mr_udb/51-PHP.usfm

238 lines
48 KiB
Plaintext

\id PHP - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h फिलिप्पैकरांस
\toc1 फिलिप्पैकरांस
\toc2 फिलिप्पैकरांस
\toc3 php
\mt1 फिलिप्पैकरांस
\s5
\c 1
\s नमस्कार
\p
\v 1 फिलिप्पै शहरातील सोबतीच्या प्रिय विश्वासणाऱ्यांनो, पौल आणि तीमथ्य आम्ही जे, येशू ख्रिस्ताची सेवा करत आहोत. आम्ही हे पत्र तुम्हा सर्वांना लिहित आहोत, जे फिलिप्पै येथे राहतात, तुम्हाला देवाने स्वतःसाठी वेगळे केले आणि येशू ख्रिस्तामध्ये संयुक्त आहात. आम्ही विशेषतः पर्यवेक्षक आणि वडीलजणांना लिहित आहोत.
\v 2 देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हावर कृपा करो आणि तुम्हास शांती देवो अशी आम्ही प्रार्थना करतो.
\s पौलाची कृतज्ञता व आनंद
\s5
\p
\v 3 जेव्हा पण मी तुमच्याबद्दल विचार करतो, तेव्हा मी त्या देवाचे आभार मानतो.
\v 4-5 आनंदाने मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही विश्वास ठेवला त्या दिवसापासून आत्तापर्यंत माझ्यासोबत, तीमथ्यासोबत आणि दुसरे जे सुवार्ता सांगतात त्यासोबत काम करत आहोत.
\v 6 मला पूर्ण खात्री आहे की जेंव्हा येशू ख्रिस्त परत येईल तेंव्हा तो त्या गोष्टी पूर्ण करेल.
\s5
\p
\v 7 तुमच्याबद्दल असे वाटणे मला योग्य आहे कारण मी तुमच्यावर मनापासून प्रीती करतो. देवाने कृपाळूपणे दिलेले कार्य करण्यासाठी तुम्ही माझे भागीदार होत आला आहात, जरी आता मी तुरूंगात आहे, किंवा मी सुवार्तेविषयी उघडपणे लोक समुदायात बोललो आणि लोकांना दाखवून दिल्या ह्या गोष्टी खऱ्या आहेत.
\v 8 मला तुमच्यासोबत राहण्याची खूप इच्छा आहे हे देव पाहतो. जसे मी तुम्हावर खूप प्रीती करतो, तसेच येशू ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो.
\s5
\p
\v 9 मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही एकमेकांवर आणखी जास्त प्रीती करावी, आणि तुम्ही हे करावे ही देवाची इच्छा आहे ह्याविषयी तुम्ही जाणून घ्यावे आणि समजून घ्यावे.
\v 10 मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की देव तुम्हाला हे ओळखण्यासाठी सक्षम बनवेल की कशावर विश्वास ठेवावा आणि उत्तम मार्गाने कार्य करण्यासाठी सहाय्य करेल. ख्रिस्त जेव्हा परत येईल तेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि दोष रहीत राहावे, यासाठी ही मी प्रार्थना करतो.
\v 11 मी आणखी अशीही प्रार्थना करतो की, तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करावे कारण येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने देवाने तूम्हाला चांगला गोष्टी दिल्या आहेत. मग इतर लोक बघतील की तुम्ही कशा रीतीने देवाचा सन्मान करत आहात.
\s पौलाच्या बंदिवासाचे परिणाम
\s5
\p
\v 12 माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, माझी इच्छा आहे की, तुम्ही ह्या अवघड गोष्टी समजून घ्याव्यात ज्या त्रासामधून मी गेलो त्यामुळे सुवार्ता सांगण्यास प्रतिबंधित केले नाही. त्याऐवजी, माझ्या कठीण परिस्थितीने मला ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी आणखी बऱ्याच लोकांना सांगण्यासाठी सक्षम बनवले आहे.
\v 13 विशेषतः रोममधील सर्व सैन्य रक्षक आणि या शहरातील इतर अनेक लोकांना आता हे समजले आहे की मी कैदी आहे कारण मी ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगतो.
\v 14 शिवाय, बरेच विश्वासणारे येशू बद्दलची सुवार्ता धैर्याने आणि निर्भयपणे घोषित करतात कारण देव त्यांना मदत करेल ह्याविषयी ते त्यावर भक्कम भरवसा ठेवतात. प्रभूने मला तुरूंगात सुवार्ता सांगण्यासाठी मदत केली आहे हे त्यांनी पाहिल्याने अधिक आत्मविश्वासाने येशूविषयी बोलतात.
\s5
\p
\v 15 काही लोक सुवार्तेची घोषणा करत आहेत कारण त्यांना हेवा वाटतो आणि विश्वासणाऱ्यांनी त्यांचा माझ्यापेक्षा जास्त आदर करावा यासाठी ते करतात. परंतु इतर जण सुवार्तेची घोषणा करत आहेत कारण ते ख्रिस्तावर प्रीती करतात आणि ज्या लोकांनी सुवार्ता ऐकली नाही त्यांनी ऐकावी यासाठी ते करतात.
\v 16 ख्रिस्तावरील प्रीतीमुळे जे सुवार्तेची घोषणा करतात त्यांना हे माहीत आहे की देवाने मला लोकांसमोर बोलण्यासाठी आणि सुवार्तेचे स्पष्टीकरण सांगण्यासाठी नियुक्त केले.
\v 17 परंतु जे स्वार्थी कारणास्तव ख्रिस्ताविषयी सुवार्ता घोषित करत आहेत त्यांना असे करण्याचे चांगले कारण नाही. मी तुरूंगात असतांना मला विश्वास आहे की ते मला अधिक त्रास देत आहेत.
\s ख्रिस्तघोषणा होत असल्याबद्दल पौलाला झालेला आनंद
\s5
\p
\v 18 पण काही फरक पडत नाही! लोक ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करत आहेत, चांगल्या कारणासाठी असो किंवा वाईट कारणासाठी असो. लोक येशू ख्रिस्ताबद्दल संदेश पसरवत आहेत! म्हणूनच मी आनंदी आहे आणि मला त्यामध्ये नेहमी आनंद राहील!
\p
\v 19 मी आनंद करेन कारण देव मला तुरुंगातून सोडवेल हे मला माहित आहे. तो हे करेल कारण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मला मदत होते.
\s5
\p
\v 20 मी काय केले पाहिजे ते मी करताना मी आढळू नये ह्याविषयी मी आतुरतेने आणि आत्मविश्वासाने अपेक्षा करतो. त्याऐवजी, मला आता संताप आला पाहीजे, जसा मला भूतकाळात आला होता. मी जगलो किंवा मेलो तरी, मी माझ्या शरीराने ख्रिस्ताला आदर देईन.
\s जीवन की मरण, कोणते चांगले?
\p
\v 21 परंतु माझ्यासाठी, मी ख्रिस्ताचा सन्मान करण्यासाठी जगतो. पण जर मी मरतो, तर ते माझ्यासाठी त्याहून चांगले राहील.
\s5
\p
\v 22 दुसरीकडे, जर मी या जगात माझ्या शरीरात जगतो, तर मी येथे ख्रिस्ताची सेवा करू शकेन. म्हणून मला जगण्यासाठी किंवा मरण्यास प्राधान्य द्यावे हे मला हे समजत नाही.
\v 23 जीवन किंवा मरण, यात कशाला प्राधान्य द्यावे हे मला समजत नाही. मी मरावे आणि या जगाला सोडून ख्रिस्ताबरोबर राहायला जावे, कारण ख्रिस्ताबरोबर राहणे हे कोणासाठीही चांगले आहे.
\v 24 पण मी येथे पृथ्वीवर जिवंत राहणे आवश्यक आहे कारण तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे.
\s5
\p
\v 25 मी यासाठी खात्री पटवली आहे, मला ठाऊक आहे तुम्हाला मदत करून आनंदी राहण्यासाठी आणि ख्रिस्तावर अधिक भरवसा ठेवण्यासाठी मी तुझ्याबरोबर जिवंत राहीन.
\v 26 म्हणून तुम्ही माझ्यासाठी आनंदी असले पाहीजे कारण ख्रिस्त येशूमध्ये मी तुम्हाकडे परत येईन.
\s धैर्य धरावे म्हणून बोध
\p
\v 27 सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांसमोर ख्रिस्ताबद्दलच्या सुवार्तेचा आदर करण्यासाठी चांगल्या प्रकारे वागा. मी तुम्हाला येऊन भेटलो किंवा नाही तरी हे करा, तुम्ही जसे जगता त्यामुळे मला आनंद होईल. त्यांनी मला सांगावे तुम्ही दोघांनी मिळून तुमच्याने होणारा विश्वासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहात आणि सुवार्ता आपल्याला जसे सांगते तसे जगू शकतो.
\s5
\p
\v 28 जे तुझ्याविरूद्ध आहेत त्यांना तुम्ही घाबरू नका! आणि जेव्हा तुम्ही त्यांना धैर्यवान प्रतिकार करता, देव त्यांचा नाश करेल परंतु तुम्हाला वाचवेल हे त्यांना तुम्ही दाखवून देता.
\v 29 देव तुमच्यावर कृपा करतो तो तुम्हास ख्रिस्ताकरिता त्रासातून जाण्याची तसेच त्याच्यावर भरवसा ठेवण्याची अनुमती देतो.
\v 30 सुवार्तेचा विरोध करणाऱ्या विरूद्ध प्रतिकार करा, तुम्ही पाहीले फिलिप्पै येथे जसे मी काही लोकांना विरोध केला त्याप्रकारे तुम्ही करा, आणि जसे तुम्ही ऐकले मी अजूनही येथे अशा लोकांना विरोध आहे.
\s5
\c 2
\s ऐक्याप्रीत्यर्थ विनंती
\p
\v 1 ख्रिस्ताने आम्हाला प्रोत्साहित केले, तो आमच्यावर प्रीती करतो आणि सांत्वन देतो, देवाच्या आत्म्याची आमच्यासोबत सहभागिता आहे, आणि ख्रिस्तापासून आमच्यासाठी खूप कृपा आहे,
\v 2 पुढील गोष्टी करून मला पूर्णपणे आनंदीत करा: एक दुसऱ्यासोबत सहमत असणे, एकमेकांवर प्रीती करणे, एका व्यक्तीसारखे कृत्य करा, आणि त्याच गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
\s नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
\s5
\p
\v 3 स्वतःला इतरांपेक्षा अधिक महत्वाचे बनवू नका आणि आपण काय करत आहात याबद्दल बढाई मारू नका. त्याऐवजी, नम्र असा, आणि विशेषतः स्वतःपेक्षा एकमेकांना अधिक सन्मान द्या.
\v 4 तुमच्यापैकी प्रत्येकाने केवळ स्वतःसाठी जे काही हवे त्याबद्दल काळजी करू नये. त्याऐवजी, तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना कशाची गरज आहे त्याविषयी त्यांना मदत करा.
\s प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
\s5
\p
\v 5 जसा येशू ख्रिस्ताने विचार केला तसाच विचार करा:
\q1
\v 6 तो देवासमान आहे तरी,
\q2 त्याने स्वतःला देवाच्या बरोबरीने ठेवण्याचा
\q2 आग्रह केला नाही.
\q1
\v 7 त्याऐवजी, देव असल्यासारखे वागणे त्याने बंद केले.
\q2 तो आम्हाला गुलाम म्हणून प्रगट झाला.
\q2 तो माणूस बनला.
\q2 तो देव होता, तरीही तो मानवी स्वरूपात प्रगट झाला,
\q1
\v 8 आणि त्याने स्वतःला लीन केले.
\q2 आणि देवाचे आज्ञापालन केले, जरी त्याला मरून जावे लागले असले तरी,
\q2 तरी सुध्दा गुन्हेगाराप्रमाणे वधस्तंभावर मरण पावला.
\s5
\q1
\v 9 म्हणून देवाने त्याला खूप मान दिला,
\q2 जगून गेलेल्या इतर कोणाहीपेक्षा त्याला जास्त सन्मानित केलेले आहे,
\q1
\v 10 प्रत्येकाने त्याचे नाव “येशू” ऐकावे जेणेकरून
\q2 त्याच्या सन्मानासाठी गुडघे टेकतील,
\q2 प्रत्येकजण स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली;
\q1
\v 11 जेणेकरून प्रत्येकजणांना माहिती असणे
\q2 येशू ख्रिस्त हा प्रभू आहे,
\q2 आणि त्याच्यामुळे त्यांना देव पित्याची स्तुती करता येते.
\s सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे
\s5
\p
\v 12 माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुमच्यासोबत असताना तुम्ही देवाची आज्ञा पाळत होता. पण आता मी तुमच्यापासून दूर झालो आहे. त्यामुळे त्याच्या आज्ञा अधिक पाळा. देवाचा आदर एकमेकांसोबत करा, नम्र असा, आणि तोपर्यंत काम करा जोपर्यंत तो तुम्हा सर्वांना वाचवत नाही.
\v 13 देव तुमच्या अंतःकरणात काम करतो कारण तुम्हास काम करण्याची इच्छा आहे आणि म्हणून त्या चांगल्या गोष्टी करा ज्या त्याला संतुष्ट करतात.
\s5
\p
\v 14 प्रत्येक गोष्ट तक्रार न करता किंवा वादविवाद केल्याशिवाय करा.
\v 15 तुम्ही अविश्वासणाऱ्या मध्ये राहता त्यामुळे तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टीचा विचार करू नका कारण त्यापैकी पुष्कळ लोक हे दुष्ट आहेत जे वाईटाला चांगले म्हणणात. अशा दुष्ट लोकांमध्ये मध्य रात्रीच्या अंधकारात चमकणाऱ्या ताऱ्यासारखे तुम्ही असावे.
\v 16 संदेशावर निरंतर विश्वास ठेवा जेणेकरून तुम्हाला कायमचे जगता येईल. जर तुम्ही हे केले, ख्रिस्त परत येईल तेव्हा मी खुप आनंदी होईन, कारण त्यावरून मला समजून येईल तुम्ही कोणामध्ये काम करत आहात.
\s5
\p
\v 17 आणि मी तुम्हा सर्वांसोबत महान आनंद करेन, जरी त्यांनी मला मारून टाकले, आणि देवापुढे अर्पण करतात त्याप्रकारे माझे रक्त त्यांनी वाहीले तरी. तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्यामुळे तुमचा जो छळ होतो ती अधिक बाजू आहे.
\v 18 त्याचप्रमाणे, तुम्हीसुद्धा, माझ्यासोबत आनंद करायला हवा!
\s तीमथ्य
\s5
\p
\v 19 मी प्रभू येशूवर विश्वास ठेवून तीमथ्याला तुमच्याकडे लवकर पाठवतो. मला आशा आहे जेव्हा तो परत येईल, तेव्हा देव तुमच्या जीवनात कसे कार्य करत आहे याबद्दल सांगून मला प्रोत्साहन देईल.
\v 20 तीमथ्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणीही नाही जे यथार्थपणे तुमची काळजी घेईल.
\v 21 ज्या इतरांना मी तुम्हाकडे पाठवू शकेन ते फक्त स्वतः:च्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या बद्दलच चिंता करतात. येशू ख्रिस्ताला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल त्यांना पुरेशी चिंता नाही.
\s5
\p
\v 22 परंतु तीमथ्याने हे सिद्ध केले आहे तो प्रभूवर प्रीती करतो, कारण लहान मुलगा ज्याप्रमाणे वडिलांबरोबर काम करतो त्याचप्रमाणे त्याने माझ्याबरोबर सुवार्ता सांगण्याची कामे केली होती.
\v 23 मला लवकरच तुमच्याकडे तीमथ्याला पाठवण्याची अपेक्षा आहे, माझ्यासोबत काय होईल हे मला माहित आहे.
\v 24 आणि देवाला हेच करण्याचे आहे असा मी विश्वास ठेवतो, मला लवकरच सोडण्यात येईल याविषयी खात्री आहे, आणि मग मी स्वतः तुमच्याजवळ येईन.
\s एपफ्रदीत
\s5
\p
\v 25 एपफ्रदीतला तुम्हाकडे परत पाठवावे असा माझा विश्वास आहे. तो माझा सहकारी आणि आपल्या सहविश्वासू बंधू व ख्रिस्ताचा सैनिक आहे, आणि तो तुमचा संदेशवाहक आणि सेवक ज्याला माझ्या गरजेच्या वेळी मदत करायला तुम्ही पाठवले.
\v 26 जेव्हा एपफ्रदीत शिकला जेव्हा तुम्हाला समजले तो आजारी आहे, तो खुप चिंतीत झाला आणि फिलिप्पै येथे राहणाऱ्या सर्वांसोबत राहण्यास इच्छा बाळगू लागला.
\v 27 खरंच, तो खुपच आजारी पडला आणि मरणास टेकला होता, परंतु तो मेला नाही. खरोखर, देव त्याच्यावर खुपच दयाळू होता आणि माझ्यासोबतही तसाच होता, म्हणून मला खूप दुःखी होण्याचे कारणच राहणार नाही.
\s5
\p
\v 28 म्हणून मी त्याला तुमच्याकडे पुन्हा लवकरात लवकर पाठवीत आहे. तुम्ही त्याला पुन्हा पाहून आनंद करू शकाल यासाठी मी हे करतो, आणि मला कमी दुःख होईल.
\v 29 आपल्यात जो महान आनंद आहे त्याने एपफ्रुदीताचे स्वागत करा कारण प्रभू येशू आपल्यावर प्रीती करतो. आणि इतर विश्वासणाऱ्यांप्रमाणे त्याचा आदर करा.
\v 30 तो ख्रिस्तासाठी काम करत असतांनाच, तो जवळ जवळ मरण पावला असता. मला ज्या गोष्टींची गरज होती त्या पुरवण्यासाठी त्याने आपला जिव धोक्यात घातला होता, तुम्ही माझ्यापासून दूर आहात त्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही.”
\s5
\c 3
\s ख्रिस्तप्राप्तीपुढे जात, कुळ, विद्या वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही
\p
\v 1 शेवटी, माझ्या प्रिय विश्वासणाऱ्यांनो, नेहमी आनंद करत रहा कारण तुम्ही प्रभूचे आहात. पूर्वी सांगितलेल्या त्याच गोष्टीविषयी मी तुम्हाला लिहित आहे, हे मला थकवत नाही, आणि ते तुम्हाला हानी करू इच्छिणाऱ्या पासून तुमचे रक्षण करेल.
\p
\v 2 जंगली कुत्र्यांप्रमाणे जे तुमच्यासाठी धोकादायक आहेत अशा लोकांपासून सावध रहा. ते केवळ यहूदी बनविण्यासाठी पुरुषांच्या शरीराचे मांस कापतात.
\v 3 परंतु आमच्यासाठी—देवाचा आत्मा आम्हाला देवाची खरी उपासना करण्यास सहाय्य करतो; आम्ही आनंदी आहोत कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये विश्वास केला आहे; आणि जे लोक रीतिरिवाज किंवा समारंभ करतात त्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. ह्यामुळे सुंता होणे हे आमच्या स्वतःसाठी किती खरे होते.
\s5
\p
\v 4 देवाला संतुष्ट करण्यासाठी पुऱ्याशा गोष्टी कोणी केल्या असेल, तर तो मी आहे.
\p
\v 5 माझ्या जन्मानंतरच्या सातव्या दिवशी त्यांनी माझी सुंता केली. माझा इस्राएलाचा एक नागरिक म्हणून जन्म झाला. मी बन्यामीन कुळातील आहे. माझ्या स्वतःपेक्षा अधिक हिब्रू असा व्यक्ती तुम्ही शोधू शकत नाही! माझे पूर्वज इब्री होते. आणि मोशेचे नियम जे परूश्यांनी मला शिकवले आणि माझ्या पूर्वजांनी जे शिकवले ते मी पाळत आलो आहे.
\s5
\p
\v 6 मी लोकांनी कायद्यांचे पालन करावे म्हणून प्रोत्साहन दिले त्यामुळे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा मी छळ केला. मी नियमशास्त्राचा अवमान केला असे कोणीही म्हणू शकत नाही.
\s ख्रिस्त प्राप्ती करता पौलाला लागलेली उत्कंठा
\p
\v 7 परंतु तेव्हा ज्या सर्व गोष्टींना मी महत्वाची जागा द्यायचो त्या आत्ता मी तुच्छ लेखतो. कारण ख्रिस्ताने मला बदलले आहे.
\s5
\p
\v 8 त्याऐवजी, इतकेच नव्हे तर आता मी सर्व गोष्टींना फक्त निरुपयोगी म्हणूनच विचार करतो. परंतु कचरा हा फेकण्यासाठी आहे, त्या तुलनेत माझ्या प्रभू ख्रिस्त येशूबद्दल जाणून घेणे किती महान आहे. ख्रिस्ताकडून लाभ घेण्यासाठी, मी माझ्या आयुष्यातून सर्वकाही निरर्थक गोष्टी काढून टाकल्या आहेत.
\v 9 मी आता पूर्णपणे ख्रिस्ताशी संबंधित आहे. मला ठाऊक आहे नियमशास्त्र पाळण्याद्वारे मी देवाच्या दृष्टीत स्वतःला चांगले करू शकत नाही. त्याऐवजी मी पूर्णपणे ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणून देवाने मला त्याच्या दृष्टीने चांगले घोषित केले आहे.
\v 10 जेव्हा देवाने मला त्याच्या दृष्टीने चांगले घोषित केले, मी ख्रिस्ताविषयी अधिक माहित करणे सुरू केले त्यामुळे ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. आणि ख्रिस्ताचा जन्म होण्याकरिता ख्रिस्ताने मला निवडले.
\v 11 त्यामुळे मी पूर्ण अपेक्षाने देवावर विश्वास ठेवला, जसे देवाने वचन दिले आहे त्याप्रमाणे तो मला पुन्हा जगू देईल.
\s5
\p
\v 12 या सर्व गोष्टी माझ्यासोबत अद्याप पूर्ण झाल्या आहेत मी असा दावा करत नाही. परंतु या गोष्टी प्राप्त करण्यास प्रयत्न करत राहतो, कारण ह्या गोष्टीमुळे ख्रिस्त येशू माझा ताबा घेतो.
\v 13 माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, मी अजूनही ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत पूर्ण झाल्या आहेत असा विचार करू शकत नाही. परंतु मी एका धावपटूप्रमाणे आहे, कारण मी अंतिम रेषेकडे धावत असतांना मागे वळून पाहत नाही.
\v 14 त्याऐवजी, मी पारितोषिक जिकंण्यासाठी, मी अंतिम रेषेकडे धावत आहे, जे देवासोबत सर्वकाळ जगण्यासाठी आहे. यासाठी देवाने मला बोलाविले आहे, आणि ख्रिस्त येशूने काम पूर्ण केले आहे.
\s5
\p
\v 15 म्हणून आपण सर्व जे विश्वासात मजबूत झालो आहेत त्या सर्वांचा एकच विचार पाहिजे. पण तुम्हापैकी कोणी असा विचार करत नाही तर, देव तुम्हाला हे प्रकट करेल.
\v 16 जे आता आम्हाबद्दल खरे आहे, मात्र आतापर्यंत आम्ही आलो आहे, आपण आता पर्यंत जसा त्यावर विश्वास ठेवला तसाच अधिक आणि अधिक ख्रिस्तावर विश्वास ठेवू.
\s पौलाचे अनुकरणीय उदाहरण
\s5
\p
\v 17 माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, माझ्यासोबत जोडले जा आणि माझे अनुकरण करा, आणि माझ्यासारखे जीवन जगणऱ्याचे निरीक्षण करा, आणि आमच्या ह्या उदाहरणाचे अनुकरण करा.
\v 18 तिथे बरेच लोक असे आहेत जे म्हणतात आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, परंतु आपल्यासाठी वधस्तंभावर त्याने जे केले त्याला ते विरोध करतात. मी तुम्हाला अशा लोकांविषयी अनेक वेळा सांगितले आहे, आणि त्याविषयी मी तुम्हाला पुन्हा सांगताना, मी आता रडत आहे, दुःखी आहे.
\v 19 शेवटी देव त्यांचा नाश करेल कारण त्यांची खाण्याची इच्छा हे त्याचे दैवत आहे, आणि ते निर्लज्जपणाने जगतात आणि जगीक गोष्टींचा विचार करतात.
\s ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे
\s5
\p
\v 20 आम्हासाठी, आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. हे आम्ही उत्सुकतेने परत आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त वाट पाहत आहोत.
\v 21 आता आपण असलेले अशक्त आणि नम्र शरीरे, तो बदलणार आहे, त्याच्या स्वतःच्या शक्तिशाली शरीराप्रमाणे तो बदलणार आहे. हे तो नियंत्रण करणाऱ्या त्याच शक्तीने तो असे करेल.
\s5
\c 4
\s सदबोध
\p
\v 1 माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, मी तुमच्यावर प्रीती करतो आणि मी तुमच्यासाठी लांब आहे. तुम्ही मला आनंद देता; देव मला प्रतिफळ देईल त्याचे कारण तुम्ही असाल. प्रिय मित्रांनो, जसे मी तुम्हाला सुरूवातीच्या पत्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर विश्वास ठेवा.
\p
\v 2 मी युवदीयेला विनंती करतो, आणि सुंतुखेला विनंती करतो, परत एकमेकांशी शांततापूर्ण संबंध ठेवा, कारण ख्रिस्तामध्ये तुम्ही एकत्र आहात.
\v 3 आणि माझ्या विश्वासामध्ये भागीदार असणाऱ्यांना पण विनंती करतो, कृपया या स्त्रीला मदत करा. त्यांनी विश्वासूपणे सुवार्तेची घोषणा केली आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे, क्लेमेंतासोबत आणि उरलेले माझे सहकारी मजूर, ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, ज्या पुस्तकात देवाने त्या सर्व लोकांची नावे लिहून ठेवली जे निरंतर जगणार आहे.
\s5
\p
\v 4 प्रभू येशूसाठी नेहमी आनंद करा! मी पुन्हा म्हणेन, आनंद करा!
\v 5 सर्व लोकांनी नक्कीच हे पाहावे की तुम्हीही सौम्य आहात कारण देव जवळ आहे.
\v 6 कशाचीही काळजी करू नका. त्याऐवजी, प्रत्येक परिस्थितीत देवाकडे प्रार्थना करा, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे ते त्याला सांगा, आणि त्याला मदत करण्यासाठी सांगा. आणि तुमच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी देवाचे आभार माना.
\v 7 मग देवाची शांती, तुम्हाला समजते त्यापेक्षा ती खूप मोठी आहे, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये सामील झालो, आमच्या भावना आणि आमचे विचार कसे आहेत याचे रक्षण करणाऱ्या सैनिकाप्रमाणे असतील.
\s5
\p
\v 8 शेवटी, माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, जे काही सत्य आहे, जे काही लोकांचा आदर करण्यास पात्र आहेत, जे बरोबर आहे, ज्यामध्ये काही चूक आढळू शकत नाही, जे काही सुखकारक आहे, ज्या काही लोकांना प्रशंसा पाहिजे, जे काही चांगले आहे, जे लोक त्याची स्तुती करण्यास पात्र आहेत: या गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करत असायला हवे.
\v 9 ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवितो आणि त्या तुम्ही ग्रहण केल्या, त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवितांना त्या तुम्ही ऐकल्या आणि त्या करताना तुम्ही मला पाहिले, त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः करा. मग देव, जो आम्हाला शांती देतो, तो तुझ्यासोबत असेल.
\s फिलिप्पैकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता
\s5
\p
\v 10 मी खूप आनंद करतो आणि प्रभूचे आभार मानतो, कारण काही काळानंतर, आत्ता तुम्ही मला पैसे पाठवले आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्याबद्दल तुम्ही चिंतित आहात हे मला दाखवून दिले आहे. खरंच, तुम्ही माझ्याबद्दल नेहमीच चिंता करत असता, परंतु तुमच्याकडे ती दाखविण्याची संधी मिळत नसते.
\v 11 मला कशाची गरज आहे म्हणून मी हे बोलत नाही. खरं तर, जे काही आहे त्यात तृप्त राहण्यास मी शिकलो आहे.
\v 12 मी गरजू असू शकतो किंवा मला भरपूर असू शकते. सर्व परिस्थितीत समाधानी कसे राहायचे ते मी शिकलो आहे. मला प्रत्येक वेळी आनंदी कसे रहायचे याचे रहस्य ठाऊक आहे.
\v 13 मी सर्व काही करण्यास तयार आहे कारण ख्रिस्त मला शक्ती देतो.
\s5
\p
\v 14 असे असले तरी, माझ्या कठीण परिस्थितीत माझ्याबरोबर वाटून घेण्यासाठी तू योग्य गोष्ट केलीस.
\p
\v 15 फिलिप्पै येथील माझ्या मित्रांनो, तुम्हा स्वतः त्या वेळेची माहीती आहे की मी सर्वप्रथम तुम्हाला सुवार्ता सांगितली, जेव्हा मी मासेदोनियाच्या प्रातांमधून जाण्यास निघालो, फक्त तुम्हाला वगळता विश्वासणाऱ्यांच्या मंडळीने मला पैसे पाठवले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे मला मदत केली नाही!
\v 16 मी जेव्हा थेस्सलनीका शहरात होतो तेव्हापण, माझ्यासाठी तुम्ही पैसे पाठवून मला ज्याची गरज होती त्यापेक्षा अधिक वेळा भागवली आहे.
\v 17 मला इच्छा आहे की तुम्ही मला पैसे द्यावे म्हणून मी हे सांगत नाही, त्याऐवजी, देवाने तुमच्यासाठी स्तुती करावी हे पाहण्याची माझी इच्छा आहे.
\s5
\p
\v 18 माझ्याकडे आता भरपूर गोष्टी आहेत. माझ्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत ज्या एपफ्रदीतच्या द्वारे तुम्ही मला पाठवल्या आहेत. या गोष्टी अशा आहेत जेव्हा याजक देवाला एका पशूचे बलिदान अर्पण करतो आणि त्याला त्याचा चांगला सुगंध करतो.
\v 19 देव, ज्याची मी सेवा करतो, तो तुम्हाला सर्व गोष्टी पुरून देईल कारण तुम्ही येशू ख्रिस्ताच्या मालकीचे आहात, कोणाला स्वर्गीय वैभव आणि संपत्तीची मालकी हवी आहे.
\v 20 म्हणून देव आमचा पिता ह्याचे गौरव करा जो आमच्यावर युगानुयुग राज्य करेल आणि लखलखीत प्रकाशात! आमेन!
\s समारोप
\s5
\p
\v 21 माझ्याकडून सर्व विश्वासणाऱ्यास शुभेच्छा द्या. ते सर्व देवाच्या मालकीचे आहेत! तसेच, माझ्याबरोबरचे विश्वासणारे तुला शुभेच्छा देतात.
\v 22 देवाचे सर्व लोक जेथे आहेत तुम्हाला शुभेच्छा देतात. विशेषतः कैसर, सम्राटच्या राजवाड्यात काम करणाऱ्या सहविश्वासू, तुम्हाला त्यांच्या शुभेच्छा देतो.
\p
\v 23 आपला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या दिशेने निरंतर त्याची कृपेची कृत्य करत राहो हीच माझी इच्छा आहे.