mr_udb/50-EPH.usfm

290 lines
70 KiB
Plaintext

\id EPH - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h इफिसकरांस
\toc1 इफिसकरांस
\toc2 इफिसकरांस
\toc3 eph
\mt1 इफिसकरांस
\s5
\c 1
\p
\v 1 विश्वासातील प्रिय बंधूनो, ज्यांना देवाने आपणासाठी वेगळे केले, ज्यांचा विश्वास ख्रिस्ताच्या ठायी आहे, जे इफिसास राहणारे; त्यांस मी पौल, ज्याला देवाने निवडून ख्रिस्त येशूचा प्रेषित असे तुम्हांकडे पाठवले.
\v 2 तो मी, अशी प्रार्थना करतो की, देव जो आपला बाप आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू, ह्यांची करुणा व शांती तुम्हास लाभो.
\s5
\p
\v 3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, देव धन्यवादित असो! कारण तो आम्हासाठी प्रत्येक स्वर्गीय, आत्मिक आशीर्वादांच्याद्वारे महान आनंदास कारणीभूत ठरला आहे, जो की ख्रिस्त येशूने आम्हास दिला.
\v 4 जग निर्माण करण्याआधीच ख्रिस्त येशूच्याद्वारे, देवाने आंम्हास त्याचे लोक होण्यास निवडले आहे, अशासाठी की जो आम्हांस देवासाठी वेगळे करतो त्याच्या दृष्टीस आपण निर्दोष असे जगावे.
\s5
\v 5 तो आपणावर प्रेम करतो ह्या कारणास्तव, ख्रिस्त येशू्च्याद्वारे देवाने फार पूर्वीच आम्हांला त्याची मुले म्हणून दत्तक घेतले. त्याने आपल्याला दत्तक घेण्याची योजना आखली कारण असे करणे त्याला आनंददायी वाटले, की आपण त्याची मूले व्हावे, म्हणून त्याने जे इच्छीले तेच केले.
\v 6 आपण आता त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हांस दिलेल्या अद्भुत कृपेबद्दल देवाची स्तुती करतो, अशी प्रेमदया ज्यास आपण पात्रसुद्धा नाही.
\s5
\p
\v 7 गुलामास (गुलामीच्या) बाजारपेठेतून विकत घेऊन त्यास स्वतंत्र करावे, तसे येशूने आम्हास स्वतंत्र केले आहे. त्याच्या मरणाद्वारे त्याने आम्हास स्वतंत्र केले, अशासाठी की, देवाने आमच्या पापांची क्षमा करावी, कारण तो आमच्यावर अतिशय दयाळू असा आहे.
\v 8 तो आमच्यावर फार दयाळू असून त्याने आम्हांस शहाणपणहि दिले आहे.
\s5
\v 9 ख्रिस्ताला प्रकट करणे जसे त्याला आनंदाचे वाटले, असेच देवाने त्याचे गुपित आता समजावले आहे.
\v 10 देवाने त्या वेळी नियोजन केले की, त्याने नियुक्त केलेल्या स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टींना एकत्रित करील, आणि ख्रिस्त एक असा असेल की जो त्यांवर अधिकार करील.
\s5
\v 11 त्याने योजल्याप्रमाणे आणि आपल्या मनाच्या संकल्पणेप्रमाणे, फार पूर्वी देवाने आपणास ख्रिस्ताशी जुळण्यास निवडले आहे.
\v 12 त्याने हे यासाठी केले की, यहूदी, जे आत्मविश्वासाने अपेक्षा करत होते की मसीहा येऊन ज्यांना ख्रिस्त माहित नाही अशा यहूदी नसलेल्या लोकांच्या आधी पहिल्याने ह्यांना वाचवेल, अश्यांसाठी त्याने हे केले, म्हणजे ते त्याच्या दयेबद्दल त्याची स्तुती करतील.
\s5
\v 13 तर आता अहो, इफिसकर आणि यहूदी नसलेले लोकहो, तुम्ही सत्य वचन आणि शुभवर्तमान ऐकला आहे, तो असा, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. आणि तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, अशासाठी की देवाच्या आत्म्याने तुमच्यावर अभिवचनाचा शिक्का मारून तुम्ही देवासाठी वेगळे केले आहा असे दाखवावे.
\v 14 देवाने आपल्यासाठी देऊ केलेल्या सर्व वचनांचा पवित्र आत्मा हा साक्षीदार आहे. हे सर्वकाही त्याचा धन्यवाद करण्यासाठी खूप कारणीभूत आहेत.
\s देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना
\s5
\p
\v 15 देवाने तुमच्या करता खूप काही केल्या कारणाने, तुम्ही प्रभू येशूवर कसा विश्वास ठेवला आणि देवाच्या सर्व निवडलेल्यांवर तुम्ही कशी प्रिती केली, ह्याबद्दल मी ऐकले आहे.
\v 16 मी तुमच्या करता देवाजवळ प्रार्थनेत धन्यवाद देण्यास खंड पडू दिला नाही.
\s5
\v 17 देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, वैभवी प्रकाशात राहणारा, त्याजकडे मी अशी प्रार्थना करतो की, तो तुम्हास सुज्ञपणे विचार करण्यास आणि जे काही तो तुम्हास प्रगट करतो ते सर्व काही समजण्यास मदत करो.
\v 18 मी तुमच्या करता अशीही प्रार्थना करतो, देव आपणाला असे शिक्षण देवो की तो आपणाकरिता काय करू इच्छीत आहे, आणि तो का सत्य बोलत आहे ते आपण त्याच्या निवडलेल्यांनी जाणावे. आणि आपल्याला ज्या काही महान गोष्टी देण्याविषयी त्याने जे वचन दिले ते किती महान आहेत ते आपल्याला कळावे आणि तो निवडेल तो प्रत्येकजण त्याच्या मालकीचा आहे हे आपण जाणावे.
\s5
\v 19 त्याचबरोबर मी अशीही प्रार्थना करतो की, ज्या प्रकारे देवाचे सामर्थ्यशाली कृत्ये ख्रिस्त मेला असताही पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत ठरले, आणि त्याला स्वर्गात सर्वोच्च गौरव स्थानावर नेले.
\s ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य
\p
\v 20 तसेच ख्रिस्ताच्याठायी जे विश्वास ठेवतात, त्या आपणासाठी देव किती सामर्थ्यशाली आहे ते तुम्हास कळावे.
\v 21 त्या ठिकाणी, ख्रिस्त प्रत्येक सामर्थ्यशाली आत्म्यावर अधिकाराच्या प्रत्येक स्तरावर आणि अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक नावावर सर्वोच्च म्हणून राज्य करतो. येशू आताच नव्हे तर सदासर्वकाळ कुठल्याही मानवा पेक्षा कितीतरी जास्त थोर आहे.
\s5
\v 22 देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या अधिसत्तेखाली केले आहे, ते जणू काही सर्व त्याच्या पायाखाली आहे. त्याचबरोबर देवाने ख्रिस्ताला सर्व विश्वासणाऱ्या मंडळीवर, अधिकारी असे नेमले आहे.
\v 23 हे अशासाठी की सर्व विश्वासणारे ख्रिस्ताचे एकत्र शरीर आहे. ज्या प्रकारे तो सर्व ब्रम्हांडास आपल्या सामर्थ्याने भरतो, त्याच प्रकारे तो सर्व विश्वासणाऱ्यांना ज्याठिकाणी ते आहेत तेथे आपल्या सामर्थ्याने भरतो.
\s5
\c 2
\s देवाच्या कृपेने तारण मिळते
\p
\v 1 ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही देवाला अनुसरण्यास शक्तीहीन व जणुकाय मेलेले असे होता.
\v 2 ज्यांना आपण पाहू शकत नाही असा दुष्ट आत्मा दुष्ट आत्म्यांवर सत्ता चालवणारे, असे तुम्ही पूर्वी सैतानाचे अनुकरण करीत असलेल्या आजच्या जगातील बहुतेक लोकांसारखे जे आता सैतानाचे अनुकरण करतात, त्यासारखे जगला. सैतान हा दुष्ट आत्मा आहे जो आता देवाला जे अनुसरत नाहीत, त्यांना नियंत्रित करीतो.
\v 3 आपणही कधीकाळी देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणारे, मनात वाईट इच्छीणारे आणि आपल्या शरीरास व मनास आनंद देणाऱ्या गोष्टी करणारे असे होतो. म्हणून इतरांप्रमाणे, देव, आमच्यावर फार रागावला होता.
\s5
\p
\v 4 परंतु देव आपल्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याची कृत्ये फार दयाळू आहेत.
\v 5 देवाला अनुसरण्यास आपण मेलेले, शक्तीहीन असे होतो, परंतु त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये सामील करून आम्हांला पुन्हा जगण्याकरता जिवंत केले. देवाने आपल्याला ह्यासाठी तारले कारण तो आपल्यावर खूप प्रेम करतो.
\v 6 त्याने आपल्याला अशा लोकांतून उठवले आहे, जे मेलेल्यांसारखे होते, आणि स्वर्गीय ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठी त्याने आपल्यास सन्मानाची आसने दिली.
\v 7 त्याने हे अशासाठी केले की तो आपल्याप्रती किती दयाळू आहे हे भविष्यात कळावे, कारण आपण ख्रिस्त येशूसोबत सामील झाले आहोत.
\s5
\p
\v 8 तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्याद्वारे, देवाने त्याच्या अती दयाळूपणाने तुम्हाला त्याच्या शिक्षेपासून तारले आहे. आम्ही स्वत:ला वाचविले नाही; तर ही देवाकडून भेट आहे.
\v 9 एक अशी भेट जी कोणीही कमवू शकत नाही, हे अशासाठी की कोणीही बढाई मारून असे म्हणू नये की त्याने आपणास स्वत: तारले आहे.
\v 10 म्हणून देवाने आपणास ख्रिस्त येशूमध्ये सामील होण्यास नविन लोक असे निर्माण केले आहे, अशासाठी की आपण चांगली कामे करावी, अशी कामे जी देवाने फार पूर्वीच आपल्यासाठी नेमून ठेवली आहेत.
\s यहूदी व यहूदीतर ह्यांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य झाले आहे
\s5
\p
\v 11 तुम्ही यहूदी नसल्याकारणाने जे तुम्ही यहूदी नसलेले विश्वासी होता, त्यांना अलीकडेच उपरी म्हटले जायचे, हे तुम्ही विसरता कामा नये, कारण तुम्ही यहूदी म्हणून जन्माला आले नव्हते. “सुंता न झालेले मूर्तिपूजक;” असे ते तुम्हास चिडवायचे, ते स्वत:ला सुंता झालेले, ह्याचा अर्थ असा होतो की फक्त तेच देवाचे लोक आहेत तुम्ही नाही असे म्हणायचे. जरी सुंता हे फक्त असे काही आहे की जे मनुष्य करतात, देव नाही.
\v 12 त्यावेळी, खऱ्या देवाबद्दल जाणून घेतल्याशिवाय तुम्ही देवाच्या, इस्राएली समुदायात सामील होऊ शकत नव्हते, किंवा देवाने त्याच्या करारात त्यांना देऊ केलेले वचन तुम्ही प्राप्त करू शकत नव्हते. आपण या जगात देवावर विश्वास ठेवण्याची अपेक्षा देखील करू शकत नव्हतो कारण देव कोण आहे हे तुम्हास ठाऊकही नव्हते.
\s5
\v 13 परंतु आता ख्रिस्त येशूने जे काही केले, त्याद्वारे तुम्ही त्याच्याठायी विश्वास ठेवण्यास पात्र झाला, कारण ख्रिस्त वधस्तंभावरील मरणास सहमत झाला.
\v 14 ख्रिस्ताने यहूदी आणि यहूदी नसलेल्या मधील असणारी भिंत पाडण्याच्या द्वारे, त्यांच्यामध्ये शांती व एकता आणली, त्याने लोकांमधील दुरावा निर्माण करणाऱ्या द्वेषाचा अडथळा नष्ट केला आहे.
\v 15 त्याने आपल्याकरिता यहूदी नियमशास्त्र आणि आज्ञा पाळणे हे आवश्यक नाही असे केले. त्याने यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघे, यांमध्ये शांती प्रस्थापित करून आपणास एक लोक असे केले.
\v 16 यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघेही एकत्रित विश्वासणाऱ्यांचा एक नविन गट, देवाचे मित्र होण्यास, येशू हा कारणीभूत ठरला आहे. त्यांनी एकमेकांचा राग करणे थांबवावे हे येशूच्या वधस्तंभावरच्या मरण्याद्वारे शक्य झाले.
\s5
\v 17 देवासोबत शांती घेऊन येणारा, असा शुभवर्तमान येशूने येऊन सांगितला; त्याने तो, जे तुम्ही यहूदी नसलेले, ज्यांना देवाबद्दल कळले नव्हते आणि आंम्हा यहूदीयांसाठीही ज्यांना देव माहित आहे, अशा दोघांसही घोषीत केले.
\v 18 यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघेही आता येशूच्याद्वारे पित्यासोबत बोलू शकत होते, कारण देवाचा आत्मा सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये वसती करतो.
\s5
\p
\v 19 म्हणून आता यहूदी नसलेले असे तुम्ही, देवाच्या लोकांसाठी अनोळखी आणि परदेशी असे राहिला नाहीत, परंतु याउलट देवाने स्वत:साठी वेगळे केलेल्यांसोबत तुम्ही मित्र व सहकारी झाला आहात, आणि ज्या कुटूंबाचा देव हा पिता आहे त्या कुटूंबाशी तुमचा संबंध आहे.
\v 20 तुम्ही दगडाप्रमाणे आहात, ज्याला देवाने त्याच्या इमारतीमधील भाग असे केले आहे, आणि ही इमारत संदेष्टे आणि प्रेषित यांच्या शिकवणूकी वर बांधण्यात आली आहे. परंतु सर्वात महत्वाचा दगड, ज्याला कोनशीला असे म्हणतात, तो ख्रिस्त येशू स्वत: आहे.
\v 21 ज्याप्रमाणे मंदिराच्या निर्माणासाठी दगडांना एकत्र रचून त्या द्वारे ते बांधण्यात येते, त्याचप्रमाणे येशू नविन विश्वासणाऱ्यांना स्वत:साठी वेगळे करण्याद्वारे आपले कुटूंब बांधत आहे, ज्यामध्ये लोक जोडण्याद्वारे एका मंदिराचे निर्माण होते.
\v 22 जे आपण यहूदी आणि यहूदी नसलेले अशा दोघांसही देव एकत्र कुटंबात निर्माण करत आहे. ज्यामध्ये देवाचा आत्मा वसती करतो, कारण देवाचा आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये वसती करतो.
\s5
\c 3
\s देवाच्या रहस्याचे प्रकटीकरण करणाऱ्या कार्यावर पौलाची रवानगी
\p
\v 1 देवाने ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी केल्या, या कारणास्तव मी पौल, तुम्हा गैर यहूद्यांसाठी येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे.
\v 2 तुमच्याकरता काम नेमून दिल्याद्वारे देवाने मला सन्मानित केले आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच असे मी गृहीत धरतो.
\s5
\v 3 मी तुम्हाला थोडक्यात नमूद केलेल्या गुपित सत्यामुळे त्याने मला हे काम दिले;
\v 4 त्या बद्दल मी आधीच थोडक्यात जे काही लिहिलेले तुम्ही वाचाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येणार की, मी देवाची सत्यता स्पष्टपणे समजून घेतली आहे.
\v 5 पूर्वीच्या काळी, देवाने शुभवर्तमान ज्या कोणाकडे येणार त्याला ते पुर्णपणे प्रगट केले नव्हते. ते असे काही होते की त्याला कोणीही समजू शकत नव्हते, परंतु आता त्याच्या आत्म्याने प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना जे आत्म्यात देवाची सेवा करण्यास बोलावले आहेत, त्यांना शुभवर्तमान प्रगट केले आहे.
\s5
\v 6 ते लपलेले सत्य हे आहे की, यहूदी नसलेले देखील यहूद्यांसोबत देवाच्या आत्मिक संपन्नतेत भागीदार होऊन देवाच्या कळपात सामिल होतील आणि देवाने त्यांना वचन दिलेल्या गोष्टीत ते भागीदार असतील, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, हेच शुभवर्तमान आहे.
\v 7 तर आता ज्या कामास मी योग्य नाही, ते शुभवर्तमान पसरविण्यास मी देवाचा सेवक आहे, परंतु जे देवाने मला दिले, त्याच्या सामर्थ्याने ते माझ्यामध्ये कार्य करत आहे.
\s5
\p
\v 8 जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये किमान योग्यतेचा आहे, तरी देवाने त्याच्या दयेमुळे आणि कृपेमुळे, ख्रिस्ताने जे आपणासाठी केले हा शुभवर्तमान घोषीत करण्यास मला सक्षम केले आहे, ते इतके विपूल आहे की कोणीही त्याचे वर्णन करू शकत नाही.
\v 9 माझे कार्य हे आहे की देवाची योजना जी त्याने फार पूर्वी सर्वकाही निर्माण करण्याआधी आपणाजवळून खूप काळ लपवून ठेवली ती प्रत्येकास समजून सांगावी.
\s5
\v 10 देवाने जे ज्ञानाने योजीले, ते ख्रिस्तावर भरवसा ठेवणाऱ्या आपल्या लोकांद्वारे स्वर्गीय शक्तिशाली देवदूतांनाही ते दर्शविले आहे.
\v 11 देव नेहमीच अनंतकाळसाठी योजना आखत असतो, आणि ह्या योजना त्याने येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या कृतीद्वारे पूर्णत्वास नेले.
\s5
\v 12 म्हणून आता आपण प्रार्थना करतो त्यावेळेस, देवाकडे आत्मविश्वासाने आणि न घाबरता येऊ शकतो, कारण आपण येशू मध्ये विश्वास करतो, ज्याने देवाची योजना पुर्णत्वास नेली.
\v 13 म्हणून आता मला झालेल्या तुरूंगातील पुष्कळ यातनांनी तुम्ही निराश होता कामा नये, कारण माझ्या तुरूंगातील यातना तुम्हास प्रौढत्वामध्ये वाढण्यास मदत करतील.
\s हृदयामध्ये ख्रिस्ताने येऊन रहावे म्हणून प्रार्थना
\s5
\p
\v 14 कारण देवाने ह्यासर्व गोष्टी तुमच्याकरता केल्या आहेत, म्हणून मी देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो.
\v 15 तोच एक असा आहे, जो सर्व विश्वासणाऱ्यांचा जे आता स्वर्गात आणि पृथ्वीवर आहेत, त्या सर्वांचा पिता आहे, तोच सर्व प्राणीमात्रांचा व मानव जातीचा निर्माणकर्ता आहे.
\v 16 त्याच्या थोर सामर्थ्यामुळे मी अशी प्रार्थना करतो की, देवाचा आत्मा जो तुमच्या आत्म्यामध्ये वस्ती करतो, त्याद्वारे तो तुम्हास सामर्थ्यवान आणि मजबूत करो.
\s5
\v 17 तुमचा विश्वास त्याच्याठायी असल्या कारणाने, मी अशी प्रार्थना करतो की ख्रिस्त तुम्हा मध्ये वास करो, अशासाठी की तुम्ही झाडाप्रमाणे घट्ट असे मूळावलेले आणि खडकावर पाया रचलेल्या इमारती प्रमाणे व्हावे,
\v 18 ते यासाठी की, देवाच्या पसंतीस उतरलेल्यांसोबत तुम्हीही पुर्णपणे समजण्यास सक्षम व्हावे, की ख्रिस्ताचे प्रेम हे किती विस्तीर्ण, किती उंच, किती सखोल आहे.
\v 19 कारण हे प्रेम फार महान असल्याकारणाने ते आपल्या समजण्यापलीकडे, परंतु ह्या प्रेमाखातीर, मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तो तुम्हास स्वत:ने भरून टाकावे.
\s5
\p
\v 20 कारण आपल्यामध्ये कार्य करीत असलेल्या सामर्थ्याद्वारे, ज्या सामान्य गोष्टी आम्ही त्याला मागतो त्यापेक्षाही मोठ्या करण्यास देव सक्षम आहे. आपल्या कल्पनांपेक्षाही तो थोर गोष्टी करण्यास सक्षम आहे.
\v 21 येशू ख्रिस्ताच्या द्वारे एकत्रित जमलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांनी सर्व गोष्टीच्या पलिकडे देवाचे गौरव केलेच पाहिजे. इतिहासातील विश्वासणाऱ्या सर्व पिढ्या त्याचे सदासर्वकाळ गौरव करा. हे असेच होवो.
\s5
\c 4
\s मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे म्हणून सदस्यांमध्ये एकी असावी
\p
\v 1 म्हणूनच, येशू ख्रिस्ताचे नाव घोषीत केल्यामुळे, ह्या कैदेतून ज्यामध्ये मी आहे, मी तुम्हाला विनंती करतो की, देवाच्या पसंतीस उतरलेल्यांनी, येशूचा, ज्याने तुम्हाला बोलाविले आहे, त्याचा आदर होईल असे जीवन जगावे.
\v 2 नम्रतेने आणि संयमपूर्वक आणि धैर्याने एकमेकांच्या गरजा पुरवा कारण आपण एकमेकांवर प्रेम करतो.
\v 3 शांततेत एकमेकांशी एकत्र राहण्याद्वारे, तुम्ही एकमेकांबरोबर एकतेने राहण्या करता सर्व काही करा.
\s5
\v 4 सर्व विश्वासणाऱ्यासाठी एकच गट, एकच पवित्र आत्मा आहे, आणि तुम्ही आत्मविश्वासाने वाट पाहण्यासाठी निवडून घेतले आहात, अशासाठी की देवाचे तुमच्यासाठी असणारे वचने परिपूर्ण व्हावे.
\v 5 ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो असा येशू ख्रिस्त हाच एक प्रभू आहे, त्याच्या नावात कोणालाही बाप्तीस्मा देण्याचा एकच मार्ग आहे.
\v 6 देव एकच आहे, सर्वांचा खरा पिता. तोच त्याच्या सर्व लोकांवर अधिकार चालवतो आणि आपल्या सामर्थ्याने सर्व काही भरतो.
\s5
\p
\v 7 देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला उदारपणे आत्मिकदान दिले आहे, जे की ख्रिस्ताने त्याच्या इच्छीलेल्या परिमाणाने आम्हास दिले.
\v 8 स्तोत्रकर्त्याने देवाबद्दल काय म्हटले हे त्यासारखे आहे, ज्यांच्यावर त्याने विजय मिळविला त्यांच्या कडून खंडणीचे पैसे प्राप्त करण्याविषयी ते आहे,
\q जेव्हा तो डोंगराच्या शिखरावर त्याच्या शहराकडे वर गेला,
\q त्याने कैद्यांना कैद करुन नेले,
\q आणि त्याने त्याच्या लोकांना खंडणीची भेट दिली.
\s5
\p
\v 9 "तो वर गेला" असे शब्द आपल्याला निश्चितपणे सांगतात की ख्रिस्तदेखील स्वर्गातून पृथ्वीवर उतरला होता, ज्याप्रमाणे देवाचा अभिषिक्त राजा यरूशलेमेहून लढण्यास यावा असे.
\v 10 ख्रिस्त, ज्याला सैतानाला जिंकण्यास खाली पाठवण्यात आले, तोच आपल्या पापांकरिता वधस्तंभावर सुद्धा खिळला गेला, तो पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात सर्वोच्च स्थानावर गेला, अश्यासाठी की त्याने सर्व गोष्टी त्याच्या सामर्थ्याने भराव्या.
\s5
\v 11 त्याने काही विश्वासूंना प्रेषित म्हणून, काही संदेष्टे म्हणून, काही सुवार्तीक म्हणून, काही पुढारी म्हणून आणि काही शिक्षक म्हणून विश्वासणाऱ्यांच्या गटावर नियुक्त केले.
\v 12 ह्या मागील हेतू हा होता की देवाच्या लोकांना देवाचे काम करण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्याकरिता तयार करावे, अश्यासाठी की जे लोक ख्रिस्ताचे आहेत त्यांनी आध्यात्मिकरित्या मजबूत व्हावे.
\v 13 त्याच्यावर विश्वास करण्याद्वारे आणि त्याला समजण्यास आपली पूर्ण वाढ झाल्याने, त्याची अशी इच्छा आहे की आपण सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र बनून राहावे, अश्यासाठी की जो परिपूर्ण आहे त्याच्यासारखे आपण वाढावे.
\s5
\v 14 मग आपण यापुढे सत्याबद्दल बालकासारखे अज्ञानी असणार नाही. वाऱ्याने आणि लाटांनी उडवलेल्या तारवा सारखे आपण नसणार, जे प्रत्येक नविन शिकवणीस अनुसरतात. खोटे शिकविणाऱ्या लोकांना आम्ही आमची फसवणूक आणि मोहात पाडण्याची अनुमती देणार नाही.
\v 15 याउलट, आम्ही देवावर प्रीती करुन आणि त्याच्या खऱ्या शिक्षणावर विश्वास ठेवत जगू, आणि आम्ही प्रत्येक बाबतीत अधिकाधिक ख्रिस्तासारखे होत जावू. एका व्यक्तीचे डोके जसे त्याच्या शरीराला नियंत्रित करते तसेच तोही त्याच्या लोकांवर नियंत्रण करतो.
\v 16 ज्याप्रकारे एका व्यक्तीचे शरीर सांध्यांद्वारे पूर्ण शरीरास एकत्र जोडते, अश्यासाठी की शरीर वाढावे आणि त्याद्वारे शरीराची बांधणी व्हावी, कारण शरीरातील प्रत्येक अवयव हा एकमेकांवर अवलंबून असतो, त्याच प्रकारे त्याने सर्व विश्वासणाऱ्यांना सर्वत्र प्रेम करण्यास आणि एकत्र वाढण्यास सक्षम केले आहे.
\s जुने व नवे जीवितक्रम.
\s5
\p
\v 17 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराद्वारे, मी ठामपणे जाहिर करतो की तुम्ही यहूदी नसलेले जसे करतात त्यासारखे तुम्ही जगू नये. ते व्यर्थतेच्या मार्गानी विचार करतात आणि व्यर्थतेच्याच दिशेला ते जातात.
\v 18 योग्य आणि अयोग्य काय आहे हे त्यांना स्पष्टपणे समजत नाही. ते देवाच्या आज्ञापाळण्याचे आकलन करू शकत नाही, कारण त्यांनी त्याचे वचन ऐकण्यासाठी नकार दिला आहे. म्हणून येशूने दिलेले सार्वकालीक जीवन त्यांच्याकडे नाही, जे त्याने आम्हास दिले.
\v 19 त्यांनी लज्जास्पद गोष्टी करणे निवडले आहे, त्यांची शरीरे निरंतर त्या गोष्टी इच्छीतात. ते सर्व प्रकारची अनैतिक कामे करतात आणि त्यांविषयी ते अधिकाधिक वासनाधीन होतात, आणि जे काही ते इच्छितात त्याचा लोभ धरतात.
\s5
\p
\v 20 परंतु जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल शिकता तेव्हा तुम्ही ह्याप्रमाणे जगणे शिकत नाही.
\v 21 तर आता तुम्ही ख्रिस्ता बद्दल ऐकले आहे आणि त्याने तुम्हास शिक्षणही दिले, तुम्हास हे कळाले आहे की त्याचेच मार्ग हे जगण्यासाठी खरे आहेत.
\v 22 जेव्हा तुम्ही आपल्या फसवणाऱ्या इच्छेनुसार करत असाल, तेव्हा येशूने शिकवले की आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याप्रमाणे जगणे थांबवावे.
\s5
\v 23 आपण देवाला आपल्या मनातील सखोल विचार बदलू द्यावे,
\v 24 आणि देवाने नविन व्यक्ती होण्याकरता बनवले असता तुम्ही त्याप्रमाणे जगावे. आपण देवासाठी वेगळे केलेले आणि येशूविषयी पवित्र सत्यात प्रामाणिकपणे जीवन जगले पाहिजे.
\s दैनंदिनाचे नियम
\s5
\p
\v 25 तर आता, ऐकमेकांशी खोटे बोलणे थांबवा. उलट विश्वासात आपण एकमेकांचे सहकारी असल्याने, आपण ऐकमेकांसोबत सत्य तेच बोलू; कारण आपण देवाच्या कुटूंबातील एकमेकांचे सदस्य आहोत.
\v 26 आपण रागावला तर, आपल्या रागाला पापाचे कारण होऊ देऊ नका. दिवस संपण्याआधीच तुमचा राग थांबायला हवा.
\v 27 म्हणजेच तुम्ही सैतानाला वाईट कृत्ये करण्यास वाव देणार नाही.
\s5
\v 28 जे चोरी करत असत त्यांनी आतापासून चोरी करू नये. त्या ऐवजी, त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमुळे आपले जीवन व्यतित करण्याकरिता कठोर परिश्रम करावे, अशासाठी जे गरजू आहेत त्यांना देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीतरी असावे.
\v 29 चुकीची भाषा वापरू नका, त्या ऐवजी, चांगले बोला म्हणजेच ह्याद्वारे जे गरजू आहेत त्यांना मदत होईल.
\v 30 तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या वागण्याने देवाच्या पवित्र आत्म्यास दु:ख देऊ नका. कारण जेव्हा देव या जगाला सैतानाच्या बंधनातून सोडवेल त्या दिवसासाठी, त्याने आम्हास देवाच्या सर्वकाळ रक्षणाच्या वचनाने शिक्कामोर्तब केले आहे.
\s5
\v 31 इतरांच्या दिशेने रागाने जाऊ नका. कोणत्याही प्रकारे रागिष्ट किंवा इतरांवर अपमानास्पदपणे ओरडणारे होऊ नका. कधीही इतरांबद्दल वाईट योजना करू नका. इतरांची निंदा करू नका.
\v 32 ऐकमेकांप्रती दयावान असा, एकमेकांच्याप्रती क्षमाशीलतेने कृती करा. एकमेकांना क्षमा करा, कारण ख्रिस्ताने जे काही केले त्याप्रमाणे देवाने तुम्हांला क्षमा केली आहे.
\s5
\c 5
\p
\v 1 आपण देवाची मुले असल्याकारणाने त्याचे अनुकरण करा, कारण त्याने आम्हावर प्रेम केले आहे.
\v 2 ज्या प्रकारे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली की, तो आपल्या पापांसाठी वधस्तंभावर देवाला अर्पण आणि यज्ञ असा झाला, की जे देवाला फार आनंद देणारे होते, त्याच प्रकारे आपण इतरांवर प्रेम करावे.
\s5
\v 3 कोणत्याही प्रकारची अनैतिक कृती सुचवू नका आणि दुसऱ्यांकडे जे आहे त्याची इच्छा धरू नका किंवा जे वाईट करतात त्याचीही इच्छा धरू नका. अशा पापांमुळे लोक देवाच्या लोकांबद्दल वाईट बोलतील, जे की देवासाठीच वेगळे केलेले आहेत, पापासाठी नाही.
\v 4 इतरांना अश्लील गोष्टी किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा पापाबद्दल विनोद सांगू नका. जे देवाशी संबंधित आहेत त्यांनी ह्या अश्या गोष्टी बोलू नये. याउलट जेव्हा तुम्ही इतरांशी बोलता, तेव्हा देवाच्या प्रेमाबद्दल धन्यवाद द्या.
\s5
\v 5 आपणास ह्याची खात्री असू द्या की, कोणताही व्यक्ती जो जारकर्मी, किंवा असभ्य, किंवा लोभी(कारण हे मूर्तिपूजे सारखेच आहे) ख्रिस्त राज्य करीत असता देवाच्या लोकांत असणार नाही.
\v 6 कोणीही तुम्हास युक्तीवादात फसवू नये, कारण ते पापाच्या गोष्टी करतात, जे देवाच्या आज्ञा मानत नाहीत, त्यांच्या प्रती तो क्रोधीत होईल.
\p
\v 7 तर आता जो कोणी अश्या पापाच्या गोष्टी करतो, त्याच्यासोबत सामील होऊ नका.
\s5
\v 8 प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही पापी अवज्ञामध्ये राहत होता, जसे की काळोख रात्र तुम्हास पुर्णवेळेस विळखा घालून असावी. परंतु तुम्ही आता प्रभूच्या प्रकाशात जगत आहा.
\v 9 जसे प्रकाशामुळे चांगल्या गोष्टी निर्माण होतात, त्याचप्रमाणे जे येशूच्या प्रकाशात राहतात ते चांगले आणि सत्य काय आहे, हे ओळखतात आणि करतात.
\v 10 ते उघडपणे दाखवितात की प्रभूला काय संतुष्ट करते.
\v 11 जे काही निरुपयोगी आत्मिक काळोखात कार्य करत आहेत त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नका. त्याऐवजी, फक्त एवढे बोला की, "ते पापी कृत्ये निरुपयोगी आहेत, "
\v 12 कारण लोक दुष्टाईच्या ज्या गोष्टी अंधाराच्या गुप्त स्थळी करतात त्या प्रकाशात उघड करणे देखील लज्जास्पद आहे.
\s5
\v 13 कारण प्रकाश जे उघडकीस करतो त्या सर्व गोष्टी नंतर स्पष्टपणे आणि चांगल्या प्रकारे समजल्या जाऊ शकतात,
\v 14 कारण प्रकाश हा आपल्याला स्पष्ट दाखवतो की सत्य आहे तरी काय. हे असे आहे जेव्हा देवाचे वचन लोकांना नष्ट करणारी पापे स्पष्ट करते आणि येशू लोकांची क्षमा करून त्यांना नविन करतो. म्हणून विश्वासणारे असे म्हणतात,
\q "आपल्या झोपेतून जागा हो
\q आणि जे मेलेल्यांसारखे आहेत त्यांच्यातून ऊठ
\q ख्रिस्त आपल्याला क्षमा आणि नवीन जीवन समजून घेण्यास सक्षम करेल.”
\s5
\p
\v 15 यास्तव तुम्ही कसे जगता त्याबद्दल सावध असा. मूर्ख जसे व्यवहार करतात तसे तुम्ही करू नका. याउलट, सुज्ञ मनुष्य जसा वागतो तसे करा.
\v 16 पृथ्वीवरील वेळेचा वापर सुज्ञपणे करा कारण तेथील दिवस वाईट गोष्टींनी भरलेले आहेत.
\v 17 त्यामुळे मूर्ख होऊ नका, त्या ऐवजी, प्रभू येशूची काय इच्छा आहे हे समजून घ्या.
\s5
\p
\v 18 मद्यार्क असलेले पेये घेऊन झिंगू नका, जे की माणसाचे जीवन नाश करते. याउलट, पुर्णवेळ काय करावे यासाठी देवाचा आत्मा तुमचा ताबा घेवो.
\v 19 एकमेकांसोबत स्तोत्रे, ख्रिस्ताची गाणी, आणि देवाने तुम्हाला दिलेले गीते गा. ही स्तोत्रे आणि इतर गाणी आपल्या अंतःकरणातून प्रभू येशूची स्तुती करण्यास गा.
\v 20 येशू ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केले आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी देव जो आपला पिता ह्याला प्रत्येक समयी धन्यवाद द्या.
\v 21 ख्रिस्ताचा आदर व्हावा यासाठी तुम्ही नम्रतेने ऐकमेकांस शरण जा.
\s ख्रिस्ती कुंटुंबाचा जीवनक्रम
\s5
\p
\v 22-23 पत्नींनो, ज्याप्रकारे तुम्ही येशूच्या अधीन राहता, त्याच प्रकारे आपल्या पतीच्या नेतृत्वाच्या अधीन रहा. कारण ज्याप्रकारे पती हा पत्नीचा पुढारी असतो, त्याच प्रकारे ख्रिस्त देखील जगातील सर्व विश्वासणाऱ्या मंडळींचा पुढारी आहे. त्याने सर्व विश्वासणाऱ्यांना त्यांच्या पापांमुळे होणाऱ्या निंदेपासून वाचविले आहे.
\v 24 जसे की सर्व विश्वासणारे ख्रिस्ताच्या अधिकाराच्या अधीन राहतात, त्याचप्रमाणे स्त्रीने सुद्धा पुर्णपणे आपल्या पतीच्या अधिकाराला शरण जावे.
\s5
\p
\v 25 पतींनो, जशी ख्रिस्ताने सर्व विश्वासणाऱ्यांवर प्रीती केली, की त्याने आपणा करीता वधस्तंभावर स्वत:चा जीव दिला, तशीच तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा,
\v 26 म्हणजे तो आपल्याला त्याच्या स्वत:साठी वेगळे करील. आमच्या पापांची शिक्षा काढून टाकण्याद्वारे, येशूने शब्दाच्या सामर्थ्यानुसार जसे पाण्याने धुऊन टाकावे तसे विश्वासणाऱ्यांना शुद्ध केले आहे.
\v 27 आता ख्रिस्त संपूर्ण विश्वासणाऱ्यांना स्वत:साठी पूर्णपणे स्वच्छ, क्षमा झालेले, निर्दोष, ज्यात काही पाप नाही असा गट म्हणून सादर करू शकतो.
\s5
\v 28 प्रत्येक मनुष्याने आपल्या पत्नीवर असे प्रेम करावे जसे तो आपल्या शरीरावर प्रेम करतो. जेव्हा पुरुष आपल्या पत्नीवर प्रेम करतो, तेव्हा असे होते की तो स्वतःवरच प्रेम करतो,
\v 29-30 कारण कोणीही स्वतःच्या शरीराचा हेवा करत नाही. याउलट, तो त्याच्या शरीराची काळजी करतो आणि त्याला खाऊ घालतो, त्याच प्रकारे ख्रिस्तसुद्धा सर्व विश्वासणाऱ्या मंडळींची ज्या जगात आहेत त्यांची काळजी करतो. आम्ही विश्वासणाऱ्यांचा एक समुह झालो आहोत, जो त्याच्याशी संबंधित आहे.
\s5
\v 31 जे लग्न करतात त्यांसाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
\q "जेव्हा एक माणूस आणि एक स्त्री लग्न करते तेव्हा ते कायमचे आपल्या आईवडिलांना सोडून देतील. ते पती आणि पत्नी असे एकत्र यावे, आणि ते दोघे नसून एकच देह असे होतील.”
\p
\v 32 देवाने प्रकट केलेल्या गोष्टींचा अर्थ समजावून घेणे अवघड आहे, परंतु मी तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल, जे त्याला त्याच्या विश्वासणाऱ्या विश्वव्यापी मंडळीबद्दल आहे त्याबाबतीत सांगत आहे.
\v 33 तथापि, प्रत्येक मनुष्य जशी आपणावर प्रीती करतो तशी आपल्या पत्नीवर करावी, आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचा आदर करावा.
\s5
\c 6
\p
\v 1 तर आता मुलांनो तुम्ही प्रभू येशूचे असल्या कारणाने, तुमच्या आईवडीलांचे ऐका, कारण असे करणे तुम्हास योग्य आहे.
\v 2 देवाने शास्त्रवचनात आज्ञा दिली की.
\p “आपल्या आई वडिलांचा सन्मान कर.” देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे पहिला नियम आहे, आणि त्याने त्यामध्ये काहीतरी वचनही दिले, त्याने वचन दिले.
\p
\v 3 “जर तू हे करशील, तर तू यशस्वी होशील, आणि तू या पृथ्वीवर खूप वर्षे जगशील.”
\s5
\p
\v 4 पालकांनो, आपल्या मुलांना इतके कठोरपणे वागवू नका की ते क्रोधित होतील. त्या ऐवजी, त्यांना चांगले शिकवण्याद्वारे वर आणा आणि प्रभू येशूची इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांना शिस्त लावा.
\s5
\p
\v 5 दासांनो, जे पृथ्वीवर तुमचे मालक आहेत त्यांच्या आज्ञा पाळा. ज्या प्रकारे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता, त्याचप्रकारे त्यांचा आदरपूर्वक आणि प्रामाणिकपणे सन्मान करा.
\v 6 ते तुमच्याकडे पाहत असताच त्यांच्या आज्ञा पाळु नका. याउलट, तुम्ही तुमच्या मालकाचे दास नसून ख्रिस्ताचे दास आहात याप्रमाणे त्यांच्या आज्ञेत रहा. देव तुमच्या कडून जे करू इच्छितो ते उत्साहाने करा.
\v 7 आनंदाने आपल्या स्वामीची सेवा करा, जसे की तुम्ही प्रभू येशूची सेवा करत आहा, कोणा सामान्य मनुष्याची नाही.
\v 8 हे असेच करा कारण लक्षात घ्या काही दिवसांनी प्रभू येशू प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी प्रतिफळ देईल. जे दास आहेत आणि जे नाहीत त्यांना देखील तो प्रतिफळ देईल.
\s5
\p
\v 9 स्वामींनो, ज्या प्रकारे तुमचे दास तुम्हास चांगल्या तऱ्हेची सेवा देतात, त्यासाठी तुम्ही त्यांना चांगली वागनूक द्या. त्यांना धमकावणे थांबवा, हे विसरू नका की जो त्यांचा प्रभू आहे आणि तोच तुमचा प्रभू स्वर्गात आहे. तुम्ही दुसऱ्याव्यक्तीला ध्यानात घेऊन चांगले केले आहे का त्याचा तो न्याय करील.
\s ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री
\s5
\p
\v 10 शेवटी, प्रभू येशूवर पूर्णपणे अवलंबून रहा, अशासाठी की त्याने त्याच्या पराक्रमी सामर्थ्याने आपणास आध्यात्मिक रित्या दृढ करावे.
\v 11 ज्या प्रकारे एखादा सैनिक आपले सर्व शस्त्र धारण करतो, त्याच प्रकारे आपण देवाचे प्रत्येक स्त्रोत सैतानाच्या प्रत्येक वाईट योजनेविरुध्द यशस्वीपणे वापरले पाहिजे.
\s5
\v 12 आम्ही इतर मानवांच्या विरोधात लढा देत नाही, याउलट आम्ही सर्व प्रकारच्या सैतानी शासकांविरुद्ध आणि आध्यात्मिक अंधकारात राहणाऱ्या दुष्ट आत्म्यांविरुद्ध लढा देत आहोत.
\v 13 म्हणूनच, ज्याप्रकारे एक सैनिक आपली सर्व शस्त्रसामग्री परिधान करतो, त्याच प्रमाणे तुम्ही देखील देवाची सर्व शस्त्रसामग्री परिधान करावी, जेणेकरून तुम्ही या दुष्टाईच्या जगात दुष्टा विरुध्द उभे राहू शकाल. देवाच्या शस्त्रांबरोबर, तुम्ही दुष्टांच्या आक्रमणांविरुद्ध लढू शकाल आणि देवासाठी जगू शकाल.
\s5
\p
\v 14 म्हणून देवाचे सत्य आणि प्रामाणिकपणा परिधान करून तुम्ही सैतानाविरुध्द उभे रहा, जसे की ते लढाई मधील तुमचे चिलखत आहे असे ते धारण करा आणि लढा.
\v 15 आणि ज्या प्रकारे सैनिक आपल्या वहाणा घालतो, त्याप्रकारे देवासंगती शांती प्रस्थापित करणाऱ्या शुभवर्तमानास घट्ट धरून रहा.
\v 16 ज्याप्रमाणे सैनिक त्यांच्या शत्रूंच्या बाणांपासून आपले संरक्षण करण्यासाठी ढाल सोबत ठेवतो, त्याचप्रमाणे तुम्हीसुध्दा विश्वासाची ढाल आपल्या सोबत ठेवा, म्हणजेच सैतान आत्मीकरित्या तुमची हानी करणार नाही.
\s5
\v 17 आणि ज्याने तुमचे तारण केले आहे, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवा. हे एक सैनिकासारखे असेल, ज्याचे डोके संरक्षित करण्यासाठी शिरस्त्राण घालावे. आणि शास्त्रवचनात देव काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवावा; हे असे आहे की एका सैनिकाने आपली तलवार घट्ट पकडावी.
\v 18 तुम्ही असे करत असतांना, नेहमी देवाला प्रार्थना करीत रहा आणि आपल्या व इतरांसाठी ह्या गोष्टी करण्याविषयी त्याला विनंती करा, आणि देवाचा आत्मा तुम्हास काय प्रार्थना करावी ते सुचवो. या उद्देशासाठी, सर्व देवाच्या लोकांसाठी नेहमी प्रार्थनापुर्वक प्रार्थना करत रहा.
\s5
\v 19 विशेषतः, माझ्यासाठी प्रार्थना करा, की मी काय बोलावे ह्या बद्दल देव मला मार्गदर्शन करो, अशासाठी की मी ख्रिस्त निर्भयपणे इतरांना सांगावा. लोकांना आधी संदेश माहित नव्हते, पण आता देवाने मला तो प्रगट केला आहे.
\v 20 ह्या कारणास्तव मी ख्रिस्ताचा प्रतिनिधी असल्याने तुरुंगात आहे. प्रार्थना करा की जेव्हा मी ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगतो, तर ती न घाबरता सांगावी, कारण हेच बोलणे आवश्यक आहे.
\s समाप्ती
\s5
\p
\v 21 हे अशासाठी की तुम्ही जाणावे की माझ्या सोबत काय घडत आहे आणि मी काय करत आहे. मी तुखिकाला तुझ्याकडे पत्रांसोबत पाठवीत आहे. इथे जे काही घडत आहे ते तुम्हाला तो सांगेल. तो एक सहविश्वासू बांधव आहे ज्याच्यावर आम्ही सर्व खूप प्रेम करतो आणि तो प्रभू येशूची विश्वासूपणे सेवा करतो.
\v 22 म्हणूनच मी त्याला तुमच्याकडे पाठवीत आहे, अशासाठी की मी आणि माझे सहकारी कसे आहोत हे तुम्ही जाणावे, म्हणजे त्याने तुमचे सांत्वन आणि तुम्हास प्रोत्साहित करावे अशी माझी इच्छा आहे.
\s5
\p
\v 23 देव आमचा पिता याजपासून व प्रभू येशू ख्रिस्तापासून सर्व विश्वासणाऱ्या बंधूजणास कृपा व शांती असो, आणि एकमेकांना प्रेम करण्यास आणि ख्रिस्तावर निरंतर भरवसा ठेवण्यासाठी तो आपल्याला सक्षम करो.
\v 24 मी प्रार्थना करतो की देव तुमच्यासोबत प्रेमळपणे कृती करो, आणि त्यांच्या सोबतही जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतात आणि त्याच्यावर प्रेम करणे कधीही थांबवत नाहीत.