mr_udb/47-1CO.usfm

900 lines
218 KiB
Plaintext

\id 1CO - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h 1 करिंथकरांस
\toc1 1 करिंथकरांस
\toc2 1 करिंथकरांस
\toc3 1co
\mt1 1 करिंथकरांस
\s5
\c 1
\s नमस्कार व उपकारस्तुती
\p
\v 1 मी पौल, हे पत्र लिहित आहे. मी हे लिहित असता आपला सोबतीचा विश्वासणारा सोस्थनेस, माझ्या बरोबर आहे. देवाने मला येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित होण्यासाठी नियुक्त केले आहे, आणि देवाने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले आहे.
\v 2 करिंथमधील देवाच्या मंडळीसाठी, ज्या प्रत्येक एकाला, सर्वत्र, देवाने ख्रिस्त येशूच्या नावात त्यांना वाचवावे म्हणून हाक मारतात अशांसाठी हे पत्र आहे, त्यांना ख्रिस्ताने देवासाठी वेगळे केले आहे, जो त्यांचा व आपलाही तारणारा आहे.
\p
\v 3 आपला देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांवर प्रीती करो आणि तुम्हांला शांती देवो.
\s5
\p
\v 4 येशू ख्रिस्ताने तुम्हाला अनेक भेटी दिल्या आहेत कारण तो तुमच्यावर प्रीती करतो म्हणून मी तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी माझ्या देवाचे आभार मानतो.
\v 5 ख्रिस्ताने तुम्हाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. तुम्ही देवाला ओळखावे आणि त्याचे सत्य बोलावे म्हणून त्याने तुम्हाला मदत केली आहे.
\v 6 जसे तुम्ही ख्रिस्ता विषयी बोलला तेव्हा तुम्ही स्वतःच ह्या विधानाच्या बाजूने उभे राहिले आहात.
\s5
\p
\v 7 देव प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येकास प्रकट करील आणि प्रत्येकाने त्याला ओळखावे असे करील, ह्या दिवसाची तुम्ही वाट पाहात असता तुम्हाला देवाच्या आत्म्यापासून कोणत्याही दानांची कमतरता भासू नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो.
\v 8 तुम्हाला शेवट पर्यंत त्याची सेवा करता यावी म्हणून देव देखील तुम्हाला मजबूत बनवील, जेणेकरून आपला प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर माघारी येईल त्या दिवशी तुम्ही स्वतःला लाज वाटण्यास कारण ठरू नये.
\v 9 देव ते करण्यासाठी त्याचे अभिवचन राखील. देवाने त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे, ह्याला तुम्ही ओळखावे आणि त्याच्यावर प्रीती करावी, म्हणून तुम्हांला बोलावले आहे.
\s ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती
\s5
\p
\v 10 माझ्या भावांनो आणि बहिणींनो, येशूच्या अधिकाराने मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही एका करारापर्यंत यावे, आणि हे मतभेद निकालात काढावे, आणि येथून पुढे तुमच्यामध्ये मतभेद राहू नयेत. मतभेदाचे निवारण करत असतांना समान दृष्टिकोणातून गोष्टी पाहाण्यास शिका आणि मग तुम्हाला आढळेल की तुमच्या मनामध्ये सारखेच ध्येय आहेत.
\v 11 तुमच्यातील काही जणांमध्ये विभाजन आणि असहमती आहे असे मला ख्लोवेच्या घरात असणाऱ्यांकडून कळविण्यात आले.
\s5
\p
\v 12 हिच ती समस्या आहे. तुमच्यातील प्रत्येकजण एका पुढाऱ्याशी किंवा दुसऱ्या एकाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करतात. एक म्हणतो, “मी पौलाशी एकनिष्ठ आहे. दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोस ह्याच्याशी एकनिष्ठ आहे.” कोणीतरी म्हणतो, “मी पेत्राशी एकनिष्ठ आहे.” आणि शेवटचा एक म्हणतो, “परंतु मी तर ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहे.”
\v 13 परंतु ख्रिस्त त्याचा एकनिष्ठपणा विभाजीत करत नाही. पौल तुमच्यासाठी वधस्तंभी गेला नाही. तुमचा बाप्तिस्मा ज्या व्यक्तिने केला त्याने पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा केला नाही.
\s5
\p
\v 14 तेथे मी केवळ थोड्याच लोकांना बाप्तिस्मा दिला; त्यापैकी क्रिस्प व गायस ह्यांनाच मी बाप्तिस्मा दिला, म्हणून मी देवाचे आभार मानतो.
\v 15 मी त्यांना माझ्या नावात बाप्तिस्मा दिला हे सत्य नाही.
\v 16 आता करिंथमधिल कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही, मात्र ह्या लोकांपेक्षा, मी स्तेफनाच्या घराण्याचा देखील बाप्तिस्मा केला हे मला आठवते.
\s5
\p
\v 17 ह्याचे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे ख्रिस्ताने मला लोकांचा बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवले नाही, परंतु प्रत्येकाला त्याच्या विषयीची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले होते. मी केलेल्या सुवार्तेची घोषणा मनुष्याचे ज्ञान आणि हुशारीचे शब्द वापरून रचलेली नव्हती, तर तो संदेश ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर मरण पावला ह्या त्याच्या कार्याच्या पायावर तयार केलेला होता.
\s वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य
\s5
\p
\v 18 देवाच्या गोष्टींसाठी जे मृत झालेले आहेत ते त्याला ओळखु शकत नाही, वधस्तंभावर मरणाऱ्या ख्रिस्ता विषयीचा संदेश त्यांच्यासाठी निरर्थक आहे. परंतु देवाने आमच्यापैकी ज्यांना वाचवले आणि जीवनात आणिले आहे, म्हणून देवाचे सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करत आहे, हे आम्हाला ठाऊक आहे.
\v 19 एका संदेष्ट्याने शास्त्रलेखात असे लिहिले आहे :
\q “आपण ज्ञानी आहोत असे जे विचार करतात, त्यांचा शहाणपणा
\q मी नष्ट करीन,
\q आणि बुद्धीमानांनी पुर्णतः अपयशी व्हावे अशी
\q मी उत्तम योजना करीन.”
\s5
\p
\v 20 या जगाचे ज्ञानी लोक कोठे आहेत? त्यांना देवाविषयी काहीही समजत नाही. जे विद्वान त्यांना, आणि जे वादविवादांमध्ये कुशल आहेत त्यांना देखील समजत नाही. कारण देवाने दाखवले आहे की, त्यांचे संपूर्ण शहाणपण मुर्खपणा आहे.
\v 21 देवाच्या शहाणपणानुसार, अविश्वासणारे त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखू शकत नाहीत. म्हणून देव तो संदेश सांगण्यात संतुष्ट असतो, जो त्यांच्यादृष्टीने मुर्खपणाचा आहे. तोच संदेश आम्ही सांगितला आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांना वाचण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी आहे.
\s5
\p
\v 22 यहूदी लोकांना कोणालाही अनुसरण्याआधी चमत्कारीक सामर्थ्याचे उघड प्रदर्शन व्हावे असे त्यांना वाटते. ग्रीक हे आध्यात्मिक कल्पनेविषयी नवीन आणि ताज्या विचार करण्याच्या पद्धतीद्वारे ज्ञानाचा शोध घेतात.
\v 23 परंतु आम्ही तर वधस्तंभावर मरण पावलेल्या, ख्रिस्ताविषयीच्या संदेशाची घोषणा करतो. यहूद्यांसाठी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा संदेश असा काही आहे ज्याला ते ग्रहण करू शकत नाहीत कारण वधस्तंभावरचे मरण त्यांच्यावर शाप आणते. ग्रीकांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रीत करावे हे देखील त्यांना अतिशय मुर्खपणाचे वाटते.
\s5
\p
\v 24 परंतु आमच्यासाठी, आम्ही देवाला ओळखावे म्हणून त्याने आम्हाला बोलावले आहे, नाश होण्यापासून वाचवण्यासाठी आणि देवाला ओळखण्याचे शहाणपण व त्याच्या विषयी शिकण्यासाठी ख्रिस्तच त्याचे सामर्थ्य आहे. परंतु शुभवार्ता कोणत्याही वंशासोबत किंवा तत्त्वज्ञानात बांधलेली नाही; ख्रिस्तामध्ये यहूदी आणि पृथ्वीवरील इतर राष्ट्रे आणि वंश ह्यात कोणताही भेदभाव नाही.
\v 25 देवासाठी जे काही मुर्खपणाचे आहे ते मानव प्राणी जितक्या उत्तम कल्पना करू शकतो त्या पेक्षा जास्त ज्ञानीपणाचे आहे. आणि देवाच्या स्वभावाचा कमकुवतपणा बलवानाहून आणि सर्वात महान मानवप्राणी जे होऊन गेले त्याहूनही अधिक बलशाली आहे.
\s5
\p
\v 26 बंधू आणि भगिनिंनो, देवाने तुम्हाला पाचारण केले तेव्हा पाहा तुम्ही कशा प्रकारचे लोक होता. पाहा की तुमचे काही मोल नव्हते. तुम्ही बुद्धिमान लोक नव्हता. लोकांनी तुमचे आज्ञापालन करावे एवढ्या योग्यतेचे तुम्ही नव्हता. तुम्हाला फार महत्वाचे पूर्वज नव्हते.
\v 27 त्याऐवजी, देवाने अविश्वासणाऱ्यांसाठी ज्यांचा काही अर्थ नव्हता अशा गोष्टींना निवडले, जेणेकरून त्यांनी स्वतःची स्तुती करणे थांबवावे. ज्या गोष्टी अतिशय बलवान होत्या असा विश्वास ठेवणाऱ्यांना लाजवता यावे म्हणून, देवाने अशक्त गोष्टींना वापरण्यासाठी निवडले.
\s5
\p
\v 28 ज्या गोष्टींना अविश्वासणारे महत्वाच्या समजतात त्यांना काही मोल नाही, हे दर्शवण्यासाठी देवाने त्यांच्या दृष्टीने जे विशेष नाही अशांना निवडले.
\v 29 देवाने असे केले जेणे करून मनुष्याकडे स्वतःची प्रशंसा करण्यासाठी कोणतेही कारण असू शकणार नाही आणि त्याऐवजी त्याने सर्व स्तुती प्रशंसा देवाला द्यावी.
\s5
\p
\v 30 देवाने जे काही केले आहे त्यामुळे, आता तुम्ही येशू ख्रिस्ताशी जोडले गेले आहात, त्यानेच आम्हाला स्पष्ट केले की देव किती ज्ञानी आहे, त्याने आपल्याला देवा बरोबर योग्य करून ठेवले आहे, त्याने आम्हांला देवासाठी वेगळे केले आहे, आणि त्यानेच आम्हांला वाचवले आणि सुरक्षित ठिकाणी आणिले आहे.
\v 31 म्हणून, जसे शास्त्रभागात सांगितले आहे :
\q “जो कोणी स्वतःची प्रशंसा करतो त्याने केवळ प्रभूने त्याच्यासाठी जे काही केले त्याबद्दल स्वतःची प्रशंसा करावी.”
\s5
\c 2
\s तत्वज्ञान व प्रकटीकरण
\p
\v 1 भावांनो आणि बहिनींनो, मी तुमच्याकडे आलो तेव्हा, मी सुंदर भाषण केले नाही, किंवा ज्ञानी लोकांनी सांगितलेल्या गोष्टीच मी तुम्हाला परत-परत सांगितल्या नाहीत. देवाच्या लपलेल्या सत्याविषयी मी तुम्हाला सांगितले.
\v 2 येशू ख्रिस्त आणि वधस्तंभावरील त्याचा मृत्यू ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयाबद्दल मी तुम्हाला बोलणार नाही असे मी ठरविले होते.
\s5
\p
\v 3 मी तुमच्या सोबत होतो तेव्हा, मी शारीरिकदृष्ट्या किती कमकुवत होतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. माझ्या शत्रुंच्या दहशतीमूळे माझा किती थरकाप झाला आणि भयाने माझे अंतःकरण किती भरून टाकले होते हेही तुम्ही पाहीले व तुम्हाला माहीत आहे.
\v 4 परंतु तुम्ही माझा संदेश ऐकला आहे, आणि मी तुमच्याशी बोललो तेव्हा मी काळजी पूर्वक नियोजित संभाषण केले नाही. त्याऐवजी, देवाच्या आत्म्याने माझ्या द्वारे केलेल्या चमत्कारांच्या सामर्थ्यामुळे मी सत्य बोललो होतो, हे त्याने तुम्हाला दाखवून दिले आहे.
\v 5 मानवी ज्ञानाला पाहीजे तसे काहीतरी करता यावे म्हणून नाही, तर तुम्हाला देवावर त्याच्या सामर्थ्यामुळे विश्वास ठेवता यावा अशा प्रकारे मी शिकवले.
\s5
\p
\v 6 आता जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यासारखे जे कोणी आपल्या विश्वासात वाढले त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत. परंतु आता तुम्हाला समजते आणि ह्या जिवनात असलेले राजे आणि राज्यपाल यांच्याशी त्याचा काही संबंध नाही, परंतु ते लवकरच निघून जातील.
\v 7 देवाने आतापर्यंत लपवून ठेवलेल्या ज्ञानाची घोषणा आम्ही करतो, कारण देवाने स्वतःच जगाची निर्मीती करण्याआधी हा सूज्ञ निर्णय करून ठेवला होता, आणि आमच्या सन्मानासाठी त्याने हा निर्णय केला होता.
\s5
\p
\v 8 या जगावर राज्य करणारा कोणीही देवाच्या सूज्ञ योजनेंविषयी समजू शकत नाही. त्यांना त्या समजल्या असत्या, तर त्यांनी प्रभूला कधीच वधस्तंभी खिळीले नसते, परंतु त्याऐवजी त्यांनी ख्रिस्ताचा सन्मान करायला हवा होता.
\v 9 परंतु शास्त्रभागामध्ये ते असे म्हणते :
\q “कोणीही कधीही पाहिल्या नाही अशा गोष्टी,
\q कोणीही ऐकल्या नाही,
\q कोणीही कल्पना करू शकत नाहीत,
\q देवाने अशा गोष्टी त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार करून ठेवल्या आहेत.”
\s5
\p
\v 10 देवाने आत्म्याच्याद्वारे दाखवलेल्या ह्याच त्या सर्व गोष्टी आहेत. कारण आत्मा सर्वकाही पाहतो आणि त्याला सर्वकाही ठाऊक आहे. केवळ देवालाच स्वतःविषयीचे ठाऊक असलेले खोलवर आणि दडलेले गुपीत सुद्धा त्याला ठाऊक आहे.
\v 11 तो काय विचार करतो हे त्याच्या आत्म्याशिवाय कोणीही व्यक्ती समजू शकत नाही. म्हणून देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही देवाच्या गुपीत गोष्टी समजू शकत नाही.
\s5
\p
\v 12 देवाने आंम्हाला दिलेला आत्मा तो ह्या जगापासून आलेला आत्मा नाही. देवापासून आलेल्या आत्म्याला आम्ही स्वीकारले आहे. हाच आत्मा देवाने आंम्हाला मोफत दिलेल्या सर्व दानांना समजण्यासाठी मदत करतो.
\v 13 ह्या जगाचे ज्ञान संपादन करणारे लोक आंम्ही शिकवलेले धडे समजू शकत नाही. केवळ देवाच्या आत्म्याद्वारेच हे धडे शिकवले जातात. ह्या धड्यांचा अर्थ काय आहे ते समजण्यासाठी तो आम्हाला मदत करतो.
\s5
\p
\v 14 जो कोणी देवाला ओळखत नाही तो देवाच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टींचा सहज स्वीकार करू शकत नाही. अशा व्यक्तीसाठी ते धडे मुर्खपणाचे आहेत. देवापासून आलेले व ज्ञानी असलेले लोकच केवळ ह्या गोष्टी समजू शकतात.
\v 15 ज्याला हे ठाऊक आहे की देव सर्वगोष्टींचा न्याय करतो, परंतु तो इतर लोकांच्या न्यायाखाली येत नाही.
\v 16 जसे आमच्यापैकी एका संदेष्ट्याने लिहिल्या प्रमाणे :
\q “देवाच्या मनातले सर्वकाही ओळखणे हे कोणालाही शक्य नाही.
\q देवाला शिकवण्यास कोणीही सक्षम नाही.
\m परंतु आम्ही तर ख्रिस्ताचे सर्व विचार जाणतो.
\s5
\c 3
\s पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध
\p
\v 1 माझ्या भावांनो आणि बहिनींनो, मी तुमच्या सोबत असता, देवा विषयीचे कठीण सत्य ऐकण्यासाठी तुम्ही तयार नव्हता. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीनच जोडले गेलेल्या लहान मुलांप्रमाणे असता तर कदाचीत मी तुमच्याशी तसे बोललो असतो.
\v 2 जशी एक आई आपल्या बाळाला दुध पाजते त्याच प्रकारे, मी तुम्हांस समजण्यास सोप्या होतील अशा गोष्टी शिकवल्या. कारण तुम्ही मांस खाण्यास तयार नव्हता. आणि आता देखील, तुम्ही तयार नाही.
\s5
\p
\v 3 जरी तुम्ही ख्रिस्ती आहात, तरी अजूनही तुम्ही अविश्वासणाऱ्यांसारखे वागता. हे मला ठाऊक आहे, कारण तुम्हापैकी पुष्कळजण एकमेकांचा हेवा करता, आणि भांडखोरपणे वागता, आणि जणूकाय तुम्ही अजूनही अविश्वासणारेच असल्याप्रमाणे न्यायनिवाडा करता.
\v 4 तुम्ही मंडळीला फाडून तिचे तुकडे करत आहात, कारण तुमच्यातील काहीजण म्हणतात मी, पौलाने काय शिकवले, तेच आम्ही अनुसरण करीत आहोत; इतर म्हणतात अपुल्लोसाने काय शिकवले तेच आम्ही अनुसरण करीत आहोत. तुम्ही अविश्वासणाऱ्यांप्रमाणे वर्तन करीत आहात.
\p
\v 5 देवाने तुमच्या जीवनात जे महान कार्य केले त्या तुलनेत, अपुल्लोसाचे महत्व काहीच नाही. पौल देखिल महत्वाचा नाही. आम्ही दोघेही सेवक आहोत, आणि ज्याने आम्हाला नियुक्त केले त्याच देवाची आम्ही सेवा करतो.
\s5
\p
\v 6 जरी तुमच्यामध्ये देवाच्या वचनाचे बी पेरणारा मी जरी प्रथम होतो तरी सुद्धा, तो अपुल्लोसच होता ज्याने तुम्हाला विश्वासात वाढण्याची खात्री दिली. परंतु केवळ देवच तो होता जो तुमची आत्मिक वाढ होऊ देतो.
\v 7 मला हे पुन्हा सांगु द्या : कोणी एक बी पेरतो आणि त्याला पाणी घालतो, कमीत कमी ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही, केवळ देव तो आहे जो वाढ होऊ देतो. त्याने लावलेल्या एका बागेप्रमाणे तुम्ही आहात.
\s5
\p
\v 8 एखादा पेरतो आणि एखादा पाणी घालतो दोघेही सारखेच काम करतात, आणि ह्याचे प्रतिफळ म्हणून प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या वेतन देण्यात येईल. प्रत्येकाने किती कठीण परिश्रम केले त्याच्या मोजमापानूसार त्याने रक्कम भरली आहे.
\v 9 आम्ही दोघे देवा बरोबर एकत्र कार्य करत आहोत आणि आम्ही दोघेही देवाचे आहोत. परंतु तुमच्यासाठी, देव तुम्हाला त्याच्या शेतात वाढवत आहे. हे जणुकाय तो त्याला राहण्यासाठी तुमची बांधनी करून तुम्हाला वाढवत आहे.
\s शिक्षकांवरील जबाबदारी
\s5
\p
\v 10 देवासाठी करावयाचे कार्य त्याने मला मोफत सोपवून दिले आहे. मी तुम्हामध्ये बांधणी करण्यात पारंगत असलेल्यासारखे अतिशय काळजी पूर्वक परिश्रम केले. पण माझ्यानंतर कोणीतरी ज्याची मी सुरुवात केली त्या आधारावर बांधनी करील. इतरांनी आधीच जे केले त्यावरच प्रत्येकजण बांधतो. परंतु ते कसे बांधतात ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
\v 11 एक पाया जो अगोदरच तयार करून ठेवलेला आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पाया घातला जाऊ शकत नाही. तो पाया म्हणजे येशू ख्रिस्त होय.
\s5
\p
\v 12 त्या पायाच्या शीर्षस्थानी काय ठेवायचे ते निवडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे आम्ही आहोत. बांधकाम करणारे सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत, आणि वाळलेला पेंढा ह्यापासून बनलेले साहित्य गोळा करतात.
\v 13 देव आमच्या कामाचा न्याय करील आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यासाठी काय काम केले हे सर्वांना दिसेल असे करील. आम्ही केलेल्या कार्याची तपासनी करण्यासाठी तो अग्नी पाठवील. देवासाठी आम्ही किती कठीण परिश्रम केले हे केवळ तो अग्नीच त्याला दाखवून देईल.
\s5
\p
\v 14 एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाची अग्नीद्वारे चाचणी होऊन देखील जर त्याचे काम टिकून राहीले, तर त्याला त्याच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.
\v 15 परंतु अग्नीने जर त्याचे सर्व काम जाळून टाकले तर, तो आपले सर्व प्रतिफळ गमावून टाकील, परंतु तरीही देव त्याला वाचवील. त्याने केलेले प्रत्येक काम अग्नीने जरी खाऊन टाकले तरीसूद्धा.
\s5
\p
\v 16 तुम्ही त्याचे मंदिर आहात जेथे देव वसतो ती जागा तुम्ही आहात हे खात्रीने तुम्हाला माहित आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला खात्रीने माहीत असावे.
\v 17 जो कोणी त्याचे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करील त्याला तो नष्ट करील हे देवाने अभिवचन दिले आहे. ह्याचे कारण हे आहे की त्याचे मंदिर केवळ त्याच्याच मालकीचे आहे. आणि त्याच अभिवचनाने तो तुमचे रक्षण करतो, कारण आता तुम्ही त्याचे मंदिर आहात, आणि तुम्ही केवळ त्याच्याच मालकीचे आहात!
\s5
\p
\v 18 तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये म्हणून सांभाळा. आपल्याला अविश्वाणाऱ्यापेक्षा अतिशय जास्त ज्ञान आहे, असे जर तुमच्यापैकी एखादा विचार करत असेल तर त्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अविश्वासणाऱ्यांना ज्या गोष्टी पाहीजे त्यापासून जर तो दूर होऊन एकटा राहिला, व असे करण्यासाठी त्यांनी त्याला मुर्ख समजले तरी ते बरे होईल. तो ह्या गोष्टींपासून दूर राहील तेव्हा, खरे ज्ञान काय आहे हे शिकण्यास तो आरंभ करील.
\v 19 ज्याला जग महान ज्ञान समजते, त्याला देव खरोखर मुर्खपणा समजतो. कारण शास्त्रलेख सांगते,
\q “देव ज्ञान्यांना त्यांच्या मुर्खपणाच्या योजनेमध्येच पकडतो.”
\m
\v 20 आणि पुन्हा शास्त्रलेख सांगतो,
\q “देव ज्ञान्यांच्या सर्व योजना ऐकतो, आणि त्यांचा शेवट देखील त्याला ठाऊक आहे, ते सर्वकाही गमावतील.”
\s5
\p
\v 21 म्हणून अविश्वासणाऱ्यांचे पाहीजे तसे कौतुक करणे थांबवा, त्या गोष्टी करण्याबद्दल अभिमान बाळगणे देखील थांबवा. कारण देवाने तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्याची तुलना अविश्वासणारे तुम्हाला जे काही देतील त्याच्याशी कशी करू शकता?
\v 22 देवाने तुमच्यासाठी पौलाला दिले आहे, आणि त्याने अपुल्लोस, आणि पेत्राला देखील तुमच्यासाठी दिले आहे. आणि देवाने हे जग, आणि तुमचे जीवन, आणि मरणावर त्याचा विजय तुम्हाला दिलेला आहे. देवाने जे सर्वकाही आता आहे आणि जे सर्वकाही भविष्यात असेल—ते तुम्हाला दिले आहे व ते सर्वकाही तुमचेच आहे;
\v 23 आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात; आणि ख्रिस्त देवाचा आहे.
\s5
\c 4
\s प्रेषित देवाला जबाबदार
\p
\v 1 प्रत्येकाने आम्हाला, आणि देवाने शुभवर्तमानाचे लपलेले सत्य ज्यांच्यावर सोपवले आहे त्यांना ही ख्रिस्ताच्या सेवकांप्रमाणे समजावे.
\v 2 देवाने आम्हाला दिलेले काम आम्ही विश्वासूपणे करायलाच हवे कारण आम्ही असे करावे म्हणून त्याने आम्हावर भरवसा टाकला आहे.
\s5
\p
\v 3 जर कोणी मनुष्य, किंवा कायद्याच्या न्यायालयाने देखील माझ्या जीवनाचा न्याय केला, मी त्याविषयी थोडाफार विचार करीन. मी माझ्या स्वतःचा देखील न्यायनिवाडा करण्यास सक्षम नाही.
\v 4 मी काहीतरी चूक केल्यावद्दल कोणी माझ्यावर दोषारोप केलेला मला आठवत नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की मी निर्दोश आहे. देवच केवळ माझा न्यायनिवाडा करील.
\s5
\p
\v 5 तर मग तुम्ही, योग्य वेळ येण्या अगोदर कोणाचाही न्यायनिवाडा करू नये. देव परत येईल तेव्हा तोच हे करील. तोच एक आहे जो निबीड अंधकारात लपलेल्या प्रत्येकगोष्टी देखील प्रकाशात आणू शकतो, आणि प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो हे त्याला ठाऊक आहे म्हणून तोच योग्य न्यायनिवाडा करील. तो येईल तेव्हा, प्रत्येकाला देवाकडून मिळायला हवा असा सन्मान ते स्वीकार करतील.
\s5
\p
\v 6 आता भावांनो आणि बहिनींनो, आम्ही जो नियम पाळतो तो असा आहे, “जे लिहिले आहे त्याच्या पलिकडे जाऊ नका.” अपुल्लोस आणि मी असेच जीवन जगत आहोत. आम्ही केवळ तुमच्यासाठीच ह्या प्रकारे शिकवले. जेणेकरून तुम्ही देवाचे वचन शिकत असता त्याविषयी सतत विचार करत रहावे. जे तुम्हाला असे शिकवतात त्या लोकांविषयी अभिमान बाळगण्या पासून हे तुम्हाला दूर ठेवील, मग तो मी असो किंवा अपुल्लोस असो.
\v 7 तुम्ही आणि इतर विश्वासणाऱ्यांमध्ये काही फरक नाही. तुम्ही प्रत्येकाने एका भेट स्वरूपात सर्वकाही केले आहे. तुमच्या पैकी कोणीही इतर कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. तुमच्यापैकी कोणीही आपण इतर सर्वांपेक्षा वेगळे असल्याची बढाई मारू नये. आम्ही सर्व सारखेच आहोत.
\s5
\p
\v 8 परंतु तुम्ही असे वागता जसे तुम्हाला पाहीजे ते सर्वकाही तुमच्याकडे आहे! तुम्ही असे जगत आहात जसे तुम्ही श्रीमंत होता! तुम्ही असे जगत आहात जसे तुम्ही राजे आणि राण्याप्रमाणे राज्य करत होता—आणि तेही आमच्या मदती शिवाय. ठिक आहे, माझी इच्छा आहे की खरोखर जर तुम्ही राजे व राणी असता तर आम्हीपण तुमच्यासोबत राज्य केले असते!
\v 9 परंतु प्रत्यक्षात देवाने आम्हा प्रेषितांना, एका लढाई नंतर मिरवणूकीने जाणाऱ्या कैद्यांच्या रांगेच्या शेवटी प्रदर्शनास ठेवल्यासारखे दिसते. आम्ही मरणाची शिक्षा देण्यात आलेल्या पुरुषांसारखेच आहोत; सर्व जगाला आणि मनुष्य व देवदूत या दोघांनाही पाहता यावे, म्हणून आम्हाला प्रदर्शनास ठेवण्यात आले आहे.
\s5
\p
\v 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख असल्यासारखे इतर आम्हां प्रेषिताकडे पाहतात, आणि तरी ही तुम्ही स्वतःकडे ज्ञानी लोक म्हणून पाहता. आम्ही अशक्त दिसतो, परंतु तुम्ही एका बलवाना प्रमाणे वागतात! तुम्ही स्वतःची स्तुती व सन्मान करता, परंतु ज्यांचा इतरांनी द्वेष करावा असे आम्ही प्रेषित आहोत.
\v 11 आता ह्या समयापर्यंत आम्ही प्रेषित उपाशी आणि तहानलेले फिरत होतो. आम्ही इतके गरीब होतो की आम्ही स्वतःचे कपडे देखील विकत घेऊ शकत नव्हतो. अधिकाऱ्यांनी आम्हाला वारंवार निर्दयतेने मारहाण केली. आमचे घर म्हणता येईल असे कोणतेही ठिकाण आमच्याकडे नाही.
\s5
\p
\v 12 जीवन जगण्यासाठी आम्ही आमच्या हाताने श्रम करतो. इतर आम्हाला शाप देतात तेव्हा आम्ही त्याची फेड आशिर्वादामध्ये करतो. इतरांकडून आम्हाला त्रास झाला असता, आम्ही तो धिराने सहन करतो.
\v 13 लोक आमच्याविषयी लबाड बोलतात तेव्हा, आम्ही त्यांना अगदी दयाळू पणे उत्तर देतो. आणि असे असून सुद्धा, आम्ही जणुकाही ह्या जगाची घाण आणि कचरा आहोत ज्याला लोकांना कचऱ्याच्या ढिगामध्ये फेकावेसे वाटते असे ते आमच्याशी वागतात.
\s पितृतुल्य बोध व सूचना
\s5
\p
\v 14 मी तुम्हाला अपमाणीत करण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु जसे प्रिय पालक शिस्त लावण्यासाठी आपल्या मुलांमध्ये सुधारणा करतात तशी सुधारणा तुमच्यामध्ये करावी अशी माझी इच्छा आहे.
\v 15 जर तुमच्याकडे दहा हजार शिक्षक असून ख्रिस्ताविषयी सांगत असले, तरी तुमच्याकडे केवळ एकच आत्मिक पिता असावा. मी तुम्हाला सांगितलेल्या शुभवर्तमानावर तुम्ही विश्वास ठेवल्याने मी ख्रिस्तामध्ये तुम्हाला पिता असा झालो आहे.
\v 16 म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करावे.
\s5
\p
\v 17 ह्याच कारणासाठी मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. माझी त्याच्यावर प्रीती आहे, आणि ते माझे विश्वासू लेकरू आहे. जसा मी ख्रिस्ताशी जोडला गेलो तेव्हा मी कसे जीवन जगलो याची तो तुम्हाला आठवण करून देईल. आम्ही जेथे कोठे जातो व ज्या सर्व मंडळ्यांना आम्ही भेटी देतो तेथे मी ह्याच प्रकारे शिकवतो.
\p
\v 18 तुमच्यापैकी काही गर्विष्ठ झाले आहेत. तुम्हाकडे माझे येणे लवकरच होऊ नये असे जीवन तुम्ही जगत आहात.
\s5
\p
\v 19 परंतु मी यावे अशी जर देवाची इच्छा असेल, तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. तेव्हा ते गर्विष्ठ लोक कशाप्रकारे बोलले एवढेच मी समजून घेईन असे नाही, परंतु त्यांच्यामध्ये देवाचे सामर्थ्य आहे की नाही ह्याचा मी शोध घेईन.
\v 20 देवाचे राज्य तुम्ही काय म्हणता ह्या विषयी नाही; ते देवाच्या सामर्थ्याविषयी आहे.
\v 21 मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? छडी घेऊन मी तुम्हाला शिक्षा करू काय, किंवा मी तुमच्यावर किती प्रीती करतो व मी तुमच्याशी किती सौम्यतेने वागतो हे तुम्हाला पाहता यावे म्हणून मी तुम्हाकडे यावे काय?
\s5
\c 5
\s भयंकर स्वरूपाच्या अनीतींचे एक उदाहरण
\p
\v 1 लोकांनी आम्हाला सांगितले आहे की, तुमच्या मंडळीतील कोणी एक लैंगिक अनैतिकतेमध्ये जगत आहे, अशाप्रकारची अनैतिकता ज्याची परवानगी अविश्वासणारे देखील देत नाहीत. एक मनुष्य जो आपल्या पित्याच्या पत्नीचा प्रियकर आहे.
\v 2 तुम्ही इतके गर्विष्ठ झाला आहात! उलट तुम्ही ह्या पापासाठी रडले पाहिजे, कारण हे पूर्ण मंडळीसाठी धोकादायक आहे. ह्या मनुष्याला तुम्ही मंडळीच्या बाहेर काढले पाहिजे.
\s5
\p
\v 3 मी शरीराने तुम्हा जवळ नाही, परंतु मला तुम्हा सर्वांविषयी खुप चिंता वाटते, आणि म्हणून मी माझ्या आत्म्याने तुम्हां सोबत आहे. आणि जणु काय मी तुमच्या सोबतच आहे, असे समजून ज्याने असे केले त्याचा न्याय मी अगोदरच केला आहे.
\v 4 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली उपासना करण्यासाठी तुम्ही एकत्र जमता, तेव्हा मी तुमच्या सोबत उपासना करतो—आणि मी आधीच त्या व्यक्तीचा न्याय केला आहे.
\v 5 त्याच्या दैहीक शरीराचा नाश व्हावा म्हणून, त्या मनुष्याला तुम्ही सैतानाला सोपवून द्यावे. अजून देखील आम्हाला अशी आशा आहे की प्रभू येईल तेव्हा देव त्याला वाचवील.
\s5
\p
\v 6 तुम्ही आपल्या स्वतःची प्रशंसा करावी हे चांगले नाही. तो दुष्ट खमीरासारखा आहे आणि हे तुम्हाला निश्चितच माहित असावे : थोडेसे खमीर संपुर्ण कणकेचा गोळा फुगवते.
\v 7 पाप त्या खमीराप्रमाणे आहे. म्हणून तुम्ही जुने खमीर काढून दूर फेकून द्यावे जेणेकरून त्याचा परिणाम कणकेच्या संपूर्ण गोळ्यावर होणार नाही. तुम्ही खमीर न घालता बनवलेल्या कणकेच्या गोळ्या प्रमाणे आहात. जसे वल्हांडण सणामध्ये, खमीराला भाकरीपासून दुर ठेवणे आवश्यक असते. कारण ख्रिस्त आपला वल्हांडणाचा कोकरा आहे : तो आमच्यासाठी बलिदान झाला.
\v 8 म्हणून चला वल्हांडण सण साजरा करूया, आणि शुद्धीकरणाच्या सर्व नियमांचे आचरण करूया. आज्ञाभंगाची आणि दुष्टपणाची जागा घेणाऱ्या जुन्या खमीराला फेकून देऊन आणि देवाचे आज्ञा पालन करून आणि इतरांना सत्य शिकवून आपण सणाचा उत्सव करायला हवा. आपण असे करतो, तर आपण खमीर नसलेल्या भाकरीप्रमाणे आहोत.
\s5
\p
\v 9 मी तुम्हाला लिहिले आहे, लैंगिकरित्या अनैतिक असणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही राहू नये.
\v 10 अर्थातच, जे अविश्वासणारे अनैतिक आहेत, किंवा जे इतरांच्या गोष्टींची इच्छा धरतात, किंवा जे इतरांच्या गोष्टी जप्त करतात किंवा जे मूर्तीपुजक आहेत, त्यांचे तुम्ही सहभागी होऊ नये, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही.
\s5
\p
\v 11 त्याऐवजी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, लैंगिक अनैतिकतेमध्ये जगणाऱ्या एखाद्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यासोबत तुम्ही जवळची मैत्री ठेऊ नये. आपण जसे की लोभ, किंवा मूर्तीपूजा, किंवा कोणी एक इतरांशी बोलताना अपमान करणारा, किंवा दारूडा, किंवा पैशांची हेरा फेरी करणारे असे इतर पापही त्यामध्ये समाविष्ट करावे. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा दावा करून देखील, अशाच प्रकारच्या भयानक गोष्टी करणाऱ्यांसोबत तुम्ही खाऊ देखील नये.
\v 12 कारण जे कोणी ख्रिस्ताच्या मंडळी बाहेर आहेत त्यांचा न्यायनिवाडा मी करावा अशी माझ्यावर कोणतीही सक्ती नाही. जे आत आहे केवळ त्यांचाच न्यायनिवाडा करणे तुमचे कर्तव्य आहे.
\v 13 देवच एक आहे जो मंडळीच्या बाहेर असणाऱ्यांचा न्याय करील. शास्त्रलेख आम्हाला आज्ञा देते,
\q “तुमच्यामधील जो वाईट व्यक्ती आहे त्याला तुम्ही दूर न्यावे!”
\s5
\c 6
\s ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणे
\p
\v 1 इतर विश्वासणाऱ्या बरोबर तुमचा एखादा वाद असेल, तेव्हा तुम्ही ते प्रकरण अविश्वासणाऱ्या नागरी न्यायाधीशाकडे घेऊन जाऊ नये. तर ज्यांना देवाने ह्याच कामासाठी वेगळे केले आहे, अशा सोबतीच्या विश्वासणाऱ्याकडे, ते प्रकरण घेऊन जावे.
\v 2 आम्ही देवाचे आहोत म्हणून आपण जगाचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत असावे. जर तुम्ही एके दिवशी जगाचा न्यायनिवाडा करणार आहात, तर ज्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत अशा समस्यांना सोडवण्यास देखील तुम्ही सक्षम असले पाहिजे.
\v 3 तुम्ही देवदूतांचा न्यायनिवाडा कराल हे तुम्हाला माहीत असायला हवे! निश्चितच तुम्ही ह्या जीवनातील प्रकरणांचाही न्याय करण्यास सक्षम व्हाल.
\s5
\p
\v 4 आणि जर तुम्ही ह्या जीवनातील महत्वांच्या प्रकरणांचे निवारण करू शकाल तर, ख्रिस्ती लोकांमध्ये होणाऱ्या वादविवादाचे अविश्वासणाऱ्यांकडून निवारण व्हावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही.
\v 5 ह्या बाबतीत तुम्ही कशारीतीने अपयशी झालात हे दर्शवण्यासाठी मी असे बोललो आहे. ख्रिस्ती भाऊ आणि बहिणींमध्ये याप्रकारचे विवाद उत्पन्न होतात तेव्हा त्यांचे निवारण करण्यास पुरेसे असे नक्कीच कोणीतरी ज्ञानी लोक तेथे मंडळीत असतीलच.
\v 6 परंतु त्याऐवजी तुमच्या पैकी काही विश्वासणारे इतर विश्वासणाऱ्यांवर नागरी न्यायालयात दोषारोप करतात, आणि अविश्वासणाऱ्या न्यायाधिशाने तुमचा न्याय करण्यास तुम्ही परवानगी देता!
\s5
\p
\v 7 तुम्हामध्ये आपसात कोणतेही वाद असतात, तेव्हा असे समजा की जे तुम्ही करायला हवे होते ते तुम्ही केले नाही. एका भावाला किंवा बहिणीला न्यायालयात घेऊन जावे ह्यापेक्षा तुम्ही त्यांना तुमच्यापासून लाभ घेऊ द्यावा.
\v 8 त्याऐवजी तुम्ही चूकला आहात, आणि इतरांची फसवणूक केली आहे, आणि एकदा तर तुम्ही आपल्या स्वतःच्या भावांना आणि बहिणींना फसवले आहे.
\s5
\p
\v 9 देव दुष्टांवर राज्य करणे कधिच स्वीकार करणार नाही हे तुम्ही खात्रीने नीट समजून घ्या. जर ते तुम्हाला ह्या पेक्षा निराळे काही सांगतील तर त्यावर विश्वास ठेऊ नका. सत्य हे आहे की, लैंगिकरित्या अनैतिक पापे करणारे, देवाव्यतिरीक्त जे कोणाचीही किंवा इतर कशाचीही उपासना करतात, जे त्यांच्या विवाहाच्या शपथा मोडतात, जे कोणी लैंगिक कृत्यांचा समावेश असलेल्या तथाकथित उपासनेच्या घृणास्पद कृत्यांमध्ये लुप्त आहेत. ज्या उपासनेमध्ये लैंगिक कर्मासारख्या घृणास्पद कृत्यांचा सहभाग असतो अशी उपासना करणारे, जे कोणी समलैंगिकतेमध्ये जीवन जगतात,
\v 10 जे कोणी चोरी करतात, कोणी एक अजून जास्त प्राप्तकरण्यासाठी लोभी आहे, जे कोणी मद्यपान करतात, कोणी एक दुसऱ्याविषयी लबाड बोलतो, आणि जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात त्यांच्यापासून जे कोणी चोरी करतात देव त्यांच्यावर राज्य करण्यास तयार होणार नाही.
\v 11 तुमच्यापैकी काही लोक ह्या गोष्टी करतात. परंतु देवाने तुम्हाला तुमच्या पापांपासून शुद्ध केले आहे, त्याने तुम्हाला त्याच्या स्वतःसाठी वेगळे करून ठेवले आहे, आणि त्याने तुम्हाला त्याच्या बरोबर योग्य केले आहे. त्याने हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि आपल्या देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यानेच केले आहे.
\s अशुद्धता ही ख्रिस्ती माणसाच्या जीवनक्रमाशी विसंगत होय
\s5
\p
\v 12 काही असेही म्हणतात: “मला जे काही करावेसे वाटते, ते काहिही करण्याची मला मोकळीक आहे, कारण मी ख्रिस्ताशी जोडलेला आहे.” होय, परंतु जे काही करण्याची मला परवानगी आहे ते माझ्यासाठी उपयोगी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. कारण “मला जे काही करावेसे वाटते ते काहीही करण्याची मला मोकळीक आहे” कशानेही माझ्यावर धनिपण करावे अशी परवानगी मी देत नाही.
\v 13 लोक असे देखील म्हणतात, “अन्न मनुष्याला खाण्यासाठी बनवलेले आहे, आणि मनुष्य अन्न खाण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.” परंतु देव लवकरच अन्न आणि मनुष्य ह्यांना नाहीसे करील. अर्थातच, हे लोक खरोखर शारिरीक संबंधाविषयी बोलतात. तथापी, देवाने आमची शरिरे लैंगिकरित्या अनैतीक व्हावीत म्हणून बनवले नाही. परंतु शरीराने प्रभूची सेवा करावी, आणि प्रभूने शरीरासाठी पूरवठा करावा म्हणून बनवले आहे.
\s5
\p
\v 14 देवाने प्रभूला मरणातून उठवले, आणि तो आम्हाला देखील पुन्हा जीवंत राहता यावे म्हणून आपल्या सामर्थ्याने उठवील.
\p
\v 15 तुमची शरिरे ख्रिस्ताशी जोडलेली आहेत हे तुम्हाला माहीत असावे. तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचा एखादा भाग काढून आणि तो वेश्येशी जोडावा काय? कधिच नाही!
\s5
\p
\v 16 तुम्हाला हे माहित आहे की जो कोणी एका वेश्ये सोबत झोपतो तो तिच्याशी एकरूप होतो. शास्त्रभागात विवाहा विषयी सांगितल्याप्रमाणे हे आहे : “ते दोघे एकदेह होतील.”
\v 17 आणि जे कोणी प्रभूशी जोडलेले आहेत ते त्याच्या बरोबर एक आत्मा असे होतील.
\s5
\p
\v 18 म्हणून तुम्हाला लैंगिक पाप करावेसे वाटते, तेव्हा जितक्या लवकर तुम्हाला जाता येईल तितक्या लवकर तेथून पळून जा! लोक म्हणतात, “मनुष्य जे प्रत्येक पाप करतो ते तो शरीराच्या बाहेरून करतो”—लैंगिकरित्या केलेले एकमेव पाप सोडून, तो आपल्या स्वतःच्या शरीराच्या विरोधात पाप करतो.
\s5
\p
\v 19 तुमचे शरिर हे तुम्हामध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला माहीत असावे. देवाने तुम्हाला त्याचा आत्मा दिला आहे, म्हणून आणि आता येथून पूढे तुम्ही स्वतःचे नाही. त्याऐवजी, तुम्ही देवाचे आहात.
\v 20 देवाने पुत्राच्या जीवनाची किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे. म्हणून तुम्ही आपल्या मानवी देहामध्ये जे काही कराल त्या सर्वांद्वारे देवाचा सन्मान करा.
\s5
\c 7
\s विवाह, ब्रम्हचर्य व सूटपत्र ह्यांविषयी प्रश्न
\p
\v 1 विवाह झालेल्या विश्वासणाऱ्यांनी कसे जीवन जगावे ह्याबाबत तुम्ही मला काही प्रश्न लिहिले. येथे माझे उत्तर आहे. विवाहामध्ये काही वेळा लैंगिक नातेसंबंधापासून दूर राहणे कदाचित योग्य ठरेल.
\v 2 परंतु अनेक वेळा लोक मोहात पडून लैंगिकरित्या अनैतिक होतात. म्हणून प्रत्येक पतीला त्याची स्वतःची पत्नी असावी, आणि प्रत्येक पत्नीला तिचा स्वतःचा पती असावा.
\s5
\p
\v 3 आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याच्या किंवा तिच्या जोडीदारासोबत लैंगिक नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार असावा.
\v 4 कारण पती त्याच्या शरीराचे नियंत्रण त्याच्या पत्नीला देतो. आणि पत्नी आपल्या शरीराचे नियंत्रण तिच्या पतीला देते.
\s5
\p
\v 5 म्हणून एकमेकांना लैंगिक जवळीकते पासून वंचीत करू नका, जो पर्यंत तुम्ही दोघे थोड्या कालावधीसाठी दूर राहण्यासाठी एकमत होत नाहीत तो पर्यंत, जेणेकरून तुम्हाला प्रार्थना करता येईल. परंतु तो कालावधी संपल्यानंतर, पुन्हा एकत्र व्हा. सैतानाला तुम्हाला मोहात पाडण्याची संधी देऊ नका कारण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
\p
\v 6 तुम्ही विवाह करावा अशी मी तुम्हाला आज्ञा देत नाही, कारण मला ठाऊक आहे की, तुमच्यापैकी पुष्कळांनी विवाह केला आहे किंवा पुष्कळांची विवाह करण्याची तयारी आहे.
\v 7 तुमच्यासमोर माझे उदाहरण आहे : मी एकटाच आहे, काही वेळा मला असे वाटते की तुमच्यापैकी प्रत्येकाने देवाची सेवा करण्याकरिता एकटेच असावे. परंतु देवाने त्याच्या लेकरांना अनेक वेग-वेगळी दाने दिली आहेत; तो काहींना विवाह करण्यास, आणि इतरांना एकटे राहण्यास सक्षम करतो.
\s5
\p
\v 8 तुमच्यापैकी ज्यांचा विवाह झालेला नाही आणि ज्यांचे पती मरण पावले आहेत, त्यांना मी असे म्हणतो की, कदाचित जर तुम्ही माझ्यासारखे एकटेच राहिलात तर ते बरे होईल.
\v 9 परंतु जर तुम्हाला स्वतःला नियंत्रणात ठेवणे कठीण होत असेल, तर तुम्ही विवाह करावा. लैंगिक इच्छेच्या तीव्र वासनेतून जाण्यापेक्षा, तुम्ही विवाह कराल तर ते बरे होईल.
\s5
\p
\v 10 तुम्ही जे विवाहित आहात त्यांना देव स्वतःच्या आज्ञा देतो : “पत्नीने तिच्या पती पासून विभक्त होऊ नये.”
\v 11 ( परंतु ती जर आपल्या पती पासून विभक्त होईल, तर तिने पुन्हा विवाह करू नये, किंवा तिने आपल्या पतीसोबत शांतीने राहावे.) आणि, “पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.” प्रभूच्या आज्ञा त्या ह्याच आहेत.
\s5
\p
\v 12 आणि मला हे सांगायचे आहे आणि हा माझा सल्ला आहे, प्रभूची आज्ञा नाही,—ज्याला अविश्वासणारी पत्नी आहे त्याच्यासाठी : जर ती तुझ्यासोबत राहण्यास समाधानी असेल, तर तिला घटस्फोट देऊ नको.
\v 13 आणि जर तू विश्वास न ठेवणाऱ्या पती सोबत राहणारी स्त्री आहेस, आणि जर तो तुझ्या सोबत राहण्यास समाधानी असेल, तर त्याला घटस्फोट देऊ नको.
\v 14 पत्नी देवावर विश्वास ठेवते म्हणून अविश्वासणारा पती देवासाठी एका विशिष्ठ मार्गाने वेगळा केला जातो. अविश्वासणारी स्त्री जीचा पती देवावर विश्वास ठेवणारा आहे तीच्यासाठी देखील हे असेच आहे. तुमच्या मुलांसाठी देखील हे असेच आहे : ते देवासाठी एका विशिष्ठ मार्गाने वेगळी केली जातात, कारण त्यांचे आई वडील ख्रिस्तावर विश्वास ठेवतात.
\s5
\p
\v 15 तथापी, अविश्वासणाऱ्या जोडीदाराला जर तुम्हाला सोडून जायची इच्छा असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला जाऊ द्यावे. ह्या परिस्थीतीमध्ये, तुम्ही विवाह करतांना घेतलेल्या शपथांचे येथून पूढे तुमच्यावर बंधन राहत नाही. देवाने आम्हाला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
\v 16 आपल्या अविश्वासणाऱ्या जोडीदारासमोर तुम्ही कसे जीवन जगता ह्याद्वारे देव कसे कार्य करू शकतो हे तुम्हाला माहीत नाही. आणि तुम्हाला हे माहीत असावे की, तुमचे जीवन एक साधन बनू शकते ज्या द्वारे देव तुमच्या जोडीदाराला वाचवू शकेल.
\s5
\p
\v 17 प्रभूने आपल्याला नियुक्त केल्याप्रमाणे, आणि देवाने दिलेल्या पाचारणाचे आज्ञापालन करणारे जीवन आपण जगले पाहीजे. सर्व मंडळ्यांचा हाच सिद्धांत आहे.
\v 18 एखादा मनुष्य ख्रिस्ती होण्याआधी जर सुंता करून घेतो, त्याने ती खुण काढून टाकण्याचा प्रयत्न करू नये. देवाने तुमचे तारण केले तेव्हा तुमची सुंता झालेली नसेल, तर कोणालाही तुमची सुंता करण्यास तुम्ही परवानगी देऊ नका.
\v 19 सुंता होणे किंवा सुंता न होणे हे दोन्ही आमच्यासाठी महत्वाचे नाहीत. परंतु देवाने जे काही करण्यासाठी आज्ञापीले तेच आम्ही करावे हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे.
\s5
\v 20 म्हणून देवाने तुम्हाला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी बोलावले तेव्हा तुम्ही जसे श्रम केले तसेच करत जा आणि ह्याच प्रकारे जीवन जगत राहा.
\v 21 देवाने तुमचे तारण केले तेव्हा जर तुम्ही होता, त्याविषयी काळजी करू नका. नक्कीच, तुम्हाला जर तुमची सुटका विकत घेण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा घ्या आणि स्वतंत्र व्हा.
\v 22 हे यासाठी की ज्याला प्रभू गुलाम म्हणून बोलावितो तो प्रभू मुळे मुक्त झालेला व्यक्ती आहे. ह्याच प्रकारे, तुम्ही यापूर्वी कधीही कोणाचे ही गुलाम नव्हता तरी, देवाने तुम्हाला बोलावले तेव्हा तुम्ही त्याचे गुलाम झाला आहात.
\v 23 देवाने तुम्हाला त्याच्या पुत्राचे मोल देऊन विकत घेतले आहे; तुमची स्वतंत्रता मौल्यवान आहे. म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका.
\v 24 ख्रिस्तामधील भावांनो आणि बहिणींनो, देवाने तुम्हाला बोलावले तेव्हा तुम्ही कोणीही असाल, तुम्ही गुलाम असाल किंवा स्वतंत्र असाल, त्याच स्थितीमध्ये टिकून राहा.
\s5
\p
\v 25 ज्यांनी कधीच विवाह केलेला नाही त्यांच्या प्रश्नाविषयी, मी माझे मत देईन, परंतु ह्या प्रश्नावर मला देवापासून विशिष्ट आज्ञा देण्यात आलेली नाही. परंतु तरी तुम्ही माझ्या उत्तराची खात्री करू शकता, कारण देवाच्या दयेने, ह्या बाबतीत माझ्या विश्वासूपणाची त्याला खात्री आहे.
\v 26 म्हणूनच, कठीण परिस्थिती मुळे ते आपल्या सर्वांवर येत आहे असे दिसते, देवाने तुम्हाला ज्या स्तिथीत बोलावले त्यातच तुम्ही टिकून राहावे असे मला वाटते.
\s5
\p
\v 27 तुम्ही जे विवाहित आहात, त्यांना मी सांगतो : आपल्या शपथांपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधू नका.
\v 28 परंतु जे अविवाहित आहेत त्या मनुष्यांसाठी, त्यांना मी सांगतो, जर तुम्ही विवाह करता, तेव्हा तुम्ही पाप करता असे नाही. अविवाहित स्त्रीयांना देखील मी असाच सल्ला देईन. जर तुम्ही विवाह केला, तर तुम्ही पाप करता असे नाही. तथापी, जर तुम्ही विवाह करता, तर तुम्ही अनेक समस्यांमध्ये सापडाल, म्हणून तुम्ही अविवाहित राहावे असा मी सल्ला देईन.
\s5
\p
\v 29 भावांनो आणि बहिणिंनो, ज्या वेळेमध्ये आम्ही जगत आहोत त्याविषयी मला जे म्हणायचे ते हेच आहे : आमच्याकडे फार कमी वेळ शिल्लक राहिला आहे. सर्व संकटे जी येणार आहेत त्यामुळे, आतापासून ज्यांनी विवाह केला आहे ते जसेकाही त्यांचा विवाह झालेला नाही असे जगतील.
\v 30 जे दुःखाने भरले आहेत ते अश्रु गाळणार नाहीत. जे कोणी अप्रतिम प्रसंगाचा आनंद घेतात, त्यांच्या मुखावर किंवा त्यांच्या मनात कोणताही आनंद असणार नाही. जे कोणी त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी विकत घेण्यासाठी पैसा खर्चकरतील, ते त्याचा आनंद घेणार नाहीत; त्यांनी असे जीवन जगावे की जणुकाय काहिही त्यांच्या मालकीचे नाही.
\v 31 आणि जे कोणी अविश्वासणाऱ्यांसोबत व्यवहार करतात तो त्यांनी जणू काय ह्या पूढे त्यांच्याशी काहीही न करण्यासारखा करावा. कारण या जगाची व्यवस्था नाश होण्याच्या मार्गावर आहे.
\s5
\p
\v 32 ह्या विषयी काळजी करण्यापासून तुम्ही मुक्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. जसे तुम्ही पाहता, प्रभूसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकरणाविषयी अविवाहित पुरूष चिंता करतो. देवाला जे पाहिजे ते करावे आणि त्याची सेवा करावी असे त्याला वाटते.
\v 33 परंतु विवाहित पुरूषाने जगातील दैनंदिन जीवनाचे प्रकरण तसेच आपल्या पत्नीला संतोषविण्यासाठी आणि तिची सेवा करण्यासाठी देखील चिंता केली पाहीजे.
\v 34 ज्यांचा विवाह झाला आहे त्यांना दोन प्रकारच्या चिंता असतात ज्या एकमेकांना विरूद्ध दिशेने ओढत असतात. ज्या विधवा आणि अविवाहित मुली आहेत त्यांच्या बाबतीत देखील हे असेच आहे : जसे विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया, प्रभूची सेवा करण्यामध्ये आपला वेळ घालवण्याविषयी चिंता करतात. देवाने त्यांना स्वतःसाठी वेगळे करून ठेवले आहे, म्हणून त्यासाठी कसे जीवन जगता येईल ह्याचाच ते विचार करत असतात. परंतु विवाहित स्त्रियां देखील जगाच्या प्रकरणा विषयी चिंता करतात ज्या प्रत्येकाला स्पर्शकरून जाणाऱ्या असतात. आणि त्या चिंतेमध्ये आणखी भर घालून, त्यांना आपल्या पतीला संतोषविण्याची इच्छा असते.
\s5
\p
\v 35 तुमची मदत करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. मी तुम्हाला कोणतीही आज्ञा देऊ इच्छित नाही. जर तुम्ही माझ्या सल्ल्यानूसार जगलात तर, ज्या गोष्टींविषयी विवाहित लोक काळजी करतात त्या बद्दल काळजी न करता प्रभूला संतोषविण्याचा सोपा मार्ग तुम्हाला मिळेल.
\s5
\p
\v 36 एखाद्या स्त्री सोबत विवाह करण्यासाठी एखाद्या पुरूषाने वचन दिले, परंतु त्याच्या लैंगिक इच्छेमुळे तो तिला आदराने वागवत नाही असे जर त्याच्या लक्षात आले, तर त्याने विवाह करावा. हे एक पाप नाही.
\v 37 परंतु जर त्याने असा निर्णय घेतला की वर्तमान काळात तो तिच्या सोबत विवाह करू इच्छित नाही, आणि जर तो त्याच्या लैंगिक इच्छेवर ताबा ठेऊ शकतो, तर तो विवाह न करण्याचा चांगला निर्णय करतो.
\v 38 म्हणून जो कोणी आपल्याला वाग्दत असलेल्या स्त्री सोबत विवाह करतो तो एक चांगली गोष्ट करतो आणि तो पाप करत नाही; आणि जो कोणी विवाह न करण्याचा निर्णय घेतो तो आणखी काहीतरी चांगले करतो.
\s5
\p
\v 39 एका स्त्रीने जो पर्यंत तिचा पती जीवंत आहे तो पर्यंत त्याच्या सोबतच राहावे; तिचा पतीचा मृत्यु झाल्यावर, तिची इच्छा असेल त्याच्या सोबत विवाह करण्यासाठी ती मुक्त आहे. परंतु ज्याला प्रभूवर विश्वास आहे त्याच्यासोबतच तिने विवाह करावा.
\v 40 तथापी, माझ्या दृष्टीने जर एखाद्या विधवेने पुन्हा विवाह केला नाही तर ती आनंदी राहिल. आणि मला असे वाटते की, माझ्यात देखील देवाचा आत्मा आहे.
\s5
\c 8
\s मूर्तीला दाखवलेले नैवेद्य
\p
\v 1 आता, मूर्तीला दाखवलेले अन्न खाण्याविषयी तुम्ही विचारलेल्या प्रश्ना विषयी : लोक म्हणतात ते आम्हाला ठाऊक आहे, “आम्हाला सर्वांना ज्ञान आहे.” परंतु तुम्हाला जास्त समजते असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल खुप अभिमान वाटेल. तथापी, तुम्ही इतरांवर प्रीती करता, तेव्हा त्यांची विश्वासात दृढ वाढ व्हावी, म्हणून तुम्ही त्यांना मदत करता.
\v 2 सत्य हे आहे की आपल्याला काहीतरी समजते असा जर कोणीही विचार करतो, तर आतापर्यंत तो त्या गोष्टी समजला नाही ज्या त्याने समजून घेणे आवश्यक होत्या.
\v 3 तुम्ही देवावर प्रेम करता, तेव्हा देव तुम्हाला ओळखतो.
\s5
\p
\v 4 आता मूर्तीला वाहिलेले अन्न खाण्याविषयी : ज्या मूर्ती काहीच नाही त्यांच्या तत्वांसोबत सुरवात करूया. “तेथे केवळ एकच देव आहे,” ह्यात आम्हाला कोणतीही शंका नाही. म्हणून मूर्ती खरे देव नाहीत, ते खरोखर जीवंत देव नाहीत.
\v 5 अशा अनेकांना देव आणि प्रभू म्हटले जाते त्यांना मंदिरे आहेत, आणि लोक त्यांची अशी उपासना करतात जणु काय ते पृथ्वीवर आणि स्वर्गात देखील जीवंत आहेत.
\v 6 शास्त्राभाग हे अगदी स्पष्ट सांगते,
\q “अद्याप आमच्यासाठी एकच देव, जो पिता आहे,
\q त्याच्या द्वारेच सर्वगोष्टी आलेल्या आहेत, आणि आम्ही केवळ त्याच्यासाठीच जगतो.
\q आणि केवळ एकच प्रभू, येशू ख्रिस्त आहे;
\q त्यानेच सर्व काही बनवले आहे, आणि केवळ तोच एक असा आहे जो आपल्याला जीवन देतो.
\s दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी
\s5
\p
\v 7 परंतु प्रत्येकालाच हे माहीत नाही. पुर्वीच्या काळात काहींनी मूर्तीची उपासना केली, आणि आता, त्यांनी मूर्तीला वाहीलेले अन्न खाल्ले तर, त्यांना काळजी वाटते की ते अजूनही त्या देवाची उपासना करत आहेत. त्यांची दोन मतांमध्ये विभागणी होते, ते ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासात अशक्त होतात, परंतु त्यांनी मूर्तींना दाखवलेले अन्न विकत घेतल्यावर त्यांना असे वाटते की ते त्यांचा सन्मान करत आहेत.
\s5
\p
\v 8 आम्हाला ठाऊक आहे की जे अन्न आम्ही खातो ते आम्हाला देवा समोर चांगले किंवा वाईट ठरवत नाही.
\v 9 परंतु ख्रिस्तामधील तुमचे भाऊ आणि बहिनीच महत्वाच्या आहेत. ते अन्न खाण्याची तुम्हाला मोकळीकता आहे, तुम्हाला खाण्याची मोकळीकता आहे, परंतु तुमच्या खाण्याच्या मोकळीकतेमुळे कोणताही व्यक्ती त्याच्या विश्वासातून पडायला नको.
\v 10 तुम्हाला माहीत आहे की ती मूर्ती कधीच जीवंत नव्हती, ना ती कधीही खरोखर देव नव्हती. परंतु विश्वासात अशक्त अशा एका बंधूने जर तुम्हाला मूर्तींच्या मंदिरात खातांना पाहिले, हे त्याला त्याच्या मूर्ती पुजेकडे मागे फिरण्यास प्रोत्साहन देणार नाही काय?
\s5
\p
\v 11 परिणामी, जर तुमच्या एखाद्या विश्वासात अशक्त असलेल्या भावाने किंवा बहिणीने मूर्तीला वाहिलेले मांस खातांना पाहीले कारण तुम्हाला ते अन्न खाण्यासाठी तुमच्या मनामध्ये मोकळीकता आहे परंतु त्यांना तुमच्या सारखी मोकळीकता नसल्याने—ते अन्न खाण्यासाठीची तुमची मोकळीकता ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला होता त्या तुमच्या भावांचा किंवा बहिणींचा नाश करू शकते.
\v 12 म्हणून तुम्ही आपला अशक्त भाऊ आणि बहिण ह्यांच्या विरोधात पाप करता, जेव्हा तुम्ही त्यांना असे काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहीत करता ज्याविषयी त्यांची योग्य आणि अयोग्य समज त्यांनी ते करू नये असे सांगते. हे ख्रिस्ताच्या विरोधात पाप करणे होय.
\v 13 म्हणूनच, जर अन्नामुळे माझा भाऊ किंवा बहिण त्याच्या देवाबरोबरच्या नाते संबंधातून खाली पडत असेल, तर मी पुन्हा मांस खाणार नाही! त्यांचे पतन होईल असे काहीही करण्यास मी इच्छुक नाही.
\s5
\c 9
\s आपल्या स्वतःच्या हक्कांवर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण
\p
\v 1 माझ्या कामावर टिका करणाऱ्या लोकांना मी ह्याप्रकारे प्रतिउत्तर देतो : मी एक प्रेषित आहे. आमचा प्रभू ‘येशू’ ह्याला मी पाहिले आहे. मी स्वतंत्र आहे. माझ्या हातून घडलेल्या कार्याचे फळ तुम्ही आहात—माझी कारागिरी तुम्ही आहात.
\v 2 जरी इतर काहीजण मी खरा प्रेषित नाही असा विचार माझ्याबद्दल करतात, तरीही तुमच्याकरता मी एक खरा प्रेषित आहे. प्रभूच्या मंजुरीच्या शिक्क्याद्वारे, मी एक खरा प्रेषित आहे आणि याचा पुरावा म्हणून तुम्ही आहात.
\s5
\p
\v 3 जे कोणी मला म्हणतो की, मी एक खरा प्रेषित नाही त्यांना मी म्हणतो तुम्ही विश्वासणाऱ्यांनी दिलेल्या पैशांवर मी जगत नाही म्हणून मी एक खरा प्रेषित आहे हे माझे त्यांना उत्तर असते.
\v 4 अर्थातच आम्हांला त्या पैशांवर जगण्याचा हक्क आहे.
\v 5 इतर प्रेषितांप्रमाणे प्रभूचे भाऊ आणि केफा जसे करतात त्याप्रमाणे नक्कीच आम्ही देखील एका विश्वासणाऱ्या पत्नीबरोबर प्रवास करू शकतो.
\v 6 आणि केवळ मी व बर्णबाने आमच्या स्वतःच्या आधारासाठी काम केलेच पाहीजे असा नियम कोणीही बनवलेला नाही.
\s5
\p
\v 7 कोणताही सैनिक आपल्या स्वतःच्या खर्चाने सैन्यात सेवा करत नाही. द्राक्षमळा लावून त्याच्यातील द्राक्ष चाखत नाही किंवा द्राक्षरस पीत नाही असा कोणी एक नाही. प्राण्यांपासून येणाऱ्या दुधापैंकी काही दुध न पिता कोणीही त्या कळपाला पाळत नाही.
\p
\v 8 हे तर सामन्य ज्ञान आहे. परंतु नियमशास्त्रही हेच सांगते.
\s5
\p
\v 9 मोशेच्या नियमशास्त्रात तो म्हणाला, “बैल धान्याची मळणी करेल, तेव्हा त्यातील काही खाण्यापासून त्याला थांबवू नका.” या नियमात (असे काही आहे ज्याविषयी देव असे समजतो.)
\v 10 हा नियम आमच्याविषयी आहे. जसा एखादा बैल मळणी करत असता ते धान्य तो खातो त्यासारखेच, जसा एखादा प्रेषित त्याच्या मंडळीवर जगतो त्याप्रमाणेच कोणत्याही कामात जे काम करतात त्यांना त्या कामातून मिळणाऱ्या फळाचा लाभ मिळायलाच पाहीजे असे मोशे म्हणतो.
\v 11 आम्ही तुमच्यात जर शुभवर्तमानाचे बीं पेरले आहेत, तर आमच्या आधारासाठी आम्ही तुमच्याकडून पैसे प्राप्त केले तर त्यामधे मोठे काय आहे?
\s5
\p
\v 12 जर इतरांना आपल्याकडून या प्रकारची मदत मिळाली, तर आम्ही त्यापेक्षाही अधिक पात्र आहोत हे आम्ही निश्चितपणे सिद्ध केले आहे.
\p तथापि, जरी आम्हांला त्यावर हक्क आहे, तरीही आम्ही तुमच्याकडून काहीही स्वीकारले नाही. त्याऐवजी, ख्रिस्ताबद्दल असलेल्या सुवार्तेवर लोकांनी विश्वास ठेवाण्याकरता आम्ही ते अधिक कठीण बनवले नाही म्हणून आम्ही सर्व प्रकारचे त्रास सहन करतो.
\v 13 बलिदाने पार पाडण्यास मदत करणारे मंदिरात देवाला अर्पण केलेल्या बलिदानांपैकी काही अर्पण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतात हे नक्कीच तुम्हांला माहिती आहे. देवाला अर्पण केलेले काही अन्न त्यांना मिळते.
\v 14 त्याचप्रकारे, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचे जीवन जगण्याचे वेतन शुभवर्तमानापासून प्राप्त व्हावे अशी आज्ञा देवाने दिली आहे. देवाला जे दिले जाते त्यातून काही भाग त्यांच्या गरजा पूर्ण होण्याकरता त्यांना दिला जातो.
\s5
\p
\v 15 परंतु मी या पैशाची स्वत:साठी मागणी केली नाही. आणि म्हणूनच आता मी हे तुम्हाला लिहित आहे असे काही नाही. तुमच्याकडून पैसे मागण्यापेक्षा मी मरण्यास पसंत करेन. तुमच्याकडून माझा आधार व्हावा हा माझा अधिकार आहे असा दावा मी कधीही केलेला नाही—माझा अभिमान व्हावा ह्या कारणामुळे मी ही मागणी केली नाही.
\v 16 जरी मी शुभवर्तमानाची घोषणा करतो, तर त्यासाठी मी बढाई मारावी असे काहीही मी करत नाही. शुभवर्तमान प्रचार करणे मला आवश्यक आहे. देवाने जे करण्यासाठी माझी निवड केली आणि ते मी केले नाही तर मला पुष्कळ अश्रुंनी शोक करावा लागेल.
\s5
\p
\v 17 मी शुभवर्तमानाचा प्रचार मोफत करतो, तेव्हा माझ्याकडे एक महान बक्षीस राहील. परंतु जरी मी मोफतपणे उपदेश केला नसला, तरी देखील मी हे केलेच पाहिजे, कारण देवाने त्याचे हे काम करण्यासाठी माझ्यावर भरवसा केला आहे.
\v 18 तर मग देव मला काय प्रतिफळ देईल? जे लोक मला आधार देत नाहीत त्यांना मी मोफतपणे शुभवर्तमान सांगतो, तेव्हा कोणालाही माझ्या बंधनात न टाकता, मी ते मोफतपणे सांगतो हे असे आहे. कुठल्याही पैशांचा खर्च न करता त्यांना सुवार्ता प्राप्त होते, आणि माझे जे देणे त्यांना आहे ते मी त्यांच्याकडून काहीही घेत नाही.
\s लोकांना प्राप्त करून घेण्याच्या कामी त्याची आस्था
\s5
\p
\v 19 मी सर्व जबाबदारी पासून मुक्त आहे आणि मला कोणाचेही काहीही देणे नाही. मला कोणीही काही दिले नाही, परंतु लोकांनी ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवावा व मी त्यासाठी अधिकाधिक त्यांचे मन वळवावे म्हणून मी सर्वांसाठी एक दास झालो.
\v 20 मी यहूदी लोकांसोबत काम करतो तेव्हा, एका यहूदीसारखा झालो होतो, जेणेकरून ख्रिस्तासाठी मला त्यांना जिकंता यावे. जे नियमशास्त्राखाली जगत आहेत त्यांच्यासाठी (जरी नियमशास्त्र जसे जगण्यास सांगते तसे माझे जीवन मी जगत नाही), जसा मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तसा जे नियमशास्त्राखाली जगत आहेत त्यांनीही विश्वास ठेवावा, म्हणून ते जसे जगतात तसे मी देखील जगलो होतो.
\s5
\p
\v 21 मोशेच्या नियमशास्त्रापासून दूर राहणारे, जे यहूदी नाहीत त्यांच्यासोबत मी असतो, तेव्हा (जरी मी स्वतः नियमशास्त्राच्या बाहेर नाही आणि ख्रिस्ताच्या नियमांचा मी आज्ञाधारक आहे), नियमशास्त्रापासून दूर राहणाऱ्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांचे मन मला वळवता यावे म्हणून मी त्याच्यांसारखा झालो.
\v 22 नियम आणि कायद्यांबद्दल दुर्बल असलेल्यांनी, ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, म्हणून त्यांचे मन मला वळवता यावे म्हणून त्यांनी जसे केले तसा मी राहिलो. कारण कोणत्याही मार्गाने देवाने कार्य करण्यासाठी निवडावे, देवाने त्याच्यांपैकी काहींचा बचाव करावा म्हणून मी नियमाखाली आणि बऱ्याच मार्गांनी आणि सर्व प्रकारच्या लोकांबरोबर राहिलो.
\v 23 ख्रिस्ताविषयीची सुवार्तेची घोषणा मला करता यावी, यासाठी चांगली बातमी आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येते आणि त्याचा अनुभव मला देखील घेता येईल म्हणून मी हे सर्वकाही केले.
\s विजयाला अवश्य असा प्रयत्न
\s5
\p
\v 24 लोक एका शर्यतीत धावतात, तेव्हा ते सर्वच धावतात, परंतु त्याच्यांपैकी कोणी एकच बक्षीस जिकंतो हे तुम्हांला माहीतच आहे. म्हणून तुम्हीही बक्षीस जिकांलच असे धावा.
\v 25 प्रत्येक धावपटू हा तो कसा आधिक प्रशिक्षीत होईल ह्याची काळजी घेतो. ते त्वरीत नाश होणाऱ्या आणि निस्तेज होणाऱ्या एका पुष्पगुच्छाला प्राप्त करण्यासाठी धावतात. परंतु आम्ही कायम टिकून राहणाऱ्या एका पुष्पगुच्छाला कदाचित प्राप्त करू शकू म्हणून धावत आहोत.
\v 26 म्हणूनच, प्रत्येक गोष्टीत मी जे करतो, एका हेतूसाठी ते मी करतो. माझे प्रयत्न मी व्यर्थ घालवत नाही किंवा एक मुष्ठियोद्धा ज्याला विरोधक नाही अशासारखा मी हवे तसे प्रहार करुन स्वत:ला थकवत नाही.
\v 27 मी माझ्या शरीराला शिस्त लावतो आणि माझ्या आज्ञा पाळाव्या असे मी त्याला बनवतो. मला इतरांना शुभवर्तमान सांगण्याची इच्छा नाही कारण त्याने मला जे करायला सांगितले ते पूर्ण करण्यास मी अयशस्वी होईल आणि म्हणून माझे बक्षीस मी गमावेन.
\s5
\c 10
\s इस्राएल लोकांच्या इतिहासावरून इशारा
\p
\v 1 बंधूनो आणि भगिनींनो, आमचे यहूदी पूर्वज त्या देवाला अनुसरण करीत होते, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले दिवसभर ते एका ढगाखाली, आणि तांबड्या समुद्रातून ते कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले, हे आपण लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे.
\v 2 आणि आम्ही जसा ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला आहे, तसाच मोशे जसे त्याने देवाचे अनुसरण केले तसेच इस्त्राएल लोक त्याला अनुसरण करायचे त्यांचाही मेघात आणि समुद्रात बाप्तिस्मा झाला.
\v 3 देवाने त्यांना स्वर्गातून दिलेला मान्ना त्या सर्वांनी खाल्ला,
\v 4 आणि मोशेने खडकाला मारले तेव्हा देवाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले ते त्या सर्वांनी पिले. आणि तो खडक ख्रिस्त होता.
\s5
\p
\v 5 पंरतु देव त्यांच्यापैकी बहुतांशावर रागावला होता कारण त्यांनी इतर दैवतांची पूजा केली आणि त्याच्याविरुद्ध बंड केले, त्यामुळे त्यांची मृत शरीरे सर्व अरण्यात जमिनीवर पडलेली होती.
\p
\v 6 आता आमच्यासाठी उदाहरण म्हणून या गोष्टी आहेत, म्हणून त्यांनी केले तसे आम्हीही वाईटाची इच्छा धरणारे होऊ नये हे आपण यामधून शिकूया.
\s5
\p
\v 7 आमच्या पूर्वजांपैकी काहीजण देखील मूर्तिची उपासना करणारे होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, “लोक खाण्यास आणि पिण्यास खाली बसले आणि नंतर ते एका लैंगिक पद्धतीचे नृत्य करण्यासाठी उठले.”
\v 8 त्यांच्या लैंगिक अनैतिकतेमुळे आमच्या तेवीस हजार यहूदी पूर्वजांचा एका दिवसात मृत्यु झाला.
\s5
\p
\v 9 आपल्या पूर्वजांपैकी काहींनी असे केले, आणि त्यामुळे ते विषारी सापांकडून मारले गेले. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा ख्रिस्ताला नाकारून त्याच्या अधिकाराची परीक्षा घेऊ नये.
\v 10 आपल्या पूर्वजांपैकी काहींनी कुरकुर केली, आणि त्यामुळे एका मृत्युदूताकडून ते नष्ट केले गेले, त्याचप्रमाणे देव जे काय पुरवतो त्याबद्दल आम्ही सुद्धा कुरकुर नये.
\s5
\p
\v 11 आम्ही—जे या जगाच्या अगदी शेवटच्या काळात जगत आहोत, तेव्हा या गोष्टी ज्या आमच्या पूर्वजांबरोबर झाल्या आहेत; त्यातून आम्ही शिकावे, म्हणून आम्हांसाठी त्यांनी त्या लिहून ठेवल्या आहेत.
\v 12 आणि म्हणून हा धडा आहे, तुम्ही मजबूत आहात आणि तुम्ही मजबूत उभे आहात असे तुम्हांला वाटत असेल, तर काळजी घ्या, कारण हे अगदी शेवटी घडत असतानाच, तुम्ही देखील पडू शकता, म्हणून अधिक काळजी घ्या.
\v 13 प्रत्येक मोह हा आम्हां सर्वांसाठी सामायिक आहे, परंतु देवाने आम्हांला अभिवचन दिले आहे आणि पापाविरूद्ध लढण्यासाठी आमच्या क्षमतेपेक्षा मोठे होण्याची परवानगी त्या मोहाला तो देणार नाही. मोह येईल, तेव्हा त्यातून मुक्त व्हावे म्हणून एक मार्ग देव तुम्हांला देईल, त्यामुळे आपण कदाचित पाप करण्याचे मोहाला टाळाल.
\s मूर्तिपूजेचा त्याग
\s5
\p
\v 14 म्हणूनच, माझ्या प्रियांनो, तुम्हांला मूर्तिपूजेपासून जितक्या जोरात पळता येईल तितक्या जोराने दूर पळा.
\v 15 जगण्याबद्दल काळजीपूर्वक विचार करणारे लोक समजून मी तुमच्याशी बोलतो आहे; मी इथे काय म्हणतो आहे याचा विचार करा.
\v 16 आम्ही द्राक्षरसाचा प्याला पितो, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या रक्तात सहभागी होऊन, आम्ही आर्शीवादीत होतो. आम्ही भाकर मोडतो, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शरीरात सहभागी आहोत.
\v 17 येथे केवळ भाकरीचा एक चतकोर तुकडा आहे, आणि आम्ही, जरी अनेक असलो तरी, आम्ही सर्व त्या चतकोर भाकरींतून घेतो आणि एकत्र खातो, म्हणून आम्ही सर्व एकत्र मिळून एकच शरीर निर्माण करतो.
\s5
\p
\v 18 इस्त्राएलाच्या लोकांबद्दल विचार करा. जे वेदीवर अर्पिण्यात आलेले बलिदान ते खातात त्या वेदीचे भागीदार होतात.
\v 19 एक मूर्ती काही वास्तविक आहे, किंवा मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका हे महत्वाचे आहे? अजिबात नाही. म्हणून मी असे म्हणत आहे.
\s5
\p
\v 20 परंतु मी हे सांगत आहे : परराष्ट्रीय त्यांचे यज्ञ तयार करतात, तेव्हा ते खरोखर ते भूतांसाठी तयार करतात, आणि देवासाठी ते अजिबात तयार करत नाहीत. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीत भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.
\v 21 तुम्ही प्रभूच्या प्याल्यामधून पिता आणि त्यानंतर भूतांच्या प्याल्यामधूनही पिता असे कदापि पिऊ नका. तुम्ही प्रभूच्या जेवणाचे भागीदार होता आणि त्यानंतर भूतांसोबतही जेवण करता तसे कदापि खाऊ नका.
\v 22 असे करण्याने प्रभूला ईर्ष्या उत्पन्न होते. तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके तुम्ही नाही!
\s5
\p
\v 23 काही म्हणतात, “प्रत्येक गोष्ट कायदेशीर आहे,” परंतु सर्वकाही गोष्टी आमच्या चांगल्यासाठी किंवा इतर लोकांच्या चांगल्यासाठी नाहीत. होय, “प्रत्येक गोष्ट कायदेशीर आहे, परंतु देवामध्ये मजबूत वाढण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्टींची मदत होणार नाही.
\v 24 केवळ तुमच्या चांगल्यासाठी काम करु नका, पंरतु इतर लोकांचेही चांगले करा. आम्ही सर्वांनी प्रत्येकजणांची मदत होईल असा मार्ग तयार करून प्रत्येकाच्या मदतीचे कार्य केलेच पाहिजे.
\s5
\p
\v 25 येथे आमचे नियम आहेत : बाजारात असलेले जे कोणते मासं तुम्हांला हवे आहे तर ते एका मूर्तीला अर्पित केलेले आहे किंवा नाही असा कुठलाही विचार न करता तुम्ही ते खरेदी करू शकता.
\v 26 जसे की स्तोत्रकर्ता म्हणतो, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.”
\v 27 अविश्वासणाऱ्या परराष्ट्रीयाने जर तुम्हाला जेवावयास आंमत्रित केले, आणि तुमची जाण्याची इच्छा आहे, तर तो जो काही तुम्हाला वाढेल ते खा. त्याने ते कोठून खरेदी केले याबद्दल त्याला विचारावे म्हणून तुम्ही कोणत्याही बंधनाखाली नाही.
\s5
\p
\v 28 परंतु जर कोणी तुम्हांला म्हणेल की, “आम्ही हे अन्न मंदिरातील मूर्तिस्थानातून विकत घेतले आहे आणि ते त्या देवाला अर्पण केलेले होते,” जो वाढतोय त्या व्यक्तीला वाईट वाटेल, आणि म्हणून योग्य आणि अयोग्य भावना निर्माण होऊ नये आणि विरोधाभासही होईल, असा विचार करून ते अन्न खाऊ नका.
\v 29 बरोबर काय आणि चूक काय याबद्दल तुम्ही स्वतःला काय वाटते, परंतु इतर व्यक्ती त्याबद्दल कसा विचार करतो त्याबद्दल काळजी केली जात नाही. दुसऱ्या व्यक्तीचे बरोबर किंवा चूक काय ह्याबद्दल असलेल्या विश्वासानुसार माझे वैयक्तिक पर्याय बदलले जाणार नाहीत.
\v 30 मी धन्यवाद देऊन जेवणाचा आस्वाद घेतो, तर इतर कोणीतरी मला दोष लावण्याकरीता मी परवानगी देणार नाही.
\s5
\p
\v 31 तुम्हांला दिले गेलेले एखादे जेवण तुम्ही खात असाल किंवा काहीतरी पेय पित असाल, किंवा काहीही तुम्ही करता, ते सर्वकाही अशा प्रकारे करा जेणेकरून तुम्ही देवाची स्तुती कराल असा नियम येथे आहे.
\v 32 यहूद्यांना किंवा ग्रीकांना, अगदी देवाच्या मंडळीत असलेल्यांनाही, यासारख्या गोष्टींबद्दल अडखळण होऊ नका.
\v 33 मी शक्य होईल तितक्या मार्गाने प्रत्येकजणांना संतुष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो कारण हे माझे कर्तव्य आहे. माझ्या स्वतःचे हित न शोधता हे मी करतो. त्याऐवजी, मी इतर लोकांना मदत करून त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून देवाने त्यांचे तारण करावे.
\s5
\c 11
\p
\v 1 मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करतो, तसेच माझ्या उदाहरणाचे अनुकरण करा.
\p
\v 2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही जे सर्वकाही करता त्यात माझी आठवण करता, आणि मी तुमच्यापर्यंत आणलेल्या सर्व महत्त्वाच्या शिकवणींना तुम्ही घट्ट पकडून ठेवले आणि ज्याप्रमाणे मी त्या शिकवणी तुम्हांला शिकवल्या, तशाच तुम्ही त्या ठेवल्या आहेत.
\v 3 ख्रिस्ताला प्रत्येक पुरूषावर अधिकार आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, आणि एका पुरूषाला एका स्त्रीवर अधिकार आहे, आणि देवाला ख्रिस्तावर अधिकार आहे.
\v 4 कोणताही पुरूष प्रार्थना करतो तेव्हा किंवा देवापासून आलेल्या उपदेशाची घोषणा करतो तेव्हा, जर तो आपले मस्तक झाकतो तर तेव्हा तो त्याच्या स्वतःवर लज्जा आणतो.
\s5
\p
\v 5 पण एखादी स्त्री प्रार्थना करते किंवा देवाने तिला दिलेल्या एका उपदेशाची घोषणा करते तेव्हा, जर तीचे मस्तक झाकलेले नसते, तर ती तिच्यावर लज्जा आणते.
\v 6 एखाद्या स्त्रीने आपले डोके झाकण्यास नकार दिला, तर मग तिने आपले केस एका पुरूषाच्या केसांप्रमाणे लहान कापले पाहिजे. परंतु एखाद्या स्त्रीने तिचे केस लहान असे कापून काढणे किंवा तिच्या डोक्याचे मुंडण करणे हे तिच्यासाठी लज्जास्पद आहे हे तुम्हाला माहितच आहे. म्हणून, त्याऐवजी, तिने आपले डोके झाकून ठेवले पाहिजे.
\s5
\p
\v 7 देवाने पुरूषाला त्याच्याप्रमाणे बनवले आहे म्हणून त्याने आपले डोके झाकू नये, आणि देव स्वत: कसा आहे असे काही प्रमाणात मनुष्य प्रतिबिंबित करतो. परंतु पुरूष कशासारखे आहेत हे स्त्रीया दर्शवतात.
\v 8 कारण देवाने स्त्री हव्वा हिच्या पासून आदाम हा पुरूष निर्माण केलेला नाही; त्याऐवजी, त्याने आदाम पुरूषापासून हव्वा ह्या स्त्रीला निर्माण केले आहे.
\s5
\p
\v 9 देवाने स्त्रीच्या मदतीकरता ज्याला निर्माण केले तो पुरूष नव्हता, परंतु स्त्री ही पुरुषासाठी निर्माण केली गेली आहे.
\v 10 देवदूतांकरीता, तिच्यावर पुरुषाचा अधिकार आहे हे चिन्ह म्हणून, स्त्रियांनी त्यांचे डोके झाकून टाकावे.
\s5
\p
\v 11 तर आम्ही प्रभू मध्ये जसे एकत्र जगत आहोत, तसेच स्त्रियांना मदतीसाठी पुरुषांची आवश्यकता आहे, आणि पुरुषांना मदतीसाठी महिलांची गरज आहे.
\v 12 कारण ती स्त्री पुरुषांपासून बनविण्यात आली आहे, आणि मनुष्य स्त्रीपासून जन्माला आला आहे. ते एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु सर्व गोष्टी देवापासून आलेल्या आहेत.
\s5
\p
\v 13 ह्याचा निवाडा तुम्ही स्वतःच करा : एका स्त्रीने आपल्या डोक्यावर आच्छादन न करता देवाला प्रार्थना करणे हे योग्य आहे का?
\v 14 एका पुरूषाला लांब केस असणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे असे निसर्ग स्वतःच आम्हांला शिकवतो.
\v 15 पंरतु एका स्त्री साठी तिचे लांब केस हे तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करते असे देखील ते शिकवते. तिच्या सुंदरतेला आच्छादित करण्यासाठी देवाने तिला लांब केस दिले आहे.
\v 16 परंतु मंडळीतील कोणीही या विषयावर मत मांडू इच्छित असेल तर, आमच्याकडे यापेक्षा इतर कोणताही नियम नाही, किंवा कोणत्याही मंडळ्यापैकी यापेक्षा वेगळे काही करत नाही.
\s प्रभूभोजनाचे भ्रष्टीकरण
\s5
\p
\v 17 या सूचनांमध्ये, प्रभूभोजनाविषयी तुम्ही काय करत आहात त्यासाठी मी तुमची प्रशंसा करीत नाही. तुम्ही सर्व खाण्यासाठी एकत्रित येता, तेव्हा एकमेकांना उत्तेजन आणि मदत करण्याऐवजी, मंडळीतील तुमची सहभागिता खूपच वाईट बनवता.
\v 18 काळजीचा पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही एकत्र येता, तेव्हा तुम्ही भिन्न गट आणि भिन्न स्वरूपांत येतात. लोकांनी जे काही मला सांगितले आहे, ते खरे आहे असे दिसून येते.
\v 19 तुमच्या आपापसात भिन्न गट आहेत, काही मान्य आहेत, काही अमान्य आहेत आणि सन्माननिय ठिकाणे आहेत, आणि इतरांना ते नाही आहेत असे दिसून येते.
\s5
\p
\v 20 तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन खात नाही.
\v 21 तुम्ही खाता तेव्हा, एक व्यक्ती संपूर्ण भोजन आणतो आणि तो येतो तेव्हा लगेचच ते खातो; तो इतर कोणाचीही वाट पाहत नाही. दुसरा व्यक्ती भूकेला असंताना इतर लोक मात्र खूप द्राक्षारस पितात व ते मद्यधुंद होतात.
\v 22 तुम्हाला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी घरे नाहीत असे कृत्य तुम्ही करता! तुम्ही मंडळी बरोबर अपमानास्पद वागता, आणि ज्या हेतूकरता तुम्ही एकत्रित होता त्याला तुम्ही तुच्छ मानता. जे गरीब आहेत त्यांचा तुम्ही अपमान करता. मी याबद्दल काहीच चांगले बोलू शकत नाही. हे एक लज्जास्पद आहे.
\s5
\p
\v 23 कारण मला प्रभूपासून जे मिळाले तेच मी तुमच्यापर्यंत आणले आहे, प्रभू येशूला ज्या रात्री मारण्यासाठी त्याच्या शत्रुंच्या हाती धरुन देण्यात आले, तेव्हा त्याने भाकर घेतली,
\v 24 आणि नंतर त्याने देवाचे उपकार मानले, त्याने ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
\s5
\p
\v 25 नंतर तशाच प्रकारे, त्यांनी भोजन केल्यावर, त्याने एक प्याला घेतला, आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
\v 26 कारण प्रत्येक वेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
\s5
\p
\v 27 प्रभूभोजनाच्या या उत्सवात येणाऱ्या सर्वांनी ते ज्या प्रकारे सामायिक केले गेले आहे त्या प्रकारे देवाला आदर देण्याकरिता आले पाहिजे. जो कोणी ही भाकर खातो आणि तो प्याला पितो म्हणून अशा पद्धतीने प्रभूच्या सन्मानार्थ करणे आवश्यक आहे. जो कोणीही त्या भाकरीचा आणि त्या प्यालाचा अपमान करतो तो प्रभूचे शरीर आणि रक्त याच्याविरुद्ध पाप करतो म्हणून तो दोषी ठरेल.
\v 28 म्हणूनच आम्ही सर्वांनी सहभागितेमध्ये सहभागी होण्याआधी आपले स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. आमच्या जीवनाचे, आमच्या पापांचे आणि देवाच्या दयेचे परीक्षण केल्यानंतरच आम्ही भाकरीला खाल्ले आणि प्याल्यातून पिले पाहीजे.
\v 29 जो कोणीही ह्या भोजनाला खातो आणि पितो आणि तो प्रभूचे शरीर आपण हाताळतो आहोत हा विचार तो करत नाही, तर खाण्याने आणि पिण्याने त्याच्या स्वतःवर देवाचा दंड ओढवून घेतो.
\v 30 प्रभू भोजनाला योग्य पद्धतीने तुम्ही घेतले नाही म्हणून तुम्हातील अनेकजण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत.
\s5
\p
\v 31 आम्ही सहभागितेमध्ये सहभागी होण्याआधी आपले स्वतःचे परीक्षण केले, तर देव आपल्यावर न्याय आणणार नाही.
\v 32 परंतु देव न्याय करतो आणि आम्हांला शिक्षा करतो, तेव्हा तो आम्हाला शिस्त लावण्यासाठी आम्हाला दुरूस्त करतो, जेणेकरून देवाविरूद्ध ज्या जगाने बंड केले आहे त्याबरोबर तो आम्हाला दोष लावणार नाही.
\s5
\p
\v 33 माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही प्रभूभोजनासाठी एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
\v 34 तुमच्यापैकी एखादा भूकेला असेल, तर त्याने घरीच खावे यासाठी की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र येता, तेव्हा देवाने तुम्हाला शिस्त लावावी म्हणून तो एक निमित्त होणार नाही.
\p आणि मी तुमच्याकडे येईन, तेव्हा तुम्ही मला जे काही लिहिले त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन.
\s5
\c 12
\s आध्यात्मिक दानांची विविधता व एकता
\p
\v 1 बंधूनो आणि भगिनींनो, आता मला तुम्हांला आत्मिक दानांविषयी शिकवू द्या. त्यांचा उपयोग कसा करावा ह्याची माहिती तुम्हांला असावी अशी माझी इच्छा आहे.
\v 2 ज्या मूर्तींना एक शब्द देखील बोलता येत नसेल तर त्या मूर्तींची उपासना तुम्ही कशी केली तेव्हा कसे त्यांनी तुम्हांला चुकीच्या मार्गाने चालवले होते. हे तुमच्या आठवणीत आहे.
\v 3 “येशू ख्रिस्त हा प्रभू आहे”, हे तुम्हाला जाहीर करण्यासाठी देवाचा आत्मा मदत करतो. पवित्र आत्म्याने भरलेला कोणीही मनुष्य कधीही असे म्हणत नाही की, “येशू शापित असो!”
\s5
\p
\v 4 ख्रिस्ताच्या लोकांना आत्मा अनेक निरनिराळे कृपादाने देतो, परंतु तो आत्मा एकच आहे.
\v 5 तसेच देवाची सेवा करण्याचे अनेक निरनिराळे मार्ग देखील आहेत, पंरतु प्रभू केवळ एकच आहे.
\v 6 देवाच्या राज्यात लोकांना कार्ये करण्यासाठी अनेक निरनिराळे मार्ग देखील आहेत, पंरतु तो देवच आहे जो त्याच्याकरता कार्ये करण्यासाठी त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो.
\s5
\p
\v 7 प्रत्येक विश्वासणाऱ्यांजवळ आत्म्याच्या सामर्थ्यापैकी काही सामर्थ्य त्यांच्याकडे आहे हे त्यांना दाखवता यावे म्हणून देवाने ते शक्य बनवले आहे; देवाने हे केले यासाठी की, सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र होऊन त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता मदत व्हावी आणि त्याचा अधिक सन्मान व्हावा.
\v 8 कारण तो आत्मा देवापासून आलेल्या महान ज्ञानयुक्त उपदेशाला बोलता यावे म्हणून एका व्यक्तीला तो तयार करतो, आणि तो आत्मा देवापासून आलेल्या काही ज्ञानाला इतरांपर्यंत पोहचवण्याकरता एका दुसऱ्या व्यक्तीला तो तयार करतो. ख्रिस्तात विश्वास ठेवणाऱ्यां प्रत्येकामध्ये त्याच आत्म्याच्या कार्यांच्या माध्यामातून ही निरनिराळे कृपादाने येतात.
\s5
\p
\v 9 तसेच दुसऱ्या विश्वासणाऱ्याला त्याच आत्म्याच्या योगे देवावर विस्मयकारक गोष्टी घडवण्याकरता विश्वास ठेवण्याचे कृपादान तो देतो. आणखी तसेच देखील तो दुसऱ्या एका व्यक्तीला देवाला प्रार्थना करून लोकांना बरे करण्यास पात्र करतो. तो आत्मा विविध कृपादांने देतो, पंरतु तरी देखील तो आत्मा देवाचा आहे.
\v 10 देवाची स्तुती लोकांनी करावी म्हणून तो आत्मा काही विश्वासणाऱ्यांना सामर्थ्ययुक्त कृत्ये करण्यासाठी सक्षम बनवतो. देवापासून आलेल्या उपदेशाला त्यांना सागंता यावे, म्हणून इतर काही विशिष्ट विश्वासणाऱ्यांना, तो सक्षम करतो. कोणता आत्मा देवाचा सन्मान करतो आणि कोणता करत नाही हे सांगण्यासाठी तोच आत्मा इतर विश्वासणाऱ्यांना देखील सक्षम करतो. तो आत्मा देवापासून येणाऱ्या उपदेशाला विविध भाषेतून सांगता यावे म्हणून तो भाषा देतो, आणि त्या उपदेशांना आपल्या भाषेत भांषातर करून त्याचा अर्थ सांगण्यासाठी तो इतरांना देखील सक्षम करतो.
\v 11 पुन्हा आणि पुन्हा आम्ही अनेक निरनिराळे कृपादांनाना पाहतो, परंतु तो आत्मा सारखाच आहे जो ही कृपादाने ज्याला तो निवडतो, त्या व्यक्तीला देतो.
\s शरीरावरून घेतलेले उदाहरण
\s5
\p
\v 12 कारण मनुष्याचे शरीर जसे एककेंद्रीय असून त्याचे अनेक अवयव असतात, आणि शरीराचे प्रत्येक अवयव सर्व शरीर बनवते, त्याचप्रमाणे ते ख्रिस्तासोबत आहे.
\v 13 कारण ख्रिस्ताच्या आत्माच्याद्वारे, आमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सामील झालो होतो. आमची पार्श्वभूमी कशी होती, आम्ही यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो, त्याने काही फरक पडला नाही, परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने पवित्र आत्म्याचे दान प्राप्त केले.
\s5
\p
\v 14 लक्षात ठेवा, शरीर हे केवळ एक भाग नाही, पंरतु संपूर्ण शरीर तयार होण्यासाठी बरेच भाग एकत्र काम करत आहेत.
\v 15 तुझा पाय तुझ्याशी बोलला आणि म्हणाला, “मी हात नाही, म्हणून मी तुझ्या शरीराचा भाग नाही,” तर तो तुझ्या हातासारखा नाही म्हणून त्यावरून तुमच्या शरीराचा काही भाग कमी होणार नाही.
\v 16 आणि तुझा कान तुझ्याशी बोलला आणि तुला म्हणाला, “मी एक डोळा नाही, म्हणून, शरीरात माझे कुठलेही ठिकाण नाही,” तर तो तुझ्या डोळ्यासारखा नाही म्हणून त्यावरून तुमच्या शरीराचा काही भाग कमी होणार नाही.
\v 17 तुझे संपूर्ण शरीर एक डोळा झाला, तर तुम्ही काहीही ऐकू शकणार नाही. तुझ्या संपूर्ण शरीरात एकच कानाने ऐकू येत असल्यास, तर तूला वास घेता येणार नाही.
\s5
\p
\v 18 पंरतु शरीरातील प्रत्येक अवयव देवाने एकत्रित लावून ठेवले आहेत, आणि ज्याप्रमाणे त्याने त्याची रचना केली आहे तसेच ते कार्य करते. प्रत्येक अवयव आवश्यक आहे.
\v 19 जर आपल्यातला प्रत्येक जण इतर सर्व अवयवांप्रमाणेच सारखे असतो, तर आपण एक शरीर नसतो.
\v 20 आम्ही सर्व अनेक सदस्य आहोत, पण फक्त एकच शरीर असे आहोत.
\s5
\p
\v 21 तुमच्या शरीरामध्ये, डोळा हाताला म्हणू शकणार नाही, “मला तुझी गरज नाही”, नक्कीच त्याला त्या हाताची गरज आहे. किंवा डोके पायांना म्हणू शकणार नाही, “मला तुझी गरज नाही.”
\v 22 कमी सक्षम असलेले अवयव देखील किंवा जे आवश्यक असलेले आणि सासांरिक कार्ये करणारे, हे सर्व संपूर्ण शरीर म्हणून या सर्वांची आवश्यकता असते.
\v 23 ज्या अवयवांना इतरांनी पाहिल्यास आम्हाला लाज वाटते, त्यांना झाकण्यासाठी आम्ही अधिक काळजी घेतो. अशा प्रकारे आम्ही त्यांच्यासाठी अधिक आदर व्यक्त करतो.
\v 24 पंरतु देवाने कमी महत्वाच्या असलेल्या अवयवांना प्रतिष्ठित अवयवांशी जोडले. आणि ते शरीराचा भाग आहेत म्हणून देवाने त्या कमी प्रदर्शनीय अवयवांना सन्मान दिला आहे.
\s5
\p
\v 25 देवाने ह्याप्रकारे संपूर्ण शरीराला सन्मानित केले आहे म्हणून मंडळीत कुठलेही विभाजन नाही, आणि ते सदस्य त्यांचे कृपादाने किंवा क्षमता, हेतू किंवा भूमिका काहीही असो, तरी ते ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत, म्हणून त्या शरीराच्या प्रत्येक सदस्याची त्याच स्नेहभावाने काळजी घ्यावी.
\v 26 आम्ही एकाच शरीराचे अवयव आहोत, म्हणून एखादा सदस्य दुःख सोसतो, तेव्हा आम्ही सर्व दुःख सहन करतो. एका सदस्याला ख्रिस्तासाठी पूर्ण केलेल्या गोष्टीबद्दल त्याला सन्मानित केले जाते, तेव्हा संपूर्ण शरीर एकत्र आनंद करते.
\p
\v 27 आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात, आणि वैयक्तिकरीत्या, तुम्ही सर्व त्याचे सदस्य आहात.
\s5
\p
\v 28 देवाने मंडळीला एक भेट म्हणून लोकांना दिले आहे. त्याने मंडळीला प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर ज्यांनी सामर्थ्यशाली कृत्ये केली, जे बरे करत होते, जे लोक प्रशासन काम करतात, त्यांना ज्यांनी मदत केली, आणि आत्म्याने ज्यांना विविध प्रकारच्या भाषा त्यांना दिल्या आहेत. स्थानिक मंडळीचे सदस्य असणारे लोक, हे देवाने तुम्हांला दिलेल्या त्या भेटवस्तू आहेत. देवाने तुम्हांला ते दिले आहेत.
\v 29 प्रत्येकजण काही एक प्रेषित नाही. सर्वच संदेष्टे नाहीत. केवळ आम्हापैकी काही शिक्षक आहेत. केवळ काहीच सामर्थ्यशाली कृत्ये करतात.
\s5
\p
\v 30 आम्ही सर्वजण आजाऱ्याला बरे करू शकतो का? नक्कीच नाही. आम्ही सर्वजण विशेष भाषांमध्ये बोलू शकतो का? केवळ काहीजणाकडे ते कृपादान आहेत. आम्ही सर्वजण इतर भाषांमध्ये संदेशांचा अर्थ सांगू शकतो का? केवळ काही करू शकतात. देवाकडून आम्हाला मिळणाऱ्या कृपादानांमध्ये आम्ही सर्वजण भिन्न आहोत.
\v 31 पंरतु तुम्ही मोठ्या उत्सुकतेने महान कृपादाने, विशेषकरून मंडळीला प्रोत्साहित आणि मजबूत करणाऱ्या कृपादांनाना शोधून काढावे अशी माझी इच्छा आहे. आणि आता, मी अधिक उत्कृष्ट असा एक मार्ग तुम्हाला दाखवेन.
\s5
\c 13
\s प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय
\p
\v 1 मला हवे तसे करण्यास मी लोकांचे मन आश्चर्यचकित करून त्यांचे मन वळवू शकतो असे काही मी बोलू शकतो, किंवा जरी मी देवदूतांसोबत बोलू शकतो परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर जे काहीही करत नाही परंतु केवळ आवाज करतात, त्या एका झांजेपेक्षा किंवा एका घंट्यापेक्षा मी कमी किमंतीचा होईन.
\v 2 जर मी देवासाठी संदेशाची घोषणा करू शकतो, आणि जर मी देवाबद्दलची गुप्त सत्ये समजावून सांगू शकतो, आणि जर मी एका पर्वताला हलवता येईल इतका आधिक भरवसा मी देवावर ठेवतो—परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर मी काहीही किंमतीचा नाही.
\v 3 मी जरी माझ्या मालकीचे सर्व गरीबांच्या अन्नदानासाठी दिले, किंवा मी कुणा एखाद्याला वाचविण्यासाठी मला स्वतः जाळण्याकरता बलिदान जरी केले परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर मला काहीही लाभ होणार नाही.
\s5
\p
\v 4 तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर तुम्ही आनंदाने कष्ट सहन कराल. तुम्ही खरोखर प्रेम करता, तर तुम्ही इतरांबद्दल दयाळू व्हाल. तुम्ही खरोखर प्रेम करता, इतर लोकांकडे आपल्याजवळ नसलेली वस्तू आहे म्हणून तुम्ही तुमचे मन वळवणार नाहीत. तुम्ही खरोखर प्रेम करत असाल, तर तुमच्याविषयी तुम्ही बढाई मारणार नाही किंवा गर्व करणार नाही.
\v 5 तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर तुम्ही त्यांचा गैरवापर करणार नाही. तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्याकरता जगणार नाही. कोणीही तुम्हांला त्वरेने संतप्त करू शकणार नाही. लोकांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींच्या मार्गांवर तुम्ही चालणार नाहीत.
\v 6 तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर कोणी वाईट कृत्ये केली असेल, तर तुम्ही त्यामुळे आनंदी होणार नाहीत; त्याऐवजी, लोक देवाबरोबर विश्वासू असतील तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल.
\v 7 तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर सर्व घडणाऱ्या गोष्टीत तुम्ही देवाला उंच कराल. देव लोकांसाठी सर्वोत्तम गोष्टी करेल असा विश्वास तुम्ही धराल. काय घडेल याची पर्वा न करता तुम्ही देवावर विश्वास ठेवाल. कोणत्या अडचणींना सामोरे जात आहात याची पर्वा न करता तुम्ही देवाची आज्ञा पाळाल.
\s5
\p
\v 8 तुम्ही खरोखर प्रेम करता, तर तुम्ही प्रेम करण्याचे थांबवणार नाहीत. जे देवाचे संदेश बोलण्यास सक्षम आहेत ते, अन्य भाषेत बोलणारे, किंवा गुढ रहस्याचे सत्य जाणणारे, हे केवळ थोड्या काळापुरतेच ह्या गोष्टी करतील. एक दिवस ते या गोष्टी करण्याचे थांबवतील.
\v 9 आता, या जीवनात, सर्व भागांपैकी केवळ जे माहीत असायला हवे त्यापैकी एक छोटासा भागच आम्हांला माहीती आहे हे सर्व आम्ही जाणूनच आहोत. देवाच्या संदेशाची घोषणा करणारे केवळ अशंतः असे करतात.
\v 10 परंतु त्या परिपूर्ण गोष्टी घडून येतील, तेव्हा अंशिक किंवा अपूर्ण असलेल्या सर्व गोष्टींचा अंत होईल.
\s5
\p
\v 11 मी एक लहान मुलगा होतो, तेव्हा एक लहान मूलासारखा मी बोलत असे, एका मूलासारखा विचार मी करीत असे, आणि मी लहान मुलासारखे निर्णय घेत असे. परंतु मी प्रौढ झालो, तेव्हा मी लहान मूलासारखे वागणे थांबवले, आणि मी प्रौढांसारखे वागण्यास सुरूवात केली.
\v 12 आता देवाविषयी आम्हांला जे समजले आहे, जे आम्हांला समजले ते फारच अपरिपूर्ण समजले आहे, सर्व काही समजले नाही. परंतु ख्रिस्त परत येईल, तेव्हा आम्ही त्याला समोरासमोर पाहू. सत्य काय आहे याचा केवळ एक भाग आम्हाला आता माहिती आहे. परंतु तो जसा आम्हांला पूर्णपणे ओळखतो, तसेच तेव्हा आम्ही देखील त्याला पूर्णपणे ओळखू.
\v 13 आता आम्ही ख्रिस्तावर भरवसा ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याने वचन दिलेल्या सर्व गोष्टी तो आमच्यासाठी करेल ह्यावर आम्ही भरवसा ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि आम्ही त्याच्यावर आणि एकमेकांना प्रेम करावे हे महत्त्वाचे आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास, आशा आणि प्रेम, हे आम्हांला आवश्यक असलेले तीन गुण आहेत. पण त्या तीनपैकी सर्वात महान एक आहे. म्हणून विश्वास महत्त्वाचा आहे, आणि पर्वा न करता आम्ही कितीही आशेला किंमत देतो, तरीही, यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
\s5
\c 14
\s संदेश देण्याचे व ‘भाषा’ बोलण्याचे दान
\p
\v 1 तुम्हाला इतरांवर प्रेम करण्यास सक्षम बनवावे ही प्रार्थना तुम्ही देवाला कळकळीने करायलाच हवी. आत्मा तुम्हाला देईल त्या कृपादांनानी आमच्या सहविश्वासू बंधूला मजबूत करण्यासाठी तुम्हांला सक्षम बनवावे अशी देखील प्रार्थना त्याला करा; तो तुम्हाला जो संदेश सांगण्यासाठी देतो ते त्याचे संदेश घोषित करण्यासाठी तुम्हांला सक्षम बनवावे ही प्रार्थना विशेषतः तुम्ही त्याला करा.
\v 2 आत्म्याच्याद्वारे दिल्या गेलेल्या एका भाषेत एखादा व्यक्ती बोलत असतो, तेव्हा तो लोकांबरोबर बोलत नाही, तर तो देवाबरोबर बोलतो, कारण कोणीही त्याला समजू शकत नाही. आत्मा त्याच्या स्वत:च्या पुढे जातो त्याप्रमाणेच तो त्याला या गोष्टीविषयी सांगत असतो.
\v 3 दुसऱ्या बाजूस, देवापासून येणाऱ्या संदेशाची घोषणा करणारा संदेष्टा थेट लोकांबरोबर बोलतो. त्यांनी मजबूत होण्याकरता त्यांना मदत व्हावी, त्यांनी खंबीर असावे म्हणून त्यांना मदत व्हावी, आणि त्यांना आराम देण्यासाठी जेणेकरून ते दुःखात असतानाही ते आंनदी राहतील म्हणून तो हे करतो.
\v 4 एखादा व्यक्ती जो आत्म्याच्या द्वारे दिल्या गेलेल्या एका भाषेत बोलतो तर तो स्वतःची उन्नती आणि स्वतःचीच मदत करतो, परंतु एखादा व्यक्ती जो देवाच्या संदेशाची घोषणा करतो तर तो प्रत्येकांची आणि मंडळीतील प्रत्येकाने त्यांच्या विश्वासात मजबूत व्हावे म्हणून मदत करतो.
\s5
\p
\v 5 आता तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, पंरतु देवाचा संदेश सांगण्याचे कृपादान तुम्हापैकी अधिक आणि अधिकांकडे असले तर ते संपूर्ण मंडळीसाठी अधिक हिताचे होईल. देवापासून आलेल्या संदेशाची जो कोणीही घोषणा करतो तो त्याच्या सहविश्वासू बंधूला मजबूत करण्यासाठी मदत करतो. म्हणून ह्या कारणामुळे, इतर विविध भाषांमध्ये संदेश घोषित करणाऱ्यांपेक्षाही अधिक महत्वाचे काम तो करतो आहे—त्या संदेशाचा अर्थ सांगणारा कोणी सक्षम असला तरच त्याचा उपयोग होतो.
\p
\v 6 मी तुमच्याकडे आलो आणि मी केवळ आत्म्याद्वारे दिल्या गेलेल्या भाषेतच बोलत आहे, तर त्याचा उपयोग तुम्हांला कसा होईल? जोपर्यंत मी तुम्हांला बोलणार नाही आणि तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या गोष्टींची माहिती देणार नाही तोपर्यंत, किंवा तुम्हांला ठाऊक नसलेल्या सत्याविषयी समजण्यास मदत करेल तोपर्यंत किंवा मी तुम्हाला तुम्ही पूर्वी न ऐकलेले काही संदेश तुम्हांला घोषित करीत नाही तोपर्यंत, किंवा मी तुम्हाला तुम्ही पूर्वी कधीही न शिकलेल्या काही नियंमाना मी शिकवेल तोपर्यंत, ते तुमची मदत करू शकणार नाही.
\s5
\p
\v 7 मी बासरी किंवा वीणा वाजवली तर आणि लोकांप्रमाणे ते जिवंत प्राणी नाहीत, आणि ती बासरी निर्माण करीत असलेला आवाज आणि विण्यातून निघणारा आवाज यात फरक नाही, तर कोणते वाद्य मी वाजवत होतो हे सांगण्यासाठी कोणीही सक्षम नाही.
\v 8 आणि एका सैनिकाने तुतारीला असमाधानकारकपणे फुकंले, तर सैन्याला युद्धासाठी सज्ज व्हायचे की नाही याची कल्पना होणार नाही.
\v 9 ते असे तेव्हा असते जेव्हा तुम्ही शब्द उच्चारता तेव्हा कोणीच तुम्हांला समजू शकत नाही : तुम्ही काय बोलला आहात हे कोणीही समजू शकणार नाही.
\s5
\p
\v 10 जगामध्ये निश्चितपणे अनेक भाषा आहेत, आणि ज्यांना त्या समजतात त्यापैकी सर्व त्या अर्थ देतात.
\v 11 परंतु एखाद्याची भाषा मला समजत नसेल, तर त्याला मी एका विदेश्यासारखा होईल, आणि तो देखील मला विदेश्यासारखाच होईल.
\s5
\p
\v 12 आत्म्याने तुमच्याद्वारे कार्य करावे म्हणून तुम्ही खूप इच्छुक आहात, म्हणून मंडळीतील विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचे पालन करावे म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा.
\p
\v 13 देवाने तुम्हांला दिलेल्या भाषेत तुम्ही काय म्हणता त्याचा अर्थ लावण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम करावे, त्या कारणासाठी प्रार्थना करा.
\v 14 कोणीएक अशा भाषेत प्रार्थना करतो तर त्याचा आत्मा निश्चितपणे प्रार्थना करतो, पण त्याचे मन तसे करत नाही.
\s5
\p
\v 15 म्हणूनच, आम्ही आमच्या आत्म्याने प्रार्थना केली पाहीजे, परंतु आमच्या बुद्धीनेही प्रार्थना केली पाहीजे. आणि त्याचप्रमाणे आम्ही गातो तर देवाची स्तुती करतो.
\v 16 तुम्ही केवळ तुमच्या आत्म्यातच देवाची स्तुती करण्याचा आग्रह धरला, तर तुम्ही काय म्हणत आहात हे बाहेरील व्यक्तीला कधीच समजणार नाही, आणि त्या संदेशाशी सहमत होण्यास तो कधीही सक्षम होणार नाही.
\s5
\p
\v 17 कारण तुम्ही आत्म्याने देवाचा धन्यवाद कराल तर हे बरे आहे आणि तुमच्यासाठी चांगले होईल, परंतु तुम्ही इतर विश्वासणाऱ्यांची मदत करत नाही.
\v 18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुमच्या कोणापेक्षाही अधिक भाषा बोलतो.
\v 19 परंतु मंडळीला खूप बोलण्याऐवजी, देवाने मला दिलेल्या अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, शब्दांनी मी शिकवू शकतो म्हणून, मी केवळ माझ्या मनातील पाच शब्द बोलू इच्छितो.
\s5
\p
\v 20 बंधूनो आणि भगिनींनो, लहान मुले जे अनेक प्रकारचे पाप करत नाहीत त्यासारखे तुम्ही झाले पाहीजे. परंतु तुम्ही स्वतःबद्दल आणि देवबद्दल विचार करता, तेव्हा तुम्ही मुलासारखे विचार करू नये, तर चांगले विचार करावे.
\v 21 देव म्हणतो ते नियमशास्त्रात लिहिले आहे,
\q “विदेशी व अन्य भाषांमध्ये जे बोलता त्या पुरूषांद्वारे,
\q मी माझ्या इस्त्राएल लोकांशी बोलेन;
\q आणि तरीसुद्धा माझे लोक मला समजू शकणार नाहीत.”
\s5
\p
\v 22 म्हणून एखादा विश्वासणारा देवाने त्याला दिलेल्या एखाद्या भाषेत बोलतो आहे, तर हे बोलणे ऐकत असलेल्या अविश्वासूला कदाचित प्रभावित करते. परंतु देवापासून आलेला एक संदेश एखादा विश्वासणारा बोलत असेल, तर हे इतर विश्वासणाऱ्यांना प्रभावित करते.
\v 23 सर्व विश्वासणारे एकमेकांशी एकत्र भेटले आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलले तर किती गोंधळात टाकणारे ते असेल हे तुम्ही पाहू शकता. कोणात्याही अविश्वासूने त्यांना ऐकले तर तो त्या सर्वांना वेडे आहेत असे म्हणेल.
\s5
\p
\v 24 परंतु तुम्ही सर्वजणांनी देवापासून आलेल्या सत्य संदेशाना आळिपाळीने सांगितले तर, तर कोणत्याही अविश्वासूला कळून येईल की त्याने देवाविरूद्ध पाप केल्यामुळे तो दोषी आहे.
\v 25 या अविश्वासूने खरोखर काय विचार केला होता हे देव तेथे असलेल्या इतर लोकांस सांगेल. मग तो चकीत आणि भयभयीत होऊन आपल्या तोंडावर जमिनीवर पालथा पडेल, आणि तो देवाची स्तुती करीत आणि “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” असे म्हणेल.
\s उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता
\s5
\p
\v 26 बंधूनो आणि भगिनींनो, तुम्ही एकत्र येऊन देवाची उपासना करता तेव्हा ते ह्याप्रकारच्या मार्गाने असावे. तुमच्यापैकी प्रत्येकजणांनी गाण्यास एक स्तोत्र सोबत आणले पाहीजे, किंवा वचनातून काहीतरी शिकवण्यास, किंवा देवाने तुम्हाला सांगितले आहे त्याबद्दल काहीतरी सांगण्यास, किंवा देवाने दिलेल्या भाषेतील एखादा संदेश सांगण्यास, किंवा अशा एका संदेशाचा अर्थ लावण्यास तयार असावे. तुम्ही ख्रिस्ताची मंडळी आहात, म्हणून सर्वकाही एकत्रित तुम्ही करता तेव्हा एकमेकांना उत्तेजन द्यावे.
\v 27 देवापासून आलेल्या एका संदेशाला अन्य भाषेतून कोणी बोलण्याची इच्छा तेथे धरत असेल, तर असे दोन किंवा तीन व्यक्तीपेक्षा आधिक तेथे नसावे. त्यांनी एकावेळी एकानेच बोलावे, आणि कोणीतरी त्या संदेशाचा अर्थ सांगायला हवा.
\v 28 तथापि, त्या संदेशाचा अर्थ लावण्यासाठी तेथे कोणीही सक्षम नसेल, तर मग देवापासून येणाऱ्या भाषेतून बोलणाऱ्याने गप्प बसावे आणि केवळ देवाशीच बोलावे.
\s5
\p
\v 29 देवापासून आलेल्या एका संदेशाला तेथे कोणाला बोलण्याची इच्छा असेल, तर केवळ दोन किंवा तीन अशा व्यक्ती तेथे असाव्यात; आणि शास्त्रलेख काय सांगते त्यानुसार त्या संदेशाची बाकीच्या प्रत्येकांनी परीक्षा करायला हवी.
\v 30 परंतु देवाने मंडळीमध्ये बसलेल्यांपैकी कुणाला तरी संदेश उमजून सांगण्यासाठी परवानगी दिली असेल, तर मग जो संदेश देत होता त्याने गप्प बसले पाहिजे. ह्याप्रकारे, सर्व विश्वासणारे त्या संदेशाचा अर्थ ऐकू शकतात.
\s5
\p
\v 31 प्रत्येकजण जे देवाच्या संदेशांची घोषणा करतात त्यांनी असे केलेच पाहीजे. परंतु सर्व विश्वासणारे शिकू शकतील आणि देवावर प्रेम अधिक धैर्य प्राप्त करतील म्हणून त्यांनी तसे एक एक करुन केले पाहीजे.
\v 32 जे सत्यतेने देवाच्या संदेशाला बोलतात त्या प्रत्येकांनी आत्मा जसा त्यांना चालवतो त्यानुसार चालावे.
\v 33 कारण देव गोंधळ निर्माण करीत नाही; त्याऐवजी, तो शांती प्रस्थापित करतो.
\p देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते व त्याच्या स्वतःसाठी वेगळे केले, त्या सर्व मंडळ्यामध्ये आम्ही हे असे करतो :
\s5
\v 34 स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे; कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. देवाचा संदेश जो एक देत असतो त्यामध्ये त्यांनी कदापि व्यत्यय आणू नये, परंतु त्यांनी नेहमी आपल्या पतींच्या अधीन असावे, कारण नियमशास्त्रदेखील असेच म्हणते.
\v 35 स्त्रीयांना शिकण्याची इच्छा असेल, तर तेव्हा उपासनेत व्यत्यय आणण्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे. कारण सेवेत व्यत्यय आणणे हे एका महिलेसाठी तिच्या पतीचा अपमान करणे आहे.
\v 36 ज्या लोकांद्वारे देवाने त्याचे वचन आम्हांला दिले ते लोक तुम्ही होता काय? किंवा ते केवळ तुमच्यापर्यंतच आले आहे काय?
\s5
\p
\v 37 तुमच्यामध्ये कोणीही संदेष्टा किंवा कोणीही आत्मिक असेल, तर देवाने आज्ञापिलेल्या गोष्टींना मी लिहित आहेत, हे तो समजून घेईल, आणि मी जे काय लिहिले आहे त्यानुसार तो चालेल.
\v 38 परंतु मी जे काय लिहिले आहे त्याला जर कोणी कबूल करत नसेल, तर तुम्ही त्याला कबूल करू नये.
\s5
\p
\v 39 म्हणून, बंधूनो आणि भगिनींनो, मनःपूर्वक इच्छेसह मंडळीला देवाचे संदेश सांगा; आणि देवाने दिलेल्या भाषेतून बोलण्यापासून कोणालाही मना करू नका.
\v 40 मंडळीच्या उपासनेत जे सर्वकाही तुम्ही करता, सभ्यतेसह आणि योग्य क्रमाने पार पाडावे.
\s5
\c 15
\s मृतांचे पुनरुत्थान
\p
\v 1 बंधूनो आणि भगिनींनो, आणि आता मी तुम्हास सांगितलेल्या सुवार्तेबद्दल, मी तुम्हांला आठवण करून देऊ इच्छितो. तुम्ही ह्या संदेशावर विश्वास ठेवला आणि त्यानुसारच तुम्ही जगतही आहात.
\v 2 जोपर्यंत आपण त्याच्याशी दृढतेने रहातो तोपर्यंत ही सुवार्ता तुम्हाला वाचवील तुम्ही त्यावर खरोखर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ती तुम्हाला वाचवणार नाही.
\s5
\p
\v 3 कारण इतरांनी जे मला प्रथम सांगितले आहे तेच मी तुम्हांला सांगून टाकले आहे, जसे शास्त्रलेखाने भाकित केले होते त्याप्रमाणे तो होईल ख्रिस्त आमच्या पापांकरता मरण पावला;
\v 4 त्यांनी त्याला पुरले देखील, आणि देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले, शास्त्रलेखाने जे घडणार आहे त्याबद्दल सांगितले गेलेले सर्व त्या अनुरूपतेसह घडून आले.
\s5
\p
\v 5 मग ख्रिस्त केफाला(ज्याला पेत्र म्हणत) त्याला दिसला. आणि नंतर तो बाकीच्या इतर प्रेषितांना दिसला.
\v 6 नंतर प्रभूमध्ये असलेल्या पाचशेहून अधिक बंधू आणि भगिनींना ते सर्व एकत्रित जमले होते तेव्हा तो त्यांना दिसला. त्यांच्यापैकी काहीचें निधन झाले आहे, परंतु बहुतेक अजूनही जिवंत आहेत आणि हे सत्य आहे हे दाखवू शकतात.
\v 7 मग तो याकोबाला दिसला, आणि नंतर पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
\s5
\p
\v 8 मी त्याला पाहण्यास मुळीच पात्र नव्हतो, तरी देखील शेवटी त्याने मला दर्शन दिले.
\v 9 कारण प्रेषितांमध्ये मी सर्वात शेवटचा झालेलो आहे. मी ख्रिस्ताच्या मंडळीचा इतक्या मोठ्या प्रमाणात छळ केला आहे म्हणून मी प्रेषित होण्यासाठी पात्र नाही.
\s5
\p
\v 10 परंतु देव माझ्यासोबत फार दयेने वागला आहे, म्हणून त्याने माझ्याद्वारे अनेक चागंल्या गोष्टी केल्या आहेत. खरोखरच, मी इतर सर्व प्रेषितांपेक्षा अधिक कष्ट केले आहे. तरीही, खरोखर कोणतेही काम मी केलेले नाही, परंतु देव आहे, ज्याने मला ते करण्यास ताकद दिली.
\v 11 म्हणून, मी तुम्हांला उपदेश केलेला असो किंवा इतर प्रेषितांनी उपदेश केलेला असो, आम्ही ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा केली, आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला.
\s5
\p
\v 12 जे आता मृत आहेत ते आता उठणार नाहीत असे आता तुमच्यापैकी काहीजण म्हणत आहेत. ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे असे आम्ही तुम्हांला अगोदरच जाहीर केले आहे, म्हणून हे खरे असू शकत नाही.
\v 13 मेलेल्यांतून कोणीही उठला नाही तर नक्कीच देवाने ख्रिस्ताला उठविले नाही.
\v 14 आणि त्याने ख्रिस्ताला मरणातून उठविले नाही, तर मग आम्ही जो काही उपदेश केला त्याला काहीच अर्थ नाही, आणि तुम्ही ख्रिस्ताबद्दल जो विश्वास करता तो तुमच्या जीवनात किंवा तुमच्या मरणात काहीही करू शकत नाही.
\s5
\p
\v 15 या व्यतिरिक्त, मरण पावलेले खरोखर पुन्हा उठणार नाहीत, तर आम्ही देवाबद्दल खोटे बोललो असे लोक पाहतील.
\v 16 मी पुन्हा म्हणेन, मरणातून कोणीही उठवले जात नसेल, तर मग देवाने ख्रिस्तालाही मरणातून उठविले नाही.
\v 17 आणि, ख्रिस्ताला त्याने उठविले नाही, तर मग तुम्ही जो विश्वास ठेवला तो निरूपयोगी आहे, आणि तुम्ही पाप केले आहे म्हणून देव अजूनही निषेध करतो.
\s5
\p
\v 18 तसे असेल तर, मग ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे सर्व जे मरण पावले आहेत तर त्यांनाही पुनरुत्थानाची कुठलीही आशा नाही.
\v 19 या जीवनात केवळ ख्रिस्तामध्येच आम्हाला आशा असल्यास, आणि आम्ही मरण पावल्यानंतर तो आमच्यासाठी काहीच करणार नाही अशी आम्ही त्याच्याबद्दल अपेक्षा करतो, तर आम्ही खोट्या गोष्टींत विश्वास ठेविला आहे म्हणून इतरा सर्व लोकांपैकी, आम्ही सर्वाधिक दयेस पात्र आहोत.
\s5
\p
\v 20 परंतु खरे तर, देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे, आणि अनेक लोकांतून तो केवळ एकच आहे जो प्रथम उठणार आहे.
\v 21 कारण आदामाने जे काय केले त्यामुळे जगातील प्रत्येकजण मरतो. तथापि, येशू ख्रिस्त हा तो मनुष्य—त्याने जे काही केले त्यामुळे जे लोक मरण पावले आहेत ते पुन्हा जिवंत होतील.
\s5
\p
\v 22 कारण, आदामाने पाप केल्यामुळे सर्व मरण पावले, तशाच प्रकारे, ख्रिस्ताने जे काही केले आहे त्यामुळे सर्वजण पुन्हा जिवंत होतील.
\v 23 परंतु ते एका विशिष्ट क्रमाने मरणातून पुन्हा जिंवत होतील : ख्रिस्त हा पाहिला आहे जो मरणातून पहिला उठला आहे; नतंर तो पृथ्वीवर येईल तेव्हा जे त्याच्याशी जुळलेले होते ते पुन्हा जिंवत होतील.
\s5
\p
\v 24 देव पित्याने शासन करावे, म्हणून ख्रिस्त संपूर्ण जग त्याला सादर करेल तेव्हा मग जग त्याच्या शेवटाजवळ येईल. राज्यकर्ते म्हणून जे आहेत ते सर्व, आणि सर्व गोष्टींवर राज्य करणारा अधिकारी आणि या जगात असणारी सर्व सामर्थ्यशाली सत्ता ह्या सर्वांचा ख्रिस्त शेवट करेल तेव्हा हे होईल.
\v 25 देव त्याच्या शत्रूपैंकी प्रत्येकावर विजय मिळवेल तो पर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहीजे, आणि त्यांच्याकडे आणखी सामर्थ्य राहिले नाही हे दर्शविण्यासाठी ख्रिस्ताच्या पायाखाली त्यांना तो ठेवेल.
\v 26 अंतिम शत्रू म्हणजे मृत्यू त्याला देखील देव स्वतःच नष्ट करेल.
\s5
\p
\v 27 कारण शास्त्रलेख म्हणते, “देवाने त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी ठेवल्या आहेत,” ख्रिस्ताचे पाय, ते आहेत. परंतु देव स्वतःला त्यामध्ये समाविष्ट करीत नाही हे स्पष्ट आहे.
\v 28 देवाने सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या सामर्थ्यात ठेवल्यानंतर, मग पुत्र देखील, स्वतःला देवपित्याच्या सामर्थ्यात ठेवेल, जेणेकरून प्रत्येकाशी आणि सर्वकाही संबंधाने देव समान असेल.
\s5
\p
\v 29 हे सर्व सत्य नसले तर मग काही ख्रिस्ती इतरांना मृत लोकांसाठी बाप्तिस्मा कसे देतात? देव मृतांना पुन्हा जिवंत करणार नाही, तर ह्याचा काही अर्थ नाही.
\v 30 आणि सुवार्ता घोषित करण्याकरता सतत आम्ही आमचे जीवन धोक्यात घातले परंतु आम्हां प्रेषिताकरीता त्याचा काही अर्थ नाही.
\s5
\p
\v 31 माझ्या बंधूनो आणि भगिनींनो, आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी तुम्ही माझ्या मालमत्तेसारखे आहात हे मी दाखवतो; म्हणून मला तुमचा खुप अभिमान आहे. परंतु मी तुम्हांला सांगतो की मी दररोज मरतो!
\v 32 देव मृतांना उठवत नाही, तर मग इफिसात मी त्या रानटी प्राण्याबरोबर उगीचच लढलो. कवी जे लिहितात त्या बाबतीत ते खरे असेल : “चला आज आपण अन्न खाऊ आणि द्राक्षरस पिऊ, कारण आम्ही उद्या मरावयाचे आहे.”
\s5
\p
\v 33 फसवणूक होऊ देऊ नका : “तुम्हाला वाईट मित्र असतील, तर तुम्ही आता यापुढे कोणत्याही प्रकारे योग्य मार्गाने जगण्याची काळजी करणार नाही.”
\v 34 नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या! योग्य मार्गाने जगा आणि पाप करीत राहू नका. तुमच्यापैकी काहींना देवाबद्दल अजिबात माहीत नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
\s5
\p
\v 35 कोणीतरी तुम्हांला विचारू शकतो, “मरण पावलेले कसे उठवले जातात? ते कोणत्या प्रकारचे शरीर असू शकतील?”
\v 36 तुम्हाला काहीच माहिती नाही! जे कोणतेही बीं तू जमिनीत पेरले आहेस ते जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याची वाढ होण्यास सुरूवात होणार नाही ह्या वस्तुस्थितीबद्दल तुम्ही विचार करत नाही.
\s5
\p
\v 37 आणि तुम्ही मराल तेव्हा, तुम्ही जे शरीर पेराल तर तेच शरीर बाहेर येईल असे नाही. हा तर केवळ एक उघडा दाणा आहे; त्यात काही गोष्टीत पूर्णपणे बदल होईल.
\v 38 देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला एक नवीन शरीर देऊ करील, आणि प्रत्येक जमिनीत टाकलेले दाण्याला, एक विभिन्न शरीर तो देईल.
\v 39 सर्व जिवंत प्राणी समान नाहीत. तेथे माणसे आहेत, आणि तेथे अनेक प्रकारचे जमिनींवर राहणारे प्राणी आहेत, आणि तेथे पक्षी आणि मासे आहेत. ते सर्व भिन्न आहेत.
\s5
\p
\v 40 स्वर्गात विविध प्रकारच्या गोष्टी देखील तेथे आहेत. त्या स्वर्गीय शरीराचे स्वरूप हे पृथ्वीवरील गोष्टींच्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे.
\v 41 तेजस्वी सूर्यासाठी एक प्रकारचा निसर्ग तेथे आहे, आणि सौम्य चद्रांसाठी दुसऱ्या प्रकारचा निसर्ग तेथे आहे. ताऱ्यांसाठी अजून दुसऱ्या प्रकारचा निसर्ग देखील तेथे आहे, परंतु तारे अनेक वेगवेगळ्या मार्गाने एकमेकांपासून भिन्न असतात.
\s5
\p
\v 42 लोक मरणातून पुन्हा उठतील तेव्हा हे तशाच प्रकारे आहे. जमिनीत जे जाते त्याचा मृत्यु झाला आहे, पंरतु जे उठविण्यात येते ते कधीही मरणार नाही.
\v 43 तो जमिनीत जातो तेव्हा, तो लज्जास्पद असतो, परंतु देव त्याला पुन्हा उठवतो तेव्हा, त्याला सामर्थ्य आणि सन्मान आहे.
\v 44 जे जमिनीत जाते ते या पृथ्वीचे आहे, परंतु मरणातून जे उठते त्याला देवाचे सामर्थ्य आहे. तर, काही गोष्टी आहेत ज्या या पृथ्वी संबंधित आहेत, आणि काही गोष्टी आहेत ज्यांना देवाचे सामर्थ्य आहे, ज्या कायमच्या टिकून राहतील.
\s5
\p
\v 45 म्हणून शास्त्रलेख म्हणतो, “पहिला मनुष्य, आदाम, हा एक जिवंत प्राणी होता ज्याने आपल्या मुलांना व वंशजांना जीवन दिले.” परंतु ख्रिस्त, दुसरा आदाम, ज्याने लोकांना सदासर्वकाळ जगण्यासाठी देवाचे सामर्थ्य दिले.
\v 46 पृथ्वीच्या संबधीत जे आहे ते नैसर्गिक, प्रथम आले, आणि देवाच्या संबधीत जे आहे ते नंतर आले, आणि तेच आध्यात्मिक आहे.
\s5
\p
\v 47 पहिला मनुष्य, आदाम, हा पृथ्वीवरील होता कारण तो मातीपासून बनविला गेला होता. परंतु दुसरा मनुष्य, ख्रिस्त हा स्वर्गातील होता.
\v 48 आदाम ज्याप्रमाणे मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे सर्व जे त्याच्यापासून आले ते लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले. ते ख्रिस्तासारखेच आहे, जो मनुष्य स्वर्गातून आहे : जे स्वर्गासंबधित आहे ते त्याच्यासारखे बनवले गेले आहेत.
\v 49 देवाने जसे आम्हांला बनवले तसे तो माणूस मातीतून बनविला गेला होता, तर स्वर्गातून आलेल्या मनुष्याप्रमाणेच तो देखील आम्हांला बनवेल.
\s5
\p
\v 50 बंधू आणि भगिनिंनो,आता मी हे सांगतो, देवाच्या नियमांना जे पाळता त्या सर्वांना त्याने देण्याचे वचन दिले ते मनुष्य प्राणी जे मरतात ते या गोष्टी मिळवू शकत नाहीत.
\v 51 पाहा! देवाने आमच्यापासून लपविल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वच विश्वासणारे मरणार नाहीत, परंतु देव आम्हां सर्वांना बदलणार आहे.
\s5
\p
\v 52 एखाद्याचे डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटच्या तुतारीचा आवाज देवाचे देवदूत फुंकतील, तेव्हा एका क्षणात तो आम्हांला बदलून टाकेल. आणि नंतर देव मेलेल्यांचे पुनरुत्थान करेल जेणेकरून पुन्हा कधीच मरणार नाही म्हणून ते त्या तुतारील फुंकतील.
\v 53 कारण आम्ही, सर्व मरतो तरीही जगू, पुन्हा कधीही मरणार नाही, आम्ही सर्वकाळासाठी जगू. होय, आमचे शरीरे हे मरण्यासाठीच आहेत, परंतु देव त्यांना नवीन करेल, आणि आम्ही पुन्हा कधीही मरणार नाही.
\s5
\p
\v 54 हे जेव्हा घडून येईल, तेव्हा शास्त्रलेख जे सांगते, ते खरे ठरेल :
\q “देवाने मृत्युला पूर्णपणे पराभूत केले आहे.”
\v 55
\q1 “मृत्यु पुन्हा कधीही जिकंणार नाही!
\q मृत्युच्या वेदना काढून टाकल्या गेल्या आहेत!”
\s5
\p
\v 56 आम्ही मरत असतो तेव्हा जे पाप आहे जे आमच्यावर इतके दुःख आणते. आणि नियमशास्त्रामुळे आमच्या जीवनात पापाची शक्ती येते.
\v 57 परंतु आता आम्ही देवाचे आभार मानतो कारण तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मरणावर विजय देतो!
\s5
\p
\v 58 म्हणून, माझ्या प्रिय बंधूनो व भगिणींनो, तुमच्या विश्वासात बळकट राहा. तुमच्या जीवनात स्थिर राहा, प्रभूचे कार्य अधिक आणि अधिक करत राहा. तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही जे काही त्याच्यासाठी करता ते सर्वकाळ राहील.
\s5
\c 16
\s यरुशलेम शहरातील गोरगरिबांसाठी वर्गणी
\p
\v 1 आता मी जे पैसे यरूशलेममधील देवाशी संबधीत असलेल्या लोकांसाठी जे पैसे आम्ही गोळा करीत आहोत त्याबद्दल तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी इच्छा आहे. मी गलतीयाच्या मंडळ्यांतील विश्वासणाऱ्यांना जे करण्यास आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
\v 2 प्रत्येक रविवारी, जेवढे तुम्ही सक्षम आहात त्या मानाने, तुमच्यापैकी प्रत्येकाने बाजूला पैसा ठेवावा, म्हणजे मी येईल तेव्हा तुम्हाला जास्तीचे वर्गणीची गरज वाटणार नाही.
\s5
\p
\v 3 तुमचे उपहार यरूशलेमेस घेऊन जावे अशी कोणाबद्दल तुमची इच्छा असेल, त्या लोकांना तुम्ही निवडणे आवश्यक आहे. आणि मी पोहोचेन, तेव्हा मी तुमच्या उपहाराबद्दल त्यांच्याबरोबर पत्रे पाठवीन.
\v 4 आणि तसे करणे योग्य असेल तर, ते माझ्याबरोबर यरूशलेमेस प्रवास करतील.
\s खाजगी प्रकरण व निरोप
\s5
\p
\v 5 मी मासेदोनियाच्या प्रदेशातून प्रवास करत जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन, तुमच्याकडे येण्याची माझी योजना आहे.
\v 6 कदाचित मी तुमच्याबरोबर राहीन, आणि कदाचित सर्व हिवाळाही घालवीन, जेणेकरून माझ्या सहलीच्या मार्गामध्ये तुम्ही मला मदत करू शकता.
\s5
\p
\v 7 मी तुम्हाला फक्त थोडा वेळ भेटू इच्छित नाही. तर मला आशा आहे की लांब पुरेशी वेळ घालवल्याने आम्हां दोघांना मदत होईल.
\v 8 पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत इफिसात राहण्याची माझी इच्छा आहे.
\v 9 जरी अजूनही आम्हाला तेथे विरोध करणारे अनेक लोक आहेत, म्हणून प्रभूने माझ्यासाठी तेथे एक द्वार उघडले आहे.
\s5
\p
\v 10 तीमथ्य येईल, तेव्हा प्रेमळपणे त्याला वागणूक द्या आणि त्याला भीती वाटणार नाही म्हणून त्याजकडे पहा, कारण मी करत आहे त्याप्रमाणेच तो सुद्धा प्रभूचे कार्य करीत आहे.
\v 11 यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. त्याच्या मार्गावर जाण्यासाठी तुम्हाला शक्य होईल तितकी मदत त्याला करा; त्याने माझ्याबरोबर सामील होता यावे म्हणून त्याला शांततेत इकडे पाठवा. माझ्या मार्गावर येणाऱ्या इतर बांधवांसह त्यानेही प्रवास करावा ही अपेक्षा त्याच्याकडून मी करीत आहे.
\p
\v 12 तुम्ही आपला भाऊ अपुल्लोस विषयी विचारले. इतर बांधव तुझ्याकडे येतील तेव्हा त्याने तुम्हांला भेटायलाच पाहीजे असा मी त्याला जोरदार आग्रह केला. त्याने आता येण्याचे ठरविले नाही, परंतु त्याला संधी मिळाल्यावर तेव्हा तो तुमच्याकडे येईल.
\s5
\p
\v 13 सावध रहा, तुमच्या विश्वासापासून बहकू नका. प्रौढ पुरूषांप्रमाणे प्रभूसाठी कार्य करा आणि सशक्त व्हा.
\v 14 प्रीतीच्या सामर्थ्याच्याद्वारे प्रत्येक गोष्ट करा.
\s5
\p
\v 15 स्तेफनाच्या घराण्यातील लोकांविषयी तुम्हांला माहिती आहे की, अखया प्रांतामध्ये विश्वास ठेवणारे ते पाहिले होते, आणि जे प्रभुचे आहेत त्यांची मदत करण्यास ते ठरलेले होते, बंधूनो आणि भगिनिंनो, मी तुम्हाला विनंती करतो की,
\v 16 प्रभूच्या कामात मदत आणि आमच्या सोबत कठीण परिश्रम करणाऱ्या लोकांची त्यांच्याप्रमाणे आज्ञा पाळा.
\s5
\p
\v 17 स्तेफना, फर्तूनात आणि अखायिक हे करिंथातून येथे आले तेव्हा मला आनंद झाला, कारण तुम्ही येथे नव्हता तेव्हा.
\v 18 त्यांनी जशी तुम्हांला मदत केली त्याप्रमाणेच, त्यांनी माझ्या आत्म्यात मला प्रोत्साहीत केले व मला मदत केली. त्यांनी तुम्हाला कशी मदत केली त्याबद्दल इतरांना सांगा.
\s5
\p
\v 19 आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विल्ला, प्रिस्कील्ला जे तुम्ही प्रभूचे काम करत आहात ते तुम्हांला सलाम सांगतात, आणि इतर विश्वासणारे जे त्यांच्या घरी भेटतात ते ही त्याप्रमाणे सलाम सागंतात.
\v 20 उर्वरित बंधू आणि भगिनिंही, तुम्हांला सलाम सांगतात. स्नेहभावचे चुंबन घेऊन एकमेकांना शुभेच्छा द्या.
\s5
\p
\v 21 मी, पौल, हे वाक्य माझ्या स्वतःच्या हाताने लिहित आहे.
\v 22 जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर त्यावर शाप येवो, हे, प्रभू ये!
\v 23 प्रभू येशू ख्रिस्तापासून येणारी कृपा तुम्हाबरोबर असो.
\v 24 जसे तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एकत्र जुळलेले आहात, मी तुम्हाला हे स्मरणपत्र पाठवितो की मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. आमेन.