mr_udb/46-ROM.usfm

793 lines
192 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id ROM - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h रोमकरांस
\toc1 रोमकरांस
\toc2 रोमकरांस
\toc3 rom
\mt1 रोमकरांस
\s5
\c 1
\p
\v 1 प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला, अशासाठी की त्याच्या कडून आलेले शुभवर्तमान विदीत करावे, ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून, तुम्हा सर्व रोम वासीयांना हे पत्र मी लिहीत आहे.
\v 2 देवाच्या संदेष्ट्याच्या द्वारे पवित्र शास्त्रात हे पूर्वीच कळवीले होते की येशू ख्रिस्त येणार आहे.
\v 3 ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दावीदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.
\s5
\p
\v 4 परंतू त्याच्या दैवी स्वभावामुळे तो, देवाचाच पूत्र आहे हे त्याने दाखवले. देवाने, जेव्हा तो मेला असता आपल्या आत्म्याच्याद्वारे त्याला पून्हा जीवंत केले तेव्हाही त्याने हे आपणास दाखवले की तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
\p
\v 5 त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्तानेच आम्हांला प्रेषित असे नियूक्त केले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांना त्याच्याठायी विश्वास करावा आणि त्याच्या आज्ञेचे पालन करावे.
\v 6 तुम्हीही जे रोममध्ये राहता, देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.
\s5
\p
\v 7 ज्या लोकांवर देवाने प्रेम केले, व ज्यांना त्याने आपले लोक होण्याकरता बोलाविले, असे जे लोक आहेत त्या सर्वांना मी हे पत्र लिहित आहे. आपला देवा पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति सतत लाभो.
\s5
\p
\v 8 सुरुवातीलाच रोममध्ये राहणाऱ्या तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण त्याने जे काही आम्हासाठी केले त्याच्याचद्वारे मी असे करू शकतो. मी आणखी त्याचे आभार मानतो कारण तुमचा विश्वास रोम साम्राज्यात सगळीकडे जाहीर होत आहे.
\v 9 कारण पाहा, ज्या देवाची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता लोकांना सांगून करतो, तोच माझ्याविषयी साक्षी आहे की, मी तुमची नेहमी प्रार्थनेत आठवण करतो.
\v 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे.
\s5
\p
\v 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि विश्वासात, ख्रिस्ताला आदर देण्यात तुम्ही अधिकाधिक वाढावे.
\v 12 म्हणजे मला हे सांगायचे आहे की, आम्ही येशूवर कसा विश्वास केला, हे सांगण्याद्वारे आपण ऐकमेकांना विश्वासामध्ये प्रोत्साहन देऊ या.
\s5
\p
\v 13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जे यहूदीतर तुमच्यामध्ये आहेत, त्यांनी येशूच्याठायी विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.
\v 14 कारण मी सर्व लोकांना जे ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख, सुक्षीत व अशीक्षीत यांना देवाचे शुभवर्तमान सांगने कायद्याने भाग आहे.
\v 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
\s5
\p
\v 16 ख्रिस्ताने जे काही केले त्याबद्दलची सुवार्ता मी आत्मविश्वासाने जाहीर करतो, कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले या सुवार्तेवर विश्वास करणाऱ्यांना, देवाने त्यांचे तारण करावे यासाठी ती सुवार्ता एक सामर्थ्यशाली मार्ग आहे. विशेषत: देवाने प्रथम यहूद्यांना जे सुवार्तेवर विश्वास करतात त्यांना तारले, आणि नंतर त्याने जे गैरयहूदी आहेत त्यांना तारले.
\v 17 या सुवर्तेद्वारे देवाने लोकांना कसे स्वत:जवळ आणले, हे प्रगट केले. पवित्र शास्त्रात फार पूर्वी लिहिल्या प्रमाणे ते आहे की, जे देवाच्याठायी भरवसा ठेवतात, त्यांना तो सर्वकाळासाठी स्वत:जवळ आणणार.
\s5
\p
\v 18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व त्याचा आदर न केल्यामुळे, स्वर्गातून देवाने हे स्पष्ट केले आहे की अशा सर्वानचा तो राग करतो. त्यांची लायकी शिक्षा भोगण्याचीच आहे हे त्याने दाखवून दिले. कारण त्यांनी वाईट अशी कर्मे केलीत आणि सत्य देव कोण आहे, हे लोकांना कळावे त्यापासून त्यांना दूर ठेवले.
\p
\v 19 सर्व जे गैरयहूदी आहेत त्यांना देवाविषयीचे ज्ञान कळून आले, कारण देवाने स्वत: ते त्यांना प्रगट केले आहे.
\s5
\v 20 देव प्रत्यक्षात कसा आहे हे लोक त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. परंतू जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. म्हणून कोणी असे म्हणू शकत नाही की आम्हाला देवाविषयी काहीच माहीती नाही. कारण जर तुम्हांला हे कळत नाही, तर तुम्हांला देवाविषयीचे कसलेच समर्थन करता येणार नाही.
\v 21 कारण जरी गैरयहूद्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते त्याच्याविषयी मूर्ख गोष्टींचा विचार करत गेले आणि देव स्वत: विषयी त्यांना काय प्रगट करू इछ्चितो त्याविषयी ते नासमज असे झाले.
\s5
\p
\v 22 जरी गर्वाने त्यांनी स्वत:ला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले.
\v 23 आणि तो सर्वकाळ असणारा व वैभवशाली देव आहे, असे त्यांनी मान्य करण्याचे नाकारले, उलट अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी, यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.
\s5
\p
\v 24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व अनैतीक अशुद्धतेमुळे सोडून दिले, याचा परिणाम असा झाला की त्यांनी एकमेकांच्या देहाला लैंगिक पापांनी विटाळवीले.
\v 25 तसेच, त्यांनी देवाबद्दल काय सत्य आहे हे मान्य करण्याऐवजी, खोटी दैवतांची उपासना करणे निवडले. त्यांनी त्या निर्माणकर्त्या ऐवजी जे त्याने निर्मिले त्याची उपासना केली. ज्याने सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ धन्यवादित असा आहे, आमेन.
\s5
\p
\v 26 म्हणून देवाने गैरयहूदी लोकांच्या बळकट इच्छेप्रमाणे त्यांना लज्जास्पद लैंगिक पाप करण्यास मोकळे सोडले, याचा परिणाम असा झाला की त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले.
\v 27 तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे देवाने त्यांना त्यांच्या शरिरामध्ये व्याधी दिल्या, ज्यांचे ते हकदार होते.
\s5
\p
\v 28 आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. याचा परिणाम असा झाला की त्यांनी असे वाईट पाप करण्यास सूरू केले जे कोणी आतापर्यंत केले नसेल.
\s5
\p
\v 29 ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि अशा इच्छांनी भरलेले होते व दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करणारे आणि दुसऱ्यांना हानी पोहचवणारे अशी इच्छा ते करत होते.
\v 30 ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, विशेष करून देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच
\v 31 पूष्कळांनी असे मूर्खपणाचे कृत्ये केलीत जे देवाचा अपमान करणारी होती, ते दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुसऱ्याप्रती दुष्ट वागणूक देणारे असे होते.
\s5
\v 32 जरी देवाच्या नितिमत्वाचा नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत, असे त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करत गेले आणि इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देत गेले.
\s5
\c 2
\p
\v 1 पाहा, जे लोक सतत पापाच्या गोष्टी करतात, त्यांना तो कठोर अशी शिक्षा करणार आहे, कारण त्याने हे स्पष्टपणे प्रगट केले आहे की तो त्यांच्यावर क्रोधीत झाला आहे. म्हणून देव जेव्हा लोकांचा न्याय करणार, तेव्हा माझ्या यहूदी मित्रा आपल्याला सबब नाही. तू जर असे म्हणशील की जे गैरयहूदी आहेत त्यांनाच त्यांच्या वाइट कृत्यांचे फळ मिळणार, परंतू तुमच्यातील जर कोणी असे बोलतो तर, देवाने तुम्हास शिक्षा करावी यासाठी तुम्ही बोलत आहात. कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वत:लाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तू ही तीच गोष्ट करतोस.
\v 2 आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो.
\s5
\p
\v 3 यास्तव तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करता, आणि जे इतरांचा न्याय करता, पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता. म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वत:ची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही.
\v 4 आणि तुम्ही असेही म्हणायला नको की, देव आमच्याशी अत्यंत दयाळूपणे आणि सहनशीलतेने वागत आहे, म्हणून मला माझ्या पापांपासून वळण्याची काही गरज नाही. परंतू कदाचित तुम्ही पश्चाताप करावा यासाठी देव तुमच्याशी दयाळूपणे वागत आहे, हे तुम्हास समजले पाहिजे.
\s5
\p
\v 5 पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवीत आहात. जेव्हा देव तुम्हाला त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.
\p
\v 6 देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.
\v 7 नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. कारण देवाने त्यांचा आदर करावा अशी त्यांची इच्छा आहे.
\s5
\p
\v 8 परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात आणि जे वाइट न करण्याचे देवाने सांगितले तेच करतात, त्यांना तो क्रोधाने भरपाई करून देईल.
\v 9 जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर ज्यांनी देवाच्या वचनावर विश्वास केला नाही, कारण देवाने त्यांना त्याचे लोक होण्यास बोलावले होते व नंतर गैरयहूदी लोकांवर संकटे येतील.
\s5
\p
\v 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल, प्रथम यहूद्यांना ज्यांना देवाने त्याचे होण्यास बोलावले व मग गैरयहूदी लोकांना मिळेल.
\v 11 देवाजवळ पक्षपात नाही, त्याच्याजवळ कोणताही व्यक्ती असा महत्वाचा नाही, त्याला सर्वजन सारखेच आहेत.
\v 12 परंतू जे सर्व गैरयहूदी देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते देवापासून सर्वकळसाठी विभक्त केले जातील आणि जितक्यांनी यहूदी असता देवाने मोशेद्वारे दिलेल्या नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल.
\s5
\p
\v 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते देवाच्या नजरेत नीतिमान ठरतील.
\v 14 कारण जे यहूदी नसलेले ज्यांना देवाने मोशेद्वारे दिलेले नियमशास्त्र नाही, मूलत: जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही ते नैसर्गिक रित्या नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांच्या मनात नियमशास्त्र आहे असे ते सिद्ध करतात.
\s5
\p
\v 15 म्हणजे ते त्यांच्या ह्दयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
\v 16 देव त्यांना त्यांच्या कृत्यांप्रमाणे म्हणजेच त्यांनी जे विचारात आणले आणि ते करण्याद्वारे न्याय करणार आहे. त्यांनी लपून केलेल्या कृत्यांबद्दलही तो त्यांचा न्याय करणार आहे. आणि ख्रिस्त त्यांच्यावर न्यायाधीश असा तो नेमून देणार आहे, तोच त्यांना परखून त्यांचा न्याय करणार. माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
\s5
\p
\v 17 परंतु आता तुम्ही जे स्वत:ला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता,
\v 18 त्या तुम्हांस देवाची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही शिकवता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे.
\v 19 तुम्हाला याची खात्री आहे की जे गैरयहूदी आहेत त्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात आणि त्याद्वारे तुम्ही ज्यांना देवाबद्दल काहीच माहीत नाही अशांना देवाबद्दल मार्गदर्शन करतात.
\v 20 तुम्हाला याची खात्री आहे की जे देवाबद्दल मुर्खतेच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि जे ज्यांना देवाबद्दल काहीच माहीत नाही अशा बालकांसारखे असणाऱ्यांचे तुम्ही मार्गदर्शन करू शकता. कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे.
\s5
\v 21 मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता आणि ह्या गोष्टी असल्याचा दावा करता, ते तुम्ही स्वत:ला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश लोकांना करता पण तुम्ही स्वत: चोरी का करता?
\v 22 तुम्ही जे अविवाहित त्यांना व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही जे दुसऱ्यांना मूर्तीपूजा करण्यास मनाई करता, ते तुम्हीच ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून दुर जात नाही.
\s5
\v 23 तुम्ही जे नियमशास्त्राविषयी बढाई मारता की, आमच्याकडे देवाचा नियम आहे, त्याच नियमांचे तुम्ही पालन करत नाही. याचा परिणाम असा होतो की तुम्हीच देवाचा अपमान करता.
\v 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुम्ही आपल्या वाडवडीलांप्रमाणे नसावे, जे तुम्ही यहूदी आहात, तुमच्यामुळे गैरयहूदी लोक देवाला वाईट असे बोलतात, कारण तुमची कृत्ये तशी आहेत. ‘विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” जे गैरयहूदी आहेत ते असे म्हणतात, कदाचित ह्यांचा देव ढोंगी असावा कारण ह्यांच्या अशा वागण्याने तो त्यांना शिक्षाहि करत नाही.
\s5
\p
\v 25 तुम्ही जर नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे कारण तसे करण्याने तो देवाने मोशेला दिलेले नियम पाळतो. पण जर तुम्ही जे सुंता झालेले असूनही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झालेल्यांपेक्षाही अधिक वाईट आहा.
\v 26 याचा अर्थ असा की, सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर तो देखील देवाच्या लोकांतील एक असा बनतो. जरी त्याची सुंता झालेली नसेल.
\v 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही परंतू तो जर नियमशास्त्र पूर्णपणे पाळत असेल तर, तुम्हांला शिक्षा केल्याने देव दाखवून देईल की तो जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो. कारण जे तुम्ही सुंता झालेले आहा, तेच तुम्ही नियमशास्त्र मोडता.
\s5
\p
\v 28 कारण देवाच्या विधी करण्याद्वारे कोणी खरोखर यहूदी होत नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता केल्याने ही देव त्याला मान्य करिल असे ही नाही.
\v 29 याउलट आपण ज्यांचे देवाने अंत:करण पालटले, ते आपण यहूदी आहोत. देवाने आपल्याला त्याच्या विधी पाळण्याने नव्हे, तर आपण देवाच्या आत्म्याला आपला स्वभाव बदलण्यास परवानगी दिल्याने आपला स्विकार केला. जरी इतर लोक आपली स्तुती करत नसतील, तरी देव आपली प्रशंसा करेल.
\s5
\c 3
\p
\v 1 कोणी तरी असे बोलून आक्षेप घेतला की, जर सुंता होऊनही देव आपला स्विकार करत नसेल तर मग आपला यहूदी असून काय फायदा? तर मग यहूदी असण्यात किंवा गैरयहूदी असण्यात काय फायदा? सुंता करणे हे आपण यहूद्यांना काही फायद्याचे नाही.
\v 2 तर यहूदी असणे हे आपल्याला पूष्कळरित्या फायदेशीर आहे, असे मी त्यांना उत्तर देऊ इच्छीतो. सर्वप्रथम, यहूदी असणे का फायदेशीर आहे कारण, देवाने त्याची वचने आपल्या पूर्वजांना सांगितली, अशी वचने जे आपल्याला प्रगट करतात की तो कोण आहे.
\s5
\p
\v 3 हे खरे आहे की त्यातील काही यहूद्यांनी देवाला वचन दिल्याप्रमाणे आज्ञा पाळल्या नाही. म्हणून कोणी तरी असे विचारले की, त्यांचा अविश्वासूपणा देवाच्या विश्वासूपणाला नाहीसा करील काय की देवाने वचन दिल्याप्रमाणे तो आम्हा यहूद्यांना आशिर्वाद देणार नाही?
\v 4 खात्रीने नाही! देव जे काही वचन देतो ते तो पूर्ण करतो, मनुष्यांप्रमाणे तो वचन देत नाही. देवाने केलेले वचन न पाळल्याबद्दल जे सर्व यहूदी देवाला आरोप लावतात ते खूप चूकीचे करतात. दावीद राजा ह्याबद्दल असे लिहतो की, “तू सांगितलेले सत्य प्रत्येक जण कबूल करो आणि जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप करेल तेव्हा तुला नेहमीच विजय मिळावा.”
\s5
\p
\v 5 यास्तव जर आपल्या यहूद्यांच्या दुष्टपणामुळे देव आशिर्वाद देत नसेल तर, आपण असे म्हणू शकतो का, की देव अनीतिमान आहे? ( देवाबद्दल मी असे प्रश्न करायला नको, पण मी हे साधारण मानवाप्रमाणे बोलतो आहे.)
\v 6 खात्रीने नाही! आपण खचितच या निष्कर्ष वर येऊ नये की देव आपला न्याय करणार नाही, कारण देव आपण यहूद्यांचा न्याय करणार नाही तर मग देव जगाचा न्याय कसा करील? हे त्याला शक्यच नाही.
\s5
\p
\v 7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, देव खरोखरच आपले वचन पाळत नाही हे खरे आहे. कारण देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मी केले नाही, पण याचा परिणाम असा आहे की लोक देवाची स्तुती करतात, कारण त्याने दया केली आहे. म्हणून ज्याअर्थी देवाची स्तुती लोक करत असल्या कारणाने, तो मला असे म्हणणार नाही की मी माझ्या पापांबद्दल शिक्षेस पात्र ठरलो आहे.
\v 8 तर मग पौल, हे खरे आहे का, की आपण का वाईट करावे का? म्हणजे मग लोक देवाचा आदर करतील. कारण काही जण माझ्या विरुध्द असे बोलण्याने आरोप लावत आहेत. देव त्यांना शिक्षा करणार आहे जे लोक माझ्या विरोधात असे बोलत आहेत कारण त्यांना शिक्षा मिळावी यात पात्र ते ठरले आहेत.
\s5
\p
\v 9 तर मग काय? आपण असा निष्कर्ष काढावा की देव आपण यहूद्यांना अधिक अनुकूल आहे आणि गैर-यहुद्यांना प्रतिकूल आहे? मुळीच नाही! कारण यहूदी आणि गैरयहूदी हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत आणि ते देवाच्या शिक्षेस पात्र असे आहेत.
\v 10 शास्त्रात असे लिहिले आहे:
\q “कोणीही धार्मिक नाही, एकही व्यक्ती नाही.
\s5
\v 11 आपले जीवन कसे जगावे असा समंजस कोणीही नाही. एकही देवाला ओळखण्याचा शोध करीत नाही.
\p
\v 12 खरोखरच ते सर्व देवापासून दूर गेले आहेत, ते देवाच्या नजरेत भ्रष्ट असे झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही.
\s5
\q
\v 13 “लोकांची तोंडे दुर्गंधी येणाऱ्या उघड्या कबरांसारखी आहेत ते आपल्या बोलण्याने लोकांना फसवितात.”
\q “ज्याप्राकारे सापाचे विष लोकांना हानी पोहचवते, त्या प्रकारे ते आपल्या बोलण्याणे लोकांना हानी पोहचवतात.”
\q
\v 14 “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत ज्यांनी ते लोकांना शाप देत राहतात.”
\s5
\q
\v 15 त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
\q
\v 16 जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात आणि लोकांना दु:खी करतात.
\q
\v 17 त्यांना लोकांसोबत शांतीने कसे राहावे ह्याचा मार्ग माहीत नाही.”
\q
\v 18 “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.”
\s5
\p
\v 19 आणखी असे की, जे नियमशास्त्रात लिखित आहेत ते शास्त्राधीन लोकांसाठी आहे, जे मोशेने लिहीले होते. परंतू आपणाला ह्यातून हे शिकण्यास मिळते की पापांबद्दल देवाने शिक्षा देण्याचे ठरवीले तेव्हा यहूदी काय आणि गैरयहूदी काय हे कोणीही देवाला काही बोलू शकत नव्हते, कारण देवाने जगातील सर्वांना दोषी असे करार केले.
\v 20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. परंतू देवाचे नियम कोणीही न पाळण्याने ते दोषी ठरतील. उलट आपण देवाला ओळखणेच हे आपल्याला जाणीव करून देते की आपण पापी आहोत.
\s5
\p
\v 21 कारण जेव्हा देवाने आपल्या पापांची क्षमा केली तेव्हा ते मोशेला दिलेल्या नियमांचे पालन करण्यावर अवलंबून नाही. परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्रा व्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे.
\v 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही.आणि त्या द्वारे देवाने आपले सर्व पाप पुसून टाकले आहेत.
\s5
\p
\v 23 कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाने त्यांच्यासाठी ठेवलेले उज्वल ध्येय ते साध्य करण्यास अपयशी ठरले आहेत.
\v 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे आणि त्यांचे पाप पुसून टाकले आहे. ख्रिस्त येशूने हे आपल्यासाठी मरण्याद्वारे साध्य केले आहे.
\s5
\p
\v 25 देवाने हे दाखवून दिले की ख्रिस्ताने आपले रक्त सांडवण्याद्वारे आपला राग आवरला आहे. लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमात आहे हे सिद्ध व्हावे.
\v 26 देवाने ख्रिस्ताला आपल्या करता मरणास नियूक्त केले. आणि असे करण्याद्वारे त्याने हे प्रगट केले की तो न्यायी आणि जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे पाप मिटून टाकण्यास समर्थ्य आहे.
\s5
\p
\v 27 तर मग असे मुळीच नाही की आम्ही मोशेच्या नियमांचे पालण करतो म्हणून आमची पापे पुसून टाकण्यात आली असावी? म्हणजे जर आपण मोशेचे नियम पाळतो तर आपण देवाचे नियम पाळण्यात बढाई मारली असती. याउलट, आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो म्हणून देवाने आपली पापे पुसून टाकली आहेत.
\v 28 तर मग आता हे स्पष्ट झाले की कोणी देवाचे नियम पाळल्याने तो देवाच्या जवळचा होत नाही तर, जो ख्रिस्ताच्याठायी विश्वास ठेवतो, तो देवाच्या पसंतीस पडतो. कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमात ठरतो.
\s5
\p
\v 29 ह्यास्तव तुम्ही जे यहूदी आहात, त्यांनी असा विचार करणे थांबवावे की देव त्यांना स्विकारणार! तुम्हाला खचितच माहित होणार की तो गैरयहूदी लोकांना सुद्धा स्विकारणार. होय, नक्कीच, तो गैरयहूदी लोकांचादेखील स्विकार करणार आहे.
\v 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही देव विश्वासाने नीतिमान ठरवील. कारण त्यांनी देखील ख्रिस्तात भरवसा ठेवला आहे.
\s5
\v 31 तर मग कोणीतरी मला मोशेच्या नियमशास्त्रविषयी विचारले की, “जर तुम्ही असे म्हणता की आपण ख्रिस्तात विश्वास ठेवल्याने देव अपल्याला त्याच्याबरोबर चांगले असे ठरवतो, तर याचा अर्थ असा की आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? तेव्ही मी उत्तर देईन, खात्रीने नाही, उलट आपण तर नियमशास्त्राला मान्यता देत आहो.
\s5
\c 4
\p
\v 1 परंतू अब्राहाम हा तर आम्हा आपल्या यहूद्यांचा आदरणीय पूर्वज आहे. म्हणून अब्राहमाच्याविषयी काय घडले हे ह्यावरून आपणास बोध व्हायला हवा.
\v 2 कारण अब्राहाम आपल्या चांगल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला लोकांसमोर अभिमान बाळगण्यास जागा असती, ( परंतु, असे असूनही, त्याला देवासमोर अभिमान बाळगण्यास कुठलेच कारण नाही.)
\v 3 कारण शास्त्र काय सांगते ते आठवण करा की, “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.” कारण जे देवाने त्याच्यासाठी वचन दिले होते त्यावर त्याने विश्वास केला, आणि ह्याच कारणाने अब्राहम देवाच्या पसंतीस उतरला.
\s5
\p
\v 4 आता आपण जे काम करतो त्याचे आम्हाला वेतन दिले जाते, तर ते भेट म्हणून मानले जात नाही. त्याऐवजी, ते आम्ही कमावलेले आहे असे मानले जाते. त्याचप्रमाणे देवाने आपणावर दया करावी ह्यासाठी काही गोष्टी करण्याद्वारे आपण त्याला भाग पाडतो तर, तर ती भेट म्हणून असे गणले जात नाही.
\v 5 परंतू प्रत्यक्षात, जे लोक आधी देवाचा सन्मान करत नव्हते त्यांना देवाने आपल्याबरोबर चांगले असे केले आहे. आता, उलट ते त्याच्याठायी विश्वास करतात आणि ह्याच कारणाने देवाने त्यांना त्याच्याबरोबर चांगले असे समजले आहे.
\s5
\p
\v 6 ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दावीद स्त्रोत्रसंहीतेत असे लिहतो की;
\q
\v 7 “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांच्या अपराधांकडे तो बघत नाही, असे लोक किती सुदैवी आहेत.
\q
\v 8 धन्य ते लोक ज्यांच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.
\s5
\p
\v 9 यासारखे भाग्यवान होणे म्हणजे आपण केवळ यहूद्यांच्याच अनुभवाची गोष्ट आहे काय? नाही, हा अनुभव जे गैरयहूदी आहेत ते ही घेऊ शकतात. हे आपल्याला माहीत आहे, कारण “अब्राहामाचा देवाच्याठायी असलेला विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” हे शास्त्रात आपल्याला लिहलेले आढळते.
\v 10 कारण अब्राहमाची सुंता होण्याअगोदर त्याच्या सोबत असे घडले, सुंता झ्याल्यानंतर नाही, ह्या गोष्टीचा विचार नीट करा.
\s5
\p
\v 11 बऱ्याच वर्षांनंतर, देवाने अब्राहामाला सुंता करावी अशी आज्ञा दिली, आणि त्याने तसे केले. सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, आपणास यावरून बोध व्हावा की देवाने अब्राहमाला त्याची सुंता झाली नसताही, देवावर विश्वास ठेवल्याकारणाने त्याला सर्वांचा विश्वासाचा पूर्वज असे मानले. अशाच प्रकारे जे सर्व देवाच्याठायी विश्वास ठेवतात, ते देवाच्या पसंतीस उतरतात.
\v 12 त्याच प्रकारे, आम्हा सर्व खऱ्या यहूद्यांचा, आब्राहाम हा पूर्वज असे नेमून दिले, अशासाठी त्यांच्या शरिरावर सुंता झाल्याची खून एवढेच नाही तर, त्याहूनही अधीक महत्वाचे म्हणजे की त्यांची सुंता होण्यापूर्विसुद्धा ते अब्राहमा सारखे जगले, म्हणजेच त्यांनी देवाच्याठायी विश्वास ठेवला.
\s5
\p
\v 13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, परंतू ते अभिवचन नियमशास्त्रामुळे पाळण्याने आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे की देवाने जे काही म्हटले ते तो करणार त्यामुळे आले. म्हणून देवाने आब्राहमास त्याच्यासोबत नितीमान असे ठरवले.
\v 14 कारण देवाने लोकांना दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. ह्याचा अर्थ असा की देवावर विश्वास ठेवणे हे व्यर्थ असते, आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचनसुद्धा व्यर्थ असते.
\v 15 तर प्रत्यक्षात हे लक्षात ठेवा की, देवाने त्याच्या वचनात असे लिहले आहे की, जे त्याच्या नियमशास्त्राचे पालन करणार नाही त्यांना तो शिक्षा करणार. तथापि, हे सुद्धा लक्षात असू द्या की, ज्या लोकांसाठी नियम नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.
\s5
\p
\v 16 म्हणून आपली आशा देवावर असल्याकारणाने आपणास त्या गोष्टी मिळतील ज्या त्याने आपणास वचनबद्ध केल्या आहेत. जे अब्राहमाचे खरे आदरणीय वंशज, आम्हा यहूद्यांसाठी, जे त्याच्याठायी विश्वास ठेवतात आणि ज्यांच्या जवळ नियम आहेत, आणि त्यांच्यासाठीही ज्यांच्याजवळ नियम नाही, परंतू ते आब्राहमाप्रमाणे देवावर विश्वास ठेवतात असे जे गैरयहूदी ह्यांना ह्या गोष्टी मिळाव्या ह्यासाठी त्याने अशा रीतीने कृती केली आहे. कारण देवाने आब्राहमास आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना खरा पूर्वज असे माणले.
\v 17 (आणि पाहा देव अब्राहमाबद्दल पवित्र शास्त्रात असे म्हणतो की: “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता करणार.”)
\p देव खात्री देतो की तो अब्राहमाला अनेक वंशज देईल. आणि आब्राहमाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवावर त्याने भरवसा ठेवला आणि त्याच्या समक्षतेत राहिला की तो तसे करणार.
\s5
\p
\v 18 कारण त्याने आपल्या अंत:करणात अशा वेळेस आशा धरली, जेव्हा त्याच्याकडे कूठल्याच प्रकारे शारिरीक अवस्था नव्हती की त्याच्याद्वारे देव वंशज निर्माण करील. कारण तो आणि त्याची पत्नी मुलास जन्म द्यावा यासाठी फार वयोवृद्घ असे झाले होते. तरी देवाने आब्राहमास असे म्हटले, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगाणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील.” ह्यावर आब्राहमाने विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे तो ‘अनेक राष्ट्रांचा पिता’ झाला.
\v 19 अब्राहाम जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी शंका धरली नाही की देव जे बोलला ते होणार का? तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही.
\s5
\p
\v 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. उलट, त्याने देवावर विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही, तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला तो जे काही करणार होता त्याबद्दव गौरव दिले.
\v 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे.
\v 22 “ह्याच कारणास्तव देवाने त्याल्या त्याच्याठायी नीतिमान असे गणले.”
\s5
\p
\v 23 देवाच्याठायी असलेल्या त्याच्या विश्वासामुळे, त्याने त्याला नितीमान असे ठरवले, हे अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे,
\v 24 तर देवाच्याठायी विश्वास ठेवल्याकरणाने ज्यांना देवाने त्याच्यासोबत नितीमान असे ठरवले, ज्याने आपल्या प्रभु येशुला, जो मेलेला असताही, त्याला पून्हा जीवंत असे केले, असा जे विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ते आहे.
\v 25 देवाकडून आपल्या वाईट कृत्यांची क्षमा व्हावी म्हणून, येशूने लोकांना, त्याला देहात शासन करावे ह्यासाठी अनूमती दिली. आणि देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे, यासाठी देवाने येशूला पून्हा जिवंत केले.
\s5
\c 5
\p
\v 1 देवावर विश्वास ठेवल्या कारणाने देवाने आम्हास त्याच्या सोबत नितीमान असे ठरवले आहे. म्हणून देवासोबत आपण आता शांतीने आहोत.
\v 2 हे असे काही आहे की, ख्रिस्ताने आम्हा करता जे काही केले, त्याद्वारे देवाने आपणा करता एक द्वार उघडले आहे, ज्याच्या आत गेल्यावर देव आपल्याशी दयाळू असा असणार आहे. म्हणून आम्ही हर्षीत आहोत कारण आपण आत्मविश्वासाने आशा करत आहो की देव किती थोर आहे, हे तो आम्हास प्रगट करणार आहे.
\s5
\p
\v 3 याशिवाय ख्रिस्ताला जूळल्या कारणाने आम्ही जेव्हा दु:ख सोसतो, तेव्हा आम्ही हर्षीतही होतो, कारण आम्हासं ठाऊक आहे की आमचे दु:ख सोसने, आम्हाला धिराने सहन करणे शिकवत आहे.
\v 4 आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण धीराने सहन करतो, तेव्हा देव आम्हास मान्यता देतो, आणि आम्हास हे जेव्हा कळते की देवाने आम्हास मान्य केले आहे, तेव्हा आम्ही आत्मविश्वासाने ह्याची आशा धरतो की तो आम्हा करता मोठ्या अशा गोष्टी करणार.
\v 5 आणि देव आपणांवर प्रीती करतो याकारणाने, आम्ही ज्या गोष्टीची वाट धिराने पाहत आहोत, ती गोष्ट आम्ही प्राप्त करू असा आमचा विश्वास आहे. त्याचा पवित्रआत्मा, जो त्याने आम्हास दिला, देव आम्हास किती प्रेम करतो हे समजण्यास कारणीभूत ठरतो.
\s5
\p
\v 6 आम्ही जेव्हा आमचे स्वत:चे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आम्हा मनुष्यांकरता मरण पावला. असे असूनही आपण देवाचा आदर करीत नाही.
\v 7 फार क्वचितच कोणा मनुष्यासाठी कोणी आपला प्राण देईल, नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही, तरिही एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील.
\s5
\p
\v 8 तरीदेखील, देवासाठी, आम्ही देवाविरुद्ध बंड करत असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि त्याद्वारे त्याने दाखवून दिले की तो आमच्यावर फार प्रेम करतो.
\v 9 तर आता आपण ख्रिस्त आपल्या पापांकरता मरण्याद्वारे आणि त्याचे रक्त सांडण्याद्वारे देवाने आपणास त्याच्याबरोबर नीतिमान ठरवले आहे. म्हणून जेव्हा देव पापाबद्दल आपला क्रोध पूर्ण जगाला दाखवणार आहे, तेव्हा ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत.
\s5
\p
\v 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे देवाने आम्हास त्याचे मित्र असे केले. त्यामुळे आता ह्याची अजून खात्री आहे की आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील.
\v 11 इतकेच नव्हे तर, आपल्या प्रभू येशूने जे आपल्यासाठी केले, त्याद्वारे आम्ही देवाबरोबर मित्र झाल्याकारणाने आम्ही हर्ष करतो.
\s5
\p
\v 12 मी आतापर्यंत जे काही लिहिले आहे त्यातून आपण काय शिकू शकता ते खालील प्रमाणे आहे, आदामामुळे सर्व मानव हे पापी आहेत, देवाने बनवीलेला पहिला मानव, ज्याने फार पूर्वी पाप केले. त्याने पाप केले म्हणून तो मरण पावला, म्हणून त्यानंतर जे मनुष्ये होती ती पापी अशी होती आणि तेही सर्व मरण पावले.
\v 13 मोशेचे नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी मनुष्याने पाप केले. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते.
\s5
\p
\v 14 परंतु आपणास हे माहित आहे की, आदामाच्या जिवनापासून ते मोशेच्या जिवनापर्यंत, सर्व मनुष्यांनी पाप केले, आणि ह्याच कारणाने ते मरण पावले. ज्या लोकांनी आदामाच्या पापांपेक्षा वेगळ्या पद्धतीने पाप केले, ते लोक सुद्धा मरण पावले. तर आता, जसे की आदामाच्या पापांनी सर्व मनुष्यांना प्रभावीत केले, त्याच प्रकारे, ख्रिस्त, जो नंतर आला, त्याच्या मरणाने सर्व लोकांना प्रभावीत केले.
\v 15 पण देवाचे बक्षिस, ज्याने ते आंम्हास दिले ते आदामाच्या पापासारखे नाही. कारण आदामाच्या पापामुळे सर्व लोक मरण पावले. परंतू, येशू ख्रिस्त, ह्या एका मनुष्यामुळे आणि आम्हा सर्वांसाठी केलेल्या त्याच्या बलीदानाने, ज्या, लायकीचे ही आपण नव्हतो, देवाने कृपेने आपणास सर्वकाळचे जीवन दिले.
\s5
\v 16 आणि आदामाच्या पापापासून देवाची देणगी ही दुसऱ्याप्रकारची होती. कारण आदामाने पाप केले, त्याच्यामागे सर्व लोकांनी पाप केले. आणि म्हणून देवाने अशी घोषणा केली की सर्व लोक शिक्षेसपात्र आहेत. परंतू कृपेची भेट म्हणून, देवाने आपणास त्याच्या सोबत नितीमान असे केले आहे.
\v 17 आदाम, ह्या एका मनुष्याने जे केले त्यामुळे सर्व लोक मरण पावले, पण आता पूष्कळ लोकांना देवाच्या कृपेची विपुलता ज्याने ती आम्हास दिली ज्याच्या योग्यतेचेही आपण नाही, त्याद्वारे त्याने आम्हास त्याच्या सोबत नीतिमान असे केले आहे.
\s5
\p
\v 18 म्हणून आदाम, ह्या एका मनुष्यामुळे ज्याने देवाचे नियम पाळले नाही, सर्व मानव हे शिक्षेस पात्र झाले. त्याचप्रकारे येशु, ह्या एका मनुष्याद्वारे, ज्याने देवाच्या आज्ञापाळून मरण्याद्वारे त्याच्या नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन दिले आहे.
\v 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे, ख्रिस्त, ह्या एका मनुष्याने, देवाच्या आज्ञापालनाने आणि त्याच्या मरणाद्वारे तो पुष्कळांना नीतिमान असे ठरवील.
\s5
\v 20 देवाने मोशेला यासाठी नियम दिले की जेणकरून लोकांना कळेल की त्यांनी किती भयानक पापे केली आहेत, परंतू जेव्हा लोकांनी आणखी पाप केले, तेव्हा देव त्यांच्या सोबत आणखी कृपेने वागला, ज्याच्या लायकीचेही ते नव्हते.
\v 21 त्याने हे अशासाठी केले की, लोक पापांमुळे मरण पावतात, ह्याच्या विपरीत कदाचीत त्याच्या कृपेच्या भेटीने ते त्याच्यासोबत नितीमान ठरतील. त्यानंतर ते सार्वकाल असे जगतील, कारण आपला प्रभू ख्रिस्त येशूने त्यांच्यासाठी हे केले आहे.
\s5
\c 6
\p
\v 1 तर कदाचित मी जे लिहले ह्यावर मला कोणीतरी असे बोलू शकतो की, देव आपल्या सोबत कृपाळू असा आहे, तर मग आपण सतत पाप करतच राहावे काय म्हणजे देव आपल्याला सतत क्षमा करणार?
\v 2 तर त्यांना माझे उत्तर असे असणार की, खात्रीने नाही, आपण तर पापाला मेलेलो असे आहोत, ह्याचा अर्थ आपण पाप कसे करणार? म्हणजेच आपण पाप करू नये.
\v 3 कारण जेव्हा आपला येशूच्या ऐक्यात बाप्तिस्मा होतो, तेव्हा देव आपणास ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मरण पावलेला असे बघतो. हे तुम्हांला माहीत नाही का?
\s5
\p
\v 4 म्हणून जेव्हा आपला बाप्तिस्मा केला जोतो, तेव्हा देव आपल्याला ख्रिस्ताबरोबर त्याच्या कबरेत असे पाहतो. ज्याप्रकारे देवाने त्याच्या सामर्थ्याने ख्रिस्तास मरणातून उठवले, त्याच प्रकारे आपण नव्याप्रकारे जीवन जगावे हे त्याने शक्य केले आहे.
\v 5 कारण देव ख्रिस्ताच्या मरणासोबत आपणाला त्याच्याशी जोडलेले असे पाहतो, आणि त्याला मरणातून उठवताना तो आपणासही त्याच्यासोबत मरणातून उठवणार आहे.
\s5
\p
\v 6 कारण पाहा, आपण पून्हा पाप करू नये व त्याद्वारे आपला नाश होऊ नये, ह्यासाठी देव आपल्याला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला असे पाहतो.
\v 7 अशासाठी की जो कोणी ख्रिस्ताबरोबर पापाकरता मरतो, त्याने पून्हा पाप करू नये.
\s5
\p
\v 8 आणि आता देव आपणास ख्रिस्ताबरोबर पापाकरता मरण पावलेला पाहत असल्याकारणाने, आम्ही असाहि विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर आम्ही जिवंतही राहू.
\v 9 आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून देवाद्वारे उठविला गेला, तो ख्रिस्त यापुढे पून्हा मरणार नाही. ह्यास्तव आता कुठलीहि गोष्ट त्याला पून्हा मरण्यास भाग पाडणार नाही.
\s5
\p
\v 10 जेव्हा तो मरण पावला, तेव्हा तो आपल्या पापी जगातून स्वतंत्र होऊन निघून गेला, आणि आता तो पून्हा कधीच मरणार नाही. परंतू तो पून्हा जीवंत असल्या कारणाने, तो देवाला गौरव देण्यास जगेल.
\v 11 त्याचप्रकारे आपण स्वतःलाहि देवाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, आणखी पाप करण्यास असमर्थ असे तुम्ही मृत व्यक्ती आहात, परंतू त्याचबरोबर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये जूळलेले व देवाची स्तुति करणारे असे जिवंत लोक आहात.
\s5
\p
\v 12 म्हणून जेव्हा तुम्ही पाप करू इच्छिता तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे वागू नका, लक्षात असूद्या की तुमचे शरिर एक दिवस मरणार आहे.
\v 13 कुठलेही वाईट काम करू किंवा बोलूही नका, तसे केल्यास तुम्ही जणू काय मेलेल्यांसारखे व्हाल, कारण मृत लोकांना काही एक कळत नाही व त्यांना देवही कळत नाही. याउलट, स्वत:ला देवाचे लोक, जे जीवंत आणि त्याला ओळखणारे आहेत, असे सादर करा. तुम्ही जे काही बोलता आणि करता, ते देवासाठी करा. धार्मिकतेचे कार्य करण्यास त्याला तुमचा उपयोग करू द्या.
\v 14 जर पाप करण्याची तुमची इच्छा झाली तर, ते करू नका. कारण मोशेला देवाने दिलेले नियम हे तुम्हास पाप करण्यापासून थांबण्यास असमर्थ आहेत, परंतू देव आता तुमची पाप न करण्यास कृपेने मदत करतो.
\s5
\p
\v 15 यावरून मग कोणी मला असे बोलावे काय, “तुम्ही म्हटल्या प्रमाणे मोशेचे नियम जे देवाने त्याला दिले, ते आपणास पाप करण्यापासून थांबवण्यास असमर्थ आहे, परंतू आपली लायकी नसतानाही देव आपणा सोबत कृपाळू असा आहे, तर याचा अर्थ हा आहे की देवाने आपणास पाप करण्यास परवाणगी दिली आहे?” मी त्यांना उत्तर देऊ इच्छीतो की, बिलकूल नाही, खचितच आपण पाप करू नये.
\v 16 कारण जर तुम्ही कोणाची आज्ञा पाळण्याचे मानता, तेव्हा तुम्ही त्याचे सेवक बनता. याचा अर्थ असा की मी जर पाप करण्याचे इच्छिले, तर मी पापाचा सेवक होणार आणि ह्याचा परिणाम मृत्यू हा असणार. परंतू मी जर देवाला अनुसरले, तर मी देवाचा सेवक होईन, आणि ह्याचा परिणाम असा होईल की ज्या चांगल्या गोष्टी देव आपल्या कडून करू इच्छितो, त्या तो करेल.
\s5
\p
\v 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम असल्या कारणाने, तुम्ही जे वाईट इच्छिले ते केले. परंतू त्या नंतर तुम्ही प्रामाणिकपणे ख्रिस्ताने जे शिकवले ते पाळण्यास सुरुवात केली. ह्यासाठी मी देवाला धन्यवाद देऊ इच्छितो.
\v 18 म्हणून आता ह्या नंतर तुम्ही पाप करू नये आणि पापाने तुम्हावर स्वामीत्व गाजवू नये. याउलट देव जो नितीमान, ह्याचे तुम्ही सेवक आहात.
\s5
\p
\v 19 तुमच्या स्वत:बाबत आणि देवाबाबत सत्य तुम्हास कळावे, ह्यासाठी मी तुम्हा लोकांस समजावे म्हणून लिहीताना दाखल्यांचा उपयोग करीत आहे. भूतकाळात तुम्ही तुमच्या इच्छेच्या गुलामगिरीत होता, त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारची अशूद्ध आणि वाईट अशा गोष्टी केल्या. परंतू आता, देवासारखी न्यायीपणाची कामे करण्यास तुम्ही स्वत:ला परवानगी द्या, म्हणजे तो तुम्हास त्याच्याकरता त्याचे स्वत:चे लोक असे वेगळे करील.
\v 20 कारण हे सत्य आहे की, तुम्ही देवाच्या नितीमत्वासंबंधाने आणि त्याच्या सामर्थ्यापासून मोकळे होता. (कारण तुम्ही जे मनात इच्छीले तेच केले). जे सत्य ते तुम्ही केलेच नाही.
\v 21 परंतू अशी स्वतंत्रता तुमच्या काय कामाची, ज्यात काही गोष्टी करण्याने तुम्हाला अप्रतिष्ठा मिळते आणि देवापासून दुर करते?
\s5
\v 22 परंतु आता तुम्हांला पाप करण्याची काही गरज नाही, त्या प्रकारचे गुलाम तुम्ही नाही, उलट तुम्ही देवाचे सेवक बनले आहा. ह्याची परतफेड म्हणून देवाने तुम्हाला त्याचे वेगळे केलेले लोक आणि त्याच्यासोबत सार्वकालीक जीवन दिले आहे.
\v 23 पाहा जे सर्व आपल्या मनाचे ऐकून वाईट करतात, ते त्याची मजुरी मिळवतील, आणि त्याची मजूरी मरण आहे. उलट देवाने आपणास मोफत अशी भेट दिली आहे, त्याने आपणास त्याच्यासोबत सार्वकालीक जीवन जगण्यास आणि ख्रिस्ताशी जूळण्यास परवानगी दिली आहे.
\s5
\c 7
\p
\v 1 माझ्या बंधूनो, तुम्हांस नियमांबद्दल माहीत आहे. तर तुम्हास नक्कीच हे ठाऊक असणार की ते नियम लोकांना जिवंत असतानाच पाळता येतील.
\s5
\p
\v 2 उदाहरणार्थ, जो पर्यंत एखद्या स्त्रीचा पती जीवंत आहे, तो पर्यंत तीने त्याच्याशी विश्वासू राहावे, परंतू तीचा पती जर मरण पावला, तिला आता विवाह झाला असल्या समान वागण्याची आवश्यकता नाही. नियम तीला विवाहातून मुक्त करतो .
\v 3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसऱ्या कोणा मनुष्याकडे गेली तर, तर ती व्यभिचारिणी होईल. पण जर तिचा पती मरण पावला तर तीला नियम पाळण्याची काही गरज नाही. त्यानंतर जर तीने दुसऱ्या पुरुषाशी विहाह केला तरी ती व्यभिचारिणी नसणार.
\s5
\p
\v 4 माझ्या बंधूनो आणि भगिणींनो, अशाच प्रकारे ख्रिस्ताबरोबर तुम्ही मेले असता, देवाचे नियमशास्त्र यापूढे तुम्हांला नियंत्रण करणार नाही. तुमच्याद्वारे देवाचा आदर व्हावा यासाठी तुम्ही ख्रिस्ताशी जूळण्यास स्वतंत्र असे आहात. तुम्ही जीवंत असल्या कराणाने हे करू शकता. ज्याने त्याला मरणातून उठवले त्या देवाने तुम्हास ख्रिस्ताशी एकरूप केले आहे.
\v 5 कारण जेव्हा आम्ही देवाचा नियम शिकलो, त्याद्वारे आम्ही आमच्या वाईट विचारांना अनुसरून अधिकाधीक पाप करण्याचे इच्छीले. म्हणून आम्ही त्या वाईट गोष्टी केल्या ज्याच्याने देवाने आम्हाला त्याच्यापासून कायमचे वेगळे केले.
\s5
\p
\v 6 परंतु आता आम्ही मोशेच्या नियमशास्त्रातून स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले आहे. आपण काय करावे हे नियमशास्त्राने आपणास न सांगावे ह्यासाठी आपण त्याकरता मृत असे झालो आहोत. तर नियमशास्त्रानुसार जुन्या पद्धतीपेक्षा, आत्मा प्रगट करेल अशा नविन प्रकारे देवाची स्तुती आमच्याद्वारे व्हावी, यासाठी देवाने हे आमच्या करता केले आहे.
\s5
\p
\v 7 तर कोणीतरी मला उत्तर देईल, जर लोकांना देवाचा नियम माहित आहे, तर हे सत्य आहे का की त्यांनी आणखी अधिक पाप करावे? नियमशास्त्र त्यांच्याकरता पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? ह्यावर मला त्यांना सांगू द्या की, खचितच नाही! नियमशास्त्र पाप नाही, परंतू हे सत्य आहे की नियमशास्त्र कळाल्यावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. उदाहरणार्थ, “जे तुझे नाही त्याचा तू लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर जे माझे नाही त्याची इच्छा धरणे म्हणजे लोभ हे मला माहीत झाले नसते.
\v 8 आणि नमुद केलेल्या आज्ञांद्वारे, इतरांच्या मालकीची गोष्ट मिळवण्याची माझ्या पापी इच्छाशक्तीने माझ्यात अनेक मार्गांनी लालसा उत्पन्न केल्या असत्या. परंतू जेथे नियम नाही तेथे पापही नाही.
\s5
\v 9 पूर्वी, देवाच्या नियमाला कशाची आवश्यकता आहे हे न जाणता, मी जे करत होतो त्याची काळजी न करता मी पाप केले. परंतू देवाने आम्हास दिलेल्या नियमांबद्दल जेव्ही मी जागरूक झालो, मला अचानक कळाले की मी पाप करत होतो,
\v 10 आणि मला हे ही कळाले की मी देवापासून दूर केला गेलेलो आहे. कारण जी आज्ञा मला सार्वकालीक जीवन देण्यासाठी योजण्यात आली होती तिचे पालन केल्याने उलट ती माझ्यासाठी मरण अशी झाली.
\s5
\p
\v 11 कारण मला पाप करण्याची इच्छा झाल्यास, मी असा विचार करतो की फक्त नियम पालन केल्याने मी सार्वकाल जगणार. परंतू मी चूकीचे करत होतो, माझी अशी विचारधरणा होती की सोबतच मी पापही करत राहावे. परंतू खरे पाहीले तर, मी देवाचे नियम खरोखर न पाळल्या कारणाने, देव मला त्याच्यापासून सर्वकालासाठी दूर करणार होता.
\v 12 म्हणून आम्हास माहीत आहे की देवाने मोशेला दिलेले नियम हे संपूर्णतः चांगले आहेत. आणि देवाने जे काही आपणास करण्याकरता आज्ञापीले ते पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहे.
\s5
\p
\v 13 तर, ह्यावर कोणी मला असे बोलेल की, याचा अर्थ असा आहे का, देवाने मोशेला दिलेले नियम, जे की उत्तम होते, त्यांमुळेच मी देवापासून दुर केला गेलो? मी त्याला असे उत्तर देईन, खात्रीने नियम असे करत नाही! परंतु ह्याउलट, नियम जे की चांगले आहेत, त्यानेच मला करण्यास उद्यूक्त केले. ह्याचा परिणाम असा झाला की, मी देवापासून फार दूर गेलो, हे मला कळाले. आणखी, मी देवाचे नियम शिकल्याने, जे त्याने आज्ञापीले होते, त्याद्वारे मी जे काही करत आहे ते खरोखरच पाप आहे हे मला कळून आले.
\p
\v 14 आम्हांस माहीत आहे की मोशेला दिलेले नियम हे देवाकडून आले आहेत. परंतू माझ्याकरता, मी असा व्यक्ति आहे जो पाप करतो, हे असेच आहे की जणू काय, माझ्या पाप करण्याच्या इच्छेने मला पापाचा दास बनण्याकरिता मला भाग पाडले आहे. माझे मन मला जे काही सांगेल तेच मला करावे लागते.
\s5
\p
\v 15 मी जे काही करतो ते सहसा मला समजत नाही. म्हणजेच, ज्या चांगल्या गोष्टी मला कराव्या अशा वाटतात, त्या मी करत नाही, आणि मला नको असलेल्या ज्या वाईट गोष्टी, त्याच गोष्टी मी करतो.
\p
\v 16 ह्याचा अर्थ हाच की जर मी नको असलेल्या वाईट गोष्टी करतो, तर देवाचे वचन हे चांगले आहे ह्यावर मी संमती देतो.
\s5
\p
\v 17 म्हणजेच, मला पाप करावे म्हणून मी पाप करतो असे नाही, उलट माझ्या ठायी पाप करण्याची असलेली इच्छा मला पाप करण्यास कारणीभूत ठरते.
\v 18 मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्याकडून करवत नाही. हे मला ठावूक आहे कारण, जे चांगले ते मी करू इच्छीतो, परंतू जे चांगले ते मी करत नाही.
\s5
\p
\v 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो.
\v 20 आणि ज्याअर्थी, ज्या वाईट गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही. उलट, काहीतरी वेगळे मला पाप करण्यास कारणीभूत ठरते, आणि हे सत्य आहे की मी परिपूर्ण नसल्याने मी पाप करतो.
\v 21 तर माइयामध्ये मला हे आढळून आले की, जे चांगले ते मी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्यातील वाईट इच्छा मला जे चांगले ते करण्यास प्रतिबंधीत करते, हे असे नेहमीच होते.
\s5
\p
\v 22 माझ्यातील नविन मनुष्यामध्ये, मी देवाच्या नियमशास्त्रामुळे फार आनंद करतो.
\v 23 असे असले तरी, माझे शरीर मला निराळ्याच सामर्थ्याचा अनुभव करते. ते माझ्या मनावर जे मी इच्छीतो त्याच्या उलट कार्य करते, आणि जो माझा जूना स्वभाव त्याप्रमाणे करण्यास मला लावते.
\s5
\p
\v 24 ही गोष्ट जेव्हा मी विचारात घेतो, मी स्वत:ला अत्यंत दु:खी असे समजतो. शारिरीक इच्छेच्या ताब्यातून मला कोणीतरी सोडवावे असे मला वाटते, अशासाठी की मी देवापासून विभक्त न व्हावे.
\v 25 तरी मी आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो, की त्याने आम्हाला ह्या शारिरीक इच्छेच्या ताब्यातून सोडवले. तर मग आपल्या मनासोबत, तुम्ही आणि मी देवाच्या नियमाचे पालन करायला हवे. परंतू आपल्या जून्या पापी स्वभावामुळे तुम्ही आणि मी वारंवार आपल्या पापी इच्छांनी आपला ताबा घ्यावा ह्याची अनूमती देतो.
\s5
\c 8
\p
\v 1 म्हणून आता जे ख्रिस्त येशूला जूळले आहेत त्यांना देव शिक्षा करणार नाही.
\v 2 कारण येशू ख्रिस्ताला आपण जूळल्याकारणाने देवाचा आत्मा आपणास नव्या प्रकारे जगण्यास कारणीभूत ठरला आहे. अशा तऱ्हेने, माझ्या मनात पापाचा विचार आला तर ते करण्यास मला काही गरज नाही, आणि देवापासून मी कधीही दूर केला जाणार नाही.
\s5
\p
\v 3 आपण हा विचार करणे निरर्थक आहे की, देवासोबत राहावे यासाठी आपण नियमशास्त्र पाळण्याचा प्रयत्न केला, परंतू पाप करणे आपण थांबवू शकत नाही. यासाठी देवाने आपली मदत केली, त्याने आपला स्वत:चा पूत्र या जगात पाठवला यासाठी की त्याचा पूत्र आपण केलेल्या अपकृत्याची भरपाई करेल. पाप करणाऱ्यांच्या शरिरासारखे शरिर धारण करून त्याचा पूत्र आला. आमच्या पापांकरता अर्पण म्हणून त्याचा पूत्र स्वत:स अर्पण करण्यास आला. आणि असे करण्याने त्याने दाखवून दिले की आपली पापे खरोखर किती दुष्ट होती आणि ती जो कोणी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
\v 4 म्हणून आता देवाच्या नियमशास्त्रात असलेल्या गोष्टी आपण परिपूर्ण करू शकतो. ह्या गोष्टी आपण आपल्या जून्या वाईट इच्छांमध्ये कृती केल्याने परिपूर्ण होणार नाही, तर उलट देवाच्या आत्म्याच्या इच्छेने जीवन जगल्याद्वारे परिपूर्ण होतील.
\v 5 जे लोक आपल्या स्वाभावीक वाईट गोष्टींकडे लक्ष लावून आपले जीवन जगतात, परंतू उलट जे लोक देवाच्या आत्म्याने चालतात ते त्याच्या गोष्टींकडे लक्ष लावतात.
\s5
\p
\v 6 जो आपल्या स्वाभावीक वाईट इच्छांकडे चिंत्त लावतो व ते आपल्या विचारात घेतो, तो सार्वकालीक जीवन मिळवणार नाही. परंतू देवाचा आत्मा काय इच्छीतो हे ज्याला कळाले ते सार्वकालीक जीवन जगतील आणि ते शांती मिळवतील.
\v 7 मला हे समजावून सांगू द्या की, लोकांना त्यांच्या वाईट स्वभावाची इच्छा इतक्या प्रमाणात आहे की, ते देवाच्या विरुद्ध वागत आहेत. कारण ते देवाच्या नियमाचे पालन करत नाहीत व त्यांना आधीन होताही येत नाही.
\v 8 कारण जे लोक त्यांचा वाईट स्वभाव सांगेल ते करतात, असे देवाला प्रसन्न करू शकत नाही.
\s5
\p
\v 9 परंतू आपणाला आपल्या वाईट स्वभावाद्वारे चालवले जावे असे होता कामा नये. उलट, देवाचा आत्मा आम्हामध्ये राहतो याकारणाने आपण देवाच्या आत्म्याला आपला ताबा देऊ. पाहा, ख्रिस्ताकडून आलेला आत्मा जर लोकांमध्ये वास करत नाही, तर ते ख्रिस्ताचे नाहीत.
\v 10 परंतू ख्रिस्त त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हामध्ये राहत असल्याने, देव आपल्या शरिराला मृत स्वरूपात पाहतो, यास्तव तुम्हास आता पाप करण्याची काही गरज नाही, आणि त्याने तुम्हास त्याच्यासोबत नितीमान केले, याकारणाने तो तुमचा आत्मा जीवंत असा पाहतो.
\s5
\p
\v 11 आणि येशूला मरणातून पून्हा उठवीण्यास देव कारणीभूत ठरला आहे. यास्तव जे तुमचे मर्त्य शरिर जे नक्कीच मरणार आहे, त्याला देव पून्हा जीवंत करणार, कारण देवाचा आत्मा तुंम्हामध्ये वास करतो. त्याने ख्रिस्ताला मरणातून पून्हा उठवले आणि त्याच्या आत्म्याद्वारे तो तुम्हासही पून्हा जीवंत करणार आहे.
\s5
\p
\v 12 तर मग बंधूनो, आत्मा सुचवेल त्याप्रमाणे आपण जगायला हवे. आणि जे करायचे नाही ते म्हणजे आपल्या जून्या वाईट देहस्वभावाला अनूसरून न जगणे.
\v 13 जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही खचितच मरणार आणि देवापासून सर्वकालासाठी विभक्त व्हाल. परंतु आत्म्याच्या द्वारे जर तुम्ही ह्या गोष्टी थांबवल्या, तर तुम्ही खचितच सर्वकाल जगाल.
\s5
\p
\v 14 कारण आम्ही जे देवाच्या आत्माचे पालन करतो, तितके देवाची मुले आहोत.
\v 15 हे असे आहे कारण देवाकडून तुम्हाला एक आत्मा मिळाला आहे, जो देवापासून तुम्हास पून्हा भीति वाटू नये असे करतो. तुम्ही गुलाम नाही जे आपल्या धन्याला भीतात, उलट ह्या आत्म्याद्वारे आपण देवाचे पूत्र असे झालो आहोत. ह्या आत्म्यायोगे आम्ही “माझ्या बापा” अशी हाक मारतो.
\s5
\p
\v 16 तो आत्मा स्वत: आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत.
\v 17 आपण जर देवाची मुले आहोत तर त्याने जे काही वचन आपणास आणि ख्रिस्तास देऊ केले आहे ते ऐके दिवशी आपण ख्रिस्ताबरोबर मिळवू. परंतु देवाने आम्हाला सन्मानित करावे यासाठी, ख्रिस्ताने ज्याप्रकारे चांगल्या गोष्टींसाठी दुःख सहन केले त्याच प्रकारे आपणही दु:ख सहन केले पाहिजे.
\s5
\p
\v 18 कारण भविष्यकाळात देव आपल्याला प्रगट करेल त्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे, ज्यांच्याकडे आपण लक्ष लावावे, काहीच नाहीत असे मी मानतो.
\v 19 कारण देवाद्वारे निर्माण केलेल्या गोष्टी, जेव्हा तो त्याच्या खऱ्या पुत्रांना प्रगट करेल व ते कोण असतील त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
\s5
\p
\v 20 देवाने निर्माण केलेल्या गोष्टींनी त्याने उद्देशलेले साध्य न करावे असे केले. हे अशाकरता नव्हे की त्यांनी अपयशी व्हावे, उलट देवाने हे अशा मार्गाने तयार केले की त्यांनी सतत आत्मविश्वासाने अपेक्षा करावी,
\v 21 की, त्याने निर्माण केलेले ऐके दिवशी मरणार नाही, सडणार नाही, आणि खाली टाकले जाणार नाही. तो त्यांना त्यामधून स्वतंत्र करेल, अशासाठी की ज्याप्रकारे तो आपल्या लेकरांकरता अद्भूत कृत्ये करतो, त्याच प्रकारे तो त्यांच्यासाठी ही अशा गोष्टी करेल.
\p
\v 22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, देवाने निर्माण केलेल्या संपूर्ण गोष्टी कण्हत व वेदना भोगत आहेत आणि त्याच गोष्टी याची देखील वाट पाहत आहेत की त्याने ही अशाच गोष्टी त्यांच्या साठीही कराव्या. परंतू आता एखाद्या स्त्रीला बाळंतपणाच्या कळा लागाव्या तशा प्रकारचे दु:ख ती भोगत आहे.
\s5
\p
\v 23 परंतु निर्माण केलेल्या गोष्टीच कण्हत नाही तर, आपण ज्यांना देवाचा आत्मा आहे, आणि जो देवाने सांगितलेले पूर्ण होण्याची वाट पाहत आहे, तो आणि आपण स्वत:ही मनातल्या मनात कण्हत आहोत. आम्ही कण्हत आहोत, कारण आम्ही देवाने दिलेल्या वचनाची पूर्तता होण्याच्या काळाची आतूरतेने वाट पाहत आहोत, की जेव्हा देव त्याची दत्तक लेकरे म्हणून आम्हास पूर्ण अधिकार देणार. त्यामध्ये तो आपल्या शरिरास या पृथ्वीवरील विटाळवाण्या गोष्टीतून स्वतंत्र करेल. हे असे तो आपल्या नविन शरिर दिल्याद्वारे करणार आहे.
\v 24 कारण देवाने आपणास तारले, त्या दिवसापासून आम्ही ह्या दिवसाची भविष्यात विश्वासाने परिपूर्तता होऊ ह्याची आशेने वाट पाहत आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर आपणास पूढे आशा करण्याची काही गरज नसणार. कारण ज्याची आशा आपण धरली आहे ते जर मिळाले तर आपण कशाची वाट पाहणार.
\v 25 परंतु, आपल्याजवळ जे अद्याप नाही ते मिळण्याची आम्ही धीराने वाट पाहत आहोत. आम्ही उत्सुकतेने आणि धैर्यपूर्वक वाट पाहत आहोत.
\s5
\p
\v 26 त्याचप्रमाणे, जेव्हा आपण कमजोर असतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वत: आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने प्रार्थना करतो.
\v 27 पाहा, जो देव आपला आतील स्वभाव आणि अंत:करण पारखतो, त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. त्याचा आत्मा, आपणासाठी जे देवाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी देव ज्याप्रकारे इच्छीतो त्याच प्रकारे प्रार्थना करतो.
\s5
\p
\v 28 आणि आपणास माहीत आहे की, ज्यांच्यावर देव प्रेम करतो त्यांच्यासाठी तो सर्व गोष्टी मिळून चांगलेच असे करतो. जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठीच तो असे करतो, कारण त्याने तसे करण्याचे योजीले असते. चांगलेच प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो.
\v 29 देवाला पूर्वी माहित होते की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. देवाने अगोदरच निवडले होते की आपले चारित्र त्याच्या पुत्राच्या चारित्र्या सारखे असणार. याचा परिणाम असा की ख्रिस्त देवाचा पहिला पूत्र झाला, आणि जे देवाची मुले होती ती आता येशूचे लहान भाऊ असे झाले.
\v 30 आणि ज्या देवाने आपल्यासाठी आधी असे ठरविले होते की आपण त्याच्या पुत्राप्रमाणे वागू, त्याने त्यालाही बोलावले. आणि आपण जे बोलावलेले असे आहो, त्याने त्याच्या सोबत आपल्याला नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना तो गौरवसुद्धा देईल याची आम्हास खात्री आहे.
\s5
\p
\v 31 म्हणून ह्या सर्व गोष्टीं ज्या देवाने तुमच्यासाठी केल्या, त्यातून आपण काय शिकलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगेन. कारण देव आपल्या वतीने कार्य करीत असल्यामुळे कोणीही आपल्या विरुद्ध जिंकू शकत नाही!
\v 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, उलट आपणा सर्वांसाठी त्याला दुसऱ्यांच्या हाती क्रूरतेने मरण्यास दिले, अशासाठी की सर्व विश्वसणाऱ्यांना त्याच्या मृत्यू द्वारे लाभ व्हावा. कारण देवाने ते केले आहे, तो आपल्याला त्याच्याकरता जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही ख्रिस्ताद्वारे मुक्तपणे दिले आहे.
\s5
\v 33 देवासमोर चुकीच्या गोष्टीबद्दल कोणीही आम्हाला दोष देऊ शकत नाही, कारण त्याने आम्हास निवडून त्याचे केले आहे. तोच एक असा आहे ज्याने आम्हास नितीमान ठरवीले आहे.
\v 34 तो येशू ख्रिस्तच आहे जो आमच्याकरता देवाजवळ विणवनी करतो. तो ख्रिस्तच आहे जो आमच्याकरता मारला गेला आणि पून्हा मरणातून उठवला गेला. जो सर्वात उच्च ठिकाणी आहे तो ख्रिस्तच आहे, जेथे तो देवासोबत राज्य करतो. तो नक्कीच आपल्याला दोषी ठरवणार नाही.
\s5
\p
\v 35 ख्रिस्ताला आपल्यावर प्रेम करण्यापासून कोणीही किंवा कुठलीही गोष्ट थांबवू शकणार नाही. हे असे होणार नाही, त्रास देणारा कोणी, कष्ट देणारा कोणी, छळ करणारा कोणी, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय?
\v 36 ह्या अशा गोष्टी कदाचित आपल्या सोबत घडतील, जसे की लिहील्या प्रमाणे, दावीद देवाला असे म्हणतो, की “आम्ही फक्त तुझे लोक असल्या कारणाने, इतर लोक वारंवार आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात, ते असे मानतात की आम्ही फक्त ठार मारण्यासाठीच आहोत, जसे काय एखादा खाटीक मेंढराला फक्त प्राणी समजून कापतो त्या प्रमाणे ते आम्हाला समजतात. ते कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे आम्हाला समजतात.”
\s5
\p
\v 37 तरी या सर्व वाईट गोष्टींमध्ये ज्या आमच्याशी घडत आहेत, आम्ही, ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे, ह्या गोष्टींवर अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत.
\v 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन जगत असताना, नाही देवदूत, नाही सैतान, नाही वर्तमान घडामोडी, नाही भविष्यकाळातील घडामोडी, नाही सामर्थशाली असलेला,
\v 39 नाही आकाशात सामर्थशाली असलेला किंवा त्याच्या खाली असलेला किंवा देवाने निर्माण केलेली कुठलीही गोष्ट देवाला आपणावर प्रीती करण्यास थांबवणार का? आपला प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्यासाठी मरण्याकरता पाठवण्याद्वारे आपणासाठी मरण्यास दिले ही प्रीती देवाने आपल्याला दाखवली.
\s5
\c 9
\p
\v 1 मी ख्रिस्ताशी एकरूप असल्याने मी तुमच्याशी खरे बोलणार, खोटे बोलणार नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी पूष्टी देतो, कारण पवित्र आत्मा मला चालवतो.
\v 2 इस्त्राएलामधील माझ्या भावांसाठी मी फार दु:खी आणि शोकात आहे.
\s5
\p
\v 3 कारण माझे भाऊ, माझे नातेवाईकांनी ख्रिस्तावर वाश्वास ठेवावा याकरिता देवाने मला शापित आणि ख्रिस्तापासून सर्वकाळासाठी वेगळे केले तरी चालेल अशी मी इच्छा करतो.
\v 4 इस्राएली माझ्यासारखेच आहेत. ते याकोबाच्या वंशजांपैकी, ज्यांना देवाने निवडलेले आहे, असे ते आहेत. देवाने त्यांना सदैव आपले निवडलेली मुले असे समजले आहे. त्यांने त्यांच्या पूर्वजांना दाखवले की तो किती सामर्थशाली आहे. त्यांच्यासोबतच त्याने पूष्कळदा करार केले. सिनाय पर्वतावर त्यानेच त्यांच्या करता वचने दिली. ते त्या लोकांतील होते ज्यांना देवाने त्याची उपासना करण्यास परवानगी दिली. आणखी ते त्या लोकांतील होते ज्यांना देवाने पूष्कळ अभिवचने दिले, त्यातील एक म्हणजे त्यांच्यामधून ख्रिस्त येणार हे महत्वाचे वचन.
\v 5 अब्राहाम, इसाक, आणि याकोब हे आपले पूर्वज होते ज्यांच्यापासून देवाने राष्ट्रे उत्पन्न करण्यास प्रारंभ केला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्हा इस्राएलामधून ख्रिस्त मानव बनून जन्मास आला. तोच देव आहे, जो सर्वकाल स्तुतीच्या योग्य असा आहे, आणि हे सत्य आहे.
\s5
\p
\v 6 देवाचे वचन अब्राहाम, इसहाक, आणि याकोब यांच्या वंशजांना त्याचे सर्व आशिर्वाद वारसाहक्काने मिळतील असे होते. परंतु माझ्या पूष्कळशा इस्त्राएली बंधूंनी ख्रिस्ताला नाकारले, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की देवाने त्यांना दिलेले वचन तो पूर्ण करण्यास ते अपयशी झाला. कारण हे त्या सर्व लोकांसाठी नाही जे स्वत:ला याकोबाचे वंशज आणि देवाचे खरोखर निवडलेले इस्राएली लोक असे समजतात.
\v 7 याचा अर्थ असाही नाही की, जे अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, ज्यांना देवाने खरोखर अब्राहमाचे वंशज म्हटले, उलट त्यातील काहींनाच देवाने अब्राहामाचे खरे वंशज समजले. ह्यालाच दूजोरा म्हणून त्याने अब्राहमाला असे म्हटले, “तुझ्या पूत्रांपैकी फक्त इसहाकालाच मी तुझ्या वंशाचा खरा पिता असे समजेन.”
\s5
\p
\v 8 माझ्या बोलण्याचा हा उद्देश आहे की, आब्राहमाचे सर्व वंशज हे देवाची मुले असतीलच असे नाही, उलट, त्यातील असेच लोक असतील जेव्हा देवाने आब्राहमाला त्याचे वंशज देण्याचे वचन दिले, हे तेच लोक असतील ज्यांना देव आब्राहमाचे खरे वंशज आणि त्याची मुले असे समजणार.
\v 9 नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” हेच ते वचन आहे जे देवाने आब्राहमाला दिले आणि तसे त्याने घडवून आणलेही.
\s5
\p
\v 10 इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा, जी आब्राहमाचा मुलगा इसहाक ह्याची पत्नी, म्हणजे आपला पूर्वज इसहाक, याच्याकडून गरोदर झाली आणि जूळ्यांना जन्म दिला.
\v 11 आणि एसाव आणि याकोब ही जुळे जन्माला येण्यापूर्वी,
\v 12 आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा देव रिबेकाशी बोलला, “ज्या रूढी होत्या त्याच्या विरोधात, जो वडील तो धाकट्याची सेवा करील.” निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. म्हणून तिला सांगितले होते की,
\v 13 पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी लहान याकोबावर प्रेम केले आणि वयाने मोठा असलेल्या एसावाला नापसंत केले.”
\s5
\p
\v 14 तर मग आपण काय म्हणावे? काही लोक निवडण्याद्वारे देव अन्यायी आहे काय? त्यांना माझे उत्तर असेल की, देव खचितच अन्यायी नाही.
\v 15 कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.”
\v 16 यास्तव देव लोकांना निवडतो, अशासाठी नाही की त्यांच्या इच्छेद्वारे देवाने त्यांना निवडावे किंवा त्यांनी अतोनात प्रयत्न करुन देवाला आनंदी केले असे ही नाही. उलट, त्याच्याद्वारे जे दयेस पात्र नाहीत अशांस, त्याच्याद्वारे दया प्राप्त व्हावी अशासाठी तो लोकांना निवडतो.
\s5
\p
\v 17 कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला राजा केले, यासाठी की मी तुझ्याविरूद्ध लडून आपले सामर्थ्य जगाला दाखवावे की मी किती शक्तीशाली आहे.”
\v 18 म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो, जसे की फारो.
\s5
\p
\v 19 तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?”
\v 20 होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडवणाऱ्याला, “तू मला असे का केलेस” असे विचारील काय?
\v 21 एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?
\s5
\v 22 परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त करावेसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती, त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय?
\v 23 जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती, त्यांना त्याने गौरव मिळण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी.
\v 24 ज्या आपणांला त्याने फक्त यहूद्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते.
\s5
\v 25 होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते, “जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन. आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती तिला प्रिय म्हणेन.”
\v 26 आणि असे होईल की, जेथे ‘तुम्ही माझे लोक नाहीत’ असे म्हटले, होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल.
\s5
\v 27 आणि यशया इस्राएलाविषयी असे ओरडून सांगतो की, “जरी इस्त्राएलाविषयी मुलांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी त्यांच्यातील फक्त थोडेच तारण पावतील.
\v 28 कारण पूर्ण करुन व आटोपते घेऊन प्रभु पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणील.”
\v 29 आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते, “जर सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरासारखे झालो असतो.”
\s5
\v 30 तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की, जे यहूदीतर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायीपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले.
\v 31 परंतु इस्राएल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही.
\s5
\v 32 का नाही? कारण ते हे नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्यांनी केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले.
\v 33 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. “पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.
\s5
\c 10
\p
\v 1 बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की,
\v 2 त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही.
\v 3 देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत.
\s5
\v 4 कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.
\v 5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.”
\s5
\v 6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की स्वर्गात कोण जाईल? म्हणजे ख्रिस्ताला खाली आणावयास.
\v 7 किंवा “खाली अधोलोकात कोण जाईल? म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.
\s5
\v 8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंत:करणात आहे.”ते वचन हे आहे.
\v 9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंत:करणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तर तुझे तारण होईल.
\v 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंत:करणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
\s5
\v 11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.”
\v 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे.
\v 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.”
\s5
\v 14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील?
\v 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!
\s5
\v 16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?”
\v 17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.
\s5
\v 18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.
\s5
\v 19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो, “खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन. विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.”
\s5
\v 20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे मला शोधीत नव्हते त्यांना मी सापडलो, जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.”
\v 21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो, “ज्या लोकांनी माझी आज्ञा मोडली, आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.”
\s5
\c 11
\p
\v 1 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.
\v 2 देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की,
\v 3 “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यांपैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात.
\s5
\v 4 परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बआलापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.
\v 5 त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत.
\s5
\v 6 आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही.
\v 7 तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले.
\v 8 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा, पाहू न शकणारे डोळे, ऐकू न शकणारे कान दिले आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.”
\s5
\v 9 दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
\v 10 दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत. आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.”
\s5
\v 11 म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इर्ष्या उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले.
\v 12 परंतु त्यांनी केलेला चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला ऱ्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल.
\s5
\v 13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो.
\v 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईर्ष्यावान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे.
\s5
\v 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडूनचा स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का?
\v 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
\s5
\v 17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात.
\v 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते.
\s5
\v 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.”
\v 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे, परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका; तर भीति बाळगा.
\v 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.
\s5
\v 22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल.
\s5
\v 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाहीत तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे.
\v 24 म्हणून तुम्ही जे निसर्गतः रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!
\s5
\v 25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशत: कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.
\s5
\v 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे, “मुक्त करणारा सीयोनातून येईल, तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
\v 27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन. तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.”
\s5
\v 28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो.
\v 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही.
\s5
\v 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे.
\v 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी.
\v 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तुरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.
\s5
\v 33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय आणि त्याच्या मार्गाचा मार्ग काढणे कठीण आहे.
\v 34 पवित्र शास्त्र सांगते. “प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?”
\s5
\v 35 “प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?”
\v 36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.
\s5
\c 12
\p
\v 1 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
\v 2 आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.
\s5
\v 3 मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा.
\s5
\v 4 कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते.
\v 5 त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.
\s5
\v 6 देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे.
\v 7 जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे.
\v 8 कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला देयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
\s5
\v 9 तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा.
\v 10 बंधूप्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वत:पेक्षा इतरांचा बहुमान करा.
\s5
\v 11 आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा.
\v 12 आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाठीने प्रार्थना करा.
\v 13 पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.
\s5
\v 14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका.
\v 15 जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा.
\v 16 एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वत:स शहाणे समजू नका.
\s5
\v 17 कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करु नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा.
\v 18 शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा.
\s5
\v 19 प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो.
\v 20 “तुमचा शत्रू भुकेला असल्यास त्यास खावयास द्या, तहानेला असेल तर प्यावयास द्या. कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.”
\v 21 वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका. त्यांनी तुमच्यासाठी जे केले त्यापेक्षाही चांगले करा.
\s5
\c 13
\p
\v 1 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहेत ते देवाने नेमलेले आहेत.
\v 2 परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वत:ला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वत:वर न्याय ओढवून घेतील.
\s5
\v 3 अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीति वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रशंसा होईल.
\v 4 होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे.
\v 5 यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्सदविवेकबुध्दीने अधीन राहणे आवश्यक आहे.
\s5
\v 6 आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात.
\v 7 तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.
\s5
\v 8 एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे.
\v 9 “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको”या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर”या शब्दात सामावलेली आहे.
\v 10 प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.
\s5
\v 11 आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे.
\v 12 रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि ‘दिवस’ जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु.
\s5
\v 13 दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको,
\v 14 तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासनामध्ये गुंतून राहू नका.
\s5
\c 14
\p
\v 1 जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे.
\v 2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो.
\s5
\v 3 जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
\v 4 दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.
\s5
\v 5 एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी.
\v 6 जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्न खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्न खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.
\s5
\v 7 कारण कोणीही स्वत:साठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो.
\v 8 म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत.
\v 9 ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.
\s5
\v 10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
\v 11 असे लिहिले आहे की, “प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.”
\s5
\v 12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.
\v 13 म्हणून आपण एकमेकांचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की, तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही.
\s5
\v 14 मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे ती माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.
\v 15 जर खाण्यामुळे तुझा भाऊ दु:खी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नाने नाश करु नकोस.
\s5
\v 16 म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये.
\v 17 खाणे पिणे यात देवाचे राज्य नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे.
\s5
\v 18 जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे.
\v 19 तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे.
\s5
\v 20 तुम्ही खाता त्या अन्नामुळे देवाच्या कार्याचा नाश करु नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे मनुष्यासाठी चुकीचे आहे.
\v 21 मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.
\s5
\v 22 तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वत:चा द्वेष करीत नाही तो धन्य.
\v 23 जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवून खातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.
\s5
\c 15
\p
\v 1 आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.
\v 2 आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्नती व्हावी या हेतूने सुखी करावे.
\s5
\v 3 ख्रिस्ताने सुद्धा स्वत:ला सुखी केले नाही. याउलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे. “तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.”
\v 4 आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की, शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो.
\s5
\v 5 आणि देव जो धीराचा आणि उत्तेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे.
\v 6 म्हणजे तुम्ही सर्व जण एक मुखाने देव जो आपला प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे.
\v 7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्या गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा.
\s5
\v 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत.
\v 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.”
\s5
\v 10 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते, “विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.”
\v 11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते. “अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.”
\s5
\v 12 यशयासुद्धा असे म्हणतो, “इशायाचे मूळ प्रगट होईल, ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल. ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.”
\s5
\v 13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
\s5
\v 14 माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात.
\s5
\v 15 परंतु तुम्हांला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले.
\v 16 ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.
\s5
\v 17 तर मग मी जो आता खिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टीत अभिमान बाळगतो.
\v 18 कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्याकडून घडविल्या नाहीत, त्या सांगण्याचे धैर्य मी करणार नाही.
\v 19 अद्भुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे.
\s5
\v 20 जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये.
\v 21 परंतु असे लिहिले आहे, “ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील.”
\s5
\v 22 कारण मी ख्रिस्त विषयी संदेश सांगण्याचा प्रयत्न केला जिथे त्यांनी त्याच्याबद्दल ऐकले नाही; या कारणांमुळे मला तुमच्याकडे येण्यास पुष्कळ वेळा अडथळा झाला.
\v 23 परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहीले नाही, व पुष्कळ वर्षांपासून तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा आहे.
\s5
\v 24 जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
\v 25 पण आता मी तुम्हाला भेट देऊ शकत नाही, कारण मी देवाच्या लोकांसाठी पैसे घेण्याकरिता यरुशलेमेत जात आहे.
\s5
\v 26 कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळ्यांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे.
\v 27 ते त्यांचे ऋणी आहेत. व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे, कारण जर यहूदीतरांना इस्राएलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे, तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी.
\s5
\v 28 मग हे काम संपवून त्याचे फळ सुरक्षितपणे त्याच्या हाती सोपविल्यावर जेव्हा मी स्पेनला जाण्यासाठी निघेन, तेव्हा मी त्या मार्गाने जात असता तुमच्या शहरातून जाईन.
\v 29 आणि मला माहीत आहे की, मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन.
\s5
\v 30 बंधूंनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे आणि आत्म्याकडून जे प्रेम आपणांकडे येते त्यामुळे माझ्या वतीने, माझ्याबरोबर देवाजवळ आग्रहाने प्रार्थना करण्याची विनंति करतो.
\v 31 यासाठी की यहूदीयात जे अविश्वासू आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमेतील मंडळीतील माझी सेवा संताना मान्य व्हावी.
\v 32 यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे.
\s5
\v 33 शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
\s5
\c 16
\s पौलाचा मित्रमंडळीला सलाम
\p
\v 1 1 किंख्रिया येथील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो.
\v 2 की, पवित्र जनास योग्य अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.
\s5
\v 3 ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा.
\v 4 ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळयाही आभार मानतात.
\v 5 त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय मित्र अपैनत जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे यालाही सलाम सांगा.
\s5
\v 6 मरीया जिने तुमच्यासाठी फार काम केले तिला सलाम सांगा.
\v 7 अंद्रोनीक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान जे प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते त्यांना सलाम सांगा.
\v 8 प्रभुमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा.
\s5
\v 9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सलाम सांगा.
\v 10 ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबूल याच्या घरातील मंडळीस सलाम सांगा.
\v 11 माझा नातेवाईक हेरोदियोन आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे. त्यांना सलाम सांगा.
\s5
\v 12 त्रुफैना आणि त्रुफासा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत त्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत तिला सलाम सांगा.
\v 13 प्रभूमध्ये निवडलेला रुफ आणि त्याची आई जी माझीही आई आहे तिला सलाम सांगा.
\v 14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मास, पत्रबास, हर्मेस आणि त्यांच्याबरोबर जे बंधु आहेत त्यांना सलाम सांगा.
\s5
\v 15 फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुंपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा.
\v 16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
\s5
\v 17 बंधूजनहो, मी तुम्हांस विंनती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा.
\v 18 असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करतात.
\s5
\v 19 त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.
\v 20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.
\s5
\v 21 माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
\v 22 पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभुमध्ये सलाम सांगतो.
\s5
\v 23 माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात.
\v 24 (आपला प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.)
\s5
\v 25 आता देव जो तुमच्या विश्वासात, तुम्हांला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभु येशू ख्रिस्तविषयी विदित करण्यास व तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला व देवाच्या रहस्याच्या प्रकटीकरणाला, धरुन जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होते ते प्रकट करणाऱ्या देवाला गौरव असो.
\v 26 परंतु आता आपणांला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की, हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करुन दिले आहे.
\s5
\v 27 एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.