mr_udb/45-ACT.usfm

1831 lines
505 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id ACT - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h प्रेषितांचीं कृत्यें
\toc1 प्रेषितांचीं कृत्यें
\toc2 प्रेषितांचीं कृत्यें
\toc3 act
\mt1 प्रेषितांचीं कृत्यें
\s5
\c 1
\s विषय प्रवेश
\p
\v 1 प्रिय थियफिला, देवाने येशूला स्वर्गात वर उचलून घेईपर्यंत त्याने केलेल्या व शिकवलेल्या अनेक गोष्टींविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात तुमच्यासाठी लिहिले आहे.
\v 2 तो स्वर्गात घेतला जाण्याअगोदर, ज्या गोष्टी त्याला प्रेषितांना माहिती करून द्यावयाच्या होत्या त्या त्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना सांगितल्या.
\v 3 त्याने क्रुसावर दुःख सहन केले व तो मरण पावल्यानंतर, तो पुन्हा जिवंत झाला. त्याने त्यांना तो पुन्हा एकदा जिवंत झाल्याचे प्रमाण वेगवेगळ्या प्रकारे पटवून दिले, प्रेषितांनी त्याला पुढील चाळीस दिवस अनेकदा प्रकट झालेले पाहिले. देवाच्या राज्यात लोकांच्या जीवनात तो कशाप्रकारे राज्य करणार याविषयी तो त्यांच्याशी बोलला.
\s5
\v 4 तो त्यांच्याबरोबर असता, त्यांना म्हणाला, “माझ्या पित्याने वचन दिल्याप्रमाणे तो त्याचा आत्मा तुम्हांकडे पाठवेपर्यंत वाट पाहत राहा. यरुशलेम सोडून जाऊ नका, तुम्ही मला याविषयी बोलतांना ऐकले आहे.
\v 5 योहानाने लोकांना पाण्याने बाप्तिस्मा दिला, परंतु काही दिवसानंतर देव तुम्हास पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.”
\s येशूचे स्वर्गारोहण
\s5
\p
\v 6 एकेदिवशी प्रेषित येशूबरोबर एकत्र जमले असतांना, त्यांनी त्यास विचारले, “प्रभू, आता तू इस्त्राएलाचा राजा होशील का?”
\v 7 त्याने त्यास उत्तर दिले, “माझ्या पित्याने ठरवले आहे ज्या दिवशी हे घडेल त्या विषयी तुम्हांला त्याचा काळ व समय आणि दिवस जाणण्याची गरज नाही.
\v 8 परंतु पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल तेव्हा तो तुम्हास सामर्थ्यशाली बनवेल. मग तुम्ही यरुशलेमेत आणि यहूदा प्रांतात, शमरोनात, आणि सर्व जगाला माझ्याविषयी सांगाल.”
\s5
\v 9 तो हे बोलल्यानंतर, तो स्वर्गामध्ये वर उचलला गेला, आणि ढगांनी त्याला लोकांच्या नजरेआड केले.
\p
\v 10 प्रेषित त्याला आकाशामध्ये वर जातांना पाहत होते, त्यावेळेस दोन पुरुष, पांढरे वस्त्र परिधान केलेले स्वर्गदूत होते, ते येऊन त्यांच्या बाजूस उभे राहिले.
\v 11 त्यातील एक म्हणाला, “गालीलातील लोकहो, तुम्हास येथे थांबून आकाशाकडे पाहण्याची गरज नाही! एके दिवशी, ज्याला परमेश्वराने तुम्हापासून स्वर्गात वर उचलून घेतले तो हाच येशू, ज्याप्रकारे आता तुम्ही त्याला स्वर्गामध्ये घेतलेले पाहिले तो पुन्हा पृथ्वीवर त्याच प्रकारे परत येईल.”
\s बाराव्या प्रेषितांची नेमणूक
\s5
\p
\v 12 ते दोन स्वर्गदूत त्यास सोडून गेल्यानंतर, प्रेषित यरूशलेमेपासून काही अंतरावर असलेल्या जैतूनाच्या डोंगरावरून यरुशलेमेकडे गेले.
\v 13 त्यांनी शहरात प्रवेश केल्यानंतर, ते राहत असलेल्या घरातील वरच्या खोलीमध्ये गेले. त्यांमध्ये पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब जो अल्फीचा पुत्र होता, शिमोन म्हणणारा जिलोत, आणि यहूदा जो याकोबाचा पुत्र होता.
\v 14 हे सर्व प्रेषित एकत्र येऊन निरंतर प्रार्थना करू लागले असता. येशू बरोबर राहत असलेल्या स्त्रिया, मरीया येशूची आई, आणि त्याचे लहान भाऊ हेही प्रार्थनेमध्ये सहभागी झाले.
\s5
\p
\v 15 त्या दिवसांमध्ये येशूचे अनुकरण करणाऱ्या एकशे वीस लोकांचा समुह त्या ठिकाणी जमला असतां, पेत्र आपल्या विश्वासणाऱ्या भावांमध्ये उभा राहिला. तो त्यास म्हणाला,
\v 16 “माझ्या भावांनो, दावीद राजाने यहूदाविषयी जी वचने लिहून ठेवली होती. ती वचने खरी होणे अगत्याचे होते, आणि ती झाली आहेत, कारण ती पवित्र आत्म्याने दावीदाला लिहिण्यास सांगितली होती.
\s5
\v 17 यहूदा जरी आपल्यासारखा प्रेषित होता, तरीही ज्यांनी येशूला धरले व मारून टाकले अशा लोकांना त्याने मदत केली.”
\p
\v 18 त्या व्यक्तीने आता ह्या दुष्ट कार्याद्वारे पैसे मिळवले व त्या पैशाने शेत विकत घेतले. त्यानंतर तो जमिनीवर उपडा पडला, त्याचे शरीर फुटले आणि त्याची आतडी बाहेर पडली आहेत.
\v 19 यरुशलेमेत राहत असलेल्या सर्व लोकांनी याविषयी ऐकले आणि त्यांच्या स्वतःच्या अरामिक भाषेत त्यांनी या शेताला हकलदमा, ज्याचा अर्थ “रक्ताचे शेत” असा होतो, असे म्हटले, कारण त्या ठिकाणी कोणीतरी मरण पावले होते.
\s5
\p
\v 20 आणखी पेत्र त्यास म्हणाला, “यहूदासोबत ज्याप्रकारे घडले त्याच्या विषयी स्तोत्रसहितेमध्ये लिहिले आहे असे मला दिसते: ‘त्याचे घर उजाड पडो; त्याचा वंश नष्ट होवो.” आणि दावीदाने लिहिलेली ही वचने देखील यहूदाविषयी संदर्भ देतात: ‘कोणी दुसरा पुढारी म्हणून त्याचे कार्य हाती घेवो.”
\s5
\p
\v 21 “यहूदाच्या बदल्यात कोणा एका व्यक्तीची निवड करावी हे आम्हां प्रेषितांसाठी आवश्यक आहे. तो व्यक्ती असा असावा जो प्रभू येशू आम्हांबरोबर असतांना आमच्यामध्ये सर्वकाळ होता.
\v 22 ते असे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे येशूचा बाप्तिस्मा झाला त्या दिवसापासून तर ज्या दिवशी येशू आम्हांपासून स्वर्गामध्ये वर उचलला गेला त्या दिवसापर्यंत जो आपल्याबरोबर होता. व ज्याने येशूला मरणानंतर पुन्हा पाहिले तोच एक यहूदाच्या बदल्यात येणारा व्यक्ती असावा.”
\p
\v 23 म्हणून प्रेषितांनी व इतर विश्वासणाऱ्यांनी दोन व्यक्तीची नावे सुचवली. त्यातील एकाचे नाव योसेफ बर्सब्बा, त्याला युस्त म्हणून देखील ओळखले जात होते. दुसऱ्याचे नाव मत्तिथ्या होते.
\s5
\v 24-25 त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली: “हे प्रभू येशू, यहूदाने त्याचे प्रेषितपण संपुष्टात आणले. त्याने पाप केले आणि जेथे जाणे योग्य होते त्या ठिकाणी तो गेला. प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयात काय विचार करतो हे तुला माहित आहे, तर कृपया, या दोन व्यक्तींमधून कोणाची निवड तू यहूदाच्या बदल्यात केली आहे हे आम्हांस दाखव.”
\v 26 नंतर त्यांनी त्या दोघातून एकाची निवड करण्यासाठी चिठ्या टाकल्या, आणि मत्तिथ्याच्या नावाची चिठ्ठी निघाली, आणि तो इतर अकरा प्रेषितांबरोबर एक प्रेषित झाला.
\s5
\c 2
\s पवित्र आत्म्याचे दान
\p
\v 1 त्या दिवशी जेव्हा यहूदी लोक पन्नासावा दिवस साजरा करत होते, सर्व विश्वसाणारे यरुशलेमेत एके ठिकाणी एकत्र जमले.
\v 2 त्यांनी अचानक आकाशातून येणारा एक मोठा आवाज ऐकला जो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा होता. त्या घरात बसलेलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा आवाज ऐकला.
\v 3 मग त्यांनी अग्नीच्या ज्वालेसारखे काहीतरी पाहिले. ह्या ज्वाला एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यावर एक-एक अशा खाली उतरल्या.
\v 4 प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याने भरला आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागला, ज्याप्रमाणे आत्म्याने त्यांना ते बोलण्यास सहाय्य केले.
\s5
\p
\v 5 त्यावेळेस अनेक यहूदी यरुशलेमेत पन्नासावा दिवस साजरा करण्यासाठी राहत होते. हे ते यहूदी लोक होते जे नेहमी देवाची आराधना करत. त्यांना वेगवेगळ्या देशांमधून त्या ठिकाणी यावे लागत होते.
\v 6 ज्या वेळेस त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्यासारखा मोठा आवाज ऐकला, त्यावेळेस ते एकत्र जमले ज्याठिकाणी विश्वासणारे जमले होते. एकत्र जमलेली गर्दी आश्चर्यचकित झाली कारण त्यातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला आपली स्वतःची भाषा बोलतांना ऐकले.
\v 7 ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस म्हणाले, “हे सर्व बोलणारे लोक गालीलाहून आले आहेत, मग ते आपली भाषा कशी जाणतात?
\s5
\v 8 परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांना आपल्या स्वतःची भाषा बोलतांना ऐकले आहे जी आपण आपल्या जन्मापासून शिकलो आहोत!
\v 9 आपल्यापैकी काही पार्थी आणि मेदी, एलामी, आणि मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पुदुकिया, पंत, आसिया प्रांतातील आहेत.
\v 10 काही लोक फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा प्रांतातील आहेत. आमच्यातील काही रोम देशातून यरुशलेमेत भेट देण्यासाठी आले आहेत.
\v 11 त्यामध्ये मूळ यहूदी त्याचबरोबर यहूदी नसलेले परंतु यहूद्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवणारे आहेत. आपल्यापैकी इतर जे क्रेत या बेटावरील आहेत आणि काही अरब प्रातांतील आहे. तर हे कसे शक्य आहे की ते आपल्या भाषेत देवाने केलेल्या महान कार्याबद्दल बोलतात?”
\s5
\v 12 लोक आश्चर्यचकित झाले होते कारण जे घडत आहे हे पाहून त्यांस काय विचार करावा हे कळत नव्हते. तर त्यांनी एकमेकांस विचारले,“ह्याचा अर्थ काय?”
\v 13 पण त्यातील काहींनी जे पाहिले होते त्याविषयी त्यांची थठ्ठा उडवली. ते म्हणाले, “हे लोक अशाप्रकारे बोलतात कारण त्यांनी खुप नवीन द्राक्षरस घेतला आहे!”
\s पेन्टेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचे भाषण
\s5
\p
\v 14 तेव्हा पेत्र इतर अकरा प्रेषितांबरोबर उठून मोठ्याने लोकांच्या गर्दीला बोलू लागला; तो म्हणाला, “यहूदातील लोकांनो आणि यरुशलेमेत राहणाऱ्यांनो, तुम्ही प्रत्येकजण, माझे ऐका, मी तुम्हास स्पष्ट करतो हे काय घडत आहे!
\v 15 तुमच्यापैकी काही असा विचार करतात आम्ही द्राक्षरस घेतला आहे, परंतु तसे आम्ही काहीही केले नाही. आता फक्त सकाळचे नऊ वाजले आहेत, आणि येथील लोक दिवसाच्या यावेळी कधीही द्राक्षरस घेत नाहीत!
\s5
\v 16 त्याऐवजी, आमच्याबरोबर ज्या अद्भुत गोष्टी घडल्या आहेत त्या भविष्यवक्ता योएल ह्याने काही काळापूर्वी लिहून ठेवल्या आहेत ते असे.
\p परमेश्वर म्हणतो,
\v 17 “शेवटच्याकाळात माझा आत्मा प्रत्येकाला देईन परिणामी तुमचे पुत्र व कन्या लोकांना माझा संदेश देतील, तुमच्यातील तरुण माझ्याकडून दृष्टान्त पाहतील, आणि तुमच्यातील वृद्ध स्वप्ने पाहतील जे मी तुम्हास देईन.
\s5
\v 18 त्या दिवसात मी माझा पवित्र आत्मा माझ्या सेवकास देईन तेव्हा ते माझा संदेश लोकांना सांगतील.
\v 19 मी आकाशात अद्भुत गोष्टी घडवून आणेन, आणि मी पृथ्वीवर चमत्कार करून दाखवून देईन ज्या महत्वाच्या गोष्टी घडणार आहे. ह्या पृथ्वीवर रक्त, अग्नी आणि धूर दाखवीन.
\s5
\v 20 मी प्रभू परमेश्वर प्रत्येकाचा न्यायकरण्यापूर्वी ह्या गोष्टी घडून येतील. आकाशामध्ये सूर्य लोकांना अंधकारमय दिसेल आणि चद्र रक्तमय दिसेल.
\v 21 जे मला मदतीसाठी बोलवतील त्या सर्वांचा मी बचाव करेन.””
\s5
\p
\v 22 पेत्र निरंतर बोलत होता, “माझ्या इस्राएली मित्रांनो, माझे ऐका! ज्या वेळेस नासरेथकर येशू तुम्हामध्ये होता, देवाने त्याला पाठवले आणि त्याकडून अद्भुत असे चमत्कार घडवून त्याचे प्रमाण पटवून दिले, हे परमेश्वरापासून आहे. तुम्हाला स्वतःच ठाऊक आहे की हे सत्य आहे.
\v 23 तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही या माणसाला म्हणजे येशूला त्याच्या शत्रूच्या हातामध्ये सोपवीले. तथापि, देवाने त्यासाठी पूर्व योजना केली, आणि त्याला त्याविषयी सर्व माहित होते. मग तुम्ही जे लोक देवाचे नियम पाळत नाहीत त्या लोकांना विनंती केली की त्यांनी येशूला मारावे.
\v 24 तो मरण पावला, परंतु परमेश्वराने त्याला पुन्हा उठवले, कारण त्यासाठी त्याने मृत असावे हे शक्य नव्हते. परमेश्वराने येशूला पुन्हा जिवंत केले.”
\s5
\p
\v 25 काही काळापूर्वी राजा दावीदाने ख्रिस्त काय म्हणाला ते लिहिले, प्रभू परमेश्वरा, मला माहित आहे तू नेहमी माझे ऐकतोस. तू माझ्या उजविकडे बसला आहे, म्हणून जे मला हानी पोहंचू इच्छितात त्यांना मी भिणार नाही.
\v 26 ह्यामुळे माझे हृदय आनंदी आहे आणि मला माहित आहे तू मला मदत करशील.
\s5
\p
\v 27 तू मला मेलेल्या लोकांच्या ठिकाणी राहू देणार नाहीस. तू माझे शरीर देखील व्यर्थ जाऊ देणार नाहीस, कारण मी तुझ्याबरोबर एकनिष्ट आहे आणि नेहमीच आज्ञाधारक आहे.
\v 28 पुन्हा कसे जिवंत व्हायचे हे तू मला दाखवलेस. तू मला आनंदित करशील कारण तू सदासर्वदा मजबरोबर असशील.”
\s5
\p
\v 29 पेत्र पुढे म्हणाला, “माझ्या यहूदी भावांनो मला याविषयी खात्री आहे आमचा पूर्वज राजा दावीद, मरणपावला, आणि लोकांनी त्याला दफन केले. आणि ज्याठिकाणी त्याला दफन केले ते ठिकाण आजही आहे.
\v 30 राजा दावीद एक भविष्यवक्ता होता आणि त्याला माहित होते देवाने त्याला वचन दिल्याप्रमाणे त्याच्या वंशजांपैकी एक राजा होईल.
\v 31 काही काळापूर्वी, दावीदाला माहित होते तो काय करणार आहे, म्हणून परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केले. तो म्हणाला परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मृतांच्या ठिकाणी पडून राहू दिले नाही, त्याचे शरीर व्यर्थ जाऊ दिले नाही.”
\s5
\p
\v 32 “येशू हा मनुष्य मरणपावल्या नंतर, परमेश्वराने त्याला पुन्हा जिवंत केले. आपल्यापैकी प्रत्येकाला, त्याच्या शिष्यांना हे ठाऊक आहे कारण आम्ही त्याला पाहिले आहे.
\v 33 परमेश्वराने येशूला त्याच्या पित्याबरोबर राज्य करण्यासाठी त्याच्या उजविकडे बसवून सन्मानित केले आहे. त्याने आम्हांला दिलेल्या पवित्र आत्म्याने आज आम्ही पाहू व ऐकू शकतो.
\s5
\v 34 आम्हास हे ठाऊक आहे की दावीद आपल्या स्वताःबद्दल बोलत नाही कारण दावीद येशू प्रमाणे स्वर्गात वर उचलला घेतला गेला नाही. परंतु दावीद स्वताः येशू
\q ख्रिस्ताबद्दल असे म्हणतो, परमेश्वर माझ्या प्रभू ख्रिस्तास असे म्हणाला, ‘माझ्या उजविकडे बसून राज्य कर,
\v 35 जोपर्यंत मी माझ्या शत्रूंचा पूर्णपणे नायनाट करीत नाही.””
\p
\v 36 पेत्र असे म्हणून थांबतो, “माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आणि इतर इस्त्राएली लोकांनी हे माहित करून घ्यावे परमेश्वराने येशूला प्रभू आणि ख्रिस्त केले आहे, हा तोच ख्रिस्त आहे ज्यास तुम्ही वधस्तंभावर खिळले आणि मारून टाकले.”
\s5
\p
\v 37 लोकांनी पेत्र व इतर प्रेषितांचे हे बोलणे ऐकले, तेव्हा आपण चूक केली आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून लोक त्यास म्हणाले, “आम्ही काय केले पाहिजे?”
\p
\v 38 पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हापैकी प्रत्येकाने आपल्या पापी वर्तनातून मागे आले पाहिजे. आता जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवतात तर आम्ही तुम्हास बाप्तिस्मा देऊ. परमेश्वर तुमच्या पापाची क्षमा करेल, आणि तो तुम्हास त्याचा पवित्र आत्मा देईल.
\v 39 परमेश्वराने असे करण्याचे वचन तुम्हास आणि तुमच्या मुलाबाळांस आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यास, आणि जे आम्हांपासून दूरवर राहतात. आमचा प्रभू परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा त्या प्रत्येकास देईल ज्यास तो आपले लोक होण्यास बोलवीतो!”
\s5
\p
\v 40 पेत्र त्यास खुप अशा गोष्टींविषयी ताकीद देऊन बोलला. तो त्यास म्हणाला, “परमेश्वराला तुमच्या तारणासाठी विचारा म्हणजे तो तुम्हास शिक्षा करणार नाही त्या लोकांप्रमाणे जे दुष्ट लोक येशूचा नाकार करतात!”
\p
\v 41 म्हणून ज्या लोकांनी पेत्राच्या संदेशावर विश्वास ठेवला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्याठिकाणी जवळ जवळ तीन हजार लोक त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या मंडळीत सामिल झाले.
\s ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन
\p
\v 42 प्रेषितांच्या शिकवणीमध्ये ते लोक निरंतर आज्ञाधारक राहिले. ते लोक इतर विश्वासणाऱ्यांबरोबर अनेक वेळेस एकत्र येऊन भोजन करीत व दररोज प्रार्थना करीत असे.
\s5
\p
\v 43 यरुशलेमेमध्ये राहत असलेले लोक परमेश्वराला आदर व सन्मान देत असे कारण प्रेषित त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अद्भुत गोष्टी करत असे.
\v 44 जे लोक येशूवर विश्वास ठेवत होते ते सर्व निरंतर एकत्र येत होते. त्याजवळ असलेल्या गोष्टी ते एकमेकांबरोबर सामाईकरित्या वाटून घेत असे.
\v 45 त्यातील काही वेळोवेळी त्यांच्या जमिनी आणि इतर वस्तू विकून काही पैसे इतरांना त्याच्या गरजेप्रमाणे देत असत.
\s5
\v 46 प्रत्येक दिवशी ते मंदिराच्या जवळ एकत्र येत आणि आनंदाने त्यांचे भोजन इतरांबरोबर वाटत असे त्यांच्या एकत्र भोजन करण्याने ते प्रभूभोजन साजरा करत असे.
\v 47 असे करीत असतांना ते निरंतर परमेश्वराची स्तुती करीत आणि यरुशलेमेतील इतर लोक त्यांचा सन्मान करीत असे. या गोष्टी घडत असतांना प्रभू येशू त्यांच्यामध्ये अधिक लोकांची भर घालत असे जे लोक त्यांच्या पापांच्या शिक्षेपासून मुक्त होत असे.
\s5
\c 3
\s लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे
\p
\v 1 पेत्र व योहान दुपारच्या तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जात असतांना.
\v 2 जन्मापासून पांगळा असलेल्या कोणी एका व्यक्तीला भिक मागण्यासाठी लोक त्याला दररोज मंदिराच्या सुंदर नावाच्या द्वाराजवळ घेऊन येत होते.
\p
\v 3 पेत्र व योहानाला मंदिरात जातांना पाहून तो त्यांना भीक मागु लागला.
\s5
\v 4 पेत्र आणि योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले, पेत्र त्यास म्हणाला, “आमच्याकडे पाहा!”
\v 5 मग त्याने त्याजकडून काही मिळेल या अपेक्षेने त्यास निरखून पाहिले.
\v 6 पेत्र त्यास म्हणाला, “माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही नाही, माझ्याकडून तुझ्यासाठी जे होईल ते मी करेन. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावात बरा हो. ऊठ आणि चालू लाग!”
\s5
\v 7 मग पेत्राने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तत्क्षणी त्या मनुष्याच्या पायात व टाचेत बळ आले.
\v 8 तो उड्या मारू आणि चालू लागला! मग तो चालत आणि उड्या मारत व देवाची स्तुती करत पेत्र व योहान ह्यांच्याबरोबर मंदिरात गेला!
\s5
\p
\v 9 ज्या लोकांनी त्याला मंदिरात चालतांना आणि देवाची स्तुती करतांना पाहिले.
\v 10 त्यांनी त्याला ओळखले की हाच मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाज्यापाशी बसून भीक मागत असे! त्याच्याबरोबर असे काय घडले यावरून ते आश्चर्यचकित झाले.
\s पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषण
\s5
\p
\v 11 पेत्र आणि योहान ह्यांना हा मनुष्य बिलगून राहिलेला आहे असे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित व स्तब्ध झाले! आणि त्याच्याकडे मंदिरामध्ये शलमोनाच्या देवडीकडे धावत गेले.
\v 12 पेत्राने लोकास पाहून तो त्यास म्हणाला, “इस्त्राएली भावांनो या मनुष्यांबरोबर जे घडले ते पाहून आश्चर्य मानू नका! तुम्ही आमच्याकडे अशाप्रकारे पाहता जणू काय आम्ही आमच्या सामर्थ्याने या मनुष्यास चालायला लावले आहे?
\s5
\v 13 मग मी तुम्हास सांगतो खरे काय घडत आहे. आमचे पूर्वज अब्राहाम, इसाहाक, आणि याकोब, यांनी परमेश्वराची आराधना केली. आणि त्याच परमेश्वराने येशूला महान रितीने सन्मानित केले. तुमच्या पुढाऱ्यांनी येशूला पिलाताकडे धरून आणले, जेणे करून त्यांच्या सैनिकांनी त्याला ठार मारावे. पिलाताने येशूला सोडण्याचा निर्णय घेतला असता तुम्ही त्याला नाकारले.
\v 14 परमेश्वराकडून आलेला नीतिमान येशू, इस्त्राएलाचा ख्रिस्त असतांना त्याच्या बदल्यात तुम्ही एका खुन्यास सोडावयास लावले!
\s5
\v 15 जो लोकांस अनंतकाळचे जीवन प्राप्त करून देतो त्याच येशूस तुम्ही ठार मारले, हे परमेश्वराच्या लक्षात आले, आणि त्याने त्याला पुन्हा जिवंत केले त्यानंतर आम्ही त्याला कित्येक वेळेस पाहिले.
\v 16 म्हणून आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि ह्या मनुष्याला देखील ज्या येशूने ताकद दिली आणि तुम्हासमोर चालण्यास सक्षम केले, तो ही त्यावर विश्वास ठेवतो.”
\s5
\p
\v 17 “माझ्या देश मित्रांनो, आता मला हे समजले आहे की तुम्ही आणि तुमच्या पुढाऱ्यांनी येशूला ठार मारले कारण तुम्हाला ठाऊक नव्हते की तोच ख्रिस्त होता.
\v 18 तथापि, परमेश्वराने लोकांद्वारे येशूच्या मरणाविषयी काही काळा अगोदरच भाकित केले होते. परमेश्वराने त्याच्या भविष्य वक्त्याद्वारे ख्रिस्ताचे काय होणार याविषयी सांगितले आणि त्यांनी ख्रिस्ताच्या येण्याविषयी, दुःखसहन करण्याबद्दल आणि मरण्याबद्दल लिहून ठेवले होते.
\s5
\v 19 म्हणून तुम्ही आपल्या पापमय जीवनापासून मागे फिरा आणि परमेश्वराला आवडणारे जीवन जगण्यासाठी मदत मागा, जेणे करून तो तुम्हाला तुमच्या पापाची पूर्णपणे क्षमा करेल, आणि तुम्हास सामर्थ प्राप्त करून देईल.
\v 20 जर तुम्ही हे कराल, तर तुम्हास हे कळेल की तो तुम्हास मदत करीत आहेत. आणि एकेदिवशी तो पुन्हा ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवेल, ज्याने तुम्हास त्यास दिले आहे. आणि तो व्यक्ती येशू आहे.
\s5
\v 21 काही काळापूर्वी, परमेश्वराने दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने निवडलेल्या पवित्र संदेष्ट्याच्याद्वारे लोकांना सांगायला लावले. परमेश्वराने केलेल्या निर्मितीची पुन्हा निर्मिती करेपर्यंत येशू स्वर्गामध्ये राहिला.
\v 22 उदाहरणा दाखल, मोशे संदेष्टा ख्रिस्ताबद्दल असे म्हणाला, ‘तुमचा परमेश्वर तुमच्यातून माझ्यासारखा संदेष्टा पाठवेल. तो जे काही म्हणेल ते तुम्ही ऐकणे गरजेचे आहे.
\v 23 जो त्या संदेष्टाचे ऐकणार नाही आणि त्याची आज्ञा पाळणार नाही ते देवाचे लोक नाही, देव त्यांना नष्ट करेल.””
\s5
\v 24 पुढे पेत्र त्यास म्हणाला, “संदेष्टाद्वारे सांगण्यात आले होते की या दिवसांमध्ये काय घडेल त्यामध्ये शमुवेल आणि इतर संदेष्टे हेही या घटनेविषयी बोलले होते.
\v 25 जेव्हा देवाने आमच्या पूर्वजांना आशीर्वादित करण्याचे वचन दिले त्याने आम्हास ही निश्चित आशीर्वादित करण्याचे वचन दिले. तो अब्राहामास ख्रिस्ताविषयी असे म्हणाला, ‘तुझ्या वंशजांनी केलेल्या कार्यानुसार मी पृथ्वीवरील सर्व जातींना आशीर्वादित करेन.””
\v 26 पेत्राने असे बोलून त्याचे भाषण संपवले, “म्हणून जेव्हा परमेश्वर येशूला ह्या पृथ्वीवर ख्रिस्त म्हणून त्याची सेवा करण्यासाठी पाठविले, प्रथम तो इस्त्राएली लोकांकडे त्यांना आशीर्वादित करण्यासाठी, जेणे करून तुम्ही जे वाईट करत आहात ते करण्याचे थांबवावे.”
\s5
\c 4
\s न्यायसभेपुढे पेत्र व योहान
\p
\v 1 दरम्यान, काही याजक मंदिराच्या अंगणामध्ये होते. मंदिराच्या पहारेकऱ्यांचा अधिकारी आणि सदूकी गटांचे काही सदस्यही तेथे होते. पेत्र आणि योहान हे दोघे लोकांशी बोलत असतांना ते सर्व पुरुष त्यांच्याकडे आले.
\v 2 ते पुरूष फार क्रोधित झाले कारण ते दोघे प्रेषित येशूविषयी लोकांना शिक्षण देतांना त्यांना आढळले. देवाने येशूला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले आहे असे ते लोकांना सांगत होते.
\v 3 पेत्र आणि योहानाला प्रश्न विचारण्यासाठी यहूदी धर्मसभेला दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल, कारण संध्याकाळ झाली होती.
\v 4 परंतु, पेत्राचे भाषण ऐकून पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या पुरूषांची संख्या पाच हजारांच्यावरती गेली.
\s5
\p
\v 5 नंतर दुसऱ्या दिवशी मुख्ययाजकांनी इतर याजकांना बोलावले, यहूदी नियमशास्त्राचे शिक्षक आणि यहूदी धर्मसभेचे इतर सदस्य, ह्यांना त्याने बोलाविले, आणि ते एका ठिकाणी यरुशलेममध्ये एकत्र आले.
\v 6 हन्ना मुख्य याजक तेथे होता, तसेच त्याच्यासोबत नवा मुख्य याजक कयफा, योहान आणि आलेक्सांद्र, तसेच मुख्य याजकाचे इतर नातेवाईक पुरुषही तेथे हजर होते.
\v 7 सैनिकांनी पेत्र व योहान ह्यांना खोलीत आणण्याची आज्ञा केली, मग त्यांनी पेत्र आणि योहानाला विचारले, “ज्या व्यक्तीला चालता येत नव्हते त्याला बरे करण्याचे सामर्थ्य तुम्हाला कोणी दिले?”
\s5
\p
\v 8 पवित्र आत्म्याने पेत्राला सामर्थ्य दिल्याप्रमाणे, पेत्र त्यांना म्हणाला, “आम्हावर राज्य करणाऱ्या सोबतीच्या इस्त्राएली लोकांनो आणि इतर सर्व वडिलांनो माझे लक्षपूर्वक ऐका!”
\v 9 आज या चांगल्या कृत्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न करता हा लंगडा मनुष्य कसा चालू लागला, तर मला तुम्हाला व सर्व इस्त्राएलच्या लोकांना सांगू द्या.
\v 10 तो फक्त येशू नासोरीच्या नावाने बरा झाला आहे आणि आता हा मनुष्य तुम्हा समोर उभा आहे ते तुम्ही पाहतच आहात. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर जीवे मारिले त्याला देवाने मेलेल्यातून उठविले आहे.
\s5
\p
\v 11 नासोरी येशू ख्रिस्ता विषयी शास्त्रालेखात सांगितल्या प्रमाणे;
\q “जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंद केला तोच कोनशिला झाला.”
\v 12 फक्त येशूच आपल्याला वाचवू शकतो कारण दुसरा कोणीही मनुष्य नाही जो आम्हांला आमच्या पापापासून वाचवू शकतो, केवळ येशू आम्हांला तारण देवू शकतो कारण देवाने जगात इतर कोणताही मनुष्य दिला नाही ज्याच्या नावाने आमचे तारण होईल व आमच्या पापाचे दोष दूर होतील.
\s5
\p
\v 13 यहूदी पुढाऱ्यांच्या हे लक्षात आले की, पेत्र आणि योहान ह्यांना त्यांची भीती वाटत नाही तसेच ते अज्ञानी व साधारण लोक आहेत आणि ते कधीही शाळेत शिकले नाही हे त्यांना समजले. म्हणून पुढाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांना हे ठाऊक होते त्यांनी येशू ख्रिस्तासोबत वेळ घालवला आहे.
\v 14 बरा झालेला मनुष्य तरी पेत्र आणि योहान यांच्या जवळ उभा असल्याने यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध काही बोलू शकले नाही.
\s5
\p
\v 15 तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी रक्षकाला सांगून पेत्र, योहान व बरा झालेला माणूस ह्यांना त्या खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यावर पुढारी पेत्र व योहान त्यांचे काय करावे ते आपसात मसलत करीत बसले.
\v 16 ते म्हणाले, “ह्या लोकांना शिक्षा होईल असे काहीही करू शकत नाही. यरुशलेमेतील प्रत्येकाला हे ठाऊक आहे की त्यांनी अद्भुत चमत्कार केला आहे, तो घडला नाही असेही आपण लोकांना सांगू शकत नाही.”
\v 17 तरी दुसऱ्या लोकांमध्ये ह्यांनी येशूच्या नावाने शिक्षण द्यावे ह्याची आम्ही त्यांना परवानगी देऊ शकत नाही तर ज्याने ह्या माणसाला आरोग्य देण्याचा अधिकार दिला त्याच्याविषयी त्यांनी इतरांना सांगने थांबवले नाही तर आम्ही तुम्हाला शिक्षा करू असे त्यानां आता सांगू.
\v 18 तर यहूदी पुढाऱ्यांनी रक्षकांना त्या दोघा प्रेषितांना पुन्हा खोलीत आण्यास सांगितले. रक्षकांनी त्यांना आत आणल्यानतंर त्या दोघांना ते म्हणाले की त्यांनी ह्या पुढे येशूच्या नावाविषयी बोलू नका किंवा शिकवू नका.
\s5
\p
\v 19 परंतु पेत्र आणि योहान त्यानां म्हणाले, “देवाची आज्ञा न पाळता तुम्ही स्वतःची आज्ञा पाळावी हे देवाच्या दृष्टिने योग्य आहे काय? योग्य काय आहे हे तुम्ही ठरवावे असे मला वाटते.”
\v 20 ‘परंतु आमच्या दृष्टिने पाहिल्यास आम्ही तुमच्या आज्ञाचे पालन करू शकत नाही, येशूला लोकांसाठी जे चमत्कार करतांना आम्ही पाहिले व त्याने इतरांना शिकवीतांना आम्ही ऐकले हे आम्ही लोकांना सांगण्यापासून थांबणार नाही.”
\s5
\p
\v 21 मग यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा पेत्र आणि योहान यांनी त्याची अवज्ञा करू नये असे सांगितले, परंतु त्यांना शिक्षा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारण यरुशलेमेतील सर्व लोक तो मनुष्य चालू लागला आहे ही घटना घडल्यामुळे देवाची स्तुती करीत होते.
\v 22 तो मनुष्य चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता आणि जन्मापासूनच तो कधी चालला नव्हता.
\s पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात
\s5
\p
\v 23 पेत्र आणि योहान यहूदी धर्मसभेतून बाहेर आल्यानंतर, ते इतर विश्वासणाऱ्याकडे गेले आणि मुख्य याजक व यहूदीवडिलांनी त्यांना जे काही सांगितले ते त्यांनी सर्व काही त्यानां कळवले.
\v 24 विश्वासणाऱ्यांनी हे ऐकल्या नंतर त्या सर्वांनी एक मनाने देवाला ही प्रार्थना केली हे प्रभू तू आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आहेस.
\v 25 आमचा पूर्वज राजा दावीद ह्याने जो तुझी सेवा करत होता त्याने
\q पवित्र आत्म्याच्या द्वारे हे शब्द लिहले, “जगातील लोक का रागावले आहेत?
\q इस्त्राएल लोक देवाविरुद्ध व्यर्थ योजना का आखत आहेत?
\s5
\p
\v 26 जगातील राजांनी देवाच्या राज्याविरुद्ध लढण्यास तयारी केली आहे
\q आणि इतर अधिकारी त्यांना त्यात सामिल झाले आहेत
\q प्रभू देवाचा विरोध करण्यास व त्याला त्याने मसीहा म्हणून निवडले आहे त्याच्याविरुद्ध ते उभे राहिले आहेत.
\s5
\p
\v 27 हो हे सत्य आहे! येशू ज्याला तू मसीहा म्हणून सेवा करण्यासाठी निवडले त्याच्याविरुद्ध ह्या शहरातील इस्राएली लोक व परराष्ट्रीय एकत्र आले आहेत. हेरोद आणि पंत पिलात या दोघांनी या शहरात त्याच्या विरुद्ध योजना आखली आहे.
\v 28 त्यांनी हे करावे असे तू घडू दिले कारण तू फार अगोदर असे घडेल हे ठरवले होते.
\s5
\p
\v 29 म्हणून ते आम्हांला कशी शिक्षा करतील त्याविषयी ते काय म्हणत आहेत ते तू ऐक! येशूविषयी प्रत्येकाला सांगण्यासाठी व तुझी सेवा करण्यासाठी आम्हांला साहाय्य कर.
\v 30 तुझा पवित्र सेवक येशू ह्या नावाने तुझे सामर्थ्य उपयोगात आणून आरोग्याची चिन्हे व चमत्कार यांची मोठी कामे घडू दे!”
\p
\v 31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना पूर्ण केली, तेव्हा ज्या जागेवर ते उभे होते ती जागा हालू लागली. पवित्र आत्म्याने जे शब्द बोलण्यासाठी सांगितले होते ते शब्द धैर्यपूर्व बोलावे असे सामर्थ्य दिले, आणि त्यांनी ही तसेच केले.
\s सामाईक निधी
\s5
\p
\v 32 येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा समुह त्यांच्या विचारात व त्यानां काय करायचे आहे ह्या बाबतीत पूर्णपणे एक मनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही असे कधी म्हणाला नाही की माझ्या मालकीची आहे. त्याच्याकडे जे काही होते ते सर्व एकमेकांना वाटत होते.
\v 33 प्रेषितांनी इतरांना धैर्याने देवाने येशू प्रभूला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले हे सांगने सुरू ठेवले आणि देव सर्व विश्वासणाऱ्यांना खुप मदत करत होता.
\s5
\v 34 विश्वासणाऱ्यांपैकी काही जणाची स्वतःची घरे जमीनी होत्या त्यांनी आपली मालमत्ता विकली. त्यांनी ते विकल्या नंतर तो पैसा ते आणत असत.
\v 35 आणि प्रेषितांना ते देत असत आणि प्रेषितही ज्या विश्वासणाऱ्यांना पैशांची गरज असे त्यानां तो वाटून देत असत अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांना जगण्यासाठी आवश्यक त्याची पुर्तता होत होती.
\s5
\p
\v 36 त्या ठिकाणी योसेफ नावाचा एक मनुष्य होता तो लेवी वंशाचा असून कुप्र बेटातून आलेला होता. त्याला प्रेषित ‘बर्णबा’असे म्हणत असत. यहूदी भाषेत त्या नावाचा अर्थ, इतरांना उत्तेजन देणारा असा होतो.
\v 37 त्याने आपली शेत जमीन विकली आणि तिचा पैसा इतर विश्वासणाऱ्यामध्ये वाटून देण्यासाठी प्रेषितांकडे आणून दिला.
\s5
\c 5
\s हनन्या व सप्पीरा
\p
\v 1 तेव्हा, विश्वासणाऱ्यापैकी कोणी एक हनन्या नावाचा पुरूष होता आणि त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा असे होते. त्याने आपली काही जमीन विकली.
\v 2 ती जमीन विकून जे पैसे आले त्यातील त्याने काही ठेवून घेतले हे त्याच्या पत्नीला देखील माहित होते की त्याने काय केले आहे. मग उरलेले पैसे त्याने आणले व प्रेषितांच्यासमोर ते सादर केले.
\s5
\p
\v 3 तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू सैतानाला आपले पूर्ण नियंत्रण घेऊ दिले आणि अशाने तू पवित्र आत्म्याला फसवण्याचा प्रयत्न केला. तू ही अशी भयंकर गोष्ट का केलीस? जमीन विकून आलेल्या पैशातून तू स्वतःसाठी काही राखूण ठेवले आहे. आलेला पूर्ण पैसा तू दिला नाही.
\v 4 ती जागा विकण्याआधी पुर्णपणे तुझाच मालकीची होती. ती विकल्यानंतर ही पूर्ण पैसा तुझाच होता. तर मग तू असली दुष्ट गोष्ट करण्याचा विचार का केला? तू आम्हांला फसवण्याचा प्रयत्न करत नव्हतास! तू तर स्वताः देवाला फसवण्याचा प्रयत्न केला!”
\v 5 हनन्या ने हे शब्द ऐकताच लगेच तो खाली पडला व आपला प्राण सोडला. व हनन्याच्या मृत्यूविषयी ज्यांनी ऐकले ते सगळे घाबरले.
\v 6 तेव्हा काही तरुण पुढे आले, त्यांनी त्याचे शरीर एका चादरीत गुंडाळले, आणि त्यांनी त्याला बाहेर नेऊन पुरले.
\s5
\p
\v 7 जवळपास तीन तास लोटल्यावर त्याची पत्नीही आत आली परंतु जे घडले आहे ते तिला ठाऊक नव्हते.
\v 8 मग हनन्याने आणलेला पैसा पेत्राने तिला दाखवला आणि विचारले, “तुम्ही जी जमीन विकली तिच्या मोबदल्यात तुम्हा दोघांना मिळालेली रकम्म ती एवढीच आहे का?” ती म्हणाली, “होय आम्हांला एवढेच मिळाले आहे”.
\s5
\p
\v 9 पेत्र तिला म्हणाला, “तुम्ही दोघांनी ही भयंकर कृत्य केली आहेत! तुम्ही दोघांनी देवाच्या आत्म्याला फसवण्यात एकजूटता दाखवली आहे! तर ऐक! तुझ्या नवऱ्याला ज्यांनी पुरले त्यांच्या पावलांचा आवाज तुला ऐकू येतोय का? पाहा ते दाराशीच उभे आहेत आणि आता तेही तुला नेतील!”
\v 10 सप्पिरा पेत्राच्या पायांशी मरून पडली. मग ते तरुण पुरुष आत आले. जेव्हा त्यांनी पाहीले ती मेली आहे त्यांनी तिचेही शरीर उचलून नेले आणि तिच्या पतीच्या शरीराच्या बाजूला तिला पुरले.
\p
\v 11 हनन्या आणि सप्पीरा यांचे देवाने काय केले हे पाहून यरुशलेमातील सर्व विश्वासणाऱ्यांवर खूप भय पडले आणि इतर प्रत्येकाने ज्याने हे ऐकले ते ही हे ऐकून खूप घाबरले.
\s प्रेषितांनी केलेली अद्भुते
\s5
\p
\v 12 लोकांमध्ये ते जे उपदेश करीत होते त्याची सत्यता समजण्यासाठी देव प्रेषितांच्याद्वारे अनेक अद्भुत चमत्कार घडू देत होता. शलमोनाची देवडी म्हटलेल्या मंदिरातील अंगणात विश्वासणारे नियमीतपणे एकत्र भेटत असत.
\v 13 येशूवर ज्यांनी विश्वास ठेवला नाही असे इतर सर्व लोक विश्वासणाऱ्यांमध्ये सामिल होण्यास घाबरत असत. परंतु ते लोक विश्वासणाऱ्यांचा अतिशय सन्मान करत राहिले.
\s5
\v 14 अनेक स्त्रिया व पुरुष यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यास सुरूवात केली, आणि ते विश्वासणाऱ्या लोकांशी येऊन मिळाले.
\v 15 त्याचा परिणाम म्हणजे लोक आजाऱ्यांना आणून रस्त्यावर ठेवत आणि त्यानां खाटावर व बिछाण्यावर टाकत जेणे करुन पेत्र त्यांच्या बाजूने जात असता पेत्राची सावली त्यांच्यापैकी काहीवर पडावी आणि त्यांनी बरे व्हावे.
\v 16 यरुशलेम जवळील नगरातून लोकांचा मोठा समुदाय प्रेषितांकडे येऊ लागला. ते सोबत आजारी व ज्यांना अशुद्ध आत्मे लागले आहेत अशांना घेऊन येत असत आणि देव त्या सर्वांना बरे करत असत.
\s न्यायसभेपुढे पुन्हा प्रेषित
\s5
\p
\v 17 मग मुख्य याजक आणि जे त्याच्यासोबत होते ते सर्व म्हणजे सदुक्याच्या गटातील सदस्य, प्रेषितांप्रती फार ईर्षेने पेटले.
\v 18 म्हणून त्यांनी मंदिराच्या रक्षकांना आज्ञा दिली की प्रेषितांना अटक करुन सार्वजनिक तुरूंगात त्यानां ठेवावे.
\s5
\v 19 परंतु रात्री देवाच्या दूताने तुरुंगाची दारे उघडले आणि प्रेषितांना बाहेर आणून सोडले.
\v 20 मग देवदूत प्रेषितांना म्हणाला,“मंदिराच्या अंगणात जा, तेथे उभे राहा आणि अनंतकाळाच्या जीवनाचा संदेश लोकांना द्या.”
\v 21 हे ऐकल्यानंतर प्रेषित मोठ्या पहाटेस मंदिराच्या अंगणात गेले आणि लोकांना येशूविषयी उपदेश देवू लागले. दरम्यान मुख्य याजक व त्याच्या बरोबर यहूदी धर्मसभेच्या सदस्यांना त्यांनी बोलवले. त्यांच्या सोबत इस्राएलाचे पुढारीही होते. ते सगळे एकत्र आले असता त्यांनी रक्षकाला तुरूंगातून प्रेषितांना आणण्यासाठी पाठवले.
\s5
\v 22 परंतु जेव्हा रक्षक तुरूंगात त्यानां आणण्यासाठी गेले त्यांना प्रेषित तेथे आढळले नाहीत. म्हणून ते धर्मसभेकडे परत आले आणि त्यांनी त्यानां सांगितले,
\v 23 ‘आम्ही पाहिले तुरूंगाची दारे सुरक्षितरीत्या लावलेली होते आणि शिपाईही पहारा देत दाराजवळ उभे होते. परंतु जेव्हा आम्ही दारे उघडली आणि आम्ही त्या माणसांना आणायला आत गेलो त्यापैकी कोणीही तुरूंगात नव्हती!
\s5
\v 24 मंदिराच्या रक्षकांच्या सरदार आणि मुख्य याजकांनी हे ऐकले तेव्हा ते फार गोंधळून गेले आणि या घटनांचा पुढे काय परिणाम होतो याचे ते आश्चर्य करू लागले.
\p
\v 25 तेवढ्यात कोणीतरी येऊन त्यांना सांगितले, “हे पाहा तुम्ही ज्या मनुष्यांना तुरूंगात टाकले होते ते सध्या मंदिराच्या अंगणात उभे आहेत आणि ते तिथे लोकांना शिक्षण देत आहेत!”
\s5
\v 26 म्हणून मंदिराच्या रक्षकांचा सरदार मंदिराच्या अंगणात आपल्या अधिकाऱ्यासोबत गेला, आणि त्यांनी प्रेषितांना धर्मसभेसमोर घेऊन आले. परंतु त्यांनी त्यांच्याशी कठोर व्यवहार केला नाही कारण त्यांना अशी भीती वाटत होती की लोक धोंडमार करून आम्हांला ठार करतील.
\p
\v 27 सरदार आणि त्याचे शिपाई ह्यांनी प्रेषितांना धर्मसभेसमोर आणून उभे केले व धर्मसभेच्या सदस्याच्यासमोर उभे राहण्याची आज्ञा केली आणि मुख्य याजक त्यांना म्हणाला
\v 28 “आम्ही तुम्हाला येशू नावाच्या मनुष्याच्या विषयी लोकांना शिकऊ नका अशी आज्ञा केली नव्हती काय परंतु तुम्ही आमच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि यरुशलेमेतील सर्व लोकांना तुम्ही त्याच्याविषयी शिकवले आहे! ऐवढेच नव्हे त्या माणसाच्या मृत्यूसाठी आम्ही जबाबदार आहोत असे ही तुम्ही सर्वांना सांगत आहात!”
\s5
\v 29 परंतु पेत्र प्रेषित व स्वतःच्या तर्फे उत्तर देत होता, ‘तुम्ही लोक आम्हांला जे सांगता त्या पेक्षा आम्हांला देवाच्या आज्ञाचे पालन केले पाहिजे!
\v 30 येशूला वधस्तंभी खिळून ठार करणारे तुम्हीच आहात! परंतु आमचे पूर्वज ज्या देवाची उपासना करतात त्याने येशूला मृत्यूमधून पुन्हा जिवंत केले आहे.
\v 31 देवाने इतर कोणाही पेक्षा अधिक येशूचा सन्मान केला त्याने आम्हांला तारण दिले आहे व अधिकारी म्हणून नेमले आहे त्याने आम्हां इस्त्राएलाला पाप करणे थांबवण्यास परवानगी दिली जेणे करून तो आमच्या पापाची क्षमा करू शकेल.
\v 32 येशू सोबत घडलेल्या ज्या गोष्टी आम्हास ठाऊक आहेत त्या आम्ही लोकांना सांगतो आणि देवाची आज्ञापालन करणाऱ्या आम्हांला देवाने जो पवित्र आत्मा दिला आहे तो देखील ह्या गोष्टी सत्य असल्याचा पाठपुरावा करत (साक्ष देत) आहे.”
\s5
\v 33 जेव्हा धर्मसभेच्या सदस्यांनी हे ऐकले ते प्रेषितांवर अतिशय चिडले आणि ते त्यांना ठार करण्याची इच्छा करू लागले.
\p
\v 34 परंतु गमलियेल नावाचा एक धर्मसभेचा सदस्य होता तो परुश्यांमधून होता तो लोकांना यहूद्यांचे नियमशास्त्र शिकवत असे आणि सर्व यहूदी लोक त्याचा सन्मान करत असत. तो धर्मसभेत उभा राहिला आणि त्यांने शिपायांनी प्रेषितांना त्या खोलीतून थोड्यावेळासाठी बाहेर जाण्याची सुचना केली.
\s5
\v 35 शिपायांनी प्रेषितांना बाहेर नेल्यानंतर तो धर्मसभेचा इतर सदस्यांना म्हणाला, “इस्त्राएलाच्या बंधूनो, ह्या मनुष्यांना तुम्ही काय करणार आहात ह्याविषयी काळजीपूर्वक विचार करा.
\v 36 काही वर्षा अगोदर थुदास नावाच्या पुरुषाने सरकारविरुद्ध बंड पुकारले. आपण कोणी तरी महत्त्वाचे आहोत हे तो लोकांना सांगत असे, आणि जवळपास चारशे मनुष्य त्याला मिळाली. परंतु तो मारला गेला आणि त्याच्या सोबत जे कोणी होते, त्या सर्वांची दाणादाण झाली. म्हणून त्यांनी योजना केल्या प्रमाणे ते काहीही करू शकले.
\v 37 ह्या नंतर कर देण्यासाठी लोकांची यादी तयार करावी आणि त्या काळात गालील प्रदेशातील यहूदा नावाच्या व्यक्तीने बंडखोरी केली, आणि अनेक लोकांना त्याने आपल्या मागे यावे असे त्याचे मन वळवले परंतु ढोंगी फार झाला आणि त्याच्या मागे वेगवेगळ्या विषयांनी बोलविले.
\s5
\v 38 तर मी आता तुम्हास हे सांगतो, हया मनुष्याचे वाईट करू नका! त्यांना सोडून द्या! मी तुम्हास हे सांगतो कारण हे मनुष्य ज्या योजना करत आहे त्या जर मनुष्यांकडून असत्या तर नक्कीच त्यांना कोणीतरी थांबवेल व ते अपयशी होतील.
\v 39 परंतु जर देवाने त्यांना ह्या गोष्टी करण्याची आज्ञा केली असेल, तुम्ही त्यांना थांबवण्यास यशस्वी होणार नाही, कारण तुम्हांला हे लवकरच समजेल की तुम्ही देवाच्याविरुद्ध कार्य करत होता!” धर्मसभेच्या सदस्यांनी गमलिएलाचे म्हणणे स्वीकारले.
\s5
\v 40 त्यांनी मंदिराच्या शिपयांना आत आणण्यास सांगितले, व त्यांना फटके देण्याची आज्ञा केली. म्हणून रक्षक त्यांना धर्मसभेच्या खोलीत घेऊन आले व तेथे त्यांनी त्यांना फटके मारले. आणि धर्मसभेच्या लोकांनी त्यानंतर आज्ञा केली की पुन्हा त्यांनी येशूचे नाव लोकांमध्ये सांगू नये. आणि प्रेषितांना त्यांनी सोडून दिले.
\p
\v 41 प्रेषित धर्मसभेतून बाहेर पडले. येशू ख्रिस्ताचे अनुसरन ते करत होते म्हणून देवाने त्यांना लोकांच्या अपमानास पात्र होण्याचा सन्मान दिला आहे या बद्दल ते खूप आनंदात होते.
\v 42 त्यानंतरचा प्रत्येकदिवस प्रेषित मंदिराच्या भागात वेगवेगळ्या लोकांच्या घरी जात असत, तेथे त्यांनी लोकांना शिकवण देण्याचे आणि येशू ख्रिस्ताविषयी शिकवण्याचे सुरू ठेवले.
\s5
\c 6
\s सात जणांची निवड
\p
\v 1 त्यादिवसामध्ये ही अनेक लोक विश्वाणारे बनत होते; बाहेरून आलेले यहूदी स्थानिक इस्त्राएलात जन्मलेल्या यहूद्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले, कारण त्याच्या विधवांना त्याच्या जेवणाचा यथायोग्य वाट दररोज मिळत नव्हता.
\s5
\p
\v 2 तर त्यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर बारा प्रेषितांनी सर्व विश्वासणाऱ्यांना यरुशलेमेत एकत्र भेटण्यासाठी बोलवले; मग प्रेषित त्या सर्वांना म्हणाले, “लोकांना अन्न वितरित करण्यासाठी देवाच्या वचनाचे उपदेश व शिक्षण सोडून द्यावे हे योग्य नाही!
\v 3 देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन ज्यांना मिळते व जे अत्यंत ज्ञानी आहेत, अशा सात भावांची तुमच्यामधून निवड करा; म्हणजे आम्ही त्यांना हे कार्य करण्याची सुचना देऊ.
\v 4 आम्हांसाठी तर आम्ही देवाची प्रार्थना करण्यात उपदेश करण्यात व प्रभू येशूने संदेश शिकविण्यात आमच्या वेळेचा उपयोग करणार आहोत.”
\s5
\p
\v 5 सर्व विश्वासणाऱ्यांना प्रेषितांची ही सुचना अत्यंत योग्य वाटली. म्हणून त्यांनी स्तेफन नावाच्या मनुष्याची निवड केली हा मनुष्य देवामध्ये खुप विश्वास ठेवणारा आणि त्याला पवित्र आत्मा पूर्णपणे नियंत्रित करतो असा होता. त्यांनी फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना आणि निकलोस ह्यांची ही निवड केली निकलोस हा अंत्युखियाचा होता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्या अगोदर निकलोसाने यहूदी धर्माचा स्वीकार केला होता.
\v 6 विश्वासणाऱ्यांनी या सात पुरुष्यांना प्रेषितांकडे आणले, मग प्रेषितांनी ह्या मनुष्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्यातील प्रत्येकाने हे कार्य उत्तम रितीने पूर्ण करावे.
\s5
\p
\v 7 म्हणून विश्वासणाऱ्यांनी लोकांना देवाचे वचन सांगने सुरू ठेवले यरुशलेमेमध्ये येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या अतिशय वाढत होती त्यामध्ये यहूदी याजकही होते जे येशूवर विश्वास का ठेवावा ह्या संदेशाचे अनुकरण करणारे होते.
\s5
\p
\v 8 लोकांमध्ये अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ देव स्तेफनाला देत होता त्याने येशू हा सत्य आहे ह्या संदेशाला बळकटी मिळत होती.
\v 9 परंतु काही लोक स्तेफनाच्याविरुद्ध उभे राहिले, त्यामध्ये लिबिर्तिन म्हटलेल्या सभास्थानामध्ये एकत्र येणाऱ्या यहूद्यांचा एक गट होता तसेच काही लोक कुरनेकर आलेक्सांद्रिय या शहरातील होते, आणि किलिकिया व आसिया प्रांतातीलही काही लोक त्याला विरोध करणारे होते ते सर्व स्तेफनाशी वाद करू लागले.
\s5
\v 10 परंतु स्तेफन काही चुकीचे बोलत आहे, हे ते सिद्ध करू शकत नव्हते कारण देवाचा आत्मा स्तेफनाला अतिशय ज्ञानाने बोलण्यास मार्गदर्शन करत होता.
\p
\v 11 म्हणून काही लोकांनी खोटेपणाने स्तेफनावर आरोप लावावे अशी त्यांची मने वळवली; त्या मनुष्यांनी म्हटले, “ह्याला आम्ही देवाविषयी आणि मोशेविषयी वाईट बोलतांना ऐकले आहे.
\s5
\v 12 अशा पद्धतीने त्यांनी इतर यहूदी लोकांना स्तेफनाच्याविरुद्ध पेटवले त्यामध्ये यहूदी नियमशास्त्र शिकवणारे वडील व शिक्षकही होते, त्या सर्वांनी स्तेफनाला धरले आणि यहूदी धर्मसेभेत त्याला घेऊन आले.
\v 13 त्याच्यावर खोटे दोषारोप करणारे काही लोकही ते घेऊन आले, त्या लोकांनी म्हटले, “हा मनुष्य ह्या पवित्र मंदिराविरुद्ध वाईट बोलत राहतो, आणि देवाकडून मोशेला जे नियम प्राप्त झाले त्याविषयी ही बोलतो.
\v 14 ह्याला आम्ही असे बोलतांना ऐकले आहे की, नासरेथ गावाचा हा येशू ह्या मंदिराचा नाश करेल, आणि मोशेने आमच्या पूर्वजांना शिकवलेल्या रितिरिवाजांपेक्षा दुसऱ्या पद्धतींना अवलंबून करायला शिकवले, असे आम्ही ह्याला म्हणतांना ऐकले आहे.”
\p
\v 15 धर्म सभेतील सर्व लोकांची नजर स्तेफनावर होती, आणि त्यांनी त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा आहे असे पाहिले.
\s5
\c 7
\s स्तेफनाचे भाषण
\p
\v 1 नंतर मुख्य याजकाने स्तेफनाला विचारले, “तुझ्याविषयी हे लोक ज्या गोष्टी बोलत आहेत त्या खऱ्या आहेत काय?”
\v 2 स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी बांधवांनो आणि सन्मानीय पुढाऱ्यांनो, कृपया माझे ऐका! आपला पूर्वज अब्राहाम हारान शहरात जाण्याअगोदर मेसोपोटामियाच्या भागात राहत असतांनाच आपण ज्याची उपासना करतो त्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले.
\v 3 देव त्याला म्हणाला, ‘तू व तुझे नातेवाईक राहत आहेत तो देश सोड, आणि ज्या देशात जाण्याचे मी तुला मार्गदर्शन करेन तेथे जा.”
\s5
\v 4 अशा रितीने अब्राहामाने तो देश सोडला, त्या देशाचे नाव खास्द्यांचा देश असेही होते, आणि तो हारानात आला व तेथे राहिला. त्याचे वडील मरण पावल्या नंतर देवाने त्याला तोही देश सोडून सध्या आपण जेथे आहोत, तेथे राहण्यास सांगितले.
\p
\v 5 त्यावेळेस देवाने अब्राहामला या ठिकाणी कोणतीही भूमी दिली नाही, छोटी जागा देखिल दिली नाही. परंतु देवाने त्याला असे अभिवचन दिले की, ही भूमी त्याला व त्याच्या वंशजांना तो देईल आणि ती सर्वदा त्यांची असेल, परंतु त्यावेळेस अब्राहामाला कोणते ही संतान नव्हते जे वारसदार असतील.
\s5
\p
\v 6 नंतर देवाने अब्राहामला सांगितले, ‘तुझी संतती एका परदेशात जाऊन राहिल. ते तेथे चारशे वर्ष राहतील, तेथिल राज्यकर्ते तुझ्या संततीशी दूर व्यवहार करून त्यांना गुलाम बनवतील.
\v 7 जे लोक त्यांना गुलाम म्हणून त्याच्याकडून काम करून घेतील, त्यांना मात्र मी शासन करीन. त्या नंतर तुझी संतती तो देश सोडून देईल, आणि या देशात येऊन ते माझी उपासना करतील.”
\v 8 मग देवाने अब्राहामाला आज्ञा दिली की, अब्राहामाच्या घराण्यातील त्याच्या संततीतील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी, ते देवाचे लोक आहेत हे दाखवणारे ते चिन्ह असेल नंतर अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याचा जन्म झाला, इसहाक आठ दिवसाचा असतांना अब्राहामाने त्याची सुंता केली. त्या नंतर इसहाकाचा मुलगा याकोब ह्याचा जन्म झाला, याकोबाला बारा मुले झाली, जे आपण यहूदी आपले पूर्वज असे म्हणतो.
\s5
\v 9 तुम्हाला हे ठाऊक आहे की, याकोबाच्या मुलांपैकी जे मोठे होते ते त्यांचा लहान भाऊ योसेफ ह्यांच्यावर त्यांचा बाप अधिक प्रीती करतो म्हणून त्याचा हेवा करू लागले, म्हणून त्यांनी त्याला गुलामाच्या व्यापाऱ्याला विकले त्याने त्याला मिसर देशास नेले, आणि तेथे तो गुलाम झाला. परंतु देवाने योसेफाला मदत केली;
\v 10 लोकांनी जेव्हा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाने त्याचे रक्षण केले. त्याने योसेफाला ज्ञान दिले, आणि मिसरचा राजा फारो ह्याने योसेफाविषयी चांगले विचार करावे असेही केले. म्हणून मिसरवर राज्यकारभार करण्यासाठी आणि फारोच्या सर्व जमिनीकडे लक्ष देण्यासाठी फारोने त्याची नेमणूक केली.
\s5
\p
\v 11 योसेफ हे कार्य करत असतांना मिसरमध्ये दुष्काळ पडला आणि अन्नाची टंचाई भासू लागली, कनानातही तसेच झाले. लोक त्रासून गेले. त्यादिवसामध्ये याकोब आणि त्यांची मुले जी कनानात होती त्यांनाही अन्न धान्य पुरेसे नव्हते.
\v 12 मिसरमध्ये लोक अन्न धान्य विकत घेऊ शकतात अशा लोकांकडून आलेला समाचार ऐकल्यावर याकोबाने योसेफाच्या मोठ्या भावांनाही धान्य विकत घेण्यासाठी मिसरला पाठवले. ते तेथे गेले आणि त्यांनी योसेफाकडून धान्य विकत घेतले, परंतु ते त्याला ओळखू शकले नाही. मग ते आपल्या घरी परत आले.
\v 13 योसेफाचे भाऊ मिसरमध्ये दुसऱ्यांदा गेले तेव्हा, त्यांनी पुन्हा योसेफाकडून धान्य विकत घेतले, परंतु त्यावेळेस त्याने स्वतःला तो कोण आहे हे त्यांना सांगितले. तेव्हा फारोला कळाले की, योसेफाचे लोक हे इब्री होते. आणि कनानातून आलेली माणसे ही त्याचे बंधू होते.
\s5
\v 14 योसेफाने आपल्या बंधूना घरी परत पाठवल्या नंतर त्यांनी त्याचे वडील याकोब ह्यांना योसेफ तुला बोलावतो व तुझ्या पूर्ण घराण्याला तो मिसरमध्ये बोलावतो हे सांगितले. त्यावेळेस योसेफाची पूर्ण कुटूंबात पंचाहत्तर सदस्य होते.
\v 15 जेव्हा याकोबाने हे ऐकले तेव्हा तो व त्याचे कुटूंब मिसरमध्ये राहण्यासाठी गेले, त्यानंतर पुढे याकोब तेथे मरण पावला. आणि आपले पूर्वज त्याचे मुलेही तेथेच मेले.
\v 16 शखेम शहरात हमोराच्या पुत्रांकडून अब्राहामाने जी कबर विकत घेतली, तेथे त्यांना त्याची शरीरे आपल्या देशात परत आणल्यानंतर पुरवण्यात आली.
\s5
\p
\v 17 पूर्वज बहुगुणित झाले, देवाने अब्राहामाला अभिवचन दिलेले होते की तो त्याच्या लोकांना मिसरमधून सोडवेल ते अभिवचन पूर्ण होण्याची वेळ आली असता आपले पूर्वज संख्येने बहुगुणित झाले होते.
\v 18 त्यादिवसात दुसरा राजा मिसरमध्ये राज्य करू लागला होता, त्याच्या राज्यकालाच्या कितीतरी अगोदर योसेफाने मिसरच्या लोकांना किती मदत केली ह्याची ह्या राजाला माहिती नव्हती.
\v 19 त्या राजाने क्रुरतेने आपल्या पूर्वजांचा नाश करण्याचे ठरवले. त्याने त्यांचा अमानुष छळ केला, आणि त्यांना फार वेदना दिल्या त्याने त्यांना आपल्या नवजात लेकरांना घराबाहेर फेकून द्या म्हणजे ते मरतील अशी ही आज्ञा केली.
\s5
\v 20 त्या दिवसात मोशेचा जन्म झाला आणि देवाने पाहिले की तो एक फार सुंदर बालक आहे, म्हणून त्याच्या आई वडिलांनी लपून तीन महिन्यापर्यंत त्याची काळजी घेतली.
\v 21 परंतु त्यानंतर त्याला घराच्या बाहेर टाकावे लागले, परंतु फारोच्या मुलीला तो सापडला आणि तिने त्याला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले.
\s5
\v 22 मिसरच्या लोकांना माहित असलेले सर्व ज्ञान मोशेला शिकवण्यात आले, आणि जेव्हा तो मोठा झाला. तेव्हा तो सामर्थ्याने बोलत असे, व कार्य करत असे.
\v 23 मोशे चाळीस वर्षांचा झाला असता एकदा असे झाले की, आपले नातेवाईक इस्त्राएली ह्यांची भेट घेण्याचे त्याने ठरवले.
\v 24 मिसरमधला एक व्यक्ती इस्त्राएली व्यक्तीसंगती गैर व्यवहार करतांना त्याने पाहिले. म्हणून तो इस्त्राएली माणसाची मदत करायला गेला, आणि त्याने मिसरच्या व्यक्तीला ठार करून त्या इस्त्राएलाची मदत केली.
\v 25 देवाने मोशेला इस्त्राएली बंधूना गुलामगिरीतून स्वत्रंत करण्यासाठी पाठवले आहे, असे त्यांना कळेल असे मोशेला वाटले. परंतु त्यांना ते कळाले नाही.
\s5
\v 26 दुसऱ्या दिवशी दोन इस्त्राएली बंधू आपसामध्ये भांडतांना मोशेने पाहिले, त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मोशे त्यांना म्हणाला, ‘बंधूनो तुम्ही दोघेही इस्त्राएली आहात; तुम्ही एकमेकांशी का भांडता?
\v 27 परंतु जो मनुष्य दुसऱ्यांशी भांडत होता त्याने मोशेला ढकलले आणि त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्याय करणारा असे कोणी नेमले आहे.”
\v 28 काल तू त्या मिसरच्या माणसाला ठार केले तसे तू मलाही करू पाहतोस काय?”
\s5
\v 29 जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिसर देश सोडून मिद्यांनाच्या प्रदेशाकडे पळून गेला. तेथे तो काही वर्ष राहिला, तेथे त्याने लग्न केले आणि त्याच्या पत्नीला दोन मुले झाली.
\q
\v 30 चाळीस वर्षानंतर एकेदिवशी प्रभू परमेश्वर एका दूताच्या स्वरूपात मोशेला सिनाय पर्वतावर रानातील जळत्या झुडपात तो त्याला प्रगट झाला.
\s5
\p
\v 31 जेव्हा मोशेने पाहिले त्याला आश्चर्य वाटले, कारण की ते झुडूप जळत होते परंतु भस्म होत नव्हते, हे काय होत आहे हे पाहण्यासाठी तो अधिक जवळ गेला, तेव्हा प्रभू परमेश्वर त्याच्याशी बोलला,
\v 32 ‘तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ज्या देवाची उपासना करत होते तो मी आहे.” मोशेला इतकी भीती वाटली की तो थरथर कापू लागला. तो झुडपाकडे आपली नजर उंचावून पाहण्यास धजला नाही.
\s5
\v 33 मग प्रभू परमेश्वर त्याला म्हणाला, “तू माझा सन्मान करतो हे दाखवण्यासाठी आपल्या पायातील जोडे काढ, कारण मी येथे आहे व ज्या भूमीवर तू उभा आहे ती ही माझी आहे.
\v 34 मिसरमधील लोक माझ्या लोकांचा कसा छळ करतात ते मी निरंतर पाहत आलो आहे व त्यांच्यावर माझी नजर पडली आहे. त्या छळामुळे माझा लोकांचे कन्हणे मी ऐकले आहे. म्हणून मिसरमधून त्यांना सोडवण्यासाठी मी खाली आलो आहे तर आता तू तयार हो तुला पुन्हा मिसरमध्ये मी परत पाठवत आहे.”
\s5
\p
\v 35 हा मोशे तोच आहे ज्याने इस्त्राएली लोकांची मदत केली, परंतु लोकांनी त्याचा नाकार असा केला, ‘तुला आम्हांवर कोणी न्यायधीश व कारभारी नेमले आहे. देवाने स्वतःहा त्याला त्यांच्यावर अधिकारी करण्यासाठी व गुलामगिरीतून सोडवण्यासाठी मोशेला पाठवले होते. झुडपातून देवदूताने त्याला तसे करण्याची आज्ञा दिली होती.
\v 36 आमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणणारा हाच तो मोशे होय, देव त्याच्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी त्याने मिसरमध्ये, लाल समुद्राजवळ, आणि इस्त्राएली लोक चाळीस वर्ष अरण्यात राहत होते त्यादिवसात पुष्कळ चमत्कार केले.
\v 37 देव तुम्हातून माझ्या सारखा आणखी एक संदेष्टा तुम्हा करता देव तयार करेल असे इस्त्राएली लोकांना सांगणारा हाच तो मोशे होय.
\s5
\v 38 अरण्यवासामध्ये जे इस्त्राएली लोक होते त्याच्यामध्ये हाच मनुष्य मोशे होता; सिनाय पर्वतावरून जेव्हा देवदूत बोलला तेव्हा त्याच्याची बोलणाराही हाच तो होता. देवाने देवदूतांकर्वी सीनाय पर्वतावर दिलेले नियम स्वीकारणारा मोशे तो हाच, आणि त्या देवदूताने आपल्या पूर्णजांना जो संदेश दिला तोही मोशेने सांगितला आहे. आपण अनंतकाळा करता कसे जगावे ही देवाने दिलेली वचने देवापासून ज्याने स्वीकारले तो हाच होय, आणि ती वचने त्याने आमच्यापर्यंत पोहोंचवली आहे.
\p
\v 39 तरी ही आमचे पूर्वज मोशेचे आज्ञापालन करण्यास तयार नाही. त्या ऐवजी त्याने त्याला आपला पुढारी म्हणून नाकारले आणि पुन्हा मिसरमध्ये जाण्यास ते इच्छुक होते.
\v 40 म्हणून त्यांनी त्याचा भाऊ अहरोन त्याला सांगितले, ‘तू आमचे पुढारीपण करण्यासाठी मूर्त्या बनव जे आमचे देव असतील. ज्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले आहे ते आम्हांला ठाऊक नाही;
\s5
\v 41 म्हणून त्यांनी वासरा सारखी दिसणारी मूर्ती तयार केली, मग त्यांनी त्या मूर्तीच्यासमोर सन्मानासाठी यज्ञ अर्पिले आणि त्यांनी स्वतः जे घडवले होते त्यासमोर ते गाऊ व नाचू लागले.
\v 42 म्हणून देवाने ही त्यांना त्यांच्या चुका दुरूस्त करणे थांबवले सूर्य चंद्र व आकाशातील तारे ह्यांची उपासना करण्यासाठी त्याने त्यांना सोडून दिले होते. एका संदेष्ट्याने लिहिलेल्या शब्दांशी हे मिळते जुळते आहे;
\q1 देव म्हणाला, ‘अहो इस्त्राएली लोकांनो चाळीस वर्ष अरण्यातील भटकतांना तुम्ही प्राण्यांना ठार करून त्यांना बलिदान केले ते तुम्ही मलाच अर्पण करत होता का?
\s5
\p
\v 43 या उलट तुम्ही जागो जागी मोलेख दैवतेच्या सारखी दिसणारी मूर्तीचा मंडप घेऊन फिरत होता. रेफान नावाचा ताऱ्याची प्रतीमा ही तुम्ही वाहत होता. ह्या मूर्त्या तुम्ही तयार केल्या होत्या आणि तुम्ही माझ्या ऐवजी त्यांची उपासना करत होता. आणि म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या देशाच्या ही दूर पलीकडिल देशामध्ये नेऊन तुमच्या घरापासून खूप लांब टाकून देईन.”
\s5
\p
\v 44 आमचे पूर्वज अरण्यात असतांना त्यांनी त्या पवित्र मंडपाजवळ ही त्याची उपासना केली, जो देव त्यांच्या सोबत आहे ह्याचे दर्शक होते. मोशेला देवाने जो आराखडा दाखवला हो अगदी तंतोतंत होता.
\v 45 त्यानंतर काही पाळके आमच्या पूर्वजांनी यहोशवा जेव्हा त्यांना ह्या देशात घेऊन आला त्यावेळेस आपल्या सोबत आणला आमच्या अगोदर येथे राहणाऱ्या लोकांना देवाने हुसकून लावले, आणि आम्ही ही जागा स्वतःची म्हणून घेतली त्यावेळेस ते घडले, तर अशा रितीने इस्त्राएली लोकांनी ह्या जागेवर ताबा मिळवला. दावीद राजा राज्य करत होता त्यावेळेस ही तो निवासमडंप आपल्यामध्ये होता.
\v 46 दावीद देवाला संतोषवित असे, आणि त्याने देवाला विनंती केली की, त्याच्यासाठी त्याने एक घर बांधू द्यावे जेथे तो व त्याचे सर्व इस्त्राएली लोक देवाची उपासना करू शकतील.
\s5
\v 47 परंतु त्या ऐवजी देवाने दावीदाचे पुत्र शलमोन ह्याला ते घर बांधण्यासाठी सांगितले जेथे लोक त्याची उपासना करू शकतील.”
\p
\v 48 परंतु आपल्याला ठाऊक आहे की, इतर कशा ही पेक्षा देव महान आहे, आणि लोकांनी बनवलेल्या घरांमध्ये तो राहत नाही. यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे हे आहे.
\q
\v 49-50 देव म्हणतो, “स्वर्ग हे माझे सिंहासन आणि पृथ्वी हे माझे पादासन आहे. स्वर्गात व पृथ्वीवर सर्व काही मी निर्माण केले आहे. तर तुम्ही मानवानो मी राहावे अशी जागा माझ्यासाठी बनवू शकणार काय?
\s5
\p
\v 51 तुम्ही लोक त्याच्याविषयी अतिशय हठ्ठी झाला आहात तुम्ही तुमच्या पूर्वजां सारखेच आहात! त्यांनी जसे पवित्र आत्म्याला विरोध केले तसाच तुम्ही ही करता;
\v 52 तुमच्या पूर्वजांनी प्रत्येक संदेष्ट्याचा छळ केला. ख्रिस्त येणार आहे ह्याची घोषणा करणाऱ्यांना ही त्यांनी फारपूर्वी ठार केले, ख्रिस्त ज्याने नेहमी तेच केले जे देवाला संतोषवित असे. आणि ख्रिस्त आला आहे; त्याला तुम्ही काही दिवसां अगोदर त्याच्या शत्रूच्या हातात दिले, आणि त्यांनी त्याला ठार करावे अशी मागणी केली.
\v 53 देवापासून नियमशास्त्र प्राप्त झालेले असे तुम्ही लोक आहात. देवाने देवदूतांच्याद्वारे ते नियम आपल्या पूर्वजांना दिले. परंतु तुम्ही त्याचे आज्ञापालन केले नाही.”
\s स्तेफनाचा मृत्यु
\s5
\p
\v 54 यहूदी धर्मसभेचे सदस्य व इतर लोकांनी स्तेफन काय म्हणाला हे ऐकले, तेव्हा ते खुप संतापले. ते त्याच्यावर ऐवढे संतापले की ते रागाने त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले.
\v 55 परंतु पवित्र आत्माने स्तेफनावर पूर्णपणे नियंत्रण केले होते त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे लावली आणि देवापासून त्याला एक चकाकता प्रकाश दिसला. आणि देवाच्या उजविकडे त्याने येशूला उभे पाहिले.
\v 56 “पाहा,” तो म्हणाला, “मला स्वर्ग उघडलेला आहे आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला दिसत आहे.”
\s5
\p
\v 57 यहूदी धर्मसभेच्या लोकांनी व इतरांनी हे ऐकताच ते मोठ्याने ओरडले, त्याने आपले हात आपल्या कानावर ठेवले जेणेकरून त्यांचे त्याने ऐकू नये आणि ते लगेच त्याच्याकडे धावत गेले.
\v 58 त्यांनी त्याला ओढत यरुशलेम शहराच्या बाहेर आणले, आणि त्याला धोंडमार करायला सुरवात केली, जे लोक त्याच्यावर दोषारोप करत होते. त्यांनी आपले अंग केकाळून बाजूला ठेवले जेणेकरून त्याच्यावर धोंडे मारायला त्यांना सोपे जाईल. आणि त्यांनी ते कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या जवळ जमिनीवर ठेवले. कारण तो त्या कपड्यांची देखरेख करणार होता.
\s5
\v 59 ते स्तेफनावर दगडमार करत असता, स्तेफनाने प्रार्थना केली, पाहा, “प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर!”
\p
\v 60 आणि मग स्तेफन आपल्या गुडघ्यावर आला आणि मोठ्याने ओरडला, “प्रभू ह्यांना ह्या पातकाची शिक्षा करून नको!” तो हे शब्द बोलल्यानंतर मरण पावला.
\s5
\c 8
\s ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग
\p
\v 1-2 त्यानंतर देवाचे भय धरणाऱ्या काही लोकांनी स्तेफनाचे शरीर एका कबरेत पुरले आणि त्यांनी त्याच्यासाठी फार मोठ्या आवाजात विलाप केला.
\p त्याच दिवशी यरुशलेमेत राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा लोकांनी अमानुष छळ सुरू केला. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांपैकी बहुतेक लोक यहूदीया व शमरोन प्रातांत पळून गेले. यरुशलेमेमध्ये केवळ विश्वासणाऱ्यांपैकी प्रेषितच मागे राहिले.
\v 3 ते स्तेफनाला ठार करत असता शौल स्तेफनाला ठार केले पाहिजे ह्यांची अनुमती देत तेथे उभा होता. म्हणून विश्वासणाऱ्याच्या समुहाला नाश करण्याचा प्रयत्न शौलानेही सुरु केला. एकामागून एका घरात तो जात असे आणि तेथे येशूवर विश्वास ठेवणारे स्त्री व पुरूष असल्यास त्यांना ओढून बाहेर काढून तरूंगात घालत असे.
\s शोमरोनामध्ये फिलिप्प
\s5
\p
\v 4 इकडे यरुशलेमेतून जे विश्वासणारे बाहेर निघाले होते, आणि वेगवेगळ्या गावांमध्ये पसरले, त्यांनी तेथे येशूच्या संदेशाची घोषणा करण्याचे सुरूच ठेवले.
\v 5 फिलिप्प नावाचा एक विश्वासणारा जो यरुशलेमेतून निघाला होता तो शोमरोन जिल्हाच्या एका शहरात जाऊन राहिला. तेथे तो लोकांना येशू हाच ख्रिस्त आहे असे सांगत असे.
\s5
\v 6 तेथील अनेक लोकांनी फिलिप्पाचे हे ऐकले आणि तो अद्भुत चिन्ह चमत्कार करतो हे ही त्यांनी पाहिले, म्हणून त्यामुळे तो जे काही बोलत होता ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकले.
\v 7 उदाहरणार्थ, फिलिप्प लोकांमधील अशुद्ध आत्म्याना आज्ञा करीत असे आणि ते त्यांना मोठ्याने ओरडून सोडून जात असत. तसेच, असंख्य लोक जे पक्षघाती होते आणि अनेक जे अपंग होते तेही बरे झाले.
\v 8 आणि म्हणून त्या शहरातील अनेकांनी अत्यानंद केला.
\s शिमोन जादूगार
\s5
\p
\v 9 त्या शहरामध्ये शिमोन नावाचा एक मनुष्य होता आणि शोमरोनातील लोकांना तो आपल्या जादूने आश्चर्यचकित करीत असे, आणि तो जादूटोणा बऱ्याच काळापासून करत होता आणि तो स्वतःला “महान शिमोन!” असे असल्याचा दावा करत असे.
\v 10 तेथिल सर्व लोक मग ते लहान असो किंवा थोर असो, साधारण असो ते सगळे त्याचे ऐकत असत. ते त्याला म्हणत असत, “देवाचे महान सामर्थ्य म्हणतात तो हाच मनुष्य होय.”
\v 11 ते त्याचे लक्षपूर्वक ऐकत असत कारण बराच काळपर्यंत त्याने जादूटोणा करून लोकांना आश्चर्यचकित केले होते.
\s5
\v 12 देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल त्याविषयीची आणि येशू ख्रिस्ता विषयीच्या शुभवार्तेवर लोकांनी विश्वास ठेवला हा संदेश फिलिप्पाने सांगितला होता. आणि विश्वास ठेवणाऱ्या स्त्रियांचा व पुरूषांचा येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला.
\v 13 शिमोनानेही फिलिप्पावर विश्वास ठेवला आणि त्याचाही बाप्तिस्मा झाला; लगेच तो फिलिप्पासोबत राहू लागला. आणि फिलिप्प जे अद्भुत चमत्कार करत होता ते पाहून तो आश्चर्यचकित होत राहिला, ह्या गोष्टी दाखवून देतात फिलिप्प सत्य बोलत आहे.
\s शोमरोनामध्ये पेत्र व योहान
\s5
\p
\v 14 यरुशलेमेतील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनात अनेक लोक देवाच्या संदेशाचा स्वीकार करत आहे, त्यांनी विश्वास ठेवला आहे, त्यांनी पेत्र व योहानाला तेथे पाठविले.
\v 15 पेत्र आणि योहान शोमरोनामध्ये आल्यानंतर, नविन विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा मिळावा अशी प्रार्थना त्यांनी केली.
\v 16 हे स्पष्ट होते कारण अद्याप त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता. केवळ प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झालेला होता.
\v 17 मग पेत्र आणि योहान ह्यांनी त्याच्यावर हात ठेवला, आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.
\s5
\p
\v 18 प्रेषितांनी आपले हात विश्वाणाऱ्यांवर ठेवल्याने त्यांना पवित्र आत्मा मिळतो हे शिमोनाने पाहिले, आणि म्हणून त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले,
\v 19 आणि असे म्हणाला, “तुम्ही जे करता ते मलाही करता यावे असे माझ्यासाठी करा, कारण ज्या कोणावर मी हात ठेवेन त्याला पवित्र आत्मा मिळावा असे मला वाटते.”
\s5
\v 20 परंतु पेत्र त्याला म्हणाला, “तू व तुझा पैसा दोघांचाही नाश होवो, कारण तू देवाचे दान पैशांने विकत घेण्याचा प्रयत्न केला आहेस.”
\v 21 आम्ही जे करतो त्यात तू आमच्या सोबत काम करू शकत नाहीस कारण तुझे हृदय देवा सोबत नीट नाही!
\v 22 आणि म्हणून अशा दुष्टपणाने विचार करने बंद कर, देवाला विनंती कर जर त्याची इच्छा असेल तर तो तुझ्या या दुष्टतेविषयी व तुझ्या हृदयाच्या कुटीलपणा विषयी तुला क्षमा करू शकतो!
\v 23 आपल्या दुष्ट मार्गांना सोडून दे, कारण मला हे जाणवते की तू आमच्याविषयी फार हेव्याने भरलेला आहेस, आणि दुष्टता करण्याच्या निरंतर विचाराने तुला गुलाम म्हणून ठेवले आहे!”
\s5
\v 24 मग शिमोनाने उत्तर दिले, “तुम्ही जे काही आत्ताच म्हणाला ते माझ्यासोबत न घडो अशी तुम्ही प्रभूला प्रार्थना करा.”
\s5
\v 25 प्रभू येशूविषयी पेत्र आणि योहान ह्यांना जे व्यक्तिक माहित होते ते व प्रभूने जो उपदेश केला, त्याची घोषणा तेथिल लोकांना केल्यानंतर ते दोघे पुन्हा यरुशलेमेत परतले. परत येत असतांना त्यांनी शोमरोन जिल्हातील लोकांना शुभवर्तमानाची घोषणा केली.
\s फिलिप्प व हबशी षंढ
\s5
\p
\v 26 एक दिवस प्रभू देवाने पाठवलेला दूत फिलिप्पास आज्ञा देऊन म्हणाला, “यरुशलेमेपासून गज्जा शहराकडे दक्षिणेस जाणाऱ्या रस्त्याने जाण्यासाठी तयार हो, हा रस्ता वाळवंटात होता.
\v 27 म्हणून फिलिप्प तयार झाला आणि त्या रस्त्याने जाण्यास निघाला त्या रस्त्यावर त्याची भेट एथिओपियन देशातील एका मनुष्यांशी झाली. एथिओपियनच्या राणीच्या सर्व कोशाचा हा कारभारी होता आणि एक महत्त्व पूर्ण अधिकारी होता. त्यांच्या भाषेमध्ये लोक त्यांच्या राणीला कांदके असे म्हणत, हा मनुष्य यरुशलेमेत देवाची उपासना करण्यासाठी गेला होता,
\v 28 आणि आपल्या रथात बसून तो घरी परत जाण्याच्या प्रवासात होता. जेव्हा तो रथात प्रवास करत होता तो यशया संदेष्ट्याच्याद्वारे लिहिलेले पुस्तक वाचत होता.
\s5
\p
\v 29 देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “त्या रथाच्या जवळ जा, आणि त्याच्या जवळ चालू लाग!”
\v 30 म्हणून फिलिप्प त्या रथाच्या जवळ धावत गेला, आणि त्या अधिकाऱ्याला यशया भविष्यवक्त्याचे पुस्तक वाचतांना त्याने ऐकले, त्याने त्या मनुष्याला विचारले, “तू जे वाचत आहे ते तुला समजते काय?”
\v 31 त्याने फिलिप्पाला उत्तर दिले, “नाही हे पुस्तक जर कोणी मला समजून सांगणारा नसेल तर शक्यतो मी समजू शकणार नाही.” मग तो मनुष्य फिलिप्पाला म्हणाला, “वर ये आणि माझ्या बाजूला बस.”
\s5
\v 32 तो अधिकारी शास्त्रलेखाचा जो भाग वाचत होता तो हा! “लोक त्याला ठार करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा तो एका गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा होता एक लहान मेंढरू लोकर कातरणाऱ्यापुढे जसे शांत राहते तसा तो शांत होता.”
\q
\v 33 त्याचा अपमान करण्यात येईल, आणि त्याला न्याय मिळणार नाही त्याचा वंश शक्यतो कोणाला माहित नसेल, कारण त्याला ठार केले जाईल.
\s5
\p
\v 34 तो हे जे शब्द वाचत होता त्याविषयी त्या अधिकाऱ्याने फिलिप्पाला विचारले, “मला सांग येथे संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे? तो स्वतः विषयी हे लिहित आहे काय अथवा तो इतर कोणाविषयी बोलतोय?”
\v 35 म्हणून फिलिप्पाने त्याला प्रती उत्तर दिले; त्याने त्या शास्त्रलेखापासून आरंभ केला, आणि प्रभू येशूच्या शुभवर्तमानापर्यंत त्याला समजून सांगितले.
\s5
\v 36-37 ते त्या मार्गाने प्रवास करत असता, जेथे पाणी होते अशा एका ठिकाणा जवळ ते पोहोंचले, त्या अधिकाऱ्याने फिलिप्पाला म्हटले, “पाहा येथे तर पाणी आहे!” माझी इच्छा आहे की तू माझा बाप्तिस्मा करावा, कारण माझा बाप्तिस्मा व्हावा या पासून थांबवणारी अशी कुठलीही गोष्ट माझ्यासमोर नाही.”
\v 38 त्या अधिकाऱ्याने रथ हाकणाऱ्याला थांबण्यास सांगितले. मग फिलिप्प आणि तो अधिकारी उतरून पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला.
\s5
\v 39 जेव्हा ते पाण्यातून बाहेर आले, देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला तेथून उचलले. फिलिप्प पुन्हा त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पडला नाही परंतु जरी फिलिप्प त्याला दिसला नाही तरी तो अधिकारी आपल्या मार्गाने प्रवास करत अतिशय आनंदाने परतला.
\v 40 फिलिप्पाला नंतर आढळले देवाच्या आत्म्याने त्याला चमत्कारिक रितिने अजोत नावाच्या शहराजवळ आणून सोडले आहे. शिजरीया आणि अजातोस ह्या शहरामध्ये त्याने प्रभू येशूचा संदेश गाजवने सुरूच ठेवले, शिजरीयामध्ये प्रवास करून येईपर्यंत तो हा संदेश देत राहिला.
\s5
\c 9
\s शौलाचा पालट
\p
\v 1 प्रभूच्या मागे चालणाऱ्यांना शौलाने क्रोधाविष्ट होऊन ठार करण्याची धमकी देणे चालूच ठेवले, यरुशलेमेत मुख्य याजकाकडे तो गेला.
\v 2 आणि दिमिष्कांत येथे यहूदी सभास्थानाच्या पुढाऱ्यांना त्यांची ओळख करू देणारी पत्रे देण्याची विनंती त्यांने केली. जो कोणी येशूचा मार्ग शिकवतो, किंवा त्या मार्गाचे अनुकरण करतो, अशा स्त्री किंवा पुरुषांना पकडून यरुशलेमेत कैद करून नेणे व तेथे यहूदी पुढाऱ्यांच्या द्वारे त्यांचा न्याय करून त्यांना दंड देण्यात यावा असा अधिकार त्या पत्राद्वारे शौलाला देण्यात आला होता.
\s5
\p
\v 3 शौल आणि त्याच्यासोबतचे लोक जेव्हा दिमिष्कांच्या जवळ प्रवास करीत आले, आणि शौलाभोवती आकाशातून एक तेजस्वी प्रकाश चकाकला.
\v 4 लगेच तो घोड्यावरून खाली पडला. त्याने कोणा ऐकाचा आवाज त्याच्याशी बोलतांना ऐकला, “शौला शौला तू मला त्रास का देतोस?”
\s5
\v 5 शौलाने त्याला विचारले, “प्रभू तु कोण आहेस?” देव म्हणाला, “ज्याचा तू छळ करतो तो मी येशू आहे.
\v 6 तर आता ऊठ, आणि शहरात जा, तू माझ्यासाठी काय करावे हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”
\v 7 शौलासोबत काम करणारे लोक इतके आश्चर्यचकित झाले की ते काहीही बोलू शकले नाहीत. ते तेथे निच्छल उभे राहिले. त्यांनी प्रभूची वाणी बोलतांना ऐकली परंतु त्यांनी कोणालाही पाहिले नाही.
\s5
\v 8 शौल जमिनीवर ऊठून उभा राहिला, परंतु जेव्हा त्याने आपले डोळे उघडले तेव्हा काहीही त्याला दिसले नाही. म्हणून त्याच्यासोबतच्या लोकांनी त्याचा हात धरून त्याला दिमिष्कांमध्ये नेले.
\v 9 पुढील तीन दिवस पौलाला काहीही दिसले नाही. त्याने काहीही खाल्ले किंवा प्याले नाही.
\s दिमिष्कामध्ये शौल
\s5
\p
\v 10 दिमिष्क शहरात हनन्या नावाचा येशूचा एक अनुयायी होता. प्रभू येशूने त्याला एक दृष्टांत दाखवला आणि त्याला म्हणाला, “हनन्या!” तो उत्तरला, “प्रभू मी ऐकत आहे.”
\v 11 प्रभू येशूने त्याला सांगितले, “सरळ म्हटलेल्या मार्गावर यहूदाचे घर आहे तेथे जा. तार्सकर शौल नावाच्या मनुष्यांशी तुला बोलायचे आहे असे तेथे कोणाला तरी सांग, कारण तो ह्या क्षणी माझ्याकडे प्रार्थना करत आहे.
\v 12 हनन्या नावाच्या कोणाएका मनुष्याने तो राहत आहे तेथे प्रवेश करून, त्याला पुन्हा दिसावे ह्यासाठी त्याचावर हात ठेऊन प्रार्थना केली असे मी शौलाला दृष्टांतांत दाखवले आहे.
\s5
\v 13 हनन्याने उत्तर दिले, “परंतु हे प्रभू अनेक लोकांनी मला ह्या मनुष्याविषयी सांगितले आहे; यरुशलेमेत जे तुझ्यावर विश्वास ठेवतात अशा अनेक लोकांना ह्याने फार दृष्टतेने वागवले आहे हे मी ऐकले;
\v 14 दिमिष्कामध्ये जे कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना ह्याने अटक करावे असे अधिकार पत्र मुख्य याजकाने ह्याला दिले आहे ते घेऊन तो येथे आला.”
\v 15 परंतु प्रभू येशूने हनन्याला सांगितले, “शौलाकडे जा; मी जे सांगतो ते तू कर, कारण मी त्याला माझी सेवा करण्यासाठी निवडले आहे म्हणजे तो परराष्ट्रीय लोक त्यांचे राजे व इस्त्राएली लोकांना माझे सत्य शिकवेल.
\v 16 आणि मी स्वतः त्याला हे दाखवून देईन, की इतर लोकांना माझ्याविषयी सांगण्यासाठी त्याला दुःख सहन करावे लागेल.”
\s5
\v 17 म्हणून हनन्या तेथे गेला, आणि शौल राहत होता ते घर शोधल्यावर त्याने त्यात प्रवेश केला. शौलाला भेटल्या बरोबर त्याने आपले हात त्याच्यावर ठेवले, आणि तो त्याला म्हणाला, “बंधू शौल प्रभू येशूने स्वतःहा मला तुझ्याकडे येण्यास आज्ञा केली आहे. दिमिष्क या शहराकडे येतांना ज्याने तुला दर्शन दिले, तो हाच होय, तुला पुन्हा दृष्टी यावी आणि पवित्र आत्म्याने तुझ्यावर पूर्ण नियंत्रण करावे, ह्यासाठी त्याने मला पाठविले आहे.”
\v 18 लगेचच मासाच्या अंगावरील खवल्यासारखे असे काही तरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले. आणि तो पुन्हा पाहू लागला, मग तो उभा राहिला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला.
\v 19 शौलाने काही अन्न खाल्ल्यानंतर त्याला पुन्हा बळ प्राप्त झाले. पुढील असंख्य दिवस दिमिष्कांतमध्ये शौल विश्वासणाऱ्यां सोबत राहिला.
\s5
\p
\v 20 यहूदी सभास्थानांमध्ये त्याने लागलेच येशूविषयी उपदेश करायला सुरवात केली, त्याने त्यांना सांगितले की, येशू हा देवाचा पुत्र आहे.
\v 21 जे लोक त्याला उपदेश करतांना ऐकत ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांच्यापैकी काही असे म्हणत होते, “हे आम्हास विश्वास ठेवण्यास अवघड आहे की, ज्याने यरुशलेमेमध्ये विश्वासणाऱ्यांचा पाठलाग केला, आणि यरुशलेमेतील मुख्य याजकाकडे येथे येऊन त्यांना अटक करून नेण्यास जो आला आहे तोच हा मनुष्य आहे ह्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही;”
\v 22 परंतु देवाने शौलाला अशी कृपा दिली की त्याने अधिकाधिक लोकांना सुस्पष्टपणे व पटेल असे उपदेश करावा. तो शास्त्रलेखातून हे सिद्ध करत होता की येशू हाच ख्रिस्त आहे म्हणून दिमिष्कांमधील यहूदी पुढारी त्याचे बोलणे कसे खोडावे हे समजू शकले नाही.
\s5
\p
\v 23 काही कालानतरानंतर तेथील यहूदी पुढाऱ्यांनी त्याला ठार करण्याचा बेत आखला.
\v 24 ते यहूदी लोक रात्रंदिवस शहरात प्रवेश करणाऱ्या वेशींवर लक्ष ठेऊन होते जेणेकरून शौल दृष्टिस पडता त्यांनी त्याला ठार करावे, परंतु त्यांनी जी योजना केली, ती शौलाला कोणी तरी सांगितली.
\v 25 त्याच्याद्वारे येशूवर विश्वास ठेवलेल्यापैकी काही लोकांनी रात्री त्याला शहरा भोवतीच्या मोठ्या दगडी भींतीजवळ नेले. तेथे त्याला एका मोठ्या टोपल्यात ठेऊन दोरी द्वारे त्याला भींतीवरून खाली उतरवले अशा रितीने तो दिमिष्कांतून पळून गेला.
\s यरुशलेम व तार्स येथे शौल
\s5
\p
\v 26 यरुशलेमेमध्ये आल्यानंतर इतर विश्वासणाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न शौलाने केला. परंतु ते सर्व त्याला घाबरले, तू विश्वासात आला आहे यावर त्यांच्यापैकी कोणाचा विश्वास बसे ना.
\v 27 परंतु बर्णबाने त्याला घेतले आणि तो घेऊन प्रेषितांकडे आला. शौल दिमिष्कांकडे कसा प्रवास करत होता, त्याने येशूला कसे पाहिले, आणि प्रभू तेथे त्याच्याशी काय बोलला हे सगळे त्याने प्रेषिताला समजावून सांगितले. दिमिष्कांमध्ये यहूदी लोकांना शौलाने धैर्याने कसा उपदेश केला तेही त्याने त्यांना सांगितले.
\s5
\v 28 यरुशलेमेतील प्रेषितांना आणि विश्वासणाऱ्यांना शौल भेटत राहिला आणि येशूविषयी लोकांना तो धैर्याने उपदेश करत होता.
\p
\v 29 ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशीही शौल येशूविषयी बोलत असे आणि तो त्यांच्याशी वादविवाद करत असे, परंतु ते निरंतर त्याचा काटा कसा काढता येईल ह्याविषयी प्रयत्न करत होते. ते त्याला ठार करण्याचा प्रयत्न करत होते.
\v 30 हे इतर विश्वासणाऱ्यांनी ऐकले, तेव्हा त्यातील काही विश्वासणाऱ्यांनी त्याला कैसऱ्या शहरात घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याला त्याचे मुळ गाव तार्सस येथे जाणाऱ्या जहाजावर पाठवले.
\s5
\p
\v 31 यहूदिया, गालील आणि शोमरोन या संपूर्ण प्रांतात राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांना शांती प्राप्त झाली, कारण आता त्यांचा छळ करणारा कोणीही उरला नव्हता. पवित्र आत्मा त्यांना उत्तेजित करत होता प्रभू येशूचा आदर त्यांच्याद्वारे निरंतर होत असणार, पवित्र आत्म्याच्या द्वारे इतर अनेक लोकानांही विश्वासणारे बनावे असे त्यांना सक्षम करत होता.
\p
\v 32 पेत्र ह्या प्रदेशातून प्रवास करत असतांना किनाऱ्यावरील पठारावर लोद नावाच्या गावात राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांना भेटायला तो गेला.
\s5
\v 33 तेथे तो आणि ऐनेयास नावाच्या एका मनुष्याला भेटला पक्षघातामुळे आठ वर्षांपासून ऐनेयास हा आपल्या बिछाण्यावरून ऊठला नव्हता.
\v 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास येशू ख्रिस्त तुला बरे करतो; ऊठ आणि आपला बिछाना गुंडाळ;” आणि लगेच ऐनेयास ऊठून उभा राहिला.
\v 35 लोद आणि शारोनच्या पठाऱ्यांवर राहणाऱ्या बहुतेक लोकांनी ऐनेयाला येशूने बरे केल्यानंतर त्याला पाहिले, आणि म्हणून त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला.
\s दुर्कस
\s5
\p
\v 36 यापो नावाच्या शहरात टबीथा नावाची एक विश्वासणारी होती. ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते. गरीब लोकांना ज्यांची आवश्यक्ता होती अशा गोष्टी देऊन ती निरंतर सत्कृत्ये करीत असे.
\v 37 पेत्र लोद या ठिकाणी आला असतांना ती फार आजारी पडून मरण पावली. तेथील काही स्त्रियांनी येऊन योग्य चालिरिती प्रमाणे तिचे शरीर धुतले. आणि तिचा शरीराला कापडाने गुंडाळून तिच्या घरातील माडीवर तिला ठेवले.
\s5
\p
\v 38 लोद हे शहर यापोजवळ होते म्हणून शिष्यांनी जेव्हा हे ऐकले की पेत्र आताही लोद येथे आहे त्यांनी दोघांना पेत्राकडे निरोप घेऊन पाठवले. पेत्र जेथे आहे तेथे ते आल्यावर त्यांनी त्याला विनंती केली, “आमच्या सोबत लवकर यापो इथे चला.”
\v 39 पेत्र लगेच तयार झाला आणि त्यांच्या सोबत गेला. जेव्हा तो यापोतील तिच्या घराजवळ आला त्यांनी त्याला जेथे दुर्कसचे शरीर ठेवले आहे तेथे वरच्या खोलीत नेले. सर्व विधवा तिच्या अवतीभोवती उभ्या होत्या. त्या रडत होत्या, ती जिवंत असतांना लोकांसाठी तिने जी अंगरखे व वस्त्रे तयार केली ती सर्व त्या विधवांनी पेत्राला दाखविली.
\s5
\v 40 परंतु पेत्राने त्या सर्वांना खोलीच्या बाहेर काढले. मग तो आपल्या गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना केली. मग शरीराकडे वळून म्हणाला, “टबीथा, ऊठ, लगेच तिने आपले डोळे उघडले आणि जेव्हा पेत्राला तिने पाहिले ती उठून बसली.
\v 41 त्याने तिचा एक हात धरला आणि तिला उभे करण्यास मदत केली. त्यानंतर त्याने विश्वासणाऱ्यांना बोलावले विशेषता त्यांच्यापैकी विधवांना पुन्हा परत बोलावले आणि त्याने दाखवले, ती अद्यापही जिवंत आहे.
\v 42 यापोत सगळीकडे सर्वांना हा चमत्कार समजला आणि अनेक लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला.
\v 43 पेत्र यापो येथे बरेच दिवस राहिला तो शिमोन म्हटलेल्या व्यक्तीच्या घरी राहत असे जो प्राण्याच्या चमडींपासून कातडे कमावण्याचे काम करत असे.
\s5
\c 10
\s पेत्र व कर्नेल्य
\p
\v 1 कैसरीया नावाच्या शहरामध्ये कर्नेल्य नावाचा कोणी एक मनुष्य राहत होता. इटली येथील रोमी सैनिकांच्या एका मोठ्या बैठनेत शंभर सैनिकांवर तो अधिकारी म्हणून कार्य करत होता.
\v 2 देवाला जे संतोषवेल ती गोष्ट करण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असे; तो व त्याचे संपूर्ण घराने परराष्ट्रीय होते आणि ते निरंतर देवाची उपासना करणारे होते. तो अनेकदा परराष्ट्रीय लोकांना आर्थिक मदत करत असे, आणि स्वतः देवाची निरंतर प्रार्थना करत असे.
\s5
\p
\v 3 ऐकेदिवशी दुपारी तीन वाजता कर्नेल्याने एक दृष्टान्त पाहिला. देवाने पाठवलेल्या एक दूत स्पष्टपणे त्याच्या दृष्टिस पडला. त्याने देवदूताला त्याच्या खोलीतून त्याच्याशी बोलतांना ऐकले, “कर्नेल्या”
\v 4 कर्नेल्याने टक लावून देवदुताकडे पाहिले आणि तो घाबरला. त्याने घाबरून विचारले, “तुला काय हवे, देवाकडून पाठवलेल्या दूताने त्याला उत्तर दिले तू देवाची नियमितपणे प्रार्थना केली आहेस आणि गरीब लोकांना गरज असेल तेव्हा त्यांना आर्थिक मदत केली आहे म्हणून देव तुझ्यावर प्रसंन्न झाला आहे. ह्या गोष्टी देवासमोर आठवणीत असलेल्या बलिदानाप्रमाणे आहे.
\v 5 म्हणून आता काही लोकांना यापो येथे जाण्याची आज्ञा कर, आणि तेथून शिमोन म्हटलेल्या माणसाला ज्याचे दुसरे नाव पेत्रही आहे परत आणण्यास सांग.
\v 6 तो शिमोन म्हटलेल्या परंतु कातडे काढणाऱ्या मनुष्याच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्र किनारी आहे.”
\s5
\v 7 कर्नेल्याशी बोलणारा दूत निघून गेल्यावर त्याने आपल्या घरात काम करणाऱ्या दोघा कारभाऱ्यांना बोलावले आणि देवाचे भय धरणाऱ्या उपासना करणाऱ्या एका सैनिकालाही बोलाविले.
\v 8 देवदूताने त्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने त्यांना समजावून सांगितल्या. कैसरीया येथे पेत्राला आणण्यासाठी त्याने त्यांना यापोला पाठवले.
\s5
\p
\v 9 दुसऱ्या दिवशी दुपारच्या आसपास ते तिघे मनुष्य प्रवास करत यापो शहराजवळ पोहोंचले. यापो शहराजवळ ते असतांच पेत्र घरावरील धाब्यावर प्रार्थना करण्यासाठी गेला.
\v 10 त्याला भुक लागली आणि त्याला काहीतरी खावेसे वाटले; जेव्हा काही लोक जेवण तयार करत होते तेंव्हा पेत्राने एक दृष्टान्त पाहिला.
\v 11 त्याने आकाश उघडलेले आणि मोठ्या चादरीमध्ये काहीतरी जमिनीवर येतांना पाहिले, त्याची चारही कोपरे वर केलेली होती.
\v 12 त्या चादरीमध्ये सर्व प्रकारचे वेगवेगळे जीव जंतू होते. यहूदी लोकांना मोशेचे नियमशास्त्र जे पक्षी व प्राणी खाण्यास मनाई करत होते तेही त्यात होते. काहींना चार पाय होते, काही जमिनीवर सरपटणारे होते व इतर जंगली पक्षी होते.
\s5
\v 13 मग त्याने देवाला त्याच्याशी बोलतांना ऐकले, “पेत्रा ऊठ, ह्यातील काही मार व त्यांना खा.”
\v 14 परंतु पेत्राने उत्तर दिले, “प्रभू नक्कीच खात्रीने तू मला हे करायला सांगत नाही कारण यहूदी नियमांप्रमाणे आजपर्यंत मी स्वीकारण्यास अयोग्य असे काहीही खाल्लेले नाही किंवा अशी कोणतीही कृत्ये केलेली नाही.”
\v 15 मग देव दुसऱ्यांदा हे बोलतांना पेत्राला आढळला. तो म्हणाला, “मी देव आहे म्हणून जर मी एखादी गोष्ट खाण्यासाठी स्वीकार योग्य बनवली आहे तर ती स्वीकारून खाण्यास अयोग्य आहे असे तू म्हणू नकोस!”
\v 16 हे तीन वेळेस घडले आणि त्यानंतर लगेचच प्राणी आणि पक्षी असलेली चादर आकाशात पुन्हा वर घेतली गेली.
\s5
\p
\v 17 हा दृष्टान्त काय असावा हे समजून घेण्याचा प्रयत्न पेत्र करत असतांच कर्नेल्याने ज्या पुरुषांना पाठवले होते ते तेथे पोहोंचले. त्यांनी लोकांना विचारले, शिमोनाच्या घरी कसे जावे, अशा रितीने त्यांनी त्याचे घर सापडले व ते दाराशी उभे होते.
\v 18 त्यांनी आवाज देऊन विचारले, येथे शिमोन नावाचा आणि पेत्र म्हटलेला कोणी व्यक्ती राहण्यास उतरला आहे काय.
\s5
\v 19 पेत्र तो दृष्टान्त समजून घेण्याचा प्रयत्न करत असतांना देवाचा आत्मा त्याला म्हणाला, “ऐक पाहा! तुझी भेट घेण्यासाठी तीन पुरूष येथे आले आहे.
\v 20 तर आता ऊठ खाली उतर आणि त्यांच्यासोबत जा; त्यांच्यासोबत मी जाऊ नये असा विचार करू नको, कारण मीच त्यांना तुला नेण्यासाठी पाठवले आहे.”
\v 21 म्हणून पेत्र त्या पुरुषांकडे खाली गेला आणि म्हणाला, “नमस्कार! तुम्ही ज्याला शोधत आहात तो पुरूष मीच आहे तुम्ही येथे का आला आहात?”
\s5
\v 22 त्यांनी उत्तर दिले, “रोमी अधिकारी कर्नेल्याने आम्हांला येथे पाठवले आहे. तो एक चांगला मनुष्य असून देवाची उपासना करणारा आहे आणि जेही यहूदी लोक त्याला ओळखतात ते सगळे त्याला एक धार्मिक मनुष्य म्हणून पाहतात. एका दूताने त्याला सांगितले, “काही मनुष्यांना तू यापो येथे पाठव आणि तेथे शिमोन पेत्राला घेऊन त्याला येथे परत घेऊन ये, म्हणजे त्याला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही ऐकावे.”
\p
\v 23 म्हणून पेत्राने त्यांना आपल्या घरात आमंत्रित केले, आणि त्यांनी तेथे रात्रभर मुक्काम करावे अशी त्यांने त्यांना विनंती केली, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला आणि त्या पुरुषांसोबत गेला, यापोतील अनेक विश्वासणारेही तेथे त्यांच्यासोबत गेले.
\s5
\v 24 त्यानंतरच्या दिवशी कैसरिया शहरात ते पोहोंचले. कर्नेल्य त्यांची वाट पाहत होता. त्यानेही आपले नातेवाईक आणि जवळचे मित्र यांना तेथे बोलावले म्हणून तेही त्या घरात होते.
\s5
\v 25 पेत्राने जेव्हा घरात प्रवेश केला, कर्नेल्य उठून त्याची भेट घेण्यासाठी पुढे गेला आणि लवून त्याला नमन केले.
\v 26 परंतु पेत्राने कर्नेल्याला पकडले हाताने त्याला धरले आणि त्याला आपल्या पाय जवळून उभे केले,. तो त्याला म्हणाला, “ऊठ उभा राहा! माझा सन्मान करू नको! तुझ्यासारखाच मीही एक मनुष्य आहे.”
\s5
\p
\v 27 तो कर्नेल्याशी बोलत असतांना पेत्र आणि इतर लोकांनी घरात प्रवेश केला आणि त्यांनी पाहिले की इतर असंख्य लोक तेथे एकत्र आले आहेत.
\v 28 मग पेत्र त्यांना म्हणाला, “तुम्हा सर्वांना हे ठाऊक आहे की जर आम्ही कोणा परराष्ट्रीय लोकांना भेटतो किंवा त्याच्या सोबत जरी असतो तरी आम्ही आमचा यहूदी नियम तोडतो असा आम्ही विचार करतो. परंतु देवाने मला दृष्टान्तात हे दाखवले आहे की कोणीही असा अशुद्ध किंवा अस्वच्छ नाही की ज्याला देव स्वीकारू शकत नाही.
\v 29 म्हणून तू जेव्हा काही पुरुष्यांना मला येथे घेऊन येण्यासाठी पाठवेन मी कुठल्याही प्रकारची अट न ठेवता येथे आलो. तर कृपया मला सांग की तू मला येथे का बोलावले आहेस?”
\s5
\p
\v 30 कर्नेल्याने प्रतिउत्तर केले, “तीन दिवसा अगोदर जवळपास ह्यास वेळेस मी आपल्या घरात प्रार्थना करत होतो मी दुपारी तीन वाजता प्रार्थना करण्याचा माझा शिरस्त आहे तेव्हा तेजस्वी वस्त्र घातलेल्या कोणी एक मनुष्या माझ्या समोर उभा राहिला.
\v 31 आणि म्हणाला, ‘कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तू दरिद्र्यांना मदत केली आहे. म्हणून देव तुझ्यावर प्रसंन्न आहे.
\v 32 तर आता यापो शहरात संदेश वाहक पाठव आणि तेथून शिमोन म्हटलेल्या पेत्राला येथे घेऊन ये तो समुद्र किनारी ज्याचे नाव शिमोन आहे आणि जो कातडे तयार करतो अशा मनुष्याच्या घरी उतरलेला आहे.”
\v 33 आणि म्हणून मी त्वरित काही पुरुषांना तुला आणण्यासाठी पाठवले, आणि नक्कीच तू आला आहेस म्हणून तुझे मी आभार मानतो. तर आता आम्ही येथे सर्व एकत्र आलो आहोत आम्हांला हे ठाऊक आहे, की देव आमच्या सोबत आहे आणि प्रभू देवाने तुला जी काही आज्ञा केली आहे ते आम्ही ऐकावे तर कृपया तू आमच्याशी बोलावे.”
\s पेत्राचे भाषण
\s5
\p
\v 34 तर पेत्राने त्यांच्याशी बोलण्यास आरंभ केला, तो म्हणाला, “तर आता मला हे सत्य कळाले की देव विशिष्ट लोकांचा पक्षपात करत नाही.
\v 35 त्या ऐवजी प्रत्येक लोक गटातून जो कोणी त्याचा सन्मान करतो आणि त्याला आवडेल अशी कामे करतो त्याचा तो स्वीकार करतो.
\s5
\v 36 आम्हा इस्त्राएली लोकांना देवाने जो संदेश दिला तो तुला ठाऊक आहे. येशू ख्रिस्ताने जे केले त्यामुळे आम्ही लोक त्याच्या संगती शांतीत समेट करू ही आनंदाची बातमी त्याने आम्हांला पूर्वीच संदेष्ट्याच्याद्वारे सांगितली. हा येशू केवळ आम्हा इस्त्राएलांचा प्रभू नाही. हा संपूर्ण लोकांचा प्रभू आहे आणि सर्वांवर राज्य करतो, गालीलापासून सुरू करून संपूर्ण यहूदीयात त्याने जे कार्य केले ते तुला ठाऊक आहे.
\v 37 गालीलमध्ये राहून, त्याने पूर्ण यहूद्यांमध्ये काय केले हे तुला माहित आहे. बाप्तिस्मा करण्याअगोदर योहान लोकांना ही घोषणा करत असे की, त्यांनी आपआपल्या पातकापासून वळावे आणि बाप्तिस्मा घ्यावा तेव्हापासूनच येशू ती कामे करत आला आहे.
\v 38 नासरेथ गावातील पुरुष याला देवाने पवित्र आत्मा दिला आणि चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले हे तुला ठाऊक आहे आणि येशू अनेक ठिकाणी नेहमी चांगले करत आणि लोकांना बरे करत फिरला हे देखिल तुला माहित आहे सैतानाच्याद्वारे लोक पिडलेले होते अशा सर्वांना तो बरे करत फिरला येशू हे सगळे करू शकला कारण नेहमी देव त्याला मदत करत असे.”
\s5
\p
\v 39 संपूर्ण इस्त्राएलात यरुशलेमेमध्ये येशूने ज्या काही गोष्टी केल्या त्याच गोष्टी आम्ही प्रेषित लोकांना सांगितल्या. यरुशलेमेतील पुढाऱ्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून ठार केले.
\v 40 परंतु तो मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत व्हावा असे देवाने केले तो जिवंत झाला आहे हे सर्व यहूदी लोकांनी त्याला पाहावे असे देवाने केले.
\v 41 त्याऐवजी त्याने अगोदरच काही प्रेषितांना निवडून येशू मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाल्यावर त्यांना भेटावा आणि मग त्यांनी इतरांना त्याच्याविषयी सांगावे असे योजले होते तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला त्यावेळस आम्ही प्रेषितांनी त्याच्या संगती जेवणही केले.
\s5
\v 42 देवाने आम्हांला आज्ञा केली की आम्ही सर्व लोकांना उपदेश करावा आणि त्यांना सांगावे की एक दिवस सर्वांचा न्याय करण्यासाठी देवाने येशूची नियुक्ती केली आहे तो न्याय करेल, सर्व जिवंताचा व त्या दिवसापर्यंत मेलेल्यांचा अशा सर्वांचा तो न्याय करेल.
\v 43 फार काळापूर्वी अनेक संदेष्ट्यांनी त्याच्याविषयी लोकांना लिहिले त्यांनी लिहिले की जर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील तर देव त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेल, कारण की हा मनुष्य त्यांच्यासाठी हे घडवेल.
\s परराष्ट्रीयांवर आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो
\s5
\p
\v 44 पेत्र हे शब्द त्यांच्याशी बोलत असतांना अचानक पवित्र आत्मा खाली उतरून त्या सर्व परराष्ट्रीय लोकांवर आला जे संदेश ऐकत होते.
\v 45 यापो येथून पेत्रा संगती आलेले यहूदी विश्वासणारे हे पाहून आश्चर्यचकित झाले की देवाने परराष्ट्रीय लोकांवरही आपला पवित्र आत्मा उदारपणे ओतला आहे.
\s5
\v 46 देवाने हे केले असे यहूदी विश्वासणाऱ्यांना दिसून आले कारण त्यांनी त्या लोकांना ज्या भाषा त्यांनी कधी शिकल्या नाही अशा भाषेत देवाचे गौरव करतांना पाहिले.
\v 47 मग पेत्र इतर यहूदी विश्वासणाऱ्यांना जे त्याच्या सोबत होते त्यांना म्हणाला, “आम्हां यहूदी विश्वासणाऱ्यांना जसा पवित्र आत्मा दिला तसाच देवाने त्यांनाही दिला आहे, तर आपण आता सगळे एकमताने त्यांचा बाप्तिस्मा होईल असे सहमत होऊ या!”
\v 48 मग पेत्र त्या परराष्ट्रीय लोकांना म्हणाला की त्यांचाही येशू ख्रिस्ताच्या नावात विश्वासणारे म्हणून बाप्तिस्मा व्हायला हवा, म्हणून त्यांनी त्या सर्वांचा बाप्तिस्मा केला त्यांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पेत्राने अनेक दिवस त्याच्यासोबत राहावे अशी त्यांनी विनंती केली म्हणून पेत्र व इतर विश्वासणाऱ्यांनी तसेच केले.
\s5
\c 11
\s पेत्राचे आत्मसमर्थन
\p
\v 1 यहूदीया प्रांतात वेगवेगळ्या गावामध्ये राहणाऱ्या इतर विश्वासणाऱ्यांनी व प्रेषितांनी लोकांना हे म्हणतांना ऐकले की, परराष्ट्रीय लोकांनीही येशूविषयीचा देवाचा संदेश ऐकला आहे व त्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे.
\v 2 परंतु यरुशलेमेमध्ये काही यहूदी विश्वासणारे होते जे ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांनी सुंता करत अशी इच्छा ठेवणारे होते. जेव्हा पेत्र कैसरीयाहून यरुशलेमेत परत आला तेव्हा ते त्याला भेटले आणि त्यांनी त्याच्यावर टीका केली.
\v 3 ते त्याला म्हणाले, “सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांच्या घरी जाऊन भेट देणे येथे तर तू चुकल्या शिवाय तू त्यांच्यासंगती जेवणही केलेस!”
\s5
\p
\v 4 तेव्हा पेत्राने नेमके काय घडले होते हे त्यांना समजावून सांगण्यास सुरवात केली.
\v 5 तो म्हणाला, “मी यापो शहरात प्रार्थना करत असतांना मला एक दृष्टान्त झाला. जेथे मी होतो तेथे मी पाहिले की एका मोठ्या चादरीचे चार कोपरे धरून आकाशातून खाली सोडली जात आहे.
\v 6 मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत असतांना त्यात मी काही पाळीव प्राणी व जंगली प्राणी श्वापदे व पक्षी पाहिले.
\s5
\v 7 मग देवाने मला आज्ञा केली ती मी ऐकली, ‘पेत्रा ऊठ व यांना मार व खा!
\v 8 परंतु मी उत्तर दिले, ‘प्रभू मी हे करावे अशी तुझी खरोखर इच्छा नसावी, कारण आमच्या नियमात ज्या गोष्टी खाण्यास मनाई केली आहे त्या आजवर मी कधीही खाल्येल्या नाहीत!
\v 9 देव स्वर्गातून दुसऱ्यांदा माझ्याशी बोलला, ‘मी देव आहे म्हणून मी जर एखादी गोष्ट खाण्यासाठी योग्य ठरवली आहे तर ती तू अशुद्ध ठरवू नकोस.”
\v 10 हिच घटना आणखी दोन वेळेस घडली, आणि त्यानंतर ती चादर त्यातील सर्व प्राणी आणि पक्षी यांना पुन्हा परत आकाशात परत घेण्यात आले.
\s5
\p
\v 11 अगदी त्याच क्षणाला कैसरीयाहून मला माझ्या घरी शोधण्यासाठी पाठवण्यात आलेली ती तीन माणसे पोहोंचली.
\v 12 देवाच्या आत्म्याने मला सांगितले की, ती माणसे परराष्ट्रीय आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी मागेपुढे पाहू नये. माझ्यासंगती सहा यहूदी विश्वासणारे हे कैसरीयाला गेले, आणि मग आम्ही त्या परराष्ट्रीय माणसाच्या घरी गेलो.
\v 13 त्याने आम्हांला सांगितले की त्याने त्याच्या घरात एक देवदूत उभा असलेला पाहिला. देवदूताने त्याला सांगितले, ‘काही माणसे यापोला पाठव आणि शिमोन म्हटलेला ज्याचे दुसरे नाव पेत्र आहे त्याला घेऊन ये.”
\v 14 तू व तुझ्या घराण्यातील इतर सर्वांचे तारण कसे होईल हे तो तुला सांगेल.”
\s5
\v 15 मी त्यांच्याशी बोलण्याचा आरंभ केला तेव्हा पेन्टेकॉस्ट सणाच्या दिवशी पहिल्यांदा आपल्यावर जसा पवित्र आत्मा उतरला तसाच त्यांच्यावरही अचानक पवित्र आत्मा उतरला.
\v 16 मग प्रभू जे बोलला तेव्हा त्याची मला आठवण झाली, ‘योहान तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करेल परंतु देव तुम्हाला पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा देईल.
\s5
\v 17 आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर देवाने आम्हांला जो पवित्र आत्मा दिला तोच त्याने परराष्ट्रीयांनाही दिला आहे. तर देवाने त्यांना पवित्र आत्मा दिला असता मी देवाला चूक ठरवू शकत नाही. “देवाने त्यांना पवित्र आत्मा दिला तर मी देवाला हे सांगू शकत नाही की त्याने चूक केली आहे.”
\p
\v 18 पेत्राचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या यहूदी विश्वासणाऱ्यांनी त्याच्यावर टीका करणे थांबवले. त्या ऐवजी ते देवाची स्तुती करत म्हणाले, “जर परराष्ट्रीय आपल्या पापी स्वभावापासून वळतील तर देवही त्यांना अनंतकाळचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून स्वीकारतो हे आता आपल्याला स्पष्ट झाले आहे.”
\s परराष्ट्रीयांमधून झालेली ख्रिस्ती मंडळी
\s5
\p
\v 19 स्तेफनाचा मृत्यु झाल्यावर अनेक विश्वासणाऱ्यांनी यरुशलेम सोडले आणि ते इतर ठिकाणी गेले कारण यरुशलेमेत त्यांना फार छळ सोसावा लागत होता. त्यापैकी काही लोक फेनिके येथे गेले काही लोक कुप्र बेटावर गेले आणि इतर काही अंत्युखिया सीरियातील एक गाव येथे गेले आणि त्या ठिकाणांवर ते येशूचा संदेश निरंतर लोकांना सांगत राहिले परंतु त्यांनी केवळ यहूदी लोकांनाच तो दिला.
\v 20 त्यापैकी काही विश्वसणारे लोक कुप्र बेटावरील होते तर काही उत्तर आफ्रिकेतील कुरेनेकर या शहराचे होते ते अंत्युखियात गेले आणि त्यांनीही परराष्ट्रीय लोकांना प्रभू येशूविषयी सांगितले.
\v 21 प्रभू देव विश्वसणाऱ्यांना प्रभावीपणे उपदेश करण्यासाठी सामर्थ्याने सक्षम करत होता. परिणामी असंख्य परराष्ट्रीय लोक यांनी त्यांच्या संदेशावर विश्वास ठेवला आणि प्रभूवर भरोसा ठेवला.
\s5
\p
\v 22 यरुशलेमेतील विश्वसणाऱ्यांच्या समूहाने लोकांकडून हे ऐकले की अंत्युखियातही असंख्य लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत म्हणून यरुशलेमेतील विश्वसणाऱ्यांच्या पुढाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.
\v 23 जेव्हा तो तेथे पोहोंचला तेव्हा विश्वसणाऱ्यांसोबत देवाने त्याची दया कशी दाखवली हे त्याला दिसले तर तो अत्यंत आनंदित झाला आणि त्याने सर्व विश्वसणाऱ्यांना प्रोत्साहित केले की त्यांनी प्रभू येशूवर पूर्णपणे भरोसा ठेवावा.
\v 24 बर्णबा हा चांगला मनुष्य होता आणि तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता आणि तो देवावर पूर्णपणे विश्वास ठेवत असे. बर्णबाने जे केले त्यामुळे तेथील अनेक लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला.
\s5
\p
\v 25 नंतर बर्णबा शौलाचा शोध करायला किलिकियातील तार्सास या ठिकाणी गेला.
\v 26 त्याचा तेथे शोध लागल्यावर बर्णबाने त्याला अंत्युखियात आणले जेणेकरून तो विश्वसणाऱ्यांना शिकवण्यासाठी सहकार्य करेल. अशा रितीने बर्णबा शौल तेथील मंडळ्या नियमीतपणे भेटत राहिले आणि खुप लोकांना त्याने येशूविषयी शिक्षण दिले अंत्युखिया येथिल शिष्यांना ख्रिस्ती हे नाव मिळाले.
\s बर्णबा व शौल यरुशलेमेस जातात
\s5
\p
\v 27 त्याच काळात बर्णबा शौल अंत्युखियात होते तेव्हा यरुशलेमेमधून काही विश्वसणारे जे संदेष्टे होते ते तेथे आले.
\v 28 त्यापैकी एक ज्याचे नाव अगब होते तो उभा राहिला आणि बोलला. देवाच्या आत्म्याने त्याला हे सुचवले की अनेक देशांमध्ये दुष्काळ पडला आहे. (रोमचा सम्राट क्लौद्याच्या ह्याच्या काळात हा दुष्काळ पडला आहे)
\s5
\v 29 अगब ह्याने जे म्हटले हे तेथील विश्वासणाऱ्यांनी ऐकले आणि त्यांनी एक निर्णय घेतला की ते काही पैसे जमा करतील आणि यहूदीयात राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांना मदत म्हणून पाठवतील त्यापैकी प्रत्येकजण जे देऊ शकत होता तेवढी रक्कम देण्याचा त्यांनी निर्णय केला.
\v 30 त्यांनी ते पैसे बर्णबा शौल यांच्यासोबत यरुशलेम येथील विश्वसणाऱ्यांच्या पुढाऱ्यांना पाठवले.
\s5
\c 12
\s हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका
\p
\v 1 जवळपास ह्याच वेळेत हेरोद अद्रिपा राजाने सैनिकांना पाठवून यरूशलेमेतील विश्वसणाऱ्यांना पुढाऱ्यांपैकी काहींना अटक करण्यासाठी सैनिकांना पाठवले, सैनिकांनी त्यांना तुरूंगात टाकले. त्यांनी हे केले कारण विश्वसणाऱ्यांना छळावे अशी त्याची इच्छा होती.
\v 2 प्रेषित योहान याचा मोठा भाऊ प्रेषित याकोब याचा वध करून त्याचे डोके धडापासून वेगळे करावे अशी आज्ञा एका सैनिकाने केली. आणि त्या सैनिकाने तसेच केले.
\s5
\v 3 यहूदी लोकांच्या पुढाऱ्यांना ह्या कृत्याने आनंद झाला आहे हे हेरोदाच्या लक्षात आले, म्हणून त्याने पेत्राला ही अटक करण्याची सैनिकांना आज्ञा दिली. यहूदी लोक भाकरी मध्ये खमिर न टाकता यहूदी लोकांच्या भाकर खाण्याच्या सणाच्या दिवसात ह्या घटना घडल्या. (यहूदी लोक सणाच्या दिवसात खमिर न घालता भाकर खातात त्या दिवसात ही घटना घडली.)
\v 4 त्यांनी पेत्राला अटक केल्यावर त्यांनी त्याला तुरूंगात टाकले. सैनिकांच्या चार गटांना त्यांनी पेत्राची राखण करण्यासाठी तेथे ठेवले. प्रत्येक गटात चार सैनिक होते. वल्हांडणाचा सण संपल्यावर यहूदी लोकांच्या समोर तुरूंगातून पेत्राला आणून त्याचा न्याय करावा ही हेरोदाची इच्छा होती. पेत्राला ठार करावे ही त्याची योजना होती.
\s5
\p
\v 5 म्हणून बरेच दिवस पेत्र तुरूंगात होता परंतु यरूशलेमेतील इतर विश्वासणाऱ्यांचा समुह देवाकडे कळवळीने प्रार्थना करत होते की देवाने त्याला मदत करावी.
\v 6 हेरोदाने पेत्राला बाहेर आणून सार्वजनिकपणे ठार करण्याची योजना ज्या दिवसांची होती त्या दिवसाच्या अगोदरच्या रात्री पेत्र दोन सैनिकांच्या मध्ये दोन साखळदंडांनी बांधलेला असा झोपलेला होता. आणि दोन सैनिक तुरूंगाचे दार राखत होते.
\s5
\v 7 अचानक प्रभू परमेश्वराचा दूत पेत्राच्या बाजूस उभा राहिला आणि तुरूंगाची ती खोली प्रकाशाने भरून गेली. देवदूताने पेत्राला त्याच्या बाजूस थापटून त्याला उठवले व त्याला म्हणाला, “लवकर ऊठ!” पेत्र ऊठत असतांना त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. तरीही सैनिकांना काय घडत आहे ह्याची जाणिव झाली नाही.
\v 8 मग देवदूत त्याला म्हणाला, “आपला कमरबंद बांध आणि आपले जोडे घाल!” पेत्राने सांगितल्याप्रमाणे केले. (मग देवदूत त्याला म्हणाला, “तू आपला अंगरखा घाल आणि माझ्या मागे ये!”)
\s5
\v 9 सांगितल्याप्रमाणे पेत्राने आपला अंगरखा घातला पायात जोडे घातले आणि तो देवदूताच्या मागे चालत तुरूंगाच्या कोठडीतून तो बाहेर आला, परंतु हे खरोखर घडत आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. त्याला असे वाटले की तो स्वप्न पाहत आहे.
\v 10 पेत्र आणि देवदूत दारावर पहारा देणाऱ्या दोन सैनिकांच्या जवळून गेले परंतु त्या सैनिकांच्या दृष्टीस ते पडले नाही. मग ते त्या लोखंडी दाराजवळ आले जे दार शहरात उघडते. ते दार स्वत:हून आपोआप उघडले मग पेत्र व देवदूत तुरूंगातून बाहेर पडले. एका रस्त्याने थोडे अंतर पुढे गेल्यानंतर, देवदूत अचानक अदृश्य झाला.
\s5
\v 11 यानंतर पेत्राला पुर्णपणे जाणिव झाली की जे काही घडले तो एक दृष्टांत नव्हता तर हे खरोखर घडले होते. मग त्याने विचार केला, आता मला कळाले की प्रभू परमेश्वराने मला मदत करण्यासाठी एक दूत पाठवला होता हेरोदाने माझ्यासाठी जी योजना केली होती त्यातून त्याने मला सोडवले. आणि यहूदी पुढाऱ्यांच्या ज्या अपेक्षा घडणार होत्या त्यातून त्याने मला मुक्त केले. “माझ्यासंगती जे काही घडेल ह्याची अपेक्षा जे यहूदी पुढारी करत होते आणि हेरोदाने माझ्यासंगती जे काही करण्याची योजना आखली होती त्यातून त्याने मला सोडवले.”
\p
\v 12 जेव्हा पेत्राला समजले की देवाने त्याला सोडवले आहे तो मरीयेच्या घरी गेला. ती मार्क म्हटलेल्या योहानाची आई होती. या ठिकाणी अनेक विश्वसणारे एकत्र झाले होते आणि ते देवाला प्रार्थना करत होते की देवाने पेत्राची मदत करावी.
\s5
\v 13 पेत्राने बाहेरून दार ठोठावले आणि एक दासी मुलगी जिचे नाव रुदा आहे ती बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी दाराजवळ आली.
\v 14 जेव्हा पेत्राने उत्तर दिले तेव्हा तिने त्याची वाणी ओळखली परंतु ती एवढी आनंदी आणि उत्साही झाली की तिने दार न उघडता ती आत पळत गेली!. पेत्र दाराशी उभा राहून दार ठोकत आहे अशी माहिती तिने इतर विश्वसणाऱ्यांना दिली.
\v 15 परंतु त्यापैकी तिला एक म्हणाला, “अरे तू वेडी झाली आहेस!” परंतु ती हे सांगत राहिली ती जे सांगत आहे ते सत्य आहे आणि ते तिला म्हणत राहिले, “नाही पेत्र असूच शकत नाही कदाचित तो त्याचा दूत असावा.”
\s5
\v 16 परंतु पेत्र दार ठोठावत राहिला. म्हणून शेवटी कोणीतरी दार उघडले, आणि त्यांनी पाहिले की तेथे पेत्र होता आणि ते पुर्णपणे आश्चर्यचकित झाले!
\v 17 पेत्राने आपल्या हाताने त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. आणि मग त्याने त्यांना परमेश्वर देवाने तुरूंगातून त्याला बाहेर कसे आणले त्याचे तंतोतंत वर्णन केले. तो त्यांना हे ही म्हणाला, “आपल्या समुहाचा पुढारी याकोब ह्याला जाऊन सांगा आणि इतर सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनाही काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघाला आणि आपल्या मार्गाने दुसरीकडे गेला.
\s5
\p
\v 18 दुसऱ्या दिवशी सकाळी जे सैनिक पेत्राचे रक्षण करत होते ते फार त्रासून गेले कारण त्याचे काय झाले ते त्यांना ठाऊक नव्हते.
\v 19 मग हेरोदाला ह्याविषयी कळाले. म्हणून त्याने सैनिकांना पेत्राला शोधण्याची आज्ञा दिली. परंतु ते त्याला शोधू शकले नाही. मग पेत्राचे रक्षण करणारे सैनिक ह्यांना त्याने चौकशीसाठी बोलावले मग आज्ञा केली की त्यांना ठार करण्याची शिक्षा द्यावी. त्यानंतर, हेरोद यहूदातून निघून खाली कैसरिया शहरास गेला, तेथे तो काही काळ राहिला.
\s हेरोदाचा मृत्यु
\s5
\p
\v 20 त्यानंतर हेरोद यहूदीया प्रांत सोडून कैसरीया शहरात गेला तेथे तो काही काळ राहिला. सोर व सिदोन या शहरांत राहणाऱ्या लोकांशी हेरोद अतिशय रागावलेला होता मग एके दिवशी या दोन्ही शहरांतून काही लोक प्रतिनिधी एकत्र येऊन हेरोदाला भेटण्यासाठी आले. त्यांनी ब्लस्त हेरोदाचा महत्वपूर्ण अधिकारी ह्याला विनंती केली की त्यांच्या शहरातील लोक हेरोद राजाशी शांती करू इच्छितात समेट करू इच्छितात. हेरोद राज्य करत होता त्या लोकांसंगती त्यांना व्यापार करायचा होता कारण त्यांना त्या भागातून अन्न-धान्य विकत घ्यायचे होते.
\v 21 ज्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे हेरोदाने योजिले होते त्या दिवशीच त्याने महागडी भरजरी वस्त्रे परिधान केली जे त्याच्या राजास त्याचे दर्शक होते. मग तो आपल्या सिहांसनावर बसला आणि तेथून त्याने त्या लोकांना भाषण दिले.
\s5
\p
\v 22 जे त्याचे ऐकत होते ते सगळे मोठमोठ्याने म्हणाले, “हा व्यक्ती जो बोलतोय तो देव आहे मनुष्य नव्हे.”
\v 23 हेरोदाने लोकांना स्वत:ची नव्हे तर देवाची स्तुती करू दिली लगेचच प्रभू देवापासून एका दूताने हेरोदाला तडाखा मारला आणि तो आजारी पडला असंख्य किड्याने त्याची आतडे खाल्ली आणि त्याचा मृत्यु फार वेदनामय झाला.
\s5
\p
\v 24 विश्वासणारे देवाचा संदेश वेगवेगळ्या बऱ्याच ठिकाणी सांगत होते आणि अनेक लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला व ते वाढतच गेले.
\p
\v 25 यहूदीया प्रांतातील विश्वासणाऱ्यांना बर्णबा आणि शौल ह्यांनी पैसे पोहोंचवण्याचे काम पूर्ण केल्यावर ते यरुशलेमेला निघाले तेथून सूरिया प्रांतातील अंत्युखिया शहरात परत आले तेथे त्यांनी योहान ज्याचे नाव मार्क होते त्याला आपल्या सोबत घेतले.
\s5
\c 13
\s अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळी
\p
\v 1 सूरिया भागातील अंत्युखियात विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये संदेष्टे आणि येशूविषयी लोकांना शिकवणारे ही होते. ते म्हणजे बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, आणि मनाएन जो राजा हेरोद अंतिपास ह्याच्या सोबत लहानाचा मोठा झाला होता, आणि शौल हे ते होते.
\v 2 ते उपास आणि प्रभूची उपासना करत असता पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “मी त्यांना जे काम करण्यासाठी निवडलेले आहे ते काम बर्णबा आणि शौल ह्यांनी करावे म्हणून त्यांना माझ्यासाठी वेगळे करा!”
\v 3 मग त्यांनी उपास आणि प्रार्थना सुरू ठेवली, त्यांनी आपले हात बर्णबा व शौल यांच्यावर ठेवले आणि देवाने त्यांना साहाय्य करावे अशी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पवित्र आत्म्याने त्यांना आज्ञापिले ते करण्यासाठी त्यांनी त्यांना पाठवले.
\s कुप्र येथे बर्णबा व शौल
\s5
\p
\v 4 बर्णबा आणि शौल यांनी कुठे जावे ते पवित्र आत्म्याने त्यांना सुचीत केले. म्हणून ते अंत्युखियाहून समुद्रामार्गे सलुकीया नावाच्या शहराकडे गेले. तेथून ते सलमीनांत ह्या कुप्र नावाच्या बेटावरील शहरात जहाजाने गेले.
\v 5 ते सलमीनांत येथे असतांना यहूदी सभास्थानामध्ये ते गेले. तिथे त्यांनी येशूविषयीचा देवाचा संदेश गाजवला. मार्क म्हटलेला योहानही त्यांच्यासोबत होता व तो त्यानां मदत करत असे.
\s5
\p
\v 6 त्या सर्व बेटातून ते तिघे जाऊन पफे नावाच्या शहरापर्यंत गेले. तेथे ते एका जादुगाराला भेटले त्याचे नाव बर्येशू असे होते. तो एक यहूदी होता आणि स्वतः संदेष्टा असल्याचा खोटा दावा करत होता.
\v 7 तेथील बेटाचा राज्यपाल सिर्ग्य पौल जो एक बुद्धिमान मनुष्य होता तो त्याच्यासोबत असे. तेव्हा राज्यपालाने कोणाला तरी बर्णबा आणि शौल यांना माझाकडे घेऊन या असे म्हणून पाठवले कारण त्याला देवाचे वचन ऐकायचे होते.
\v 8 परंतु अलीम जादुगार ज्याच्या नावाचा अर्थ ग्रीक भाषेत असा होतो, त्याने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या राज्यपालाने येशूवर विश्वास ठेऊ नये असे वारंवार प्रयत्न चालवले.
\s5
\v 9 परंतु शौल जो आता स्वतःला पौल ह्या नावाने बोलावत असे, तो पवित्र आत्म्याने सामर्थ्य पावला आणि त्याने त्या जादुगराकडे टक लावून पाहून त्याला म्हटले,
\v 10 “तू सैतानाची सेवा करत आहेस, आणि जे काही चांगले आहे त्या सगळ्याचा तू विरोधी आहेस! तू लोकांशी निरंतर लबाड्या करतोस आणि त्याच्या विरुध्द दुष्ट गोष्टी करतस . परंतु प्रभू परमेश्वराविषयीचे सत्य हे खोटे आहे असे बोलणे तू आता बंद कर!
\s5
\v 11 प्रभू परमेश्वर तुला आताच ह्याची शिक्षा करेल! तू आता आंधळा होशील आणि काही काळ तुला सूर्य दिसणार नाही.” त्याच क्षणी तो आंधळा झाला जणू काय अंधार त्याच्यावर पडला असे त्याला वाटले आणि तो इकडे तिकडे हात चाचपडत फिरू लागला जेणे करून कोणीतरी त्याचा हात धरावा आणि त्याला न्यावे.
\v 12 अलीमास काय झाले हे जेव्हा राजपालाने पाहिले तेव्हा त्याने येशूवर विश्वास ठेवला. प्रभू येशू विषयी पौल आणि बर्णबा जे काही शिकवत होते ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटले.
\s पिसिदियांतील अंत्युखियामध्ये पौलाने यहूद्यांना केलेला उपदेश
\s5
\p
\v 13 त्यानंतर पौल आणि त्यांच्या बरोबरील लोक जहाजाने पफे आणि पिर्गा शहर जे पंफुल्यीया प्रांतात होते तिथे गेले. ते पिर्गा येथे असतांना मार्क म्हटलेला योहान ह्याने त्यानां सोडले आणि तो यरुशलेमेत आपल्या घरी परत गेला.
\v 14 त्यानंतर पौल आणि बर्णबा जमिनीवरुन प्रवास करत पिर्गाहून अंत्युखिया शहरात आले जे गलतीय प्रांतातील पिसिदिया जिल्ह्यात होते. शब्बाथच्या दिवशी ते सभास्थानात गेले आणि जाऊन बसले.
\v 15 मोशेने नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले होते ते कोणी तरी मोठ्याने वाचले. त्यानंतर संदेष्ट्यांनी जे लिहिले होते त्याचे मोठ्याने वाचन केले. नंतर यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी पौल आणि बर्णबा यांच्याकडे संदेश पाठवला. ‘यहूदी बांधवानों जर तुम्हापैकी कोणाला आम्हां लोकांना बोलुण उत्साहित करायचे असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता.”
\s5
\v 16 मग पौल उभा राहिला आणि त्याने आपल्या हाताने लोकांनी ऐकावे असा इशारा केला मग तो म्हणाला, सोबतीच्या इस्त्राएल बंधूनो आणि तुम्ही जे परराष्ट्रीय लोक देवाची आराधना करता कृपया माझे ऐका!
\v 17 देव ज्याची आम्ही इस्त्राएली लोक सेवा, उपासना करतो, त्याने आमच्या पूर्वजांना त्याचे लोक होण्यास निवडले, आणि ते मिसर देशात परदेशी म्हणून राहत असतांना त्याने त्यानां संख्येने आतिशय बहुगुणित केले. आणि देवाने त्यानां गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अद्भुत असे कार्य केले.
\v 18 त्यानां गुलामगिरीतून सोडविण्यासाठी परमेश्वराने सामर्थ्यशाली कृत्य केले, जरी त्यांनी परत त्यांच्या आज्ञाउल्लंघन केले नाही तरी चाळीस वर्षे अरण्यात असतांना त्याने त्यांची काळजी घेतली.
\s5
\v 19 कनान देशात राहणाऱ्या सात लोकांना इस्राएलाने जिंकावे असे त्याने केले आणि त्याची जागा इस्राएली लोकांनी सदासर्वकाळ वास्तव्य करण्यासाठी दिली.
\v 20 आमचे पूर्वज इजिप्तला गेल्या नंतर चारशे पन्नास वर्षानंतर हे सर्व काही घडले.”
\p ‘त्या नंतर परमेश्वराने त्याच्या लोकांच्या सेवेसाठी न्यायाधीश इस्राएली लोकांवर पुढारी म्हणून नेमले. ह्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांवर अधिकार करणे सुरू ठेवले आणि शमुवेल संदेष्टा हा न्यायाधिशापैकी शेवटला होता.
\s5
\v 21 शमुवेल त्यांचा पुढारी असतांना लोकांनी त्यांच्यावर एक राजा निवडावा व नियुक्त करावा ही मागणी केली. म्हणून देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा मुलगा शौल ह्याची त्यांच्यावर राजा म्हणून निवड केली. त्याने चाळीस वर्ष त्यांच्यावर राज्य केले.
\v 22 देवाने शौलाचा राजा म्हणून त्याग केल्यानंतर त्याने दावीदाला त्याचा राजा म्हणून निवडले. देवा त्याच्याविषयी म्हणाला, ‘मला ज्या गोष्टीची आवड आहे तशीच आवड ज्या मनुष्याला आहे असा दावीद इशायाचा पुत्र मला आढळला आहे. मला जे हवे आहे ते सर्व तो करेल.””
\s5
\p
\v 23 “दावीदाच्या वंशातूनच देवाने येशू ह्याला आपल्यासाठी आणले जेणे करुन तो इस्राएली लोकांचा बचाव करेल. आणि दावीदाला अभिवचन दिले त्याप्रमाणे तो आपल्या पूर्वजा सोबत करेल.
\v 24 येशूने आपले कार्य सुरू करण्याअगोदर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने जे इस्राएल लोक त्याच्याकडे आले त्यानां उपदेश केला त्यांनी आपल्या पापी स्वभावापासून मागे वळून परमेश्वराला क्षमा मागावी असे त्याने त्यांना शिकवले. त्यानंतर तो त्यांचा बाप्तिस्मा करत असे.
\v 25 देवाने त्याला जे काम दिले ते जेव्हा योहान संपवित होते तेव्हा तो असे म्हणत असे, ‘देवाने तुम्हाला अभिवचन दिलेला मसीहा मी आहे असे तुम्ही विचार करता काय? नाही मी तो नाही. परंतु ऐका! मसीहा लवकरच येणार आहे. तो इतका महान आहे की मी त्याच्या पायतणाचा बंध सोडावयासही योग्य नाही.””
\s5
\p
\v 26 ‘इस्राएली बंधूनो तुम्ही जे अब्राहामाचे वंशज आहात आणि परराष्ट्रीय लोकांनो जे तुम्ही देवाची उपासना करता कृपया ऐका! देवाने आपल्या लोकांचे तारण कसे करायचे हा संदेश त्याने आपल्या सर्वांना दिला आहे.
\v 27 यरुशलेमेत राहणारे लोक आणि त्याच्या अधिकाऱ्यांना हे समजले नाही की देवाने आम्हांला तारण्यासाठी पाठविलेला मनुष्य म्हणजे येशू हा होय. जरी दर शब्बाथ दिवशी संदेष्ट्यांनी लिहलेले शास्त्र लेख मोठ्याने वाचण्यात येतात तरी संदेष्टे मसीहा विषयी काय म्हणत होते ते त्यांना समजले नव्हते म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी येशूला मृत्युदंड दिला आणि संदेष्ट्यांनी भाकीत केल्याप्रमाणे होते.
\s5
\v 28 अनेक लोकांनी येशूला दुष्ट गोष्टी करण्याविषयी दोष आरोप लावला परंतु ते त्याच्यापैकी कोणीही हे सिद्ध करू शकला नाही की त्याने असे कोणते काम केले त्यासाठी त्याला मृत्युदंड व्हावा, आणि त्यांनी पिलात जो राज्यपाल होता त्याला येशूला मरणदंड देण्याची विनंती केली.
\v 29 संदेष्ट्यांनी फार वर्षापूर्वी लिहिल्याप्रमाणे लोक मसीहा संगती काय करतील ते सर्व त्यांनी येशूसंगती केले त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले मग त्याचे शरीर वधस्तंभावरून उतरवण्यात आले आणि त्यांनी त्याला एका कबरेत ठेवले.
\s5
\v 30 परंतु, देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा जिवंत केले.
\v 31 गालीलाहून यरुशलेममध्ये जे त्याचे अनुयायी आले होते त्यानां अनेक दिवसापर्यंत निरंतर तो दर्शन देत गेला. ज्यांनी त्याला पाहिले ते आता त्याच्याविषयी लोकांना सांगत आहेत.”
\s5
\p
\v 32 ह्याच वेळी आम्ही तुम्हाला ही शुभवार्ता सांगत आहोत देवाने आपल्या यहूदी पूर्वजांना जे अभिवचन दिले ते त्याने आता परिपुर्ण केले आहे!
\v 33 त्याने त्याच्या वंशजांना जे सांगितले होते ते आपल्या संगती केले आहे आणि जे यहूदी नव्हते त्यांच्यासाठी येशू पुन्हा जिवंत झाल्याने ते काम केले आहे. दावीदाला दुसऱ्या स्तोत्रामध्ये देव आपल्या पुत्राला पाठवेल ह्या विषयी जे बोलला त्याप्रमाणे हे आहे,
\q ‘तू माझा पुत्र आहेस:
\q आज मी तुला आपला पुत्र बनवले.”
\p
\v 34 देवाने मसीहाला मृत्युतून पुन्हा जिवंत केले आहे आणि तो आता पुन्हा कधी मरणार नाही. ह्या विषयी देवाने आपल्या यहूदी पूर्वजांना असे म्हटले, ‘मी तुम्हाला नक्कीच मदत करेन दावीदाला अभिवचन दिल्याप्रमाणे मी नक्कीच करेन.”
\s5
\v 35 आणखी एका दुसऱ्या स्तोत्रात दावीद मसीहा विषयी असे म्हणतो; ‘त्या पवित्र शरीराला तू कुजू देणार नाही.”
\v 36 दावीद जिवंत असतांना त्यानां देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही केले. आणि जेव्हा तो मरण पावला त्याचे शरीर पुरण्यात आले त्याच्या पूर्वजांच्याप्रमाणेच त्याचे शरीर पुरले गेले आणि त्याचे शरीर कुजले. म्हणून या स्तोत्रात तो नक्कीच स्वतः विषयी बोलत नव्हता.
\v 37 परंतु येशूला देवाने मृत्युतून जिवंत केले, उठवले आणि त्याचे शरीर कुजले नाही.”
\s5
\p
\v 38 म्हणून माझ्या सोबतीच्या इस्त्राएलांनो आणि इतर मित्रांनो, येशूने जे केले त्याच्या परिणामामुळे तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की देव तुमच्या पापांची क्षमा करू शकतो. मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राप्रमाने ज्या पातकांची तुम्हाला क्षमा होऊ शकत नाही त्याही पापाची तो क्षमा करू शकतो.
\v 39 देवाला न आवडणांऱ्या अशा कोणत्याही गोष्टींचा दोष येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर आता ह्या पुढे लागु होत नाही.
\s5
\v 40 म्हणून आता हे लक्षपुर्वक ऐका की संदेष्टयांनी जे सांगितले होते देव न्याय करणार आहे आता तो न्याय करत नाही!
\v 41 संदेष्ट्याने असे लिहले की देव असे म्हणतो,
\q जे तुम्ही मला नावे ठेवता मी काय करणार आहे ते पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, आणि मग तुमचा नाश होईल. तुम्ही जिवंत असतांनाच मी तुमच्यासाठी भयानक गोष्टी करीन ज्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी जे काही करणार आहे ते कोणी येवून तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही!
\s5
\p
\v 42 पौलाने त्यांच्याशी आपले बोलणे संपवल्यावर तो निघून जात असतांना त्यांच्यापैकी अनेक लोक त्याच्याकडे आले व पुढल्या शब्बाथी ही त्याने यावे ह्या गोष्टीविषयी अधिक बोलावे अशी त्याला विनंती केली.
\v 43 ही सभा संपल्यानंतर अनेक लोक पौल आणि बर्णबाच्या मागे चालू लागले आणि हे लोक देवाची उपासना करणारे यहूदी व परराष्ट्रीयही होते. पौल आणि बर्णबा हे त्यांच्याशी बोलत राहिले. आणि त्यांना विनंती करत राहिले की त्यांनी देवावर भरवसा ठेवावा. जो येशूने केलेल्या कामामुळे लोकांच्या पापाची दयेने क्षमा करतो.
\s प्रेषित परराष्ट्रीयांकडे वळतात
\s5
\p
\v 44 पुढील शब्बाथच्या दिवशी अंत्युखियातील बहुतांश लोक यहूदी सभास्थानात येशूविषयी पौल आणि बर्णबा ह्यांना बोलतांना ऐकावे म्हणून एकत्र जमले.
\v 45 पौल आणि बर्णबा यांचे ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली हे बघून यहूदी पुढाऱ्यांना त्याच्याविषयी खुप इर्षा वाटली म्हणून ते पौल जो बोलत होता त्याच्या विरोधात बोलू लागले आणि त्याचा अपमान करू लागले.
\s5
\v 46 आणि म्हणून धैर्याने पौल आणि बर्णबा ह्या यहूदी पुढाऱ्यांना म्हणाले, ‘येशूविषयीचा देवाचा संदेश तुम्हा यहूदीयांना प्रथम द्यावा हे अगत्याचे होते कारण देवाने आम्हांला अशी आज्ञा केली आहे. परंतु तुम्ही देवाचा संदेश नाकारत आहात. असे केल्याने हे तुम्ही दाखवून देत आहात की तुम्ही सार्वकालिक जीवनाच्या योग्यतेचे नाही. म्हणून आता आम्ही तुम्हाला सोडून या पुढे परराष्ट्रीय लोकांमधे देवाचा हा संदेश सांगू.
\v 47 आणि आम्ही हे करत आहोत कारण प्रभू देवाने आम्हांला तसे करण्याची आज्ञा केली आहे. त्याने आम्हांला असे सांगितले की,
\q ‘मी तुला परराष्ट्रीय लोकांना माझे रहस्य प्रकट करण्यासाठी निवडले आहे जेणे करुन त्यांना प्रकाश प्राप्त व्हावा. मी तुम्हाला संपूर्ण जगातील लोकांना तारणाचा संदेश देण्यासाठी निवडले आहे.””
\s5
\p
\v 48 जेव्हा परराष्ट्रीय लोकांनी त्याचे हे शब्द ऐकले तेव्हा ते अत्यानंद झाले, आणि त्यांनी येशूच्या संदेशाबद्दल देवाला स्तुती केली. ज्या सर्व परराष्ट्रीय लोकांना देवाने सार्वकालिक जीवनासाठी विश्वास ठेवावा म्हणून निवडले त्यांनी प्रभू येशूच्या संदेशावर विश्वास ठेवला.
\v 49 त्यावेळेस त्या भागात अनेक विश्वासणारे प्रवास करत होते आणि प्रभू येशूचा संदेश जेथे कुठे ते जात तेथे पसरवत होते.
\s5
\p
\v 50 परंतु काही यहूदी पुढाऱ्यांनी त्याच्या सोबत उपासना करणाऱ्या महत्वाच्या स्त्रियांनी तसेच शहरातील महत्वपूर्ण माणसांची बोलनी केली त्यांनी पौल आणि बर्णबा यांना थांबवावे असे त्याचे मत बनवले. अश्याने त्या परराष्ट्रीय लोकांनी पौल आणि बर्णबा त्यांच्या विरुध्द लोकांना चिथवले आणि त्यांनी त्यांना त्याच्या भागातून हकलून लावले.
\v 51 ते दोन प्रेषित तेथून जात असता त्यांनी आपल्या पायाची धूळ झटकली ह्यासाठी की त्या पुढाऱ्यांना हे समजावे की देवाने त्यांना नाकारले आहे आणि तो त्यांना शासन करील. मग ते अंत्युखिया शहराकडे परत गेले आणि तेथून ते ईकुन्या या शहरी गेले.
\v 52 दरम्यान विश्वासणारे आनंदाने परिपूर्ण होत राहिले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरत राहिले.
\s5
\c 14
\s इकुन्यामध्ये पौल व बर्णबा
\p
\v 1 इकुनियांत पौल आणि बर्णबा नेहमी प्रमाणे यहूदी सभास्थानांत गेले आणि तेथे येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी सामर्थ्याने भाषण केले. परिणामी अनेक यहूदी आणि बऱ्याच गैर यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेवला.
\v 2 परंतु काही यहूद्यांना त्या संदेशावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. त्यांनी गैर यहूद्यांनी त्यावर विश्वास न ठेवण्यास सांगितले; आणि काही परराष्ट्रीय ह्यांना विश्वासणाऱ्यांनी चेतवले.
\s5
\v 3 म्हणून पौल आणि बर्णबाने तेथे बराच काळ प्रभू येशू विषयी धैर्याने बोलण्यास घालवला आणि प्रभू येशूने त्यांना तेथे अनेक चमत्कार करण्यास सक्षम केले अशा प्रकारे त्याने लोकांना हा सत्य संदेश दर्शवला की जरी आमची लायकी नाही तरीही प्रभू आमचे तारण करतो.
\p
\v 4 इकुन्यांत राहणाऱ्या लोकांचे दोन भाग झाले, काही यहूदीयां संगती सहमत होते. तर काही प्रेषितांसंगती सहमत होते.
\s5
\v 5 पौल आणि बर्णबा ह्यांचा विरोध करणारे यहूदी आणि परराष्ट्रीय एकत्र येऊन पौल आणि बर्णबा ह्यांना कशा प्रकारे वागणूक द्यावी ह्याविषयी आपसात चर्चा करू लागले. शहरातील काही पुढाऱ्यांनी त्यांचे सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. दगडमार करून पौल आणि बर्णबा ह्यांना ठार करावे असा एकत्रित पणे त्यांनी निर्णय घेतला.
\v 6 परंतु पौल आणि बर्णबा ह्यांना त्यांची योजना कळाली आणि म्हणून ते लायकोनिया ह्या जिल्ह्याकडे लवकर निघून गेले. लुस्त्रा व दर्बे ह्यांच्या शहरांमध्ये आणि आसपासच्या प्रदेशात देखिल हे गेले;
\v 7 ते त्या भागात असतांना त्यांनी लोकांना प्रभू येशूचा संदेश निरंतर सांगितला.
\s लुस्र येथे पौल व बर्णबा
\s5
\p
\v 8 लुस्त्रामध्ये बाल पणापासून पायांनी अधू असलेला एक मनुष्य त्यांचे ऐकत होता. त्याच्या आईने त्याला जन्म दिला तेव्हा पासूनच त्याचे पाय अधू होते आणि तो कधी चालला नव्हता.
\v 9 प्रभू येशूविषयी पौल बोलत असता तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर त्याला असे दिसले की येशू मला बरे करू शकतो असा तो विश्वास ठेवत आहे.
\v 10 म्हणून मोठ्या आवाजात त्याला पाहून म्हटले, “उभा राहा!” जेव्हा त्या माणसाने ऐकले तो लागलेच आपल्या पायावर उडी मारून उभा राहिला आणि चालू लागला.
\s5
\p
\v 11 पौलाने काय केले हे लोकांनी पाहिले असता त्यांना वाटले की ज्या दैवतांची ते उपासना करतात तेच पौल आणि बर्णबा आहे. म्हणून ते आपल्या लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाले, “पाहा! देव मानव रुपात आपल्याकडे आकाशातून खाली उतरून आला आहे जेणेकरून त्याने आपल्याला मदत करावी;”
\v 12 ते आपसात बोलू लागले की कदाचित बर्णबा हा मुख्य दैवत असावा ज्याचे नाव ज्युपितर आहे. आणि ते पौलाला मर्क्युरी म्हणजे इरत दैवतांचा संदेष्टा असे संबोधू लागले. पौल बोलणारा होता म्हणून ते त्याविषयी असा विचार करत होते.
\v 13 त्या शहराच्या वेशीच्या जवळच एक मंदिर होते जेथे हे लोक ज्युपितरची उपासना करत असे. तेथे जो पुजारी होता त्याने पौल आणि बर्णबा ह्यांनी जे केले ते ऐकले आणि तो वेशीजवळ लोक जमले होते तेथे आला. आपल्या सोबत तो दोन बैल घेऊन आला त्यांच्या गळ्यांभोवती फुलांच्यामाळा लटकवलेल्या होत्या. पौल आणि बर्णबा ह्यांची उपासना करण्याच्या हेतूने त्या बैलांचे बलिदान करावे, अशी त्या पुजाऱ्यांची आणि लोकांच्या गर्दिची इच्छा होती.
\s5
\v 14 परंतु बर्णबा आणि पौल ह्या प्रेषितांनी हे ऐकले तेव्हा ते फार उदास झाले आणि त्यांनी आपले वस्त्रे फाडली आणि ते लोकांमध्ये गेले, आणि मोठ्याने ओरडले,
\v 15 “मनुष्यांनो आमची उपासना करण्यासाठी तुम्ही त्या बैलांना ठार करू नका! आम्ही देव नाही! तुमच्यासारखे भावना असणारे आम्हीही केवळ मानव आहोत; आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी आलो आहोत! सर्वसमर्थ देव ह्याच्याविषयी सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत; आमची इच्छा आहे की तुम्ही इतर दैवतांची उपासना करने थांबवावे कारण ते तुम्हाला मदत करू शकत नाहीत. ह्या खऱ्या देवाने आकाशे, स्वर्ग, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले.
\v 16 भुतकाळात सर्व परराष्ट्रीय लोकांनी ज्या कोणत्या दैवतांची इच्छा होती त्यांची तुम्ही उपासना केली आहे. देवाने ही तुम्हाला त्यांची उपासना करू दिली कारण की तुम्ही त्याला ओखळत नव्हता.
\s5
\v 17 परंतु त्याने आम्हांला हे दाखवून दिले की तो सर्वांशी दयेने वागणारा देव आहे. तोच पाऊस पाडतो आणि पिकांना उगवितो, आणि वाढवतो. तो तुम्हाला विपुल धन धान्य देऊन तुमचे अंतःकरणे आनंदाने भरतो.”
\v 18 पौल जे म्हणाला ते लोकांनी ऐकले परंतु तरीही पौल आणि बर्णबाची उपासना करावी म्हणून त्या बैलांचा बळी देण्याच्या विचारात ते होते परंतु शेवटी लोकांनी निर्णय घेतला की त्यांनी तसे करू नये.
\s5
\p
\v 19 तर अंत्युखियातून आणि इकुनियांतून काही यहूदी लोक तेथे आले आणि लुस्त्र तेथील लोकांनी पौल जे सांगत होता तो संदेश सत्य नाही असे अनेकांचे मन वळवले त्या यहूदी लोकांचे म्हणणे ऐकून ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते पौलावर रागावले. त्यांनी यहूदी लोकानांही पौलाला दगडमार करण्याची परवानगी दिली आणि तो खाली पडून बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी त्याला दगडमार केले. त्या सर्वांना असे वाटले की तो मेला आहे म्हणून त्यांनी त्याला ओढत शहराबाहेर नेऊन टाकले आणि तेथे त्याला मरावयास सोडले.
\v 20 परंतु लुस्त्रातील काही विश्वासणारे आणि ते जेथे त्याला टाकले होते तेथे पौलाभोवती उभे राहिले. आणि पौल शुद्धिवर आला; तो उभा राहिला आणि पुन्हा विश्वासणाऱ्यांसहित शहरात गेला.
\p दुसऱ्या दिवशी पौल आणि बर्णबा ह्यांनी लुस्त्र शहर सोडून दर्बे या शहराकडे प्रस्तान केले.
\s अंत्युखियास परतणे
\s5
\p
\v 21 तेथे ते बरेच दिवस राहिले, आणि प्रभू येशूची सुवार्ता लोकांना सांगत राहिले, अनेक लोक विश्वासणारे झाले आणि ह्यानंतर पौल आणि बर्णबा आपल्या पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले ते पुन्हा लुस्त्र येथे गेले तेथून ते इकुनियांत गेले, आणि त्यानंतर ते इकुन्या प्रांतातील अंत्युखिया येथे गेले.
\v 22 प्रत्येक ठिकाणी त्यांनी विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर निरंतर भरवसा ठेवत राहावा अशी कळकळीची विनंती केली त्यांनी विश्वासणाऱ्यांना सांगितले, “देव आपल्यावर युगानयुग राज्यकरण्या अगोदर आपल्या सर्वांना संकटाचा सामना करावा लागेल.”
\s5
\v 23 पौल आणि बर्णबा ह्यांनी त्यांच्या मंडळीसाठी पुढारी नेमले पौल आणि बर्णबा ह्यांनी प्रत्येक काम सोडण्याअगोदर तेथील विश्वासणाऱ्यांना एकत्र केले त्यांच्यासोबत प्रार्थनेत आणि उपासात वेळ घालवला. मग पौल आणि बर्णबा ह्यांनी त्या पुढाऱ्यांना व इतर विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूच्या हातात समर्पित केले ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. त्यानेच त्यांची काळजी घ्यावी.
\p
\v 24 पिसिदिया जिल्ह्यात पौल आणि बर्णबा ने प्रवास केल्यानंतर ते दक्षिणेकडे पंफुल्यांत गेले.
\v 25 त्या जिल्ह्यामध्ये ते पिर्गा या शहरात आले आणि तेथे प्रभू येशूविषयी देवाचा संदेश तेथील लोकांना सांगितला, मग तेथून ते समुद्र किनाऱ्याजवळील अत्तलिया शहरात गेले.
\v 26 आणि तेथे त्यांना एक जहाज मिळाले आणि ते सूरिया प्रांतातील अंत्युखियास शहराकडे परत गेले ही तिच जागा होती जेथून पौल आणि बर्णबा ह्यांना इतर जागी जाऊन उपदेश करण्यासाठी निवडण्यात आले होते. आणि तेथेही विश्वासणाऱ्यांनी देवाकडे पौल आणि बर्णबा ह्यांना ज्या कामासाठी त्यांना निवडले आहे त्यासाठी त्यांना मदत करावे अशी प्रार्थना त्यांनी केली होती.
\s5
\v 27 जेव्हा ते अंत्युखिया शहरात आले तेव्हा त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले पौल आणि बर्णबा ह्यांनी देवाने त्यांना कशी मदत केली ते सर्व सविस्तर सांगितले आणि परराष्ट्रीय लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा असे देवाने केले ही गोष्ट त्यांनी विशेषतः त्यांना सांगितली.
\v 28 मग पौल आणि बर्णबा इतर विश्वासणाऱ्यांसोबत बराच काळपर्यंत अंत्युखियात राहिले.
\s5
\c 15
\s परराष्ट्रीयातले ख्रिस्ती व मोशेचे नियमशास्त्र
\p
\v 1 यहूदी प्रांतातील काही विश्वासणारे अंत्युखियास येथे गेले. त्यांनी तेथे काही परराष्ट्रीय विश्वसणाऱ्यांना शिकवण्यास आरंभ केला, ते म्हणाले, “मोशेला देवाकडून मिळालेला नियमशास्त्राप्रमाणे तुम्ही देवाचे आहात हे दाखवण्यासाठी तुमची सुंता झालीच पाहिजे. जर तुम्ही तसे करणार नाही, तर तुमचे तारण होणार नाही.”
\v 2 पौल आणि बर्णबा त्या यहूद्यांशी अजिबात सहमत नव्हते आणि त्यांनी त्यांच्याशी वादविवाद करायला सुरवात केली. म्हणून अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी पौल, बर्णबा आणि त्याच्या सोबत काही विश्वासणाऱ्यांनी यरुशलेमेस जावे म्हणून त्याची निवड केली, ह्यात हेतू हा की या विषयावर ते तेथे प्रेषित आणि इतर पुढाऱ्यांशी चर्चा करतील.
\s5
\p
\v 3 पौल बर्णबा आणि इतर विश्वासणारे जेव्हा अंत्युखियातून प्रवासास निघाले ते फेनिके आणि शोमरोन या भागातून प्रवास करत गेले. जेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतांना थांबत होते त्यांनी तेथील विश्वासणाऱ्यांना अनेक परराष्ट्रीय विश्वासात आल्याचे सांगितले. पण बर्णबा आणि विश्वासणारे अत्यानंदित झाले.
\v 4 पौल बर्णबा व इतर विश्वासणारे यरुशलेमेत पोहचल्यावर प्रेषितांनी त्यांचे स्वागत केले प्रेषित इतर वडील आणि त्या संबंधित इतर विश्वासणाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने त्यांना ज्या गोष्टी करण्यास सहाय्य केले त्या गोष्टींविषयी पौल आणि बर्णबा यांनी तेथे सांगितले.
\s5
\p
\v 5 परंतु परुश्यांमधून आलेले जे यहूदी विश्वासणारे होते ते इतर विश्वासणाऱ्यांमध्ये उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, “ज्या यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांची सुंता झालीच पाहिजे, आणि देवाने मोशेला जे नियमशास्त्र दिले त्या सर्वांचे त्यांनी पालन केले पाहिजे.”
\s यरुशलेम येथील धर्मसभा
\p
\v 6 प्रेषित आणि इतर वडील या विषयी बोलण्यासाठी एकत्रित आले.
\s5
\v 7 या विषयी बराच काळ चर्चा केल्यानतंर पेत्र उभा राहिला आणि त्यांचाशी बोलला. तो म्हणाला “सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनी, देवाने बराच काळापूर्वी तुम्हा प्रेषितांनमधून माझी निवड केली जेणेकरून मी परराष्ट्रीय लोकांना देवाच्या कृती विषयी सांगावे आणि जेणे करून ते त्याच्यावर विश्वास ठेवतील.
\v 8 देव लोकांचे अंतःकरण जाणतो जसा त्याने आम्हांला पवित्र आत्मा दिला तसाच परराष्ट्रीय लोकांना ही देऊन तो त्यांना स्वीकारतो हे त्यांनी मला आणि इतरांना दाखवून दिले.
\v 9 देवाने त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कोणताही वेगळेपणा दाखवला नाही प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने त्याने त्यांना ही आतुन शुद्ध केले आहे आणि आम्हांला ही तशीच क्षमा दिली आहे.
\s5
\v 10 तर मग गरीब यहूदी लोकांनी यहूदी रितीरिवाजांचे आणि नियमशास्त्राचे पालन करावे असा त्यांच्यावर तुम्ही दबाव का टाकता असे करणे म्हणजे त्यांच्यावर एक जड ओझे लादण्यासारखे आहे; कारण आपले पूर्वज किंवा आम्ही यहूदी आजही त्या नियमांचे पालन करू शकलो नाही म्हणून अशा नियमांचे पालन जबरदस्ती त्यांना करायला लावणे असे करुन देवाला क्रोधाविष्ट करणे थांबवा”
\v 11 आपल्याला तर हे ठाऊक आहे की देव यहूद्यांचे तारण करतो कारण देव यहूद्यांचे तारण येशू प्रभूने जे केले त्याद्वारे करतो. देव यहूद्यांचे तारण अगदी तसेच करतो जसे तो प्रभू येशू वर विश्वास ठेवणाऱ्या परराष्ट्रीयांचे तारण करतो.”
\s5
\p
\v 12 पेत्र हे बोलल्या नंतर तेथील लोक शांत झाले मग त्या सर्वांनी पौल आणि बर्णबा ह्यांचे ऐकले कारण देवाने परराष्ट्रीय लोकांमध्ये जे अद्भुत चमत्कार केले होते त्या विषयी त्यांना सांगितले हया चमत्कारावरून हे लक्षात येते की देवाने परराष्ट्रीयांना ही स्वीकारले आहे.
\s5
\p
\v 13 पौल आणि बर्णबा यांनी आपले मूल्य संपवल्या वर यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांचा पुढारी याकोब त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनी माझे ऐका.
\v 14 शिमोन पेत्राने आम्हांला सांगितले आहे की देवाने परराष्ट्रीयांना मागे कसा आर्शिवाद दिला देवाने त्यांच्यापैकी असे लोक निवडले की ज्यांना तो स्वतः कडे आणणार होता.
\s5
\v 15 देव बऱ्याच काळापूर्वी हे शब्द बोलला जे संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले होते ते ही यांच्याशी सहमत आहे हेच ते सांगतात.
\v 16 नतंर मी पुन्हा परत येईन आणि दावीदाच्या वंशातून एकाला राजा म्हणून निवडेन. एखादे घर पुर्णपणे मोडकळीस येते आणि त्याला तो पुन्हा जो बांधतो त्याच्या सारखा तो होईल.
\v 17 इतर सर्व लोकांनी मला ओळखण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी हे करीन त्या लोकांमधे इस्त्राएलाहून निराळे लोक ही असतील ज्यांना मी स्वतःकडे स्वतःचे लोक होण्यासाठी बोलवेन तुम्ही हे नक्कीच घडेल ह्याची खात्री बाळगा कारण मी स्वतः प्रभू परमेश्वराने हे शब्द बोलले आहेत.
\v 18 मी माझ्या लोकांना ह्या घटना घडतील हे खुप आधिच सांगितले आहे.”
\s5
\v 19 याकोब पुढे बोलत राहिला. तो म्हणाला,“म्हणून जे परराष्ट्रीय लोक देवाकडे आपली पातके सोडून वळत आहेत अश्यांना अधिक त्रास देणे थांबवावे. म्हणजेच त्यांनी आपले नियम व रितीरिवाजांचे पालन करावे अशी आपण त्यांना जबरदस्ती करू नये.
\v 20 त्या उलट, आपण त्यांना असे पत्र लिहावे ज्यामध्ये त्यांनी चारच गोष्टी करण्याची विनंती करावी मूर्तीला अर्पिलेले मांस त्यांनी खाऊ नये, ज्यांच्या संगती त्यांचा विवाह झाला नाही अशा कोणाही सोबत त्यांनी शारिरीक सबंध ठेवू नये. जिव गुदमरुन मेलेल्या प्राण्यांचे मांस त्यांनी खाऊ नये, आणि प्राण्यांचे रक्त ही खाऊ नये.
\v 21 अनेक शहरांमध्ये अनेक लोक मोशेच्या नियमशास्त्राची घोषणा करत आलेले आहेत आणि त्यामध्ये ह्या गोष्टींचा विरोध ते नियम करतात दर शब्बाथ दिवशी यहूदी सभास्थानांमध्ये त्या नियमांचे वाचन होते आणि म्हणून या परराष्ट्रीयांना जर या नियमा विषयी अधिक माहिती करुन घ्यायची असेल तर ते आपल्या सभास्थानात त्यांची माहिती करुन घेऊ शकतात.”
\s परराष्ट्रीयांतील लोकांना एक पत्र
\s5
\p
\v 22 प्रेषित आणि इतर वडील व यरुशलेमेतील इतर विश्वासणाऱ्यांनी याकोबाचे हे बोलणे स्वीकारले. यरुशलेमेतील पुढाऱ्यांनी काय ठरवले आहे ते अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांना समजावे म्हणून पौल आणि बर्णबा यांच्या समवेत आपल्या मधून काही मनुष्यांना निवडून पाठवावे असा त्यांनी निर्णय घेतला. म्हणून त्यांनी आपल्यामधुन सिलास यहूदा म्हटलेला बर्सब्बा ह्याची निवड केली यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांमध्ये हे दोघे ही पुढारी होते.
\v 23 मग त्यांनी यहूदा आणि सिलास यांच्या हस्ते अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांना खालिल प्रमाणे पत्र लिहिले “सूरिया आणि किलिकीया प्रांतातील इतर भागात राहणारे व अंत्युखियात राहणाऱ्या परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांना आम्ही तुमच्या सोबतीचे प्रेषित व वडील तुम्हास शुभेच्छा देऊन हे लिहितो.
\s5
\v 24 आम्हांला लोकांनी सांगितले आमच्या मधून काही लोक तुमच्या कडे आले जरी आम्ही त्यांना पाठवले नव्हते तरी ते तुमच्या कडे आले. तुमच्या विचारांना गोंधळात पाडणाऱ्या अशा गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या आहेत हे ही आम्ही ऐकले.
\v 25 आमचा प्रिय बर्णबा आणि पौल यांच्या सोबत आम्ही आमच्या मधून काही मनुष्यांना निवडून त्यांच्या सोबत पाठवावे अशी विनंती त्यांना केली.
\v 26 या दोघांनी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची सेवा करतांना आपला जिव धोक्यात घातला आहे.
\s5
\v 27 आम्ही त्यांच्या सोबत यहूदा आणि सिलास यांना ही पाठवले आहे आम्ही ज्या गोष्टी लिहित आहोत त्या गोष्टी हे दोघेही तुम्हास सांगतील.
\v 28 पवित्र आत्म्याला आणि आम्हांला योग्य वाटले. यहूदी नियमांच्या ओझ्यांचे पालन तुम्ही करणे गरजेचे आहे आम्ही तुम्हाला केवळ खालिल सुचना देत आहोत ज्याचे तुम्ही पालन करणे आवश्यक आहे,
\q
\v 29 लोकांनी मूर्तींना आर्पिलेले अन्न खाऊ नये. तुम्ही प्राण्यांचे रक्त किंवा ज्या प्राण्यांना जीव गुदमरुन ठार करण्यात आलेले आहे अश्यांचे मांस खाऊ नये तसेच ज्यांच्याशी तुमचा विवाह झालेला नाही अश्यासोबत तुम्ही लैगिंक सबंध स्थापन करू नये. जर तुम्ही या गोष्टी करणे टाळले तर तुम्ही योग्य करत आहात धन्यवाद.”
\s5
\p
\v 30 ज्या चार लोकांना त्यांनी निवडले ते यरुशलेमेहून निघाले आणि अत्युंखियात पोहचले जेव्हा अत्युंखियातील सर्व विश्वसणारे एकत्र जमले तेव्हा त्यांनी ते पत्र त्यांना दिले.
\v 31 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी ते पत्र वाचले, ते आनंदित झाले, कारण त्यातील संदेशाने त्यांना उत्साहित केले.
\v 32 यहूदा आणि सिला हे संदेष्टे असल्यामुळे तेथील विश्वासणाऱ्यांशी ते बराच वेळ बोलले आणि त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले, त्यांनी त्यांना उत्तेजन दिले आणि प्रभू येशूवर अधिक ठामपणे विश्वास ठेवण्यास त्यांना मदत केली.
\s5
\p
\v 33-34 यहूदा आणि सिला ह्यांनी तेथे बराच वेळ राहिल्यानंतर ते यरुशलेमेस परत जाण्यास तयार झाले तेव्हा अंत्युखियाच्या विश्वासणाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मग ते तेथून निघाले.
\v 35 परंतु पौल आणि बर्णबा हे दोघेही अंत्युखियातच राहिले. तेथे असतांना इतर अनेकांसोबत मिळून मिसळून त्यांनी लोकांना शिकवले आणि प्रभू येशूचा संदेश गाजवला.
\s पौल व बर्णबा वेगळे होतात
\s5
\p
\v 36 काही वेळानंतर पौल बर्णबास म्हणाला, “आपण पूर्वी ज्या प्रत्येक शहरांमध्ये प्रभू येशूचा संदेश गाजवला आहे आपण तेथे जाऊया आणि तेथील आपल्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांना भेटूया. प्रभू येशूवरील विश्वासामध्ये ते कसे चालत आहे हे त्यामुळे आपल्याला कळेल.”
\v 37 बर्णबा पौलाशी सहमत झाला आणि तो म्हणाला की आपण योहान ज्याचे नाव मार्क होते त्यालाही आपल्या सोबत पुन्हा एकदा घेऊया.
\v 38 परंतु पौलाने बर्णबाला म्हटले, की मार्कला पुन्हा सोबत नेण्याचा विचार चांगला राहणार नाही, त्याच्यासोबतचे काम पूर्ण न करता मार्क त्यांना पंफुल्याहून मागच्या यात्रेत मध्येच सोडून परत आला होता.
\s5
\v 39 ह्या विषयात पौल आणि बर्णबा ह्या दोघांमध्ये एकमेकांविरुद्ध असहमती होती म्हणून ते ऐकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबाने मार्कला आपल्या सोबत घेतले. ते जहाजावर गेले आणि कुप्रास बेटाकडे निघाले.
\v 40 पौलाने सिलाला घेतले आणि तो अंत्युखिया येथे परत आला त्याच्या संगती काम करण्यासाठी. तेथील विश्वासणाऱ्यांना प्रभू देवाला प्रार्थना केली की त्यांनी पौल आणि सूरिया ह्यांना ही सेवा करण्यास कृपा द्यावी आणि मग ते दोघे अंत्युखियातून प्रवासास निघाले.
\v 41 पौल व सिला सोबत सूरिया आणि किलिकिया प्रांतातून प्रवास करत गेला ते तेथील विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर अधिक विश्वास मजबुत होण्यास सहकार्य करत गेले.
\s5
\c 16
\s लुस्र येथे तीमथ्य पौलाला जाऊन मिळतो
\p
\v 1 पौल आणि सिला दर्बे आणि लुस्त्र येथिल शहरात गेले आणि तेथे त्यांनी विश्वासणाऱ्यांची भेट घेतली. लुस्त्र येथे तीमथ्य नावाचा कोणी एक विश्वासणारा होता त्याची आई यहूदी विश्वासणारी होती परंतु त्याचे वडील ग्रीक होते.
\v 2 लुस्त्र आणि इकुन्यांत येथील विश्वासणारे यहूदी तीमथ्या विषयी चांगले बोलत होते.
\v 3 म्हणून पौलाची इच्छा होती की तीमथ्याला त्याने वेगवेगळ्या ठिकाणी सोबत न्यावे म्हणून त्याने तीमथ्याची सुंता केली त्या ठिकाणी राहणाऱ्या यहूदी लोकांनी तीमथ्याला स्वीकारले म्हणून त्याने तसे केले कारण त्याचे वडील गैर यदूही आहेत व त्यांनी त्याची सुंता केली नव्हती हे त्या यहूदी ह्यांना ठाऊक होते. तर तीमथ्य पौल आणि सिला ह्यांच्या सोबत गेला, आणि त्यांनी सोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास केला.
\s5
\p
\v 4 यरुशलेमेतील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे नियम निश्चित केले होते ते प्रत्येक शहरात जाऊन त्यांनी विश्वासणाऱ्यांना शिकविले.
\p
\v 5 त्या शहरातील विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशूवर अधिक उत्तमपणे विश्वास ठेवावा अशी मदत त्यांनी त्यांना केली आणि दर दिवशी अनेक लोक विश्वासणारे झाले.
\s5
\p
\v 6 पौल आणि त्याच्या सोबतीच्या लोकांनी आशियामध्ये जाऊन वचन सांगू नये असा पवित्र आत्म्याने त्यांना विरोध केला म्हणून ते फ्रुगिया आणि गलतियाच्या प्रांतात गेले.
\v 7 मुसिया भागाच्या सिमेवर ते आले, त्यांना उत्तरेकडिल बिथुनिया भागात जायचे होते, परंतु पुन्हा येशूच्या आत्म्याने त्यांना तेथे जाण्यापासून थांबवले.
\v 8 म्हणून ते मुसियाच्या भागातून प्रवेश करत त्रोवस नावाच्या भागाजवळ आले हे शहर समुद्र किनाऱ्यावर होते.
\s5
\v 9 त्या रात्री देवाने पौलाला एका दृष्टांतांत त्याने मासेदोनिया भागातील एका माणसाविषयीचे दर्शन दिले. तो पौलाला बोलवत होता, त्याने म्हंटले, “मासेदोनियात या आणि आम्हांला मदत करा.”
\v 10 हा दृष्टांत पाहिल्यावर आम्ही मासेदोनियाकडे गेलो. कारण आमचा विश्वास होता की देवाने आम्हांला तेथील लोकांना शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले आहे.
\s पौल मासेदोनियामधील फिलिप्पैला जातो
\s5
\p
\v 11 येथून आम्ही एका जहाजात चढलो ते हाकारत त्रोवसवरून समथ्राकेस पोहोंचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नियापुलीसला गेलो.
\v 12 मग आम्ही नियापुलीसला सोडून फिलिप्पैला गेलो. मासेदोनियातील हे अत्यंत महत्वाचे शहर होते तेथे अनेक रोमी नागरीक राहत असत. आम्ही फिलिप्पैमध्ये अनेक दिवस राहिलो.
\p
\v 13 शब्बाथाच्या दिवशी आम्ही शहराच्या बाहेर नदी जवळ गेलो. आम्ही असे ऐकले होते की यहूदी लोक तेथे प्रार्थनेसाठी एकत्र जमत असत. जेव्हा आम्ही तेथे पोहोंचलो तेव्हा तेथे काही स्त्रिया प्रार्थना करण्यासाठी एकत्रित आल्या होत्या तेव्हा आम्ही तेथे बसलो आणि त्यांना येशूविषयी सांगण्यास सुरवात केली.
\s5
\v 14 त्या स्त्रियांमध्ये लुदिया नावाची एक स्त्री पौलाचे ऐकत होती. ती थुवतीरा ह्या शहरातली असून ती जांभळी वस्त्रे विकण्याच्या व्यवसाय करत असे व देवाची उपासना करणारी होती. तिने पौलाचा संदेश नीट ऐकावा असे प्रभूने केले आणि तिने त्यावर विश्वास ठेवला.
\v 15 पौल आणि सिलास ह्यांनी लुदिया व तिच्या घरातील राहणाऱ्या इतरांचा बाप्तिस्मा केल्यावर ती त्या दोघांना म्हणाली, “मी प्रभू संगती विश्वास योग्य आहे ह्याचा जर तुम्हाला भरोसा वाटत असेल तर कृपया माझ्या घरात या आणि तेथे राहा.” तिने हे म्हटल्या नंतर आम्ही तिच्या घरी जाऊन राहिलो.
\s5
\p
\v 16 दुसऱ्या दिवशी लोक प्रार्थना करायला एकत्र जमतात तेथे जात असता एका तरुण स्त्रि जी गुलाम होती ती आमच्या दृष्टिस पडली. एक दुष्ट आत्मा तिला लोकांचे भविष्य सांगण्याचे सामर्थ देत होता. लोक तिच्या मालकास पैसे देत असत आणि त्या बदल्यात ती त्या लोकांना सोबत भविष्यात काय घडेल हे त्यांना सांगत असे.
\v 17 ही तरुणी पौल आणि आमच्या मागोमाग येऊन मोठ्याने ओरडत असे, सर्व देवाहून महान अशा देवाचे हे सेवक आहेत! हे मनुष्य सर्व दैवताहून थोर देवाची सेवा करणारे आहेत; देव तुम्हाला कसे तारण देईल हे ते तुम्हाला सांगू शकतात.
\v 18 ती असे बरेच दिवस करत राहिली. शेवटी पौलाला राग आला, तो त्या तरुणीकडे वळाला आणि तिच्यातील अशुद्ध आत्म्याना तो म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावात तिच्यातून बाहेर ये!” त्याच क्षणी त्या दुरआत्म्याने तिला सोडून दिले.
\s पौल व सीला ह्यांचा बंदिवास व सुटका
\s5
\p
\v 19 आणि म्हणून त्या तरूणीच्या मालकाच्या हे लक्षात आले की आता ती त्यांना अधिक पैसे कमावून देऊ शकत नव्हती कारण ती लोकांना काय घडेल ह्याचे भाकित करण्यास असमर्थ होती आणि म्हणून तो खुप रागावला त्यांनी पौलाला आणि सिला यांना धरले आणि सार्वजनिक ठिकाणी जेथे अधिकारी आहेत त्या चौकात त्यांना घेऊन गेला.
\v 20 त्या तरुण स्त्रिच्या मालकांनी त्यांना शहरातील अधिकाऱ्यांकडे आणून त्यांना सांगितले हे लोक यहूदी आहेत आणि ते या शहरातील लोकांना खुप त्रास देत आहेत.
\v 21 हे आम्हांला अशा प्रकारचे नियम व कायदे सांगत आहे जे आम्हां रोमी लोकांना पाळणे अयोग्य आहे!
\s5
\v 22 तेव्हा गर्दीतील अनेक लोक पौल आणि सिला ह्यांना दोषारोप करण्यास सामिल झाले आणि त्यांना मारने सुरू केले. तेव्हा रोमी अधिकाऱ्यांनी पौल आणि सिला ह्यांचे कपडे फाडून त्यांना बेताने मारण्यास त्यांनी त्यांना सांगितले.
\v 23 म्हणून, सैनिकांनी पौल आणि सिला ह्यांना बेताने खुप वाईट रितीने मारहान केली , त्यानंतर त्यांनी त्याला धरले आणि त्यांना तुरूंगात टाकले. त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्याला सांगितले की, खबरदार हे तेथून निघून जाता कामा नये अशी ताकीद दिली.
\v 24 अधिकाऱ्याने सांगितल्यामुळे तुरुंग अधिकाऱ्याने पौल आणि सिला ह्यांना तुरुंगातील अतिशय आतल्या खोलीमध्ये टाकले. त्याने त्यांना खाली बसवून त्यांचे पाय दूर केले. आणि मग त्यांनी दोन मोठ्या लाकडांना केलेल्या छिद्रांमध्ये त्यांनी त्यांचे घोटे बांधले. आणि अशापद्धतीने पौल आणि सिला आपले पाय हालवू शकत नव्हते.
\s5
\p
\v 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिलास प्रार्थना करत आणि देवाला गीत गात होते इतर कैदी त्यांचे ऐकत होते.
\v 26 अचानक एक मोठा भुमीकंप झाला आणि त्याने संपूर्ण तुरुंग हादरले, त्या भुकंपामुळे तुरुंगातील सर्व दारे उघडली आणि सर्व कैद्यांना ज्या साखळदंडाने बांधले होते ते साखळदंडही गळून पडले.
\s5
\v 27 तुरुंगाचा अधिकारी झोपेतून उठला आणि त्याने पाहिले की तुरुंगाची सर्व दारे भुकंपामुळे उघडली आहे. त्याला वाटले की सगळे कैदी तुरुंगातून पळून गेले आहेत म्हणून त्याने आपल्या स्वतःला ठार करण्यासाठी आपली तलवार उपसली, कारण त्याला हे ठाऊक होते की जर तुरुंगातील कैदी पळून गेले तर शहराचे अधिकारी त्याला ठार करतील.
\v 28 पौलाने तुरुंगाच्या अधिकाऱ्याला पाहिले आणि त्याच्याकडे आरोळी करून म्हणाला, “स्वतःला ठार करू नकोस! आम्ही सर्व कैदी येथेच आहोत!”
\s5
\v 29 त्या तुरूंगाच्या अधिकाऱ्याने कोणालातरी आरोळी करून लवकर मशाल घेऊन येण्यास सांगितले, जेणेकरून ते खरेच तुरूंगात कोण कोण आहे ते त्याला पाहता यावे तो थरथर कापत पौल आणि सिला ह्यांच्या पायाजवळ पडला.
\v 30 त्याने पौल आणि सिला ह्यांना तुरुंगातून बाहेर आणले व त्यांना विचारले, “महाशय माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?”
\v 31 त्यांनी त्याला उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव, आणि तू व तुझे घराने ह्यांचे तारण होईल.”
\s5
\p
\v 32 मग पौल आणि सिलाने ह्यांनी त्याच्याशी व त्याच्या कुटूंबातील सर्वांशी प्रभू येशूविषयी संभाषण केले.
\v 33 मग तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच मध्यरात्री त्यांच्या जखमा धुतल्या; आणि मग पौल आणि सिला ह्यांनी त्याचा व त्याच्या घराण्यातील सर्वांचा बाप्तिस्मा केला.
\v 34 मग तुरूंगाच्या अधिकाऱ्याने पौल व सिला ह्यांना आपल्या घरी नेले व तेथे त्यांना खाण्यास अन्न दिले. तो व त्याच्या संपूर्ण कुटूंबाने देवावर विश्वास ठेवला म्हणून खुप आनंदित होते.
\s5
\v 35 दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील अधिकाऱ्यांनी काही सेवकांना पाठवले आणि तुरूंगाच्या अधिकाऱ्याला हा निरोप द्यावयास सांगितला, “त्या दोन कैद्यांना सोडून दे.”
\v 36 जेव्हा तुरूंगाच्या अधिकाऱ्याने हे ऐकले तो पौलाकडे गेला आणि त्याला म्हणाला, “शहराच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सोडून द्यावयास मला सांगितले आहे. म्हणून तुम्ही दोघेही तुरुंग सोडू शकता, आणि शांतीने जाऊ शकता.”
\s5
\v 37 परंतु पौल त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “शहराच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण गर्दी समोर आम्हांला मारण्याची आज्ञा केली, जरी आम्ही रोमी नागरीक असूनही त्यांनी आम्हांला सर्वांच्यासमोर मारण्याची त्या माणसाने आज्ञा दिली आणि आम्हांला तुरुंगातही टाकले. आणि आता ते आम्हांला कोणालाही न सांगता गुपचुप जावयास सांगत आहेत. आम्ही हे स्वीकारणार नाही; त्या शहराच्या अधिकाऱ्याने स्वतः यावे आणि आम्हांला तुरूंगातून बाहेर काढावे.”
\v 38 म्हणून ते सैनिक परत गेले आणि त्यांनी शहराच्या अधिकाऱ्यांना पौलाने जे सांगितले होते ते कळवले. पौल आणि सिला हे रोमी नागरिक आहेत हे शहरातील अधिकाऱ्याने ऐकले तेव्हा त्यांना भीती वाटली कारण त्यांनी त्यांच्यासोबत चुकीची गोष्ट केली होती.
\v 39 म्हणून शहराचे अधिकारी पौल आणि सिला ह्यांच्याकडे आले, आणि त्यांच्याशी जे वर्तन केले त्याबद्दल त्यांनी त्यांना क्षमा मागीतली. शहराच्या अधिकाऱ्याने त्यांना तुरूंगातून बाहेर काढले आणि त्यांना शहर सोडून जाण्याची विनंती केली.
\s5
\v 40 पौल आणि सिला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते लुदियाच्या घरी गेले तेथे ते तिला व इतर विश्वासणाऱ्यांना भेटले, त्यांनी विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूवर भरोसा ठेवत राहण्यास उत्साहित केले आणि मग ते दोन प्रेषित फिलिप्पै शहरात पुढे गेले.
\s5
\c 17
\s थेस्सलनीका येथे पौल
\p
\v 1 ते अंफिपुली आणि अपुल्लोनिया यावरून प्रवास करत थेस्सलनीका शहरात आले. तेथे एक यहूद्यांचे सभास्थान होते.
\v 2 नेहमी प्रमाणे पौल शब्बाथ दिवशी त्याच्या सभास्थानात गेला. तीन आठवड्यापासून दर शब्बाथ दिवशी तो तेथे जात असे. तेथे तो लोकांसोबत शास्त्रलेखामधून येशू हा ख्रिस्त आहे या विषयी तो बोलत असे.
\s5
\v 3 मसीहा मरेल आणि तो पुन्हा जिवंत होईल हे संदेष्ट्यांनी शास्त्रलेखात लिहिले आहे ते त्यांने त्यांना दाखवले. तो म्हणाला, “हा मनुष्य येशू ख्रिस्त आहे. तो मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला, संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे तो मरण पावून तिसऱ्या दिवशी जिवंत होईल तसेच झाले.”
\v 4 त्याच्या पैकी काही यहूद्यांनी पौल जे सांगत होता त्यावर विश्वास ठेवला आणि ते पौल आणि सिला ह्यांना भेटू लागले. तेथे बरेच परराष्ट्रीय लोक आणि काही सन्माननीय स्त्रियाही होत्या ज्या देवाची उपासना करणाऱ्या होत्या त्यांनीही येशूच्या संदेशावर विश्वास ठेवला आणि ते सगळे पौल आणि सिला यांना भेटू लागले.
\s5
\p
\v 5 पौल जे शिकवत होता त्यावर बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला म्हणून यहूद्यांचे काही पुढारी पौलावर रागवले म्हणून ते सार्वजनिक ठिकाणी आले आणि तेथिल काही दृष्ट लोकांनी आपल्या संगती यावे असे त्यांनी त्यांचे मन वळवले. अशा रितीने यहूदी पुढाऱ्यांनी गर्दी जमा केली आणि त्यांना फार मोठ्याने आरडाओरडा करण्यास सांगितले. पौल आणि सिला यासोन म्हटलेल्या मनुष्याच्या घरी राहत होते तेथे ते धावत त्याच्या घरी गेले. लोकांनी पौल व सिला यांना बाहेर काढावे अशी त्यांची इच्छा होती.
\v 6 त्यांना पौल व सिला सापडले नाही परंतु त्यांना यासोन आढळला आणि त्यांनी त्याला धरले. त्यांनी त्याला व इतर विश्वसणाऱ्यांना ओढत जेथे शहराचे अधिकारी होते तेथे नेले. ते म्हणाले, “सर्व जगात ज्यांनी गोंधळ घातला आहे ते लोक या ठिकाणीही आले आहेत.”
\v 7 आणि हा मनुष्य यासोन ह्याने त्यांना घरात घेतले आहे. ते सम्राटाच्या विरुद्ध कारस्थान करत आहेत. ते असे म्हणतात की ज्याचे नाव येशू आहे तो खरा राजा आहे!”
\s5
\v 8 तेव्हा जमा झालेल्या लोकांनी आणि जमलेल्या जमावाने आणि शहराच्या अधिकाऱ्यांनी ऐकले तेव्हा त्यांना अधिक राग आला आणि ते फार उत्तेजित झाले.
\v 9 शहराच्या विश्वसणाऱ्यांनी यासोन आणि अन्य अधिकाऱ्यांस अधिक दंड भरावयास सांगितला. आणि त्यांना सांगितले की जर पौल आणि सिला यापुढे गोंधळ करणार नाहित तर ते पैसे त्यांना परत मिळतील. आणि शहरातील अधिकाऱ्यांनी यासोन आणि इतर अधिकाऱ्यांना सोडून दिले.
\s बिरुया येथे पौल
\s5
\p
\v 10 म्हणून त्याच रात्री पौल आणि सिला ह्यांना सिल्लोमिका मधून बाहेर बिरुया नावाच्या गावात पाठवले. पौल आणि सिलास तेथे गेल्यावर ते यहूदी सभास्थानाकडे गेले.
\v 11 थेस्सलनीका येथिल लोक यहूदी देवाचा संदेश ऐकण्यासाठी तयार नव्हते, परंतु बिरुया येथिल लोक मात्र तो ऐकण्यास तयार होते म्हणून प्रभू येशूचा संदेश त्यांनी फार आतुरतेने लक्षपूर्वक ऐकला. पौल येशूविषयी जे ऐकत होता ते खरे आहे का हे त्यांना स्वत:ला समजावे म्हणून ते दररोज शास्त्रलेख वाचत असत.
\v 12 पौलाच्या शिकवणीमूळे बऱ्याच यहूदी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला आणि सन्मानीय परराष्ट्रीय स्त्रियांनी व बऱ्याच परराष्ट्रीय पुरूषांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला.
\s5
\p
\v 13 परंतु त्यानंतर थेस्सलनीका येथील काही यहूद्यांनी ऐकल्यानंतर पौल बिरुया येथे जाऊन येशूविषयीच्या देवाकडील संदेशाची घोषणा करत आहे. म्हणून ते बिरुया येथे गेले आणि त्यांनी लोकांना अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे ते पौलावर फार चिडले.
\v 14 बिरुयातिल काही विश्वासणाऱ्यांनी पौलाला समुद्रकिनाऱ्यावर नेले आणि दुसऱ्या शहरात पाठवले परंतु सिला आणि तीमथ्य बिरुया येथेच राहिले.
\v 15 पौल आणि इतर मनुष्य जेव्हा किनाऱ्यावर पोहोंचले तेव्हा तेथे त्यांना एक तारू मिळाले त्यात ते बसून शहराकडे गेले. जे लोक पौलाला सोडण्यासाठी आले होते त्यांना पौल म्हणाला, “सिला आणि तीमथ्य यांना असे सांगा की त्यांनी लवकरात लवकर अथेनै येथे यावे” मग ते मनुष्य पौलाला अथेनैला सोडून बिरुयाकडे परतले.
\s अथेनै येथे पौल
\s5
\p
\v 16 अथेनै मध्ये पौल सिला आणि तीमथ्य यांची वाट पाहत थांबला. दरम्यांनच्या काळात तो शहरामध्ये फिरत राहिला. ते शहर मुर्त्यांनी भरले होते म्हणून तो फार निराश झाला.
\v 17 तर तो यहूदी सभास्थानाकडे गेला आणि तेथे येशूविषयी यहूद्यांशी बोलला, आणि जे ग्रीक लोक त्यांच्या विश्वासाचा स्वीकार करत होते त्यांच्याशीही बोलला. आणि दररोज तो सार्वजनिक ठिकाणी चौकात जात असे आणि तेथे जे लोक त्याला भेटत तेथे त्यांच्याशी तो संभाषण करत असत.
\s5
\p
\v 18 लोक काय विश्वास ठेवतात ह्याविषयी चर्चा करणे ज्यांना आवडते त्यांच्या काही शिक्षकांना पौल भेटला. त्यापैकी काहींना लोक एपीकूरपंथी असे म्हणत असत, आणि इतरांना ते स्तोयिक पंथी असेही म्हणत. ते काय विश्वास ठेवतात ते त्यांनी पौलाला सांगितले, आणि पौल काय विश्वास ठेवतो हे त्याला विचारले. मग त्यापैकी काही एकमेकांना म्हणाले, “काही विचित्र देवतांविषयी तो काहीतरी बोलत आहे.” ते असे म्हणाले कारण पौल त्यांना येशू ख्रिस्त कसा मरण पावला आणि तो परत कसा जिवंत झाला ह्याविषयी सांगत होता.
\s5
\p
\v 19 म्हणून ते, शहरातील पुढारी एकत्र येत असत त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले. ते तेथे पोहोंचले तेव्हा ते पौलास म्हणाले, “तू जो लोकांना नविन संदेश शिकवत आहेस त्याविषयी कृपया आम्हांला सांग?
\v 20 आम्हांला समजत नाही अशा काही गोष्टी तू शिकवत आहेस, म्हणून त्यांचा अर्थ काय ते आम्ही जाणू इच्छितो.”
\v 21 अथेनै मधील लोक तसेच इतर भागातून आलेले लोक जे राहत असत ते जे काही त्यांना नवीन होते त्याविषयी बोलणे त्यांना आवडत असे.
\s अरीयपगात पौलाने केलेले भाषण
\s5
\p
\v 22 पौल त्या लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, अथेनैच्या लोकांनो, मला हे दिसते की तुम्ही फार धार्मिक आहात.
\v 23 कारण मी फिरत असतांना माझ्या दृष्टीस तुम्ही त्यांची उपासना करता आहात अशा काही गोष्टी पडल्या, मला अशी एक वेदीही दिसली ज्यावर कोणीतरी असे कोरले होते (ज्या देवाला आम्ही ओळखत नाही अशा देवाच्या सन्मानार्थ) तर मला तुम्हाला त्या देवाविषयी सांगू द्या ज्याची तुम्ही उपासना करता पण त्याला ओळखत नाही. तर ज्याची तुम्ही उपासना करत असूनही ज्याला ओळखत नाही त्या देवाविषयी आता मला तुम्हाला सांगू द्या.
\s5
\p
\v 24 ह्या देवाने संपूर्ण जग व त्यातील सर्वकाही बनवले आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व जिवंतांवर तो अधिकार करतो, मानवांनी हातानी बनविलेल्या मंदिरात तो राहत नाही.
\v 25 लोकांनी बनवलेल्या कशाचीही त्याला गरज नाही कारण तोच लोकांना जीवन देतो विश्वास देतो. लोकांना ज्याची गरज आहे ते सर्वकाही तोच त्यांना पुरवतो.
\s5
\p
\v 26 अगदी सुरवातीला देवाने एक जोडपे बनवले आणि त्याच्याद्वारे देवाने संपूर्ण जगात राहणारे वेगवेगळे लोकसमुह बनवले. देवाने हे सगळे लोकसमुह त्यांच्या वेळेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.
\v 27 त्याची इच्छा होती की लोकांना त्याची आवश्यकता आहे ह्याची जाणिव व्हावी. अशाने कदाचित ते त्याचा शोध घेतील आणि तो त्यांना सापडेल. देवाची इच्छा आहे की आपण त्याचा शोध घ्यावा जरी तो आपल्यापैंकी कोणापासूनही दूर नाही तरी त्याची इच्छा आहे की आपण त्याचा शोध घ्यावा.
\s5
\v 28 तुम्हापैकी कोणीतरी असे म्हटले, “आम्ही त्याची लेकरे आहोत.” त्या देवामुळे आपण जगतो आणि त्याच्यामध्ये आपण अस्तित्वात आहोत.
\p
\v 29 आपण देवाची लेकरे आहोत म्हणून आपण हा विचार करू नये की देव सोने, चांदी, दगड किंवा मानवाने असाच काहितरी बनवलेला आहे.
\s5
\v 30 लोकांना काय हवे आहे देव त्यांना काय करावयास लोवतो देव त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो हे जोपर्यंत लोकांना माहित नव्हते तोपर्यंत देवाने त्यांना त्यांच्या कृतीसाठी शासन केले नाही. परंतु आता देव सर्व लोकांना सर्व ठिकाणी त्यांनी त्यांची वाईट कृत्ये सोडून वळावे अशी आज्ञा केली आहे.
\v 31 तो आम्हांला हे सांगतो की एके दिवशी त्याने निवडलेला मनुष्य ज्याला त्याने मृत्यूतून जिवंत केले आहे तो सर्वांचा न्याय करेल असा दिवस त्याने नेमला आहे.”
\s5
\p
\v 32 जेव्हा त्या मनुष्याने पौलाला असे सांगताना ऐकले की कोणी एक मनुष्य मरण पावला आणि तो पुन्हा जिवंत झाला तेव्हा त्यांच्यापैकी काही लोक पौलाला हसू लागले. परंतु इतर लोकांनी त्याला पुन्हा ये आणि आम्हांला इतर दिवशी ह्याविषयी सांग अशी विनंती केली.
\v 33 त्यांनी असे म्हटल्यावर पौल तेथून निघून गेला.
\v 34 परंतु त्यापैकी काही लोक पासोबत गेले आणि त्यांनी पौल येशूविषयी जे सांगत होता त्या संदेशावर विश्वास ठेवला त्यामध्ये एक मनुष्य होता ज्याचे नाव दिओनुस्य असे होते. आणि दामारी नावाची एक स्त्री ही तेथे होती आणि तिच्यासंगती इतर लोकांनीही विश्वास ठेवला.
\s5
\c 18
\s करिंथ येथे पौल
\p
\v 1 त्यानंतर, पौलाने अथेनै शहर सोडले आणि तो करिंथ शहराला गेला.
\v 2 पंत प्रदेशातील अक्विल्ला नावाच्या एका यहूदी व्यक्तीसंगती तेथे त्याची भेट झाली. अक्विल्ला आणि त्याची पत्नी प्रिस्किला हे इटलीच्या रोम शहरातून थोड्यावेळेसाठी तेथे आले होते त्यांनी रोम शहर सोडले कारण रोमी सम्राट क्लौद्याने ह्याने रोममधून सर्व यहूद्याने निघून जावे अशी आज्ञा केली होती.
\v 3 अक्विल्ला आणि प्रिस्किला तंबू बनवण्याचा व्यवसाय करत होते. पहिले तोही तंबू बनवत असे म्हणून तो त्यांच्यासोबत राहिला, आणि त्यांनी एकत्र राहून काम केले.
\s5
\v 4 प्रत्येक शब्बाथ दिवशी पौल यहूदी सभास्थानात जात असे, तेथे तो यहूदी आणि परराष्ट्रीय ह्या दोघांसोबतही बोलत असे तो त्यांना येशूविषयी शिकवत असे.
\p
\v 5 मग मासेदोनिया भागातून सिला आणि तीमथ्य ते तेथे पोहोंचल्यानंतर पौलाने तंबू बनवने थांबवले. त्याने आपला पूर्णवेळ यहूदी ह्यांसोबत येशूविषयी बोलण्यात घालवला त्याने त्यांना सांगितले की येशू हाच ख्रिस्त आहे.
\v 6 परंतु यहूदी पौलाविरुद्ध उभे राहिले आणि ते त्याच्याविषयी वाईट गोष्टी बोलू लागले. आणि म्हणून देव त्यांच्यावर प्रसंन्न नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपल्या अंगावरील कपड्यांवरिल धुळ झटकली, आणि तो त्यांना म्हणाला, “जर देव तुम्हाला शासन करेल तर ते तुमच्यामुळेच असेल माझ्यामुळे नव्हे! ह्यापुढे मी जे यहूदी नाहीत अशा लोकांसंगती बोलणार आहे.”
\s5
\v 7 म्हणून पौलाने यहूदी सभास्थान सोडून दिले आणि त्याच्या समोर असणाऱ्या घरात तो गेला तेथे त्याने उपदेश केला. त्या घराचा मालाक तीत युस्त हा होता तो एक परराष्ट्रीय मनुष्य असून देवाची उपासना करणारा होता.
\v 8 त्यानंतर यहूदी सभास्थानाचा अधिकारी ज्याचे नाव क्रिस्प असे होते त्याने आपल्या संपूर्ण कुटूंबासहित येशू प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथातील इतर बरेच लोक ज्यांनी पौलाचे ऐकले त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.
\s5
\p
\v 9 एकेरात्री पौलाला दृष्टांत झाला की प्रभू येशूने त्याला असे म्हटले, “जे लोक तुझ्याविरुद्ध आहेत त्यांची भीती बाळगू नकोस तर माझ्याविषयी बोलत राहा,
\v 10 कारण मी तुला साहाय्य करीन आणि येथे कोणी ही तुला दुखापत करू शकणार नाही त्यांना तू माझ्याविषयी सांगत राहा, कारण ह्या शहरात असे अनेक लोक आहे जे माझे आहेत.”
\v 11 म्हणून पौल करिंथात दीड वर्षापर्यंत राहिला आणि देवापासून येशूविषयी आलेला संदेश तो लोकांना सांगत राहिला.
\s गल्लियो आणि पौल
\s5
\p
\v 12 गल्लियो हा अखया प्रांताचा रोमी राज्यपाल झाल्यानंतर यहूदी पुढारी एकत्र आले आणि त्यांनी पौलाला धरले त्यांनी त्याला राज्यपालासमोर नेले व त्याच्यावर आरोप लावले.
\v 13 त्यांनी असे म्हटले, “आमच्या यहूदी नियमशास्त्राविरुद्ध हा लोकांना देवाची उपासना करण्याची शिकवन देतो.”
\s5
\v 14 जेव्हा पौल बोलणारच होता तेंव्हा गल्लियोने यहूद्यास उत्तर केले, “जर ह्या माणसाने कोणता रोमी कायदा तोडला असला तर तुम्हा यहूद्यांना मला काय सांगाचे आहेत ते मी ऐकले असते.
\v 15 परंतु तुम्ही स्वतःचे यहूदी कायदे, शब्द आणि नावे ह्याविषयी बोलत आहात तर तुम्ही स्वताःहाच ह्याच्याशी त्याविषयी बोलले पाहिजे मी ह्याविषयी न्याय करणार नाही!”
\s5
\v 16 गल्लियोने हे म्हटल्या नंतर, त्याने काही सैनिकांना हे सांगितले की यहूदी पुढाऱ्यांना ह्या कोर्टातून बाहेर काढा.
\v 17 तेव्हा लोकांनी यहूद्यांचा पुढारी सोस्थनेस ह्याला धरले. त्यांनी न्यायधिशाच्या आसना समोरच त्याला मारले. परंतु गल्लियोने त्याविषयी काहीही केले नाही.
\s पौल सूरियास परत येतो
\s5
\p
\v 18 पौल विश्वासणाऱ्यांसोबत करिंथास आणखी बरेच दिवस राहिला. आणि मग प्रिस्किला आणि अक्विल्ला ह्यांच्या सोबत जहाजात बसून तो सूरिया प्रांताकडे प्रवासास निघाला. त्याने किंख्रियामध्ये आल्यावर आपल्या डोक्याच्या केसाचे मुंडन केले कारण त्याने तसा नवस केला होता.
\v 19 ते इफिस शहरात आल्यावर प्रिस्किला व अक्विल्ला तेथे राहिले.
\p पौल स्वतः यहूदी सभास्थानामध्ये गेला आणि तेथे तो येशूविषयी यहूद्याना बोलला.
\s5
\v 20 त्याने तेथे अधिक काळ राहावे असे त्यांनी विनंती केली परंतु त्याने त्यांस नाकार दिला.
\v 21 परंतु तो निघत असतांना त्याने त्यांना सांगितले, “जर देवाची इच्छा असेल तर मी नक्कीच परत येईन.” मग तो एका जहाजात चढला आणि तेथून इफिसकडे समुद्र मार्गाने निघाला.
\s5
\p
\v 22 ते जहाज जेव्हा कैसरिया शहरात येऊन पोहोंचले तेव्हा पौल तेथे उतरला. तेथून तो यरुशलेमेस गेला आणि तेथे त्याने विश्वासणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर तेथून तो सूरिया प्रांतातील अंत्युखिया शहरात गेला.
\p
\v 23 पौलाने तेथे विश्वासणाऱ्यांसोबत काही काळ घालवला मग अंत्युखिया सोडून तो गलातिया आणि फ्रुगिया प्रांतातील अनेक शहरात फिरला येशूविषयीचा देवाकडून आलेल्या संदेशावर विश्वासणाऱ्यांनी अधिक विश्वास ठेवावा अशी त्याने त्यांना विनंती केली.
\s इफिसमध्ये अपुल्लो
\s5
\p
\v 24 पौल गलतिया आणि फ्रुगियातून जात असता अपुल्लो नावाचा कोणी यहूदी पुरुष इफिस येथे आला. तो आलेक्सांद्रिया शहरातील होता आणि शास्त्रलेखात तो फार पारंगत होता.
\v 25 लोकांनी कसे जगावे ह्याविषयी प्रभू येशूने दिलेले शिक्षण इतर विश्वासणाऱ्यांनी अपुल्लोसास शिकवले होते, आणि तो त्याच गोष्टी लोकांना शिकवत असे परंतु तो प्रभू येशूविषयी सर्व काही शिकवत नव्हता, कारण त्याला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचाच बाप्तिस्मा ठाऊक होता.
\v 26 अपुल्लो यहूदी सभास्थानात गेला आणि त्याने तेथील लोकांना जे काही तो शिकला आहे त्या गोष्टी शिकवल्या. प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला ह्यांनी तो जे शिकवत आहे ते ऐकले, तेव्हा त्याने त्याला आपल्या घरी बोलाविले आणि तेथे येशूविषयी त्याला अधिक शिकवले.
\s5
\p
\v 27 अपुल्लोसाने निर्णय घेतला की तो अखया प्रांतात जाण्यास इच्छुक आहे तेव्हा इफिस येथिल विश्वासणाऱ्याने त्याला सांगितले की तसे कर त्याच्यासाठी उत्तम होईल. म्हणून त्यांनी अखयातील विश्वासणाऱ्यांना पत्र लिहिले, आणि अपुल्लोसाचे स्वागत करावे असे त्यास सांगितले. तो तेथे पोहोंचल्यावर देवाने आपल्या दये द्वारे ज्यांना येशूवर विश्वास ठेवण्यास सक्षम केले होते अशांना त्याने सहकार्य केले.
\v 28 अपुल्लोस यहूदी पुढाऱ्यांशी फार सामर्थ्याने बोलत असे आणि बरेच लोक त्याचे ऐकत असत तो शास्त्रलेखाचे वाचन करून येशू हा मसीहा आहे हे त्यांना तो दाखवू शकत होता.
\s5
\c 19
\s इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य
\p
\v 1 अपुल्लो करिंथ येथे असता, पौल फुग्रिया आणि गलतिया व आशियातील सर्व भागात प्रवास करत इफिस येथे परत आला तेथे तो काही लोकांना भेटला जे स्वतःला विश्वासणारे म्हणत असत.
\v 2 त्याने त्यांना विचारले, “तुम्ही देवाच्या संदेशावर विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा प्राप्त झाला का?” त्यानी उत्तर दिले, “नाही, आम्हांला मिळाला नाही. पवित्र आत्मा आहे हे आम्ही ऐकले देखिल नाही.”
\s5
\v 3 तर पौलाने विचारले,“तर जेव्हा तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्हाला काय माहिती होते?” त्यांनी उत्तर दिले, “योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने जे काही सांगितले त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला.”
\v 4 पौल म्हणाला,“आपल्या दृष्ट कृत्यांपासून जे लोक मागे फिरले त्याचा योहानाने बाप्तिस्मा केला. त्याने लोकांना त्याच्या नंतर जो येणार होता त्या व्यक्ती वर म्हणजेच येशूवर विश्वास ठेवण्याविषयी सांगितले.”
\s5
\v 5 जेव्हा त्या मनुष्यांने ऐकले, तेंव्हा त्याचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला.
\v 6 त्या नंतर त्याच्या पैकी प्रत्येकाच्या डोक्यावर एकानंतर एक पौलाने हाथ ठेवला आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ त्यांच्या पैकी प्रत्येकावर उतरले. पवित्र आत्म्याने त्यांना त्यांनी कधीही शिकल्या नाहीत अशा भाषेत बोलण्याची शक्ती दिली, आणि पवित्र आत्म्याने सांगितल्या प्रमाणे ते संदेश देऊ लागले.
\v 7 पौलाने ज्यांना बाप्तिस्मा दिला आणि ज्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला असे ते सुमारे बारा पुरूष होते.
\s इफिस येथे पौल
\s5
\p
\v 8 त्या नंतर जवळपास तीन महिने इफिस मधील सभास्थानात दर शब्बाथ दिवशी पौल जात असे आणि तेथील लोकांना येशूविषयी आणि देव स्वतःला राजा म्हणून कसा प्रगट करेल या विषयी सांगून लोकांचे मन वळवत असे.
\v 9 परंतु यहूद्यांपैकी काही लोक त्या संदेशावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्या विषयी अधिक ऐकण्याची त्यांची इच्छा नव्हती. पौल जे काही शिकवत आहे त्याबद्दल त्यांनी बऱ्याच वाईट गोष्टी बोलल्या. म्हणून पौलाने त्यांना सोडून दिले आणि विश्वासणाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन तुरूंगाच्या तुरन्नाच्या पाठशाळेत तो गेला.
\v 10 तेथे पौलांने दोन वर्ष लोकांना शिकवले. अश्या प्रकारे आशिया प्रांतात राहणाऱ्या बहुतेक सर्व यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांनी प्रभू येशूचा संदेश ऐकला.
\s5
\p
\v 11 देवाने पौलाला हे चमत्कार करण्याचे सामर्थ दिले.
\v 12 काही आजारी लोक पौलाकडे येऊ शकले नाही तर पौलाने स्पर्श केलेला एखाद्या कापडाचा तुकडा लोक घेऊन जात आणि आजाऱ्यांवर ठेवत. परिणामी आजारी लोक बरे होत आणि त्यांच्यातून दूर आत्मा निघून जात होते.
\s5
\p
\v 13 तेथे काही यहूदी लोक जे गावो गावी फिरत असत आणि तेथील लोकांमध्ये दूरात्मा असल्यास ते त्यांना घालवत असत. त्या पैकी काही यहूदी लोकांमधील दृष्ट आत्म्यांना हे सांगून घालवत,“पौल ज्या येशू विषयी शिकवतो त्या प्रभू येशूच्या नावात मी तुला आज्ञा करतो तू बाहेर निघ!”
\v 14 असे करणारे ती सात माणसे होती. ते स्किवा नावाच्या पुरूषाची मुले होती आणि तो यहूदी असून स्वतःला मुख्य याजक म्हणत असे.
\s5
\v 15 परंतु एके दिवशी ते अशा प्रकारे कार्य करत असता तो दुष्ट आत्मा त्या व्यक्तीतून बाहेर आला नाही. परंतु तो दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला,“मला येशू ठाऊक आहे मी पौलालाही ओळखतो परंतु तुम्हाला मला काहीही करण्याचे सामर्थ्य दिलेले नाही!
\v 16 हे म्हटल्या नंतर ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने स्किवाच्या मुलांवर उडी मारली व हल्ला केला. त्याने त्यांना खाली पाडले व त्यांच्यातील प्रत्येकाला घायाळ केले. त्याने त्या सर्वांचे कपडे फाडले आणि त्यांना जखमी केले. ते घाबरले आणि ते त्या घरातून पळून गेले.
\v 17 इफिस मध्ये राहणारे सर्व लोक यहूदी आणि परराष्ट्रीयांनी जे घडले त्या विषयी ऐकले. दुष्ट आत्मा लागला तो मनुष्य फार बलवान होता हे पाहून ते सर्व घाबरले. त्याच वेळेस त्यांनी प्रभू येशूच्या नावाचा आदर आणि सन्मान केला.
\s5
\p
\v 18 त्या वेळेस जेव्हा इतर विश्वासणारे ऐकत होते अनेक विश्वासणाऱ्यांनी ही हे कबूल केले तेही अश्या दुष्ट गोष्ट करत होते काही लोक जे जादू टोणा करणारे होते.
\v 19 त्यांनी आपली पुस्तके बाहेर काढली. त्यामध्ये जादू कशी करावी हे लिहले होते आणि सर्वांच्या समोर एका ठिकाणी एकत्रित करून त्यांनी त्या जाळल्या. जेव्हा लोकांनी त्या पुस्तकांची किंमत लावली तेव्हा ती जवळपास पन्नास हजार चांदीच्या नाण्यां ऐवढी होती.
\v 20 अशा प्रकारे बऱ्याच लोकांनी प्रभू येशू विषयीचा संदेश ऐकला आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
\s पौलाचे पुढले बेत
\s5
\p
\v 21 इफिसमध्ये आपले काम पूर्ण केल्यानंतर आत्म्याने त्याला यरुशलेममध्ये जाण्याचा निश्चय करण्यास प्रवृत केले, परंतु प्रथम मासेदोनिया आणि अखया प्रांतातील विश्वाणाऱ्यांना जाऊन भेटण्याची त्यांनी योजना आखली. पौल म्हणाला, “मी यरूशलेमेस गेल्यानंतर मला रोमला ही जावे लागेल.”
\v 22 त्याने आपले दोन सहकारी तीमथ्य आणि एरास्त यांना मासेदोनिया येथे पाठवले परंतु पौल आसिया प्रांतातीली इफिस येथेच राहिला.
\s इफिस येथील दंगल
\s5
\p
\v 23 या नंतर लगेच इफिस येथले लोक येशू आणि त्याच्या विषयीच्या शिक्षणा मुळे गोंधळ निर्माण करू लागले.
\v 24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य तेथे होता. अर्तमी(डायना ) देवीच्या चांदीच्या मूर्त्यांना तो बनवत असे. देमेत्रिय अशा मूर्त्या बनवणाऱ्या व विकणाऱ्या सर्व माणसांसाठी भरपूर पैसा कमवत असे.
\p
\v 25 मूर्त्या बनवणाऱ्या सर्व मुर्त्यीकारांना देमेत्रियाने एकत्र केले तो त्यांना म्हणाला आपले काम करून आपण खुप पैसा कमवतो हे तुम्हाला ठाऊक आहे.
\s5
\v 26 आपण ज्या मूर्त्या बनवतो त्या कोणीही विकत घेऊ नये असे पौलाने इफिस मध्ये राहणाऱ्या सर्वांना सांगितले हे तुम्हाला ठाऊक आहे. ऐवढेच नव्हे तर आशिया प्रांतात राहणाऱ्या इतर गावातील लोकांनाही आपण जे बनवतो ते विकत घेण्याची इच्छा नाही. पौल लोकांना हे सांगतो की आपण ज्या मूर्त्या बनवतो त्यात देव नाही आणि त्यांची उपासना करू नये.
\v 27 जर लोक त्याचे ऐकतील तेव्हा आपला व्यवसाय ठप होईल. अर्तमी(डायना) देवीच्या मंदिरात जाऊन तिची उपासना करण्याचा विचार लोक यापुढे करणार नाहीत. अर्तमी (डायना) ही महान देवी आहे हा विचार ही लोक करणार नाही. परंतु संपूर्ण आसिया प्रांत आणि संपूर्ण जग तिची उपासना करणारे आहेत!
\s5
\v 28 देमेत्रियांनी जे सांगितले त्यामुळे ते सर्व पुरूष पौलावर चिडले आणि ते ओरडू लागले,“इफिस मधील अर्तमी(डायना) देवी थोर आहे!
\v 29 त्या शहरातील अनेक लोक पौलावर चिडले आणि तेही ओरडू लागले. त्याच्या पैकी काही लोकांनी गायस आणि अरिस्तार्ख जे मासेदोनियाचे असून पौला सोबत प्रवास करणारे होते त्यांना त्याने धरले. त्या नंतर लोकांचा संपूर्ण जमाव त्या दोघांना आपल्या सोबत ओढत घेऊन त्यांना शहराच्या नाट्यगृहात घेऊन गेला.
\s5
\v 30 पौलाची इच्छा होती की नाट्यगृहात जाऊन लोकांनशी बोलावे परंतु इतर विश्वासणारे त्याला तसे करू देईना.
\v 31 त्या शहरातील अधिकारी जे पौलाचे मित्र होते त्यांनी काय घडत आहे ते ऐकले त्यांनी काही लोकांना पाठवून पौलाने नाट्यगृहात जाऊ नये असे त्याला सांगितले.
\p
\v 32 नाट्यगृहात जमलेला लोकांचा जमाव गोंधळ घालत राहिला व आरडा ओरडा करत राहिला. काही लोक एका गोष्टी विषयी ओरडत होते काही लोक दुसरे काही तरी ओरडत होते. लोकांचा एक गट काही घोषणा करत होता लोकांचा दुसरा गट काही घोषणा करत होता त्याच्या पैकी बहुतेकांना हे ठाऊक ही नव्हते की ते तेथे का जमले आहेत.
\s5
\v 33 तेथे जमलेल्या यहूद्यांपैकी एकाचे नाव आलेक्सांद्र असे होते. काही यहूदी यांनी त्याला पुढे ढकलले जेणेकरून तो लोकांसोबत बोलू शकेल. अलेक्सांद्राने आपल्या हाताने इशारा करून जमावाला शांत करायचा प्रयत्न केला. तो त्यांना हे सांगू इच्छित होता की यहूद्यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ केलेला नाही.
\v 34 तेथे जमलेल्या बऱ्यांपैकी परराष्ट्रीय लोकांना आलेक्सांद्र हा यहूदी आहे आणि यहूदी अर्तमी (डायना) देवीची उपासना करत नाहीत हे त्यांना ठाऊक होते. म्हणून परराष्ट्रीय लोक दोन तास पर्यंत “इफिसची देवी डायना थोर” अशी घोषणा करत राहिले.
\s5
\p
\v 35 त्या नंतर शहरातील एका अधिकाऱ्याने जमावाला शांत केले. तो त्यांना म्हणाला,“माझ्या सोबतीच्या नागरीकांनो जगातील प्रत्येकाला ठाऊक आहे की अर्तमी (डायना) देवीची मूर्ती स्वर्गातून खाली पडली आहे!
\v 36 प्रत्येकाला हे ठाऊक आहे आणि कोणीही ह्या गोष्टी खोटे आहे हे म्हणू शकत नाही. म्हणून आता तुम्ही सगळे शांत व्हा. कोणतेही मूर्खपणाच्या गोष्टी करू नका.
\v 37 तुम्ही ह्या दोन मनुष्यांना येथे आणायला नको होते कारण की त्यांनी कोणतेही दुष्ट काम केले नाही. त्यांनी आपल्या मंदिरात जाऊन तेथून काहीही घेतले नाही आणि आपल्या देवीच्या विरुध्द काही वाईट बोलले नाही.
\s5
\v 38 म्हणून जर देमेत्रिय आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्यांना जर कोणावर वाईट केल्याचा दोषारोप करायचा असेल यांनी योग्य पद्दतीने तो करावा. आपल्या मध्ये न्यायालय आहेत त्यांनी तेथे जावे, आणि सरकार ने न्यायाधिश नियुक्त केले आहेत त्यांच्याकडे आपला वाद न्यावा. तेथे तुम्ही कोणावरही आरोप लावू शकता.
\v 39 परंतु त्या वैयक्तिक जर तुम्हाला कशाची आवश्यकता असेल तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांनी ते काम करावे अशी त्यांना विनंती करा असा हा जमाव योग्य नाही!
\v 40 ह्या गोंधळाचा योग्य तो निस्तारा करा कारण आम्हांला सरकारच्या विरुध्द जायचे नाही. जर अधिकाऱ्यांनी मला विचारीले की तुम्ही सर्व जमाव कशाचा गोंधळ घालत होता तर त्यांना योग्य स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.”
\v 41 शहराच्या अधिकाऱ्याने जमावाला हे उत्तर दिले. मग त्यांने ह्या सर्वांना आपआपल्या घरी जाण्यास सांगितले आणि ते सगळे आपआपल्या घरी परतले.
\s5
\c 20
\s मासेदोनिया, हेल्लास प्रांत व त्रोवस येथे पौल
\p
\v 1 इफिसमधिल लोकांनी दंगल बंद केल्यानंतर, पौलाने सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र बोलावले त्यांनी प्रभू येशूवर भरवसा ठेवने चालू ठेवावे अशी त्यांना विनंती केली त्यानंतर त्याने त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनिया प्रांताकडे निघून गेला.
\v 2 तो तेथे पोहोंचल्या नंतर त्यांनाही येशूवरील विश्वासात दृढ राहण्याची विनंती केली तेथून तो हेल्लास प्रांतात गेला.
\v 3 ग्रीस येथे तो तीन महिने राहिला. तो जहाजाने सूरिया येथे परत जाण्याचा विचार करत असता, त्याने हे ऐकले होते की, तो तेथे प्रवासात असताना काही यहूदी त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. म्हणून तो पुन्हा मासेदोनियामधून गेला.
\s5
\v 4 त्याच्यासोबत यरुशलेमेला प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये हे होते बिरुया शहरातील पुर्राचा पुत्र सोपत्र; थेस्सलनेकेतील अरिस्तार्ख आणि सकूंद, दर्बे शहरातून गायस, गलातिया प्रांताचा तीमथ्य, आणि तुखिक व त्रफिम जे आशिया प्रांतातील होते.
\v 5 ही सात माणसे मी आणि पौल ह्यांच्यापुढे मासेदोनियाहून जहाजाने गेलीत. म्हणून ती त्रोवस ह्या शहरात आम्ही पोहोचण्याच्या अगोदर पोहोचली आणि आम्हां दोघांची त्यांनी तेथे वाट पाहिली.
\v 6 परंतु मी आणि पौल खूशकीच्या मार्गाने फिलिप्पै शहरापर्यंत प्रवास करीत गेलो तेथे खमिर न घालता बनवण्यात येणाऱ्या भाकरीचा यहूदी सण आटोपल्या नंतर त्रोवस शहरात जाणारे जहाज आम्हास आढळले व त्यात आम्ही बसलो पाच दिवसानंतर आम्ही त्रोवस येथे पोहोंचलो आणि आमच्यापुढे ज्यांनी प्रवास केला त्या मनुष्यांशी आमची भेट झाली. त्रोवस ह्या शहरात सात दिवस आम्ही खुप काम केले.
\s युतुख
\s5
\p
\v 7 रविवारी संध्याकाळी आम्ही आणि इतर विश्वासणारे प्रभू भोजन करण्याकरीता आणि एकत्र जेवण करण्याकरीता जमलो. पौल मध्यरात्रीपर्यंत विश्वासणाऱ्यांशी बोलत गेला. कारण की तो त्रोवस सोडून दुसऱ्या दिवशी जाण्याची योजना करत होता.
\v 8 आम्ही ज्या माडीवरच्या खोलीत एकत्र आलो होतो. अनेक तेलाचे दिवे प्रकाशासाठी जळत होते.
\s5
\v 9 एक तरुण मुलगा ज्याचे नाव युतुख होते तोही तेथे होता. त्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील उघड्या खिडकीच्या चौकटीवर तो बसला होता पौल बराचकाळ बोलत राहिल्यामुळे युतुखला डुलकी लागली व तो तेथेच पेंगू लागला. शेवटी तो गाढ झोपी गेला. आणि त्या खिडकीवरून तो खाली जमिनीवर पडला. काही विश्वासणारे लगेच खाली धावत गेले आणि त्यांनी त्याला उचलले, परंतु तो मरण पावलेला होता.
\v 10 पौलही खाली गेला, त्याने त्याच्यावर पाखर घातली आणि त्या तरुणावर तो निजला आपले हात त्याने त्याच्या भोवती घेतले व त्याला मिठी मारली मग जे लोक त्याच्या अवतीभोवती उभे होते त्यांच्याकडे वळून तो म्हणाला, “काळजी करू नका! तो आता पुन्हा जिवंत झाला आहे.”
\s5
\v 11 मग पौल आणि इतर पुढारी पुन्हा वर गेले आणि तेथे त्यांनी जेवण केले व प्रभू भोजन घेतले. त्यानंतर सूर्य उगवेपर्यंत पौल विश्वासणाऱ्यां संगती बोलला आणि मग तो तेथून निघाला.
\v 12 इतर लोकांनी तरुणाला परत घरी नेले आणि तो पुन्हा जिवंत झाला म्हणून त्यांना फार मोठे सांत्वन प्राप्त झाले.
\s मिलेताचा प्रवास
\s5
\p
\v 13 मग आम्ही जहाजाकडे गेलो परंतु पौल आमच्या संगती त्रोवस मध्ये जहाजात चढला नाही कारण त्याला आमच्याहून लवकर जमिनीच्या मार्गाने अस्सा ह्या शहरात जायचे होते म्हणून उरलेले आम्ही जहाजात चढलो आणि अस्सा ह्या समुद्र मार्गे निघालो.
\v 14 आम्ही पौलाला अस्सा तेथे भेटलो तेथून तो आमच्या संगती जहाजात चढला. समुद्र मार्गे मिलेत ह्या शहराकडे गेलो.
\s5
\v 15 मिलेत येथे पोहोचल्यावर एक दिवस थांबल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासात निघालो आणि खियास नावाच्या एका बेटावर पोहोचलो पुढल्या दिवशी आम्ही सामा सोडले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मिलेतास पोहोचलो.
\v 16 मिलेत हे शहर इफिसच्या दक्षिणेला होते आणि पौलाची आशियामध्ये अधिक काळ थांबायची इच्छा नव्हती म्हणून त्याला इफिस येथे जायचे नव्हते, शक्य असल्यास यरूशलेमेस पेटेकॉस्टच्या सणाच्या दिवसात असावे अशी त्याची इच्छा होती आणि सणाचा काळ जवळ आला होता.
\s मिलेत तेथे इफिसच्या वडिलवर्गाशी पौलाने वियोगसमयी केलेले भाषण
\s5
\p
\v 17 मिलेत येथे आमचे जहाज पोहोचल्यावर पौलाने इफिस येथे एक संदेश वाहक पाठवला आणि तेथिल विश्वासणाऱ्यांच्या वडिलांना त्याने आपल्याला भेटण्यास यावे असा संदेश पाठवला.
\p
\v 18 जेव्हा वडील तेथे पोहोंचले पौल त्याना म्हणाला, “मी आशिया प्रांतात आलो त्या पहिल्या दिवसापासून मी येथून जाण्याच्या दिवसापर्यंत मी तुम्हा सोबत असतांना संपूर्ण वेळ कसा वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे.
\v 19 मी प्रभू येशूची सेवा विनम्रपणे कशी करत राहिलो आणि अनेकदा मी रडलो हेही तुम्ही जाणता विश्वास न ठेवणारे यहूदी ह्यांनी मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी कसा छळ सहन केला हेही तुम्हास माहित आहे.
\v 20 मी जेव्हा तुम्हाला देवाचा संदेश सांगितला तुम्हा पासून मी कोणतेही उपयोगाची गोष्ट राखून ठेवली नाही. लोकांच्या उपस्थितीत मी तुम्हाला देवाचा संदेश शिकवला आहे आणि मी तुमच्या घरात जाऊनही तुम्हा सोबत तो संदेश शिकवला आहे.
\v 21 मी यहूदा व गैर यहूद्यांनी उपदेश केला आहे त्यांनी आपल्या पापी स्वभावापासून वळावे, आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवावा हे मी त्यांना सांगितले.
\s5
\p
\v 22 आणि आता मी यरुशलेमेत जात आहे कारण पवित्र आत्म्याने मला स्पष्टपणे दाखवले की मी तेथे जाणे अवश्यक आहे आणि मी त्याची आज्ञा पाळनेही अवश्यक आहे. तेथे माझे काय होईल हे मला ठाऊक नाही.
\v 23 परंतु मला हे माहिती आहे की ज्या प्रत्येक शहराला मी भेट दिली तेथे पवित्र आत्म्याने मला सांगितले की यरुशमेलेत लोक मला तुरूंगात टाकतील आणि माझा छळ होईल.
\v 24 लोकांनी मला ठार जरी केले तरी मला काही परवा नाही, परंतु त्या अगोदर प्रभू येशूने मला जे काम करावयास दिले ते संपवने आवश्यक आहे, आमची लायकी नसताना ही देव आम्हासाठी जे करून आमचे तारण करतो त्याचा चांगला संदेश मी लोकांना सांगावा ह्यासाठी त्याने मला पाचारण केले आहे.
\s5
\v 25 देव स्वताःला राजा म्हणून कशा रितीने प्रकट करेल हा संदेश मी तुम्हा सर्वांना दिला आहे परंतु मला हेही ठाऊक आहे की मी तुम्हाला समोरासमोर दिसण्याची ही आजची शेवटची वेळ आहे.
\v 26 म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुम्ही मला उपदेश करतांना ऐकले आणि येशूवर विश्वास न ठेवता कोणाचा मृत्यु झाला तर त्याचा मी दोषी नाही;
\v 27 कारण मी तुम्हाला देवाने आम्हासाठी जी योजना केली होती ती पूर्णपणे सांगितली आहे.
\s5
\v 28 तुम्ही पुढाऱ्यांनी देवाच्या संदेशावर विश्वास ठेवावा व त्याचे आज्ञापालन करत राहावे. तसेच जे इतर विश्वासणारे पवित्र आत्म्याने काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे दिले आहे त्यांना तुम्ही मदत करत राहावे. जसा मेंढपाळ आपल्या मेंढपाळ्यांवर देखरेख करतो तसेच तुम्ही विश्वसाणाऱ्या समुहाची व स्वतःचीही देखभाल करावी, देवाच्या पुत्राच्या शरीरातून वधस्तंभावर जे रक्त वाहिले त्या रक्ताने देवाने त्यांना विकत घेतले आहे.
\v 29 मला हे चांगले ठाऊक आहे की मी येथून गेल्यानंतर जे खोट्या गोष्टी शिकवतात असे लोक तुम्हामध्ये येतील आणि विश्वासणाऱ्यांना खुप नुकसान पोहोचवतील मेंढराना ठार करणाऱ्या हिंसक कोल्ह्यांसारखे ते आहेत.
\v 30 तुम्हा पुढाऱ्यांच्या गटामध्ये काही लोक चुकीच्या गोष्टी शिकवून विश्वासणाऱ्यांशी खोटेपणा करतील, ते तसा संदेश शिकवतील काही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि त्या गोष्टी शिकवणाऱ्याचे अनुयायी होतील. म्हणून प्रभू येशूच्या सत्य संदेशावर विश्वास ठेवने तुम्हापैकी कोणीही थांबवू नये म्हणून काळजी घ्या!
\s5
\v 31 तीन वर्ष रात्रंदिवस मी तुम्हाला तो संदेश शिकवला आहे आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रभू संगती तुम्ही विश्वास योग्य राहावे अशी विनंती केली आहे ह्याची आठवण ठेवा.”
\p
\v 32 “आमची कोणतीही पात्रता नसतांना तो आम्हांला वाचवतो ह्या संदेशावर विश्वास ठेवत राहा आणि मी आता निघतांना ही प्रार्थना करतो, की देवाने तुमचे रक्षण करावे. जो संदेश मी तुम्हाला सांगितला त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत राहाल तर मजबुत व्हाल आणि जे कोणी देवाचे आहेत त्या सर्वांना देवाने जे अभिवचन दिले आहे ते परमेश्वर तुम्हाला युगानयुग देत राहिल.
\s5
\p
\v 33 मी स्वतःसाठी कोणाच्याही पैश्यांचा किंवा सुंदर कपड्यांचा कधीही लोभ धरलेला नाही.
\v 34 माझ्या मित्रांना आणि मला जेव्हा पैश्यांची गरज पडली तेव्हा तुम्हाला हे चांगले ठाऊक आहे की मी आपल्या स्वतःच्या हातांनी काम केले व पैसा कमावला.
\v 35 जे काही मी केले त्यात मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही ही कठीण परिश्रम करावे जेणेकरून आपल्यापैंकी जे गरजू आहे त्यांना देण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा असावा आपल्या प्रभू येशूने जे म्हटले त्याची आपण आठवण ठेवावी, “एखादी व्यक्ती इतरांपासून घेतो त्यापेक्षा जेव्हा तो इतरांना देतो त्यावेळेस अधिक आनंदित असतो.”
\s5
\p
\v 36 पौलाने आपले बोलणे संपवल्यानंतर त्या वडिलांसोबत त्याने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
\v 37 ते खुप रडले आणि त्यांनी पौलाला मिठी मारली आणि त्याचे मुके घेतले.
\v 38 तो त्यांच्या पुन्हा दृष्टीस पडणार नाही हे जे तो बोलला त्याबद्दल ते खुप दुखीत होते मग ते त्याला जहाजापर्यंत सोडण्यासाठी गेले.
\s5
\c 21
\s मिलेताहून सोरापर्यंत येणे
\p
\v 1 इफिस येथील वडील वर्गास निरोप दिल्यानंतर आम्ही जहाजात बसलो आणि कोस बेटाकडे प्रवास करत निघालो. तेथे आम्ही रात्रभर मुक्काम केला. तेथे जहाजाने मुक्काम केला. मग दुसऱ्यादिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथेही जहाज थांबले होते नंतर आम्ही पातऱ्या या शहरात गेलो.
\v 2 पातऱ्याला आम्ही आमचे जहाज सोडले आणि कोणीतरी आम्हास असे सांगितले की एक जहाज फेनिकेला जाणार आहे आम्ही त्या जहाजात बसलो आणि ते निघाले.
\s5
\v 3 कुप्र हे बेट दिसेपर्यंत आम्ही समुद्रातून प्रवास केला. आम्ही बेटाच्या दक्षिणेकडे गेलो आणि सूरिया प्रांतातील पाताऱ्यास नगरातील फेनिकेला, सीरिया प्रांतातील, सोर शहरात पहोंचेपर्यंत जहाजातून प्रवास केला. जहाजातून माल उतरावयाचा होता, म्हणून जहाज तेथे बरेच दिवस थांबणार होते.
\p
\v 4 पाताऱ्यास येथे विश्वासणारे कोठे राहतात ते कोणीतरी आम्हास सांगितले. आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याबरोबर सात दिवस राहिलो. देवाच्या आत्म्याने त्यांना प्रगट केले यरुशलेम येथे लोक पौलाचा छळ करत आहेत म्हणून पौलाने यरुशलेमेत जाऊ नये असे त्यांनी पौलास सांगितले.
\s5
\v 5 जहाजाची पुन्हा निघण्याची वेळ झाली तेव्हा आम्ही पुढे यरुशलेमाला जाण्याची तयारी केली पाताऱ्यास सोडतांना तेथील सगळे विश्वसणारे, त्यांच्या बायका व त्यांची मुले हे सर्व आम्हांला निरोप देण्यास समुद्रकीनारी आले. आम्ही तेथे वाळूत गुडघे टेकून प्रार्थना केली.
\v 6 एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर, पौल आणि त्याच्या सोबतीचे आम्ही जहाजात बसलो आणि इतर विश्वसणारे आपआपल्या घरी निघून गेले.
\s कैसरीयास येणे
\s5
\p
\v 7 सोर सोडल्यानंतर आम्ही त्या जहाजातून पोलेमा नगराकडे निघालो तेथे विश्वसणारे होते, आम्ही त्यांना अभिवादन केले आणि त्याच्या संगती रात्री मुक्काम केला.
\v 8 आम्ही प्तलमैस दुसऱ्या दिवशी सोडल्यानंतर कैसरीया शहराकडे समुद्र प्रवास सुरू केला, तेथे पहोचल्यावर आम्ही फिलीप्पच्या घरात मुक्कामी राहीलो. हा येशू ख्रिस्ताचे अनुयायी कसे बनावे हे इतरांना सांगत आपला वेळ घालवत असे. यरुशलेमेतील विश्वासणाऱ्यांनी त्याच्या विधवांची काळजी घेण्यासाठी जे सात पुरुष निवडले होते त्यापैकी हा होता.
\v 9 त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्यांच्यापैकी प्रत्येकीला पवित्रआत्मा सांगत असे, तो संदेश त्या बऱ्याचदा देत असे.
\s5
\p
\v 10 फिलिप्पच्या घरी आम्ही बरेच दिवस राहिलो तेव्हा यहूदा प्रांतातून अगब नावाचा एक विश्वासणारा कैसरिया येथे आला. पवित्र आत्मा त्याला सुचवत असे ते तो संदेश वेळोवेळी देत असे.
\v 11 आम्ही जेथे होतो तेथे तो आला, आणि त्याने पौलाचा कमरबंद आपल्या हातात घेतला. मग त्याने आपले स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो, ‘यरुशलेमेतील यहूदी पुढारी ह्या कमरबंदाच्या मालकाचे हात व पाय अशा रितीने बांधले, आणि ते त्याला परराष्ट्रीय लोकांच्या हाती कैदी म्हणून देतील.”
\s5
\v 12 जेव्हा आम्ही हे ऐकले तेव्हा आम्ही व इतर विश्वासणाऱ्यांनी पौलाला विनंती केली की, “हे बघा यरुशलेमेत वर जाऊ नकोस!”
\v 13 परंतु पौलाने सांगितले, “कृपया रडणे थांबवा आणि मी तेथे जाऊ नये म्हणून माझे अंतःकरण निराश करू नका,” तुम्ही मला जाण्यापासून माझे मन का खचवत आहात? मी प्रभू येशूची सेवा करतो म्हणून यरुशलेमेत मी केवळ तुरूंगातच नव्हे, तर त्याच्यासाठी मरायला देखिल तयार आहे.”
\v 14 जेव्हा आम्हास ही जाणीव झाली की तो यरुशलेमेला जाईलच, आम्ही त्यानंतर पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही म्हणालो, “प्रभूची इच्छा पूर्ण होवो!”
\s यरुशलेमस येणे
\s5
\p
\v 15 कैसरियातील त्या दिवसानंतर आम्ही आमची साधन संपत्ती एकत्र केली, आणि मार्गाने प्रवास करत यरुशलेमेत जाण्यासाठी निघालो.
\v 16 कैसरियातील काही विश्वासणारे आम्हासोबत आले. म्नासोन नावाच्या एका माणसाच्या घरी त्याने आम्हांला राहायला नेले. तो कुप्र येथील बेटावरचा मनुष्य होता. जेव्हा सुरवातीला लोक येशूबद्दल ऐकायला तयार झाले, तेव्हाच त्याने येशूवर विश्वास ठेवला.
\s यहूद्यांतून ख्रिस्ती झालेल्यांची समजूत घालण्यासाठी पौलाने केलेला नवस
\s5
\p
\v 17 आमचे यरुशलेमेमध्ये आगमन झाल्यावर विश्वासणाऱ्यांच्या समुहाने आमचे आनंदाने स्वागत केले.
\v 18 दुसऱ्या दिवशी पौल आणि आम्ही सगळे तेथील मंडळीचा पुढारी याकोब ह्याला भेटण्यास व त्याच्याशी बोलण्यास गेलो. यरुशलेमेतील मंडळीचे इतर सर्व पुढारी तेथे हजर होते.
\v 19 पौलाने सर्वांना अभिवादन केले, आणि परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने त्याला ज्या गोष्टी करावयास साहाय्य केले त्या सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या.
\s5
\v 20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा याकोब आणि इतर पुढाऱ्यांनी परमेश्वराचे आभार मानले त्यापैकी एकाने पौलाला म्हटले, “बंधू तुला हे ठाऊक आहे की आम्हां यहूदी लोकांपैकी हजारोंनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे. आणि तुला हेही माहिती आहे की आम्ही काळजीपूर्वक मोशेच्या नियमशास्त्राचे आज्ञापालन करतो.
\v 21 परंतु आमचे सोबतीचे यहूदी विश्वासणारे ह्यांना असे सांगण्यात आले आहे की तू जेव्हा परराष्ट्रीय लोकांमध्ये असतो, तेव्हा तू तेथील यहूदी विश्वासणाऱ्यांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांनी थांबवावे असे शिक्षण देतो असे त्यांनी ऐकले आहे. लोक असे म्हणतात की, यहूदी विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या मुलांची सुंता करू नये, आणि इतर रीतीरीवाजांचे पालन करू नये. ते तुझ्याविषयी सत्य सांगत आहेत असे आम्हास वाटत नाही.
\s5
\v 22 आम्हां सोबतीचे यहूदी विश्वासणाऱ्यांना हे कळेल की तू आला आहेस आणि त्यामुळे ते कदाचित रागाने भरतील. म्हणून त्यांनी तुझ्याविषयी जे ऐकले ते खरे नाही हे दाखवण्याकरता तू काहीतरी केले पाहिजे.
\v 23 म्हणून आम्ही तुला जे सुचवतो ते तू कृपया करावे. आमच्यामध्ये चार लोक असे आहेत ज्यांनी देवाला नवस केला आहे.
\v 24 तर तू ह्या माणसा सोबत मंदिरात जा आणि त्यांच्यासाठी व तुझ्यासाठी आवश्यक त्या विधी पूर्ण करून घे. म्हणजे तू मंदिरात उपासना करू शकशील नंतर जेव्हा अर्पण करण्याची त्यांची वेळ येईल तेव्हा अर्पणाच्यावेळी तुम्ही त्यांचा खर्च भरावा. त्यानंतर ते आपल्या डोक्याच्या केसांचे मुंडन करू शकतील जेणेकरून त्यांनी जे म्हटले होते ते केले आहे हे दिसावे. जेव्हा लोक तुला मंदिराच्या अंगणात ह्या पुरुषां सोबत पाहतील तेव्हा त्यांनी तुझ्याविषयी जे ऐकले होते ते खरे नाही हे त्यांना कळेल. त्या ऐवजी त्यांना असे समजेल की तू आमच्या सर्व यहूदी नियमशास्त्राचे पालन करणारा आहेस.
\s5
\v 25 आणि परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांच्या सबंधात, यरुशलेमेतील आम्हां वडिलांनी त्यांनी आमचे कोणते नियम पाळावे ह्या विषयी चर्चा केली आहे व त्यांना पत्र ही दिले आहेत आणि आमच्या निर्णयांना त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहेत. आम्ही त्यांना असे लिहिले की लोकांनी मूर्तीला अर्पिलेले मांस त्यांनी खाऊ नये, प्राण्यांच्या रक्ताचे सेवन त्यांनी करू नये, लोकांनी ज्या प्राण्यांना गुदमरून ठार केले आहे त्यांचे मांस खाऊ नये. आणि त्यांना हे देखिल सांगितले की ज्यांच्या संगती त्यांचा विवाह झालेला नाही अशांसोबत लैंगिक संबंध प्रस्तापित करू नये.
\v 26 पौल त्यांनी जे सांगितले ते करण्यास तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी तो त्या चार भावांसोबत त्यांना घेऊन गेला त्यांनी स्वतःला शुद्ध केले. त्यानंतर पौल मंदिराच्या अंगणात गेला आणि तेथे जाऊन त्याने याजकांना सांगितले की कोणत्या दिवशी ते स्वतःला शुद्ध करतील आणि ते त्यांच्यातील प्रत्येकासाठी प्राण्यांचे अर्पण करतील.
\s यरुशलेमेतला दंगा व पौलाला अटक
\s5
\p
\v 27 त्यांचे शुद्धिकरणाचे सात दिवस परिपुर्ण होत आले असता, पौल मंदिराच्या अंगणात परतला. आशियातील काही यहूदी ह्यांनी त्याला तेथे पाहिले, आणि ते त्यांच्यावर फार चिडले. त्यांनी मंदिरातील अंगणात जमलेल्या इतर यहूदी ह्यांना पौलाला धरण्यासाठी मदत मागीतली.
\v 28 ते ओरडले, “इस्त्राएली बंधूनो, कृपया या माणसाला शासन करण्यास आम्हांला साहाय्य करा! हाच तो व्यक्ती आहे जो लोकांना सगळीकडे असे सांगत फिरतो की तुम्ही यहूदी लोकांचा तिरस्कार करा. लोकांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करू नये आणि ह्या पवित्र मंदिराचा सन्मान करू नये असे हा लोकांना सांगत फिरतो. त्याने तेथे परराष्ट्रीय लोकांनाही मंदिरात आणले आहे आणि ही जागा अशुद्ध केली आहे!”
\v 29 ते असे म्हणाले, कारण त्यांनी पौलाला यरुशलेमेत त्रफिम ह्या परराष्ट्रीय व्यक्ती सोबत फिरताना पाहिले होते. त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे परराष्ट्रीय लोकांना मंदिरात प्रवेश नाही आणि त्यांनी असा विचार केला की पौल त्रफिम ह्याला ही मंदिराता त्यादिवशी आपल्या सोबत घेऊन आला होता.
\s5
\v 30 शहरातील सर्व लोकांनी असे ऐकले की मंदिरात काही गोंधळ उडाला आहे, आणि म्हणून ते सगळे धावत मंदिराकडे आले. त्यांनी पौलाला धरले आणि त्याला ओढत मंदिराच्या बाहेर आणले. लोकांनी मंदिराच्या आतमध्ये दंगल करू नये म्हणून मंदिराची दारे बंद करण्यात आली.
\p
\v 31 ते पौलाला ठार करण्याचा प्रयत्न करत असता कोणी तरी मंदिराजवळील किल्यात गेला आणि तेथील रोमी अधिकाऱ्याला मंदिरात यरुशलेमेतील लोक गोंधळ घालत आहेत असे सांगितले.
\s5
\v 32 सल्या अधिकाऱ्याने तत्काळ काही अधिकाऱ्यांची व शिपयांची पलटण आपल्या सोबत घेतली आणि तो धावत जेथे लोकांचा जमा होता तेथे मंदिराकडे आला. लोकांची गर्दी जी पौलावर ओरडत होती आणि त्याला मारत होती त्यांनी सैन्य अधिकारी व सैनिकांना येताना पाहिले आणि त्यांनी त्याला मारने थांबवले.
\p
\v 33 सैन्य अधिकारी पौल होता तेथे आला आणि त्याने त्याला आपल्या ताब्यात घेतले. पौलाच्या प्रत्येक हातात साखळदंडाने त्याला बांधावे अशी त्याने सैनिकांना आज्ञा केली. तेव्हा त्याने जमावातील लोकांना विचारले, “हा मनुष्य कोण आहे आणि त्याने काय केले आहे?”
\s5
\v 34 त्यांच्यापैकी बरेच लोक कोणी काही तर दुसरे भलतेच बोलत होते. आणि ते मोठ मोठ्याने आरडाओरडा करत होते म्हणून त्या सैन्य अधिकाऱ्याला काही समजत नव्हते की ते काय बोलत आहे. म्हणून त्याने आज्ञा केली की पौलाला किल्यामध्ये घेऊन जावे आणि तेथे तो त्याची चौकशी करेल.
\v 35 सैनिक पौलाला घेऊन किल्याच्या पायऱ्यांजवळ गेले परंतु अनेक लोक त्यांच्या मागे आले आणि ते पौलाला ठार करण्याचा प्रयत्न करत होते म्हणून सैन्य अधिकाऱ्याने आज्ञा दिली की त्यांनी त्याला पाऱ्यांवरून उचलून घ्यावे आणि किल्यात न्यावे.
\v 36 त्यांच्या मागे आलेला जमाव त्याला ठार मारा, त्याला ठार मारा अशी घोषणा करत होते!
\s5
\p
\v 37 पौलाला ते किल्यात घेऊन जात असतांना त्याने सैन्य अधिकाऱ्याला ग्रीक भाषेत म्हटले, “मी तुझ्या संगती काही बोलू शकतो का?” तो सैन्य अधिकारी त्याला म्हणाला, “मला आश्चर्य वाटते की तू ग्रीक भाषा बोलतोस!
\v 38 मला असं वाटल की तू मिसरमधून आलेला तो व्यक्ती आहेस जो सरकारच्याविरुद्ध काही दिवसां अगोदर बंडखोरी करत होता आणि त्याने चार हजार लोकांना आपल्या सोबत घेऊन वाळवंटात नेले जेणेकरून आम्ही त्याला पकडू नये.”
\s5
\v 39 पौलाने त्याला उत्तर दिले, “नाही तो मी नव्हे मी एक यहूदी आहे, माझा जन्म किलिकीया प्रांतातील महत्वाचे शहर तार्सस येथला आहे. मी तुला विनंती करतो की मला लोकांशी थोडावेळ बोलू दे.”
\v 40 मग सैन्य अधिकाऱ्याने पौलाला लोकांसंगती बोलण्याची त्याला परवानगी दिली म्हणून पौल पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने त्या जमावाला शांत राहण्याचा इशारा केला. जमावातील लोक शांत झाल्यानंतर पौल त्यांच्याशी त्यांच्या स्वतःच्या इब्री भाषेत बोलू लागला.
\s5
\c 22
\s यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण
\p
\v 1 पौल म्हणाला, ‘यहूदी वडीलजनहो व माझ्या यहूदी बंधूनो, माझ्यावर जे आरोप करत आहेत त्याच्याशी मी बोलत असता कृपया तुम्ही लक्षपुर्व ऐका!
\v 2 जेव्हा जमावातील लोकांनी पौलाला त्याच्या स्वताःच्या इब्री भाषेत बोलतांना ऐकले तेव्हा ते सगळे शांत झाले आणि ऐकू लागले. मग पौल त्यांना म्हणाला,
\s5
\v 3 “जसे तुम्ही आहात तसा मी ही यहूदी आहे. किलिकिया प्रांतातील तार्सस शहरात माझा जन्म झाला परंतु मी येथेच यरुशलेमेत वाढलो. मी लहान असतांना मोशेने आपल्या पूर्वजांना दिलेले सर्व नियम शिकलो. गमलियेल माझे शिक्षक होते. मी त्या नियमांचे पालन केले कारण देवाची आज्ञा पाळावी अशी माझी इच्छा होती, आणि मला खातरी आहे की तुम्ही सर्व देखिल त्या नियमाचे पालन करता.
\v 4 आणि म्हणूनच येशूविषयीच्या देवाच्या संदेशावर विश्वास ठेवणाऱ्यांना कैद करावे म्हणून मी प्रयत्न केला. त्यांना ठार मारण्याचे निरनिराळे मार्ग मी शोधत असे. जेव्हा मला त्या संदेशावर विश्वास ठेवणारे स्त्री किंवा पुरुष सापडत तेव्हा मी त्यांना तुरूंगात टाकत असे.
\v 5 मुख्य याजकाला हे ठाऊक आहे, यहूदी धर्मसभेतील इतर बंधूही ह्या गोष्टी जानतात. दिमिष्क येथील त्याच्या सोबतीच्या यहूद्यांना देण्यासाठी पत्रे दिली होती. त्या पत्रामध्ये मला अधिकार देण्यात आला होता की मी दिमिष्क येथे जाऊन येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना अटक करावी. मग मी त्यांना कैद करून येथे यरुशलेमेस आणावे जेणे करुन त्यानां येथे शासन करता येईल.
\s5
\p
\v 6 तर मी दिमिष्क येथे गेलो. जवळपास दुपार झाली असता दिमिष्काजवळ पोहोंचलो अचानक आकाशातून एक मोठा प्रकाश माझ्याभोवती प्रकाशला.
\v 7 तो प्रकाश ऐवढा तेजस्वी होता की मी जमिनीवर पडलो. तेव्हा आकाशातून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, ‘शौला! शौला! मला छळ करण्यासाठी तू ह्या गोष्टी का करीत आहेस?
\v 8 मी उत्तर दिले, ‘तू कोण आहेस, प्रभू? तो म्हणाला, ‘मी नासरेथचा येशू आहे ज्याचा तू छळ करत आहेस.”
\s5
\v 9 माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या मनुष्याला तेजस्वी प्रकाश दिसला परंतु ती वाणी काय म्हणाली हे त्यानां समजले नाही.
\v 10 मग मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तेव्हा प्रभूने मला उत्तर दिले, ‘ऊठ व दिमिष्कामध्ये जा. तेथे एक मनुष्य तुला ते सर्व सांगेल जे करावे असे मी तुझ्यासाठी योजिले आहे.”
\v 11 त्यानंतर मला दिसेणासे झाले, कारण त्या तेजस्वी प्रकाशाने मला आंधळे केले होते. म्हणून माझ्यासोबतच्या मनुष्यांनी माझा हात धरला आणि मला दिमिष्कामध्ये नेले.
\s5
\v 12 हनन्या नावाचा एक मनुष्य मला भेटण्यास आला. तो देवाचा सन्मान करणारा व यहूदी नियमशास्त्राचे पालन करणारा मनुष्य होता. दिमिष्कांत राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलत असत.
\v 13 तो आला आणि माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो मला म्हणाला, ‘माझ्या मित्रा शौला तुला पुन्हा दिसो! लागलेच मी पाहू लागलो आणि त्याला माझ्या बाजूला उभे असलेले मला दिसले.
\s5
\v 14 मग तो मला म्हणाला, “ज्या देवाची आम्ही उपासना करतो आणि ज्या देवाची आमच्या पूर्वजनांनी उपासना केली त्याने तुला निवडले आहे आणि तू त्याच्यासाठी काय केले पाहिजे ते तो तुला दाखविल. त्याने तुला येशू मसीहा जो नीतिमान तो दाखवला आहे, आणि तू त्याला तुझ्याशी बोलतांना स्वतः ऐकले आहे.
\v 15 तू जे काही पाहिले आणि त्याच्यापासून जे ऐकले, ते सर्व लोकांना सांगावे अशी त्याची इच्छा आहे.
\v 16 म्हणून आता उशीर करू नको ऊठ, मला तुला बाप्तिस्मा देऊ दे आणि प्रभू येशूला तू प्रार्थना कर आणि देवाने तुझ्या पापांची क्षमा करावी अशी विनंती कर.”
\s5
\p
\v 17 नंतर मी यरूशलेमेत परत आलो. मी येथे ऐके दिवशी मंदिरात असातांना प्रार्थना करीत होतो आणि मला एक दृष्टांत दिसला.
\v 18 प्रभू माझ्याशी बोलला आणि तो मला म्हणाला, “तेथे राहू नकोस! आता यरुशलेम सोडून दे, कारण तेथील लोक तू त्यांना माझ्याविषयी जे सांगशील त्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत;”
\s5
\v 19 पण मी त्याला म्हणालो, “प्रभू त्यांना हे ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी मी वेगवेगळ्या यहूदी सभास्थानामध्ये गेलो जे तुझ्यावर विश्वास ठेवतात ते मला आढळल्यास मी त्यांना तुरूंगात टाकत असे आणि मी त्यांना मार-हानही केली आहे.
\v 20 स्तेफन तुझ्याविषयी लोकांना सांगत असे तो ठार केला जात असता मी ते पाहत व त्यांना होकार देत तेथे उभा होतो ह्यांची त्यांना आठवण आहे. त्याला ठार करणाऱ्यांनी आपली अंगरखे काढून फेकली होती त्यांचे रक्षण करत मी उभा होतो!”
\v 21 परंतु प्रभू मला म्हणाला, “नाही तू येथे राहू नकोस! यरुशलेम सोडून दे कारण मी तुला येथून फार दूर परराष्ट्रीय लोक गटांमध्ये पाठवत आहे!”
\s रोमी नागरिक म्हणून असलेल्या पौलाचा हक्क
\s5
\p
\v 22 प्रभूने त्याला इतर लोक गटामध्ये पाठवले हे पौल सांगेपर्यंत लोकांनी त्याचे फार लक्षपूर्वक ऐकले. मग त्यांनी ओरडने सुरू केले, “त्याला ठार करा तो जिवंत राहण्याच्या लायकिचा नाही.
\v 23 ते आरडाओरडा करत असता त्यांनी आपले अंगरखे काढले आणि हवेत धुळ उडवू लागले ते किती रागावलेले आहेत हे त्यातून दिसत होते.
\v 24 म्हणून सैन्य अधिकाऱ्याने आज्ञा दिली पौलाला तुरूंगात घेऊन जावे. त्याने सैनिकांना पौलाला चाबकाने फटके मारण्याची आज्ञा दिली जेणेकरून त्याने असे काय केले ज्याने यहूदी ऐवढे चिडले हे पौलाने त्यांना सांगावे.
\s5
\v 25 त्यांनी त्याचे हात ताणले आणि त्याला बांधले जेणेकरून ते त्याच्या पाठीवर फटके मारतील. पौलाजवळील एका सैनिकाला पौल म्हणाला, “एका रोमी नागरीकाला कुठलीही चौकशी न करता व दोषी न ठरवता जर तू फटके मारशील तर तू कायद्याचा भंग करशील!”
\v 26 जेव्हा त्या सैनिकाच्या अधिकाऱ्याने ते ऐकले तो सैन्य अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याने ते त्याला कळवले. तो सैन्य अधिकाऱ्याला म्हणाला, “हा मनुष्य रोमी नागरीक आहे! आम्ही त्याला चाबकाने मारावे ही आज्ञा तू नक्कीच करू शकत नाही!”
\s5
\v 27 सैन्य अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. तो स्वतः तुरूंगात गेला आणि पौलाला म्हणाला, “मला सांग तू काय खरोखर रोमी नागरीक आहेस?” पौलाने उत्तर दिले, “होय, मी आहे”
\v 28 मग तो सैन्य अधिकारी म्हणाला, “मी देखिल रोमी नागरीक आहे. रोमी नागरीतत्व मिळवण्यासाठी मी खुप पैसा दिला आहे.” पौल म्हणाला, “परंतु मी तर जन्मताच रोमी नागरीक आहे.”
\v 29 पौलाने काय केले आहे हे प्रश्न विचारण्यासाठी सैनिक त्याला चाबकाने फटके मारण्याच्या तयारीत होते. परंतु पौलाने जे म्हटले, ते ऐकल्यानंतर त्यांनी त्याला सोडून दिले सैन्य अधिकारी घाबरला कारण पौल हा रोमी नागरीक आहे हे त्याला ठाऊक होते आणि सैनिकाने पौलाचे हात बांधावे ही आज्ञा करून आधीच नियम भंग केला होता.
\s सन्हेद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्पण
\s5
\p
\v 30 तरीही सैन्य अधिकाऱ्याची इच्छा होती की यहूदी पौलाला दोषी ठरवत आहे हे जाणून घ्यावे. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी पौलाच्या साखळदंड काढावे अशी त्याने सैनिकांना आज्ञा दिली. आणि दुसऱ्या दिवशी मुख्य याजक आणि इतर यहूदी धर्माच्या सदस्य ह्यांना भेटण्यासाठी बोलवले. मग तो पौलाला घेऊन धर्मसभाची बैठक बसली होती तेथे गेला आणि तेथे त्याने त्यांच्यासमोर त्याला उभे केले.
\s5
\c 23
\p
\v 1 पौलाने यहूदी सदस्यांकडे पाहिले आणि म्हणाला; माझ्या यहूदी बांधवानों, माझ्या संपूर्ण जीवनात मी देवाचा सन्मान करत जगलो आहे, आणि मी केलेली अशी कोणती गोष्ट मला आठवत नाही जी चुकिची असेल.”
\v 2 मुख्य याजक हनन्या याने पौल जे बोलला ते ऐकले आणि पौलाजवळ उभे असलेल्या माणसाने पौलाच्या तोंडात मारावी अशी त्याने सुचना केली.
\v 3 मग पौल हनन्याला म्हणाला, “अरे ढोंग्या देव तुला यासाठी शासन करेल! मोशेने देवाला दिलेल्या नियमाप्रमाणे तू तेथे न्याय करण्यास बसला आहेस. परंतु तू स्वतःच त्या नियमाचे उल्लंघन करतोस, कारण मी कोणती चूक केली हे सिद्ध न करता मला मारण्याची आज्ञा करत आहेस!”
\s5
\v 4 पौला जवळ उभे असलेले मनुष्य पौलाला म्हणाले, “देवाचा सेवक आमचा मुख्य याजक यांच्या विरुध्द तू वाईट बोलू नाये!”
\v 5 पौलाने प्रतिउत्तर केले, “माझ्या सोबतीच्या यहूद्यांनो मी हे बोललो त्याबद्दल मी क्षमा मागतो, कारण ज्याने तुम्हाला मला मारण्यास सांगितले ते मुख्य याजक होते हे मला माहित नव्हते. जर मला हे ठाऊक असते तर मी मुख्य याजकाबद्दल बोललो नसतो, कारण आपल्या यहूदी नियम शास्त्रात हे लिहले आहे, “आपल्या अधिकाऱ्यांच्या विरुध्द वाईट बोलू नकोस!”
\s5
\p
\v 6 पौलाच्या हे लक्षात आले की धर्मसभेच्या सदस्यांमध्ये काही सदूकी होते तर काही परूशी होते. म्हणून तो धर्मसभेत मोठ्याने म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानों मी एक परूशी आहे जसे माझे वडील होते तसाच मी आहे. मला या ठिकाणी चौकशीसाठी उभे करण्यात आले कारण मी अशी अपेक्षा बाळगतो की एके दिवशी जे लोक मरण पावले आहेत ते पूर्ण जिवंत होतील.”
\v 7 जेव्हा तो हे म्हणाला मेलेले लोक जिवंत होतील याविषयी सदूकी आणि परूशी आपआपसात वाद करू लागले.
\v 8 सदूकी असा विश्वास ठेवत की लोक मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणार नाहीत. ते असाही विश्वास ठेवतात की देवदूत किंवा अन्य प्रकारचे आत्मे अस्तित्वात आहेत. परंतु परूशी या सर्वांवर विश्वास ठेवतात.
\s5
\v 9 म्हणून ते वाद विवाद करत असता ऐकमेकांवर ओरडू लागले आणि अश्या प्रकारे त्यांच्यात फुट पडली. परूशांपैकी नियम शास्त्रातील शिक्षक उठुन उभे राहिले त्यापैकी एक म्हणाला, “या मनुष्याने काही चूक केली नाही असे आम्हांस वाटले. कदाचित एखादा स्वर्गदूत किंवा एखादा आत्मा त्यांच्याशी बोलला असावा आणि तो जे काही म्हणतो ते सत्य आहेत.”
\v 10 मग परूषी आणि सदूकी एकमेकांवर चिडून गेले. म्हणून सैन्य अधिकाराला भीती वाटली की ते पौलाचे तुकडे-तुकडे करतील. त्याने सैनिकांना आज्ञा दिली की तुम्ही खाली तुरूंगात जा आणि धर्म सभेतून पौलाला बाहेर काढा आणि त्याला येथे कोठडीमध्ये आणा.
\s5
\p
\v 11 त्या रात्री पौलाने प्रभू येशूला येतांना आणि आपल्या जवळ उभे असंताना पाहिले. प्रभू त्याला म्हणाला, “धीर धर! तू येथे यरुशलेमेत माझ्या विषयी सांगितले आहेत आणि तू हे रोममध्ये ही सांगितले पाहिजे.”
\s यहूद्यांचा पौलाविरुद्ध कट
\s5
\p
\v 12 दुसऱ्या दिवशी पौलाचे तिरस्कार करणारे काही यहूदी एकत्र आले आणि त्याला कसे ठार करावे ह्या विषयी त्यांनी चर्चा केली. त्यांनी आपसामध्ये असे संभाषण केले की तो मरणार नाही तोवर ते काहीही खाणार किंवा पिणार नाहीत. जे त्यांनी वचन घेतले आहेत ते पूर्ण करणार नाही तर देवाने त्यांना शापित करावे असे त्यांनी मागणी केली.
\v 13 पौलाला ठार करू पाहणारे जवळपास चाळीस पुरूष होते.
\s5
\v 14 ते मुख्य याजका कडे गेले आणि यहूदी वडीलधाऱ्यांकडे गेले व त्यांना म्हणाले, “आम्ही पौलाला ठार करे पर्यंत काहीही खाणार नाही व पिणार नाहीत असे वचन आम्ही देवाला दिले आहेत.
\v 15 म्हणून तुम्ही सैन्य अधिकाऱ्यांकडे जावे आणि सर्व यहूदी धर्मातर्फे पौलाला खाली घेऊन या अशी त्याला विनंती करा. तुम्ही सैन्य अधिकाऱ्याला सांगा की तुम्हाला पौलाशी अधिक बोलायचे आहे. तो येथे येण्यासाठी मार्गात असता आम्ही त्याला ठार करण्यास टपून बसू.”
\s5
\p
\v 16 परंतु पौलाच्या बहिणीचा मुलगा ह्याने यांचे योजना विषय ऐकले आणि तो किल्यात गेला आणि त्याने पौलाला सांगितले.
\v 17 पौलाने हे ऐकले तेव्हा त्यांने अधिकाऱ्यांपैकी एकाला बोलविले व त्याला म्हटले,“या तरुणाला सैन्य अधिकाऱ्याकडे घेऊन जा कारण त्याला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे.”
\s5
\v 18 म्हणून त्या अधिकाऱ्याने त्या तरुणाला सैन्य अधिकाऱ्याकडे नेले अधिकारी आपल्या सैन्य अधिकार्याला म्हणाला,“पौल या कैद्याने मला बोलावले आणि मला म्हणाला, ‘या तरुणाला आपल्या सैन्य अधिकाराकडे घेऊन जा कारण ह्याला काहीतरी सांगायचे आहे.”
\v 19 सैन्य अधिकाराने त्या तरुणाचा हात धरला आणि त्याला दूर नेले व त्याला विचारले,“तुला मला काय सांगायचे आहे?”
\s5
\v 20 उद्या दर समयी सगळ्यांसमोर पौलाला घेऊन यावे अशी काही यहूद्यांची योजना आहे. ते असे होती की त्यांना काही अधिक प्रश्नाविषयी त्याची चौकशी करायची होती. परंतु हे सत्य नाही.
\v 21 ते जे म्हणतील ते तू करू नकोस, कारण चाळीस पेक्षा जास्त यहूदी पुरूष पौल धर्मसभेत जात असता त्याला मारावयास लपून बसले आहे. त्यांनी देवासमोर अशी शपथ घेतली आहे की पौलाला ठार करेपर्यंत ते काहीही खाणार नाहीत व काही ही पिणार नाही ते पुन्हा तयार आहेत, आणि आता सध्या तू त्यांची विनंती मान्य करावी अशी वाट पाहत बसले आहेत.”
\s5
\v 22 त्या सैन्य अधिकाऱ्याने तरुण पुरुषाला म्हटले,“त्यांच्या योजना विषयी तू मला कळवले हे तू इतर कोणाला सांगू नकोस.” मग त्यांने त्या तरुणाला आपल्या मालकाला कळवले.
\p
\v 23 सैन्य अधिकाराने आपल्या दोन अधिकाऱ्यांना बोलवले आणि त्यांना सांगितले,“दोन हजार सैनिकांच्या टोळीला प्रवासाठी तयार करा. सोबत सत्तर घोडेस्वार सैनिक घ्या, तसेच दोनशे भाले धरणारे सैनिक आणखी घ्या. तुम्ही सर्वांनी आज रात्री नऊ वाजता कुच करण्यास तयार असावे तुम्ही सगळे कैसरीयास शहराकडे जाणार आहात.
\v 24 पौलाला बसण्यासाठी तुमच्या कडे घोडे तयार असू घ्या, आणि तेथे फेलिक्स राज्यपालाचा महलात त्याला घेऊन जा.”
\s5
\v 25 मग सैन्य अधिकाऱ्याने राज्यापालासाठी एक पत्र लिहले, त्याने असे लिहले;
\v 26 “मी क्लौद्य लुसिया तुला लिहत आहे हे फेलिक्स तू आमचा राज्यपाल आहेस आणि आम्ही तुझे सेवक व मी तुला अभिवादन करत आहोत.
\v 27 मी हा मनुष्य पौल तुझ्याकडे पाठवतो करण काही यहूदी यांनी त्याला धरीले आणि त्याला मारणारच होते. परंतु आम्हांला कळवले की हा रोमी नागरीक आहे, म्हणून मी आणि माझे सैनिक तेथे गेलो आणि त्याचा बचाव केला.
\s5
\v 28 त्यांने काही चूक केली ते मला यहूद्यांपुढे चालून घ्यायचे होते म्हणून मी त्याला यहूदा सभा विधान सभेत घेऊन गेलो.
\v 29 पौलाने ह्या माणसाला प्रश्न विचारले आणि त्याने त्याचे उत्तर दिले. ज्या गोष्टीविषयी त्यांनी याच्या वर आरोप लावला आहे या यहूदी नियम शास्त्रा संबंधात आहे. परंतु पौलाने कोणताही रोडवन कायदा तोडले नाही. म्हणून आमच्या अधिकाऱ्याने त्याला शिक्षा ही देऊ नये किंवा त्याला कोणत्याही तुरूंगात ठेवू नये.
\v 30 कोणीतर मला असे कळवले की काही यहूदी ह्याला ठार करायची योजना करत होते, म्हणून मी त्याला तुझाकडे पाठवत आहे, जेणेकरून तू त्याला कुठलाही अयोग्य न्याय देऊ नये. ज्या यहूद्यांनी याच्यावर दोषारोप आणला आहे त्यांनी ही कैसरीयात जावे आणि ते त्यांच्यावर कोणता आरोप ठेवत आहे ते तुम्हाला कळवावे अशी मी त्यांना आज्ञा दिली आहे.
\s5
\p
\v 31 सैन्यधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सैनिकाने केले. त्यांनी पौलाला घेतले आणि ते त्याला घेऊन रात्री अंतिपत्रिस येथे गेले.
\v 32 दुसऱ्या दिवशी गढीत सैनिक यरुशलेमेत परत आले आणि गढींत सवार सैनिक पौला बरोबर पुढे गेले.
\v 33 ते कैसऱ्या शहरात पोहोंचल्यावर त्यांनी ते पत्र राज्यपालास दिले, आणि त्याने पौलाला त्यांच्यासमोर सादर केले.
\s5
\v 34 राज्यपालाने ते पत्र वाचले आणि तो पौलास म्हणाला,“तू कोणत्या प्रांताचा आहेस?” पौलाने उत्तर दिले,“मी किलिकीया येथला आहे.”
\v 35 मग राज्यपालाने म्हटले,“तुझ्यावर आरोप करणारे लोक जेव्हा येतील, तेंव्हा मी तुम्हा दोघांचे ही म्हणणे ऐकीन आणि त्यानंतर तुझा न्याय करीन.” मग त्याने आज्ञा दिली की हेरोदाच्या वाड्यात पौलाला ठेवण्यात यावे व त्याच्या वर लक्ष ठेवावे.
\s5
\c 24
\p
\v 1 पाच दिवसानंतर यरूशलेमेहून मुख्य याजक हनन्या आपल्या सोबत काही यहूदी वडिलधाऱ्या मंडळीला घेऊन आणि तिर्तुल्ल नावाच्या एका वकीला सोबत खाली गेला. तेथे त्यांनी राज्यपालाला पौलाने त्यांच्या दुष्टिने काय चूक केले आहे ते सांगितले.
\v 2 राज्यपालाने पौलास आत आणण्याची आज्ञा केली पौल आल्यानंतर, तिर्तुल्ल ह्यावर दोषारोप करू लागला तो राज्यपालास म्हणाला, “सन्मानीय राज्यपाल फेलिक्स तुम्ही आमच्यावर जेवढे वर्ष अधिकार करत आहात, शासन करत आहात, आम्ही समाधानाने जगलो आहोत. तुम्ही योग्य योजना आखून ह्या पूर्ण प्रदेशाला अनेक गोष्टींमध्ये पुढे नेले आहे.
\v 3 म्हणून महाराज फेलिक्स तुम्ही आम्हासाठी जेथे कोठे ज्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
\s5
\v 4 परंतु मी तुमचा अधिक वेळ न घेता मी जे म्हणत आहे त्याकडे कृपया आपण लक्ष द्यावे ही विनंती करतो.
\v 5 आमच्या हे लक्षात आले आहे की, हा मनुष्य जेथे कोठे जातो तेथे यहूद्यांना त्रासात टाकतो. हा ज्यांना नासोरीचे अनुयायी असे म्हणतात अशा एका लक गटाचाही पुढारी आहे.
\v 6 यरुशलेम येथील मंदिरातही अशा काही गोष्टी हा करत होता ज्याने ते अशुद्ध होईल म्हणून आम्ही त्याला अटक केले.
\s5
\v 7 परंतु लुसिया रोमच्या किल्ल्याचा सैन्य अधिकारी, आपल्या सैनिका संगती आला आणि ह्याला आमच्या पासून काढून घेतले.
\v 8 लुसियाने पौलावर दोषारोप करणाऱ्यांना तुझ्याकडे यावे आणि येथे पौलावर आरोप लावावे असे आम्हांला सांगितले. जर तू स्वतः त्याला प्रश्न विचारशील, तर आम्ही त्या गोष्टी बोलतो आणि हे आरोप जे ह्यावर लावतो ते खरे आहेत हे तुला कळेल.”
\v 9 मग तेथे आलेल्या यहूदी पुढाऱ्यांनी तिर्तुल्ला आणि राज्यपालाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हटले.
\s5
\p
\v 10 राज्यपालाने आपल्या हाताने पौलाने बोलावे असा इशारा केला म्हणून पौलाने उत्तर दिले, आणि तो म्हणाला, “महाराज फेलिक्स, तुम्ही ह्या यहूदी प्रदेशात अनेक वर्ष न्याय दिला आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून मी तुमच्या समोर स्वतःचा बचाव करण्यात आनंदी आहे मला ठाऊक आहे की तुम्ही माझे ऐकाल आणि माझा योग्य तो न्याय कराल.
\v 11 तुला हे माहिती आहे की देवाची उपासना करण्यासाठी मी यरुशलेमेत जाऊन केवळ बारा दिवस झाले आहे.
\v 12 मी लोकांना यहूदी सभास्थानात किंवा यरूशलेमेत इतर कोठेही दंगे करावे किंवा भांडणे करावीत असे करतांना मला पाहिले नाही कारण मी ते केले नाही.
\v 13 म्हणून ज्या गोष्टींविषयी ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्या गोष्टी ते सिद्ध करू शकत नाही.
\s5
\v 14 परंतु मी हे कबूल करतो की हे सत्य आहे, आमचे पूर्वज ज्या देवाची उपासना करत त्याच देवाची मी उपासना करतो आणि येशूने आम्हांला जो मार्ग शिकवला त्याचे मी अनुसरन करतो हे सत्य आहे. देवाने मोशेला जे नियमशास्त्र दिले आणि संदेष्ट्यांनी त्याच्या पुस्तकात जे सर्व काही लिहिले त्यावर मी विश्वास ठेवतो.
\v 15 हे मनुष्य विश्वास ठेवतात तसाच मीही विश्वास ठेवतो जे दृष्ट होते व जे चांगले होते त्या दोघांनाही. देव ऐकेदिवशी जे सर्व मेले आहे त्या सर्वांना जिवंत करेल.
\v 16 ह्या लोकांप्रमाणे मीही विश्वास ठेवतो की जे चांगले आहे आणि जे वाईट आहे अशा दोघांनाही देव ऐकेदिवशी मेलेल्यातून पुन्हा जिवंत करणार आहे. तो दिवस येणार आहे म्हणून मी देवाला प्रसंन्न करावे असे जीवन जगतो तसेच लोकांच्या दुष्टिने जे योग्य ते करतो.
\s5
\v 17 मी कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकानी असल्याने मी यरुशलेमेत येताना माझ्या सोबतीच्या यहूद्यांकडून तेथील गरिबांसाठी काही पैसे घेऊन आलो.
\v 18 आशियातील काही यहूदी ह्यांनी मंदिराच्या अंगणात मी देवाची उपासना करण्यासाठी विधी पूर्ण केलेले असे मला पाहिले माझ्या संगती कुठली गर्दी नव्हती आणि मी लोकांना दंगा करण्यासाठी चेतवत नव्हतो.
\v 19 परंतु त्या यहूदी लोकांना चेतवले. ते लोक याठिकाणी तुझ्यासमोर असायला हवे होते; त्यांना असे वाटते की मी काही चुकीचे केले आहे.
\s5
\v 20 ज्यांनी मंदिरात लोकांना चेतवले त्यांनी माझ्यावर दोषारोप करण्यासाठी येथे यायचे नसेल तर तेथे जी यहूदी माणसे आली आहेत त्यांनी मी धर्मसभेसमोर स्वतःचा बचाव केला त्यात मी काय चुकीचे केले असे त्यांना वाटते ते सांगावे.
\v 21 कदाचित मी ओरडून, “देव ऐकेदिवशी सर्व मेलेल्यांना जिवंत करणार आहे ह्याविषयी माझा न्याय होत आहे.” असे ओरडून बोललो त्याविषयी मी चूकलो असे हे म्हणतात.
\s फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो
\s5
\p
\v 22 लोक ज्याला येशूचा मार्ग असे म्हणतात त्या विषयी फेलिक्सला अगोदरच बरेच काही ठाऊक होते परंतु पौलाला किंवा इतर कोणत्याही यहूद्याला त्याने आणखी बोलू दिले नाही. त्या ऐवजी तो त्यांना म्हणाला, “जेव्हा सैन्य अधिकारी लुसिया येथे येईल त्यावेळेस मी ह्या वाद्याचा निवाडा करीन.
\v 23 पौलाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याने पुन्हा पौलाला तुरूंगात नेण्याची सुचना दिली आणि पौलावर निरंतर पहारा ठेवण्यास बजावले. परंतु त्याने म्हटले की पौलाला साखळदंडाने बांधू नये, आणि जर त्याचे मित्र त्याला भेटतील तर त्या अधिकाऱ्याने त्यांना भेटू द्यावे तसेच पौलाला जी मदत हवी आहे ती त्याने करावी असेही सांगितले.
\s5
\p
\v 24 बऱ्याच दिवसा नंतर फेलिक्स त्याची पत्नी द्रुसिल्ला जी यहूदी होती तिच्या सोबत परत आला आणि पौलाला संभाषण करण्यासाठी बोलवून घेतले. त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याविषयीचे पौलाचे बोलणे फिलिक्साने ऐकून घेतले.
\v 25 देवाला प्रसंन्न करण्यासाठी लोकांनी काय करावे अशी देवाची इच्छा आहे ह्याविषयी पौल त्याच्याशी बोलला. लोकांनी आपल्या कृतीवर नियंत्रण करावे आणि देव सर्व लोकांचा न्याय कसा करेल ह्याविषयी पौलाने त्याला समजून सांगितले ह्या सर्व गोष्टी ऐकून फेलिक्सला भीती वाटली म्हणून तो पौलाला म्हणाला, “मला आता ऐवढेच ऐकायचे आहे. जेव्हा माझाकडे वेळ असेल तेव्हा मी पुन्हा एकदा तुला बोलावून घेईन.
\s5
\v 26 फेलिक्सची आशा होती की पौल त्याला काही पैसे देईल म्हणून त्याने पौलाला अनेकदा स्वतःकडे बोलावून ही फेलिक्स संगती बरेचदा चर्चा केली परंतु त्याने फेलिक्सला कोणताही पैसा दिला नाही आणि फेलिक्सने सैनिकाला पौलाला तुरूंगातून मोकळे करण्याची सुचना केली नाही.
\p
\v 27 यहूदी पुढाऱ्यांना खुश करावे अशी त्याची इच्छा होती म्हणून फेलिक्साने पौलाला तुरुंगातच ठेवले. परंतु दोन वर्ष झाल्यानंतर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला.
\s5
\c 25
\s फेस्तासमोर पौलाची चौकशी
\p
\v 1 त्या भागाचा राज्यपाल म्हणून फेस्ताने शासन करण्यास आरंभ केला. तीन दिवसा नंतर त्याने कैसऱ्या सोडले आणि तो यरुशलेमेस वर गेला.
\v 2 तिथे मुख्य याजक आणि यहूदी पुढारी फेस्तासमोर उभे राहिले आणि ते म्हणाले की पौलाने ज्या गोष्टी केल्या आहे त्या फार वाईट आहेत.
\v 3 त्यांनी तातडीने पौलाचा न्याय करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी यरुशलेमेत घेऊन यावेत असे फेस्तला सांगितले. परंतु रस्त्याने येताना त्यांनी त्याच्या वर हल्ला करून त्याला ठार करावे अशी त्यांची योजना होती.
\s5
\v 4 फेस्ताने प्रतिउत्तर केले,“पौल कैसरीया येथे तुरूंगात पाहाऱ्यात आहेत त्याला तेथेच असू द्या. मी स्वतः लवकरच कैसऱ्या येथे जाणार आहेत.”
\v 5 “म्हणून” ज्यांना-ज्यांना शक्य आहे त्या तुम्ही ही माझ्या सोबत तेथे यावे. जर तुम्हाला पौलावर काही आरोप लावायचा असेल तर तुम्ही ते करू शकता.”
\s5
\p
\v 6 मंदिराच्या पुढाऱ्यांसोबत यरुशलेमेत फेस्ताने आठ दहा दिवस आणखी राहिला. नंतर तो तेथून पुन्हा खाली कैसऱ्या शहरात परतला. दुसऱ्या दिवशी फेस्ताने न्यायधिशाच्या आसनावर बसला आणि त्याने आज्ञा केली की पौलाला त्याच्या समोर सादर केले पाहिजे.
\v 7 न्यायधिशाच्या आसना समोर पौलाला आणल्या नंतर, यरुशलेमहून आलेले पुढारी त्याच्या भोवती गोळा झाले आणि त्याच्या वर फार भयंकर आरोप करू लागले परंतु त्यां पैकी कोणताही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
\v 8 मग पौल स्वतःच्या बचावात बोलला. तो म्हणाला,“मी यहूद्यांच्या नियम शास्त्राच्या विरुध्द किंवा मंदिराच्या विरुध्द किंवा सम्राटा विरुध्द काहीही चुकीचे केले नाही”
\s5
\v 9 परंतु यहूदी पुढाऱ्यांना खूश करावे अशी फेस्ताची इच्छा होती म्हणून त्यांने पौलाला विचारले,“मी या गोष्टींचा न्याय करावा म्हणून मी तुला यरुशलेमेला वर न्यावे अशी तुझी इच्छा आहे काय?”
\v 10 पौलाने उत्तर दिले, “नाही मी येथे तुझ्या समोर उभा आहे तुम्ही सम्राटाचे प्रतिनिधी आहात. आणि येथेच माझा न्याय व्हावा. मी यहूदी लोकांच्या विरुध्द काहीही केले नाही आणि हे तुला चांगले ठाऊक आहे.”
\s5
\v 11 मला मृत्युदंड मिळावा असे जर मी काही केले असले तर मी मरण्यास नाकार देणार नाही: परंतु हे माझ्या वर जे आरोप करत आहेत त्यापैकी कशाची ही शिक्षा तशी नाही. केवळ त्यांचे समाधान करण्यासाठी कोणीही मला दोषी ठरवू शकत नाही. मी ही विनंती करतो की कैसराने स्वतः माझा न्याय करावा.”
\v 12 फेस्ताने आपल्या सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर, तो म्हणाला,“तू कैसराकडे न्याय मागीतला आहेस, म्हणून कैसराकडे तू पाठवला जाशील!”
\s अग्रिप्पा व बर्णीका
\s5
\p
\v 13 या नंतर बऱ्याच दिवसांनी, राजा हेरोद अग्रिप्पा कैसरिया येथे आला, त्याच्या बरोबर त्याची बहिण बर्णीका ही देखिल होती. फेस्तला सन्मान करण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते.
\v 14 राजा अग्रीप्पा आणि बर्णीका बरेच दिवस कैसऱ्या येथे मुक्कामास राहिले. काही काळ गेल्यानंतर फेस्ताने अग्रीप्पाला पौलाविषयी सांगितले. तो म्हणाला,“या ठिकाणी फेलिक्स ने ज्याला तुरूंगात ठेवले असा एक मनुष्य आहे.
\v 15 मी यरुशलेमेस गेलो असता मुख्य याजक आणि यहूदी वडिलांनी माझ्या समोर येऊन या मनुष्याला मी मृत्यु दंड द्यावा अशी विनंती केली.
\v 16 परंतु मी त्यांना सांगितले की एखाद्या मनुष्याने घोर गुन्हा केला असेल, तर रोमी लोक अशा व्यक्तीला लगेच शासन करत नाहीत तशी आमची प्रथा आहे. त्या ऐवजी आम्ही दोषारोप असलेल्या मनुष्याला त्याच्यावर आरोप करणाऱ्यांच्या समोरा समोर उभे करतो आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांविरूद्ध त्याला स्वतःच बचाव करू देतो.
\s5
\v 17 तर ते यहूदी कैसऱ्यात आल्यानंतर मी चौकशी करण्यासाठी थोडा ही विलंब केला नाही. ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मी न्यायधिशाच्या आसनावर बसलो आणि शिपायांना आज्ञा केली की त्यांनी कैद्याला घेऊन यावे.
\v 18 परंतु यहूदी पुढाऱ्यांनी मला सांगितले की त्या कैद्याने काय चुकीचे केले आहे, तेव्हा त्याने काही भयंकर केले असे मला वाटले.
\v 19 त्या ऐवजी ते त्याच्याशी ज्या गोष्टी विषयी वाद करत होते त्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या होत्या आणि येशू नावाचा कोणी एक मनुष्य जो मरण पावला परंतु पौल असे म्हणतो की तो पुन्हा जिवंत झाला त्या विषयीच्या होत्या.
\v 20 मला ह्या गोष्टी समजल्या नाहीत, किंवा त्यातील सत्य मला शोधता आले नाही. म्हणून मी पौलाला म्हटले,“काय तुला पुन्हा यरुशलेमेत नेऊन तेथे मी तुझा न्याय करावा अशी तुझी इच्छा आहे काय?”
\s5
\v 21 परंतु पौलाचा कैसराने स्वतः न्याय करावा अशी विनंती केली, म्हणून मी त्याला कैसराकडे पाठवेपर्यंत त्याला पाहाऱ्यात ठेवावे अशी आज्ञा केली.”
\v 22 मग अग्रिप्पा फेस्तला म्हणाला,“या माणसाला काय म्हणायचे आहे मला स्वतः ऐकायला आवडेल.” फेस्ताने उत्तर दिले, “उद्या तू त्याचे ऐकावे अशी मी व्यवस्था करतो.
\s5
\p
\v 23 दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका यांनी न्याय देण्याच्या खोलीत प्रवेश केला, आणि इतर सर्व लोकांनी त्यांचा सन्मान केला. काही रोमी सैन्यधिकारी आणि कैसरातील महत्त्वपुर्ण मनुष्य ही त्या ठिकाणी त्याच्या सोबत त्यांच्या समोर आले. मग फेस्ताने आज्ञा दिली की पाहरेकऱ्यांनी पौलाला आत आणावे.
\v 24 पौल आत आल्यानंतर, फेस्त म्हणाला, “राजा अग्रिप्पा आणि इतर तुम्ही जे सगळे येथे हजर आहात, तुम्ही या मनुष्याला पाहता! यरुशलेम आणि येथील यहूद्यांच्या अनेक पुढाऱ्यांनी ह्याने अधिक काळ जगू नये अशी माझ्या कडे विनंती केली.
\s5
\v 25 परंतु ह्याला मृत्युदंड द्यावा असे ह्याने काहीही केले नाही असे मला अढळले. इतकेच नाही तर या वादाचा न्याय कैसराने करावा अशी ह्याने विनंती केली आहे म्हणून मी ह्याला रोमला पाठवण्याचे निश्चत केले आहे.
\v 26 म्हणून सम्राटाला मी याच्या विषयी काय लिहावे ते मला स्पष्टपणे माहिती नाही. म्हणून मी ह्याला येथे सर्वांसमोर बोलण्यासाठी आणले आहे, आणि विशेषता हे अग्रिप्पा राजा तुझ्यासमोर! मी हे केले आहेत जेणेकरून तू ह्याला काही प्रश्न विचारावे. त्यावरून मला कळेल की मी सम्राटाला काय लिहले पाहिजे.
\v 27 मला असे वाटते की एखाद्या कैद्याला रोममध्ये सम्राटाकडे लोक त्याच्या वर कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप लावताय ते न सांगता पाठवने अयोग्य ठरेल.”
\s5
\c 26
\s अग्रिप्पापुढे पौलाने केलेले भाषण
\p
\v 1 मग अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तू स्वतःहा विषयी बोलावे अशी मी तुला परवानगी देतो.” मग पौलाने आपले हात पुढे केले आणि बोलण्यास सुरवात केली.
\v 2 तो म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा, मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो की आज जे यहूदी पुढारी माझ्यावर दुष्ट गोष्टी केल्याचा आरोप करत आहे ते कसे चूकले आहेत ह्याचे स्पष्टीकरण तुला मी आज देऊ शकतो.
\v 3 विशेषतः मी अधिक भाग्यशाली आहे कारण तुला आम्हां यहूद्यांच्या सर्व प्रथा माहिती आहेत आणि आम्ही कोणत्या प्रश्नांवर वाद करतो त्याही तुला ठाऊक आहेत. म्हणून मी तुला विनंती करतो की कृपया धैर्याने माझे ऐकावे.”
\s5
\p
\v 4 “माझ्या सर्व यहूदी बाधवांना मी जन्मलो त्या गावात मी कसा वागलो आणि त्यानंतर मी यरुशलेमेत कसा जगलो ते त्यांना ठाऊक आहे.
\v 5 ते मला फार पूर्वीपासून ओळखतात आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते तुला सांगू शकतील, मी तरुण वयापासून आमच्या धर्माच्या सर्व कठोरप्रथांचे पूर्णपणे पालन केले आहे. मी इतर परूशांप्रमाणे जगलो आहे.
\s5
\v 6 देवाने आमच्या पूर्वजांना जे अभिवचन दिले ते तो पूर्ण करेल ह्याची मी खात्रीने वाट पाहतो म्हणून आज मी ह्या चौकशीसाठी उभा आहे.
\v 7 आम्हां यहूद्यांचे बारा वंश रात्रं दिवस देवाची उपासना करून व त्याचा सन्मान करून त्याने आम्हांला जे अभिवचन दिले त्याची वाट पाहत राहतात. हे सन्माननीय राजा देवाने आम्हांला जे वचन दिले ते तो पूर्ण करेल अशी मी अपेक्षा बाळगतो, आणि तेही हाच विश्वास ठेवतात! तर हे राजा मी देवाकडून ही अपेक्षा बाळगतो म्हणून मी चूक करतो असे ते मला म्हणतात.
\v 8 तर राजा तुला हे वाटते का की देव मेलेल्यांना जिवंत करू शकत नाही?
\s5
\p
\v 9 नासरेथ गावाच्या येशूवर लोकांनी विश्वास ठेवण्यापासून थांबवण्यासाठी मी जे काही करू शकतो ते करावे असा वेळ माझ्या जीवनात भुतकाळात होता. यरुशलेममध्ये राहत असतांना मी हेच केले.
\v 10 मी यरुशलेमात असतांना काय हे करत होतो. मी अनेक विश्वासणाऱ्यांना तुरूंगात टाकले कारण मुख्य याजकाने मला ते करण्याचा अधिकार दिला होता जेव्हा त्यांच्या लोकांनी विश्वासणाऱ्यांना ठार केले तेव्हा मी ते करण्यासाठी सहमत होतो.
\v 11 आमच्या सभास्थानांमध्ये मी बहुतेकदा त्यांना शिक्षा दिली आहे. त्यांनी येशूचा अपमान करावा ह्यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती केली आहे. मी त्यांच्यावर एवढा रागावलेला होतो की त्यांना शोधण्यासाठी मी परदेशातील शहरांमध्येही गेलो.
\s5
\p
\v 12 “दिमिष्क येथील विश्वाणाऱ्यांना मी ताब्यात घ्यावे म्हणून मुख्य याजकांनी मला अधिकार दिला आणि म्हणून मी तेथे गेलो.
\v 13 मी त्या शहराकडे जात असतांना दुपारच्या समयास रस्त्यावर मला एक तेजस्वी प्रकाश आकाशात दिसला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही तेजस्वी होता! तो माझ्या चहूकडे प्रकाशला जे माझ्यासोबत प्रवास करत होते त्यांनाही त्याने घेरले. त्यांच्यावरही तो चकाकला.
\v 14 आम्ही सर्व जमिनीवर पडलो. तेव्हा माझ्याशी माझ्या स्वतःच्या इब्री भाषेत कोणाचीतरी बोलण्याची वाणी मी ऐकली. तो म्हणाला, “शौला शौला, तू मला का घायाळ करतोस? मेंढपाळाच्या अनुकूचिदार काठीला लाथ मारने तुला अवघड होईल.
\s5
\v 15 मग मी म्हणालो, “तू कोण आहेस प्रभू?” तो, म्हणाला, “ज्याचा तू छळ करतो तो मी येशू आहे.
\v 16 तर आता ऊठ आणि आपल्या पायावर उभा राहा! मी तुला दर्शन देत आहे जेणेकरून तू माझा दास व्हावा माझ्याविषयी तुला जे आता ठाऊक आहे आणि पुढे जे मी तुला दाखवणार आहे त्याचा तू साक्षीदार व्हावा.
\v 17 ज्या लोकांमध्ये तुला मी पाठवेन त्यांच्यापासून आणि गैर यहूद्यांपासून मी तुला वाचवीन.
\v 18 जेणेकरून तू त्यांचे डोळे उघडावे, त्यांना अंधकारातून प्रकाशात आणावे, आणि देवाच्या शत्रूच्या सामर्थ्यातून त्यांना मुक्त करून देवाकडे आणावे म्हणून मी तुझा उपयोग करेन अशा रितीने देव त्यांच्या पातकांची क्षमा करून देव त्यांना अनंतकाळा करता स्वतःचे लोक बनवेल आणि ते विश्वासाने माझे लोक बनतील.
\s5
\p
\v 19 म्हणून राजा अग्रिप्पा देवाने मला दर्शन देऊन जे सांगितले ते मी केले.
\v 20 सर्व प्रथम मी दिमिष्कामध्ये यहूद्यांशी बोललो आणि त्यानंतर यरुशलेमेतील लोकांशी बोललो, यहूदी ह्यांच्या सर्व प्रदेशात तसेच तेथील सर्व परराष्ट्रीय लोकांमध्ये ही मी बोललो. त्यांनी पाप करणे बंद करावे आणि देवाचे साहाय्य मागावे असे मी त्यांना सांगितले. त्यांनी पाप करणे बंद केले आहे हे दाखवणाऱ्या गोष्टी सुरू कराव्या असे मी त्यास सांगितले.
\p
\v 21 ह्या संदेशाची मी घोषणा करत होतो म्हणून, जेव्हा मी मंदिराच्या अंगणात होतो तेव्हा काही यहूद्यांनी मला पकडले आणि त्यांनी मला ठार करण्याचा प्रयत्न केला.
\s5
\v 22 परंतु देव माझे साहाय्य करत होता म्हणून मी ह्या गोष्टींची घोषणा आजच्या दिवसापर्यंत करत आहे. संदेष्ट्यांनी मोशे ह्यांनी भविष्यात काय घडेल ते जसे च्या तसे मी सर्व साधारण आणि थोर लोकानांही सांगत आलो आहे.
\v 23 ख्रिस्त छळ सोसेल आणि मरण पावेल आणि मग मृतांमधून जिवंत होणारा तो प्रथम ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. तो स्वतःच्या लोकांना आणि परराष्ट्रीय लोकानांही देव खरोखर त्यांचा बचाव करेल ह्याची घोषणाही केली.
\s5
\p
\v 24 ह्यापेक्षा पुढे पौल काही बोलण्याअगोदर फेस्त मोठ्या आवाजात बोलला, “पौला तू वेडा आहेस! तू खुप जास्त अभ्यास केला आहे, आणि त्यामुळे तुला वेड लागले आहे!”
\v 25 परंतु पौलाने उत्तर दिले, “हे महान फेस्त, मी वेडा नाही! तर ह्या उलट मी जे सांगत आहे ते सत्य आणि विचार पूर्वक शाहानपणाचे आहे!
\v 26 कारण राजा अग्रिप्पा मी ज्या गोष्टींविषयी बोलतो त्या गोष्टी जाणून आहे, आणि मी त्याच्यासोबत ह्या गोष्टींविषयी मोकळीकतेने बोलू शकतो. मला ह्याची खात्री आहे की ह्या सर्व गोष्टी त्याच्या लक्षात नक्कीच आल्या असतील कारण ह्यापैकी कोणत्याही घटना लपून छपून घडलेल्या नाहीत.
\s5
\v 27 हे राजा अग्रिप्पा संदेष्ट्यांनी जे लिहिले त्याजवर तू विश्वास ठेवतोस काय? मला हे माहिती आहे की तू त्यावर विश्वास ठेवतो.
\v 28 मग अग्रिप्पाने पौलाला उत्तर दिले, “अतिशय थोड्या वेळेत तू मला जवळपास ख्रिस्ती बनवून टाकण्यास माझे मन वळवलेच होते.”
\v 29 पौलाने उत्तर दिले, “कदाचित थोडका वेळ किंवा खुप जास्त वेळ ते महत्वाचे नाही, मी ही प्रार्थना करतो की तू आणि इतर जे आज माझे ऐकत आहेत तुम्ही सर्वांनी माझ्यासारखे बनावे केवळ तुमच्या हातात माझ्यासारखे साखळदंड असू नये!
\s5
\p
\v 30 मग राजा उभा राहिला राज्यपाल बर्णीका आणि इतर सर्वही उठून उभे राहिले.
\v 31 आणि ते त्या खोलीतून बाहेर पडले. ते तेथून बाहेर पडल्यावर ऐकमेकांना म्हणाले, “ह्याला मुत्यूदंड द्यावा, किंवा ह्याला साखळदंडात ठेवावे असे ह्याने काही चुकीचे केले नाही.
\v 32 अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “जर ह्या माणसाने साम्राटाला त्याचा न्याय करण्यास ची दात मागीतली नसती तर आपण त्याला कदाचित सोडू शकलो असतो.”
\s5
\c 27
\s पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास क्रेतापर्यंत
\p
\v 1 नंतर राज्यपालाने ठरवले की आम्ही इटलीला समुद्रा मार्गे जावे म्हणून त्याने पौलाला आणि इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या सेनापतीच्या ताब्यात दिले. औगुस्तूस नावाच्या तुकडीचा तो भाग होता आणि तो त्यात शताधिपती ह्या हुद्द्यावर होता.
\v 2 आशियातील अद्रमुत्तीय ह्या शहरातून आम्ही जहाजात चढलो, आशियातील किनारपट्टीच्या काही बंदरांमधून प्रवास करत ते जहाज जाणार होते. अशा रितीने आम्ही समुद्र मार्गाने गेलो. मासेदोनियातील थेस्सलनीका येथिल अरिस्तार्ख हाही आमच्या सोबत होता.
\s5
\v 3 आम्ही दुसऱ्या दिवशी सिदोन येथे पोहोंचलो. यूल्याने पौलाप्रती दया दाखवली आणि त्याला काळजी घेणाऱ्या मित्रांना, भेटावे अशी परवानगी दिली.
\v 4 तेथून आम्ही पुन्हा जहाजात बसलो आणि जहाज निघाले. आम्ही कुप्राच्या किनार पट्टीने निघालो त्यामार्गाने जाण्याचे कारण म्हणजे वारा आम्हांला विरुध्द दिशेला वाहवू शकत नव्हता.
\v 5 त्यानंतर, किलिकीया आणि पंफुल्या ह्यांच्या समुद्र किनाऱ्या जवळून आमचे जहाज पलिकडे मुर्या येथे पोहोंचले, जे लुक्या मध्ये आहे. तेथे आम्ही जहाजातून उतरलो.
\v 6 आलेक्सांद्रियातून आलेले ते जहाज जामादाराला आढळले आणि ते लवकरच इटलीला जाणार होते. म्हणून त्याने आम्ही त्या जहाजावर जावे अशी व्यवस्था केली, आणि आम्ही तेथून निघालो.
\s5
\v 7 आम्ही बऱ्याच दिवसांच्या नंतर हळुहळु जहाज हाकारत राहिलो, आणि कनिदासमोर आलो, परंतु येथे येण्यास आम्हांला खुप त्रास झाला, कारण वारा आमच्या विरुध्द दिशेला होता. वारा जोराचा असल्यामुळे जहाज पश्चिमेकडे सरळ दिशेने न्यावयाचे शक्य नव्हते. म्हणून त्या ऐवजी आम्ही क्रेत बेटाच्या बाजूने जहाज हाकारले. त्या दिशेला वारा एवढ्या जोराचा नव्हता आणि आम्ही सलमोनाला मागे टाकले, ह्या जागेत पाण्याच्या मधोमध जमीनीचा थोडा उंचवटा आहे.
\v 8 येथे वारा जोरात होता, आणि म्हणून जहाज वेगाने पुढे जात नव्हते. म्हणून आम्ही क्रेतच्या किनारपट्टिच्या जवळून हळुहळु हाकारत राहिलो. आणि लसयाच्या जवळील सुंदर नावाच्या गावाजवळ आम्ही आलो.
\s मिलितापर्यंत तुफान व नौकाभंग
\s5
\p
\v 9 बराच काळ निघून गेला आणि आता अशा परिस्थीतीत जहाज हाकारने धोकादायक झाले असते कारण यहूद्यांचा उपास करण्याचा वेळ निघून गेला होता. आणि समुद्र ही आता वादळाने खवळला होता. म्हणून जहाजावरील मनुष्यास पौल म्हणाला,
\v 10 “भावांनो, जर आपण आता समुद्रात जहाज हाकारले, तर आपल्याला तर इजा होईल एवढेच नव्हे तर जहाज आणि त्यातील मालही नाश होऊ शकतो, आणि आपल्या जीवासही धोका पोहोचू शकतो.”
\v 11 परंतु रोमी अधिकाऱ्यांनी पौलावर विश्वास ठेवला नाही. त्याने जहाज चालवणाऱ्याकडे आणि जहाज चालवणाऱ्या मालकाकडे लक्ष दिले, त्यांनी जो सल्ला दिला तसेच करण्याचे त्याने ठरवले.
\s5
\v 12 हिवाळ्यामध्ये मुक्काम करण्यासाठी ते बंदर योग्य नव्हते, मग बहुतेक नाविकांनी तेथून समुद्रास जाण्यासाठी सुचवले त्यांची आशा होती की ते लवकरच येथे पोहोंचतील व तेथे हिवाळा घालवतील. फेनिके हे क्रेत मधील एक शहर आहे. येथे पश्चिमोत्तर आणि दक्षिण पश्चिम हे दोन्ही ही वारे वाहतात. दक्षिणेकडून हळुवार वारा वाहत होता.
\v 13 म्हणून जहाजाच्या नावाडांना असे वाटले की ते प्रवास करू शकतात. म्हणून, आपले नांगर उतरून आणि क्रेत बेटाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जहाज हाकारू लागले.
\s5
\v 14 थोड्याच वेळानंतर, किनाऱ्यावरून जोरदार वारे वाहू लागले. किनाऱ्यावरून उत्तर दिशेने ते वारे वाहत होते आणि ते जहाजावर आदळले. या वाऱ्यांना युरकुलोन, “पुर्वोत्तर वारे” असे म्हणतात.
\v 15 जहाज ज्या दिशेने जात होते त्याच्या विरुध्द दिशेने ते वारे वाहत होते, आणि जहाज आणखी पुढे जाऊ शकत नव्हते. नाव हाकनाऱ्यांनी जहाजाला वाऱ्याने नेले त्या दिशेने जाऊ दिले.
\v 16 मग ते जहाज किनार पट्टिला लागून कौदा नावाच्या एका छोट्या बेटाच्या दिशेने जाऊ लागले. खुप प्रयत्नानंतर आणि जहाजाला बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी एक होडी भेटली. बरेच प्रयत्न केल्यानंतर आम्ही होडी जवळ घेऊन स्वाधीन करून घेतली.
\s5
\v 17-18 त्यानंतर नावाडांनी ती होडी जहाजाला बांधली आणि त्यांनी जहाजाला मजबुती देण्यासाठी तारांचा उपयोग केला. त्यांनी जहाजाला खालून आवळून घट्ट बांधले. सुर्ती नावाच्या भाटीवर नाव आदळेल अशी त्यांना भीती वाटली म्हणून त्यांनी शीड उतरवली आणि मग ते तसेच वाऱ्यासोबत वाहवत चालले. वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी जहाजातून माल टाकून देण्यास सुरवात केली.
\s5
\v 19 वादळाच्या तिसऱ्या दिवशी जहाजातील दोऱ्या, खांब आणि इतर औजारे समुद्रात टाकली जहाजाला हलके करावे अशी त्यांची योजना होती. हे सर्व त्यांनी स्वतःच्या हातांनी केले.
\v 20 तरीही बरेच दिवसापर्यंत वारा जोराचा वाहत होता, आता रात्रंदिवस काळ्याभोर ढगांनी घेरले होते, त्यामुळे आम्हांला दिवसा सूर्य आणि रात्री तारे दृष्टीस पडले नाही. आणि जणू आम्ही जगण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या.
\s5
\p
\v 21 जहाजावर बऱ्याच दिवसापर्यंत आमच्या पैकी कोणीही काहीही खाल्ले नाही. मग एके दिवशी, पौल आम्हांमध्ये उभा राहिला आणि म्हणाला, “मित्रांनो, क्रेत मधून आपण जहाज हाकारू नये हे मी तुम्हास सांगितले होते.
\v 22 परंतु आता मी तुम्हाला विनंती करतो की घाबरू नका, कारण आपल्या पैकी कोणीही मरणार नाही. जहाज नष्ट होईल परंतु आपल्या पैकी कोणीही नाश पावणार नाही.
\s5
\v 23 मला हे ठाऊक आहे, की मी ज्या देवाचा आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याने माझ्याकडे देवदूत पाठवला आणि तो माझ्या बाजूला उभा राहिला.
\v 24 तो देवदूत मला म्हणाला, ‘पौला, घाबरू नकोस! तुला रोमला गेले पाहिजे आणि तुझा न्याय व्हावा म्हणून तुला सम्राटा समोर उभे राहायला पाहिजे. पाहा माझी इच्छा आहे की तू हे समजून घ्यावे की देवाने तुला आणि या जहाजावरील प्रत्येकाला वाचवावे अशी तुझी प्रार्थना ऐकली आहे.
\v 25 तर मित्रांनो आनंदित व्हा धीर धरा कारण मला विश्वास आहे की देव हे नक्की करणार, जसे देवाने सांगितले तसेच घडणार.
\v 26 परंतु शीड किंवा जहाज एखाद्या बेटावर आदळेल मग तेथून आपण किनाऱ्यावर पोहचू.
\s5
\p
\v 27 वादळ सुरू झाल्यानतंर चौदाव्या रात्री अद्रिया समुद्रातून जहाज इकडेतिकडे हेलकावे खात असतांना मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांनी अनुमान केले की आम्ही कुठल्या तरी भुमीच्या जवळ येत आहोत.
\v 28 म्हणून त्यांनी तेथे पाणी किती खोल आहे ते पाहण्यासाठी दोरी सोडली. त्यांनी दोरी पुन्हा वर घेतली की ते चाळीस मिटर भरले. थोड्यावेळाने त्यांनी पुन्हा पाण्याची खोली मोजली तेव्हा तीस मिटर भरली.
\v 29 त्यांना भीती वाटली की जहाज काही खडकांवर आदळेल म्हणून त्यांनी जहाजाच्या बरामावरून चार नागंर सोडून दिले. आणि ते प्रार्थना करू लागले की लवकर पहाट व्हावी जेणे करुन जहाज कोठे जात आहे ते त्यांना कळेल.
\s5
\v 30 काही खलाशी जहाजावरून पळून जातांना दिसले त्यांनी होडी समुद्रामध्ये सोडली. आपली योजना कुणाला कळू नये म्हणून त्यांनी असे दाखवले जणू काय जहाजाचा समोरील बाजूने ही ते नागंर कापू पाहू लागले.
\v 31 तेव्हा पौल शतधिपतींना आणि शिपायांना म्हणाला, एक खलाशी जहाजावर आहे तुम्हाला वाचण्याची कोणती ही आशा राहणार नाही,
\v 32 तेव्हा शिपायांनी होडीची दोरी कापून पाण्यात सोडून दिली.
\s5
\p
\v 33 नतंर पहाट होण्याच्या सुमारास पौलाने सर्वांना काही तरी खाण्यासाठी दिले. तो म्हणाला तुम्ही वाट पाहत राहा निरीक्षण करत राहा मी काहिच खाल्ले नाही.
\v 34 म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की काही अन्न खा. कारण तुम्ही जगण्यासाठी हे गरजेचे आहे तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.
\v 35 पौलाने हे म्हटल्यानतंर सर्वांसोबत त्यांने भाकर घेतली आणि देवाचे त्यांच्यासाठी आभार मानले आणि ती खाली. त्याने ती भाकर मोडली आणि आम्हां सर्वांसोबत तो खाऊ लागला.
\s5
\v 36 त्यांना ही धैर्य आले आणि ते ही अन्न खाऊ लागले.
\v 37 त्या भागावर आम्ही सर्वजण एकूण दोनशे शाहत्तर लोक जहाजात होतो.
\v 38 प्रत्येकाने जेवण केल्यानतंर त्यांनी ऊरलेला गहू जहाजामधून समुद्रामध्ये टाकून दिला.
\s5
\p
\v 39 पहाट झाल्यानंतर आम्हांला जमिन दिसू लागली परंतु आम्ही कोठे होतो माहित नाही परंतु ती जमिन कोठे आहे हे खलाश्यांना ओळखता आले नाही परंतु एक खाडी आणि तिचा सपाट किनारा दिसला आणि म्हणून जहाजाला त्यांनी त्या किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला.
\v 40 म्हणून त्यांने नागंर समुद्रात कापून राहू दिले. त्याच वेळेस सुकाणाची बधंने ढिली केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून समुद्रकिनाऱ्याची सपाटीची वाट त्यांनी केली आणि वाऱ्यांनी जहाज पुढे ढकलत आले. आणि मग ते जहाज त्यांनी किनाऱ्याकडे वळवले.
\v 41 परंतु लाठांच्या जवळच समुद्रातून वर आलेल्या जमिनीत तारू पुढे घुसले तेव्हा जहाजाची नाव त्या रेतीत गच्च रुतून बसली आणि ते हलवू शकत नव्हते. मोठ्या लाठा जहाजाचा मागच्या बाजूने पडत होत्या आणि अश्याने जहाज फुटून गेले.
\s5
\p
\v 42 तेव्हा कैद्यांपैकी कोणीही पाहून पळून जाऊ नये म्हणून त्यांच्यापैकी प्रत्येकाला मारून टाकावे अशी शिपायांनी योजना आखली.
\v 43 परंतु शतधिपती ची इच्छा होती की त्याने पौलाला वाचवावे, म्हणून सैनिकांनी त्यांची योजना पूर्ण करण्यास शताधिपतींनी त्याला अटकाव केला. त्या ऐवजी त्याने आज्ञा केली की ज्या कोणाला पोहता येते त्यांनी पाण्यात उडी घ्यावी आणि पोहून किनाऱ्यापर्यंत जावे.
\v 44 मग त्याने इतरांना फळ्यांवर किंवा तारवातल्या दुसऱ्या कशावर बसून समुद्र किनाऱ्यावर जाण्याचे सांगितले. तो जे म्हणाला अशा रितीने आम्ही सगळे सुखरूप सुरक्षित किनाऱ्यावर पोहचलो.
\s5
\c 28
\s मिलिता येथे पौल
\p
\v 1 आम्ही किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचल्यानंतर आम्हांला हे समजले की त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे.
\v 2 तिथे रहाणाऱ्या लोकांनी आम्हांला सामान्यतः दाखवली जाते त्याही पेक्षा आदरतिथ्य दाखवले त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवली आणि आम्हांला ऊब घेण्यास बोलावले कारण पाऊस पडत होता आणि गारठा खूप होता.
\s5
\v 3 पौलाने शेकोटीसाठी काही काठ्या जमा केल्या त्या त्याने शेकोटीत टाकल्या तेव्हा उष्णतेपासून दूर पळण्यासाठी त्या काठ्यांमधून एक विषारी साप बाहेर आला आणि तो पौलाच्या हाताला चावला (आणि त्याच्या हाताला झोंबून राहिला)
\v 4 तो साप पौलाच्या हाताला लटकलेला पाहात त्या बेटावर राहणारे लोक एकमेकांस म्हणू लागले, “कदाचित ह्या माणसाने कोणाचा तरी खून केलेला असावा. समुद्रामध्ये बुडण्यापासून जरी हा वाचलेला असला तरी, न्याय देवता ह्याला जिवंत राहू देत नाही”.
\s5
\v 5 परंतु पौलाने त्या सापाला आगेत झटकून टाकले आणि पौलाला काहीही झाले नाही.
\v 6 एकाएकी पौलाचे शरीर सुजेल किंवा एकाएकी तो मरून पडेल ह्याची ते वाट बघत होते. बराच वेळ त्यांनी वाट पहिली परंतु पौलाला काहीही झाले नाही. म्हणून त्या लोकांनी आपले त्याच्याविषयीचे चे विचार बदलले आणि ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा माणूस खुनी नाही! हा तर देव आहे!”
\s5
\p
\v 7 ते ज्या ठिकाणी होते त्याच्या जवळच काही शेते होती आणि ती शेती पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याची होती. तो त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हांला त्याच्या घरात आमंत्रित केले आणि तिथे राहण्यास बोलाविले.
\v 8 त्या वेळेस पुब्ल्य चे वडील तापाने आणि आवरक्तानें आजारी पडले आणि ते बिछाण्यावर पडून होते. म्हणून पौलाने त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पौलाने त्याच्यावर आपले हात ठेवले आणि त्याला बरे केले.
\v 9 पौलाने हे केल्यानंतर त्या बेटावरील अन्य लोकही आपापल्या आजारी लोकांना त्याच्याकडे घेऊन आले आणि पौलाने त्यांना बरे केले.
\v 10 त्यांनी आमच्या सर्वांसाठी उपहार आणले आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आमचा किती सन्मान करतात ते दाखवले. तीन महिन्यानंतर जेव्हा आम्ही प्रवासाला निघण्यास तयार झालो त्यांनी आमच्यासाठी अन्न आणि जहाजावर इतर उपयोगी वस्तू दिल्या.
\s रोमचा प्रवास पुढे सुरू
\s5
\p
\v 11 तेथे आम्ही तीन महिन्या नंतर आलेक्सांद्रावरून येणाऱ्या जहाजावर आम्ही चढलो ते जहाज इटलीला जात होते म्हणून आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. या जहाजाच्या समोरी बांधून जुळ्या देव ज्यांची नावे कास्टर आणि पलुपस आहे त्यांच्या प्रतीमा होत्या.
\v 12 आम्ही सुराकूस येथे पोहचलो तेथे आम्ही तीन दिवस घालवण्यासाठी राहिलो.
\s5
\v 13 तेथून वळसा घालून ईटलीतील रेगियोन येथे आलो. दुसऱ्या दिवशी दक्षिणेचा वारा सुटल्यामुळे आम्ही दोनच दिवसात पुत्युल्यास पोहचलो.
\v 14 तेथे आम्ही जहाज सोडून दिले. पुत्युलास आम्हांला काही बंधूजन भेटले. त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्या संगती सात व्यसनी व्हावे अश्या रितीने शेवटी आम्ही रोम येथे पोहचलो.
\p
\v 15 रोम मध्ये काही बंधू जणानी आमच्या विषयी काही विरोध केले म्हणून ते आम्हांला भेटावयास आले. अप्पिया रोम मधील ते थेट त्यांच्या पैकी काही लोक आम्हांस भेटले, आणि त्यांच्या पैकी काही इतर तीन उतारशाळा येथे आम्हांला सामोरे आले. जेव्हा पौलाने त्या विश्वासणाऱ्यांना पाहिले, त्यांने देवाचे आभार मागीतले आणि तो फार उत्साही झाला.
\s5
\v 16 आम्ही रोम मध्ये पोहचल्यावर पौलाला त्याच्या पाहारेकऱ्यांच्या शिपायांवर वेगळ्या घरात राहण्याची परवानगी मिळाली परंतु एक शिपाई सदैव त्याच्यावर पाहारा देणार होता.
\s पौल रोममधील यहूद्यांच्या भेटी घेतो
\p
\v 17 ह्या नंतर पौल तेथे तीन दिवस राहिल्यावर तेथे यहूद्यां मधील मुख्य माणसांना त्याने संदेश पाठवला की त्यांनी यावे आणि त्याच्या सोबत बोलावे जेव्हा ते आले पौल त्यांना म्हणाला, “माझ्या प्रिय बंधूनो मी आपल्या लोकांना विरोध किंवा आपल्या संप्रदाया विरुध्द काहीही बोललेलो नसतांना यरुशलेमेतील आपल्या पुढाऱ्यांनी मला धरले. ते मला ठार करणारच होते त्या आदी एका रोमी सैन्य अधिकाऱ्याने माझा बचाव केला मला वाचवले आणि त्या नंतर मला कैसरीया शहरात रोमी अधिकाऱ्याच्या हाती देऊन चौकशी करण्यात आली.
\v 18 रोमी अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली आणि त्यांनी मला सोडण्याची इच्छा व्यक्त केली कारण मला मृत्यु दंड व्हावा असे कोणतेही कार्य मी केलेले त्यांना आढळले नाही.
\s5
\v 19 परंतु तेथेही यहूदी पुढाऱ्यांनी रोम लोक मला स्वत्रंत करण्याची इच्छा व्यक्त करत असता ते त्या विरुध्द बोलले म्हणून सम्राटाने माझा न्याय करावा अशी मी मागणी केली त्यामुळे मी आता रोममध्ये आलो आहे तरी मी हे करण्यामागचे कारण मी आपल्या पुढाऱ्यांवर दोषारोप लावू इच्छितो असे नव्हते.
\v 20 म्हणून मी तुम्हास येथे येण्यास विनंती केली आहे जेणेकरून मी का बंदिवासात आहे हे तुम्हाला सांगावे. इस्त्राएलाचे लोक देव त्यांच्या सोबत काय करेल ही जी अपेक्षा करतात त्या मध्ये मी पूर्ण पणे भरोसा करतो म्हणून माझ्या संगती असे घडले आहे.”
\s5
\v 21 मग यहूदी पुढाऱ्यांनी त्याला म्हटले,“यहूदी बांधवां कडून अद्याप तुझ्या विषयी आमच्या कडे काहीही पत्रे आलेले नाहीत. तसेच यहूदी यातून आमच्याकडे आलेल्या यहूदी बांधवांनी तुझ्याविषयी काहीही वाईट आम्हांस सांगितले नाही.
\v 22 परंतु तू ज्या गटात सहभागी आहेस त्या विषयी तू का विचार करतोस ते ऐकावे अशी आमची इच्छा आहे कारण अनेक ठिकाणी लोक त्या विश्वासाच्या विरोधात बोलत आहेत असे आम्ही ऐकले आहे.”
\s5
\p
\v 23 पौलाचे बोलणे ऐकण्याकरता त्याने एक दिवस ठरवला. मग त्या दिवशी आधी पेक्षाही अधिक लोक पौल जेथे राहत होता तेथे एकत्र आले. देव सर्वांवर कसा राज्य करील ह्या विषयी पौलाने त्यांना सांगितले. मोशेचे नियम शास्त्र आणि येशू विषयी अगोदरच कसे लिहले होते हे ही त्यांना सांगितले. पौल सकाळ पासून संध्याकाळ होईपर्यंत जे कोणी ऐकण्यास तयार होते त्या सर्वांशी बोलला.
\v 24 त्या यहूद्यांपैकी काही लोकांची, पौल येशू विषयी जे बोलत होते ते सत्य आहे, अशी खात्री झाली. परंतु त्यांच्या पैकी काहींनी खात्री न पटल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला नाही.
\s5
\v 25 त्यांच्या आपसात एकमत न झाल्या मुळे ते निघून जाण्याच्या तयारीत होते, परंतु पौलाला अजून एक गोष्ट सांगायची होती; “पवित्र आत्म्याने तुमच्या पूर्वंजांविषयी सत्य तेच बोलले, येशू यशया संदेष्ट्याद्वारे हे शब्द त्याच्याशी बोलला;
\q
\v 26 तर या लोकांकडे जा आणि त्यांना सांग:
\q तुमच्या कानाने तुम्ही ऐकाल, परंतु देव काय म्हणत आहे हे तुम्ही कधी समजणार नाही.
\q तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल परंतु देव खरोखर कोणत्या गोष्टी करत आहे त्या तुम्ही कधीही खरोखर पाहणार नाही.
\s5
\q
\v 27 या लोकांचे अंतःकरण हठ्ठी झाले आहे म्हणून हे लोक समजत नाहीत
\q त्यांचे कान जवळपास बहीरे झाले आहेत;
\q त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत, कारण पाहायची त्यांची इच्छा नाही.
\q त्यांना आपल्या कानांनी ऐकायचे ही नाही किंवा आपल्या अंतःकरणाने समजून घ्यायचे नाही,
\q नाही तर ते वळले असते आणि मी त्यांना बघितले नसते.
\s5
\p
\v 28-29 म्हणून हे तुम्हास माहित असू द्या की जे कारण देवाने नियुक्त केले आहे ते तू आता परराष्ट्रीयांना दे आणि ते त्याचे ऐकतील.”
\s समाप्ती
\s5
\p
\v 30 पौलाने भाड्याने घेतलेल्या घरात तो जवळ पास दोन वर्ष राहिला. अनेक लोक त्याला भेटावयास येत असत, आणि तो त्या सर्वांचे आनंदाने स्वागत करत असे व त्यांच्या सोबत बोलत असे.
\v 31 देव स्वतःला राजा बनवून कसा प्रकट करेल या विषयी तो लोकांना उपदेश करत व शिकवत असे आणि तो त्यांना येशू ख्रिस्ताविषयी शिकवण देत असे. तो हे मोठ्या धैर्याने करत असे आणि त्याला कोणीही अटकाव केला नाही.