mr_udb/42-MRK.usfm

1344 lines
288 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains invisible Unicode characters

This file contains invisible Unicode characters that are indistinguishable to humans but may be processed differently by a computer. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id MRK - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h मार्ककृत शुभवर्तमान
\toc1 मार्ककृत शुभवर्तमान
\toc2 मार्ककृत शुभवर्तमान
\toc3 mrk
\mt1 मार्ककृत शुभवर्तमान
\s5
\c 1
\s बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
\p
\v 1-2 देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, याच्याविषयीची ही सुवार्ता आहे. यशया संदेष्ट्याने ही सुवार्ता त्याच्या या लिखाणातून सांगितली:
\q “ऐक! मी माझ्या संदेशवाहकाला तुझ्यापुढे पाठवीत आहे.
\q तो तुझ्या स्वागतासाठी लोकांना तयार करेल.
\q
\v 3 जो कोणी अरण्यात त्याची वाणी ऐकेल त्या प्रत्येकाला तो ओरडून सांगेल,
\q ‘प्रभूचे स्वागत करण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा.’”
\s5
\p
\v 4 यशया संदेष्ट्याने ज्याच्याविषयी लिहिले होते तो संदेशवाहक योहान होता. लोक त्याला “बाप्तिस्मा करणारा” असे संबोधत असत. योहान अरण्यात राहत असे, तो लोकांना बाप्तिस्मा देत होता आणि त्यांना हे सांगत असे, “तुम्ही पाप केले आहे याबद्दल दुःखी व्हा, आणि ते करण्याचे थांबवण्याचा निश्चय करा, मग देव कदाचित तुम्हाला क्षमा करेल.”
\v 5 योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी यहूदा जिल्ह्यातील आणि यरुशलेम नगरातील लोकांचा मोठा समुदाय अरण्यात त्याच्याकडे गेला. त्यापैकी पुष्कळ लोकांनी ते पापी आहेत असे स्वीकारले. नंतर योहानाने त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.
\v 6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेले खरबरीत कपडे घालत होता आणि त्याच्या कंबरेला एक चामड्याचा कमरबंद होता. तो रानावनांत सापडणारे नाकतोडे आणि रानमध खात असे.
\s5
\p
\v 7 तो उपदेश करत असे, “लवकरच कोणीतरी महान असा एक येणार आहे. मी खाली वाकून त्याच्या पायतणाचे बंध सोडण्यासही योग्य नाही.
\v 8 मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो परंतु तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.”
\s येशूचा बाप्तिस्मा
\s5
\p
\v 9 योहान हा उपदेश करत असतांना, येशू गालील जिल्ह्यातील नासरेथ या गावातून आला. योहान जेथे उपदेश करत होता त्या ठिकाणी येशू आला, आणि योहानाने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.
\v 10 येशू पाण्यातून बाहेर येताच, लगेचच, त्याला आकाश उघडलेले आणि देवाचा आत्मा त्याच्या स्वतःवर उतरतांना त्याच्या दृष्टीस पडला. देवाचा आत्मा कबूतराच्या रूपाने आला.
\v 11 देव स्वर्गातून बोलला व म्हणाला, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो. मी तुझ्याविषयी अतिशय प्रसन्न आहे.”
\s येशूची परीक्षा
\s5
\p
\v 12 मग देवाच्या आत्म्याने येशूला अरण्यात नेले.
\v 13 तो तेथे चाळीस दिवस होता. त्या दरम्यान, सैतान त्याला मोहात पाडत होता. त्या ठिकाणी जंगली प्राणी होते, आणि देवदूत त्याची काळजी घेत.
\s येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ
\s5
\p
\v 14 नंतर, योहानाला तुरुंगात टाकल्यावर, येशू गालीलात गेला. गालीलामध्ये, तो देवाच्या सुवार्तेची घोषणा करत होता.
\v 15 तो म्हणाला, “आता ती वेळ आली आहे. देव राजा आहे हे तो लवकरच दाखवून देईल. तुम्ही पाप केले आहे याबद्दल दुःखी व्हा, आणि ते करणे थांबवण्याचा निश्चय करा, म्हणजे देव तुम्हाला क्षमा करू शकेल. सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
\s पहिल्या शिष्यांना पाचारण
\s5
\p
\v 16 एके दिवशी, येशू गालील समुद्राजवळून जात असतांना, शिमोन आणि शिमोनाचा भाऊ, अंद्रिया हे दोन पुरूष त्याच्या दृष्टीस पडले. ते आपली जाळी मासे धरण्यासाठी समुद्रात टाकत होते. ते मासे धरून आणि विकून पैसे कमवत असत.
\v 17 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यासोबत आलात तर, जसे तुम्ही मासे एकत्रीत करत आला आहात तसेच, तुम्ही लोकांना एकत्र कसे करावे हे मी तुम्हाला शिकवीन.”
\v 18 त्याच क्षणी त्यांनी जाळे सोडले, आणि ते त्याच्या सोबत गेले.
\s5
\p
\v 19 नंतर ते काही अतंरावर गेल्यावर, येशूने याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान, या इतर दोन मनुष्यांना पाहिले. ते जब्दी नावाच्या मनुष्याचे पुत्र होते. ते दोघेही एका नावेत मासे धरण्याचे जाळे दुरूस्त करत होते.
\v 20 त्यांना पाहताच, ‘माझ्याबरोबर या, असे येशू त्यांना म्हणाला. मग त्यांनी त्यांच्या बापाला मोलाने आणलेल्या सेवकांसोबत नावेत सोडून दिले, आणि ते येशूबरोबर निघून गेले.
\s कफर्णहूमातील सभास्थानांत येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो
\s5
\p
\v 21 येशू आणि शिष्य हे जवळच्या कफर्णहूम शहरात गेले. पुढील शब्बाथ दिवशी, तो सभास्थानात गेला आणि तेथे जमा झालेल्या लोकांना शिक्षण देऊ लागला.
\v 22 त्याच्या शिकवीण्याच्या पद्धतीने ते आश्चर्यचकित झाले. तो स्वतःला माहित असलेल्या माहीतीवर अवलंबून असलेल्या शिक्षकाप्रमाणे शिकवत असे. यहूदी नियमशास्त्र शिकविणारे इतरांनी शिकवलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवत, तसे त्याने शिकवले नाही.
\s5
\v 23 येशू सभास्थानात जेव्हा शिकवीत होता. तेथे एक मनुष्य दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात होता. दुष्ट आत्मा असलेल्या मनुष्याने ओरडण्यास सुरूवात केली,
\v 24 “अहो! येशू, नासरेथकर! आम्हा दुष्ट आत्म्याचे तुझ्याबरोबर काहीही देणे घेणे नाही! तू आम्हांला नष्ट करायला आला आहेस काय? मला माहीत आहे तू कोण आहेस. देवापासून आलेला पवित्र तो तुच आहेस!”
\v 25 येशूने दुष्ट आत्म्याला दटावून, म्हटले, “गप्प बस आणि त्याच्यातून निघ!”
\v 26 दुष्ट आत्म्याने मनुष्याला थरथरून हालविले. तो मोठ्याने किंचाळला, आणि मग तो त्या माणसाच्या बाहेर आला आणि त्याला सोडून गेला.
\s5
\v 27 तेथे असलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. परिणामी, त्यांनी एकमेकांशी चर्चा करुन म्हटले, “हे आश्चर्यकारक आहे! तो नवीन आणि अधिकारयुक्त शिकवन देत नाही, तर तो त्या दुष्ट आत्म्यांना आज्ञा देतो आणि त्याचे म्हणणे ते ऐकतात!”
\v 28 येशूने काय केले होते हे लोकांनी लवकरच गालील जिल्ह्यातील इतर पुष्कळांना (लोकांना) सांगितले.
\s पेत्राची सासू व इतर रोगी यांना येशू बरे करतो
\s5
\p
\v 29 नंतर त्यांनी सभास्थान सोडल्यावर, येशू, शिमोन आणि अंद्रिया, हे याकोब आणि योहानासोबत सरळ शिमोन आणि अंद्रिया यांच्या घरी गेले.
\v 30 शिमोनाची सासू खुप तापाने आजारी असल्यामुळे बिछाण्यात पडून होती. लगेचच येशूला कोणीतरी तिच्या आजारपणाविषयी सांगितले.
\v 31 येशूने तीच्याकडे जाऊन, तिच्या हाताला पकडले आणि ऊठण्यास मदत केली. त्याच क्षणात तिचा ताप निघून गेला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
\s5
\p
\v 32 त्या संध्याकाळी, सूर्य मावळला असतांना, येशूकडे लोकांनी पुष्कळ आजाऱ्यांना आणि दुष्ट आत्म्याच्या ताब्यात असणाऱ्यांना आणले.
\v 33 जणू काही त्या शहरात राहणारे सर्व लोक शिमोनाच्या घराच्या अंगणात जमलेले होते.
\v 34 येशूने वेगवेगळ्या आजाराने पिडीत बऱ्याच लोकांना बरे केले. त्याने लोकांमधून पुष्कळ भूते बाहेर येण्यासाठी सक्ती केली. त्याने भूतांना स्वताःबद्दल लोकांना काहीही सांगण्यास परवानगी दिली नाही, कारण त्यांना माहीत होते की तो देवाचा पवित्र आहे.
\s येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफर्णहूम सोडतो
\s5
\p
\v 35 येशू दुसऱ्या दिवशी पहाटेच अंधार असतांना ऊठला. तो घराबाहेर गेला आणि त्या गावातून निघून जेथे लोक नाहीत तेथे गेला. नंतर त्याने प्रार्थना केली.
\v 36 शिमोन आणि त्याचे सोबती त्याला शोधत होते.
\v 37 त्यांना तो सापडला तेव्हा ते म्हणाले, “शहरातला प्रत्येक व्यक्ती तुला शोधत आहे.”
\s5
\p
\v 38 तो त्यांना म्हणाला, “मला उपदेश करता यावा ह्यासाठी आपल्याला शेजारच्या गावात जाणे अवश्यक आहे. ह्याच कारणासाठी मी जगात आलो आहे.”
\v 39 मग ते सर्व गालीलातून गेले. ते पोहोचल्यावर, येशू सभास्थानात जाऊन उपदेश करू लागला आणि लोकांमधून दुष्ट आत्मे घालवण्यासाठी त्याने त्यांना जबरदस्ती केली.
\s येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
\s5
\p
\v 40 एके दिवशी येशूकडे एक मनुष्य आला त्याला त्वचा रोग होता ज्याला कुष्ठरोग असे म्हणत. तो येशू समोर गुडघे टेकून आणि त्याच्याकडे विनंती करीत म्हणाला, “कृपया मला बरे करा, कारण तुम्ही मला बरे करण्यासाठी समर्थ आहात जर तुम्ही इच्छुक असाल तर!”
\v 41 येशूला त्याचा कळवळा आला. त्याने त्याचे हात पुढे केले आणि त्या मनुष्याला स्पर्श केला. मग तो त्याला म्हणाला, “माझी इच्छा आहे तू बरे व्हावे, बरा हो!”
\v 42 तोबडतोब तो मनुष्य बरा झाला! तो आता कुष्ठरोगी नव्हता!
\s5
\p
\v 43 त्याला पाठवण्याआधी येशूने त्याला बजावून सांगितले.
\v 44 येशू त्याला हे म्हणाला, “आताच जे काय झाले ते कोणाला सांगू नको, त्याऐवजी, याजकाकडे जाऊन स्वत:ला दाखव आणि तो तुझे परिक्षण करेल. कुष्ठरोगातून बरे झालेल्या लोकांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे अर्पण करावे. तू बरा झाला हीच लोक समुदायाला साक्ष होईल.”
\s5
\v 45 त्या मनुष्याने येशूच्या सूचनांचे पालन केले नाही. येशूने त्याला कसे बरे केले हे त्याने लोकांना सांगायला सुरूवात केली. परिणामी, येशूला शहरात सार्वजनिक ठिकाणी यापुढे प्रवेश करणे शक्य नव्हते, कारण लोक त्याच्याभोवती गर्दी करत असत. त्याऐवजी, तो शहराबाहेर अशा ठिकाणी थांबत असे जेथे कोणी एक राहत नसे. परंतु संपूर्ण प्रदेशातून लोक त्याच्याकडे येत राहिले.
\s5
\c 2
\s येशू एका पक्षघाती माणसाला बरे करतो
\p
\v 1 काही दिवस गेल्यावर, येशू कफर्णहूमात परत आला. येशू परत आला आहे आणि तो घरी आहे ही गोष्ट लोकांनी इतरांना त्वरीत सांगितली.
\v 2 येशू जेथे राहत होता तेथे मोठा लोकसमुदाय एकत्र जमला. खुप गर्दी असल्याने घरात पुरेशी जागा उरली नाही. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नव्हती, तसेच अंगणातही जागा नव्हती. येशूने देवाचा संदेश त्यांना सांगितला.
\s5
\p
\v 3 काही लोक एका पक्षघाती माणसाला येशूजवळ घरामध्ये घेऊन आले. चार माणसांनी त्याला खाटेवर उचलून आणले होते.
\v 4 लोक समुदाय पुष्कळ असल्यामुळे त्यांना त्या मनुष्याला येशूकडे घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, ते घराच्या छतावर गेले आणि येशू जेथे उभा होता तेथे त्यांनी छत उकलून मोठे भगदाड पाडले. त्यांनी येशूच्या समोर पक्षघाती मनुष्याला अंथरुना सोबत उकललेल्या छतातून खाली सोडले.
\s5
\p
\v 5 नंतर येशूला समजले त्या मनुष्यांचा विश्वास आहे की तो त्याला बरे करू शकतो, तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “माझ्या मुला, मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे!”
\v 6 यहूदी नियमशास्त्र शिकवणारे काही पुरुष तेथे बसले होते. त्यांनी स्वत:शी विचार करण्यास सुरूवात केली.
\v 7 “हा मनुष्य स्वतःला काय समजतो? तो गर्विष्ठ आहे आणि असे बोलल्याने देवाचा अपमान करतो! फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो!”
\s5
\p
\v 8 येशूला समजले ते त्यांच्या मनात काय विचार करत आहे. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टीचा विचार का करत आहात?
\v 9 मला काय सांगणे सोपे होईल, ‘मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे’ किंवा ‘ऊठ! आपले अंथरुन उचल आणि चालू लाग’?
\s5
\p
\v 10 मी तुम्हाला दाखून देईन मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला,
\v 11 “ऊठ! आपले अंथरुन उचल! आणि घरी जा!”
\v 12 सगळे लोक पाहत असतांना, लागलेच तो मनुष्य ऊठून उभा राहिला! त्याने अंथरुन उचलले, आणि मग तो निघून गेला. हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुती करत म्हनाले , “आता घडलेली गोष्ट आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नाही!”
\s लेवीला पाचारण
\s5
\p
\v 13 येशूने कफर्णहूम सोडले आणि गालील समुद्राच्या किनाऱ्याजवळून गेला. लोकांचा मोठा समुदाय त्याच्याकडे आला आणि त्याने त्यांना शिकविले.
\v 14 तो चालत असता, त्याने लेवी नावाच्या मनुष्याला पाहिले त्याच्या पित्याचे नाव अल्फी होते. तो आपल्या कार्यालयात बसत असून तेथे कर जमा करत असे. येशूने त्याला म्हटले, “माझ्या सोबत ये.” तो ऊठला आणि येशूसोबत गेला.
\s5
\p
\v 15 नंतर, येशू लेवीच्या घरी जेवण करत होता. येशू आणि त्याच्या शिष्यांबरोबर पुष्कळ पापी आणि कर गोळा करणारे जेवत होते.
\v 16 यहूदी नियमशास्त्राचे शिक्षण देणारे आणि परुशी पंथाच्या सदस्यांनी येशूला पापी जण व कर गोळा करणाऱ्यांसोबत जेवतांना पाहिले. त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तो पापी जण आणि कर गोळा करणाऱ्या लोकांबरोबर का खातो आणि पितो?”
\s5
\p
\v 17 मग येशूने त्यांना हे विचारतांना ऐकले, त्या यहूदी नियमशास्त्राचे शिक्षण देणाऱ्यांना तो म्हणाला, “निरोगी लोकांना वैद्याची गरज नाही. त्याच्या उलट, जे आजारी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे. ज्या लोकांना वाटते ते नितिमान आहेत त्यांना बोलवण्यासाठी मी आलो नाही, परंतु आपण पापी असल्याचे ज्यांना माहित आहे त्यासाठी मी आलो.
\s उपासाविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 18 आता यावेळी, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य आणि परुशी पंथाचे काही सदस्य अन्नाचे सेवन करत नसत (उपास), ते असे नियमीत करत असत. त्यातले काही मनुष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “योहानाचे शिष्य आणि परुशी अन्नाचे सेवन करत नाहीत (उपास). तुमचे शिष्य अन्नाचे सेवन (उपास) का करतात?”
\v 19 येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा एखादा माणूस एखाद्या स्त्रीशी लग्न करतो, तो सोबत असे पर्यंत त्याच्या मित्रांना उपास करणे नक्कीच शक्य होणार नाही. लग्न हे वरासह मेजवानी आणि उत्सव साजरा करण्याची वेळ आहे, विशेषतः जेव्हा वर त्यांच्यासोबत आहे.
\s5
\p
\v 20 परंतु एक दिवस, वराला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल. मग त्या दिवसामध्ये, ते अन्नापासून दूर राहतील.”
\p
\v 21 येशू त्यांच्याकडे वर जाऊन म्हणाला, “लोक जुन्या कपड्याला दुरुस्ती करण्यासाठी नविन कपड्याचे ठिगळ लावत नाहीत. त्यांनी ते केले, जेव्हा ते कपडे धुतील, तेव्हा ठिगळ लहान होईल आणि नविन कपडा जुन्याला अजून जास्त फाडून टाकेल. परिणामी, छिद्र अजून मोठे होईल!
\s5
\p
\v 22 त्याचप्रमाणे, लोक नवा द्राक्षारस साठवून ठेवण्यासाठी जुन्या कातडी पिशव्यांचा उपयोग करत नाहीत. जर त्यांनी तसे केले, तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी खराब करेल कारण नवा द्राक्षारस जेव्हा आंबून जातो आणि विस्तृत होतो तेव्हा नव्या द्राक्षारसमुळे जुन्या कातडी पिशव्या फाटून जातात. परिणामी द्राक्षारस आणि कातडी पिशवी दोन्हींचा नाश होईल! त्याउलट, लोक नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीत ठेवतात!”
\s येशू हा शब्बाथाचा प्रभू
\s5
\p
\v 23 एका शब्बाथ दिवशी, येशू त्याच्या शिष्यांसह काही धान्याच्या शेतातून जात होता. ते धान्याच्या शेतातून चालून जात असतांना, शिष्य काही धान्याची कणसे मोडत होते.
\v 24 काही परुशांनी पाहिले ते काय करत आहेत आणि ते येशूला म्हणाले, “पाहा! ते शब्बाथा विषयीचा यहूदी नियम मोडत आहेत. ते असे का करत आहेत?”
\s5
\p
\v 25 येशू त्यांना म्हणाला, “दावीद राजा आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना भूक लागली होती त्याविषयीचा शास्त्रलेख तुम्ही कधीच वाचला नाही का?
\v 26 अब्याथार मुख्य याजक असतांना, दावीद देवाच्या मंदिरात गेला आणि त्याने काही भाकरीसाठी विचारले. देवाला समर्पण केलेल्या भाकरींपैकी मुख्य याजकाने त्याला काही दिल्या. आपल्या नियमाप्रमाणे, फक्त याजकच त्या भाकरी खाऊ शकतो! परंतु दावीदानेही त्यातले काही खाल्ले. मग त्यातून काही त्याने आपल्या सोबतच्या माणसांना सुध्दा दिल्या.”
\s5
\p
\v 27 पुढे येशू त्यांना म्हणाला, “शब्बाथ हा लोकांच्या गरजासाठी स्थापन करण्यात आला होता. शब्बाथाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोकांना बनविले नाही!
\v 28 म्हणून, लक्षात ठेवा, मनुष्याचा पुत्र अगदी शब्बाथाचाही प्रभू आहे!”
\s5
\c 3
\s शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या माणसाला बरे करणे
\p
\v 1 आणखी एका शब्बाथ दिवशी येशू नेहमीप्रमाणे सभास्थानात गेला. तेथे एक मनुष्य असून त्याचा हात वाळलेला होता.
\v 2 परुशी पंथापैकी काही जण तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की नाही हे काळजीपूर्वक पाहत होते; त्याने काही तरी चुकीचे करावे त्याबद्दल त्याच्यावर दोष ठेवावा अशी त्यांची इच्छा होती.
\s5
\p
\v 3 येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “येथे सर्वांसमोर उभा रहा!” मग तो मनुष्य ऊठून उभा राहिला.
\v 4 नंतर येशू लोकांना म्हणाला, “देवाने मोशेला दिलेले नियम लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची, किंवा वाईट करण्याची परवानगी देते का? शब्बाथ दिवशी मनुष्याचे प्राण वाचवण्याचे नियमशास्त्र आपल्याला परवानगी देते का, किंवा त्याची मदत करण्याचे नाकारून त्याला मरू देणे ह्याची परवानगी देते?” परंतु त्यांनी काही उत्तर दिले नाही.
\s5
\p
\v 5 त्याने त्यांच्याकडे रागाने पाहीले. तो अतिशय हताश झाला कारण ते हट्टी होते आणि त्या मनुष्याला मदत करण्यास तयार नव्हते. त्यामुळे तो त्या मनुष्याला म्हणाला, “हात लांब कर!” जेव्हा त्या मनुष्याने आपला वाळलेला हात लांब केला, तो पूर्वीसारखा बरा झाला!
\v 6 परुशी सभास्थानातून बाहेर गेले. त्यांनी ताबडतोब हेरोद अंतिपा याच्या काही यहूदी समर्थकांना भेट दिली, जो गालील जिल्ह्यावर राज्य करतो. त्यांनी एकत्र येऊन येशूला मारण्यासाठी कट रचला.
\s येशू पुष्कळ रोग्यास बरे करतो
\s5
\p
\v 7 येशू आणि त्याच्या शिष्यांनी शहर सोडले आणि ते गालील समुद्राच्या किनाऱ्याने पुढे गेले. मोठा लोक समुदाय त्याच्या मागेमागे जात होता. जे लोक त्याच्या मागे येत होते ते गालील आणि यहूदातून,
\v 8 यरुशलेमतून, यहूदा जिल्ह्यातील शहरातून, इदोम जिल्ह्यातून, यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेशातून, आणि सोर व सीदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून. ते सर्व त्याच्याकडे आले कारण त्याने काय केले होते त्याबद्दल त्यांनी ऐकले.
\s5
\p
\v 9-10 कारण त्याने पुष्कळ लोकांना बरे केले होते, वेगवेगळ्या आजारांनी पिडलेले लोक त्याला स्पर्श करण्यासाठी पुढे जात होते. त्यांचा विश्वास होता जर त्यांनी त्याला स्पर्श केला, तर ते बरे होतील. मग त्यांने शिष्यांना सांगितले त्यांच्यासाठी एक लहान होडी तयार करा जेणे करुन लोक समुदाय त्याला स्पर्श करण्यासाठी पुढे येत असता त्याला त्यांनी चेंगरु नये.
\s5
\p
\v 11 जेव्हा जेव्हा दुष्ट आत्मे येशूला पाहात होते, त्यांच्या नियंत्रनात असलेल्या लोकांना ते येशूच्या पुढे लोटंगण घालण्यास लावत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस!”
\v 12 येशूने दुष्ट आत्म्यांना तो कोण आहे हे न सांगण्याची बजावून आज्ञा केली.
\s बारा प्रेषितांची निवड
\s5
\p
\v 13 येशू टेकडीवर गेला. तो जात असता, ज्यांनी त्याच्या बरोबर यावे असे त्याला वाटत होते त्यांना येशूने बोलावले आणि ते त्याच्यासोबत गेले.
\v 14 त्याने आपल्यासोबत राहण्यासाठी आणि त्याच्यासाठी जाऊन उपदेश सांगण्यासाठी बारा जणांची नियुक्ती केली. तो त्यांना प्रेषित म्हणत.
\v 15 तसेच त्याने त्यांना लोकांमधून दुष्ट आत्मे बाहेर काढण्यासाठी सामर्थ्य दिले.
\v 16 या बारा जणांची त्याने निवड केली: शिमोन, ज्याला त्याने पेत्र हे नाव दिले.
\s5
\p
\v 17 जब्दीचा मुलगा, याकोब, आणि याकोबाचा भाऊ, योहान, ह्यांना त्याने, ‘गर्जना करणारे पुत्र’हे नवीन नाव दिले कारण ते अतिशय आवेशी होते;
\v 18 अंद्रिया, पेत्राचा भाऊ; फिलिप्प; बर्थलमय; मत्तय; थोमा; अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी;
\v 19 आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला.
\s सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करीतो या आरोपास त्याने दिलेले उत्तर
\s5
\p
\v 20 येशू आणि त्याचे शिष्य एका घरात गेले. तो जेथे राहत होता तेथे पुन्हा लोक समुदाय जमा झाला. पुष्कळ लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली. तो आणि त्याच्या शिष्यांना जेवायला देखील वेळ भेटत नव्हता.
\v 21 जेव्हा त्याच्या नातेवाईकांनी हे ऐकले, ते त्याला आपल्यासोबत घरी आणण्यासाठी गेले कारण काही लोकांनी सांगितले होते की तो वेडा झाला आहे.
\p
\v 22 यहूदी नियमांना शिकवणारे काही पुरुष यरुशलेमहून खाली आले. त्यांनी ऐकले येशू लोकांमधून दटावून दुष्ट आत्मे बाहेर काढत होता. म्हणून ते लोकांना सांगत होते, “बालजबूल, तो दुष्ट आत्म्यावर राज्य करतो, तो येशूवर नियंत्रण ठेवतो. तोच येशूला लोकांमधून दुष्ट आत्मे काढण्यासाठी सामर्थ्य देतो!”
\s5
\p
\v 23 म्हणून येशूने त्या पुरूषांना स्वतःकडे बोलाविले. येशू त्याच्याशी बोधकथेतून बोलला आणि म्हणाला, “सैतान कसे सैतानाला काढू शकतो?
\v 24 जर एकाच देशात राहणारे लोक एकमेकांविरुद्ध लढत असतील, तर त्यांचा देश एक संयुक्त देश म्हणून राहणार नाही.
\v 25 आणि जर एकाच घरात राहणारे लोक एकमेकांशी लढत असतील तर, ते कुटूंब नक्कीच एकजुटीने राहणार नाही.
\s5
\p
\v 26 त्याचप्रमाणे, जर सैतान आणि त्याचे दुरात्मे एकमेकांशी लढले, तर ते मजबूत होण्याऐवजी, शक्तीहीन होतील.
\v 27 बलवान माणसाच्या घरात कोणीही प्रवेश करू शकत नाही आणि त्याच्या वस्तू घेऊ शकत नाही त्या बलवान माणसाला बाधंले. तरच तो त्या माणसाच्या घरातल्या गोष्टी चोरू शकतो.”
\s5
\p
\v 28 येशू आणखी म्हणाला, “हे काळजीपूर्वक समजून घ्या! लोक अनेक प्रकारे पाप करू शकतात आणि ते देवाबद्दल वाईट बोलू शकतात. तरी देव त्यांना क्षमा करू शकतो,
\v 29 परंतु जर कोणी पवित्र आत्म्याविषयी वाईट शब्द बोलेल, देव त्याला कधीही क्षमा करणार नाही. ती व्यक्ती सर्वकाळ दोषी आहे.”
\p
\v 30 येशूने त्यांना या गोष्टी सांगितल्या कारण ते म्हणत होते, “दुष्ट आत्मा त्याला नियंत्रित करत आहे!”
\s येशूचे वास्तविक नातेवाईक
\s5
\p
\v 31 येशूची आई आणि लहान भावंडे पोहचली. ते बाहेर उभे असतांना, त्याला बाहेर बोलवण्यासाठी त्यांनी कोणाला तरी आत पाठवले.
\v 32 येशूच्या सभोवती लोक समुदाय बसला होता. त्यातला कोणी एक त्याला म्हणाला, “तुझी आई आणि लहान भावंडे बाहेर आहेत. त्यांना तुला पाहायचे आहे.”
\s5
\p
\v 33 येशूने त्याला विचारले, “माझी आई कोण आहे? माझी भावंडे कोण?”
\v 34 त्याच्यासोबत बसलेल्या लोक समुदायाकडे पाहून, तो म्हणाला, “इकडे पाहा! तुम्ही माझी आई आणि माझी भावंडे आहात.
\v 35 जे लोक देवाची इच्छा पूर्ण करतात तेच माझे भाऊ, माझी बहीण किंवा माझी आई आहेत!”
\s5
\c 4
\s पेरणाऱ्याचा दाखला
\p
\v 1 पुन्हा येशू गालील समुद्राच्या किनाऱ्याजवळ लोकांना शिकवू लागला. तो शिक्षण देत असता, खुप मोठा लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तो नावेत चढला आणि त्याने ती पाण्यात ढकलली. मग तो तारवामध्ये बसल्यामुळे त्याला त्यांच्याशी चांगल्या रीतीने बोलता येत होते. त्याच वेळेस, लोक समुदाय पाण्याच्या किनाऱ्याजवळ होता.
\v 2 नंतर त्याने त्यांना काही बोधकथा शिकवल्या. तो त्यांना शिकवत असताना, तो त्यांना हे म्हणाला,
\s5
\v 3 “हे ऐका! एक मनुष्य काही बी पेरण्यासाठी आपल्या शेतात गेला.
\v 4 जसा तो जमिनीवर ते पसरत होता, त्यातले काही बी वाटेवर पडले. मग काही पक्ष्यानी येऊन त्या बिया खाल्या.
\v 5 इतर बि खडकाळ जमिनीवर पडले जेथे दगडावर पुरेशी माती नव्हती. लवकरच बी अंकुरले कारण ओलसर माती खोल नसल्यामुळे सूर्याने तिला तापवले.
\s5
\p
\v 6 परंतु त्या रोपट्यावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर, ते वाळू लागले. त्याची मूळे खोल नसल्याने ते वाळून गेले.
\v 7 तो पेरीत असतांना, काही बी काटेरी झुडपाच्या जमिनीवर पडले. रोपे वाढली, पण काटेरी झाडेही वाढू लागली आणि चांगल्या झाडांना ही दाटनी केली. त्यामुळे रोपाने फळ दिले नाही.
\s5
\p
\v 8 परंतु तो पेरत असतांना, काही बी चांगल्या जमिनीवर पडले. परिणामी, ते उगवले, ते चांगले वाढले, आणि नंतर त्यांनी भरपूर धान्य दिले. त्या माणसाने बी पेरल्यापैकी उगवलेल्या काही रोपाने तीस पट फळ दिले. काहींनी साठपेक्षा जास्त दिले. काही शंभरपेक्षा जास्त दिले.”
\v 9 नंतर येशूने म्हटले, “जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी आताच जे सांगितले ते काळजीपूर्वक समजून घ्या.”
\s5
\p
\v 10 नंतर, फक्त बारा शिष्य आणि काही जवळचे अनुयायी त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याला बोधकथेबद्दल विचारले.
\v 11 तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला देव स्वत: राजा म्हणून कसा प्रकट करेल त्याचा संदेश सांगतो, परंतु इतरांसाठी मी बोधकथेतून बोलतो.
\q
\v 12 मी काय करत आहे ते पाहतील, तेव्हा ते शिकणार नाही.
\q जेव्हा ते माझे बोलणे ऐकतील, त्यांना समजणार नाही.
\q जर ते शिकले किंवा समजू लागले,
\q त्यांच्या पापाबद्दल त्यांना पश्चाताप होईल आणि ते पाप करणे थांबवण्याचा निर्णय घेतील,
\q आणि देव त्यांना क्षमा करेल.”
\s5
\p
\v 13 तो त्यांना आणखी म्हणाला, “तुम्हाला ही बोधकथा समजली नाही का? तर मग तुम्हाला मी दुसरी बोधकथा शिकवली तर कशी समजणार?
\v 14 मी तुम्हाला बोधकथा सांगितल्या प्रमाणे, जो माणूस बियाणे पेरतो तो देवाच्या गोष्टी इतरानां शिकविणाऱ्याप्रमाणे आहे.
\v 15 काही लोक असे हे वाटेवर पडलेल्या बियासारखे आहेत. जेव्हा ते देवाचा संदेश ऐकतात, तेव्हा सैतान एकाच वेळी येतो आणि त्यांनी जे ऐकले ते त्यांनी विसरून जाण्यास भाग पाडतो.
\s5
\p
\v 16 काही लोक हे खडकाळ जमिनीवर माती खोल नसल्यासारखे आहेत. जेव्हा ते देवाचा संदेश ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने स्वीकारतात.
\v 17 परंतु, संदेश मनात न रुजल्या कारणाने ते केवळ थोड्या काळासाठीच विश्वास ठेवतात. ते खोल मुळ नसलेल्या रोपटाप्रमाणे आहे. जेव्हा इतर लोक त्यांना वाईट रीतीने वागणूक देतात किंवा देवाच्या संदेशावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना दुःख सहन करावे लागते, जे लोक दुःख सहन करतात ते देवाच्या संदेशावर विश्वास ठेवण्याचे लवकरच थांबवतात.
\s5
\p
\v 18 काही लोक हे काटेरी झुडपाच्या मातीत मुळ असल्यासारखे आहेत. ते लोक देवाचे वचन ऐकतात.
\v 19 त्यांना श्रीमंत व्हावे असे वाटते, आणि त्यांना पुष्कळ गोष्टी कमवण्याची इच्छा आहे. परिणाम असा होतो की ते देवाचा संदेश विसरतात आणि ते देवाने जे करण्यासाठी ठरवले ते करत नाहीत.
\v 20 परंतु काही लोक चांगल्या मातीप्रमाणे आहेत. ते देवाचा संदेश ऐकतात आणि तो स्विकरतात आणि त्यावर विश्वास ठेवतात, देवाने सांगितल्याप्रमाणे ते त्या गोष्टी करतात. ते चांगल्या रोपासारखे आहेत ते तीस, साठ, किंवा शंभरपट धान्याचे उत्पादन देतात.”
\s दिवा व बी यांचे दाखले
\s5
\p
\v 21 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली: “लोक तेलाचा दिवा लावून आणि घरात आणून नक्कीच त्याच्यावर काहीतरी झाकत नाही. त्या ऐवजी, तो दिवठणीवर ठेवतात जेणेकरून प्रकाश चमकत राहील.
\v 22 त्याचप्रमाणे, लपूनछपून घडलेल्या गोष्टी एके दिवशी सर्वांना माहिती होतील, आणि लपूनछपून घडलेल्या गोष्टी एके दिवशी सर्वजणांना प्रकाशात दिसतील.
\v 23 जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर तुम्ही आताच जे ऐकले आहे त्याविषयी काळजीपूर्वक विचार करावा.”
\s5
\p
\v 24 मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही माझ्याकडून ऐकले त्याविषयी काळजीपूर्वक विचार करावा, कारण मी जे काही बोललो ते तुम्हाला समजण्यासाठी देव सहाय्य करेल, तो तुम्हाला त्याहून अधिक समजून सांगेल.
\v 25 मी जे काही सांगतो ते विचारपूर्वक समजून घेतात, देव त्यांना अधिक समजण्यास सक्षम करेल. परंतु मी सांगतो त्यावर ते काळजीपूर्वक विचार करत नाही, तर जे त्यांना माहित आहे ते सुध्दा विसरून जातील.”
\s5
\p
\v 26 येशू पुढे म्हणाला, “जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून दाखवायला सुरूवात करील, ते जमिनीवर बी पसरवणाऱ्या माणसाप्रमाणे आहे.
\v 27 त्यानंतर तो दर रात्री झोपतो आणि दररोज ऊठल्यावर बीयाबद्दल काळजी करत नाही. त्या काळात बियाणे कसे अंकुरले आणि कशा पद्धतीने वाढले ते त्यांला समजले नाही.
\v 28 जमिन स्वतः पीक उत्पादन करते. प्रथम देठ दिसेल. मग कणीस येईल. मग कणसातले संपूर्ण दाणे दिसू लागतील.
\v 29 धान्य पिकल्यानंतर लगेचच, तो लोकांना कापणी करण्यासाठी पाठवेल कारण पीक कापण्याची वेळ आलेली आहे.”
\s5
\p
\v 30 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून दाखवेल, ते कसे असेल? हे वर्णन करण्यासाठी मी कोणत्या बोधकथेचा वापर करू शकतो?
\v 31 ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जेव्हा मोहरीच्या दाण्यांला आपण लावतो तेव्हा काय होते ते तुम्हाला माहित आहे. जरी मोहरीचे बी हे सर्व बियात लहान असले, तरी ते मोठे रोप बनतात.
\v 32 त्यांना लावल्या नंतर, ते वाढतात आणि बागेतील इतर झाडांपेक्षा मोठे होतात. त्यांनी मोठ्या फांद्यांना बाहेर टाकले जेणेकरून पक्ष्यांना त्यांच्या सावलीत घरटी बांधता येतील.
\s5
\p
\v 33 येशूने लोकांना देवाच्या संदेशाविषयी अनेक बोधकथा सांगितल्या. जर ते काही समजण्यास सक्षम असतील, तर तो त्यांना अधिक सांगत राहिला.
\v 34 तो त्याच्यासोबत बोलत असता त्याने नेहमीच बोधकथेचा वापर केला. परंतु तो आपल्या शिष्यांसह एकटा असतांना त्यांना सर्व बोधकथांचे स्पष्टीकरण दिले.
\s येशू वादळ शांत करतो
\s5
\p
\v 35 त्याच दिवशी, सूर्य मावळत असतांना, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “चला आपण समुद्राला ओलांडून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ या.”
\v 36 येशू नावेत तयार होता, मग त्यांनी लोक समुदायाला सोडले आणि समुद्रातून रवानगी केली. इतर लोक देखील त्यांच्याबरोबर दुसऱ्या नावेतून गेले.
\v 37 जोरदार वादळ आले आणि लाटा नावेत येऊ लागल्या! लवकरच त्या नावेत पाणी भरले होते!
\s5
\p
\v 38 येशू नावेच्या मागच्या भागात होता. तो आपले डोके उशीवर ठेऊन झोपला होते. म्हणून त्यांनी त्याला ऊठविले, ते त्याला म्हणाले, “गुरूजी! आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?”
\v 39 येशू ऊठला आणि वाऱ्याला दटावले. मग तो समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा!” मग वारा वाहण्याचा थांबला आणि समुद्रावर मोठी शांतता पसरली.
\s5
\p
\v 40 तेव्हा तो शिष्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? अजून तुम्हाला विश्वास नाही का?”
\v 41 ते घाबरले होते. ते एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील त्याच्या आज्ञा पाळतात!”
\s5
\c 5
\s गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो
\p
\v 1 येशू आणि त्याचे शिष्य गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहचले. गरसे नावाचे लोक ज्या ठिकाणी स्थायिक झाले त्या स्थानाजवळ ते उतरले.
\v 2 जेव्हा येशू तारवातून बाहेर गेला, एक मनुष्य कबरस्थानातील कबरेतून निघून आला. तो मनुष्य दृष्ट आत्म्याच्या नियंत्रणात होता.
\s5
\p
\v 3 तो मनुष्य कबरेतून बाहेर आला कारण तो तेथे राहत होता. लोक त्याला ओळखत आणि कधीकधी त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. ते त्याला थांबवू शकले नाही. अगदी साखळदंड बांधूनही नाही.
\v 4 जेव्हा पण ते साखळदंड आणि बंधने वापरत, तेव्हा तो मनुष्य त्यांना अलगत तोडत असे. तो खुप शक्तीशाली होता की कोणीही त्याच्यावर ताबा ठेऊ शकत नव्हता.
\s5
\p
\v 5 दिवस आणि रात्र तो मनुष्य कबरस्थानात आपला वेळ घालवत असे. तो मोठ्याने ओरडत आणि तीक्ष्ण दगडाने स्वतःला जखमी करत असे.
\v 6 येशूला त्याने काही अतंरावरून नावेतून उतरतांना पाहिले, तो त्याच्याकडे धावत आला आणि त्याने गुडघे टेकले. .
\s5
\p
\v 7-8 येशू दुष्ट आत्म्याला म्हणत होता, “अरे दुष्ट आत्म्या, या मनुष्यातून निघ!” पण राक्षसाने लगेच त्याला सोडले नाही. तो मोठ्याने ओरडला, “येशू, मला माहीत आहे की तू देवाचा पुत्र आहेस, त्यामुळे आपल्यात काहीही समान नाही. मला एकटे सोड! देवाच्या नावाने मी तुला विनंती करतो. मला त्रास देऊ नको!”
\s5
\p
\v 9 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” त्याने येशूला उत्तर दिले, “माझे नाव सैन्य आहे कारण या मनुष्यामध्ये पुष्कळ दुष्ट आत्म्ये आहोत.”
\v 10 मग दुष्ट आत्म्याने येशूला कळकळीने विनंती केली की त्याने त्यांना त्या प्रदेशातून बाहेर काढू नये.
\s5
\p
\v 11 त्याच वेळेस, डुकरांचा एक मोठा कळप डोंगराच्या कडेला चरत होता.
\v 12 मग दुष्ट आत्म्याने येशूला विनंती केली, “आम्हांला त्या डुकरांत शिरण्यासाठी परवानगी दे म्हणजे आम्ही त्यात शिरू!
\v 13 येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. मग दुष्ट आत्म्याने त्या मनुष्याला सोडले आणि डुकरांत शिरले. कळपात, सुमारे ते दोन हजाराची गणती होती, त्यांनी कड्यावरून खाली सरोवरातील पाण्यात उडी मारली व गुदमरून मरून गेले.
\s5
\p
\v 14 डुकरांना राखीत ते लोक धावत गेले आणि नगरात आणि शेतमळ्यांत जे घडले त्याचा अहवाल सांगितला. पुष्कळ लोक जे घडले ते बघण्यासाठी गेले.
\v 15 येशू ज्या ठिकाणी होता तेथे ते आले. मग पूर्वी दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात असलेल्या मनुष्याला त्यांनी पाहीले. तो तेथे कपडे घालून आणि मानसिकरित्या शांत बसलेला होता. ह्या सर्व गोष्टी पाहुण ते भयभीत झाले.
\s5
\p
\v 16 ज्या लोकांनी घटना पाहिली त्यांनी दुष्ट आत्म्याच्या पूर्वी नियंत्रणात असलेल्या माणसाचे वर्णन केले आहे. त्यांनी डुकरांचे काय झाले हे ही वर्णन करून सांगितले.
\v 17 मग लोकांनी येशूला प्रदेश सोडून जाण्याची विनंती केली.
\s5
\p
\v 18 येशू नावेत बसून जाण्यासाठी निघाला, पूर्वी दुष्ट आत्म्याच्या नियंत्रणात असलेला मनुष्य येशूला विनंती करू लागला, “मला आपणाबरोबर येऊ द्या!”
\v 19 पण येशूने त्याला येऊ दिले नाही. त्याऐवजी, तो त्याला म्हणाला, “घरी जा आणि तुझ्या परिवाराला देवाने तुझासाठी जे केले ते सांग, आणि देव तुझाशी किती दयाळू होता ते ही सांग.”
\v 20 तो मनुष्य त्या जिल्हातल्या दहा शहरातून फिरला. येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते त्याने ते लोकांना सांगितले. सर्व लोकांनी तो काय बोलतो ते ऐकले त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले होते.
\s याईराची कन्या
\s5
\p
\v 21 येशू आणि त्याचे शिष्य नावेने गालील समुद्राजवळ पूर्वी होते तेथे गेले. जेव्हा ते सोर येथे पोहोंचले, तेव्हा मोठा लोकसमुदाय येशूभोवती गोळा झाला.
\v 22 यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी, ज्याचे नाव याईर होते, तो तेथे आला. जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो येशूच्या पायाजवळ पालथा पडला.
\v 23 मग तो येशूला कळकळीने विनंती करून म्हणाला, “माझी मुलगी खुप आजारी आहे आणि मरणा जवळ आहे! कृपया माझ्या घरी या आणि तीच्यावर हात ठेवा. तिला बरे करा आणि जगण्यास साहाय्य करा!”
\v 24 म्हणून येशू व त्याचे शिष्य त्याच्याबरोबर गेले. मोठा लोकसमुदायही त्याच्या मागे गेला आणि पुष्कळ लोक लोटत-लोटत येशूच्या जवळ गेले.
\s येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो
\s5
\p
\v 25 गर्दीमधे कोणी एक स्त्री होती तिला रक्तस्त्राव होता. बारा वर्षांपासून दररोज तिला रक्तस्राव होत होता.
\v 26 वैद्य तिच्यावर उपचार करतांना बऱ्याच वर्षांपर्यंत तिला त्रास सहन करावा लागला होता. वैद्यांना पैसे देण्यासाठी स्वतःचे सर्व पैसे खर्च केले आणि त्यांनी तिच्यावर उपचार करूनही बरे होण्याऐवजी तिचा त्रास वाढला.
\v 27 जेव्हा तिने ऐकले की येशूने लोकांना बरे केले, तेव्हा तो जेथे होता तेथे ती आली आणि येशूच्या जवळ गर्दीमध्ये ती आली.
\s5
\p
\v 28 ती विचार करत होती, “जर मी त्याला स्पर्श केला किंवा त्याच्या कपड्यांना शिवले, तर मी बरी होईन.” म्हणून तिने येशूच्या कपड्याला शिवले.
\v 29 त्याचवेळेस, तिचा रक्तस्त्राव थांबला. तिला स्वतःच्या शरीरात जाणवले की आपल्या आजारातून ती बरी झाली आहे.
\s5
\p
\v 30 लागलेच येशूला स्वतः जाणवले की त्याच्या सामर्थ्याने कोणी तरी बरे झालेले आहे. मग त्याने जमावाभोवती वळून पाहीले आणि मग म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
\v 31 शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “पुष्काळ लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता ना! कदाचित पुष्कळ लोकांनी तुम्हाला स्पर्श केला असेल! मग तुम्ही का विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’”
\v 32 परंतु येशू, जीने त्याला स्पर्श केले तीला तो आवतीभोवती शोधत होता.
\s5
\p
\v 33 ती स्त्री खुप घाबरली आणि थरथरत होती. ती त्याच्यासमोर गुडघे टेकून बसली आणि तिने जे काही केले ते त्याला सांगितले.
\v 34 तो तिला म्हणाला, “मुली, तू माझावर विश्वास ठेवला की मी तुला बरे करू शकतो त्या कारणाने, मी तुला आता बरे करत आहे. मनात शांती ठेऊन घरी जा, कारण मी तुला वचन देतो यापुढे तू ह्या आजाराने आजारी पडणार नाहीस.”
\s येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो
\s5
\p
\v 35 येशू त्या स्त्रीशी बोलत असता याईराच्या घरून काही लोक पोहोंचले. ते याईराला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. म्हणून गुरूजीला तुझ्या घरी आणण्याची गरज नाही‍!”
\s5
\p
\v 36 येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो याईराला म्हणाला, “परिस्थिती निराशाजनक आहे असे समजू नको! फक्त ती जगेल असा विश्वास ठेव!”
\v 37-38 नंतर त्याने पेत्र, याकोब आणि योहान फक्त आपल्याजवळच्या तीन शिष्यांना आपल्याबरोबर याईराच्या घरी जाण्यासाठी सोबत घेतले. त्याने इतर कोणासही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. नंतर ते घराजवळ पोहंचल्यावर, येशूने पाहिले लोक दु:खी झाले होते. काही जण रडत होते आणि इतरजण विलाप करत होते.
\s5
\p
\v 39 तो घरात गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही दुःखी का आहात आणि का रडता? हे लेकरु मेलेले नाही, फक्त झोपलेली आहे.”
\v 40 लोक त्यावर हसु लागले, कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. त्याने इतर सर्व लोकांना घराच्या बाहेर पाठवले. मग त्याने तिच्या आईला आणि वडिलांना व तीन शिष्य सोबत घेतले. जेथे मुल झोपलेले होते तो त्या खोलीत गेला.
\s5
\p
\v 41 त्याने मुलीचा हात धरला आणि तो तिला तिच्या भाषेत म्हणाला, “तलीथा कुम!” याचा अर्थ, “लहान मुली, ऊठ!”
\v 42 त्याच वेळेस मुलगी ऊठली आणि सभोवती चालत गेली. (ती बोलत होती हे आश्चर्यकारक नव्हते, कारण ती बारा वर्षांची होती. ) ज्यावेळी हे घडले, तेव्हा ते सर्व तेथे होते ते अद्भूतरीत्या आश्चर्यचकीत झाले.
\v 43 येशूने त्यांना विशेष रीत्या बजावून सांगितले, “मी जे काही केले ते कोणालाही सांगू नका!” मग त्याने त्यांना सांगितले की मुलीला काही तरी खायला द्या.
\s5
\c 6
\s येशूचा नासरेथात अव्हेर
\p
\v 1 येशूने कफर्णहूम सोडले आणि आपल्या नासरेथ गावात गेला. त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले.
\v 2 शब्बाथ दिवशी, तो सभास्थानांमध्ये गेला आणि लोकांना शिकवू लागला. जे लोक त्याचे ऐकत होते त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना आश्चर्य वाटले की त्याला ही सर्व बुद्धी कुठे मिळाली आणि चमत्कार करण्यासाठी शक्ती कुठून आली.
\v 3 ते म्हणाले, “तो तर फक्त एक सामान्य सुतार आहे! आम्ही त्याला आणि त्याच्या कुटूंबाला ओळखतो! त्याची आई मरीया हिला आम्ही ओळखतो! आम्ही त्याच्या लहान भाऊ याकोब, योसे, यहूदा आणि शिमोन यांना ओळखतो! आणि त्याच्या लहान बहिणी देखील आमच्या बरोबर येथेच राहतात!” म्हणून त्यांनी त्याला विरोध केला.
\s5
\p
\v 4 येशू त्यांना म्हणाला, “हे नक्कीच खरे आहे की लोक माझा आदर सन्मान करतील आणि इतर ठिकाणी दुसऱ्या संदेष्टांचाही गौरव करतील, परंतु मूळ गावात हे होणार नाही! आपले नातेवाईक आणि आपल्या स्वतःच्या घरांमध्ये राहणारे लोक देखील आपला आदर करणार नाहीत!”
\p
\v 5 म्हणून, जरी त्याने तेथे काही आजारी लोकांना बरे केले, तरीही तो दुसरे काही चमत्कार करू शकला नाही.
\v 6 तो त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्यचकित झाला. पण तो त्यांच्या गावातून गेला आणि त्यांना शिकविले.
\s बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठविणें
\s5
\p
\v 7 एके दिवशी त्याने बारा शिष्यांना एकत्र बोलावले, आणि मग त्याने त्यांना सांगितले की, तो त्यांना दोन-दोन करून वेगवेगळ्या शहरातील लोकांना शिकविण्यासाठी पाठवणार आहे. त्याने त्यांना लोकांतून दुष्ट आत्मे बाहेर काढण्याचे सामर्थ्य दिले.
\v 8-9 त्यांने त्यांना चपला घालण्यास आणि प्रवासात सोबत चालण्यासाठी काठी घेण्याची सुचना दिली. त्याने त्यांना अन्न घेऊ नये, किंवा काही साठवण्यासाठी पिशवी, किंवा त्यांच्या प्रवासासाठी पैसेही घ्यायला सांगितले नाही. त्याने त्यांना अतिरिक्त अंगरखा देखील घेण्याची परवानगी दिली नाही.
\s5
\p
\v 10 त्याने त्यांना ह्याही सुचना दिल्या. “शहरात गेल्या नंतर, जर एखाद्याने तुम्हाला त्याच्या घरात राहण्याचे आमंत्रण दिले, तर त्याच्या घरी जा. मग त्या शहरातून निघून जाईपर्यंत त्याच घरात खा आणि झोपा.
\v 11 जेथे कुठे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत आणि जेथे कुठे लोक तुमचे ऐकणार नाहीत, ते ठिकाण सोडतांना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. असे केल्याने, तुम्ही त्यांना साक्षी व्हाल की त्यांनी तुमचे स्वागतच केले नाही.”
\s5
\p
\v 12 मग त्या नंतर शिष्य बाहेर वेग-वेगळ्या शहरात गेले, त्यांनी उपदेश केला लोकांनी पाप केले आहे त्याबद्दल पश्चात्ताप करणे, आणि ते थांबवीण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून देव त्यांना क्षमा करेल.
\v 13 ते लोकांमधून पुष्कळ दुष्ट आत्मे जबरदस्तीने काढत, आणि ते पुष्कळ आजाऱ्यांना जैतूंनाच्या तेलाने अभिषेक करत आणि त्यांना बरे करत.
\s बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध
\s5
\p
\v 14 राजा हेरोद अंतिपास ह्याने येशू काय करतो त्याविषयी ऐकले. कारण अनेक लोक त्याच्याविषयी बोलत होते. काही लोक येशूविषयी असे म्हणत, “तो बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! तो मेलेल्यांतून ऊठला आहे! म्हणून त्याच्याकडे चमत्कार करण्यासाठी देवाचे सामर्थ्य आहे!”
\v 15 इतर काही जण येशूविषयी म्हणाले, “तो प्राचीन संदेष्टा एलीया आहे ज्याला देवाने परत पाठविण्याचे अभिवचन दिले होते.” इतर काही जण येशूविषयी म्हणाले, “नाही, तो वेगळा संदेष्टा आहे, फार पूर्वी होऊन गेलेल्या इतर संदेष्ट्यांसारखा तोही एक आहे.”
\s5
\p
\v 16 राजा हेरोद अंतिपाने लोक जे बोलत आहेत ते ऐकले व स्वतःस म्हणाला, चमत्कार करत असलेला मनुष्य नक्कीच योहान आहे! मी माझ्या सैनिकांना त्यांचा शिरच्छेद करण्यास सांगितला, परंतु तो पुन्हा जिवंत झाला आहे!”
\v 17 काही काळापूर्वी, हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्या सोबत विवाह केला.
\s5
\p
\v 18 योहान हेरोदाला नेहमी सांगत असे, “तुझा भाऊ जिवंत असता तू आपल्या भावाची बायकोसोबत लग्न करण्याची परवानगी देवाचे शास्त्र देत नाही.” मग, हेरोदियाने विनंती केल्यामुळे योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. हेरोदने स्वतः सैनिकांना योहानाकडे पाठवले. त्यांनी योहानाला अटक केली व तुरुंगात टाकले.
\v 19 परंतु हेरोदियाला योहानावर आणखी सूड घ्यायचा होता म्हणून, तिला त्याला मारण्याची इच्छा होती. परंतु ती हे करू शकत नव्हती कारण योहान तुरुंगात होता, हेरोदाने त्याला तिच्यापासून दूर ठेवले.
\v 20 हेरोदाने हे केले कारण योहानाला तो भीत होता. कारण त्याला माहीत होते की, योहान हा नितिमान असून त्याने स्वतःला देवासाठी समर्पित केले आहे. राजा त्याच्यामुळे फार अस्वस्थ झाला आणि त्याच्यासोबत काय करावे हे त्याला कळत नव्हते, परंतु त्याला त्याचे म्हणणे ऐकणे आवडत असे.
\s5
\p
\v 21 परंतु हेरोदियाला अखेरीस कोणीतरी योहानाला शिक्षा देण्यासाठी भेटले. एके दिवशी त्यांनी हेरोदाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला सन्मानित केले, त्यांनी सर्वात महत्वाचे सरकारी अधिकारी, सर्वात महत्वाचे सैन्यातील नेत्यांना, आणि गालील जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या लोकांना त्याच्याबरोबर खाण्यासाठी व त्याच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्यास आमंत्रित केले.
\v 22 जेव्हा ते भोजन करत असता हेरोदीयीच्या मुलीने खोलीत जाऊन राजा आणि त्याच्या पाहुण्यांसाठी नाच केला. तिने राजा हेरोद आणि त्याच्या पाहुण्यांला संतुष्ट केले त्यामुळे राजा तिला म्हणाला, “तुझी जी इच्छा आहे ती मला माग आणि मी ते तुला देईन.”
\s5
\p
\v 23 तो तिला आणखी म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग, मी ते तुला देईन! मी तुला जे माझ्या स्वतःचे आहे आणि राज्याचा अर्धा भाग देईन, जर तू मागितले तर.”
\v 24 त्या मुलीने लगलेच खोली सोडली आणि तिच्या आईकडे गेली. राजाने काय सांगितले हे तिने तिला सांगितले आणि तिला विचारले, “मी काय मागू?” तिच्या आईने उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर माग!”
\v 25 ती मुलगी लवकरच खोलीत पुन्हा आली. ती राजाकडे गेली आणि म्हणाली, “माझी इच्छा आहे तुम्ही कोणाला तरी आज्ञा करावी की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर थाळीत ठेवून मला द्यावे!”
\s5
\p
\v 26 तिची ही मागणी ऐकूण राजाला फारच त्रास झाला कारण त्याला माहीत होते योहान हा अतिशय धार्मिक मणुष्य आहे. परंतु तिने जे काही मागितले त्याबद्दल तो तिला नकार देऊ शकत नव्हता कारण त्याने ती जे काही मागितले असेल ते देण्याचे तिला आश्वासन दिले होते, आणि त्याच्या पाहुण्यांनी त्याला वचन देतांना ऐकले.
\v 27 मग राजाने कोणाला तरी आज्ञा करून सांगितले, जा आणि योहानाचे शीर कापून आणून त्या मुलीच्या हवाली करा. त्या मनुष्याने तुरुंगात जाऊन योहानाचे शीर कापले.
\v 28 त्याने ते उचलून ताटात ठेवले, परत दरबारात आणले, आणि त्या मुलीला दिले. त्या मुलीने ते आपल्या आईसाठी घेऊन गेली.
\v 29 योहानाच्या शिष्यांनी काय घडले ते ऐकल्यावर ते तुरुंगात गेले आणि त्यांनी तेथून योहानाचे शरीर घेतले; मग त्यांनी त्याला पुरले.
\s बारा प्रेषितांचे परत येणे
\s5
\p
\v 30 बारा प्रेषित ज्या ठिकाणी गेले होते तेथून ते परत येशूकडे आले. त्यांनी जे केले होते आणि त्यांनी लोकांना जे काही शिकवले होते त्याचा अहवाल त्यांनी सांगितला.
\v 31 तो त्यांना म्हणाला, “ज्या ठिकाणी कोणी लोक राहत नाही तेथे माझ्याबरोबर या, ह्यासाठी की आपण एकटे असू आणि थोडा वेळ आराम करू!” त्याने हे यासाठी म्हटले कारण पुष्कळ लोक त्याच्याकडे येत आणि परत जात, त्याचा परिणाम येशू आणि त्याच्या शिष्यांना जेवण करण्यास किंवा दुसरे काही करण्यासाठी वेळ भेटत नसे.
\v 32 ते सर्व जण स्वतः नावेत बसून लोक राहत नाहीत अशा ठिकाणी निघून गेले.
\s5
\p
\v 33 परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जातांना पाहिले. त्यांना हे देखील समजले की ते येशू आणि त्याचे शिष्य आहेत, आणि ते कोठे जात आहेत हे त्यांनी पाहिले. म्हणून ते शेजारच्या गावातून येशू आणि त्याच्या शिष्यांच्या पुढे ते जेथे जात होते तिथे पळत गेले. ते प्रत्यक्षात येशू आणि शिष्यांच्या पुढे जाऊन पोहचले.
\v 34 जसे येशू आणि त्याचे शिष्य नावेतून उतरल्यावर, येशूने मोठा लोक समुदाय पाहिला. त्याला त्यांचा कळवळा आला कारण ते गोंधळलेले होते, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते होते. म्हणून त्याने त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवल्या.
\s5
\p
\v 35 दुपारी उशिरा नंतर शिष्य त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “या ठिकाणी कोणीही राहत नाही, आणि आता खुप उशीर झाला आहे.
\s पाच हजारांना भोजन
\p
\v 36 तर लोकांना जवळच्या ठिकाणी आणि गावामध्ये पाठून द्या, त्यांनी स्वतःसाठी काहीतरी विकत घेऊन खावे!”
\s5
\p
\v 37 परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “नाही, तुम्हीच त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही या लोक समुदायाला पुरेल ऐवढ्या भाकरी विकत घेतल्या तरी पुरणार नाहीत. एखादा मणुष्य अगदी दोनशे दिवसाच्या कामाने मिळवीलेल्या पैश्या ऐवढे आपल्याकडे असले तरी!
\v 38 परंतु तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरीचे तुकडे आहेत? जा आणि शोधून काढा!” ते गेले आणि त्यांना सापडले आणि मग ते त्याला म्हणाले, “आमच्याकडे फक्त पाच भाकरी आणि दोन शिजलेले मासे आहेत!”
\s5
\p
\v 39 त्याने शिष्यांना सुचना देवून सर्व लोकांना हिरव्यागार गवतावर बसण्यास सांगितले.
\v 40 त्यामुळे लोक समुहामध्ये बसले. काही समुहामध्ये पन्नास लोक होते आणि इतर गटांमध्ये शंभर लोकांचा समावेश होता.
\v 41 येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने स्वर्गाकडे पाहिले आणि त्यांच्यासाठी देवाचे आभार मानले. मग त्याने भाकरी मोडल्या आणि माशांचे तुकडे केले आणि शिष्यांना दिले ह्यासाठी की शिष्यांनी त्या लोकांना वाटावे.
\s5
\p
\v 42 खाण्यासाठी पुरेसे होईपर्यंत सगळ्यांनी ते खाल्ले!
\v 43 तेव्हा शिष्यांनी भाकरीच्या उरलेल्या तुकड्यांच्या आणि माश्यांच्या उरलेल्या बारा टोपल्या भरुन घेतल्या.
\v 44 तेथे जवळपास पाच हजार माणसांनी भाकरी व मासे खाल्ले. तरी त्यांनी स्त्रिया व मुलांची मोजणी केली नाही.
\s येशू पाण्यावरून चालतो
\s5
\p
\v 45 लागलेच येशूने आपल्या शिष्यांना नावेत बसायला सांगितले आणि मग ते बेथसैदा येथे गेले, जे गालील समुद्राच्या पुढील भागात होते. तो तेथे राहिला आणि तेथे असणाऱ्या बऱ्याच लोकांचा त्याग केला.
\v 46 नंतर त्याने लोक समुदायाला निरोप दिला, तो प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला.
\v 47 संध्याकाळ झाली, त्याचे शिष्य नावेमध्ये सरोवराच्या मध्यभागी होते, आणि येशू स्वतः जमिनीवर होता.
\s5
\p
\v 48 ते प्रवास करत असता वारा त्याच्या विरुध्द असल्याचे त्याने पाहिले. परिणामी, त्यांना मोठी अडचण होत होती. भल्या पहाटे अंधार असतांना तो पाण्यावरून चालून शिष्यांकडे गेला. त्यांच्या सोबत जाण्याचा त्याचा हेतू होता.
\v 49 त्यांनी त्याला पाण्यावरून चालतांना पाहिले, पण त्यांना तो भूत आहे असे वाटले. ते ओरडले;
\v 50 कारण त्याला पाहून ते सर्व फार घाबरले. परंतु तो त्यांच्याबरोबर बोलला. तो त्यांना म्हणाला, “शांत व्हा! घाबरू नका कारण तो मी आहे!”
\s5
\p
\v 51 तो नावेत त्यांच्यासोबत खाली बसला आणि वारा वाहण्याचा थांबला. त्यांने जे केले ते पाहून ते पुर्णपणे आश्चर्यचकित झाले.
\v 52 त्यांनी येशूला भाकरी व मासे वाढवतांना पाहीले, तरी तो किती सामर्थ्यशाली आहे हे त्यांना समजले नाही, त्यांना हे समजायला हवे होते.
\s येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो
\s5
\p
\v 53 नंतर ते नावेत बसून गालील सरोवराच्या जवळून पुढे गेले, व ते गनेसरेत येथे पोहोंचले. मग त्यांनी तेथे नाव बांधली.
\v 54 जसे ते नावेच्या खाली उतरले लागलेच लोकांनी येशूला ओळखले.
\v 55 येशू येथे आला आहे हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी ते संपूर्ण शहरात धावत गेले. मग त्यांनी जे आजारी होते त्यांना खाटेवर ठेवले आणि येशू जेथे आहे असे लोक सांगत तेथे आजाऱ्यांना घेऊन गेले.
\s5
\p
\v 56 तो कुठल्याही गावात, शहरात किंवा शेताच्या जागी जात, जे आजारी आहेत ते त्यांना त्या बाजारपेठेत आणत. मग आजारी लोक येशूला स्पर्श करू द्यावा किंवा त्याच्या अंगरख्याच्या काठाला स्पर्श करू द्यावा अशी त्याला विनंती करीत ह्यासाठी की येशू कदाचित त्यांना बरे करेल. ज्या कोणी त्याला किंवा त्याच्या झग्याला स्पर्श केला ते आरोग्य पावले.
\s5
\c 7
\s परूश्यांचा वरपांगी सोवळेपणा
\p
\v 1 एके दिवशी यरुशलेमेहून आलेले काही परुशी आणि काही यहूदी नियम शिकवणारे लोक येशूभोवती जमले.
\s5
\p
\v 2 शिष्यांनी आपले हात न धुताच अन्न खाल्ले असे परुश्यांनी पाहिले.
\v 3-4 ते आणि इतर सर्व यहूदी त्यांच्या पूर्वजांनी शिकवलेली परंपरा कडकपणे पाळत. विशेषतः; ते त्यांचे प्याले, घागरी, भांडी आणि बिछाना अशा गोष्टी ते धूत असत असे केल्याने देव त्यांचा त्याग करणार नाही. उदाहरणार्थ, एका विशिष्ट विधीप्रमाणे आपले हात धुतल्या शिवाय ते अन्न खात नसत, विशेषतः बाजारपेठेतून वस्तू खरेदी करून परतल्यानंतर. अशा इतर अनेक परंपरा आहेत ज्या त्यांनी स्विकारल्या व पालन करण्याचा प्रयत्न करतात.
\s5
\p
\v 5 त्या दिवशी, परुशी आणि यहूदी नियम शिकवणाऱ्या काही लोकांनी पाहिले की त्याच्या शिष्यांपैकी काही जण आपल्या हाताने अन्न खात होते परंतु त्यांनी विशेष विधीने हात धुतले नाही. म्हणून त्यांनी येशूला प्रश्न केला आणि म्हणाले, “तुझे शिष्य हे पूर्वांजांनी शिकवलेली परंपरा पाळत नाहीत! आपल्या विधीप्रमाणे हात न धुता ते कसे काय अन्न खाऊ शकतात!”
\s5
\v 6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने तुमच्या पूर्वजांना दटावले, आणि केवळ चांगले असल्याचे ढोंग करणाऱ्या लोकांना त्याच्या शब्दाने चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे! देवाने जे सांगितले ते त्यांने हे लिहिले:
\q ‘हे लोक असे बोलतात जसे ते खरोखरच मला सन्मान देणार,
\q पण ते खरोखरच मला आदर देण्याबद्दल विचार करत नाहीत.
\q
\v 7 माझ्यासाठी त्यांनी आराधना करणे व्यर्थ आहे,
\q कारण जे लोक सांगतात फक्त तेच ते शिकवतात
\q जसे काय मी स्वतः त्यांना आज्ञा केली आहे.
\s5
\p
\v 8 तुम्ही, तुमच्या पूर्वजांप्रमाणेच, देवाने आज्ञा केलेल्या गोष्टी करण्यास नकार देता. त्याऐवजी, दुसऱ्यांनी शिकवलेल्या परंपरांचे पालन मात्र तुम्ही करता.”
\v 9 येशू त्यांना हे देखील म्हणाला, “देवाने दिलेल्या आज्ञांचे पालन न करता तुम्ही असे समजता की तुम्ही हुशार आहात ह्यासाठी तुम्ही आपल्या स्वतःच्या परपरांचे पालन करता!
\v 10 उदाहरणार्थी, आपला पूर्वज मोशे यांनी देवाच्या आज्ञा लिहिल्या, ‘आपल्या वडिलाचा आणि आपल्या आईचा मान राख. त्याने असेही लिहिले, ‘आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल जो वाईट बोलतो त्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी शिक्षा करावी.
\s5
\p
\v 11-12 परंतु तुम्ही लोकांना असे सांगता की आईवडिलांना मदत नाही केली तरी बरोबर आहे. पालकांच्या ऐवजी देवाला दिले तर तुम्ही बरोबर करता असे तुम्ही लोकांना शिकवतात. त्यांना आपल्या पालकांना सांगू देता, ‘जे मी तुमच्यासाठी पुरवठा म्हणून देणार होतो, ते मी आता देवाला देण्याचे वचन दिले आहे. म्हणून मी आता तुमची मदत करू शकत नाही! परिणामी, तुम्ही लोकांना खरोखर असे सांगत आहात आपल्या पालकांना मदत करायची गरज नाही!
\v 13 अशा प्रकारे तुम्ही देवाने दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करत आहात! तुम्ही स्वत: आपले शिक्षण इतरांना शिकवता आणि त्यांना पाळण्यास सांगता! आणि अजून तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता.”
\s अंतर्यामीची भ्रष्टता
\s5
\p
\v 14 येशूने पुन्हा लोक समुदायाला जवळ बोलावले. मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझे ऐका! आणि मी जे सांगतो ते समजण्याचा प्रयत्न करा.
\v 15 लोक जे खातात त्यामुळे देव त्यांना अशुद्ध ठरवत नाही. त्याउलट, लोकांच्या अंतःकरणातून जे बाहेर येते त्यामुळे देव तुम्हाला अशुद्ध ठरवील.”
\p
\v 16-17 नंतर येशू लोक समुदाय सोडून गेला, त्यांने त्याच्या शिष्यांसह घरात प्रवेश केला. त्यांनी त्याला आताच सांगितलेल्या बोधकथेबद्दल प्रश्न विचारला.
\v 18 त्यांने त्यांना उत्तर दिले, “तुम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही का? तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की बाहेरून आत जाणाऱ्या गोष्टींमुळे देव आपल्याला अशुद्ध मानीत नाही.
\v 19 आमच्या मनात प्रवेश करणे किंवा नाश करण्याऐवजी, त्या आपल्या पोटामध्ये जातात, आणि नंतर कचरा आमच्या शरीरातून निघून जातो.” हे सांगत असतांना, येशू घोषणा करत होता की लोक कोणतेही अन्न खाऊ शकतात देव त्यांना अशुद्ध मानणार नाही.
\p
\v 20 तो आणखी म्हणाला, “जे विचार आणि कृती लोकांच्या आतून बाहेर येते त्यामुळे देव त्यांना अशुद्ध समजतो.
\v 21 विशेषतः, लोकांच्या आतमधील स्वभावामुळे ते वाईट गोष्टीचा विचार करण्यास भाग पडतात; ते अनैतिकपणे कृत्य करतात, ते गोष्टी चोरतात, ते खून करतात.
\v 22 ते व्यभिचार करतात, ते लोभी, ते द्वेषाने काम करतात, ते लोकांना फसवतात. ते अनुचितपणे वागतात, ते लोकांचा हेवा करतात, ते इतरांविषयी वाईट बोलतात. ते गर्विष्ठ आहेत. आणि ते मूर्खपणे वागले.
\v 23 लोक ज्याविषयी विचार करतात आणि नंतर ते वाईट कृत्य करतात, आणि त्यामुळेच देव त्यांना अशुद्ध ठरवतो.”
\s येशू सुरफुनीकी स्त्रीची मुलगी बरी करतो
\p
\v 24 नंतर येशू आणि त्याचे शिष्य गालील भाग सोडून गेले, ते सोर आणि सीदोनच्या आसपासच्या प्रदेशात गेले. तो एका निश्चित घरात राहत असतांना, त्याची इच्छा होती की कोणालाही त्या विषयी समजू नये. परंतु लोकांना लवकरच समजले की तो तेथे होता.
\v 25 एक विशिष्ट स्त्री, तिच्या मुलीमध्ये अशुद्ध आत्मा होता, तिने येशूविषयी ऐकले. ती त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडली.
\v 26 आता ही स्त्री एक यहूदी नव्हती. तिचे पूर्वज यहूदी नव्हते. ती स्वतः सीरिया जिल्ह्यातील फेनिशियाच्या प्रदेशात जन्मली होती. येशूने आपल्या मुलीतून दुष्ट आत्म्याला बाहेर काढावे अशी तिने त्याला विनंती केली.
\p
\v 27 तो त्या स्त्रीला म्हणाला, “प्रथम मुलांना जे पाहिजे ते सर्व त्यांना खाऊ दे, कारण आई जे मुलांसाठी अन्न तयार करत आहे त्यापैकी कोणीतरी घेऊन ते कुत्र्याला फेकून देणे चांगले नाही.”
\v 28 तिने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, परंतु घरचे कुत्रे, जे मेजाखाली लोळतात, जे मुलांच्या हातून पडते तेच खातात.”
\p
\v 29 येशूने तिला म्हटले, “तू जे बोलली आहेस त्यामुळे, घरी जा. दुष्ट आत्म्याने तुझ्या मुलीला सोडून जावे असे मी केले आहे.”
\v 30 मग ती स्त्री आपल्या घरी परतली आणि दुष्ट आत्मा तिच्या मुलील सोडून गेला असल्याने ती मुलगी अंथरूनावर शांतपणे झोपलेली तिने पाहिले.
\s येशू बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला बरे करतो
\p
\v 31 येशू आणि त्याच्या शिष्यांनी सोर भोवतीचा प्रदेश सोडला आणि सीदोनच्या उत्तर भागात गेले. नंतर पूर्वेला दहा नगराकडे, आणि मग दक्षिणेकडील गालील सरोवराजवळील गावात गेले.
\v 32 तेथे, लोकांनी त्याच्याकडे बोलले नाही. त्यांनी त्याच्याजवळ एका मणुष्याला आणले जो बहिरा आणि मूका होता. त्यांनी येशूला त्याच्यावर हात ठेवण्याची व बरे करण्याची विनंती केली.
\p
\v 33 मग येशू त्याला समुदायापासून वेगळे घेऊन गेला ह्यासाठी की त्या दोघांना एकांत भेटावा. त्याने माणसाच्या दोन्ही कानात आपल्या हाताचे एक एक बोट ठेवले. नंतर तो आपल्या बोटांवर थुंकला, त्याने त्याच्या बोटाने त्याच्या जिभेला स्पर्श केला.
\v 34 नंतर त्याने स्वर्गाकडे पाहिले, त्याने उसासा टाकला आणि तो त्याच्या भाषेत त्या मणुष्याच्या कानात म्हणाला, “इप्फाथा,” ज्याचा अर्थ, “उघडले जा!”
\v 35 एकाच वेळी मनुष्याला स्पष्टपणे ऐकू आले. त्याने स्पष्टपणे बोलण्यास सुरूवात केली आणि ज्यामुळे त्याला बोलता येत नव्हते त्यातून तो बरा झाला.
\p
\v 36 येशूने जे केले होते त्याबद्दल लोकांनी कोणालाही सांगू नये असे सांगितले होते. परंतु त्याने त्यांना व इतरांना बारकाईने याबद्दल कोणालाही सांगू नये असे सांगितले तरी सुद्धा ते याबद्दल आणखी बोलत राहिले.
\v 37 ज्या लोकांनी याबद्दल ऐकले ते पुर्णपणे आश्चर्यचकीत झाले आणि म्हणू लागले, “त्याने जे काही केले ते अद्भूत आहे! त्याच्या व्यतिरिक्त आश्चर्यकारक गोष्टी केल्या, त्याने बहिऱ्या लोकांना ऐकण्यास सक्षम केले! आणि जे बोलू शकत नव्हते अशांना त्याने बोलण्यास सक्षम केले!”
\s5
\c 8
\s चार हजारांना भोजन
\p
\v 1 त्या दिवसांमध्ये, लोकांचा एक मोठा जमाव पुन्हा एकत्र आला. ते तेथे दोन दिवस होते, त्यांच्याकडे खायला काही अन्न नव्हते. त्यामुळे येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावले आणि मग त्यांना तो म्हणाला,
\v 2 “हे लोक माझ्या बरोबर तीन दिवसापासून आहेत, आणि त्यांच्याकडे खायला काहीच शिल्लक उरले नाही. म्हणून आता त्यांच्याविषयी मी फार चिंतित आहे.
\v 3 जर मी त्यांना भूकेले असतांना घरी पाठवले, त्यांच्यापैकी काही जण घरी जातांना कमजोर होतील. त्यांच्यातील काही खुप दुरून आले आहेत.”
\v 4 शिष्यांना समजले की तो लोकांना काही खायला द्या असे म्हणत आहे, त्यामुळे त्यांपैकी एकाने उत्तर दिले, “या लोक समुदायाला समाधानी करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे अन्न शोधू शकत नाही! याठिकाणी कोणी राहत नाही!
\s5
\p
\v 5 येशूने त्यांना विचारले, “तुमच्याकडे किती भाकरीचे तुकडे आहेत?” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.”
\v 6 नंतर येशूने लोक समुदायाला आज्ञा केली, की “जमिनीवर बसा!” नंतर ते खाली बसल्यावर, त्याने सात भाकरी घेतल्या, देवाचे उपकार मानले, त्या मोडल्या, आणि त्याने लोकांना वाटण्यासाठी आपल्या शिष्याकडे दिल्या.
\s5
\p
\v 7 त्यांच्याजवळ काही लहान मासे आहेत असेही आढळले. म्हणून त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊन, तो शिष्यांना म्हणाला, “हे देखील वाटा.” त्यांनी लोक समुदायाला मासे वाटल्यानंतर,
\v 8 लोकांनी ते अन्न खाल्ले, आणि त्यांनी स्वतःला भरपूर आणि संतुष्ट होईपर्यंत खाल्ले. शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे गोळा केले आणि सात मोठ्या टोपल्या भरल्या.
\v 9 शिष्यांनी अंदाज काढला की त्या दिवशी सुमारे चार हजार लोकांनी अन्न खाल्ले. मग येशूने लोक समुदायाला निरोप दिला.
\v 10 यानंतर लगेच, तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला, आणि ते दल्मनुथ जिल्हातल्या गालील सरोवराच्या जवळ गेले.
\s असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध
\s5
\p
\v 11 मग परुशी येशूकडे आले. ते त्याच्यासोबत वादविवाद करू लागले आणि देवाने तुला पाठवले आहे हे दर्शविण्यासाठी चमत्कार कर असा ते आग्रह धरू लागले.
\p
\v 12 येशूने स्वत:शी दिर्घ उसासा टाकला, आणि तो म्हणाला, “तुम्ही मला चमत्कार कर असे का म्हणता? मी तुमच्यासाठी चमत्कार करणार नाही!”
\v 13 मग त्याने त्यांना सोडले. त्याच्या शिष्यांसह, तो पुन्हा नावेमध्ये आला, आणि ते गालीलच्या सरोवराजवळून पुढे गेले.
\s5
\p
\v 14 शिष्य पुरेसे अन्न आणण्यासाठी विसरले होते. विशेषतः नावेत त्याच्याकडे केवळ एकच भाकर होती.
\v 15 ते जात असता, येशूने त्यांना सावधानतेचा इशारा दिला आणि म्हटले, “सावध असा! परुशी व हेरोद यांच्या खमिराविषयी सावध असा!”
\s5
\p
\v 16 शिष्यांचा त्याच्याविषयी गैर-समज झाला. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपल्याजवळ भाकरी नाही म्हणून तो तसे बोलत आहे.”
\v 17 येशूला ते आपसात काय चर्चा करत आहेत हे माहिती होते. म्हणून तो त्यांना म्हणाला, “पुरेशी भाकर नसण्याविषयी का बोलत आहात? आताच मी जे काही म्हटले ते समजून घ्या. तुम्ही विचार का करत नाही!
\s5
\p
\v 18 तुमच्याकडे डोळे आहेत, परंतु तुम्ही काय पाहता ते तुम्हाला समजत नाही! तुमच्याकडे कान आहेत, परंतु मी जे सांगतो ते समजत नाही! मग तो म्हणाला, “तुम्हाला काय घडले ते आठवत नाही?
\v 19 जेव्हा मी फक्त पाच भाकरी मोडल्या आणि पाच हजार लोकांना भोजन दिले सगळ्यांना समाधान वाटले नाही काय? पण तरी तेथे अन्न शिल्लक राहिले! तेथे भाकरीच्या तुकड्यांच्या किती टोपल्या उरल्या?” ते म्हणाले, “आम्ही बारा भरलेल्या टोपल्या गोळा केल्या.”
\s5
\p
\v 20 मग तो म्हणाला, “चार हजार लोकांना खाण्यासाठी मी सात भाकरी मोडल्या, पण सर्व जणांना खाण्यासाठी भरपूर होते, तुम्ही भाकरीच्या तुकड्यांचे किती टोपल्या गोळा केल्या?” ते म्हणाले, “आम्ही बारा मोठ्या टोपल्या गोळा केल्या.”
\v 21 तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला हे कळत नाही का?”
\s येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो
\s5
\p
\v 22 ते बेथसैदा येथे नावेत बसून पाहोचले. लोकांनी एका आंधळ्या व्यक्तीला येशूकडे आणले आणि त्याला स्पर्श करून बरे करण्यास विनंती करू लागले.
\v 23 येशूने आंधळ्या मनुष्याचा हात पकडून, त्याला शहराबाहेर नेले. मग त्याने आपली लाळ त्या मणुष्याच्या डोळ्याला लावली, त्याने आपले हात त्या मनुष्यावर ठेवले आणि मग त्याला विचारले, “तुला काही दिसते का?”
\s5
\p
\v 24 त्या मनुष्याने वर पाहिले आणि मग तो म्हणाला, “होय, मला लोक दिसतात! ते सभोवती चालत आहेत, परंतु ते स्पष्ट नाही. ते झाडासारखे दिसत आहेत!”
\v 25 मग येशूने पुन्हा त्या अंध माणसाला स्पर्श केला. तो मनुष्य तत्क्षणी पाहू लागला, आणि त्याच क्षणी तो पुर्णपणे बरा झाला! त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले.
\v 26 येशू त्याला म्हणाला, “शहरात जाऊ नको!” मग त्याने त्या मणुष्याला त्याच्या घरी पाठवले.
\s येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली
\s5
\p
\v 27 येशू व त्याच्या शिष्यांनी बेथसैदा सोडले आणि जवळच्या फिलिप्पा कैसरिया गावात गेले. वाटेत असतांना त्याने त्यांना प्रश्न विचारला, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?”
\v 28 ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तू बाप्तिस्मा करणारा योहान आहेस. इतर लोक म्हणतात तू एलीया संदेष्टा आहेस. आणि इतर म्हणतात तू पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहेस.”
\s5
\p
\v 29 तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बद्दल काय? मी कोण आहे असे तुम्ही म्हणता?” पेत्र त्याला म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस!”
\v 30 मग तो ख्रिस्त आहे हे त्यांनी अजून कोणालाही सांगू नये असे येशूने त्यांना ताकीद देऊन सांगितले.
\s स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य
\s5
\p
\v 31 मग येशूने त्यांना शिकवण्यास सुरवात केली की, तो म्हणजे मनुष्याच्या पुत्र, पुष्कळ दु:खे सहन करेलच. त्याला वडील जण, मुख्य याजक आणि यहूदी नियम शिकविणारे लोक नाकारतील. तो मारला जाईल. परंतु त्याच्या मृत्युनंतर तिसऱ्या दिवशी, तो पुन्हा जिवंत होईल.
\v 32 तो त्यांना स्पष्टपणे बोलला. पण पेत्र त्याला एका बाजूला घेऊन गेला आणि त्याला अशा प्रकारे बोलल्याबद्दल ओरडला.
\s5
\p
\v 33 येशू सभोवती वळाला आणि त्याच्या शिष्यांकडे पाहिले. मग त्याने पेत्राला दटावले, म्हणाला, “तसा विचार करणे थांबव! सैतान तुला असे बोलण्यास भाग पाडत आहे! तुमची इच्छा आहे लोकांना सांगितल्याप्रमाने मी करावे, त्याऐवजी मी काय करावे अशी देवाची इच्छा आहे.”
\s आत्मत्यागाचे आमंत्रण
\p
\v 34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोक समुदायाला बोलाविले ह्यासाठी की त्यांनी त्याचे ऐकावे. तो त्यांना म्हणाला, “जर तुम्हापैकी कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो, तुम्ही फक्त तेच करू नका ज्याने तुमचे जगणे सोपे होईल. तुम्ही वधस्तंभ बळजबरीने वाहून वधस्तंभावर खिळल्या जाणाऱ्या गुन्हेगारांसारखे दुःख सहन करण्यास तयार असणे आवश्यक आहे.
\s5
\p
\v 35 तुम्ही ते केलेच पाहिजे, कारण जे लोक माझ्या मालकीचे आहेत ते नाकारून स्वतःचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात ते त्याचे प्राण गमावतील. ज्यांना माझे शिष्य असल्यामुळे आणि सुवार्ता सांगितल्यामुळे ठार केले जाईल ते सर्वकाळ जगतील.
\v 36 लोक या जगात जे काही त्यांना हवे आहे ते मिळवू शकतात, परंतु जर त्यांनी खरोखर सार्वकालिक जीवन प्राप्त केले नाही तर त्यांनी काहीच मिळवले नाही!
\v 37 सार्वकालीक जीवन प्राप्त करण्यासाठी निश्चितच तेथे असे काही नाही जे मनुष्य देवाला देऊ शकतो ह्या सत्या बद्दल काळजी पुर्वक विचार करा!
\s5
\p
\v 38 आणि ह्याविषयी विचार करा: जेव्हा बरेच लोक देवापासून वळतील आणि खूप पाप करतील तेव्हा ते माझे आहे असे नाकारतील आणि ह्या दिवसांमध्ये मी जे बोलतो त्याचा तिरस्कार करतील, म्हणून जेव्हा मी पवित्र दूत आणि पित्याच्या गौरवात परत येईन तेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, ते माझे आहेत असे मी स्विकार करणार नाही!”
\s5
\c 9
\s येशूचे रूपांतर
\p
\v 1 तो त्याच्या शिष्यांना हे देखील म्हणाला, “लक्षपूर्वक ऐका! आता तुम्हापैकी येथे असलेले काहीजण हे बघणार आहेत, देव स्वतःला महान शक्तिशाली राजा म्हणून प्रगट करणार आहे. तुमचा मृत्यू होण्यापूर्वी तो हे करतांना तुम्ही पाहणार आहात.”
\p
\v 2 सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर घेऊन गेला. ज्यावेळेस ते वरती एकटे होते, तो त्यांना फार वेगळा प्रगट झाला.
\v 3 त्याचे कपडे चकचकीत पांढरे शुभ्र झाले. ते जगात कोणीही धुऊन स्वच्छ केले नसतील त्या ही पेक्षा जास्त पांढरे शुभ्र कपडे होते.
\s5
\p
\v 4 पूर्वी होऊन गेलेले दोन संदेष्टे, मोशे आणि एलीया, त्यांना प्रगट झाले. मग ते दोघे येशू सोबत बोलू लागले.
\v 5 थोड्या वेळेनंतर, पेत्र म्हणाला, “गुरूजी, आपण येथे असणे अद्भुत आहे! तर आम्हांला तीन मंडप तयार करू द्या. एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी.
\v 6 त्याला काही तरी बोलायचे होते म्हणून तो हे म्हणाला, परंतु काय बोलावे हे त्याला कळत नव्हते. तो आणि इतर दोन शिष्य भयभीत झाले होते.
\s5
\p
\v 7 मग चमकदार ढग प्रगट झाले त्याने त्यांना झाकून टाकले. देव ढगातून बोलला आणि त्यांना म्हणाला, “हा माझा पुत्र आहे. हा तोच आहे ज्यावर मी प्रीती करतो. म्हणून तुम्ही त्याचे ऐका”
\v 8 ज्यावेळेस तीन शिष्यांनी त्यांच्या भोवती पाहिले, त्यांनी पाहिले येशू तेथे त्यांच्या बरोबर एकटाच होता, आणि मग त्या नंतर त्यांच्यापैकी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
\s5
\p
\v 9 ते डोंगरावरून खाली उतरत असता येशू त्यांना म्हणाला, जे काही त्याच्या सोबत घडले ते कोणालाही सांगता कामा नये. तो म्हणाला, “ज्यावेळेस मी, जो मनुष्याचा पुत्र, मरणातून जिवंत होईन, त्यानंतर तुम्ही त्यांना सांगा.”
\v 10 खूप काळापर्यंत त्या विषयी त्यांनी इतरांना सांगितले नाही. परंतु तो मरणातून जिवंत होईल असे म्हणाला, याचा अर्थ काय असू शकतो, ह्या विषयी ते आपसात चर्चा करू लागले.
\s5
\p
\v 11 त्यांनी येशूला विचारले, “जे पुरूष आमचे नियमशास्त्र शिकवतात ते असे का म्हणतात की मसीहा ह्या पृथ्वीवर येण्याअगोदर एलीया हा पृथ्वीवर परत आला पाहिजे?”
\v 12-13 येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाने वचन दिल्याप्रमाणे हे खरे आहे की एलीयाने प्रथम येऊन सर्व काही व्यवस्थित करावे. परंतु एलीया आलेला आहे, आणि आपल्या पुढाऱ्यांनी त्याच्या सोबत खुप वाईट रितीने व्यवहार केला, ज्याप्रकारे संदेष्ट्यांच्या द्वारे फार पूर्वी सांगण्यात आले, ते ह्याच प्रकारे करू इच्छित होते. परंतु मी जो मनुष्याचा पुत्र आहे, मला देखील वाटते जे काही माझ्या विषयी, शास्त्रात लिहिले आहे ते तुम्ही समजावे. ते असे म्हणतात त्याने फार दुःख भोगावे आणि लोकांनी त्याला नाकारावे.”
\s शिष्य भूतग्रस्त मुलाला बरे करण्यास असमर्थ
\s5
\p
\v 14 मग ज्या ठिकाणी इतर शिष्य होते तेथे येशू आणि त्याचे तीन शिष्य पोहचले. त्या ठिकाणी मोठा लोक समुदाय इतर शिष्यांच्या भोवती जमलेला त्यांनी पहिला आणि जे यहूदी नियमशास्त्र शिकवणारे माणसे त्यांच्या सोबत वाद करत होते.
\v 15 त्याला आलेला बघून समुदाय खूप आश्चर्यचकित झाले. मग ते त्याच्याकडे धावून गेले आणि त्याला सलाम केला.
\v 16 त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कशा विषयी वादविवाद करत आहात?”
\s5
\p
\v 17 त्या गर्दीतल्या एका माणसाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या पुत्राला येथे आणले आहे जेणेकरून तुम्ही त्याला बरे कराल. त्याच्या मध्ये एक दुष्ट आत्मा आहे जो त्याला बोलू देत नाही.
\v 18 जेव्हा जेव्हा आत्मा त्याच्यावर हल्ला करतो, तो त्याला खाली फेकतो. त्याच्या तोंडातून फेस येतो, तो त्याचे दात खातो, आणि तो ताठ होतो. मी तुझ्या शिष्यांना त्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी विनंती केली होती, परंतु ते त्याला काढू शकले नाही.”
\s येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो
\p
\v 19 येशूने त्या लोकांना उत्तर देत म्हटले, “अहो अल्पविश्वासी लोकांनो! मी कुठपर्यंत तुम्हा बरोबर राहू! त्या मुलाला माझ्याकडे घेऊन या!”
\s5
\v 20 मग त्यांनी त्या मुलाला येशूकडे आणले. तेंव्हा दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले, त्या मुलाला गंभीर झटका बसला, आणि तो मुलगा जमिनीवर पडला. तो रेंगाळू लागला आणि त्याच्या तोंडाला फेस येत होता.
\v 21 येशूने मुलाच्या पित्याला विचारले, “तो असा कधी पासून आहे?” त्याने उत्तर दिले, “तो बाळ होता त्या वेळेपासून हे घडू लागले.
\v 22 तो आत्मा केवळ इतकेच करत नाही तर, तो त्याला काही वेळेस आग्निमध्ये किंवा पाण्यात देखील फेकतो जेणेकरून तो मरेल. तुम्हाला शक्य असेल, तर आमच्यावर दया करा आणि आमची मदत करा!”
\s5
\p
\v 23 येशू त्याला मोठ्याने म्हणाला, “निश्चितच मी करू शकतो! जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात देव त्यांच्यासाठी काहीही करू शकतो!”
\v 24 त्याच वेळी मुलाचे वडील मोठ्याने ओरडले, “मी विश्वास करतो की तुम्ही माझी मदत कराल, परंतु मी ठामपणे विश्वास करत नाही. आणखी ठामपणे विश्वास करण्यास मला मदत कर!”
\v 25 येशूने पाहिले गर्दी फार वाढत होती. त्याने त्या दुष्ट आत्म्याला धमकावले: “हे दुष्ट आत्म्या, ह्या मुलास बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी थांबवत आहे! मी तुला आज्ञा करतो याच्यातून बाहेर ये आणि त्याच्या मध्ये कधीच परत शिरू नकोस!”
\s5
\p
\v 26 तेव्हा तो दुष्ट आत्मा ओरडला आणि बळजबरीने मुलाला हालवले; मग तो त्या मुलाला सोडून गेला. मुलाने काहीही हालचाल केली नाही. तो मुलगा मृत देहासारखा वाटत होता. त्या ठिकाणी असलेले बहुतेक लोक असे म्हणत होते “तो मेला आहे!”
\v 27 त्यानंतर, येशूने त्याचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली. नंतर तो मुलगा उभा राहिला.
\s5
\p
\v 28 नंतर, ज्यावेळेस येशू आणि त्याचे शिष्य एका घरात एकटेच होते, त्यांनी त्याला विचारले, “त्या दुष्ट आत्म्याला आम्ही का बरे धमकावू शकलो नाही?”
\v 29 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारच्या दुष्ट शक्तीला केवळ प्रार्थनेनेच घालवू शकता. अन्यथा दुसरा मार्ग नाही.
\s आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य
\s5
\p
\v 30 येशूने आणि त्याच्या शिष्यांनी तो प्रांत सोडल्यावर, ते गालीलातून जात होते. तो कोठे आहे हे कोणालाच कळू नये अशी येशूची इच्छा होती.
\v 31 त्याच्या शिष्यांना शिकविण्यासाठी त्याला वेळ पाहिजे होता. तो त्यांना सांगत होता, “एके दिवशी माझे शत्रू मला धरतील, मी जो मनुष्याचा पुत्र आहे मला ते दुसऱ्यांच्या हाती धरून देतील. ते लोक मला मारून टाकतील. परंतु मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी, मी मरणातून जिवंत होईन!”
\v 32 तो जे काही सांगत होता ते त्यांना समजत नव्हते, त्याचा अर्थ काय आहे हे विचारण्यास ते घाबरत होते.
\s नम्रतेविषयी धडा
\s5
\p
\v 33 मग येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास परतले. ज्या वेळेस ते घरामध्ये होते, त्याने त्यांना विचारले, “ज्या वेळेस आपण रस्त्यावरून प्रवास करत असता तुम्ही कशा विषयी बोलत होता?”
\v 34 परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांना उत्तर देण्याची लाज वाटत होती कारण, प्रवास करत असतांना, ते आपसामध्ये ह्या विषयी भांडत होते की ज्यावेळेस येशू राजा होईल तर त्यांच्यापैकी कोण मोठा होणार.
\v 35 तो खाली बसला, त्याने बारा शिष्यांना त्याच्या जवळ बोलाविले आणि मग तो त्यांना म्हणाला, “जर देवाने तुम्हाला सर्वात जास्त विशेष समजावे असे कोणाला वाटते, तर त्याने सर्वांची सेवा करावी आणि त्याने स्वत:ला सर्वात कमी महत्त्वाचे व्यक्ती मानले पाहिजे.”
\s5
\p
\v 36 मग त्याने एका बाळाला जवळ घेतले व त्याला त्यांच्यामध्ये ठेवले. त्याने त्या बाळाला आपल्या हातात घेतले आणि त्यांना म्हणाला,
\v 37 जे मुलांचे स्वागत अशा प्रकारे करतात कारण ते माझ्यावर प्रीती करतात, ते माझे स्वागत करतात असे देव समजतो. हे पण खरे आहे ज्याने मला पाठविले आहे, त्या देवाचे देखील ते स्वागत करतात.”
\s सहिष्णुतेची शिकवण
\s5
\p
\v 38 योहान येशूला म्हणाला, “गुरूजी, कोणीतरी लोकांमधून दृष्ट आत्म्यांना धमकावून लावतांना आम्ही पाहिले. ते करण्यासाठी त्याला तुमच्याकडून अधिकार मिळाला असा त्याने दावा केला. तर आम्ही त्याला ते करणे थांबव असे सांगितले कारण तो आम्हा शिष्यांपैकी नव्हता.”
\v 39 येशू म्हणाला, “ते करण्यास त्याला थांबवू नका. जो माझ्या अधिकाराने अद्भुत कामे करतो तर कोणी माझ्या विषयी निंदा करणार नाही.
\s5
\p
\v 40 जे कोणी आम्हांला विरोध करत नाही ते त्याच ध्येयावर आहेत ज्यावर आम्ही आहोत.
\v 41 जे तुम्हाला कुठल्याही मार्गात मदत करतात, माझे म्हणजे मशीहाचे अनुकरण करणारे असाल म्हणून जरी ते तुम्हास पाण्याचा एक प्याला देतील, देव त्यांना निश्चितच प्रतीफळ देईल!”
\s इतरांना अडखळवण्याविरूद्ध इशारा
\s5
\p
\v 42 येशू म्हणाला, “जर कोणी माझ्यावर विश्वास करतो आणि त्याला तुम्ही पाप करण्यासाठी कारणीभूत होता, तर देव तुम्हास कडक शिक्षा करेल, जरी त्या व्यक्तीला या लहान मुलासारखे सामाजिक महत्त्व नसेल तरी. माझ्यावर विश्वास करणाऱ्याला पाप करण्यासाठी भाग पाडले तर देवाचे शासन होण्याऐवजी हे बरे होईल की त्याच्या गळ्याला जड धोंडा बांधून समुद्रात टाकण्यात यावे.
\v 43-44 पाप करण्यासाठी तुझ्या एका हाताचा वापर करण्याची तुझी इच्छा होत असेल तर, त्याचा वापर करू नकोस! पाप न करण्यासाठी जर तुला तुझा हात कापावा जरी लागला तरी तू हे कर! पृथ्वीवर असतांना जरी तुला एक हाता शिवाय जगावे लागले तरी, हे बरे राहिल की तू सर्वदा जगावे. परंतु हे चांगले नाही की देवाने तुझ्या पापामुळे तुझे संपूर्ण शरीर नरकात फेकावे.
\s5
\p
\v 45-46 पाप करण्यासाठी तुझ्या एका पायाचा वापर करण्याची तुझी इच्छा होत असेल तर, त्याचा वापर करू नकोस! पृथ्वीवर असतांना जर तुला एका पाया शिवाय जगावे लागले तरी, हे बरे राहिल की तू सर्वदा जगावे, परंतु तू पाप करावे आणि परिणामी देवाने तुझ्या संपूर्ण शरीराला नरकात फेकून द्यावे हे बरे नाही.
\s5
\p
\v 47 जर ज्या गोष्टी पाहून तू पापाच्या मोहात पडतोस, तर त्या गोष्टींकडे पाहू नकोस! जरी तुला पाप न करावयास डोळा बाहेर काढावा लागला, तरी ते कर! तुला तुझ्या दोन डोळ्यासोबत नरकात टाकण्याऐवजी हे उत्तम आहे की, एक डोळा असावा आणि देवाने तुमच्यावर राज्य करावे.
\v 48 तेथे सर्वदा माणसाला किडे खातात आणि अग्नी कधीही थांबत नाही.
\s5
\p
\v 49 “ज्याप्रमाणे लोक भोजनावर मीठ टाकतात त्याप्रमाणे देव लोकांवर अग्नीचा वर्षाव करेल.
\v 50 जेवणासाठी मीठ उपयुक्त आहे पण ज्यावेळेस बेचव होते त्याला तुम्ही खारट चव देऊ शकत नाही,ऐकमेकांबरोबर चांगले करा ज्याप्रमाणे मीठ जेवणाला चव देते त्याप्रमाणे इतरांबरोबर चांगले करा.
\s5
\c 10
\s विवाहबंधनाची ईश्वरनिर्मित दृढता
\p
\v 1 येशू आणि त्याचे शिष्य त्या जागेवरून निघाले, आणि ते यहूदीया प्रांतातून यार्देन नदीच्या पलीकडे पूर्व दिशेस गेले. पुन्हा लोकांची गर्दी त्याच्याकडे आली तेव्हा, त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे, त्याने त्यांना परत शिकविले.
\v 2 तो त्यांना शिकवत असता, काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याला विचारू लागले, “पुरुषाने स्त्रीला घटस्फोट द्यावा असे आमचे नियम परवानगी देतात का?” जर त्याने “होय” किंवा “नाही” असे उत्तर दिले तर त्याच्यावर टीका करता यावी म्हणून त्यांनी त्याला ते विचारले.
\v 3 त्याने त्यांना उत्तर दिले, “ह्या विषयी तुमच्या पूर्वजांना मोशेने काय आज्ञा दिली?”
\v 4 त्यांच्यापैकी एकाने उत्तर दिले, “मोशेने परवानगी दिल्याप्रमाणे पुरुषाने स्त्रीला एका कागदावर घटस्फोटाचे कारण लिहून द्यावे, आणि तिला पाठवून द्यावे.”
\s5
\p
\v 5 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांची त्यांच्या स्त्रियांना पाठून देण्याची त्यांची खंबीरपणे इच्छा होती. त्याच कारणामुळे मोशेने ते नियम लिहिले.
\v 6 ज्यावेळेस देवाने प्रथम लोकांची निर्मिती केली, त्याने नर व नारी तयार केले.
\s5
\p
\v 7 देव असे का म्हणाला हे स्पष्ट करतो, “ज्यावेळेस पुरुष लग्न करतो, त्याने त्याच्या परिवाराला सोडून पत्नीसोबत जुडावे.
\v 8 त्यांनी असे मिळून राहावे की ते एकच व्यक्ती समजून यावे, आणि दोन लोक एक देहाप्रमाणे होतील.
\v 9 कारण हे सत्य आहे की, पुरुषाने त्याच्या स्त्रीपासून वेगळे न व्हावे. देवाने त्यांना एकत्रित जोडले आणि त्याची इच्छा आहे की त्यांनी एकत्र राहावे!”
\s5
\p
\v 10 ज्या वेळेस येशू आणि त्याचे शिष्य एका घरामध्ये एकटे होते, त्यांनी ह्या विषयी परत विचारले.
\v 11 तो त्यांना म्हणाला, “जो पुरुष त्याच्या पत्नीला सोडून देतो आणि दुसऱ्या स्त्री सोबत विवाह करतो देव त्याला व्यभिचार समजतो.
\v 12 जी स्त्री तिच्या पतीला सोडून देते आणि दुसऱ्या पुरुषासोबत विवाह करते, तर देव त्याला देखील व्यभिचार समजतो.”
\s लहान मुलांना येशूचा आशीर्वाद
\s5
\p
\v 13 आता लोक त्यांच्या लेकरांना येशूकडे आणत होते जेणेकरून तो त्यांना स्पर्श करून त्यांना आशीर्वाद देईल, परंतु शिष्य त्या लोकांवर रागावले.
\v 14 ज्या वेळेस येशूने ते पहिले, त्याला राग आला. तो शिष्यास म्हणाला, “लेकरांना माझ्याकडे येऊ द्या! त्यांना मनाई करू नका! ज्या लोकांमध्ये ह्या लेकरांप्रमाणे गुण आहेत, देव त्यांच्यावर राज्य करेल.
\s5
\p
\v 15 ह्याची नोंद घ्या: जो कोणी लेकरांप्रमाणे देवाला त्यांचा राजा म्हणून स्वागत करत नाही, देव नक्कीच त्यांच्यावर राज्य करणार नाही.”
\v 16 मग त्याने लेकरांना अलिंगन दिले. त्याने त्याचे हात देखील त्यांच्यावर ठेवले आणि देवाला त्यांच्यासाठी चांगले काम करण्यासाठी सांगितले.
\s सार्वकालीक जीवनप्राप्तीविषयी एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न
\s5
\p
\v 17 नंतर येशूने पुन्हा त्याच्या शिष्यांसोबत प्रवास करण्यास सुरवात केली, तेंव्हा त्यांच्या पर्यंत एक मनुष्य पळत आला. त्याने येशू समोर गुडघे टेकून त्याने विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालीक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे?”
\v 18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? उत्तम केवळ देव आहे!
\v 19 परंतु तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी, मोशेने दिलेल्या आज्ञा तर तुला ठाऊक आहेत: ‘कोणाचाही खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटे सांगू नको, कोणालाही फसवू नको, आणि तुझ्या आई वडिलांचा आदर कर.’”
\s5
\p
\v 20 तो मनुष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, मी लहान होतो तेव्हापासून त्या सर्व आज्ञा पाळत आलो आहे.”
\v 21 येशूने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “एका गोष्ट आहे जी तू अजूनही केलेली नाहीस. तू घरी जायला पाहिजे, तुझ्या जवळ जी संपत्ती आहे ती विकून टाक, आणि गरीब लोकांना पैसे देऊन टाक. परिणामी, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मी सांगितल्या प्रमाणे तू केल्यावर चल, आणि माझ्या मागे ये!”
\v 22 ज्या वेळेस त्याने येशूच्या सुचना ऐकल्या तो निराश झाला. दु:खी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता.
\s संपत्तीची आडकाठी
\s5
\p
\v 23 येशूने लोकांकडे पाहिले. नंतर तो शिष्यास म्हणाला, “जे लोक फार श्रीमंत आहेत त्यांच्यावर देवाने राज्य करण्यास सहमत होणे हे फार कठीण आहे.”
\v 24 शिष्यांना जे काही सांगितले त्यावरून ते गोंधळून गेले. येशू परत म्हणाला, “माझ्या प्रिय मित्रांनो, कोणावरही देवाने राज्य करण्यास सहमत होणे हे फार कठीण आहे.
\v 25 वास्तविक पाहता, “उंटासारख्या मोठ्या प्राण्याला सुईच्या नाकातून जाणे सोपे होऊ शकते, पण देवाने श्रीमंत लोकांवर राज्य करावे हे त्यांना स्विकारण्यास कठीण आहे.”
\s5
\p
\v 26 शिष्य फार अचंबीत झाले. तर ते एकमेकांना म्हणू लागले, जर मग ते असे आहे तर, कोणाचेही तारण होणार नाही!”
\v 27 येशूने त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, “होय, लोकांनी स्वतःचे तारण करणे अशक्य आहे! परंतु देव नक्कीच त्यांना वाचवू शकतो, कारण देव काहीही करू शकतो!”
\v 28 पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही मागे सोडून तुझ्या मागे आलो आहोत.”
\s5
\p
\v 29 येशूने उत्तर दिले, “तुम्ही हे जाणावे अशी माझी इच्छा आहे: ज्यांनी कोणी त्यांचे घर, बंधू, भगिनी, माता, पिता, लेकरें, किंवा त्यांच्या जागा, माझे शिष्य होण्यासाठी आणि शुभवार्ता सांगण्यासाठी सोडून दिले,
\v 30 जे काही त्यांनी मागे सोडून दिले ते शंभर पटीने ह्याच जीवनात ते प्राप्त करतील. त्यात त्यांची घरे, बंधू-भगिनी, माता-पिता, लेकरें व त्यांच्या जागा त्यात आहेत. शिवाय, ते माझ्यावर विश्वास करतात म्हणून ह्या जगात लोक त्यांचा छळ करतील, भविष्यामध्ये त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
\v 31 पण मी तुम्हा सर्वांना चेतावनी देत आहे: जे कोणी आता स्वतःला फार प्रतिष्ठीत समजतात अशा बऱ्याच जणांना भविष्य काळामध्ये अप्रतिष्ठित करण्यात येईल, आणि जे कोणी स्वतःला अप्रतिष्ठित करू पाहतो अशा बऱ्याच जणांना भविष्य काळामध्ये प्रतिष्ठीत करण्यात येईल!”
\s आपल्या मृत्युबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भविष्य
\s5
\p
\v 32 काही दिवसा नंतर त्यांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला, यरूशलेम शहराकडे जाणाऱ्या मार्गावरून येशू आणि त्याचे शिष्य चालत होते. येशू त्यांच्या पूढे चालत होता. शिष्य आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या बरोबरचे इतर लोक भयभीत झाले तो त्याच्या बारा शिष्यांना वेगळे करून एका ठिकाणी घेऊन गेला. त्याच्या सोबत काय घडणार आहे त्या विषयी त्याने त्यांना परत सांगण्यास सुरूवात केली; तो म्हणाला,
\v 33 लक्ष देऊन ऐका! आम्ही यरूशलमेस जात आहोत. तेथे मुख्य याजक नियम शास्त्र शिकवणारी माणसे, मला म्हणजे मनुष्याचा पुत्राला अटक करतील. मी मरावे असे ते घोषणा देतील. मग ते मला रोमी अधिकाऱ्यांकडे नेतील.
\v 34 त्यांचे लोक माझी चेष्टा करतील आणि माझ्यावर थुंकतील. ते मला चाबकाने मारतील, आणि नंतर ते मला मारून टाकतील. परंतु तिसऱ्या दिवसानंतर, मी परत जिवंत होईन!”
\s याकोब व योहान याची विनंती
\s5
\p
\v 35 प्रवासात असता, जब्दीचे दोन मुले, याकोब आणि योहान, येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “गुरूजी, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा अशी आमची इच्छा आहे!”
\v 36 तो त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
\v 37 ते त्याला म्हणाले, “ज्यावेळेस तू तुझ्या राज्यात राज्य करशील तेव्हा, आपल्यापैकी एक तुझ्या उजव्या बाजूला बसू दे आणि एक डाव्या बाजूला बसू दे.”
\s5
\p
\v 38 परंतु येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही.” मग त्याने त्यांना विचारले, “ज्या त्रासातून मी जाणार आहे तो त्रास तुम्ही सहन करू शकता का? इतर लोक ज्याप्रमाणे मला मारतील त्याप्रमाणे तुम्ही ते सहन करू शकता का?”
\v 39 ते त्याला म्हणाले, “होय, आम्ही ते करू शकतो!” मग येशू त्यांना म्हणाला, “हे खरे आहे की मी ज्या त्रासातून गेलो आहे तो त्रास तुम्ही सहन करू शकता आणि इतर लोक ज्याप्रमाणे मला मारतील तसे तुम्ही सहन करू शकता.
\v 40 परंतु माझ्या बाजूला कोण बसेल याची निवड करणारा मी नाही. ज्या लोकांना देवाने अगोदरच निवडले आहे त्यांना तो त्या जागा देईल.”
\s खरे मोठेपण
\s5
\p
\v 41 याकोब आणि योहानाने जी विनंती केली, नंतर त्या विषयी इतर दहा शिष्यांनी ते ऐकले. मग ते म्हणाले, ते दोन शिष्यांविषयी दुःखी आहेत.
\v 42 मग येशू त्या सर्वांना एकत्रित बोलवून म्हणाला, “तुम्हाला ठाऊक आहे की जे राजे आहेत आणि इतर जे लोकांवर अधिकार चालवतात ते शक्तीशाली आहेत असे दाखवण्यात त्यांना आनंद वाटतो. तुम्हाला देखील ठाऊक आहे जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांना इतरांना आज्ञा देण्यात आनंद वाटतो.
\s5
\p
\v 43 परंतु त्यांच्यासारखे होऊ नका! तर त्या उलट, तुम्हा सर्वांपैकी ज्या कोणाला वाटते देवाने त्यांना मोठे करावे तर त्यांनी इतरांची सेवा करणारे बनावे.
\v 44 शिवाय, तुमच्यापैकी कोणालाही असे वाटते की देवाने त्यांना खूप विशेष समजावे तर, त्यांनी इतरांसोबत एका सेवकासारखे वागावे.
\v 45 मी, जो मनुष्याचा पुत्र आहे, सेवा करून घेण्यासाठी आलो नाही. तर त्या उलट, मी इतरांची सेवा करावयास आणि माझे जीवन त्यांच्यासाठी देऊन पुष्कळ लोकांना मुक्ती मिळण्यासाठी आलो आहे.”
\s आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीदान
\s5
\p
\v 46 येशू आणि त्याचे शिष्य यरूशलमेकडे जात असता ते यरीहोकडे पोहोंचले. मग, ज्या वेळेस मोठ्या समुदायासह यरीहोला सोडत असता, एक नियमित पैशांची भीक मागणारा आंधळा व्यक्ती वाटेच्या कडेला बसलेला होता. त्याचे नाव बार्तीमय होते, त्याच्या वडीलाचे नाव तीमया होते.
\v 47 ज्यावेळेस त्याने लोकांनी बोललेले ऐकले की येशू नासरेथकर ह्या वाटेने जात आहे, तो ओरडून म्हणाला, “येशू! तू जो दावीदाचा वंशज आणि मसीहा आहेस, माझ्यावर दया कर!”
\v 48 पुष्कळ लोकांनी त्याला दटावीले आणि त्याला शांत राहा म्हणाले. पण तो अधिक ओरडला, “तू जो दावीदाचा वंशज आणि मसीहा आहेस, माझ्यावर दया कर!”
\s5
\p
\v 49 येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला ह्या ठिकाणी बोलवा!” मग त्यांनी त्या आंधळ्या व्यक्तीला बोलावून, म्हटले, “येशू तुला बोलवत आहे! तर मग चल आता धीर धर आणि ऊठ!”
\v 50 त्याने उडी मारली, त्याने त्याचे कपडे फेकून दिले, आणि येशूकडे आला.
\s5
\p
\v 51 येशूने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो आंधळा व्यक्ती येशूला म्हणाला, “गूरूजी, मला परत पाहायचे आहे!”
\v 52 येशू त्याला म्हणाला, “तू माझ्यावर विश्वास करतोस म्हणून मी तुला बरे करत आहे. मग तू आता जाऊ शकतोस!” तो लागेच पाहू लागला. आणि तो वाटेने येशू सोबत गेला.
\s5
\c 11
\s यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश
\p
\v 1 जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमे जवळ आले, जैतूनाच्या डोंगराजवळ बेथफगे आणि बेथानीस गावाजवळ पोहोंचले, मग येशूने त्याच्या दोन शिष्यास बोलाविले
\v 2 आणि त्यांना म्हणाला, “जे गाव आमच्या पुढे आहे त्यामध्ये जा. ज्यावेळेस तुम्ही त्यात प्रवेश कराल, तुम्हाला एक शिंगरु बांधलेले आढळेल ज्यावर कोणीही बसले नाही. त्याला सोडून माझ्याकडे आणा.
\v 3 जर तुम्हाला कोणी म्हणाले, ‘तुम्ही हे का करता? तुम्ही सांगा, ‘प्रभूला ह्याची गरज आहे. त्याची गरज पूर्ण होताच त्याला परत पाठविण्यात येईल.’”
\s5
\p
\v 4 तर मग दोन शिष्य गेले आणि त्यांना ते शिंगरु सापडले. त्याला घराच्या दाराजवळ, वाटेच्या बाजूला बांधले होते. मग त्यांनी त्याला सोडले.
\v 5 जे काही लोक तेथे होते त्यांना म्हणाले, तुम्ही का त्या गाढवाला सोडत आहात?”
\v 6 जे काही येशू बोलला ते त्यांनी त्यांना सांगितले. गाढव घेऊन जाण्यासाठी लोकांनी त्यांना परवानगी दिली.
\s5
\p
\v 7 दोन शिष्यांनी त्या गाढवाला येशूकडे आणिले आणि त्याला बसण्यासाठी त्यांनी आपले वस्त्रे त्यावर टाकले.
\v 8 खूप लोकांनी वाटेवर आपली वस्त्रे त्याच्या पुढे पसरले, जवळच्या शेतातून खजुरीच्या झाडाच्या फांद्या तोडून वाटेवर पसरून टाकल्या.
\v 9 जे लोक त्याच्या मागे पुढे चालत होते ते सर्व “देवाची स्तुती असो!” असे म्हणत होते “जो त्याच्या अधिकाराने आला आहे त्याला देव आशीर्वादित करो.”
\v 10 “ज्या प्रमाणे आमचा पूर्वज दावीद राजा ह्याने राज्य केले त्या प्रमाणे तू करशील तर तू धन्यवादित असो!” “जो अति उंच स्वर्गात आहे त्याची स्तुती असो!”
\s5
\p
\v 11 येशूने त्यांच्या सोबत यरुशलमेत प्रवेश केला, आणि मग तो मंदिराच्या अंगणात गेला. त्याने ह्या सर्व गोष्टी तेथे पाहिल्यानंतर, दुपारी उशीर झाल्यामुळे त्याने ते शहर सोडले. तो त्याच्या बारा शिष्यांसोबत बेथानीस परतला.
\s अंजिराचे निष्फळ झाड
\p
\v 12 दुसऱ्या दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य बेथानी गाव सोडत असता, त्याला भूक लागली.
\s5
\p
\v 13 त्याने पूर्ण पाने असणारे अंजिराचे झाड दुरून पाहिले, तर तो त्याच्याकडे गेला त्याच्यावर अंजीर शोधत होता. परंतु तो त्याच्याकडे आला, त्याला त्याच्यावर फळ मिळाले नाही, कारण ते येण्यासाठी अंजिराचा हंगाम नव्हता.
\v 14 तो झाडाला म्हणाला, “पुन्हा कोणीही तुझ्यातून कधीही खाणार नाही.” आणि हे शिष्यांनी ऐकले.
\s देवाच्या भवनाचे शुद्धीकरण
\s5
\p
\v 15 येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमेस परत गेले आणि मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. त्याने त्या लोकांकडे पाहिले जे बलिदानासाठी जनावरे विकत घेत होते आणि विकत होते. मंदिराच्या अंगणातून त्या सर्व लोकांना बाहेर हाकलून लावीले. त्याने रोमी नाण्यांच्या बदल्यात मंदिराच्या कराचे पैसे विकणाऱ्यांच्या पैशांची उलथापालथ केली. बलिदानासाठी कबूतर विकणाऱ्यांची आसनांची उलथापालथ केली.
\v 16 जे कोणी मंदिराच्या क्षेत्रातून जाऊन काही पण विकण्यासाठी घेऊन जातात त्यांना तो परवानगी देत नसे.
\s5
\p
\v 17 नंतर त्या लोकांना त्याने शिकविले, आणि त्यांना म्हणाला, “शास्त्रात असे लिहिले आहे की देव म्हणाला, ‘माझ्या घरात सर्व राज्यातील लोकांनी येऊन प्रार्थना करणारे व्हावे, परंतु आपण त्यास अशा गुहेसारखे बनविले आहे ज्यात लुटारू लपले आहेत.”
\v 18 मुख्य याजक आणि यहूदी नियमशास्त्र शिकविणाऱ्या लोकांनी त्याने काय केले ते ऐकले. त्याला कसे मारून टाकावे ह्याची योजना ते करीत होते, परंतु ते घाबरले कारण तो जे शिकवत होता त्या विषयी लोक समूदाय आश्चर्यचकित झाले हे त्यांना कळून आले.
\v 19 प्रत्येक संध्याकाळ येशू व त्याचे शिष्य शहर सोडून जात असे.
\s विश्वासाचे सामर्थ्य
\s5
\p
\v 20 दुसऱ्या दिवशी सकाळी ते यरुशलेमेच्या रस्त्यावर जात असता, त्यांनी पाहिले की येशूने ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला होता, ते पूर्णपणे सुकलेल्या स्थितीत होते.
\v 21 येशूने जे अंजिराच्या झाडाला सांगितले होते ते पेत्राला आठवले आणि तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या झाडाला तुम्ही श्राप दिला होता ते सुकून गेले आहे!”
\s5
\p
\v 22 येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा!
\v 23 तसेच हे लक्षात घ्या: जर तुम्ही ह्या डोंगराला म्हणालात, ‘स्वतःला वर उचलून समुद्रात फेकला जा! आणि जर तुम्ही शंका न बाळगता म्हणाला तर ते घडेल, तेच आहे, जर तो विश्वास करतो की हे होणार आहे तर, देव त्याच्यासाठी ते करेल.
\s5
\p
\v 24 तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा केव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करून जे काही मागता, ते तुम्हाला मिळणारच आहे असा विश्वास ठेवा, आणि जर तुम्ही ह्या प्रकारे करता, तर देव तुम्हासाठी ते करील.
\v 25 आता, हे देखील मी तुम्हास सांगतो: जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, आणि जर तुम्हाला कोणी दुःखवीले, त्यांचा तुम्ही द्वेष करता, तर तुम्ही त्यांना क्षमा करा, कारण जशी स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा केली आहे.
\v 26 (काही प्राचीन अधिकृत लेखांमध्ये आढळते: जर तुम्ही क्षमा करणार नाही, तर जो स्वर्गातील पिता आहे तो देखील तुमच्या पापांची क्षमा करणार नाही).
\s येशूच्या अधिकाराविषयीचे प्रश्न
\s5
\p
\v 27 पुन्हा येशू आणि त्याचे शिष्य मंदिराच्या अंगणात यरूशलेम शहरास पोहोंचले. येशू तेथे चालत असता, मुख्य याजक, जे यहूदी नियमशास्त्र शिकवतात, आणि वडिलजन ह्या सर्वांचा समूदाय त्याच्याकडे आला.
\v 28 ते त्याला म्हणाले, “कुठल्या अधिकाराने तू ह्या गोष्टी करत आहेस? काल ज्या गोष्टी तू येथे केल्या ते करण्यास तुला कोणी अधिकार दिला?”
\s5
\p
\v 29 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला एक प्रश्न करतो. जर तुम्ही मला उत्तर दिले, तर तुम्हाला सांगेन मी कुठल्या अधिकाराने ह्या गोष्टी करत आहे.
\v 30 जे लोक योहानाकडे येत होते त्यांचा बाप्तिस्मा करण्यासाठी अधिकार त्याला देवाकडून होता? किंवा लोकांकडून होता? किंवा लोक होते ज्यांनी त्याला अधिकार दिला?”
\s5
\p
\v 31 त्यांनी काय उत्तर द्यावे ह्या विषयी ते आपसामध्ये वादविवाद करत होते. ते एकमेकांना म्हणाले, “जर त्याला देवाकडून अधिकार होता असे आम्ही म्हणालो, तर तो आम्हांला म्हणेल, ‘मग योहान जे काही बोलला त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे होता!
\v 32 दुसरीकडे, जर आम्ही म्हणालो योहानाला अधिकार लोकांकडून होता, तर आमच्या सोबत काय घडेल?” योहानाच्या बाबतीत ते बोलण्यासाठी घाबरले, कारण त्यांना ठाऊक होते की लोक त्यांच्यावर फार रागवतील. त्यांना ठाऊक होते की लोकांना पूर्णपणे विश्वास आहे योहान हा संदेष्टा होता ज्याला देवाने पाठविले होते.
\v 33 तर त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाला कोठून अधिकार मिळाला हे आम्हांला ठाऊक नाही.” मग येशू त्यांना म्हणाला, “कारण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही म्हणून, मी ही तुम्हाला सांगणार नाही की हे सर्व करण्यासाठी मला कोणी अधिकार दिला होता”.
\s5
\c 12
\s द्राक्षमळ्याचा दाखला
\p
\v 1 मग येशूने त्यांना बोधकथा सांगण्यास सुरूवात केली. तो म्हणाला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याने त्याच्याभोवती एक कुंपण बांधले. त्यांनी द्राक्षरस गोळा करण्यासाठी एक दगडी टाकी बनवली. त्याने त्याच्या द्राक्षमळ्याच्या संरक्षणासाठी एक बुरुज बांधला जेणेकरून कोणी तरी तेथे बसून त्या द्राक्षमळ्याचे रक्षण करील. त्याने काही शेतकऱ्यांना तो द्राक्षमळा संभाळण्यासाठी दिला आणि तो दुसऱ्या राज्यात निघून गेला.
\v 2 द्राक्षमळ्याची कापणी करण्याची वेळ आली तेव्हा, जे काही पिक त्यातून उत्पन्न झाले त्यातला भाग घेण्यासाठी त्याने एका दासाला त्या माणसांकडे पाठवले जे त्याच्या द्राक्षमळ्याचे संरक्षण करत होते.
\v 3 परंतु तो दास ज्यावेळेस पोहोंचला, त्यांनी त्याला धरले आणि त्याला मारले, आणि त्यांनी त्याला काहीच फळ दिले नाही. नंतर त्यांनी त्याला पाठवून दिले.
\s5
\p
\v 4 नंतर मालकाने दुसऱ्या दासाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांनी त्याच्या डोक्यात मारले आणि त्याचा अपमान केला.
\v 5 नंतर मालकाने परत एका दासाला पाठवले. त्या शेतकऱ्यांनी त्याला मरून टाकले. ज्यांनाही त्याने पाठवले त्यांनी त्याच्या सोबत गैरव्यवहार केला. काही जणांना मारले व काही जणांना जीवे मारले.
\s5
\p
\v 6 मालकाकडे आणखी एक व्यक्ती राहिला होता, त्याचा मुलगा, ज्याच्यावर तो खुप प्रेम करायचा. मग त्याने त्याच्या मुलाला पाठवले कारण त्याने असा विचार केला कदाचित ते त्याचा आदर करतील.
\v 7 परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला येत असता पाहीले ते एकमेकांशी बोलू लागले, ‘पाहा! हा तो मालकाचा मुलगा जो येणाऱ्या दिवसामध्ये ह्या द्राक्षमळ्याला वतन करून घेईल, तर मग त्याला आपण मारून हा द्राक्षमळा आपला करून घेऊ!
\s5
\p
\v 8 मालकाच्या पुत्राला त्यांनी कैद केले, आणि त्याला मारून टाकले. मग त्यांनी त्याच्या देहाला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.
\v 9 हे तुम्हाला ठाऊक आहे काय द्राक्षमळ्याचा मालक काय करेल तो येईल आणि जे दुष्ट माणुस त्याच्या द्राक्षमळ्याची राखण करत होते त्यांना तो जीवे मारील. मग तो द्राक्षमळ्याचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या लोकांची निवड करील.
\s5
\p
\v 10 आता ह्या शब्दांविषयी काळजी पूर्वक विचार करा, जे तुम्ही शास्त्र भागात वाचले आहे:
\q “इमारत बांधणाऱ्या पुरुषांनी एका विशिष्ट धोंड्याचा वापर करण्यासाठी नाकारले. परंतु प्रभूने त्याच धोंड्याला योग्य जागी ठेवले, आणि इमारतीमध्ये ते अतिशय विशेष धोंडा झाला!
\q
\v 11 प्रभूने हे केले आहे, ज्यावेळेस आम्ही त्याकडे पाहतो तेव्हा आम्ही आश्चर्यचकित होतो.”
\p
\v 12 येशू त्यांना दोष लावत आहे, असे यहूदी पुढाऱ्यांना समजून आले, ज्यावेळेस त्याने दुष्ट लोकांच्या कामाविषयी ही गोष्ट सांगितली. तर त्याला ते कैद करू इच्छित होते. परंतु जर त्यांनी असे केले तर लोकसमुदाय काय म्हणेल ह्यामुळे ते घाबरले. ते त्याला सोडून निघून गेले.
\s कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 13 यहूदी पुढाऱ्यांनी काही परुशी आणि काही सदस्य जे हेरोद अंतिपा आणि रोमी सरकारच्या पक्षाला समर्थीत आहेत त्यांना येशूकडे पाठवले.
\v 14 ते पोहंचल्या नंतर, ते त्याला म्हणाले, “गुरूजी, तुम्ही सत्य शिकवता हे आम्हास ठाऊक आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात ह्या विषयी तुम्ही चिंता करत नाही, मग जरी ते विशेष व्यक्तीला पसंत पडले किंवा नाही. त्याऐवजी, देवाच्या इच्छे प्रमाणे आम्ही काय करावे ते तुम्ही आम्हांला प्रामाणिकपणे शिकवता. तर ह्या गोष्टी विषयी तुम्ही काय विचार करता हे आम्हांला सांगा: रोमी सरकारला आम्ही कर देणे योग्य आहे किंवा नाही? तर आम्ही त्यांना कर भरावा, किंवा भरू नये?”
\v 15 देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी करावे ह्याची त्यांना खरोखर इच्छा नाही हे येशूला ठाऊक होते. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मी काही तरी चुकीचे बोलावे आणि माझ्यावर दोष लावावा म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात हे मला ठाऊक आहे. परंतु तरी ही मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. माझ्याकडे नाणे आणा जेणेकरून मी त्याला पाहीन.”
\s5
\p
\v 16 त्यांनी त्याच्याकडे नाणे आणल्यानंतर, त्याने त्यांना विचारले, “ह्या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि त्याच्यावर कोणाचे नाव आहे?” त्यांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे नाव आणि चित्र आहे.”
\v 17 येशू त्यांना म्हणाला, “ते खरे आहे, मग जे कैसराचे आहे ते कैसराला द्या, जे देवाचे आहे ते देवाला द्या.” जे तो बोलला त्यावरून ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले.
\s पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 18 लोक मरणानंतर परत जिवंत होतात, हे जे इतर यहूदी विश्वास करतात पण जी माणसे सदूकी गटातले आहेत ते त्याला नाकार देतात. काही सदूकी येशूकडे आले आणि त्याला विचारु लागले,
\v 19 “गुरूजी, आम्हा यहूद्यांसाठी मोशेने लिहिले आहे की जर एका मनुष्याला संतती नसता तो मेला तर, त्याच्या भावाने मेलेल्या मनुष्याच्या पत्नीसोबत विवाह करावा. मग त्या दोघांना मुले असतील तर, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. अशाप्रकारे मृतांची संतती कायम राहील असे सर्व समजतील.
\s5
\p
\v 20 तर येथे एक उदाहरण आहे. एका कुटूंबातील सात भाऊ होते. सर्वात लहान पुरुषाने एका महिलेशी लग्न केले, परंतु त्याने व त्याच्या बायकोला कोणत्याही मुलास जन्म दिला नाही. मग नंतर त्याचा मृत्यु झाला.
\v 21 दुसऱ्या भावाने देखील त्या स्त्री सोबत विवाह केला, परंतु, त्याने देखील, बाळाला जन्म दिला नाही. मग नंतर तो मेला. तीसऱ्या भावाने इतर भावांसारखे केले. परंतु त्याने देखील कोणत्याही लेकरांना जन्म दिला नाही, आणि तो नंतर मरण पावला.
\v 22 अखेरीस सर्व सात बंधूंनी पाठोपाठ त्या स्त्रीशी लग्न केले, पण कोणाचेही मुल झाले नाही आणि त्यांचे एकामागून एक मृत्यु झाले. त्यानंतर त्या महिलेचाही मृत्यु झाला.
\v 23 आता ते मरणातून परत जिवंत झाले त्या दिवशी ती कोणाची पत्नी होणार? ध्यानात ठेवा तीचे सर्व सात भांवासोबत विवाह झालेला आहे!”
\s5
\p
\v 24 येशूने त्यांना उत्तर दिले, “आपण निश्चितपणे चुकीचे आहात. तुम्हाला ठाऊक नाही त्यांनी ह्या विषयी शास्त्रलेखात काय लिहिले आहे. लोकांना परत जिवंत करण्याचे देवाचे सामर्थ्य तुम्हाला देखील नाही समजले.
\v 25 त्या भावांपैकी ती स्त्री कोणाची पत्नी होणार नाही, कारण जेव्हा लोक परत जिवंत होतील, पुरूषांना पत्नी असावी आणि स्त्रियांना पुरूष असावा त्याऐवजी, ते स्वर्गात देवदूतांप्रमाणे असतील. देवदूत विवाह करत नाही.
\s5
\p
\v 26 परंतु लोक मेल्यानंतर परत जिवंत होतात ह्या विषयी तुम्हाला सांगू द्या. ज्या पुस्तकात मोशेने लिहिले, त्याने जे लोक मेले त्यांच्या विषयी लिहिले; ते तुम्ही वाचले आहे ह्याची मला खात्री आहे. जेव्हा मोशे त्या जळत्या झुडूपाकडे पाहात होता, देव त्याला म्हणाला, ‘मी तो देव आहे ज्याची उपासना अब्राहाम, इसाहाक, आणि याकोब करतात.
\v 27 आता जे देवाची उपासना करतात ते मेलेले नाहीत. ते जिवंत लोक आहेत जे देवाची उपासना करतात. जेव्हा तुम्ही म्हणता मेलेले लोक जिवंत होत नाही, तुम्ही फार चुकीचे बोलतात.”
\s सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न
\s5
\p
\v 28 जो मनुष्य यहूदी नियमशास्त्र शिकवतो त्याने त्यांचे बोलणे ऐकले. येशूने सदूकीच्या प्रश्नाचे उत्तर चांगल्या रितीने दिले हे त्याला ठाऊक होते. तर त्याने पुढे येऊन येशूला प्रश्न केला, “कोणती आज्ञा अतिशय महत्त्वाची आहे?”
\v 29 येशूने उत्तर दिले, “ही आहे ती अतिशय महत्त्वाची आज्ञा: ‘ऐका, हे इस्त्राएल! प्रभू आमचा देव जो एकच प्रभू आहे.
\v 30 तुम्ही जे काही विचार करता, जे तुम्हाला पाहिजे आणि वाटते, आणि जे काही तुम्ही करता त्या सर्वांमध्ये देवावर प्रीती करा!
\v 31 दुसरी फार महत्त्वाची आज्ञा ही आहे: ज्या प्रमाणे तुम्ही स्वतःवर प्रीती करता त्याच प्रमाणे तुमच्या भोवती जे लोक आहेत त्यांच्यावरही तिच प्रीती करा. ह्या दोन आज्ञांपैकी इतर अतिशय महत्त्वाचे नाहीत!”
\s5
\p
\v 32 तो मनुष्य येशूला म्हणाला, “गुरूजी, तुम्ही चांगले उत्तर दिले. तुम्ही बरोबर म्हणाला एकच देव आहे आणि त्याला सोडून दुसरा देव नाही.
\v 33 तुम्ही हे देखील योग्य बोलला आहात की तुम्ही जे काही विचार करता, जे तुम्हाला पाहिजे आणि वाटते, आणि जे काही तुम्ही करता त्या सर्वांमध्ये देवावर प्रीती करा. तुम्ही हे देखील योग्य म्हणाला तुम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येता त्यांच्यावर प्रीती करावी ज्याप्रमाणे आम्ही स्वतःवर करतो. त्याच्यासाठी प्राण्यांचे बलिदान किंवा इतर होमअर्पणापेक्षा देवाला ह्या गोष्टी करणे आवडते हे देखील तुम्ही योग्य बोलले आहात.”
\v 34 ह्या माणसाने हुशारीने उत्तर दिले हे येशूला समजले. तर तो त्याला म्हणाला, “तू खूप जवळ आहेस जेथे देव तुझ्यावर राज्य करण्यास तयार होईल.” त्यानंतर, त्याला विचलीत करणारे प्रश्न विचारण्यास यहूदी पुढारी घाबरून गेले.
\s ख्रिस्त दावीदाचा पुत्र व प्रभू
\s5
\p
\v 35 नंतर, ज्यावेळेस येशू मंदिराच्या भागात शिकवत होता, तो लोकांना म्हणाला, “ही माणसे जे यहूदी नियमशास्त्र शिकवतात, ते चुकीचे असू शकतात जेव्हा ते म्हणतात येशू फक्त दावीदाचा मानवी वंशज आहे.
\v 36 पवित्र आत्म्याने दावीदाला स्वतः ख्रिस्ता विषयी बोलण्यासाठी भाग पाडले, “देव माझ्या प्रभूला म्हणाला, “माझ्या उजव्या बाजूच्या हाताशी बस, त्या ठिकाणी मी सर्वांपेक्षा तुझा मोठा आदर करेन! तुझ्या वैऱ्यांना पूर्णपणे पराजित करेपर्यंत इथे बस!”’
\v 37 म्हणून, दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘माझा प्रभू’ म्हणून बोलवतो! ख्रिस्त दावीदाच्या वंशजातून आलेला फक्त मनुष्य नव्हे तर! तो दावीदा पेक्षा महान आहे!” जसे त्याने त्या गोष्टी शिकवल्या पुष्कळ लोकांनी आनंदाने ऐकले.
\s शास्त्र्यांसंबंधाने इशारा
\s5
\p
\v 38 येशू लोकांना शिकवत असता, तो त्यांना म्हणाला, “जी माणसे आमच्या नियमाप्रमाणे वागत नाहीत त्यांच्या पासून सावध राहा. लोकांनी त्यांचा आदर करावा असे त्यांना वाटते, मग ते लांब झगे घालतात आणि ते किती विशेष आहेत हे लोकांना दाखविण्यासाठी ते बाहेर फिरतात. बाजारामध्ये लोकांनी त्यांना आदराने सलाम करावा असे देखील वाटते.
\v 39 त्यांना सभास्थानामध्ये अति विशेष जागेवर बसण्यास आवडते, सणाच्या दिवशी, जेथे अति आदरणीय लोक बसतात त्या जागेवर बसण्यास आवडते.
\v 40 विधवांची फसवणूक करून त्यांची घरे आणि संपत्ती मिळऊन घेतात. लोकांमध्ये मोठी प्रार्थना करून ते चांगले आहेत याचे ढोंग करतात. देव त्यांना निश्चितच कठोर शिक्षा देईल!”
\s विधवेने केलेले दान
\s5
\p
\v 41 नंतर, येशू मंदिराच्या क्षेत्रात ज्या डब्यांमध्ये लोक दान टाकतात त्याच्या समोरच बसला. जसा तो तेथे बसला होता, ते त्या डब्यांपैकी एकात पैसे टाकत असता तो त्यांचाकडे पाहत असे. पुष्कळ श्रीमंत लोकांनी मोठ्या रक्कमेचे पैसे टाकले.
\v 42 नंतर एक गरीब विधवा आली तिने दोन तांब्याची नाणी आत टाकली, ज्याची खूप कमी किंमत होती.
\s5
\v 43-44 येशूने त्याच्या शिष्यांना गोळा केले आणि त्यांना म्हणाला, “खरे तर हे आहे ज्या इतर लोकांकडे पुष्कळ पैसे आहेत, परंतु त्यांनी त्यातला छोटासा भाग दिला आहे. परंतु ही स्त्री, जी फार गरीब आहे, आजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जितके पैसे होते ते सर्व तिने टाकून दिले. तर ह्या गरीब विधवेने इतरांपेक्षा जास्त पैसे डब्यात टाकले आहे.
\s5
\c 13
\s देवाच्या भवनाची धूळधान व युगाची समाप्ती याविषयी येशूचे भविष्य
\p
\v 1 येशू मंदिराचे क्षेत्र सोडत असता, त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याला म्हटले, “गुरूजी, पाहा ते विशाल धोंडे किती विस्मयकारक आहेत आणि इमारती देखील किती सुंदर आहेत!”
\v 2 येशू त्याला म्हणाला, “होय, ज्या इमारतीकडे तू पहात आहेस त्या विस्मयकारक आहेत, परंतु तुला त्यांच्या विषयी काहीतरी सांगू इच्छित आहे. त्यांचा पूर्णपणे नाश होणार आहे. ह्या मंदिरातले कोणतेही धोंडे एकावर एक टिकून राहणार नाहीत.
\s5
\p
\v 3 मंदिराच्या खोऱ्यातून ते जैतूनाच्या डोंगरावर पोहंचल्यावर, येशू तेथे बसला. जेव्हा पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया त्याबरोबर एकटे होते, त्यांनी त्याला विचारले,
\v 4 “आम्हांला सांग, मंदिराच्या इमारती सोबत हे कधी घडणार आहे? या सर्व गोष्टी लवकरच घडून येतील याचा अर्थ काय होईल? ते आम्हांला सांगा.
\s5
\p
\v 5 येशूने त्यांना उत्तर दिले, “काय घडणार आहे ह्या विषयी तुम्हाला कोणीही बहकू नये म्हणून सावध राहा!
\v 6 मी त्यांना पाठवले आहे असे पुष्कळ लोक येऊन सांगतिल. ते म्हणतील ‘मी ख्रिस्त आहे! ते पुष्कळ लोकांना बहकवून टाकतील.
\s5
\p
\v 7 सैनिक युद्ध लढत आहे असा आवाज ज्या वेळेस तुम्ही ऐकता, किंवा ज्या वेळेस तुम्ही दूरच्या युद्धांविषयी वार्ता ऐकता, तेंव्हा भयभीत होऊ नका. ह्या गोष्टी निश्चितच घडणार आहेत. परंतु ज्या वेळेस असे घडेल, देवाने नियोजित केलेल्या सर्व गोष्टी त्यावेळी संपवून टाकेल असे समजू नका!
\v 8 विविध देशांमध्ये राहणारे गट आपसामघ्ये भांडण करतील, आणि विविध राजे आणि पुढारी आपसामध्ये भांडतील. पुष्कळ जागी भूकंप देखील होतील, दुष्काळ पडणार आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतील, लोक फक्त दु:ख सहन करण्यास सुरूवात करतील. हे प्रथम त्रास असे असतील ज्याप्रमाणे स्त्री प्रथम बाळाला जन्म देत असतांना त्रास होतो त्याचप्रमाणे होईल. त्यानंतर त्यांना अधिक त्रास सहन करावा लागेल.
\s5
\p
\v 9 त्या वेळी लोक तुमच्यासोबत काय करतील त्यासाठी तुम्ही तयार असा. ते तुम्हाला कैद करतील आणि गटांच्या पुढाऱ्यांना समोर उभे करून ते तुमची परीक्षा घेतील. लोक तुम्हाला विविध सभास्थानात मारतील. उच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते तुम्हाला परीक्षेत पडतील. परिणामी, तुम्ही माझ्या विषयी त्यांना सांगू शकाल.
\v 10 देवाने नियोजन केल्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी संपविण्यापूर्वी माझे अनुकरण करणाऱ्यांनी सर्व राज्यातील लोकांना शुभवर्तमानाचा प्रचार करावा.
\s5
\p
\v 11 जेव्हा लोक तुम्हाला कैद करतील, तुम्ही काय बोलावे ह्याची चिंता करू नका, त्या ऐवजी, तेच बोला जे देव तुमच्या मनात त्यावेळी टाकेल. मग ते फक्त तुम्ही बोलता असे होणार नाही. तो पवित्र आत्मा असणार जो तुमच्या द्वारे बोलणार आहे.
\v 12 काही बंधू भगिनी इतर बंधू भगिनींसोबत विश्वासघात करतात. काही वडील आपल्या मुलांना फसवतात. काही मुले आपल्या पालकांचा विश्वासघात करतील जेणेकरून सरकारी अधिकारी त्यांच्या पालकांना मारतील.
\v 13 माझ्यावर विश्वास करता म्हणून पुष्कळ लोक तुम्हाला नाकारतील. परंतु तुमच्या जीवनाचा अंत होईपर्यंत तुम्ही निरंतर माझ्यावर विश्वास करत राहा, तुमचे तारण होईल.
\s5
\p
\v 14 त्यावेळी, भयंकर गोष्टी मंदिरात घडतील. ते मंदिर भ्रष्ट होईल आणि लोक त्याला बंद करण्यास कारणीभूत होतील. त्या वेळेस तुम्ही हे पाहायला नसायला पाहिजे, तुम्ही लवकर पळून जावे! (जे कोणी हे वाचत आहेत त्यांनी ह्या चेतावनीवर लक्ष द्यावे) त्यावेळी जे यहूदी जिल्ह्यातील लोक आहेत त्यांनी उंच डोंगरांवर पळून जावे.
\v 15 जे लोक स्वतःच्या घरांच्या बाहेर आहेत त्यांनी काहीसुध्या घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊ नये.
\v 16 जे मळ्यात काम करीत आहेत ते अतिरिक्त कपडे मिळविण्यासाठी त्यांच्या घरात त्यांनी परत जाऊ नये.
\s5
\p
\v 17 त्या दिवसांमध्ये ज्या स्त्रिया गर्भवती राहतील आणि ज्या स्त्रिया लेकरांना दुध पाजतील त्यांच्या विषयी मला फार वाईट वाटत आहे, कारण त्यांना पळण्यासाठी फार त्रास होईल!
\v 18-19 त्या दिवसांमध्ये लोक फार कठीण त्रास सहन करतील. आणि देवाने सृष्टीची रचना केली तेव्हापासून आतापर्यंत कोणीही पिडा सहन केली नसेल; भविष्यात ही कोणी केली नसेल. म्हणून प्रार्थना करा की हिवाळ्यात हा त्रासदायक काळ येऊ नये कारण तेंव्हा प्रवास करणे कठीण होईल.
\v 20 ज्या वेळी लोक जास्त त्रासात ग्रस्त होते आणि जर देवाने ती वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला नसता, तर सर्व मेले असते. परंतु त्याने कमी वेळ करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला त्याच्या निवडलेल्या लोकांविषयी कळवळा होता.
\s5
\p
\v 21-22 त्या वेळी जे लोक खोटे बोलतील की तो मी आहे, म्हणजे ख्रिस्त आणि काहीजण देवाचे संदेष्टे म्हणून प्रगट होतील. नंतर ते पुष्कळ चमत्कार सादर करतील. देवाने ज्यांना निवडले त्यांनाही बहकवून टाकण्याचा प्रयत्न करतील. मग त्यावेळेस जर तुम्हाला कोणी म्हणतील, ‘पाहा,ख्रिस्त येथे आहे! किंवा जर कोणी असे म्हटले, ‘तो तेथे आहे! त्यावर विश्वास ठेऊ नका!
\v 23 सावध राहा! हे घडण्याअगोदर मी तुम्हाला चेतावनी दिली हे लक्षात ठेवा!
\s5
\p
\v 24 लोकांनी अशा प्रकारे सहन केल्यानंतर, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र चमकणार नाही;
\v 25 तारे आकाशातून पडतील, आणि आकाशातील सर्व शक्तिशाली गोष्टी त्यांच्या जागे वरून सरकतील.
\v 26 मग लोक मला, म्हणजे मनुष्याचा पुत्राला पहातील, जो ढगातून सामर्थ्याने आणि महिमेने येत आहे.
\v 27 मग ज्या लोकांना देवाने निवडलेले आहे त्यांना जगाच्या दूर ठिकाणाहून सगळीकडून एकत्र करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना पाठवीन.
\s जागृतीची आवश्यकता
\s5
\p
\v 28 अंजिराचे झाड कशा प्रकारे वाढते ह्या विषयी तुम्ही काहीतरी शिकावे अशी माझी इच्छा आहे. जेव्हा त्याच्या फांद्यांना हिरवळ उगवेल आणि पाने फुटू लागतील, तेव्हा तुम्हाला कळून येईल की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
\v 29 त्याचप्रमाणे, ज्या घडणाऱ्या गोष्टीचे मी वर्णन केले आहे, माझे येणे फार जवळ आहे हे तुम्हाला स्वतः समजून येईल, मी दाराशी उभा आहे.
\s5
\p
\v 30 हे लक्षात ठेवा: जो पर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तो पर्यंत ही पिढी मरणार नाही.
\v 31 ह्या गोष्टी घडणारच आहे ह्याची खात्री तुम्ही बाळगू शकता. ही पृथ्वी आणि जे काही आकाशात आहे ते नष्ट होतील, परंतु ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या निश्चितच होणार आहेत.
\v 32 परंतु मी केव्हा येईन ह्याची योग्य वेळ कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही माहीत नाही. मी जो देवाचा पुत्र आहे मला देखील, ठाऊक नाही. फक्त माझ्या पित्याला ठाऊक आहे.
\s5
\p
\v 33 मग आता तयार असा! सर्वदा सावध असा. कारण तुम्हाला ठाऊक नाही ती वेळ कधी येईल जेव्हा हे सगळे घडेल!
\v 34 जेव्हा एक मनुष्य आपले घर सोडून लांब प्रवासाला जातो, तो त्याच्या दासांला घराचे व्यवस्थापण करण्यास सांगतो. तो प्रत्येकाला सांगतो त्याने काय करावे. मग तो द्वारपालाला सांगतो मी परत येईन तो पर्यंत सावध राहा.
\s5
\v 35 त्या मनुष्याने सर्वदा तयार असावे, कारण त्याला ठाऊक नाही त्याचा मालक कदाचित संध्याकाळी, मध्य रात्री येईल, कोंबडा आरवल्यावर किंवा पहाटेस. ह्याचप्रमाणे, तुम्ही देखील सर्वदा तयारीत असा, कारण तुम्हाला ठाऊक नाही मी कधी परत येणार.
\v 36 मी येईन तेव्हा तुम्ही तयारीत असणार नाही असे होऊ नये!
\v 37 जे शब्द मी तुम्हा शिष्यांना सांगत आहे ते सर्वांसाठी आहे, सर्वदा तयार असा!”
\s5
\c 14
\s येशूला धरण्याविषयी अधिकाऱ्यांची मसलत
\p
\v 1 एक आठवडाभर चालणारा वल्हांडण नावाचा सण साजरा करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक होता. त्या दिवसांमध्ये ते आणखी एक सण साजरा करत असत. त्या सणाला ते खमिर न घातलेल्या भाकरीचा सण असे म्हणत असत. मुख्य याजक आणि यहूदी नियमशास्त्र शिकवणारे लोक येशूला गुप्तपणे अटक कशी करावी आणि त्याला ठार कसे करावे याविषयीची योजना आखत होते.
\v 2 परंतु ते एकमेकांना असे म्हणत होते की, “आपण हे कार्य सणाच्या दिवसांमध्ये करू नये कारण तसे केले तर लोक आपल्यावर खूप रागावतील आणि कदाचित दंगल घडेल.”
\s बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
\s5
\p
\v 3 येशू बेथानी या गावामध्ये शिमोनाच्या घरी होता त्याला कोडी देखील म्हणत असत. ते जेवण करत असतांना एक स्त्री त्याच्याकडे आली. तिच्या हातामध्ये एक दगडाची बरणी होती आणि त्या बरणीमध्ये अतिशय मोलवान सुगंधित अत्तर होते ज्याचे नाव जटामांसी असे होते. तिने ती बरणी उघडली आणि त्यातील सर्व अत्तर येशूच्या डोक्यावर ओतले.
\v 4 तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांना राग आला आणि ते स्वतःशी असे म्हणाले, “त्या अत्तराची किती नासधूस केली आहे!”
\v 5 ते कदाचित वर्षभराच्या मजुरी एवढ्या किमतीत विकता आले असते आणि त्यातून जो पैसा आला असता तो गरीब लोकांना देता आला असता!”म्हणून त्या लोकांनी तिला रागावले.
\s5
\p
\v 6 परंतु येशू म्हणाला, “तिला रागावणे बंद करा! तिने माझ्यासाठी जे काही केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मी मानतो. म्हणून तुम्ही तिला अधिक त्रास देऊ नका.
\v 7 तुम्हामध्ये गरीब लोक तर नेहमीच असणार आहेत. म्हणून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. परंतु मी येथे तुम्हासोबत फार जास्त वेळ राहणार नाही.
\v 8 तिला जे करावयाचे होते ते तिने अतिशय योग्य असे केले आहे. मी लवकरच मरणार आहे. हे जणू काय तिला माहिती झाले आहे म्हणून तिने माझा देह पुरण्या अगोदरच तयार करण्यासाठी माझ्या शरीरावर अभिषेक केला आहे.
\v 9 मी तुम्हाला हे सांगतो: संपूर्ण जगामध्ये जेथे कोठे माझे अनुयायी शुभवर्तमानाची घोषणा करतील ते त्या-त्या ठिकाणी हिने माझ्यासाठी काय केले तेही सांगतील आणि लोक तिची आठवण करतील.”
\s यहूदाची फितुरी
\s5
\p
\v 10 मग यहूदा इस्कार्योत हा मुख्य याजकाकडे गेला आणि येशूला कसे धरून देता येईल यात कशा प्रकारे त्यांची मदत होऊ शकते याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली. तो येशूच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य असूनही त्याने हे कार्य केले!
\v 11 मुख्य याजकांनी हे ऐकले तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. कारण तो त्यांना मदत करण्यास इच्छा दर्शवत होता. त्याच्या मोबदल्यात ते एक मोठी पैशांची रक्कम त्याला देतील. यहूदा त्याला मान्य झाला आणि येशूला त्यांच्या हाती देण्याची संधी तो पाहू लागला.
\s शेवटले भोजन
\s5
\p
\v 12 सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्याला बेखमीर भाकरीचा सण असे म्हणतात. त्या दिवशी ते वल्हांडणाकरीता एका कोकऱ्याला ठार करतात, येशूचे शिष्य त्याला म्हणाले “वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी आम्ही कोठे जावे आणि आपणासाठी जेवण तयार करावे अशी तुझी इच्छा आहे?”
\v 13 मग येशूने आपल्या शिष्यांपैकी दोघांना तयारी करण्यासाठी निवड केली. तो त्यांना म्हणाला, “यरूशलेमेत जा. एक मनुष्य तेथे तुम्हाला भेटेल त्याच्या हातामध्ये पाण्याने भरलेला एक मोठे रांजन असेल. त्याच्या मागे जा.
\v 14 तो जेव्हा एका घरात शिरेल तेव्हा त्या घराच्या मालकाला असे म्हणा आम्हा शिष्यांसोबत वल्हांडणाचे भोजन करावे अशी आमच्या गुरुजींची इच्छा आहे. त्या करीता तू आम्हांला खोली दाखव.
\s5
\p
\v 15 घराच्या वरच्या माळ्यावरील एक मोठी खोली तो तुम्हाला दाखवेल. ती खोली तयार केलेली आहे आणि तेथे आपण जेवण करू शकतो. मग तेथे तुम्ही आपल्यासाठी जेवण तयार करा.”
\v 16 अशा रितीने ते दोन शिष्य कार्य करण्यास पुढे गेले. ते शहरात गेले आणि त्याने त्यांना जे सर्व सांगितले होते तसेच त्यांना आढळले. वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी तेथे भोजन तयार केले.
\s5
\p
\v 17 संध्याकाळ झाल्यानंतर येशू आपल्या बारा शिष्यांसहीत त्या घरी पोहोंचला.
\p
\v 18 बारा शिष्य तेथे बसून जेवण करत असतांना, येशू म्हणाला, “तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका: माझ्या शत्रूंनी मला अटक करावी यासाठी तुमच्यापैकी एक व्यक्ती त्यांना मदत करणार आहे. येथे माझ्यासोबत जेवणाऱ्यामध्येच तो एक व्यक्ती बसलेला आहे.”
\v 19 हे ऐकूण शिष्य अतिशय दुःखी झाले आणि ते त्याला एकामागून एक असे म्हणाले, “खात्रीने मी तो नाही!”
\s5
\p
\v 20 त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्हा बारा शिष्यांपैकी तो एक आहे, तो सध्या माझ्यासोबत ताटामध्ये भाकर मोडून घास खात आहे.
\v 21 मनुष्याच्या पुत्राने मरावे हे निश्चित केलेले आहे कारण हे माझ्याविषयी लिहिलेले आहे. परंतु जो मनुष्य माझा विश्वासघात करतो त्याच्यासाठी भयंकर शासन ठेवलेले आहे. त्याचा जन्मच झाला नसता तर फार बरे झाले असते!”
\s5
\p
\v 22 ते जेवण करत असतांना त्याने एका हातात भाकर घेतली आणि त्याबद्दल देवाचे आभार मानले. त्यानंतर तिचे तुकडे-तुकडे केले आणि त्यांना दिले आणि तो त्यांना म्हणाला, “ही भाकर माझे शरीर आहे. ही घ्या आणि ती खा.”
\v 23 हे झाल्यानंतर ज्या प्यालामध्ये द्राक्षरस होता तो त्याने घेतला आणि त्यासाठी त्याने देवाचे आभार मानले. मग त्याने तो प्याला त्या सर्वांना दिला आणि ते सर्व त्यातून प्याले.
\v 24 तो त्यांना म्हणाला, “हा द्राक्षरस माझे रक्त आहे. माझे शत्रू मला ठार करतील तेव्हा ते वाहणार आहे. देवाने बऱ्याच लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी जो करार तयार केला आहे तो माझ्या रक्ताने निश्चित केला जाईल.
\v 25 तुम्ही हे जाणावे अशी माझी इच्छा आहे. देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल तेव्हा मी द्राक्षरस पेईन तो पर्यंत मी द्राक्षारस पिणार नाही.”
\s5
\p
\v 26 त्यानंतर त्यांनी एक गीत गायले आणि ते जैतूनांच्या डोंगराकडे निघून गेले.
\s शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य
\p
\v 27 ते आपल्या मार्गामध्ये असतांना येशूने त्यांना म्हटले, देव माझ्याविषयी जे काही म्हणाला ते त्यांनी शास्त्रलेखात लिहून ठेवले आहे, ‘मी मेंढपाळांना ठार करेन आणि मेंढरांची दाणादाण होईल. माझ्याविषयी लिहून ठेवण्यात आलेले हे शब्द खरे ठरतील. तुम्ही मला सोडून पळून जाल.
\s5
\p
\v 28 परंतु देव जेव्हा मला पुन्हा जिवंत करेल मी तुम्हापुढे गालील जिल्ह्यात जाईन आणि तेथे मी तुम्हाला भेटेन.”
\v 29 मग पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, “कदाचित सर्व शिष्य तुला सोडून देतील परंतु मी सोडणार नाही! मी तुला कधीही सोडणार नाही!”
\s5
\p
\v 30 मग येशूने त्याला म्हटले, “परंतु खरे हे आहे, की आज रात्री कोंबडा दोनदा आरवण्यापूर्वी तू मला ओळखत नाहीस असे तीनदा तू माझा नाकार करशील!”
\v 31 परंतु पेत्र त्याला जोर देऊन हे सांगू लागला की, “त्यांनी मला ठार जरी केले तरी मी तुला ओळखत नाही असे नाकारणार नाही!” आणि इतर सर्व शिष्यांनी ही असेच म्हटले.
\s गेथशेमाने बागेत येशू
\s5
\p
\v 32 त्या मार्गाने पुढे जात असतांना लोक ज्याला गेथशेमाने असे म्हणतात. त्या ठिकाणी येशू आणि त्याचे शिष्य येऊन पोहोंचले. मग तो त्याच्या शिष्यांना असे म्हणाला, “मी प्रार्थना करत आहे तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा!”
\v 33 मग त्याने पेत्र याकोब आणि योहानाला आपल्यासोबत घेतले. आणि तो अतिशय तळमळला.
\v 34 तो त्यांना म्हणाला, “मी अतिशय दुःखी झालो आहे. मी मरत आहे की काय इतक्या प्रमाणात मी दुःखी आहे. तुम्ही पुरूष येथे थांबा आणि लक्ष ठेवा!”
\s5
\p
\v 35 तो आणखी थोडा पुढे गेला आणि तो जमिनीवर पालथा पडला. आणि मग त्याने प्रार्थना केली की शक्य असल्यास त्याला दुःख सहन करावे लागू नये.
\v 36 तो म्हणाला, “हे माझ्या बापा, तुला सर्व काही करणे शक्य आहे, मला ह्या वेदनेला सामोरे जावे लागू नये म्हणून मला आता सोडव! परंतु माझ्या इच्छेप्रमाणे करू नकोस. त्याऐवजी तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण कर!”
\s5
\p
\v 37 मग तो परत आला आणि त्याचे शिष्य झोपलेले आहेत असे त्याला दिसले. त्याने त्यांना झोपेतून उठवले आणि तो त्यांना म्हणाला, “शिमोना, तू झोपत आहेस काय? तू थोडा वेळासाठी ही जागा राहू शकला नाहीस?”
\v 38 आणि तो त्यांना म्हणाला, “मी जे म्हणतो ते तुम्हाला करावेसे वाटते परंतु तुम्ही शरीराने अशक्त आहात. म्हणून तुम्ही जागे राहा आणि प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडाल तेव्हा तुम्हाला विरोध करता येईल!”
\v 39 म्हणून तो पुन्हा परत गेला आणि त्याने आधी जी प्रार्थना केली होती तिच प्रार्थना पुन्हा केली.
\s5
\p
\v 40 जेव्हा तो परत आला. तेव्हा त्याला ते पुन्हा झोपी गेलेले दिसले. त्यांना ऐवढी झोप आली होती की ते आपले डोळे ही उघडू शकले नाही. जेव्हा त्याने त्यांना झोपेतून जागे केले त्यावेळेस त्यांना ऐवढी लाज वाटली की त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेनासे झाले.
\v 41 मग तो पुन्हा परत गेला आणि त्याने पुन्हा प्रार्थना केली. तीसऱ्या वेळेस जेव्हा तो परत आला तेव्हा ते त्याला पुन्हा झोपी गेलेले दिसले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आताही झोपलेले आहात काय? ही त्याची वेळ नाही. माझे दुःख सहन करण्याच्या वेळेची सुरूवात होत आहे. पाहा! मनुष्याचा पुत्र धरून देण्यात यावा यासाठी पापी लोकांना कोणीतरी सहाय्य करणार आहे.
\v 42 म्हणून आता ऊठा! चला आता जाऊया! पाहा! मला धरून देण्यासाठी मदत करणारा आला आहे!”
\s येशूला अटक
\s5
\p
\v 43 तो हे बोलत असतांनाच यहूदा तेथे पोहचला. येशूच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य तो होता असे असूनही येशूच्या शत्रूंनी येशूला धरून द्यावे यासाठी तो त्यांना मदत करत होता. त्याच्यासोबत लोक तलवारी व भाले घेऊन आले होते. यहूदी सभास्थानाच्या पुढाऱ्यांनी त्या मनुष्यांना पाठवले होते.
\v 44 येशूचा विश्वासघात करणाऱ्या यहूदाने त्या लोकांच्या समुदायाला अगोदरच सांगून ठेवले होते की, “तुम्हाला ज्या व्यक्तिला धरायचे आहे, मी त्या व्यक्तीचे चुंबन घेईन. जेव्हा मी त्याचे चुंबन घेईन तेव्हा तुम्ही त्याला धरा आणि दूर घेऊन जा.”
\v 45 यहूदा येशूला धरण्यासाठी आला असता लगेचच तो येशूच्या जवळ गेला आणि त्याने म्हटले, “अहो गुरूजी!” आणि मग त्याने येशूचे चुंबन घेतले.
\v 46 मग त्या लोकांनी येशूला पकडले.
\s5
\p
\v 47 परंतु त्यांच्या जवळच उभ्या असणाऱ्या येशूच्या शिष्यांपैकी एकाने आपली तलवार ऊपसली आणि मुख्य याजकाच्या एका सेवकावर त्याने हल्ला केला, तो वार केल्यामुळे त्याचा केवळ कान कापल्या गेला.
\v 48-49 येशूने त्यांना म्हटले, “मी जणुकाय एखादा दरोडेखोर आहे असा समज करून तुम्ही मला पकडण्यासाठी तलवारी आणि भाले घेऊन येता हे किती वेडेपणाचे आहे. दररोज मंदिराच्या अंगणामध्ये मी लोकांना शिकवत होतो! तुम्ही मला तेव्हा का अटक केली नाही? परंतु हे सर्व यासाठी घडत आहे, की संदेष्ट्यांनी शास्त्रलेखांमध्ये माझ्या विषयी लिहिलेले सर्व काही खरे व्हावे.”
\p
\v 50 त्या वेळेस त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
\s5
\p
\v 51 त्या वेळेस एक तरुण येशूच्या मागे मागे चालत होता. त्याने त्याच्या शरीराभोवती केवळ एक तागाचे वस्त्र गुंडाळलेले होते. लोकांनी त्याला धरले, तेव्हा
\v 52 त्यांच्यापासून दूर पळून जाण्यासाठी त्याने स्वतःला झटका दिला आणि त्यांच्या हाती तागाचे वस्त्र मागे राहिले आणि तो नग्न अवस्थेतच पळून गेला.
\s मुख्य याजकांसमोर येशूची चौकशी
\s5
\p
\v 53 ज्या लोकांनी येशूला पकडले होते ते त्याला घेऊन मुख्य याजकाच्या घरी गेले. त्याच्या घरी यहूदी लोकांची संपूर्ण धर्मसभा एकत्र झालेली होती.
\v 54 येशूच्या मागे मागे थोडे अंतर ठेवून पेत्र जात होता. मुख्य याजक ज्या घरात राहत असे त्याच्या घराच्या अंगणात पेत्र गेला आणि मुख्य याजकाच्या घराचे रक्षण करणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसला. शेकोटीच्या बाजुला बसून तो स्वतःला शेकत होता.
\s5
\p
\v 55 येशूला ठार करावे या उद्देशाने यहूदी धर्मसभेच्या लोकांनी येशूविषयी खोटे बोलणारे काही लोक जमवले होते. त्या धर्मसभेत मुख्य याजक आणि इतर यहूदी पुढारी होते. परंतु त्यांना यश येत नव्हते,
\v 56 कारण अनेक लोकांनी जरी त्याच्याविरुद्ध खोटे बोलले असले तरीही त्यांचे ते बोलणे ऐकमेकांसोबत विसंगत होते.
\s5
\v 57 शेवटी काही लोक उभे राहिले आणि त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले व असे म्हणाले,
\v 58 “तो बोलत असतांना आम्ही त्याला असे म्हणतांना ऐकले आहे, “मनुष्यांनी बनवलेले हे मंदिर मी तोडून टाकेन आणि कोणाची ही मदत न घेता मी दुसरे एक मंदिर केवळ तीन दिवसात पुन्हा एकदा उभारेन.”
\v 59 परंतु यांच्यापैकी काही लोक जे काही बोलत होते त्यांच्याशी इतर लोक सहमत नव्हते.
\s5
\p
\v 60 शेवटी मुख्य याजक स्वतः त्यांच्यासमोर उभा राहिला आणि येशूला तो म्हणाला, “तू यांना प्रत्युत्तर देणार नाही काय? तुझ्यावर आरोप करण्यासाठी ते जे काही गोष्टी म्हणत आहेत त्या सर्वांविषयी तुझे काय म्हणणे आहे?”
\v 61 परंतु येशू ख्रिस्त शांत राहिला आणि त्याने काहीही उत्तर दिले नाही. मग मुख्य याजकाने पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याने त्याला विचारले, “तू ख्रिस्त आहेस काय? तू देवाचा पुत्र आहेस असे तू म्हणतोस?”
\v 62 येशू म्हणाला, “मी आहे. आणखी तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मला देवाच्या सोबत जो सर्वशक्तीमान आहे, त्याच्या सोबत राज्य करतांना पाहाल. आकाशातील ढगांवर बसून मी उतरत असतांना देखील तुम्ही मला पाहाल!”
\s5
\p
\v 63 येशूचे हे शब्द ऐकल्यावर मुख्य याजक इतका आश्चर्यचकीत झाला की त्याने आपली बाह्य वस्त्रे फाडली. आणि मग तो म्हणाला, “ह्या मनुष्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी आता आम्हांला आणखी मनुष्याची गरज नाही,
\v 64 कारण त्याने देवाच्या विरुद्ध काय बोलले हे तुम्ही आताच ऐकले आहे! त्याने देवाविरुद्ध दुष्ट गोष्टी बोलल्या आहेत! म्हणून तुम्ही आता काय निर्णय घेणार?” ते सर्वजण म्हणाले की येशू दोषी आहे आणि त्याला मरण दंडाची शिक्षा व्हावी यास तो पात्र आहे.
\v 65 मग त्यांच्यापैकी काही लोक येशूवर थुंकू लागले. त्यांनी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याला ते मारू लागले आणि त्यांनी त्याला म्हटले, “जर तू संदेष्टा आहेस तर तुला कोणी मारले ते आम्हांला सांग!” येशूची राखण करणाऱ्या लोकांनी आपल्या हातांनी येशूला मारले.
\s पेत्र येशूला नाकारतो
\s5
\p
\v 66 मुख्य याजकाच्या घराच्या बाहेर अंगणात पेत्र बसलेला असता त्या मुख्य याजकाच्या घरात काम करणारी एक मुलगी त्याच्या जवळ आली.
\v 67 शेकोटीच्या बाजूला बसून पेत्र शेकत असतांना तिने त्याला निरखून पाहिले. नंतर ती म्हणाली, “नासरेथचा तो मनुष्य येशू ह्याच्या सोबत तू देखील होता!”
\v 68 परंतु त्याने ते नाकारले आणि तो म्हणाला, “तू कशाविषयी बोलत आहेस ते मला ठाऊक नाही! त्यापैकी मला काहीही समजत नाही.” मग तो तिथून उठला आणि अंगणाच्या बाहेरील दरवाज्याजवळ जाऊन तो उभा राहिला.
\s5
\p
\v 69 ती काम करणारी मुलगी पुन्हा एकदा त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला पाहिले व ती आजूबाजूच्या उभ्या असलेल्या लोकांना म्हणाली, “ज्या माणसाला त्यांनी अटक केली आहे त्या मनुष्यासोबत हा पुरुष देखील मी पाहिलेला आहे.”
\v 70 परंतु त्याने पुन्हा एकदा नकार दिला. थोड्या वेळानंतर त्याच्या अवतीभोवती जे लोक उभे होते ते पेत्राला म्हणाले, “तू देखील गालीली या ठिकाणचा आहेस. येशूच्या सोबत जे लोक होते त्यांच्यापैकी तू देखील एक आहेस हे निश्चित खरे आहे.”
\s5
\p
\v 71 परंतु तो जर खरे बोलत नसेल तर देव त्याला शिक्षा करो असे तो म्हणू लागला, तो म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात मी त्याला ओळखत नाही!”
\v 72 त्याचवेळेस कोंबडा दुसऱ्यांदा आरवला. त्यानंतर येशूने काय म्हटले होते ते पेत्राला आठवले. “कोंबडा दोनदा आरवण्यापूर्वी तू तीन वेळेस मला ओळखण्यास नकार देशील” त्याने येशूचा तीनदा नाकार केला आहे हे त्याला जाणवू लागले आणि तो रडू लागला.
\s5
\c 15
\s रोमन सुभेदार पिलातासमोर येशू
\p
\v 1 अगदी पहाटेच मुख्य याजक व इतर यहूदी परिषद एकमेकांना भेटले की, कशा प्रकारे येशूवर रोमी राज्यपाल समोर दोष लावण्यात येईल. त्यांच्या सैनिकांनी येशूचे हात परत बांधले. पिलात जो राज्यपाल आहे त्याच्या राहण्याच्या जागी ते त्याला घेऊन गेले.
\v 2 पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस असे तू म्हणतोस?”येशूने उत्तर दिले, “तुम्ही स्वतः असे म्हंटले होते.”
\v 3 मग येशूने फार वाईट कामे केले असे मुख्य याजकांनी घोषणा केली.
\s5
\p
\v 4 पिलाताने त्याला परत विचारले, “तुला उत्तर देण्यासाठी काहीच नाही?”
\v 5 परंतु येशूने अधिक काहीच नाही म्हटले. परिणामी पिलाताला फार आश्चर्य वाटले.
\s5
\p
\v 6 आता ही राज्यपालची परंपरा आहे की वल्हांडणच्या उत्सवात एका व्यक्तीला तुरुंगातून सोडण्यात येईल. लोकांच्या विनंती नुसार तो सहसा एका कैदीला सोडायचा.
\v 7 त्या वेळी एक बरब्बा नावाचा व्यक्ती इतर माणसा सोबत तो तुरुंगात होता. रोमन सरकारच्या विरोधात बंडखोरपणा केल्यावर त्यांने खून केला होता.
\v 8 समुह पिलाताकडे आले आणि पुर्वी केल्याप्रमाणे कोणा एकाला सोडून द्यावे म्हणून विचारले.
\s5
\p
\v 9 पिलाताने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही लोक ज्याला राजा समजता मी त्याला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?”
\v 10 त्यांने हे विचारले कारण त्याला समजून आले मुख्य याजकांची काय इच्छा आहे. ते येशूला दोषी ठरवत होते कारण त्याच्याशी ते जळत होते कारण पुष्कळ लोक त्याचे शिष्य होत होते.
\v 11 परंतु मुख्य याजकांनी जमावास विनंती केली की त्यांनी पिलाताला येशूच्या ऐवजी बरब्बाला सोडण्याची विनंती करावी.
\s5
\p
\v 12 पिलात त्यांना म्हणाला, “जर मी बरब्बाला सोडले, तुम्हाला काय हवे आहे की मी ह्या राजा सोबत करावे”
\v 13 मग ते परत ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका!”
\s5
\p
\v 14 पिलात त्यांना म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु ते अधिक जोराने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका!”
\v 15 म्हणून लोकांना संतुष्ट करण्यासाठी पिलाताने बरब्बाला सोडून दिले. मग त्याच्या सैनिकांनी येशूला फटके मारले; त्या नंतर, पिलाताने त्यांना सांगितले त्याला घेऊन जा आणि त्याला वधस्तंभावर खिळून टाका.
\s शिपाई येशूची थट्टा करतात
\s5
\p
\v 16 शिपायांनी येशूला आपल्या अंगणात बराकमध्ये नेले. मग जे तेथे काम करत होते त्यांच्या सर्व गटाला त्यांनी तेथे बोलवले.
\v 17 शिपाई एकत्र जमल्यावर, त्यांनी जांभळा रंगाचा झगा येशूवर टाकला. त्यांनी त्याच्या डोक्यात विणलेल्या काट्यांचा मुकुट घातला.
\v 18 नंतर त्यांनी त्याची टिंगल करण्याकरीता, राजासारखे त्याचे स्वागत केले; ते म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुमचे स्वागत आहे!”
\s5
\p
\v 19 त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारत राहिले आणि त्याच्यावर थुंकले. त्याच्या समोर गुडघे टेकून नमन केले. आदर दाखवण्याचे ढोंग त्यांनी केले.
\v 20 त्याची निंदा करणे संपल्यावर, त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळा रंगाचा झगा ओढून काढला. त्यांनी त्याचेच कपडे त्याला घातले, आणि वधस्तंभावर खिळण्यासाठी त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले.
\s येशूला वधस्तंभावर खिळतात
\p
\v 21 आता शिमोन नावाचा एक कुरेनेकर व्यक्ती आला. तो अलेक्सांद्र व रुफ ह्यांचा बाप होता. शहराच्या बाहेरून येतांना तो तेथून जात होता. शिपायांनी शिमोनाला येशूचा वधस्तंभ घेऊन चालण्यास आग्रह केला.
\s5
\p
\v 22 शिपायांनी येशूसाठी वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी शिमोनाला भाग पाडले. शिपायांनी त्या दोघांना गुलगुथा नावाच्या जागेवर आणले. त्या नावाचा अर्थ, “कवटीची जागा.”
\v 23 त्यांनी बोळ मिसळलेला द्राक्षारस येशूला देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पिण्यास त्याने नकार दिला.
\v 24 काही शिपायांनी त्याचे कपडे घेतले. मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर, जुगार खेळून त्यांनी त्यांच्यामध्ये कपडे वाटून घेतले.
\s5
\p
\v 25 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.
\v 26 त्यांनी त्याला वधस्तंभावर का खिळिले ह्याचे कारण येशूच्या मस्तकावरती एक चिन्ह म्हणून लावण्यात आले, त्यावर “यहूद्यांचा राजा” असे लिहिले होते.
\v 27-28 त्यांनी दोन माणसांना देखील वधस्तंभावर खिळिले जे लुटारू होते. एकाला येशूच्या उजव्या बाजुच्या वधस्तंभावर आणि दुसऱ्याला डाव्या बाजुच्या वधस्तंभावर खिळले.
\s5
\p
\v 29 जे लोक तेथून जात होते ते त्यांचे मस्तक हलवून त्याचा अपमान करत होते. ते म्हणाले, “आहा! तू म्हणालास की तू मंदिराचा नाश करशील आणि तीन दिवसांत पुन्हा ते बांधशील.
\v 30 जर तू ते करू शकतो, तर वधस्तंभावरून खाली येऊन स्वतःला मुक्त कर!”
\s5
\p
\v 31 मुख्य याजक, जे यहूदी नियम शास्त्र शिकवितात यांना सोबत मिळून येशूची थट्टा करायची होती. मग ते आपसामध्ये बोलले, “त्याने दुसऱ्यांना त्रासातून वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही!
\v 32 तो म्हणाला, ‘मी ख्रिस्त आहे; मी तोच आहे जो इस्राएलांच्या लोकांवर राज्य करतो. जर हे शब्द सत्य आहेत, तर त्याने आताच वधस्तंभावरून खाली यावे! मग आम्ही विश्वास ठेवू!” त्याच्या बाजूला ज्या दोन माणसांना वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
\s येशूचा मृत्यु
\s5
\p
\v 33 दुपारच्या वेळी संपूर्ण भूमी अंधकारमय झाली, आणि दुपारचे तीन वाजेपर्यंत अंधकार होता.
\v 34 तीन वाजल्याच्या सुमारास येशू मोठ्याने ओरडला, “एलोई, एलोई लामा सबकथनी?” त्याचा अर्थ होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
\v 35 जेव्हा काही लोक येथे उभे होते त्यांनी ‘एलोई’ हा शब्द ऐकला, त्यांनी त्याला चुकीचे समजले आणि म्हणाले, “ऐका! तो एलीया संदेष्टाला बोलवत आहे!”
\s5
\p
\v 36 त्यांच्या पैकी एकजण धावत गेला आणि स्पंजला आंबट वाईनमध्ये बुडवून आणले. त्याने त्याला एका वेतावर ठेवले, आणि नंतर येशूने चोखण्यास प्रयत्न करावा म्हणून त्याने त्याला वर केले. तो म्हणाला, “थांबा! पाहूया की एलीया त्याला वधस्तंभावरून खाली काढण्यासाठी येईल!”
\v 37 आणि मग येशू मोठ्याने ओरडला, श्वास घेणे थांबले, आणि मरण पावला.
\v 38 त्याच वेळी पवित्र मंदिराचा पडदा वरून खालपर्यंत दोन भागात फाटला.
\s5
\p
\v 39 ज्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले होते त्या शिपाईयांची देखरेख करणारा एक अधिकारी येशू पुढे उभा होता. ज्या वेळेस त्याने पाहिले येशू कसा मेला. तो म्हणाला, “खरोखर, हा मनुष्य देवाचा पुत्र होता!”
\v 40-41 तेथे देखील काही स्त्रिया होत्या; हा प्रसंग त्यां दूर उभे राहून पहात होत्या. ज्यावेळेस येशू गालीलात होता त्या त्याच्या बरोबर होत्या, आणि त्याला जे पाहिजे होते ते त्यांनी त्याला दिले. त्या त्याच्या बरोबर यरुशलेमेस आल्या होत्या. त्या स्त्रियांपैकी मरीया ही मग्दालियामधली होती. त्या ठिकाणी दुसरी मरीया होती, जी लहान याकोब आणि योसे ची आई होती. सलोमी देखील तेथे होती.
\s येशूची उत्तरक्रिया
\s5
\p
\v 42-43 ज्यावेळेस संध्याकाळ जवळ होती, अरिमथाईचा योसेफ नावाचा एक मनुष्य तेथे आला. तो यहूदी परिषदेचा एक सदस्य होता, ज्याचा सर्व आदर करत असत. तो देखील वाट पाहत होता की देव कधी स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल. संध्याकाळ होत होती. शब्बाथाच्या दिवसा पूर्वीचा दिवस, ज्याला यहूदी तयारीचा दिवस म्हणतात. मग तो येशूचे शरीर लवकर वधस्तंभावरून खाली काढण्यासाठी धैर्याने परवानगी घेण्यास पिलाताकडे गेला.
\v 44 येशू मरण पावलेला आहे हे ऐकून पिलाताला आश्चर्य वाटले. मग ज्या सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले त्यांच्या अधिकाऱ्याला बोलावले, आणि विचारले येशू मरण पावला का?
\s5
\p
\v 45 ज्यावेळी अधिकाऱ्याने पिलाताला सांगितले की येशू मरण पावला आहे. पिलाताने योसेफाला येशूचे शरीर घेऊन जाण्यास परवानगी दिली.
\v 46 योसेफाने तागाचे कपडे विकत घेतल्यावर, त्याने आणि इतरांनी येशूचे शरीर वधस्तंभावरून खाली उतरवले. त्यांनी त्याला तागाच्या कापडात गुंडाळले आणि कबरेत नेले जी खडकात अगोदरच खोदलेली होती. मग त्यांनी एक मोठा सपाट धोंडा कबरेच्या समोरून लोटला.
\v 47 मग्दालियाची मरीया आणि याकोब आणि योसेची आई मरीया येशूचे शरीर कोठे ठेवले हे पहात होते.
\s5
\c 16
\s येशूचे पुनरुत्थान
\p
\v 1 शब्बाथ संपल्यावर, तेव्हा मग्दालियाची मरीया, लहान याकोबाची आई मरीया, आणि सलोमी यांनी येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधीत द्रव्ये विकत घेतली.
\v 2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे, सूर्य उगवल्यानंतर, त्यांनी सुगंधीत द्रव्ये घेतली आणि कबरेकडे जाण्यासाठी निघाले.
\s5
\p
\v 3 ते तेथे जात असता, ते एकमेकांना विचारू लागले, “आम्हासाठी कबरीच्या प्रवेशद्वारा वर असलेला धोंडा बाजूला कोण लोटणार आहे?”
\v 4 ते पोहचल्यानंतर, त्यांनी वर त्या धोंड्याकडे पाहिले, जो फार मोठा होता, आणि तो अगोदरच लोटलेला होता.
\s5
\p
\v 5 त्यांनी कबरेत प्रवेश केला आणि एका तरुण पुरूषासारखा देवदूत त्यांनी पाहिला. तो गुहेच्या उजव्याबाजूला बसलेला होता. त्याने एक पांढरा झगा घातलेला होता. परिणामी, ते भयभीत झाले.
\p
\v 6 तो तरुण व्यक्ती त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका! तुम्ही येशूच्या शोधात आहात हे मला ठाऊक आहे, नासरेथचा मनुष्य, ज्याला एका वधस्तंभावर खिळले आणि मारण्यात आले. परंतु तो पुन्हा जिवंत झाला आहे! तो येथे नाही! पाहा! ही जागा आहे येथे त्याचे शरीर ठेवले होते.
\v 7 जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा. विशेष करून खात्रीपूर्वक पेत्राला सांगा. त्यांना सांगा, “ज्याप्रमाणे तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते, येशू तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, आणि तुम्ही त्याला तिथे पहाल’!”
\s5
\p
\v 8 ती स्त्री बाहेर गेली आणि कबरेतून पळाली. त्या कापत होत्या कारण ते घाबरले होते आणि चकित झाले. त्यांनी ह्या विषयी कोणालाही काहीही सांगितले नाही, कारण ते घाबरले होते.
\s शिष्यांना येशूचे दर्शन
\s5
\p
\v 9 जेव्हा येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी परत जिवंत झाला, तो मग्दालिया मरीयेला अगोदर प्रगट झाला. हीच ती स्त्री होती जिच्यातून पूर्वी सात दुष्ट आत्म्यांना धमकाविले होते.
\v 10 जे येशू बरोबर होते ती त्यांच्याकडे गेली, ते रडत असता आणि शोक करत असता. तिने जे पाहीले ते त्यांना सांगितले.
\v 11 परंतु तिने जेव्हा सांगितले की येशू परत जिवंत आहे आणि तिने त्याला पहिले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास त्यांनी नकार दिला.
\s5
\p
\v 12 त्या दिवसानंतर, यरुशलेमेच्या जवळच्या क्षेत्रातून चालत असता येशू त्याच्या दोन शिष्यांना वेगळ्या रूपात प्रगट झाला.
\p
\v 13 त्याला ओळखल्यानंतर, ते दोघे यरुशलेमेस परत गेले. काय घडले हे त्यांनी त्याच्या इतर अनुयायांना सांगितले, परंतु त्यांनी त्यावर विश्वास केला नाही.
\s5
\p
\v 14 नंतर अकरा प्रेषित जेवण करत असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने त्यांना दटावले कारण त्या लोकांनी तो परत जिवंत झालेला पाहिल्यानंतर सांगितलेल्या बातमी वर त्यांनी विश्वास ठेवण्यास खंबीरपणे नकार दिला.
\s येशूची शेवटची आज्ञा
\p
\v 15 तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण जगात जा आणि सर्वांना शुभवार्तेचा प्रचार करा!
\v 16 ज्यांचा बाप्तिस्मा होईल आणि जे कोणी तुमच्या संदेशावर विश्वास ठेवतील देव त्या सर्वांचे तारण करेल. जो विश्वास करणार नाही त्यांना तो दोषी ठरवेल.
\s5
\p
\v 17 जो कोणी शुभवार्तेवर विश्वास करेल तो चमत्कार करेल. विशेषतः, माझ्या सामर्थ्याने ते लोकांतून दुष्ट आत्म्यांना बाहेर धमकावून लावतील. ज्या भाषा ते शिकले नाहीत त्या भाषा ते बोलतील.
\v 18 जर त्यांनी सापाला उचलले किंवा जर त्यांनी विषारी द्रव पिले, तरी त्यांना त्रास होणार नाही. जेव्हा जेव्हा ते आजारी लोकांवर हात ठेवतील, देव त्यांना आरोग्य देईल.”
\s प्रभू येशूचे स्वर्गारोहण व शिष्यांची कामगिरी
\s5
\p
\v 19 प्रभू येशूने शिष्यांना हे सांगितल्यानंतर, देवाने त्याला स्वर्गात घेतले. मग तो त्याच्या सिंहासनावर बसला जे देवाच्या बाजूला महान आदरामध्ये त्याच्या उजव्या हाताशी, त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी आहे.
\v 20 ज्याप्रमाणे शिष्य, यरूशलेमेतून बाहेर गेले, आणि त्यांनी सगळीकडे प्रचार केला. जेथे कुठे ते गेले, प्रभूने त्यांना चमत्कार करण्यासाठी सक्षम केले. जेणेकरून, त्याने देवाचा संदेश खरा आहे हे लोकांना दाखवले.