mr_udb/41-MAT.usfm

2196 lines
548 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id MAT - MARATHI_UDB_NT
\ide UTF-8
\h मत्तयकृत शुभवर्तमान
\toc1 मत्तयकृत शुभवर्तमान
\toc2 मत्तयकृत शुभवर्तमान
\toc3 mat
\mt1 मत्तयकृत शुभवर्तमान
\s5
\c 1
\s येशू ख्रिस्ताची वंशावळी
\p
\v 1 अब्राहाम आणि दावीद राजाचा वंशज, येशू ख्रिस्ताच्या वंशावळीचा हा वृत्तांत आहे.
\v 2 अब्राहाम हा इसहाकाचा पिता होता. इसहाक हा याकोबाचा पिता होता. याकोब हा यहूदा आणि त्याचे भाऊ ह्यांचा पिता होता.
\v 3 यहूदा हा पेरेस आणि जेरह ह्यांचा पिता होता, तामार ही त्यांची आई होती. पेरेस हा हेस्त्रोनाचा पिता होता. हेस्त्रोन हा अरामाचा पिता होता.
\s5
\p
\v 4 अराम हा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब हा नहशोनाचा पुत्र होता. नहशोन हा सल्मोनाचा पिता होता.
\v 5 सल्मोन व त्याची पत्नी रहाब हे इस्राएली नव्हते, ते दोघे बवाजाचे आई वडील होते. बवाज हा ओबेदाचा पिता होता. ओबेदाची आई रुथ ही देखील इस्राएली स्त्री नव्हती. ओबेद हा इशायाचा पिता होता.
\v 6 इशाय हा दावीद राजाचा पिता होता. दावीद हा शलमोनाचा पिता होता. शलमोनाची आई उरीयाची पत्नी होती.
\s5
\p
\v 7 शलमोन हा रहबामाचा पिता होता. रहबाम हा अबीयाचा पिता होता. अबीया हा आसाचा पिता होता.
\v 8 आसा हा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट हा योरामाचा पिता होता. योराम हा उज्जीयाचा पूर्वज होता.
\s5
\p
\v 9 उज्जीया हा योथामाचा पिता होता. योथाम हा अहाजाचा पिता होता. अहाज हा हिज्कीयाचा पिता होता.
\v 10 हिज्कीया हा मनश्शेचा पिता होता. मनश्शे हा अम्मोनाचा पिता होता. अम्मोन हा योशीयाचा पिता होता.
\v 11 योशीया हा यखन्या आणि त्याच्या भावांचा आजोबा होता. जेव्हा बाबेलच्या सैन्यांनी इस्राएली लोकांना गुलाम म्हणून बाबेल देशात घेऊन गेले त्या वेळेत ते तेथे होते.
\s5
\p
\v 12 बाबेलच्या लोकांनी इस्राएलांना बाबेल देशात घेऊन गेले त्यानंतर, यखन्या हा शल्तीएलाचा पिता झाला. शल्तीएल हा जरूब्बाबेलाचा आजोबा होता.
\v 13 जरूब्बाबेल हा अबीहूदाचा पिता होता. अबीहूद हा एल्याकीमाचा पिता होता.
\v 14 एल्याकीम हा अज्जुराचा पिता होता. अज्जुर हा सादोकाचा पिता होता. सादोक हा याखीमाचा पिता होता.
\s5
\p
\v 15 याखीम हा एलीहूदाचा पिता होता. एलीहूद हा एलाजाराचा पिता होता. एलाजार हा मत्तानाचा पिता होता. मत्तान हा याकोबाचा पिता होता.
\v 16 याकोब हा योसेफाचा पिता होता. योसेफ हा मरीयेचा पती होता, मरीया ही येशूची आई होती. तो येशू ज्याला ख्रिस्त म्हणतात.
\p
\v 17 येशूच्या पूर्वजांची यादी या प्रकारे केली आहे: अब्राहामाच्या वेळेपासून तर दावीद राजा जगला तेथपर्यंत चौदा पिढ्या. आणि दाविदाच्या वेळेपासून तर इस्राएल लोक बाबेल देशामध्ये जाण्यापर्यंत दुसऱ्या चौदा पिढ्या, आणि येथून ते ख्रिस्त जन्मला तेथपर्यंत आणखी चौदा पिढ्या.
\s येशू ख्रिस्ताचा जन्म
\s5
\p
\v 18 येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी जे काही घडले त्याचा हा तपशील आहे. त्याची आई, मरीया हिचा विवाह योसेफाशी होण्याचे ठरले होते, परंतु ते दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहण्या पूर्वी, त्यांना असे दिसून आले की तिला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दिवस गेले आहेत.
\v 19 तर आता, योसेफ जो तिचा पती होणार होता, तो देवाच्या आज्ञांचे पालन करणारा मनुष्य होता, म्हणून तिच्याशी विवाह करू नये असे त्याने ठरवले. परंतु इतर लोकांसमोर तिचा अपमान व्हावा अशी त्याची इच्छा नव्हती. म्हणून तिच्याशी विवाह करण्याच्या योजनेपेक्षा तिला शांततेने सोडून द्यावे असा निर्णय घेतला.
\s5
\p
\v 20 तो ह्यावर गांभीर्याने विचार करत होता, तेव्हा देवाने पाठवलेल्या एका दूताने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला आश्चर्यचकित केले. देवदूताने म्हटले, “दाविदाच्या पुत्रा, योसेफा, मरीयेशी विवाह करण्यासाठी कचरू नको. तिच्यामध्ये जो गर्भ राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
\v 21 ती एका पुत्राला जन्म देईल, आणि तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारणारा असल्यामुळे त्याचे नाव तू ‘येशू’ ठेव.’”
\s5
\p
\v 22 हे सर्व ह्यासाठी घडले कारण, फार काळापूर्वी देवाने यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे काही लिहिले होते ते सगळे खरे व्हावे. यशयाने लिहिले आहे,
\v 23 “पाहा एक, कुमारी गर्भवती होईल आणि एका पुत्राला जन्म देईल. ते त्याला इम्मानुएल असे म्हणतील,” त्याचा अर्थ ‘आम्हाबरोबर देव.’”
\s5
\p
\v 24 मग योसेफ झोपेतून उठल्यावर, देवदूताने त्याला करण्यास सांगितले होते तसेच त्याने केले. त्याने मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
\v 25 परंतु तिने पुत्राला जन्म देईपर्यंत त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले नाही; त्याने त्याचे नाव येशू ठेवले.
\s5
\c 2
\s ज्ञानी लोक येशूबाळाच्या दर्शनास येतात
\p
\v 1 यहूदा प्रांतातील बेथलेहेम गावामध्ये येशूचा जन्म झाला तेव्हा महान हेरोद राजा तेथे राज्य करत होता. येशूच्या जन्मानंतर काही दिवसांनी, पूर्वेकडून फार दूरवरून ताऱ्यांचा अभ्यास करणारे काही पुरूष यरुशलेम शहरात आले.
\v 2 त्यांनी लोकांनकडे विचारपूस केली, “तुम्हा यहूद्यांचा राजा होण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला एक तारा पाहिला आहे तो हे दर्शवतो की तो जन्मास आला आहे, म्हणून आम्ही त्याला नमन करण्यासाठी आलो आहोत.”
\p
\v 3 ते लोक काय विचारपूस करत आहेत हे हेरोद राजाच्या कानी पडले, तेव्हा तो अतिशय चिंताग्रस्त झाला. यरूशलेमेमधील पुष्कळ लोक देखील चिंताग्रस्त झाले.
\s5
\p
\v 4 मग हेरोदाने सर्व मुख्य याजकांना आणि यहूदी नियम शास्त्राच्या शिक्षकांना एकत्र बोलावले. त्याने त्यांना विचारले, ‘संदेष्ट्याने भाकित केल्याप्रमाणे ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा होता.
\v 5 ते त्याला म्हणाले, “त्याचा जन्म येथेच यहूदा प्रांतातील, बेथलेहेम गावामध्ये होईल, कारण मिखा संदेष्ट्याने फार पूर्वी लिहिले आहे,
\v 6 ‘अहो यहूदाच्या भूमीवर बेथलेहेममध्ये राहणाऱ्यांनो, निश्चितच तुमचे शहर हे खूपच विशेष आहे, कारण तुमच्या शहरातून येणारा मनुष्य एक राज्यकर्ता असेल. तो इस्राएलामध्ये राहणाऱ्या माझ्या लोकांचे मार्गदर्शन करील.’”
\s5
\p
\v 7 मग हेरोद राजाने ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या पुरूषांना गुप्तपणे बोलावले. त्याने त्यांना विचारले अगदी प्रथम केंव्हा तो तारा प्रकट झाला.
\v 8 मग तो त्यांना म्हणाला, “बेथलेहेम गावास जा आणि ते बालक कोठे आहे अशी सर्वत्र विचारपूस करा. तो तुम्हांला सापडेल तेव्हा, माझ्याकडे परत येऊन मला सांगा, म्हणजे मी स्वतःदेखील तेथे जाईन, आणि त्याची उपासना करीन.”
\s5
\p
\v 9 मग ते पुरूष राजा सोबत बोलल्यावर बेथलेहेम गावाकडे गेले. ते पूर्वेकडील देशात असतांना त्यांनी जो तारा पाहिला होता, तो ज्या घरात ते बालक होते त्या घरावर थांबेपर्यंत त्यांच्या पुढे-पुढे चालत राहिला, याचे त्यांना आश्चर्य वाटले.
\v 10 त्यांनी तो तारा पाहिला, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते त्याच्या मागे-मागे चालत राहिले.
\s5
\p
\v 11 त्यांना ते घर सापडल्यावर, त्यांनी त्यात प्रवेश केला, आणि बालक व त्याची आई, मरीया यांना पाहिले. त्यांनी खाली वाकून त्याला नमन केले. मग त्यांनी आपल्या धनाच्या पेट्या उघडल्या आणि सोने, सुगंधी धूप, आणि गंधरस त्याला अर्पण केले.
\v 12 मग देवाने त्यांना स्वप्नामध्ये असा इशारा दिला की हेरोद राजाकडे परत जाऊ नका. म्हणून ते त्यांच्या देशाकडे जाण्यासाठी निघाले, परंतु आलेल्या मार्गाने परत न जाता, त्या ऐवजी ते दुसऱ्या मार्गाने गेले.
\s मिसर देशास पलायन
\s5
\p
\v 13 ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी बेथलेहेम गाव सोडल्यानंतर, देवापासून आलेला एक दूत योसेफाला स्वप्नात प्रकट झाला. तो म्हणाला, “ऊठ, बाळाला आणि त्याच्या आईला घे, आणि मिसर देशास पळून जा. जो पर्यंत मी असे सांगत नाही की, आता तुला तो देश सोडायला हवा तोपर्यंत तेथेच राहा, कारण हेरोद राजा त्याच्या सैनिकांना पाठवण्याच्या बेतात आहे जेणेकरून त्यांनी येऊन बाळाला शोधून मारून टाकावे.”
\v 14 म्हणून योसेफ त्याच रात्री उठला; त्याने बाळाला व त्याच्या आईला बरोबर घेतले, आणि ते मिसर देशास पळून गेले.
\v 15 हेरोद राजाचा मृत्यु होईपर्यंत ते तेथे राहिले, मग ते मिसरामधून निघाले. देवाने होशेय संदेष्ट्याला लिहिण्यास सांगितले होते ते खरे ठरावे, ते ह्या प्रकारे,
\q1 “मी माझ्या पुत्राला मिसरामधून बोलावले आहे.”
\s बेथलेहेम येथील मुलांची कत्तल
\s5
\p
\v 16 हेरोद राजाचा मृत्यु होण्या अगोदर, त्याला हे कळून आले की त्या मनुष्यांनी त्याला फसवले आहे, आणि ह्याचा त्याला राग आला. येशू अजूनही बेथलेहेम गावामध्येच जवळपास आहे असे त्याला वाटले होते म्हणून, हेरोदाने सर्व दोन वर्ष वयाच्या आणि त्याहून कमी वयाच्या मुलांना जीवे मारण्यासाठी सैनिकांना पाठवले. ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या मनुष्यांना तारा पहिल्यांदा केव्हा दिसला हे त्यांचे त्याला सांगण्यावरून, मुल किती वर्षांचे असेल याचा हेरोदाने हिशोब केला.
\s5
\p
\v 17 हेरोदाने असे केले तेव्हा, यिर्मया संदेष्ट्याने फार काळापूर्वी बेथलेहेमा जवळील रामा शहराविषयी लिहून ठेवले होते, ते खरे ठरले:
\q
\v 18 रामा येथील स्त्रिया मोठ्याने ओरडत व रडत आहे.
\q ह्या स्त्रियांची पूर्वज राहेल, तिच्या मृत झालेल्या लेकरांसाठी रडत होती.
\q लोक तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते तसे करू शकत नाहीत कारण, सर्व मुले ठार झाली आहेत.
\s मिसराहून परतणे
\s5
\p
\v 19 हेरोद राज्याच्या मृत्युनंतर देखील योसेफ आणि त्याचा परिवार मिसरातच राहत असता, देवाने पाठवलेला एक देवदूत योसेफाला स्वप्नात प्रकट झाला.
\v 20 तो योसेफास म्हणाला, “ऊठ आणि बाळाला व त्याच्या आईला सोबत घेऊन परत इस्राएल देशात जाऊन राहा, कारण मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे मरण पावले आहेत.”
\v 21 म्हणून योसेफाने मुलाला व त्याच्या आईला सोबत घेतले आणि ते इस्राएलामध्ये जाण्यासाठी निघाले.
\s5
\p
\v 22 अर्खेलाव हा त्याचा पिता हेरोद राजाच्या जागेवर यहूदा प्रांतात राज्य करत आहे हे योसेफाने ऐकले, तेव्हा तेथे जाण्याची त्याला भीती वाटू लागली. तेव्हा पुढे त्याने काय करावे याविषयीच्या सुचना देवाने त्याला स्वप्नामध्ये दिल्या, म्हणून योसेफ, मरिया, आणि त्यांचे बालक गालील प्रांतास परतले.
\v 23 ते नासरेथ गावी राहण्यासाठी गेले. परिणामी फार काळापूर्वी संदेष्टा जे काही बोलला होता की: ‘तो नासरेथाचा आहे असे लोक म्हणतील’ ते खरे ठरावे.
\s5
\c 3
\s बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
\p
\v 1 येशू अजूनही नासरेथ गावातच असता योहान, ज्याला लोक बाप्तिस्मा करणारा म्हणतात, तो यहूदा प्रांतातील ओसाड प्रदेशात गेला. तेथे येणाऱ्या सर्व लोकांना तो उपदेश करत होता.
\v 2 तो म्हणत असे, “तुम्ही पाप करणे थांबवले पाहिजे, कारण देव लवकरच दाखवून देईल की तो राजा आहे, तुम्ही जर पाप करणे थांबवले नाही तर तो तुमचा नकार करेल.”
\v 3 योहानाने उपदेश करण्यास सुरवात केली, तेव्हा फार काळापूर्वी यशया संदेष्टा जे काही बोलला ते खरे ठरले. तो म्हणाला,
\pi “अरण्यामध्ये कोणाचा तरी आवाज लोकांना ऐकू येत आहे, तो येणाऱ्या प्रत्येकाला ओरडून म्हणत आहे,
\pi प्रभू येईल तेव्हा त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार असा!
\pi त्याच्यासाठी सर्वकाही तयार करा!”
\s5
\p
\v 4 योहान हा उंटाच्या केसापासून बनवलेले खरबरीत वस्त्र घालत असे. जसा एलिया संदेष्टा फार काळापूर्वी घालत होता तसा, चामड्याचा कमरबंद आपल्या कंबरे भोवती घालत असे. अरण्यात आढळणारा मध आणि नाकतोडे हेच मात्र त्याचे अन्न होते.
\v 5 यरुशलेम शहरामध्ये राहणारे लोक, यहूदा जिल्ह्यातील इतर ठिकाणातील अनेक लोक, आणि यार्देन नदी जवळ राहणारे इतर पुष्कळ लोक हे सर्व योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी येत होते.
\v 6 त्यांनी त्याचे ऐकल्यानंतर ते, उघडपणे त्यांच्या पापांची कबुली देत असत, आणि मग तो त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत असे.
\s5
\p
\v 7 परंतु योहानाने पाहिले की अनेक परूशी आणि सदूकी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे येत आहेत. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विषारी सापाची पिल्ले आहात! जो कोणी पाप करतो, त्या प्रत्येकाला देव एके दिवशी शिक्षा करील ह्या विषयी तुम्हांला कोणी सावध केले?
\v 8 जर खरोखर तुम्ही पाप करणे थांबवले, तर ते दर्शविण्यासाठी योग्य त्या गोष्टी करा.
\v 9 देवाने अब्राहामाच्या वंशजांना दिलेले वचन मला ठाऊक आहे. परंतु आपल्या स्वतःशी असे म्हणू नका, ‘आम्ही आमचा पूर्वज अब्राहामाचे वंशज आहोत, म्हणून आमच्या पापासाठी देव आम्हांला शासन करणार नाही. ' मी तुम्हास सांगतो की देव ह्या धोंड्याचे रुपांतर अब्राहामाच्या वंशजांमध्ये करू शकतो!
\s5
\p
\v 10 जे झाड चांगले फळ देत नाही त्याला कापण्यासाठी जसे एखादा मनुष्य त्याच्या मुळांवर घाव करतो तसे, देव तुम्हांला शिक्षा देण्यासाठी तयार आहे. तो अशा प्रत्येक झाडाला कापून टाकेल आणि त्यांना तो आग्निमध्ये टाकेल.”
\p
\v 11 “माझ्याविषयी म्हणाल तर, मी काही फार महत्त्वाचा नाही, कारण मी तर केवळ पाण्याने बाप्तिस्मा करतो. लोकांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप केल्यानंतर मी ते करतो. परंतु लवकरच अतिशय सामर्थ्यशाली गोष्टी करणारा असा कोणीतरी एक येत आहे. तो माझ्यापेक्षा एवढा महान आहे की, मी त्याच्या पायतणांना उचलून चालण्यास देखील पात्र नाही.
\p तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
\v 12 चांगल्या धान्यातून भूसा वेगळा करण्यासाठी, त्याचे उफणण्याचे सुप त्याने आपल्या हाती घेतले आहे. त्याने ज्या धान्याची मळणी केली आहे त्यामधून सर्व निरुपयोगी भूसा बाहेर काढून टाकण्यास तो तयार आहे. जसे शेतकरी आपल्या कोठारात गहू साठवतो तसेच तो नीतिमान लोकांना सुद्धा घरामध्ये ठेवील; परंतु जसे एखाद्याने न विझणाऱ्या आग्निमध्ये भुसा जाळावा तसे, तो दुष्ट लोकांना आग्निमध्ये जाळून टाकील.
\s येशूचा बाप्तिस्मा
\s5
\p
\v 13 त्या दिवसात, जेथे योहान होता तेथे, येशू गालील जिल्ह्यातून यार्देन नदीकडे गेला. योहानाने त्याचा बाप्तिस्मा करावा म्हणून त्याने तसे केले.
\v 14 येशूने योहानाला त्याचा बाप्तिस्मा करण्यास सांगितले, तेव्हा योहानाने त्याला नकार दिला; तो म्हणाला, “तुच माझा बाप्तिस्मा करावा ह्याची मला गरज आहे! तू तर पापी नाहीस तरी देखील, तू माझ्याकडे का आला आहेस?”
\v 15 परंतु येशू त्याला म्हणाला, “आताच माझा बाप्तिस्मा कर, कारण हे केल्याने आपण दोघेही देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करू.” मग योहान त्याला बाप्तिस्मा देण्यासाठी तयार झाला.
\s5
\p
\v 16 त्यानंतर, येशू लगेचच पाण्यातून वर आला. त्याचवेळेस, जणू काही आकाश उघडले गेले, आणि देवाचा आत्मा कबूतराच्या रुपाने खाली येतांना आणि आपल्यावर थांबतांना, येशूने पाहिला.
\v 17 मग देव स्वर्गातून बोलला आणि म्हणाला, “हा माझा पुत्र आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, आणि मी त्याच्या विषयी फार संतुष्ट आहे.”
\s5
\c 4
\s अरण्यात येशूची परिक्षा
\p
\v 1 मग सैतानाकडून येशूची परिक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
\v 2 चाळीस दिवस आणि रात्र, त्याने उपास केल्यामुळे त्याला भूक लागली.
\v 3 परिक्षा घेणारा, सैतान त्याच्याकडे आला, आणि त्याला म्हणाला, “जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर ह्या दगडांना अशी आज्ञा दे की ते तुझ्यासाठी भाकरी बनतील!”
\v 4 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही! मी हे करणार नाही, कारण देवाने शास्त्रलेखात सांगितले आहे, ‘लोकांना खरोखर जीवन जगण्यासाठी केवळ अन्नच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक काहीतरी लागते; देवाने बोललेले प्रत्येक शब्द त्यांनी ऐकावे.’”
\s5
\p
\v 5 नंतर देवाला विशेष असलेल्या यरुशलेम शहरात, सैतान येशूला घेऊन गेला. त्याने त्याला मंदिराच्या सर्वात उंच ठिकाणी उभे केले.
\v 6 आणि त्याला म्हणाला, “जर तू खरोखरच देवाचा पुत्र आहेस, तर खाली जमिनीवर उडी टाक. अर्थातच, तुला दुखापत होणार नाही, कारण देवाने शास्त्रलेखात असे सांगितले आहे,
\q ‘तुला रक्षण करण्यासाठी देव त्याच्या देवदूतांना आज्ञा देईल.
\q तू पडू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील.
\q तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला दूर ठेवतील.’”
\s5
\p
\v 7 परंतु येशू म्हणाला, “नाही! मी खाली उडी घेणार नाही, कारण देवाने शास्त्रात हे देखील म्हटले आहे, ‘तुझा देव कसा आहे हे सिद्ध करण्यास त्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करू नको.’”
\v 8 मग सैतान त्याला एका डोंगरावरील अतिशय उंच ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने त्याला जगातील सर्व राष्ट्रे आणि त्या राष्ट्रांच्या भव्य गोष्टी दाखवल्या.
\v 9 मग तो त्याला म्हणाला, “जर तू मला नमन करून माझी उपासना केलीस तर मी तुला या सर्व राष्ट्रांवर राज्य करू देईन आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या भव्य गोष्टी तुला देईन.”
\s5
\p
\v 10 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, मी तुझी उपासना करणार नाही, तर आता सैताना, निघून जा! ‘देव शास्त्रलेखात म्हणतो, केवळ तुझा देव प्रभू ह्यालाच तू नमन करावे, आणि तू केवळ त्याचीच उपासना करावी!’”
\v 11 मग सैतान तेथून निघून गेला, आणि त्याच घटकेस, देवदूत येऊन येशूची काळजी घेऊ लागले.
\s गालीलातील कफर्णहूम येथे येशू जाऊन राहतो
\s5
\p
\v 12 येशू यहूदा प्रांतात होता, तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला सांगितले की हेरोद राजाने योहानाला तुरूंगात टाकले आहे. मग येशू गालील जिल्ह्यातील, नासरेथ गावात परतला.
\v 13 नंतर त्याने नासरेथ सोडले व कफर्णहूम शहरामध्ये राहण्यास गेला. कफर्णहूम हे गालील समुद्राजवळ जो पुर्वी जबुलून आणि नफताली वंशाचा प्रदेश होता तेथे स्थित आहे.
\s5
\p
\v 14 तो तेथे गेला जेणेकरून यशया संदेष्ट्याने फार काळापूर्वी लिहिलेले शब्द खरे ठरावे:
\q
\v 15 जबुलून आणि नफताली यांचे प्रदेश,
\q समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून, यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या भागात असलेले प्रदेश,
\q गालीलातील ते प्रदेश, जे पुष्कळ परराष्ट्रीयांचे घर आहे!
\q
\v 16 असे लोक अंधारातच असलेल्या लोकांप्रमाणे, देवाला ओळखत नाहीत,
\q परंतु ते सत्य शिकतील, जणू काय तेजस्वी प्रकाश त्यांच्यावर प्रकाशला आहे.
\q होय, त्यांना मरणाची अतिशय भीती वाटली,
\q परंतु त्यांच्यावर अति तेजस्वी प्रकाश चमकला आहे!”
\s5
\p
\v 17 त्याच दिवसात, येशू कफर्णहूम शहरात असता, त्याने लोकांना उपदेश करण्यास आरंभ केला, “देव लवकरच स्वतःला एक राजा म्हणून प्रकट करणार आहे, जेव्हा तो राज्य करेल तेव्हा तो तुमचा न्याय करील. म्हणून पाप करणे थांबवा!”
\s प्रथमशिष्यांना पाचारण
\s5
\p
\v 18 एके दिवशी येशू गालील समुद्राजवळून चालत असता, शिमोन, ज्याला नंतर पेत्र म्हणण्यात आले, त्याला आणि त्याचा धाकटा भाऊ अंद्रिया, ह्या दोघां पुरूषांना त्याने पाहिले. ते आपली मासे पकडण्याची जाळी पाण्यात टाकत होते कारण ते मासे पकडून आणि त्यांना विकून पैसे मिळवणारे होते.
\v 19 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या सोबत या आणि माझे शिष्य होण्याकरीता लोकांना कसे एकत्र करावे हे मी तुम्हांला शिकवीन. जसे तुम्ही मासे पकडले अगदी त्यासारखेच हे असेल.”
\v 20 लागलेच ते करत असलेले काम त्यांनी टाकून दिले आणि त्याच्या बरोबर निघून गेले.
\s5
\p
\v 21 त्यापैकी तीन लोक तेथून निघाले तेव्हा, येशूने इतर दोन पुरूष म्हणजे, याकोब आणि याकोबाचा धाकटा भाऊ योहान, ह्यांना पाहिले. ते दोघे आपला पिता जब्दी, ह्याच्यासोबत त्यांच्या नावेमध्ये, मासे पकडण्याची जाळी नीट करत होते. त्यांनी आपले काम सोडून देऊन येशूच्या मागे यावे असे त्याने त्यांना सांगितले.
\v 22 लागलेच त्यांनी आपल्या वडिलांसह आपली नाव देखील सोडली आणि येशूच्या मागे गेले.
\s गालीलातील फेरी व कार्य
\s5
\p
\v 23 येशू या चार पुरूषांना घेऊन संपूर्ण गालील जिल्ह्यातून फिरला. तो सभास्थानामध्ये लोकांना शिक्षण देत असे. देव स्वतःला राजा म्हणून कसे प्रकट करणार आहे ह्याविषयीच्या शुभवर्तमानाचा उपदेश तो लोकांना करत असे. जे लोक आजारी होते अशांना देखील तो बरे करत असे.
\v 24 सूरिया जिल्ह्याच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांनी तो करत असलेल्या कार्याविषयी ऐकले, तेव्हा त्यांनी जे लोक आजारातून जात आहेत, त्यांना आणि असे लोक जे अनेक रोगांपासून त्रस्त आहेत त्यांना, ज्या लोकांना तीव्र वेदना आहेत त्यांना, जे लोक सैतानाच्या ताब्यात आहेत त्यांना, ज्यांना अपस्मार चा आजार आहे अशांना, आणि ज्यांना अर्धांगवायू झाला आहे. अशा सर्व लोकांना त्याच्याकडे आणिले. आणि येशूने त्यांना बरे केले.
\v 25 मग मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर चालू लागला. ते लोक गालीलातून, दहा गावातून, यरुशलेम शहरातून, यहूदा प्रांतातील इतर भागातून, आणि यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या ठिकाणातून आलेले होते.
\s5
\c 5
\s डोंगरावरील प्रवचन
\p
\v 1 येशूने मोठ्या जमावाला पाहिले तेव्हा, तो एका डोंगर माथ्यावर गेला. त्याच्या अनुयायांना शिकवता यावे म्हणून तेथे तो खाली बसला. ते त्याचे ऐकण्यासाठी त्याच्या अधिक जवळ आले.
\v 2 मग त्याने असे बोलून त्यांना शिकवण्यास आरंभ केला:
\s धन्यवाद
\q
\v 3 “देव त्या लोकांबरोबर संतुष्ट आहे जे मान्य करतात की त्यांना देवाची गरज आहे;
\q तो स्वर्गातून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मान्य होईल.
\q
\v 4 या पापी जगामुळे जे शोक करतात अशा लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
\q तो त्यांना प्रोत्साहन देईल.
\s5
\p
\v 5 जे नम्र आहेत अशा लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
\q त्यांना देवाने नवीन केलेल्या पृथ्वीचे वतन मिळेल.
\q
\v 6 जसे एखाद्या व्यक्तीला खाण्या-पिण्याची इच्छा असते त्याच प्रमाणे जे लोक नीतिमत्तेत जगण्याची इच्छा धरतात त्यांच्या बद्दल देव संतुष्ट आहे;
\q तो त्यांना नीतिमत्तेने जगण्यास पात्र करील.
\q
\v 7 इतरांसोबत दयेने वागणाऱ्या लोकांबरोबर; देव संतुष्ट आहे.
\q त्यांच्याशी तो दयाळूपणे वागेल.
\q
\v 8 देव त्याच लोकांबरोबर संतुष्ट आहे; जे केवळ त्यालाच संतोष मिळेल असे करण्याचा प्रयत्न करतात.
\q जेथे देव आहे तेथे एके दिवशी ते देखील राहतील आणि त्याला पाहतील.
\s5
\p
\v 9 इतरांना शांतीने राहण्यास मदत करणाऱ्या लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
\q तो त्यांना त्याची स्वतःची मुले लेखील.
\q
\v 10 प्रामाणिकपणे जगल्यामुळे ज्यांच्या सोबत वाईट घडले त्यांच्या बरोबर देव संतुष्ट आहे;
\q तो त्यांच्यावर राज्य करण्यास मान्य असेल.
\s5
\p
\v 11 माझ्या नावावर विश्वास ठेवला म्हणून लोक तुमचा अपमान करतील, ते तुमच्याशी वाईट वर्तन करतील आणि जेव्हा इतर लोक तुम्हांला वाईट म्हणतील तेव्हा देव तुमच्याबरोबर संतुष्ट आहे.
\v 12 हे घडेल तेव्हा, आनंदित व्हा आणि उल्हास करा, कारण देव तुम्हांला स्वर्गात मोठे प्रतिफळ देईल. देव तुमच्या विषयी चांगले विचार करील. देवाच्या दृष्टीने जे प्रतिष्ठीत आणि चांगले अशा संदेष्ट्यांचा तुमच्या पूर्वजांनी छळ केला हे अगदी तसेच आहे.
\s मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे
\s5
\p
\v 13 जसे मीठ अन्नामध्ये बदल घडवते, तसेच तुम्हांला या जगासाठी करायचे आहे. परंतु जर मिठाची शक्ती गेली तर, त्याला कोणाच्यानेही परत आणता येणार नाही. त्याला बाहेर फेकून दिले जाऊन लोक त्याच्यावरून चालतील.
\v 14 अंधारात असलेल्या लोकांसाठी दिवा प्रकाश देतो, तेच तुम्हांला या जगासाठी करायचे आहे. जसे डोंगरावर वसलेल्या शहराला पाहावे, तसे लोक तुम्हांला पाहतील.
\s5
\p
\v 15 दिवा लावल्यानंतर, ते त्याला टोपली खाली ठेवत नाहीत. तर, त्याला दिवा ठेवण्याच्या जागेवरच ठेवतात, जेथून त्यांच्या घरात असणाऱ्या सर्व लोकांवर त्याचा प्रकाश पडावा.
\v 16 अगदी तसेच, जे काही योग्य आहे ते तुम्ही अशाप्रकारे करावे की तुम्ही काय करता हे लोक पाहू शकतील. तुम्हाला असे करतांना ते पाहतील, तेव्हा ते तुमच्या स्वर्गातील पित्याची स्तुती करतील.”
\s जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण
\s5
\p
\v 17 “देवाने मोशेला दिलेले नियम किंवा जे काही संदेष्ट्यांनी लिहिले आहे, त्यापासून वेगळे करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे असे समजू नका. त्या ऐवजी, ज्या गोष्टी घडायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.
\v 18 हे लक्षात असू द्या: ह्या नियमांमधील सर्व काही, ज्या गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटतात त्यासुद्धा, आणि त्यातील लहानातील लहान गोष्टींचे स्पष्टीकरण—आकाश आणि पृथ्वी दृष्टीआड होईपर्यंत आणि देवाने जे घडणार आहे त्या विषयी त्याच्या लेखकांना लिहिण्यास सांगितले ते पूर्ण होईल तोपर्यंत सर्वकाही नक्कीच खरे ठरेल.
\s5
\v 19 कारण ते सत्य आहे, त्या आज्ञांपैकी छोटीशी आज्ञा जरी तुम्ही मोडली, आणि लोकांना ती मोडण्यासाठी जर तुम्ही शिकवता, तर जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करेल तेव्हा तुम्ही कमी महत्त्वाचे असाल. तथापि, जर या सर्व आज्ञा तुम्ही पाळता आणि तशाच गोष्टी इतरांना पाळण्यास शिकवता, त्या वेळेस तुम्ही फार मानास्पद असे व्हाल.
\v 20 ह्याच कारणामुळे, मी तुम्हास सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांपेक्षा तुम्ही ह्या नियमांचे पालन करायलाच हवे. जर तुम्ही असे केले नाही, तर देव तुमच्यावर राज्य करण्यास मान्य होणार नाही.
\s राग व खून
\s5
\p
\v 21 “देव आमच्या पूर्वजांशी जे काही बोलला हे तुम्ही इतरांकडून ऐकले आहे, ‘तुम्ही कोणालाही ठार मारू नये, आणि, ‘जर तुम्ही कोणाला ठार मारले तर शासकीय समितीचे सभासद तुम्हांला मरण दंडाची शिक्षा देतील.
\v 22 परंतु मी तुम्हांला सांगतो, जर तुम्ही कोणा सोबतही रागावलात, तर देव स्वतः तुमचा न्याय करील, जर तुम्ही एखाद्याला असे म्हणाल, ‘तू निरूपयोगी आहेस, तर प्रशासन करणारी समिती तुझा न्याय करील. जर तुम्ही एखाद्याला म्हणाल, ‘तू मूर्ख आहेस,’तर देव तुम्हांला नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देईल.
\s5
\p
\v 23 म्हणून जेव्हा तू आपली भेट देवासाठी वेदीकडे घेऊन जात असता, जर तुला तेथे आठवले की तू आपल्या भावाला अपमानीत केले आहे,
\v 24 तर वेदीजवळच आपली भेट तशीच ठेव, आणि प्रथम त्या भावाकडे जा ज्याला तू अपमानीत केले आहे. आणि जे काही तू केलेस त्या कृत्यांबद्दल मी खिन्न आहे, आणि त्या बद्दल तू मला क्षमा करावी असे त्याला सांग. नंतर जाऊन आपली भेट देवाला अर्पण कर.
\s5
\p
\v 25 जर तुझ्या सोबतीचा नागरिक तू काहीतरी चूकीचे केल्याबद्दल तुझ्यावर दोषारोप ठेवण्यासाठी तुला न्यायालयात घेऊन जात आहे, त्या नागरीकासोबत न्यायालयात जात आहे तोच, तू लवकरात लवकर त्याच्या सोबत समेट कर. वेळ आहे तोच असे कर जेणेकरून तो तुला न्यायकरण्यासाठी घेऊन जाणार नाही, कारण न्यायाधिशाला जर तुझ्यामध्ये दोष आढळला तर तो तुला तुरूंग रक्षकाकडे देईल, आणि तुरूंग रक्षक तुला तुरूंगात टाकेल.
\v 26 हे लक्षात असू दे: जर तू तुरूंगात गेलास, तर तू कधीच बाहेर येऊ शकणार नाही कारण न्यायधिशाने तुला दिलेल्या शिक्षेची तू भरपाई करू शकत नाही. म्हणून आपल्या बंधूबरोबर शांतीने राहता येईल हे लक्षात ठेवा.”
\s अशुद्धता
\s5
\p
\v 27 “देव आमच्या पूर्वजांशी बोललेला तुम्ही ऐकले आहे, ‘विवाहबाह्य संबंध ठेवू नका.
\v 28 परंतु मी तुम्हांला हे सांगतो: जर एखादा पुरूष एखाद्या स्त्रीकडे शारिरीक संबंध ठेवण्याच्या इच्छेने पाहतो तर, त्याच्या विषयी देव असे समजतो की त्याने अगोदरच आपल्या मनात तिच्या सोबत विवाहबाह्य संबंध ठेवला आहे.
\s5
\p
\v 29 एखाद्या ठराविक गोष्टीकडे पाहिल्याने जर तुमच्या कडून पाप करण्याची इच्छा होत असेल, तर त्याच्याकडे पाहणे थांबवा. पाप करणे टाळण्यासाठी जर तुझे दोन्ही डोळे जर तुला नष्ट करावे लागले तरी तू तसे कर. तू पाहात असून देवाने तुझ्या देहाला नरकात फेकून द्यावे ह्यापेक्षा तू आंधळा असावे आणि पाप करणे थांबवावे हे तुझ्यासाठी बरे होईल.
\v 30 आणि जर तू आपल्या हातांपैकी एका हाताने पाप करण्याची तुला इच्छा होत असेल, तर तसे करणे थांबव. जर तू आपला हात कापून फेकून देणे, हे तुला पाप करणे टाळण्यासाठी जर सक्षम करत असेल तर तू तसेच करावे. आंधळे असावे आणि पाप करणे थांबवावे, देवाने तुला दोन्ही हात असता नरकात फेकून द्यावे यापेक्षा हे बरे आहे.”
\s5
\p
\v 31 “देवाने शास्त्रभागामध्ये म्हटले आहे, ‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो, त्याने ते एखाद्या दस्तऐवजावर लिहून द्यावे की तो तिला घटस्फोट देत आहे.
\v 32 परंतु आता मी तुम्हास जे काही सांगतो ते ऐका: एखादा मनुष्य त्याच्या पत्नीला फक्त व्यभिचार केल्याच्या कारणावरूनच घटस्फोट देतो. तसेच जर एखादा मनुष्य त्याच्या पत्नीला दुसऱ्या कोणत्याही कारणावरून घटस्फोट देतो व ती स्त्री कोणत्याही पुरूषासोबत विवाह करते तर ती व्यभिचार करते. आणि जो पुरूष तिच्याशी विवाह करतो तो देखील तिच्या सोबत व्यभिचार करतो.”
\s शपथा व खरेपणा
\s5
\p
\v 33 “देव आमच्या पूर्वजांशी बोलला हे देखील तुम्ही तुमच्या धार्मिक शिक्षकांकडून ऐकले आहे, ‘तुम्ही देवाचे नाव घेऊन जे काही करण्याचे ठरवले आहे ते करण्याची खात्री करा!
\v 34 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: काहीही करण्यासाठी शपथ वाहू नका आणि तुमच्यापैकी कोणीतरी मोठा असेल त्याला साक्षीदार होण्यास शपथ घेऊ नका. उदाहरणार्थ, तुम्ही काही करणार आहात त्यासाठी शपथ वाहू नका आणि स्वर्गातून कोणीतरी साक्षीदार व्हावे म्हणून शपथ घेऊ नका, कारण स्वर्ग ते स्थान आहे जेथे देव त्याच्या सिंहासनावर एक राजा म्हणून बसलेला आहे.
\v 35 आणि पृथ्वी आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका; कारण पृथ्वी ते स्थान आहे ज्याला देवाने आपले पाय ठेवण्याचे आसन केले आहे. आणखी, यरुशलेमेची शपथ वाहून नक्कीच काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका, कारण यरुशलेम हे शहर खासकरून देवाचे आहे.
\s5
\p
\v 36 आणखी, तू एखादी गोष्ट करणार आहेस अशी शपथ वाहू नको आणि तू जर ती गोष्ट केली नाहीस तर त्यांनी तुझा शिरच्छेद करावा असे बोलू नको. तुमच्या डोक्यावरील केसांपैकी एकाचा देखील रंग बदलण्यास तुम्ही समर्थ नाही.
\v 37 एखादी गोष्ट करण्याविषयी जर तुम्ही बोलत असाल, तर केवळ एवढेच म्हणा ‘होय, मी ते करणार, किंवा ‘नाही, मी ते करणार नाही. याहून अधिक जास्त जर तुम्ही काही बोललात, तर ते सैतानापासून आहे, त्या दुष्टानेच, तुम्हाला याप्रकारे जास्त बोलण्यास सुचवले आहे.”
\s सूड
\s5
\p
\v 38 “देव आमच्या पूर्वजांशी बोलला हे तुम्ही ऐकले आहे, ‘जर कोणी एकाने तुमच्या एका डोळ्याला काही इजा करतो, तर त्यांनी त्या व्यक्तीच्या डोळ्यांना इजा करावी. आणि जर कोणीएक तुमच्या एखाद्या दाताला इजा करतो, तर त्यांनी त्या व्यक्तीच्या दाताला इजा करायलाच हवी.
\v 39 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: तुम्हांला इजा पोहचवणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्यापासून दूर राहा, अगदी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही करू नका. या उलट, जर कोणी तुमच्या एका गालावर मारून तुमचा अपमान करतो, तेव्हा तुमचा दुसरा गाल त्या व्यक्तीकडे करा जेणेकरून त्याने त्यावर देखील मारावे.
\s5
\p
\v 40 तुझा अंगरखा घेण्यासाठी जर कोणी न्यायालयात तुझ्यावर फिर्याद करू इच्छित असेल तर, त्या व्यक्तीला तुझे दोन्ही अंगरखे आणि तुझे वस्त्र देखील घेऊ दे, जे तुझ्यासाठी अतिशय मोलाचे आहे.
\v 41 जर एखादा रोमी शिपाई तुला त्याच्या सोबत त्याचे शस्त्र घेऊन एक किलोमीटर जाण्यासाठी सक्ती करत असेल, तर तू ते त्याच्या सोबत दोन किलोमीटरपर्यंत घेऊन जावे.
\v 42 आणखी, जर कोणी तुझ्याकडे एखादी गोष्ट मागतो, तर त्याला ती गोष्ट दे. कोणी तुझ्याकडे काही उसने मागतो, तर पुढे होऊन त्याला उसने दे.
\s प्रेम व सर्वांगपूर्ण शील
\s5
\p
\v 43 “देव आमच्या पूर्वजांशी बोललेला तुम्ही ऐकले आहे, ‘इस्राएलामधील तुमच्या सहकारी बंधुवर प्रीती करावी आणि परराष्ट्रीयांचा द्वेष करावा, कारण ते तुझे शत्रू आहेत.
\v 44 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: तुमच्या मित्रांवर तुम्ही प्रीती करता तशीच प्रीती तुमच्या शत्रूंवर करा, आणि ज्यांनी तुम्हांला त्रास दिला त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
\v 45 तुमचा पिता जो स्वर्गात आहे, तो जसा करतो तसेच तुम्ही करा. तो सर्वांशी दयेने वागतो. उदाहरणार्थ, सुर्याने चांगल्या लोकांवर आणि वाईट लोकांवर देखील सारखाच प्रकाश टाकावा असे तो करतो, आणि जे त्याचे नियम पाळतात अशांसाठी आणि जे पाळत नाहीत अशा दोघांसाठी सुद्धा तो पाऊस पाठवतो.
\s5
\p
\v 46 केवळ तुमच्यावर प्रीती करणाऱ्या लोकांवरच जर तुम्ही प्रीती करता, तर ह्या सर्वांसाठी देवाने तुम्हांला प्रतिफळ द्यावे अशी अपेक्षा करू नका! अगदी जे लोक अतिशय भयंकर गोष्टी करतात, जसे की जकातदार, जे त्यांच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच प्रीती करतात. त्यांच्यापेक्षा चांगली कृती तुम्ही करायलाच पाहिजे!
\v 47 होय, जे तुमचे मित्र आहेत केवळ त्यांनाच जर तुम्ही सलाम करता आणि देवाने त्यांना आशिर्वादीत करावे अशी विनंती करता, तेव्हा तुम्ही इतर लोकांपेक्षा काही एक चांगले करत नाही. अगदी परराष्ट्रीय, जे देवाचे नियम पाळत नाहीत, ते सुद्धा अशाच गोष्टी करतात!
\v 48 म्हणून तुमचा देव पिता जो स्वर्गात आहे त्याच्या सोबत तुम्ही पूर्णपणे विश्वासू असणे आवश्यक आहे, जसा तो पूर्णपणे तुमच्या सोबत विश्वासू आहे.”
\s5
\c 6
\b
\b
\s गुप्त धर्माचरण
\p
\v 1 “जेव्हा तुम्ही चांगली कामे करता, तेव्हा इतर लोकांनी आपल्याला पाहावे या हेतूने तुम्ही ती कामे करणार नाही हे निश्चित करा. त्यांनी तुम्हांला पाहावे आणि तुमच्या विषयी चांगला विचार करावा असे करू नका. केवळ इतर लोकांनी तुमच्या विषयी चांगला विचार करावा या हेतूने जर तुम्ही चांगली कामे करता, तर तुमचा देव पिता जो स्वर्गात आहे, तो तुम्हांला कोणतेही प्रतिफळ देणार नाही.
\s गुप्त दानधर्म
\p
\v 2 म्हणून जेव्हा तुम्ही गरिबांना काहीतरी देता, जसे एखादा तुतारी वाजवत असता लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते, तसे त्यांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल असे करू नका. तसेच जे ढोंगी लोक सभास्थानात आणि रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून लोकांनी आपली प्रशंसा करावी या हेतूने करतात. हे लक्षात असू द्या की ते लोक ह्या ढोंगी लोकांची प्रशंसा करतात, परंतु ढोंगी लोकांना मिळणारे प्रतिफळ हेच आहे!
\s5
\p
\v 3 जसे ते करतात तसे करण्यापेक्षा, तुम्ही गरिबांना काहीतरी देता तेव्हा, तुम्ही काय करत आहात हे इतर लोकांना समजता कामा नये.
\v 4 अशा प्रकारे, तुम्ही गरिबांना काहीतरी गुप्तपणे द्यावे. जेव्हा तुम्हांला कोणीही पाहत नाही, परिणामी, तुमचा देव पिता जो तुमचे निरीक्षण करत आहे, तुम्हांला प्रतिफळ देईल.
\s गुप्त प्रार्थना
\s5
\p
\v 5 “आणखी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा ढोंगी करतात तसे करू नका. त्यांना सभास्थानात आणि मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे आवडते, जेणे करून लोकांनी त्यांना पाहून त्यांच्याविषयी चांगला विचार करावा. हे लक्षात ठेवा की ते लोक त्यांची प्रशंसा करतात, परंतु खरोखर हेच त्यांचे प्रतिफळ आहे.
\v 6 परंतु तुम्ही, जेव्हा प्रार्थना करता, तेव्हा आपल्या वैयक्तिक खोलीमध्ये जा आणि तुमचा देव जो पिता, ज्याला कोणीही पाहू शकत नाही त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी दार बंद करा. जेव्हा कोणी तुमचे निरीक्षण करत नाही तेव्हा तो तुमचे निरीक्षण करत आहे, आणि तोच तुम्हांला प्रतिफळ देईल.
\v 7 तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा देवाला ‍‍न ओळखणारे लोक प्रार्थना करतांना जसे पुन्हा-पुन्हा तेच शब्द बोलतात तसे तुम्ही त्यांच्या सारखी प्रार्थना करू नये. त्यांना असे वाटते की ते जर जास्त शब्द बोलले तर, देव त्यांची प्रार्थना ऐकेल आणि जे त्यांनी मागीतले ते त्यांना देईल.
\s5
\p
\v 8 त्यांच्या सारखे पुन्हा-पुन्हा तेच शब्द बोलू नका, कारण तुम्ही त्याच्याकडे मागण्या अगोदर तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या देव पित्याला ठाऊक आहे.
\s प्रभूने शिकवलेली प्रार्थना
\p
\v 9 म्हणून ह्या प्रकारे प्रार्थना करा:
\q ‘हे पित्या, तू जो स्वर्गामध्ये आहेस,
\q2 प्रत्येकजण तुझा सन्मान करो.
\q2
\v 10 प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी तुच पूर्णपणे राज्य करावे.
\q2 पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो, जशी स्वर्गामध्ये होते,
\q3 अगदी तसेच सर्वकाही घडावे.
\s5
\q2
\v 11 आम्हांला प्रत्येक दिवसाचे आवश्यक अन्न दररोज दे.
\q2
\v 12 ज्यांनी आमच्या विरोधात पाप केले त्यांना जशी आम्ही क्षमा केली आहे तशीच तू ही आमच्या अपराधांची क्षमा कर.
\q2
\v 13 जेव्हा आम्ही मोहात पडतो तेव्हा आमच्या कडून चूकीच्या गोष्टी होऊ नये,
\q2 आणि जेव्हा सैतान आम्हांला इजा करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आम्हांला वाचव.
\s5
\p
\v 14 तुमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या लोकांना क्षमा करा, कारण, तुम्ही असे करता तेव्हा, तुमचा, देव जो पिता स्वर्गामध्ये आहे, तुमच्या अपराधांची क्षमा करील.
\v 15 परंतु जर तुम्ही इतर लोकांना क्षमा केली नाही, तर देव देखील तुमच्या पापांची क्षमा करणार नाही.
\s गुप्त उपास
\s5
\p
\v 16 देवाला संतोषविण्यासाठी तुम्ही उपास करता, तेव्हा ढोंगी लोकांप्रमाणे उदास दिसू नका. त्यांची मुखे उदास दिसतात जेणेकरून त्यांनी जेवण केलेले नाही आणि ते खुप चांगले आहे हे लोकांच्या लक्षात यावे असे ते करतात. ह्याकरीता इतर त्यांच्यविषयी चांगला विचार करतील, परंतु हे लक्षात ठेवा हेच केवळ ते प्रतिफळ जे त्या लोकांना मिळेल!
\v 17 त्या ऐवजी, तुम्हापैकी प्रत्येकजण, जेव्हा उपास करतो, तेव्हा नेहमी प्रमाणे आपले केस विंचरावे आणि आपले तोंड धूवावे,
\v 18 ह्या प्रमाणे तू उपास करीत आहे हे इतर लोकांना कळणार नाही. परंतु तुझा देव, पिता ज्याला कोणीही पाहू शकत नाही, तो तुझे निरीक्षण करील की तू काहीही खाल्ले नाही. जरी तुला कोणीही पाहिले नाही तरी तो तुला पाहतो, आणि तोच तुला प्रतिफळ देईल.
\s खरीखुरी संपत्ती
\s5
\p
\v 19 या पृथ्वीवर स्वार्थीपणाने आपल्या स्वतःसाठी खुप मोठ्याप्रमाणात पैसा आणि भौतिक वस्तू साठवून ठेवू नका, कारण पृथ्वीवरील सर्वगोष्टी नष्ट होऊन जाणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील गोष्टी नाश होतात, वस्तू गंजतात, आणि चोर येऊन चोरी करतात.
\v 20 त्याऐवजी, देवाला संतोष मिळेल अशा गोष्टी करा. जर तुम्ही चांगली कामे केली, तर हे स्वर्गात संपत्ती साठवल्या सारखेच होईल. तेथे काहीही नाश होत नाही. स्वर्गामधील गोष्टी उध्वस्त देखील होत नाही. काही गंजत देखील नाही, आणि चोर येऊन चोरी करत नाही.
\v 21 लक्षात असू द्या की जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्याच्या विषयी तुम्ही विचार करावा.
\s प्रकाश आणि अंधार
\s5
\p
\v 22 “तुमचे डोळे तुमच्या शरीरासाठी दिव्याप्रमाणे आहेत, ते तुम्हांला गोष्टी पाहण्यासाठी मदत करतात. म्हणून जर तुम्ही जसे देव त्या गोष्टींना पाहतो तसे पाहाल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.
\v 23 परंतु तुमची दृष्टी जर चांगली नाही, तर तुम्हांला काहीही पाहता येणार नाही. तुम्ही पूर्णपणे अंधारात जाल. तुम्ही किती लोभी असाल!
\p
\v 24 “कोणीही एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या धन्यांची सेवा करू शकत नाही. तसे करण्याचा त्याने प्रयत्न जरी केला, तरी त्यांच्या पैकी एकाचा तो द्वेष करेल, आणि दुसऱ्या एकावर प्रीती करील, किंवा त्यांच्या पैकी एका सोबत विश्वासू राहील, आणि दुसऱ्याचा तिरस्कार करील. तसेच, तुम्ही एकाच वेळेस देवाची आणि पैशांची उपासना करू शकत नाही.”
\s चिंता आणि देवावर भिस्त
\s5
\p
\v 25 म्हणून मी सांगतो की तुम्हांला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींविषयी काळजी करू नका. आपल्याला खाण्यास अन्न आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी, किंवा घालण्यासाठी पुरेसे वस्त्र मिळतील किंवा नाही ह्याविषयी काळजी करू नका. जसे तुम्ही आपले जीवन जगता ते ह्या सर्व गोष्टींपेक्षा खुप महत्त्वाचे आहे.
\v 26 पक्षांविषयी विचार करा. ते बीं पेरीत नाहीत, आणि पिकाची कापणी करीत नाहीत किंवा त्यांचा साठा करण्यासाठी कोठारे बनवत नाहीत. तरीही त्यांच्याकडे सर्वदा खाण्यासाठी अन्न आहे, कारण तुमचा देव जो पिता स्वर्गामध्ये आहे, तो त्यांना खाण्यासाठी अन्न पुरवतो. आणि तुम्ही सर्व त्या पक्षांपेक्षा खुप जास्त मोलाचे आहात! म्हणून देव तुमच्या गरजेचा पुरवठा करील ह्याची तुम्ही खात्री करू शकता!
\s5
\p
\v 27 केवळ काळजी करून, आपल्या आयुष्याची वर्षे वाढवण्यासाठी तुमच्या पैकी कोणीही सक्षम नाही. तुमच्या आयुष्याचा एक मिनिट सुद्धा वाढविण्यास तुम्ही सक्षम नाही! म्हणून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींविषयी तुम्ही काळजी करू नये.
\p
\v 28 आपल्याला घालण्यासाठी पुरेसे वस्त्र मिळतील किंवा नाही ह्यांविषयी देखील तुम्ही काळजी करू नये. ज्या प्रकारे रानातील फुले वाढतात त्यांच्याविषयी विचार करा. ते पैसा मिळवण्यासाठी काम करत नाही, आणि ते स्वतःचे वस्त्र बनवत नाही.
\p
\v 29 मी तुम्हांला सांगतो की शलमोन राजा, जो फार काळा पूर्वी होता, त्याने खुप सुंदर वस्त्रे घातली होती, परंतु त्याची वस्त्रे ह्या सुंदर फुलांपैकी एकासारखी देखील नव्हती.
\s5
\p
\v 30 देवाने रानातील झुडपांना खुप सुंदर बनवले आहे, परंतु ते रानात फार थोड्या वेळेसाठीच वाढतात. एका दिवसात त्यांची वाढ होते, आणि दुसऱ्या दिवशी लोक त्यांना सरपण म्हणून भट्टीत टाकून त्यांच्या विस्तवावर भाकरी भाजतात. परंतु देवासाठी रानातील झाडे आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात, आणि तुम्ही जास्त काळ जगता. म्हणून तुम्ही जे अविश्वासू आहात, देवावर भरवसा ठेवा!
\v 31 म्हणून काळजी करून असे म्हणू नका, ‘आम्हाला खाण्यासाठी काहीतरी मिळेल का? किंवा ‘आम्हाला पिण्यासाठी काही मिळेल का? किंवा ‘आम्हाला घालण्यासाठी वस्त्र मिळतील का?
\s5
\p
\v 32 जे देवाला ओळखत नाहीत तेच लोक अशा गोष्टींची सर्वदा काळजी करत राहतात. परंतु तुमचा देव जो पिता, जो स्वर्गात आहे, तुम्हांला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे त्याला ठाऊक आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या विषयी काळजी करू नये.
\v 33 त्याऐवजी, देव आपल्यावर राज्य करील तेव्हा केवळ त्याचा स्वीकार करणे आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणे ह्यालाच तुमच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट बनवा. जर तुम्ही असे कराल, तर तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तो तुम्हांला देईल.
\v 34 म्हणून दुसऱ्या दिवशी तुमच्या सोबत काय होणार आहे ह्याची काळजी करू नका, कारण जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा ह्या सर्वांबाबत तुमच्याकडे पुरेसे असेल. म्हणून पुढे येणाऱ्या वेळे विषयी काळजी करू नका.
\s5
\c 7
\s इतरांचे दोष काढण्याबाबत.
\p
\v 1 इतरांनी किती पापमय कृत्ये केली आहेत याविषयी बोलू नका, जेणेकरून तुम्ही किती पापमय कृत्ये केली आहेत असे देवाने तुमच्या विषयी म्हणू नये.
\v 2 तुम्ही इतर लोकांचे दोष काढले तर, देव तुम्हांला दोषी ठरवील. ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढले तसे, तुमचेही दोष काढण्यात येतील.
\s5
\p
\v 3 तुमच्या पैकी कोणीही इतर कोणाच्याही छोट्याशा चूकीबद्दल चिंताकुल होऊ नये! हे त्या व्यक्तीच्या डोळ्यात गेलेल्या कचऱ्याचा कण पाहण्यासारखे आहे. परंतु तुम्ही तर आपल्या स्वतःच्या मोठ्या अपराधाबद्दल चिंताकुल व्हावे. हे जणू काय एखाद्या लाकडाचा ओंडका तुझ्या डोळ्यात असल्या प्रमाणे आहे हे तुझ्या लक्षात येत नाही.
\v 4 इतर लोकांच्या किरकोळ चूकांबद्दल तुम्ही असे बोलू नये, ‘मला तुझ्या डोळ्यातील कचऱ्याचा कण बाहेर काढू दे! तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकडाचा ओंडका असून सुद्धा, तू असे बोलू शकत नाही!
\v 5 अहो ढोंग्यानो, सर्व प्रकारे मोठी पापे करणे थांबवा. मगच तुम्ही इतरांना त्यांची लहान पापे करणे थांबवण्यास सक्षम व्हाल.”
\s5
\p
\v 6 ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या तुम्ही अशा कुत्र्यांना देता जे नंतर तुम्हावरच हल्ला करतील. आणि तुम्ही मौल्यवान मोती डुकरांपुढे फेकू नये, कारण ते त्याच्या वरून चालतील. ह्याच प्रकारे जर तुला हे माहीत आहे की, देवाविषयीच्या अद्भुत गोष्टी सांगितल्यावर देखील ते तुझ्याशी वाईट वागतील अशा लोकांना त्या तू सांगू नये.
\s प्रार्थना करण्यास प्रोत्साहन
\s5
\p
\v 7 “ज्याची तुम्हांला गरज आहे ते देवाकडे मागत राहा, आणि त्याने ते तुम्हांला द्यावे ह्याची अपेक्षा करतच राहा.
\v 8 प्रत्येकजण जो देवाकडे काहीतरी मागतो, आणि जो त्याने त्याला द्यावे अशी अपेक्षा करतो, तो प्राप्त करील.
\p
\v 9 तुमच्या मुलाने जर तुम्हांला भाकर मागीतली, तुमच्या पैकी कोणीही त्याला धोंडा देणार नाही, हो की नाही?
\v 10 तुमच्या मुलाने जर तुम्हांला मासा मागीतला, तर तुमच्या पैकी कोणीही त्याला साप देणार नाही, हो की नाही?
\s5
\p
\v 11 तुम्ही जरी वाईट आहात तरी, आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी कशा द्याव्या हे तुम्हांला समजते. मग देव, तुमचा पिता जो स्वर्गात आहे, जे त्याला मागतात त्यांना कितीतरी चांगल्या गोष्टी निश्चितच देईल.
\s सुवर्णनियम
\p
\v 12 तर इतरांनी तुमच्याशी कशा प्रकारे वर्तन करावे असे तुम्हांला वाटते, तशाच प्रकारे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करावे, कारण देवाच्या नियमांचे आणि फार काळापूर्वी संदेष्ट्यांनी लिहिले त्या सर्वांचे सार हेच आहे.
\s दोन रस्ते
\s5
\p
\v 13-14 देवा सोबत सर्वकाळामध्ये राहण्यास स्वर्गात जाणे हे फार कठीन आहे; हा तोच कठीन मार्ग आहे जो तुम्ही निवडला पाहिजे. तेथे अजून एक मार्ग आहे, ज्याने पुष्कळ लोक जातात, व तो मार्ग रुंद आहे; ते रुंद फाटक येईपर्यंत चालतील, परंतु ते जेव्हा त्यामधून प्रवेश करतील, तेव्हा ते मरण पावतील. म्हणून मी तुम्हांला सांगतो की तुम्ही कठीन मार्ग निवडावा आणि स्वर्गात देवासोबत सर्वकाळ जगण्यासाठी अरुंद फाटकाने आत प्रवेश करावा.”
\s खरे व खोटे शिक्षक
\s5
\p
\v 15 तुमच्याकडे येऊन देव काय म्हणाला हे तुमच्याशी खोटेपणाने बोलणाऱ्या लोकांविषयी सावध असा. ते काही उपद्रव करणार नाहीत असे वाटतात, परंतु ते सत्य नाही. स्वतःला मेंढरांच्या वेशात लपवलेल्या लांडग्यांप्रमाणे ते आहेत. ते निरुपद्रवी मेंढरे आहेत असा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना वाटते, परंतु खरोखर एखाद्या लांडग्यांप्रमाणे ते तुमच्यावर हल्ला करतात.
\v 16 मग तुम्ही कसे ओळखाल की ते खोटे आहे? तर मग, झाडाने दिलेल्या फळाला पाहून, तुम्हांला समजेल की ते झाड कोणते आहे. उदाहरणार्थ, काटेरी झुडूप द्राक्षे देत नाही, म्हणून कोणीही काटेरी झुडूपावरून द्राक्षे तोडण्याचा विचार देखील करणार नाही. आणि रिंगणीचे झाड अंजीराचे फळ देत नाही, म्हणून कोणीही रिंगणीच्या झाडावरून अंजीर तोडण्याचा विचार देखील करणार नाही.
\v 17 येथे आणखी एक उदाहरण आहे: सर्व चांगली फळे देणारी झाडे चांगलीच फळे देतात, परंतु सर्व निरुपयोगी झाडे अयोग्य फळ देतात.
\s5
\p
\v 18 कोणतेही चांगले झाड निरुपयोगी फळ देत नाही, आणि कोणतेही वाईट झाड चांगले फळ देत नाही.
\v 19 जे झाड चांगले फळ देत नाही अशा प्रत्येक झाडाचे कामकरी तुकडे करतील आणि त्या सर्वांना जाळून टाकतील.
\v 20 झाडे कोणती फळे देतात हे पाहून, तुम्हांला समजते की ती झाडे कोणती आहेत. त्याच प्रकारे, तुमच्याकडे येणारे लोक काय करतात हे तुम्ही पाहाल तेव्हा, ते खरोखर देवासाठीच बोलतात किंवा नाही हे तुम्हांला समजेल.
\s उक्ती आणि कृती
\s5
\p
\v 21 पुष्कळ लोक मला वारंवार प्रभू म्हणून हाका मारत असले तरी सुद्धा, जणू काय त्यांना मीच अधिकार दिला आहे असे ते दाखवतात, त्यांच्यापैकी काही लोकांवर देव राज्य करण्यास मान्य होणार नाही, कारण त्याची जशी इच्छा आहे त्या प्रमाणे ते करीत नाहीत. माझा पिता केवळ त्यांच्यावर राज्य करण्यास मान्य होईल जे त्याच्या इच्छेप्रमाणे करतात.
\v 22 ज्या दिवशी देव प्रत्येकाचा न्याय करील, तेव्हा पुष्कळ लोक मला म्हणतील, ‘प्रभू, आम्ही तुझे प्रतिनिधी म्हणून देवाचा संदेश सांगितला! तुझे प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांमधून भूते बाहेर काढली! आणि तुझे प्रतिनिधी म्हणून, आम्ही पुष्कळ वेळा अद्भुत कामे केली!
\v 23 मग मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘तुम्ही माझे आहात हे मी कधीच स्वीकार केले नव्हते. अहो वाईट करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा!’”
\s दोन पाये
\s5
\p
\v 24 तर मग, मी जे काही सांगतो ते जो कोणी ऐकतो आणि मी आज्ञापिल्याप्रमाणे करतो, तो ज्याने आपले घर खडकावर बांधले अशा एका हुशार मनुष्यासारखा आहे.
\v 25 मग पाऊस जरी आला आणि नदीला पूर आला, आणि वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते खाली पडणार नाही कारण ते एका मजबूत खडकावर बनवलेले आहे.
\s5
\p
\v 26 दुसरीकडे, जो कोणी मी सांगतो ते ऐकतो आणि त्या प्रमाणे आज्ञापालन करत नाही तो, ज्याने आपले घर वाळूवर बांधले अशा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे.
\v 27 मग पाऊस पडला आणि नदीला पूरही आला, आणि वारा सुटला व त्या घरावर आदळला, तेव्हा ते घर पूर्णपणे कोलमडून पडले व नष्ट झाले, कारण ते वाळूवर बांधलेले होते. म्हणून मी तुम्हांला जे काही सांगितले त्याचे तुम्ही आज्ञापालन करायलाच हवे.
\s5
\p
\v 28 येशूने ह्या सर्व गोष्टी शिकवण्याचे संपविल्यावर, ज्या लोकसमुदायाने त्याचे ऐकले त्यांना त्याच्या शिकवणीचे खुप आश्चर्य वाटले.
\v 29 जो स्वतःला माहित असलेल्या गोष्टींवर अवलंबून असतो अशा एका शिक्षकाप्रमाणे त्याने शिकवले. यहूदी नियमशास्त्र शिकवणारे जसे इतरांनी शिकवलेल्या गोष्टीच पुन्हा-पुन्हा शिकवतात, तसे त्याने शिकवले नाही.
\s5
\c 8
\s कुष्ठरोग्याला बरे करणे
\p
\v 1 येशू डोंगरावरून खाली आला तेव्हा, लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला.
\v 2 येशूने लोक समुदायाला निरोप दिल्यानंतर, त्वचा रोग असलेला एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकले. तो येशूला म्हणाला, “प्रभू, कृपा करून मला बरे करा, कारण जर तुमची इच्छा असेल तर मला बरे करण्यास तुम्ही सक्षम आहात हे मला ठाऊक आहे.”
\v 3 आजारी व्यक्तीला निरोगी लोकांपासून दूर ठेवण्याचा नियम येशूने मोडला; आणि त्याने आपला हात सरळ केला व त्या मनुष्याला स्पर्श केला. तो त्याला म्हणाला, “तुला बरे करावे अशी माझी इच्छा आहे, मी आताच तुला बरे करतो!” लागलीच तो मनुष्य आपल्या आजारातून बरा झाला.
\s5
\p
\v 4 मग येशू त्याला म्हणाला, “जवळपास असलेल्या याजकाकडे जाऊन स्वतःस दाखव जेणेकरून त्याने तुझे परिक्षण करावे आणि आता येथून पुढे तू आजारी नाही ह्याची त्याने खात्री करावी. मग त्याने स्थानिक लोकांना सांगितल्या नंतर, त्यांना कळून येईल की तुला आता कुष्ठरोग राहिलेला नाही, मग पुन्हा तू त्यांच्या सोबत राहण्यास सक्षम होशील. मी तुला बरे केले आहे हे याजकाशिवाय कोणालाही सांगणार नाहीस ह्याची खात्री कर. नंतर यरुशलेमेतील मंदिरात जा आणि मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ह्या आजारातून बरे झालेल्या लोकांनी देवाला द्यावयाचे अर्पण याजकाला दे.
\s शताधिपतीचा चाकर
\s5
\p
\v 5 मग येशू कफर्णहूम शहरास आला तेव्हा, एक रोमी शिपाई जो शंभर सैनिकांवर अधिकारी होता त्याच्याकडे आला. त्याने येशूकडे मदतीसाठी विनंती केली.
\v 6 तो त्याला म्हणाला, “प्रभू, माझ्या सेवकाला पक्षघात झाला आहे, आणि तो घरी अंथरुणावर पडलेला आहे, आणि त्याला अतिशय वेदना होत आहेत.”
\v 7 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्या घरी जाईन आणि त्याला बरे करीन.”
\s5
\p
\v 8 परंतु अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभू, जाण्याचा त्रास घेऊ नका. तुम्ही माझ्या घरी यावे आणि माझ्याशी जोडले जावे इतक्या योग्यतेचा मी नाही. त्या ऐवजी, माझा सेवक बरा झाला आहे एवढेच बोला, आणि तो बरा होईल.
\p
\v 9 माझ्या सोबत देखील असेच आहे. मी एक सैनिक आहे; मला माझ्या सेनापतीची आज्ञा पाळावी लागते, आणि ज्यांना मी आज्ञा देतो असे देखील सैनिक माझ्याकडे आहेत. जेव्हा त्यांच्या पैकी एकाला मी ‘जा! म्हटले की तो जातो. जेव्हा दुसऱ्याला ‘ये! म्हटले की तो येतो. मी जेव्हा माझ्या दासाला म्हणतो, की ‘हे कर!' तर तो ते करतो. अशाच अधिकाराने तुम्हीपण बोला.”
\v 10 येशूने हे ऐकले तेव्हा, तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या सोबत चालणाऱ्या लोकसमुदायाला तो म्हणाला, “हे लक्षपूर्वक ऐका: ह्या परराष्ट्रीय मनुष्यासारखा या पूर्वी कधीच कोणीही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला मला आढळला नाही. इस्राएल मध्ये देखील नाही, जेथे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा अशी मी अपेक्षा केली, की कोणी तरी माझ्यावर एवढा विश्वास ठेवावा!
\s5
\p
\v 11 मी तुम्हांला खरोखर सांगतो जेव्हा देव सर्वांवर पूर्णपणे राज्य करील तेव्हा पुष्कळ परराष्ट्रीय लोक देखील माझ्यावर विश्वास ठेवतील, आणि ते दूर-दूरच्या देशातून येतील, जे दूर पूर्वेकडे आहेत ते सुद्धा आणि जे दूर पश्चिमेकडे आहेत ते सुद्धा येतील, आणि ते अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ह्यांच्या सोबत भोजनास बसतील.
\v 12 परंतु यहूद्यांनी देवाला स्वतःवर राज्य करू दिले पाहिजे होते, देव त्यांना नरकात फेकून देईल, जेथे पुर्णपणे अंधकार आहे. तेथे त्यांना होत असलेल्या त्रासामुळे ते रडतील आणि त्यांना होत असलेल्या तीव्र वेदनेमुळे ते आपले दात चावतील.”
\v 13 मग येशू अधिकाऱ्याला म्हणाला, “घरी जा. मी दूर अंतरावरून तुझ्या सेवकाला बरे करावे, व तसेच व्हावे असा जो तू विश्वास ठेवला, तसेच होईल.” मग तो अधिकारी घरी गेला आणि त्याला त्याचा सेवक त्याच घटकेस बरा झालेला समजले जेव्हा येशू म्हणाला होता की तो त्याला बरे करील.
\s शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी
\s5
\p
\v 14 येशू आणि त्याचे काही शिष्य पेत्राच्या घरी गेले तेव्हा, येशूने पेत्राच्या सासूला पाहिले. ती अंथरुणावर झोपलेली होती कारण तिला ताप आलेला होता.
\v 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व लगेचच तिचा ताप बरा झाला. मग ती उठली व तिने त्यांना जेवण वाढले.
\s5
\p
\v 16 त्याच संध्याकाळी शब्बाथ संपल्यावर, जमावाने ज्यांना भूतांनी वश केले होते, आणि इतर लोक जे आजारी होते, अशा पुष्कळ लोकांना येशूकडे आणिले. केवळ त्याच्या बोलण्याद्वारे त्याने भूते घालवली, आणि जे सर्व आजारी होते त्यांना त्याने आरोग्य दिले.
\v 17 त्याने हे केले तेव्हा, यशया संदेष्ट्याने जे काही लिहिले ते खरे ठरले, ‘त्याने लोकांना त्यांच्या आजारांपासून मुक्त केले, आणि त्याने त्यांना बरे केले.
\s शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी
\s5
\p
\v 18 येशूने आपल्या सभोवती लोकांची गर्दी पाहिली, परंतु त्याला आराम करण्याची गरज होती. परंतु त्याला तारवामधून सरोवरापलीकडे घेऊन जावे अशी त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा केली.
\v 19 जसे ते तारवाच्या दिशेने निघाले तेव्हा, यहूदी नियमशास्त्र शिकवणारा एक पुरुष त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे तुम्ही जाल तेथे मी तुमच्याबरोबर येईन.”
\v 20 येशूने त्याला उत्तर दिले, “खोकडांस राहण्यासाठी जमिनीमध्ये बिळे, आणि पक्षांना आकाशात राहण्यासाठी घरटे आहेत, परंतु मी जरी मनुष्याचा पुत्र असलो तरी, माझ्याकडे घर नाही जेथे मी आराम करू शकतो.
\s5
\p
\v 21 आणखी एक पुरुष जो येशूच्या शिष्यांपैकी होता त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला प्रथम घरी जाण्याची परवानगी द्या. माझ्या पित्याच्या मरणानंतर मी त्याला पुरेन आणि मग मी तुमच्या बरोबर येईन.”
\v 22 परंतु येशू त्याला म्हणाला, “आताच माझ्या बरोबर ये. असे लोक जे मेलेल्यात जमा आहेत, त्यांनाच आपले स्वतःचे लोक मरण्याची वाट पाहू दे.”
\s वादळ शांत करणे
\s5
\p
\v 23 त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य तारवामध्ये चढले, आणि त्यांनी गालील सरोवराच्या दिशेने तारवास हाकारणे सुरु केले.
\v 24 लगेचच पाण्यामध्ये जोराचा वारा सुटला, आणि अतिशय मोठाल्या लाटा उचंबळत होत्या व त्याने तारू भरून जात होते. परंतु येशू झोपलेला होता.
\v 25 त्यांनी जाऊन त्याला ऊठवीले, आणि त्याला म्हणाले, “प्रभू, आम्हांला वाचवा! आपण बुडणार आहोत!”
\s5
\p
\v 26 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही घाबरून जाऊ नये! मी तुम्हांला वाचवू शकतो इतका देखील तुमचा विश्वास नाही.” मग तो उठला आणि वाऱ्याला दटावले आणि लाटांना शांत होण्यास सांगितले. लगेचच वारा वाहणे थांबले आणि पाणी शांत झाले.
\v 27 ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि ते एक एकमेकांशी म्हणू लागले, “हा मनुष्य निश्चितच एक असाधारण व्यक्ती आहे! सर्व गोष्टी ह्याच्या नियंत्रणात आहेत! वारा आणि लाटा देखील ह्याच्या आज्ञा पाळतात!”
\s गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त
\s5
\p
\v 28 जेव्हा ते सरोवराच्या पूर्वेकडील भागात आल्यावर, गदरेकर राहतात त्या प्रदेशात ते उतरले. मग भूतांनी वश केलेले दोन पुरूष मेलेल्या लोकांना ठेवतात त्या गुहेमधून बाहेर आले ते तेथेच राहत असत. कोणीही त्या वाटेने जाण्यास धजत नव्हते, कारण ते अत्यंत हिंसक आणि लोकांवर हल्ला करणारे होते.
\v 29 लगेचच ते येशूवर ओरडले, “तू देवाचा पुत्र आहेस! म्हणून तुझा आणि आमचा काही संबंध नाही, आम्हांला एकटेच राहू दे! देवाने आमच्यासाठी नियोजीत केलेल्या शिक्षेच्या वेळे अगोदरच तू आम्हांला छळण्यासाठी आला आहेस काय?”
\s5
\p
\v 30 तेथे जवळपासच डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
\v 31 म्हणून त्या दुष्टआत्म्यांनी येशूला विनंती केली आणि म्हणाले, “तू आम्हांला ह्या माणसांमधून बाहेर काढणार असशील, तर आम्हांला त्या डुकरांमध्ये पाठव!”
\v 32 येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्हांला हेच पाहिजे तर, जा!” मग दुष्टआत्म्यांनी त्या माणसांना सोडले व डुकरांमध्ये प्रवेश केला. लगेचच तो डुकरांचा संपूर्ण कळप धावत जाऊन कड्यावरून खाली पडला आणि पाण्यात बुडून गेला.
\s5
\p
\v 33 मग त्या डुकरांची राखण करणारे लोक घाबरून गेले आणि नगरात पळून गेले व झालेल्या सर्व गोष्टींविषयी, ज्या दोन माणसांना दुष्टआत्म्यांनी नियंत्रीत केले होते त्यांच्यासोबत देखील काय घडले हे वर्तमान कळवले.
\v 34 मग असे झाले की त्या नगरात राहणारे सर्व लोक येशूकडे आले. त्यांनी त्याला आणि दुष्टआत्म्यांनी वश केले होते त्या दोन पुरूषांना पाहिले. तेव्हा ते येशूला त्यांचा प्रांत सोडून जाण्यास विनंती करू लागले.
\s5
\c 9
\s पक्षघाती मनुष्य
\p
\v 1 येशू व त्याचे शिष्य तारवात चढले. त्यांनी सरोवरावरून तारू हाकारले आणि कफर्णहूमास गेले, हे तेच शहर होते जेथे तो राहत होता.
\v 2 काही लोकांनी पक्षघात झालेल्या एका मनुष्याला त्याच्याकडे आणिले, तो अंथरुणावर झोपलेला होता. पक्षघात झालेल्या मनुष्याला तो बरे करू शकतो असा त्यांचा विश्वास आहे हे जाणून येशू त्याला म्हणाला, “मुला, धीर धर! मी तुझ्या अपराधांची क्षमा करतो.
\s5
\p
\v 3 यहूदी नियम शास्त्र शिकवणारे काही लोक आपसात बोलू लागले, “हा मनुष्य स्वतःला देव समजतो; तो पापांची क्षमा करू शकत नाही!”
\v 4 ते काय विचार करत आहेत हे येशूला समजले, म्हणून तो त्यांना म्हणाला, “माझ्या विषयी वाईट विचार करू नका!
\v 5 ‘मी तुझ्या पापांची क्षमा करतो, असे ह्या मनुष्याला म्हणणे कोणालाही कठीन जाणार नाही, कारण हे खरंच घडते किंवा नाही हे कोणीही पाहू शकत नाही. परंतु ‘ऊठ आणि चालू लाग! असे कोणीही त्याला म्हणू शकत नाही, कारण तो परत चालू शकतो की नाही हे लोक सहजपणे पाहू शकतात!
\v 6 म्हणून मी असे काही करणार आहे जेणेकरून तुम्हांला हे समजावे की देवाने मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर असतांना लोकांच्या अपराधांची क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे.” मग तो त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, आपले झोपण्याचे अंथरुण उचल, आणि घरी जा!”
\s5
\p
\v 7 लगेचच तो मनुष्य उठला, आपले झोपण्याचे अंथरूण उचलले, आणि घरी गेला!
\v 8 लोक समुदायाने हे पाहिले तेव्हा, ते विस्मीत झाले. देवाने मानवजातीला अशा गोष्टी करण्याचा अधिकार दिल्याबद्दल त्यांनी त्याची स्तुती केली.
\s मत्तयाला पाचारण
\p
\v 9 येशू तेथून दूर जात असता, त्याने मत्तय नावाच्या मनुष्याला पाहिले. रोमी सरकारकरीता कर गोळा करण्यासाठी तो एका टेबलाजवळ बसलेला होता. येशू त्याला म्हणाला, “माझ्या बरोबर ये आणि माझा शिष्य हो!” मग मत्तय उठला आणि त्याच्या बरोबर गेला.
\s5
\p
\v 10 येशू आणि त्याचे शिष्य एका घरात जेवणासाठी बसले. ते जेवण करत असता, पुष्कळ कर गोळा करणारे आणि मोशेच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करणारे इतर लोक आले आणि ते त्याच्या सोबत जेवू लागले.
\v 11 परुश्यांनी हे पाहिले तेव्हा ते शिष्यांकडे गेले आणि म्हणाले, “तुमचा गुरु कर गोळा करणारे आणि इतर जे त्यांच्या सारखे आहेत त्यांचा सहभागी होतो आणि त्यांच्या सोबत जेवतो हे फार तिरस्करणीय आहे.”
\s5
\p
\v 12 ते काय बोलत आहेत हे येशूने ऐकले म्हणून त्याने त्यांना ही बोधकथा सांगितली: जे लोक आजारी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे, जे चांगले आहेत त्यांना नाही.
\v 13 देवाने बोललेल्या ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्ही शिकायला हवे: ‘तुम्ही केवळ यज्ञार्पणेच करू नये तर लोकांबरोबर दयेनेही वागले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात असू द्या, जे लोक स्वतःला नीतिमान समजतात त्यांनी आपल्या पापमय जिवनापासून मागे फिरावे आणि माझ्याकडे यावे म्हणून नव्हे तर, ज्या लोकांना माहित आहे की ते पापी आहेत त्यांनाच बोलावण्यासाठी मी आलो आहे.”
\s उपास
\s5
\p
\v 14 मग बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य येशूकडे येऊन त्याला विचारू लागले, “आम्ही व परूशी उपास करतो कारण देवाला संतोषवावे अशी आमची इच्छा आहे, परंतु तुमचे शिष्य तसे करत नाहीत. ते का करत नाहीत?”
\v 15 येशूने उत्तर दिले, “जेव्हा नवरदेव विवाहाच्या वेळेस त्याच्या मित्रांबरोबर आहे, तेव्हा ते लोक उपाशी राहणार नाहीत, हो की नाही? नाही, कारण त्या घटकेस ते दुःखी नसतील. परंतु नवरदेवाला त्यांना सोडून जाण्याची वेळ येईल, तेव्हा ते अन्नापासून दूर राहतील, कारण तेव्हा ते दुःखी असतील.
\s5
\p
\v 16 लोक जुन्या कपड्याला पडलेले छिद्र दुरूस्त करण्यासाठी सुती कापडाचे ठिगळ त्याच्यावर लावत नाहीत. जर त्यांनी असे केले तर जेव्हा ते त्या कपड्याला धुऊन काढतील, तेव्हा ते ठिगळ आकसून जाईल आणि कपड्याला फाडून टाकील, आणि छिद्र अजून मोठे होईल.
\s5
\p
\v 17 ताजा द्राक्षाचा रस कोणीही जुन्या कातडी पिशव्यांमध्ये ओतून साठवत नाहीत. जर कोणी तसे केले तर, द्राक्षाचा रस जेव्हा मद्यामध्ये परिवर्तीत होईल तेव्हा त्या कातडी पिशव्या फाटून जातील. त्या पिशव्या नष्ट होतील, आणि तो द्राक्षारस जमिनीवर सांडून जाईल. त्या ऐवजी, लोक नविन द्राक्षाचा रस नविन कातडी पिशव्यांमध्ये ठेवतात, आणि जेव्हा तो द्राक्षाचा रस आंबून जातो तेव्हा त्या पिशव्या फुगतात. ह्याच प्रकारे, पिशवी आणि द्राक्षारस दोन्हीपण सुरक्षीत राहतात.”
\s याइराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री
\s5
\p
\v 18 येशू हे बोलत असता, शहरातील एक पुढारी त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे लवून नमन केले. मग तो म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे! परंतु जर तुम्ही येऊन तिच्यावर आपले हात ठेवले, तर ती पुन्हा बरी होईल!”
\v 19 म्हणून येशू उठला, आणि तो व त्याचे शिष्य त्या मनुष्यासोबत गेले.
\s5
\v 20-21 मग बारा वर्षांपासून रक्तस्त्रावाने पिडीत असलेली एक स्त्री येशूच्या जवळ आली. ती स्वतःशीच म्हणत होती, “मला रक्तस्त्रावाचा त्रास आहे हे कोणालाही न समजता येशूने मला बरे करावे. म्हणून जर मी त्याला स्पर्श केला किंवा मी केवळ त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला, तर या विषयी कोणालाही न कळता मी बरी होईन.” म्हणून ती त्याच्या मागून आली आणि त्याच्या वस्त्राच्या कोपऱ्याला शिवले.
\v 22 मग येशूने मागे वळून पाहिले की त्याला कोणी स्पर्श केला. आणि जेव्हा त्याने त्या स्त्रिला पाहिले, तो तिला म्हणाला, “बाई, धीर धर. मी तुला बरे करू शकतो असा तू विश्वास ठेवलास म्हणून, मी तुला बरे केले आहे.” अगदी त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.
\s5
\p
\v 23 येशू त्या मनुष्याच्या घरी आल्यावर बासरी वाजवणाऱ्यांना अंत्यसंस्काराचे संगीत वाजवतांना पाहिले; आणखी तेथे पुष्कळ विलाप करणारे आणि शोक करणाऱ्यांना त्याने पाहिले कारण ती मुलगी मरण पावली होती.
\v 24 तो त्यांना म्हणाला, “अंत्यसंस्काराचे संगीत वाजवणे आणि विलाप करणे थांबवा आणि येथून दूर व्हा, कारण मुलगी मेलेली नाही! ती केवळ झोपलेली आहे!” लोकांना हे माहित होते की ती मेलेली आहे, म्हणून ते त्याच्यावर हसू लागले.
\s5
\p
\v 25 परंतु येशूने त्यांना घरा बाहेर जाण्यास सांगितले. मग मुलगी झोपली होती त्या खोलीत त्याने प्रवेश केला, त्याने तिचा हात धरून ठेवला व ती पुन्हा जिवंत झाली.
\v 26 आणि हे सर्व त्या प्रांतातील लोकांनी ऐकले.
\s दोन आंधळे
\s5
\p
\v 27 येशू तेथून जात असता, दोन आंधळे मनुष्य त्याच्या मागे येऊन ओरडू लागले, “दावीद राजाच्या पुत्रा, आमच्यावर दया करून आम्हांला बरे कर!”
\v 28 येशू त्याच्या स्वतःच्या घरात गेला, आणि ते दोन आंधळे मनुष्य त्याच्या मागे त्या घरात गेले. येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला बरे करण्यास सक्षम आहे असा तुम्ही विश्वास ठेवता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू!”
\s5
\p
\v 29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला दृष्टी देण्यास सक्षम आहे असा तुम्ही विश्वास धरला, म्हणून मी आताच तुम्हांला दृष्टी देतो!”
\v 30 आणि त्यांना पाहता येऊ लागले! मग येशूने त्यांना बजावून सांगितले, “मी तुमच्यासाठी जे काही केले ते कोणालाही सांगणार नाही ह्याची खात्री करा.
\v 31 परंतु त्यांनी बाहेर जाऊन त्या संपूर्ण प्रदेशात ही वार्ता पसरवली.
\s मुका भूतग्रस्त
\s5
\p
\v 32 मग ते दोन पुरूष तेथून गेले तेव्हा, दुष्ट आत्म्याने वश केल्या मुळे जो बोलू शकत नव्हता अशा एका मनुष्याला काही लोकांनी येशूकडे आणिले.
\v 33 येशूने त्या दुष्ट आत्म्याला बाहेर काढल्या नंतर तो मनुष्य बोलू लागला! लोकसमुदायाने हे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी या पूर्वी इस्राएलामध्ये घडतांना आम्ही कधीच पाहील्या नव्हत्या!”
\v 34 परंतु परूशी म्हणाले, “तो सैतानच आहे, जो दुष्टआत्म्याने राज्य करतो, त्याच्याद्वारेच ह्या मनुष्यामधून भूतांना बाहेर काढले आहे.”
\s5
\p
\v 35 मग येशू आणि त्याचे शिष्य गालील जिल्ह्यातील पुष्कळ गावामधून आणि नगरांमधून फिरले. लवकरच देव स्वतःला एक राजा म्हणून प्रकट करणार आहे असे तो सभास्थानात शिकवत होता आणि ह्या विषयीची शुभवार्ता लोकांना सांगत होता. आणखी त्याने लोकांना त्यांच्या निरनिराळ्या आजारातून आणि रोगातून बरे केले.
\v 36 त्याने लोकांच्या गर्दीला पाहिले तेव्हा त्यांच्या विषयी त्याला फार दुःख वाटले, कारण ते निराशेत आणि काळजीमध्ये होते. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे ते होते.
\s5
\p
\v 37 मग तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “माझ्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी तयार असलेले लोक जणू काय कापणीसाठी तयार झालेल्या पिकाप्रमाणे आहेत, परंतु पिक गोळा करण्यास जाण्यासाठी फार थोडके लोक आहेत.
\v 38 म्हणून पिक गोळा करण्यासाठी अधिक जास्त लोक पाठवावे म्हणून प्रभू देवा कडे प्रार्थना करा.”
\s5
\c 10
\p
\v 1 येशूने त्याच्या बारा शिष्यांना स्वतःकडे येण्यास सांगितले. लोकांना नियंत्रित करणाऱ्या अशुद्ध आत्म्यांना काढून टाकण्याची शक्ती त्याने त्यांना दिली. वेगवेगळ्या प्रकारे आजारी असणाऱ्यांना आणि निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी जडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी त्याने त्यांना सक्षम केले.
\s5
\p
\v 2 त्याने त्यांना प्रेषित हे नाव दिले, त्या बारा शिष्यांची ही यादी आहे. शिमोन ज्याला त्याने पेत्र असे नाव दिले; पेत्राचा लहान भाऊ अंद्रिया; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबाचा लहान भाऊ योहान,
\v 3 फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय,
\v 4 शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
\s5
\p
\v 5 वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी या बारा शिष्यांना येशू पाठवत असतांना त्याने त्यांना या प्रकारे सुचना केल्या: “परराष्ट्रीय लोक राहतात त्या ठिकाणांमध्ये जाऊ नका किंवा शोमरोनी लोक राहतात त्यांच्या गावातही जाऊ नका.
\v 6 त्याऐवजी इस्राएलातील लोकांकडे जा; ज्या मेंढपाळापासून मेंढरे जशी भटकून जातात त्याप्रमाणे ते लोक आहेत.
\v 7 जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल तेव्हा त्यांना अशी घोषणा करून सांगा की देव लवकरच स्वतःला त्यांचा राजा म्हणून प्रकट करणार आहे.
\s5
\p
\v 8 आजारी लोकांना बरे करा, मेलेल्या लोकांना तुम्ही पुन्हा जिवंत करा, कुष्ठरोग झालेल्यांना बरे करा, आणि त्यांना समाजाचा भाग बनण्यासाठी परत आणा ज्या लोकांना भूतांनी नियंत्रित केलेले आहे अशांमधून त्यांना काढून टाका. लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसा घेऊ नका कारण देवानेही तुमची मदत करावी म्हणून तुमच्याकडून कसल्याही प्रकारचा पैसा घेतलेला नाही.
\v 9-10 तुम्ही आपल्या सोबत काहीच पैसा घेऊ नका, किंवा काय कपडे घालावे त्यासाठी एखादी थैलीही घेऊ नका, तसेच चालण्यासाठी काठी देखील ठेवू नका. स्वतःसोबत तुम्ही एखादा जास्तीचा अंगरखा किंवा जास्तीचे चपलांचे जोड घेऊ नका, तुम्ही जे काही घातले आहे तेवढेच तुम्हासाठी पुरे आहे. ज्या लोकांसाठी एखादा कामकरी काम करतो, त्या लोकांपासून काम करणाऱ्याला वेतन मिळावे हे योग्य आहे; म्हनून तुम्ही ज्या लोकांकडे राहाल त्यांच्याकडून तुम्ही भोजन आणि राहण्यासाठी जागा स्वीकारावी.
\s5
\p
\v 11-12 तुम्ही एखाद्या गावात किंवा एखाद्या खेड्यात प्रवेश केला असता ज्या मनुष्याची तुम्ही त्याच्या घरी राहावे अशी इच्छा आहे असा मनुष्य शोधा. तुम्ही जेव्हा त्याच्या घरात प्रवेश कराल तेव्हा देवाने त्या घरात राहणाऱ्या लोकांचे भले करावे अशी त्याच्याकडे प्रार्थना करा. तुम्ही ते गाव किंवा ते शहर सोडेपर्यंत त्याच व्यक्तीच्या घरात राहावे.
\v 13 त्या घरात राहणाऱ्या लोकांनी जर तुमचा खरोखर चांगला स्वीकार केला तर देव नक्कीच त्यांचे भले करणार. परंतु जर त्यांनी तुमचा स्वीकार पूर्ण मनाने केला नाही तर तुमची प्रार्थना त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही आणि देवही त्यांचे भले करू शकणार नाही.
\s5
\v 14 त्या घरात राहणाऱ्या किंवा त्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमच्या संदेशाला ऐकले नाही तर तुम्ही ते ठिकाण सोडून द्या. तुम्ही तिथून निघत असतांना तुमच्या पायाची धूळ झटकून टाका. तुम्ही जे काही बोलाल त्याचा त्यांनी जसा नाकार केला तसाच देवही त्यांचा नाकार करणार आहे. असा इशारा तुम्ही त्याद्वारे त्यांना द्याल.
\v 15 तुम्ही हे लक्षपूर्वक नोंद करा: देव सर्व लोकांचा न्याय करणार आहे तेव्हा तो सदोम गमोरा येथील दुष्ट लोकांना शासन करेल. परंतु तुम्ही ज्या कोणत्याही शहरात जाता तेथील लोकांनी जर तुमचा नकार केला तर देव त्यांना त्यांच्यापेक्षाही जास्त कठोरपणे शासन करणार आहे.
\s5
\p
\v 16 “हे लक्षात घ्या: जेव्हा मी तुम्हांला पाठवत आहे तेव्हा तुम्ही धोकादायक कोल्ह्यांच्या समोर स्वतःचा बचाव न करू शकणाऱ्या मेंढरांप्रमाणे त्या लोकांमध्ये पाठवले जात आहात. आणि जसे कबूतर कोणाला त्रास देत नाही तसे तुम्ही देखील कबूतराप्रमाणे कोणालाही उपद्रव करू नये. अशा लोकांपासून तुम्ही निरंतर स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत असावे जसा साप लोकांविरुद्ध स्वतःचा बचाव करण्यासाठी सावध असतो तसे तुम्हीही असावे.
\v 17 तुम्ही लोकांविषयी सावध असा कारण ते तुम्हांला अटक करतील आणि धर्मसभेच्या सदस्यांच्या समोर तुमची कसोटी व्हावी म्हणून ते त्यांच्यासमोर तुम्हांला उभे करतील; तुम्ही माझे शिष्य आहात म्हणून ते तुम्हांला शिक्षा करतील. ते त्यांच्या सभास्थानांमध्ये तुम्हांला नेतील आणि तुम्हाला चाबकांनी फटके मारतील.
\v 18 तुम्ही माझे आहात म्हणून ते तुम्हांला राज्यपालांपुढे आणि राजां पुढे नेतील जेणेकरून तुमचा न्याय व्हावा आणि तुम्हांला दंड देण्यात यावा. परंतु तुम्ही त्या अधिकार्‍यांना आणि इतर परराष्ट्रीय लोकांना माझ्याविषयी साक्ष द्याल.
\s5
\p
\v 19 जेव्हा ते लोक तुम्हांला अटक करतील तेव्हा तुम्ही त्यांना काय बोलणार आहात या विषयी काळजी करू नका कारण त्या क्षणी पवित्र आत्मा तुम्ही कोणते शब्द बोलावे ते तुम्हांला सुचवणार आहे.
\v 20 तुम्ही काय बोलणार आहात ह्याचा निर्णय तुम्ही करू नका, त्याऐवजी स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांला सुचवणार आहे.
\s5
\p
\v 21 तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून ते तुम्हांला ठार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातात सोपवतील. उदाहरणार्थ, लोक त्यांच्या भावांसोबत तसे करतील आणि वडील त्यांच्या मुलांना धरून देतील. मुले देखील आपल्या आई-वडिलांच्या विरुद्ध बंडाळी करतील आणि त्यांना ठार मारावे म्हणून त्यांना धरून देतील.
\v 22 तुम्ही माझ्यावर भरंवसा ठेवता म्हणून लोक तुमचा तिरस्कार करतील. परंतु जे कोणी मरेपर्यंत माझ्यावर विश्वासूपणे भरंवसा ठेवतील त्या लोकांचा देव बचाव करेल.
\v 23 जेव्हा एखाद्या शहरातील लोक तुम्हांला छळतील तेव्हा तुम्ही ते शहर सोडून दुसऱ्या शहराकडे पळून जा. हे लक्षात ठेवा: जेव्हा मी मनुष्याचा पुत्र निश्चितच या पृथ्वीवर परत येण्या आधी, तुम्ही इस्त्राएलामधिल एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये लोकांना माझ्याविषयी सांगणे संपविणे होणार नाही.
\s5
\p
\v 24 एखाद्या शिष्याने आपल्या गुरूपेक्षा महान व्हावे अशी अपेक्षा करू नये आणि दासाने देखील आपल्या स्वामी पेक्षा मोठे होण्याची अपेक्षा करू नये.
\v 25 लोकांनी एखाद्या शिक्षकापेक्षा अधिक सन्मान त्याच्या विद्यार्थ्यांना द्यावा अशी अपेक्षा आपण करू शकत नाही किंवा एखाद्या दासाच्या मालकाला लोक जेव्हा सन्मान देतात त्यापेक्षा जास्त सन्मान ते त्याच्या दासाला देऊ शकत नाहीत. त्याच प्रकारे मी तुमचा शिक्षक व तुमचा स्वामी आहे म्हणून लोक तुमच्या सोबत दूरव्यवहार करतील अशी अपेक्षा बाळगा कारण त्यांनी माझ्या सोबत देखील वाईट वर्तन केले आहे. तुम्ही जास्तीत जास्त अशी अपेक्षा करू शकता की त्यांनी माझ्या सोबत जसे वर्तन केले, तसे ते तुम्हा सोबतही करतील. ज्याला ते सैतान म्हणतात, त्याच्या घराण्यावर राज्य करणाऱ्यासारखे ते मला समजतात. जर त्यांनी माझ्यासोबत वाईट वर्तन केले आहे तर ते तुम्हा सोबत कसे वागतील असे तुम्हांला वाटते?”
\s5
\p
\v 26 “तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना घाबरू नका. लोकांना आतापर्यंत जे सर्वकाही गुप्त आहे, ते आता त्यांना तुम्ही प्रगट करावे ही देवाची इच्छा आहे. त्याच्याविषयीचे जे काही सत्य आहे, ते तुम्ही लपून ठेवावे अशी त्याची इच्छा नाही किंवा ते गुप्त ठेवावे असेही त्याला वाटत नाही.
\v 27 म्हणून त्यांना घाबरण्याच्या ऐवजी, मी तुम्हांला जे काही गुप्तपणे सांगतो जणू काय ते रात्री सांगत असल्यासारखे, तुम्ही लोकांकडे जाऊन ते भर दिवसा उजेडात मोठ्याने सांगावे. ज्या गोष्टी मी तुम्हांला गुप्तपणे एकांतात सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही लोकांना उघडपणे सार्वजनिकरित्या सांगाव्यात.
\s5
\p
\v 28 जे केवळ तुमच्या शरीराला ठार करू शकतात परंतु तुमच्या आत्म्याचा नाश करू शकत नाहीत अशा लोकांना घाबरू नका. परंतु त्याऐवजी जो तुमच्या शरीराला आणि तुमच्या आत्म्याला नरकामध्ये नाश करू शकतो त्या देवाला भ्या.
\v 29 चिमण्यांविषयी विचार करा, त्यांची किंमत ऐवढी कमी असते की तुम्ही एका नाण्यामध्ये त्या दोन खरेदी करू शकता. परंतु जेव्हा त्यातली एक चिमणी जमिनीवर पडते आणि मरण पावते तेव्हा तुमच्या स्वर्गातील बापाला ते ठाऊक आहे कारण त्याला सर्वकाही माहीत आहे.
\v 30 तसेच त्याला तुम्हाविषयी ही सर्व काही ठाऊक आहे, तुमच्या डोक्यावर किती केस आहेत हे देखील त्याला माहित आहेत!
\v 31 देव चिमण्यांची जेवढी किंमत करतो त्यापेक्षाही कितीतरी अधिक तुम्ही त्याच्यासाठी मोलवान आहात, म्हणून जेव्हा लोक तुम्हाला ठार मारण्याची धमकी देतात तेव्हा तुम्ही त्यांना घाबरू नका.
\s5
\p
\v 32 जेव्हा लोक इतरांना हे सांगतील की ते माझे आहेत तेव्हा मी देखील माझा पिता जो स्वर्गात आहे त्याच्या समोर ते लोक माझे आहेत ह्याचा स्वीकार करेन.
\v 33 परंतु जर ते लोकांसमोर ते माझे आहेत आणि याचा स्वीकार करण्यास घाबरतील तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्यालाही मी सांगणार की ते लोक माझे नाहीत.
\s5
\p
\v 34 “या पृथ्वीवरील लोकांनी एकमेकांसोबत शांतीत जगावे असे सांगण्यासाठी मी आलो आहे असा विचार करू नका. मी आलो आहे म्हणून मला अनुसरण करणाऱ्यांपैकी काही लोक ठार केले गेले.
\v 35 मी या पृथ्वीवर आलो आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्याविरुद्ध जे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत असे लोक उठतील. उदाहरणार्थ, काही पित्यांची मुले आपल्या वडिलांचा विरोध करतील काही मुले आपापल्या आईंचा विरोध करतील आणि काही सुना आपल्या सासूंच्या विरोधात उभ्या राहतील.
\v 36 कधी कधी एखाद्या व्यक्तीचे शत्रू हे त्याच्या घरातील आपले स्वतःचे लोक असतात हे यावरुन तुम्हांला दिसून येईल.
\s5
\p
\v 37 जे लोक स्वतःच्या आईवर किंवा स्वतःच्या वडिलांवर माझ्याही पेक्षा अधिक प्रीती करतात असे लोक माझे होण्याच्या योग्यतेचे नाहीत. आणि जे लोक माझ्या पेक्षाही अधिक स्वतःच्या मुलांवर किंवा स्वतःच्या मुलींवर प्रीती करतात ते देखील माझे लोक होण्याच्या योग्यतेचे नाहीत.
\v 38 तुम्ही माझे आहात म्हणून जर तुम्ही मरण्यासाठी देखील तयार झालेला नाहीत, तर तुम्ही माझे लोक होण्याच्या योग्यतेचे नाही.
\v 39 जे लोक मृत्यू पासून सुटका पाहण्यासाठी ते माझे आहेत यास नाकार देतात ते लोक अनंत काळाकरिता देवा सोबत राहू शकणार नाहीत; परंतु जे लोक माझ्याकरिता आपला प्राण गमावण्यास तयार आहेत आणि ते माझ्यावरील विश्वासामुळे आहे तर ते देवासोबत अनंत काळ वस्ती करतील.
\s5
\p
\v 40 “जो कोणी तुमचे स्वागत करतो तो माझे स्वागत करत आहे, असे देव म्हणतो आणि जो कोणी माझे स्वागत करतो तो देवाचे स्वागत करत आहे अशा दृष्टिकोनातून देव त्या लोकांकडे पाहतो, जो माझे स्वागत करतो तो ज्याने मला पाठवले त्याचे स्वागत करतो.
\v 41 एखादा व्यक्ती संदेष्टा आहे म्हणून जेव्हा लोक त्याचे स्वागत करतात ते त्या संदेष्ट्याला देवापासून जे प्रतिफळ प्राप्त होणार असते तेच प्रतिफळ मिळवतात. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती नीतिमान आहे म्हणून जर कोणी त्या व्यक्तीचे स्वागत करत असेल तर त्या नीतिमान व्यक्तीला देवापासून मिळणारे प्रतिफळही हे लोक प्राप्त करत असतात.
\s5
\p
\v 42 याची नोंद घ्या: तुम्ही कोणत्याही प्रकारे महत्त्वाची व्यक्ती नसूनही केवळ माझ्या शिष्यांपैकी एक आहात आणि तुम्हांला तहान लागली आहे हे पाहून जर कोणी तुम्हाला थंड पाणी पिण्यासाठी दिले तर देव नक्कीच अशा लोकांना त्यांचे प्रतिफळ देईल.”
\s5
\c 11
\s बाप्तिस्मा करणारा योहान
\p
\v 1 येशूने त्याच्या बारा शिष्यांना त्यांनी काय करावे ह्याच्या सूचना सांगणे संपविल्यानंतर, इस्राएलातील विविध गावांमध्ये जाण्यासाठी त्याने त्यांना पाठवून दिले. आणि मग तो स्वतः इस्राएलातील इतर गावांमध्ये उपदेश करण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी निघून गेला.
\p
\v 2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात असतांना, ख्रिस्त काय करत आहे याविषयी त्याने ऐकले. म्हणून त्याने त्याच्या काही शिष्यांना त्याच्याकडे
\v 3 असे विचारण्यासाठी पाठवले की, “संदेष्ट्यांनी ज्याच्या विषयी सांगितले होते तो येणारा ख्रिस्त तूच आहेस काय, किंवा आम्ही इतर कोणाच्या येण्याची वाट पाहावी?”
\s5
\p
\v 4 येशूने योहानाच्या शिष्यांना उत्तर दिले, “मी लोकांना काय सांगत आहे. ते तुम्ही जाऊन योहानाला सांगा. तसेच मी काय करत आहे असे तुम्हाला दिसते ते देखील त्याला सांगा.
\v 5 आंधळ्या लोकांनी पुन्हा पाहावे आणि लंगड्या लोकांनी चालावे असे मी करत आहे. ज्या लोकांना कुष्ठरोग झाला आहे त्यांना मी बरे करत आहे. बहिऱ्या लोकांना ऐकता यावे असे मी त्यांना बरे करत आहे. आणि जे लोक मेलेले होते त्यांना मी पुन्हा जिवंत करत आहे. गरीब लोकांना मी देवाची चांगली बातमी सांगत आहे.
\v 6 मी जे काही कार्य करत आहे, ते ज्या लोकांना आवडत नाही त्यांच्यासारखेच जे माझ्यावर विश्वास ठेवणे थांबवत नाहीत; अशा लोकांवर देव प्रसन्न आहे.”
\s5
\v 7 योहानाचे शिष्य निघून गेल्यानंतर, येशू योहानाविषयी लोकांच्या समूहासोबत बोलू लागला. तो त्यांना म्हणाला, “अरण्यामध्ये तुम्ही योहानाला पाहण्यासाठी गेला होता, तेव्हा तुम्ही तेथे काय पाहण्याच्या अपेक्षेने गेला होता? वाऱ्याने ऊंच गवत हालवले जात आहे ते पाहण्यासाठी तुम्ही तेथे गेला होता काय?
\v 8 मग तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती दृष्टीस पडणार अशा अपेक्षेने गेला होता? भरजरी वस्त्रे महाग कपडे घालणारा व्यक्ती तुमच्या दृष्टीस पडेल अशा अपेक्षेने तुम्ही तेथे नक्कीच गेला नव्हता. होय की नाही! तुम्हाला तर चांगले ठाऊक आहे, की असे महाग वस्त्रे घालणारे लोक रानावनात राहत नाहीत, तर ते राजाच्या महलामध्ये राहत असतात.
\s5
\p
\v 9 तर मग खरे सांगा, कोणत्या प्रकारचा व्यक्ती तुमच्या दृष्टीस पडण्याची तुम्हास अपेक्षा होती? एक संदेष्टा? हा, होय! परंतु मला तुम्हाला सांगू द्या: योहान हा काही सर्वसाधारण संदेष्टा नव्हे.
\v 10 शास्त्रवचनांमध्ये कोणीतरी लिहिले आणि म्हटले की, देव ज्याला संदर्भ देत होता हा तोच आहे,
\q ‘ऐका! माझ्या येण्यासाठी लोकांनी तयार व्हावे म्हणून तूझ्यासमोर मी माझ्या एका संदेश वाहकाला पाठवत आहे’ तोच हा संदेश वाहक होय.
\s5
\p
\v 11 याची नोंद घ्या. आतापर्यंत जेवढे सर्व लोक जिवंत होते, त्यामध्ये कोणीही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाऐवढा महान देवाच्या दृष्टीत झाला नाही. परंतु त्याच वेळेस, देव ज्या सर्व लोकांवर राज्य करण्यास सहमत आहे, त्यांच्यातील अगदी लहानही योहानापेक्षा महान आहे.
\v 12 बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने उपदेश करण्यास सुरूवात केली तेव्हापासून, काही लोकांनी देवाने त्यांच्यावर राज्य करावे यासाठी देवाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्याने राज्य करावे असे त्याच्यावर जोर टाकला आहे. जेणेकरून त्यांना त्यातून काहीतरी फायदा व्हावा.
\s5
\p
\v 13 संदेष्टांनी शास्त्र लेखांमध्ये जे लिहिले आहे. आणि नियमशास्त्र बाप्तिस्मा करणारा योहान येईपर्यंत जे काही सांगत होता. ते सर्व तुमच्या वाचनात आहे. आणि तेच मी तुम्हाला योहानाविषयी ही सांगत आहे.
\v 14 केवळ एवढेच नाही, परंतु तुम्ही हे समजून घेण्यास तयार असणार, तर मी तुम्हाला सांगतो की योहान हा दुसरा एलिया आहे, हा तोच संदेष्टा होता जो भविष्यामध्ये येणार होता.
\v 15 तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी आता जे काही बोललो त्याविषयी तुम्हाला फार लक्षपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
\s5
\p
\v 16 परंतु तुम्ही आणि सध्या जे लोक जिवंत आहेत, ते बाजारामध्ये एकत्र येऊन खेळणाऱ्या मुलांसारखे आहेत. त्यांच्यापैकी काही त्याच्या मित्रांना एकत्र करून त्यांना असे म्हणतात,
\v 17 ‘आम्ही बासूरीवर तुम्हासाठी फार आनंददायक असे संगीत वाजवले, परंतु तुम्ही त्या संगीताच्या तालावर नाच केला नाही! त्यानंतर आम्ही तुम्हासाठी प्रेतक्रियेमध्ये जे गीत गातात ते ही गायले, परंतु तुम्ही आमच्यासोबत रडला नाही!
\s5
\p
\v 18 मी असे म्हणतो कारण तुम्ही योहान आणि मी आम्हा दोघांपासून ही समाधानी नाहीत! योहान तुम्हाकडे आला आणि त्याने तुम्हाला उपदेश केला, तेव्हा जसे बहुतेक लोक करतात, तसे तो उत्तम भोजन खात नसेल किंवा द्राक्षरस ही पीत नसेल. परंतु तुम्ही त्याचा नाकार केला आणि असे म्हणाला, ‘एक दुरात्मा त्याचे नियंत्रण करत आहे!
\v 19 मी, मनुष्याचा पुत्र, योहानासारखा नाही. इतर लोक खातात त्याप्रमाणे मी जेवण केले आणि द्राक्षरस प्यालो. परंतु तुम्ही माझा देखील नाकार केला आणि मला म्हणालात, ‘पाहा! हा मनुष्य तर खूप जेवण करतो आणि भरपूर द्राक्षरस पितो, आणि त्याचे मित्र जकात गोळा करणारे आणि इतर पापी लोक ही आहेत! परंतु तुम्हामध्ये कोणी खरोखर ज्ञानी असेल तर तो आपल्या उत्तम कृत्यांनी ते दर्शवून देईल.”
\s पश्चात्ताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार
\s5
\p
\v 20 येशू त्या भागातील ज्या गावांमध्ये जात होता, तेथे राहणाऱ्या लोकांनी त्याला अनेक चमत्कार करताना पाहिले. परंतु ते आपल्या पापी जीवनापासून वळले नाहीत. म्हणून येशू त्यांना असे बोलून रागावू लागला.
\v 21 “खोराजीन शहरात राहणाऱ्या आणि बैथसैदा शहरात राहणाऱ्या लोकांनो, तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात दुःख सहन करावे लागणार! मी तुमच्या शहरांमध्ये फार मोठे चमत्कार केले, परंतु तुम्ही पाप करणे थांबवले नाही. मी सोर किंवा सीदोन या शहरांमध्ये फार पूर्वी जर हेच चमत्कार केले असते, तर त्या दुष्ट लोकांनी नक्कीच पाप करणे बंद केले असते; त्यांनी आपल्या अंगावर खरबरीत कपडे घातले असते आणि राखेमध्ये बसून, आपल्या पापांबद्दल दुःख प्रकट केले असते.
\v 22 मला तुम्हाला हे सांगू द्या: सोर आणि सीदोन या दोन शहरांमध्ये जे दुष्ट लोक राहत होते त्यांना देव नक्की शासन करणार आहे, परंतु सर्व लोकांना शेवटल्या दिवशी जेव्हा न्यायालयासमोर जावे लागेल. त्या दिवशी तो तुम्हाला त्यांच्या ही पेक्षा अधिक कठोर रीतीने शासन करणार आहे.
\s5
\p
\v 23 कफर्णहूम नगरात राहणाऱ्या लोकांना मला तुम्हाला देखील काही तरी सांगायचे आहे. तुम्हाला असे वाटते का? की इतर लोक तुमची एवढी स्तुती करतील की तुम्ही सरळ स्वर्गात प्रवेश कराल? असे घडणार नाही! त्याउलट, लोक मरण पावल्यानंतर जेथे देव त्यांना शिक्षा देतो तेथे खाली तुम्ही जाणार आहात! बऱ्याच काळापूर्वी जर सदोमामध्ये हेच चमत्कार मी केले असते, तर त्या दुष्ट लोकांनी नक्कीच आपल्या पापांना थांबवले असते, आणि ते शहर आजही तुम्हामध्ये असते. परंतु तुम्ही पाप करणे थांबवले नाही.
\v 24 मला तुम्हाला हे सांगायचे आहे की सदोमामध्ये राहणाऱ्या दुष्ट लोकांना देव शिक्षा करणार आहे, परंतु शेवटच्या दिवशी देव सर्व लोकांचा न्याय करेल तेव्हा तो तुम्हाला त्यांच्याही पेक्षा अधिक कठोर अशी शिक्षा देईल.”
\s बालसदृश मनोवृत्ती
\s5
\p
\v 25 येशूने त्याच वेळेस अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व गोष्टींमध्ये तू राज्य करत आहेस. ज्या लोकांना ते फार ज्ञानी आणि अतिशय जास्त शिक्षित आहेत, अशांना ह्या गोष्टी जाणून घेण्यापासून तू थांबवले आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. त्याऐवजी, लहान लेकरांप्रमाणे जे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींना सत्य म्हणून स्वीकारतात अशा लोकांना तू ह्या गोष्टी प्रकट केल्या आहेस.
\v 26 होय, माझ्या पित्या, तुझ्या दृष्टीने हे उत्तम आहे म्हणून तू असे होऊ दिले.”
\p
\v 27 मग येशूने लोकांना असे म्हटले, “देवाने, माझ्या पित्याने, माझे काम करण्यासाठी मला जाणणे आवश्यक आहे म्हणून मला या सर्व गोष्टी प्रकट केल्या आहेत, मी खरोखर कोण आहे हे केवळ माझ्या पित्यालाच ठाऊक आहे. शिवाय, केवळ मी आणि ज्या लोकांनी त्याला ओळखावे अशी माझी खरोखर इच्छा आहे. अशांवरच मी त्याला प्रकट करणार आहे.
\s येशूची स्वतःची कामगिरी
\s5
\p
\v 28 तुमच्या पुढाऱ्यांनी जे सर्व नियम तुम्हाला शिकवले त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करून खूप थकलेल्या लोकांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. ह्या सर्व गोष्टी करण्यापासून मी तुम्हाला विसावा देईन.
\v 29 एक बैल जसा त्याच्यावरील जु स्वीकारतो, तसेच तुम्ही मला अधीन व्हा, आणि मला तुम्हाला जे काही शिकवायचे आहे ते शिका. मी नम्र आणि सौम्य आहे, आणि खरोखर तुम्ही विसावा पावाल.
\v 30 कारण मी तुम्हाला जे ओझे देतो ते फार हलके आहे, आणि तुम्ही ते अगदी सहज घेऊन चालू शकता.”
\s5
\c 12
\s शब्बाथाचे पालन
\p
\v 1 त्यावेळेस एका शब्बाथ दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य ज्या शेतामध्ये काही धान्य होते त्या शेताजवळून जात होते. शिष्यांना भूक लागलेली असल्यामुळे, त्यांनी त्या शेतातील धान्याची काही कणसे तोडली आणि ते ती कणसे खाऊ लागले, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याची परवानगी होती.
\v 2 ते असे करत असतांना काही परूश्यांनी त्यांना पाहिले, म्हणून ते येशूला म्हणाले, “पाहा! तुझे शिष्य विसावा घेण्याच्या दिवशी देखील काम करत आहेत. नियमशास्त्र आम्हाला असे करण्याची परवानगी देत नाही!”
\s5
\p
\v 3 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “आपला पूर्वज आणि राजा दावीद याच्यासोबत असलेले मनुष्य जेव्हा त्यांना भूक लागली त्यावेळेस त्यांनी काय केले हे शास्त्रलेखामध्ये लिहिलेले आहे. तुम्ही ते वाचले आहे, परंतु त्याचा अर्थ काय होतो याविषयी तुम्ही कधी विचार केलेला नाही!
\v 4 देवाची उपासना करतात त्या पवित्र तंबूमध्ये दावीदाने प्रवेश केला आणि त्याने तेथे काही अन्न मागितले. देवासमोर काही भाकरी मांडण्यात आल्या होत्या त्या भाकरी मुख्य याजकाने त्याच्या हातात दिल्या. परंतु मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, ती भाकर केवळ याजकच खाऊ शकत होते, परंतु दावीद आणि त्याच्या मनुष्यांनी त्या भाकरी खाल्ल्या. आणि देवाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीच चूक केली नव्हती!
\s5
\p
\v 5 तसेच, मोशेने लिहिले आहे ते तुम्ही नक्कीच वाचले असेल, तो म्हणतो जरी याजक आमच्या शब्बाथ दिवशी मंदिरात काम करत असले, तर ते यहूदी कायद्यांचे विश्रांती दिवस पाळत नाहीत, तरी देखील ते दोषी नाहीत.
\v 6 याचा अर्थ काय होतो ते मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाकडे आलो आहे, आणि मी मंदिरापेक्षाही महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्या पूर्वजांनी शब्बाथ दिवसाविषयी काय म्हटले यापेक्षा मी तुम्हाला जे काही शिकवत आहे त्याचे तुम्ही पालन करावे हे महत्त्वाचे आहे.
\s5
\p
\v 7 शास्त्रलेखामध्ये लिहिलेल्या देवाच्या या वचनाविषयी तुम्ही विचार केला पाहिजे: ‘तुम्ही लोकांसोबत दयेने वागावे ही माझी इच्छा आहे, आणि केवळ बलिदानच करत राहू नये’ ह्या वचनाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळाले असते, तर तुम्ही माझ्या शिष्यांना दोष लावला नसता, त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही.
\v 8 मी मनुष्याचा पुत्र आहे, आणि शब्बाथ दिवशी लोकांनी काय केले पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार आहे.”
\s वाळलेल्या हाताचा मनुष्य
\s5
\p
\v 9 त्यादिवशी येशू तेथून निघाल्यानंतर, तो एका सभास्थानात गेला.
\v 10 तेथे त्याला सुकलेल्या हाताचा एक मनुष्य दृष्टीस पडला. शब्बाथ दिवसाविषयी येशूसोबत वाद-विवाद करावा अशी परूश्यांची इच्छा होती, म्हणून त्यांच्यापैकी एकाने येशूला विचारले, “विसावा घेण्याच्या दिवशी लोकांना बरे करण्याची देव आम्हाला परवानगी देतो का?” येशू काहीतरी चुकीचे बोलून एखादे पाप करेल अशी त्यांची आशा होती.
\s5
\p
\v 11 त्याने त्यांना उत्तर दिले, “समजा तुम्हापैकी एकाकडे केवळ एकच मेंढरू आहे, आणि शब्बाथ दिवशी ते एका खोल खड्ड्यामध्ये पडले. तर काय तुम्ही त्याला तेथेच सोडून द्याल काय? नक्कीच नाही! तुम्ही त्याला धराल आणि लगेचच त्याला बाहेर काढाल, आणि आमचे शब्बाथ दिवशी असे करणे चुकीचे ठरणार नाही.
\v 12 परंतु एका मेंढरापेक्षा एखादा व्यक्ती कितीतरी मोलवान आहे. तर एखाद्या मनुष्याला कोणत्याही दिवशी बरे करणे हे आम्हासाठी चांगले आहे, आणि आम्ही त्याला शब्बाथ दिवशी देखील बरे करू शकतो!”
\s5
\p
\v 13 त्यानंतर तो त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपला हात लांब कर! त्या मनुष्याने त्याचा सुकलेला हात लांब केला, आणि तो दुसऱ्या निरोगी हाता सारखाच पूर्णपणे निरोगी झाला!
\s येशूला ठार मारण्याचा कट
\p
\v 14 मग परूशी त्या सभास्थानातून निघून गेले. येशूला कसे ठार मारावे याची योजना ते आखू लागले.
\s5
\v 15 परूशी त्याला ठार करण्याची योजना आखत आहेत हे येशूला ठाऊक असल्यामुळे, त्याने शिष्यांना घेतले आणि तो तेथून निघून गेला. लोकांची खूप गर्दी होती, जेथे असंख्य आजारी लोकही होते, आणि ते त्याच्या मागे गेले, आणि त्याने त्या सर्वांना बरे केले.
\v 16 परंतु त्याने त्यांना निक्षून सांगितले की त्यांनी त्याच्या विषयी इतर लोकांना सांगू नये.
\v 17 यशया संदेष्ट्याने फार पूर्वी जे लिहून ठेवले होते ते त्याने अशाप्रकारे नम्रतेने वागण्याद्वारे परिपूर्ण केले. त्याने असे लिहले होते,
\s5
\q
\v 18 “हाच तो माझा सेवक होय ज्याला मी निवडले आहे,
\q मी ह्याच्यावर प्रीती करतो आणि तो मला संतोष देतो.
\q मी त्याच्यामध्ये माझा आत्मा ठेवीन,
\q आणि तो परराष्ट्रीयांना न्याय व तारण देईल.
\s5
\p
\v 19 तो लोकांसोबत भांडण करणार नाही, आणि तो आरडा-ओरडाही करणार नाही.
\q आणि तो रस्त्यांवर मोठ्याने बोलणार नाही.
\q
\v 20 अशक्त लोकांसोबत तो अतिशय सौम्यतेने वागणार;
\q जर एखादा व्यक्ती अगदी मरावयास टेकला असेल, तर तो त्याला ठार करणार नाही.
\q आणि तो लोकांचा न्याय अतिशय न्यायीपणाने करेल आणि ते दोषी नाहीत अशी घोषणा करेल.
\q
\v 21 म्हणून परराष्ट्रीय लोक त्याच्यावर अगदी पूर्ण मनाने भरवसा ठेवतील.”
\s सैतानाचे सहाय्य घेतल्याचा आरोप
\s5
\p
\v 22 एके दिवशी काही माणसांनी आंधळा आणि जो बोलू शकत नव्हता अशा एका व्यक्तीला येशूकडे आणले कारण त्याला एक दुरात्मा लागलेला होता. येशूने त्याच्यातील दुरात्मा काढून टाकला आणि त्या व्यक्तीला बरे केले. नंतर तो मनुष्य बोलू लागला आणि त्याला पाहता येऊ लागले.
\p
\v 23 ज्या लोकांनी ते पाहिले ते अतिशय आश्चर्य करू लागले. ते एकमेकांना विचारू लागले की, “हा व्यक्ती ख्रिस्त असू शकतो काय, दावीद राजाचा वंशज ज्याची आम्ही वाट पाहत आहोत तो ख्रिस्त हाच व्यक्ती आहे काय?”
\s5
\p
\v 24 परूश्यांनी त्या चमत्काराविषयी ऐकले होते म्हणून, ते म्हणाले, “लोकांमधून दुरात्मे घालवण्याची शक्ती ह्या व्यक्तीला सैतानाचा अधिपती, बालजबूलाकडून प्राप्त होते हा सैतान म्हणजेच दुरात्म्यांचा अधिकारी होय, देवापासून हे नाही.”
\v 25 परंतु परूशी काय विचार करत आहेत हे येशूने ओळखले. म्हणून त्याने त्यांना उत्तर दिले, “एका देशातील दोन गट एकमेकांसोबत भांडू लागले, तर त्या देशांमध्ये फूट पडून त्या देशाचा नाश होईल. एकाच शहरात किंवा एकाच घरात राहणारे लोक एकमेकांसोबत भांडू लागले, तर नक्कीच ते एक कुटूंब किंवा एक शहर मिळून राहू शकत नाहीत.
\s5
\p
\v 26 अगदी याच प्रकारे, सैतान त्याच्या स्वतःच्या दुष्ट आत्म्यांना घालवू लागला, तर तो स्वतःच्याच विरुद्ध लढत असेल. आणि अशा रीतीने तो त्याच्या सेवकांवर अधिकार करू शकणार नाही!
\v 27 इतकेच काय तर, सैतान माझ्याद्वारे दुरात्मे घालवत असेल, तर तुमचे शिष्य देखील सैतानाच्या सामर्थ्याने दुरात्मे घालवतात हे सत्य आहे का? नाही! परंतु हे सत्य नाही आणि म्हणून तुम्ही जो विचार करत आहात तो तर्काला धरून नाही.
\s5
\p
\v 28 परंतु तो देवाचा आत्मा आहे जो दुरात्मे घालवण्याची शक्ती मला देतो, हे यावरून सिद्ध होते की देवाने तुमच्यावर स्वतःला राजा म्हणून दाखवणे आरंभ केले आहे.
\p
\v 29 मी दुरात्मे घालवण्यास का सक्षम आहे हे मी तुम्हाला दाखवतो. एक व्यक्ती सैतानासारख्या एका बलदंड मनुष्याच्या घरात जाऊन जो पर्यंत त्याला बांधत नाही तो पर्यंत त्याची मालमत्ता कोणालाही लुटता येत नाही. परंतु तेथे जाऊन त्याला बांधले, तर नंतर तो त्याची मालमत्ता घेऊ शकेल.
\p
\v 30 म्हणून कोणीही व्यक्ती तटस्थ राहू शकत नाही. मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दुरात्मे काढतो ह्या गोष्टीला जे स्वीकार करत नाहीत ते माझा विरोध करणारे आहेत, आणि लोकांनी माझे शिष्य व्हावे याकरिता जे लोकांना गोळा करत नाहीत ते लोकांनी माझे शिष्य होऊ नये म्हणून त्यांना माझ्यापासून दूर करतात.
\s5
\p
\v 31 मला दुरात्मे काढण्यासाठी सक्षम करणारा पवित्र आत्मा नाही असे तुम्ही म्हणत आहात. म्हणून मी तुम्हाला असे म्हणतो: कोणी एखाद्याला कोणत्याही प्रकारे दुखवले व अपमान केला आणि मग त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी देवाला त्याची क्षमा मागितली, तर देव त्यांना त्याची क्षमा करणार. परंतु पवित्र आत्म्याने केलेल्या कार्याचा जे कोणी अपमान करतील त्यांना देव क्षमा करणार नाही.
\v 32 माझा, म्हणजेच मनुष्याच्या पुत्राचा जे लोक अपमान करतात त्यांना क्षमा करण्यासाठी देव तयार आहे, परंतु पवित्र आत्मा काय करतो त्याचा जर कोणी अपमान केला तर देव अशा लोकांना क्षमा करणार नाही. देव त्यांना आताही क्षमा करणार नाही, आणि येणाऱ्या राज्यातही क्षमा करणार नाही.”
\s5
\p
\v 33 “तुम्ही एखाद्या झाडावरील फळ पाहता तेव्हा तुम्ही निर्णय घेता की ते फळ चांगले आहे किंवा वाईट आहे. ते फळ चांगले असेल, तर तुम्हाला हे कळते की ते झाडही नक्कीच चांगले आहे. मी चांगली कार्ये करत आहे, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की मी चांगला आहे किंवा नाही.
\v 34 तुम्ही विषारी सापांच्या पिल्लांसारखे आहात! तुम्ही वाईट असल्यामुळे, कोणतीही चांगली गोष्ट बोलू शकत नाही. एखादा व्यक्ती काय बोलतो ह्यावरून त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय आहे ते दिसते
\v 35 चांगले लोक चांगल्या गोष्टी बोलतात. त्यांनी चांगल्या गोष्टींना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवले आहे आणि त्यांना हवे तेव्हा ते त्या गोष्टींना बाहेर काढू शकतात म्हणूनच ते अशाप्रकारे वागू शकतात. परंतु वाईट लोक वाईट गोष्टी बोलतात. कारण जणूकाय त्यांनी सर्व वाईट गोष्टींचा साठा करून ठेवला आहे आणि त्यांनी त्या गोष्टी अशा ठिकाणी साठवून ठेवल्या आहेत तेथून त्या कोणत्याही वेळेस ते बाहेर काढू शकतात.
\s5
\p
\v 36 देव ज्या दिवशी न्याय करणार त्या दिवसाविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, लोकांनी इतरांना दुःख होईल अशा बोललेल्या प्रत्येक शब्दाची तो त्यांना आठवण करून देईल, आणि त्यांनी जे काही म्हटले त्या विषयी तो त्यांचा न्याय-निवाडा करील.
\v 37 तुम्ही जे कोणते शब्द बोलले आहात त्या शब्दांवरून देव एक तर तुम्हाला नीतिमान ठरवेल, किंवा तुम्ही जे काही बोलला आहात त्यानूसार तो तुम्हाला दोषी ठरवेल.”
\s चिन्ह दाखवण्याबाबत येशूला केलेली विनंती
\s5
\p
\v 38 तेव्हा यहूदी नियमांचे शिक्षक आणि परूश्यांपैकी काही लोकांनी येशूला प्रतिक्रिया दिली, “गुरूजी, देवाने तुम्हाला पाठवले आहे याबद्दल आमची खात्री पटावी म्हणून तुम्हाला एखादा चमत्कार करताना आम्हाला पाहावयाचे आहे.”
\v 39 मग येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही मला या अगोदरच चमत्कार करताना पाहिलेले आहे, परंतु तुम्ही दुष्ट आहात, आणि तुम्ही देवाची उपासना विश्वास योग्यतेने करत नाहीत!” देवाने मला पाठवले आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवावे अशी तुमची इच्छा आहे, परंतु देव तुम्हाला केवळ एकच चमत्कार दाखवणार आहे. योना संदेष्ट्यासोबत जे घडले त्याप्रमाणे हे आहे.
\v 40 एका मोठ्या माशाच्या पोटामध्ये तीन दिवस व तीन रात्र योना होता आणि त्यानंतर देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढले. अशाच प्रकारे, मी, मनुष्याचा पुत्र, देखील पृथ्वीमध्ये खोलवर तीन दिवस आणि तीन रात्र राहणार आहे, आणि त्यानंतर देव मला पुन्हा जिवंत करणार आहे.
\s5
\p
\v 41 देव ज्या वेळेस सर्व लोकांचा न्याय करणार, त्यावेळेस निनवे शहरातील लोक त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभे राहतील. परंतु योनाने त्यांना चेतावणी दिली त्यावेळी त्यांनी पाप करणे थांबवले होते. आता मी तुम्हाकडे आलो आहे, आणि योना होता त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचा मी आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव तुमचा न्याय करणार आहे.
\s5
\p
\v 42 शलमोन राजा ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकवत होता, त्या ऐकण्यासाठी एका दुरवरच्या प्रदेशातून इस्त्राएलाच्या दक्षिणेकडे राहणारी, शिबाची राणी, फार पूर्वीच्या काळी आली होती. शलमोन होता, त्याहीपेक्षा मी कितीतरी महत्त्वाचा आहे, आणि आता मी तुम्हाकडे आलो आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव सर्वांचा न्याय करेल तेव्हा शिबाची राणी त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभा राहील, आणि ती तुम्हाला दोषी ठरवील.”
\s अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके
\s5
\p
\v 43 “कधीकधी जेव्हा एक दुष्ट आत्मा एका व्यक्तीला सोडतो, त्यावेळेस तो निर्जन स्थळामध्ये भटकत राहतो, एखाद्याच्या आत शिरावे आणि विसावा घ्यावा म्हणून तो शोधत फिरतो. परंतु जर त्याला कोणी आढळले नाही,
\v 44 तर तो स्वतःशीच असे म्हणतो, ‘मी ज्या व्यक्तीमध्ये राहत असे त्या व्यक्तीकडे पुन्हा परत जाईन. तर तो पुन्हा परत जातो आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर देवाच्या आत्म्याचे नियंत्रण नाही असे त्याच्या दृष्टीस पडते. एखादे घर स्वच्छ झाडलेले आहे आणि सर्वकाही जेथे हवे तेथे नीट ठेवलेले आहे, परंतु ते रिकामे आहे अशा घरासारखे त्या व्यक्तीचे जीवन आहे.
\v 45 मग हा अशुद्ध आत्मा जातो आणि त्याच्याहून अधिक दुष्ट असे सात अशुद्ध आत्मे मिळवतो, आणि ते सर्व त्या व्यक्तीत प्रवेश करतात आणि त्याच्या सोबत राहण्यास सुरूवात करतात. मग त्या व्यक्तीची स्थिती आधी होती, त्याच्यापेक्षाही त्यानंतरची स्थिती त्याहूनही अधिक वाईट होते. तुम्हापैकी ज्या दुष्ट लोकांनी माझे शिक्षण ऐकले आहे तुम्ही देखील हाच अनुभव घ्याल.”
\s प्रभू येशूचे नातलग
\s5
\p
\v 46 येशू त्या लोक समुदायाशी बोलत असतांना, त्याचे लहान भाऊ आणि त्याची आई त्या ठिकाणी आले. तो ज्या घरात उभा राहून बोलत होता त्या घराच्या बाहेर ते उभे होते आणि त्यांना त्याच्याशी बोलण्याची इच्छा होती.
\v 47 कोणीतरी त्याला म्हणाले, “तुझी आई आणि तुझे लहान भाऊ घराबाहेर उभे आहेत, आणि त्यांना तुझ्या सोबत बोलायचे आहे.”
\s5
\p
\v 48 मग ज्या व्यक्तीने येशूला हा निरोप दिला त्याला येशू म्हणाला, “माझी खरी आई आणि माझे खरे भाऊ कोण आहेत हे मी तुला सांगतो.”
\v 49 मग त्याने त्याच्या शिष्यांकडे बोट दाखवले आणि म्हणाला, “मी जेवढी माझ्या आईवर आणि माझ्या भावांवर प्रीती करतो तेवढीच मी ह्यांच्यावरही प्रीती करतो.
\v 50 माझा देव जो पिता स्वर्गात राहतो त्याच्या इच्छेप्रमाणे जे करतात, ते माझ्या भावांइतके, माझ्या बहिणींइतके, आणि माझ्या आई इतके मला प्रिय आहेत.”
\s5
\c 13
\s पेरणी करणाऱ्याचा दृष्टांन्त
\p
\v 1 मग त्याच दिवशी येशूने, आपल्या शिष्यांसोबत, ज्या घरात तो शिक्षण देत होता ते घर सोडले आणि तेथून गालील समुद्राच्या किनार्‍यावर गेला. तेथे तो खाली बसला,
\v 2 आणि त्याचे शिक्षण ऐकण्यासाठी फार मोठा लोकांचा समुदाय त्याच्याजवळ गोळा झाला. थोडी मोकळी जागा मिळावी म्हणून तो एका नावेत चढला आणि तिच्यात बसून त्याने त्यांना शिक्षण दिले. लोकांची गर्दी समुद्र किनाऱ्यावर उभी राहून त्याचे शिक्षण ऐकू लागली.
\s5
\p
\v 3 त्याने त्यांना असंख्य बोधकथेचा उपयोग करून शिक्षण दिले. तो म्हणाला, “ऐका! एक मनुष्य आपल्या शेतामध्ये बी पेरण्यासाठी गेला.
\v 4 जेव्हा तो जमिनीवर बी पेरत होता, तेव्हा त्यापैकी काही बी वाटेवर पडले. परंतु काही पक्षी आले आणि त्यांनी ते बी खाऊन टाकले.
\v 5 काही बी अशा जमिनीवर पडले जेथे फारशी माती नव्हती आणि खडकाळ जागा होती. त्या बीयांना लवकर अंकूर फुटले, कारण सुर्याने त्या उथळ मातीला लवकरच तापवले त्यामुळे असे घडले.
\v 6 परंतु जेव्हा ती छोटी रोपटे वाढली, तेव्हा ती सूर्यप्रकाशात अतिशय तापली आणि त्यामुळे ती सुकून गेली कारण त्यांची मूळे मातीमध्ये खोलवर रुजलेली नव्हती.
\s5
\p
\v 7 काही बी अशा जमिनीवर पडले जेथे काटेरी झुडपे होती. ती काटेरी झुडपे त्या लहान रोपट्या सोबत वाढली, आणि त्यांनी त्यांना कवटाळले.
\v 8 परंतु काही बी चांगल्या जमिनीवर पडले, आणि ती झाडे वाढली आणि त्यांनी भरपूर पीक दिले. काही रोपट्यांनी शंभर पट इतके पीक दिले. काही ठिकाणी त्यांनी साठ पट इतके पीक दिले आणि काही ठिकाणी तीस पटीपर्यंत पीक आले.
\v 9 जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी जे काही बोललो त्याचा लक्षपूर्वक विचार केला पाहिजे.”
\s दृष्टांन्ताचा उपयोग
\s5
\p
\v 10 मग शिष्य येशूकडे नंतर परत आले आणि त्यांनी त्याला विचारले, “तू गर्दीमध्ये लोकांशी बोलत असतो तेव्हा बोधकथांचा उपयोग का करतो?”
\v 11 त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाने या अगोदर कोणाला जे प्रगट केले नाही ते त्याने तुम्हावर प्रकट केले आहे, म्हणजेच तो स्वतःला कशा पद्धतीने राजा म्हणून प्रकट करणार आहे हे त्याने तुम्हाला दाखवले आहे. परंतु त्याने ह्या गोष्टी इतर लोकांवर प्रकट केलेल्या नाहीत.
\v 12 मी काय बोलतो याचा जो कोणी विचार करणार आणि ते समजून घेईल, तर परमेश्वर त्यांना त्या गोष्टी अधिक समजण्यास सक्षम करेल. परंतु मी जे बोलत आहे त्याविषयी लक्षपूर्वक विचार करण्याचा जे प्रयत्न करणार नाहीत ते त्याही गोष्टी विसरतील ज्या त्यांना अगोदर पासूनच ठाऊक आहेत.
\s5
\p
\v 13 आणि म्हणूनच लोकांशी बोलतांना आम्ही बोधकथा स्वरूपांमध्ये बोलतो, कारण जरी त्यांना मी जे करतो ते दिसते, तरीही त्याचा अर्थ काय आहे हे त्यांना समजत नाही, आणि मी जे बोलतो ते त्यांना ऐकू येत असले, तरीही त्यात त्याचा अर्थ काय आहे हे ते शिकत नाहीत.
\v 14 बऱ्याच काळापूर्वी देवाने यशया संदेष्याच्याद्वारे जे म्हटले होते ते या लोकांच्याद्वारे अतिशय परिपूर्णरीत्या आज होत आहे,
\p मी जे बोलत आहे ते तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु ते तुम्हाला समजणार नाही.
\q मी जे काही करतो ते तुम्ही पाहाल
\q परंतु त्याचा अर्थ काय होतो
\q हे तुम्ही शिकणार नाही.
\s5
\p
\v 15 देव यशयाला असे देखील म्हणाला,
\q हे लोक खरोखरच माझे ऐकण्यासाठी असमर्थ झाले आहेत;
\q मी जे काही बोलत आहे ते खरोखर ऐकत नाहीत.
\q त्यांनी आपले डोळे बंद करावे असे ते झाले आहेत आणि त्यांना खरोखर पाहण्याची इच्छा नाही
\q जणुकाय त्यांना काहीही ऐकायचे देखील नाही. ते अशाप्रकारे आहेत त्यामुळे पाप करणे थांबवण्याचा विचारही ते करणार नाहीत.
\q त्यांच्या अशा कृत्यामुळे मी त्यांना वाचवावे ह्याची त्यांना गरज आहे
\q याविषयी ते विचार करणार नाहीत.
\s5
\p
\v 16 परंतु तुम्हाविषयी म्हणायचे तर देव तुम्हावर प्रसन्न झाला आहे कारण मी जे काही केले ते तुम्ही पाहिले आहे आणि मी जे काही बोलतो ते तुम्ही समजून घेत आहात.
\v 17 तुम्ही याची नोंद घ्या: मी जे काही करत आहे ते पाहण्यासाठी अनेक संदेष्टे आणि नीतिमान लोक फार पूर्वीपासून पाहण्याची अभिलाषा धरत होते, परंतु त्यांना ते पहावयास मिळाले नाही. मी जे काही बोलत आहे ते ऐकावे अशीही त्यांची इच्छा होती, परंतु मी जे बोलत आहे ते त्यांना ऐकता आले नाही.”
\s पेरणाऱ्याच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण
\s5
\p
\v 18 आता मी जी बोधकथा सांगितली त्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो ते तुम्ही ऐका.
\v 19 देव लोकांच्या जीवनावर कशा पद्धतीने राज्य करण्याची सुरूवात करत आहे याविषयी काही लोक ऐकतात परंतु त्यांना ते कळत नाही. जे बी वाटेवर पडले त्या बियांसारखे ते आहेत. सैतान, जो दुष्ट आहे, तो येतो आणि लोकांनी जे काही ऐकले ते त्यांनी विसरून जावे असे तो करतो.
\s5
\p
\v 20 काही लोक देवाचा संदेश ऐकतात आणि लगेचच आनंदाने स्वीकारतात आणि त्याचा ते स्वीकार करतात. ते त्या खडकाळ जागेसारखे आहेत जेथे काही बी पडले होते.
\v 21 परंतु ते त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर न रुजल्यामुळे, ते केवळ थोड्या वेळासाठीच विश्वास धरतात. ज्या रोपट्यांची मुळे खोल नाहीत अशासारखे ते आहेत. म्हणून मी जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवल्यामुळे, त्यांच्याशी दूर व्यवहार करतात किंवा त्यांचा छळ करतात, तर माझ्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारून ते पाप करतात.
\s5
\p
\v 22 काही लोक देवाचे वचन ऐकतात, परंतु त्यांना श्रीमंत होण्याची अभिलाषा असते, म्हणून ते पैशाविषयी काळजी करतात आणि त्या पैशांनी ते काय विकत घेऊ शकतात याचा विचार करतात. परिणामी, ते देवाचा संदेश विचारतात आणि त्यांनी काय करावे अशी जी देवाची इच्छा आहे ते त्या गोष्टी करत नाहीत. ज्या जमिनीमध्ये काटेरी झुडपे होती अशा जमिनीसारखे आहेत.
\v 23 परंतु काही लोक माझा संदेश ऐकतात आणि तो संदेश ते समजून घेतात, देवाला आवडतात अशा गोष्टी काही लोक करतात, इतर काही लोक देवाला आवडणांऱ्या अधिक जास्त गोष्टी करतात, आणि काही लोक तर देवाला प्रिय वाटणाऱ्या अशा खूप गोष्टी करतात. ज्या चांगल्या जमिनीमध्ये बी पडले आणि त्यांनी पुष्कळ उत्पन्न दिले अशा जमिनी सारखे हे लोक होत.”
\s निदणाचा दृष्टान्त
\s5
\p
\v 24 येशूने लोक समुदायाला आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करण्याची सुरूवात होईल, तेव्हा एखाद्या जमिनीचा मालक आपल्या सेवकांना आपल्या शेतामध्ये चांगले गहू पेरण्यासाठी पाठवतो त्याप्रमाणे होईल.
\v 25 त्या शेताचे रक्षण न करता आणि ते सेवक झोपले असतां, त्या जमिनीच्या मालकाचा शत्रू आला आणि त्याने त्या गव्हांमध्ये जंगली बी ही पेरले. मग तो निघून गेला.
\v 26 नंतर त्या बीयांना अंकूर फुटले आणि त्यातून हिरवी रोपटे वाढू लागली, त्यामध्ये कणसे आकार घेऊ लागली, परंतु त्यासोबतच ती काटेरी झुडपे ही वाढली.
\s5
\p
\v 27 म्हणून त्या जमिनीच्या मालकाचे सेवक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “स्वामी, तुम्ही आम्हाला उत्तम प्रतीचे बीं दिले आणि आम्ही तेच शेतामध्ये पेरले होते. तर मग हे काटेरी झुडपे कोठून आली?
\v 28 जमिनीचा मालक त्यांना म्हणाला, ‘माझ्या शत्रूने हे केले आहे. त्याच्या दासांनी त्याला म्हटले, ‘आम्ही त्या काटेरी झुडपांना उपटून टाकावे अशी तुझी इच्छा आहे काय?
\s5
\p
\v 29 त्यांने त्यांना उत्तर दिले, ‘नाही, तुम्ही असे करू नका, कारण तुम्ही त्या झुडपांना उपटतांना कदाचित काही गहू ही त्याच वेळेस उपटून टाकाल.
\v 30 कापणीची वेळ येईपर्यंत त्या झुडपांना आणि गव्हाला सोबत वाढू द्या. जेव्हा ती वेळ येईल त्यावेळेस कापणी करणाऱ्यांना मी असे म्हणेन, ‘पहिल्याने झुडपे गोळा करा, त्यांना एकत्र मोळीमध्ये बांधा आणि त्यांना जाळण्यासाठी घेऊन जा. त्यानंतर गहू एकत्र करा आणि तो माझ्या कोठारांमध्ये साठवून ठेवा.’”
\s मोहरीचा दाणा व खमिर ह्यांचे दृष्टान्त
\s5
\p
\v 31 येशूने ही बोधकथा देखील त्यांना सांगितली: “देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करण्यास सुरूवात करेल, तेव्हा एखाद्या मनुष्याने आपल्या शेतामध्ये मोहरीच्या दाण्याला पेरले आणि ते वाढू लागले तसे होईल.
\v 32 लोक जे पेरतात त्या सर्व बियांणामध्ये मोहरीचे दाणे हे अतिशय लहान असे आहेत, परंतु येथे इस्राएलामध्ये ते फार मोठ्या झाडांमध्ये रूपांतरित होतात. त्या झाडांची परिपूर्ण वाढ होते, तेव्हा ते बागेमधील इतर झाडांपेक्षा कितीतरी मोठ्या आकाराचे होतात. त्यांचा आकार मोठ्या झाडासारखा होतो, आणि ते एवढे मोठे असतात की, त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी देखील आपली घरटी बांधू शकतात.”
\s5
\p
\v 33 येशूने ही देखील बोधकथा सांगितली: “देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करू लागेल, तेव्हा एखादी स्त्री जी भाकर बनवते त्यासारखे ते असेल. तिने जवळपास चाळीस किलो पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडेसे खमिर मिसळले, आणि त्या पीठाचा गोळा फुगून मोठा झाला.”
\s5
\p
\v 34 लोकसमुदायाला ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी येशूने या बोधकथांचा उपयोग केला. तो त्याच्या सोबत संभाषण करत असे तेव्हा तो नेहमीच त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींच्याद्वारे सांगत असे.
\v 35 बऱ्याच काळापूर्वी देवाने आपल्या संदेष्ट्यांपैकी एकाला जे लिहिण्यास सांगितले होते, त्या गोष्टी तो असे करत असल्याने सत्य ठरल्या.
\p ‘मी त्यांच्याशी बोधकथेच्या रूपात बोलणार; सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत त्या गोष्टी शिकवण्यासाठी मी त्यांना बोधकथांना शिकवेन.
\s निदणाच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण
\s5
\p
\v 36 येशूने लोकसमुदायाला पाठवून दिल्यानंतर, तो एका घरात गेला. त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “गव्हाच्या शेतामध्ये जी झुडपे उगवली त्या बोधकथेचा अर्थ तू आम्हाला स्पष्ट करून सांग.”
\v 37 त्याने उत्तर दिले, “जो चांगले बी पेरितो, तो मनुष्याच्या पुत्राचे प्रतिनिधित्त्व करत आहे.
\v 38 हे जग ज्यामध्ये लोक राहतात, त्यांना ते शेत दर्शवते. देव ज्या लोकांवर राज्य करण्यासाठी सहमत होतो त्या लोकांना जे बीज चांगले वाढले ते दाखवते. सैतान दुष्ट, तो जे काही सांगतो, ते करणारे लोक म्हणजे त्या शेतात वाढलेली काटेरी झुडपे होय.
\v 39 ज्या शत्रूने येऊन काटेरी झुडूपाचे बीं पेरले तो व्यक्ती म्हणजे तो सैतान होय. पिकाची कापणी करण्याची वेळ म्हणजे ह्या जगाची शेवटची वेळ होईल. कापणी करणारे देवदूताचे प्रतिनिधित्त्व करतात.
\s5
\p
\v 40 त्या काटेरी झुडूपांना गोळा करण्यात आले आणि ते जाळले गेले. देव सर्व लोकांचा न्याय करेल, त्यावेळेस काय घडणार आहे हे त्यावरून दिसून येते त्यावेळेस जगाचा अंत होईल. आणि ते ह्याप्रमाणे असेल:
\v 41 मी, मनुष्याचा पुत्र, माझे देवदूत पाठवेन, आणि या सर्व लोकांवर मी राज्य करणे सुरू केले आहे त्यांच्यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवल्यापासून आणि माझ्याविरुद्ध इतर गोष्टींच्या द्वारे पाप करण्याचे जे कारण बनलेले लोक आहेत त्यांना एकत्र गोळा करतील.
\v 42 देवदूत अशा प्रकारच्या लोकांना नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देतील. तिथे त्यांना ज्या मोठ्या वेदना होतील त्यामुळे ते लोक दात खातील आणि विलाप करतील.
\v 43 तथापि, देवाच्या इच्छेप्रमाणे जे लोक जगले आहेत त्यांच्यावर देवाचा प्रकाश प्रकाशेल. सूर्य ज्या तेजाने प्रकाशतो तसे देवाचे तेज त्यांच्यावर प्रकाशेल. हा प्रकाश त्यांच्यावर पडेल कारण देव, जो त्यांचा पिता, त्यांच्यावर राज्य करणार आहे. मी आता जे काही बोललो आहे; त्याविषयी जर तुम्ही लक्षपूर्वक विचार केला, तर तुम्हाला ह्या गोष्टींची समज प्राप्त होईल.”
\s ठेव, मोती व जाळे ह्यांचे दृष्टान्त
\s5
\p
\v 44 “एखाद्या व्यक्तीने एका शेतामध्ये एक मोठा खजाना लपवला होता आणि तो एखाद्या व्यक्तीला सापडला अशा व्यक्तीसारखे ते लोक होते, जे देव त्यांच्यावर राज्य करू इच्छितो ह्याविषयी समजतील. या व्यक्तीने ते शेत खोदले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपवून ठेवले जेणेकरून इतर कोणालाही ते सापडू नये. आणि मग तो तेथून निघून गेला आणि त्याने आपली सर्व मालमत्ता विकली आणि त्याने ते शेत खरेदी करण्यासाठी पैसा गोळा केला. आणि मग तो पुन्हा गेला आणि त्याने ती शेती विकत घेतली आणि आता त्या शेतातील खजाना तो प्राप्त करण्यास समर्थ झाला.
\p
\v 45 तसेच, देव आपल्या लोकांवर राज्य करण्याची सुरूवात करतो, तेव्हा एक व्यापारी चांगल्या दर्जाचे मोती विकत घेण्यासारखे आहेत.
\v 46 एक अतिशय मौल्यवान मोती विकण्यासाठी उपलब्ध आहे असे त्याला आढळले, तेव्हा त्याने आपली सर्व मालमत्ता विकून तो मोती विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा गोळा केला. आणि मग तो जाईल आणि त्याला तो विकत घेईल.
\s5
\p
\v 47 देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल, तेव्हा एका मोठ्या तळ्यातील माशांना मोठी जाळी टाकून पकडणाऱ्या मासेमाऱ्यांसारखे होईल. त्यांनी त्या जाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या माशांना धरले, त्यामध्ये काही उपयोगी आणि काही निरुपयोगी मासेही आले.
\v 48 त्यांचे जाळे पूर्ण भरले, तेव्हा मासेमारी करणाऱ्या लोकांनी ते वर ओढले आणि त्याला किनार्‍यावर आणले. मग ते तेथे बसले आणि त्यांनी चांगले मासे आपल्या बाधल्यांमध्ये भरले, परंतु ज्या माशांचा त्यांना उपयोग नव्हता त्यांना त्यांनी दूर फेकून दिले.
\s5
\p
\v 49 ह्या जगाचा अंत होईल तेव्हा जे निरुपयोगी लोक आहेत यांचेही असेच होईल. जेथे देव लोकांचा न्याय करत आहे तेथे देवदूत येतील आणि दुष्ट लोकांना नीतिमान लोकांपासून वेगळे करतील.
\v 50 ते दुष्ट लोकांना नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देतील. आणि ते दुष्ट लोक तेथे रडतील आणि आपले दात खातील कारण त्या ठिकाणी त्यांच्या वेदना फार भयंकर असल्याने त्यांना त्रास होईल.”
\s5
\p
\v 51 मग येशूने आपल्या शिष्यांना असे विचारले, “मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व बोधकथा ह्या तुम्हाला समजल्या आहेत काय?” ते त्याला म्हणाले,
\v 52 “होय, आम्हाला त्या समजल्या आहेत.” नंतर त्याने म्हटले, “तुम्हाला ह्या सर्व बोधकथा समजल्या आहेत, म्हणून तुम्हाला ही बोधकथा देखील नक्कीच समजेल: देव आपल्या लोकांवर कशा पद्धतीने राज्य करू इच्छितो, हे तुम्ही, इतर लोकांना शिकवावे, कारण मी तुम्हाला जे काही म्हटले आहे ते तुम्ही ऐकले आहे. तुम्ही या आधी जे काही शिकला आहात त्यामध्ये तुम्ही हे ही जोडा. आणि तुम्ही मिळून ह्या गोष्टी इतरांना शिकवा. एखादा घर मालक आपल्या साठवणीच्या खोलीतून जुन्या गोष्टी आणि नव्या गोष्टी बाहेर काढतो अशा घर मालकासारखे तुम्ही व्हाल.”
\s नासरेथात येशूचा अव्हेर
\p
\v 53 येशूने ह्या सर्व बोधकथांना सांगणे संपवले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना घेतले आणि तो त्या प्रदेशातून निघून गेला.
\s5
\p
\v 54 मग ते येशूच्या मूळगावी, म्हणजेच नासरेथास गेले. शब्बाथ दिवशी त्याने लोकांना सभास्थानामध्ये शिकवण देण्यास सुरूवात केली. याचा परिणाम असा झाला की लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. परंतु त्यांच्यापैकी काही लोक म्हणाले, “हा व्यक्ती तर आमच्या सारखाच सर्वसाधारण व्यक्ती आहे! तर मग याला एवढे कसे ठाऊक आहे आणि तो इतक्या गोष्टी कशा समजू शकतो? आणि तो इतके चमत्कार करण्यास कसा समर्थ झाला?
\v 55 हा तर केवळ एका सुताराचा मुलगा आहे, होय की नाही? त्याच्या आईचे नाव मरीया, आणि त्याचे लहान भाऊ याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा हेच आहेत!
\v 56 आणि त्याच्या बहिणी देखील आमच्या सोबत याच गावात राहतात. तर मग हे सर्व चमत्कार करणे याला कसे शक्य आहे?”
\s5
\p
\v 57 येशू हाच ख्रिस्त आहे असे तेथील लोकांनी स्वीकारण्यास नाकार दिला. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “मी आणि इतर संदेष्टे जेथे कोठे जातो तेथे लोक आमचा सन्मान करतात, परंतु आमच्या स्वतःच्या गावी आमचा सन्मान होत नाही आणि आमचे स्वतःचे कुटूंबीय देखील आमचा सन्मान करत नाहीत!”
\v 58 येशू ख्रिस्त आहे असा तेथील लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे येशूने तेथे खूप चमत्कार केले नाहीत.
\s5
\c 14
\s बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मुत्यू
\p
\v 1 येशू चमत्कार करत आहेत याविषयीची वार्ता हेरोद अंतीपस ह्या शासकाकडे पोहचली.
\v 2 त्याने आपल्या सेवकांना म्हटले, “हा नक्कीच बाप्तिस्मा करणारा योहान असला पाहिजे. जो मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत झाला असावा, आणि म्हणूनच त्याच्याकडे चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.”
\s5
\p
\v 3-4 हेरोद असा विचार करत होता ह्याच्या मागे हे कारण होते. हेरोदाने हेरोदिया सोबत विवाह केला होता, ती त्याचा भाऊ फिलीप्प ह्याची बायको होती, आणि फिलिप्प जिवंत असतांनाच त्याने असे केले होते. म्हणून योहान त्याला असे म्हणत होता, “तू जे काही केले आहे ते देवाच्या नियमाच्या विरोधात आहे!” तेव्हा, हेरोदियाला खूश करण्यासाठी, हेरोदाने आपल्या सैनिकांना सांगितले की योहानाला कैदेत टाका. त्यांनी त्याला साखळदंडांनी बांधले आणि तुरूंगामध्ये ठेवले.
\v 5 आपल्या माणसांना सांगून योहानाला ठार करावे अशी हेरोदाची इच्छा होती, परंतु तो सर्वसाधारण लोकांना घाबरत होता, कारण योहान हा देवासाठी बोलणारा एक महान संदेष्टा आहे असा त्यांचा विश्वास होता.
\s5
\p
\v 6 एके दिवशी, हेरोदाने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठी मेजवानी केली होती, आणि त्याच्या पाहुण्यासमोर हेरोदीयाच्या मुलीने नाच करून त्यांना खूश केले. तिचे नृत्य पाहून हेरोदालाही अतिशय आनंद झाला,
\v 7 म्हणून त्याने तिला असे वचन दिले की ती जे काही मागेल ते तो तिला देईल, आणि त्यांने हे वचन दिले आहे यासाठी त्याने देवाला साक्षीदार म्हणून राहण्याची विनंती केली.
\s5
\p
\v 8 मग हेरोदियेची मुलगी निघाली आणि तिच्या आईला तिने म्हटले की मी काय मागावे. तिच्या आईने तिला सांगितले की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर आणून द्यावे असे तू माग. मग ती मुलगी पुन्हा परत गेली आणि हेरोदाला असे म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तू कलम करावे आणि एका तबकात घालून तो खरोखर मेला आहे हे दाखवण्यासाठी माझ्यासमोर घेऊन यावे!”
\v 9 हिरोदीयाच्या मुलीने जे काही मागितले ते मी तिला देईन असे अभिवचन दिल्याचे आता हेरोदाला खूप पस्तावा झाला. परंतु ते वचन देतांना त्याने देवाला साक्षीदार म्हणून ठेवल्यामुळे, आणि त्याच्या मेजवानीसाठी जमलेल्या सर्व पाहुण्यासमोर त्याने ते बोलले होते, म्हणून त्याने जे काही म्हटले आहे ते त्याला करावेच लागेल अशी त्याला जाणिव झाली. म्हणून त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली की तिच्या इच्छेप्रमाणे करा.
\s5
\p
\v 10 त्याने सैनिकांना तुरूंगात जाण्याची आज्ञा केली आणि योहानाचे शीर कापावे म्हणून सांगितले.
\v 11 त्यांनी तसे केले, आणि एका तबकामध्ये योहानाचे डोके ठेवून ते त्या मुलीकडे घेऊन आले. मग त्या मुलीने ते शिर घेतले आणि आपल्या आईकडे आणले.
\v 12 त्यानंतर योहानाचे शिष्य तुरूंगात गेले, त्यांनी योहानाचे शरीर घेतले आणि ते पुरले. आणि मग ते तेथून गेले आणि येशूला जाऊन त्यांनी ह्या सर्व घडलेल्या घटना सांगितल्या.
\s पाच हजार लोकांना भोजन
\s5
\p
\v 13 येशूने ही बातमी ऐकल्यानंतर, त्याने आपल्या शिष्यांना आपल्या सोबत घेतले आणि गालील समुद्रात एका नावेने प्रवास करत जिथे कोणीही राहत नव्हते अशा ठिकाणी तो गेला.
\p मग ते कोठे गेले आहे हे लोक समुदायाने ऐकले, तेव्हा त्यांनीही आपली गावे सोडली आणि ते त्यांच्या मागोमाग किनाऱ्यांनी पाई पाई चालत यांच्याकडे गेले.
\v 14 येशू किनाऱ्यावर आला, तेव्हा त्याने लोकांचा मोठा जमाव त्याची वाट पाहत आहे असे त्याने पाहिले. त्याला त्यांचा फार कळवळा आला, आणि त्यांच्यामध्ये जे लोक आजारी होते त्या सर्वांना त्यांने पूर्णपणे बरे केले.
\s5
\p
\v 15 त्या दिवशी जवळपास संध्याकाळ झाली होती, तेव्हा शिष्य येशूजवळ आले आणि म्हणाले, “हे एक ठिकाण ओसाड आहे आणि येथे कोणतीही वस्ती नाही, आणि आता बराच उशीर झाला आहे. म्हणून तू आता ह्या लोकांना जवळपासच्या गावांमध्ये जावे आणि स्वतःसाठी अन्न विकत घ्यावे असे सांगून त्यांना पाठवून दे.”
\s5
\p
\v 16 परंतु येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “अन्न विकत घेण्यासाठी त्यांना येथून जाण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही स्वतःच त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्या!”
\v 17 शिष्यांनी त्याला म्हटले, “परंतु आमच्याकडे तर केवळ पाच भाकरी आणि दोन बनवलेले मासे आहेत!”
\v 18 तो म्हणाला, “ते माझ्याकडे घेऊन या!”
\s5
\p
\v 19 जो लोकसमुदाय एकत्र आला होता त्या लोक समुदायाला येशूने तेथील गवतावर बसण्यास सांगितले. मग त्याने ते दोन मासे आणि त्या पाच भाकरी आपल्या हातात घेतल्या. त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे केली, आणि त्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले, आणि मग त्याने त्या भाकरी तुकड्यांमध्ये मोडल्या. मग त्याने ते तुकडे आपल्या शिष्यांच्या हातात दिले, आणि त्यांनी ते लोकसमुदायांमध्ये वाटले.
\v 20 तेथे जमलेल्या सर्वांनी तृप्त होईपर्यंत जेवण केले. आणि त्यानंतर त्यांच्यातल्या काही लोकांनी उरलेले तुकडे गोळा केले तर त्यांच्या बारा टोपल्या भरल्या.
\v 21 त्यावेळी सुमारे पाच हजार पुरूषांनी जेवण केले, आणि त्यामध्ये स्त्रियांची आणि मुलांची गणना केली नव्हती!
\s येशू समुद्रावरून चालतो
\s5
\p
\v 22 ही घटना घडल्यानंतर लगेचच, येशूने आपल्या शिष्यांना नावेमध्ये बसण्यास आणि त्याच्या अगोदर गालील समुद्राच्या पलीकडच्या बाजूस जाण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात, तो लोकांना त्यांच्या घरी लावून देणार होता. म्हणजेच तो लोकांचा निरोप घेणार होता.
\v 23 त्याने त्या लोकांच्या गर्दीला निरोप दिल्यानंतर, तो डोंगरावर चढला तेथे तो स्वतःसाठी प्रार्थना करणार होता. तेव्हा संध्याकाळ झाली असता तो तेथे अद्यापही एकटाच होता.
\v 24 इतक्या वेळपर्यंत शिष्य किनाऱ्यापासून वल्लवत बरेच अंतर पार करून गेले होते. शिष्य वल्लवण्याचा प्रयत्न करत असतांना; वारा त्यांच्या विरुद्ध दिशेला जोरदार वाहत होता. त्या वाऱ्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि त्या नावेला मागेपुढे पाण्यामध्ये हेलकावे खावे लागले.
\s5
\p
\v 25 मग येशू डोंगरावरून उतरून खाली पाण्याजवळ आला, मोठ्या पहाटे तीन वाजेपासून ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तो पाण्यावर चालत नावेकडे आला.
\v 26 शिष्यांनी त्याला पाण्‍यावर चालतांना पाहीले, तेव्हा तो एक भूत आहे असे त्यांना वाटले. ते अतिशय घाबरून गेले, आणि ते भीतीने फार मोठ्याने ओरडू लागले.
\v 27 लगेचच येशू त्यांना म्हणाला, “घाबरू नका! हा मी आहे. भीती बाळगू नका!”
\s5
\p
\v 28 पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभू, हा तू आहेस, तर मी देखील पाण्यावरुन चालत तुझ्याकडे यावे असे मला सांग!”
\v 29 येशू म्हणाला, “ये!” म्हणून पेत्र नावेतून बाहेर निघाला आणि तो पाण्यावरून चालत जात येशूकडे जाऊ लागला.
\v 30 परंतु त्याचे लक्ष जोराने वाहणाऱ्या वाऱ्याकडे गेले, तेव्हा तो घाबरला. आणि तो पाण्यामध्ये बुडू लागला मग तो मोठ्याने ओरडला, “प्रभू, मला वाचवा!”
\s5
\p
\v 31 येशूने लगेच आपला हात पुढे केला आणि पेत्राला धरले. येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या सामर्थ्यावर अगदी थोडासाच विश्वास ठेवतो! मी तुला बुडण्यापासून वाचवणार नाही असा तू विचार का केला?”
\v 32 मग येशू आणि पेत्र दोघेही नावेमध्ये चढले आणि वारा अचानक आपोआपच जोराने वाहण्याचा बंद झाला.
\v 33 नावेमध्ये जे सर्व शिष्य होते त्यांनी येशूसमोर उघडे पडून नमन केले आणि ते त्याला म्हणाले, “तू खरोखर देवाचा पुत्र आहेस!”
\s5
\p
\v 34 त्या नावेतून समुद्रात ते आणखी पुढे गेले, तेव्हा गनेसरेत नावाच्या गावाच्या शेजारील किनाऱ्यावर ते पोहोंचले.
\v 35 येशूला त्या प्रदेशातील पुरूषांनी ओळखले, आणि येशू त्यांच्या प्रदेशात आला आहे हे त्या संपूर्ण भागात राहणाऱ्या इतरांना माहिती द्यावी म्हणून त्यांनी काही लोकांना पाठवले. मग त्या प्रदेशातील लोकांनी त्यांच्यामधील आजारी लोकांना त्याच्याकडे आणले.
\v 36 त्यांनी त्याला स्पर्श करू द्यावा किंवा त्याने घातलेल्या अंगरख्याच्या काठाला तरी निदान स्पर्श करू द्यावा जेणेकरून ते बरे होतील म्हणून ते आजारी लोक येशूला विनंती करत राहिले. त्याला किंवा त्याच्या वस्त्राला स्पर्श करणारा प्रत्येक व्यक्ती बरा झाला.
\s5
\c 15
\s मानवी संप्रदाय व येशूची शिकवण
\p
\v 1 तेव्हा यरुशलेमेहून काही परूशी आणि यहूदी नियम शिकवणारे पुरूष येशूसोबत बोलण्यासाठी आले. व ते म्हणाले,
\v 2 “तुझे शिष्य आमच्या पूर्वजांच्या परंपरांना मोडतात असे आम्ही पाहिले आहे! कारण ते जेवण करण्यापूर्वी हात धुण्याचा योग्य विधी करत नाहीत!”
\v 3 येशूने त्यांना उत्तर दिले, “आणि तुम्ही ही तुमच्या पूर्वजांनी जे शिकवले ते पाळता यावे म्हणून देवाने दिलेल्या आज्ञा पाळण्यास नकार देता असे मी पाहतो!
\s5
\p
\v 4 देवाने तर ह्या दोन आज्ञा दिल्या आहेत: ‘आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर, आणि ‘जे लोक आपल्या आईबद्दल किंवा आपल्या वडिलांबद्दल वाईट बोलतात त्यास अवश्य जीवे मारावे’.
\v 5 परंतु तुम्ही तर लोकांना सांगता की, ‘तू तुझ्या आईला किंवा वडिलांना असे म्हणू शकतो की, “तुमची मदत होण्यासाठी जे काही मला तुम्हांला देणे होते ते आता मी देवाला अर्पण करण्याचे वचन दिले आहे.”’
\v 6 आता आपल्या आईवडिलांना काहीएक देण्याची गरज नाही असा विचार तुम्ही करता, तेव्हा याप्रकारे देवाने आज्ञापिलेल्या आज्ञांना तुम्ही दुर्लक्षीत करता जेणेकरून तुमच्या पूर्वजांनी शिकवलेले तुम्हांला पाळता यावे म्हणून तुम्ही ते करता!
\s5
\p
\v 7 तुम्ही केवळ चांगले असल्याचे ढोंग करता! यशयाने देखील तुमच्या पूर्वजांबद्दल असलेले देवाचे विचार बोलला तेव्हा त्यानेही तुम्हांविषयीचे सत्य सांगितले आहे.
\v 8 ‘ते लोक माझा सन्मान करतात असे म्हणतात, पण ते माझी काळजी करत नाहीत,
\v 9 त्यांनी माझी उपासना करणे हे त्यांच्यासाठी व्यर्थ आहे, कारण जणू काय मीच त्यांना आज्ञा दिली आहे असे मनुष्याचे विचार ते शिकवितात.’”
\s5
\p
\v 10 मग येशूने जमावाला परत पुन्हा एकदा त्याच्याजवळ बोलाविले. तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला जे सांगणार आहे ते नीट ऐका आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
\v 11 एखादा व्यक्ती खाण्यासाठी आपल्या तोंडात काही घालतो तर देव त्या कारणाने त्याला नाकारत नाही. त्याऐवजी, लोक जे बोलतात—म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर आलेले शब्द—देवाने त्यांना स्वीकारू नये म्हणून कारणीभूत ठरतात.”
\s5
\p
\v 12 त्यानंतर शिष्य येशूजवळ गेले आणि म्हणाले, “तुझे बोलणे परुश्यांनी ऐकले आणि तुझ्यावर ते रागावले हे तुला ठाऊक आहे काय?”
\v 13 तेव्हा येशूने त्यांना ही बोधकथा सांगितली. “जसा एक शेतकरी जे रोपटे त्यांने लावले नाही त्या रोपट्याला तो त्याने लावलेल्या रोपट्यांमधून मुळासकट वर उपटून काढतो अगदी त्याचसारखे माझा स्वर्गातील पिता देखील जे तो बोललेला आहे आणि त्याच्या बोलण्याच्या विरुद्ध जे गोष्टी शिकवतात त्या सर्वांना तो उपटून टाकेल.
\v 14 परुश्यांकडे कोणतेही लक्ष देवू नका. कारण आंधळे मार्गदर्शक आंधळ्या लोकांना कुठे बघून त्यांनी चालले पाहिजे अशी मदत ते करू शकत नाहीत. त्याऐवजी, ते सर्व एकाच खड्डयात पडतील. अगदी त्याचसारखे परूशी लोक देवाची आज्ञा काय आहे हे लोकांना समजण्यास मदत करत नाहीत.”
\s5
\p
\v 15 पेत्र येशूला म्हणाला, “एका व्यक्तीने काय खावे त्याबद्दलची बोधकथा आम्हाला स्पष्ट करून सांग.”
\v 16 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी शिकविलेले तुम्हाला खात्रीने समजायलाच हवे, पण तुम्ही ते समजून घेत नाहीत म्हणून मी निराश झालो आहे.
\v 17 लोक जे काहीपण अन्न खातात ते त्यांच्या पोटात जाते, आणि नंतर राहिलेले ते त्यांच्या शरीरातून बाहेर पडते. लोक जे खातात त्यामुळे देवाने त्यांना स्वीकारू नये म्हणून कारणीभूत होत नाही.
\s5
\p
\v 18 त्याऐवजी, देवाने एखाद्या व्यक्तीला नाकरण्याचे कारण म्हणजे त्याच्या तोंडातून बोलले जाणारे वाईट शब्द होय, कारण तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये वाईट विचार करत असतो आणि त्यामुळे वाईट तेच बाहेर पडते.
\v 19 हे असे ह्यासाठी आहे कारण लोकांचे अंतर्याम हे त्यांना, लोकांचा खून करणे, व्यभिचार करणे, इतर लैगिंक पाप करणे, चोरी करणे, खोट्या साक्षी, इतराबद्दंल वाईट बोलणे ह्या वाईट गोष्टी विचार करण्यास भाग पाडते.
\v 20 देवाने लोकांना त्याच्यासाठी स्वीकारू नये म्हणून ही कृत्ये कारणीभूत ठरतात. परंतु ना धुतलेल्या हाताने खाणे हे देवाने लोकांना नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही.”
\s एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
\s5
\p
\v 21 त्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना सोबत घेतले आणि गालील जिल्ह्यातून निघून ते सर्व जेथे सोर आणि सिदोन शहरे आहेत त्या दिशेने गेले आणि तेथील प्रातांत पोहचले.
\v 22 तेव्हा त्या प्रातांत राहणारी कनानी नावाच्या लोकांच्या गटातून आलेली एक स्त्री येशूकडे आली. ती सारखी ओरडत होती, “प्रभूजी, तुम्ही दावीद राजाचे पुत्र आहात, तुम्ही मशीहा आहात! माझ्यावर आणि माझ्या मुलीवर दया करा! ती खूप दुःख सोसीत आहे कारण तिला एका भूताने वश केले आहे.”
\v 23 परंतु तरीही येशूने तिला उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला म्हटले, “तिला जाण्यास सांगा कारण ती आपण जसे जात राहू तसे ती आपल्या मागे येऊन ओरडत राहून आपल्याला त्रास देत राहील.”
\s5
\p
\v 24 येशूने तिला म्हटले, “देवाने मला केवळ इस्त्राएलाच्या लोकांकरता पाठवलेले आहे, कारण ते मार्गांपासून भटकलेल्या मेंढरासारखे आहेत. स्वर्ग कसा मिळवावा हे त्यांना ठाऊक नाही.”
\v 25 परंतु ती स्त्री येशूच्या आधिक जवळ आली आणि त्याच्यासमोर येऊन आपल्या गुडघ्यांवर जाऊन तिने याचना केली, “प्रभूजी, माझी मदत करा!”
\v 26 मग त्याने तिला सांगितले, “एखाद्याने आपल्या मुलासाठी तयार केलेले जेवण घेऊन ते घरातील कुत्र्यांच्या पिल्लांना टाकणे हे योग्य नाही.”
\s5
\p
\v 27 परंतु त्या स्त्रीने उत्तर दिले, “प्रभूजी, तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे, पण तरीही कुत्र्याची पिल्ले आपला धनी ज्या स्वतःच्या मेजावर बसतो आणि जेवतो, तेव्हा फरशीवर पडलेला चुरा खातात!”
\v 28 तेव्हा येशू तिला म्हणाला, “बाई, माझ्यावर तू दृढतेने विश्वास ठेवला, त्यामुळे मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या मुलीस बरे करीन!” आणि त्याचक्षणी ते भूत तिच्यातून निघून गेले, व ती बरी झाली.
\s5
\p
\v 29 मग येशू आणि त्याचे शिष्य त्या भागातून निघून गेले, व गालील समुद्राजवळ परत आले. मग येशू तेथील जवळचा डोंगर चढून गेला आणि लोकांना शिकवण्यासाठी बसला.
\v 30 मग मोठा लोकसमुदाय पुढील दोन दिवसापर्यंत त्याच्याजवळ येतच राहिला आणि लंगडे, असहाय्य, आणि आंधळे लोक, जे बोलू शकत नव्हते त्यांना, आणि अनेक इतर जे विविध आजाराने त्रस्त होते त्यांना आणिले. येशूने त्यांना बरे करावे म्हणून ते त्याच्यासमोर त्यांना ठेवत होते. आणि त्यांना त्याने बरे केले.
\v 31 लोकसमुदायाने जे लोक बोलू शकत नव्हते, अशा असहाय्य लोकांना, लंगड्या लोकांना, आणि आंधळ्या लोकांना बरे करतांना त्याला पाहिले आणि ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “इस्त्राएलात आम्हांवर राज्य करणाऱ्या देवाची स्तुती असो!”
\s चार हजारांना भोजन
\s5
\p
\v 32 मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावले आणि म्हटले, “हा लोकसमुदाय गेल्या तीन दिवसांपासून माझ्याबरोबर आहे आणि खाण्यासाठी काहीही उरले नाही. म्हणून त्याबद्दल मला दुःख आहे. ते उपाशी असतांना त्यांना पाठवावे अशी माझी इच्छा नाही, कारण जर मी तसे केले, तर घरी जातांना रस्त्यामधे ते कदाचित चक्कर येऊनही पडतील.”
\v 33 शिष्यांनी त्याला म्हटले, “या ठिकाणी कोणीही राहत नाही, आणि एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला जेवण खाऊ घालण्यापुरते अन्न आम्ही शक्यतो मिळवू शकणार नाही!”
\v 34 येशूने शिष्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती लहान भाकरी आहेत?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांजवळ सात लहान भाकरी आणि थोडे भाजलेले मासे आहेत.”
\v 35 तेव्हा येशूने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले.
\s5
\p
\v 36 त्याने त्या सात भाकरी व मासे घेतले. त्यानंतर त्यांने त्यांच्यासाठी देवाचे आभार मानिले, त्याने त्या भाकरींना तोडून त्याचे तुकडे केले व ते आपल्या शिष्यांना देत गेला. तेव्हा शिष्यही ते लोकसमुदायास देत गेले.
\v 37-38 ते सर्व लोक जेवले आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी ते भरपूर होते, कारण येशूने चमत्कारिक रितीने अन्न वाढविले होते. तेथे चार हजार पुरूष होते जे जेवले होते, स्त्री व लहान मुलेही जेवले पण कोणीही त्यांना मोजले नाही. नंतर शिष्यांनी तेथे उरलेल्या भाकरीच्या तुकड्यांना गोळा केले, आणि त्यांनी मोठ्या अशा सात टोपल्या भरून सोबत घेऊन गेले.
\p
\v 39 येशूने लोकसमुदायाला पाठवून दिल्यानंतर, त्याला आणि शिष्यांना एक तारू मिळाले त्या तारवात बसून सरोवरच्या काठी असलेल्या मगदानाच्या प्रदेशात ते गेले.
\s5
\c 16
\s चिन्हासाठी विनंती व येशूचा नकार
\p
\v 1 काही परूशी आणि सदूकी येशूकडे आले आणि ते त्याला म्हणाले, “देवाने खरोखर तुला आम्हांसाठी पाठवले आहे! ह्याची खात्री आम्हांला पटावी म्हणून तू त्याच्या सामर्थ्याने एखादा चमत्कार करून आम्हांस दाखव!”
\v 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “आमच्या देशामध्ये, संध्याकाळी आभाळ लाल असेल, तर आम्ही म्हणतो की, “उद्याचे हवामान चांगले राहील.
\s5
\p
\v 3 परंतु सकाळी आभाळ लाल असेल तर आम्ही म्हणतो की, ‘आजचे हवामान वादळी असेल’. आभाळाकडे पाहून, हवामान कसे असेल असे तुम्ही सांगू शकता, परंतु तुमच्या अवतीभोवती आता ज्या सर्व गोष्टी घडतांना तुम्ही पाहता, तेव्हा देव काय करत आहे हे तुम्हांला समजत नाही.
\v 4 मी केलेले चमत्कार तुम्ही दुष्ट लोकांनी पाहिले, पण तरीही तुम्ही विश्वासूपणाने देवाची उपासना केली नाही. म्हणून योना संदेष्टा जो एका मोठ्या माशाच्या आत तीन दिवस राहिला आणि परत बाहेर आला ह्या घडलेल्या चमत्कारा व्यतिरिक्त कुठलाही चमत्कार, मी तुमच्यासाठी करणार नाही.” मग येशूने त्यांना सोडले, आणि तेथून आपल्या शिष्यांसोबत दूर निघून गेला.
\s असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध
\s5
\p
\v 5 ते सर्व गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूस गेले. तेव्हा आपल्यासोबत खाण्यासाठी काहीही घेतले नाही आपण ते विसरलो आहोत हे शिष्यांच्या लक्षात आले.
\v 6 त्या वेळी, येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी जे खमिर तुम्हांला देऊ इच्छितात त्याविषयी सावध राहा ते घेऊ नका.”
\v 7 येशूने त्यांना जे सांगितले त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करू लागले, आणि ते एकमेकांस म्हणू लागले की, “आपण खाण्यासाठी सोबत काहीच घेतले नाही म्हणून नक्कीच हा असा बोलला आहे!”
\v 8 परंतु ते काय म्हणत आहेत हे येशूला माहित होते म्हणून त्यांने उत्तर दिले, “तुम्ही खाण्यासाठी भाकरी घेण्यास विसरला ह्या कारणांसाठी मी तुम्हांला परूशी आणि सदूकी यांच्या खमिराविषयी सांगितले असा विचार तुम्ही करत आहात आणि त्यामुळे मी फार निराश झालो आहे. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो पण तुम्ही तर केवळ थोडाच विश्वास धरिता.
\s5
\p
\v 9 अन्न नाही म्हणून मी चिंतीत आहे असा विचार करू नका. तर पाच हजारांना पाच भाकरीने मी कसे जेवू घातले, किंवा किती अन्नाच्या भरलेल्या टोपल्या तुम्ही गोळा केल्या हे तुम्ही खरोखर विसरला आहात काय?
\v 10 अथवा सात लहान भाकरी मी वाढवल्या तेव्हा चार हजार लोक जेवले नाहीत काय? आणि त्यानंतर किती तुकड्यांच्या टोपल्यां तुम्ही गोळा केल्या त्याबद्दल काय?
\s5
\p
\v 11 खरोखर मी भाकरीविषयी बोलत नव्हतो हे तुम्हांला समजायला पाहिजे होते. तर परूशी व सदूकी जे खमिर तुम्हांला देऊ इच्छितात त्याविषयी सावध राहा ते घेऊ नका.”
\v 12 तेव्हा येशू भाकरीमध्ये असलेल्या खमिंराबद्दल बोलत नव्हता तर त्याऐवजी, तो परूशी व सदूकी यांच्या शिकवणुकीबद्दल बोलत होता हे शिष्यांच्या लक्षात आले.
\s येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
\s5
\p
\v 13 येशू व त्याच्या शिष्यांनी कैसरिया फिलिप्पै शहराजवळील प्रदेशात प्रवेश केला तेव्हा, त्याने त्यांना विचारले, “मी जो मनुष्याचा पुत्राला, म्हणजे मला, लोक खरोखर कोण म्हणून म्हणतात?”
\v 14 त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही बाप्तिस्मा करणारे योहान आहात, जो जिवंत होऊन पुन्हा परत आला आहे असे काही लोक म्हणतात. इतर लोक म्हणतात की तुम्ही एलीया संदेष्टा आहात, जो देवाच्या अभिवचनाप्रमाणे स्वर्गातून परत आला आहे. आणखी काही म्हणतात की तुम्ही यिर्मया संदेष्टा आहात किंवा फार पूर्वी जे संदेष्टे जगत होते त्यांच्यापैकी एक, जो जिवंत होऊन पुन्हा परत आला आहे.”
\v 15 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मी कोण आहे याबद्दल तुम्ही काय म्हणता?”
\v 16 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही ख्रिस्त आहात! तुम्ही सर्वसमर्थ देवाचे पुत्र आहात.”
\s5
\p
\v 17 तेव्हा येशूने त्याला म्हटले, योनाच्या मुला, शिमोना देव तुझ्यासोबत संतुष्ट आहे. आताच जे तू बोललास--कोणत्याही मनुष्याने हे तुला प्रकट केले नाही. त्याऐवजी, माझ्या स्वर्गात राहणाऱ्या पित्याने हे तुला प्रकट केले आहे.
\v 18 आणखी मी तुला हे देखील सांगतो: तू पेत्र आहेस, ज्याचा अर्थ ‘खडक’ असा होतो. एक मोठा खडक एका मोठ्या इमारतीसाठी आधार असतो तसा माझ्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्या समूहांचा आधार तू होशील. आणि मृत्यु देखील त्याला नष्ट करण्यास समर्थ नसेल.”
\s5
\p
\v 19 मग तो म्हणाला, “देव ज्याच्यांवर राज्य करणार आहे त्या लोकांप्रती मार्ग उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी मी तुला सक्षम करेन. पृथ्वीवर जी काही परवानगी तू देशील, देव स्वर्गात त्याला परवानगी देईल. पृथ्वीवर जे काही तू प्रतिबंधित करशील, देव स्वर्गात त्याला प्रतिबंधित करेल.”
\v 20 मग येशूने शिष्यांना तो ख्रिस्त आहे हे त्यांनी यावेळी कोणालाही सांगू नये अशी सक्तीने ताकीद दिली.
\s स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य
\s5
\p
\v 21 त्या वेळेपासून येशूने शिष्यांना शिकवण्यास सुरूवात केली की, यरुशलेम शहरात जाणे हे त्याला गरजेचे आहे. कारण तेथे सत्ताधारी वडील, मुख्य याजक, आणि यहूदी नियम शिकवणारे पुरूष याच्यांकडून येशूला दुःख सोसावे लागेल आणि मरावे लागेल. मग त्या नंतर तिसऱ्या दिवशी, तो पुन्हा जिवंत होईल.
\v 22 पण पेत्र त्याला एका बाजूला घेऊन गेला आणि त्याच्या ह्या बोलण्याचा निषेध करू लागला. तो म्हणाला, “प्रभूजी, देवाने आपल्यासोबत तसे घडून येण्याची परवानगी कधीच न देवो!”
\v 23 तेव्हा येशू वळला व पेत्राला पाहू लागला, आणि त्याला म्हणाला, “माझ्या बाजुपासून दूर हो, कारण सैतान तुझ्याद्वारे बोलत आहे. मी पाप करावे म्हणून तू प्रयत्न करत आहेस. देव जो विचार करतो तसा तू विचार करत नाहीस, परंतु तू तर केवळ लोकांसारखे विचार करतोस!”
\s आत्मत्यागाचे आमंत्रण
\s5
\p
\v 24 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी तुमच्यापैकी माझा शिष्य होऊ पाहतो, तर ज्या गोष्टी तो करू इच्छित नाही त्यांनी त्या आवश्य कराव्या. हे अशासारखे आहे जो कोणी त्याचा वधस्तंभ उचलतो आणि त्याच्या मरणाच्या ठिकाणापर्यंत घेऊन चालतो. हे जे काही जो करतो तो माझा शिष्य होतो हा याचा अर्थ होतो.
\v 25 इतर जे माझ्या अनुयायांवर हल्ला करतात तेव्हा जो कोणी त्याचा जीव वाचवू पाहतो- तो त्याला गमावील. परंतु जो कोणी माझ्यासाठी मरण्याची इच्छा धरेल तो सर्वकाळासाठी जगेल.
\v 26 लोकांना या जगात जे काही पाहिजे असते ते सर्वकाही ते कदाचित मिळवू शकतील, परंतु ते माझे शिष्य झाले नाहीत तर, खरोखरच ते काहीच मिळवत नाहीत कारण त्यांना अनंतकाळचे जीवन मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या मोबदल्यात देव काही स्वीकार करेल असे काही नाही.
\s5
\p
\v 27 लक्षपूर्वक ऐका. मी, मनुष्याचा पुत्र, ही पृथ्वी सोडून जाईन, पण मी परत येईन, आणि स्वर्गातील देवदूत माझ्याबरोबर येतील. त्या वेळी जसा माझ्या पित्याकडे गौरवी प्रकाश आहे तसाच माझ्यात ही असेल, आणि प्रत्येकजण जे या जगात जिवंत होते तेव्हा त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे मी प्रतिफळ देईन.
\v 28 लक्षपूर्वक ऐका! तुमच्यातील काहीजण जे आता येथे असे आहेत की ते स्वर्गातून येणाऱ्या त्या एकाला, मी राजा म्हणून परत येईन तेव्हा तुम्ही मला पाहाल, तुमच्या मरण्यापूर्वी हे तुम्हांला दिसेल!”
\s5
\c 17
\s येशूचे रूपांतर
\p
\v 1 एका आठवड्यानंतर येशूने, पेत्र, याकोब, आणि याकोबाचा लहान भाऊ योहान यांना घेतले, आणि त्यांना एका उंच डोंगरावर जेथे ते इतर लोकांपासून दूर होते तो तेथे घेऊन गेला.
\v 2 ते तेथे असता, येशूचे रूप पालटतांना त्या तीन शिष्यांनी पाहिले, त्याचे मुख सुर्यासारखे तेजस्वी झाले होते, आणि त्याची वस्त्रे चमकत होती आणि प्रकाशासारखी उज्वल झाली होती.
\s5
\p
\v 3 तेव्हा अचानक मोशे आणि एलीया, जे फार वर्षापूर्वी महत्वपूर्ण संदेष्टे होते, ते दिसू लागले आणि त्याच्याशी बोलू लागले.
\v 4 पेत्राने त्यांना पाहिले व येशूला म्हणाला, “प्रभू, आपण येथे असणे हे आम्हांसाठी उत्कृष्ठ आहे! तुमची इच्छा असेल, तर मी येथे तीन धार्मिक स्थळांचे मंडप तयार करतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, आणि एक एलीयासाठी.”
\s5
\p
\v 5 पेत्र हे बोलत असतांना, एक तेजस्वी ढग त्यांच्यावर आले. त्यांनी देवाला येशूबद्दल ढगातून बोलतांना ऐकले. तो त्यांना म्हणाला, “हा माझा पुत्र आहे, मी त्याच्यावर प्रेम करितो. तो मला फार संतुष्ट करतो. त्यामुळे तुम्ही त्याचे ऐकलेच पाहिजे!”
\v 6 त्या तीन शिष्यांनी देवाला बोलतांना ऐकले, तेव्हा ते फार घाबरले. परिणामी, ते आपल्या मुखावर जमिनीवर पालथे पडले.
\v 7 परंतु येशू त्यांच्याकडे गेला आणि त्यांना त्याने स्पर्श केला आणि त्यांना म्हणाला, “उभे राहा! आता अजिबात भिऊ नका!”
\v 8 आणि त्यांनी वर पाहिले, तेव्हा येशू हा केवळ एकटाच असून तो तेथे अजनूही उभा आहे असे त्यांनी पाहिले.
\s5
\p
\v 9 ते डोंगराहून खाली उतरत असतांना, येशू त्यांना सुचना देत होता की, “मनुष्याचा पुत्र, मेल्यानंतरही देव त्याला पुन्हा उठवेल तोपर्यंत पर्वतावरच्या माथ्यावर पाहिलेले कोणास ही सांगू नका.”
\v 10 त्या तीन शिष्यांनी येशूला विचारले, “तू जे बोलतोस ते खरे आहे, तर मसीहा येण्याअगोदर एलीयाने त्यापूर्वी परत येणे गरजेचे आहे असे यहूदी नियम शिकवणारे पुरुष का म्हणतात?”
\s5
\p
\v 11 येशूने त्यांना उत्तर दिले, “मसीहाच्या येण्यासाठी एलीया अनेक लोकांना तयार करेल हे देवाने दिलेले अभिवचन सत्य आहे.
\v 12 परंतु हे लक्षात घ्या: एलीया हा आधीच आला आहे आणि आमच्या पुढाऱ्यांनी त्याला पाहिले देखील आहे, परंतु मशीहाच्या आधी येणाऱ्या त्या एकाला ते ओळखू शकले नाही. त्याऐवजी, त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला वाईट वागणूक दिली आणि तेच पुढारी लवकरच जो स्वर्गातून येतो, त्याप्रमाणेच तशीच वागणूक ते लवकरच मलाही देतील.”
\v 13 तो एलीया विषयी बोलत होता तेव्हा तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला संबोधित होता हे त्या तीन शिष्यांना समजले.
\s भूतग्रस्त मुलगा
\s5
\p
\v 14 येशू आणि ते तीन शिष्य जमलेल्या लोक समुदायाच्या आणि शिष्यांच्या विसावा घेण्याच्या ठिकाणी परत आले तेव्हा, एक मनुष्य येशू जवळ आला आणि त्याच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला.
\v 15 तो त्याला म्हणाला, “गुरूजी, माझ्या पुत्रावर दया करा आणि त्याला बरे करा! त्याला अपस्माराचा आजार आहे आणि तो फार यातना भोगत आहे. आणि या आजारामुळे, तो अनेक वेळा आग्निमध्ये आणि पाण्यामध्ये पडला आहे.
\v 16 मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणले होते जेणेकरून कदाचित ते त्याला बरे करतील, परंतु ते त्याला बरे करण्यास असमर्थ राहिले.”
\s5
\p
\v 17 येशूने उत्तर दिले, “तुम्ही या वेळेचे लोक देवाच्या सामर्थ्यात पूर्णपणे विश्वास करत नाहीत. किती गोंधळलेले तुम्ही आहात! जे मी करतो ते करण्यास तुम्ही कधी सक्षम व्हाल, मी कोठवर तुमच्या सोबत राहू! मुलाला माझ्या जवळ येथे घेऊन या!”
\v 18 त्या मुलाला त्यांनी येशूकडे घेऊन आले तेव्हा, ज्या भूतामुळे त्याला अपस्माराचा आजार झाला होता त्याला येशूने दटावले. परिणामी, त्या मुलामधून ते भूत बाहेर निघून गेले, आणि त्याच क्षणापासून तो मुलगा बरा झाला.
\s5
\p
\v 19 नंतर, काही शिष्यांनी येशू त्यांच्या शेजारी एकटाच होता तेव्हा त्याच्याजवळ ते आले आणि त्याला विचारले, “आम्हांला त्या भूताला बाहेर काढता का आले नाही?”
\v 20-21 त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही अधिक विश्वास ठेविला नाही त्यामुळे ते गेले नाही. यावर विचार करा: मोहरीचे दाणे फार लहान असतात, परंतु ते वाढतात आणि मोठ्या वनस्पतीची निर्मिती करतात. त्याच प्रकारे, तुम्ही देखील थोडासा विश्वास ठेविला तर जे काही तुम्ही देवाने करावे म्हणून विनंती करता तो ते करेल, आणि तुम्ही काहीही करण्यास समर्थ व्हाल! तुम्ही या डोंगराला देखील असे म्हणू शकता की, ‘येथून तेथे सरक! आणि तुम्ही जेथे त्याला जायला सांगाल तेथे ते जाईल.
\s आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य
\s5
\p
\v 22 गालील जिल्ह्यात सर्व शिष्य एकत्रित राहत होते तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राला, कोणी एक, मला धरून अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करेल.
\v 23 ते माझा वध करतील, परंतु माझा वध झाल्यानंतर देव मला पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत करेल.” शिष्यांनी हे बोलणे ऐकले, तेव्हा ते फार दु:खी झाले.
\s परमेश्वराच्या मंदिराचा कर
\s5
\p
\v 24 कफर्णहूम शहरात येशू आणि त्याचे शिष्य आले, तेव्हा मंदिराचा कर गोळा करणारा मनुष्य पेत्राजवळ आला व त्याला म्हणाला, “तुमचा गुरु मंदिराचा कर देत नाही का?”
\v 25 त्याने त्यांना उत्तर दिले, “होय, तो देतो.” मग ते येशूच्या घरात आले, तेव्हा पेत्र आपले बोलणे सुरू करण्याअगोदर येशू त्याला म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते अधिकारी कोणाकडून महसूल किंवा कर घेतात? आपल्या देशातील त्यांच्या नागरिकांकडून, किंवा त्यांनी काबीज केलेल्या देशातील नागरिकांकडून ते गोळा करतात?”
\s5
\p
\v 26 पेत्राने त्याला उत्तर दिले, “इतर देशांच्या नागरिकांकडून.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तर मग आपल्या देशातील त्यांच्या नागरिकांना कर देण्याची काही गरज नाही.
\v 27 तर मग पुढे जा आणि कर भरून टाक जेणेकरून मंदिराचे कर गोळा करणारे आपल्याबद्दल क्रोधीत होणार नाहीत. कर भरण्यासाठी पैसे मिळावे, यासाठी गालील समुद्राकडे जा, तुझी मासे पकडण्याची काठी आणि गळ घे, आणि जो पहिला मासा तू पकडशील त्या माशाला घे, त्याचे तोंड तू उघडशील, तेव्हा तुला एक चांदीचे नाणे सापडेल त्याची किंमत तुझा आणि माझा कर भरणे होईल इतकी पुरी आहे. त्या नाण्याला घे आणि मंदिराचा कर गोळा करणाऱ्यांना तो देऊन टाक.”
\s5
\c 18
\s नम्रतेविषयी धडा
\p
\v 1 अगदी त्याच वेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्याला विचारु लागले, “देव तुम्हांला राजा बनवेल तेव्हा आमच्यांपैकी सर्वात महत्त्वाचा कोण असेल?”
\v 2 तेव्हा एका बालकाला येशूने आपल्याजवळ बोलावले आणि त्याने त्या बालकाला त्यांच्या मधोमध उभे केले.
\v 3 तो म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो: तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला जर तुम्ही बदलणार नाहीत आणि ह्या लहान बालकासारखे नम्र होणार नाहीत. तर नक्कीच देव तुमच्यावर राज्य करण्यास सहमत होणार नाही.
\s5
\p
\v 4 ह्यास्तव ह्या बालकासारखे जे लोक स्वतःला नम्र करतील त्यांच्यावर मी राज्य करेन, तेव्हा त्या सर्वांपैकी ते महत्वाचे असतील.
\v 5 आणि, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून लोक यासारख्या एखाद्या बालकाचे स्वागत करतील तेव्हा ते माझेच स्वागत करत आहेत असा विचार देव करेल.”
\s दुसऱ्यांस अडखळविणाऱ्यांना इशारा
\p
\v 6 माझ्यामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो आणि तू जर त्याला पाप करण्यास कारणीभूत होत असशील, अगदी जरी ह्या लहान बालकाप्रमाणे लोक त्याला कमी लेखत असले तरी, देव तुला नक्कीच शिक्षा करेल. एखाद्याला त्याच्या गळ्यात एक वजनदार दगड बांधून समुद्राच्या खोल पाण्यात त्याला फेकून दिले त्यापेक्षाही वाईट शिक्षा देव तुला देईल!
\s5
\p
\v 7 माझ्यामध्ये विश्वास ठेवण्यास इतरांना जे थांबवतील त्याच्यांसाठी हे किती भयंकर होईल. माझ्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना थांबवणारे तेथे आवश्य असतीलच, पंरतु जे असे करतील त्या सर्वांसाठी हे किती भयंकर होईल.
\v 8 म्हणून तुझा एखादा हात किंवा पाय देखील पाप करण्याची इच्छा धरीत असेल, तर त्या हाताला किंवा पायाला वापरणे बंद कर! पाप करणे टाळण्यासाठी तुला त्याला कापून टाकावा जरी लागत असेल तर ते देखील कर! समजा दोन्ही हात आणि दोन्ही पाय आहे आणि तरीही देवाने नरकाच्या सर्वकाळच्या अग्नीत तुम्हाला टाकले तर त्यापेक्षा तुम्ही एक हात किंवा एक पाय असला आणि तरी सुद्धा देवासोबत राहत आहात; ते तुमच्यासाठी आधिक बरे होईल.
\s5
\p
\v 9 होय, आणि तुमचे डोळे जे पाहतात आणि त्यामुळे पापात पडत असाल, तर त्या गोष्टीकडे पाहण्याचे थांबवा! पाप करण्यापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हांला एखादा डोळा छिद्र पाडण्याच्या हत्याराने उपटून काढावा लागला तरी, ते करा! समजा दोन्ही डोळे आहे आणि तरीही देवाने नरकाच्या सर्वकाळच्या अग्नीत तुम्हाला टाकले तर त्यापेक्षा तुम्ही एक डोळा असला आणि तरी सुद्धा तुम्ही देवासोबत सर्वकाळासाठी राहत आहात; ते तुमच्यासाठी आधिक बरे होईल.”
\s5
\p
\v 10 “यातील एखाद्या मुलाला देखील कमी लेखू नका ह्याची खात्री बाळगा. कारण मी तुम्हांला खरोखर सांगतो की, जर तुम्ही मुलांशी वाईट वागलात तर जे देवदूत त्यांचे रक्षण करतात ते नेहमी माझ्या पित्याकडे जातात व त्याला ती माहिती कळवतात.
\s भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत
\s5
\p
\v 12 तुम्ही ह्या परिस्थितीत काय केले असते तुम्हांला काय वाटते? जर तुमच्या जवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले, तर तुम्ही नक्कीच नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून द्याल आणि त्या हरवलेल्या एका मेंढराला शोधायला जानार की नाही?
\v 13 आणि जर तुम्हांला ते सापडले, मी तुम्हांला खात्री देतो की, तुम्ही खूप आनंदित व्हाल. नव्याण्णव मेंढरे हरवले नाहीत म्हणून तुम्ही आंनदी व्हाल. पंरतु ते हरवलेले मेंढरू तुम्हांला सापडले म्हणून त्या एकासाठी तुम्हांला जास्त आनंद होईल.
\v 14 मेंढपाळाला आपले एखादे मेंढरू हरवून दूर जावे अशी इच्छा तो करत नाही म्हणून तशाच प्रकारे देव, आमचा स्वर्गातील पिता, त्याच्या ह्या मुलांपैकी एखाद्याने देखील नरकात जावे अशी इच्छा तो करत नाही.”
\s अपराध करणाऱ्या बरोबर कसे वागावे
\s5
\p
\v 15 “तुझ्या विश्वासणाऱ्या एका सोबतीने जर तुझ्याविरूद्ध अपराध केला, तर तुम्ही त्याच्यासोबत एकटे असतांना जा आणि तुझ्याविरूद्ध त्याने पाप केले आहे म्हणून त्याला समज दे, तुझ्याविरूद्ध त्याने पाप केले आहे हे जर त्याने तुझे ऐकले व त्याबद्दल त्याने तुला क्षमा मागीतली, तर तुम्ही आणि तो पुन्हा एकदा चांगले बंधू व्हाल.
\v 16 तथापि, त्या व्यक्तीने जर तुझे ऐकले नाही, तर एक किंवा दोन इतर विश्वासणाऱ्यांना मिळवण्यासाठी जा अशासाठी की, नियमशास्त्र असे सांगते, ‘प्रत्येक आरोपाची पुष्टी करण्यासाठी दोन किंवा तीन साक्षीदार असणे आवश्यक आहे. म्हणून ते तुझ्यासोबत येतील आणि साक्ष देतील.
\s5
\v 17 आणि जर तुझ्याविरूद्ध अपराध केला आहे त्याने त्यांचेही ऐकले नाही तर संपूर्ण प्रकरण मंडळीला सांग जेणेकरून ते त्याला ठीक करतील. आणि जर तो व्यक्ती मंडळीचेही ऐकणार नाही, तर मूर्तींपूजक आणि जकातदारांना त्यांच्या पापांविषयी आशेला जागा नाही असे म्हणून तुम्ही त्यांना वगळता, तसेच तुमच्यामधून त्याला वेगळे करा.
\s5
\p
\v 18 हे तुमच्या लक्षात असू द्या: मंडळीतील एका सदस्याला शिक्षा द्यायची किंवा शिक्षा नाही द्यायची असा जो काही निर्णय पृथ्वीवर तुम्ही निश्चीत कराल तोच निर्णय देव स्वर्गातही निश्चित करेल.
\s सामुदायिक प्रार्थना
\p
\v 19 आणखी हे देखील तुमच्या लक्षात असू द्या: पृथ्वीवर राहणांऱ्या किमान दोघांनी एकमेकांशी सहमत होऊन देवाला जे काही त्यांनी मागीतले तर माझा स्वर्गात असणारा पिता ज्याबद्दल तुम्ही मागीतले ते तुम्हांला देईल.
\v 20 आणि हे सत्य आहे, कारण जिथे कुठे किमान दोन किंवा तीन माझ्यावर विश्वास धरून तुम्ही एकत्रित येता तर तिथे मी तुमच्याबरोबर आहे.”
\s कृतघ्न चाकराचा दृष्टांत
\s5
\p
\v 21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याला म्हणाला, “जो माझ्याविरुद्ध पाप करत राहतो असा त्या माझ्या विश्वासू सोबतीला मी किती वेळा क्षमा करणे आवश्यक आहे? जर तो मला क्षमा करण्यास सांगत असेल तर मी त्याला हव्या तितक्यांदा म्हणजेच सात वेळा क्षमा करणे आवश्यक आहे काय?”
\v 22 येशूने त्याला म्हटले, “मी तुला सांगतो की, तुम्ही एखाद्याला क्षमा केवळ सात गणती वेळे पर्यंतच करावी असे आवश्यक नाही तर उलट तुम्ही त्याला साताच्या सत्तरवेळा क्षमा करणे आवश्यक आहे--क्षमा करण्याला कुठलीही वेळेची संख्या नाही.
\s5
\p
\v 23 हे आम्ही का करावे याचे स्पष्टीकरण करण्यासाठी, मी तुम्हांला एक बोधकथा सांगतो. त्यात देव एका राजासारखा आहे आणि त्याचे अधिकारी आहेत. त्या राजाने आपल्या काही सेवकांना सांगितले की, जे काही पैसे आधिकाऱ्यांना त्याने दिले होते ते त्याला हवे होते.
\v 24 त्याच्याबरोबर आपल्या खात्याचा हिशोब करावा म्हणून ते अधिकारी राजाजवळ आले. त्यांच्यापैकी एका अधिकाऱ्याकडे राजाचे दशलक्ष रूपयांचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले.
\v 25 परंतु, त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा पैसा त्याच्याकडे नव्हता म्हणून तो, त्याची बायको, त्याची मुले आणि त्याच्याजवळ असलेले सर्व काही दुसऱ्यांना विकून टाका आणि येणाऱ्या पैशाने त्याला दिलेल्या कर्जाची परतफेड व्हावी अशी आज्ञा राजाने दिली.
\s5
\p
\v 26 त्या प्रचंड कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नाही हे त्याला लक्षात आले, म्हणून तो अधिकारी राजासमोर आपल्या गुडघ्यावर गेला आणि तो त्याला गयावया करू लागला, ‘माझ्याविषयी धीर धरा, आणि अखेरीस मी तुमचे सर्व कर्ज परत करीन.
\v 27 राजा जाणून होता की, तो अधिकारी ते सर्व प्रचंड कर्ज कधीच फेडू शकणार नाही, म्हणून त्याचा कळवळा त्याला आला. मग त्याने त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले.
\s5
\p
\v 28 मग तोच अधिकारी बाहेर गेल्यावर राजाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे ज्याने त्याच्याकडून एका वर्षाकरता थोडेसे कर्ज घेतले त्याच्याकडे तो गेला. त्याचा गळा धरून त्याने त्याला पकडले, तो त्याची नरडी आवळू लागला, आणि त्याला म्हणाला, ‘माझ्याकडून जे कर्ज तू घेतले होते ते मला परत कर!
\v 29 तो अधिकारी त्याच्या गुडघ्यावर गेला आणि त्याला असे बोलून त्याला गयावया करत म्हणाला, ‘माझ्याशी धीर धरा, आणि अखेरीस, मी तुमचे सर्व कर्ज परत करीन.
\s5
\p
\v 30 परंतु त्या पहिल्या अधिकाऱ्याने त्या मनुष्याला दिलेले लहानसे कर्ज रद्द करण्याचे नाकारत राहिला. त्याऐवजी, त्याने त्या अधिकाऱ्याला तुरूंगात टाकले आणि त्याने त्याच्याकडून घेतलेले सर्व पैसे जे त्याने कर्ज म्हणून घेतले ते परत करेपर्यंत त्याला तेथे राहावे लागणार होते.
\v 31 घडलेला हा प्रकार इतर अधिकाऱ्यांना समजला तेव्हा ते अतिशय दुःखी झाले. म्हणून ते राजाकडे गेले आणि जे काही घडले त्याची सविस्तर माहीती कळवली.
\s5
\p
\v 32 तेव्हा राजाने ज्या अधिकाऱ्याकडे लाखो रूपयांची थकबाकी होती त्याला बोलावून तो त्याला म्हणाला, ‘अरे दृष्ट दासा! माझ्याकडून घेतलेले प्रचंड कर्ज मी माफ करावे म्हणून तू मला गयावया केली होती आणि ते मी रद्द ही केले होते!
\v 33 म्हणून जसे मी तुझ्याशी दयाळूपणे वागलो आणि तुझे कर्ज रद्द केले तसेच अगदी तू देखील तुझ्या सोबती अधिकाऱ्याशी दयाळूपणे वागायचे होते आणि ते कर्ज माफ करायचे होते!
\s5
\p
\v 34 राजा फार संतापला होता. त्याने ह्या अधिकाऱ्याला काही तुरूंग अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले जे त्याने घेतलेले सर्व कर्ज परत करत नाही तोपर्यंत त्याचा छळ ते करणार होते.”
\v 35 मग येशू पुढे बोलला, “तुमच्याविरूद्ध जर एखाद्या सोबती विश्वासणाऱ्याने अपराध केला असेल तर तुम्हीदेखील त्याच्याशी दयाळूपणाने वागला नाहीत आणि मनापासून क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता तुमच्या सोबतही तसेच करेल.”
\s5
\c 19
\s सूटपत्राविषयी प्रश्न
\p
\v 1 येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर, त्याने त्याच्या शिष्यांना घेतले आणि तो गालील जिल्ह्यातून निघून गेला. यहूदीया प्रांतातून जे यार्देन नदीच्या पूर्वेस होते तेथे ते गेले.
\v 2 तेव्हा तेथे मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांना त्याने बरे केले.
\s5
\p
\v 3 काही परूशी त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे असे आमचे यहूदी नियमशास्त्र परवानगी देते काय? त्याच्याशी वादविवाद करता यावा ह्यासाठी त्यांनी त्याला असे विचारले.
\v 4 मग येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचलेले आहे, म्हणून तुम्हांला नक्कीच माहीती पाहिजे की, देवाने प्रथम लोक निर्माण केले होते, तेव्हा त्यावेळी ‘त्याने एक पुरूष बनवला आणि त्याने एक स्त्री बनवली’.
\s5
\p
\v 5 एक स्त्री व पुरुष लग्न करतात तेव्हा त्यांनी यापुढे त्यांच्या आई-वडीलांसोबत राहू नये. त्याउलट, त्या दोघांनीही एकत्र राहिलेच पाहिजे, आणि ते इतके जवळ येतील की ते एका व्यक्तीप्रमाणे एक होतील. आणि देव हे का म्हणाला हे स्पष्ट करते.
\v 6 परिणामी, पूर्वी ते दोन स्वतंत्र लोक म्हणून काम करीत असले तरी ते आता एक देह असल्यासारखे आहेत. हे सत्य आहे म्हणून, देवाने जिच्याशी त्याला जोडले त्या पुरूषाने कधीही आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ नये.
\s5
\p
\v 7 मग परूशी त्याला म्हणाले, हे सत्य असल्यास, “एखाद्या पुरूषाने आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायची इच्छा असेल तर त्याने तिला घटस्फोट देण्यासाठी ठोस कारण सांगणारा एक कागद द्यावा आणि नंतर तिला पाठवून द्यावे अशी मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
\v 8 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या हट्टी पूर्वजांना आपले स्वत:चे मार्ग हवे होते म्हणून मोशेने त्यांना आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली, आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा काही वेगळे नाही. पंरतु देवाने प्रथम एक पुरूष आणि एक स्त्री बनवली, तेव्हा त्यांनी एकमेकांपासून वेगळे व्हावे असा त्याचा हेतू नव्हता.
\v 9 मी ठामपणे तुम्हांला सांगत आहे की, देव असे मानतो की जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देतो व दुसऱ्या स्त्री सोबत लग्न करतो तर तो व्यभिचार करतो. त्याच्या पहिल्या पत्नीने जर व्यभिचार केला तरच तो घटस्फोट देऊ शकतो.”
\s5
\p
\v 10 शिष्यांनी त्याला म्हटले, “हे सत्य असल्यास, पुरुषांनी कधीही लग्न करू नये हे योग्य ठरेल!”
\v 11 त्याने उत्तर दिले, “प्रत्येक मनुष्याला ही शिकवण स्वीकारणे शक्य होणार नाही, पंरतु केवळ ज्याला देव ते स्वीकारण्यास शक्य करेल तेच लोक स्वीकारतील.
\v 12 काही पुरुष लग्न करत नाहीत कारण ते जन्मापासून ते लैंगिकरित्या सदोष असतात. इतर काही पुरुष जे लग्न करत नाहीत कारण त्यांच्या मनाचे खच्चीकरण केलेले असते. मग आणखी काही पुरुष आहेत जे लग्न न करण्याचा निर्णय घेतात कारण लग्न करण्याऐवजी देवाची सेवा त्यांनी करावी व देवाने त्यांच्यावर राज्य केलेले बरे असा ते विचार करतात. लग्नाविषयी जे काही मी बोललो आहे ते समजून घेण्यास तुम्ही सक्षम असाल तर ते मान्य करावे आणि त्याचे पालन करावे.”
\s येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो
\s5
\p
\v 13 मग काही लहान मुलांना येशूकडे आणण्यात आले जेणेकरून त्याने त्याचे हात त्यांच्यावर ठेवावे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. परंतु लोकांनी असे केले म्हणून शिष्य त्यांच्यावर रागावले.
\v 14 आम्ही त्याच्यांवर रागवत आहोत हे येशूने पाहिले, तेव्हा तो आम्हांला म्हणाला, “लहान बालकांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका! कारण जसे ते नम्र आहेत आणि विश्वास धरतात, त्याच्यासारख्या असणाऱ्या लोकांवरच देव राज्य करणार आहे.”
\v 15 मग येशूने मुलांवर त्याचे हात ठेवले आणि त्यांना आशीर्वादीत करावे म्हणून देवाला प्रार्थना केली. मग तो त्या ठिकाणाहून निघाला.
\s5
\p
\v 16 येशू एका बाजूने जात असता, एक तरुण मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “गुरूजी, देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
\v 17 येशू त्याला म्हणाला, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? केवळ एकच अस्तित्व चांगले आहे आणि खरोखर काय चांगले आहे ते त्यालाच ठाऊक आहे. ते अस्तित्व म्हणजे देव आहे. पंरतु देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे या तुझ्या इच्छेबद्दल तू केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मी तुला सांगतो की, देवाने मोशेला दिलेल्या आज्ञा नियमितपणे पाळ.”
\s5
\v 18 मग त्या मनुष्याने येशूला विचारले, “कोणत्या आज्ञा मी पाळल्याच पाहिजे?” येशूने त्याला उत्तर दिले, “कोणाचाही खून करू नको, व्यभिचार करू नको, कोणत्याही गोष्टींची चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको,
\v 19 आपली आई आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर, आणि तुझ्या स्वतःवर जितके जास्त प्रेम तू करतो तितकेच प्रेम तुझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर कर.”
\s5
\p
\v 20 तो तरुण मनुष्य येशूला म्हणाला, “या सर्व आज्ञा मी नियमित पाळत आलो आहे. म्हणून देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे म्हणून या व्यतिरिक्त आणखी मी काय करावे?”
\v 21 येशूने त्याला म्हटले, “तुला जशी देवाची इच्छा आहे तसे जर परिपूर्ण व्हायचे असेल तर, घरी जा, तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्वकाही विकून टाक, आणि ते पैसे गरिबांना वाटून टाक.” याचा परिणाम असा होईल की तू स्वर्गात श्रीमंत असशील. म्हणून, माझ्या मागे ये, आणि माझा शिष्य हो!”
\v 22 त्या तरुण मनुष्याने ते शब्द ऐकले, तेव्हा तो दुःखी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता आणि त्याच्या मालकीचे सर्वकाही असलेले तो देऊ इच्छित नव्हता.
\s श्रीमंतीपासून होणारे तोटे
\s5
\p
\v 23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “हे तुमच्या अंतःकरणात साठवून ठेवा: देवाने श्रीमंत लोकांच्या जीवनावर राज्य करावे म्हणून ते सहमत होणे फार कठीण आहे.
\v 24 हे देखील लक्षात ठेवा: एका सुईच्या डोळ्याच्या माध्यमातून जाणे एका ऊंटासाठी हे शक्य आहे. देवाने श्रीमंत लोकांच्या जीवनावर राज्य करावे म्हणून ते सहमत होणे हे त्यापेक्षाही आणखी कठीण आहे.”
\s5
\p
\v 25 शिष्यांनी हे ऐकले, तेव्हा ते अतिशय चकित झाले. देवाने सर्वात जास्त आशीर्वाद श्रीमंत लोकांना दिला आहे असा विचार ते करत असे. म्हणून ते येशूला म्हणाले, “हे जर असे आहे, तर कोणाचेही तारण होऊ शकणार नाही असे दिसून येते!”
\v 26 तेव्हा येशूने त्याच्यांकडे न्याहाळून पाहिले आणि तो म्हणाला, “होय, लोकांना स्वतःला वाचविणे अशक्य आहे. परंतु देव त्यांना वाचवू शकतो, कारण देव काहीही करू शकण्यास समर्थ आहे!”
\v 27 मग पेत्र त्याला म्हणाला, “तुम्हांला माहित आहे की आम्ही सर्वकाही मागे सोडले आहे आणि तुम्हांला अनुसरण्यासाठी आम्ही तुमचे शिष्य झालो आहोत तर हे करण्यासाठी आम्हांला काय लाभ मिळेल?”
\s5
\p
\v 28 येशू त्यांना म्हणाला, “हे तुमच्या अंतःकरणात साठवून ठेवा: तुम्हांला अनेक लाभ मिळतील. देव नवीन पृथ्वीची निर्मिती करेल आणि तेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, त्याच्या महान सिंहासनावर बसेन तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात तुम्ही प्रत्येक एका सिंहासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशातील लोकांचा न्याय कराल.
\s5
\p
\v 29 माझे शिष्य होण्याकरता ज्याने आपले एखादे घर किंवा मैदानातील एखादा भूखंड, त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला, त्यांच्या मुलांना, किंवा इतर कोणत्याही कुटूंबातील सदस्यांना मागे सोडले त्यांना देव प्रतिफळ देईल. देवासाठी त्यांनी ते सोडून दिले म्हणून शंभर वेळा अनेक पटीने लाभ देईल. आणि ते देवासोबत सर्वकाळासाठी जगतील.
\v 30 परंतु या जीवनात महत्वाचे असलेले अनेक लोक भविष्यात त्या वेळी महत्त्वाचे नसतील आणि आता बिनमहत्त्वाचे असलेले बरेच लोक भविष्यात त्या वेळी महत्वाचे ठरतील.
\s5
\c 20
\s द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत
\p
\v 1 देव त्याच्या लोकांवर राज्य करण्यास सुरूवात करेल, तेव्हा देव लोकांना कसे प्रतिफळ देईल हे स्पष्ट करण्यासाठी, ह्याची तुलना एका संपत्तीच्या मालकाने काय केले त्यासोबत मी करीन. अगदी पहाटेच्या वेळी मालमत्तेचा मालक बाजारपेठेमध्ये गेला, ज्यांना काम हवे होते त्यासाठी लोक नाक्यावर एकत्र जमले होते. त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी मोलाने मजुर आणण्यासाठी तो तेथे गेला होता.
\v 2 त्याने ज्या लोकांना काम करण्यासाठी आणले होते त्यांना एक दिवसासाठी काम करण्याकरीता प्रमाण वेतन देण्याचे वचन दिले. मग त्याने त्यांना आपल्या द्राक्षमळ्यास पाठवून दिले.
\s5
\p
\v 3 त्याच दिवसाच्या सकाळी नऊ वाजता तो पुन्हा बाजारात गेला. तेथे त्याने काम नसलेले अनेक लोक पाहिले.
\v 4 तो त्यांना म्हणाला, जसे इतर लोकांनी केले तसे, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात जा, आणि तिथे काम करा. आणि जे काही योग्य वेतन आहे ते मी तुम्हांला देईन. म्हणून ते देखील त्याच्या द्राक्षमळ्यात गेले आणि काम करण्यास सुरूवात केली.
\s5
\p
\v 5 दुपारी तीन वाजता तो पुन्हा बाजारपेठेकडे गेला आणि ज्याने त्यांना एक वाजवी वेतन देण्याचे वचन दिले ते इतर मजुर त्याला सापडले.
\v 6 पाच वाजता तो पुन्हा बाजारपेठेत गेला आणि तेथे उभे असलेले काम नसलेले काही लोक त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?
\v 7 त्यांनी त्याला उत्तर दिले, ‘कारण आम्हांला कोणीही काम दिले नाही. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हांला काम देतो. जसे इतर लोकांनी केले तसे ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात जा, आणि तिथे काम करा. म्हणून ते गेले.
\s5
\p
\v 8 संध्याकाळी झाली, तेव्हा द्राक्षमळ्याचा मालक आपल्या व्यवस्थापकाला म्हणाला, ‘मजुरांना येण्यास सांग जेणेकरून तुला त्यांचे वेतन देता येईल. पाहिल्यांदा, ज्यांनी अगदी शेवटी कामाला सुरूवात केली त्यांना अगोदर मजुरी दे, आणि नंतर ज्यांनी अगदी सुरूवातीला कामाला सुरूवात केली त्यांना शेवटी मजुरी दे.
\v 9 त्या व्यवस्थापकाने दुपारी पाच वाजेपर्यंत काम सुरू न करणाऱ्या प्रत्येक मजुरांना एक दिवसाचे प्रमाण वेतन दिले.
\v 10 अगदी पहाटेच काम सुरू करणारे मजुर आपली मजुरी घेण्याकरता गेले, तेव्हा ते प्रमाण वेतन पेक्षा अधिक पैसे प्राप्त होतील असा विचार ते करू लागले. पण त्यांनाही केवळ प्रमाण वेतन प्राप्त झाले.
\s5
\p
\v 11 मग त्यांना मिळालेले वेतन योग्य नाही असा विचार ते करू लागले, म्हणून त्यांनी द्राक्षमळ्याच्या मालकाकडे तक्रार केली.
\v 12 ते त्याला म्हणाले, ‘तुम्ही न्यायी नाही! त्या मजुरांनी आमचे सर्व काम झाल्यावर उरलेल्या शेवटच्या वेळेत काम सुरू करून केवळ एक तासच काम केले! पंरतु तुम्ही आमच्या जितके तितकेच वेतन त्यांनाही दिले! आम्ही मात्र उन्हातान्हात कष्ट केले!
\s5
\p
\v 13 द्राक्षमळ्याचा मालक तक्रार करणाऱ्यांपैकी एकाला म्हणाला, ‘मित्रा, मी तुझ्याबाबतीत अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर एका प्रमाण वेतनावर संपूर्ण दिवस काम करायला सहमत झाला होतास.
\v 14 तर मला तक्रार करू नकोस! तुझी मजुरी घे आणि चालायला लाग! मी तुला जे काही दिले तेवढेच वेतन तुमचे सर्व काम सुरू झाल्यानंतर शेवटी काम सुरूवात करणाऱ्या मजुरांना देण्याची माझी इच्छा होती.
\s5
\p
\v 15 निश्चितपणे माझ्या पैशाचा खर्च मला वाटेल तसा करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही का? माझ्या उदारतेबद्दल तू माझा मत्सर करू नये!”’
\v 16 मग येशू आम्हांला म्हणाला, त्याचप्रमाणे, “जे आता कमी महत्त्वपूर्ण वाटतात देव काही लोकांना चांगले प्रतिफळ देईल, आणि तो काही लोकांना प्रतिफळ देणार नाही जे आता जास्त महत्वपूर्ण वाटतात.”
\s येशूने आपल्या मृत्युबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य
\s5
\p
\v 17 येशू यरूशलेमकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बारा शिष्यांसोबत चालत जात असता, तेव्हा त्याला त्यांच्याशी एकांतात बोलता यावे म्हणून त्याने त्यांना एकाबाजूला घेतले. मग तो त्यांना म्हणाला,
\v 18 “लक्षपूर्वक ऐका! आम्ही आता वर यरुशलेमेस जात आहोत. आम्ही तेथे असतांना, मला, मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यासाठी कोणीतरी मुख्य याजक आणि यहूदी नियमांना शिकवणाऱ्या माणसांना मदत करेल, आणि ते मला परीक्षेत टाकतील. ते माझ्यावर दोष लावतील आणि त्यासाठी मला मरणदंड व्हावा असे म्हणतील.
\v 19 मग त्यांना माझी थट्टा करता यावी, फटके मारता यावे, आणि मला वधस्तंभावर खिळवून मारून टाकता यावे म्हणून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु त्या नंतर तिसऱ्या दिवशी, देव मला पुन्हा जिवंत करील.”
\s ऐहिक सन्मानाप्रीत्यर्थ विनंती
\s5
\p
\v 20 त्यानंतर जब्दीच्या पुत्राची आई, याकोब आणि योहान, ह्या तिच्या दोन मुलांना घेऊन येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली आणि तिच्यावर त्याने उपकार करावे म्हणून तिने त्याला एक विनंती केली.
\v 21 येशू तिला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” ती त्याला म्हणाली, “तुम्ही राजा व्हाल तेव्हा माझ्या या दोन पुत्रांना सर्वात प्रतिष्ठेच्या ठिकाणी, एक तुमच्या उजवीकडच्या हाताशी आणि दुसरा डावीकडच्या हाताशी बसण्याची परवानगी द्या.”
\s5
\p
\v 22 तेव्हा येशू तिला आणि तिच्या मुलांना म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! मी जे दुःख सहण करणार आहे ते दुःख तुम्हांला सहन होईल काय?” याकोब आणि योहानाने त्याला उत्तर दिले, होय, आम्ही ते करू शकतो.”
\v 23 मग येशू त्यांना म्हणाला, “होय, मी जसे दुःख सहन करू शकतो तसे तुम्ही करू शकाल. पण कोण माझ्या बाजूला बसून माझ्याबरोबर राज्य करेल हे निवडणारा मी कोणी नाही. तर देव, माझा पिता, ज्या एकाला तो निवडतो त्याला ती जागा देतो.”
\p
\v 24 याकोब आणि योहानाने केलेल्या विनंतीला इतर दहा शिष्यांनी ऐकले तेव्हा ते त्याच्यांवर रागावले कारण त्यांना देखील सन्मानांच्या पदांवर येशूबरोबर राज्य करायचे होते.
\s खरे मोठेपण
\s5
\p
\v 25 मग येशूने त्या सर्वांना एकत्रित बोलावले आणि त्यांना म्हटले, “तुम्हांला माहीती आहे की, जे परराष्ट्रीयांवर राज्य करतात ते फार शक्तिशाली आहेत असे दाखविण्यात त्यांना आंनद वाटतो. त्यांच्या मुख्य राज्यकर्त्यांना आपल्या हाताखालील लोकांना आज्ञा देण्यास आनंद वाटतो.
\v 26 पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नये. त्याउलट, तुम्हापैकी प्रत्येकजण जो देवाने त्याच्याबद्दल महत्वाचा म्हणून विचार करावा असे इच्छित असला तर त्याने नक्कीच इतरांकरता एक सेवक व्हायला पाहिजे.
\v 27 होय, आणि तुम्हापैकी प्रत्येकजण जो देवाने त्याच्याबद्दल अति महत्वाचा म्हणून विचार करावा असे इच्छित असला तर त्याने नक्कीच इतरांकरता एक दास व्हायला पाहिजे.
\v 28 तुम्ही माझे अनुकरण करायलाच पाहिजे. माझी सेवा इतरांनी करावी म्हणून मी आलो नाही. त्याउलट, इतरांची सेवा करायला आणि माझा प्राण त्यांनी घेण्याची परवानगी त्यांना मी द्यावी ह्यासाठी मनुष्याचा पुत्र म्हणजे मी आलो आहे. जेणेकरून, अनेक लोकांना त्यांच्या पापांबद्दल होणाऱ्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी खंडणी म्हणून माझे मरण असेल.”
\s दोन आंधळ्यांना दृष्टिदान
\s5
\p
\v 29 ते यरीहो शहर सोडत असतांना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.
\v 30 ते तेथून जात असतांना, रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते असे त्यांनी पाहिले. त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू, दावीदाच्या पुत्रा, तुम्ही ख्रिस्त आहात! आमच्यावर दया करा!”
\v 31 जमावातील लोकांनी त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते आंधळे मनुष्य अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र, तुम्ही ख्रिस्त आहात! आमच्यावर दया करा!”
\s5
\p
\v 32 मग येशू थांबला आणि त्याच्याजवळ येण्याकरता त्यांना बोलावले, मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
\v 33 ते त्याला म्हणाले, “प्रभू, आमच्या डोळ्यांना बरे करा जेणेकरून आम्ही पाहू शकू!”
\v 34 येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.
\s5
\c 21
\s यरुशलेमेत येशूचा प्रवेश
\p
\v 1-2 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता, ते जैतूनाच्या डोंगराजवळच्या बेथफगे या गावी आले. नंतर येशू त्याच्या दोन शिष्यांना म्हणाला, “तुम्ही समोरच्या गावात जा. तुम्ही त्यात प्रवेश कराल तेव्हा लागलीच, एक गाढवी व तिच्याबरोबर एक शिंगरु बांधलेले असे तुम्हांला आढळेल. त्यांना सोडा आणि त्यांना माझ्याकडे येथे घेऊन या.
\v 3 तुमच्या असे करण्याबद्दल जर कोणीही तुम्हांला काही विचारले, तर त्याला सांगा की, ‘प्रभूला यांची गरज आहे. त्यानंतर तो त्यांना लगेच घेऊन जाण्याची परवानगी तुम्हांला देईल.”
\s5
\p
\v 4-5 हे सर्व घडले, तेव्हा एका संदेष्ट्यांच्या द्वारे जे लिहले होते ते पूर्ण झाले. त्या संदेष्ट्याने लिहिले होते, “यरुशलेमेत राहणाऱ्या लोकांना सांगा, ‘पाहा! तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो नम्रपणे येईल. तो नम्र आहे हे दाखवेन, कारण तो गाढवीच्या पिल्लावर म्हणजेच एका शिंगरावर बसून येत आहे.
\s5
\p
\v 6 मग ते दोन शिष्य गेले आणि येशूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केले.
\v 7 त्यांनी त्या गाढवीला आणि तिच्या शिंगराला येशूकडे आणिले. त्याला बसण्यासाठी काहीतरी बनवावे म्हणून त्यांनी त्यावर आपली अंगावरील कपडे घातले. मग येशूने त्याच्यावर ताबा मिळवला आणि त्यावर बसला.
\v 8 तेव्हा एका मोठ्या लोकसमुदायाने आपले काही बाहेरील कपडे काढून रस्त्यावर पसरले, आणि इतर लोकांनी खुजूरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूचा सन्मान करण्याकरता ह्या गोष्टी त्यांनी केल्या.
\s5
\p
\v 9 लोकसमुदायातील काही त्याच्या पुढे चालत होते आणि काही त्याच्या मागे चालत होते आणि मोठ्याने ते असा जयघोष करू लागले, “दावीद राजाचा पुत्र, ख्रिस्ताची स्तुती करा!” “देवाचा प्रतिनिधी आणि देवाच्या अधिकाराने म्हणून जो येतो आहे त्याला प्रभू देव आशिर्वाद देवो.” “जो स्वर्गात परम उंच आहे, त्या देवाला स्तुती असो!”
\v 10 येशूने यरुशलेमेमध्ये प्रवेश केला, तेव्हा शहरातील सर्व लोक फार उत्सुक झाले आणि म्हणू लागले, “या माणसाचा आदर ते अशाप्रकारे का करत आहेत?”
\v 11 जो जमाव आधीपासून त्याच्यामागे आला होता त्यांनी उत्तर दिले, “हा गालीलातील नासरेथातून आलेला, येशू संदेष्टा आहे!”
\s परमेश्वराच्या भवनाचे शुद्धीकरण
\s5
\p
\v 12 मग येशूने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला आणि तेथे जे खरेदी व विक्री करत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मंदिराचा पैशांचा कर भरण्यासाठी रोमन नाण्यांना अदलाबदल करून देणाऱ्यांच्या मेजांनाही त्याने उलथून टाकिले आणि यज्ञाकरता कबूतरे विकणाऱ्यांच्या आसनालाही त्याने उलथून टाकले.
\v 13 तेव्हा तो त्यांना म्हणाला, एका संदेष्टयाने शास्त्रलेखात लिहिले की देव म्हणतो, “जेथे लोक त्या ठिकाणी माझी प्रार्थना करतील असे माझे घर मला हवे आहे, पंरतु तुम्ही लोकांनी त्याला लुटारू जमवणाऱ्यांचे ठिकाण बनवले आहे!’”
\p
\v 14 त्यानंतर, अनेक आंधळे लोक आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले जेणेकरून त्यांना त्याने बरे करावे, आणि त्याने तसे केले.
\s5
\p
\v 15 यहूदी मुख्य याजक आणि यहूदी नियमांना लोकांना शिकवणारे पुरुष यांनी येशूला अद्भुत कृत्ये करतांना पाहिले. मंदिरात लहान मुलांनाही “दावीद राजाचा पुत्र, ख्रिस्ताची आम्ही स्तुती करतो” अशी घोषणा देतांना त्यांनी पाहिले, तेव्हा ते फार क्रोधीत झाले कारण येशू हाच ख्रिस्त आहे असा विश्वास ते धरत नव्हते.
\v 16 येशूने त्या लहान मुलांनी तसे म्हणण्यास परवानगी देऊ नये असा विचार ते करू लागले, म्हणून त्यांनी त्याला विचारले, तुम्ही ह्याला कशी काय परवानगी देऊ शकता? ही मुले काय घोषणा देत आहेत हे तुम्ही ऐकले का?” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “होय, मी त्यांना ऐकले आहे, परंतु ‘मुले माझी स्तुती करतील’ हे लहान मुलांबद्दल असलेले हे शास्त्रवचन तुम्ही वाचले आहे आणि ते जर तुम्हांला आठवत असेल, तर तुम्हांला हे कळेल की देव त्यांच्याबरोबर संतुष्ट आहे,” स्तोत्रकर्ता, देव काय म्हणतो ते लिहितो, ‘तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे.’”
\p
\v 17 नंतर येशूने ते शहर सोडले. शिष्य त्याच्याबरोबर बेथानी या गावी गेले, आणि ते त्या रात्री तेथेच राहिले.
\s अंजीराचे निष्फळ झाड
\s5
\p
\v 18 दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे ते शहराकडे पुन्हा येत असता, तेव्हा येशूला भूक लागली.
\v 19 रस्त्याच्या कडेला त्याने अंजिराचे एक झाड पाहिले, काही अंजीर तोडून खावे म्हणून तो अंजिराच्या झाडापाशी गेला. पण तो जवळ गेला, तेव्हा त्या झाडावर अंजीर नाहीत तर केवळ पाने आहेत असे त्यांनी पाहिले. मग तो त्या अंजिराच्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही अंजीर न येवो!” परिणामी, ते अंजिराचे झाड लगेच वाळायला सुरू झाले.
\s5
\p
\v 20 शिष्यांनी दुसऱ्या दिवशी पाहिले, तेव्हा ते अंजिराचे झाड पूर्णपणे वाळून गेले होते. त्यांना फार आश्चर्य वाटले आणि ते येशूला म्हणाले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून गेले ह्यामुळे आम्ही फार आश्चर्यचकित झालो आहोत!”
\v 21 येशू त्यांना म्हणाला, “याचा विचार करा: तुम्ही जे काही त्याला मागीतले आहे ते करण्यास देव समर्थ आहे असा विश्वास तुम्ही संशय न करता धरला, तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तसेच यासारख्या गोष्टी करण्यास तुम्ही सक्षम व्हाल. तसेच तेथे असलेल्या डोंगराला ‘स्वतःला उपट आणि स्वतःला समुद्रात फेकून दे, असे त्याला म्हणालात तर ते घडेल! असे अद्भुत कृत्ये तुम्ही देखील करू शकाल.
\v 22 त्या व्यतिरिक्त, तुम्ही जेव्हाकधी देवाला प्रार्थना करून काही गोष्टी तुम्ही मागता, तेव्हा तो तुम्हांला देईल असा विश्वास तुम्ही धरला, तर त्याच्याकडून तुम्हांला प्राप्त होईल.”
\s येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 23 त्यानंतर, येशूने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. तो लोकांना शिकवत असतांना, मुख्य याजक व लोकांचे वडीलजण येशूकडे आले. ते म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? काल तुम्ही येथे जे केले हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
\v 24 येशू त्यांना म्हणाला, “मीसुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो, आणि तुम्ही मला उत्तर दिले, तर कोणी या गोष्टी करण्यासाठी मला अधिकार दिला आहे, हे मी तुम्हांला सांगेन.
\s5
\p
\v 25 बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने त्याच्या जवळ आलेल्यांना बाप्तिस्मा दिला हा अधिकार त्याला कोठून मिळाला? देवाकडून किंवा लोकांकडून त्याला तो मिळाला का? मुख्य याजक आणि वडीलजण यांनी काय उत्तर दिले पाहिजे याविषयी आप-आपसांत चर्चा केली. ते एकमेकांना म्हणाले, “हे देवापासून आहे, असे आम्ही म्हणालो, तर तो आम्हांला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्या संदेशावर विश्वास ठेवायला पाहिजे!
\v 26 ‘पंरतु हे मनुष्यापासून आहे, असे आम्ही म्हणालो, तर लोक आपल्या विरुद्ध अतिक्रूर प्रतिक्रिया दाखवू शकतात कारण सर्व लोक विश्वास करतात की योहान हा देवाने पाठविलेला एक संदेष्टा होता.
\v 27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाला हा अधिकार कोठून मिळाला हे आम्हांला माहित नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, कारण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, म्हणून काल जे काही मी केले त्या गोष्टी करण्याची परवानगी मला कोणी दिली? हे मी तुम्हांला सांगणार नाही.”
\s दोन पुत्राचा दुष्टांत
\s5
\p
\v 28 मग येशू मुख्य याजक व वडीलजणांना म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो त्याबद्दल तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुले होती, तो आपल्या मोठ्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षमळ्यात जा आणि काम कर!
\v 29 पंरतु मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘मी जाणार नाही! परंतु नंतर त्या मुलाने आपले मन बदलले व तो द्राक्षमळ्यात गेला आणि काम केले.
\v 30 नंतर वडील आपल्या लहान मुलाकडे गेले आणि त्यांनी त्याच्या मोठ्या मुलाला सांगितलेले ते त्याला सांगितले, तो मुलगा म्हणाला, ‘हो महाशय, मी आज जाईन आणि द्राक्षमळ्यात काम करीन. पंरतु तो तिथे गेला नाही.
\s5
\p
\v 31 मग त्याच्या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने त्याच्या वडिलांना जे काही हवे ते केले?” त्यांनी उत्तर दिले, “मोठ्या मुलाने”. मग येशू त्यांना म्हणाला, तर याचा विचार करा: जकातदार व वेश्या यांसह इतर लोक, यांना तुम्ही म्हणता की ते फार पापी आहेत-तो तुम्हांवर राज्य करण्यास सहमत होण्याऐवजी त्याच्यांवर राज्य करण्यास सहमत होण्याची दाट शक्यता आहे.
\v 32 मी तुम्हांला हे सांगतो कारण, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील योग्य मार्गाने कसे जगावे हे स्पष्ट सांगितले, पंरतु तुम्ही त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवला नाही. पंरतु जकातदार आणि वेश्या यांनी त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवला, आणि ते आपल्या पापी वर्तनापासून दूर वळाले. याउलट, त्याच्यांत बदल झाला आहे असे पाहून देखील तुम्ही पाप करणे थांबविण्यास नकार दिला आणि योहानाच्या उपदेशावर विश्वास ठेवला नाही.”
\s द्राक्षमळ्याचा दुष्टांत
\s5
\p
\v 33 “मी तुम्हांला आणखी दुसरी बोधकथा सांगतो तिला ऐका, एक जमीन मालकाने एक द्राक्षमळा लावला. त्याने त्याच्या सभोवती एक कुंपण बांधले. द्राक्षातून बाहेर येणारा रस गोळा करण्यासाठी एक जागा त्याने बनविली. त्याने एक मनोरा देखील बांधिला यासाठी की त्यामध्ये कोणीतरी बसून त्या द्राक्षमळ्याची रखवाली करू शकेल. त्याने काही लोकांना द्राक्षमळा भाड्याने दिला जे त्याची काळजी घेतील आणि त्याला काही द्राक्षे परत देतील. मग तो दुसऱ्या देशी निघून गेला.
\v 34 द्राक्षे तोडण्याचा हंगाम आला, तेव्हा त्या जमीनमालकाने आपल्या काही चाकरांना द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या मनुष्याकडे द्राक्षमळ्यात उत्पन्न झालेला द्राक्षांचा वाटा उचलण्यासाठी पाठवले.
\s5
\v 35 परंतु त्या भाडेकरूंनी चाकरांना बांधून टाकले, त्यांनी त्याच्यापैकी एकाला मार दिला, तर दुसऱ्यास जीवे मारले, आणि तिसऱ्या एकाला त्यावर धोंडमार करून ठार केले.
\v 36 म्हणून त्या जमीन मालकाने पहिल्या वेळेस पाठवले होते त्यापेक्षा आधिक चाकरांना पाठवले. पण त्या भाडेकरूंनी इतर चाकरांना वागणूक दिली होती त्यासारखीच वागणूक ह्या इतर चाकरांनाही दिली.
\v 37 याबद्दल त्याने ऐकल्यानंतर, जमीनमालकाने आपल्या स्वतःच्या मुलाला भाडेकरूपासून द्राक्षांचा वाटा मिळवण्यासाठी पाठवले. त्याने त्याला पाठवले तेव्हा तो स्वतःशी म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील आणि माझा द्राक्षांचा वाटा त्याला देतील.
\s5
\p
\v 38 पण शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला येतांना पाहिले तेव्हा ते एकमेकांस म्हणू लागले, ‘हा मनुष्य तर ह्या द्राक्षमळ्याचा वारस आहे! चला आपण एकत्र होऊ आणि त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊन आप-आंपसात वाटणी करू.
\v 39 म्हणून त्यांनी त्याला धरले, द्राक्षमळ्याच्या बाहेर त्याला फेकले आणि त्याला ठार मारले.
\s5
\p
\v 40 आता मी तुम्हांला विचारतो, जमीनमालक आपल्या द्राक्षमळ्यास परत येईल तेव्हा या भाडेकरून सोबत तो काय करील असे तुम्हांला वाटते?”
\v 41 यहूदी मुख्य याजक आणि वडीलजणांनी उत्तर दिले, तो त्या दुष्ट माणसांचा समूळपणे नाश करील! मग त्या द्राक्षमळ्याला तो इतरांना भाड्याने देईल. ते द्राक्षे कापणी करतील तेव्हा ते त्याचा वाटा देतील.”
\s5
\p
\v 42 येशू त्यांना म्हणाला, “हे योग्य आहे, म्हणून तुम्ही शास्त्रवचनांतील वाचलेल्या या शब्दांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहेः
\q इमारती बांधणांऱ्या मनुष्याने एका मोठ्या इमारतीच्या एका विशिष्ट दगडाला नाकारले. परंतु त्याच दगडाला इतरांनी त्याच्या योग्य ठिकाणी ठेवले, आणि तो इमारतीचा सर्वात महत्वाचा दगड झाला. हे प्रभूने केले आहे, आणि आम्ही त्याच्याकडे पाहतो तेव्हा आश्चर्यचकित होतो.
\s5
\p
\v 43 तुम्ही मला नाकारिले म्हणून, मी तुम्हांला हे सांगणार आहे: देव ज्या तुम्हा यहूदी लोकांवर राज्य करायचा पण आता तो करणार नाही. त्याऊलट, परराष्ट्रीयांवर, आणि तो जे करायला सांगतो ते करणांऱ्यावर तो राज्य करण्यास सहमत होईल.
\v 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.
\s5
\p
\v 45 मुख्य याजकांनी आणि वडीलजण असलेले परुश्यांनी ही बोधकथा ऐकली, तेव्हा तो ख्रिस्त आहे ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून तो त्यांच्यावर आरोप ठेवत होता हे त्यांच्या लक्षात आले.
\v 46 त्याला धरून अटक करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांनी तसे केले नाही कारण त्यांनी हे केले तर गर्दी काय करेल ह्याची त्यांना भीती होती कारण लोकसमुदाय येशूला संदेष्टा म्हणून मानीत होते.
\s5
\c 22
\s लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत
\p
\v 1 येशूने यहूदी पुढाऱ्यांना आणखी इतर बोधकथा सांगितल्या त्यापैकी ही एक बोधकथा आहे:
\v 2 देव राजा म्हणून सर्वत्र राज्य करेल, तेव्हा तो एका राजासारखा असेल ज्याने आपल्या सेवकांना सांगितले की, त्यांनी त्याच्या मुलासाठी लग्नाची एक मेजवानी तयार करायला पाहिजे.
\v 3 मेजवानी तयार झाली, तेव्हा त्याने आंमत्रित केलेल्या लोकांना लग्नाच्या मेजवानीला येण्याची त्यांची वेळ झाली आहे हे सांगण्याकरता राजाने आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक गेले आणि त्या लोकांना ते सांगितले. पंरतु आंमत्रित केले गेलेल्या लोकांना जाण्याची इच्छा नव्हती.
\s5
\v 4 म्हणून राजाने त्या लोकांना मेजवानीला यावे हे सांगण्याकरता पुन्हा इतर काही सेवकांना पाठवले. तो त्या सेवकांना म्हणाला, “मी आंमत्रित केलेल्या लोकांना मेजवानीला या असे सांगा, मी जेवण तयार केले आहे. बैल आणि पुष्ट वासरे कापली आहेत आणि शिजवली आहेत. सगळ्या गोष्टी तयार आहे. आता लग्नाच्या मेजवानीला येण्याची तुमची वेळ झाली आहे. राजा तुम्हांला हे म्हणतो!”’’
\s5
\v 5 पंरतु सेवकांनी त्यांना सांगितलेल्यावर त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्यामधील काही जण त्यांच्या मालकीच्या शेतात गेले. इतर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले.
\v 6 बाकीच्या काहीनीं राजाच्या सेवकांना पकडले, त्यांना वाईट वागणूक दिली, आणि त्यास जीवे मारले.
\v 7 राजाने जे काही घडले ते ऐकले तेव्हा, तो फार क्रोधित झाला. त्याने त्या खुन्यांना ठार मारण्याची आणि ते शहर जाळून टाकण्याची आज्ञा सैनिकास दिली.
\s5
\v 8 त्याच्या सैनिकांनी हे केल्यानंतर, राजा आपल्या सेवकांना म्हणाला, मी मेजवानी तयार केली आहे, परंतु ज्या लोकांना आमंत्रण देण्यात आले होते ते येण्यास पात्र नाहीत.
\v 9 म्हणून मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यावर जा, तुम्हांला आढळेल त्या कोणालाही सांगा की, त्यांनी लग्नाच्या मेजवानीला यायलाच पाहिजे.
\v 10 मग ते सेवक तेथे गेले, आणि जे जे त्यांना भेटले त्या प्रत्येकाला त्यांनी जमा केले. त्यांनी दुष्ट लोक आणि चांगल्या लोक या दोघांना एकत्रित केले. लग्नाच्या मेजवानी जेथे होणार होती त्या ठिकाणाच्या दिवाणखान्यात त्यांना ते घेऊन आले. दिवाणखाना लोकांनी भरून गेला होता.
\s5
\v 11 राजाने अतिथींना भेटण्यासाठी दिवाणखान्यात प्रवेश केला, तेव्हा लग्नाच्या मेजवानीसाठी अतिथींना घालण्यासाठी दिला गेलेला पोशाख न घातलेला कोणाएकाला त्याने तेथे पाहिले.
\v 12 राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा, लग्नाच्या ठिकाणी अतिथी घालतात तो पोशाख तू घातलेला नाहीस म्हणून तू ह्या दिवाणखान्यात मुळीच प्रवेश करायला नाही पाहिजे!? त्या मनुष्याने काहीही सांगितले नाही, कारण काय बोलावे ते त्याला कळत नव्हते.
\s5
\v 13 तेव्हा राजाने आपल्या सेवकांना म्हटले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि बाहेर जिथे निर्भिड अंधार आहे तेथे त्याला टाका, तेथे लोक रडतात आणि त्यांना वेदना होत असतात म्हणून ते आपले दात विचकवतात.’”
\v 14 मग येशू म्हणाला, देवाने अनेकांना त्याच्याकडे येण्यासाठी आमंत्रित केले आहे, परंतु तेथे असण्यासाठी काही लोक आहेत ज्यांच्यासाठी त्याने निवडले आहे. परंतु केवळ काही लोक आहेत जे त्यांनी तेथे असण्यासाठी निवडले आहेत असा या बोधकथेचा मुद्दा आहे.”
\s कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 15 येशूने हे सांगितले, तेव्हा त्याने काहीतरी बोलावे म्हणून आपण त्याला कसे प्रेरित करू शकतो जेणेकरून मग त्याच्यावर आरोप ठेवण्यास त्यांना शक्य होईल ही योजना आखण्याकरता परूशी एकत्र जमले होते.
\v 16 इस्राएली लोकांनी केवळ कर भरण्यासाठी यहूदी आधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या करांची भरपाई करावी, ही विचारसरणी असलेल्या शिष्यांपैकी काहींना त्यांनी त्याच्याकडे पाठवले. त्यांनी राजा हेरोदाचे समर्थन करणाऱ्या काही सदस्यांनाही पाठवले. इस्राएली लोकांनी केवळ रोमी सरकारला द्यावा लागणाराच कर भरावा असा त्या पक्षातील विचार करायचे. ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्यांनी येशूला सांगितले, “गुरूजी, आम्हांला माहित आहे की आपण खात्रीलायक आहात आणि आपण आमच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे याबद्दल सत्य शिकवता. कोणी आपल्याबद्दल काय म्हणेल म्हणून तुम्ही जे काही शिकवता त्याच्यात कधीही बदल करत नाहीत, जरी तो एक महत्वाचा व्यक्ती आहे जो आपण काय शिकवता ते आवडत नाही.
\v 17 तर या प्रकरणाबद्दल आपणास काय वाटते ते आम्हांला सांगा: आम्ही रोमी सरकारला कर द्यावा, किंवा नाही, हे योग्य आहे का?
\s5
\v 18 परंतु येशूला हे माहित होते की त्यांना जे करायचे होते ते खरोखर वाईट आहे. (यहूदी अधिकार आणि रोमी अधिकार ह्यांच्या विषयी त्याने असे काही बोलावे जेणेकरून तो अडचणीत सापडावा अशी त्यांची इच्छा होती.) यहूदी अधिकाऱ्यांकडून किंवा रोमी अधिकाऱ्यांकडून त्रास होईल असे काही म्हणण्यास ते त्याला भाग पाडत होते. मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ढोंगी आहात; मी काहीतरी बोलावे असे तुम्ही इच्छिता ज्यासाठी तुम्हांला माझ्यावर आरोप करता येईल.
\v 19 रोमन कर भरण्यासाठी जे नाणे लोक वापरतात ते मला दाखवा.” म्हणून त्यांनी दिनार नावाचे एक नाणे त्याला दाखवले.
\s5
\v 20 मग तो त्यांना म्हणाला, “या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि कोणाचे नाव यावर लिहिलेले आहे?”
\v 21 त्यांनी उत्तर दिले, “त्यात रोमी सरकारचे प्रमुख कैसर याचे चित्र आणि नाव आहे.” मग तो त्यांना म्हणाला, “तर सरकारला जे आवश्यक आहे ते त्यांना द्या, आणि जे देवाचे आवश्यक ते त्याला द्या.”
\v 22 येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले, तेव्हा त्याच्या उत्तरावर कोणीही आरोप करण्यास सक्षम नाही म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते येशूला सोडून गेले.
\s पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न
\s5
\p
\v 23 दरम्यान त्याच दिवशी, काही सदूकी येशूकडे आले. लोक मेल्यानंतरही ते पुन्हा जिवंत होऊ शकत नाही असा विश्वास धरणारा तो एक यहूदी वर्ग होता. ते येशूला एक प्रश्न विचारू इच्छित होते.
\v 24 ते त्याला म्हणाले, “गुरूजी, मोशेने शास्त्रलेखात लिहिले आहे की, ज्याला कुठलेही मूलबाळ नव्हते असा एखादा मनुष्य मरण पावला, तर त्याच्या भावाने त्या मृत मनुष्याच्या विधवेशी लग्न करावे जेणेकरून तिला एक मुलगा असू शकेल. जो मृत्यू पावला त्याचा मुलगा म्हणून ह्या मुलाला समजण्यात येईल, आणि त्याप्रमाणे त्या मृत मनुष्याचा वंश चालेल.
\s5
\v 25 आता, आमच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटूंबात सात मुले होती. सर्वात मोठ्याने कुणासोबत तरी विवाह केला. तो व त्याच्या बायकोला मुले झाले नाही आणि तो मरण पावला. मग दुसऱ्या भावाने त्या विधवेशी विवाह केला. पण तो देखील एखादे मूल न होताच मृत्यु पावला.
\v 26 तिसऱ्या भावाच्या बाबतीतही, आणि ज्यांनी त्या समान विधवेशी एक एक करून विवाह केला त्या इतर चार भावाच्या बाबतीतही तसेच घडले.
\v 27 शेवटी, त्या महिलेचाही मृत्यु झाला.
\v 28 तेव्हा, देव मेलेल्यांमधून लोकांना उठवील त्या वेळी, सात भाऊ होते त्यातील कोण तिचा पती होईल असे तुम्हांला वाटते? लक्षात ठेवा की त्या सर्वांनी तिच्याशी विवाह केला होता.”
\s5
\v 29 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुमच्या विचार करण्यामध्ये तुम्ही नक्कीच चुकत आहात, शास्त्रलेखात काय लिहले ते तुम्हांला माहित नाही. देवाकडे लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे हे देखील तुम्हांला माहित नाही.
\v 30 खरे हे आहे की ती स्त्री त्यापैकी कोणाचीही पत्नी होणार नाही, कारण देवाने सर्व मृत गोष्टींना जिवंतपणाचे अभिवचन दिले होते त्यामुळे कोणीही लग्न करणार नाही. त्याऐवजी, लोक स्वर्गात देवदूतासारखे असतील. ते लग्न करणार नाहीत.
\s5
\v 31 पण मृत लोक पुन्हा जिवंत होतात त्याबद्दल देव काहीतरी म्हटलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते वाचलेले आहे. अब्राहाम, इसहाक आणि याकोब मरण पावल्यानंतर, देव मोशेला म्हणाला,
\v 32 ‘मी तो देव आहे ज्याची अब्राहाम उपासना करायचा, मी तो देव आहे ज्याची इसहाक उपासना करायचा, मी तो देव आहे ज्याची याकोब उपासना करायचा. देवाची उपासना करणारे ते लोक मृत नाहीत. तर ते जिवंत लोक आहेत जे देवाची उपासना करतात. त्यांचे आत्मे अजूनही जिवंत आहेत ह्याची आम्हांला खात्री आहे!”
\p
\v 33 येशूने शिकवलेले लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.
\s सर्वात मोठ्या आज्ञेविषयी प्रश्न
\s5
\p
\v 34 येशूने सदूकी लोकांना अशाप्रकारे उत्तर दिले की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ते सदूकी विचारही करू शकले नाही हे परुश्यांनी ऐकले, तेव्हा त्याला त्यांनी काय म्हणावे म्हणून परूशी एकत्रित जमले. मग ते त्याच्याकडे गेले.
\v 35 देवाने मोशेला दिलेले नियम काळजीपूर्वक अभ्यास केलेला आणि एक वकील असलेला एक मनुष्य त्याच्यांमध्ये होता. येशूबरोबर त्याला वादविवाद करायचा होता. त्याने त्याला विचारले,
\v 36 “गुरूजी, देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे?”
\s5
\v 37 येशूने त्याचे उत्तर म्हणून तो शास्त्रलेख बोलला, “प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर. आपल्या सर्व इच्छेप्रमाणे त्याच्यावर प्रीती कर, आपल्याला अनुभवत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये, आणि आपण सर्व विचारांमध्ये त्याच्यावर प्रीती कर.
\v 38 देवाने मोशेला दिलेल्या नियमांत ही सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे.
\s5
\v 39 प्रत्येकांनी आज्ञा पाळलीच पाहिजे अशी ही पुढील सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे: ‘आपण ज्या लोकांशी संर्पकात येतो त्याच्यांवर जसे आपण स्वत:वर प्रीती करतो तसेच त्यांच्यावरही प्रीती करावी.
\v 40 मोशेने शास्त्रवचनामध्ये लिहिलेले प्रत्येक नियम आणि सदेष्ट्यांनीही लिहिलेले सर्व काही ह्या दोन आज्ञांवरच आधारित आहे.
\s मशीहा विषयी प्रश्न प्रतिसादात त्याला सांगण्यासाठी अगदी एक शब्द विचार करण्यास सक्षम.
\s5
\p
\v 41 येशूजवळ परूशी अजूनही एकत्र जमलेले असतांना, त्याने त्यांना प्रश्न केला,
\v 42 “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “तो दावीदाचा पुत्र आहे.”
\s5
\v 43 येशू त्यांना म्हणाला, “ख्रिस्त हा जर दावीदाचा पुत्र आहे, तेंव्हा दावीदाने त्याला प्रभू म्हणून म्हंटले नाही, तर दावीदाला पवित्र आत्म्याने म्हणण्यास सांगितले.”
\v 44 दावीदाने शास्त्रलेखात ख्रिस्ताबद्दल असे लिहिले आहे: ‘देव माझ्या प्रभुला म्हणाला, “माझ्या उजव्या बाजूला येथे बस, जेथे मी तुला थोर सन्मान देईन.”’
\s5
\v 45 म्हणून तेव्हापासून, दावीद राजाने ख्रिस्ताला ‘आपला प्रभू’ असे म्हटले आहे, ख्रिस्त दावीदाच्या कुळातील कोणीही असू शकत नाही! तो दावीदापेक्षाही फार थोर असणे आवश्यक आहे!”
\v 46 येशू जे बोलला ते ऐकलेल्यांना कुणा एकालाही त्याला सांगण्यासाठी प्रत्युउत्तर देण्यासाठी अगदी एक शब्दही सुचेना. त्यानंतर, त्याला जाळ्यात पकडण्यासाठी आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
\s5
\c 23
\s शास्त्री व परूशी ह्यांचा निषेध
\p
\v 1 त्यानंतर येशूने लोक समुदायाला आणि त्यांच्या शिष्यांना म्हटले,
\v 2 “देवाने मोशेद्वारे इस्राएलाच्या लोकांना दिलेल्या नियम शास्त्राचा अर्थ सांगण्याचे कार्य परूश्यांनी आणि आमच्या यहूदी नियमशास्त्र शिकवणाऱ्यांनी स्वतःकडे घेतले आहे.
\v 3 परिणामी, ते तुम्हाला जे काही करण्यासाठी सांगतात ते तुम्ही अवश्य केले पाहिजे. परंतु ते जे करतात, तसे तुम्ही करू नका कारण ते स्वतःच त्या नियमांचे पालन करत नाहीत.
\s5
\p
\v 4 ज्या नियमांचे पालन करणे अवघड आहे अशा अनेक नियमांचे पालन करण्याची ते तुमच्याकडून अपेक्षा करतात. परंतु त्या नियमांचे पालन करण्यासाठी ते स्वतः कोणालाही सहकार्य करत नाहीत. जणू काय त्यांनी खूप वजनदार ओझे बांधून तुमच्या खांद्यांवर ठेवले व तुम्ही ते वाहून न्यावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्हाला मदत व्हावी म्हणून ते आपले स्वतःचे एक बोट देखील त्या वजनाला लावणार नाहीत.
\v 5 ते जे काही कार्य करतात, ते केवळ ह्यासाठीच करतात की इतर लोकांनी त्यांच्याकडे पाहावे आणि त्यांची स्तुती करावी की ते किती चांगले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या हातांवर बांधण्यात येणाऱ्या शास्त्र लेखाच्या छोट्या-छोट्या पेट्या त्या वास्तविक पाहता आकाराने मोठ्या बनवून बांधतात. त्यांच्या अंगरख्याला जे गोंडे बांधलेले आहेत त्यांचा आकारही ते मोठा करतात जेणेकरून इतरांनी असा विचार करावा की ते देवाचा कितीतरी सन्मान करणारे आहेत.
\s5
\p
\v 6 इतर लोकांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांची इच्छा असते. उदाहरणार्थ, एखाद्या मेजवानीत जेथे अतिशय महत्वाचे लोक बसतात तेथेच तेही बसतात. सभास्थानांमध्येही अशाच प्रकारच्या जागांमध्ये ते बसत असतात.
\v 7 बाजारामध्ये लोकांनी त्यांना अतिशय जास्त सन्मान दाखवून अभिवादन करावे ह्याची त्यांना खूप आवड आहे, आणि लोकांनी त्यांना ‘गुरूजी’ असे म्हणावे हेही त्यांना आवडते.
\s5
\p
\v 8 यहूदी शिक्षकांना जसे लोक म्हणतात, तसेच इतर लोकांनी तुम्हालाही ‘गुरुजी’ म्हणावे, याची तुम्ही म्हणजे माझ्या शिष्यांनी परवानगी देऊ नये. केवळ मीच जो तुमचा खरा गुरू आहे: याचा अर्थ असा आहे की, तुम्ही सर्व समान आहात, भाऊ आणि बहिणीसारखे, तुम्ही एकमेकांचे आहात.
\v 9 पृथ्वीवरील कोणालाही ‘पिता’ म्हणून हाक मारू नका, कारण देव, तुमचा पिता जो स्वर्गात आहे, तोच केवळ तुमचा खरा पिता आहे.
\v 10 लोकांनी तुम्हाला ‘गुरुजी’ म्हणावे याची परवानगी देऊ नका, कारण मी, जो ख्रिस्त, केवळ एकच असा तुमचा शिक्षक आहे.
\s5
\p
\v 11 त्याऐवजी, सेवक जसा इतरांची सेवा करतो तशीच तुम्ही इतरांची सेवा करावी, तुम्हापैकी जो कोणी देवाच्या दृष्टीने महत्वाचा बनू इच्छितो त्याने असेच करावे.
\v 12 जे कोणी स्वतःला महत्त्वाचे बनवू इच्छितात देव त्यांना विनम्र करतो. आणि जे स्वतःला विनम्र करतात देव त्यांना खरोखर महत्त्वाचे बनवतो.”
\s5
\p
\v 13-14 मग येशूने धार्मिक पुढाऱ्यांना म्हटले, “तुम्ही जे नियम शास्त्राचे शिक्षक आहात आणि अहो परूशांनो, तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर रीतीने शासन करणार, कारण तुम्ही लोकांनी त्याचा स्वीकार करून त्यांच्यावर राज्य करावे यापासून त्यांना थांबवता. देवाच्या शहरांमध्ये इतरांनी प्रवेश करू नये म्हणून दार बंद करणाऱ्या लोकांसारखे तुम्ही आहात. तुम्हाला स्वतःलाही आत प्रवेश करायचा नाही, आणि तुम्ही इतरांनाही प्रवेश करू देत नाहीत.
\p
\v 15 नियम शास्त्राच्या शिक्षकांनो आणि परूश्यांनो, तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर शासन करणार! तुम्ही जे काही शिकवता त्याच्यावर एका व्यक्तीने विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही कितीतरी कठोर परिश्रम करतात. तुम्ही इतर दूरवरच्या भूमीकडे प्रवास करत जाता आणि समुद्रही ओलांडून ते कार्य करण्यासाठी जाता; आणि ह्याचा परिणाम म्हणून, तुम्ही जे काही शिकवता तेव्हा तो व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही नरकात जाण्यासाठी जेवढे पात्र आहात त्याहून कितीतरी जास्त पटीने त्याला नरकात जाण्यास पात्र बनवता.”
\s5
\p
\v 16 “अहो यहूदी पुढाऱ्यांनो, परमेश्वर तुम्हाला किती कठोर शासन करणार आहे! जे आंधळे लोक इतरांचे नेतृत्व करू इच्छितात अशा लोकांसारखे तुम्ही आहात. तुम्ही म्हणता, ‘जणुकाय मंदिर एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीने काय करावे हे खात्री करण्यासाठी मंदिरास विनंती करतात, परंतु जर तो व्यक्ती सांगितल्याप्रमाणे करणार नाही, तर तुमच्यासाठी त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु मंदिरामधील सोन्या समोर काहीतरी करण्याविषयी जर तो बोलला असेल, तर ते त्याने अवश्य केले पाहिजे.
\v 17 तुम्ही मूर्ख आहात, आणि जे लोक आंधळे आहेत त्यांच्यासारखे तुम्ही आहात! मंदिरामध्ये जे सोने आहे ते तर महत्त्‍वाचे आहेच, परंतु त्याहीपेक्षा अतिशय महत्वाचे म्हणजे मंदिर आहे. कारण ते मंदिर आहे ज्यामुळे मंदिरातील सोने केवळ देवासाठी उपयोगी ठरते.
\s5
\p
\v 18 तुम्ही असेही म्हणतात, ‘जर एखाद्याने वेदीला तो एखादी गोष्ट करू इच्छितो ते करावे किंवा नाही अशी परवानगी जणू काही वेदीने द्यावी अशी विनंती करतो, मग वचन दिल्याप्रमाणे तो ते कार्य करत नाही, तर त्याने काही फरक पडत नाही. परंतु त्याने वेदीवर जी भेट दिली आहे त्याने काय करावे हे जर त्याने तिला विचारले, तर मग त्याने ते नक्कीच केले पाहिजे.
\v 19 जे लोक आंधळे आहेत त्यांच्या सारखे तुम्ही झाला आहात. तुम्ही वेदीवर जी भेट चढवता ती महत्त्वाची आहे, परंतु तिच्याहूनही अधिक महत्त्वाची ती वेदी आहे कारण त्यामुळेच देवाच्या उपयोगासाठी ती भेट पवित्र झाली आहे.
\s5
\p
\v 20 म्हणून जे लोक काहीतरी करण्याची शपथ घेतात आणि मग वेदीच्या समोर ती करण्याची खात्री देतात की ते ती गोष्ट करणार आहेत, तर मग वेदीवरील सर्व गोष्टींनीही तसेच करावे अशी ते विनंती करतात.
\v 21 होय, तसेच जे लोक एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतात आणि त्याच्यासाठी मंदिराला साक्षीदार म्हणून ठेवतात, तर वास्तविक पाहता ती गोष्ट करण्यासाठी ते देवाला साक्षीदार म्हणून ठेवतात कारण मंदिर त्याचे आहे.
\v 22 आणि तसेच जे लोक काहीतरी करण्याचे अभिवचन देतात आणि त्यासाठीच स्वर्गाला साक्षीदार म्हणून ठेवतात, तर ते वास्तविक पाहता सिंहासनावर बसलेल्या देवाला साक्षीदार म्हणून ठेवत आहेत, आणि ते त्याच्या सिंहासनाला ही साक्षीदार म्हणून ठेवतात.”
\s5
\p
\v 23 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो आणि तुम्ही परूश्यांनो, परमेश्वर देव तुम्हांला किती कठोरपणे शासन करणार आहे! तुम्ही सर्व ढोंगी आहात, कारण तुम्ही ज्या भाज्यांचे उत्पादन करता, जसे की बडीशेप, पुदिना, आणि जिरे ह्या सर्वांचा एक दहावा हिस्सा तुम्ही देवाला देता, तरी जे देवाचे नियम त्याहूनही महत्त्वाचे आहे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून त्यांचे पालन करत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही इतर लोकांबरोबर न्यायाने वागत नाहीत, इतरांसोबत तुम्ही दयाळूपणे वागत नाहीत आणि तुम्ही लोकांची फसवणूक करता. तुमच्या भाजीपाल्याचा दहावा हिस्सा देवाला देणे चांगले आहे, परंतु तुम्ही त्याहूनही इतर महत्त्वाच्या नियमांचे पालन देखील केले पाहिजे.
\v 24 इतरांना नेतृत्व देणाऱ्या आंधळ्या लोकांसारखे तुम्ही सर्व पुढारी झाला आहात. तुम्ही पाणी पिताना त्याच्यातील अगदी छोटासाही किटक तुम्ही गिळू नये म्हणून ह्याची फार काळजी घेता, परंतु तुमची कृती मात्र एखाद्या मोठ्या उंटाला गिळून टाकण्यासारखी वाईट आहे!
\s5
\p
\v 25 “अहो ढोंग्यांनो, तुम्ही नियमशास्त्राच्या शिक्षकांनो आणि तुम्ही परूश्यांनो, देव तुम्हाला भयंकर शासन करणार आहे! इतर लोकांच्या समोर तुम्ही चांगले आहात असे वर्तन करता. स्त्रियांनी बाहेरूनच धुतलेले कप आणि ताटासारखे तुम्ही आहात, परंतु इतरांपासून जे अन्न आणि पेय पदार्थ तुम्ही एवढे घेतले आहेत जेवढ्यांची तुम्हाला आवश्यकता नाही अशा सर्व अन्नपदार्थांनी ती ताटे आणि ते प्याले आत मधून घाणेरडे आहेत.
\v 26 अहो आंधळ्या परूश्यांनो! सर्वप्रथम तुम्ही इतरांपासून चोरी करणे थांबवले पाहिजे. त्यानंतरच तुम्ही जे काही न्याय आणि योग्य आहे ते करण्यास सक्षम व्हाल. त्यानंतर तुम्ही अशा प्याल्यासारखे व्हाल जो बाहेरून आणि आतुनही स्वच्छ केलेला आहे.”
\s5
\p
\v 27 “अहो ढोंग्यांनो, तुम्ही मनुष्य जे इतरांना नियम शास्त्र शिकवता आणि तुम्ही जे परूशी आहात देव तुम्हाला भयंकर शासन देणार आहे! मेलेल्या लोकांच्या कबरांवर ज्या शुभ्र पांढर्‍या रंगाच्या कबरा बांधलेल्या आहेत त्यासारखे तुम्ही आहात, तुम्ही त्या शुभ्र पांढऱ्या रंगाने रंगवलेले आहात जेणेकरून लोकांनी त्यांना स्पर्श करू नये. त्या कबरा दिसायला तर सुंदर आहेत, परंतु आतमधून त्या मेलेल्या लोकांच्या हाडांनी आणि सडलेल्या मासांनी पूर्णपणे भरलेल्या आहेत.
\v 28 तुम्हीही त्या कबरींसारखे आहात. जेव्हा तुमच्याकडे लोक पाहतात, तर ते तुम्हा विषयी असा विचार करतात की तुम्ही फार नीतिमान आहात, परंतु तुम्ही अंतर्यामामध्ये ढोंगी आहात, कारण तुम्ही देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करता.”
\s5
\p
\v 29 “यहूदी नियम शिकवणाऱ्या शिक्षकांनो आणि अहो परूश्यांनो तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर शासन देणार आहे! फार पूर्वी ज्यांनी संदेष्ट्यांना ठार केले त्या संदेष्ट्यांच्या कबरांना तुम्ही बांधून काढता. नीतिमान मनुष्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना तुम्ही सुशोभित करता.
\v 30 तुम्ही म्हणता, “आमचे पूर्वज जिवंत होते त्या काळात जर आम्ही जगलो असतो, तर आम्ही संदेष्ट्यांना ठार करणाऱ्या लोकांना कधीच मदत केली नसती.”
\v 31 अशाप्रकारे, तुम्ही हे स्वीकार करता की तुम्ही त्या खून करणाऱ्या लोकांचे वंशज आहात; आणि म्हणून, तुम्हीही अगदी त्यांच्या सारखेच आहात!
\s5
\p
\v 32 तुमच्या पूर्वजांनी ज्या सर्व पातकांना करण्याचा आरंभ केला होता, तुम्ही देखील त्या सर्व पापांना पूर्ण कराल, कारण तुम्ही त्यांचे वंशज आहात.
\v 33 तुम्ही किती दुष्ट लोक आहात! विषारी सापांच्या सारखे तुम्ही धोकादायक आहात! देवाने तुम्हाला नरकामध्ये शासन करावे यापासून तुम्ही वाचणार आहात असा तुम्ही मूर्खतेचा विचार करता!
\s5
\p
\v 34 तुम्ही ह्याची नोंद घ्या ह्याच कारणामुळे मी तुम्हाकडे संदेष्टे, ज्ञानी पुरुष, आणि शिक्षक पाठवणार आहे. तुम्ही त्यांच्यापैकी काहींना वधस्तंभावर खिळून ठार करणार आहात, आणि तुम्ही त्यांच्यापैकी इतरांना इतर प्रकारे ठार करणार आहात. त्यांच्यापैकी काही लोकांना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चाबकांनी फटके माराल ती ठिकाणे तुमची उपासनेची ठिकाणे असतील आणि त्यांच्यापैकी काहींना तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून बाहेर हाकलून लावाल.
\v 35 म्हणून देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि तुमचे पूर्वज संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या नीतिमान लोकांना, ज्यामध्ये आदामाचा पुत्र हाबेल, जो एक नीतिमान पुरुष होता, बराख्याचा मुलगा जखर्‍या, ज्याला तुमच्या पूर्वजांनी मंदिर आणि वेदी ह्यांच्यातील पवित्र ठिकाणी ठार केले ह्याचा दोष देव तुम्हाला लावील. ते दोन पुरुष ज्या काळामध्ये जगले त्यामधील सर्व नीतिमान संदेष्ट्यांना तुम्हीच ठार केले आहे.
\v 36 याविषयी विचार करा: तुम्हा लोकांनी माझ्या सेवा कार्याला आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, आणि देवच तुम्हाला त्या सर्व संदेष्ट्यांना ठार केल्याबद्दल शिक्षा देणार आहे!”
\s यरूशलेमेच्या भविताव्याबाबत येशूचे दुःखोद्गार
\s5
\p
\v 37 “अहो यरुशलेमेतील लोकांनो, देवाने ज्यांना पाठवले त्यांना धोंडमार करणाऱ्यांनो आणि फार पूर्वी संदेष्ट्यांना ठार करणाऱ्या लोकांनो. तुम्हाला सुरक्षा द्यावी म्हणून मी अनेकदा तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, जशी एखादी कोंबडी आपल्या लहान पिलांना आपल्या पखांखाली एकत्र करते तसेच मी अनेकदा केले आहे. परंतु मी तसे करावे अशी तुमची इच्छा नव्हती.
\v 38 म्हणून तुम्ही आता हे ऐका: तुमचे शहर आता एक ओसाड स्थान होणार आहे.
\v 39 तुम्ही हे आपल्या मनामध्ये लक्षपूर्वक बाळगा: मी जेव्हा पुन्हा परत येईन तेव्हाच मी तुमच्या दृष्टीस पडेन, तुम्ही त्यावेळेस माझ्याविषयी असे म्हणाल, “देवाच्या अधिकाराने येणाऱ्या ह्या मनुष्यावर देव खरोखर प्रसन्न झाला आहे.”
\s5
\c 24
\s मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्याविषयीचे येशूचे भविष्य
\p
\v 1 मग येशू मंदिराच्या अंगणातून निघून गेला. तो तेथून चालत जात असता, त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्या मंदिराची इमारत किती सुंदर आहे याविषयी ते त्याच्याशी बोलू लागले.
\v 2 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ज्या इमारती पाहत आहात त्याविषयी मला तुम्हाला सत्य सांगायचे आहे: एक सैन्य त्यांना पूर्णपणे नष्ट करणार आहे. या इमारतीवरील प्रत्येक दगड ते काढून फेकून देतील. एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही असे ते करतील.”
\s5
\p
\v 3 त्यानंतर, जेव्हा येशू जैतून डोंगराच्या उतारावर एकटाच बसला होता, शिष्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला विचारले, “मंदिराच्या इमारती सोबत त्या घटना केव्हा घडतील? आणि ह्या जगाचा अंत होणार आहे, आणि तू पुन्हा परत येणार आहेस हे दिसावे म्हणून कोणत्या गोष्टी घडणार आहेत?”
\p
\v 4 येशूने उत्तर दिले, “काय घडणार आहे याविषयी तुम्हाला कोणीही फसवू नये, याची खात्री बाळगा एवढेच मी तुम्हाला सांगेन!
\v 5 अनेक लोक येतील आणि तो मीच आहे असे तुम्हाला सांगतील. होय, ते खरोखर असे म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे, आणि ते अनेक लोकांना फसवतील.
\s5
\p
\v 6 जवळपासच्या युद्धांच्या बातम्या तुम्ही ऐकाल तसेच दूरवरच्या युद्धांविषयी ही तुमच्या कानावर बातमी पडेल, परंतु त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. ह्या गोष्टी घडणे अवश्यक आहे असे देवाने सांगितले हे तुम्ही सदैव लक्षात ठेवा. परंतु ह्या घटना घडतील, तेव्हा जगाचा अंत आला आहे असा त्याचा अर्थ होणार नाही!
\v 7 वेगवेगळ्या लोकांचे गट एकमेकांवर हल्ला करतील, आणि राजे एकमेकांवर चाल करून जाण्यासाठी आपापल्या सैन्याचे नेतृत्व करतील. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळ आणि भूमिकंप होतील.
\v 8 या सर्व गोष्टी अगोदर घडतील, परंतु एखादी स्त्री एका बाळाला जन्म देत असते तेव्हा तिच्या वेदनांची सुरूवात होते तशाच प्रकारे हे असेल.
\s5
\p
\v 9 यापेक्षा अधिक वाईट गोष्टी घडणार आहेत. जे लोक तुमचा विरोध करतात ते तुम्हाला ठार करावे व छळावे म्हणून धरून नेतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून वेगवेगळ्या गटातील लोक तुमचा तिरस्कार करतील.
\v 10 माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक देखील, त्यांचा छळ झाल्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणे बंद करतील. ते त्यांच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास घात करतील आणि एकमेकांचा तिरस्कार करतील.
\v 11 अनेक लोक ‘मी संदेष्टा आहे’ असे म्हणत येतील आणि मात्र ते खोटे बोलतील व त्यामुळे अनेक लोक फसवले जातील.
\s5
\p
\v 12 देवाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे, अनेक विश्वासणारे देखील एकमेकांवर प्रीती करणार नाहीत.
\v 13 परंतु जे विश्वासणारे त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवत राहतील, त्या सर्वांना देव तारेल.
\v 14 शिवाय, जगाच्या प्रत्येक भागामध्ये विश्वासणारे जातील आणि देव जगाच्या प्रत्येक भागातील लोकांवर राज्य करण्याची सुरूवात कशी करणार आहे, याविषयीच्या आनंदाच्या बातमीचा प्रचार करतील आणि ते सर्व लोक गटांपर्यंत ही बातमी नेतील. त्यानंतर जगाचा अंत येईल.”
\s5
\p
\v 15 “परंतु जगाचा अंत होण्याच्या अगोदर, पवित्र मंदिराला अशुद्ध करणारा आणि लोकांनी मंदिर सोडून द्यावे म्हणून कारणीभूत असणारा अमंगळ व्यक्ती मंदिरामध्ये उभा राहील. याविषयी दानिएल संदेष्टा फार पूर्वी बोलला होता आणि त्याने लिहूनही ठेवले होते. मी तुम्हाला इशारा देत आहे, म्हणून ह्याविषयी आता जो कोणी वाचत आहे त्याने याकडे विशेष लक्ष द्यावे.
\v 16 मंदिरामध्ये ही घटना घडतांना तुम्ही पाहाल, तेव्हा यहूदी या प्रांतात राहणाऱ्या सर्वांनी डोंगरांकडे पळून जावे!
\v 17 पळून जाण्या अगोदर आपल्या घरातून काही वस्तू घेण्यासाठी मैदानामधील लोकांनी पुन्हा आपल्या घरांकडे परत जाऊ नये.
\v 18 जे लोक शेतामध्ये काम करत असतील त्यांनी घरामधून आपली अंगरखे घेण्यासाठी परत फिरू नये.
\s5
\p
\v 19 त्या काळामध्ये ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांना किती कष्ट होतील, आणि ज्या लहान लेकरांना पाजणाऱ्या असतील त्यांना दुःख सहन करावे लागेल, कारण त्यांच्यासाठी तेथून पळून जाणे खरोखर अवघड होईल!
\v 20 प्रार्थना करा की तुमचे पळून जाणे हिवाळ्यामध्ये होऊ नये कारण तेव्हा प्रवास करणे तुम्हाला कठीण होईल, तसेच ही घटना शब्बाथ दिवशी विसाव्याच्या दिवशी घडू नये म्हणून प्रार्थना करा;
\v 21 कारण ह्या घटना घडतील तेव्हा लोकांना फार त्रासाला सामोरे जावे लागेल. देवाने हे जग निर्माण केले तेव्हापासून आतापर्यंत इतक्या मोठ्या संकटाचा सामना कोणालाही करावा लागला नाही, आणि पुढेही एवढे मोठे संकट कोणावर येणार नाही असे हे संकट असणार आहे.
\v 22 लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागेल याची वेळ जर देवाने कमी केली नसती, तर प्रत्येक जण मरण पावला असता, परंतु त्याने त्याची वेळ कमी करण्याचे ठरवले आहे कारण ज्या लोकांना त्याने निवडले आहे त्यांच्याविषयी त्याला काळजी वाटते.”
\s5
\p
\v 23-24 “त्यावेळेस लोक असे म्हणतील मी तो आहे, मी ख्रिस्त आहे, किंवा ते देवापासून आलेले खरे संदेष्टे आहेत असे म्हणत प्रकट होतील. ते वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह व चमत्कार करतील आणि अद्भुत गोष्टी करतील, जेणेकरून लोकांना फसवावे. देवाने निवडलेल्या तुम्हा लोकांनाही फसवावे म्हणून ते प्रयत्न करतील. म्हणून त्यावेळेस, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे! किंवा कुणी म्हणेल, ख्रिस्त तेथे आहे, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!
\v 25 ह्या गोष्टी घडण्याच्या अगोदरच मी यांच्याविषयी तुम्हाला इशारा देऊन ठेवला आहे हे तुम्ही विसरू नये.
\s5
\p
\v 26 जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या रानात आहे! तर तुम्ही तेथे जाऊ नका. तसेच, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या गुप्त खोली मध्ये आहे! तर तुम्ही त्या व्यक्तीवर देखील विश्वास ठेवू नये.
\v 27 कारण जेव्हा वीज चकाकते तेव्हा ती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व लोकांच्या दृष्टीस पडते, अगदी तशाच प्रकारे, जेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, परत येईन तेव्हा प्रत्येकजण मला पाहील.
\v 28 मी पुन्हा परतेन, तेव्हा ते सर्वांना स्पष्टपणे दिसणारे असेल; जेव्हा आपल्याला गिधाडे आकाशामध्ये फिरताना दिसतात, तेव्हा तेथे एखादा मेलेले जनावर असेल हे आपल्याला कळते तशाप्रमाणे हे होईल.”
\s5
\p
\v 29 “लोकांनी त्या दिवसांमध्ये संकटाचा सामना केल्यानंतर, संपूर्ण सृष्टी अंधकारमय होईल. सूर्य अंधकारमय होईल. चंद्र प्रकाश देणार नाही. तारे आकाशातून खाली पडतील. आणि देव आकाशाला हलवेल आणि सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणाहून हालतील.
\s5
\p
\v 30 त्यानंतर, मी, मनुष्याचा पुत्र, पुन्हा पृथ्वीवर परत येत आहे हे दर्शवणारे चिन्ह सर्वजणांना आकाशामध्ये दृष्टीस पडेल. तेव्हा सर्व लोकांच्या गटातील जे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ते विलाप करतील कारण देव त्यांना शिक्षा करणार आहे याविषयी ते घाबरलेले असतील. मी पृथ्वीवर परत येईन तेव्हा सामर्थ्याने व मोठ्या गौरवाने ढगांवर बसून परत येताना, मला म्हणजे, मनुष्याच्या पुत्राला ते पाहतील.
\v 31 मी स्वर्गातून माझ्या स्वर्गदूतांना पृथ्वीवर सगळीकडे पाठवेन. ते मोठ-मोठ्याने तुतारी वाजवतील. मग मी लोकांना निवडले आहे त्यांना ते संपूर्ण पृथ्वीवरून एकत्र करतील.”
\s जागृतीची आवश्यकता
\s5
\p
\v 32 “अंजिराचे झाड याप्रमाणे वाढते याविषयी असलेल्या बोधकथेतून काही गोष्टींचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अंजिराच्या एका झाडाच्या फांद्या नाजूक असतात आणि त्याला पालवी फुटण्यास सुरू होते, तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्हाला समजू लागते.
\v 33 त्याचप्रमाणे, मी तुम्हाला आता समजावून सांगितलेल्या सर्व गोष्टी घडतांना तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुम्हाला ही कळेल की माझे परत येणे जवळ आले आहे.
\s5
\p
\v 34 या गोष्टी लक्षात ठेवा: मी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या ज्या लोकांनी पाहिल्या ते मरण पावल्यानंतरच हे सगळे काही घडेल.
\v 35 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या निश्चितच घडतील ह्याची तुम्ही नक्की खात्री बाळगा. एकेदिवशी पृथ्वी आणि आकाश अदृश्य होईल, परंतु मी जे तुम्हाला सांगितले आहे ते नेहमीच खरे ठरेल.”
\s5
\p
\v 36 “परंतु मी ज्या गोष्टी घडतील असे तुम्हाला सांगितले आहे त्या घडण्याची वेळ मला, किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला, किंवा स्वर्गातील एखाद्या देवदूताला, तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. केवळ माझ्या पित्याला ते माहित आहे.
\s5
\p
\v 37-39 नोहा जिवंत असतांना जसे घडले तसेच ते असेल. महापूर येईपर्यंत, त्याच्यांसोबत काहीतरी वाईट होणार आहे याची जाणिव त्या लोकांना झाली नव्हती. ते नेहमीप्रमाणे जेवण करत होते आणि पीत होते. काही पुरूष लग्न करून घेत होते आणि आई-वडिल आपल्या मुलींचे लग्न पुरुषांसोबत करून देत होते. नोहा आणि त्याचे कुटूंब यांनी त्या मोठ्या नावेत प्रवेश केला त्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य निरंतर चालू होते. आणि त्यानंतर तो महापूर आला आणि जे त्या नावेत नव्हते त्या सर्वांना त्याने बुडवून टाकले. अगदी अशाच प्रकारे, जे अविश्वासणारे लोक मनुष्याचा पुत्र म्हणजे मी कधी येणार यांना माहिती नाही आणि ते मी येण्याची अपेक्षा ही करणार नाहीत.
\s5
\p
\v 40 मी परत येईन, तेव्हा मी सर्व लोकांना स्वर्गात वर घेऊन जाणार नाही. माझ्यावर ज्यांनी भरोसा ठेवला आहे केवळ त्यांनाच मी घेऊन जाईन. उदाहरणार्थ, दोन लोक एका शेतात असतील. त्यांच्यापैकी एकाला स्वर्गात वर घेतले जाईल आणि त्याच्या सोबतचा दुसरा व्यक्तीला येथे शिक्षा भोगण्यासाठी सोडून दिले जाईल.
\v 41 अशाच प्रकारे, एका जात्यावर दोन स्त्रिया दळत असतील. त्यापैकी एकीला स्वर्गात घेतले जाईल आणि दुसरीला सोडून दिले जाईल.
\v 42 म्हणून, तुमचा प्रभू म्हणजेच मी, या पृथ्वीवर कोणत्या दिवशी परत येणार हे तुम्हाला ठाऊक नाही, तर मी कोणत्याही वेळेस परत येऊ शकतो म्हणून तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे.
\s5
\p
\v 43 एका घराच्या मालकाला जर माहिती असले की दरोडेखोर रात्री कोणत्या क्षणी येतील, तर तो जागा राहिला असता आणि दरोडेखोरांना त्याने घर फोडू दिले नसते. अशाचप्रकारे, मी देखील एखाद्या चोरासारखा अनपेक्षित रीतीने येईन.
\v 44 मी परत येण्याची तुम्ही अपेक्षा करणार नाही त्यावेळेस मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर परत येईल म्हणून तुम्ही तयार असण्याची गरज आहे.”
\s विश्वासू दास व दृष्ट दास ह्यांचा दृष्टान्त
\s5
\p
\v 45 “प्रत्येक विश्वास योग्य आणि ज्ञानी सेवक कसा आहे ह्याविषयीचा विचार करा. घरमालकाने एका सेवकाकडे इतर सेवकांवर देखरेख करण्याची जबाबदारी दिली. त्यांना ठरलेल्या वेळेवर जेवण देण्याचे त्याने त्याला सांगितले. त्यानंतर तो एका दूरच्या प्रवासावर निघून गेला.
\v 46 जेव्हा घरमालक त्या प्रवासावरून परत येईल, तेव्हा जर दास तसे करताना त्याला आढळला तर घर मालक त्याच्यावर अतिशय प्रसन्न होईल.
\v 47 याविषयी विचार करा; घर मालक त्या एका दासाला त्याच्या सर्व मालमत्तेवर देखरेख ठेवणारा म्हणून नियुक्त करेल.
\s5
\p
\v 48 परंतु एखादा दुष्ट दास स्वतःशीच असे म्हणेल, ‘आता माझा मालक बराच काळासाठी परत येणार नाही त्याला जाऊन बराच वेळ झाला आहे. आणि मी काय करत आहे हे त्याला कळणार ही नाही.
\v 49 मग तो त्याच्या सोबतच्या इतर सेवकांना मारहाण करू लागेल. आणि तो खाईल व पिईल आणि जे पितात त्यांच्यासोबत राहील.
\v 50 तो सेवक अपेक्षा करणार नाही अशा वेळेस त्याचा घर मालक परत येईल.
\v 51 तो त्या सेवकाला अतिशय कठोर शिक्षा देईल आणि जेथे ढोंगी लोकांना ठेवले जाते तेथे तो त्याला ठेवेल. त्या ठिकाणी लोक रडतात आणि आपले दात खातात कारण तेथे त्यांना खूप जास्त वेदना होतात.”
\s5
\c 25
\s दहा कुमारींचा दुष्टान्त
\p
\v 1 येशूने त्याचे बोलणे पुढे सुरूच ठेवले, “मी स्वर्गातून एक राजा म्हणून परत येईन, तेव्हा ज्या दहा कुमारी एका लग्नाच्या मेजवानीसाठी गेल्या असता त्यांच्यासोबत जे घडले तशा प्रकारे होईल. त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिवे घ्यायचे होते आणि येणाऱ्या वराची वाट पाहायची होती.
\v 2 आता त्या दहापैकी पाच हुशार होत्या आणि पाच मुली मूर्ख होत्या.
\v 3 त्या पाच मूर्ख मुलींनी आपल्यासोबत दिवे तर घेतले, परंतु त्या दिव्यामध्ये घालण्यासाठी जास्तीचे जैतूनाचे तेल त्यांनी सोबत घेतले नव्हते.
\v 4 परंतु हुशार मुलींनी आपल्या सोबत नुसते दिवेच नाही घेतले तर त्या दिव्यात घालण्यासाठी तेलही एका भांड्यात ठेवले होते.
\s5
\p
\v 5 वराला येण्यासाठी खूप विलंब होत होता, आणि तो पर्यंत रात्रही झाली. त्यामुळे सर्व मुलींना झोप लागली आणि त्या झोपी गेल्या.
\v 6 मध्यरात्री कोणीतरी त्यांना ओरडून उठवले आणि म्हटले, ‘तो आला आहे! वर येथे पोहचला आहे! तुम्ही बाहेर जा आणि त्याची भेट घ्या!
\s5
\p
\v 7 म्हणून त्या सर्व मुली झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे पुन्हा पेटवले.
\v 8 मूर्ख मुली हुशार मुलींना म्हणाल्या, ‘आम्हाला तुमच्याकडील थोडे तेल द्या, कारण आमचे दिवे विजण्यास आले आहेत!
\v 9 त्या हुशार मुलींनी त्यांना प्रत्युत्तर दिले, ‘नाही, कारण आम्ही जर तुम्हाला ते दिले तर आमच्या दिव्यांसाठी व तुमच्या दिव्यांसाठी ते पुरेसे असणार नाही. म्हणून तुम्ही तेल विकणाऱ्यांकडे जा व स्वतःसाठी काही विकत घ्या!
\s5
\p
\v 10 परंतु त्या मूर्ख मुली तेल विकत घेण्यासाठी निघाल्या होत्या, त्या वेळेस वर आला. तेव्हा ज्या हुशार मुली तयार होत्या त्या त्याच्या सोबत विवाहाच्या सभागृहात गेल्या जेथे वधू वाट पाहात होती. त्यानंतर त्या सभागृहाचे दार बंद करण्यात आले.
\v 11 काही वेळाने, त्या बाकीच्या मूर्ख मुलीही विवाहाच्या सभास्थानी आल्या, आणि त्यांनी वराला हाक मारून म्हटले, ‘महाशय, आम्हासाठी दार उघडा!
\v 12 परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, ‘खरे पाहिले असता मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी दार उघडणार नाही!
\v 13 मग येशूने आपले बोलणे पुढे सुरू ठेवले आणि तो म्हणाला, “तुम्हा सोबतही असेच घडू नये म्हणून, मी परत येण्याची वाट पाहत राहा, कारण मी केव्हा परत येईन हे तुम्हाला ठाऊक नाही.”
\s रुपयांचा दुष्टान्त
\s5
\p
\v 14 “मी स्वर्गातून राजा म्हणून परत येईन, तेव्हा एखादा मनुष्य जो लांबच्या प्रवासासाठी निघतो त्याच्यासारख असेन. त्याने त्याच्या सेवकांना एकत्र बोलावले आणि आपल्या मालमत्तेतून त्यांच्यातील प्रत्येकाला काही पैसा दिला जो त्यांनी गुंतवणूक करायचा होता आणि त्याच्यासाठी त्यावर अधिक नफा मिळवायचा होता.
\v 15 त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याने त्यांना पैसा वाटून दिला. उदाहरणार्थ, त्याने एका सेवकाला सोन्याने भरलेल्या पाच थैल्या दिल्या आहे, दुसर्‍या एका सेवकाला त्याने सोन्याच्या दोन थैल्या दिल्या, आणि त्याच्या दुसऱ्या एका सेवकाला त्याने केवळ एकच सोन्याची थैली दिली, मग तो लांबच्या प्रवासासाठी निघून गेला.
\v 16 ज्या सेवकाला सोन्याच्या पाच थैल्या मिळाल्या होत्या त्या सेवकाने लागलेच निघून जाऊन त्याच्याद्वारे अधिक पाच थैल्या कमावल्या.
\s5
\p
\v 17 त्याच प्रकारे, ज्या सेवकाला सोन्याच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या त्यानेही त्यांच्यावर व्यापार करून आणखी दोन थैल्या कमावल्या.
\v 18 परंतु ज्या सेवकाला सोन्याची एकच थैली मिळाली होती तो बाहेर गेला, आणि त्याने जमिनीमध्ये एक खड्डा खणला, आणि ती थैली त्याने सुरक्षित राहावी म्हणून तेथे पुरून ठेवली.
\s5
\p
\v 19 बऱ्याच काळा नंतर त्यां सेवकांचा धनी परत आला. त्याने जो पैसा सेवकांना दिला होता त्यांचे त्या प्रत्येकाने काय केले हे समजून घेण्यासाठी त्याने त्यांना एकत्र बोलावले.
\v 20 ज्या सेवकाला त्याने पाच सोन्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याच्याकडे दहा थैल्या आणून दिल्या. तो म्हणाला, ‘स्वामी, तुम्ही माझ्याकडे पाच सोन्याच्या थैल्या सांभाळण्यासाठी दिल्या होत्या. पाहा, मी आणखी पाच कमावल्या आहेत!
\v 21 त्याच्या स्वामीने त्याला उत्तर दिले, ‘तू खूप चांगला सेवक आहेस! तू माझ्यासोबत विश्वासयोग्य राहिला आहेस. मी दिलेली ही लहान रक्कम तू खूप चांगल्या रीतीने हाताळली आहेस म्हणून मी तुला अधिक मोठ्या जबाबदारीवर नेमेन. ये आणि माझ्यासोबत आनंद कर!
\s5
\v 22 ज्या सेवकाला त्याने दोन सोन्याच्या थैल्या दिल्या होत्या, तो आला आणि त्याने म्हंटले स्वामी तुम्ही माझ्याकडे दोन सोन्याच्या थैल्या सांभाळण्यासाठी दिल्या होत्या. पाहा, मी आणखी दोन कमावल्या आहेत!
\v 23 त्याच्या स्वामीने त्याला उत्तर दिले, ‘तू खूप चांगला सेवक आहेस! तू माझ्यासोबत खूप विश्वास योग्यतेने वागला आहेस. ही लहानशी रक्कम तू खूप चांगल्या रीतीने हाताळली आहे म्हणून मी तुला मोठ्या जबाबदारीवर नेमेल. ये आणि माझ्यासोबत आनंद कर!
\s5
\p
\v 24 त्यानंतर ज्या सेवकाला सोन्याची केवळ एकच थैली मिळाली होती तो तेथे आला. तो म्हणाला, ‘स्वामी, मला तुमची भीती वाटत होती. एखाद्या शेतकऱ्याने एखादे शेत पेरले नसताही त्या शेतातून कापणीची अपेक्षा करावी तशा प्रकारे तुम्ही देखील कोणतीही गुंतवणूक न करता बर्‍याचशा पैशांची अपेक्षा करणारे व्यक्ती आहात हे मला ठाऊक आहे.
\v 25 तुम्ही मला गुंतवणूक करण्यासाठी जी रक्कम दिली होती ती गुंतवणूक केल्यानंतर जर मी ते पैसे गमावले तर तुम्ही काय कराल ह्याविषयी मला भीती वाटत होती म्हणून मी ते पैसे जमिनीत लपवून ठेवले. हे पाहा हे ते आहेत; कृपया हे परत घ्या!
\s5
\p
\v 26 त्याच्या स्वामीने प्रत्युत्तर दिले, ‘अरे दुष्ट, आळशी दासा! मी गुंतवणूक केली नसताही पैशांची अपेक्षा करतो हे तुला ठाऊक नव्हते काय?
\v 27 तर मग, तू माझे पैसे बँकेमध्ये जमा करायचे असते, म्हणजे जेव्हा मी परत आलो तेव्हा ते मला त्यावरील व्याजासहित परत मिळाले असते!
\s5
\p
\v 28 मग त्या स्वामीने त्याच्या इतर सेवकांना म्हटले, “त्याच्या जवळून ती सोन्याची थैली घ्या आणि ज्या सेवकाजवळ दहा थैल्या आहेत त्याला ती द्या!
\v 29 ज्या लोकांना प्राप्त झालेल्या गोष्टींचा उत्तम रीतीने उपयोग करता येतो, देव त्यांना अधिक देतो, आणि अशाने त्यांच्याकडे पुष्कळ होते. परंतु प्राप्त झालेल्या गोष्टींना जे लोक योग्य रीतीने उपयोगात आणत नाहीत त्यांच्याकडे जे असते तेही त्यांच्याकडून काढून घेतले जाते.
\v 30 एवढेच नव्हे तर, या निरुपयोगी दासाला बाहेर अंधारात टाकून द्या आणि तेथे तो त्यांच्यासारख्याच बरोबर विलाप करेल आणि वेदनेमध्ये आपले दात खाईल.’”
\s न्यायाचा दिवस
\s5
\p
\v 31 “मी, मनुष्याचा पुत्र परत येईन, तेव्हा मी माझ्या तेजस्वी गौरवाने आणि माझ्या सर्व देवदूतांच्यासोबत परत येईन. त्यानंतर सर्वांचा न्याय करण्यासाठी मी माझ्या सिंहासनावर राजा म्हणून विराजमान होईन.
\v 32 सर्व प्रकारच्या गटांतील सर्व लोकांना माझ्यासमोर एकत्रित केले जाईल. जसा एक मेंढपाळ त्याच्या कळपातील मेंढरांपासून बकऱ्या वेगळ्या करतो तसेच मी देखील लोकांना वेगवेगळे करीन.
\v 33 मी नीतिमान लोकांना माझ्या उजव्या हाताला आणि अनीतिमान लोकांना माझ्या डाव्या बाजूला जसे मेंढरे आणि बकरे वेगळे करतात तसे करीन.
\s5
\p
\v 34 जे माझ्या उजव्या बाजूस आहेत त्यांना मी असे म्हणेन, ‘तुम्ही लोक माझ्या पित्याद्वारे आशीर्वादित आहात! या आणि ज्या सर्व उत्तम गोष्टी तो तुम्हाला देत आहे त्या स्वीकारा कारण आतापासून सदासर्वकाळ तो तुम्हावर संपूर्णपणे राज्य करणार आहे या जगाच्या निर्मितीपासून त्याने त्या गोष्टी तुम्हासाठी उत्पन्न केल्या आहेत.
\v 35 ह्या गोष्टी तुमच्या आहेत, कारण जेव्हा मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काहीतरी खावयास दिले. मी जेव्हा तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. जेव्हा मी तुमच्या शहरांमध्ये परका होतो, तेव्हा तुम्ही मला तुमच्या घरांमध्ये राहण्यासाठी आमंत्रित केले.
\v 36 मला जेव्हा वस्त्रांची आवश्यकता होती, तेव्हा तुम्ही मला ते दिले. जेव्हा मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. जेव्हा मी तुरूंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी भेट घेण्यासाठी आला.
\s5
\p
\v 37 मग देवाने ज्यांना चांगले लोक म्हणून निवडले आहे ते लोक त्याला म्हणतील, ‘हे प्रभू, तू केव्हा भुकेला होता आणि आम्ही तुला काहीतरी खावयास दिले? आणि तू कधी तान्हेला होता आणि आम्ही तुला काहीतरी प्यावयास दिले?
\v 38 जेव्हा तुम्ही आमच्या शहरांमध्ये अनोळखी व्यक्ती म्हणून आसताना आम्ही तुला कधी आमच्या घरात आमंत्रित केले? तुला केव्हा वस्त्रांची गरज होती आणि आम्ही तुला कधी कपडे दिले?
\v 39 तू कधी आजारी होतास आणि कधी तुला तुरूंगात तुला टाकले व आम्ही येऊन तुझी भेट घेतली? तू सांगितलेल्या गोष्टीपैंकी कोणतीही गोष्ट केल्याची आम्हाला आठवण नाही.
\p
\v 40 तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, “तुम्ही तुमच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांसाठी ह्यापैकी कोणतीही गोष्ट केली असली आणि अतिशय कमी महत्वाचा लोकांसाठी जर ते केले असेल तर तुम्ही नक्कीच ते माझ्यासाठी केले आहे हे सत्य आहे.
\s5
\p
\v 41 परंतु जे माझ्या डावीकडे उभे असतील त्यांना मी असे म्हणणार, ‘देवाने तुम्हा लोकांना शापित केलेले आहे, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा! देवाने सैतानासाठी आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या सर्वकाळाच्या अग्नीमध्ये तुम्ही जा!
\v 42 तुम्ही तिथे जावे हे तुम्हा साठी योग्य आहे, कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खाण्यासाठी काहीही दिले नाही. मी जेव्हा तहानेला होतो तेव्हा तुम्ही माझी तहान भागवण्यासाठी मला काही प्यायला दिले नाही.
\v 43 तुमच्या शहरांमध्ये मी जेव्हा परका होतो तेव्हा तुम्ही मला तुमच्या घरामध्ये आमंत्रित केले नाही. मला गरज होती तेव्हा तुम्ही मला कपडे दिले नाही. मी आजारी होतो किंवा जेव्हा मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.
\s5
\p
\v 44 तेव्हा ते उत्तर देतील, ‘हे प्रभू, तू केव्हा भुकेला किंवा तहानेला किंवा अनोळखी परका किंवा वस्त्रांच्या गरजेत किंवा आजारी किंवा तुरूंगात होतास आणि आम्ही तुला मदत केली नाही?
\p
\v 45 मी त्यांना उत्तर देईन, ‘जेव्हा तुम्ही माझ्या लोकांपैकी अगदी लहानातील लहानापैकी कोणासाठीही ते केले नव्हते, तेव्हा वास्तविक पाहता तुम्ही ते माझ्यासाठी केले नव्हते.
\p
\v 46 त्यानंतर माझ्या डावीकडे उभे असणार्‍या त्या लोकांना देवाने त्यांना शिक्षा देण्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे सदासर्वकाळासाठी जावे लागेल, देवाच्या दृष्टीने जे लोक चांगले आहेत ते देवासोबत सदासर्वकाळ राहण्यासाठी जातील.
\s5
\c 26
\s येशूला ठार मारण्याचा कट
\p
\v 1 या सर्व गोष्टी सांगण्याचे येशूने समाप्त केल्यानंतर, तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
\v 2 “आतापासून दोन दिवसानंतर आपण वल्हांडणाचा सण साजरा करणार आहोत हे तुम्हाला माहीत आहे. त्या वेळेस मला, मनुष्याच्या पुत्राला, जे मला वधस्तंभावर खिळणार आहेत त्यांच्या हातात धरून देतील.”
\s5
\p
\v 3 त्याच वेळेस मुख्य याजक आणि यहूदी वडील मंडळ हे महान याजक कयफा ह्याच्या घरी जमले होते.
\v 4 येशूला एखाद्या कोड्यामध्ये अडकवून कशी अटक करावी याची ते योजना करत होते जेणेकरून त्यांना त्याला ठार करता आले असते.
\v 5 परंतु ते म्हणाले, “वल्हांडणाच्या सणाच्या दिवसांमध्ये आपण ते करू नये, जर आपण तसे केले, तर लोक कदाचित दंगल करतील.”
\s बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
\s5
\p
\v 6 येशू आणि त्याचे शिष्य बेथानी नावाच्या एका खेड्यात असता, येशूने ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते, त्या शिमोनाच्या घरी जेवत होते.
\v 7 ते जेवण करत असता, तेथे घरात एक स्त्री आली. दगडांनी बनवलेल्या एका बाटलीमध्ये अतिशय मोलवान अत्तर घेऊन ती तेथे आली होती. येशू जेवण करत असतांना ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या डोक्यावर तिने ते पूर्ण अत्तर ओतून टाकले.
\v 8 जेव्हा शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यापैकी एक जण म्हणाला, “हे अत्तर असे वाया घालवणे अतिशय वाईट आहे!
\v 9 आम्ही ते विकले असते आणि त्यामुळे भरपूर पैसे मिळवले असते! मग आम्ही तो पैसा गरीब लोकांना दिला असता.”
\s5
\p
\v 10 ते काय बोलत आहेत हे येशूला माहीती होते, म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या स्त्रीला अजिबात त्रास देऊ नये! तिने माझ्यासाठी एक अतिशय सुंदर कार्य केले आहे.
\v 11 गरीब लोक तुम्हामध्ये तर नेहमीच असणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला त्यांना मदत करावीशी वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. परंतु मी नेहमीकरीता तुम्हासोबत राहणार नाही!
\s5
\p
\v 12 तिने हे अत्तर माझ्या शरीरावर ओतले, तेव्हा मी लवकरच मरणार आहे हे तिला माहिती झाल्यासारखे वाटले. आणि मला पुरले जाण्याच्या आधी तिने माझ्या शरीराला अभिषेक केल्याप्रमाणे ते झाले.
\v 13 मी तुम्हाला हे सांगतो: माझ्याविषयी संपूर्ण जगामध्ये लोक जेथे कोठे सुवार्ता सांगतील, तेथे ह्या स्त्रीने माझ्यासाठी जे काही केले त्याविषयी ही ते सांगतील, आणि अशा रीतीने लोक नेहमी तिची आठवण करतील.”
\s यहूदाची फितुरी
\s5
\p
\v 14 त्या बारा शिष्यांपैकी एक असून देखील, यहूदा इस्कर्योत, त्या मुख्य याजकांकडे गेला.
\v 15 त्याने त्यांना विचारले, “मी येशूला अटक करण्यास मदत केली. तर त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला किती पैसे देण्यास तयार व्हाल?” त्याला चांदीच्या तीस मोहरा देण्याचे त्यांनी कबूल केले. मग त्यांनी त्या मोहरांना मोजले आणि त्याला त्या देऊन टाकल्या.
\v 16 त्यावेळेपासून येशूला अटक करण्याची संधी यहूदा शोधू लागला.
\s शेवटले भोजन
\s5
\p
\v 17 एक आठवडाभर चालणाऱ्या खमिर न टाकता तयार केलेल्या भाकरीच्या सणाच्या पहिल्याच दिवशी, शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत भोजन करावे म्हणून वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी त्याचे जेवण कुठे करावे अशी तुझी इच्छा आहे?”
\v 18 येशूने त्याच्या दोन शिष्यांना काय करावे याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या. तो त्यांना म्हणाला, “शहरामधील मी एका मनुष्यासोबत या अगोदरच योजना आखली आहे. तुम्ही त्याच्याकडे जा. त्याला जाऊन असे सांगा: गुरुजी असे म्हणतात, ‘मी तुला ज्या वेळेविषयी सांगितले होते ती वेळ आता जवळ आली आहे. मी तुझ्या घरी माझ्या शिष्यांसोबत वल्हांडणाचे जेवण करून तो सण साजरा करणार आहे, आणि ते भोजन तयार करण्यासाठी मी ह्या दोघांना तुझ्याकडे पाठवले आहे.’”
\v 19 म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे त्या दोन शिष्यांनी तसेच केले. त्या मनुष्याच्या घरी जाऊन त्या दोघांनी वल्हांडणाचे भोजन तयार केले.
\s5
\p
\v 20 मग ती संध्याकाळ आल्यानंतर, येशू त्याच्या बारा शिष्यांसोबत जेवण करत होता.
\v 21 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका: माझ्या शत्रूंनी मला धरावे यासाठी तुमच्या पैकी एक जण त्यांना मदत करणार आहे.”
\v 22 शिष्य अतिशय उदास झाले. ते त्याला म्हणू लागले, ते एकानंतर एक त्याच्याशी बोलले, “प्रभू, मी तो नक्कीच नाही!”
\s5
\p
\v 23 त्याने त्याला उत्तर दिले, “माझ्यासोबत जो भाजीच्या ताटामध्ये जो भाकर बुचकळत आहे. तोच मला माझ्या शत्रूंनी अटक करावी म्हणून मदत करावी आणि तो तुम्हापैकीच एक आहे.
\v 24 माझ्याविषयी शास्त्रलेख जे सांगतात तसे घडावे म्हणून, मनुष्याचा पुत्र, म्हणजे मी नक्कीच ठार केला जाईन. परंतु जो पुरुष माझ्या शत्रूंना मला अटक करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यासाठी भयंकर शिक्षा वाट पाहात आहे! त्या पुरुषाने कधी जन्म घेतला नसता तर ते त्याच्यासाठी कितीतरी बरे झाले असते!”
\v 25 त्याला जो धोका देणार होता, तो यहूदा त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी तर तो नक्कीच नाही!” येशूने त्याला उत्तर दिले, “होय, तूच तो आहेस.”
\s5
\p
\v 26 ते जेवण करत असतांना, येशूने भाकरीचा एक लहान तुकडा घेतला आणि त्याच्याबद्दल देवाचे आभार मानले. त्याने ती भाकर मोडली, आणि ते तुकडे शिष्यांना दिले, आणि तो म्हणाला, “ही भाकर घ्या आणि ती खा. हे माझे शरीर आहे.”
\s5
\p
\v 27 त्यानंतर त्याने द्राक्षरसाचा एक प्याला घेतला आणि त्याच्यासाठी देवाचे आभार मानले. मग त्याने तो त्यांना दिला आणि तो म्हणाला, “तुम्ही सर्व या प्यालातून प्या.
\v 28 ह्या प्याल्यातील द्राक्षरस माझे रक्त आहे ते माझ्या शरीरातून लवकरच वाहीले जाईल. अनेक लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी देव जो नवा करार करणार आहे त्याचे चिन्ह म्हणजे हे रक्त आहे.
\v 29 तुम्ही ह्याची काळजीपूर्वक नोंद घ्या: हा द्राक्षरस एका नव्या अर्थाने पिण्याची वेळ येईपर्यंत मी यानंतर कधीही अशाप्रकारे द्राक्षरस पिणार नाही. माझा पिता सर्वांवर राज्य करत आहे हे प्रगट करेल त्याच वेळेस हे घडेल.”
\s शिष्य आपल्याला सोडून जातील ह्याबाबत येशूचे भविष्य
\s5
\p
\v 30 त्यानंतर त्यांनी एक गीत गायले, आणि मग ते जैतूनाच्या डोंगराकडे चालत गेले.
\p
\v 31 तेथे जात असतांना, येशूने त्यांना सांगितले, “माझ्यासोबत जे घडणार आहे त्यामुळे तुम्हापैकी प्रत्येक जण आज रात्री मला सोडून देईल! हे नक्कीच घडणार आहे कारण देवाने बोललेले हे शब्द शास्त्र लेखामध्ये लिहिलेले आहेत:
\q ‘मनुष्याने मेंढपाळाला ठार करावे असे मी होऊ देईन,
\q आणि ते सर्व मेंढरांची दाणादाण करतील.
\v 32 परंतु मी मरण पावल्यावर आणि पुन्हा जिवंत झाल्यानंतर, मी तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटणार.”
\s5
\p
\v 33 पेत्राने उत्तर दिले, “तुझ्यासोबत जे काही घडणार आहे ते पाहून कदाचित सर्व शिष्य तुला सोडून देतील, परंतु मी तुला नक्कीच कधीही सोडणार नाही!”
\v 34 येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हटले, “आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस, असे तीन वेळेस तू म्हणशील हे सत्य आहे!”
\v 35 पेत्र त्याला म्हणाला, “मी तुझा बचाव करत असतांना त्यांनी मला ठार जरी केले, तरी मी तुला ओळखत नाही असे कधीही म्हणणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही असेच म्हटले.
\s गेथशेमाने बागेत येशू
\s5
\p
\v 36 त्यानंतर गेथशेमाने नावाच्या एका ठिकाणावर येशू आपल्या शिष्यांसोबत पोहोंचला. तेथे तो म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करतो तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा.”
\v 37 त्याने आपल्या सोबत, पेत्र, याकोब, आणि योहानाला घेतले आणि तो अतिशय चिंताक्रात झाला व कळवळला.
\v 38 त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “मी अतिशय दुःखी आहे, इतका की मी जणुकाय मरावयास टेकलो आहे असे मला वाटते! तुम्ही येथे थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”
\s5
\p
\v 39 मग आणखी थोडे पुढे जाऊन, तो जमिनीवर उपडा पडला. त्याने प्रार्थना केली, “हे पित्या, ज्याप्रकारे मला दुःख सहन करावे लागणार आहे, तुला शक्य असल्यास मला ते दुःख सहन करावे लागू देऊ नकोस. परंतु माझ्या इच्छेप्रमाणे करू नकोस. त्याऐवजी, जशी तुझी इच्छा आहे तसे कर!”
\v 40 मग तो त्या तीन शिष्यांकडे परत आला आणि ते त्याला झोपलेले आहेत असे दिसले. त्याने पेत्राला जागे केले आणि त्याला तो म्हणाला, “तुम्ही पुरूष झोपी गेलात हे पाहून मी निराश झालो आहे, तुम्हाला माझ्यासोबत थोडावेळ देखील जागे राहता आले नाही!
\v 41 कोणी तुम्हाला पापात पाडण्यासाठी तुम्हाला मोहात पाडावे अशा वेळेस तुम्ही त्याचा विरोध करावा म्हणून तुम्ही जागे राहून प्रार्थना करणे आवश्यक आहे.”
\s5
\p
\v 42 मग तो दुसऱ्यांदा तेथे गेला. त्याने प्रार्थना केली, “माझ्या पित्या, जर मी दुःख सहन करणे अवश्य आहे, तर जे काही घडावे अशी तुझी इच्छा आहे ते घडू दे!”
\p
\v 43 जेव्हा तो त्या तीन शिष्यांकडे परत आला, त्याने पाहिले की ते पुन्हा झोपलेले होते. त्यांच्याने झोप आवरणे अशक्य झाले होते.
\v 44 म्हणून त्यांने त्यांना सोडून दिले आणि तो पुन्हा परत गेला. त्याने तिसऱ्यांदा प्रार्थना केली, त्याने आधी म्हटले तशाच प्रकारे पुन्हा प्रार्थनेमध्ये म्हटले.
\s5
\p
\v 45 मग तो इतर सर्व शिष्यांकडे परत आला. त्याने त्यांना जागे केले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आता ही झोपलेले आहात आणि आराम करत आहा हे पाहून मी निराश होत आहे! पाहा! पापी लोकांनी मनुष्याच्या पुत्राला अटक करावी यासाठी कोणीतरी त्यांना मदत करत आहे!
\v 46 तर उठा! आपण जाऊन त्यांना भेटूया! मला अटक करण्यासाठी त्यांना मदत करणारा जवळ येऊन पोहचला आहे!”
\s येशूला अटक
\s5
\p
\v 47 येशू हे बोलत असतांना, यहूदा तेथे येऊन पोहचला. तो त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असूनही, येशूच्या शत्रूंना येशूला अटक करावी यासाठी त्याने त्यांना मदत केली. तलवारी आणि भाले घेऊन एक मोठा समुदाय त्याच्यासोबत होता. वडिलांनी आणि मुख्ययाजकांनी त्यांना तेथे पाठवले होते.
\v 48 यहूदाने अगोदरच त्यांना एक इशारा निश्चित करून ठेवला होता. त्याने त्यांना असे सांगितले होते की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच मनुष्य तुम्हास हवा आहे. त्याला अटक करा!”
\s5
\p
\v 49 तो लगेचच येशूकडे गेला आणि त्याला म्हणाला, “गुरूजी, अभिवादन!” आणि मग त्याने येशूचे चुंबन घेतले.
\v 50 येशूने उत्तर दिले, “मित्रा, तू जे काही करण्याचे ठरवले आहे, ते लवकर कर.” मग यहूदासोबत जे लोक आले होते ते पुढे आले आणि त्यांनी येशूला पकडले.
\s5
\p
\v 51 तेव्हा अचानक, येशूसोबत असलेल्या पुरूष्यांपैकी एकाने आपल्या म्यानातून तलवार काढली आणि मुख्य याजकाच्या एका सेवकावर त्याला ठार करण्यासाठी त्याने वार केला, परंतु त्या सेवकाचा केवळ कानच कापला गेला.
\v 52 येशू त्याला म्हणाला, “तू आपली तलवार तिच्या म्यानात परत घाल! जे इतरांना तलवारीने ठार करू इच्छितात, इतर कोणीतरी त्या व्यक्तीला देखील तलवारीने ठार करेल!
\v 53 तुम्हाला काय वाटते मी जर माझ्या पित्याला विनंती केली तर तो माझ्यासाठी देवदूतांच्या सैन्याच्या बारा तुकड्यांना लगेचच पाठवून देणार नाही काय?
\v 54 परंतु जर मी तसे केले, तर संदेष्ट्यांनी शास्त्र लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे मसीहा सोबत जे काही घडणार आहे ते परिपूर्ण होणार नाही.”
\s5
\p
\v 55 जे लोक येशूला धरण्यासाठी आले होते, त्यांना येशू त्यावेळेस म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि भाले घेऊन मला धरण्यासाठी आला आहात हे किती आश्चर्यकारक आहे, एखाद्या दरोडेखोराला धरायला यावेत तसे तुम्ही आला आहात! तुमच्या मंदिराच्या अंगणामध्ये दररोज मी बसलेलो असायचो आणि लोकांना शिकवत असे. तुम्ही मला तेव्हा का अटक केली नाही?
\v 56 परंतु माझ्याविषयी शास्त्र लेखामध्ये संदेष्ट्यांनी लिहिलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी हे केवळ घडत आहे.” मग येशूच्या सर्व शिष्यांनी येशूला सोडून दिले आणि ते तेथून पळून गेले.
\s प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी
\s5
\p
\v 57 मुख्य याजक कयफा ज्या ठिकाणी राहत होता त्या घरात ज्यांनी येशूला अटक केली होती ते त्याला घेऊन गेले. यहूदी नियम शिकवणारे पुरूष आणि यहूद्यांमधील वडील अगोदर पासूनच तेथे एकत्रित झालेले होते.
\v 58 पेत्र दुरवरून येशूच्या मागे मागे चालत होता. मुख्य याजकाच्या घराच्या अंगणामध्ये पेत्र आला. त्याने अंगणामध्ये प्रवेश केला आणि रक्षकांच्या सोबत तो बसला आणि काय घडत आहे ते पाहू लागला.
\s5
\p
\v 59 येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून मुख्य याजक आणि यहूद्यांच्या धर्म सभेतील इतर लोक अशा लोकांचा शोध घेत होते जे त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देतील.
\v 60 परंतु अनेक लोकांनी त्याची खोटी साक्ष देऊन देखील त्यांना असा कोणी सापडला नाही जो उपयोगी साक्ष देऊ शकेल. शेवटी दोन पुरूष समोर आले आणि म्हणाले,
\v 61 “ह्या मनुष्याने म्हटले आहे की, ‘मी देवाच्या मंदिराचा नाश करण्यास आणि तीन दिवसात ते पुन्हा उभारण्यास समर्थ आहे.’”
\s5
\p
\v 62 मग मुख्य याजक उभा राहिला आणि येशूला म्हणाला, “तू ह्यांना प्रत्युत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर ज्या गोष्टींचा आरोप लावत आहेत त्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?”
\v 63 परंतु येशू शांत राहिला. मग मुख्य याजक त्याला म्हणाला, “मी तुला आज्ञा करतो की तू मला सत्य सांगावे; सर्वसमर्थ देव तुझे ऐकत आहे हे तुला ठाऊक आहे: तू देवाचा पुत्र, ख्रिस्त आहेस काय?”
\v 64 येशूने उत्तर दिले, “होय, तू म्हणतो ते तसेच आहे. परंतु मी तुम्हा सर्वांना हे देखील सांगतो: तुम्ही मला, मनुष्याच्या पुत्राला, एके दिवशी सर्वसमर्थ देवाच्या बाजूला बसून अधिकार करत असतांना पाहणार आहात. तसेच स्वर्गातून ढगांवर बसून येत असतांना मी तुम्हाला दिसणार आहे!”
\s5
\p
\v 65 ह्यामुळे मुख्य याजक एवढा व्यथीत झाला की त्याने आपला अंगरखा फाडला. मग तो म्हणाला, “ह्या मनुष्याने देवाचा अपमान केला आहे! तो देवाच्या समान आहे असा स्वतःविषयी दावा करतो! आता ह्या मनुष्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी आम्हाला आणखी कोणाची गरज नाही! त्याने काय म्हटले ते तुम्ही ऐकले आहे!
\v 66 तुम्हाला ह्याविषयी काय वाटते?” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आमच्या नियमांप्रमाणे, हा दोषी ठरला आहे आणि ह्याला मृत्युदंड देण्यात यावा!”
\s5
\p
\v 67 मग त्यांच्यापैकी काही लोक त्याच्या तोंडावर थुंकले. आणि इतर लोकांनी त्याला बुक्कयांनी मारहाण केली. इतर अनेकांनी त्याला चापटा मारल्या;
\v 68 आणि ते म्हणाले, “तू ख्रिस्त असल्याचा दावा करतोस, म्हणून तुला कोणी मारले ते आम्हास सांग!”
\s पेत्र येशूला नाकारतो
\s5
\p
\v 69 पेत्र बाहेर अंगणामध्ये बसला होता. तेथील एक दासी त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला पाहिले. ती म्हणाली, “गालील जिल्ह्यातील तो मनुष्य येशू, त्याच्यासोबत तू देखील होतास !”
\v 70 परंतु सगळेजण हे संभाषण ऐकत असतांना, त्याने तिचे म्हणणे नाकारले. तो म्हणाला, “तू कशाविषयी बोलत आहेस हे मला ठाऊक नाही!”
\s5
\p
\v 71 मग तो घराच्या अंगणातून निघून बाहेरील दाराजवळ गेला. दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांना ती म्हणाली, “नासरेथाहून आलेला तो मनुष्य येशू याच्यासोबत हाही मनुष्य होता.”
\v 72 परंतु पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला. तो म्हणाला, “मी जर खोटा बोलत असेल तर परमेश्वर मला शिक्षा देवो! मी तर तुम्हाला सांगतो, मी तर त्या मनुष्याला ओळखत देखील नाही!” मग पेत्र अंगणात बाहेर आला त्याने जे केले त्याबद्दल दुःख झाले आणि तो रडला.
\s5
\p
\v 73 आणखी थोड्या वेळानंतर, जे लोक तेथे उभे होते ते पेत्राच्या जवळ आले, आणि ते त्याला म्हणाले, “आम्हाला नक्कीच खात्री आहे की तू देखील त्या मनुष्यासोबत होतास . तुझ्या बोलण्याच्या शैलीवरून आम्ही ओळखू शकतो की तू देखील गालीलाचा आहेस.”
\v 74 मग पेत्र मोठमोठ्याने असे बोलू लागला की जर तो खोटा बोलत असेल तर देव त्याला शाप देईल. तो खरे सांगत आहे ह्याचा साक्षीदार म्हणून त्याने देवाला स्वर्गातून साक्ष देण्याची विनंती केली आणि तो म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!” आणि लगेचच कोंबडा आरवला.
\v 75 मग येशूने त्याच्याशी बोललेले होते ते पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस असे तू म्हणशील.” मग पेत्र अंगणातून बाहेर आला, आणि त्याने जे केले त्याबद्दल त्याला दुःख झाले म्हणून तो फार रडला.
\s5
\c 27
\s रोमी सुभेदार पिलात ह्याच्यासमोर येशू
\p
\v 1 येशूचा वध करण्यासाठी रोमन शासनाला कसे पटवून द्यावे यासाठी मोठ्या पहाटे सर्वच मुख्य याजकांनी आणि यहूदी वडिलांनी याचा निर्णय घेतला.
\v 2 मग त्यांनी त्याचे हात बांधले आणि ते त्याला रोमी राज्यपाल पिलात याच्याकडे घेऊन गेले.
\s यहूदाचा मुत्यू
\s5
\p
\v 3 मग यहूदा, ज्याने येशूचा विश्वासघात केला होता, त्याला हे जाणवले की त्यांनी येशूला ठार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्याने जे काही केले होते त्याविषयी आपले मन बदलले. त्याने ती चांदीची तीस मोहरे घेतली आणि पुन्हा त्या सर्व मुख्य याजकांकडे आणि वडिलांकडे गेला.
\v 4 तो म्हणाला, “मी पाप केले आहे. मी एका निर्दोष मनुष्याला विश्वासघाताने पकडून दिले आहे.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “त्याच्याशी आमचे काही घेणे देणे नाही! ही तुझी समस्या आहे!”
\v 5 म्हणून यहूदाने ते पैसे घेतले आणि मंदिराच्या अंगणामध्ये ते फेकून दिले. मग तो तेथून निघून गेला आणि त्याने जाऊन स्वतःला गळफास लावून घेतला.
\s5
\p
\v 6 नंतर त्या मुख्य याजकांना ते मोहरे सापडली. त्यांनी ती सगळी गोळा केली आणि ते म्हणाले, “एखाद्या मनुष्याने मरावे म्हणून आम्ही हा पैसा दिला होता, आणि आमच्या नियम शास्त्राप्रमाणे मंदिराच्या खजिन्यात हा पैसा टाकावा याची आम्हाला परवानगी नाही.”
\v 7 म्हणून त्यांनी त्या पैशाचा उपयोग एक शेत विकत घेण्यासाठी केला त्या शेताचे नाव कुंभाराचे शेत असे होते. यरुशलेममध्ये जे अनोळखी लोक मरण पावत होते त्यांना पुरण्याच्या जागेसाठी म्हणून त्यांनी त्या शेताचा उपयोग केला.
\v 8 म्हणून त्या शेताला आजच्या दिवसापर्यंत “रक्ताचे शेत” असे म्हटले जाते.
\s5
\p
\v 9 यिर्मया संदेष्ट्याने फार पूर्वी जे शब्द लिहून ठेवले होते, ते त्यांच्या या शेताच्या विकत घेण्यामुळे खरे ठरले: “त्यांनी तीस चांदीच्या मोहरा घेतल्या त्याची किंमत इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या नजरेमध्ये एवढीच होती.
\v 10 आणि त्या पैशाने त्यांनी एक कुंभाराचे शेत विकत घेतले. प्रभूने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी तसे केले.”
\s येशूची चौकशी
\s5
\p
\v 11 मग येशू त्या राज्यपालाच्या समोर जाऊन उभा राहिला. राज्यपालाने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहे असे तू म्हणतोस का?” येशूने त्याला उत्तर दिले, “होय, तू जे आताच बोलला त्याप्रमाणे ते आहे.”
\p
\v 12 परंतु जेव्हा मुख्य याजकांनी आणि इतर वडिलांनी येशूवर वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याचा आरोप ठेवला तेव्हा त्याने त्यांना कसल्याही प्रकारे उत्तर दिले नाही.
\v 13 म्हणून पिलाताने त्याला म्हटले, “ते तुझ्यावर कसल्या प्रकारचे आरोप लावतात ते तुला ऐकू येते काय? त्यांना कोणतेही प्रत्युत्तर देणार नाहीस काय?”
\v 14 परंतु येशूने काहीही म्हटले नाही. ते त्याच्यावर ज्या सर्व गोष्टींचा आरोप करत होते त्यापैकी कुठल्याही दोषाला त्याने उत्तर दिले नाही. यामुळे राज्यपालाला खूप आश्चर्य वाटले.
\s5
\p
\v 15 वल्हांडणाचा सण साजरा करण्याच्या दिवसांमध्ये राज्यपालाची अशी रीत होती की तुरूंगात अटक केलेल्या एका व्यक्तीला तो सुटका देत असे. लोक ज्याच्याविषयी विनंती करत असत त्या व्यक्तीला तो सुटका देत असे.
\v 16 त्यावेळेस यरुशलेमेमध्ये एक प्रसिद्ध असा कैदी होता त्याचे नाव बरब्बा असे होते.
\s5
\p
\v 17 म्हणून जेव्हा लोकांची गर्दी जमा झाली, पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणता कैदी सोडू असे तुम्हाला वाटते: बरब्बाला, किंवा ज्याला तुम्ही ख्रिस्त म्हणता त्या येशूला?”
\v 18 त्याने त्यांना असा प्रश्न विचारला कारण मुख्य याजकांनी येशूला त्याच्याकडे आणले होते यामागे ते येशूविषयी मत्सर करत होते अशी जाणीव राज्यपालास झाली होती. आणि पिलाताला असे वाटले की कदाचित लोक येशूला सोडविण्यासाठी प्राधान्य देतील.
\p
\v 19 पिलात न्यायासणाच्या सिंहासनावर बसलेला असतांना, त्याच्या पत्नीने त्याच्याकडे एक संदेश पाठवला: “ह्या मनुष्यामुळे आज मोठ्या पहाटेस मला एक विचित्र स्वप्न पडले आहे. म्हणून तू त्या नीतिमान मनुष्याला दोषी ठरवू नकोस, व मृत्युदंड देऊ नको!”
\s5
\p
\v 20 परंतु मुख्य याजकांनी आणि वडिलांनी पिलाताने बरब्बाला सोडावे, आणि येशूला ठार करण्याची आज्ञा द्यावी असे लोकांचे मन वळवले.
\v 21 म्हणून राज्यपालाने त्यांना विचारले, “तुम्हासाठी मी या दोन पुरुषांपैकी कोणाला सोडावे?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बरब्बा!”
\v 22 हे ऐकून पिलात आश्चर्यचकित झाला, आणि त्याने विचारले, “तुम्हापैकी काही लोक ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशू विषयी मी काय करावे?” त्या सर्वांनी त्याला उत्तर दिले, “तुझ्या सैनिकांनी त्याला वधस्तंभावर खिळावे अशी त्यांना आज्ञा कर!”
\s5
\p
\v 23 पिलाताने उत्तर दिले, “का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?” परंतु ते अधिकच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर द्या!”
\p
\v 24 पिलातालाही जाणीव झाली की त्याच्याने काही साध्य होत नव्हते. त्याच्या हे लक्षात आले की लोक दंगल करण्यास सुरवात करत होते. म्हणून त्याने पाण्याने भरलेले एक पात्र घेतले आणि गर्दी त्याच्याकडे पाहत असतांना त्याने आपले हात धुतले. तो म्हणाला, “मी माझे हात धुण्यावरून तुम्हाला हे दाखवून देत आहे की, जर हा मनुष्य मेला, तर तो माझा दोष नाही!”
\s5
\p
\v 25 आणि सर्व लोकांनी त्याला उत्तर दिले, “त्याच्या मरणासाठी आम्ही दोषी ठरू आणि आमचे मूलबाळ देखील दोषी ठरावेत!”
\v 26 मग त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडावे अशी त्याने त्याच्या सैनिकांना आज्ञा दिली. परंतु त्यांनी येशूला फटके मारावे अशी त्याने सैनिकांना आज्ञा दिली. आणि मग त्याने येशूला त्याच्या सैनिकांच्या हातात दिले ते येशूला वधस्तंभावर खिळणार होते.
\s येशूला वधस्तंभावर खिळतात
\s5
\p
\v 27 राज्यपालाच्या सैनिकांनी येशूला धरले आणि सैनिकांच्या बराकीमध्ये नेले. तेथे त्याच्याभोवती सैनिकांची संपूर्ण तुकडी जमा झाली.
\v 28 त्यांनी त्याचे कपडे ओढून काढले, आणि तो राजा असल्यासारखे ते त्याच्यासमोर नाटक करू लागले, आणि त्यांनी त्याच्यावर लाल रंगाचे एक राजकीय वस्त्र पांघरले.
\v 29 त्यांनी काटे असलेल्या काही झाडांच्या फांद्या घेतल्या आणि त्यांना एकत्र गुंफून त्यांनी त्याचा एक मुकूट तयार केला व तो त्यांनी त्याच्या डोक्यावर ठेवला. त्यांनी त्याच्या उजव्या हातामध्ये राजाच्या हातात असते तशी एक राजदंड सारखी काठी त्याच्या हातात दिली. आणि मग त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आणि असे म्हणून त्याची थट्टा उडवली, “हे यहूदाच्या राजा तू चिरायू असो!”
\s5
\p
\v 30 ते त्याच्यावर थुकंत राहिले. त्यांनी काठी घेतली आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर मारले.
\v 31 त्यांनी त्याची थट्टा करणे थांबवल्यावर, त्याच्या अंगावर घातलेले वस्त्र त्यांनी काढून घेतले आणि त्याचे कपडे त्यांनी त्याला पुन्हा घातले. मग ज्या ठिकाणी ते त्याला वधस्तंभावर खिळणार होते त्या ठिकाणाकडे ते त्याला घेऊन जाऊ लागले.
\s5
\p
\v 32 येशूने त्याचा वधस्तंभ थोडे अंतर घेऊन गेल्यानंतर, शिमोन नावाचा एक मनुष्य सैनिकांच्या दृष्टीस पडला, तो कुरेने नावाच्या शहरातील होता. त्याने येशूचा वधस्तंभ उचलून न्यावा अशी सैनिकांनी त्याच्यावर जबरदस्ती केली.
\v 33 गुलगुथा नावाच्या एका ठिकाणावर ते आले. या नावाचा अर्थ ‘कवटी सारखी एक जागा. असा होतो.
\v 34 ते तेथे पोहचले, तेव्हा त्यांनी द्राक्षरसामध्ये अतिशय कडू अशा चवीचा एक पदार्थ मिसळला. येशूला वधस्तंभावर खिळत असतांना त्याला जास्त वेदना होऊ नये म्हणून त्यांनी तो येशूला पिण्यासाठी दिला. परंतु त्याची चव घेतल्यावर त्याने तो पिण्यास नकार दिला. काही सैनिकांनी त्याचे कपडे घेतले.
\s5
\p
\v 35 मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. त्यानंतर, येशूच्या वस्त्राचा कोणता भाग कोणाला मिळावा हे ठरवण्यासाठी त्यांनी आपआपसामध्ये चिठ्ठ्या टाकल्यासारखा एक खेळ खेळला आणि त्याची वस्त्रे त्यांनी आपसात वाटून घेतली.
\v 36 मग सैनिक तेथे त्याचे रक्षण करण्यासाठी बसले, कोणी येऊन त्याला तेथून काढून घेऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी थांबले होते.
\v 37 ते येशूला वधस्तंभावर का खिळत होते ह्याचे कारण लिहिलेली एक पाटी त्यांनी येशूच्या वर वधस्तंभावर खिळली होती. परंतु त्या पाटीवर केवळ एवढेच लिहिले होते, ‘हा येशू आहे. यहूद्यांचा राजा.
\s5
\p
\v 38 आजूबाजूच्या वधस्तंभावर त्यांनी आणखी दोन चोरांनाही खिळले होते. त्यांनी एक वधस्तंभ येशूच्या डावीकडे आणि दुसरा वधस्तंभ येशूच्या उजवीकडे रोवलेला होता.
\v 39 येशू एखादा दुष्ट व्यक्ती असल्याप्रमाणे त्याच्या जवळून जाणारे लोक त्याचा अपमान करून आपले डोके हलवत होते.
\v 40 ते असे म्हणत होते, “तू मंदिराचा सर्वनाश करून ते तीन दिवसात पुन्हा उभारशील असे म्हणाला होतास! जर तू ते करण्यास समर्थ आहेत तर तू नक्कीच स्वतःलाही वाचवू शकतोस! जर तू देवाचा पुत्र आहेस तर, वधस्तंभावरून खाली उतरून ये!”
\s5
\p
\v 41 अशाच प्रकारे, मुख्य याजकांनी, यहूदी नियम शास्त्र शिकवणार्‍या पुरुषांनी, आणि वडीलजणांनी त्याची थट्टा केली. ते अशा प्रकारे बोलत होते,
\v 42 “ह्याने असा दावा केला आहे की, तो आजारी लोकांना बरा करणारा आहे, परंतु तो स्वतःला मात्र मदत करू शकत नाही!” “तो म्हणतो की तो इस्राएलाचा राजा आहे. तर त्याने वधस्तंभावरून खाली उतरून घ्यावे. मगच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!”
\s5
\p
\v 43 “तो देवावर विश्वास ठेवतो असा दावा करणारा आहे, एवढेच नव्हे तर तो असा एक मनुष्य आहे जो देव देखील आहे असेही म्हणतो. म्हणून जर देव त्याच्यावर प्रसन्न आहे, तर देवाने त्याला आता येथून सोडवावे!”
\v 44 आणि जे दोन दरोडेखोर त्याच्यासोबत वधस्तंभी खिळलेले होते त्यांनीही त्याची अशाच प्रकारे थट्टा केली, आणि तेही अशाच गोष्टी त्याच्याशी बोलले.
\s येशूचा मुत्यू
\s5
\p
\v 45 दुपारच्या वेळी संपूर्ण देशावर अंधकार पसरला. दुपारच्या तीन वाजेपर्यंत तेथे अंधार राहिला.
\v 46 तीन वाजन्याच्या सुमारास येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एली, एली, लमा सबखथनी” याचा अर्थ असा होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला आहेस?”
\v 47 तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी जेव्हा “एली,” हा शब्द ऐकला, तेव्हा त्यांनी असा विचार केला की तो एलिया संदेष्ट्याला हाक मारत आहे.
\s5
\p
\v 48 लगेचच त्यांच्यापैकी एक व्यक्ती धावत गेला आणि त्याने एक स्पंज घेतला. कडू द्राक्षरसाने त्याने तो भरला. मग त्याने तो स्पंज काठीच्या टोकावर लावला आणि येशूच्या तोंडाजवळ धरला जेणेकरून येशूने त्यातील द्राक्षरस प्यावा.
\v 49 परंतु तेथील इतर लोक म्हणाले, “थांबा! एलिया संदेष्टा ह्याला वाचवण्यासाठी येतो का ते आपण पाहू या!”
\v 50 मग त्यानंतर येशूने पुन्हा एकदा मोठ्याने आरोळी मारली, आणि त्याने आपला आत्मा देवाच्या स्वाधीन केला, व तो मरण पावला.
\s5
\p
\v 51 त्याच क्षणी मंदिरातील परम पवित्र स्थान वेगळा करणारा जाड पडदा वर पासून खाल पर्यंत मधोमध फाटला व त्याचे दोन भाग झाले. तेव्हा पृथ्वी हालली आणि काही मोठे खडक दुभंगले गेले.
\v 52 काही कबरा उघडल्या गेल्या, आणि ज्यांनी देवाला सन्मान देणारे जीवन जगले होते अशा अनेक लोकांची शरीरे पुन्‍हा जिवंत झाली.
\v 53 ते कबरांमधून बाहेर पडले, आणि येशू पुन्हा जिवंत झाल्यानंतर, ते यरुशलेमेमध्ये गेले आणि त्यांनी अनेक लोकांना दर्शन दिले.
\s5
\p
\v 54 येशूला ज्या सैनिकांनी वधस्तंभावर खिळले होते त्या सैनिकांवर देखरेख करणारा अधिकारी तेथेच बाजूला उभा होता. वधस्तंभावर देखरेख करणारे आणि त्यांचे रक्षण करणारे सैनिकही तेथे उभे होते. जेव्हा त्यांना भूमिकंप झाल्याची जाणिव झाली आणि त्यांनी इतर घडलेल्या गोष्टी पाहिल्या, ते अतिशय भयभीत झाले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले, “खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता!”
\p
\v 55 तेथे अनेक स्त्रियाही होत्या. त्या थोड्या अंतरावरून ह्या सर्व गोष्टी पाहत होत्या. त्याला लागेल त्या गोष्टींची पुर्तता त्यांनी करावी म्हणून त्या गालील प्रांताहून येशूच्यासोबत येथपर्यंत आल्या होत्या.
\v 56 या स्त्रियांमध्ये मग्दाला येथील मरीया, दुसरी मरीया जी याकोब आणि योसेफ ह्यांची आई होती, आणि याकोब आणि योहान यांची आई त्यामध्ये होत्या.
\s येशूची उत्तरक्रिया
\s5
\p
\v 57 मग जवळ जवळ संध्याकाळ झाल्यानंतर, योसेफ नामक एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाई या नावाच्या गावातला होता. तो देखील येशूचा शिष्य होता.
\v 58 तो पिलाताकडे गेला आणि येशूचे शरीर त्याने पिलाताला मागितले व त्याला पुरण्याची परवानगीही मागितली. पिलाताने त्याच्या सैनिकांना आज्ञा केली की त्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे.
\s5
\p
\v 59 म्हणून योसेफ आणि इतर लोकांनी त्याचे शरीर घेतले आणि ते एका स्वच्छ व पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये गुंडाळले.
\v 60 योसेफाची स्वतःची कबर जी कामकऱ्यांनी एका खडकामध्ये कोरून काढली होती त्या नव्या कबरेत त्यांनी त्याला ठेवले. त्या कबरीच्या तोंडाशी त्यांनी एक मोठा गोल धोंडा ढकलून ठेवला. मग ते तेथून निघून गेले.
\v 61 मग्दाला या गावाची मरीया आणि दुसरी मरीया त्या कबरीच्या विरुद्ध दिशेस बसून, ह्या सर्व गोष्टी पाहत होत्या.
\s5
\p
\v 62 दुसरा दिवस शनिवार असल्यामुळे, तो यहूद्यांचा विसावा घेण्याचा दिवस होता. सर्व मुख्य याजक आणि काही परूशी पिलाताकडे गेले.
\v 63 ते म्हणाले, “महाशय, आम्हाला हे आठवते की तो ठग जिवंत असतांना, असे म्हणत असे, ‘मी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईन.
\v 64 म्हणून आम्ही तुला विनंती करतो की तू आपल्या सैनिकांनी त्या कबरेची तीन दिवसापर्यंत राखण करावी अशी त्यांना आज्ञा द्या. जर तू असे केले नाहीस तर त्याचे शिष्य येतील आणि त्याचे शरीर चोरून नेतील. मग ते सर्व लोकांना जाऊन सांगतील तो मेलेल्यामधून पुन्हा जिवंत झाला आहे. जर त्यांनी लोकांना ह्या गोष्टी सांगून फसवले, तर आधी तो मी ख्रिस्त आहे असे सांगून लोकांना त्याने आधीच फसवले होते त्याही पेक्षा ही दुसरी फसवणूक अतिशय भयंकर असेल.”
\s5
\p
\v 65 पिलाताने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही काही सैनिक घेऊन जाऊ शकता. त्या कबरेकडे जा आणि तुम्हाला ठाऊक असल्याप्रमाणे तिला तुम्ही सुरक्षित करा.”
\v 66 म्हणून ते गेले आणि त्यांनी त्या कबरीच्या धोंड्यावर दोऱ्या बांधून त्याचे तोंड बंद केले आणि त्या दगडी कपारीच्या दोन्ही बाजूला त्यांनी रोमी सैनिकाचा शिक्का मारला. त्या कबरेचे राखण करण्यासाठी त्यांनी तेथे काही सैनिकांनाही ठेवले.
\s5
\c 28
\s येशूचे पुनरूत्थान
\p
\v 1 शब्बाथ दिवस समाप्त झाल्यानंतर, रविवारी मोठ्या पहाटेस, मग्दाला ह्या गावाची मरीया आणि दुसरी मरीया येशूच्या कबरेला पाहण्यासाठी गेल्या.
\v 2 अचानक तेथे एक शक्तिशाली भूकंप झाला. त्याच वेळेस स्वर्गातून देवापासून एक देवदूत तेथे आला. तो कबरे जवळ गेला आणि त्याच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला दगड त्याने बाजूला लोटला. आणि मग तो त्या दगडावर बसला.
\s5
\p
\v 3 त्याचे शरीर विजेसारखे चकाकत होते, आणि त्याचे कपडे बर्फासारखे अतिशय शुभ्र होते.
\v 4 राखण करणारे रक्षक थरथर कापू लागले, कारण ते सर्व फार घाबरले होते, आणि ते मेलेल्या मनुष्यासारखे खाली पडले.
\s5
\p
\v 5 देवदूताने त्या दोन स्त्रियांना म्हटले, “तुम्ही घाबरू नये! मला हे ठाऊक आहे की ज्या येशूला वधस्तंभावर खिळले होते, त्याला तुम्ही शोधत आहात.
\v 6 तो येथे नाही! येशूने जसे सांगितले होते, त्याचप्रमाणे देवाने त्याला पुन्हा जिवंत केले आहे! त्याचे शरीर ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ती जागा पाहा आत या!
\v 7 आणि मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मेलेल्या मधून पुन्हा जिवंत झाला आहे! तो तुमच्यासमोर गालील जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तुम्ही तेथे त्याला पाहाल. मी तुम्हाला जे काही सांगितले आहे त्याच्याकडे लक्ष द्या!”
\s5
\p
\v 8 मग त्या स्त्रिया कबरेपासून लवकर निघून गेल्या. त्या घाबरलेल्या होत्या, परंतु त्यांना अतिशय आनंद देखील झाला होता. जे काही घडले होते ते शिष्यांना सांगण्यासाठी त्या पळत गेल्या.
\v 9 अचानक, त्या धावत असतांना, येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला. तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो!” त्या स्त्रिया त्याच्या जवळ गेल्या. त्यांनी गुडघे टेकले आणि त्याच्या पायांना धरले आणि त्याची उपासना केली.
\v 10 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही घाबरू नका! जा आणि माझ्या सर्व शिष्यांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. ते मला तेथे पाहतील.”
\s5
\p
\v 11 त्या स्त्रिया जात असतांना, कबरेची राखण करणारे काही सैनिकही शहरामध्ये गेले. जे घडले होते ते सर्वकाही त्यांनी मुख्य याजकांना कळवले.
\v 12 ह्यामुळे सर्व मुख्य याजक आणि यहूदी पुढारी एकत्र जमा झाले. ती कबर रिकामी का आहे ह्याचे स्पष्टीकरण सांगण्याच्या मार्गाविषयी ते विचार करत होते. त्यांनी त्या सैनिकांना लाच म्हणून खूप पैसे दिले.
\v 13 ते म्हणाले, “लोकांना सांगा, ‘रात्रीच्या वेळीस त्याचे शिष्य आले आणि आम्ही झोपलेले असतांना त्यांनी त्याचे शरीर चोरून गेले.
\s5
\p
\v 14 आम्ही तुम्हाला ह्याची खात्री देतो की, जर ही बातमी राज्यपालाने ऐकली तर तो तुमच्यावर रागवणार नाही व ह्याची तुम्हाला शिक्षा करणार नाही. म्हणून तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही.”
\v 15 म्हणून सैनिकांनी ते पैसे घेतले आणि त्यांना सांगितल्या प्रमाणे त्यांनी केले. आणि मी हे पुस्तक लिहिण्याच्या दिवसापर्यंत यहूदी लोकांमध्ये हीच गोष्ट सांगितली जात आहे.
\s येशूचे गालीलात प्रेषितांना दर्शन
\s5
\p
\v 16 नंतर ते अकरा शिष्य गालील जिल्ह्यात गेले. येशूने त्यांना ज्या डोंगरावर जाण्यास सांगितले होते तेथे ते गेले.
\v 17 त्यांनी त्याला तेथे पाहिले आणि त्याची उपासना केली. परंतु तो खरोखरच येशू आहे आणि पुन्हा तो जिवंत झाला आहे ह्याबद्दल काही जणांना संशय आला.
\s5
\p
\v 18 आणि मग येशू त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला, “स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर माझ्या पित्याने मला सर्वांवर आणि सर्व गोष्टींवर अधिकार दिला आहे.
\v 19 म्हणून तुम्ही जा, आणि माझ्या अधिकाराचा उपयोग करून सर्व लोक गटांमधील सर्व लोकांनी माझे शिष्य बनावे म्हणून माझा संदेश तुम्ही त्यांना शिकवा. माझ्या पित्याच्या, मी जो त्याचा पुत्र, त्या माझ्या आणि पवित्र आत्म्याच्या अधिकाराखाली त्यांनी असावे म्हणून तुम्ही त्यांना बाप्तिस्मा द्या.
\s5
\p
\v 20 मी तुम्हाला जे काही आज्ञा देऊन सांगितले आहे त्या सर्व गोष्टी त्यांना शिकवून पाळावयास सांगा आणि ह्या युगाच्या अंतापर्यंत, मी सदैव तुम्हासोबत राहणार आहे हे लक्षात ठेवा.”