mr_tn/LUK/17/14.md

2.3 KiB
Raw Blame History

जा आणि स्वतःला याजकांना दाखवा

ही पूर्ण माहिती, ‘’जेणेकरून ते तुम्हाला तपासून घेतील, स्पष्टपणे मांडता येते. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

आणि असे झाले की

ह्या वाक्यांशाचा उपयोग गोष्टीतील महत्वाची घटना दर्शवण्यास करण्यात येतो. जर तुमच्या भाषेत असे करण्याची पद्धत असेल, तर त्याचा वापर इकडे करण्याचा विचार करा.

ते शुद्ध झाले

‘’आणि असे झाले की’’ ह्याने त्या घटनेची सुरुवात होते. ह्याचे भाषांतर ‘’त्यांच्या कुष्ठरोगाने जेव्हा ते बरे झाले तेव्हा ते शुद्ध झाले’’ किंवा ‘’त्यान्ह्च्या कुष्ठरोगातून ते बरे झाले.

त्यांनी त्याला बरा झालेले पाहिले

‘’तो बरा झाला ह्याची जाणीव त्याला झाली’’ किंवा ‘’येशूने त्याला बरे केले ह्याची जाणीव त्याला झाली’’

तो परत वळला

‘’तो परत येशूकडे गेला’’

मोठ्या आवाजाने त्याने देवाचे गौरव केले

‘’आणि मोठ्याने देवाचे गौरव केले’’

तो त्याच्या पायी पडला

‘’त्याने गुढघे टेकून त्याचा चेहरा येशूच्या पायांशी ठेवला. त्याने येशूचा सन्मान म्हणून असे केले.