mr_tn/LUK/06/39.md

3.1 KiB
Raw Blame History

(येशू लोकांना न्याय न करण्याचे शिकवत आहे.)

एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्या माणसाला दिशा दाखवू शकतो का?

येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग लोकांना जे माहित होते त्या बद्दल परत विचार करण्यास लावला. ह्याचे भाषांतर ‘’एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्या माणसाला दिशा दाखवू शकतो का, शकतो का? किंवा ‘’आपल्याला माहित आहे की एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्या माणसाला दिशा दाखवू शकत नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

जर त्याने केले

काही भाषांमध्ये ‘’जर कोणी केले’’ हे वापरणे जास्त योग्य ठरेल.

ते दोघेही खड्ड्यात पडतील, पडणार नाही का?

हा एक दुसरा अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’ते खड्ड्यात पडणार नाही का? किंवा ‘’ते दोघेही एका छिद्रात पडतील’’ (युडीबी)

एक शिष्य आपल्या गुरूपेक्षा श्रेष्ठ नसतो

ह्याचा अर्थ १) ‘’एका शिष्याला गुरूपेक्षा अधिक ज्ञान नसते’’ किंवा २)’’एका शिष्याला आपल्या शिक्षकापेक्षा अधिक अधिकार नसतो. ह्याचे भाषांतर एक शिष्य शिक्षकाच्या पेक्षा वरचढ नाही.

ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षित केले जाते

‘’ज्या प्रेत्येक शिष्याला चांगले प्रशिक्षण मिळते. ह्याचे भाषांतर एका कृतिशील क्रियापदाने होऊ शकते: ‘’ज्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रशिक्षणाने आपले ध्येय गाठले आहे’’ किंवा ‘’प्रत्येक शिष्य ज्याच्या शिक्षकाने पूर्णपणे त्याला शिकवले आहे. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)