mr_tn/LUK/06/01.md

1.8 KiB
Raw Blame History

असे झाले

गोष्टीतील नवीन भाग दाखवण्यासाठी हा वाक्यांश वापरला आहे. जर तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असेल, तर येथे त्याचा वापर करण्याचा विचार करा.

धान्याची शेते

ह्या बाबतीत, ते तर जमिनीचे मोठे भाग आहेत जिथे गव्हाच्या दाण्यांना विखरून अधिक धान्य उगवले जात होते.

धान्याची कणसे

गव्हाच्या रोपावरील हा भाग आहे, जे एक प्रकारचे गवत असते. ते त्या परिपक्व धान्याला किंवा त्या बियांना धरतात.

शब्बाथ दिवशी करण्यास जे योग्य नाही ते तुम्ही का करता

ह्याचे भाषांतर, ‘’शब्बाथ दिवशी तुम्ही कणसे का उपटून काढता?’’हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याचा अर्थ ‘’शब्बाथ दिवशी कणसे उपटून काढणे देवाच्या नियमांच्या विरुद्ध आहे! ‘’तू’’ ह्या शब्द अनेकवचनी आहे, आणि त्याचा संदर्भ शिष्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)