mr_tn/ROM/14/05.md

2.3 KiB
Raw Blame History

कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसांपेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो

‘’एखादा’’ आणि ‘’दुसरा’’ हे वाक्यांश एकाच गोष्टीवर दोन वेगळ्या रीतीने विचार करण्याच्या पध्दती मांडतो. पर्यायी भाषांतर: ‘’एखाद्या व्यक्तीला इतर दिवसांपेक्षा एक दिवस अतिशय महत्वाचे वाटतो, पण दुसर्याला सर्व दिवस सारखेच वाटतात. (पहा: शब्दप्रयोग)

तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी

ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’प्रत्येक व्यक्तीने तो जे करत आहे त्याने प्रभूचा सन्मान होत आहे ना ह्याची खात्री बाळगावी. (पहा: उघड आणि पूर्ण)

जो दिवस पाळतो, तो प्रभूकरिता पाळतो

‘’जोकोणी ठराविक दिवशी उपासना करतो तो प्रभूचा सन्मान करण्यासाठी तसे करतो’’

आणि जो खातो, तो प्रभूकरिता खातो

‘’जो कोणी सर्व प्रकारचे अन्न खातो तो प्रभूचा सन्मान करण्यासाठी खातो’’

जो खात नाही, तो प्रभूकरिता खात नाही

‘’जो कोणी ठराविक प्रकारचे अन्न खात नाही तो प्रभूचा सन्मान करण्यासाठी तसे करतो’’