mr_tn/ROM/06/15.md

3.9 KiB
Raw Blame History

देवाच्या प्रती आज्ञापालन आणि आज्ञाभंग ह्यासाठी गुलामगिरी एक रूपक अलंकर म्हणून पौल वापरतो. (पहा: रूपक अलंकार)

तर मग काय?आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय? कधीच नाही.

कृपेच्या अधीन राहणे हे पाप करण्यासाठी कारण नाही ह्यावर भर देण्यासाठी पौल एक प्रश्न वापरत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’तरीही, मोशेच्या नियमशास्त्राच्या ऐवजी आपण कृपेच्या अधीन आहोत म्हणून आपल्याला पापाची परवानगी आहे असे नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तसे कधीच होऊ नये

‘’तसे घडावे असे आपल्याला कधीच वाटत नाही ! किंवा ‘’तसे न करण्यास देवाने मला सहाय्य करावे! हे पद एक अतिशय बळवंत इच्छा हे न होण्यासाठी प्रदर्शित करते. इकडे वापरण्यात येणारे तसेच तुमच्या भाषेतील पद तुम्हाला इकडे वापरायचे तर वापरू शकता. ३:३१ तुम्ही कसे भाषांतर केले ते पहा.

आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा

देवाची इच्छा ही पाप करत राहण्यासाठी कारण आहे असा विचार करणाऱ्यांना ओरडण्यासाठी पौल एक प्रश्न वापरत आहे. पर्यायी भाषांतर: ‘’तुम्ही ज्या मालकाचे आज्ञापालन करण्याचे निवडता त्याचे गुलाम आहात हे तुम्ही ओळखले पाहिजे.

ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नितीमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा

येथे ,’’पाप’’ आणि ‘’आज्ञापालन’’ ह्यांचे वर्णन जसे गुलाम मालकाची सेवा करतो तसे केले आहे. एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पापाचे तरी तुम्ही गुलाम होऊ शकतात, ज्याचा अपरीनाम असतो अध्यात्मिक मृत्यू, किंवा तुम्ही आज्ञापालनाचे गुलाम असू शकता, ज्याचा परिणाम म्हणजे देव तुम्हाला नीतिमान ठरवेल. (पहा: मनुष्यात्वरोप)