mr_tn/MAT/11/07.md

2.9 KiB

येशू लोकसमुदायाशी बाप्तिस्मा कारणऱ्या योहानाबद्दल बोलण्याचे सुरु करीत आहे.

बाप्तिस्मा करणारा योहान हा कोणत्या प्रकारचा व्यक्ती होता ह्याबद्दल लोकसमुदायाने विचार करावा ह्यासाठी येशूने तीन आलंकारयुक्त प्रश्नांचा उपयोग केला. ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "तुम्ही कांही पाहण्यासाठी बाहेर गेला होतात का....? अर्थात नाही!" किंवा "खात्रीने तुम्ही बाहेर बघण्यासाठी गेला नाहीत..!" (पाहा: अलंकारयुक्त प्रशन)

वाऱ्याने हालविलेला बोरू काय

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की १) यार्देन नदीच्या तिरावरची एक प्रत्यक्ष वनस्पती (पाहा यु डी बी ) किंवा २) एका प्रकारच्या व्यक्तीचे रूपक असू शकते "वाऱ्याने हालणाऱ्या बोरू सारखा मनुष्य" (पाहा: उपमा). ह्या उपमेचे दोन संभाव्य अर्थ आहेत १) अशा प्रकारच मनुष्य सहजवाऱ्याने हालविला जाऊ शकतो, सहजरित्या मन बदलणाऱ्या व्यक्तीसाठी हे रूपक आहे, किंवा २) वारा येतो तेव्हा याऱ्य खूप आवाज करतो, खूप कांही बोलणाऱ्या परंतु महत्वाचे असे कांहीच न सांगणाऱ्यासाठी हे रूपक आहे. (पाहा: रूपक)

बोरू

"उंच लांब अशी गवताळ वनस्पती"

तलम वस्त्रें घातलेला

"महाग कपडे घालणारा" केवळ श्रीमंत लोकच अशा प्रकारची वस्त्रे घालत होते.

खरोखर

"पाहा" असेच ह्या शब्दाचे भाषांतर केले जाते. हे मागून येणाऱ्या शब्दावर भर देते. पर्यायी भाषांतर: "खचितच."