mr_tn/1CO/10/01.md

15 lines
2.0 KiB
Markdown

# आपले पूर्वज
पौल निर्गमाच्या पुस्तकातील मोशेच्या वेळेचा उल्लेख करीत आहे जेव्हा मिसर देशाचे सैन्य इस्राएल लोकांचा पाठलाग करीत होते तेव्हा ते तांबड्या समुद्रातून पळाले होते. "आपल्या" हे समावेशीकरण आहे. AT: "सर्व यहूदी लोकांचे पूर्वज" (पाहा: समावेशीकरण)
# मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला
AT: "त्या सर्वांनी मोशेचे अनुसरण केले आणि ते सर्व मोशेशी वचनबद्ध होते."
# समुद्रातून पार गेले
मिसर सोडल्यानंतर त्यां सर्वांनी मोशेबरोबर तांबडा समुद्र पार केला.
# मेघाखाली
दिवसभरांत इस्राएल लोकांचे मेघाद्वारे मार्गदर्शन केले गेले, तो मेघ देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व करतो.
# तो खडक तर ख्रिस्त होता
तो "खडक" ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली शक्तीचे प्रतिनिधित्व करतो जो संपूर्ण प्रवासांत त्यांच्याबरोबरच होता; ते त्याच्या संरक्षण आणि समाधानावर अवलंबून राहू शकत होते. (पाहा: रूपक)