(येशू तो दृष्टांत सांगत राहतो.) # त्याला त्यांनी द्राक्षमळ्यातून बाहेर फेकले ‘’मळेकर्यांनी त्या मुलाला द्राक्षमळ्यातून जबरदस्तीने बाहेर काढले’’ # मग तो द्राक्षमळ्याचा धनी त्याला काय करेल? येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा वापर मालकाने काय करावे ह्याकडे ऐकणाऱ्यांनी लक्ष देण्यास केला. त्याचे भाषांतर तुम्ही एक आज्ञा म्हणून देखील करू शकता: ‘’म्हणून आता, द्राक्षमळ्याचा धनी त्यांना काय करेल हे ऐका.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) # देव न करो! ‘’तसे घडण्यापासून देवाने ते थांबवावे!’’ किंवा ‘’ते कधीच घडू नये!’’ ह्या लोकांना देव यरुश्लेमातून काढून टाकेल कारण ते मसिहाला नाकारतील असा अर्थ लोकांनी ह्या दृष्टांतातून घेतला. ही भयंकर गोष्ट घडू नये म्हणून लोकांनी अशी तीव्र इच्छा व्यक्त केली.