# तुम्ही वाचले देखील नाही का ही एका अभिप्रेत प्रश्नाची सुरुवात आहे. त्यातून काही न शिकण्यासाठी येशू त्यांना सौम्य भाषेत दटावत आहे. ह्याचे भाषांतर ‘’निश्चित तुम्ही वाचले आहे.’’(युडीबी) किंवा ‘’तुम्ही जे वाचले त्यातून शिकले पाहिजे’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) # प्रथेची भाकर ‘’ती पवित्र भाकर’’ किंवा ‘’ज्या भाकरीचे अर्पण देवाला केले गेले’’ # मनुष्याचा पुत्र ह्याचे भाषांतर ‘’मी, मनुष्याचा पुत्र.’’ येशू स्वतःचा संदर्भ देत होता. # शब्बाथाचा प्रभू ‘’शब्बाथाचा धनी.’’ ह्याचे भाषांतर ‘’शब्बाथ दिवशी काय करायचे हे शोधण्यास त्याला अधिकार आहे !’’ (युडीबी)