# (येशू धार्मिक पुढार्यांना दुसरा दाखला सांगतो.) # कोणताही मनुष्य ‘’कोणताही माणूस टाकत नाही’’ (युडीबी)किंवा ‘’लोक कधी टाकत नाही’’ # नवीन द्राक्षरस ‘’द्राक्षांचा रस.’’ ह्याचा संदर्भ जो द्राक्षरस अजूनही आंबवलेला नाही. # बुधल्या ह्या पिशव्या प्राण्यांच्या कातड्याने बनवल्या होत्या. त्यांना ‘’द्राक्षरसाच्या पिशव्या’’ किंवा ‘’कातडी पिशव्या’’ म्हंटले जाऊ शकते (युडीबी) # नवीन द्राक्षरस त्या बुधल्या फोडून टाकेल ‘’जेव्हा नवीन द्राक्षरस आंबवलेला असतो तो ताणला जाऊन, जुन्या बुधल्या फाडून टाकतो कारण त्या अजून ताणल्या जाऊ शकत नाही.’’ येशूच्या श्रोत्यांना द्राक्षरस आंबवणे आणि पसरणे ह्याची पूर्ण माहिती समजली असेल. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण) # तो द्राक्षरस भरून वाहेल ‘’तो द्राक्षरस पिशव्यांमधून बाहेर वाहील’’ # ताज्या बुधल्या ‘’नवीन बुधल्या’’ किंवा ‘’नवीन द्राक्षरसाच्या पिशव्या.’’ ह्याचा संदर्भ न वापरलेल्या बुधल्यांशी आहे. # जुना द्राक्षरस ‘’आंबवलेला द्राक्षरस’’ # तो म्हणतो, ‘’जुने चांगले आहे’ ह्यात भर घालणे सहाय्यक ठरेल ‘’आणि म्हणून त्याला नवीन द्राक्षरस कसा आहे हे पहायचे नाही.’’ हा एक रूपक अलंकार आहे जो धार्मिक पुढार्यांच्या जुन्या शिकवणीला येशूच्या नवीन शिकवणीच्या विरोधात मांडतात. मुद्दा असा आहे की ज्या लोकांना जुन्या शिकवणीची सवय झाली आहे त्यांना येशूच्या नवीन शिकवणी ऐकून घेण्याची इच्छा नाही. (पहा: रूपक अलंकार)