पौल एका काल्पनिक यहुदी व्यक्तीबरोबर संभाषण सुरु करतो. # आपल्या हटवादीपणाने आणि पश्चातापहीन अंतःकरणाने जी व्यक्ती ऐकत नाही आणि देवाचे आज्ञापालन करत नाही त्याची तुलना पौल दगडाशी करत आहे. अंतःकरण संपूर्ण व्यक्तीचे दर्शक आहे. पर्यायी भाषांतर: ‘’ तू ऐकण्याचे आणि पश्चाताप करण्याचे नाकारतो म्हणून.’’ (पहा: रूपक अलंकार, अजहल्ल्क्षण अलंकार) # तू स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस काय ‘’साठवणे’’ हा वाक्यांश एका व्यक्तीचा संदर्भ देतो जो संपत्ती साठवून एका सुरक्षित ठिकाणी ठेवत असतो.संपती ऐवजी तो देवाची शक्षा साठवित आहे जितका काळ ते पश्चाताप करत नाही, तितकी ती शिक्षा तीव्र असते. पर्यायी भाषांतर: ‘’तू स्वतःची शिक्षा अधिक कठोर आणि तीव्र करत आहेस.’’ # क्रोधाच्या दिवशी, देवाच्या नितीमत्वपूर्ण न्यायाचे प्रगटीकरण होण्याच्या दिवशी ह्याचा संदर्भ त्याच दिवसाशी आहे.पर्यायी भाषांतर: ‘’जेव्हा देव सगळ्यांना तो संतप्त आहे हे दाखवतो आणि सर्व लोकांचा न्याय रास्तपणे करतो’’ (पहा: युडीबी) # परतफेड करतात ‘’एक रास्त प्रतिफळ किंवा शिक्षा देणे’’ # प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृतींच्या परिमाणाने ‘’प्रत्येक व्यक्तीने जसे केले आहे तसे’’ # ज्यांनी सातत्याने सत्कृत्यांनी सन्मान, गौरव आणि अक्षयता सार्वकालिक जीवन ह्याचा शोध केल आहे ‘’तो अशा लोकांना सार्वकालिक जीवन देईल ज्यांनी सातत्याने सत्कृत्ये करून दाखवले होते की ते सन्मान, गौरव आणि अक्षयता ह्यांचा मिळवण्याचा करत होते’’ # प्रयत्न करतात ह्याचा अर्थ ते अशा रीतीने वागतात की जे देवापासून न्यायाच्या दिवशी एक होकारात्मक निर्णयाचा शोध करतील. # सन्मान, गौरव आणि अक्षयता त्यांची इच्छा होती की देवाने त्यांचा सन्मान आणि गौरव करावा, आणि त्यांनी कधीही मरू नये. # अक्षयता ह्याचा संदर्भ शारीरिक, नैतिक नाश आहे.