# कारण देवाचा क्रोध लोकांनी शुभवर्तमान का ऐकण्याची गरज आहे हे पौल स्पष्ट करतो. # देवाचा क्रोध प्रगट होतो पर्यायी भाषांतर: ‘’देव त्याचा क्रोध प्रगट करतो.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # विरुद्ध ‘’प्रती’’ च्यासंबंधी # त्याच्या अभक्तीवर व अनीतीवर पर्यायी भाषांतर: ‘’लोक ज्या सर्व अनीतीच्या आणि अभक्तीच्या गोष्टी करतात.’’ # सत्य दाबून ठेवतात पर्यायी भाषांतर: ‘’ देवाच्या बद्दल खरी माहिती ते लपवून ठेवतात.’’ # देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते पर्यायी भाषांतर: ‘’त्यांना जे काही दिसते त्यामुळे त्यांना देवाच्या बद्दल कळते.’’ # कारण देवाने ह्या लोकांना देवाबद्दल गोष्टी का माहित असतात ते तो दाखवतो. # देवाने त्यांना दाखवून दिले आहे पर्यायी भाषांतर: ‘’देवाने त्यांना त्या दाखवून दिल्या.’’