येशूने १०:१६ मध्ये त्याच्या शिष्यांना त्याच्यासाठी पुढे येणारा छळ सहन करावा लागेल हे सांगण्याचे सुरु केले होते ते तो चालू ठेवतो. # जो प्रेम करतो....तो योग्य नाही पर्यायी भाषांतर: "जे प्रेम करतात...ते योग्य नाहीत" किंवा "जर तुम्ही प्रेम करता...तर तुम्ही योग्य नाहो." # तो कोण ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "जो कोणी" किंवा "कोणी एक" किंवा "कोणीहि" किंवा "जे लोक" (पाहा यु डी बी ). # प्रेम करतो येथे "प्रेम" ह्यासाठी जो शब्द वापरला गेला आहे तो "बंधू प्रेमाचा उल्लेख करतो" किंवा "मित्राचे प्रेम." ह्याचे असेहि भाषांतर होऊ शकते "काळजी घेणे" किंवा "च्या प्रती एकनिष्ठ" किंवा "ची आवड असणे." # तो मला योग्य नाही ह्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते "माझा संबंधित असणे योग्य नाही" किंवा "तो माझा शिष्य होण्यांस योग्य नाही" किंवा "तो माझा होण्यांस योग्य नाही." (पाहा यु डी बी ). # जो कोणी उचलून घेत नाही....तो नाही पर्यायी भाषांतर: "जे कोणी उचलून घे नाहीत....ते नाहीत" किंवा "जर तुम्ही उचलून घेत नाहीत...तर तुम्ही नाहीत" किंवा "जोपर्यंत तुम्ही उचलून घेत नाहीत....तुम्ही नाहीत." # वधस्तंभ.....उचलून घ्या आणि मागे या मरण्यांस तयार असण्याचे हे रूपक आहे. कोठलीहि एक वस्तू घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या मागे जाणे ह्यासाठी नियमित शब्दांचा उपयोग करा. (पाहा: रूपक). # उचलून घ्या "उचलून घेणे" किंवा "उचलून घेऊन जाणे" # जो कोणी राखतो....तो गमावील....जो कोणी गमावितो तो राखील ह्या शब्दांचे भाषांतर शक्यतो थोडक्या शब्दांत करावे. पर्यायी भाषांतर: "जे कोणी राखतील....ते गमावितील....जे कोणी गमावितील....ते राखतील" किंवा "जर तुम्ही राखाल.....तुम्ही गमवाल....जर तुम्ही गमवाल....तुम्ही राखाल." # राखतो हे "ठेवतो" किंवा "जतन करतो" ह्यासाठी सामीप्यमुलक लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: "ठेवण्याचा प्रयत्न करतो" किंवा "जतन करण्याचा प्रयत्न करतो." (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा) # गमाविल व्यक्ती मरेल असा ह्याचा अर्थ नाही. हे "त्याला खरे जीवन प्राप्त होणार नाही" ह्याचे रूपक आहे. (पाहा: रूपक) # गमावतो पर्यायी भाषांतर: "सोडून देतो" किंवा "सोडून देण्यांस तयार असतो." # माझ्याकरिता "कारण तो माझ्यावर विश्वास करतो" (पाहा यु डी बी ) किंवा "माझ्याखातर" किंवा "माझ्यामुळे." जशी १०:१८ मध्ये आहे तशीच येथे तीच कल्पना आहे "माझ्यामुळे" # तो राखील ह्या रूपकाचा अर्थ आहे खरे जीवन त्याला प्राप्त होईल." (पाहा: रूपक)