येशू वादळ शांत करतो तो अहवाल येथे समाप्त होतो. # त्यांना शिष्यांना # तुम्ही...तुम्ही बहुवचन # तुम्ही का भिता...? येशू शिष्यांना अलंकारयुक्त प्रश्न विचारून त्यांचे वाक्ताडन करीत आहे. त्याचा अर्थ "तुम्ही भिऊ नये" (पाहा यु डी बी ) किंवा "तुम्हांला भिण्याचे कांहीच कारण नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # अहो तुम्ही अल्पविश्वासी "तुम्ही" बहुवचन आहे.६:३० मध्ये तुम्ही जसे ह्याचे भाषांतर केले तसेच येथे करा. # हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे, कि वारे व समुद्रहि ह्याचे ऐकतात? हा अलंकारयुक्त प्रश्न हे दाखवितो की शिष्यांना सुद्धा आश्चर्यांत पडले होते. ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "वारे आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात, हा कोणत्या प्रकारच मनुष्य आहे?" किंवा "इतर माणसांपेक्षा असा हा विपरीत मनुष्य आम्ही पाहिला नाही! वारे आणि लाटां देखील ह्याचे ऐकतात!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # वारे आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात लोक व प्राणी ऐकतात किंवा न ऐकतात ह्यात कांही आश्चर्य नाही, परंतु वारे व लाटांनी ऐकणे ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे मानवीकरण असे वर्णन करते की नैसर्गिक घटक देखील मानवासारखे ऐकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात. (पाहा: मानवीकरण)