येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवालयेथ समाप्त होतो. # संध्याकाळ यु डी बी हे मार्क १:३० मधून असा संदर्भ देत की येशू कफर्णहूमास शब्बाथ दिवशी आला होता. कारण यहूदी शब्बाथ दिवशी काम करीत नाहीत किंवा प्रवास देखील करीत नाहीत, ते संध्याकाळ होईपर्यंत थांबले होते व नंतर त्यांनी लोकांना येशूकडे आणावयास सुरुवात केली होती. चुकीचा अर्थ टाळावयाचा असेल तरच शब्बाथाबद्दल उल्लेख करा नाहीतर करण्याची आवश्यकता नाही. # त्याने शब्दानेच भूतें घालविली हा अतिशयोक्ती अलंकार आहे. येशू एका शब्दापेक्षा अधिक शब्द बोलला असावा. ह्याचे अशा प्रकारे भाषांतर होऊ शकत: "येशूला फक्त एकदाच बोलावे लागले आणि भूत त्या माणसाला सोडून गेले." (पाहा: अतिशयोक्ती अलंकार) # यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले "देवाने यशया संदेष्ट्याला यहूदी लोकांना जी भविष्यवाणी सांगावयास सांगितली होती ती येशूने पूर्ण केली." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # जे यशयाच्या द्वारे सांगितले होते "जे क यशयाने सांगितले होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले "लोकांना रोगांपासून मुक्त करून त्यांना बे केले." (पाहा: प्रतिरूप)