mr_tn/ROM/01/20.md

27 lines
2.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# कारण
मानवजातीला देवाने स्वतःला कसे प्रगट केले हे तो स्पष्ट करून सांगत आहे.
# त्याच्या अदृश्य गोष्टी ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत
‘’अदृश्य गोष्टी’’ ह्याचा संदर्भ जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याच्याशी आहे. ते अगदी ‘’स्पष्टपणे दिसतात’’ कारण लोकांना कळते की त्या आहेत जरी लोक त्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. रूपक अलंकार, कर्तरी किंवा कर्मणी)
# जगाने
ह्याचा संदर्भ स्वर्ग आणि पृथ्वीशी आहे, आणि त्यातील सर्वकाही.
# देवपण
पर्यायी भाषांतरे: ‘’देवाचे सर्व गुणधर्म आणि गुणवैशिष्ट्ये’’ किंवा ‘’देवाच्या बद्दल ज्या गोष्टी त्याला देव बनवतात’’
# निर्मिलेल्या गोष्टी ज्ञात होऊन
पर्यायी भाषांतर: ‘’लोक देवाच्या बद्दल त्याने ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्या पाहून समजून घेऊ शकतात. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# त्यांना कसलीही सबब राहू नये
पर्यायी भाषांतर: ‘’त्यांना माहित नव्हते असे ते कधीच म्हणू शकत नाही’’
# त्यांना
१:१८ ची संपूर्ण मानवजाती
# आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले
‘’मूर्ख गोष्टींचा विचार ते करू लागले’’ (युडीबी)
# त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले
हे पद मन अंधकारमय होण्यासाठी वापरले जाते ज्याचा अर्थ आहे त्यांच्यात काहीच समज नव्हती. पर्यायी भाषांतर: त्यांच्या मनाला हे कळत नव्हते’’ (युडीबी). (पहा: शब्दप्रयोग)