mr_tn/MAT/05/13.md

19 lines
3.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# तुम्ही पृथ्वीचे मीठ आहां
"ह्या जगाच्या लोकांसाठी तुम्ही मीठा सारखे आहां" किंवा "जसे भोजनासाठी मीठ आहे, तसे जगासाठी तुम्ही आहां" ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "ज्याप्रमाणे मीठ हे भोजनाला चांगले बनविते, तुम्ही ह्या जगातील लोकांवर असा प्रभाव पाडा की ते चांगले होतील" किंवा २) "ज्याप्रमाणे मीठ हे भोजनाला नासू देत नाही त्याप्रमाणे तुम्ही लोकांना पूर्णपणे भ्रष्ट होण्यापसून वाचवाल." (पाहा: रूपक)
# जर मीठाचा खारटपणा गेला तर
ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "मीठ जे करते ते करण्याचे त्याचे सामर्थ्य नाहीसे झाले तर" (जसे यु डी बी मध्ये आहे) किंवा "जर मिठाने त्याचा स्वादच गमावला तर"
# तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल?
"त्याला परत उपयुक्त कसे कर्ता येईल?" किंवा "त्याला परत उपयुक्त करण्याचा दुसरा मार्ग नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# त्याला बाहेर फेकून लोकांच्या पायांखाली तुडविले जाण्यापेक्षा
"जेथे लोक चालतात तेथे ह्याला फेजून देणे हेच चांगले"
# तुम्ही जगाचा प्रकाश आहां
"ह्या जगाच्या लोकांसाठी तुम्ही प्रकाशासारखे आहां"
# डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही
"डोंगरावर वसलेल्या नगराचा प्रकाश रात्री कधीच लपू शकत नाही" किंवा "सगळेजण डोंगरावर वसलेल्या नगराचा प्रकाश पाहातात" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट माहिती आणि कर्तरी किंवा कर्मणी)