# दहा पीडा ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-01.jpg) मोशे आणि अहरोन फारोकडे गेले.ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!" फारोने त्यांचे ऐकले नाही.इस्त्राएल लोकांना मोकळे करण्याऐवजी त्याने त्यांस आणखी कष्टाची कामे करण्याची सक्ती केली! ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-02.jpg) फारोने लोकांना जाण्याची सतत मनाई केली, म्हणून देवाने मिसर देशावर दहा भयानक पीडा पाठविल्या.या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-03.jpg) देवाने नाईल नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-04.jpg) मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठविले.फारोने मोशेस बेडूक दूर करण्यास विनंती केली.परंतु सर्व बेडूक मेल्यानंतर फारोचे अंतःकरण आणखी कठोर झाले व त्याने इस्राएलास मिसर देश सोडण्याची परवानगी दिली नाही. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-05.jpg) मग देवाने उवांची पीडा पाठविली.मग त्याने गोमाशांची पीडा पाठविली.फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले की जर ते गोमाशांची पीडा दूर करतील तर मी इस्राएली लोकास मिसर देश सोडून जाऊ देईल.जेंव्हा मोशेने प्रार्थना केली, तेंव्हा देवाने सर्व गोमाशा दूर केल्या.परंतु फारोने आपले अंतःकरण आणखी कठोर केले व लोकांना जाण्यास मनाई केली. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-06.jpg) पुढे, देवाने मिसरी लोकांचे सर्व पाळीव प्राणी आजारी पाडून मारले.परंतु फारोचे मन अधिक कठोर होत गेले व त्याने इस्राएलास जाऊ दिले नाही. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-07.jpg) मग देवाने मोशेस फारोसमोर हवेमध्ये राख उधळण्यास सांगितले.त्याने असे केल्यानंतर, सर्व मिसर देशातील लोकांच्या अंगावर गळवे तयार झाले, मात्र इस्राएलावर त्याचा काही परिणाम झाला नाही.देवाने फारोचे अंतःकरण अधिक कठोर केले, व फारो आता इस्राएलास सोडण्यास तयार नव्हता. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-08.jpg) त्यानंतर, देवाने मिसर देशावर गारांचा पाऊस पाडून ब-याच पिकांचे नुकसान केले व बाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस ठार मारले.फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "मी मोठे पाप केले आहे.तुम्ही जाऊ शकता.”मग मोशेने प्रार्थना केली व गारांचा पाऊन थांबला. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-09.jpg) परंतु फारोने पुन्हा पाप केले व आपले मन कठोर केले. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-10.jpg) मग देवाने मिसर देशावर टोळांची पीडा पाठवली.या टोळांनी गारपिटीच्या पावसामध्ये शिल्लक राहिलेले सर्व पिक खाऊन टाकले. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-11.jpg) मग देवाने मिसरावर तीन दिवस निबिड अंधकाराची पीडा पाठविली.एवढा काळोख होता की मिसरी लोक घराबाहेर पडू शकत नव्हते.परंतु इस्राएली लोक राहत असलेल्या ठिकाणी प्रकाश होता. ![OBS Image](https://cdn.door43.org/obs/jpg/360px/obs-en-10-12.jpg) या नऊ पीडांनंतरही, फारो इस्राएल लोकांना जाऊ देण्यास नाकारत होता.फारो ऐकत नसल्यामूळे देवाने आणखी एक शेवटची पीडा पाठविली.या पीडेने फारोचे मन बदलले. _बायबल कथाःनिर्गम 5-10_