mr_ulb/24-JER.usfm

3532 lines
569 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id JER JER-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h यिर्मया
\toc1 यिर्मया
\toc2 यिर्मया
\toc3 jer
\mt1 यिर्मया
\mt2 The Book of
\is लेखक
\ip यिर्मया, त्याचा लेखक बारुखसोबत. यिर्मया, ज्याने याजक व संदेष्टा या दोघांचीही सेवा केली होती, तो हिल्कीया नावाच्या याजकपदाचा मुलगा होता. (2 राजे 22:8 चा मुख्य याजक नाही.) तो अनाथोथच्या लहानशा गावातून आला (यिर्मया 1:1). त्याला बारुख नावाच्या एका लेखकाने सेवाकार्यात सहकार्य केले ज्याला यिर्मयाने आज्ञा दिली आणि ज्याने संदेष्ट्याच्या संदेशांमधून संकलित केलेल्या लिखाणांचे प्रतिलिपी व संरक्षण केले होते (यिर्मया 36:4,32; 45:1). यिर्मयाला आश्रू ढाळणारा संदेष्टा (यिर्मया 9:1; 13:17; 14:17), आक्रमक बाबेलकरांनी दिलेल्या न्यायदंडाच्या भविष्यवाण्यामुळे संघर्षग्रस्त जीवन जगणारा म्हणून ओळखण्यात आलेले आहे.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 626-570
\ip हे कदाचित बाबेलच्या बंदिवासादरम्यान कधीतरी पूर्ण झाले होते, तरी काहींचे म्हणणे आहे की पुस्तकांचे संपादन नंतरही चालू राहिले आहे.
\is प्राप्तकर्ता
\ip यहूदा आणि यरुशलेमचे लोक आणि पवित्र शास्त्राचे इतर वाचक.
\is हेतू
\ip यिर्मयाचे पुस्तक ख्रिस्ताचे पृथ्वीवरती येण्याआधी आपल्या लोकांना ते निर्माण करण्याच्या हेतूने नवीन कराराची झलक देते. या नव्या करारामुळे देवाच्या लोकांचे पुनर्वसन होणार आहे, कारण तो त्याच्या नियमांना दगडी पाट्यांऐवजी, देहस्वभावाच्या हृदयावर लिहिणार होता. यिर्मयाचे पुस्तक यहूदाला अंतिम भविष्यवाण्यांची नोंद करते, जर राष्ट्राने पश्चात्ताप केला नाही तर भविष्यातील विनाशची चेतावणी देते. राष्ट्राला देवाकडे परत जाण्याकरिता यिर्मयास पाचारण. त्याच वेळी यिर्मयाने पश्चात्ताप न करणाऱ्या मूर्तीपूजा आणि अनैतिकतेमुळे यहूदाचा नाश करण्याची अपरिहार्यता ओळखली.
\is विषय
\ip न्याय
\iot रूपरेषा
\io1 1. देवाद्वारे यिर्मयाचे पाचारण (1:1-19)
\io1 2. यहूदाला चेतावणी (2:1-35:19)
\io1 3. यिर्मयाचे दुःख (36:1-38:25)
\io1 4. यरुशलेमाचे पतन आणि त्याचे परिणाम (39:1-45:5)
\io1 5. राष्ट्राविषयी भविष्यवाण्या (46:1-51:64)
\io1 6. ऐतिहासिक परिशिष्ट (52:1-34)
\s5
\c 1
\s यिर्मयाला पाचारण व त्याचे कार्य
\p
\v 1 बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने:
\v 2 म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले.
\v 3 तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरुशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले.
\s5
\v 4 परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,
\q
\v 5 “मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे,
\q आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.”
\v 6 मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.”
\s5
\q
\v 7 पण परमेश्वर मला म्हणाला,
\q “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे,
\q आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.
\q
\v 8 त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”
\s5
\q
\v 9 मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.
\q
\v 10 खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी,
\q आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
\s5
\p
\v 11 परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.”
\v 12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.”
\s5
\v 13 मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्या कडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जीचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”
\v 14 परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,
\s5
\v 15 कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरुशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.
\v 16 आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पुजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.
\s5
\v 17 यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.
\v 18 पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे केले आहे, ह्यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरूद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरूद्ध आणि लोकांविरूद्ध समर्थपणे उभे रहावे.
\v 19 ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.”
\s5
\c 2
\s अधोगतीस चाललेल्या इस्त्राएलाची परमेश्वराने केलेली मनधरणी
\p
\v 1 परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\q
\v 2 “जा आणि यरुशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो,
\q तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती,
\q जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.
\q
\v 3 इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ.
\q जो कोणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल, असे परमेश्वर म्हणतो.”
\s5
\q
\v 4 याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
\q
\v 5 परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि,
\q कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?
\q
\v 6 कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे?
\q ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून,
\q जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले.
\q तो परमेश्वर कोठे आहे?”
\s5
\q
\v 7 पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमित आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या.
\q तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.
\q
\v 8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही!
\q राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.”
\s5
\q
\v 9 म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 10 कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा,
\q कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
\q
\v 11 काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी?
\q पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे.
\s5
\q
\v 12 “आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 13 कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.
\s5
\q
\v 14 “इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे?
\q
\v 15 तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे.
\q त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही.
\q
\v 16 नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.
\q
\v 17 तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय?
\q जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.
\s5
\q
\v 18 तर आता, शिहोराचे
\f + नाईल
\f* पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे?
\q आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी?
\q
\v 19 तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर,
\q मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 20 “कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस,
\q ‘मी तुझी सेवा करणार नाही. तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.
\q
\v 21 पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले,
\q तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.
\q
\v 22 जरी तू स्वत:ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले,
\q तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\q
\v 23 “मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस?
\q तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पाहा! तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
\q
\v 24 जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस.
\q ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल.
\q
\v 25 तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर.
\q पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.
\s5
\q
\v 26 चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे.
\q ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
\q
\v 27 हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.”
\q कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी, ते आपल्या संकटात म्हणतील, “उठ आणि आम्हांला तार.”
\q
\v 28 तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे.
\q कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!
\s5
\q
\v 29 “तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 30 “तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही,
\q नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”
\q
\v 31 जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय?
\q “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?
\s5
\q
\v 32 कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय?
\q पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
\q
\v 33 प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस,
\q असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस.
\q
\v 34 गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे.
\q तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.
\s5
\q
\v 35 या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.”
\q पण पाहा, “मी पाप केले नाही” या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार.
\q
\v 36 तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस?
\q अश्शूरविषयी जशी तू निराश झालीस, तशी तू मिसरविषयीही निराश होशील.
\q
\v 37 आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील.
\q कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.
\s5
\c 3
\q
\v 1 ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली,
\q तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे.
\q तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 2 डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे?
\q रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस;
\q तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.
\s5
\q
\v 3 म्हणून वसंत ऋतुतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही.
\q पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा.
\q तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.
\q
\v 4 माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.
\q
\v 5 “तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?”
\q पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”
\s पश्चात्ताप करा म्हणून इस्त्राएलाची व यहूदाची मनधरणी
\s5
\q
\v 6 नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला,
\q इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.
\q
\v 7 मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहिण, यहूदाने पाहिले.
\s5
\q
\v 8 धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.
\q
\v 9 तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या.
\q
\v 10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो
\s5
\q
\v 11 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!
\q
\v 12 तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहिन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.
\s5
\q
\v 13 तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात.
\q प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले,
\q आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 14 अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे.
\q मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.
\q
\v 15 माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
\s5
\q
\v 16 आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.
\s5
\q
\v 17 त्या वेळेला यरुशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.
\q
\v 18 त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून
\f +
\fr 3.18
\fq उत्तरेकडच्या प्रदेशातून
\ft उत्तरेकडील भूमीत अश्शूर आणि बाबेल ह्यांचा समावेश आहे. तो ई. स. पूर्व 722 मध्ये शोमरोनाचे आणि ई. स. पूर्व 586 मध्ये यरुशलेमचे पतन दर्शवतो. ही ती जमीन आहे त्यामध्ये इस्राएल आणि यहूदा ह्यांना बंदिवान करून नेले.
\f* ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
\s5
\q
\v 19 मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन?
\q तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.
\q
\v 20 पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात.
\q इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 21 उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत.
\q कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
\q
\v 22 “विश्वासहिन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन.
\q पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!”
\s5
\q
\v 23 टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो,
\q खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,
\q
\v 24 तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.
\q
\v 25 आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले.
\q आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.
\s5
\c 4
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील.
\q तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,
\q
\v 2 आणि जर तू परमेश्वर जीवंत आहे अशी शपथ, सत्यतेने, न्यायाने आणि न्यायीपणाने वाहशील, तर त्याच्या ठायी राष्ट्रे आपणास आशीर्वादीत म्हणतील व त्याच्या ठायी हर्ष करतील.”
\q
\v 3 कारण परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा,
\q काट्यांमध्ये बी पेरु नका.
\s5
\q
\v 4 अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरुशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”
\s यहूदावरील स्वारीचे भय
\q
\v 5 “यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरुशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.
\q
\v 6 खुण म्हणून ध्वज उभारा व तो सियोनेच्या दिशेने दाखवा आणि सुरक्षीततेसाठी पळा. थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट व भयानक विध्वंस आणीत आहे.
\s5
\q
\v 7 सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.
\q
\v 8 म्हणून स्वत:ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.”
\s5
\q
\v 9 “आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”
\q
\v 10 तेव्हा मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहूदातील आणि यरुशलेममधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हास शांती मिळेल. तलवार तर जिवापर्यंत पोचली आहे.”
\s5
\q
\v 11 त्या वेळेला या लोकांस व यरुशलेमेला असे सांगण्यात येईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वाऱ्याच्या झळा माझ्या लोकांच्या कन्येकडे येतील. तो त्यांना उफळायला किंवा स्वच्छ करायला येणार नाही.”
\q
\v 12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्या आज्ञेवरून येत आहे, आणि मी आता त्यांच्याविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन.
\s5
\q
\v 13 पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.
\q
\v 14 हे यरुशलेमे, तू तारली जावी, म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुऊन काढ. “पाप कसे करावे” हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील?
\q
\v 15 कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे.
\s5
\q
\v 16 “राष्ट्रांना ह्याबद्दल विचार करण्यास लावा. पाहा! यरुशलेमेविरूद्ध घोषीत करा की, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहूदाच्या विरूद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत.
\q
\v 17 शेताचे रक्षण करणारे तसे ते तिच्याभोवती आहेत. कारण तिने माझ्या विरूद्ध बंड केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 18 तूझे मार्ग आणि तुझे कर्म यानी तुला या गोष्टी आणून दिल्या आहेत. ही तुझी दुष्टाई आहे, आणि ती कडू या कारणाने तुझ्या हृदयापर्यंत पोचली आहे.”
\s5
\q
\v 19 माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु:खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.
\q
\v 20 अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.
\s5
\q
\v 21 युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल?
\q
\v 22 कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”
\s5
\q
\v 23 मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता.
\q
\v 24 मी डोंगराकडे पाहिले आणि पाहा! ते कापत होते व सर्व टेकड्या थरथरत होत्या.
\q
\v 25 मी पाहिले आणि पाहा! पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते.
\q
\v 26 मी पाहिले आणि पाहा! फळबागेचे वाळवंट झाले होते आणि सर्व शहरे परमेश्वरा समोर, त्याच्या संतप्त क्रोधासमोर खाली ओढले गेले होते.
\s5
\q
\v 27 परमेश्वर असे म्हणाला: “संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही.
\q
\v 28 या कारणामुळे भूमी शोक करणार आणि वर आकाशे काळोख होतील. कारण मी माझे बेत घोषीत केले आहेत, मी त्यापासून माघार फिरणार नाही.”
\q
\v 29 प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.
\s5
\q
\v 30 आता तू उद्ध्वस्त होशील, तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली, आणि सोन्याच्या दागिण्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण जे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते आता तुझा तिरस्कार करतात. उलट, ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
\q
\v 31 त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”
\s5
\c 5
\s यरुशलेम व यहूदा ह्यांची पापे
\q
\v 1 परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला,
\q तरी मी यरुशलेमेची क्षमा करीन.
\q
\v 2 परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.”
\q
\v 3 हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत.
\q तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.
\s5
\q
\v 4 तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत.
\q ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.
\q
\v 5 म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.”
\q पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.
\q
\v 6 म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील.
\q चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल.
\q कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.
\s5
\q
\v 7 मी या लोकांस का क्षमा करावी?
\q तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या.
\q मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.
\q
\v 8 भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला.
\q
\v 9 तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो,
\q असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?
\s5
\q
\v 10 तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस.
\q तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.
\q
\v 11 कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 12 त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही,
\q अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
\q
\v 13 संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.”
\s5
\q
\v 14 यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तू हे बोलला याकारणास्तव पाहा,
\q मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील.
\q
\v 15 पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो,
\q ते शक्तिशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत.
\q किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.
\s5
\q
\v 16 त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.
\q
\v 17 तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील,
\q ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील.
\q त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.”
\s5
\q
\v 18 “पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 19 हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”
\s5
\q
\v 20 याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.
\q
\v 21 मूर्ख लोकांनो, जे तुम्हास डोळे असून पाहत नाही व कान असून ऐकत नाही ते तुम्ही हे ऐका.
\q
\v 22 परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय?
\q मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये.
\q जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.
\s5
\q
\v 23 पण हे लोक दुराग्रही हृदयाचे आहेत, जे बंडखोर होऊन दूर गेले आहे.
\q
\v 24 यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.
\q
\v 25 तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.
\s5
\q
\v 26 कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात.
\q ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.
\q
\v 27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.
\q
\v 28 ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.
\q
\v 29 परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का?
\q “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?
\s5
\q
\v 30 देशात अत्याचार व भयानक घटना घडल्या आहेत.
\q
\v 31 भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत.
\q आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”
\s5
\c 6
\s यरुशलेम व यहूदा ह्यांचा ऱ्हास
\p
\v 1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका.
\q बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
\q
\v 2 सियोनेची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे.
\q
\v 3 मेंढपाळ आणि त्यांचे कळप तिच्याकडे जातील.
\q ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वत:च्या हाताने कळपाची काळजी घेतील.
\s5
\q
\v 4 “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु.
\q हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.
\q
\v 5 तर आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु या व तिच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
\s5
\q
\v 6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “झाडे कापा आणि यरुशलेमविरूद्ध मोर्चा बांधा.
\q या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
\q
\v 7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते.
\q तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दु: ख सदोदीत माझ्या समोर आहे.
\q
\v 8 यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन,
\q आणि तुला ओसाड असे करीन, जेथे कोणीही राहू शकणार नाही.”
\s5
\q
\v 9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”
\q
\v 10 मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही.
\q पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे.
\s5
\q
\v 11 म्हणून मी परमेश्वराच्या रागाने भरलो आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओतणार आहे.
\q पुरुष व त्याची पत्नी असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
\q
\v 12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील त्यांची शेते व त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना दिल्या जातील.
\q मी माझा हात उगारून देशातील रहिवाश्यांवर हल्ला करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 13 “कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात.
\q भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.
\q
\v 14 आणि शांती नसता, शांती, शांती, असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे.
\q
\v 15 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही.
\q यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 16 परमेश्वर असे म्हणतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा.
\q चांगल्या रस्त्याची चौकशी करा, नंतर त्याच चाला आणि तुमच्या जीवा करता विसाव्याची जागा शोधा.”
\q पण तुम्ही लोक म्हणाला, आम्ही जाणार नाही.
\q
\v 17 रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले.
\q पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.
\q
\v 18 यास्तव राष्ट्रांनो, ऐका! पाहा, त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात.
\q
\v 19 हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन.
\q कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे.
\s5
\q
\v 20 परमेश्वर म्हणतो, “शेबाहून धूप आणि दूरवरच्या देशातून गोड सुगंध माझ्या काय कामाचा?
\q तुमची होमार्पणे आणि यज्ञ मला मान्य नाहीत.”
\q
\v 21 यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “मी या लोकांविरूद्ध अडखळणे ठेवीन. त्यावर वडील व मुले अडखळून पडतील. राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील.”
\q
\v 22 परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे.
\q पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
\s5
\q
\v 23 ते धनुष्य आणि भाला उचलतील. ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जने सारखा आहे.
\q आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरूषांप्रमाणे विशिष्ट रचना करूण ते घोड्यांवरून स्वारी करतात.”
\q
\v 24 त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
\s5
\q
\v 25 बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका.
\q कारण शत्रूची तलवारी आणि धोका सगळीकडे आहे.
\q
\v 26 माझ्या लोकांच्या कन्ये, शोकवस्त्रे घाल आणि राखेत लोळ, एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत कर.
\q कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल.
\s5
\q
\v 27 “यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा.
\q
\v 28 ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात.
\q ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.
\q
\v 29 भाता जळाला आहे, अग्नीतून शिसे जळून निघाले आहे,
\q ते स्वत:ला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत.
\q
\v 30 त्यांना ‘टाकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. कारण परमेश्वराने त्यांना नाकारले आहे.”
\s5
\c 7
\s आपली वागणूक व कृृती सुधारा
\p
\v 1 यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले:
\v 2 यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!
\s5
\v 3 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन
\v 4 “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस.
\s5
\v 5 कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला,
\v 6 जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस,
\v 7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन.
\s5
\v 8 पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही.
\v 9 तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल,
\v 10 मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल.
\v 11 ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 12 तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा.
\v 13 इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.
\v 14 म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.
\v 15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन.
\s मूर्तिपूजेमुळे देवाचा क्रोध
\s5
\p
\v 16 यिर्मया, तुला सांगतो, या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी याचना व आळवणीहि करु नकोस किंवा त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. कारण मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही.
\v 17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरुशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?
\v 18 मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.
\s5
\v 19 परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी.
\v 20 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी या जागेवर माझा संताप मनुष्यांवर, प्राण्यांवर, झाडांवर आणि पिकांवर येईल, तो जाळून टाकणार आणि कोणीही तो विझवू शकणार नाही.”
\s बंडखोरीबद्दल यहूदाला शिक्षा
\s5
\p
\v 21 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा.
\v 22 कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्या कडे काहीएक मागीतले नाही, मी त्यांना होमार्पणे आणि यज्ञ यांबद्दल आज्ञा दिली नाही.
\v 23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल.
\s5
\v 24 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.
\v 25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले.
\v 26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते
\s5
\v 27 “तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत.
\v 28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग. ज्या राष्ट्रांने परमेश्वराचे म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही, ते हेच आहे. सत्यता ही त्यांच्या मुखातून छेदून टाकलेली आहे.
\s5
\q
\v 29 हे यरुशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जाऊन शोकगीत गा.
\q कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे.
\v 30 कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे.” त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.
\s5
\p
\v 31 आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत:च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही.
\v 32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील.
\s5
\v 33 प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल.
\v 34 यहूदाच्या गावांतील व यरुशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”
\s5
\c 8
\p
\v 1 परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.
\v 2 आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
\v 3 आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ते जिवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो.
\s पाप व न्याय
\s5
\p
\v 4 तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय?
\q
\v 5 तर मग यरुशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत?
\q ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.
\s5
\q
\v 6 मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत.
\q जो असे म्हणतो, मी काय केले? असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.
\q
\v 7 आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे
\q पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
\s5
\q
\v 8 आमच्याजवळ परमेश्वरा ची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता?
\q कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.
\q
\v 9 शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत.
\q पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले?
\q
\v 10 म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन.
\q कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजका पर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.
\s5
\q
\v 11 काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.
\q
\v 12 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 13 परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकीन, द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.
\s5
\q
\v 14 आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू
\q परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.
\q
\v 15 आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही.
\q तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.
\s5
\q
\v 16 त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे.
\q कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.
\q
\v 17 कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन.
\q त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो,
\s यहूदा व यरुशलेमसाठी शोक
\s5
\q
\v 18 माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.
\q
\v 19 पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दुर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय?
\q किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.
\s5
\q
\v 20 “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”
\q
\v 21 माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.
\q
\v 22 गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय?
\q मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.
\s5
\c 9
\q
\v 1 जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते
\q तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.
\q
\v 2 जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो,
\q कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.
\q
\v 3 कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत.
\q ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.
\s5
\q
\v 4 तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका?
\q कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.
\q
\v 5 प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही.
\q त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.
\q
\v 6 तू आपल्या कपटा मध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 7 यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन.
\q कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू?
\q
\v 8 त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात.
\q प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.
\q
\v 9 या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 10 मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन.
\q कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही.
\q आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.
\q
\v 11 म्हणून मी यरुशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल.
\q मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
\s नाश व हद्दपार होण्याचे भय
\q
\v 12 या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय?
\q या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली.
\s5
\q
\v 13 परमेश्वर म्हणाला, “हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला.
\q
\v 14 हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.”
\s5
\q
\v 15 यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन.
\q
\v 16 नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.”
\s5
\q
\v 17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा.
\q प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.
\q
\v 18 त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा.
\q म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.
\s5
\q
\v 19 सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.”
\q
\v 20 तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा.
\q नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.
\s5
\q
\v 21 कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.
\q
\v 22 असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.
\s देवाचे ज्ञान-मानवाचे वैभव
\s5
\q
\v 23 परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी
\q त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”
\q
\v 24 पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो,
\q कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 25 परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत.
\q
\v 26 मिसर, यहूदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणारे, ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन. कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत, आणि इस्राएलाचे सर्व घराणे बेसुनत हृदयाचे आहेत.
\s5
\c 10
\s खोटा देव व खरा देव
\q
\v 1 इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वर जे वचन तुम्हास घोषीत करीत आहे ते ऐका.
\q
\v 2 परमेश्वर असे म्हणतो, “देशांचे मार्ग शिकू नका.
\q आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात.
\s5
\q
\v 3 त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे.
\q
\v 4 नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात.
\q
\v 5 अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांसच त्या वाहून न्याव्या लागतात.
\q तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”
\s5
\q
\v 6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.
\q
\v 7 तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस,
\q कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही.
\s5
\q
\v 8 ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.
\q
\v 9 ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे.
\q ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात.
\q
\v 10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जीवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.
\s5
\q
\v 11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांस पुढील संराष्ट्र द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.
\q
\v 12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.
\q
\v 13 त्याच्या वाणीने आकाशात पाण्याच्या गडगडाट होतो, आणि तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो, आणि आपल्या भांडारातून वारा बाहेर काढतो.
\s5
\q
\v 14 ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात.
\q कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.
\q
\v 15 त्या निरुपयोगी आहेत, खोट्यांचे काम आहेत, त्यांच्या शिक्षेसमयी त्यांचा नाश होईल.
\q
\v 16 पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे.
\q इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.
\s यहूदाची वाताहत
\s5
\q
\v 17 अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा.
\q
\v 18 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन.
\q आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”
\s5
\q
\v 19 माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय!
\q तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
\q
\v 20 माझ्या तंबूचा नाश झाला आणि माझ्या तंबूचे सर्व दोर तुटले आहेत.
\q माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत.
\q माझा तंबू उभारायला एकही मनुष्य उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही मनुष्य शिल्लक नाही.
\s5
\q
\v 21 कारण मेंढपाळ मूर्ख झाले आहेत. ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत.
\q म्हणून त्यांना यश नाही, त्यांचे सर्व कळप विखरले आहेत.
\q
\v 22 बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येेत आहे.
\s5
\q
\v 23 परमेश्वरा, मला माहीत आहे, मनुष्याची वाट ही त्याच्याकडून नाही येत. चालत्या मनुष्यास आपली पावले नीट करता येत नाही.
\q
\v 24 परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.
\q
\v 25 जे राष्ट्र तुला ओळखत नाही आणि जे कुटुंब तुझ्या नामाचा धावा करत नाही, त्यावर तू आपला क्रोध ओत.
\q कारण त्यांनी याकोबाचा विनाश केला आहे आणि त्यास खाऊन टाकले आहे, त्यांनी त्यास क्षीण केले आहे. त्याची वस्ती ओसाड केली आहे.
\s5
\c 11
\s मोडलेला करार
\p
\v 1 यिर्मयाला परमेश्वराकडून मिळालेले वचन, ते म्हणाले:
\v 2 “यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.
\s5
\v 3 त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.
\v 4 तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
\v 5 तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे करीन, दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.” तेव्हा मी म्हणालो होय, परमेश्वरा!
\s5
\v 6 परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.
\v 7 कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.
\v 8 पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”
\s5
\v 9 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरुशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.
\v 10 ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
\s5
\v 11 म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.
\v 12 यहूदातील शहरे व यरुशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
\v 13 कारण यहूदा तुझ्या नगरा इतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बाल देवाच्या वेद्या, बाल देवाच्या धूप वेद्या, यरुशलेमामधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.
\s5
\v 14 यिर्मया, तू या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी विनंती करु नकोस. कारण जेव्हा ते दु:खात माझा धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकणार नाही.
\q
\v 15 “माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत?
\q कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”
\q
\v 16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते.
\q पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.
\s5
\q
\v 17 कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”
\s यिर्मयाविरुद्ध कट
\s5
\q
\v 18 परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.
\q
\v 19 ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”
\q
\v 20 पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस.
\q तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.
\s5
\p
\v 21 अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”
\v 22 यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.
\v 23 त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”
\s5
\c 12
\s यिर्मयाची तक्रार व देवाचे उत्तर
\p
\v 1 परमेश्वरा, मी तुझ्याकडे वादविवाद घेऊन येतो, तू नितीमान ठरतोस,
\q मी निश्चितपणे माझ्या तक्रारीचे कारण तुला सांगितले पाहिजे. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? सर्व जे अविश्वासू लोक ते यशस्वी आहेत.
\q
\v 2 तू त्यांना लावले आणि ते मुळावले. ते वाढतात आणि फळे देतात.
\q तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस.
\s5
\q
\v 3 पण, परमेश्वरा, तू मला जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाला पारखतोस.
\q कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना तयार कर.
\q
\v 4 किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल?
\q त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशु व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”
\s5
\q
\v 5 कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील?
\q जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील?
\q
\v 6 कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्याविरूद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्याचविरूद्ध आवाज उठवीत आहे.
\q जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”
\s5
\q
\v 7 “मी माझे घर सोडले आहे, मी माझे वतन टाकले आहे.
\q मी माझे प्रिय लोक तीच्या वैऱ्यांच्या हाती दिले आहे.
\q
\v 8 माझे स्वत:चे वतन मला जंगलातील सिंहाप्रमाणे झाले आहेत.
\q तीने आपला आवाज माझ्याविरूद्ध केला, म्हणून मी तीचा द्वेष केला आहे.
\q
\v 9 माझे वतन मला तरस आहे, आणि पक्षी तिच्याभोवती घिरट्या घालत आहेत.
\q जा आणि भूमीवरील सर्व जीवंत प्राण्यांना गोळा करा, आणि त्यांनी खाऊन टाकावे म्हणून त्यास आण.
\s5
\q
\v 10 पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे,
\q त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.
\q
\v 11 त्यांनी तीला उजाड केले आहे, मी तीच्या करीता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे.
\q सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही.
\s5
\q
\v 12 नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणाहून आले आहेत,
\q कारण परमेश्वराची तलवार एका सीमेपासून देशाच्या तुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे.
\q कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी देशात सुरक्षितता नाही.
\q
\v 13 त्यांनी गहू पेरला पण काटेरी झाडांची कापणी केली, त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही.
\q परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील.”
\s5
\p
\v 14 परमेश्वर माझ्या सर्व शेजाऱ्यांविरूद्ध असे म्हणतो. जे वतन मी आपल्या इस्राएल लोकांस वतन म्हणून दिले त्यास जे दुष्ट शेजारी हात लावतात, पाहा! त्यांना मी त्याच्या भूमीतून उपटून काढीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून काढीन.
\v 15 पण अशा रीतीने त्यांना उपटून काढल्यानंतर असे होईल की परतून त्यांच्यावर दया करीन, आणि मी प्रत्येकाल्या त्याच्या वतनास आणि प्रत्येकाला त्याच्या देशास परत आणीन.
\s5
\v 16 असे होईल की जशी त्यांनी माझ्या लोकांस बालमूर्तीची शपथ वाहायला शिकवली तशी, परमेश्वर जिवंत आहे, अशी माझ्या नावाची शपथ वाहायला जर ते माझ्या लोकांचे मार्ग मन लावून शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये बांधण्यात येतील.
\v 17 पण जर कोणी ऐकत नाही, तर ते राष्ट्र मी समुळ उपटून टाकीन आणि ते नष्ट करीन, परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\c 13
\s खराब कमरबंदावरून धडा
\p
\v 1 परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”
\v 2 तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले.
\v 3 नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे,
\v 4 “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”
\v 5 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले.
\s5
\v 6 पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.”
\v 7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला.
\s5
\v 8 तेव्हा परमेश्वराचे वचन मजकडे पुन्हा आले व म्हणाले.
\v 9 परमेश्वर असे म्हणतो, “याचप्रकारे मी यहूदाचा आणि यरुशलेमेचा अहंकारी नष्ट करीन.
\v 10 हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.
\v 11 कारण जसा कमरबंध मनुष्याच्या कमरेभोवती लपेटलेला असतो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे, ते लोक माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी त्यांना आपणास लपेटलेले आहे. पण ते माझे ऐकावयाचे नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
\s भरलेल्या सुरयांवरून धडा
\s5
\p
\v 12 “यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल. तेव्हा ते तुला म्हणतील प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय?
\v 13 मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदाच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरुशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन.
\v 14 मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 15 ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
\s पश्चात्ताप न केल्यास यहूदाला बंदिवास
\q
\v 16 त्याने अंधकार पसरवीण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्याआधी,
\q आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करून ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या.
\q
\v 17 म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन.
\q माझे डोळे खात्रीने अश्रु गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.
\s5
\q
\v 18 राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा,
\q कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.
\q
\v 19 नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तीच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.
\s5
\q
\v 20 आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा.
\q त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?
\q
\v 21 ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील?
\q जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?
\s5
\q
\v 22 तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?”
\q हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे.
\q
\v 23 कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय?
\q त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.
\q
\v 24 यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील.
\s5
\q
\v 25 हेच तुला माझ्याकडून देण्यात आले आहे, तुझा घोषीत केलेला वाटा,
\q कारण तू मला विसरली आहे आणि खोट्यावर विश्वास ठेवला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 26 यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
\q
\v 27 तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोेंगरावर मी पाहिली आहेत, हे यरुशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?
\s5
\c 14
\s अवर्षणाविषयी संदेश
\p
\v 1 परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले:
\q
\v 2 “यहूदा शोक करो, तीची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत,
\q त्यांचे यरुशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.
\q
\v 3 त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात,
\q म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
\s5
\q
\v 4 ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भुमीवर कोठेही पाणी नाही.
\q म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे.
\q
\v 5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.
\q
\v 6 उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात,
\q त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.
\s5
\q
\v 7 जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर.
\q कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.
\q
\v 8 इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले.
\q तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?
\q
\v 9 जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस?
\q कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.”
\s5
\q
\v 10 परमेश्वर या लोकांस असे म्हणतो: त्यांना भटकने प्रिय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही.
\q यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.
\q
\v 11 परमेश्वर मला म्हणाला, “या लोकांच्या भल्यासाठी तू प्रार्थना करु नकोस.
\q
\v 12 कारण जरी ते उपवास करतील, तरी मी त्यांचे रडने ऐकणार नाही, आणि जरी ते होमार्पण व धान्यार्पण करतील, त्यामध्ये मी आनंद पावणार नाही. कारण तलवार व दुष्काळ आणि रोगराई यांनी मी त्यांचा नाश करीन.”
\s5
\q
\v 13 तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तलवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हास या ठिकाणी खरी सुरक्षीतता देत आहे.”
\q
\v 14 परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही आणि त्यांना अशी कोणतीही आज्ञा केली नाही किंवा त्याच्याशी बोललोही नाही. पण त्यांच्या हृदयातून निघणारे कपट, खोटे दर्शन, व दैवप्रश्न व व्यर्थता हे भविष्य ते तुम्हास सांगतात.
\s5
\v 15 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठवले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात या देशावर तलवार व उपासमार येणार नाही. ते संदेष्टे तलवारीने आणि उपासमारीने मरतील.
\v 16 आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरुशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.
\s5
\q
\v 17 हे वचन त्यांना सांग: माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत.
\q कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप मोठे आहे,
\q तीची जखम मोठी आणि ठीक न होणारी आहे.
\q
\v 18 जर मी रानात बाहेर गेलो तर पाहा, तीथे तलवारीने मारले गेलेले आहेत. आणि जर मी शहराजवळ आलो
\q तर पाहा! दुष्काळाने ग्रासलेले आहेत. कारण दोघेही, याजक आणि संदेष्टे ज्ञान नसल्याने भटकत आहे.”
\s5
\q
\v 19 “काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारले आहे का? तू सियोनचा राग करतोस काय?
\q बरे न होण्या इतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही.
\q आणि बरे होण्याची वाट पाहिली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे.
\q
\v 20 परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले.
\s5
\q
\v 21 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.
\q आठवण कर आणि आम्हा बरोबर तुझा करार तोडू नको.
\q
\v 22 राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय?
\q जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत.”
\s5
\c 15
\s यहूदावरील परमेश्वराचा न शमणारा कोप
\p
\v 1 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.
\v 2 असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे? तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो:
\q जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी,
\q जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत.
\s5
\q
\v 3 मी त्यांना चार गटात सोपवून देईन; मारण्यास तलवार, फाडून टाकण्यासाठी कुत्री, आणि आकाशांतले पक्षी व भूमीवरील पशू, परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 4 पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरुशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.
\s5
\q
\v 5 हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार?
\q तुझी विचारपूस करायला कोण वळणार?
\q
\v 6 तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस.
\q म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.
\q
\v 7 म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे.
\q मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे, जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत, तर मी माझ्या लोकांचा नाश करणार
\s5
\q
\v 8 मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन.
\q भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील.
\q
\v 9 आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल.
\q ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तीच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन.
\q परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 10 माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे.
\q मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.
\q
\v 11 परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय?
\q खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन.
\q
\v 12 कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?
\s5
\q
\v 13 मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन,
\q ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत.
\q
\v 14 तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन.
\q कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल.
\s यिर्मयाला परमेश्वराचे आश्वासन
\s5
\q
\v 15 परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे.
\q तुझ्या सहनशीलतेत मला दुर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण.
\q
\v 16 मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली.
\q तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 17 लोकांच्या आनंदात आणि जल्लोशांत मी बसलो नाही.
\q तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.
\q
\v 18 माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे?
\q आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?
\s5
\q
\v 19 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील.
\q जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील.
\q लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस.
\q
\v 20 मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 21 कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.”
\s5
\c 16
\s परमेश्वराने केलेल्या लोकांस न्याय
\p
\v 1 परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले, ते म्हणाले. संराष्ट्र आला:
\v 2 तू आपणास पत्नी करून घेऊ नको आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत.
\v 3 कारण या ठिकाणी जन्म घेणाऱ्या मुला आणि मुलींना आणि त्यांच्या आयांना ज्यांनी त्यांना जन्म दिला आणि त्यांचे बाप ज्यांमुळे ते या ठिकाणी जन्माला आले, त्यांना परमेश्वर असे म्हणतो,
\v 4 “ते रोगग्रस्त मृत्यू मरतील, त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही आणि त्यांना पुरले जाणार नाही. ते शेणखताप्रमाणे जमिनीवर असतील. कारण ते लोक तलवारीने आणि उपासमारीने नष्ट होतील. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व भूमीवरील प्राण्यांस आहार असे होतील.”
\s5
\v 5 कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ जाऊ नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत, असेे परमेश्वर म्हणतो.
\v 6 म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.
\s5
\v 7 मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
\v 8 ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात त्यांच्यासोबत तू खायला व प्यायला बसू जाऊ नकोस.
\v 9 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, पाहा! तुझ्या डोळ्या देखत मी आनंद आणि उत्सव, नवऱ्याचा आणि नवरीचा शब्द बंद होणार, असे मी करीन.
\s5
\v 10 आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?
\v 11 तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.
\s5
\v 12 पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो.
\v 13 म्हणून मी तुम्हास देशाबाहेर काढून तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशात घालवून देईन, आणि दिवसरात्र तुम्ही तेथे दुसऱ्या देवांची पुजा कराल, कारण मी तुमच्यावर अनुग्रह करणार नाही.
\s5
\v 14 यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जीवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही.
\v 15 ज्याने इस्राएलाच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली आणि त्या देशात जीथे त्याने त्यांना पांगवले, त्यातूनही काढून वर आणले तो परमेश्वर जीवंत आहे. असे ते म्हणतील आणि त्यांचा जो राष्ट्र मी त्याच्या पूर्वजांना दिला होता त्यामध्ये मी त्यांना परत आणीन.
\s5
\v 16 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांस मासे धरल्यासारखे पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील.
\v 17 कारण माझे डोळे त्यांच्या मर्गावर आहेत, ते माझ्यासमोरुन लपलेले नाहीत. त्यांचे अन्याय माझ्या डोळ्यांपासून लपलेला नाहीत.
\v 18 मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.
\s5
\q
\v 19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षीत स्थान तू आहेस.
\q पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे.
\q जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.”
\q
\v 20 लोक स्वत:साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच.
\q
\v 21 यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन,
\q म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.”
\s5
\c 17
\s यहूदाच्या हृदयपटावर कोरलेले पातक
\q
\v 1 “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे.
\q ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.
\q
\v 2 त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.
\s5
\q
\v 3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.
\q
\v 4 मी दिलेला वारसा तू गमावशील.
\q मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन.
\q कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.”
\s5
\q
\v 5 परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो,
\q जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दुर आहे, तो शापित असो.
\q
\v 6 कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही.
\q तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहीवासी नसलेल्या जागी वस्ती करीन.
\s5
\q
\v 7 परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.
\q
\v 8 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते,
\q तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात.
\q मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.”
\s5
\q
\v 9 हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार?
\q
\v 10 मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास,
\q मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो.
\q
\v 11 अन्यायाने जो श्रिमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे.
\q पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल.
\s5
\q
\v 12 आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे.
\q
\v 13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल.
\q कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे.
\q
\v 14 परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.
\s5
\q
\v 15 पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.”
\q
\v 16 मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती.
\q हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.
\s5
\q
\v 17 तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस.
\q
\v 18 माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो.
\q अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.
\s शबेबाथ पवित्र राखायला हवा
\s5
\p
\v 19 परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरुशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरुशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.
\v 20 त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरुशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
\s5
\v 21 परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरुशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.
\v 22 आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.
\v 23 पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.
\s5
\v 24 असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरुशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो.
\v 25 तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरुशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.
\s5
\v 26 ते सर्व यहूदा आणि यरुशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.
\v 27 पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरुशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरुशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”
\s5
\c 18
\s कुंभारकामावरून धडा
\p
\v 1 यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे, ते म्हणाले:
\v 2 “उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.”
\v 3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता,
\v 4 पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले.
\s5
\v 5 तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले:
\v 6 परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्यांनो, तुमच्याबरोबर या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो, इस्राएलाच्या घराण्यांनो पाहा! जशी माती कुंभाराच्या हातात असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
\v 7 एखाद्यावेळी मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलेल, ते बाहर काढने, फाडून टाकने किंवा नाश करणे असे बोलेल.
\v 8 पण जर ज्या राष्ट्राविषयी मी बोललो, ते आपल्या दुष्कृत्यांपासून फिरले तर मी जे त्यांच्याविषयी करण्याचे योजीले होते त्याबद्दल अनुतापेन.
\s5
\v 9 आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन.
\v 10 पण त्यांनी माझ्या दृष्टीमध्ये वाईट असे केले, तर मी जे चांगले सांगत होतो ते थांबवीन आणि त्यांच्यासाठी मी ते करीन.
\s5
\v 11 तर आता, यहूदाच्या मनुष्यांशी आणि यरुशलेम येथे राहणाऱ्यांना असे सांग, की परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी तुमच्यावर संकटे आणण्याचे पाहत आहे. मी तुमच्याविरुध्द बेत आखत आहे. तेव्हा प्रत्येक आपल्या दुष्ट मार्गाविषयी पश्चाताप करा, आणि आपली मार्गे व आपली कर्मे नीट करा.
\v 12 पण ते म्हणतात, आशा नाही, यास्तव आपण आपल्या योजनांनुसार कार्य करूया. आम्ही प्रत्येक आपल्या दुष्ट हृदयाच्या इच्छेप्रमाणे वागू.
\s5
\q
\v 13 यास्तव परमेश्वर असे म्हणतो: दुसऱ्या राष्ट्रांना विचारा, या अशा गोष्टी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?
\q इस्राएलाच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे.
\q
\v 14 लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय?
\q दुर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?
\s5
\q
\v 15 पण माझे लोक मला विसरले आहेत, ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात आणि आपल्या मार्गात अडखळणे करतात.
\q त्यांनी पूर्वजांच्या जुन्या वाटा सोडून ते आडवळणाने चालतात.
\q
\v 16 यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल.
\q तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.
\q
\v 17 मी त्यांना पुर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यांपुढे उडवीन.
\q त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही तर पाठ दाखवीन.”
\s लोकांची कारस्थाने व यिर्मयाची प्रार्थना
\s5
\p
\v 18 तेव्हा ते लोक म्हणाले, “या आपण यिर्मयाविरूद्ध योजना करु, कारण याजकापासून नियमशास्त्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला, आणि संदेष्ट्यांपासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्यास शब्दांचा मारा देऊ, आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही.”
\q
\v 19 हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे! आणि माझ्या वैऱ्यांचा आवाज ऐक.
\q
\v 20 त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे.
\q त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.
\s5
\q
\v 21 यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.
\q
\v 22 तू त्यांच्यावर अचानक टोळी आणशील तेव्हा त्यांच्या घरातून आरोळी ऐकू येवो,
\q कारण त्यांनी माझ्या पायाकरीता सापळा रचला आहे आणि मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे.
\q
\v 23 परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच.
\q त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस.
\q त्याऐवजी ते तुझ्यासमोरुन फेकले जावोत, तू रागाच्या समयी त्यांच्याविरुद्ध कार्य कर.
\s5
\c 19
\s भांगलेल्या मडक्यावरून धडा
\p
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, “जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.
\v 2 नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तीथे घोषीत कर.
\v 3 तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमेच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा! मी या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिणझिणतील.
\s5
\v 4 मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळवीले आहे. माहित नसलेल्या अशा परक्या दैवतांना त्यांनी या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पुर्वजांनी आणि यहूदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे.
\v 5 यहूदाच्या राजाने बाल दैवतासाठी उच्चासने बांधली त्यामध्ये ते आपल्या मुलांना अग्नीत होमार्पण जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण. आणि असे कधीही माझ्या मनातही आले नाही.
\s5
\v 6 यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोमच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.
\v 7 येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल.
\v 8 या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक तीच्या पीडा पाहून माना हलवतील व फुत्कार सोडतील, मी त्या नगरीला नाश आणि फुत्काराची गोष्ट अशी करीन.
\v 9 त्यांच्या शत्रूंनी आणि त्यांच्या जिवावर टपणारे, जो वेढा आणि यातना त्यांच्यावर आणतील, त्यामध्ये ते स्वत:च्याच मुलांचे आणि मुलींचे मांस खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असे मी त्यांना करीन.
\s5
\v 10 मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.
\v 11 आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.
\s5
\v 12 परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातील राहणारे, ज्यांच्या बाबतीत मी असेच करीन. मी या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.
\v 13 ‘यरुशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयअर्पणे केली.”
\s5
\v 14 मग परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला.
\v 15 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो: पाहा! मी यरुशलेमेवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर सर्व अरिष्ट जे मी बोललो ते आणीन. कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”
\s5
\c 20
\s यिर्मयाला कैद केल्याबद्दल पशहूराला शाप
\p
\v 1 इम्मेराचा मुलगा पशहूर याजक, जो परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. त्याने यिर्मयाने परमेश्वराच्या मंदिरात केलेले भविष्य सांगताना ऐकले,
\v 2 म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.
\s5
\v 3 दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे.
\v 4 कारण परमेश्वर असे बोलला आहे, तू आपणाला व आपल्या सर्व जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना भय असा होशील, कारण तुझ्या त्यांना तू आपल्या डोळ्यांसमोर शत्रूंच्या तलवारीने पडताना पाहशील. मी सर्व यहूदाला बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्यांना तलवारीने कापून काढील.
\s5
\v 5 मी त्यांना या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहूदाच्या राजांची सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. आणि ते ती लूटतील आणि ती घेऊन बाबेलास जातील.
\v 6 पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकांस कैद करून नेतील, आणि तू बाबेलास जाऊन मरशील, आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील.”
\s यिर्मयाचा शोक
\s5
\q
\v 7 परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरच वळलो, तू माझ्यापेक्षा सामर्थी असल्याने तू जिंकलास
\q मी हास्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो.
\q
\v 8 कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो.
\q कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.
\q
\v 9 जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही.
\q पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.
\s5
\q
\v 10 मी बऱ्याच लोकांकडून दहशतवादी अफवा ऐकल्या आहेत. तक्रार, आम्ही तक्रार करणे आवश्यक आहे
\q माझ्या जवळ असणारा प्रत्येकजन, मला पाडण्यास टपला आहे, कदाचित त्यास फसवले जाऊ शकते.
\q तेव्हा आपण त्यास पराभूत करु आणि त्याचा सूड घेऊ.
\q
\v 11 पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील.
\q ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत.
\q कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.
\s5
\q
\v 12 पण तू सेनाधीश परमेश्वर, जो धार्मिकांची पारख करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पाहणाऱ्या,
\q तर मग आता त्यांच्यावर तुझा सुड उगवताना मला पाहू दे, कारण तुझ्या समोर मी आपला वाद प्रकट केला आहे.
\q
\v 13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा.
\q कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे.
\s5
\q
\v 14 मी जन्मलो तो दिवस शापित असो.
\q ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.
\q
\v 15 तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,
\s5
\q
\v 16 परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो.
\q तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.
\q
\v 17 कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते.
\q
\v 18 मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?
\s5
\c 21
\s यरुशलेमेच्या नाशाचे भाकीत
\p
\v 1 यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले,
\v 2 “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.”
\s5
\v 3 यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा,
\v 4 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो पाहा! तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन.
\v 5 मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन.
\s5
\v 6 मी त्या शहरात राहणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराई ने मरतील.
\v 7 परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.
\s5
\v 8 आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो,
\v 9 जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
\v 10 परमेश्वर असे म्हणतो, कारण मी आपले मुख या शहराच्याविरूद्ध चांगल्या साठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. मी बाबेलाच्या राजाला ते देऊन टाकीन. तो ते आगीत भस्मसात करील.
\s यहूदाच्या राजांविरुद्ध भविष्ये
\s5
\p
\v 11 यहूदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका.
\q
\v 12 दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा.
\q जो लूटलेला त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कोणीही विझवू शकणार नाही.
\s5
\q
\v 13 खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे.
\q जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?
\q
\v 14 परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तीच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”
\s5
\c 22
\p
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर:
\v 2 आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको.
\v 3 परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.
\s5
\v 4 कारण जर तुम्ही असे केले, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आत जातील, तो व त्यांचे चाकर व त्याचे लोकही आत जातील.
\v 5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”
\s5
\v 6 कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की,
\q गिलादा प्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन.
\q निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
\q
\v 7 कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे.
\q शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.
\s5
\p
\v 8 “अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल ‘या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?
\v 9 ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”
\s5
\q
\v 10 मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा,
\q कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
\s5
\p
\v 11 कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाणा सोडले आहे आणि तो परत येणार नाही.
\v 12 ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.
\s5
\q
\v 13 जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!
\q
\v 14 जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.”
\q जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!
\s5
\q
\v 15 तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय?
\q तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
\q
\v 16 तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\p
\v 17 पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे,
\q आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.
\q
\v 18 यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की,
\q हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी,
\q असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही.
\q “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.
\q
\v 19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील.
\q ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरुशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”
\s5
\q
\v 20 “लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर.
\q अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.
\q
\v 21 तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही.
\q तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.
\s5
\q
\v 22 वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील.
\q मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे लज्जित व फजीत होशील.
\q
\v 23 जो तू राजा आहेस, तू आपल्या लबानोनाच्या राणात, जे तू गंधसरुमध्ये आपले घरटे करतोस,
\q पण जेव्हा तुला यातनांच्या प्रसूतिवेदना जसे बाळंतपणे होतात, तेव्हा तू कशी केवीलवाणी होशील.”
\s5
\p
\v 24 “परमेश्वर म्हणतो, मी जीवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.
\v 25 कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार.
\v 26 मी, तुला व तुझ्या आईला, जीने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
\s5
\v 27 आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”
\q
\v 28 कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय?
\q कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय?
\q तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत?
\q आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?
\s5
\q
\v 29 हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचे वचन ऐक!
\q
\v 30 परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि:संतान होईल,
\q ‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही
\q आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.”
\s5
\c 23
\s उरलेल्यांचे पुनरागमन
\p
\v 1 “जे मेंढपाळ माझ्या कुरणातून मेंढरांचा नाश आणि त्यांची पांगापंग करीत आहेत,” त्यांना हाय हाय! परमेश्वर असे म्हणतो,
\v 2 यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांस चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 3 “मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता, त्यास एकत्र करणार, आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील.
\v 4 मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 5 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! असे दिवस येत आहेत. “मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन.”
\q तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.
\q
\v 6 त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील.
\q आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे ‘परमेश्वर आमचे न्यायीपण’
\f + यहोवा-सिदकेनू
\f* असे असेल.
\s5
\p
\v 7 यास्तव परमेश्वर असे म्हणतो. पाहा! असे दिवस येत आहेत ज्यात, ज्या परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस मिसर देशातून बाहेर आणले, तो जीवंत आहे असे म्हणणार नाहीत.
\v 8 उलट ते असे म्हणतील, परमेश्वर जीवंत आहे, ज्याने इस्राएलाच्या वंशांना उत्तरेकडील देशातून आणि सर्व देशात ज्यात त्यांना घालवले होते, त्यातून बाहेर काढून वर चालवून आणले, असे म्हणतील.
\s खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
\s5
\q
\v 9 संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनांमुळे,
\q माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे.
\q ज्यावर द्राक्षारस हावी झाले आहे,
\q
\v 10 कारण व्यभिचाऱ्यांनी राष्ट्र भरला आहे, यास्तव राष्ट्र शोक करीत आहे.
\q रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदेष्ट्यांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांची शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.
\s5
\q
\v 11 कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 12 यास्तव त्यांच्या मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील.
\q कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बाल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले.
\q आणि त्यांनी इस्राएलाच्या लोकांस चूकीच्या मार्गास नेले.
\q
\v 14 आणि मी यरुशलेमामधल्या संदेष्ट्यांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. त्यांनी व्यभिचार केला आणि दुष्टतेत चालले.
\q ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणीही आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत.
\q ते सर्व मला सदोमा सारखे आणि तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झाले आहेत.”
\q
\v 15 यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणि विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.”
\q कारण यरुशलेमेतल्या संदेष्ट्यांकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे.
\s5
\q
\v 16 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका.
\q त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात.
\q
\v 17 माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे,
\q आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.
\q
\v 18 पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्याचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दांकडे लक्ष देऊन कोण ऐकेल?
\s5
\q
\v 19 पाहा! परमेश्वराकडून वादळ येत आहे. त्याचा राग बाहेर जात आहे, आणि ती क्रोधाच्या वादळाची भोवळ आहे.
\q ती दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.
\q
\v 20 परमेश्वराने आपल्या हृदयातील हेतू सिद्धीस नेई पर्यंत, त्याचा राग परतणार नाही.
\q शेवटल्या दिवसात तुम्हास हे समजेल.
\s5
\q
\v 21 मी त्या संदेष्ट्यांना पाठवले नाही, पण तेच संराष्ट्र द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने भविष्य करतात.
\q
\v 22 कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते, तर ते माझ्या लोकांस माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते.
\q त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून आणि कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.”
\s5
\q
\v 23 परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?”
\q
\v 24 परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो म्हणजे मी त्यास पाहू शकणार नाही?
\q मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय?
\s5
\p
\v 25 संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे.
\v 26 संदेष्ट्ये जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार?
\v 27 हे संदेष्टे, ऐकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकांस माझ्या नामाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे ह्यांचे पूर्वज बालामुळे माझे नाव विसरले.
\s5
\v 28 संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे.
\q गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 29 माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय?
\q
\v 30 परमेश्वर असे म्हणतो “म्हणून पाहा! मी खोट्या संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात आणि म्हणतात ते माझ्याकडून आले आहेत.
\s5
\p
\v 31 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात.
\v 32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी त्या संदेष्ट्यांविरूद्ध जे फसवे स्वप्ने सांगतात, म्हणजे ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व बढाईने माझ्या लोकांस चुकीच्या मार्गांने नेतात. कारण लोकांस शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकांस खचित मदत करु शकत नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 33 “जेव्हा हे लोक व संदेष्टे किंवा याजक तुला विचारतील की ‘परमेश्वराने काय घोषणा केली आहे? तेव्हा तू त्यांना सांग, कोणती घोषणा? कारण मी तुम्हास टाकले आहे, परमेश्वर असे म्हणतो.
\v 34 आणि संदेष्टे व याजक किंवा जो कोणी म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे. मी त्यास व त्याच्या सर्व घराण्याला शिक्षा करीन.
\s5
\v 35 तुम्ही प्रत्येक आपल्या भावाला आणि आपल्या शेजाऱ्यास असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले? किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?
\v 36 पण तुम्ही कधीही परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करुच नका, कारण प्रत्येकाला आपापलेच वचन ओझे असे होईल, कारण जीवंत देव, सेनाधीश परमेश्वर, आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत.
\s5
\v 37 तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?
\v 38 आणि ‘परमेश्वराची घोषणा काय आहे? असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हास म्हणेल, तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा असे म्हणू नेय. हे शब्द वापरु नका असे मी बजावले.
\v 39 म्हणून मी तुम्हास व जे नगर मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले ते मी आपल्या समक्षतेपासून दुर फेकून देणार.
\v 40 मी तुम्हावर कधीही विसरु शकणारी अप्रतिष्ठित आणि बदनामी ही आणीन.”
\s5
\c 24
\s चांगल्या आणू वाईट अंजिरांवरून धडा
\p
\v 1 परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरुशलेममधून बाबेलला नेले)
\v 2 एका टोपलीत खूप चांगली अंजीर होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजीर होती. ती खाण्यालायक नव्हती.
\v 3 परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजीर पाहिली. चांगली अंजीर फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजीर फारच नासकी आहेत. ती खाण्यासारखी नाहीत.”
\s5
\v 4 नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले,
\v 5 परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “या चांगल्या अंजीरासारखे यहूदा जे कैद करून नेलेले मी स्थानातून खास्द्यांच्या देशात त्यांच्या हितासाठी पाठवले आहे, त्यांच्याकडे मी पाहीन.
\v 6 मी आपले डोळे त्यांच्या चांगल्या करीता लावेन आणि त्यांना या देशात प्रस्थापीत करीन. मी त्यांना खाली पाडणार नाही तर त्यांना बांधीन, मी त्यांना लावीन व उपटनार नाही.
\v 7 मला ओळखण्याचे हृदय मी त्यांना देईल, मग मी परमेश्वर आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. ते सर्व अंत:करणापासून माझ्याकडे परत येतील.
\s5
\p
\v 8 पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी त्याना मी सोडून देईन, असे परमेश्वर म्हणतो.
\v 9 मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील.
\v 10 मी त्यांच्याविरुद्ध तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठवीन, मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत असे करीन.”
\s5
\c 25
\s बाबेलमुळे सत्तर वर्षे वाताहत
\p
\v 1 यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाकडे आलेले वचन, ते असे, यहूदाचा राजा योशीया, याचा मुलगा, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या पाहिल्या वर्षात,
\v 2 यहूदा लोकांस आणि यरुशलेमधील राहणाऱ्यांना यिर्मया संदेष्ट्याने पुढील संराष्ट्र घोषीत केला:
\s5
\v 3 यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही.
\v 4 परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठवले, ते बाहेर जाण्यासाठी उत्सुक होते, पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.
\s5
\v 5 ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा.
\v 6 म्हणून दुसऱ्या दैवतांना अनुसरायला आणि त्यांना पाया पडायला त्यांच्या मागे जाऊ नका आणि तुम्ही त्यास आपल्या हातांच्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे काही वाईट करणार नाही.”
\s5
\v 7 परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही माझे ऐकले नाहीत, आणि तुम्हावर अरिष्ट यावे म्हणून तुम्ही आपल्या हातांच्या कामाने मला राग आणून दिला.”
\v 8 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही.
\v 9 म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.
\s5
\v 10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन.
\v 11 आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील.
\s5
\v 12 परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.
\v 13 आणि त्या देशाविरूद्ध जी काही वचने मी बोललो, म्हणजे जे काही या पुस्तकात लिहीले आहे, जे सगळ्या राष्ट्रांविषयी यिर्मयाने भविष्य सांगितले ते मी त्यांच्यावर आणीन.
\v 14 त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.
\s राष्ट्रांसाठी संतापरूप प्याला
\s5
\p
\v 15 कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षारस प्यायला लाव.
\v 16 कारण ते हा द्राक्षारस पितील आणि जी तलवार मी त्यांच्यामध्ये पाठवीन तिच्यामुळे ते मागेपुढे डोलतील व वेड्याप्रमाणे वागतील.”
\s5
\v 17 मग मी परमेश्वराच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी प्यायला लावला.
\v 18 यरुशलेम, यहूदा शहर आणि तिच्यातील राजे आणि नेते यांना मी तो प्याला दिला, म्हणजे वैराण, विस्मय व वाळवंट, आणि फुत्कार व शाप असे होतील.
\s5
\v 19 दुसऱ्या राष्ट्रांनाही तो प्यावा लागेल, मी मिसरच्या राजा फारो, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्याच्या सेवकांना, आणि त्याच्या लोकांस,
\v 20 मी सर्व मिश्रित लोक, अरब व ऊस देशातील राजे, पलिष्ट्यांच्या देशातील सर्व राजे, अष्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षारस पिण्यास भाग पाडले.
\v 21 आणि अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षारस प्यायला लावले.
\s5
\v 22 आणखी सोरच्या व सीदोनाचे सर्व राजे, समूद्राच्या दुसऱ्या बाजूस असणारे सर्व राजे,
\v 23 आणि ददान, तेमा व बूज केसांच्या या कडा कापलेले सर्व लोक,
\s5
\v 24 अरबस्तानातील सर्व राजे, व जे मिश्रित लोक रानांत राहतात त्यांचे सर्व राजे,
\v 25 आणि जिमरी, एलाम व माद्य येथील सर्व राजे,
\v 26 उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळचे राजे या सर्वांना, या पृथ्वीवर असणारे सर्व, आपल्या राज्यांसहीत, भावांसहीत, त्या सर्वांना मी तो प्याला प्या प्यायला लावला आहे. पण बाबेलचा राजा, त्या सर्वांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.
\s5
\v 27 “परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया, तू त्यांना असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो: प्या आणि त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा, पडा आणि मी पाठवत असलेली तलवार येण्यापर्यंत परत उठू नका.
\v 28 मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच.
\v 29 कारण पाहा! माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरावर जर मी आपत्ती आणत आहे, तर तुम्हास शिक्षा होणार नाही असे कसे? तुमची सुटका होणार नाही, कारण मी पृथ्वीवरील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तलवारीला पाठवणार आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 30 “तर यिर्मया, तू त्यांना हे भविष्यवचन सांग, त्यांना बोल:
\q परमेश्वर उंचावरुन गर्जना करतो, आणि त्याच्या पवित्र मंदिरातून आपला शब्द उच्चारील,
\q तो त्याच्या कळपाविरूद्ध गर्जना करील. द्राक्षारस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, तसा, देशाच्या सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तो ओरडेन.
\q
\v 31 तो आवाज पृथ्वीच्या शेवटापर्यंत येणार, कारण परमेश्वराचा विवाद राष्ट्रांविरूद्ध आहे, तो त्यांचा न्यायनिवाडा करणार. आणि तो सर्व देहावर न्यायव्यवस्था चालवणार. दुष्टांना तो तलवारीस देणार.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 32 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार,
\q आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.”
\q
\v 33 आणि जे परमेश्वरापासून मारले गेले, त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पसरतील. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही किंवा ती गोळा करणार नाही आणि पुरणारही नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
\s5
\q
\v 34 मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा.
\q कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.
\q
\v 35 मेंढपाळांना लपायला कोठेही आश्रय राहणार नाही. आणि कळपातील धन्यांना सुटता येणार नाही.
\q
\v 36 मग मेंढपाळांच्या दुःखाचे रडणे आणि कळपाच्या धन्याचा विलाप तीथे असेल.
\q कारण परमेश्वर त्यांच्या कळपाचा विनाशक झाला आहे.
\s5
\q
\v 37 त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा,
\q
\v 38 जसा गुहेत राहणाऱ्या तरुन सिंहाप्रमाणे, ज्याने आपली गुहा सोडली आहे त्याप्रमाणे असेल.
\q कारण पीडणाऱ्या तलवारींमुळे व त्याच्या संतप्त क्रोधामुळे त्यांचा देश ओसाड झाला आहे.
\s5
\c 26
\s यिर्मयाला मृत्यूची भीती
\p
\v 1 योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले,
\v 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.
\v 3 कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.
\s5
\v 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे,
\v 5 जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही.
\v 6 तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”
\s5
\v 7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले.
\v 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील!
\v 9 शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
\s5
\v 10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.
\v 11 नंतर याजक व संदेष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरुशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वत:च्या कानांनी ऐकलेच आहे.”
\v 12 मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.
\s5
\v 13 तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.
\v 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा.
\v 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”
\s5
\v 16 मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला हि वचने घोषीत केली आहे.”
\v 17 नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले,
\s5
\v 18 “ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरुशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”
\v 19 “तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजीले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”
\s5
\v 20 पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.
\v 21 परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला.
\s5
\v 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता,
\v 23 त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले.
\v 24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.
\s5
\c 27
\s जुवांवरून धडा
\p
\v 1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम
\f + सिद्कीया
\f* ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,
\v 2 परमेश्वर मला जे काही म्हणाला, ते हे तू आपल्यासाठी बंधने व जोखड तयार कर. ते आपल्या मानेवर ठेव.
\v 3 मग यरुशलेमेला, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जे दूत येतात त्यांच्या हातून अदोमाच्या राजाकडे व मवाबाच्या राजाकडे, अम्मोन लोकांच्या राज्याकडे, सोराच्या राजाकडे, सीदोनाच्या राजाकडे ती पाठव.
\v 4 त्यांच्या मालकाला सांगण्यासाठी त्यांना आज्ञा कर आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, तुम्ही आपल्या मालकास असे सांगा की,
\s5
\p
\v 5 मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व त्यावरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्यास मी देतो.
\v 6 म्हणून आता, मी सर्व देश बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, माझा सेवक ह्याच्या हाती दिले आहेत. त्याची सेवा करायला मी वन्य प्राणीसुद्धा दिले आहेत.
\v 7 आणि त्याच्या देशाची वेळ येईपर्यंत सर्व राष्ट्रे त्याची, त्याच्या मुलाची आणि त्याच्या मुलांच्या मुलांची सेवा करतील. मग अनेक राष्ट्रे व महान राजे त्याच्याकडून आपली सेवा करून घेतील.
\s5
\p
\v 8 म्हणून जे राष्ट्रे आणि राज्ये बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराची सेवा करणार नाही आणि बाबेलाचा राजा याच्या जोखडाखाली आपली मान देणार नाही, त्यास मी त्याच्या हातून नाहीसे करीपर्यंत, तलवारीने, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करीन. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 9 आणि तुम्ही आपले संदेष्टे, आपले ज्योतिषी, आपले स्वप्नद्रष्टे आणि आपले मांत्रिक आणि आपले जादूगार, जे तुम्हास म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, त्यांचे तुम्ही ऐकू नका.
\v 10 कारण मी तुम्हास तुमच्या देशातून दूर न्यावे, कारण मी तुम्हास काढून टाकावे आणि तुम्ही मरावे म्हणून ते खोटे भविष्य सांगतात.
\v 11 “पण जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करील आणि आपली मान त्याच्या जोखडात देईल त्या राष्ट्रांना मी त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि ते तिची मशागत करतील व त्यामध्ये आपली घरे करतील.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 12 म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्यास हा संदेश दिला. “तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.
\v 13 जे राष्ट्र बाबेलाच्या राजाची सेवा करण्यास नकार देतील, त्याविषयी परमेश्वराने जसे जाहीर केले तसे तू आणि तुझे लोक तलवारीने, दुष्काळाने व मरीने का मरता?
\s5
\p
\v 14 जे कोणी संदेष्टे तुम्हाशी बोलतात आणि म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, कारण ते तुम्हास खोटे भविष्य सांगतात.
\v 15 कारण परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना बाहेर पाठवले नाही. ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात यासाठी की, मी तुम्हास बाहेर काढून टाकावे आणि तुम्ही व जो कोणी संदेष्टा तुम्हास भविष्य सांगतो त्या दोघांनी नष्ट व्हावे.”
\s5
\p
\v 16 मी याजकांना व सर्व लोकांस बोललो, आणि म्हणालो, “परमेश्वर असे म्हणतो, जे कोणी तुमचे संदेष्टे तुम्हास भविष्य सांगतात व म्हणतात, पाहा, परमेश्वराच्या मंदिरातील वस्तू बाबेलाहून आता परत लवकरच आणल्या जातील, ते तुम्हास ते खोटे भविष्य सांगतात. म्हणून त्यांची वचने ऐकू नका.
\v 17 त्यांचे ऐकू नका. तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करा व जिवंत रहा. या नगराची नासाडी का व्हावी?
\v 18 जर ते खरेच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरेच परमेश्वराकडून वचन मिळाले असेल, परमेश्वराच्या मंदिरात व यहूदाच्या राजाच्या घरात व यरुशलेमेमध्ये ज्या वस्तू उरल्या आहेत, ती बाबेलास जाऊ नयेत, म्हणून त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करावी.”
\s5
\p
\v 19 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जे खांब व जो ओतीव समुद्र व ज्या बैठकी व बाकीची पात्रे या नगरात उरली आहेत,
\v 20 म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या.
\s5
\v 21 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, परमेश्वराच्या मंदिरात आणि यहूदाच्या राज्याच्या घरात व यरुशलेमेमध्ये अजून राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल हे म्हणतो,
\p
\v 22 “त्या बाबेलास नेण्यात येतील आणि मी त्यांची पाहणी करीन त्या दिवसापर्यंत त्या तेथेच राहतील.” “नंतर त्या मी परत घेऊन येईन आणि त्या पुन्हा त्याच जागेवर ठेवीन.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 28
\s हनन्याचे खोटे भविष्य
\p
\v 1 मग त्याच वर्षी असे झाले की, यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अज्जूरचा मुलगा हनन्या संदेष्टा, जो गिबोनाकडचा होता, परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकांसमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, बाबेलाच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे.
\s5
\p
\v 3 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन.
\v 4 यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.
\s5
\p
\v 5 जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला,
\v 6 यिर्मया संदेष्टा म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली सर्व वचने, जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत, ती खरी होवोत.
\v 7 जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.
\s5
\p
\v 8 माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, त्यांनीसुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राज्यांविषयी, लढायांविषयी, दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते.
\v 9 जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.”
\s5
\p
\v 10 परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले.
\v 11 मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.
\s5
\p
\v 12 जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
\v 13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन.
\v 14 कारण मी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे, ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्यास शेतातील वन्यपशूंवरही अधिकार देईन.”
\s5
\p
\v 15 नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.
\v 16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”
\v 17 आणि त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्या मेला.
\s5
\c 29
\s यिर्मयाचे बंदिवान लोकांस पत्र
\p
\v 1 बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरुशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठवले.
\v 2 राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमेचे नेते, व कारागीर हे यरुशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.
\v 3 ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले.
\s5
\v 4 पत्रात असे म्हटले, ज्यांना मी यरुशलेमेहून कैद करून बाबेलास नेण्यास लावले त्या सर्वांना सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे सांगतो,
\v 5 “घरे बांधून त्यामध्ये राहा. बागे लावा आणि त्याचे फळ खा.
\s5
\v 6 स्त्रिया करा, आणि मुलाला व मुलीला जन्म द्या, नंतर आपल्या मुलांसाठी स्त्रिया करून द्या आणि तुमच्या मुलींना नवरे करून द्या. त्यांनी मुलांना व मुलींना जन्म द्यावा. तेथे तुम्ही वाढा, कमी होऊ नका.
\v 7 मी ज्या नगरांत तुम्हास बंदिवान करून न्यायला लावले त्याच्या शांतीसाठी झटा आणि त्यांच्यावतीने माझ्याबरोबर मध्यस्थी करा. कारण त्यांच्या शांतीत तुमची शांती आहे.”
\s5
\p
\v 8 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “तुमच्यामध्ये असलेले तुमचे संदेष्टे आणि ज्योतिषीह्न्जी यांनी तुम्हास फसवू नये आणि तुम्ही ज्यास आपली स्वप्ने पाहण्यास लावता त्याचे तुम्ही ऐकू नका.
\v 9 कारण ते माझ्या नामाने लबाड भविष्य सांगतात. मी त्यांना बाहेर पाठविले नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 10 कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.
\v 11 कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
\s5
\p
\v 12 मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन.
\v 13 कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन.
\v 14 परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 15 “कारण तुम्ही म्हटले आहे की, परमेश्वराने आम्हासाठी बाबेलामध्ये संदेष्टे उत्पन्न केले आहेत.”
\v 16 दावीदाच्या सिंहासनावर जो बसला आहे त्याच्याविषयी आणि जे लोक त्या नगरात राहतात, तुमचे बांधव जे बंदिवासात तुमच्याबरोबर बाहेर गेले नाहीत, त्या सर्वांविषयी परमेश्वर म्हणतो,
\v 17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ आणि आजार पाठवीन. कारण मी त्यांना कुजलेल्या अंजिरासारखे करीन जे खाण्याससुद्धा घाणेरडे असते.
\s5
\p
\v 18 आणि मी त्यांचा तलवार, दुष्काळ आणि मरीने पाठपुरावा करीन आणि पृथ्वीवरील सर्व राज्याच्या दृष्टीने दहशत पोहचेल असे मी त्यांना करीन. मी त्यांना ज्या राष्ट्रात विखरविले आहे तेथे भयंकर भीती, शाप व निंदा व उपहास या गोष्टींचे ते विषय होतील.
\v 19 परमेश्वर असे म्हणतो, याचे कारण हे आहे की, मी आपले सेवक संदेष्टे यांच्याद्वारे माझी वचने पाठवली, तरी त्यांनी माझे ऐकले नाही. मी वारंवार त्यांना पाठवले पण तुम्ही ऐकले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 20 “तर बंदिवानानो ज्या तुम्हास यरुशलेमेहून बाबेलास पाठविले ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.”
\p
\v 21 कोलायाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया, ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात, यांच्याविषयी इस्राएलाचा देव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराच्या हाती देईन. आणि तो त्यास तुमच्या डोळ्यांसमोर ठार करील.
\s5
\p
\v 22 नंतर यहूदाचे जे सर्व बंदिवान करून बाबेलात नेलेल्या या मनुष्यांविषयी हा शाप म्हणतील, सिद्कीया व अहाब यांना बाबेलाच्या राजाने अग्नीवर भाजले तसे परमेश्वर तुला करो.
\v 23 हे यासाठी होईल की, कारण त्यांनी इस्राएलामध्ये लज्जास्पद गोष्टी केल्यात, आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर व्यभिचार केला आणि जे मी त्यांना आज्ञापिले नाही ते वचन ते खोटेपणाने माझ्या नावाने बोलले आहेत. कारण जो मी एक आहे तो जाणतो. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 24 शमाया नेहेलमकराबद्दल, हे सांग,
\v 25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरुशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,
\v 26 परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.
\s5
\p
\v 27 म्हणून आता, अनाथोथकर यिर्मया जो आपणास तुम्हासमोर संदेष्टा म्हणवतो त्यास तू का धमकावले नाहीस?
\v 28 कारण त्याने बाबेलास आम्हाकडे पत्र पाठवले व म्हटले की, “बंदिवास दीर्घकाळ राहील, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व त्याची फळे खा.”
\v 29 सफन्या याजकाने हे पत्र यिर्मया संदेष्ट्याला ऐकू येईल असे वाचले.
\s5
\p
\v 30 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 31 “सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे.
\v 32 म्हणून परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी शमाया नेहेलमकराला आणि त्याच्या वंशजाला शिक्षा करीन. या लोकांमध्ये वस्ती करायला त्याचा कोणी उरणार नाही. मी आपल्या लोकांसाठी जे चांगले करीन ते तो पाहणार नाही. कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गैरविश्वासाचे भाषण केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 30
\s बंदिवासातून सुटकेचे वचन
\p
\v 1 यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,
\v 2 परमेश्वर, इस्राएलाचा देव, जे काही बोलला, तो म्हणतो, “मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव.
\v 3 कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.
\s5
\v 4 इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.
\v 5 कारण परमेश्वर हे म्हणाला,
\q “आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.
\s5
\q
\v 6 विचारा व पाहा जर पुरुष बाळकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे?
\q त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
\q
\v 7 हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही.
\q तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.
\s5
\p
\v 8 सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.
\v 9 पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील.
\s5
\q
\v 10 परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको.
\q कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन.
\q याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.
\q
\v 11 कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे.
\q मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे. त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही,
\q तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचीत तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.
\s5
\q
\v 12 कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.
\q
\v 13 तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.
\s5
\q
\v 14 तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत,
\q कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे,
\q मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
\q
\v 15 तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत.
\q कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.
\s5
\q
\v 16 म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील.
\q कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन.
\q
\v 17 कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे.
\q मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
\s5
\q
\v 18 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन.
\q मग नगर नाशाच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात येईल आणि ज्याठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील.
\q
\v 19 नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल,
\q कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत.
\s5
\q
\v 20 मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल
\q जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.
\q
\v 21 त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल
\q जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल.
\q कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे.
\q
\v 22 मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”
\s5
\q
\v 23 पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे.
\q ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल.
\q
\v 24 परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संतप्त क्रोध परत जाणार नाही.
\q अंतीम दिवसात, तुम्हास ते समजतील.
\s5
\c 31
\p
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”
\v 2 परमेश्वर असे म्हणतोः
\q “मी इस्राएलास विसावा देण्यास येईन तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकांस रानात अनुग्रह मिळेल.”
\q
\v 3 परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे.
\q म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.
\s5
\q
\v 4 हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील.
\q तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
\q
\v 5 तू पुन्हा शोमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळ्यांची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळांचा चांगला उपयोग होईल.
\q
\v 6 असा एक दिवस येईल की, त्यामध्ये एफ्राईमाच्या डोंगरावरील पहारेकरी ओरडून सांगतील.
\q उठा, आपण परमेश्वर आपला देव याच्याकडे वर सियोनेला जाऊ.
\s5
\p
\v 7 परमेश्वर असे म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा! राष्ट्रांतील प्रमुख लोकांसाठी आनंदाने जयघोष करा! ऐकू येईल अशी स्तुती करा. म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचे, इस्राएलाच्या वाचलेल्यांचे तारण कर.
\s5
\q
\v 8 पाहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन.
\q त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील.
\q त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल.
\q
\v 9 ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन.
\q ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे,
\q आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
\s5
\q
\v 10 राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा.
\q तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्राएल विखरला तोच त्यास एकवटील आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील.
\q
\v 11 कारण परमेश्वराने खंडणी भरून याकोबाला सोडवले आहे आणि त्याच्यासाठी जो खूप बलवान होता त्याच्या हातातून त्यास मुक्त केले आहे.
\s5
\q
\v 12 मग ते येतील आणि सियोनेच्या शिखरावर आनंदाने गातील.
\q परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षारसासाठी, तेलासाठी, आणि थवा व कळपांची संततीसाठी आनंदित होऊन येतील.
\q त्यांचा जिव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखीत होणार नाहीत.
\s5
\q
\v 13 मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील.
\q कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
\q
\v 14 नंतर मी याजकांचा जीव विपुलतेत तृप्त करीन. माझे लोक ते स्वतःला माझ्या चांगुलपणाने भरतील.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 15 परमेश्वर असे म्हणतो, “रामांत विलाप आणि अतिखेदाचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत.
\q राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही.”
\s5
\q
\v 16 परमेश्वर असे म्हणतो, तू रडण्यापासून आपला आवाज आणि आपले डोळे आसवांपासून आवर.
\q कारण तुझ्या दुःखाचे प्रतिफळ तुला मिळेल. असे परमेश्वर म्हणतो. तुझी मुले शत्रूंच्या देशातून परत येतील.
\q
\v 17 परमेश्वर असे म्हणत आहे, “तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे.” “तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील.
\s5
\q
\v 18 खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली.
\q अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
\q
\v 19 कारण मी तुझ्यापासून भटकल्यानंतर, मी पश्चाताप केला. मला शिक्षण मिळाल्यानंतर, मी दुःखात आपल्या छातीवर
\f + मांडीला
\f* थापा मारल्या.
\q कारण माझ्या तरुणपणातील अपराधाच्या अपकीर्तीमुळे मी लज्जित व शरमिंदा झालो.”
\q
\v 20 एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का?
\q कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते.
\q मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 21 तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव.
\q तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये.
\q
\v 22 विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील?
\q कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील.
\s5
\p
\v 23 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो!
\v 24 कारण यहूदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तेथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील.
\v 25 कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन.
\v 26 यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती.
\s नवा करार
\s5
\p
\v 27 परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन.
\v 28 मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 29 “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की,
\q वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत.
\v 30 कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.”
\s5
\p
\v 31 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
\v 32 मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्यादिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 33 “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
\v 34 नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
\s5
\q
\v 35 परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो. जो समुद्रास खवळतो या करीता त्याच्या लाटा गर्जतात त्यांना तो शांत करतो. सेनाधीश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो.
\q
\v 36 “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.”
\s5
\q
\v 37 परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल,
\q आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे
\q त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 38 “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल.
\v 39 मग त्यासाठी मापनसूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल.
\v 40 प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधीही उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
\s5
\c 32
\s यिर्मया अनाथोथ येथे शेत विकत घेतो
\p
\v 1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे नबुखद्नेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले.
\v 2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरुशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.
\s5
\p
\v 3 यहूदाचा राजा सिद्कीया याने त्यास कैद केले होते आणि म्हणाला, तू का भविष्य करतो व म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, पाहा, हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो ते घेईल.
\v 4 आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातातून सुटणार नाही, कारण तो खरोखर बाबेलाच्या राजाच्या हाती दिला जाईल. व त्याच्याशी समोरासमोर बोलेल आणि तो आपल्या डोळ्यांनी राजाला पाहील.
\v 5 कारण सिद्कीया बाबेलाला जाईल आणि मी परमेश्वर असे म्हणतो की मी त्याची भेट घेईपर्यंत तो तेथे राहील. जरी तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुम्ही यशस्वी होणार नाही.
\s5
\p
\v 6 यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले व म्हणाले,
\v 7 पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.
\s5
\p
\v 8 मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.
\v 9 म्हणून मी माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्याकडून अनाथोथातले ते शेत विकत घेतले आणि मी त्यास सतरा शेकेल
\f + साधारण 200 ग्राम
\f* रुपे मोजून दिले.
\s5
\p
\v 10 नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले.
\v 11 पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,
\v 12 माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्यासमक्ष आणि ज्या साक्षीदारांनी खरेदीखतावर सही केली होती त्यांच्यासमक्ष आणि जे सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले होते त्यांच्यासमक्ष, मी ते खरेदीखत महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा बारूख याच्या हाती दिले.
\s5
\p
\v 13 म्हणून त्यांच्यासमोर मी बारूखाला आज्ञा केली. मी म्हणालो,
\v 14 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, हे मोहोरबंद केलेले खरेदीखत व मोहोरबंद नसलेले खरेदीखत यांच्या पावत्या घे. त्या दीर्घकाळ राहाव्या म्हणून नवीन पात्रात घालून ठेव.
\v 15 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील.
\s5
\p
\v 16 नेरीयाचा मुलगा बारूख ह्याला खरेदीखताची पावती दिल्यावर, मी परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणालो,
\v 17 अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
\v 18 परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.
\s5
\p
\v 19 तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.
\v 20 तू मिसर देशात चिन्ह व चमत्कार केलेस. आजपर्यंत येथे इस्राएलात आणि सर्व मानवजातीत तू आपल्या नावाची किर्ती केली आहे.
\v 21 कारण तू आपले लोक इस्राएलांना चिन्ह आणि चमत्कारांनी, आपला सामर्थ्यवान हाताने, बाहु उभारून आणि मोठ्या दहशतीने मिसरामधून बाहेर आणलेस.
\s5
\p
\v 22 नंतर तू त्यांच्या पूर्वजांना दूध व मध वाहण्याचा हा जो देश देण्याची शपथ वाहिली. तो हाच देश तू त्यांना दिला.
\v 23 आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही किंवा तुझ्या नियमाचे आज्ञापालन केले नाही. त्यांना तू जे करण्याची आज्ञा दिली होती त्यांनी काहीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर ही सर्व संकटे आणली.
\s5
\p
\v 24 पाहा! हे नगर काबीज करण्यासाठी वेढे घातले आहेत. कारण तलवार, दुष्काळ आणि मरी, यांमुळे हे नगर जे खास्दी त्याविरूद्ध लढाई करतात त्यांच्या हाती देण्यात आले आहे. कारण तू जे काही बोललास ते घडले आहे. आणि पाहा, ते तू पाहिले आहे.
\v 25 तरी तू मला म्हणालास, तू आपल्यासाठी रुप्याने शेत खरेदी कर आणि साक्षीसाठी साक्षीदार बोलाव, जरी मी हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जात आहे.”
\s5
\p
\v 26 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
\v 27 “पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?”
\v 28 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील.
\s5
\p
\v 29 आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तीही जाळून टाकतील.
\v 30 कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी निश्चित आपल्या तरुणपणापासून माझ्या दृष्टीने जे वाईट तेच करीत आली आहेत. इस्राएलाच्या लोकांनी आपल्या हातानी प्रत्यक्ष कृती करून त्यांनी खचित माझा अपमान केला आहे.” असे परमेश्वर म्हणत आहे.
\s5
\p
\v 31 ज्या दिवशी त्यांनी हे नगर बांधले त्यादिवसापासून आतापर्यंत ते माझा क्रोध आणि कोप चेतविण्याचे कारण होत आले आहेत. म्हणून ते मी आपल्यापुढून दूर करीन.
\v 32 कारण इस्राएल व यहूदातील सर्व लोकांनी, त्यांचे राजे, सरदार, याजक, संदेष्टे आणि यहूदातील प्रत्येक व्यक्तीने व यरुशलेमेत राहणाऱ्यांनी मला कोपविण्यासाठी ज्या दुष्टपणाच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांमुळे मी असे करीन.
\s5
\p
\v 33 “त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.
\v 34 नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या.
\v 35 आणि त्यांनी बआल देवाची जी उंचस्थाने हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात आहेत ती त्यांनी आपली मुले व मुली यांचा मोलख देवाला होमार्पण करण्यासाठी बांधली. हे काही करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. आणि यहूदाने पाप करावे म्हणून त्यांनी किळसवाणी गोष्टी कराव्या, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
\s5
\p
\v 36 म्हणून आता, ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता, हे तलवार, दुष्काळ व मरीने बाबेलाच्या राजाच्या हाती देण्यात येईल त्या नगराविषयी मी, परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो,
\v 37 पाहा, ज्या प्रत्येक देशात मी आपल्या क्रोधाने, कोपाने आणि महारोषाने त्यांना घालवून दिले आहे, तेथून मी त्यांना गोळा करून परत येथे आणीन आणि त्यांना सुरक्षित राहण्याची शक्ती देईन.
\s5
\p
\v 38 ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.
\v 39 त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
\v 40 आणि मी त्याजशी सर्वकाळचा करार करीन. तो असा की, मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपला आदर त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.
\s5
\p
\v 41 नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत:करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन.
\p
\v 42 परमेश्वर असे म्हणतो, जसे मी हे सर्व मोठे अरिष्ट या लोकांवर आणले आहे, तसे ज्या चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोललो आहे, त्या मी सर्व त्यांच्यासाठी करीन.
\s5
\p
\v 43 ज्या देशाविषयी तुम्ही म्हणता, ‘हे ओसाड आहे, तेथे कोणी मनुष्य व पशू नाहीत. तो खास्द्यांच्या हाती दिला आहे, मग त्या या देशात शेते खरेदी करतील.
\v 44 बन्यामिनाच्या देशात, यरुशलेमेच्या सभोवतीच्या प्रदेशातील व यहूदातील नगरांत व डोगराळ प्रदेशाच्या नगरात व तळवटीच्या नगरात व नेगेबच्या नगरात लोक रुप्याने शेते खरेदी करतील आणि खरेदीखतावर सह्या घेऊन मोहोरबंद करतील व साक्षीदार बोलावून आणतील. कारण त्यांचे बंदिवासात गेलेले परत येतील. असे परमेश्वर म्हणत आहे.
\s5
\c 33
\s यरुशलेमेच्या वैभवाची पुनःस्थापना
\p
\v 1 नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
\v 2 परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,
\v 3 मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
\s5
\v 4 कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे.
\v 5 खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली.
\s5
\v 6 पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.
\v 7 कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
\v 8 मग त्यांनी ज्या अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले त्या सर्वापासून मी त्यांना धुवून स्वच्छ करीन. मी त्यांनी ज्या आपल्या सर्व अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले व ज्या सर्व मार्गाने त्यांनी माझ्याविरूद्ध बंड केले त्या सर्वांची मी त्यांना क्षमा करीन.
\v 9 कारण हे नगर पृथ्वीतल्या सर्व राष्ट्रांसमोर मला आंनदाचे नाव, स्तुतीचे गीत, सन्मानास कारण असे होईल. त्यांचे सर्व हित मी करीन ते ती ऐकतील आणि जे सर्व हित व जे सर्व कुशल मी त्यांना प्राप्त करून देईन त्यावरून ती भयभीत होतील व थरथर कापतील.
\s5
\p
\v 10 परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरुशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशु नाहीत.
\v 11 तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 12 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.
\v 13 डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 14 परमेश्वराचे असे म्हणणे आहे, पाहा! असे दिवस येत आहेत जे मी इस्राएल आणि यहूदाच्या घराण्यासाठी जे वचन दिले आहे ते मी करीन.
\v 15 त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.
\v 16 त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरुशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता
\f + यहोवा-सदकेनु
\f* आहे या नावाने बोलवतील.
\s5
\p
\v 17 कारण परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दावीदाला कधीच पडणार नाही.
\v 18 तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.”
\s5
\v 19 यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
\v 20 परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,
\v 21 तर माझा सेवक दावीद याच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल यासाठी की त्यास त्याच्या सिंहासनावर राज्य करायला मुलगा होऊ नये आणि माझी सेवा करणारे लेवी जे याजक त्यांच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल.
\v 22 ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.”
\s5
\v 23 यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
\v 24 “हे लोक जे काय बोलले, ते तू ऐकलेस लक्षात घेतले नाहीस, ते म्हणतात की, जी दोन घराणी परमेश्वराने निवडली ती त्यांना सोडून दिले आहेत काय? याप्रकारे त्यांच्या दृष्टीने पुन्हा राष्ट्र होऊ नये असे ते माझ्या लोकांस तुच्छ लेखतात.”
\s5
\v 25 परमेश्वर असे म्हणतो, “जर माझा दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अढळ नाही किंवा मी जर आकाशाचे आणि पृथ्वीचे नियम स्थापिले नाहीत,
\v 26 तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”
\s5
\c 34
\s सिद्कीयाला यिर्मयाचा इशारा
\p
\v 1 परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरुशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,
\v 2 परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील.
\v 3 तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलाच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.
\s5
\p
\v 4 सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.
\v 5 तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.”
\s5
\p
\v 6 म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरुशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली.
\v 7 त्यावेळी बाबेलाच्या राजाचे सैन्य यरुशलेमेविरूद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.
\s इब्री दासांसंबंधीची करार मोडला
\s5
\p
\v 8 सिद्कीया राजाने यरुशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले.
\v 9 तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.
\s5
\p
\v 10 म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले.
\v 11 पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.
\s5
\p
\v 12 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 13 परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे,
\v 14 जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.
\s5
\p
\v 15 आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता.
\v 16 पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत.
\s5
\v 17 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.
\v 18 मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले.
\v 19 जे यहूदा आणि यरुशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.
\s5
\v 20 मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जिव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील.
\v 21 म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जिव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन.
\v 22 परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”
\s5
\c 35
\s रेखाब्यांचे आज्ञापालन
\p
\v 1 यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले,
\v 2 “रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.”
\s5
\p
\v 3 म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले.
\v 4 मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात, देवाचा मनुष्य इग्दल्याचा मुलगा हानान याच्या खोलीत आणले. या खोल्या शल्लुमाचा मुलगा मासेया द्वारपाल, याच्या बाजूच्या खोलीच्या वर असलेल्या नेत्यांची होती.
\s5
\p
\v 5 नंतर मी रेखाब्यांसमोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले आणि त्यांना म्हणालो, “थोडा द्राक्षारस प्या.”
\v 6 पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज, रेखाब यांचा मुलगा योनादाब, यांने आम्हास आज्ञा दिली, ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्वकाळपर्यंत कोणताही द्राक्षारस पिऊ नये.
\v 7 शिवाय कोणतेही घरे बांधू नका, कोणतेही बी पेरु नका, किंवा कोणतेही द्राक्षमळे लावू नका. हे तुमच्यासाठी नाहीत. तर तुम्ही आपल्या सर्व दिवसात तंबूत राहिले पाहिजे, याकरीता ज्या देशात तुम्ही परदेशी आहात त्यामध्ये दीर्घकाळ जगावे.
\s5
\p
\v 8 आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याची वाणी आम्ही पाळत आलो आहोत, त्यामध्ये आम्ही आमच्या स्त्रिया, आमची मुले, आणि आमच्या मुलींनी आपल्या सर्व दिवसात द्राक्षारस पिऊ नये अशी आज्ञा त्याने आम्हास दिली आहे.
\v 9 आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधीही घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत:च्या मालकीची शेते व द्राक्षमळे नाहीत.
\v 10 आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो.
\v 11 पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरुशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरुशलेमेमध्ये राहत आहोत.”
\s5
\p
\v 12 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 13 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदातील मनुष्यांना व यरुशलेमेच्या रहीवाश्यांना सांग, तुम्ही माझी वचने ऐकूण आणि ती शासन स्विकारणार नाही का?” असे परमेश्वर म्हणतो.
\v 14 रेखाबाचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना कोणताही द्राक्षारस पिऊ नका अशी आज्ञा दिली त्यांनी त्याचा शब्द आजपर्यंत पाळला. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. पण मी स्वत: तुम्हास पुन्हा पुन्हा सांगत आलो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.
\s5
\p
\v 15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.
\v 16 कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.
\s5
\p
\v 17 म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरुशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”
\s5
\p
\v 18 यिर्मया रेखाबाच्या कुटुंबीयांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्याने करण्यास आज्ञापिले त्याप्रमाणे तुम्ही केले आहे.
\v 19 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी कोणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”
\s5
\c 36
\s ग्रंथपट जाळणे
\p
\v 1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले,
\v 2 तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.
\v 3 कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन.
\s5
\p
\v 4 मग यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाने सांगितली व बारूखाने पटावर लिहून काढली.
\v 5 पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही.
\v 6 म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहीले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी, लोकांस ऐकू येतील आणि यहूदा नगरांतून आलेल्या सर्व लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखव.
\s5
\p
\v 7 कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”
\v 8 म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली.
\s5
\p
\v 9 योशीयाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात यरुशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहूदाच्या नगरांतून यरुशलेमेस आले त्यांनीही परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली.
\v 10 तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.
\s5
\p
\v 11 आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली.
\v 12 तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.
\s5
\p
\v 13 तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली.
\v 14 मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारूखाकडे कूशीचा मुलगा शलेम्या याचा मुलगा नथन्या याचा मुलगा यहूदी याला पाठवून सांगितले की, “ज्या गुंडाळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये.” नेरीयाचा मुलगा बारूख ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला.
\v 15 मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.
\s5
\p
\v 16 असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.”
\v 17 मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?”
\v 18 बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.”
\v 19 मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”
\s5
\p
\v 20 मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली.
\v 21 राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला.
\v 22 आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.
\s5
\p
\v 23 तेव्हा असे झाले की, यहूदीने तीन चार पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली.
\v 24 परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकले तरी ते घाबरले नाहीत, त्यांनी आपले वस्त्रेही फाडली नाहीत.
\s5
\p
\v 25 राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही.
\v 26 यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.
\s5
\p
\v 27 नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
\v 28 परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही.
\v 29 मग तू यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला सांग परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली व म्हणालास, खचित “बाबेलाचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील व यातले माणसे व पशू या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहीले आहे?”
\s5
\p
\v 30 म्हणून, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, त्यास दावीदाच्या सिंहासनावर बसायला कोणी राहणार नाही. तर त्याचे प्रेत दिवसातल्या उन्हात आणि रात्रीतल्या थंडीत बाहेर टाकण्यात येईल.
\v 31 कारण मी त्याला, त्याच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरुशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर व यहूदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन.
\s5
\p
\v 32 मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरीयाचा मुलगा बारूख लेखकाला दिली. आणि जी गुंडाळी यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडून ऐकून तिच्यात लिहीली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.
\s5
\c 37
\s यहोयामाकीची व्यर्थ आशा
\r 2 राजे 24:17, 2 इति. 36:10
\p
\v 1 आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते.
\v 2 पण सिद्कीया, त्याच्या सेवकांनी व यहूदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत.
\s5
\p
\v 3 म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”
\v 4 आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते.
\v 5 मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरुशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरुशलेम सोडून गेले.
\s5
\p
\v 6 नंतर यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 7 “परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल.
\v 8 खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील.
\s5
\p
\v 9 परमेश्वर असे म्हणतो, खास्दी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका. कारण ते निघून जाणार नाहीत.
\v 10 जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खास्दी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्यांच्या तंबूत उरले, तरीसुद्धा ते उठून हे शहर जाळतील.”
\s5
\p
\v 11 जसे फारोचे सैन्य येत होते, तेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, यरुशलेम सोडले,
\v 12 तेव्हा यिर्मया, यरुशलेमेतून बन्यामिनाच्या देशात गेला. तो त्याच्या लोकां मध्ये प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी जाण्यास निघाला.
\v 13 तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”
\s5
\p
\v 14 परंतु यिर्मया म्हणाला, “हे खरे नाही. मी फितून खास्द्यांकडे जात नाही” पण इरीयाने त्याचे ऐकले नाही. त्यांने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्यांकडे आणले.
\v 15 ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते.
\s सिद्कीया यिर्मयाशी विचारविनिमय करतो
\s5
\p
\v 16 म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.
\v 17 मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.”
\s5
\p
\v 18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “मी तुझ्याविरूद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरूद्ध व यरुशलेमेच्या लोकांविरूद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदिशाळेत टाकले आहेस?
\v 19 तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?
\v 20 पण आता, हे माझ्या स्वामी राजा ऐक, माझी विनंती तुझ्यासमोर येवो. तू मला परत योनाथान लेखकाच्या घरी पाठवू नकोस, किंवा मी तेथे मरेन.”
\s5
\p
\v 21 म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.
\s5
\c 38
\s यिर्मयाची विहिरीतून सुटका
\p
\v 1 यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,
\v 2 “परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
\v 3 परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”
\s5
\p
\v 4 म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
\v 5 मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.”
\s5
\p
\v 6 मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
\s5
\p
\v 7 आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.
\v 8 म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,
\v 9 माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही.
\s5
\p
\v 10 नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
\v 11 म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या.
\s5
\p
\v 12 एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.
\v 13 नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.
\s सिद्कीया यिर्मयाचा सल्ला घेतो
\s5
\p
\v 14 नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
\v 15 यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.”
\v 16 पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.
\s5
\p
\v 17 मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.
\v 18 पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”
\s5
\p
\v 19 सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”
\s5
\v 20 यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
\v 21 पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे.
\s5
\p
\v 22 यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील,
\q तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे.
\q तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.
\v 23 कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.”
\s5
\p
\v 24 मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.
\v 25 मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग
\v 26 मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.
\s5
\p
\v 27 नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.
\v 28 ह्याप्रमाणे यिर्मया, यरुशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.
\s5
\c 39
\s यरुशलेमेचा पाडाव
\r 2 राजे 25:1-12; यिर्म. 52:4-16
\p
\v 1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या नवव्या वर्षात आणि दहाव्या महिन्यात, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमाविरूद्ध चालून आला आणि त्यास वेढा घातला.
\v 2 सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले.
\v 3 मग बाबेलाच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेमेत आले आणि मधल्या दरवाजाजवळ बसले. नेर्गल शरेसर, समगार नबो, व सर्सखीम हे महत्वाचे अधिकारी होते. नेर्गल-शरेसर हा उच्च अधिकारी होता. आणि इतर सर्व बाबेलचे अधिकारी होते.
\s5
\p
\v 4 असे झाले की, जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया आणि त्याच्या लढाऊ मनुष्यांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने नगरातून तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा अराबाकडच्या मार्गाने निघून गेला.
\v 5 पण खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून आणि यार्देन नदीच्या खोऱ्याच्या मैदानात यरिहोच्याजवळ सिद्कीयाला गाठले. मग त्यांनी त्यास पकडले आणि हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे आणले, जेथे नबुखद्नेस्सराने त्याच्यावर शिक्षा ठरविली.
\s5
\p
\v 6 रिब्लामध्ये, बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, त्याच्या स्वतःच्या मुलांना जिवे मारले; त्याने यहूदातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा जिवे मारले.
\v 7 मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले.
\s5
\p
\v 8 नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरुशलेमेची तटबंदी फोडली.
\v 9 राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान ह्याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांस, जे लोक खास्द्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते, त्यांना कैदी करून बाबेलास नेले.
\v 10 पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते अशा गरीब लोकांस यहूदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली.
\s नबुखद्नेस्सर यिर्मयाची काळजी घेतो
\s5
\p
\v 11 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत, राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदानाला ताकीद दिली होती; तो म्हणाला,
\v 12 “त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्यास इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.”
\v 13 म्हणून राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने, नबूशजबान या उच्च अधिकारी, नेर्गल-शरेसर या उच्च अधिकाऱ्याला आणि बाबेल राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविले.
\v 14 त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.
\s एबद-मलेखच्या मुक्तीचे वचन मिळते
\s5
\p
\v 15 आता तो यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात कैदेत असताना परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,
\v 16 एबद-मलेख कूशीशी बोल आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतोः पाहा, मी माझी वचने या नगराविरूद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्यासमक्ष खऱ्या होतील.
\s5
\p
\v 17 पण, मी तुला त्यादिवशी वाचवीन. असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही.
\v 18 कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 40
\s यिर्मया, गदल्या व उरलेले लोक
\r 2 राजे 25:22-26
\p
\v 1 यरुशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.
\v 2 प्रमुख अंगरक्षकाने यिर्मयाला घेतले आणि तो त्यास म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट या स्थळावर येणार म्हणून भाकीत केले.
\s5
\p
\v 3 आणि परमेश्वराने ते आणले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने केले आहे; कारण तुम्ही लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे आणि त्याची वाणी पाळली नाही. म्हणून या गोष्टी तुम्हा लोकांविरूद्ध घडल्या आहेत.
\v 4 पण आता पाहा, मी तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून तुला आज सोडवत आहे. जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले असले तर, ये, आणि मी तुझी काळजी घेईन. पण जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले नसेल तर मग येऊ नको. तुझ्यादृष्टीने जेथे चांगले आणि योग्य आहे तेथे तू जा.
\s5
\p
\v 5 जेव्हा यिर्मयाने काही उत्तर दिले नाही, नबूजरदान म्हणाला, शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने त्यास यहूदातील नगरांचा अधिकारी नेमले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याच्याबरोबर लोकांमध्ये राहा. किंवा जेथे कोठे तुझ्या दृष्टीने तुला योग्य वाटेल तेथे तू जा.” राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाने त्यास अन्न व बक्षीस दिले आणि त्यास दूर पाठवून दिले.
\v 6 मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामाचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो देशात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जाऊन राहिला.
\s5
\p
\v 7 आता यहूदाच्या सैन्यातील काही सेनापतींनी जे अजून अंगणात होते ते आणि त्यांच्या मनुष्यांनी ऐकले की, बाबेलाच्या राजाने अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास, देशावर अधिपती म्हणून नेमले आहे. त्यांनी हेही ऐकले की, देशात अगदी गरीब पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना कैद करून बाबेलला नेले नव्हते जे मागेच राहिले होते त्यांना त्याच्या ताब्यात दिले आहे.
\v 8 मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे.
\s5
\p
\v 9 तेव्हा शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या त्यांना व त्यांच्या मनुष्यांना शपथ घेऊन आणि त्यांना म्हणाला, खास्दी अधिकऱ्यांची सेवा करण्यास घाबरु नका. देशात वस्ती करा आणि बाबेलाच्या राजाची सेवा करा आणि असे केल्याने तुमचे भले होईल.
\v 10 आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षारस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.
\s5
\p
\v 11 त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशात जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,
\v 12 तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.
\s इश्माएलाचे गदल्याविरुद्ध बंड
\s5
\p
\v 13 कारेहाचा मुलगा योहानान व खेड्यापाड्याच्या प्रदेशातील सैन्याचे सर्व अधिकारी मिस्पा येथे गदल्याकडे आले.
\v 14 ते त्यास म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे, हे तू जाणतोस काय?” पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यावर विश्वास ठेवला नाही.
\s5
\p
\v 15 मग मिस्पा येथे एकांतात कारेहाचा मुलगा योहानान गदल्याशी बोलला की, “मला नथन्याचा मुलगा इश्माएल याला ठार मारण्याची परवानगी दे. कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. त्याने तुला का मारावे? जे सर्व यहूदी तुझ्याभोवती गोळा झाले आहेत त्यांना देशात पांगण्याची आणि यहूदाचे उरलेले अवशेष नष्ट होण्याची परवानगी का देतोस?”
\v 16 पण अहीकामाचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला, “तू ही गोष्ट करू नकोस, कारण इश्माएलाबद्दल तू खोट सांगत आहेस.”
\s5
\c 41
\p
\v 1 पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
\v 2 पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
\v 3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
\s5
\p
\v 4 गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
\v 5 शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
\s5
\p
\v 6 तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
\v 7 मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
\s5
\p
\v 8 पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
\v 9 जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
\s5
\p
\v 10 पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला.
\s5
\p
\v 11 पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
\v 12 म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
\s5
\p
\v 13 मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
\v 14 नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
\s5
\p
\v 15 पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
\v 16 नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
\s5
\p
\v 17 मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
\v 18 खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.
\s5
\c 42
\s योहानाला यिर्मयाचा संदेश
\p
\v 1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.
\v 2 ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.
\v 3 आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.”
\s5
\p
\v 4 मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”
\v 5 मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरूद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो.
\v 6 ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.”
\s5
\p
\v 7 मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
\v 8 म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले.
\v 9 आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो,
\v 10 जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.
\s5
\p
\v 11 ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात, त्यास भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. कारण तुमचे रक्षण करणास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास, मी तुमच्याबरोबर आहे.
\v 12 कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील.
\s5
\p
\v 13 पण कदाचित् तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही.
\v 14 तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.
\s5
\p
\v 15 तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता,
\v 16 तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.
\v 17 म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही.
\s5
\p
\v 18 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरुशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरुशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.
\v 19 यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरुध्द साक्ष दिली आहे.
\s5
\p
\v 20 कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.
\v 21 कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही
\v 22 म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”
\s5
\c 43
\s मिसर देशास जाणे
\p
\v 1 असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली.
\v 2 होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान व सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही.
\v 3 तू आम्हास खास्द्यांच्या हाती द्यावे, यासाठी की, तू आमच्या मरणास कारण व्हावे आणि आम्ही बाबेलात बंदीवान व्हावे. म्हणून नेरीयाचा मुलगा बारूख तुला आमच्याविरूद्ध भडकावीत आहे.”
\s5
\p
\v 4 म्हणून कारेहाचा मुलगा योहानान, सर्व सैन्याचे अधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी यहूदा देशात राहण्याविषयीची परमेश्वराची वाणी ऐकली नाही.
\v 5 पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले.
\v 6 त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा व नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले.
\v 7 ते मिसर देशात, तहपन्हेस येथे गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही.
\s5
\p
\v 8 मग तहपन्हेसात यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 9 “तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपन्हेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशदाराजवळ पादचारीमार्गावर यहूदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपवून ठेव.
\v 10 मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी बाबेलाचा राजा, नबुखद्नेस्सर, माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मया तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्याचे सिंहासन स्थापीन, नबुखद्नेस्सर त्यावर आपला भव्य गालीचा पसरवील.
\s5
\p
\v 11 कारण तो येऊन व मिसरावर चढाई करील. जे कोणी मरणासाठी नेमलेले असतील त्यांना मरण दिले जाईल. जो कोणी बंदीवांनासाठी नेमलेला आहे, तो बंदीवासात जाईल. आणि जे कोणी तलवारीसाठी असतील, ते तलवारीला दिले जातील.
\v 12 मग मी मिसराच्या देवांच्या मंदिरांना आग लावील. नबुखद्नेस्सर त्यांना जाळील किंवा त्यांना बंदीवान करून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो मिसर देश साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल.
\v 13 तो मिसर देशामधील बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील. तो मिसरी देवतांची मंदिरे जाळून टाकील.”
\s5
\c 44
\s मिसरातल्या यहूद्यांबाबत यिर्मयाची भविष्यवाणी
\p
\v 1 जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.
\v 2 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरुशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.
\v 3 कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
\s5
\p
\v 4 मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.
\v 5 पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
\v 6 म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.
\s5
\p
\v 7 म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.
\v 8 कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.
\s5
\p
\v 9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरुशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?
\v 10 ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”
\s5
\p
\v 11 “यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.
\v 12 कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.
\s5
\p
\v 13 जशी मी यरुशलेमेला शिक्षा केली, त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरीने शिक्षा करीन.
\v 14 म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”
\s5
\p
\v 15 नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले.
\v 16 ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.
\v 17 पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.
\s5
\p
\v 18 जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”
\v 19 मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”
\s5
\p
\v 20 मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,
\v 21 “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले.
\s5
\p
\v 22 मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
\v 23 तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरूद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियमशास्त्र त्याचे विधी किंवा त्याचे कराराचे आदेश, ऐकले नाहीत, हे अनिष्ट तुमच्याविरुध्द आजपर्यंत घडत आहेत.”
\s5
\p
\v 24 मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
\v 25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”
\s5
\p
\v 26 यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.
\v 27 पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.
\v 28 नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिसर देशामधून यहूदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहूदी मिसर देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल.
\s5
\p
\v 29 परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.
\v 30 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन.
\s5
\c 45
\s बारुखाला यिर्मयाचा संदेश
\p
\v 1 नेरीयाचा मुलगा बारूख याला यिर्मया संदेष्ट्याने ही वचने सांगितली आहेत. हे त्यावेळी घडले जेव्हा यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात नेरीयाचा मुलगा बारुख याने ही वचने यिर्मयाच्या तोंडून ऐकून पुस्तकात लिहिली. तेव्हा यिर्मया संदेष्टा त्याच्याशी जे वचन बोलला. ते म्हणाले,
\v 2 हे बारूखा, “परमेश्वर, इस्राएलाचा देव, तुला असे म्हणतो,
\v 3 तू म्हणालास, मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कण्हण्याने मी थकलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मला विश्रांती मिळत नाही.
\s5
\p
\v 4 तू त्यास असे सांग, परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जे काही मी बांधलेले आहे, मी आता मोडून टाकीन. मी जे लावले, ते मी आता उपटून टाकीन. हे सर्व पृथ्वीवर सत्य होईल.
\v 5 पण तू आपणासाठी मोठ्या गोष्टींची आशा करतोस काय? त्याची आशा करू नकोस. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, सर्व मानवावर अरिष्ट येईल, पण जेथे कोठे तू जाशील तेथे तुला तुझे जीवन लूट असे मी देईन.”
\s5
\c 46
\s मिसराविषयीची भविष्ये
\p
\v 1 परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे.
\v 2 मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
\q
\v 3 लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
\q
\v 4 तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या.
\q भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
\s5
\q
\v 5 हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 6 चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत.
\q ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
\s5
\q
\v 7 नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
\q
\v 8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे.
\q तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
\q
\v 9 घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
\s5
\q
\v 10 कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल.
\q तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल.
\q कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
\s5
\q
\v 11 “हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव.
\q तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
\q
\v 12 राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
\s5
\p
\v 13 जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
\q
\v 14 मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या.
\q तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
\s5
\q
\v 15 तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
\q
\v 16 जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत,
\q उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
\q
\v 17 त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
\s5
\q
\v 18 ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे.
\q जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
\q
\v 19 अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर.
\q कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
\s5
\q
\v 20 मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
\q
\v 21 तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील.
\q ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
\q
\v 22 मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत.
\q ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
\s5
\q
\v 23 परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे.
\q कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
\q
\v 24 मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
\s5
\p
\v 25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन.
\v 26 मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
\s5
\p
\v 27 परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
\v 28 परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”
\s5
\c 47
\s पलिष्ट्यांविषयी भविष्य
\p
\v 1 यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.
\q
\v 2 परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे!
\q मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील,
\q आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील.
\s5
\q
\v 3 त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे,
\q त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट,
\q आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.
\q
\v 4 कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून
\q वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल.
\q कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.
\s5
\p
\v 5 गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?
\v 6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार?
\q तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
\q
\v 7 तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे.
\q त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”
\s5
\c 48
\s मवाबाविषयी भविष्य
\p
\v 1 मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः
\q “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत.
\q
\v 2 मवाबाचा आदर राहिला नाही. हेशबोनात त्यांच्या शत्रूने तिच्याविरूद्ध अनिष्ट योजिले आहे.
\q ते म्हणाले, ‘या व आपण तिचा राष्ट्राप्रमाणे नाश करू. मदमेनासुद्धा नाश होईल, तलवार तुझ्या पाठीस लागेल.
\s5
\q
\v 3 पाहा, होरोनाईमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळीचा आवाज येत आहे.
\q
\v 4 मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे.
\q
\v 5 ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत,
\q कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत.
\s5
\q
\v 6 पळा! आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा.
\q
\v 7 कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्ती यावर भाव ठेवला आहे, म्हणून तुही पकडला जाशील.
\q मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल.
\s5
\q
\v 8 कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही.
\q परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील.
\q
\v 9 मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे.
\q तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही.
\v 10 जो कोणी परमेश्वराच्या कामात आळशी आहे तो शापीत आहे; आणि जो कोणी आपली तलवार रक्तपातापासून आवरतो तोही शापित आहे.
\s5
\q
\v 11 मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही.
\q म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.”
\v 12 याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षारस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.”
\s5
\p
\v 13 मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल.
\q
\v 14 “आम्ही सैनिक, बलवान लढणारी माणसे आहोत असे तुम्ही कसे म्हणू शकता?
\s5
\q
\v 15 मवाब उजाड होईल आणि त्याच्या नगरावर हल्ला होईल. कारण त्याचे उत्तम तरुण
\q वधाच्या जागी खाली उतरून गेले आहेत.”
\q हे राजाचे सांगणे आहे, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
\q
\v 16 मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे.
\q
\v 17 जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता,
\q ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे.
\s5
\q
\v 18 अगे तू दीबोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मानाच्या जागेवरून खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस.
\q कारण मवाबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे तो तुझे बालेकिल्ले नष्ट करील.
\q
\v 19 अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा!
\q जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे?
\q
\v 20 मवाब लज्जित झाला आहे, कारण त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत. आक्रोश आणि विलाप करा; मदतीसाठी रडा.
\q मवाबाचा नाश झाला आहे आर्णोन नदीकाठच्या लोकांस सांगा.
\s5
\q
\v 21 आता डोंगराळ प्रदेशावर शिक्षा आली आहे,
\q होलोनावर, याहस व मेफाथ
\q
\v 22 दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम
\q
\v 23 किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा
\q
\v 24 करोयोथ, बस्रा व मवाब देशामधील दूरची व जवळची नगरे यांवर न्यायनिवाडा आला आहे.
\q
\v 25 मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 26 “त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गर्वाने कृती केली आहे. आता मवाब स्वत:च्याच वांतीत हाताने टाळ्या वाजविल, म्हणून तोही हास्यविषय होईल.
\v 27 कारण इस्राएल तुझ्या हास्याचा विषय झाला नव्हता का? तो चोरांमध्ये सापडला होता का? जितकेदा तू त्याच्याविषयी बोललास तितकेदा तू आपली मान हालवलीस.
\s5
\q
\v 28 मवाबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या.
\q खडकाच्या खळग्याच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यांसारखे व्हा.”
\q
\v 29 “आम्ही मवाबाचा गर्व ऐकला आहे. त्याचा उद्धटपणा,
\q त्याचा गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उन्मत्तता ही आम्ही ऐकली आहे.”
\s5
\p
\v 30 परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे.
\q
\v 31 म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील.
\q
\v 32 हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि
\q त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे.
\s5
\q
\v 33 म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत.
\q मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षारस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही.
\s5
\p
\v 34 “हेशबोनापासून एलालेपर्यंत, याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम व एगलाथ-शलिशीयापर्यंत त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, कारण निम्रीमाचे पाणी सुद्धा आटले आहे.
\v 35 परमेश्वर असे म्हणतो, कारण जो कोणीही उच्चस्थानी अर्पण करतो आणि त्यांच्या देवाला धूप जाळतो त्यास मी मवाबातून नाहीसे करीन.”
\s5
\p
\v 36 म्हणून माझे हृदय मवाबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे, माझे हृदय कीर हरेसाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.
\v 37 कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.
\s5
\p
\v 38 मवाबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात, तेथे सर्वत्र शोक होत आहे. कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मवाबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 39 “तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.”
\s5
\p
\v 40 कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, शत्रू गरुडाप्रमाणे उडत आहे. तो आपले पंख मवाबावर पसरील.
\q
\v 41 करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत.
\q कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
\s5
\q
\v 42 म्हणून मवाबाचा नाश होऊन ते राष्ट्ररुप राहणार नाही, कारण ते परमेश्वराविरूद्ध उद्धट झाले.”
\q
\v 43 परमेश्वर असे म्हणतोः “मवाबात राहणाऱ्यांनो, दहशत व खाच आणि सापळा तुमच्यावर येत आहेत.
\q
\v 44 जो कोणी दहशतीने घाबरुन पळेल तो खाचेत पडेल,
\q आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल,
\q कारण मी हे त्याच्याविरुध्द म्हणजे मवाबावर त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणिन.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 45 जे पळून गेले होते ते हेशबोनाच्या छायेखाली निर्बल असे उभे राहिले, कारण हेशबोनातून अग्नी,
\q सीहोनातून ज्वाला निघाली आहे. ती मवाबाचे कपाळ आणि गर्विष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील.
\s5
\q
\v 46 हे मवाबा, तुला हाय हाय! कमोशाच्या लोकांचा नाश होत आहे,
\q कारण तुझी मुले बंदिवान आणि तुझ्या मुली बंदिवासात नेल्या जात आहेत.
\q
\v 47 “मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो.
\s5
\c 49
\s अम्मोन्यांविषयी भविष्य
\q
\v 1 अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो,
\q “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय?
\q तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”
\q
\v 2 यास्तव परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की,
\q अम्मोनाच्या लोकांस राब्बाविरूद्ध जेव्हा मी लढाईसाठी संकेताचा आवाज ऐकावयास लावीन, तेव्हा ते ओसाडीचा ढीग होईल आणि त्यांच्या कन्या अग्नीने जाळल्या जातील.
\q कारण जे कोणी त्याच्या ताब्यात होते त्याचा ताबा इस्राएल घेईल.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 3 हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला,
\q आकांत करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल कारण मिलकोम राजा
\q आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदिवान होऊन जाईल.
\q
\v 4 तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल,
\q तू आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवते. तू म्हणते, माझ्याविरूद्ध कोण येईल?
\s5
\q
\v 5 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी तुझ्यावर दहशत आणीन.
\q ही दहशत जे कोणी तुझ्या सभोवताली आहेत त्यांच्या सर्वांपासून येईल. तुमच्यातला प्रत्येकजण त्यांच्यापुढे विखरला जाईल.
\q तेथे पळून जाणाऱ्यांना एकत्र जमवायला कोणी असणार नाही.”
\q
\v 6 परंतु यानंतर मी अम्मोनी लोकांचा बंदिवास उलटवीन. असे परमेश्वर म्हणतो.
\s अदोमाविषयी भविष्य
\s5
\q
\v 7 अदोमाविषयी, सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, “तेमानात आता काही ज्ञान नाही काय?
\q ज्या कोणाला गोष्टी समजतात त्यांचे चांगले सल्ले अदृश्य झाले आहेत काय? त्यांचे ज्ञान दूर गेले आहे का?
\q
\v 8 ददानातल्या रहिवाश्यांनो, पळा! माघारी फिरा! जमिनीतल्या विवरात रहा.
\q कारण मी त्यास शिक्षा करणार आहे त्या समयी मी एसावाची अरिष्टे त्याच्यावर आणीन.
\s5
\q
\v 9 जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले, तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का?
\q जर चोर रात्रीत आला, तर तो त्यास पाहिजे तितके चोरणार नाही का?
\q
\v 10 पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत.
\q म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.
\q
\v 11 तुझे अनाथ मागे ठेव. मी त्यास जिवंत ठेवण्याची काळजी घेईल आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवू शकतील.”
\s5
\p
\v 12 कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही पेला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतो की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुला तो खचित प्यावा लागेल.”
\v 13 परमेश्वर म्हणतो, “कारण मी आपलीच शपथ वाहिली आहे की, बस्रा दहशत, निंदा, उध्वस्त, आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उध्वस्त होतील.”
\s5
\q
\v 14 मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की, राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे,
\q “एकत्र व्हा आणि हल्ला करा. लढायला सज्ज व्हा.”
\q
\v 15 कारण पाहा, दुसऱ्या राष्ट्रांच्या तुलनेत मी तुला लहान, लोकांकडून तुच्छ केले आहे.
\s5
\q
\v 16 जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस
\q त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसविले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस तरी
\q तेथून मी तुला खाली आणीन. असे परमेश्वराचे म्हणणे आहे.
\s5
\q
\v 17 तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल.
\q तशा प्रत्येक व्यक्ती थरथरेल आणि त्याच्या सर्व अरिष्टाविषयी फूत्कार टाकेल.
\q
\v 18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल.
\q तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. तेथे कोणी व्यक्ती मुक्काम करणार नाही. देव असे म्हणाला,
\s5
\q
\v 19 “पाहा, तो सिंहासारखा यार्देनेच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल.
\q कारण मी अदोमाला त्यातून जलद पळून जायला भाग पाडीन आणि जो कोणी मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन.
\q कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण हुकूम करीन? कोणता मेंढपाळ मला विरोध करण्यास समर्थ आहे?”
\s5
\q
\v 20 म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे?
\q तेमानाच्या रहिवाश्याविरूद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका;
\q ते खचित लहानातील लहान कळपालासुद्धा ओढून नेतील.
\q त्यांची कुरणाचे देश ओसाड जागेत बदलतील.
\s5
\q
\v 21 त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे.
\q
\v 22 पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल.
\q मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
\s दिमिष्काविषयी भविष्य
\s5
\q
\v 23 दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे.
\q ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.
\q
\v 24 दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे.
\q दुःखाने तिला घेरले आहे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत.
\q
\v 25 तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही?
\s5
\q
\v 26 म्हणून त्याची तरुण माणसे त्याच्या चौकात पडतील
\q आणि लढणारी माणसे त्या दिवशी नष्ट होतील.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\v 27 “कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन. आणि ती बेन-हदादचे बालेकिल्ले खाऊन टाकील.”
\s केदार व हासोराविषयी भविष्य
\s5
\p
\v 28 केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता)
\q “उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.
\q
\v 29 त्यांचे सैन्य त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील.
\q केदारच्या लोकांकडून त्यांचे उंट आपणासाठी घेऊन जातील आणि त्यांना ओरडून सांगतील. ‘चोहोकडे सर्व दहशत आहे.
\s5
\q
\v 30 परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा.
\q कारण बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने तुमच्याविरुध्द नवीन योजना योजली आहे. पळा! माघारी फिरा!
\q
\v 31 परमेश्वर म्हणतो, उठा! स्वस्थ व सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करा.
\q त्यास त्यामध्ये वेशी व अडसर नाहीत आणि त्यांच्यात त्यांचे लोक राहतात.
\s5
\q
\v 32 कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल.
\q त्यांच्या दाढीच्या कडा कापलेल्यांना सर्व दिशांकडे विखरीन
\q आणि मी त्यांच्यावर सर्व बाजूने संकटे आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 33 “हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल.
\q तेथे कोणीही राहणार नाही. कोणी मनुष्यप्राणी तेथे राहणार नाही.”
\s एलामाविषयी भविष्य
\s5
\p
\v 34 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या राज्याच्या सुरवातीच्या काळात एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
\v 35 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य भाग एलामाचे धनुर्धारी माणसे यांना मी लवकरच मोडीन.
\q
\v 36 कारण मी आकाशाच्या चार कोपऱ्यातून चार वारे आणीन,
\q आणि मी एलामाच्या लोकांस त्या सर्व वाऱ्यांकडे विखरीन. ज्याकडे एलामाचे घालवलेले जाणार नाहीत असे एकही राष्ट्र असणार नाही.
\s5
\q
\v 37 म्हणून मी एलामाच्या शत्रूसमोर आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्यासमोर तुकडे तुकडे करीन.
\q कारण मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन. असे परमेश्वर म्हणत आहे.
\q आणि मी त्यांना संपूर्ण नाश करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.
\q
\v 38 मग मी एलामात आपले राजासन ठेवीन आणि तेथून त्याचा राजा व त्याचे अधिकारी यांना नष्ट करीन.” असे परमेश्वराचे सांगणे आहे.
\q
\v 39 “शेवटल्या दिवसात असे घडेल की, मी एलामात बंदिवासात गेलेले परत आणीन,” असे परमेश्वराचे सांगणे आहे.
\s5
\c 50
\s बाबेलविषयी भविष्य
\p
\v 1 बाबेल देश व खास्द्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्या हाती सांगितले.
\q
\v 2 राष्ट्रांत घोषणा कर व ऐकू येईल असे सांगा! निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका.
\q म्हणा, बाबेल घेतली आहे. बेल लज्जित झाला आहे. मरदोख मोडला आहे. त्यांच्या मूर्तींची फजीती झाली आहे. त्यांचे पुतळे मोडले आहेत.
\s5
\q
\v 3 उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील.
\q तिच्यात कोणीएक मनुष्य किंवा पशूही राहणार नाही. ते दूर पळून जातील
\q
\v 4 परमेश्वर असे म्हणतो, त्यादिवसात आणि त्यावेळी इस्राएलाचे व यहूदाचे लोक
\q एकत्र येऊन बरोबर रडत जातील आणि परमेश्वर आपला देव याला शोधतील.
\q
\v 5 ते सियोनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील.
\q ते जातील आणि म्हणतील जो कधी मोडला जाणार नाही अशा सर्वकाळच्या कराराने आपण स्वत: परमेश्वराशी जोडले जाऊ.
\s5
\p
\v 6 माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत.
\q त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना डोंगरात भटकविले आहे. त्यांनी त्यांना टेकड्या टेकड्यांतून फिरवले आहे. ते गेले, ते कोठे राहत होते ती जागा ते विसरले.
\q
\v 7 प्रत्येकजण जो कोणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही,
\q कारण परमेश्वर त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे, परमेश्वर जो त्यांच्या पूर्वजांची आशा त्याच्याविरुध्द त्यांनी पाप केले आहे.
\s5
\q
\v 8 “बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा;
\q जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा.
\q
\v 9 कारण पाहा, मी उत्तरेकडून मोठ्या राष्ट्रांचा समूह उठवून बाबेलाविरूद्ध आणीन आणि ते सज्ज होऊन येतील.
\q ते तिच्याविरूद्ध स्वतः तेथे बंदोबस्त करतील. तेथपासून ते बाबेल जिंकून घेतला जाईल.
\q त्यांचे बाण निपुण वीरासारखे आहेत; ते व्यर्थ होऊन परत येत नाही.
\q
\v 10 खास्द्यांची लूट होईल. जे कोणी त्यांना लुटेल तो तृप्त होईल.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 11 माझे वतन लुटणाऱ्यांनो, तुम्ही आनंद व उत्सव करता; जसे तुम्ही वासरू त्याच्या कुरणात सभोवती पाय आपटत उड्या मारते,
\q बळकट घोड्याप्रमाणे खिंकाळता.
\q
\v 12 तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल.
\q पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल.
\q
\v 13 परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उध्वस्त होईल.
\q बाबेला शेजारून जो कोणी जाईल तो प्रत्येकजण तिच्यामुळे कंप पावेल आणि तिच्या सर्व जखमामुळे फूत्कार टाकेल.
\s5
\q
\v 14 तुम्ही सर्व बाबेलाविरूद्ध सभोवती मांडणी करून सज्ज व्हा. प्रत्येकजण जो कोणी धनुष्य वाकवतो त्याने तिच्यावर मारा करावा.
\q तुमचा एकही बाण राखून ठेवू नका, कारण तिने परमेश्वराविरूद्ध पाप केले आहे.
\q
\v 15 तिच्याविरूद्ध तिच्या सर्व सभोवताली विजयाची आरोळी मारा; तिने आपले सामर्थ्य समर्पण केले आहे. तिचे बुरुज पडले आहेत.
\q तिच्या भिंती पाडल्या आहेत, कारण हा परमेश्वराचा सूड आहे. तिच्यावर सूड घ्या.
\q तिने जसे दुसऱ्या राष्ट्रांना केले तसे तिचे करा.
\s5
\q
\v 16 बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा.
\q जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येकजण आपल्या लोकांकडे वळतील; त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या.
\s5
\q
\v 17 “इस्राएल विखुरलेले मेंढरू आहे आणि सिंहाने दूर पळवून लावले आहे. प्रथम अश्शूराच्या राजाने त्यास खाल्ले;
\q मग यानंतर, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने त्याचे हाडे मोडून टाकली आहेत.”
\v 18 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, जसे मी अश्शूराच्या राजाला शिक्षा केली तसे मी बाबेलाच्या राजाला व देशाला शिक्षा करणार आहे.
\s5
\q
\v 19 “मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानावर चरेल.
\q नंतर तो एफ्राईम व गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल.”
\q
\v 20 परमेश्वर म्हणतो, “त्यादिवसात आणि त्यावेळी, इस्राएलाचा अपराध शोधण्यात येईल,
\q पण काहीच सापडणार नाही. मी यहूदाच्या पापाविषयी चौकशी करील, पण काहीच सापडणार नाही, कारण मी ज्यांना शेष असे राखून ठेवील त्यांना क्षमा करीन.”
\s5
\q
\v 21 परमेश्वर असे म्हणतो, मराथाईम देशाविरूद्ध उठ, त्याच्याविरुध्द आणि पकोडच्या रहिवाश्यांवर चढाई कर.
\q त्यांच्यावर तलवार ठेवून आणि त्यांचा संपूर्ण नाश करा. मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकगोष्ट कर.
\q
\v 22 युध्दाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे.
\s5
\q
\v 23 सर्व देशांचा हातोडा कसा मोडून तोडून टाकिला आहे आणि नाश झाला आहे.
\q राष्ट्रामध्ये बाबेल कसा ओसाड झाला आहे.
\q
\v 24 हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा रचला आहे, तू पकडला गेला आहे आणि तुला समजले नाही.
\q तू सापडलास व पकडला गेलास, आतापर्यंत तू परमेश्वराविरुद्ध भांडलास,
\s5
\q
\v 25 परमेश्वराने आपले शस्रागार उघडले आहे आणि आपली हत्यारे त्याने बाहेर आणली आहेत कारण त्यास आपला क्रोध अंमलात आणायचा आहे.
\q कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर यास खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.
\q
\v 26 दूरवरुन तिच्यावर हल्ला करा. तिची धान्याची कोठारे उघडा आणि धान्याच्या राशीप्रमाणे त्याचे ढीग करा.
\q तिचा अगदी नाश करा, तिच्यातील कोणालाही सोडू नका.
\s5
\q
\v 27 तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा.
\q त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे.
\q
\v 28 बाबेल देशामधून जे कोणी वाचलेले आहेत ते पळून जात आहेत त्यांचा आवाज तेथे आहे. तो आवाज ते
\q आमचा देव परमेश्वर याजकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड, सीयोनेस कळवित आहे.
\s5
\q
\v 29 “बाबेलाविरूद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या. त्यांच्याविरुद्ध तळ द्या आणि
\q कोणालाही निसटू देऊ नका.
\q तिने जे काही केले त्याची परतफेड करा.
\q तिने जे माप वापरले तिला तसेच करा. कारण तिने परमेश्वरास, इस्राएलाचा पवित्र प्रभू याची अवज्ञा केली.
\v 30 म्हणून तिचे तरुण पुरुष नगरातल्या चौकात पडतील, आणि तिचे सर्व लढणारे त्या दिवशी नाश होतील.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 31 “हे गर्विष्ठा, पाहा, मी तुझ्याविरूद्ध आहे” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q “कारण हे गर्विष्ठा, तुझा दिवस आला आहे, मी तुला शिक्षा करण्याची वेळ आली आहे.
\q
\v 32 म्हणून गर्विष्ठ अडखळून पडेल. तिला कोणीही उठवणार नाही.
\q मी तिच्या नगरात आग पेटवीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकगोष्टीला खाऊन टाकिल.”
\s5
\q
\v 33 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोक, यहूदी लोक याजवर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत.
\q ज्या सर्वांना त्यांनी पकडून नेले आहे त्यांना अजून धरून ठेवले आहे.
\q
\v 34 त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील,
\q म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”
\s5
\q
\v 35 परमेश्वर असे म्हणतो, खास्द्यांविरूद्ध, बाबेलाच्या राहणाऱ्याविरूद्ध, तिचे नेते
\q व तिचे ज्ञानी माणसे यावर तलवार आली आहे.
\q
\v 36 जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्याविरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की, ते आपल्यास मूर्खाप्रमाणे प्रकट करतील.
\q तिच्या सैनिकांविरूद्ध तलवार येत आहे, अशा रीतीने ते दहशतीने भरतील.
\q
\v 37 त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे.
\q ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल.
\s5
\q
\v 38 तलवार तिच्या पाण्याविरूद्ध येईल, मग ते कोरडे होईल.
\q कारण ती कवडीमोल मूर्तीचा देश आहे, आणि त्या लोकांस त्यांच्या भयंकर मूर्तींवरून वेडे झाले आहेत.
\q
\v 39 यास्तव रानटी पशू कोल्ह्यासहीत तेथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग तेथे राहतील;
\q कारण सर्व काळी तिच्यात पुन्हा कोणी कधीही रहाणार नाही. पिढ्यानपिढ्या तिच्यात कोणी वस्ती करणार नाही.
\q
\v 40 परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम, गमोरा आणि त्यांचे शेजारी यांचा नाश केला. त्याचप्रमाणे,
\q तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तिच्यात राहणार नाही.
\s5
\q
\v 41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. कारण एक महान शक्तिशाली राष्ट्र आणि
\q पुष्कळ राजे दूर देशातून उठत आहेत.
\q
\v 42 ते धनुष्य व भाले धारण करतात. ते क्रूर आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही.
\q त्यांचा आवाज समुद्राप्रमाणे गर्जत आहेत आणि अगे बाबेलच्या कन्ये ते घोड्यांवर स्वार होऊन लढणाऱ्या मनुष्याच्या स्वरुपात
\q तुझ्याविरूद्ध येत आहेत.
\s5
\v 43 बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत.
\q प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे.”
\s5
\q
\v 44 “पाहा, जसा सिंह यार्देनेच्या दाट झुडुपांतून बाहेर येतो, तसा तो मजबूत वस्तीवर येईल.
\q कारण ते एकाएकी तिच्यापासून पळून जातील, असे मी करीन. आणि जो मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन;
\q कारण माझ्यासारखा कोण आहे? आणि मला कोण आज्ञा देईल? आणि कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?”
\s5
\q
\v 45 तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती,
\q खास्द्यांच्या देशाविरूद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका; ते खचित कळपातील
\q लहानांनादेखील, ओढून नेतील, त्यांचे कुरणाचे देश नाशाची जागा होईल.
\q
\v 46 बाबेल जिंकून घेण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल आणि त्यांच्या दुःखाची आरोळी राष्ट्रांमध्ये ऐकायला येईल.
\s5
\c 51
\s बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि
\q लेब-कामाईत
\f + बाबेलचे आणखीन एक नाव
\f* जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने
\f + आत्म्याने
\f* खळबळ उडवीन.
\q
\v 2 मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील,
\q कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील.
\s5
\q
\v 3 तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये.
\q तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर.
\q
\v 4 कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील.
\s5
\q
\v 5 कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे,
\q तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही.
\q
\v 6 बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये.
\q कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. तो तिला तिचे सर्व प्रतिफळ भरून देईल.
\s5
\q
\v 7 बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे.
\q राष्ट्रे तिचा द्राक्षारस प्याली आणि ते विवेकशून्य झाले.
\q
\v 8 बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील.
\q तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल.
\s5
\q
\v 9 बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व
\q दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे.
\q
\v 10 परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या,
\q परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या.
\s5
\q
\v 11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे
\q कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती.
\q कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे.
\q
\v 12 बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा.
\q पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा,
\q कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे.
\s5
\q
\v 13 तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात,
\q तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे.
\q
\v 14 सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.”
\q ते तुझ्याविरूद्ध युद्धाची आरोळी करतील.
\s5
\q
\v 15 त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली
\q आपल्या बुद्धीने आकाश पसरिले;
\q
\v 16 जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो.
\q तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो.
\s5
\q
\v 17 प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे.
\q कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत. तेथे त्यांच्यात जीवन नाही.
\q
\v 18 त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील.
\q
\v 19 पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे;
\q त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
\s5
\q
\v 20 तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस.
\q तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन.
\q
\v 21 तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन.
\s5
\q
\v 22 तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन.
\q तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन.
\q
\v 23 तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन.
\q तुझ्याबरोबर मी राज्यकर्ते व अधिकारी यांचे तुकडे तुकडे करीन.
\s5
\q
\v 24 परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष
\q सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन.
\s5
\q
\v 25 परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो.
\q मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन.
\q
\v 26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत;
\q कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 27 पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा.
\q तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा,
\q तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.
\q
\v 28 तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे,
\q त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा.
\s5
\q
\v 29 भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे
\q परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.
\s5
\q
\v 30 बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत.
\q त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
\q
\v 31 बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे
\q हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत.
\q
\v 32 नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत
\q आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत.
\s5
\q
\v 33 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे.
\q तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.”
\s5
\q
\v 34 यरुशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे
\q आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.
\q
\v 35 मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील.
\q “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरुशलेम म्हणेल.
\s5
\q
\v 36 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन.
\q कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन.
\q
\v 37 बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत,
\q चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल.
\s5
\q
\v 38 “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.
\q
\v 39 जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी
\q व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 40 “मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन.
\s5
\q
\v 41 शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे.
\q राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.
\q
\v 42 बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे.
\s5
\q
\v 43 तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे,
\q आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही
\q
\v 44 म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील,
\q आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल.
\s5
\q
\v 45 माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा.
\q
\v 46 देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका.
\q कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल,
\q आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.
\s5
\q
\v 47 यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील.
\q तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील.
\q
\v 48 मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील.
\q कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 49 बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे,
\q तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील.
\s5
\q
\v 50 जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका.
\q दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरुशलेमे तुमच्या मनात येवो.
\q
\v 51 “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत,
\q कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.”
\s5
\q
\v 52 यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन,
\q आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील.
\q
\v 53 कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले,
\q तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 54 “बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो.
\q
\v 55 कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे.
\q त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे.
\q
\v 56 कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत.
\q त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल.
\s5
\q
\v 57 कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील
\q व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.”
\q असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे.
\q
\v 58 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल,
\q आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल.
\q जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.”
\s5
\q
\v 59 महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया
\q हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी,
\q बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.
\v 60 यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती.
\s5
\p
\v 61 यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.
\v 62 आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.
\s5
\p
\v 63 मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.
\v 64 म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.
\s5
\c 52
\s सिद्कीयाची कारकीर्द
\p
\v 1 सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरुशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची
\f + हा या पुस्तकाचा लेखक यिर्मया नाही
\f* मुलगी होती.
\v 2 यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.
\v 3 आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरुशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.
\s यरुशलेमेचा पाडाव
\s5
\p
\v 4 मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरुशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली
\v 5 म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.
\s5
\p
\v 6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.
\v 7 मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.
\v 8 पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.
\s5
\p
\v 9 त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.
\v 10 बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.
\v 11 मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.
\s5
\p
\v 12 आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरुशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.
\v 13 त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरुशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.
\v 14 राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरुशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.
\s5
\p
\v 15 सेनापती नबूजरदानाने यरुशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
\v 16 पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
\s5
\p
\v 17 परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.
\v 18 पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.
\v 19 पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.
\s5
\p
\v 20 दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.
\v 21 प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.
\s5
\p
\v 22 त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.
\v 23 असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.
\s5
\p
\v 24 अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.
\v 25 सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.
\s5
\p
\v 26 नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.
\v 27 रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.
\s5
\p
\v 28 नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.
\v 29 नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरुशलेमेमधून नेले.
\v 30 नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.
\s यहोयाखीनाची तुरुंगातून सुटका
\r 2 राजे 25:27-30
\s5
\p
\v 31 मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.
\s5
\p
\v 32 तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले.
\v 33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.
\v 34 आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.