mr_ulb/23-ISA.usfm

4638 lines
499 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id ISA ISA-Unlocked Literal Bible
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h यशया
\toc1 यशया
\toc2 यशया
\toc3 isa
\mt1 यशया
\mt2 The Book of the Prophet
\is लेखक
\ip यशया पुस्तकाचे नाव त्याचा लेखक यशया याच्या नावावरून पडले, त्याचा विवाह एका संदेष्ट्याशी झाला ज्याने त्याच्यापासून किमान दोन मुलांना जन्म दिला. (यशया 7:3; 8:3). त्याने चार यहूद्यांचे राजे उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया (1:1) यांच्या कारकिर्दीत भाकीत केले आणि तो कदाचित पाचवा दुष्ट राजा मनश्शे याच्या मृत्यूस भेटला.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 740-680
\ip राजा उज्जीयाच्या कारकिर्दीच्या अखेरीस आणि योथाम, आहाज आणि हिज्कीया यांच्या कारकिर्दीत हे पुस्तक लिहिले गेले.
\is प्राप्तकर्ता
\ip यशयाच्या संबंधातील मुख्य श्रोते हे यहूदाचे लोक होते जे देवाच्या नियमांनुसार जगण्यात अयशस्वी ठरले.
\is हेतू
\ip यशयाचा उद्देश संपूर्ण जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताचे व्यापक भविष्यसूचक चित्र प्रदान करणे आहे. त्याच्या जीवनाची पूर्ण व्याप्ती यांचा समावेश आहे: त्याच्या येण्याची घोषणा (यशया 40:3-5), त्याचा कुमारीच्याद्वारे जन्म (7:14), सुवार्ता घोषित करणे (61: 1), त्याच्या बलिदानासंबधी मृत्यू (52:13-53:12), आणि स्वतःचा लोकांसाठी परत येणे (60: 2-3). प्रेषित यशया यास प्रामुख्याने यहूदाच्या राज्यामध्ये भविष्यवाणी करण्यासाठी बोलवण्यात आले. यहूदा पुनरुत्थान आणि बंडखोरपणाच्या काळात माध्यमातून जात होता. अश्शूर आणि मिसराचा नाश करून यहूदाला धोक्यात आणण्यात आले होते, परंतु परमेश्वराच्या कृपेमुळे त्याला वाचवले गेले. यशयाने पापापासून पश्चात्ताप करण्याचा आणि भविष्यकाळात देवाच्या सुटकेची आशा बाळगण्याचा संदेश घोषित केला.
\is विषय
\ip तारण
\iot रूपरेषा
\io1 1. यहूदाची पुनर्बांधणी (1:1-12:6)
\io1 2. इतर राष्ट्रांविरुद्ध पुनर्बांधणी (13:1-23:18)
\io1 3. भविष्यातील संकट (24:1-27:13)
\io1 4. इस्राएल आणि यहूदा यांची पुनर्बांधणी (28:1-35:10)
\io1 5. हिज्कीया आणि यशाया यांचा इतिहास (36:1-38:22)
\io1 6. बाबेल देशाची पृष्ठभूमी (39:1-47:15)
\io1 7. देवाची शांतीची योजना (48:1-66:24)
\s5
\c 1
\s पातकी राष्ट्र
\p
\v 1 आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरुशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला.
\s5
\v 2 हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः
\q “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली.
\q
\v 3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो,
\q परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”
\s5
\q
\v 4 अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक,
\q दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे.
\q त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.
\s5
\q
\v 5 तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता?
\q तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे.
\q
\v 6 पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही;
\q फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.
\s5
\q
\v 7 तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत.
\q तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत.
\q परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.
\q
\v 8 सियोनाची कन्या
\f + यरुशलेम
\f* ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी,
\q काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे.
\s5
\q
\v 9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर
\q आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती.
\s खऱ्या पश्चात्तापासाठी आवाहन
\s5
\q
\v 10 सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका;
\q गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.
\q
\v 11 परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे?
\q जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत;
\q आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;”
\s5
\q
\v 12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता,
\q माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले?
\q
\v 13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे.
\q तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.
\s5
\q
\v 14 तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो;
\q त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.
\q
\v 15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन;
\q जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही;
\q तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.
\s5
\q
\v 16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा;
\q तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा;
\q
\v 17 चांगले करण्यास शिका;
\q न्याय मिळवा, पीडितांची मदत करा,
\q पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.
\s5
\q
\v 18 परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या;
\q जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील;
\q जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.
\s5
\q
\v 19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल,
\q तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.
\q
\v 20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,”
\q कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
\s सीयोनेचा न्याय व उद्धार
\s5
\q
\v 21 विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती,
\q पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे.
\q
\v 22 तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षारसात पाणी मिसळले आहे.
\s5
\q
\v 23 तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत;
\q प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते.
\q ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.
\s5
\q
\v 24 याकरितांच प्रभू, सेनाधीश परमेश्वर
\f + ‘यहोवा-साबओथ’
\f* , इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः
\q “त्यांचा नाश होवो! मी माझ्या विरोधकांचा सूड घेईन,
\q आणि माझ्या शत्रू विरूद्ध मी स्वतः बदला घेईन;
\q
\v 25 मी तुजविरूद्ध आपला हात वळवून,
\q तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन.
\s5
\q
\v 26 मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन,
\q त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”
\s5
\q
\v 27 सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल.
\q
\v 28 बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.
\s5
\q
\v 29 “तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची
\f + मूर्ती पूजा
\f* तुम्हास लाज वाटेल,
\q आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील.
\q
\v 30 कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे,
\q व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
\s5
\q
\v 31 बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील;
\q ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कोणीही विझवणार नाही.”
\s5
\c 2
\s परमेश्वराच्या जागतिक शांततेचे राज्य
\r मिखा 4:1-5
\p
\v 1 यरुशलेम व यहूदा याविषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या.
\q
\v 2 शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर,
\q पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल;
\q व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.
\s5
\q
\v 3 “चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ,
\q म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकविल व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील.
\q कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल.
\s5
\q
\v 4 तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल,
\q ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवितील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील,
\q यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही.
\s गर्विष्ठांचा परमेश्वराकडून न्याय
\s5
\q
\v 5 याकोबाच्या घराण्या, ये, आणि आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.
\q
\v 6 कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस,
\q कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरितीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्याप्रमाणे शकुन पाहणारे आहेत,
\q व ते परदेशी लोकांच्या पुत्रांबरोबर हातमिळवणी करतात.
\s5
\q
\v 7 त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्च झाली आहे; त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही,
\q त्यांची भूमी घोडे व रथ यांनी भरलेली असून त्यासहि सीमा उरलेली नाही.
\q
\v 8 तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे;
\q ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात.
\s5
\q
\v 9 ते लोक पाया पडतील, आणि वैयक्तिक खाली पडतील; म्हणून त्यांचा स्विकार करू नका.
\q
\v 10 खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून
\q जमिनीत लप.
\q
\v 11 न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल, व त्याचा गर्व खाली करण्यात येईल,
\q आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल.
\s5
\q
\v 12 कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस,
\q प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेला यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल.
\q
\v 13 आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे,
\q आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात,
\s5
\q
\v 14 आणि सर्व उंच पर्वत व उंचावलेल्या टेकड्या यांच्या विरोधात,
\q
\v 15 आणि प्रत्येक उंच बुरुज व प्रत्येक अभेद्य भिंत यांच्याविरोधात,
\q
\v 16 आणि तार्शीशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्याविरोधात येईल.
\s5
\q
\v 17 त्या दिवशी मनुष्याचा गर्व उतरवला जाईल, त्याचा ताठा गळून पडेल;
\q फक्त परमेश्वरच उंचावला जाईल.
\q
\v 18 सर्व मूर्ती पूर्णपणे नष्ट होतील.
\q
\v 19 परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक
\q खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील.
\s5
\q
\v 20 त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती
\q ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील.
\q
\v 21 जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे
\q व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.
\q
\v 22 ज्याचे जीवन नाकपुड्यातील श्वासात आहे, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा,
\q कारण त्यास काय जमेस धरायचे?
\s5
\c 3
\s यहूदा व यरुशलेम ह्यांचा परमेश्वराकडून न्याय
\q
\v 1 पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरुशलेम व यहूदा यांच्यापासून
\q आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;
\q
\v 2 शक्तिमान पुरुष, योद्धा, न्यायधीश, संदेष्टा, ज्योतिषी, वडील,
\q
\v 3 पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार.
\s5
\q
\v 4 “मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील.
\q
\v 5 सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे;
\q लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.
\s5
\q
\v 6 आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल,
\q आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे.
\q
\v 7 त्या दिवशी तो ओरडून म्हणेल,
\q ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत,
\q तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’”
\s5
\q
\v 8 कारण यरुशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे,
\q कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.
\q
\v 9 त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत.
\q त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे.
\s5
\q
\v 10 नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.
\q
\v 11 पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल.
\q
\v 12 माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात.
\q माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.
\s5
\q
\v 13 परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.
\q
\v 14 परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील.
\q तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.
\q
\v 15 तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता?
\q असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s सीयोनकन्यांचा न्याय
\s5
\q
\v 16 परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत,
\q आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात,
\q जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.
\q
\v 17 म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील.
\s5
\q
\v 18 त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बन्ध, गळयातील चंद्रकोरी हार,
\m
\v 19 कर्णफुले, कंकणे, आणि घुंगट;
\q
\v 20 शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्यांचा डब्ब्या, आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील.
\s5
\q
\v 21 तो अंगठ्या, नथी दागिने;
\q
\v 22 सणाचे वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे;
\q
\v 23 हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील.
\s5
\q
\v 24 तेथे गोड सुगंधा ऐवजी दुर्गंध; कमरपट्ट्या ऐवजी रस्सी,
\q आकर्षक केशरचने ऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र,
\q आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील.
\q
\v 25 तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.
\q
\v 26 यरुशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील.
\s5
\c 4
\q
\v 1 त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन
\q म्हणतील आमचे स्वतःचेच अन्न आम्ही खाऊ, आमचे स्वतःचेच कपडे आम्ही घालू
\q परंतु आमची लज्जा दूर करण्याकरिता आम्हास तुझे नाव घेऊ दे.
\s यरुशलेमेचे उज्वल भवितव्य
\p
\v 2 त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.
\s5
\p
\v 3 यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरुशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,
\v 4 ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरुशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल.
\s5
\p
\v 5 नंतर परमेश्वर सियोन पर्वताच्या संपूर्ण जागेवर व तिच्या मेळ्यांच्या जागेवर दिवसा ढग व धूर, आणि रात्री जळत्या अग्नीच्या ज्वालेचा प्रकाश, परमेश्वराच्या वैभवाचे छत, निर्माण करील.
\v 6 दिवसा उष्णतेपासून आश्रयासाठी सावली व आसरा, आणि वादळ व पाऊस यापासून आच्छादन असे ते होईल.
\s5
\c 5
\s द्राक्षमळ्याचा दृष्टांत
\q
\v 1 मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे.
\q माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.
\q
\v 2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
\q त्याने मळ्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्यामध्ये द्राक्षकुंडहि खणले,
\q मग त्याने द्राक्षे द्यावी या अपेक्षेत होता पण त्यातून रानद्राक्षे निघाली.
\s5
\q
\v 3 म्हणून आता, “यरुशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो,
\q माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा.
\q
\v 4 मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते?
\q चांगले द्राक्ष यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता, त्याने का रानद्राक्षे उत्पन्न केले?
\s5
\q
\v 5 आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन.
\q मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.
\q
\v 6 मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील,
\q तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
\s5
\q
\v 7 कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय.
\q आणि यहूदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय.
\q त्याने न्यायाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी, तेथे मारणे; न्यायीपणाची वाट पाहिली, परंतू त्याऐवजी, मदतीचा आक्रोश आढळून आला.
\s दुष्टावर येणाऱ्या आपत्ती
\s5
\q
\v 8 जे घराला घर आणि
\q आपण देशामध्ये रहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात, त्यांना हाय हाय!
\q
\v 9 सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला,
\q “तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्यांशिवाय ओसाड पडतील.
\q
\v 10 दहा एकर
\f +
\fr 5.10
\fq एकर
\ft हे जमीन मोजण्याचे आधुनिक माप नसून एका बैलाच्या जोडीने एका दिवसात नांगरले जाऊ शकते एवढी जमीन आहे.
\f* द्राक्षमळा एक बाथ
\f + साधारण 22 लिटर
\f* रस देईल, आणि एक होमर
\f + साधारण 160 किलोग्राम
\f* बी केवळ एक एफा
\f + साधारण 16 किलोग्राम
\f* उपज देईल.
\s5
\q
\v 11 सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय!
\q जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
\q
\v 12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता
\q पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.
\s5
\q
\v 13 यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत,
\q त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.
\q
\v 14 यास्तव मृत्यू ने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे.
\q आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील.”
\s5
\q
\v 15 मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत.
\q
\v 16 सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.
\q
\v 17 मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भुमीवर कोकरे चरतील.
\s5
\q
\v 18 जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!
\q
\v 19 जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू,
\q आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!”
\s5
\q
\v 20 जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात.
\q ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात,
\q जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!
\q
\v 21 जे स्वत:च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय!
\s5
\q
\v 22 जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय!
\q
\v 23 जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय!
\s5
\q
\v 24 यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते,
\q त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल.
\q कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
\s5
\q
\v 25 म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे.
\q डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत.
\q हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
\s5
\q
\v 26 तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील,
\q पाहा ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत.
\s5
\q
\v 27 त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही,
\q त्यांचा कमरबंद कधीच सैल पडणार नाही, आणि त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटणार नाहीत.
\q
\v 28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत.
\q त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळा प्रमाणे आहेत.
\s5
\q
\v 29 त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील.
\q ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल.
\q
\v 30 त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील.
\q जर कोणी भूमीकडे दृष्टी लावली तर पाहा अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे.
\s5
\c 6
\s यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण
\r यहे. 1:4-28
\p
\v 1 उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.
\v 2 त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे.
\s5
\p
\v 3 प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.”
\s5
\p
\v 4 जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.
\q
\v 5 तेव्हा मी म्हणालो,
\q “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे,
\q आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो,
\q कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”
\s5
\p
\v 6 मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता.
\v 7 त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले,
\q “बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे.”
\s5
\p
\v 8 मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”
\q
\v 9 तो म्हणाला, “जा आणि या लोकांस सांग,
\q ऐका, पण समजू नका; पाहा, पण ग्रहण करू नका.
\s5
\q
\v 10 त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये,
\q आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”
\s5
\p
\v 11 तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले,
\q “नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,
\q
\v 12 आणि परमेश्वर लोकांस खूप दूर घालवून देईपर्यंत आणि देशात एकाकीपण येईपर्यंत.
\s5
\q
\v 13 तेथे दहा टक्के जरी उरले तरी पुन्हा ते नगर नाश होईल.”
\q तरी एला किंवा अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुंधा राहतो
\q त्याच्या बुंध्यात पवित्र बीज आहे.
\s5
\c 7
\s आहाजाला यशयाचा पहिला संदेश
\r 2राजे 16:5; 2इति. 28:5-15
\p
\v 1 यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरुशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.
\v 2 दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम
\f + इस्राएलच्या उत्तरेकडील राज्य
\f* हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली.
\s5
\p
\v 3 मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.
\v 4 त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको.
\s5
\p
\v 5 अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात,
\v 6 आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु.
\s5
\q
\v 7 प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,
\q
\v 8 कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे.
\q पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.
\q
\v 9 एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे.
\q तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”
\s इम्मानुएलसंबंधी यशयाचा संदेश
\s5
\p
\v 10 परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला,
\v 11 “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.”
\v 12 परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
\s5
\p
\v 13 मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय?
\v 14 म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.
\v 15 तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील.
\s5
\p
\v 16 कारण त्या मुलाला वाईट नाकारून व चांगले ते पसंत करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजांची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल.
\v 17 एफ्राईम यहूदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलाच्या घराण्यावर आणील; तो अश्शूरच्या राजाला तुजविरूद्ध आणील.”
\s5
\q
\v 18 त्यावेळी
\q मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला
\q व अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील.
\q
\v 19 त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत
\q सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणांत तळ देतील.
\s5
\p
\v 20 त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून,
\q तुमच्या डोक्याच्या व पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.
\q
\v 21 त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील.
\q
\v 22 आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल,
\q कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल.
\s5
\q
\v 23 त्यावेळी जेथे हजार शेकेल चांदीच्या
\f + साधारण 11.5 किलोग्राम
\f* नाण्याएवढ्या किंमतीची हजार द्राक्षवेली होत्या,
\q तेथे तण आणि काटेकुटे याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही
\q
\v 24 माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते.
\q
\v 25 ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील,
\q पण गुरेढोरे व मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील.
\s5
\c 8
\s संदेष्ट्याच्या पुत्राचे नाव
\p
\v 1 परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज
\f + लुटण्यात वेगवान
\f* असे लिही.”
\v 2 माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन.
\s5
\p
\v 3 मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.
\v 4 कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”
\s5
\p
\v 5 परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला,
\q
\v 6 “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात,
\q आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात.
\q
\v 7 म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील.
\q तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील.
\s5
\q
\v 8 आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल.
\q हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”
\s5
\q
\v 9 अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका;
\q युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल.
\q
\v 10 योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही,
\q कारण देव आम्हाबरोबर आहे.
\s परमेश्वराचे भय धरा
\s5
\p
\v 11 परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला,
\q
\v 12 “हे लोक कोणत्याहि गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका,
\q ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका.
\q
\v 13 सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा
\q आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा.
\s5
\q
\v 14 तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक
\q आणि यरुशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल.
\q
\v 15 पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”
\s5
\q
\v 16 माझी साक्ष पक्की बांध
\f +
\fr 8.16
\fq माझी साक्ष पक्की बांध
\ft बांधणी ही कागदाच्या गुंडाळीला गुंडाळण्याच्या आणि बांधण्याच्या कृतीचे वर्णन करते. साक्ष कदाचित यशयाच्या पूर्वीच्या शब्दांना सूचित करते, जी एक कागदाच्या गुंडाळीवर नमूद केली गेली असावी.
\f* , नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे.
\q
\v 17 मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन, जो याकोबाच्या घराण्यापासून आपले तोंड लपवितो; मी त्याची प्रतीक्षा करीन.
\q
\v 18 पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी
\q जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत.
\s5
\p
\v 19 ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
\v 20 म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.
\s5
\q
\v 21 ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून
\q आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.
\q
\v 22 ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील
\q आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.
\s5
\c 9
\s शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द
\r यश. 11:1-9
\q
\v 1 जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल.
\q मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची,
\q अप्रतिष्ठा केली,
\q पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
\q
\v 2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे;
\q जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.
\s5
\q
\v 3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे,
\q हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो,
\q लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.
\s5
\q
\v 4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा,
\q त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.
\q
\v 5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे
\q व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील
\q ती अग्नीला भक्ष होतील.
\s5
\q
\v 6 कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे;
\q आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री,
\q समर्थ देव
\f + एल-गिभोर
\f* , सनातन पिता,
\q शांतीचा राजा असे म्हणतील.
\q
\v 7 त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही,
\q दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी
\q तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील,
\q सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
\s इस्राएलावर परमेश्वराचा कोप
\s5
\q
\v 8 प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.
\q
\v 9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,
\q
\v 10 “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
\s5
\q
\v 11 म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;
\q
\v 12 पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील,
\q कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
\s5
\v 13 तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.
\q
\v 14 म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.
\q
\v 15 नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
\s5
\q
\v 16 जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.
\q
\v 17 म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही,
\q कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते.
\q या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.
\s5
\q
\v 18 दृष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते;
\q वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.
\q
\v 19 सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत,
\q आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही.
\s5
\q
\v 20 ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत.
\q प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.
\q
\v 21 मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील.
\q कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.
\s5
\c 10
\q
\v 1 जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.
\q
\v 2 ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात,
\q विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.
\s5
\q
\v 3 न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल?
\q मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?
\q
\v 4 बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही,
\q कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.
\s परमेश्वर अश्शूराचा उपयोग करून घेतो
\s5
\q
\v 5 माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.
\q
\v 6 मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे.
\q मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.
\s5
\q
\v 7 परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत.
\q पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.
\q
\v 8 तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
\q
\v 9 कालनो कर्कमीशासारखे नाही काय?
\q हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
\s5
\q
\v 10 मूर्तिपुजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरुशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.
\q
\v 11 शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तिंचे जसे मी केले,
\q तसे मी यरुशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?”
\s5
\q
\v 12 सीयोन डोंगर व यरुशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
\q
\v 13 कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे,
\q व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे
\f + शूर वीराप्रमाणे
\f* जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
\s5
\q
\v 14 पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे,
\q व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे.
\q कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”
\s5
\q
\v 15 कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय?
\q काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.
\q
\v 16 म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील;
\q आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
\s5
\q
\v 17 इस्राएलाची ज्योती
\f + इस्राएलाची ज्योती परमेश्वर
\f* अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल;
\q तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.
\q
\v 18 परमेश्वर त्याचे रान व सुपिक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील;
\q जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.
\q
\v 19 रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.
\s इस्राएलाचा अवशेष
\s5
\p
\v 20 त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले
\f + अशुराचा राजा
\f* त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.
\v 21 याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
\s5
\p
\v 22 कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
\v 23 कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
\s5
\p
\v 24 म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.
\v 25 त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
\s5
\p
\v 26 मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.
\v 27 त्या दिवशी,
\q तुझ्या खाद्यांवरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जूं काढण्यात येईल,” तुझ्या मानेच्या पुष्ठतेमुळे ते जू भंग पावेल.
\s अश्शूराची चाल
\s5
\q
\v 28 शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे;
\q आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
\q
\v 29 त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे.
\q रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.
\s5
\q
\v 30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे!
\q तू बिचारी अनाथोथ!
\q
\v 31 मदमेना पळत आहे,
\q व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.
\q
\v 32 आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल
\q सीयोन कन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.
\s5
\q
\v 33 पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील;
\q उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.
\q
\v 34 रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.
\s5
\c 11
\s इशायाच्या बुंध्याची सात्त्विक कारकीर्द
\r यश.9:1-7
\p
\v 1 इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातुन निघालेल्या शाखेला फळ येईल.
\q
\v 2 परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,
\s5
\q
\v 3 परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल;
\q त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.
\q
\v 4 याउलट तो दिनांचा न्याय चांगुलपणे करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील.
\q तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.
\q
\v 5 धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल.
\s5
\q
\v 6 लांडगा कोंकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल.
\q वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.
\q
\v 7 गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.
\s5
\q
\v 8 तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल
\q आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील.
\q
\v 9 माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत;
\q कारण सागर जसा जलपुर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.
\s5
\q
\v 10 त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल.
\q राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.
\s अवशेषांचे विजयी परतणे
\q
\v 11 त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस,
\q कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.
\s5
\q
\v 12 तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या
\q आणि यहूदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशांकडून एकत्र करील.
\q
\v 13 तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल.
\q एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही.
\s5
\q
\v 14 याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील.
\q अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील.
\q
\v 15 परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील,
\q आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल अशा रीतीने तिला सात फाटयांमध्ये विभागील.
\s5
\q
\v 16 इस्राएल मिसर देशातून वर आला,
\q तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकांस अश्शूरातुन परतण्यास हमरस्ता होईल.
\s5
\c 12
\s स्तुतिगीत
\p
\v 1 त्या दिवशी तू म्हणशील,
\q “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
\q
\v 2 पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,
\q कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
\s5
\q
\v 3 तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
\q
\v 4 त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा;
\q लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
\s5
\q
\v 5 परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
\q
\v 6 अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
\s5
\c 13
\s बाबेलाविषयी देववाणी
\p
\v 1 आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.
\q
\v 2 उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा,
\q त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.
\q
\v 3 मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे,
\q होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.
\s5
\q
\v 4 अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे,
\q अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.
\q
\v 5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत.
\q परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.
\s5
\q
\v 6 आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.
\q
\v 7 त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे;
\q
\v 8 ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे.
\q ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
\s5
\q
\v 9 पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे
\q अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.
\q
\v 10 आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत.
\q अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही.
\s5
\q
\v 11 मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन.
\q मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.
\q
\v 12 मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील.
\s5
\q
\v 13 म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल,
\q सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.
\q
\v 14 शिकारी झालेल्या हरीणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे,
\q प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.
\s5
\q
\v 15 जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.
\q
\v 16 त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील.
\q त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रीयांवर बलात्कार होतील.
\s5
\q
\v 17 पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन,
\q ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.
\q
\v 18 त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.
\s5
\q
\v 19 आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल,
\q तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
\q
\v 20 ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत.
\q अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.
\s5
\q
\v 21 परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील;
\q आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील.
\q
\v 22 तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.
\s5
\c 14
\p
\v 1 परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.
\v 2 राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.
\s5
\p
\v 3 त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल,
\v 4 बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला.
\s5
\q
\v 5 दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे.
\q
\v 6 जो क्रोधाने लोकांस निरंतर ठोसे मारत असे,
\q तो रागाने राष्ट्रावर राज्य करीत असे, कोणाला आडकाठी घालता येईना असा हल्ला करत असे तो परमेश्वराने मोडला आहे.
\s5
\q
\v 7 सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे.
\q
\v 8 लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात;
\q ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.
\q
\v 9 जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे.
\q तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील,
\q सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे.
\s5
\q
\v 10 ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे.
\q
\v 11 तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे.
\q तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.
\s5
\q
\v 12 हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस!
\q ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!
\q
\v 13 जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन,
\q देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन,
\q आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.
\q
\v 14 मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.
\s5
\q
\v 15 तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे.
\q
\v 16 जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील.
\q ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?
\q
\v 17 जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?
\s5
\q
\v 18 सर्व राष्ट्रांचे राजे, त्यांच्यातील सर्व, गौरवाने प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कबरेत निजले आहेत.
\q
\v 19 पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे.
\q जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.
\q
\v 20 जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही,
\q कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत,
\q जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”
\s5
\q
\v 21 त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा,
\q म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही.
\q
\v 22 “मी त्यांच्याविरुद्ध उठेन,” असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
\q “मी बाबेलापासून नाव, वंशज आणि भावी पिढ्या ह्यांना तोडून टाकीन,” हे परमेश्वर जाहीर करतो.
\q
\v 23 मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन,
\q आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
\s अश्शूराचा नाश होणार
\s5
\q
\v 24 सेनाधीश परमेश्वराने शपथ वाहून म्हणाला,
\q खात्रीने, माझे जे उद्देश आहेत, त्याप्रमाणे होईल; आणि जसे मी योजले तसेच होईल.
\q
\v 25 मी आपल्या देशात अश्शूराला तोडीन आणि माझ्या पर्वतावर त्यास पायाखाली तुडवीन.
\q नंतर त्याचे जोखड त्यांच्यावरून निघेल आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून दूर सारले जाईल.
\s5
\q
\v 26 संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे.
\q
\v 27 कारण सेनाधीश परमेश्वराने हा संकल्प केला आहे; तो कोण थांबवू शकेल? त्याचा हात उगारलेला आहे, आणि तो कोणाच्याने मागे वळवू शकेल?
\s पलेशेथाविषयी देववाणी
\s5
\q
\v 28 राजा आहाजाच्या मृत्यूच्या वर्षात ही घोषणा आली.
\q
\v 29 अगे पलिष्टी, तुला मारणारी काठी मोडली आहे म्हणून आनंद करू नको.
\q कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल आणि उडता आग्या सर्प त्याचे फळ होईल.
\q
\v 30 गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील,
\q आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील.
\q मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.
\s5
\q
\v 31 वेशीनो मोठ्याने आक्रोश करा;
\q नगरांनो आरोळी करा.
\q पलिष्टी तू सर्व वितळून जाशील.
\q कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.
\q
\v 32 तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल?
\q परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.
\s5
\c 15
\s मवाबाविषयी देववाणी
\p
\v 1 मवाबाबद्दलची घोषणा.
\q खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले;
\q खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.
\q
\v 2 दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले;
\q नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे.
\q त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
\s5
\q
\v 3 ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर
\q आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत
\q
\v 4 हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे.
\q यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
\s5
\q
\v 5 मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत.
\q लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत;
\q होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत.
\q
\v 6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे;
\q गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
\q
\v 7 यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते,
\q वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.
\s5
\q
\v 8 मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे;
\q त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे.
\q
\v 9 दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन.
\q जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.
\s5
\c 16
\q
\v 1 जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो
\q त्यास तुम्ही सीयोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा.
\q
\v 2 कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,
\q मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील.
\s5
\q
\v 3 सूचना दे, न्याय अंमलात आण; दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर; शरणार्थीस लपीव;
\q शरणार्थींचा विश्वासघात करू नकोस.
\q
\v 4 मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे;
\q तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो.
\q कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल.
\q ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.
\s5
\q
\v 5 विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल.
\q तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल.
\s5
\q
\v 6 आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी,
\q त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.
\q
\v 7 यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील.
\q कीर हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल.
\s5
\q
\v 8 हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत.
\q राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षवेली पायदळी तुडवल्या आहेत
\q त्या याजेरास पोहचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या.
\q त्यांचा कोंब चोहोकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता.
\s5
\q
\v 9 यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल.
\q मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन.
\q कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.
\q
\v 10 उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही.
\q व्यापारी दाबून मद्य काढण्याचे व्यवसाय करणार नाही; द्राक्षांच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे.
\s5
\q
\v 11 यामुळे मवाबाकरता माझे अंतःकरण आणि कीर हेरेसासाठी माझे अंतर्याम तंतुवाद्यासारखे उसासे टाकतात.
\q
\v 12 जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल
\q आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही.
\s5
\p
\v 13 पूर्वीच्या काळी मवाबाविषयी जे वचन परमेश्वर बोलला आहे ते हेच आहे.
\v 14 पुन्हा परमेश्वर बोलला, “तीन वर्षांच्या आतच, मवाबाचे गौरव नाहीसे होईल; त्यांचे लोक पुष्कळ असूनही, अवशेष फार थोडे आणि क्षुल्लक राहील.
\s5
\c 17
\s दिमिष्काविषयी देववाणी
\p
\v 1 दिमिष्काविषयीची घोषणा:
\p पाहा, दिमिष्क हे एक नगर म्हणून राहणार नाही; ते नासाडीचा ढीग होईल.
\q
\v 2 अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील.
\q ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही.
\q
\v 3 एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य
\q आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s इस्राएलाचा न्याय
\s5
\q
\v 4 त्या दिवसात असे होईल की,
\q याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.
\q
\v 5 जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल.
\q जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.
\s5
\q
\v 6 जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात,
\q दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.
\m
\v 7 त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील.
\s5
\p
\v 8 आपल्या हातांच्या कामाकडे, ते वेद्यांकडे पाहणार नाहीत किंवा आपल्या बोटांनी केलेल्या अशेरा स्तंभ आणि सूर्यमूर्ती याकडे ते पाहणार नाहीत.
\q
\v 9 त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणांसारखी,
\q जी ठिकाणे इस्राएल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील, आणि तेथे ती ओस पडतील.
\s5
\q
\v 10 कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाकडे दुर्लक्ष केले.
\q यामुळे तू रम्य रोपे लावली आणि निसटून अपरीचीत प्रवासास निघाला.
\q
\v 11 त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले,
\q परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.
\s5
\q
\v 12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय
\q आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!
\q
\v 13 राष्ट्रे महापुराच्या बहुत जलांच्या गोंगाटाप्रमाणे गोंगाट करतील,
\q परंतु देव त्यांना धमकावील तेव्हा ते दूर पळतील
\q आणि वाऱ्यापुढे डोंगरावरच्या भुसासारखे व वादळापुढे धुळीसारखा त्यांचा पाठलाग होईल.
\q
\v 14 तेव्हा पाहा, संध्याकाळी दहशत! आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते;
\q जे आम्हांला लुटतात त्यांचा हा वाटा आहे, आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे.
\s5
\c 18
\s कूशाविषयीचे भाकित
\q
\v 1 कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय;
\q
\v 2 जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो.
\q शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे,
\q जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र,
\q ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,
\s5
\q
\v 3 अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो,
\q जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.
\s5
\q
\v 4 परमेश्वराने मला हे सांगितले आहे की,
\q जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन.
\q
\v 5 कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात,
\q तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.
\s5
\q
\v 6 पर्वतावरील पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरील जनावरांसाठी त्या एकत्र टाकून ठेवल्या जातील.
\q उन्हाळ्यात पक्षी त्यामध्ये राहतील आणि थंडीत पृथ्वीवरील जनावरे त्यावर हिवाळा घालवतील.”
\v 7 त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पण करण्यास येतील.
\s5
\c 19
\s मिसराविषयी देववाणी
\p
\v 1 मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे;
\q मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.
\q
\v 2 देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध;
\q नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.
\s5
\q
\v 3 मिसराचा उत्साह त्याच्यामध्ये कमजोर होईल. मी त्यांचा सल्ला नष्ट करील,
\q जरी ते मूर्तीना, मृत मनुष्याच्या आत्म्याला, व मांत्रिकाजवळ व भूतवैद्यांचा सल्ला शोधतील.
\q
\v 4 “मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील.
\q असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 5 समुद्राचे पाणी पूर्ण कोरडे पडेल आणि नदी आटेल व रिक्त होईल.”
\q
\v 6 नद्यांना दुर्गंध येईल; मिसराचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील.
\q बोरू व लव्हाळे सुकून जातील
\s5
\q
\v 7 नीलजवळचे बोरू,
\q नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील.
\q
\v 8 कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील
\q त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील.
\s5
\q
\v 9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील.
\q
\v 10 मिसरचे वस्त्र कामगार चिरडले जातील; जे सर्व मोलासाठी काम करतात ते नाउमेद होतील.
\s5
\q
\v 11 सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत. फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत.
\q तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे?
\q
\v 12 मग ते, तुझी सुज्ञ माणसे कोठे आहेत?
\q तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिसराबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे.
\s5
\q
\v 13 सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत, नोफाचे
\f + मेमफीज
\f* सरदार फसले आहेत; जे तिच्या गोत्राची कोनशिला असे आहेत त्यांनी मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
\q
\v 14 परमेश्वराने त्यांच्यामध्ये विकृतीचा आत्मा मिसळला आहे
\q आणि जसा मद्यपी आपल्या ओकारीत लटपटत चालतो तसे त्यांनी सर्व कामात जे तिने केले, मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
\q
\v 15 तेथे मिसरासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही.
\s5
\p
\v 16 त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.
\v 17 यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल.
\s5
\p
\v 18 त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.
\s5
\p
\v 19 त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल.
\v 20 ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील.
\s5
\p
\v 21 त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील.
\v 22 परमेश्वर मिसराला पीडील, पीडील व बरे हि करील. ते परमेश्वराकडे परत येतील; तो त्यांची प्रार्थना ऐकेल व त्यांना बरे करील.
\s5
\p
\v 23 त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात व मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील.
\s5
\p
\v 24 त्या दिवसात इस्राएल मिसराशी व अश्शूराशी मिळालेला असा तिसरा सोबती होईल; तो पृथ्वीच्यामध्ये आशीर्वाद होईल.
\v 25 सेनाधीश परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. मिसर माझे लोक व अश्शूर माझ्या हातचे कृत्य व इस्राएल माझे वतन आशीर्वादीत असो;
\s5
\c 20
\s अश्शूर देश मिसर व कूश देश जिंकून घेईल
\p
\v 1 ज्या वर्षी सेनापती तर्तान
\f + तर्तान
\f* अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले.
\v 2 त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.
\s5
\p
\v 3 परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कुशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे,
\v 4 त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल.
\s5
\p
\v 5 जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”
\v 6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”
\s5
\c 21
\s समुद्रलगतच्या रानाविषयी देववाणी
\p
\v 1 समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी.
\q जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
\q
\v 2 दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे,
\q विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो.
\q हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल,
\q मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
\s5
\q
\v 3 यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत,
\q प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे.
\q जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
\q
\v 4 माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो.
\q रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
\s5
\q
\v 5 त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले,
\q उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
\s5
\q
\v 6 जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले,
\q तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
\q
\v 7 जेव्हा तो रथ, घोडेस्वार,
\q गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील,
\q तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
\s5
\q
\v 8 पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला,
\q हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो
\q आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
\q
\v 9 आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे.
\q त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली,
\q आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
\s5
\q
\v 10 हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा!
\q सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव,
\q ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
\s दुमाविषयी देववाणी
\s5
\q
\v 11 दूमा
\f + अदोम
\f* विषयीचा घोषणा,
\q सेईर
\f + अदोम
\f* येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
\q
\v 12 पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
\s अरबस्तानाविषयी देववाणी
\s5
\q
\v 13 अरेबिया विषयी घोषणा,
\q ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
\q
\v 14 अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा,
\q पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
\q
\v 15 कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी
\q आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
\s5
\q
\v 16 कारण परमेश्वराने मला सांगितले,
\q एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
\q
\v 17 फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे.
\s5
\c 22
\s दृष्टान्ताच्या खोऱ्याविषयी देववाणी
\p
\v 1 दृष्टांताच्या खोऱ्याविषयी
\f + यरुशलेम
\f* ही देववाणी;
\q तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?
\q
\v 2 एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी,
\q तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत.
\s5
\q
\v 3 तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे,
\q तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत.
\q
\v 4 यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहु नका, मी कष्टाने रडेन,
\q माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका.
\s5
\q
\v 5 कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू
\q याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील.
\q
\v 6 एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला,
\q आणि कीराने ढाल उघडी केली.
\q
\v 7 आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे
\q रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.
\s5
\q
\v 8 त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे,
\q आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली.
\q
\v 9 दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे,
\q आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले.
\s5
\q
\v 10 तू यरुशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली
\f + भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोड
\ft शहराच्या आतील आणि बाहेरील भिंतीच्या मधील दुरुस्ती करण्याच्या पलीकडे असलेली घरे त्यांनी पाडून टाकली. त्या घराच्या पुढील आणि मागील भिंतींनी मिळून त्या भींतीचा भाग बनला, आणि त्या पडलेल्या घरांच्या आतील भिंतींच्या दगडांचा उपयोग शहराची बाहेरील भिंत दुरुस्त करण्यासाठी केला.
\f* .
\q
\v 11 दोन भिंतीच्या मधे हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली.
\q पण तू शहर बांधनाऱ्याचा विचार केला नाही, ज्याने त्या बद्दल पूर्वीच योजीले होते.
\s5
\q
\v 12 त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला,
\q रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
\q
\v 13 परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे.
\q आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.
\q
\v 14 आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की,
\q जरी तू मेलास, तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s शेबनाच्या जागी एल्याकीम येणार
\s5
\q
\v 15 सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल;
\q
\v 16 तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस?
\q जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस.
\s5
\q
\v 17 पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकुन देईल आणि तुला घट्ट धरील.
\q
\v 18 तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन,
\q तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील.
\q
\v 19 प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील.
\s5
\q
\v 20 आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन.
\q
\v 21 तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन.
\q यरुशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल.
\q
\v 22 दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन,
\q तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही.
\s5
\q
\v 23 त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन,
\q आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल.
\q
\v 24 त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे,
\q पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील.
\s5
\p
\v 25 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
\s5
\c 23
\s सोर व सिदोनाविषयी देववाणी
\p
\v 1 सोर विषयी देववाणी,
\q तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर व तुमच्यासाठी घर नाही,
\q असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.
\q
\v 2 समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा,
\q तुम्ही सीदोनाचे व्यापारी,
\q जे तुम्ही समुद्रावरून प्रवास करता, ज्यांच्या प्रतिनीधींनी तुझ्या गरजा पूरवल्या.
\q
\v 3 आणि महान जलांवरून
\q नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती.
\s5
\p
\v 4 हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो,
\q “मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत व मी प्रसवलेहि नाही,
\q मी तरूण पुरूष वाढवले नाहीत व तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”
\q
\v 5 मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.
\s5
\q
\v 6 तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.
\q
\v 7 अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती,
\q पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत.
\s5
\q
\v 8 मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले?
\q
\v 9 सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी व पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजीले आहे.
\s5
\q
\v 10 हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही.
\q
\v 11 परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली.
\q त्याने कनानाचे सर्व दुर्ग नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे.
\q
\v 12 तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस,
\q उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”
\s5
\q
\v 13 खास्दयांचा
\f + बाबेल
\f* देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे
\q त्यांनी त्यांचे बूरूज वेढा देण्यासाठी स्थापले आहेत व त्याचे ढीगारे बनवतील, समुद्रावर संचार करणाऱ्यानो रडा शोक करा कारण तुमच्या बंदराचा नाश झाला आहे त्याचा पुर्ण विध्वंस केलेला आहे.
\q
\v 14 तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.
\s5
\p
\v 15 त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल.
\q
\v 16 हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर,
\q ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा.
\s5
\p
\v 17 सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.
\v 18 तिच्या व्यापारचा माल व त्याचे वतन परमेश्वरास पवित्र होईल, ते वतन साठवले जाणार नाही व राखून ठेवले जाणार नाही, तर जे परेश्वरासमोर राहतात त्यांनी भरपूर खावे व टिकाऊ वस्त्र घालावे म्हणून त्यांच्यासाठी त्याचा व्यापाऱ्याचा माल येईल.
\s5
\c 24
\s पृथ्वीविषयी परमेश्वराचा न्याय
\q
\v 1 पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.
\q
\v 2 आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तीच्या धानिणीशी,
\q जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.
\s5
\p
\v 3 पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल,
\q कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
\q
\v 4 मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.
\q
\v 5 पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले,
\q1 आणि सार्वकालीक करार मोडला आहे.
\s5
\q
\v 6 त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.
\q
\v 7 नवीन द्राक्षारस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत.
\s5
\q
\v 8 डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत,
\q वीणेचा आनंद बंद केला आहे.
\q
\v 9 ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.
\s5
\q
\v 10 अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे.
\q
\v 11 द्राक्षारसामुळे चौका चौकात रडणे आहे.
\q सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.
\s5
\q
\v 12 नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.
\q
\v 13 द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात
\q तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल.
\s5
\q
\v 14 ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील,
\q आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील.
\q
\v 15 यास्तव पुर्वेत परमेश्वराचे गौरव करा,
\q आणि सागरातील द्वीपांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर, याच्या नावाला गौरव द्या.
\s5
\q
\v 16 पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मीकास वैभव असो.”
\q पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे,
\q होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.
\s5
\q
\v 17 पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.
\q
\v 18 जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल.
\q स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत.
\s5
\q
\v 19 पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे.
\q पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे.
\q
\v 20 पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल,
\q तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही.
\s5
\q
\v 21 त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.
\q
\v 22 त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील,
\q1 नंतर त्यांचा न्याय केला जाईल.
\q
\v 23 नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल,
\q1 तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरुशलेमेत राज्य करील.
\s5
\c 25
\s परमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत
\q1
\v 1 हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.
\q1 कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस,
\q1 जे संकल्प तू पूर्विच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,
\q
\v 2 कारण तू शत्रूंच्या नगराला ढीग केले आहेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले आहेस,
\q आणि परक्यांचे महाल असे ते नगर राहिले नाही.
\q
\v 3 याकरिता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दयी राष्ट्रे तुला भीतील.
\s5
\q
\v 4 कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस.
\q जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो,
\q तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.
\q
\v 5 उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील
\s5
\q
\v 6 तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील,
\q तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील.
\q
\v 7 त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील.
\q
\v 8 तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील
\q देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील परमेश्वर देव हे बोलला आहे हे तो करीलच.
\s5
\q
\v 9 सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, “पाहा हा आमचा देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे त्याची आम्ही वाट पाहातो,
\q कारण तोच आमचे तारण करणारा आहे, हा आमचा परमेश्वर आहे, आम्ही सर्व आंनदी आहो कारण त्याच्याकडून आम्हांला तारण प्राप्ती होईल.
\q
\v 10 कारण परमेश्वराचा हात यरुशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी
\q सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शिवाद सदैव यरुशलेमेतील लोकांबरोबर राहतील,
\q पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.
\s5
\q
\v 11 पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान,
\q गर्व व सर्व दुराचार याचा नाश करून त्यांचा शेवट करील.
\q
\v 12 मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.
\s5
\c 26
\s परमेश्वराच्या संरक्षणासंबंधी भावपूर्ण गीत
\p
\v 1 त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील,
\q आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना व तटबंदीना तारण असे केले आहे.
\q
\v 2 वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील.
\s5
\q
\v 3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
\q
\v 4 सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
\s5
\q
\v 5 कारण जे अभिमाणाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तीला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तीला धुळीस मिळवणार.
\q
\v 6 दीनदुबळ्यांचे पाय व दरिद्र्यांचे पाय त्यांना तुडवतील.
\s5
\q
\v 7 सरळपण हा नितीमानाचा मार्ग आहे, जो तू सरळ आहेस तो तू नितीमानाची वाट सपाट करतो.
\q
\v 8 होय, परमेश्वरा, तुझ्या न्यायाच्या मार्गात आम्ही तुझी वाट पाहिली आहे,
\q आमच्या जीवाची इच्छा तुझ्या नावाकडे, तुझ्या स्मरणाकडेच आहे.
\q
\v 9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे,
\q माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन,
\q कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.
\s5
\q
\v 10 पापी मनुष्यावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच न्यायीपण शिकणार नाही. सरळपणाच्या भूमीत तो दुष्टतेनेच वागणार,
\q आणि परमेश्वराचा महिमा पाहणार नाही.
\s5
\q
\v 11 परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
\q तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
\q
\v 12 परमेश्वरा, तू आमच्यासाठी शांती ठरवशील, कारण खरच तू आमची सर्व कामे आमच्यासाठी पूर्ण केले आहेत.
\s5
\q
\v 13 परमेश्वर आमचा देव, तुला सोडून इतर देवतांनी आम्हावर राज्य केले. पण आम्ही फक्त तुझीच स्तुती करतो.
\q
\v 14 ते मृत आहेत, ते जीवंत नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत.
\q खरोखर, तू त्यांना दंड देऊन त्यांचा नाश केला आहेस आणि त्यांची आठवण तू नष्ट केली आहेस.
\s5
\q
\v 15 हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस,
\q तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत.
\s5
\q
\v 16 परमेश्वरा, संकटात असताना ते तुझे स्मरण करतात. तुझी शिक्षा त्यांच्यावर असता त्यांनी तुझ्यापुढे प्रार्थना केली.
\q
\v 17 जेव्हा एखादी स्त्री प्रसूतिची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते,
\q प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.
\s5
\q
\v 18 त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतिवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही,
\q आणि जगातील राहणारे पडले नाहीत.
\s5
\q
\v 19 तुझे मरण पावलेले जीवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा.
\q कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.”
\s5
\q
\v 20 माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा आणि दारे लावून घ्या.
\q क्रोध टळून जाईपर्यंत थोडा वेळासाठी लपा.
\q
\v 21 कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे.
\q मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.
\s5
\c 27
\s इस्राएलाची मुक्तता व एकत्रीकरण
\p
\v 1 त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.
\q
\v 2 तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.
\q
\v 3 “मी परमेश्वर, तीची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तीला पाणी घातले;
\q त्यामुळे कोणीही तीला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तीचे राखण करतो.
\s5
\q
\v 4 मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील!
\q पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन.
\q
\v 5 अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी.
\s5
\q
\v 6 येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल,
\q आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.”
\s5
\q
\v 7 काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय?
\q
\v 8 याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर
\f + बंदिवासात
\f* पाठवून अचूक मापदंडांनी
\f + अचूक मापदंडांनी
\f* त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो.
\s5
\q
\v 9 याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे.
\q तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल,
\q आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीहि उभ्या राहणार नाहीत.
\s5
\q
\v 10 कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे.
\q वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल.
\q
\v 11 त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील.
\q कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव
\q ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.
\s5
\q
\v 12 त्या दिवशी असे होईल की,
\q परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील,
\q आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार.
\q
\v 13 त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल,
\q आणि तेव्हा अश्शूर देशामध्ये नाश होणारे आणि मिसर देशात जे घालवले आहेत ते येतील.
\q आणि यरुशलेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील.
\s5
\c 28
\s एफ्राइमाला इशारा
\q
\v 1 एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला
\f + फुलांचा हार
\f* हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!
\q
\v 2 पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे.
\q नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने हाणीण.
\s5
\q
\v 3 एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.
\q
\v 4 त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे,
\q उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो.
\s5
\q
\v 5 त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल.
\q
\v 6 आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.
\s यरुशलेमेस इशारा व अभिवचन
\s5
\q
\v 7 पण हे सुद्धा द्राक्षारसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत.
\q याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षारस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे.
\q ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
\q
\v 8 खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
\s5
\q
\v 9 तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल?
\q दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय?
\q
\v 10 कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे.
\s5
\q
\v 11 खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.
\q
\v 12 पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात.
\s5
\q
\v 13 लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.
\q हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले.
\q म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
\s5
\q
\v 14 याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरुशलेमेवर राज्य करता,
\q ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका.
\q
\v 15 तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे.
\q अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही;
\q कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.”
\s5
\q
\v 16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,
\q “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा,
\q कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो.
\q जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
\s5
\q
\v 17 मी न्याय मोजमापाची काठी,
\q आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन,
\q तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील,
\q आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”
\s5
\q
\v 18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल
\q आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल.
\q जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल,
\q त्या द्वारे तुम्ही झाकले जाल.
\q
\v 19 जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल.
\q आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल.
\q आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.
\s5
\q
\v 20 कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे,
\q आणि पांघरुण पांघरायला पुरत नाही एवढे ते अरुंद आहे.
\q
\v 21 जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता,
\q जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.
\q अशासाठी की त्याने आपले कार्य,
\q त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.
\s5
\q
\v 22 तर आता तुम्ही थट्टा करू नका,
\q नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील.
\q कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव,
\q मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.
\s5
\q
\v 23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका,
\q सावध असा, माझे शब्द ऐका.
\q
\v 24 पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का?
\q तो सतत मशागत करतो का?
\s5
\q
\v 25 त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो,
\q तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय?
\q
\v 26 कारण त्याचा देव त्यास सूचना देतो,
\q तो त्यास सुज्ञपणे शिकवतो.
\s5
\q
\v 27 शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही,
\q पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.
\q
\v 28 भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही.
\q आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.
\s5
\q
\v 29 सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.
\s5
\c 29
\s अरीएल व त्याचे शत्रू
\p
\v 1 अरीएल
\f + देवाचा क्रोध किंवा यरुशलेम शहर
\f* , अरीएल, म्हणजे ते शहर ज्यात दाविदाने तळ दिला, तिला हायहाय!
\q वर्षाला वर्ष जोडा, सण फिरून येवोत.
\q
\v 2 पण मी अरिएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील,
\q आणि ती मला अरीएलासारखी होईल.
\s5
\q
\v 3 मी तुझ्यासभोवती तळ घालून तुला वेढीन,
\q आणि मी तुझ्याभोवती मजबूत कुंपण घालीन आणि तुझ्याविरूद्ध वेढा उभारीन.
\q
\v 4 तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील,
\q तुझा आवाज भूमीतून बाहेर निघणाऱ्या भूतासारखा असेल, आणि तुझा शब्द धुळीतून आल्याप्रमाणे येईल.
\s5
\q
\v 5 तुझ्या शत्रूंचा समुदाय धुळीच्या कणांसारखा आणि निर्दयांचा समुदाय उडत्या भुसासारखा होईल
\q आणि हे एका क्षणांत एकाएकी घडणार.
\q
\v 6 सेनाधीश परमेश्वराकडून, भूकंप, मोठीगर्जना व मोठे वादळ, वावटळ आणि खाऊन टाकणारी अग्नी, यांनी तुला शासन करण्यात येईल.
\s5
\q
\v 7 ते सर्व रात्रीच्या आभासासारखे असेल,
\q अनेक राष्ट्रातील समुदाय अरीएलविरूद्ध लढतील,
\q ते तिच्यावर आणि तिच्या दुर्गावर हल्ला करतील.
\q
\v 8 हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते.
\q हे असे असणार की तान्हेला स्वप्न पाहतो की तो पीत आहे, पण तो जागा होतो आणि पाहा तो मूर्छित आहे व त्याचा जीव त्रासलेला आहे,
\q होय, जे राष्ट्र समुदाय सियोन पर्वताविरूद्ध लढतात त्यांची अशीच स्थिती होईल.
\s इस्राएलाची दांभिकता व अंधत्व
\s5
\q
\v 9 तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा.
\q ते धुंद आहेत पण द्राक्षारसाने नव्हे. ते झूलत आहेत पण मद्याने नव्हे.
\q
\v 10 कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे.
\q त्याने तुमचे डोळे बंद केले आहेत, जे भविष्यवादी आहेत आणि परमेश्वर तुमची डोकी झाकले, जे तुम्ही दृष्टांत पाहता.
\s5
\q
\v 11 तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.”
\q
\v 12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
\s5
\q
\v 13 माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात.
\q पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर,
\q म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.
\q
\v 14 म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांस विस्मित करीत राहीन. आश्चर्या मागून आश्चर्य,
\q त्यांच्यातील सुज्ञ मनुष्याचे ज्ञान नष्ट होईल, आणि त्यांच्यातील शहाण्या मनुष्याचा समजदारपणा नाहीसा होईल.
\s5
\q
\v 15 जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात,
\q आणि ज्यांची कृत्ये अंधारात आहेत, व जे असे म्हणतात, “आम्हांला कोण पाहते? आणि ओळखते? त्यांना हायहाय!”
\s5
\q
\v 16 तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? “तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही” असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?
\s5
\q
\v 17 काही काळाच्या आत
\q लबानोन सुपीक भूमीमध्ये बदलण्यात येईल आणि सुपीक भूमी घनदाट जंगल होईल.
\q
\v 18 त्या दिवशी बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल
\q आणि आंधळ्याचे डोळे गडद अंधारातून पाहतील.
\q
\v 19 पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील
\q आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.
\s5
\q
\v 20 कारण निर्दयींचा अंत होईल आणि उपहास करणारा नाश होईल. दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे सर्व काढले जातील.
\q
\v 21 जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात
\q जे वेशीत न्याय शोधतात आणि नीतिमानास खोटेपणानी दाबून टाकतात.
\s5
\q
\v 22 परमेश्वर, ज्याने अब्राहामाला खंडून घेतले, परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी असे बोलतो.
\q “याकोब यापूढे लज्जीत होणार नाही व त्याचे तोंड आता फिक्के पडणार नाही.
\q
\v 23 पण जेव्हा तो त्याची सर्व मुले पाहील, जे माझ्या हातचे कार्य असेल, ते माझे नाव पवित्र मानतील.
\q ते याकोबाचा पवित्र प्रभूला पवित्र मानतील; इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
\q
\v 24 जे भ्रांत आत्म्याचे ते बुद्धी पावतील आणि जे तक्रार करतात ते विद्या प्राप्त करतील.”
\s5
\c 30
\s मिसरावरील अवलंबून राहणे व्यर्थ
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे.
\q ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात,
\q पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही,
\q अशी ती पापाने पापाची भर घालतात.
\q
\v 2 ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता
\q आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.
\s5
\q
\v 3 यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज
\q आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.
\q
\v 4 तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.
\q
\v 5 कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत
\q तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”
\s5
\q
\v 6 नेगेबमधल्या
\f + इज्राएलाच्या दक्षिणेच्या भागाच्या
\f* प्राण्यांविषयी घोषणा संदेश:
\q आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे,
\q संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प,
\q ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
\q
\v 7 मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.
\s5
\q
\v 8 आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव,
\q अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.
\q
\v 9 कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले,
\q मुले जी परमेश्वराची शिकवणुक ऐकण्यास नकार देतात.
\s5
\q
\v 10 ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.”
\q आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको;
\q आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.
\q
\v 11 मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर,
\q इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”
\s5
\q
\v 12 यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो,
\q “कारण तुम्ही हा संदेश नाकारता
\q आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
\q
\v 13 म्हणून हा अन्याय तुम्हास,
\q जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो,
\q ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
\s5
\q
\v 14 कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही.
\q आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरहि ठेवणार नाही.”
\s5
\q
\v 15 कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो,
\q “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.”
\q पण तुम्ही इच्छुक नव्हते.
\q
\v 16 तुम्ही म्हणता, नाही!
\q कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल.
\q आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.
\s5
\q
\v 17 एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील.
\q पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल.
\q पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
\s देवाच्या लोकांस त्याच्या कृपेचे अभिवचन
\s5
\q
\v 18 तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल,
\q कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.
\q
\v 19 कारण यरुशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस.
\q खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
\s5
\q
\v 20 जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल,
\q तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.
\q
\v 21 जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
\s5
\q
\v 22 तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मुर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल.
\q तुम्ही त्या देवांना मासीकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
\s5
\q
\v 23 तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल
\q आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल.
\q आणि पिके विपुल होईल.
\q त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.
\q
\v 24 आणि बैल व गाढव जे नांगरतात
\q ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील.
\s5
\q
\v 25 आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.
\q
\v 26 त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल.
\q परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
\s अश्शूराबाबत परमेश्वराचा न्याय
\s5
\q
\v 27 पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे,
\q त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
\q
\v 28 त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे,
\q अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
\s5
\q
\v 29 जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते.
\q आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.
\s5
\q
\v 30 परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.
\s5
\q
\v 31 परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.
\q
\v 32 आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो,
\q डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
\s5
\q
\v 33 पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे.
\q त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.
\s5
\c 31
\s मिसरी लोक मानव आहेत, देव नाहीत
\q
\v 1 जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय,
\q आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात.
\q परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही!
\q
\v 2 तोहि ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही.
\q आणि तो दुष्टांच्या घराण्याविरूद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरूद्ध उठेल.
\s5
\q
\v 3 मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही.
\q जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल;
\q दोघांचा नाश होईल.
\s5
\q
\v 4 परमेश्वराने मला हे सांगितले आहे, “जसा एखादा सिंह, तरुण सिंह, आपल्या फाडलेल्या भक्ष्यावर गुरगुरतात,”
\q जेव्हा मेंढपाळांचा गट बोलावून त्यांच्याविरुद्ध आणला असताही,
\q त्यांच्या आवाजाने भयभीत होत नाही, किंवा त्यांच्या गोंगाटाने दबकत नाहीत;
\q तसा सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर, त्याच्या टेकडीवर लढाई करण्यास उतरेल.
\s5
\q
\v 5 ज्याप्रमाणे पक्षी घिरट्या घालतो तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमचे रक्षण करील;
\q तो तिचे रक्षण करील आणि तो तिच्यावरून ओलांडून जाऊन तिला वाचवील व सुरक्षित ठेविल.
\p
\v 6 इस्राएलाच्या लोकांनो, जे तुम्ही त्याच्यापासून तीव्रतेने दूर निघून गेलात ते तुम्ही त्याच्याकडे माघारी या.
\v 7 कारण त्या दिवशी ते प्रत्येक आपल्या पापी हातांनी तयार केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या मूर्तींचा त्याग करतील.
\s5
\q
\v 8 अश्शूर तलवारीने पडेल; जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे.
\q तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.
\q
\v 9 ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा युद्धाचा झेंडा बघून घाबरतील
\q ज्याचा अग्नी सियोनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरुशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे.
\s5
\c 32
\s नीतिमान राजा
\q
\v 1 पाहा, राजा सदाचाराने राज्य करील, आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.
\q
\v 2 प्रत्येक जण जसा वाऱ्यापासून आडोसा व वादळामध्ये आश्रय व पाऊस तसा होईल,
\q सुक्या भूमीत जसे पाण्याचे प्रवाह, उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा तो होईल.
\q
\v 3 तेव्हा जे हे पाहतील त्यांचे डोळे मंदावणार नाही आणि ऐकणाऱ्यांचे कान हे लक्षपूर्वक ऐकतील.
\s5
\q
\v 4 अविचारी बारकाईने समजून घेईल, तोतरा सहजतेने व स्पष्ट बोलेल.
\q
\v 5 मूर्खाला अधिक काळ सन्मान्य म्हणणार नाही, किंवा फसविणाऱ्यास प्रतिष्ठीत. म्हणणार नाहीत.
\q
\v 6 कारण मूर्ख मनुष्य आपल्या मनात मूर्खपणाच्या गोष्टी बोलतो आणि वाईट गोष्टींचे बेत आखतो
\q आणि तो दुष्कृत्ये आणि देवविरहीत चुकीच्याच गोष्टी परमेश्वराविरूद्ध बोलतो.
\q तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही आणि तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही.
\s5
\q
\v 7 फसवणाऱ्याच्या पद्धती वाईट असतात. तो दुष्ट योजना आखून
\q गरीब योग्य ते बोलतो तेव्हाही तो असत्याने गरीबाचा नाश करू पाहतो.
\q
\v 8 परंतु सन्माननीय मनुष्य सन्माननीय योजना करतो कारण त्याच्या सन्माननीय कृतीमुळेच तो उभा राहतो.
\s5
\q
\v 9 तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, आणि माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझे ऐका.
\s यरुशलेमेच्या स्त्रियांना इशारा
\q
\v 10 अहो निश्चिंत स्त्रियांनो, एक वर्षाहून अधिक काळ तुमचा आत्मविश्वास तुटेल,
\q कारण द्राक्षाचे हंगाम बुडेल, फळे गोळा करता येणार नाही.
\s5
\q
\v 11 तुम्ही आरामात राहणाऱ्या स्त्रियांनो, थरथर कापा; तुम्ही आत्मविश्वास असणाऱ्यांनो, अस्वस्थ व्हा;
\q आपली तलम चांगली वस्त्रे काढा आणि आपल्याला उघडे करा; आपल्या कमरेभोवती तागाची वस्त्रे गुंडाळा.
\q
\v 12 रम्य शेतीसाठी व फलदायी द्राक्षवेलीसाठी त्या विलाप करतील.
\q
\v 13 माझ्या लोकांच्या भूमीवर काटे व कुसळे उगवतील,
\q एकेकाळी आनंदीत असलेल्या शहरातील घरांवरदेखील त्या उगवतील.
\s5
\q
\v 14 कारण महाल सोडून दिले जातील, गर्दीची शहरे ओस पडतील;
\q टेकडी व टेहळणीचा बुरूज सर्वकाळपर्यंत गुहा होईल,
\q रान गाढवांचा आनंद, कळपांची कुरणे होतील.
\q
\v 15 जोपर्यंत आम्हावर देवाच्या आत्म्याची वृष्टी वरून होणार नाही तोपर्यंत असे होईल,
\q आणि रान फलदायी शेती होईल, आणि फलदायी शेती मात्र जंगलासारखी होईल.
\s5
\q
\v 16 मग रानात न्यायत्वाची वस्ती होईल, फलदायी शेतीत नितीमत्ता वास करील.
\q
\v 17 नितीमत्तेचे कार्य शांती; नितीमत्तेचा परिणाम शांतता आणि सर्वकाळचा आत्मविश्वास होईल.
\q
\v 18 माझे लोक शांतस्थळी वस्ती करतील, सुरक्षित निवासस्थानी, आणि शांत जागी राहतील.
\s5
\q
\v 19 पण जंगलाचा नाश होते वेळी गारा पडतील व नगर अगदी जमीनदोस्त केले जाईल.
\q
\v 20 जे तुम्ही सर्व जलांजवळ पेरता, जे तुम्ही बैल व गाढव यांचे पाय मोकळे करता, ते तुम्ही आशीर्वादित आहा.
\s5
\c 33
\s परमेश्वर उद्धार करील
\q
\v 1 अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही!
\q अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो!
\q जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील,
\q जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील.
\s5
\q
\v 2 हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो;
\q रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो.
\s5
\q
\v 3 मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली.
\q
\v 4 टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील.
\s5
\q
\v 5 परमेश्वर उंचावला आहे. तो उच्चस्थानी राहतो. त्याने सियोनेस प्रामाणिकपणा व चांगुलपणा यांनी भरले आहे.
\q
\v 6 तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.
\s5
\q
\v 7 पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत.
\q
\v 8 राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही.
\q त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा
\f + साक्षींचा
\f* अनादर केला.
\s5
\q
\v 9 भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे;
\q शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत.
\s5
\q
\v 10 परमेश्वर म्हणतो आता मी उठेन, आता मी उठून उभा राहिल, आता मी उंचावला जाईन.
\q
\v 11 तुम्ही भुसकटाची गर्भधारणा कराल व धसकट प्रसवाल, तुमचा श्वास अग्नी आहे तो तुम्हास खाऊन टाकील.
\q
\v 12 लोक भाजलेल्या चुन्याप्रमाणे भस्म होतील, जसे काटेरी झुडपे तोडून व अग्नीत टाकतात.
\s5
\q
\v 13 जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या.
\q
\v 14 सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे.
\q आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील?
\s5
\q
\v 15 तो, नितीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो;
\q जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही
\q व दुष्कृत्याकडे पाहत नाही.
\q
\v 16 तो आपले घर उच्च स्थळी करील;
\q त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील.
\s5
\q
\v 17 तुझे नेत्र राजाला त्याच्या शोभेत पाहतील; ते विस्तीर्ण भूमी पाहतील.
\q
\v 18 भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे?
\q
\v 19 उद्धट मनोवृतीचे लोक, अनोळखी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे तुला पुर्णपणे आकलन झाले नाही अशा लोकांस तू फार काळ पाहणार नाहीस.
\s5
\q
\v 20 सियोनेकडे पाहा, हे नगर आपल्या मेजवाणीचे आहे;
\q तुझे डोळे यरुशलेमेकडे शांतीचे वस्तीस्थान म्हणून पाहतील. त्याचा तंबू कधीही काढणार नाहीत,
\q त्याच्या खुंट्या कधीही उपटणार नाहीत, ज्याच्या दोरखंडातील एकही दोरी तुटणार नाही.
\q
\v 21 त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी व प्रवाहांची अशी होईल.
\q त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत.
\s5
\q
\v 22 कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आम्हास न्याय देणारा आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तोच आम्हास तारील.
\s5
\q
\v 23 तुझे दोर ढिले झाले आहेत; त्यांना आपल्या डोलकाठीस घट्ट धरून ठेवत आधार नाहीत; ते शीड पसरीत नाहीत;
\q जेव्हा मोठ्या लुटीची लूट वाटण्यात आली, जे पांगळे त्यांनी लूट वाटून घेतली.
\q
\v 24 मी रोगी आहे, असे म्हणणारा त्यामध्ये वस्ती करणार नाही. जे लोक त्यामध्ये राहतात त्यांच्या अन्यायांची क्षमा करण्यात येईल.
\s5
\c 34
\s अदोम व इतर राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप
\q
\v 1 तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.
\q
\v 2 कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे;
\q त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे.
\s5
\q
\v 3 त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल,
\q आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.
\q
\v 4 आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील,
\q आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील,
\q जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.
\s5
\q
\v 5 ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल,
\q पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
\q
\v 6 परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे,
\q ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे.
\q कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.
\s5
\q
\v 7 रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल.
\q त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
\s5
\q
\v 8 कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
\q
\v 9 अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल,
\q आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.
\q
\v 10 तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल.
\q ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
\s5
\q
\v 11 पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील.
\q तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.
\q
\v 12 तिच्या सरदारांना
\q राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील.
\s5
\q
\v 13 तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील.
\q ती कोल्ह्यांचे वसतिस्थान, शहामृगाचे अंगण होईल.
\q
\v 14 हिंस्त्रपशु तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील.
\q निशाचर प्राणीहि तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.
\q
\v 15 तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील.
\q होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.
\s5
\q
\v 16 परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही.
\q कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
\q
\v 17 त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे.
\q ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.
\s5
\c 35
\s देवाच्या लोकांचे पुनर्वसन
\q
\v 1 निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि
\q कमळाप्रमाने बहरेल.
\q
\v 2 ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील;
\q त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल;
\q ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
\s5
\q
\v 3 दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
\q
\v 4 जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;”
\q पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात,
\q देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
\s5
\q
\v 5 मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.
\q
\v 6 नंतर लंगडे हरीणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल.
\q अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.
\q
\v 7 मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल;
\q कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.
\s5
\q
\v 8 तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील.
\q अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.
\q
\v 9 तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत,
\q परंतु तेथे उद्धारलेले चालतील.
\s5
\q
\v 10 परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत
\q आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील;
\q आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.
\s5
\c 36
\s सन्हेरीबाची स्वारी
\r 2राजे 18:13-37; 2इति. 32:1-19
\p
\v 1 हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर हल्ला केला, आणि त्यांचा ताबा घेतला.
\v 2 नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके
\f + अर्थ-सेनाधिपती
\f* याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरुशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला.
\v 3 मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस व आसाफचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले.
\s5
\p
\v 4 रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे?
\v 5 तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो?
\s5
\p
\v 6 पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”
\v 7 पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरुशलेमेला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?”
\s5
\p
\v 8 तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर.
\s5
\p
\v 9 माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता?
\v 10 तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर.
\s5
\p
\v 11 मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत
\f + इब्री
\f* बोलू नका.”
\v 12 पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”
\s5
\p
\v 13 नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत
\f + इब्री
\f* म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.”
\v 14 राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही.
\v 15 परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.”
\s5
\p
\v 16 हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या टाकीतले पाणी प्या.
\v 17 मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षारसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा.
\s5
\p
\v 18 परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय?
\v 19 हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय?
\v 20 ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम सोडवील काय?
\s5
\p
\v 21 पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती.
\v 22 नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.
\s5
\c 37
\s सन्हेरीबाच्या हातून यहूदाची सुटका
\r 2राजे 19:1-7
\p
\v 1 मग असे झाले की, जेव्हा हिज्कीया राजाने त्यांचा निरोप ऐकून, त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोणपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 2 त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
\s5
\p
\v 3 ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.
\v 4 परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.
\s5
\p
\v 5 तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे आले.
\v 6 आणि यशया त्यांना म्हणाला, तुझ्या धन्याला सांग; परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमान केला आहे, ते शब्द तू ऐकले आहेस, त्याने तू घाबरून जाऊ नको.
\v 7 पाहा, मी एक आत्मा त्याच्यात घालीन आणि तो काही बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल, तो आपल्याच देशात तलवारीने पडेल, असे मी करीन.
\s5
\p
\v 8 मग रब-शाके माघारी आला आणि त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरूद्ध लढाई करताना सापडला, कारण त्याने राजा लाखीशाहून गेला आहे, हे त्याने ऐकले.
\v 9 मग सन्हेरीबाने ऐकले की, कूशाचा व मिसराचा राजा तिऱ्हाका आपणाशी लढावयास गेला आहे, असे बोलताना कोणी ऐकले, ते ऐकून त्याने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन जासूद पाठवले की,
\v 10 यहूदाचा राजा हिज्कीया, याला सांगा, तू ज्या देवावर भरवसा ठेवतोस तो यरुशलेम अश्शूराच्या राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे म्हणून तुला न फसवो.
\s5
\p
\v 11 पाहा, तू ऐकले आहेस अश्शूराच्या राजांने त्यांच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय?
\v 12 गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वाडवडीलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का?
\v 13 हमाथाचा राजा आणि अर्पदचा राजा सफरवाईम नगराचा राजा, हेनाचा व इव्वाचा राजा हे कोठे आहेत?
\s5
\p
\v 14 हिज्कीयाने जासूदाकडून हे पत्र स्विकारुन त्याने ते वाचले, नंतर तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरापुढे पसरले.
\v 15 हिज्कीयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली
\v 16 हे सैन्यांच्या परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, जो तू करूबावर बसतो, तो तूच मात्र सर्व राज्यांचा देव आहेस, तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.
\s5
\p
\v 17 हे परमेश्वरा, कान लाव व ऐक! हे परमेश्वरा तुझे डोळे उघड आणि पाहा, आणि सन्हेरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत.
\v 18 हे सत्य आहे, परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्राचा व त्यांच्या भूमीचा नाश केला आहे.
\s5
\p
\v 19 त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्यांच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड व दगड होते, म्हणून अश्शूऱ्यांनी त्यांना नष्ट केले.
\v 20 तर आता, हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास त्यांच्या हातातून सोडीव, म्हणजे तूच मात्र परमेश्वर आहेस हे पृथ्वीतल्या सर्व राजांनी जाणावे.
\s5
\p
\v 21 नंतर आमोजाचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवून म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘कारण अश्शूराचा राजा सन्हेरीब याच्याबद्दल तू माझी प्रार्थना केली.
\v 22 त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे.
\q सियोनेची कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, यरुशलेमेची कन्या, तुला डोके हलवून दाखवते.
\q
\v 23 तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास
\q आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.
\s5
\q
\v 24 तू आपल्या सेवकांकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळशा रथाबरोबर
\q मी पर्वताच्या उंचावर, लबानोनाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे,
\q त्याचे उंच गंधसरू, व त्याचे निवडक देवदारू मी तोडीन
\q आणि मी त्याच्या अगदी दूरच्या उंचीवर त्याच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो
\v 25 मी विहिरी खणल्या व विदेशी पाणी प्यालो;
\q मी आपल्या पायाच्या तळव्यांनी मिसरच्या सर्व नद्या सुकवून टाकीन.
\s5
\q
\v 26 मी हे मागच्या काळात कसे केले
\q आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले, हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडवून आणले आहे.
\q तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीग करण्यास येथे आहे.
\q
\v 27 त्यामध्ये राहणारे, अल्प शक्तीचे होते, ते मोडून गेले व फजीत झाले.
\q ते शेतात लावलेल्या रोपासारखे, हिरवे गवत, छतावरचे किंवा शेतातले गवत,
\q वाढ होण्यापूर्वी पूर्वेच्या वाऱ्यापुढे करपले आहे.
\s5
\q
\v 28 पण तुझे बसणे, बाहेर जाणे, आत येणे आणि माझ्याविरूद्धचा तुझा क्रोध मला ठाऊक आहे.
\q
\v 29 कारण माझ्याविरूद्धच्या तुझ्या क्रोधामुळे आणि व तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहचला आहे,
\q मी आपले वेसण तुझ्या नाकात व आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन;
\q तू ज्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन.
\s5
\q
\v 30 तुझ्यासाठी हे चिन्ह होईलः
\q या वर्षी तुम्ही जे काही आपोआप उगवेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगवेल ते खाल,
\q परंतु तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्षमळे लावा आणि त्याचे फळ खा.
\s5
\q
\v 31 यहूदाच्या घराण्यातील वाचलेले अवशिष्ट पुन्हा मूळ धरतील आणि फळ धारण करतील.
\q
\v 32 कारण यरुशलेमेमधून अवशेष बाहेर येतील; सियोनाच्या डोंगरावरून वाचलेले येतील,
\q सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे करील.
\s5
\q
\v 33 म्हणून अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर हे म्हणतोः
\q तो या नगरात येणार नाही, किंवा येथे एकही बाण मारणार नाही, तो या समोर ढालीसह येणार नाही किंवा याविरूद्ध वेढा रचून थैमान घालणार नाही.
\q
\v 34 तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल; तो या नगरात प्रवेश करणार नाही, ही परमेश्वराची घोषणा आहे.
\s5
\q
\v 35 कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन.
\s5
\p
\v 36 मग परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूराच्या तळावरील एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिकांना ठार मारले, जेव्हा पहाटेस माणसे उठली, तेव्हा सर्वत्र प्रेते पडलेली होती.
\v 37 मग अश्शूरचा राजा सन्हेरीबाने इस्राएल सोडले व घरी गेला व आणि निनवेत जाऊन राहिला.
\s5
\p
\v 38 तेव्हा असे झाले की, तो आपला देव निस्रोख याच्या घरात पूजा करीत असताना, त्याची मुले अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने ठार मारले, मग ते अरारात देशात पळून गेले, नंतर त्याचा मुलगा एसरहद्दोन त्याच्या जागी राज्य करू लागला.
\s5
\c 38
\s हिज्कीयाचे दुखाणे
\r 2राजे 20:1-11; 2इति. 32:24-26
\p
\v 1 त्या दिवसात, हिज्कीया आजारी पडून मरणाच्या टोकास आला होता, आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, तुझ्या घराची व्यवस्था कर; कारण तू मरणार आहेस तू जगणार नाहीस.”
\v 2 मग हिज्कीयाने भिंतीकडे तोंड वळवले आणि परमेश्वरास प्रार्थना केली.
\v 3 तो म्हणाला, “परमेश्वरा, मी आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच चाललो, याची कृपया आठवण कर आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले ते मी करत आलो.” आणि हिज्कीया मोठ्याने रडला.
\s5
\p
\v 4 नंतर यशयाला परमेश्वराकडून संदेश आला, तो म्हणाला,
\v 5 जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन.
\v 6 मी तुला आणि या नगराला अश्शूराच्या राजापासून अधिकारातून सोडवीन आणि या नगराचे संरक्षण करील.
\s5
\p
\v 7 आणि माझ्यापासून तुला हे चिन्ह असेल, परमेश्वर, जे मी बोलतो ते करतो.
\v 8 पाहा, सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजाच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.
\s5
\p
\v 9 जेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया आजारी होता आणि त्यातून बरा झाल्यावर त्याने लिहिलेली ही प्रार्थना आहेः
\q
\v 10 मी म्हणालो, मी माझ्या आयुष्याच्या अर्ध्यामार्गात असता
\q मी मृतलोकांच्या द्वारात जाईन; माझ्या राहिलेल्या वर्षात मला विसाव्यासाठी तेथे पाठवले.
\q
\v 11 मी म्हणालो की, “मी परमेश्वरास, जिवंतांच्या भूमीत परमेश्वरास आणखी पाहणार नाही;
\q मी जगातील राहणाऱ्यांना किंवा मानवजातीला आणखी पाहणार नाही.
\s5
\q
\v 12 माझे जीवन काढून घेतले आहे, आणि मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझ्यापासून दूर केलेली आहे;
\q मी विणकऱ्याप्रमाणे आपले जीवन गुंडाळले आहे; तो मला मागावरून कापून काढणार आहे;
\q दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझा शेवट करशील.
\q
\v 13 मी सकाळपर्यंत रडत राहिलो;
\q सिंहाप्रमाणे तो माझी सर्व हाडे मोडतो; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझ्या जीवनाचा शेवट करशील.
\s5
\q
\v 14 मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले;
\q माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत.
\q माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.”
\q
\v 15 मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे;
\q मी आपल्या जीवनात हळूहळू चालेल कारण माझ्या जिवाला खूप क्लेश झाले.
\s5
\q
\v 16 हे प्रभू, तू माझ्यावर दुःखे पाठवली ती माझ्या चांगल्यासाठी आहेत. माझे जीवन मला परत मिळेल;
\q तू माझे जीवन व आरोग्य परत मिळवून दे.
\q
\v 17 माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे.
\q तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस.
\q कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.
\s5
\q
\v 18 कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही;
\q जे खाली खोल खड्ड्यात जातात त्यांना तुझ्या सत्याची आशा नसते.
\q
\v 19 जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे;
\q पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी.
\s5
\q
\v 20 “परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे आणि आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात
\q परमेश्वराच्या मंदिरात संगीतासह साजरा करू.”
\s5
\p
\v 21 आता यशया म्हणतो, अंजीराची एक चांदकी आणून गळवावर बांधा आणि त्यास बरे वाटेल.
\v 22 हिज्कीया असेही म्हणाला, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय?
\s5
\c 39
\s हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात
\r 2राजे 20:12-19
\p
\v 1 त्या वेळेला, बलदानाचा मुलगा मरोदख बलदान, बाबेलचा राजा याने हिज्कीयाला पत्रे आणि भेटी पाठवल्या; कारण त्याने हिज्किया आजारी असल्याचे आणि बरा झाल्याचे ऐकले होते.
\v 2 या गोष्टीमुळे हिज्कीयाला आनंद झाला; त्याने आपल्या भांडारातील मोल्यवान वस्तू चांदी, सोने, मसाले, अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भांडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिज्कीयाने त्यांना दाखविले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते.
\s5
\p
\v 3 मग यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्यास विचारले, “ही माणसे तुला काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया म्हणाला, “ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती.”
\v 4 यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”
\s5
\p
\v 5 मग यशया हिज्कीयाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक
\v 6 पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\p
\v 7 आणि तुझ्यापासून जी मुले जन्मतील, ज्यांचा तू स्वतः पिता असशील त्यांना घेऊन जातील आणि बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले षंढ म्हणून राहतील.
\v 8 मग हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन तू बोललास ते विश्वासयोग्य आहे.” कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तेथे शांतता आणि स्थिरता राहील.
\s5
\c 40
\s सीयोनेसंबंधी परमेश्वराचे सांत्वनपर उदगार
\r लूक 3 :4-6
\p
\v 1 तुमचा देव म्हणतो, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
\q
\v 2 यरुशलेमेशी प्रेमळपणाने बोला; आणि तिला घोषणा करून सांगा की
\q तुझे युद्ध संपले आहे, तिच्या अन्यायाची क्षमा झाली आहे,
\q तिने आपल्या सर्व पापांसाठी परमेश्वराच्या हातून दुप्पट स्विकारले आहे.
\s5
\q
\v 3 घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
\q
\v 4 प्रत्येक दरी उंच होईल, आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल;
\q आणि खडबडीत जमीन सपाट होईल आणि उंचसखल जागा मैदान होईल.
\q
\v 5 आणि परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व लोक ते एकत्रित पाहतील; कारण परमेश्वराच्या मुखातील हे शब्द आहेत.
\s5
\q
\v 6 एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?”
\q सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे.
\q
\v 7 गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे.
\q
\v 8 “गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
\s5
\q
\v 9 सियोनेस
\f + सियोनेतून
\f* , सुवार्ता घेऊन येणारे जाणारे, उंच डोंगरावर चढ;
\q यरुशलेमेस
\f + यरुशलेमेतून
\f* सुवार्ता सांगणाऱ्ये, आपला आवाज जोराने उंच कर. मोठ्याने आरोळी मार; घाबरू नकोस.
\q यहूदातील नगरांना सांग, येथे तुझा देव आहे!
\q
\v 10 पाहा, प्रभू परमेश्वर, विजयी वीरासारखा येत आहे आणि त्याचे बलवान बाहू त्यासाठी सत्ता चालवील.
\q पाहा, त्याचे बक्षीस त्याच्याबरोबर आहे आणि त्याचा मोबदला त्याच्यापुढेच आहे.
\s5
\q
\v 11 मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील,
\q तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
\s इस्राएलाचा अद्वितीय देव
\s5
\q
\v 12 आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वितीने,
\q पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत
\q किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत?
\s5
\q
\v 13 परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?
\q
\v 14 त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला,
\q आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?
\s5
\q
\v 15 पाहा, राष्ट्रे बादलीतल्या एका थेंबासमान आहेत आणि तराजूतल्या धुळीच्या कणासारखी मोजली आहे;
\q पाहा तो बेटही धुळीच्या कणासारखे उचलतो.
\q
\v 16 लबानोन जळणास पुरेसा नाही,
\q किंवा त्यातले वनपशु होमार्पणासाठी पुरेसे नाहीत.
\q
\v 17 त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे अपुरे आहेत; त्याच्या दृष्टीने ती काही नसल्यासारखीच आहेत.
\s5
\q
\v 18 तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?
\q
\v 19 मूर्ती! कारागीराने ओतून केली आहेः सोनार तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या ओततो.
\q
\v 20 जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो.
\s5
\q
\v 21 तुम्हास माहीत नाही काय? तुम्ही ऐकले नाही काय? तुम्हास सुरवातीपासून सांगितले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय?
\q
\v 22 जो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर बसतो तो हाच आहे आणि त्याच्यापुढे रहिवासी टोळासारखे आहेत.
\q तो आकाश पडद्याप्रमाणे ताणतो आणि त्यामध्ये राहण्यासाठी तंबूप्रमाणे पसरतो.
\s5
\q
\v 23 तो अधिपतींना काहीही नसल्यासारखे कमी करतो आणि पृथ्वीच्या अधिपतींना अर्थशून्य करतो.
\q
\v 24 पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे,
\q तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते.
\s5
\q
\v 25 “तर तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? माझ्यासारखा कोण आहे? असे तो पवित्र प्रभू म्हणतो.
\q
\v 26 आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत?
\q तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो.
\q त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही.
\s5
\q
\v 27 हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस,
\q माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही?
\q
\v 28 तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय?
\q परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा,
\q थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.
\s5
\q
\v 29 तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो.
\q
\v 30 तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात.
\q
\v 31 पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील;
\q ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.
\s5
\c 41
\s इस्राएलाला देवाचे आश्वासन
\p
\v 1 अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत;
\q ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.
\q
\v 2 पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे?
\q त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले;
\q त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले.
\s5
\q
\v 3 तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात.
\q
\v 4 ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले?
\q मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.
\s5
\q
\v 5 द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात.
\q
\v 6 प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर.
\q
\v 7 तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो,
\q त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”
\s5
\q
\v 8 परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना,
\q
\v 9 मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले,
\q आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही.
\s5
\p
\v 10 भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, आणि मी तुला आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
\s5
\q
\v 11 पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.
\s5
\q
\v 12 जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत.
\q जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.
\q
\v 13 कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन.
\s5
\q
\v 14 हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको.
\q मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.
\q
\v 15 पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे;
\q तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.
\s5
\q
\v 16 तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील.
\q आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.
\s5
\q
\v 17 खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे;
\q मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.
\q
\v 18 मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन;
\q मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
\s5
\q
\v 19 मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील.
\q मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.
\q
\v 20 मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे,
\q परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.
\s खोट्या दैवतांना परमेश्वराचे आव्हान
\s5
\q
\v 21 परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा;
\q याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा.
\q
\v 22 त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे,
\q पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा,
\q म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू.
\q म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील.
\s5
\q
\v 23 भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल;
\q काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.
\q
\v 24 पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे.
\s5
\q
\v 25 “मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो,
\q आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”
\q
\v 26 आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे?
\q खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.
\s5
\q
\v 27 मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरुशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.
\q
\v 28 जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही,
\q एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.
\q
\v 29 पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत,
\q आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.
\s5
\c 42
\s परमेश्वराचा सेवक
\p
\v 1 पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः
\q मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.
\q
\v 2 तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही.
\s5
\q
\v 3 तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल.
\q
\v 4 पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही;
\q आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.
\s5
\q
\v 5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जिवन दिले आहे;
\q तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो;
\q
\v 6 मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन.
\q मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व विदेश्यांसाठी प्रकाश देणारा असे करीन.
\s5
\q
\v 7 आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून
\q आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे.
\s5
\q
\v 8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे;
\q आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.
\q
\v 9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत,
\q आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो.
\q त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.”
\s परमेश्वराच्या महान मुक्तीबद्दल स्तवन
\s5
\q
\v 10 परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून,
\q जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा.
\q
\v 11 वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा!
\q सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत.
\s5
\q
\v 12 त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत.
\q
\v 13 परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल.
\q तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.
\s5
\q
\v 14 बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला;
\q आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन.
\q
\v 15 मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन;
\q आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन.
\s5
\q
\v 16 मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन.
\q या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.
\s5
\q
\v 17 जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात,
\q तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील.
\s शिस्तीचे फायदे मिळवण्यास इस्राएल असमर्थ
\s5
\q
\v 18 तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा.
\q
\v 19 माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे?
\q माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे?
\s5
\q
\v 20 तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही.
\q
\v 21 परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला.
\s5
\q
\v 22 पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत;
\q ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत;
\q ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही!
\s5
\q
\v 23 तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील?
\q
\v 24 याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले?
\q ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले,
\q त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही?
\s5
\q
\v 25 म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला.
\q त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.
\s5
\c 43
\s परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता
\q
\v 1 तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो,
\q भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.
\s5
\q
\v 2 जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत.
\q जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.
\q
\v 3 कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे.
\q मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे.
\s5
\q
\v 4 तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो;
\q म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन.
\q
\v 5 घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.
\s5
\q
\v 6 मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको;
\q माझे मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण.
\q
\v 7 ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलावले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय! ज्याला मी केले आहे.
\s5
\q
\v 8 जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण.
\q
\v 9 सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत.
\q त्यांच्यातील कोण हे जाहीर करेल आणि आम्हास पूर्वीच्या घडलेल्या घटनांचे घोषणा करील?
\q त्यांनी आपणास योग्य सिद्ध करण्यास आपले साक्षीदार आणावेत, त्यांनी ऐकून व खात्रीपूर्वक म्हणावे की हे खरे आहे.
\s5
\q
\v 10 परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे,
\q अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे.
\q माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही.
\q
\v 11 मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही.
\s5
\q
\v 12 मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही.
\q तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 13 यादिवसापासून मीच तो आहे,
\q आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल?
\s5
\q
\v 14 परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो,
\q कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन,
\q खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल.
\q
\v 15 मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे.
\s5
\q
\v 16 परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो,
\q
\v 17 जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात;
\q ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत.
\s5
\q
\v 18 पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका.
\q
\v 19 पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का?
\q मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन.
\s5
\q
\v 20 रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील,
\q कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन,
\q
\v 21 या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी.
\s5
\q
\v 22 हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस.
\q
\v 23 तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस;
\q किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही.
\s5
\q
\v 24 तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस.
\q पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे.
\s5
\q
\v 25 मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही.
\q
\v 26 जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड.
\s5
\q
\v 27 तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे.
\q
\v 28 म्हणून मी पवित्रस्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्राएलास शिवीगाळ करून अपमान करील.
\s5
\c 44
\s परमेश्वर हाच एकमेव देव
\q
\v 1 तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक.
\q
\v 2 ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका,
\q आणि यशुरुना, ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिऊ नको.
\s5
\q
\v 3 कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील.
\q मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.
\q
\v 4 पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळुंज, तसे ते गवतामध्ये उगवते.
\s5
\q
\v 5 “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव आपणास ठेवील;
\q आणि दुसरा आपल्या हातावर परमेश्वरासाठी असे लिहील आणि त्यास इस्राएलाच्या नावाने बोलावतील.”
\s5
\q
\v 6 इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे; आणि माझ्याशिवाय कोणी देव नाही.
\s5
\q
\v 7 माझ्यासारखा कोण आहे? तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे
\q माझे पुरातन लोक स्थापले तेव्हापासून ज्या गोष्टी घडत आहेत व पुढे ज्या घडतील त्या त्यांनी कळवाव्या.
\s5
\q
\v 8 तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय?
\q तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तेथे कोणी देव आहे काय? तेथे कोणी दुसरा ‘खडक’ नाही; मला कोणी माहीत नाही.”
\s मूर्तिपूजेचा वेडेपणा
\s5
\q
\v 9 जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत.
\q त्यांचे साक्षी पाहू शकत नाही किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील.
\q
\v 10 हे देव कोणी किंवा जी ओतीव मूर्ती क्षुल्लक आहे ती कोणी घडवली आहे?
\s5
\q
\v 11 पाहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील; कारागीर तर केवळ माणसे आहेत.
\q ते सर्व एकत्र जमून निर्णय घेवोत; ते एकत्र भयभीत व लज्जित होतील.
\s5
\q
\v 12 लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो.
\q तो त्यास हातोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो.
\q तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पीत नाही आणि क्षीण होतो.
\s5
\q
\v 13 सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो.
\q त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुणा करतो.
\q ती पवित्रस्थानात रहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची, आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो.
\s5
\q
\v 14 तो आपणासाठी गंधसरू तोडतो, किंवा सरू वा अल्लोनची झाडे निवडतो.
\q तो आपणासाठी जंगलात झाडे तोडतो. तो देवदारूचे झाड लावतो पाऊस ते वाढवतो.
\s5
\q
\v 15 मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो.
\q मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो.
\q
\v 16 लाकडाचा एक भाग अग्नीसाठी जाळतो, त्यावर मांसाचा भाग भाजतो. तो खातो आणि तृप्त होतो.
\q तो स्वत:ला ऊबदार ठेवतो आणि म्हणतो, “अहा! मला ऊब आहे, मी अग्नी पाहीला आहे.”
\s5
\q
\v 17 शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो; तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो व पूजा करतो,
\q आणि प्रार्थना करून म्हणतो, तू माझा देव आहेस म्हणून मला वाचव.
\s5
\q
\v 18 त्यांना कळत नाही, किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाही, आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाहीत.
\s5
\q
\v 19 कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात,
\q मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले.
\q आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय?
\s5
\q
\v 20 हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.
\s परमेश्वर इस्राएलाचा मुक्तिदाता
\s5
\q
\v 21 “हे याकोबा, आणि इस्राएला, यागोष्टीबद्दल विचार कर, कारण तू माझा सेवक आहेस.
\q मी तुला निर्माण केले; तू माझा सेवक आहेस. हे इस्राएला, मला तुझा विसर पडणार नाही.
\q
\v 22 मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत;
\q माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे.”
\s5
\q
\v 23 अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा;
\q अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा;
\q कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे.
\s5
\q
\v 24 तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर,
\q ज्याने सर्वकाही निर्माण केले,
\q जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे.
\q
\v 25 व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो;
\q जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो.
\s5
\q
\v 26 मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा,
\q जो यरुशलेमेविषयी म्हणतो की, ती वसविली जाईल आणि यहूदाच्या नगराविषयी म्हणतो की, ती पुन्हा बांधली जातील आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन.
\q
\v 27 जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन.
\s5
\q
\v 28 जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.
\s5
\c 45
\s कोरेशास नेमून दिलेली कामगिरी
\q
\v 1 परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो,
\q ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे,
\q आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.
\s5
\q
\v 2 मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन;
\q मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन
\q
\v 3 आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन.
\q अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे.
\s5
\q
\v 4 कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी,
\q मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले.
\q
\v 5 मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही.
\q जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले.
\q
\v 6 अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही.
\q मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.
\s5
\q
\v 7 मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले;
\q मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
\s परमेश्वर हाच उत्पन्नकर्ता
\q
\v 8 हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो.
\q पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत
\q आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे.
\s5
\q
\v 9 जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय!
\q मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?
\s5
\q
\v 10 जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो.
\s5
\q
\v 11 इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे,
\q येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग?
\s5
\q
\v 12 मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली.
\q मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली.
\s5
\q
\v 13 मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील.
\q तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 14 परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत,
\q ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील.
\q ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील,
\q खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही
\q
\v 15 हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.
\s5
\q
\v 16 ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील.
\q
\v 17 पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल;
\q तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही.
\s5
\q
\v 18 आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव,
\q ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली.
\q ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो,
\q “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.”
\s5
\q
\v 19 मी खासगीत, गुप्त जागी कधी बोललो नाही;
\q तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही.
\q मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.
\s बाबेलच्या मूर्ती आणि परमेश्वर
\s5
\q
\v 20 जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या.
\q जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.
\s5
\q
\v 21 त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या.
\q पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले?
\q मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही.
\s5
\q
\v 22 अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा;
\q कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.
\q
\v 23 मी आपली शपथ वाहीली आहे,
\q न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की
\q माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
\s5
\q
\v 24 माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे.
\q जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.
\q
\v 25 इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील.
\s5
\c 46
\p
\v 1 बेल
\f +
\fr 46.1
\fq बेल
\ft बेल, ज्याला मर्दुक म्हणून सुधा ओळखले जाते, तो बाबेलाच्या मुख्य दैवातांपैकी एक होता.
\f* खाली वाकला आहे, नबो
\f +
\fr 46.1
\fq नबो
\ft मर्दुकचा मुलगा
\f* झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.
\q
\v 2 ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत,
\q परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.
\s5
\q
\v 3 याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही,
\q ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
\q
\v 4 तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन.
\q मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
\s5
\q
\v 5 तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल, या करता त्यांच्याशी आमची तुलना होईल?
\q
\v 6 लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात.
\q ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.
\s5
\q
\v 7 ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही.
\q ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.
\s5
\q
\v 8 या गोष्टींबद्दल विचार करा; तुम्ही बंडखोरांनो! कधीही दुर्लक्ष करू नका.
\q
\v 9 प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा,
\q कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
\s5
\q
\v 10 मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे.
\q मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
\q
\v 11 मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो;
\q होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
\s5
\q
\v 12 चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.
\q
\v 13 मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.
\s5
\c 47
\s बाबेलसंबंधी न्याय
\q
\v 1 बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस;
\q खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस.
\q तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.
\q
\v 2 जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ,
\q तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.
\s5
\q
\v 3 तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल.
\q मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.
\q
\v 4 “आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”
\q
\v 5 खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा;
\q तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत.
\s5
\q
\v 6 मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे
\q आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही;
\q तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.
\q
\v 7 तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन.
\q म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.
\s5
\q
\v 8 तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस,
\q जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही;
\q मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.
\q
\v 9 परंतु अपत्यहीनता व विधवापण
\q या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील;
\q तुझे जादूटोणा आणि बहुत मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.
\s5
\q
\v 10 तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही;
\q तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले,
\q पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणी नाही.
\q
\v 11 तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस.
\q तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस.
\q तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील.
\s5
\q
\v 12 ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात
\q आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला;
\q कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील.
\q
\v 13 तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस;
\q आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून
\q नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
\s5
\q
\v 14 पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील;
\q त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही;
\q तेथे ती ज्वाला तिच्यासमोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही.
\q
\v 15 ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील.
\q ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही.
\s5
\c 48
\s नव्या गोष्टींसंबंधी भाकीत
\p
\v 1 जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक.
\q जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता,
\q पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
\q
\v 2 कारण ते स्वत:ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधिश परमेश्वर
\s5
\q
\v 3 “मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या.
\q मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.
\q
\v 4 कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.
\q
\v 5 यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले,
\q जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”
\s5
\q
\v 6 तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत.
\q
\v 7 या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस.
\q त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही.
\s5
\q
\v 8 त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या,
\q कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.
\s5
\q
\v 9 पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही.
\q
\v 10 पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे.
\q
\v 11 माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ?
\q मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
\s परमेश्वर इस्राएलास मुक्त करील
\s5
\q
\v 12 याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक.
\q मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाहि मी आहे.
\q
\v 13 होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाये घातले, आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली, जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात
\s5
\q
\v 14 तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या?
\q परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन.
\q
\v 15 मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल.
\s5
\q
\v 16 माझ्या जवळ या आणि हे ऐका;
\q प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे.
\q आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.
\s5
\q
\v 17 जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो,
\q मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो,
\q ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.
\q
\v 18 जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते!
\q तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते.
\s5
\q
\v 19 तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते.
\q आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
\s5
\q
\v 20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा,
\q गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला.
\q सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे.
\s5
\q
\v 21 तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही,
\q त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले,
\q आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.
\q
\v 22 पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.”
\s5
\c 49
\s देवाचा सेवक राष्ट्रांचा प्रकाश
\p
\v 1 अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या.
\q माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.
\q
\v 2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे.
\q त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे.
\s5
\q
\v 3 तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.”
\q
\v 4 पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे.
\q तथापी माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे.
\s5
\q
\v 5 आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे,
\q ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे,
\q मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.
\q
\v 6 तो म्हणतो, “याकोबाचे वंश उभारायला व इस्राएलचे वाचलेले परत आणण्यासाठी तू माझा सेवक व्हावे ही फार लहान गोष्ट आहे.
\q तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो.”
\s5
\q
\v 7 मनुष्यांनी ज्याला तुच्छ मानले, राष्ट्रांनी ज्याला वीट मानले, अधिकाऱ्यांच्या सेवकाला इस्राएलचा खंडणारा, त्याचा पवित्र देव असे म्हणतो,
\q परमेश्वर जो विश्वासू, इस्राएलाला पवित्र, ज्याने तुला निवडले आहे त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील.
\s सीयोनाच्या उद्धाराचे अभिवचन
\s5
\q
\v 8 परमेश्वर असे म्हणतो,
\q योग्य वेळेला मी माझी दया दाखविल, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन.
\q मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन.
\q देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,
\s5
\q
\v 9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा.
\q ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.
\s5
\q
\v 10 त्यांना भुक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत.
\q कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
\q
\v 11 मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
\s5
\q
\v 12 “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.”
\q
\v 13 हे स्वर्गांनो गायन करा, हे पृथ्वी, आनंदीत हो, डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा.
\q कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे, आणि तो आपल्या दु:खीतांवर दया करील.
\s5
\q
\v 14 पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला.”
\q
\v 15 कोणी स्त्री तीने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय?
\q होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही.
\s5
\q
\v 16 पाहा! तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत.
\q
\v 17 तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.
\q
\v 18 तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील.
\q परमेश्वर म्हणतो, मी जीवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.
\s5
\q
\v 19 जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती.
\q तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.
\q
\v 20 वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील.
\q “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.”
\s5
\q
\v 21 मग तू मनाशी म्हणशील, मी मुलांवेगळी झालेली, वांझ, हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता, माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला?
\s5
\q
\v 22 परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणतो,
\q “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांस दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन,
\q तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यांवरून तुझ्याकडे आणतील.
\s5
\q
\v 23 राजे तुझे संगोपण करणारे बाप होतील, आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील.
\q ते भुमीकडे तोंड लववून, तुझ्यापुढे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील,
\q आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत.”
\s5
\q
\v 24 वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?
\q
\v 25 पण परमेश्वर असे म्हणतो,
\q होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील.
\q कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.
\s5
\q
\v 26 “मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत:च्याच रक्ताने मद्यधुंद होतील.
\q आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”
\s5
\c 50
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणत आहे,
\q ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे?
\q आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे?
\q पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,
\s5
\q
\v 2 मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का?
\q माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का?
\q पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो;
\q त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात.
\q
\v 3 मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो.
\s देवाच्या सेवकाचे आज्ञापालन
\s5
\q
\v 4 थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षीतांची जीभ दिली आहे.
\q तो मला सकाळी सकाळी जागे करतो;
\q तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
\s5
\q
\v 5 प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे,
\q आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही.
\q
\v 6 ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली
\q आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले.
\q लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही.
\s5
\q
\v 7 कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील.
\q म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही.
\s5
\q
\v 8 मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.
\q
\v 9 पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल?
\q पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.
\s5
\q
\v 10 परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत?
\q प्रकाशाविना गहन काळोखात कोण चालतो?
\q त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून रहावे.
\s5
\q
\v 11 पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता;
\q ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला.
\q परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल.
\s5
\c 51
\s सीयोनेला समाधानकाररक वचने
\p
\v 1 “जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझे ऐका!
\q ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे, आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहावे.
\s5
\q
\v 2 अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता.
\q मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.”
\s5
\q
\v 3 होय, परमेश्वर सियोनेचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील.
\q तो त्याचे रान एदेनाच्या बागेसारखे आणि त्याचे वाळवंट तो यार्देन नदीच्या जवळ, परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे.
\q आनंद व हर्ष, आभारप्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील.
\s5
\q
\v 4 “माझ्या लोकांनो, माझ्या कडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो माझ्या कडे आपला कान लावा,
\q कारण नियम माझ्यापासूनच निघेल, आणि मी माझे न्यायीपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन.
\q
\v 5 मी न्यायीपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्यायनिवाडा करतील.
\q द्वीपे माझी वाट पाहतील, आणि माझ्या बाहूंवर भरवसा ठेवतील.
\s5
\q
\v 6 तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा.
\q धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तीच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील,
\q परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तीचे काम करणे थांबवणार नाही.
\s5
\q
\v 7 ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका!
\q मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका.
\q
\v 8 कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल,
\q पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.”
\s5
\q
\v 9 परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो.
\q ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय?
\q
\v 10 समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. ज्याने मोठ्या डोहातील पाणी सुकवले आणि समुद्रातील अति सखोल भागाचा रस्ता केला, ह्यासाठी की खंडणी भरून सोडवलेेले पार होतील, तो तूच नाही काय?
\s5
\q
\v 11 परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील
\q आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.
\s5
\q
\v 12 “मी, मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो, मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे? जे मृत्यु पावणारी आहेत, मनुष्यांचे मुले, गवतासारखा केली गेली आहेत.”
\s5
\q
\v 13 ज्याने स्वर्गे पसरवली, ज्याने पृथ्वीचा पाया घातला,
\q तो परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, त्यास तू का विसरतेस?
\q पीडक जणू काय नाश करायला सिद्ध आहे,
\q म्हणून तू प्रत्येक दिवशी सारखी हताश असते,
\q परंतू पीडणाऱ्याचा क्रोध कोठे आहे?
\s5
\q
\v 14 जो खाली वाकलेला आहे, परमेश्वर त्यास सोडण्यास त्वरा करेल, तो मरून खाचेंत पाडला जाणार नाही, आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही.
\q
\v 15 “कारण मी, परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात.” सेनाधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.
\s5
\q
\v 16 मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे.
\q अशासाठी की, मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा, आणि तू माझी प्रजा आहे, असे सियोनेला म्हणावे.
\s5
\q
\v 17 ऊठ, ऊठ, यरुशलेमे, जागी हो.
\q तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे.
\q तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे.
\q
\v 18 ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तिला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही,
\q आणि ज्या मुलांना तिने वाढवीले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही.
\s5
\q
\v 19 ही दोन संकटे तुझ्यावर आली, तुझ्याबरोबर कोण दु:ख करणार?
\q उजाडी व नाश आणि दुष्काळ व तलवार, कोण तुझे सांत्वन करणार?
\q
\v 20 तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय.
\q परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत.
\s5
\q
\v 21 पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही,
\q
\v 22 तुझा देव, प्रभू परमेश्वर, जो आपल्या कैवार घेतो, तो असे म्हणतो,
\q मी थरकापाचा प्याला, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे. तो तू पुन्हा पिणार नाहीस,
\s5
\q
\v 23 आता आम्ही तुझ्यावरून चालावे म्हणून आडवा पड, असे जे तुझे पीडणारे तुझ्या जीवाला म्हणाले आहेत,
\q त्यांच्या हाती मी तो ठेवीन,
\q आणि चालणाऱ्यांसाठी तू आपले शरीर भूमीप्रमाणे, रस्त्याप्रमाणे टाकून ठेवले आहे.
\s5
\c 52
\s सीयोनेची बंदिवासातून सुटका
\q
\v 1 सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर,
\q यरुशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर.
\q कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.
\s5
\q
\v 2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरुशलेमे, ऊठ, उठून बस,
\q सियोनेच्या बंदीवान कन्ये तू कैदी होतीस, तुझ्या मानेचा साखळदंड काढून टाक.
\q
\v 3 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही फुकट विकले गेला होता, आणि तुमची मुक्तता पैशावाचून करण्यात आली आहे.”
\s5
\q
\v 4 कारण परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सुरूवातीला माझे लोक खाली मिसरांत तात्पुरते राहण्यासाठी गेले होते.
\q अश्शूरने अलीकडेच त्यांच्यावर जुलूम केला आहे.
\s5
\q
\v 5 परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”
\q
\v 6 यास्तव माझे लोक माझे नाव जाणतील,
\q यामुळे त्या दिवशी ते जाणतील त्यांच्याशी बोलणारा मीच आहे, होय तो मीच आहे.
\s5
\q
\v 7 “शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन,
\q तुमचा देव हाच राजा आहे.” अशी जो घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत.
\q
\v 8 तुझ्या पाहारेकऱ्यांचा उंचावलेला आवाज ऐक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत.
\q कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वरास सियोनेला परत येताना पाहिले आहे.
\s5
\q
\v 9 यरुशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा,
\q कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरुशलेमेला खंडूण घेतले आहे.
\q
\v 10 परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे.
\q सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहील.
\s5
\q
\v 11 तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.
\q तुम्ही त्यामधून निघून जा, जे तुम्ही परमेश्वरची पात्रे वाहता ते तुम्ही आपणाला शुद्ध करा.
\q
\v 12 कारण तुम्ही घाईने निघणार नाही, किंवा तुम्हास पळून जाणे भाग पडणार नाहीत.
\q कारण परमेश्वर तुमच्यापुढे जाणार, आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल.
\s परमेश्वराच्या सेवकाचा दुःखभोग
\s5
\q
\v 13 माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार.
\q तो उंचावला जाईल आणि उंच व थोर होईल.
\q
\v 14 “माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला.
\q त्याचे रुप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रुप दुसऱ्या मनुष्यांपेक्षा फार वेगळे होते.
\s5
\q
\v 15 तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.”
\s5
\c 53
\p
\v 1 आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?
\q
\v 2 कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला;
\q त्याच्यात उल्लेखनीय रुप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्यास पाहीले, आम्हास आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती.
\s5
\q
\v 3 लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता.
\q ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले.
\s5
\q
\v 4 पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहीले;
\q तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला.
\s5
\q
\v 5 पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला.
\q आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले.
\s5
\q
\v 6 पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून दूर गेलो होतो; आम्ही सर्व आपापल्या मार्गात फिरलो होतो,
\q आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले.
\s5
\q
\v 7 त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही;
\q जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.
\s5
\q
\v 8 बळजबरी करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून,
\q पण त्यास जिवंतांच्या भूमीतून काढून नेले; कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय?
\q
\v 9 त्याची कबर दुष्टांबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता, त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले.
\q तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते.
\s5
\q
\v 10 तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता,
\q तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल.
\q
\v 11 तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल.
\q माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.
\s5
\q
\v 12 ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल,
\q कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता.
\q त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.
\s5
\c 54
\s परमेश्वराची इस्राएलावरील शाश्वत प्रीती
\q
\v 1 “तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर.
\q कारण परमेश्वर म्हणतो, ‘विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा एकाकी असणाऱ्याची मुले अधिक आहेत.’”
\s5
\q
\v 2 तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको;
\q आपल्या दोऱ्या लांब कर आणि आपल्या मेखा मजबूत कर.
\q
\v 3 कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल,
\q आणि तुझे वंशज राष्ट्रांस जिंकून घेतील आणि उजाड झालेल्या नगरांना वसवतील.
\s5
\q
\v 4 घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस;
\q तू आपल्या तरुणपणाची लाज आणि आपल्या त्यागण्याची बदनामी विसरशील.
\s5
\q
\v 5 कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
\q इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल.
\q
\v 6 कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे,
\q तरुण विवाहीत स्त्रीप्रमाणे आणि नाकारलेली, असे तुझा देव म्हणत आहे.
\s5
\q
\v 7 मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन.
\q
\v 8 मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले;
\q पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो.
\s5
\q
\v 9 “कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः
\q जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही,
\q तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही.
\q
\v 10 जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील,
\q तरी माझा कराराचा विश्वासूपणा तुझ्यापासून दूर होणार नाहीत किंवा माझ्या शांतीचा करार ढळणार नाही,
\q असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो.
\s नवी यरुशलेम
\s5
\q
\v 11 अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले,
\q पाहा, तुझे पाषाण सुरम्य रंगात बसवीन, आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन.
\q
\v 12 तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन,
\q आणि बाहेरील भींत सुंदर खड्यांची करीन.
\s5
\q
\v 13 आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
\q
\v 14 नीतिमत्तेत तू स्थापीत होशील.
\q तुला येथून पुढे छळाचा अनुभव येणार नाही, कारण तू भिणार नाही, आणि तुला घाबरवण्यास कोणीही तुझ्याजवळ येणार नाही.
\s5
\q
\v 15 पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल.
\q
\v 16 पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो
\q आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो.
\s5
\q
\v 17 तुझ्याविरुध्द तयार केलेले कोणतेही हत्यार सफल होणार नाही;
\q आणि तुजवर आरोप ठेवणाऱ्या प्रत्येकास दोषी ठरवशील.
\q परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आणि माझ्यापासून त्यांचे समर्थन आहे.” हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
\s5
\c 55
\s सर्वांना दयेची मोफत देणगी
\q
\v 1 अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही,
\q सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
\s5
\q
\v 2 जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता?
\q आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता?
\q माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.
\s5
\q
\v 3 तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील!
\q मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.
\q
\v 4 पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.
\s5
\q
\v 5 पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील.
\q कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.
\s5
\q
\v 6 परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.
\q
\v 7 दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो.
\q तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.
\s5
\q
\v 8 कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
\q
\v 9 कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
\s5
\q
\v 10 कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात
\q आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
\q
\v 11 तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही,
\q परंतु जे मी इच्छीले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.
\s5
\q
\v 12 कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल;
\q तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
\q
\v 13 काटेरी झुडपाच्याऐवजी, सदाहरित वाढतील; आणि काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल.
\q आणि ते परमेश्वराच्या नावासाठी सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधीही नष्ट होणार नाही.
\s5
\c 56
\s देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा;
\q कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे.
\q
\v 2 जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो.
\q तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे.
\s5
\q
\v 3 जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये,
\q परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील.
\q षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.
\s5
\q
\v 4 कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात
\q आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात.
\q
\v 5 त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल.
\q मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही.
\s5
\q
\v 6 जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी
\q आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत,
\q जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात
\q
\v 7 त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन;
\q त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील,
\q कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
\s5
\q
\v 8 हि प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः
\q मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
\s मूर्तिपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध
\s5
\q
\v 9 रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका!
\q
\v 10 त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही;
\q ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः
\q ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.
\s5
\q
\v 11 त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही;
\q ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे,
\q प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.
\q
\v 12 ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षारस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल,
\q तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.”
\s5
\c 57
\q
\v 1 धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.
\q
\v 2 तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.
\s5
\q
\v 3 पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या.
\q
\v 4 तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता?
\q कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता?
\q तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?
\s5
\q
\v 5 तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता,
\q तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्या मध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.
\s5
\q
\v 6 नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत.
\q तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?
\s5
\q
\v 7 तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.
\q
\v 8 तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले,
\q तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले.
\q तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस.
\s5
\q
\v 9 तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस.
\q तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस.
\q
\v 10 तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.”
\q आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.
\s5
\v 11 तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस?
\q तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस.
\q मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.
\q
\v 12 मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता,
\q ते तुला मदत करणार नाही.
\s5
\q
\v 13 जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मुर्तींचा समुदाय तुला सोडवो.
\q त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल,
\q आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल.
\s5
\q
\v 14 तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा,
\q माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.
\s देवाचे साहाय्य व बरे करणे
\q
\v 15 कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो,
\q मी उंच आणि पवित्र जागी राहतो,
\q नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला,
\q अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.
\s5
\q
\v 16 कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागहि धरणार नाही.
\q कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील.
\q
\v 17 कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो.
\q पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला.
\s5
\q
\v 18 मी त्याचे मार्ग पाहिले आहेत,
\q1 पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल.
\q
\v 19 आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला,
\q आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन.
\s5
\q
\v 20 पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही,
\q आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात.
\q
\v 21 “पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 58
\s उपासांचे योग्य पालन
\p
\v 1 गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर.
\q माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.
\q
\v 2 तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो.
\q अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला.
\q ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते.
\s5
\v 3 ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?”
\q पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता
\q आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.”
\s5
\q
\v 4 पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता.
\q तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही.
\q
\v 5 या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी?
\q आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल?
\s5
\q
\v 6 “या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही,
\q दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय?
\q
\v 7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय?
\q जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”
\s5
\q
\v 8 तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल.
\q तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल.
\s5
\q
\v 9 तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल.
\q तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे.
\q जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील.
\q
\v 10 जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली,
\q तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल.
\s5
\q
\v 11 तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील,
\q आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल.
\q आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल.
\s5
\q
\v 12 तुझ्यापैकी काही प्राचीन अवशेषांची पुनःबांधणी करतील; तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या उभारशील.
\q तुला “भींती दुरुस्त करणारा आणि राहण्यासाठी रस्ते नीट करणारा असे म्हणतील.”
\s शब्बाथाचे पालन
\s5
\q
\v 13 माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वत:चा आनंद पूर्ण करू नये म्हणून शब्बाथापासून आपला पाय फिरवशील
\q आणि शब्बाथाला आनंद, परमेश्वराचा पवित्र दिवस, आदराचा दिवस म्हणशील,
\q आणि आपले स्वत:चे कामकाज न करता व आपल्याच मनाचा आनंद न पाहता
\q आणि आपल्याच गोष्टी न बोलता, तू त्याचा आदर करशील.
\s5
\q
\v 14 तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन;
\q आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.
\s5
\c 59
\s राष्ट्रव्यापी दुष्टाईची कबुली
\q
\v 1 पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
\q
\v 2 तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे.
\q आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.
\s5
\q
\v 3 कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत.
\q तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.
\q
\v 4 कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही.
\q ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.
\s5
\q
\v 5 ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात.
\q जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.
\q
\v 6 त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत.
\q त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.
\s5
\q
\v 7 त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात, आणि निष्पाप रक्त पाडायला ते घाई करतात.
\q त्यांचे विचार हे अन्यायाचे विचार आहेत, हिंसा आणि नाश हे त्यांचे मार्ग आहेत.
\q
\v 8 त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही.
\q त्यांनी कुटिल मार्ग स्थापिले, आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही.
\s5
\q
\v 9 यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही.
\q आम्ही प्रकाशासाठी थांबतो, पण पाहा अंधार; आम्ही तेज शोधतो, पण आम्ही काळोखात चालतो.
\q
\v 10 आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत.
\q रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्यांप्रमाणे आहोत.
\s5
\q
\v 11 आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो,
\q आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.
\s5
\q
\v 12 कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात.
\q कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.
\q
\v 13 आम्ही बंड केले, परमेश्वरास नकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे.
\q आम्ही खंडणी बद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो, वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
\s5
\q
\v 14 न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे.
\q सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही.
\q
\v 15 सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात.
\q परमेश्वराने पाहिले पण त्यास कोठेच चांगुलपणा सापडला नाही, परमेश्वरास हे आवडले नाही.
\s5
\q
\v 16 त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही.
\q तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले,
\q आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.
\s5
\q
\v 17 त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले,
\q त्याने सूडाचे वस्र परिधान केले आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता.
\q
\v 18 त्यांच्या कृत्याप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील, त्याच्या शत्रूस क्रोध, वैऱ्यास प्रतिफल भरून देईल, द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल.
\s5
\q
\v 19 ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.
\q
\v 20 मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल, परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 21 परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 60
\s सीयोनेचे भावी ऐश्वर्य
\q
\v 1 “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
\s5
\q
\v 2 जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल,
\q तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
\q
\v 3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
\s5
\q
\v 4 तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात.
\q तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
\q
\v 5 तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासित होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल.
\q कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
\s5
\q
\v 6 मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील,
\q शेबातले सर्व येतील,
\q ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
\q
\v 7 केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील.
\q ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
\s5
\q
\v 8 हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
\q
\v 9 द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी,
\q आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे,
\q म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
\s5
\q
\v 10 विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील.
\q “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
\q
\v 11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत.
\q ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
\s5
\q
\v 12 खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
\q
\v 13 माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू,
\q देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
\s5
\q
\v 14 ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील.
\q ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
\s5
\q
\v 15 “तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे,
\q मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
\q
\v 16 तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार,
\q मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
\s5
\q
\v 17 “मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन,
\q आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
\q
\v 18 तुझ्या भुमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही,
\q परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
\s5
\q
\v 19 “दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही,
\q आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही.
\q पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल,
\q आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
\q
\v 20 “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
\q कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल,
\q आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
\s5
\q
\v 21 “तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप,
\q माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
\q
\v 22 “जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”
\s5
\c 61
\s सीयोनेच्या उद्धाराचे शुभवृत्त
\p
\v 1 प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे.
\q ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे.
\q पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
\s5
\q
\v 2 परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला,
\q आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.
\s5
\q
\v 3 सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल,
\q खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे.
\q आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
\s5
\q
\v 4 “ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील,
\q ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.”
\q
\v 5 परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील.
\s5
\q
\v 6 तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील.
\q जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.
\q
\v 7 “तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील,
\q म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”
\s5
\q
\v 8 कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा
\f + चोरीच्या अर्पणाचा
\f* तिरस्कार वाटतो.
\q मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.
\q
\v 9 त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील.
\q त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”
\s5
\q
\v 10 मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो.
\q कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते,
\q तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
\q
\v 11 कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते.
\q त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन.
\s5
\c 62
\q
\v 1 “मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरुशलेमेकरीता तीचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.”
\q
\v 2 मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील.
\q परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील.
\s5
\q
\v 3 तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील.
\q
\v 4 यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही.
\q खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे
\f + हेपझीबा
\f* ” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित
\f + बिऊला
\f* ” म्हणतील.
\q कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.
\s5
\q
\v 5 जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले
\f + तुझा निर्माणकर्ता
\f* तुझ्याशी विवाह करतील.
\q जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.
\s5
\q
\v 6 हे यरुशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे.
\q ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत.
\q जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका.
\q
\v 7 यरुशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.
\s5
\q
\v 8 परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहीली आहे,
\q खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही.
\q
\v 9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील,
\q आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षारस माझ्या पवित्र भूमीवर पितील.
\s5
\q
\v 10 वेशीतून आत ये, लोकांचा मार्ग तयार करा!
\q बांध, मार्ग तयार कर, रस्त्यावरील दगड बाजूला काढा, राष्ट्रांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
\s5
\q
\v 11 पाहा! परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषीत केले आहे की,
\q “सियोनेच्या कन्येला सांग, पाहा! तुमचा तारणारा येत आहे.
\q त्यांचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे.”
\q
\v 12 त्यांना पवित्र लोक, “परमेश्वराने खंडणी भरून सोडवलेले” असे म्हटले जाईल
\q आणि तुला शोधलेली, न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल.
\s5
\c 63
\s सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस
\p
\v 1 जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे?
\q जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे?
\q जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.
\q
\v 2 तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?
\s5
\q
\v 3 “मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता.
\q मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले.
\q त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत.
\q
\v 4 कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.
\s5
\q
\v 5 मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले.
\q परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले.
\q
\v 6 माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
\s इस्राएलासंबंधी परमेश्वराचा चांगुलपणा
\s5
\q
\v 7 मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन.
\q परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन.
\q त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.
\q
\v 8 कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत.
\q1 म्हणून तो त्यांचा त्राता झाला.
\s5
\q
\v 9 त्यांच्या सर्व दु:खात,
\q तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले.
\q त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले,
\q आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.
\s5
\q
\v 10 पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले.
\q म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला.
\s5
\q
\v 11 त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला.
\q ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले,
\q देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला
\s5
\q
\v 12 ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले,
\q आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे?
\q
\v 13 तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत.
\s5
\q
\v 14 परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला.
\q ह्याप्रमाणे तू लोकांस मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतापी होवो.
\s दया व साहाय्य ह्यांसाठी प्रार्थना
\s5
\q
\v 15 स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे.
\q तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत?
\q तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत
\q
\v 16 तू तर आमचा पिता आहेस,
\q तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही.
\q परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे.
\s5
\q
\v 17 परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस?
\q तुझ्या सेवका करीता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.
\s5
\q
\v 18 तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले.
\q
\v 19 त्या लोकांसारखे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्याना तुझे नाव दिले गेले नाही.
\s5
\c 64
\p
\v 1 अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,
\q
\v 2 जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो
\q तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते!
\s5
\q
\v 3 जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले.
\q
\v 4 तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे,
\q ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही.
\s5
\q
\v 5 जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे,
\q पण तू रागावलास आणि आम्ही पाप केले. त्या मध्ये आमचे तारण होईल का?
\s5
\q
\v 6 कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत,
\q आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
\q
\v 7 तुझ्या नावाला हाक मारेल असा कोणी नाही आहे, आणि तुला धरून घ्यायला कोणी प्रयत्न करीत नाही.
\q कराण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हांस आमच्या पातकांच्या हाती सोपवून दिले आहे.
\s5
\q
\v 8 पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो.
\q
\v 9 परमेश्वरा, आमच्यावर सतत रागावू नकोस आणि आमची पातके कायमची लक्षात ठेवू नकोस.
\q जे आम्ही तुझे लोक आहोत, कृपया आम्हा सर्वांकडे लक्ष दे.
\s5
\q
\v 10 तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत.
\q सियोनचे वाळवंट झाले आहे. यरुशलेमेचा नाश झाला आहे.
\q
\v 11 आमचे पवित्र आणि सुंदर मंदिर, जेथे आमचे पूर्वज तुझी उपासना करत असत,
\q त्यास अग्नीने नष्ट करण्यात आले आहे. आणि आम्हास प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा नाश झाला आहे.
\q
\v 12 परमेश्वरा तू कसा काय आपणाला आवरू शकतो? तू गप्प राहशील आणि आम्हास सतत पीडशील काय?
\s5
\c 65
\s बंडखोरांना शासन
\p
\v 1 ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो.
\q ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे!
\q
\v 2 मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत,
\q जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात.
\s5
\q
\v 3 ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात,
\q ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.
\q
\v 4 ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात,
\q आणि डुकराचे मांस खातात व त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो.
\s5
\q
\v 5 तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे.
\q या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते.
\s5
\q
\v 6 “पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे,
\q मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.”
\q
\v 7 “त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईन.” परमेश्वर असे म्हणतो.
\q “पर्वतांवर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यांवर माझी थट्टा केल्या बद्दल मी त्यांना त्याची परत फेड करीन.
\q मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईन.”
\s5
\q
\v 8 परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो,
\q तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.”
\q मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.
\s5
\q
\v 9 मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन.
\q माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील.
\q
\v 10 मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल.
\q या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील.
\s5
\q
\v 11 “पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.
\s5
\q1
\v 12 पण मी तुम्हास तलवारीसाठी नेमले आहे, आणि तुम्ही सर्व वधण्यासाठी वाकवले जाल,
\q1 कारण मी जेव्हा बोलाविले, तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो, तुम्ही ऐकले नाही;
\q1 त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले, आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली.”
\s5
\p
\v 13 तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल.
\q माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.”
\q माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
\q
\v 14 माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील.
\q पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल.
\s5
\q
\v 15 तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील.
\q मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील.
\q
\v 16 जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल.
\q जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील.
\q कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.
\s नवे आकाश व नवी पृथ्वी
\s5
\q
\v 17 कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार,
\q आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही.
\q
\v 18 पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरुशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन.
\q
\v 19 “मी यरुशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.”
\q तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही.
\s5
\q
\v 20 तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ,
\q किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल.
\q शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल.
\q
\v 21 “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.”
\s5
\q
\v 22 एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
\q कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
\q
\v 23 ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत.
\q कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत.
\s5
\q
\v 24 त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन.
\q
\v 25 लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल.
\q पण धूळ ही सापाचे अन्न होईल.
\q माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 66
\s परमेश्वराचा न्याय व सीयोनेची भावी भरभराट
\p
\v 1 परमेश्वर असे म्हणतो,
\q “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”
\s5
\q
\v 2 “सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो.
\q “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
\s5
\q
\v 3 जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे.
\q जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुति करणारा असा आहे,
\q त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.
\s5
\q
\v 4 अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन.
\q कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.
\s5
\q
\v 5 जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका,
\q तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे,
\q ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो.
\q पण ते लाजवले जातील.
\s5
\q
\v 6 नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे.
\q परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे.
\s5
\q
\v 7 “तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तीला पुरुषसंतान झाले.”
\q
\v 8 अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का?
\q कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली.
\s5
\q
\v 9 परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय?
\q जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो.
\s5
\q
\v 10 यरुशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तीच्यासाठी उल्लास करा.
\q जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
\q
\v 11 कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.
\s5
\q
\v 12 परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल,
\q आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल.
\q तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल.
\q
\v 13 आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरुशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.”
\s5
\q
\v 14 तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील.
\q आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल.
\s5
\q
\v 15 कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील.
\q
\v 16 कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील.
\s5
\q
\v 17 जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन,
\q बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\q
\v 18 कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील.
\p
\v 19 काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ति ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.
\s5
\v 20 आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरुशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
\v 21 “ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 22 कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील.
\q त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 23 आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\q
\v 24 “आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील,
\q कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”