mr_ulb/14-2CH.usfm

1484 lines
369 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 2CH 2CH-FREE Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h 2 इतिहास
\toc1 2 इतिहास
\toc2 2 इतिहास
\toc3 2ch
\mt1 2 इतिहास
\is लेखक
\ip यहूदी परंपरेने एज्राला लेखक म्हणून श्रेय दिले आहे. 2 इतिहासात शलमोनाच्या कराराच्या अहवालाशी सुरवात होते. शलमोनाच्या मृत्यूनंतर, राज्य वाटण्यात आले. 2 इतिहास, 1 इतिहासाचे सहकारी पुस्तक आहे जे राजा शलमोनाच्या कारकिर्दीपासून बाबेलपर्यंत बंदिवासासाठी हिब्रू लोकांचा इतिहास चालू ठेवते.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 450-425
\ip इतिहास आजच्या दिवसापर्यंत अत्यंत कठीण आहे, तरीही इस्त्राएलचे बाबेलच्या बंदिवासातून परतणे स्पष्टपणे आहे.
\is प्राप्तकर्ता
\ip प्राचीन यहूदी लोक आणि पवित्र शास्त्राचे नंतरचे वाचक.
\is हेतू
\ip 2 इतिहास हे पुस्तक 2 शमुवेल आणि 2 राजे यासारखीच माहिती देते. 2 इतिहास हे पुस्तक या काळातील याजकत्वाच्या पैलूंवर अधिक भर देते. 2 इतिहास हे पुस्तक राष्ट्राच्या धार्मिक इतिहासाचे मूल्यांकन आहे.
\is विषय
\ip इस्त्राएलचा आध्यात्मिक वारसा
\iot रूपरेषा
\io1 1. शलमोनाच्या अंतर्गत इस्त्राएलाचा इतिहास (अध्याय 1-9)
\io1 2. रहबाम ते आहाज पर्यंतचा इतिहास (अध्याय10-28)
\io1 3. हिज्कीया ते यहूदा पर्यंतचा इतिहास (अध्याय 29-36)
\s5
\c 1
\s विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना
\r 1 राजे 3:1-15
\p
\v 1 परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले.
\s5
\p
\v 2 शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील वाडवडीलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला.
\v 3 मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. कारण परमेश्वराचा दर्शनमंडप तेथे होता, कारण परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक रानात असतांना मोशेने तो बनवला होता.
\v 4 दाविदाने देवाचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरुशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता.
\v 5 हुराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती, म्हणून शलमोन आपल्याबरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला.
\s5
\v 6 दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती तेथे शलमोनाने एक हजार होमार्पणे केली.
\v 7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!”
\s5
\v 8 शलमोन परमेश्वरास म्हणाला, “माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस.
\v 9 आता, हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्रांचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे.
\v 10 या लोकांस उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?”
\v 11 तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, “हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस तसेच तुझा द्वेष करणाऱ्या शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस;
\s5
\v 12 आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळाले नाही एवढे ऐश्वर्य, संपत्ती व बहुमान मी तुला देईन.”
\v 13 मग शलमोन गिबोनाच्या उच्चस्थानाहून, दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला, व इस्राएलावर राज्य करू लागला.
\s घोडे व रथ ह्यांचा शलमोनाने केलेला व्यापार
\s5
\p
\v 14 शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले.
\v 15 राजाने यरुशलेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की, ते दगडांप्रमाणे विपुल झाले तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले.
\s5
\v 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोडयांची खरेदी करत.
\v 17 त्यांनी प्रत्येक रथ सहाशे शेकेल चांदीला व प्रत्येक घोडा दिडशें शेकेल चांदीला या प्रमाणे मिसरामधून ही खरेदी करून मग ते हेच रथ आणि घोडे हित्ती व अरामी राजांना विकले.
\s5
\c 2
\s हूराम राजाबरोबर दाविदाचा करार
\r 1 राजे 5:5-18
\p
\v 1 परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत:साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली.
\v 2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.
\v 3 सोराचा राजा हिराम
\f + हिराम
\f* याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.
\s5
\v 4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
\v 5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.
\s5
\v 6 परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्यास सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.
\v 7 तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्यास जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्यास ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेमेत काम करील.
\s5
\v 8 लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.
\v 9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.
\v 10 लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षारस आणि वीस हजार बुधले तेल.”
\s5
\v 11 मग सोराचा राजा हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यामध्ये त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.
\v 12 हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.
\s5
\v 13 हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.
\v 14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्यास सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दावीद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
\s5
\v 15 माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
\v 16 लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमेला न्यावे.”
\s5
\v 17 शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
\v 18 शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
\s5
\c 3
\s शलमोन परमेश्वराचे निवासस्थान बांधतो
\r 1 राजे 6:1-22
\p
\v 1 यरुशलेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दावीदाने योजनापुर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्णान यबूसीचे खळे होय!
\v 2 आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
\v 3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.
\s5
\v 4 मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस हाथ असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस हाथ होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती.
\v 5 मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यावर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या
\s5
\v 6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली यामध्ये उपयोगात आणलेले सोने पर्वाइमचे होते.
\v 7 मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.
\s5
\p
\v 8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार
\f + साधारण 20400 किलोग्राम
\f* सोने होते.
\v 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
\s5
\v 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
\v 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी पाच हात होती. त्यांची एकंदर लांबी वीस हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा पाच हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पाच हात लांबीचा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.
\v 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पाच हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता.
\s5
\v 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते.
\v 14 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
\s मंदिरातील हूरामाची कामगिरी
\s5
\p
\v 15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ पस्तीस हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी पाच हात उंचीचे होते.
\v 16 शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली.
\v 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.
\s5
\c 4
\p
\v 1 शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
\v 2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
\v 3 प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते.
\s5
\v 4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षीणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
\v 5 या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
\v 6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
\s5
\v 7 शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
\v 8 तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
\s5
\v 9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
\v 10 एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
\s5
\v 11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
\v 12 दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
\v 13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
\s5
\v 14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
\v 15 मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
\v 16 शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
\s5
\v 17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
\v 18 शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
\s5
\v 19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
\v 20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
\v 21 याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
\s5
\v 22 कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.
\s5
\c 5
\p
\v 1 अशारितीने शलमोनाने ठरवलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व कार्य समाप्त झाले. आपले पिता दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने आत आणल्या. सोन्यारुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान मंदिराच्या कोषागारात त्याने आणून ठेवले.
\s शलमोन मंदिरात कोश आणतो
\r 1 राजे 8:1-13
\s5
\p
\v 2 पुढे शलमोनाने, परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदाचे नगर, म्हणजेच सीयोनमधून, आणण्यासाठी इस्राएलातील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले.
\v 3 सातव्या महिन्यातील, मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.
\s5
\v 4 सर्व इस्राएलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवींनी कराराचा कोश उचलून घेतला.
\v 5 याजक आणि लेवी यांनी मिळून कोश यरुशलेमेला आणला. दर्शनमंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली. लेवी वंशातील याजकांनी ती आणली.
\p
\v 6 राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाहीत इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बली अर्पण केले.
\s5
\v 7 एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या नेमलेल्या ठिकाणी तयार करवून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराच्या कराराचा कोश करुबांच्या पखांच्या खाली ठेवला.
\v 8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले.
\s5
\v 9 त्यांचे दांडे एवढे लांब होते कि त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातुन बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरुन ते दिसू शकत नव्हते. आजपर्यंत ते तेथे आहेत.
\v 10 दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या कराराच्या कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरातून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो याच होरेब पर्वतावर केला.
\s शलमोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन
\s5
\p
\v 11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते. ते सर्व गटागटांमध्ये विभागले. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले.
\v 12 मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले आसाफ, हेमान आणि यदूथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांचे पुत्र आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये हातात घेवून वेदीच्या पुर्व टोकाकडे उभे होते. या लेवी गायकांबरोबर ऐकशे वीस याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.
\s5
\v 13 गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.
\v 14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.
\s5
\c 6
\s मंदिराचे समर्पण
\p
\v 1 मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे.
\v 2 परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.”
\v 3 मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले.
\s5
\v 4 शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.”
\v 5 मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.
\v 6 पण आता यरुशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.
\s5
\v 7 “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.
\v 8 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.
\v 9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.
\s5
\v 10 आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.
\s शलमोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन
\p
\v 11 मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.”
\s5
\v 12 शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.
\v 13 बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले.
\s5
\v 14 शलमोन म्हणाला, “हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.”
\v 15 दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.
\s5
\v 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.
\v 17 तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
\s5
\v 18 परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो
\v 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे.
\v 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.
\s5
\v 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर.
\s5
\v 22 एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना,
\v 23 तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे.
\s5
\v 24 इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर.
\v 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
\s5
\v 26 जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले,
\v 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे.
\s5
\v 28 कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास,
\v 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.
\v 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्यास ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.
\v 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील.
\s5
\v 32 जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर,
\v 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांसही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांस कळेल.
\s5
\v 34 शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील.
\v 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
\s5
\v 36 पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.
\v 37 पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.
\v 38 असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील.
\v 39 तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर.
\s5
\v 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
\v 41 आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.
\v 42 “हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
\s5
\c 7
\p
\v 1 शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले.
\v 2 त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना.
\v 3 सरळ स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वरास धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहते.”
\s5
\v 4 शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले.
\v 5 राजा शलमोनाने बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरा साठी समर्पण केले.
\v 6 याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
\s5
\v 7 परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले.
\s5
\v 8 शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता.
\v 9 आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे सात दिवस वेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला.
\v 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांस घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.
\s शलमोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन
\s5
\p
\v 11 परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
\v 12 नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
\s5
\v 13 कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला
\v 14 आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
\v 15 आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
\s5
\v 16 हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.
\v 17 शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
\v 18 तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.
\s5
\v 19 पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,
\v 20 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांस मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन.
\s5
\v 21 एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?
\v 22 तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांस या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’”
\s5
\c 8
\s शलमोनाची इतर कामगिरी
\r 1 राजे 9:10-28
\p
\v 1 परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
\v 2 मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली.
\s5
\v 3 पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
\v 4 वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
\s5
\v 5 वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
\v 6 बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
\s5
\v 7 इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
\v 8 हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
\s5
\v 9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
\v 10 काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
\s5
\v 11 शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”
\s5
\v 12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
\v 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
\s5
\v 14 आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
\v 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
\s5
\v 16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
\s5
\v 17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
\v 18 हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार
\f + साधारण 15300 किलोग्राम
\f* सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
\s5
\c 9
\s शबाची राणी शलमोनाला भेटायला येते
\r 1 राजे 10:1-13
\p
\v 1 शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरुशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.
\v 2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही.
\s5
\v 3 शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला.
\v 4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
\s5
\v 5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
\v 6 इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
\s5
\v 7 तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
\v 8 तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदहस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
\s5
\v 9 शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार
\f + साधारण 4080 किलोग्राम
\f* सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.
\s5
\v 10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
\v 11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
\v 12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली.
\s शलमोनाची संपत्ती व कीर्ती
\r 1 राजे 10:14-29; 2इति. 1:14-17
\s5
\p
\v 13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट किक्कार
\f + साधारण 22644 किलोग्राम
\f* एवढे असे.
\v 14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
\s5
\v 15 सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला.
\v 16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या.
\s5
\v 17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.
\v 18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.
\s5
\v 19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
\v 20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
\v 21 राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तिन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत.
\s5
\v 22 वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला.
\v 23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत.
\v 24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
\s5
\v 25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरुशलेमामध्ये केली होती.
\v 26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.
\s5
\v 27 यरुशलेमचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.
\v 28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
\s शलमोनाचा मृत्यू
\r 1 राजे 11:41-43
\s5
\p
\v 29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावादयाच्या इद्दोची दर्शने यामध्ये नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
\v 30 शलमोनाने यरुशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
\v 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
\s5
\c 10
\s इस्त्राएलाचे बंड
\r 1राजे 12:1-19
\p
\v 1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
\v 2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.
\s5
\v 3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, “रहबामा,
\v 4 तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”
\v 5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
\s5
\v 6 राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांस काय उत्तर द्यावे? याबाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे.”
\v 7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”
\s5
\v 8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला.
\v 9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांस काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”
\s5
\v 10 तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांस तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हास म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल.
\v 11 माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
\s5
\v 12 “यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते.
\v 13 रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.
\v 14 तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
\s5
\v 15 राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता.
\s5
\v 16 राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.
\s5
\v 17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.
\v 18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुशलेमेला पळून गेला.
\v 19 तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.
\s5
\c 11
\p
\v 1 यरुशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.
\s5
\v 2 पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला,
\v 3 “शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
\v 4 परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशी
\f + उत्तरीय राज्य
\f* लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.
\s रहबामाचे ऐश्वर्य
\s5
\p
\v 5 रहबाम यरुशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली.
\v 6 बेथलेहेम, एटाम, तकोवा,
\v 7 बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,
\v 8 गथ, मारेशा, जीफ,
\v 9 अदोरइम, लाखीश, अजेका,
\v 10 सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.
\s5
\v 11 किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला.
\v 12 प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
\s5
\v 13 सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्यास येऊन मिळाले.
\v 14 लेवींनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवींना हाकलून लावले म्हणून ते आले.
\v 15 यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ति उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
\s5
\v 16 इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमेला आले.
\v 17 त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
\s5
\v 18 रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;
\v 19 महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.
\s5
\v 20 मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले.
\v 21 रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्यास अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.
\s5
\v 22 माकाचा पुत्र अबीया याला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्यास राजा करावे अशी त्याची इच्छा होती.
\v 23 रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.
\s5
\c 12
\s शिशक यहूदावर स्वारी करतो
\r 1राजे 14:25-28
\p
\v 1 रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.
\s5
\v 2 रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.
\v 3 शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते.
\v 4 यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुशलेमेला आणले.
\s5
\v 5 तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहूदाच्या वडिलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरुशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हास सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”
\v 6 तेव्हा इस्राएलाचे सरदार आणि राजे यांनी पश्चाताप करून ते विनम्र झाले. “परमेश्वर न्यायी आहे.” असे त्यांनी उदगार काढले.
\s5
\v 7 ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. थोड्याफार प्रमाणात मी त्यांना मुक्त करीन. शिशक मार्फत यरुशलेमेला मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही.
\v 8 पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”
\s5
\v 9 शिशकने यरुशलेमेवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या.
\v 10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामाने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या.
\s5
\v 11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.
\v 12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
\s5
\v 13 रहबामाने यरुशलेमामध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सतरा वर्षे राज्य केले, इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुशलेमाची निवड केली होती. आपले नाव रहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा; नामा अम्मोनीण नगरातली होती.
\v 14 रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.
\s5
\v 15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकिकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.
\v 16 रहबामाने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीद नगरात त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र अबीया राजा झाला.
\s5
\c 13
\s अबीयाची कारकीर्द
\r 1राजे 15:1-8
\p
\v 1 इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
\v 2 त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली.
\v 3 अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
\s5
\v 4 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,
\v 5 दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
\s5
\v 6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता.
\v 7 मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
\s5
\v 8 आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
\v 9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत:वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो.
\s5
\v 10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
\v 11 परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.
\s5
\v 12 पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही.”
\s5
\v 13 पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.
\v 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले.
\v 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.
\v 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.
\v 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला.
\s5
\v 19 अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.
\v 20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला.
\v 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या.
\v 22 इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
\s5
\c 14
\s आसाची कारकीर्द
\p
\v 1 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीद नगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांस दहा वर्षे शांतता लाभली.
\v 2 आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला.
\v 3 त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या. उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले.
\v 4 त्याने यहूदी लोकांस परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.
\s5
\v 5 यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्चस्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती.
\v 6 या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
\s5
\v 7 आसा यहूदातील लोकांस म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहत आहोत, तो आपलाच आहे. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
\v 8 आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामीन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरुष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्यबाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
\s5
\v 9 पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.
\v 10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली.
\v 11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळवू नये.”
\s5
\v 12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला.
\v 13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यामध्ये कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.
\s5
\v 14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले.
\v 15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमेला परतले.
\s5
\c 15
\s आसाने केलेल्या सुधारणा
\p
\v 1 ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
\v 2 अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.
\s5
\v 3 इस्राएलाला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
\v 4 पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा इस्राएलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला.
\v 5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
\s5
\v 6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते.
\v 7 पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल.”
\s5
\v 8 आसास या शब्दांनी आणि ओदेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ति हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्ती पूर्णपणे काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
\v 9 मग त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदात आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर त्याच्या सोबत आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
\s5
\v 10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेमामध्ये एकत्र जमले.
\v 11 त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती.
\s5
\v 12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
\v 13 जो इस्राएलाचा देव परमेश्वर याची सेवा करणार नाही त्यास ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
\s5
\v 14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला.
\v 15 मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांस मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
\s5
\v 16 आसा राजाने आपली आजी माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्याने ती मूर्ती मोडून तोडून किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली.
\v 17 त्याने इस्राएलातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
\s5
\v 18 मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
\v 19 आसाच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.
\s5
\c 16
\s बेन-हदादाबरोबर आसाने केलेला सलोखा
\r 1राजे 15:16-22
\p
\v 1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
\s5
\v 2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,
\v 3 “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
\s5
\v 4 बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
\v 5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
\v 6 राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
\s5
\v 7 यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
\v 8 कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
\s5
\v 9 अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”
\v 10 द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
\s5
\v 11 आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
\v 12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
\s5
\v 13 आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
\v 14 दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
\s5
\c 17
\s यहोशाफाटाच्या राज्याची मजबुती
\p
\v 1 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.
\v 2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.
\s5
\v 3 यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही.
\v 4 आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
\s5
\v 5 परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला.
\v 6 परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.
\s5
\v 7 आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.
\v 8 त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
\v 9 हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले.
\s5
\v 10 यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.
\v 11 कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
\s5
\v 12 यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली.
\v 13 यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरुशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली.
\s5
\v 14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता.
\v 15 यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.
\v 16 जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
\s5
\v 17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
\v 18 यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.
\v 19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.
\s5
\c 18
\s अहाब आणि यहोशाफाट ह्यांच्या पराभवाचे मीखायाने केलेले भविष्य
\r 1राजे 22:1-28
\p
\v 1 यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला.
\v 2 त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रित्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
\v 3 अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.”
\s5
\v 4 यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.”
\v 5 तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.”
\s5
\v 6 पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”
\v 7 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.”
\v 8 तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”
\s5
\v 9 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते.
\v 10 कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’”
\v 11 इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”
\s5
\v 12 मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
\v 13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
\v 14 मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”
\s5
\v 15 राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!”
\v 16 यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.”
\s5
\v 17 इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
\v 18 मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.”
\s5
\v 19 परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
\s5
\v 20 “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
\v 21 तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.”
\s5
\v 22 “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
\s5
\v 23 तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”
\v 24 मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”
\s5
\v 25 इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा
\v 26 आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.”
\v 27 मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”
\s5
\v 28 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादावर हल्ला चढवला.
\v 29 इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.
\v 30 अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”
\s5
\v 31 त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
\v 32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
\s5
\v 33 पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”
\v 34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.
\s5
\c 19
\s यहोशाफाटाला येहू द्रष्टयाचे ताडन
\p
\v 1 यहूदाचा राजा यहोशाफाट यरुशलेमामध्ये आपल्या घरी सुखरुप परतला.
\v 2 हनानीचा पुत्र येहू हा द्रष्टा होता तो राजा यहोशाफाटाला सामोरा गेला. येहू यहोशाफाटाला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.”
\v 3 पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वरास अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.
\s यहोशाफाटाला येहू द्रष्टयाचे ताडन
\s5
\p
\v 4 यहोशाफाट यरुशलेमामध्ये राहत असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेबापासून एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांस पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले.
\v 5 तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले.
\s5
\v 6 यहोशाफाटाने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल.
\v 7 तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
\s5
\v 8 यानंतर यहोशाफाटाने यरुशलेमामध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वयस्कर मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेमामधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. ते यरुशलेमेत राहीले
\v 9 यहोशाफाटाने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन निष्कपट रीतीने आणि मन:पूर्वक ही सेवा करा.
\s5
\v 10 खुनाचा वाद, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्वबाबतीत प्रत्येक वेळी लोकांस सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.
\s5
\v 11 अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा पुत्र जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”
\s5
\c 20
\s मवाब आणि अम्मोन ह्यांच्यावर मिळवलेला विजय
\p
\v 1 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.
\v 2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.
\s5
\v 3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
\v 4 तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
\s5
\v 5 यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
\v 6 तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.”
\v 7 तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
\s5
\v 8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले.
\v 9 ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.”
\s5
\v 10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
\v 11 पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस.
\s5
\v 12 हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.”
\v 13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.
\s5
\v 14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत
\v 15 यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
\s5
\v 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
\v 17 तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
\s5
\v 18 यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली.
\v 19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
\s5
\v 20 यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
\v 21 यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”
\s5
\v 22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
\v 23 अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
\s5
\v 24 यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.
\s5
\v 25 यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहापाशी आले. त्यामध्ये त्यांना खूप, धन, आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत:ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले.
\v 26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखाच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरास धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे.
\s5
\v 27 मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरुशलेम लोकांस यरुशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता.
\v 28 यरुशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
\s5
\v 29 परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला.
\v 30 त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
\s यहोशाफाटाची कारकीर्द
\r 1राजे 22:41-50
\s5
\p
\v 31 यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या.
\v 32 आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.
\v 33 पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
\s5
\v 34 हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे.
\s5
\v 35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.
\v 36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
\v 37 पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.
\s5
\c 21
\s यहूदाचा राजा यहोराम ह्यांची कारकीर्द
\r 1राजे 22:50; 2राजे 8:16-24
\p
\v 1 पुढे यहोशाफाट मरण पावला. त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला.
\v 2 अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएला
\f + याहूदाचा
\f* चा राजा होता.
\v 3 यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्यारुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यास त्याने राज्य दिले.
\s5
\v 4 यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.
\v 5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरुशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले.
\s5
\v 6 अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या वर्तनूकी प्रमाणेच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या कन्येशी यहोरामाने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या.
\v 7 पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता.
\s5
\v 8 यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला.
\v 9 तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला.
\v 10 तेव्हापासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले.
\s5
\v 11 यहोरामाने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली आणि यरुशलेमेतील लोकांना व्यभिचारी मतीने चालायला लावले. अशाप्रकारे यहोरामाने यहूदी लोकांस परमेश्वरापासून दूर नेले.
\s5
\v 12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, “यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही.
\v 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांस तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत:च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते.
\v 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांस जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे.
\v 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.”
\s5
\v 16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले.
\v 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला.
\s5
\v 18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.
\v 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.
\v 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.
\s5
\c 22
\s यहूदाचा राजा अहज्या ह्याची कारकीर्द
\r 2राजे 8:25-29; 9:14-16, 27-29
\p
\v 1 यहोरामाच्या जागी यरुशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
\v 2 त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.
\v 3 अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.
\s5
\v 4 अहाबाच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वरास मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर अहाबाच्या घराण्याने त्यास सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. त्या अयोग्य सल्ल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला.
\v 5 अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामाच्या बरोबर अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा पुत्र. योराम या लढाईत अराम्याकडून जखमी झाला.
\s5
\v 6 तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजऱ्या त्याच्या समाचारास गेला.
\s येहू अहज्यास ठार मारतो
\s5
\p
\v 7 अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
\v 8 अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
\s5
\v 9 यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
\s अथल्या राजासन हिरावून घेते
\r 2राजे 11:1-3
\s5
\p
\v 10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.
\v 11 पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.
\v 12 परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.
\s5
\c 23
\p
\v 1 यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.
\v 2 त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले.
\v 3 तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.
\s5
\v 4 आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
\v 5 एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे.
\s5
\v 6 कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.
\v 7 लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.
\s5
\v 8 लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.”
\v 9 दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.
\s5
\v 10 आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.
\v 11 मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.
\s5
\v 12 लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.
\v 13 पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.
\s5
\v 14 याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”
\v 15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
\s5
\v 16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
\v 17 मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ति आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
\s5
\v 18 यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले
\v 19 कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले
\s5
\v 20 सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.
\v 21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुशलेम नगर शांत झाले.
\s5
\c 24
\s यहूदाचा राजा यहोआश ह्याची कारकीर्द
\r 2राजे 11:21-12:16
\p
\v 1 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती.
\v 2 यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती.
\v 3 यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली.
\s5
\v 4 पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.
\v 5 तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.
\s5
\v 6 तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवीना तू यहूदा आणि यरुशलेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे.”
\v 7 पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी परमेश्वराच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बआल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती.
\s5
\v 8 राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली.
\v 9 लेवींनी मग यहूदा व यरुशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांस सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.
\v 10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले.
\s5
\v 11 पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला.
\v 12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.
\s5
\v 13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले.
\v 14 कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याव्यतिरिक्त सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जीवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत.
\s5
\v 15 पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युवेळी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते.
\v 16 दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे याठिकाणी दफन केले.
\s5
\v 17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले.
\v 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ति यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला.
\v 19 लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.
\s5
\v 20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, “तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे.”
\v 21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले.
\v 22 जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”
\s5
\v 23 वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरुशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले.
\v 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले.
\s5
\v 25 अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
\v 26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती.
\s5
\v 27 योवाशाचे पुत्र, त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.
\s5
\c 25
\s अमस्याची कारकीर्द
\r 2राजे 14:1-6
\p
\v 1 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरुशलेमची होती.
\v 2 त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती पण त्यामध्ये मन:पूर्वकता नव्हती.
\s5
\v 3 अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
\v 4 पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”
\s5
\v 5 अमस्याने सर्व यहूदा लोकांस एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामीन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर तीन लाख सैनिक युध्दाला तयार होते.
\v 6 यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार
\f + साधारण 3400 किलोग्राम
\f* चांदी एवढी किंमत मोजली.
\s5
\v 7 पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमाच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांस परमेश्वराची साथ नाही.
\v 8 तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
\s5
\v 9 यावर अमस्या त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी शंभर किक्कार
\f + साधारण 3400 किलोग्राम
\f* चांदी देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा मनुष्य म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”
\v 10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले, या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहूदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले.
\s5
\v 11 यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.
\v 12 यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
\s5
\v 13 नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांस जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
\s5
\v 14 अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ति बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
\v 15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत:च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
\s5
\v 16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
\s5
\v 17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता.
\s5
\v 18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे. पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
\v 19 मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत:ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
\s5
\v 20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
\v 21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे.
\v 22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
\s5
\v 23 इस्राएलाचा राजा योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरुशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमेच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
\v 24 सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
\s5
\v 25 यहोआहाजाचा पुत्र इस्राएलाचा राजा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश.
\v 26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे.
\s5
\v 27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमेच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
\v 28 अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले.
\s5
\c 26
\s उज्जीया राजाची कारकीर्द
\r 2राजे 14:21,22; 15:1-3
\p
\v 1 अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
\v 2 उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
\v 3 उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरुशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरुशलेमाची होती.
\s5
\v 4 उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
\v 5 जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.
\s5
\v 6 उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
\v 7 पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
\v 8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली.
\s5
\v 9 यरुशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.
\v 10 वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखेसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
\s5
\v 11 उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
\v 12 सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
\v 13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
\s5
\v 14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
\v 15 काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
\s5
\v 16 पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
\v 18 त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्यास म्हणाले, “उज्जीया, परमेश्वरास धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नकोस. अहरोनाचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
\s5
\v 19 पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
\v 20 मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
\s5
\v 21 राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
\s5
\v 22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत.
\v 23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
\s5
\c 27
\s योथामाची कारकीर्द
\r 2राजे 15:32-38
\p
\v 1 योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या.
\v 2 योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.
\s5
\v 3 परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले.
\v 4 यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले.
\s5
\v 5 अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीन वर्षे अम्मोनी योथामाला शंभर किक्कार
\f + साधारण 3400 किलोग्राम
\f* चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.
\s5
\v 6 परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.
\v 7 त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकिकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे.
\s5
\v 8 योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले.
\v 9 पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशेजारी दफन केले गेले. दावीद नगरांत लोकांनी त्यास पुरले. योथामाच्या जागी आहाज हा त्याचा पुत्र राज्य करु लागला.
\s5
\c 28
\s आहाजाची कारकीर्द
\r 2राजे 16:1-4
\p
\v 1 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वरास मान्य होणारे नव्हते.
\v 2 इस्राएलाच्या राजांचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ति बनवल्या.
\s5
\v 3 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या पुत्रांना त्याने अग्नीमध्ये आहूती देवून बली दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांस तेथून घालवले होते.
\v 4 आहाजने उंचस्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.
\s5
\v 5 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामाच्या राजाच्या हातून आहाजाचा पराभव करविला. अरामाच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजाचा पाडाव करून यहूदाच्या लोकांस कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजाचा पराभव करवला.
\v 6 पेकहच्या पित्याचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे एक लाख विस हजार शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला.
\s5
\v 7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजाचा पुत्र मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.
\v 8 इस्राएलाच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या दोन लाख जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते या कैद्यांमध्ये स्त्रिया व बालकेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन येथे आले.
\s5
\v 9 तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांची कत्तल केलीत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे.
\v 10 यहूदाच्या व यरुशलेमेच्या लोकांस गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे अपराध केले आहे.
\v 11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या बंधू-भगिनींना परत पाठवून द्या. परमेश्वरास तुमचा अनावर संताप आला आहे.”
\s5
\v 12 एफ्राइमाच्या काही प्रमुख मंडळीनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानाचा पुत्र अजऱ्या, मशिल्लेमोथचा पुत्र बरेख्या, शल्लूमचा पुत्र यहिज्कीया, आणि हदलाईचा पुत्र अमास ही ती नेते मंडळी होत.
\v 13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलावर परमेश्वराचा कोप होईल.”
\s5
\v 14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले.
\v 15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यातील उघड्या नागड्या लोकांस त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी त्यांच्या जखमा बांधल्या व चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले (यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात). मग ते शोमरोनला परतले.
\s5
\v 16 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांस कैद करून नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली.
\v 17 कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते.
\v 18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, गदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. व तेथे ते राहायला गेले.
\s5
\v 19 परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण इस्राएलाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केले होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते.
\v 20 तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूराचा राजा. याने आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला.
\v 21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
\s5
\v 22 या संकटकाळात आहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला.
\v 23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्यास हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामाचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.
\s5
\v 24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणे गोळा करून त्यांची मोडतोड करून विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करून घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेमामध्ये चौका चौकात बसवल्या.
\v 25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंचस्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.
\s5
\v 26 आहाजची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
\v 27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्यास पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजाचा पुत्र हिज्कीया हा पुढे राजा झाला.
\s5
\c 29
\s हिज्कीयाची कारकीर्द
\r 2राजे 18:1-3
\p
\v 1 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या.
\s हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो
\p
\v 2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
\s5
\v 3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले.
\v 4 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली.
\v 5 तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका.
\s5
\v 6 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.
\v 7 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले.
\s5
\v 8 म्हणून यहूदा व यरुशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांस शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
\v 9 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले.
\s5
\v 10 म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही.
\v 11 तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे.”
\s5
\v 12 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयाचा पुत्र महथ आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजऱ्या, गर्षोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन,
\v 13 अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.
\v 14 हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी, यदूथूनच्या कुळातील शमाया आणि उज्जियेल.
\s5
\v 15 मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुद्धतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले.
\v 16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या.
\v 17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
\s5
\v 18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडे आम्ही शुद्ध केले आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत.
\v 19 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुद्धी करून आम्ही ती मांडली आहेत. ती आता परमेश्वराच्या वेदीसमोरच आहेत.”
\s5
\v 20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 21 त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्रस्थान आणि यहूदा यांच्या शुद्धीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
\s5
\v 22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.
\v 23 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले.
\v 24 बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. इस्राएलाबद्दल प्रायश्चित होण्यासाठी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
\s5
\v 25 दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेप्रमाणे राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवीची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती.
\v 26 त्याप्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले
\s5
\v 27 मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञा केली. त्यास सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला.
\v 28 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.
\s5
\v 29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली.
\v 30 हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.
\s5
\v 31 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली.
\s5
\v 32 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे नर कोकरे. त्यांचे परमेश्वरास होमार्पण करण्यात आले.
\v 33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू.
\s5
\v 34 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.
\s5
\v 35 होमबली पुष्कळ होते. शांत्यर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. याप्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली.
\v 36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदीत झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
\s5
\c 30
\s वल्हांडण सण पाळण्यात येतो
\p
\v 1 हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.
\s याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो
\p
\v 2 यरुशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.
\v 3 सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरुशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.
\s5
\v 4 तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली.
\v 5 बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरुशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.
\s5
\v 6 त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.
\s5
\v 7 आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
\v 8 आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.
\v 9 तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”
\s5
\v 10 एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली.
\v 11 आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरुशलेमेला प्रयाण केले.
\v 12 पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
\s5
\v 13 दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरुशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.
\v 14 यरुशलेमेमधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या.
\v 15 दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बली दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
\s5
\v 16 देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.
\v 17 येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.
\s5
\v 18 एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.
\v 19 तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
\v 20 राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांस क्षमा केली.
\s5
\v 21 इस्राएलाच्या प्रजेने यरुशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन:पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईली.
\v 22 परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांत्यर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबूली दिली.
\s5
\v 23 वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला.
\v 24 यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे व पुढाऱ्यांनी एक हजार बैल व दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले.
\s5
\v 25 यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते.
\v 26 यरुशलेमामध्ये आनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता.
\v 27 याजक व लेवी यांनी उठून लोकांस आशीर्वाद देण्याची परमेश्वरास प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वरास ऐकू गेली.
\s5
\c 31
\p
\v 1 अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरुशलेमेमध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ति फोडून टाकल्या. या परकीय दैवतांची पूजा होत असे. अशेराच्या मुर्तीही त्यांनी उखडून टाकल्या. यहूदा आणि बन्यामीन प्रांतातील सर्व उंचस्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. इतर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. व तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.
\s5
\v 2 लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांत्यर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.
\v 3 यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या होमार्पणा खातर त्यांचा उपयोग करण्यात आला. शब्बाथ, चंद्रदर्शने व इतर उत्सव कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहीले आहे.
\s5
\v 4 आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांस लेवी व याजक यांना द्यावा लागत असे, तो त्यांनी द्यावा अशी यरुशलेमेतील लोकांसाठी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.
\v 5 ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एक दशांश भाग आणून दिला.
\s5
\v 6 यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वराकरिता आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.
\v 7 लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.
\v 8 राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले.
\s5
\v 9 राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.
\v 10 तेव्हा सादोकाचा घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हास पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या लोकांस आशीर्वाद दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”
\s5
\v 11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.
\v 12 याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
\v 13 यहीएल, अजज्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या मनुष्यांची निवड केली.
\s5
\v 14 लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वरास वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वरास आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्याच्या पित्याचे नाव इम्नाना लेवी.
\v 15 एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या व शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहत त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वांनाच सारखाच भाग देत असत.
\s5
\v 16 लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.
\s5
\v 17 याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
\v 18 ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.
\v 19 अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहत असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील मनुष्यांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.
\s5
\v 20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.
\v 21 हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यास यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वरास शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले त्यास यश लाभले.
\s5
\c 32
\s सन्हेरीबाची स्वारी
\r 2राजे 18:13-19:34; यश. 36:1-22
\p
\v 1 हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.
\s5
\v 2 यरुशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले.
\v 3 तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्यास मदत केली.
\v 4 झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”
\s5
\v 5 हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत ज्याठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदी बाहेर दुसरा मजबूत कोट केला. दावीद नगरातील मिल्लो नावाच्या बूरूजाची मजबूती केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या.
\s5
\v 6 हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली.
\v 7 हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
\v 8 अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला तर साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे यहूदाचा राजा हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.
\s5
\v 9 अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.
\v 10 सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरुशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”
\s5
\v 11 हिज्कीयाचा हा तुम्हास फसवण्याचा डाव आहे. यरुशलेमामध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतताः हेतू आहे. तो तुम्हास म्हणतो, “अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.”
\v 12 पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरुशलेमेच्या लोकांस त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे.
\s5
\v 13 माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हास माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांस वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत.
\v 14 माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला. त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांस विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हास माझ्या सामर्थ्यापासुन वाचवू शकेल असे वाटते का?
\v 15 हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नका व त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हास वाचवू शकेल असे समजू नका.
\s5
\v 16 अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.
\v 17 सन्हेरीबनच्या दासांनी पत्रांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर याविषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तसेच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”
\s5
\v 18 मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमेच्या लोकांस घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता.
\v 19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरुशलेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.
\s परमेश्वर हिज्कीयाची सुटका करतो
\r 2राजे 19:35-37
\s5
\p
\v 20 यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली.
\v 21 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.
\s5
\v 22 अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वरास हिज्कीयाची आणि यरुशलेमेच्या प्रजेची काळजी होती.
\v 23 बऱ्याच जणांनी परमेश्वरास वाहण्यास भेटवस्तू यरुशलेमेत आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला.
\s हिज्कीया दुखणे
\r 2राजे 20:1-11; यश. 38:1-8
\s5
\p
\v 24 या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला याप्रकारे परमेश्वराने त्यास एक संकेत दिला.
\v 25 पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्यास धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला.
\v 26 परंतु यरुशलेमेचे लोक आणि हिज्कीया यांचे हृदयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही.
\s हिज्कीया बाबेलच्या वकिलांचे स्वागत करतो
\r 2राजे 20:12-21; यश. 39:1-8
\s5
\p
\v 27 हिज्कीयाची भरभराट झाली, त्यास मान सन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली.
\v 28 धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या आपल्या कळपासाठी कोंडवाडे बांधले.
\v 29 हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देव दयेने हिज्कीयाला समृध्दी आली.
\s5
\v 30 याच हिज्कीयाने गीहोनचा यरुशलेमामधला वरचा प्रवाह अडवून त्यास दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.
\v 31 एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्यास एकटे सोडले.
\s हिज्कीया मृत्यू
\s5
\p
\v 32 हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी आमोजचा पुत्र यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे.
\v 33 हिज्कीया मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दाविदाच्या वंशजांच्या कबरीपाशी उंच भागावर
\f + सन्मानित ठिकाणी
\f* लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्यास सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे गादीवर आला.
\s5
\c 33
\s मनश्शेची कारकीर्द
\r 2राजे 21:1-9
\p
\v 1 मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
\v 2 त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
\v 3 हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बआल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे.
\s5
\v 4 परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या ईतर दैवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेमामध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
\v 5 या परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
\v 6 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बली दिला. जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्याशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.
\s5
\v 7 मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरुशलेमेमध्ये माझे नाव चिरकाल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमेला निवडले.
\v 8 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्राएल लोकांस बाहेर पडू देणार नाही. पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत. मोशेद्वारे त्यांना दिलेल्या विधी, नियम व आज्ञा त्यांनी पाळायला हवेत.”
\v 9 मनश्शेने मात्र यहूदा लोक आणि यरुशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत केले. इस्राएल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते.
\s5
\v 10 परमेश्वर मनश्शेशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही.
\v 11 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.
\s5
\v 12 मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
\v 13 त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वरास त्याची दया आली. म्हणून त्यास पुन्हा यरुशलेमेला आणून परमेश्वराने त्यास गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
\s5
\v 14 या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.
\v 15 परक्या देवतांच्या मूर्ति त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ति काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेमामध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.
\s5
\v 16 नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांस त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली.
\v 17 लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवा प्रित्यर्थ करीत होते.
\s5
\v 18 मनश्शेची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्यावतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्राएलच्या राजांच्या बखरीत लिहिलेले आहे.
\v 19 मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वरास त्याचे गाऱ्हाणे ऐकून करुणा वाटणे हे द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व वाईट काम, उंचस्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने कोरीव मूर्ती याचेही तपशील याच बखरीत आहेत.
\v 20 पुढे मनश्शे मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्यास पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राज्य करु लागला.
\s आमोनाची कारकीर्द
\r 2राजे 21:19-26
\s5
\p
\v 21 आमोन बाविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेमेमध्ये दोन वर्षे गादीवर होता.
\v 22 परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. पित्यानी करून घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करून आमोनाने त्यांची पूजा केली.
\v 23 पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.
\s5
\v 24 आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली.
\v 25 पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा पुत्र योशीया याला लोकांनी राजा केले.
\s5
\c 34
\s योशीयाची कारकीर्द
\r 2राजे 22:1,2
\p
\v 1 योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले.
\v 2 त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.
\s योशीयाने केलेल्या सुधारणा
\p
\v 3 आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरुशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ति यांची मोडतोड केली.
\s5
\v 4 लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ति फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मूर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले.
\v 5 बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरुशलेमला शुद्ध केले.
\s5
\v 6 मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले.
\v 7 त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरुशलेमेला परतला.
\s नियमशास्त्राचा ग्रंथ सापडतो
\r 2राजे 22:3-20
\s5
\p
\v 8 योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले.
\v 9 ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरुशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली.
\s5
\v 10 मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवींनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले.
\v 11 तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांस पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या.
\s5
\v 12 कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते.
\v 13 ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते.
\s5
\v 14 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
\v 15 हिल्कीयाने शाफान चिटणीसास असे सांगितले कि, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने शाफानाला तो ग्रंथ दिला.
\v 16 शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत.
\s5
\v 17 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत”
\v 18 शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.
\v 19 तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले.
\s5
\v 20 आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.
\v 21 “माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”
\s5
\v 22 हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुशलेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले.
\s5
\v 23 हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे.” राजा योशीयाला म्हणावे:
\v 24 परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.
\v 25 माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.
\s5
\v 26 पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:
\v 27 योशीयाने, पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे
\v 28 तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
\s5
\v 29 तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरुशलेममधील सर्व वयोवृद्धांना भेटीसाठी एकत्र बोलावले.
\v 30 राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरुशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली.
\s5
\v 31 मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वरास अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.
\v 32 मग त्याने यरुशलेम आणि बन्यामीन मधील लोकांसही या करारपालनात सामील करून घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले.
\s5
\v 33 इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधील विविध मूर्ति होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ति योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांस त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.
\s5
\c 35
\s योशीया वल्हांडण सण पाळतो
\r 2राजे 23:21-23
\p
\v 1 राजा, योशीयाने यरुशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
\v 2 परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
\s5
\v 3 इस्राएली लोकांस शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
\v 4 आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. इस्राएलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा.
\s5
\v 5 आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल.
\v 6 वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”
\s5
\v 7 वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
\v 8 या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले.
\v 9 कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.
\s5
\v 10 वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
\v 11 वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेविंकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
\v 12 त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
\s5
\v 13 लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली.
\v 14 हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
\s5
\v 15 आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
\s5
\v 16 तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
\v 17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
\s5
\v 18 शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरुशलेमाची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
\v 19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
\s योशीयाचा मृत्यू
\r 2राजे 23:28-30
\s5
\p
\v 20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढावयास सैन्यासह चालून आला. योशीया त्यास लढाईसाठी सामोरा गेला.
\v 21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्यास कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.
\s5
\v 22 पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
\s5
\v 23 या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.
\v 24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमेला नेले. यरुशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमेच्या लोकांस फार दु:ख झाले.
\s5
\v 25 यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
\s5
\v 26 योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमानेची चांगली कृत्ये
\v 27 म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
\s5
\c 36
\s यहोआहाजाचा कारकीर्द व पदच्युती
\r 2राजे 23:31-33
\p
\v 1 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र.
\v 2 तो यहूदाचा राजा झाला तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये तीन महिने राज्य केले.
\s5
\v 3 त्यानंतर मिसरच्या राजाने यरुशलेमेच्या राजाला पदच्युत केले व देशावर शंभर किक्कार
\f + साधारण 3400 किलोग्राम
\f* चांदी आणि एक किक्कार
\f + साधारण 34 किलोग्राम
\f* सोने एवढी खंडणी लादली.
\v 4 मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरुशलेमेचा राजा केले. यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले.
\s यहोयाकीमाची कारकीर्द
\r 2राजे 23:34-24:7
\s5
\p
\v 5 यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेमामध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवाविरुध्द पाप केले.
\v 6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्यास नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले.
\v 7 नबुखद्नेनेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या.
\s5
\v 8 यहोयाकीमाच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध हे सर्व इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. यहोयाकीमाच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राज्य करु लागला.
\s यहोयाखीनास कैद करून बाबेलास नेण्यात येते
\r 2राजे 24:8-17
\s5
\p
\v 9 यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता. यरुशलेमामध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती. परमेश्वरास अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले.
\v 10 राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या वडिलांचा भाऊ
\f + नातलगांपैकी
\f* सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरुशलेमचा राजा केले.
\s सिद्कीयाची कारकीर्द
\r 2राजे 24:18-20; यिर्म. 52:1-3
\s5
\p
\v 11 सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले.
\v 12 परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याने केले. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत. त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.
\s5
\v 13 सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वत:शी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले.
\v 14 त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली.
\s5
\v 15 त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते.
\v 16 पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
\s यहूदाचा बंदीवास
\s5
\p
\v 17 तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरुशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरुशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती.
\s5
\v 18 देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.
\v 19 त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरुशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरुशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली.
\s5
\v 20 अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.
\v 21 अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल.
\s कोरेशाची फर्मान
\r एज्रा 1:1-4
\s5
\p
\v 22 कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की,
\v 23 “पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरुशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरुशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”