mr_ulb/13-1CH.usfm

2101 lines
277 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 1CH 1CH-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h 1 इतिहास
\toc1 1 इतिहास
\toc2 1 इतिहास
\toc3 1ch
\mt1 1 इतिहास
\mt2 The First Book of the
\is लेखक
\ip 1 इतिहासामधील पुस्तके विशेषत: आपल्या लेखकांचे नाव देत नाहीत, तर यहूदी परंपरेने एज्राला लेखक म्हणून श्रेय दिले आहे. 1 इतिहासाची सुरुवात इस्त्राएल लोकांच्या कुटुंबांची यादी. मग इस्त्राएल नावाच्या राष्ट्रावर दाविदाच्या शासनाच्या वृत्तानुसार हे पुस्तक पुढे चालू आहे, हे पुस्तक राजा दाविदाच्या कथेच्या जवळ आहे जी जुन्या करारातील एक महान आकृती आहे. प्राचीन इस्त्राएलचा राजकीय आणि धार्मिक इतिहास या व्यापक दृष्टिकोणातून येतो.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 450-400
\ip इस्त्राएल लोकांनी परत बाबेलमध्ये परतल्यावर हे स्पष्ट होते. 1 इतिहास 3: 19-24 यादीमध्ये जरुब्बाबेलच्या नंतर सहाव्या पिढीत दाविदची वंशावळ सुरू आहे
\is प्राप्तकर्ता
\ip प्राचीन यहूदी लोक आणि पवित्र शास्त्राचे नंतरचे वाचक.
\is हेतू
\ip 1 इतिहासाची पुस्तके हद्दपार झाल्यानंतर देवाची आराधना कशी करायची हे समजून घेण्यासाठी जे इस्त्राएलात परत आले त्यांच्यासाठी 1 इतिहास हे पुस्तक लिहिण्यात आले. इतिहास दक्षिणेकडील राज्य, यहूदा, बन्यामीन आणि लेवी यांच्या जमाती यांच्यावर केंद्रित आहे. या जमाती देवाला अधिक विश्वासू असल्याचे भासले होते. दाविदाचे घर किंवा राज्य सदासर्वकाळ स्थापित करण्यासाठी देवाने आपला करार दाविदाशी दिला. पृथ्वीवरील राजे करू शकत नाही यासाठी दावीद आणि शलमोन यांच्याद्वारे देवाने आपले मंदिर बांधले जिथे लोक आराधना करायला येऊ शकतील. शलमोनाच्या मंदिराचा बाबेलच्या शत्रूंकडून नाश करण्यात आला.
\is विषय
\ip इस्त्राएलचा आध्यात्मिक इतिहास
\iot रूपरेषा
\io1 1. वंशावळ (अध्याय 1-9)
\io1 2. शौलाचा मृत्यू (अध्याय 10)
\io1 3. दाविदाचा अभिषेक आणि राजवट (अध्याय 11-29)
\s5
\c 1
\s आदामाचे वंशज
\r उत्प. 5:1-32; 10:1-32; 11:10-26; लूक. 3:34-38
\p
\v 1 आदाम, शेथ, अनोश,
\v 2 केनान, महललेल, यारेद,
\v 3 हनोख, मथुशलह, लामेख,
\v 4 नोहा, शेम, हाम आणि याफेथ.
\s नोहाच्या मुलांचे वंशज
\s5
\p
\v 5 याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
\v 6 गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा
\v 7 यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम.
\s5
\p
\v 8 हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.
\v 9 कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.
\v 10 कूशचा वंशज निम्रोद हा जगातील प्रथम विजेता होता.
\s5
\p
\v 11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
\v 12 पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
\s5
\p
\v 13 आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,
\v 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
\v 15 हिव्वी, आर्की, शीनी
\v 16 अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
\s5
\p
\v 17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.
\v 18 शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.
\v 19 एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.
\s5
\p
\v 20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
\v 21 हदोराम, ऊजाल, दिक्ला,
\v 22 एबाल, अबीमाएल, शबा,
\v 23 ओफीर, हवीला, योबाब यांना यक्तानाने जन्म दिला.
\s शेमाचे वंशज
\s5
\p
\v 24 शेम, अर्पक्षद, शेलह,
\v 25 एबर, पेलेग, रऊ
\v 26 सरुग, नाहोर, तेरह,
\v 27 अब्राम म्हणजेच अब्राहाम.
\s इश्माएलाचे वंशज
\r उत्प. 25:12-16
\s5
\p
\v 28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.
\v 29 ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,
\v 30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
\v 31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.
\s5
\p
\v 32 अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.
\v 33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.
\s एसावाचे वंशज
\r उत्प. 36:10-14
\s5
\p
\v 34 इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.
\p
\v 35 एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
\v 36 अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.
\v 37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
\s5
\p
\v 38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.
\v 39 होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.
\v 40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.
\s5
\p
\v 41 दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.
\v 42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
\s5
\p
\v 43 इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
\v 44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
\v 45 योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.
\s5
\p
\v 46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
\v 47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
\v 48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.
\s5
\p
\v 49 शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.
\v 50 बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.
\s5
\p
\v 51 पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,
\v 52 अहलीबामा, एला, पीनोन,
\v 53 कनाज, तेमान मिब्सार,
\v 54 माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.
\s5
\c 2
\s इस्त्राएलाचे पुत्र
\r उत्प. 35:23-26; 46:8-25
\p
\v 1 ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
\v 2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
\s यहूदाचे वंशज
\r रुथ 4:18-22; मत्त.1:2-6; लूक 3:31-33
\s5
\p
\v 3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
\v 4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
\s5
\p
\v 5 हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
\v 6 जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
\v 7 जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध
\f + त्याने देवाला समर्पित केलेली लूट ठेवून इस्राएली लोकांवर आपत्ती आणली. यहोशवा अध्याय 7 पाहा
\f* केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
\v 8 एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
\s5
\p
\v 9 यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
\v 10 अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
\v 11 नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
\v 12 बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
\s5
\p
\v 13 इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
\v 14 चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
\v 15 सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
\s5
\p
\v 16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
\v 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
\s5
\p
\v 18 हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
\v 19 अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
\v 20 हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
\s5
\p
\v 21 नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
\v 22 सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
\s5
\p
\v 23 पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
\v 24 हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
\s5
\p
\v 25 यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
\v 26 यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
\v 27 यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
\v 28 शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
\s5
\p
\v 29 अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
\v 30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
\v 31 अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
\v 32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.
\v 33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
\s5
\p
\v 34 शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
\v 35 शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
\s5
\p
\v 36 अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
\v 37 जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
\v 38 ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
\s5
\p
\v 39 अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
\v 40 एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
\v 41 शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
\s5
\p
\v 42 यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
\v 43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
\v 44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय,
\s5
\p
\v 45 शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
\v 46 कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
\v 47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
\s5
\p
\v 48 माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
\v 49 तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
\s5
\p
\v 50 ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
\v 51 बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
\s5
\p
\v 52 किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
\v 53 आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
\s5
\p
\v 54 सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
\v 55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.
\s5
\c 3
\s दाविदाचे पुत्र
\r मत्त. 1:6
\p
\v 1 आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.
\q अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ;
\q अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
\q
\v 2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र,
\q हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
\q
\v 3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा.
\q दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
\s5
\m
\v 4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
\v 5 अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरुशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
\s5
\p
\v 6 इतर नऊ पुत्र;
\q इभार, अलीशामा, एलीफलेट,
\v 7 नोगा, नेफेग, याफीय,
\v 8 अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
\v 9 ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
\s दाविदाचे पुत्र
\r मत्त. 1:7-11
\s5
\p
\v 10 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता.
\q रहबामाचा पुत्र अबीया होता.
\q अबीयाचा पुत्र आसा.
\q आसाचा पुत्र यहोशाफाट.
\q
\v 11 यहोशाफाटाचा पुत्र योराम.
\q योरामाचा पुत्र अहज्या होता.
\q अहज्याचा पुत्र योवाश होता.
\q
\v 12 योवाशाचा पुत्र अमस्या होता.
\q अमस्याचा पुत्र अजऱ्या होता.
\q अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
\s5
\q
\v 13 योथामाचा पुत्र आहाज होता.
\q आहाजाचा पुत्र हिज्कीया,
\q हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
\q
\v 14 मनश्शेचा पुत्र आमोन होता,
\q आमोनचा पुत्र योशीया होता.
\s5
\p
\v 15 योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.
\v 16 यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
\s5
\p
\v 17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
\v 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
\s5
\p
\v 19 पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
\v 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
\v 21 पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
\s5
\p
\v 22 शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.
\v 23 निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
\v 24 एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
\s5
\c 4
\s यहूदाचे वंशज
\p
\v 1 यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
\v 2 शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
\s5
\p
\v 3 इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.
\v 4 पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता.
\s5
\p
\v 5 अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा.
\v 6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले.
\v 7 सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे पुत्र.
\v 8 हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते.
\s5
\p
\v 9 याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरनीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
\v 10 याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.
\s5
\p
\v 11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन.
\v 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
\s5
\p
\v 13 अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र.
\v 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
\v 15 यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज.
\v 16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलाचे पुत्र.
\s5
\p
\v 17 एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.
\v 18 त्याच्या यहूदी पत्नीला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.
\s5
\p
\v 19 होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.
\v 20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.
\s5
\p
\v 21 यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.
\v 22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.
\v 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
\s शिमोनाचे वंशज
\r उत्प. 46:10
\s5
\p
\v 24 नमुवेल, यामीन, यरिब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र.
\v 25 शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिबसाम. मिबसामचा पुत्र मिश्मा.
\v 26 मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी.
\s5
\p
\v 27 शिमीला सोळा मुले आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.
\v 28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
\s5
\p
\v 29 बिल्हा, असेम, तोलाद,
\v 30 बथुवेल, हर्मा सिकलाग,
\v 31 बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
\s5
\p
\v 32 त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे.
\v 33 बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
\s5
\p
\v 34 त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा पुत्र योशा,
\v 35 योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असिएलचा पुत्र सराया,
\v 36 एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदीएल, यशीमिएल, बनाया,
\v 37 जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र.
\v 38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली.
\s5
\p
\v 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
\v 40 त्यांना विपुल व चांगली गायरानेे मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
\v 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले.
\s5
\p
\v 42 शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.
\v 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
\s5
\c 5
\s रऊबेनाचे वंशज
\r उत्प. 46:8,9
\p
\v 1 रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.
\v 2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.
\v 3 इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी.
\s5
\p
\v 4 योएलाचे वंशज हे होते:
\q योएलाचा पुत्र शमाया होता.
\q शमायाचा पुत्र गोग होता.
\q गोगचा पुत्र शिमी होता.
\q
\v 5 शिमीचा पुत्र मीखा होता.
\q मीखाचा पुत्र राया होता.
\q रायाचा पुत्र बाल होता.
\q
\v 6 बालाचा पुत्र बैरा होता.
\q अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.
\s5
\p
\v 7 योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,
\v 8 योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते.
\v 9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.
\s5
\p
\v 10 शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.
\s गादाचे वंशज
\s5
\p
\v 11 त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते.
\v 12 योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.
\v 13 त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.
\s5
\v 14 हे अबीहाईलचे वंशज.
\q अबीहाईल हूरीचा पुत्र.
\q हूरी यारोहाचा पुत्र आणि
\q यारोहा गिलादाचा.
\q गिलाद मीखाएलचा.
\q मीखाएल यशीशा याचा पुत्र.
\q यशीशाया यहदोचा पुत्र.
\q यहदो बूजाचा पुत्र.
\m
\v 15 अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
\s5
\p
\v 16 ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.
\v 17 यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.
\s अडीच वंशाचा इतिहास
\s5
\p
\v 18 मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.
\v 19 हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.
\s5
\p
\v 20 आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.
\v 21 त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
\v 22 पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.
\s5
\p
\v 23 बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
\v 24 मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.
\s5
\p
\v 25 पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.
\v 26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.
\s5
\c 6
\s लेवीचे वंशज
\r उत्प. 46:11
\p
\v 1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
\v 2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
\v 3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
\s5
\p
\v 4 एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
\v 5 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
\v 6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
\s5
\p
\v 7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
\v 8 अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
\v 9 अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
\s5
\p
\v 10 योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरुशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
\v 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
\v 12 अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
\s5
\p
\v 13 शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
\v 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
\v 15 परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरुशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
\s5
\p
\v 16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
\v 17 लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
\v 18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
\s5
\p
\v 19 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
\v 20 गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी.
\q लिब्नीचा पुत्र यहथ.
\q यहथया पुत्र जिम्मा.
\q
\v 21 जिम्माचा पुत्र यवाह.
\q यवाहाचा इद्दो.
\q इद्दोचा पुत्र जेरह.
\q जेरहचा यात्राय.
\s5
\p
\v 22 कहाथाचे वंशज असे,
\q कहाथचा पुत्र अम्मीनादाब.
\q अम्मीनादाबचा कोरह.
\q कोरहचा पुत्र अस्सीर.
\q
\v 23 अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
\q
\v 24 अस्सीरचा पुत्र तहथ,
\q तहथचा पुत्र उरीएल.
\q उरीएलचा उज्जीया.
\q उज्जीयाचा शौल.
\s5
\q
\v 25 अमासय आणि
\q अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
\v 26 एलकानाचा पुत्र सोफय.
\q सोफयचा पुत्र नहथ.
\q
\v 27 नहथचा पुत्र अलीयाब.
\q अलीयाबाचा यरोहाम.
\q यरोहामाचा एलकाना.
\q एलकानाचा पुत्र शमुवेल.
\s5
\p
\v 28 थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.
\q
\v 29 मरारीचे पुत्र,
\q मरारीचा पुत्र महली.
\q महलीचा लिब्नी.
\q लिब्नीचा पुत्र शिमी.
\q शिमीचा उज्जा.
\q
\v 30 उज्जाचा पुत्र शिमा
\q शिमाचा हग्गीया आणि
\q त्याचा असाया.
\s दावीद मंदिरासाठी गायकराण नेमतो
\s5
\p
\v 31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
\v 32 यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
\s5
\p
\v 33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज,
\q हेमान हा गवई.
\q हा योएलाचा पुत्र.
\q योएल शमुवेलचा पुत्र.
\q
\v 34 शमुवेल एलकानाचा पुत्र.
\q एलकाना यरोहामाचा पुत्र.
\q यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
\v 35 तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र.
\q एलकाना महथचा पुत्र.
\q महथ अमासयाचा पुत्र.
\s5
\q
\v 36 अमासय एलकानाचा पुत्र.
\q एलकाना योएलाचा पुत्र.
\q योएल अजऱ्याचा पुत्र.
\q अजऱ्या सफन्याचा पुत्र.
\q
\v 37 सफन्या तहथचा पुत्र.
\q तहथ अस्सीरचा पुत्र.
\q अस्सीर एब्यासाफचा पुत्र.
\q एब्यासाफ कोरहचा पुत्र.
\q
\v 38 कोरह इसहारचा पुत्र.
\q इसहार कहाथचा पुत्र.
\q कहाथ लेवीचा आणि
\q लेवी इस्राएलाचा पुत्र.
\s5
\p
\v 39 आसाफ हेमानाचा नातलग होता.
\q हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे.
\p आसाफ हा बरेख्या याचा पुत्र.
\q बरेख्या शिमाचा पुत्र.
\q
\v 40 शिमा मीखाएलचा पुत्र.
\q मिखाएल बासेया याचा पुत्र.
\q बासेया मल्कीया याचा पुत्र.
\v 41 मल्कीया एथनीचा पुत्र,
\q एथनी जेरहचा पुत्र
\q जेरह हा अदाया याचा पुत्र.
\q
\v 42 अदाया एतानाचा पुत्र.
\q एथाना हा जिम्मा याचा पुत्र.
\q जिम्मा शिमीचा पुत्र.
\q
\v 43 शिमी यहथ याचा पुत्र.
\q यहथ हा गर्षोम याचा पुत्र.
\q गर्षोम लेवीचा पुत्र.
\s5
\v 44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र.
\q किशी अब्दीचा पुत्र.
\q अब्दी मल्लूखचा पुत्र.
\q
\v 45 मल्लूख हशब्याचा पुत्र.
\q हशब्या अमस्याचा पुत्र.
\q अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
\q
\v 46 हिल्कीया अमसीचा पुत्र.
\q अमसी बानीचा पुत्र.
\q बानी शेमर पुत्र.
\q
\v 47 शेमेर महलीचा पुत्र.
\q महली मूशीचा पुत्र,
\q मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
\s5
\q
\v 48 आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
\s अहरोनाचे वंशज
\s5
\p
\v 49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.
\s5
\p
\v 50 अहरोनाचे वंशज असे मोजले,
\q अहरोनाचा पुत्र एलाजार.
\q एलाजाराचा पुत्र फिनहास.
\q फिनहासचा पुत्र अबीशूवा.
\q
\v 51 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
\q
\v 52 जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
\v 53 अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
\s लेवी लोकांची नगरे
\r यहो. 21:1-42
\s5
\p
\v 54 अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
\v 55 यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणेे त्यांना मिळाली.
\v 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
\s5
\p
\v 57 अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
\v 58 हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह,
\s5
\p
\v 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
\v 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
\s5
\p
\v 61 कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
\v 62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
\s5
\p
\v 63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
\v 64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
\v 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
\s5
\p
\v 66 एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
\v 67 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
\v 68 यकमाम, बेथ-होरोन,
\v 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
\s5
\p
\v 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली.
\s5
\p
\v 71 गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
\v 72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
\v 73 रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह,
\s5
\p
\v 74 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
\v 75 हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
\v 76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
\s5
\p
\v 77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
\v 78 यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
\v 79 कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
\s5
\p
\v 80 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
\v 81 हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.
\s5
\c 7
\s इस्साखाराचे वंशज
\r उत्प. 46:13
\p
\v 1 इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
\v 2 उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
\v 3 इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
\s5
\p
\v 4 त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
\v 5 इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
\s बन्यामिनाचे वंशज
\r उत्प. 46:21
\s5
\p
\v 6 बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
\v 7 बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
\s5
\p
\v 8 जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
\v 9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
\v 10 यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
\s5
\p
\v 11 यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
\v 12 शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
\s नफतालीचे वंशज
\r उत्प. 46:24
\s5
\p
\v 13 यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
\s5
\p
\v 14 मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
\v 15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
\v 16 माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
\s5
\p
\v 17 ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
\v 18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
\v 19 अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
\s एफ्राइमाचे वंशज
\s5
\p
\v 20 एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः
\q एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह.
\q शुथेलहचा पुत्र बेरेद.
\q बेरेदाचा पुत्र तहथ.
\q तहथाचा पुत्र एलादा.
\q एलादाचा पुत्र तहथ.
\q
\v 21 तहथचा पुत्र जाबाद.
\q जाबादचा पुत्र शुथेलह.
\m गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
\v 22 एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
\s5
\p
\v 23 मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
\v 24 त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
\s5
\q
\v 25 रेफह हा एफ्राईमाचा पुत्र.
\q रेफहचा पुत्र रेशेफ.
\q रेशेफचा पुत्र तेलह.
\q तेलहचा पुत्र तहन.
\q
\v 26 तहनचा पुत्र लादान.
\q लादानचा पुत्र अम्मीहूद.
\q आम्मीहूदचा अलीशामा.
\v 27 त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
\s5
\p
\v 28 एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
\v 29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
\s आशेराचे वंशज
\r उत्प. 46:17
\s5
\p
\v 30 इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
\v 31 हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
\v 32 यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
\s5
\p
\v 33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
\v 34 अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
\v 35 शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
\s5
\p
\v 36 सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
\v 37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
\v 38 यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
\s5
\p
\v 39 आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
\v 40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
\s5
\c 8
\s बन्यामिनाचे वंशज
\r उत्प. 46:21
\p
\v 1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
\v 2 चौथा नोहा व पाचवा राफा.
\v 3 आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
\v 4 अबीशूवा, नामान, अहोह,
\v 5 गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
\s5
\p
\v 6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
\v 7 नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.
\s5
\p
\v 8 शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
\v 9 त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
\v 10 यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
\v 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
\s5
\p
\v 12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
\v 13 बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
\s5
\p
\v 14 हे बरीयाचे पुत्र:
\q अह्यो, शाशक, यरेमोथ,
\q
\v 15 जबद्या. अराद, एदर,
\q
\v 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
\m
\v 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
\v 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
\s5
\v 19 याकीम, जिख्री, जब्दी,
\v 20 एलीएनय, सिलथय, अलीएल,
\v 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
\s5
\v 22 इश्पान, एबर, अलीएल,
\v 23 अब्दोन, जिख्री, हानान,
\v 24 हनन्या, एलाम, अनथोथीया,
\v 25 इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
\s5
\v 26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
\v 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
\v 28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुशलेम येथे राहत होते.
\s शौलाची वंशावळ
\s5
\p
\v 29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
\v 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
\v 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
\s5
\p
\v 32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
\v 33 कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
\v 34 योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
\s5
\p
\v 35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
\v 36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
\q
\v 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
\s5
\p
\v 38 आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
\v 39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
\v 40 ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.
\s5
\c 9
\s बाबेलहून परत आलेले लोक
\p
\v 1 इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.
\v 2 त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.
\v 3 यरुशलेमामध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते.
\s5
\p
\v 4 ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.
\v 5 यरुशलेमामध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र.
\v 6 यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.
\s5
\p
\v 7 बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हस्सनुवाचा पुत्र.
\v 8 इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र.
\v 9 त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.
\s5
\p
\v 10 यरुशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन, अजऱ्या.
\v 11 अजऱ्या हा हिल्कीयाचा पुत्र. हिल्कीया मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम सादोकाचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा पुत्र. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता.
\s5
\p
\v 12 यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र.
\v 13 असे एकंदर एक हजार सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते.
\s5
\v 14 यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला.
\v 15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र.
\v 16 ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
\s5
\p
\v 17 यरुशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
\v 18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.
\v 19 शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.
\s5
\p
\v 20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
\v 21 मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “दर्शनमंडपाचा” द्वारपाल होता.
\s5
\p
\v 22 निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती
\v 23 परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.
\v 24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
\s5
\p
\v 25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.
\v 26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
\v 27 देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
\s5
\p
\v 28 त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत.
\v 29 आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते.
\s5
\p
\v 30 याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत.
\v 31 लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता.
\v 32 कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.
\s5
\v 33 लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे.
\v 34 हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरुशलेमात राहत होते.
\s शौलाची वंशावळ
\s5
\p
\v 35 गिबोनाचा पिता ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या पत्नीचे नाव माका होते.
\v 36 ईयेल्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी पुत्र,
\v 37 गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच अपत्ये.
\s5
\p
\v 38 मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरुशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
\q
\v 39 नेर हा कीशाचा पिता होता.
\q कीश शौलाचा पिता होता.
\q शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.
\q
\v 40 मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र.
\q मीखा हा मरीब्बालाचा पुत्र.
\s5
\p
\v 41 पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे पुत्र.
\q
\v 42 आहाज याराचा पिता होता.
\q यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता.
\q जिम्रीन मोसाचा पिता होता.
\q
\v 43 मोसा बिनाचा पिता होता.
\q बिना रफायाचा पिता होता.
\q रफाया एलासाचा पिता होता.
\q एलासा आसेलाचा पिता होता.
\q
\v 44 आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.
\s5
\c 10
\s शौल व त्याचे पुत्र ह्यांचा मृत्यू
\r 1शमु. 31:1-13
\p
\v 1 आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
\v 2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
\v 3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
\s5
\p
\v 4 नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत:ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
\s5
\p
\v 5 जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
\v 6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
\s5
\p
\v 7 जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
\v 8 मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
\s5
\p
\v 9 त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
\v 10 त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
\s5
\p
\v 11 पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
\v 12 तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनीक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
\s5
\p
\v 13 शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
\v 14 त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
\s5
\c 11
\s इस्त्राएलाचा राजा म्हणून दाविदाचा अभिषेक
\r 2 शमु. 5:1-3
\p
\v 1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत.
\v 2 मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.”
\v 3 असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.
\s दावीद सीयोन गड घेतो
\r 2 शमु. 5:6-10
\s5
\p
\v 4 दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते.
\v 5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे.
\v 6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले.
\s5
\p
\v 7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले.
\v 8 त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला.
\v 9 दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता.
\s दाविदाचे योध्दे
\r 2 शमु. 23:8-39
\s5
\p
\v 10 हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.
\v 11 दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले.
\s5
\p
\v 12 त्यानंतर दोदय अहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरांपैकी एक होता.
\v 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते.
\v 14 तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला.
\s5
\p
\v 15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.
\v 16 आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते.
\v 17 तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!”
\s5
\p
\v 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले.
\v 19 तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो या ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले.
\s5
\p
\v 20 यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो.
\v 21 या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही.
\s5
\p
\v 22 कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
\v 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले.
\s5
\p
\v 24 यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते.
\v 25 तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
\s5
\p
\v 26 सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
\v 27 हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
\v 28 तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर
\v 29 सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,
\s5
\p
\v 30 महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद,
\v 31 बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
\v 32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
\v 33 अजमावेथ बहरुमी, अलीहाबा शालबोनी,
\s5
\p
\v 34 हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान,
\v 35 हरारी साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल,
\v 36 हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
\v 37 हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय,
\s5
\p
\v 38 नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
\v 39 सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
\v 40 ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
\v 41 उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,
\s5
\p
\v 42 शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
\v 43 माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी,
\v 44 उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व ईयेल,
\s5
\p
\v 45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
\v 46 अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
\v 47 अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.
\s5
\c 12
\s सिकलाग येथे दाविदाला साहाय्य करणारे
\r 1 शमु. 22:1,2
\p
\v 1 कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.
\v 2 धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.
\s5
\p
\v 3 अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.
\v 4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.
\s5
\p
\v 5 एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या
\v 6 एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज,
\v 7 तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.
\s5
\p
\v 8 गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
\s5
\p
\v 9 गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.
\v 10 मिश्मन्ना चौथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.
\v 11 अत्तय सहावा, अलीएल सातवा,
\v 12 योहानन आठवा, एलजाबाद नववा,
\v 13 यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
\s5
\p
\v 14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता.
\v 15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.
\s5
\p
\v 16 बन्यामीन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
\v 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”
\s5
\p
\v 18 अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
\s5
\p
\v 19 मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”
\v 20 तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.
\s5
\p
\v 21 लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
\v 22 देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.
\s हेब्रोन येथील दाविदाचे सैन्य
\s5
\p
\v 23 आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले.
\v 24 यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.
\v 25 शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.
\s5
\p
\v 26 लेवीच्या कुळातून चार हजार सहाशें शूर वीर होते.
\v 27 अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
\v 28 सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.
\s5
\p
\v 29 बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
\v 30 एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते.
\v 31 मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.
\s5
\p
\v 32 इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती व जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.
\v 33 जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
\s5
\p
\v 34 नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.
\v 35 दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.
\s5
\p
\v 36 आशेर वंशातून चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
\v 37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
\s5
\p
\v 38 हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
\v 39 त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते.
\v 40 याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षारस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.
\s5
\c 13
\s कोश यरुशलेमेस आणण्याचा दाविदाचा मानस
\r 2 शमु. 6:1-11
\p
\v 1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
\v 2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
\v 3 आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
\v 4 तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
\s दावीद कोश आणण्यास जातो
\s5
\p
\v 5 किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
\v 6 करूबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
\s5
\p
\v 7 मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
\v 8 दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
\s5
\p
\v 9 किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
\v 10 तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
\v 11 परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
\s5
\p
\v 12 दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
\v 13 त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
\s हीराम दाविदाला राजा मानतो
\p
\v 14 मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.
\s5
\c 14
\p
\v 1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले.
\v 2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.
\s यरुशलेमेत जन्मलेली दाविदाची मुले
\s5
\p
\v 3 यरुशलेमातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला.
\v 4 यरुशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
\v 5 इभार, अलीशवा, एल्पलेट,
\v 6 नोगा, नेफेग. याफीय,
\v 7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
\s दावीद पलिष्टयांचा पराभव करतो
\r 2 शमु. 5:17-25
\s5
\p
\v 8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.
\v 9 आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.
\s5
\p
\v 10 मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.”
\v 11 मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.
\v 12 पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ति जाळून टाकण्याची आज्ञा दिली.
\s5
\p
\v 13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
\v 14 दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.
\s5
\p
\v 15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”
\v 16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
\v 17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.
\s5
\c 15
\s कोश यरुशलेमेस आणतात
\r 2 शमु. 6:12-16
\p
\v 1 दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
\v 2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
\v 3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरुशलेमेत एकत्र जमा केले.
\s5
\p
\v 4 दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
\q
\v 5 कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
\q
\v 6 मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
\s5
\q
\v 7 गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
\q
\v 8 अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
\q
\v 9 हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
\q
\v 10 उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
\s5
\p
\v 11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
\v 12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
\s5
\p
\v 13 पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
\v 14 यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
\v 15 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
\s5
\p
\v 16 दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
\v 17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
\v 18 याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
\s5
\v 19 हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
\v 20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
\v 21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
\s5
\p
\v 22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
\v 23 बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
\v 24 शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
\s5
\p
\v 25 अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
\v 26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
\s5
\p
\v 27 कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
\v 28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
\s5
\p
\v 29 पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
\s5
\c 16
\p
\v 1 त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.
\v 2 मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला.
\v 3 मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.
\s5
\p
\v 4 मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुति करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
\v 5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.
\v 6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत.
\s दाविदाचे आभारप्रदर्शक स्तोत्र
\r स्तोत्र. 96:1-13; 105:1-15; 106:1,47,48
\s5
\p
\v 7 तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.
\q
\v 8 परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा.
\q राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.
\q
\v 9 त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा.
\q त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
\s5
\q
\v 10 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.
\q जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.
\q
\v 11 परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा.
\q निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.
\s5
\q
\v 12 त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा.
\q त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
\q
\v 13 त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो,
\q त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,
\q
\v 14 तो परमेश्वर, आमचा देव आहे.
\q त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
\s5
\q
\v 15 त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा.
\q त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.
\q
\v 16 त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.
\q आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.
\q
\v 17 याकोबासाठी त्याने तोच नियम केला.
\q आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला.
\q
\v 18 तो म्हणाला, “मी तुला कनान देश
\q तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.”
\s5
\q
\v 19 मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,
\q फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.
\q
\v 20 तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता.
\q एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.
\q
\v 21 पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही.
\q त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली.
\q
\v 22 तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका.
\q माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
\s5
\q
\v 23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा.
\q त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा.
\q
\v 24 त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा
\q सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहिर सांगा.
\s5
\q
\v 25 परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे.
\q आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.
\q
\v 26 कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत.
\q पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
\q
\v 27 महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत.
\q सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत.
\s5
\q
\v 28 अहो लोकांच्या कुळांनो
\q परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
\q
\v 29 परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या.
\q त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.
\q पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
\s5
\q
\v 30 त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो
\q पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.
\q
\v 31 पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदीत होवो;
\q राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”
\s5
\q
\v 32 समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो
\q शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.
\q
\v 33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील
\q कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
\s5
\q
\v 34 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.
\q कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
\q
\v 35 आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.
\q आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.
\q आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी
\q आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”
\s5
\q
\v 36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो.
\m सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
\s कोशाच्या तैनातीसाठी लेवी लोकांची नेमणूक
\s5
\p
\v 37 मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.
\v 38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.
\v 39 सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले.
\s5
\p
\v 40 ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.
\v 41 आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांहि, परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
\s5
\p
\v 42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.
\v 43 नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.
\s5
\c 17
\s दाविदाशी परमेश्वराचा करार
\r 2 शमु. 7:1-29
\p
\v 1 आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.”
\v 2 तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.”
\s5
\p
\v 3 पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले,
\v 4 “जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही.
\v 5 कारण मी इस्राएलांस वर आणले त्यादिवसापासून आजपर्यंत मी मंदिरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच राहत आलो आहे.
\v 6 सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’”
\s5
\p
\v 7 “तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे” की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले.
\v 8 आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.
\s5
\p
\v 9 माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थीर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.
\v 10 मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.
\s5
\p
\v 11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.
\v 12 तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन.
\s5
\p
\v 13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही.
\v 14 मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन.
\v 15 नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.
\s5
\p
\v 16 नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?”
\v 17 आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत.
\v 18 तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.
\s5
\p
\v 19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.
\v 20 हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.
\v 21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.
\s5
\p
\v 22 तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
\v 23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर.
\v 24 तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.
\s5
\p
\v 25 कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.
\v 26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे.
\v 27 तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.
\s5
\c 18
\s दावीद आपले साम्राज्य वाढवतो
\r 2 शमु. 8:1-14
\p
\v 1 यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
\v 2 मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
\s5
\p
\v 3 मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
\v 4 दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
\s5
\p
\v 5 जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले.
\v 6 नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
\s5
\p
\v 7 हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरुशलेमेला आणल्या.
\v 8 हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
\s5
\p
\v 9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
\v 10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
\v 11 जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
\s5
\p
\v 12 सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.
\v 13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
\s दाविदाचे अंमलदार
\r 2 शमु. 8:15-18
\s5
\p
\v 14 दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
\v 15 सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
\v 16 अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
\v 17 यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार
\f + याजक
\f* होते.
\s5
\c 19
\s अम्मोनी व अरामी लोकांचा पराभव
\r 2 शमु. 10:1-19
\p
\v 1 आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला.
\v 2 दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले.
\v 3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले की, “दावीदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांस तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
\s5
\p
\v 4 हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.
\v 5 मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.
\s5
\p
\v 6 जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार
\f + साधारण 34000 किलोग्राम
\f* रुपे पाठवले.
\v 7 अम्मोन्यांनी बत्तीस हजार रथ व माकाच्या राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले; तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन लढायला आले.
\s5
\p
\v 8 दावीदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले.
\v 9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.
\s5
\p
\v 10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्यामागे व एक पुढे आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुध्द त्यांची व्यवस्थित मांडणी केली.
\v 11 उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली.
\s5
\v 12 यवाब म्हणाला, “अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन.
\v 13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.”
\s5
\p
\v 14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्राएलाच्या सैन्यापुढून पळाले.
\v 15 अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमेला परत आला.
\s5
\p
\v 16 आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांस बोलवून घेतले. शोफख हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता.
\v 17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.
\s5
\p
\v 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
\v 19 आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांस मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते.
\s5
\c 20
\s दावीद राब्बा नगर घेतो
\r 2 शमु. 11:1; 12:26-31
\p
\v 1 आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरुशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.
\s5
\p
\v 2 दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार
\f + साधारण 34 किलोग्राम
\f* होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.
\v 3 त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमेला परतले.
\s दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरूष
\r 2 शमु. 21:15-22
\s5
\p
\v 4 यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टि लोक त्यांना शरण आले.
\v 5 पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.
\s5
\p
\v 6 गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोहि रेफाईच्या वंशातला होता.
\v 7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले.
\v 8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.
\s5
\c 21
\s इस्त्राएल व यहूदी येथील शिरगणती
\r 2 शमु. 24:1-25
\p
\v 1 आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.
\v 2 दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”
\v 3 यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”
\s5
\p
\v 4 पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरुशलेमाला परत आला.
\v 5 मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
\s5
\p
\v 6 पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
\v 7 देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला.
\v 8 मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”
\s5
\p
\v 9 परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला,
\v 10 “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”
\s5
\p
\v 11 मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.
\v 12 तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”
\s5
\p
\v 13 मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.”
\v 14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले.
\v 15 यरुशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.
\s5
\v 16 दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरुशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.
\v 17 दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकांस या मरीने शिक्षा देऊ नको.”
\s5
\v 18 मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी.
\v 19 मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला.
\v 20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.
\s5
\v 21 आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
\v 22 मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.”
\s5
\p
\v 23 अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”
\v 24 तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.”
\s5
\p
\v 25 आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.
\v 26 दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
\v 27 मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
\s मंदिरासाठी जागा
\s5
\p
\v 28 त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले.
\v 29 कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती.
\v 30 पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.
\s5
\c 22
\s मंदिराच्या उभारणीची पूर्वतयारी
\p
\v 1 मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”
\p
\v 2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
\s5
\p
\v 3 दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,
\v 4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.
\v 5 दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.
\s5
\p
\v 6 मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली.
\v 7 दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती.
\v 8 पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
\s5
\p
\v 9 मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.
\v 10 तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यंत स्थापित करील.”
\s5
\p
\v 11 “आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध.
\v 12 जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.
\v 13 इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.
\s5
\p
\v 14 पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार
\f + साधारण 3400000 किलोग्राम
\f* सोने आणि दहा लक्ष किक्कार
\f + साधारण 34000000 किलोग्राम
\f* रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल.
\s5
\p
\v 15 तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत.
\v 16 जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
\s5
\p
\v 17 दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला,
\v 18 “तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हास शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.
\v 19 तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”
\s5
\c 23
\s लेवी आणि याजक ह्यांची कामे
\p
\v 1 आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले.
\v 2 त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले.
\v 3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
\s5
\p
\v 4 त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.
\v 5 चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.
\v 6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
\s5
\p
\v 7 गेर्षोन घराण्यात
\q लादान आणि शिमी हे दोघे होते.
\q
\v 8 लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
\q
\v 9 शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
\s5
\q
\v 10 शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
\q
\v 11 यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
\s5
\p
\v 12 कहाथाला चार पुत्र होते:
\q अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
\m
\v 13 अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
\v 14 मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
\s5
\q
\v 15 गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
\q
\v 16 शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
\q
\v 17 रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
\q
\v 18 शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
\s5
\q
\v 19 हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
\q
\v 20 उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
\s5
\q
\v 21 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
\q
\v 22 एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
\q
\v 23 मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.
\s5
\p
\v 24 हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
\v 25 दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
\v 26 तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”
\s5
\p
\v 27 लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली.
\v 28 अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
\v 29 मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
\s5
\p
\v 30 ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुति करायला उभे राहत.
\v 31 आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
\s5
\p
\v 32 ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.
\s5
\c 24
\p
\v 1 अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
\v 2 पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
\v 3 दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
\s5
\p
\v 4 इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
\v 5 दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
\s5
\p
\v 6 आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
\s5
\p
\v 7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
\v 8 तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
\v 9 पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
\v 10 सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
\s5
\p
\v 11 नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
\v 12 अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
\v 13 तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
\v 14 पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची,
\s5
\p
\v 15 सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
\v 16 एकुणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
\v 17 एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
\v 18 तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
\s5
\p
\v 19 परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
\s5
\p
\v 20 लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:
\q अम्रामच्या वंशातील शूबाएल;
\q शूबाएलचे वंशज: यहदाया.
\q
\v 21 रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
\q
\v 22 इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
\s5
\q
\v 23 हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
\q
\v 24 उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
\q
\v 25 मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
\s5
\q
\v 26 मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
\q
\v 27 मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
\q
\v 28 महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
\s5
\q
\v 29 कीशाचे वंशज: यरहमेल.
\q
\v 30 महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र.
\m हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
\v 31 राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.
\s5
\c 25
\s गायनवादन करणाऱ्यांचा गट
\p
\v 1 दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
\v 2 आसाफाच्या वंशातले:
\q जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
\m
\v 3 यदूथूनाचे वंशज:
\q गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
\s5
\p
\v 4 हेमानाचे वंशज:
\q बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
\v 5 हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
\s5
\p
\v 6 हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
\v 7 ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
\v 8 त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
\s5
\p
\v 9 तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत:
\q पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली;
\q दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
\q
\v 10 तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
\q
\v 11 चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
\q
\v 12 पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
\s5
\q
\v 13 सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 14 सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 15 यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 16 नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
\s5
\q
\v 17 दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 18 अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
\q
\v 19 बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 20 तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\s5
\q
\v 21 चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\q
\v 22 पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
\q
\v 23 सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 24 सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\s5
\q
\v 25 अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 26 एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
\q
\v 27 विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\q
\v 28 एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\s5
\q
\v 29 बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 30 तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 31 चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\s5
\c 26
\s द्वारपाळ आणि देखरेख करणारे
\p
\v 1 द्वारपालांचे गट:
\q हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.
\q
\v 2 मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
\v 3 एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
\s5
\q
\v 4 ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
\v 5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती.
\v 6 शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.
\s5
\q
\v 7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.
\v 8 हे सर्व ओबेद-अदोमाचे वंशज त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद-अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते.
\v 9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
\s5
\q
\v 10 मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते.
\v 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
\s5
\p
\v 12 यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
\v 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
\v 14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
\s5
\p
\v 15 ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.
\v 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.
\s5
\p
\v 17 पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या.
\v 18 पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.
\v 19 हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.
\s5
\p
\v 20 देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.
\v 21 लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.
\v 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.
\s5
\p
\v 23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
\v 24 मोशेचा पुत्र गेर्षोम, याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता.
\v 25 अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता.
\q रहब्याचा पुत्र यशया.
\q यशयाचा पुत्र योराम.
\q योरामाचा पुत्र जिख्री. आणि
\q जिख्रीचा पुत्र शलोमोथ.
\s5
\p
\v 26 दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.
\v 27 युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली.
\v 28 शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
\s5
\p
\v 29 इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.
\v 30 हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.
\s5
\p
\v 31 हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.
\v 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यासाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.
\s5
\c 27
\s राज्यातील अंमलदार
\p
\v 1 ही इस्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती.
\p
\v 2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.
\v 3 तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.
\s5
\p
\v 4 अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.
\v 5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.
\v 6 हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तिसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.
\s5
\v 7 चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\s5
\p
\v 10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\v 11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.
\v 12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबीयेजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते.
\s5
\p
\v 13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.
\v 15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\s5
\q
\v 16 इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर.
\q शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.
\q
\v 17 लेवी कमुवेलचा पुत्र हशब्या. अहरोन: सादोक.
\q
\v 18 यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार:
\q मीखाएलचा पुत्र अम्री.
\s5
\q
\v 19 जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली:
\q अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ.
\q
\v 20 एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेथ.
\q पश्चिम मनश्शेः पदायाचा पुत्र योएल.
\q
\v 21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो.
\q बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल.
\q
\v 22 दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख,
\s5
\p
\v 23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.
\v 24 सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.
\s5
\p
\v 25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.
\v 26 कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
\v 27 रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता.
\s5
\p
\v 28 गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
\v 29 आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
\s5
\v 30 ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथ गाढवांवर मुख्य होता.
\v 31 याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.
\s5
\p
\v 32 दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
\v 33 अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.
\v 34 अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.
\s5
\c 28
\s मंदिराच्या उभारणीचे काम दावीद शलमोनावर सोपवतो
\p
\v 1 दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरुशलेमेत एकत्र बोलावले.
\s5
\p
\v 2 नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
\v 3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.
\s5
\p
\v 4 इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
\v 5 देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
\s5
\p
\v 6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
\v 7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
\s5
\p
\v 8 तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
\s5
\p
\v 9 हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
\v 10 परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
\s5
\p
\v 11 दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
\v 12 त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा,
\s5
\p
\v 13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
\v 14 सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
\v 15 सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
\s5
\p
\v 16 आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
\v 17 शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
\s5
\p
\v 18 धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
\v 19 दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
\s5
\p
\v 20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
\v 21 देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”
\s5
\c 29
\p
\v 1 राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.
\v 2 माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे.
\s5
\p
\v 3 आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे.
\v 4 तीन हजार किक्कार
\f + साधारण 102000 किलोग्राम
\f* ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार
\f + साधारण 238000 किलोग्राम
\f* निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत.
\v 5 कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
\s5
\p
\v 6 तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.
\v 7 देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार
\f + साधारण 170000 किलोग्राम
\f* सोने, दहा हजार किक्कार
\f + साधारण 340000 किलोग्राम
\f* रुपे, अठरा हजार किक्कार
\f + साधारण 612000 किलोग्राम
\f* पितळ, आणि एक लाख किक्कार
\f + साधारण 3400000 किलोग्राम
\f* लोखंड दिले.
\s5
\v 8 ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली.
\v 9 या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही महा आनंदीत झाला.
\s दावीद परमेश्वराचा धन्यावाद करतो
\s5
\p
\v 10 त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”
\v 11 हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.
\s5
\p
\v 12 संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
\v 13 देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुति करतो.
\s5
\p
\v 14 या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत.
\v 15 आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही.
\s5
\p
\v 16 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.
\v 17 हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.
\s5
\p
\v 18 हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर.
\v 19 माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.
\s दावीदानंतर शलमोन गादीवर येतो
\s5
\p
\v 20 तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.
\v 21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.
\s5
\p
\v 22 मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.
\v 23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
\s5
\p
\v 24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले.
\v 25 परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले.
\s5
\p
\v 26 इशायाचा पुत्र दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.
\v 27 दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहतीस वर्षांची होती.
\v 28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला.
\s5
\p
\v 29 राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात लिहिलेला आहे.
\v 30 त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकिकत या ग्रंथांमध्ये आहे.