mr_ulb/11-1KI.usfm

1388 lines
328 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 1KI 1KI-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h 1 राजे
\toc1 1 राजे
\toc2 1 राजे
\toc3 1ki
\mt1 1 राजे
\mt2 The First Book of the
\is लेखक
\ip कोणीही 1 राजांच्या लेखकांना ओळखत नाही, काही टीका कारांनी संभाव्य लेखक म्हणून एज्रा, यहेज्केल आणि यिर्मया यांना सुचविले आहे. कारण संपूर्ण कार्यामध्ये चारशेपेक्षा अधिक वर्षांमधील कालावधींचा समावेश होतो, कारण अनेक स्त्रोत सामग्रीचा वापर नोंदी तयार करण्यासाठी केला जात असे. साहित्यिक शैली, पुस्तके इत्यादीसारख्या काही सुचना, आणि एकाधिक संकलक किंवा लेखकांऐवजी एकच संकलक किंवा लेखकांकडे सामग्रीचा वापर केलेला भाग.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 590-538
\ip हे पहिले मंदिर उभे असताना लिहिले होते (1 राजे 8:8)
\is प्राप्तकर्ता
\ip इस्त्राएलाचे लोक, पवित्र शास्त्राचे सर्व वाचक.
\is हेतू
\ip हे पुस्तक 1 आणि 2 शमुवेल यांच्या मागोमाग येणाऱ्या भागावर आहे आणि दाविदाच्या मृत्यूनंतर शलमोनची स्थापना झाल्यानंतर त्याचे राज्य सुरू होते. कथा एक संयुक्त राज्यापासून आरंभ होते, परंतु एका राज्यामध्ये दोन राष्ट्रामध्ये विभागलेला असतो ज्याला यहूदा आणि इस्राएल म्हणून ओळखले जाते. 1 आणि 2 राजे हिब्रू पवित्र शास्त्रामध्ये एका पुस्तकात एकत्रित केले आहेत.
\is विषय
\ip फाटाफूट (ऐक्यभंग)
\iot रूपरेषा
\io1 1. शलमोनाचे राज्य (1:1-11:43)
\io1 2. राज्याचे विभाजन (अध्याय 12-16)
\io1 3. एलीया आणि अहाब (अध्याय 17-22)
\s5
\c 1
\s अबीशग दावीदाची शुश्रूषा करते
\p
\v 1 आता राजा दावीद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना.
\v 2 म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, “आपण आपल्या प्रभूराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभूराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”
\s5
\v 3 आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
\v 4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
\s अदोनीया गादी हिरावून घेतो
\s5
\p
\v 5 तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.
\v 6 “तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.
\s5
\v 7 सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.
\v 8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही.
\s5
\v 9 एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.
\v 10 पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.
\s5
\v 11 तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, “हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय?”
\v 12 तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.
\s5
\v 13 तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?
\v 14 “तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.”
\s5
\v 15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.
\v 16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”
\v 17 ती त्यास म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात.
\s5
\v 18 तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?
\v 19 त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
\s5
\v 20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
\v 21 नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
\s5
\v 22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच, नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.
\v 23 राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.
\s5
\v 24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय?”
\v 25 कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.
\s5
\v 26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.
\v 27 माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव.
\s शलमोनाचा राज्याभिषेक
\r 1इति. 29:22-25
\s5
\p
\v 28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहीली.
\v 29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.
\v 30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.”
\v 31 बथशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, “माझे स्वामीराज दावीद चिरायु होवो.”
\s5
\v 32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
\v 33 राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.
\v 34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.”
\s5
\v 35 मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.
\v 36 यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो.
\v 37 महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”
\s5
\v 38 सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
\v 39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
\v 40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
\s5
\v 41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
\v 42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्यास म्हणाला, “ये तू भला मनुष्य आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
\s5
\v 43 पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दावीद याने शलमोनाला राजा केले आहे.”
\v 44 दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.
\v 45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.
\s5
\v 46 शलमोन आता राज्याचा राजासनावर बसला आहे.
\v 47 राजाचा सेवकवर्ग स्वामी दावीद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.
\v 48 आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”
\s5
\v 49 हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.
\v 50 अदोनीया शलमोनाला घाबरला, व जावून तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला.
\v 51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”
\s5
\v 52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसासही इजा होणार नाही. पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल.”
\v 53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.”
\s5
\c 2
\s शलमोनाला दाविदाने दिलेली ताकीद
\p
\v 1 दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,
\v 2 “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.
\v 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.
\v 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.
\s5
\v 5 सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.
\v 6 तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको.
\s5
\v 7 गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
\s5
\v 8 गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.
\v 9 पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”
\s दाविदाचा मृत्यू
\r 1इति. 3:4; 29:26-28
\s5
\p
\v 10 मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.
\v 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
\v 12 आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
\s शलमोन आपल्या राज्याला बळकटी आणतो
\s5
\p
\v 13 यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्यास विचारले, “तू शांतीने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”
\v 14 “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
\v 15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हास हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
\s5
\v 16 आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
\v 17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
\v 18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
\s5
\v 19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
\v 20 नंतर बथशेबा त्यास म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
\v 21 ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
\s5
\v 22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”
\v 23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधीक माझे करो.
\s5
\v 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
\v 25 राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
\s5
\v 26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
\v 27 शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
\s5
\v 28 ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभित झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.
\v 29 “कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
\s5
\v 30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.
\v 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
\s5
\v 32 त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडिल दावीद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन मनुष्यांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.
\v 33 त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
\s5
\v 34 तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.
\v 35 यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.
\s5
\v 36 मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्यास सांगितले, “इथे यरुशलेमामध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
\v 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”
\v 38 तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील,” मग शिमी यरुशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.
\s5
\v 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.”
\v 40 तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
\s5
\v 41 शिमी यरुशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.
\v 42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्यास म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला परमेश्वराची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्यास कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.
\s5
\v 43 परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?”
\v 44 मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.
\s5
\v 45 पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”
\v 46 मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.
\s5
\c 3
\s फारोच्या मुलीशी शलमोनाचा विवाह
\r 2इति. 1:2-13
\p
\v 1 मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमासभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.
\v 2 परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
\s आपणाला विवेकबुध्दी मिळावी अशी शलमोनाची प्रार्थना
\p
\v 3 राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
\s5
\v 4 राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
\v 5 शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
\s5
\v 6 तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.
\s5
\v 7 माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही.
\v 8 तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत.
\v 9 म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”
\s5
\v 10 शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला
\v 11 म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.
\v 12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही.
\s5
\v 13 आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही.
\v 14 जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
\s5
\v 15 शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
\s शलमोनाने केलेला यथार्थ न्याय
\s5
\p
\v 16 नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
\v 17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.
\s5
\v 18 तीन दिवसानंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो.
\v 19 एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मरण पावले.
\v 20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.
\s5
\v 21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
\v 22 पण तेवढ्यात ती दुसरी स्त्री म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मरण पावलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मरण पावले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
\s5
\v 23 तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जीवंत जो माझा मुलगा.”
\v 24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
\v 25 नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.”
\s5
\v 26 पण पहिल्या स्त्रीला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “हे माझ्या स्वामी नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.” दुसरी स्त्री म्हणाली, “बाळाचे दोन तुकडे करा.” म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.
\v 27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्यास पहिल्या स्त्रीच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”
\v 28 राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
\s5
\c 4
\s शलमोनाचे सरदार व अधिकारी
\p
\v 1 राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता.
\v 2 त्यास शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता.
\v 3 शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता.
\v 4 बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते
\s5
\v 5 नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
\v 6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
\s5
\v 7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई.
\v 8 त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
\v 9 माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
\v 10 अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता.
\s5
\v 11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी.
\v 12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता.
\v 13 रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती.
\v 14 इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
\s5
\v 15 नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.)
\v 16 हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
\v 17 पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता.
\s5
\v 18 एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
\v 19 उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
\s शलमोनाचे ज्ञान आणि त्याची समृध्दी
\s5
\p
\v 20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती.
\v 21 नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
\v 22 शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ,
\v 23 दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
\s5
\v 24 महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जीतके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती.
\v 25 शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
\s5
\v 26 रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते.
\v 27 शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
\v 28 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
\s5
\v 29 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले.
\v 30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
\v 31 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते.
\s5
\v 32 आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
\v 33 निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
\v 34 देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
\s5
\c 5
\s हिराम राजाबरोबर शलमोनाचा करार
\r 2इति. 2:1-18
\p
\v 1 हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याने आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले कारण त्याने ऐकले होते की, शलमोनाचा अभिषेक होऊन त्याच्या वडिलांच्या जागेवर राजा झाला आहे, त्याचे दाविदाशी सख्य होते.
\v 2 शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
\v 3 “तुम्हास माहित आहे माझे वडिल दावीद सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंना पायदळी तुडवीपर्यंत ते थांबले होते.
\s5
\v 4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू किंवा अरिष्ट राहीले नाही.
\v 5 परमेश्वराने माझे वडिल दाविदाला वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बाधण्याची माझी योजना आहे.
\s5
\v 6 तर आता माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. तुम्हास माहित आहे की आमचे लोक तुमच्या सीदोनी लोकांइतके कुशल नाहीत.”
\s5
\v 7 हिरामाला शलमोनाचे शब्द ऐकूण फार आनंद झाला व तो म्हणाला, “दाविदाला एवढा ज्ञानी पुत्र या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.”
\v 8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या ईच्छेप्रमाणे देईन.
\s5
\v 9 माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.”
\s5
\v 10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची लाकडे पुरवली.
\v 11 शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी वीस हजार कोर गहू आणि वीस कोर शुद्ध तेल दिले.
\v 12 परमेश्वराने शलमोनाला कबूल केल्याप्रमाणे, त्याने त्यास शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
\s5
\v 13 शलमोन राजाने सर्व इस्राएल लोंकावर वेठबिगार बसवला यासाठी तीस हजार माणसे नेमली.
\v 14 अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
\s5
\v 15 ऐंशी हजार लोकांस शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.
\v 16 शलमोनाच्या कामावरील मुख्य अमलदाराखेरीज आणखी तीन हजार तीनशे अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते.
\s5
\v 17 त्यांना शलमोन राजाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कापायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.
\v 18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबली येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.
\s5
\c 6
\s शलमोन परमेश्वरासाठी निवासस्थान बांधतो
\r 2इति. 3:1-14
\p
\v 1 अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जिव महिना जो दुसरा महिना होता त्यामध्ये तो परमेश्वराचे मंदिर बांधू लगला.
\v 2 शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.
\s5
\v 3 मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती.
\v 4 मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
\s5
\v 5 मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले.
\v 6 सर्वात खालच्या मजल्याची रूंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या बाहेरच्या भिंतीस तोडे ठेवले होते, ते अशासाठी की, मंदीराच्या भिंतीत तुळ्या शिरू नयेत.
\s5
\v 7 भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले खाणीतूनच ते योग्य मापाने कापून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना हातोड्या, कुऱ्हाडी किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
\v 8 तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
\s5
\v 9 शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
\v 10 मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
\s5
\v 11 परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,
\v 12 “माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
\v 13 मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
\s5
\v 14 शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
\v 15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
\s5
\v 16 मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
\v 17 मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
\v 18 हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
\s5
\v 19 आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
\v 20 याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.
\s5
\v 21 शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
\v 22 परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले.
\s5
\v 23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
\v 24 करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासुन दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
\v 25 दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते.
\v 26 आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करूबाचीही तेवढीच होती.
\s5
\v 27 हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
\v 28 हे करुब सोन्याने मढवले होते.
\s5
\v 29 दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
\v 30 दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.
\s5
\v 31 शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
\v 32 जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
\s5
\v 33 त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता;
\v 34 त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या.
\v 35 त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती.
\s5
\v 36 मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
\s5
\v 37 वर्षाचा चौथा महिना जिव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला.
\v 38 अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.
\s5
\c 7
\s शलमोनाच्या इतर इमारती
\p
\v 1 शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.
\v 2 त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.
\s5
\v 3 त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
\v 4 तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
\v 5 दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
\s5
\v 6 शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती.
\s5
\v 7 मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
\s5
\v 8 याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
\s5
\v 9 या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
\v 10 पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती.
\s5
\v 11 त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
\v 12 महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.
\s मंदिराच्या कामात हीरामाने केलेले सहकार्य
\s5
\p
\v 13 राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरुशलेम येथे बोलावून घेतले.
\v 14 हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
\s5
\v 15 हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे.
\v 16 शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती.
\v 17 या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात.
\s5
\v 18 याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या.
\v 19 जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
\s5
\v 20 हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती.
\v 21 हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले.
\v 22 कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.
\s5
\v 23 मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे.
\v 24 या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या.
\s5
\v 25 बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती.
\v 26 हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ
\f + साधारण 40000 लिटर
\f* पाणी मावत असे.
\s5
\v 27 मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होते.
\v 28 चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते.
\v 29 पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
\s5
\v 30 प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते.
\v 31 कळसाच्या आतल्या बाजूपासुन वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या.
\s5
\v 32 चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.
\v 33 रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते.
\s5
\v 34 प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
\v 35 प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या.
\s5
\v 36 चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
\v 37 हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते.
\s5
\v 38 हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ
\f + साधारण 800 लिटर
\f* पाणी मावू शकत असे.
\v 39 त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या.
\s5
\v 40 याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या
\v 41 त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या
\s5
\v 42 या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.
\v 43 दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
\s5
\v 44 एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल;
\v 45 याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.
\s5
\v 46 सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.
\v 47 या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते शलमोन राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही.
\s5
\v 48 शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी)
\v 49 शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.
\s5
\v 50 पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या.
\s5
\v 51 परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत:च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दावीद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
\s5
\c 8
\s शलमोन मंदिरात कोश आणतो
\r 2इति. 5:2-6:2
\p
\v 1 इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.
\v 2 तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी शलमोन राजासमोर एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा सनाचा माहिना चालू होता.
\s5
\v 3 इस्राएलची सर्व वडिलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला.
\v 4 त्याबरोबरच दर्शनमंडप, परमेश्वराचा कोश, तेथील सर्व पवित्र पात्रे लेवींनी व याजकांनी वरती वाहून नेली.
\v 5 राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक कराराच्या कोशासमोर आले. तेथे त्यांनी अनेक बली अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते.
\s5
\v 6 मग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
\v 7 करुबांचे पंख पवित्र कराराच्या कोशावर पसरलेले होते. कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते.
\v 8 हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.
\s5
\v 9 कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
\v 10 परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
\v 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले, व मेघामुळे याजकांना उभे राहता येईना.
\s5
\p
\v 12 तेव्हा शलमोन म्हणाला,
\q “परमेश्वर म्हणाला आहे की,
\q मी निबीड अंधारात वस्ती करीन.
\s मंदिराचे समर्पण
\q
\v 13 परंतु तुला युगानुयूग राहण्यासाठी,
\q हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
\s5
\p
\v 14 इस्राएल लोकांकडे वळून राजाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहीली.
\v 15 तो म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो! माझे वडिल दावीद यांना म्हटल्याप्रमाणे त्याने स्वत:च्या हाताने ते पूर्ण केले परमेश्वर माझ्या वडिलांना म्हणाला,
\v 16 माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणून अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे, आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दाविदाची निवड केली आहे.”
\s5
\v 17 इस्राएलाच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे, माझे वडिल दावीद यांच्या फार मनात होते.
\v 18 पण परमेश्वर माझे वडिल दावीद यांना म्हणाला, “माझ्या नामासाठी मंदिर उभारण्याची तुझ्या मनातील इच्छा मी जाणून आहे, अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.
\v 19 पण तुझ्या हस्ते हे मंदिराचे काम होणार नाही, तर तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो माझ्या नामासाठी हे मंदिर बांधील.
\s5
\v 20 परमेश्वर जे वचन बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. आता माझे वडिल दावीद याच्या गादीवर मी आलो आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.
\v 21 त्यामध्ये पवित्र कराराच्या कोशासाठी एक जागा करवून घेतली आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा केलेला तो करार यामध्ये आहे.”
\s5
\p
\v 22 शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले,
\v 23 तो म्हणाला, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुजसमान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास, कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस, जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
\v 24 माझे वडिल दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस, आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे; अशी आज वस्तुस्थिती आहे.
\s5
\v 25 माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील.
\v 26 परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
\s5
\v 27 पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल!
\v 28 पण कृपाकरून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
\s5
\p
\v 29 माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.
\v 30 परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर.
\s5
\v 31 जर एखादया व्यक्तिने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली.
\v 32 तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर.
\s5
\v 33 जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरूद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील;
\v 34 तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण.
\s5
\v 35 त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील,
\v 36 तेव्हा स्वर्गातून इस्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे.
\s5
\v 37 कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील.
\v 38 असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील.
\s5
\v 39 तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
\v 40 आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर.
\s5
\v 41 इस्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला,
\v 42 कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली,
\v 43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांस कळेल.
\s5
\v 44 परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकांस शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील.
\v 45 तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर.
\s5
\v 46 जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.
\v 47 तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील.
\s5
\v 48 बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
\s5
\v 49 तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यांस न्याय दे.
\v 50 त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्याविरुध्द पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूसमोर त्यांच्या वर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील,
\s5
\v 51 ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत.
\v 52 “तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरून ऐक, ते तुझा धावा करतील त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.
\v 53 प्रभू परमेश्वरा, पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस. त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.”
\s5
\v 54 शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरास करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला.
\v 55 मग त्याने इस्राएल लोकांस उभे राहून उंच आवाजात आशीर्वाद दिला, तो म्हणाला.
\v 56 “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांस विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत वचने दिली होती. त्यापैकी एकही शब्द वाया गेला नाही.
\s5
\v 57 आपल्या पूर्वजांना आपला देव परमेश्वर याने जशी साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हास कधी सोडू नये व कधी त्यागू नये.
\v 58 आम्ही त्यास अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.
\s5
\v 59 आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यामध्ये खंड पडू देऊ नये.
\v 60 परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांस कळेल त्याच्याशिवाय दुसरा देव नाही.
\v 61 तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”
\s5
\v 62 मग राजासहीत सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले.
\v 63 शलमोनाने बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे बली अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वरास अर्पण केले.
\s5
\v 64 मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्यादिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.
\s5
\v 65 शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
\v 66 नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराचा सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.
\s5
\c 9
\s शलमोनाला परमेश्वराचे दुसरे दर्शनी
\r 2 इति. 7:12-22
\p
\v 1 शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले, व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले.
\v 2 यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्यास दर्शन दिले.
\s5
\v 3 परमेश्वर त्यास म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील.
\s5
\v 4 तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास,
\v 5 तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही.
\s5
\v 6 पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात,
\v 7 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन.
\s5
\v 8 हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?
\v 9 यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.”
\s शलमोनाची इतर कामगिरी
\s5
\p
\v 10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
\v 11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
\s5
\v 12 शलमोनाने हिराम सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्यास ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
\v 13 राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
\v 14 हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार
\f + साधारण 4800 किलोग्राम
\f* सोने पाठवले होते.
\s5
\v 15 शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमासभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
\v 16 मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांस त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
\s5
\v 17 शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले.
\v 18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे बांधली,
\v 19 शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते ते बांधले.
\s5
\v 20 इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
\v 21 इस्राएल लोकांस त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
\s5
\v 22 इस्राएल लोकांस मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
\s5
\v 23 शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
\s5
\v 24 फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
\s5
\v 25 शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांत्यर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळीत असे. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
\s5
\v 26 एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
\v 27 समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले.
\v 28 शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून चारशे वीस किक्कार
\f + साधारण 14280 किलोग्राम
\f* सोने शलमोन राजाकडे आणले.
\s5
\c 10
\s शबाची राणी शलमोनाला भेटण्यास येते
\r 2इति. 9:1-28
\p
\v 1 परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.
\v 2 नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले.
\s5
\v 3 शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही.
\v 4 शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले.
\v 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली.
\s5
\v 6 ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे.
\v 7 पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे.
\s5
\v 8 तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य.
\v 9 परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”
\s5
\v 10 मग शबाच्या राणीने राजाला एकशे वीस किक्कार
\f + साधारण 4080 किलोग्राम
\f* सोने, नजर केले. शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्राएलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
\s5
\v 11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली.
\v 12 शलमोन राजाने या लाकडाचा वापर परमेश्वराच्या मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलामध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
\s5
\v 13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला, जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
\s शलमोनाचे वैभव आणि त्याची कीर्ती
\s5
\p
\v 14 शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार
\f + साधारण 22644 किलोग्राम
\f* सोने मिळत राहिले.
\v 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
\s5
\v 16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.
\v 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या.
\s5
\v 18 शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते.
\v 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते.
\v 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते.
\s5
\v 21 राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
\v 22 समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
\s5
\v 23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते.
\v 24 पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे.
\v 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
\s शलमोनाने केलेला घोडा व रथ ह्यांचा व्यापार
\s5
\p
\v 26 शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरुशलेमेमध्येही होते.
\v 27 राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
\s5
\v 28 मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत.
\v 29 मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
\s5
\c 11
\s शलमोनाने परमेश्वराशी केलेली फितुरी व त्याचे वैरी
\p
\v 1 राजा शलमोनाचे अनेक विदेशी स्त्रिंयावर प्रेम जडले होते. फारोच्या मुलीखेरीज, हित्ती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
\v 2 परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांस सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हास त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
\s5
\v 3 त्यास सातशे स्त्रिया होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्यास आणखी तीनशे दासीही होत्या. या बायकांनी त्यास देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
\v 4 तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्यास इतर दैवतांकडे वळवले. आपले वडिल दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
\s5
\v 5 सीदोनी लोकांच्या अष्टारोथ देवाची शलमोनाने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही शलमोनाने भजले.
\v 6 अशाप्रकारे शलमोनाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. आपले वडिल दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वरास पूर्णपणे अनुसरला नाही.
\s5
\v 7 कमोश या मवाबी लोकांच्या अमंगळ दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या अमंगळ दैवतासाठीही एक उंच स्थान बांधले.
\v 8 आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच पूजास्थळे बांधली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
\s5
\v 9 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
\v 10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
\s5
\v 11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्याकडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या सेवकाला मी ते देईन.
\v 12 पण तुझे वडिल दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा पुत्र गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
\v 13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दाविदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमेसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
\s5
\v 14 आणि मग परमेश्वराने अदोमी हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमाच्या राजघराण्यातला होता.
\v 15 त्याचे असे झाले दाविदाने पूर्वी अदोमाचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दाविदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. तेव्हा त्याने अदोमातील सर्वांची कत्तल केली होती.
\v 16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोम येथे सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोम येथे कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
\v 17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडिलांचे काही अदोमी सेवकही त्याच्याबरोबर गेले.
\s5
\v 18 मिद्यानाहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हे सगळे लोक मिळून मिसरला गेले. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.
\v 19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. त्याची राणी तहपनेस हिची ती बहीण होती.
\s5
\v 20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा पुत्र झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलांबरोबरच वाढला.
\v 21 दाविदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्यास कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
\v 22 तेव्हा फारो त्यास म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्वकाही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?” तेव्हा “हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.”
\s5
\v 23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा पुत्र. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
\v 24 दाविदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर, रजोनाने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला.
\v 25 अरामावर रजोनाने राज्य केले. इस्राएलाबद्दल त्यास चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलाला बराच त्रास दिला.
\s5
\v 26 नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
\v 27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीद राजाच्या नगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करून घेत होता.
\s5
\v 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्यास योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
\v 29 एकदा यराबाम यरुशलेमेच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्यास शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखी कोणी नव्हते.
\v 30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
\s5
\v 31 मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
\v 32 आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.
\v 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मवाबाचा कमोश, अम्मोन्याचा मिलकोम या परकीय दैवतांचे तो भजन पूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडिल दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
\s5
\v 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर अधिपती राहील. माझा सेवक दावीद याच्याखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दाविदाने पाळल्या म्हणून मी त्यास निवडले.
\v 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
\v 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेमामध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.
\s5
\v 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
\v 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
\v 39 यामुळे मी दाविदाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”
\s5
\v 40 शलमोनाने यराबामाच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामाने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
\s शलमोनाचा मृत्यू
\r 2इति. 9:29-31
\s5
\p
\v 41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या नाहीत काय?
\v 42 यरुशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले
\v 43 मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.
\s5
\c 12
\s इस्त्राएलाचे बंड
\r 2इति. 10:1-19; 11:1-4
\p
\v 1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
\v 2 शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता, त्याने हे ऐकले,
\s5
\v 3 लोकांनी त्यास बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले,
\v 4 “तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
\v 5 रहबाम म्हणाला, “तीन दिवसानंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
\s5
\v 6 शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांस मी काय सांगू?”
\v 7 यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
\s5
\v 8 पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
\v 9 रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांस कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
\s5
\v 10 तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा. तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे.
\v 11 माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”
\s5
\v 12 रहबाम राजाने त्या लोकांस “तीन दिवसानी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.
\v 13 त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
\v 14 मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
\s5
\v 15 या प्रकारे राजाने इस्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
\s5
\v 16 नवा राजा आपले म्हणणे मानत नाही, हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा, या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे.” एवढे बोलून ते निघून गेले.
\v 17 तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच.
\s5
\v 18 अदोराम नावाचा एक मनुष्य सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्यास लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला.
\v 19 इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
\s5
\v 20 यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांस कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्यास सर्व इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
\s5
\v 21 रहबाम यरुशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.
\s5
\v 22 शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
\v 23 “शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
\v 24 इस्राएलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे.” प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले.
\s यराबाम इस्त्राएलास पापात पाडतो
\s5
\p
\v 25 शखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.
\v 26 यराबाम मनाशीच म्हणाला, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
\v 27 लोक यरुशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”
\s5
\v 28 त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांस म्हणाला, तुम्हास यरुशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्राएला तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
\v 29 राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
\v 30 पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
\s5
\v 31 उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
\v 32 याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले.
\s5
\v 33 अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
\s5
\c 13
\s यहूदा येथील संदेष्टा यराबामाला ताकीद देतो
\p
\v 1 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या मनुष्यास) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
\v 2 परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
\v 3 हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांस खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
\s5
\v 4 राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना
\v 5 तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती.
\s5
\v 6 तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
\v 7 राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
\s5
\v 8 पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
\v 9 काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.”
\v 10 त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
\s5
\v 11 बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
\v 12 तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
\v 13 त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.
\s5
\v 14 हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्यास विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा मनुष्य?” संदेष्ट्याने यावर होकार दिला.
\v 15 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
\v 16 पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.
\v 17 तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
\s5
\v 18 यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
\v 19 तेव्हा तो देवाचा मनुष्य वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
\s5
\v 20 ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.
\v 21 वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
\v 22 येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
\s5
\v 23 या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा मनुष्य) निघाला.
\v 24 परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारुन टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
\v 25 इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
\s5
\v 26 वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.”
\v 27 मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
\v 28 तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
\s5
\v 29 वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
\v 30 त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
\s5
\v 31 मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या.
\v 32 परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
\s5
\v 33 राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो पुरोहित म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्यास पुरोहित बनता येई.
\v 34 या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
\s5
\c 14
\s अहीयाने यराबामाविरुध्द दिलेला संदेश
\p
\v 1 याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
\v 2 तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
\v 3 यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
\s5
\v 4 मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते.
\v 5 पण परमेश्वराने त्यास सूचना केली, “यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले. यराबामाची पत्नी अहीयाच्या घरी आली. लोकांस कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.”
\s5
\v 6 अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
\v 7 परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
\v 8 यापुर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.
\s5
\v 9 पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ति केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
\v 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.
\s5
\v 11 यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.
\v 12 अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.
\v 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.
\s5
\v 14 परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लवकरच घडेल.
\v 15 मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांस उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्यास संताप आला.
\v 16 आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांस पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
\s5
\v 17 यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.
\v 18 सर्व इस्राएल लोकांस त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
\s5
\v 19 राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
\v 20 यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.
\s रहाबामाची कारकीर्द
\r 2 इति. 11:5-12:16
\s5
\p
\v 21 शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरुशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती.
\v 22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
\s5
\v 23 या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या.
\v 24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापुर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता.
\s5
\v 25 रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमेवर स्वारी केली.
\v 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरुशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या.
\s5
\v 27 मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
\v 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
\s5
\v 29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
\v 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
\v 31 रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.
\s5
\c 15
\s अबीयामाची कारकीर्द
\r 2 इति. 13:1-14:1
\p
\v 1 नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, रहबामाचा पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
\v 2 अबीयाने तीन वर्षे यरुशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
\v 3 आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
\s5
\v 4 दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरुशलेम सुरक्षित ठेवले.
\v 5 दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
\v 6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
\s5
\v 7 अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
\v 8 अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
\s आसाची कारकीर्द
\r 2 इति. 14:1-16:14
\s5
\p
\v 9 यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
\v 10 आसाने यरुशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
\v 11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
\s5
\v 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ति पूर्णपणे हलवल्या.
\v 13 आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ति या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
\s5
\v 14 त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
\v 15 आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
\s बेन-हदादाबरोबर आसाने केलेला सलोखा
\s5
\p
\v 16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
\v 17 इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
\s5
\v 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
\v 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
\s5
\v 20 राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.
\v 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
\v 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
\s5
\v 23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
\v 24 आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
\s नादाबाची कारकीर्द
\s5
\p
\v 25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
\v 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.
\s5
\v 27 बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
\v 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
\s5
\v 29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
\v 30 राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
\s5
\v 31 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
\v 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
\s बाशाची कारकीर्द
\s5
\p
\v 33 यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
\v 34 पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली होती.
\s5
\c 16
\p
\v 1 यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
\v 2 “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
\s5
\v 3 तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
\v 4 बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
\s5
\v 5 इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.
\v 6 बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला.
\s5
\v 7 तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.
\s एलाची कारकीर्द
\s5
\p
\v 8 यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.
\v 9 जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
\v 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला.
\s5
\v 11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
\v 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला
\v 13 बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ति केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
\s5
\v 14 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
\s जिम्रीची कारकीर्द
\s5
\p
\v 15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
\v 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
\v 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
\s5
\v 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
\v 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
\v 20 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
\s जिम्रीची कारकीर्द
\s5
\p
\v 21 इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
\v 22 तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
\s5
\v 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
\v 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार
\f + साधारण 68 किलोग्राम
\f* रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
\s5
\v 25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
\v 26 नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
\s5
\v 27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
\v 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
\s अहाबाची कारकीर्द
\s5
\p
\v 29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
\v 30 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
\s5
\v 31 नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
\v 32 शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
\v 33 अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
\s5
\v 34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
\f + यहो. 6: 26 पाहा
\f*
\s5
\c 17
\s दुष्काळाविषयी एलीयाचे भविष्य
\p
\v 1 गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीवीताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
\s5
\v 2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
\v 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
\v 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
\s5
\v 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
\v 6 रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
\v 7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला.
\s एलीया आणि सारफथ येथील विधवा
\s5
\p
\v 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
\v 9 “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
\v 10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
\s5
\v 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
\v 12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
\v 13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
\s5
\v 14 इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
\v 15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
\v 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
\s5
\v 17 काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला.
\v 18 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
\s5
\v 19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले.
\v 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
\v 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
\s5
\v 22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला.
\v 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.”
\v 24 ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”
\s5
\c 18
\p
\v 1 तेव्हा पुष्कळ दिवसानी, तिसऱ्या वर्षी, एलीयाकडे परमेश्वराचे वचन आले, ते असे की, “जा, आणि अहाब राजाच्या नजरेत ये आणि मग मी भूमीवर पाऊस पाडणार.”
\v 2 तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.
\s5
\v 3 अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. पण ओबद्या परमेश्वराचा फार मान राखत असे.
\v 4 जेव्हा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्नपाण्याचीहि तरतूद केली.
\s5
\v 5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”
\v 6 तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसांत वाटून घेतला, अहाब स्वत:हा एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला.
\s5
\v 7 आणि ओबद्या वाटेत असता, एलीया अनपेक्षीतपणे त्यास भेटला. तेव्हा ओबद्याने त्यास ओळखले व जमीनीवर उपडे पडून त्यास म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
\v 8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग.”
\s5
\v 9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस?
\v 10 परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझा स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही सापडला नाहीत, असे कळले, तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली.
\v 11 आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.
\s5
\v 12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.
\v 13 ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.
\s5
\v 14 आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे, मग तो मला जीवे मारील.”
\v 15 यावर एलीया त्यास म्हणाला, “सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जीवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन.”
\s5
\v 16 तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले, आणि अहाब एलीयाला भेटण्यासाठी निघाला.
\v 17 अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”
\s5
\v 18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.
\v 19 तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”
\s एलीया अहाबाकडे येतो
\s5
\p
\v 20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
\v 21 तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.
\s5
\v 22 मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत.
\v 23 तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही.
\v 24 तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.”
\s5
\p
\v 25 मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.”
\v 26 तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तीच्या भोवती ते नाचू लागले.
\s5
\p
\v 27 दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.”
\v 28 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले.
\v 29 दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
\s5
\v 30 मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.
\v 31 एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते.
\v 32 परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.
\s5
\v 33 एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.”
\v 34 मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले.
\v 35 वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
\s5
\v 36 दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
\v 37 हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
\s5
\v 38 तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले.
\v 39 सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
\v 40 एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
\s पावसासाठी एलीयाची प्रार्थना
\s5
\p
\v 41 एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”
\v 42 तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.
\s5
\v 43 आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्यास पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले.
\v 44 सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्यास रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाहीतर पावसामुळे त्यास थांबावे लागेल.”
\s5
\v 45 पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला.
\v 46 परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.
\s5
\c 19
\s एलीया होरेबास पळून जातो
\p
\v 1 अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
\v 2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”
\v 3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
\s5
\v 4 तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
\v 5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.”
\v 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
\s5
\v 7 आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”
\v 8 तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
\s5
\v 9 तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
\v 10 एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
\s5
\v 11 यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
\v 12 धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
\s5
\v 13 एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली.
\v 14 एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
\v 16 निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.
\s5
\v 17 हजाएल अनेक पापी मनुष्यांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्यास अलीशा मारील.
\v 18 एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
\s अलीशाला पाचारण
\s5
\p
\v 19 तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बैलाची बारा जोते चालवून शेतजमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा स्वत:हा बाराव्या जोतावर होता. एलीया अलीशाजवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला.
\v 20 अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
\s5
\v 21 अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांस जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाचा तो मदतनीस झाला.
\s5
\c 20
\s अहाब अराम्यांचा पराभव करतो
\p
\v 1 बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
\v 2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला
\v 3 संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या स्त्रिया आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी.”
\s5
\v 4 यावर इस्राएलाच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
\v 5 अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
\v 6 उद्याच मी माझ्या मनुष्यांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. त्यांच्या डोळ्यांना जे आवडेल ते स्वत:च्या हाताने घेतील. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
\s5
\v 7 तेव्हा इस्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडिलधाऱ्या मनुष्यांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मणुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी स्त्रिया पुत्रे मागितली. त्यास मी कबूल झालो. आणि आता त्यास सर्वच हवे आहे.”
\v 8 यावर ती वडिलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
\s5
\v 9 मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
\v 10 तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.”
\s5
\v 11 इस्राएलच्या राजाचे त्यास उत्तर गेले. त्यामध्ये म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये.”
\v 12 राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या मनुष्यांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. “त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.”
\s5
\v 13 तेव्हा इकडे एक संदेष्टा इस्राएलाचा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
\v 14 अहाबाने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
\v 15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
\s5
\v 16 राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबाने हल्ला चढवला.
\v 17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा “शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेन-हदादच्या मनुष्यांनी त्यास सांगितले.”
\s5
\v 18 तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
\v 19 राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
\s5
\v 20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेन-हदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
\v 21 इस्राएल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली.
\s5
\v 22 यानंतर तो संदेष्टा इस्राएल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, “अरामाचा राजा बेन-हदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आख.”
\s अरामाचा पुन्हा पराभव
\p
\v 23 अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
\s5
\v 24 आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
\v 25 जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
\s5
\v 26 वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांस एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
\v 27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
\s5
\v 28 एक देवाचा मनुष्य (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”
\s5
\v 29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.
\v 30 जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता.
\s5
\v 31 त्याचे सेवक त्यास म्हणाले, “इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.”
\v 32 त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.”
\s5
\v 33 बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जीवंत आहे” अहाब म्हणाल, “जा आणि त्यास आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
\v 34 बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले.
\s बेन-हदादाला सोडल्याबद्दल अहाबाला शिक्षा
\s5
\p
\v 35 त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
\v 36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्यास ठार मारले.
\s5
\v 37 मग हा पहिला संदेष्टा एका मनुष्याकडे गेला. त्यास त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या मनुष्याने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
\v 38 त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहत बसला.
\s5
\v 39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल
\f + साधारण 34 किलोग्राम
\f* चांदीचा दंड भरावा लागेल.
\v 40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो मनुष्य पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
\s5
\v 41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
\v 42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्यास तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
\v 43 यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चितांग्रस्त झाला होता.
\s5
\c 21
\s अहाब आणि नाबोथाचा मळा
\p
\v 1 नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता.
\v 2 एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”
\s5
\v 3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”
\v 4 तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हास देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले.
\s5
\v 5 अहाबाची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्यास म्हणाली, “तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही?”
\v 6 अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्यास सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
\v 7 ईजबेल त्यास म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
\s5
\v 8 ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
\v 9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.
\v 10 नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.”
\s5
\v 11 ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) मंडळींनी ही आज्ञा मानली.
\v 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांस सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले.
\v 13 मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.
\v 14 मग त्या प्रतिष्ठित मनुष्यांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.
\s5
\v 15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हास नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” जो तो पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता नाबोथ आता जीवंत नाही मेला आहे.
\v 16 यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.
\s5
\v 17 यावेळी परमेश्वर एलीया तिश्बीशी बोलला,
\v 18 “ऊठ शोमरोनमधल्या इस्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे.
\s5
\v 19 अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”
\v 20 तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.
\s5
\v 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना तो इस्राएलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो त्यास मी ठार करीन.
\v 22 नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहीयाचा पुत्र बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांसही पाप करायला लावलेस.”
\s5
\v 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, “तुझी पत्नी ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेलमध्ये कुत्री तुटून पडतील.
\v 24 अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल”
\s5
\v 25 अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी ईजबेल हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले.
\v 26 अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांस दिला.
\s5
\v 27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
\v 28 परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला,
\v 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
\s5
\c 22
\s अहाब आणि यहोशाफाट ह्यांच्या पराभवाचे मीखायाने केलेले भविष्य
\r 2 इति. 18:1-27
\p
\v 1 पुढील तीन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
\v 2 तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाचा राजा याला भेटायला गेला.
\s5
\v 3 यावेळी इस्राएलाच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामाच्या राजाने रामोथ-गिलाद आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
\v 4 आणि इस्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.”
\s5
\v 5 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
\v 6 तेव्हा इस्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ-गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल.”
\s5
\v 7 पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
\v 8 इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
\v 9 तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला “इम्लाचा पुत्र मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.”
\s5
\v 10 यावेळी इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्याठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
\v 11 त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
\v 12 मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
\s5
\v 13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
\v 14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
\v 15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ-गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हास यश देईल.”
\s5
\v 16 पण राजा त्यास म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?”
\v 17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
\s5
\v 18 मग इस्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
\v 19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.
\v 20 परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल. तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
\s5
\v 21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.
\v 22 परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील? यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल. यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल.
\v 23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.”
\s5
\v 24 मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
\v 25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
\s5
\v 26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
\v 27 आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
\v 28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
\s5
\v 29 नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
\v 30 अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
\s5
\v 31 अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
\v 32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
\v 33 हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.
\s5
\v 34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”
\s5
\v 35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
\v 36 सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.”
\s5
\v 37 राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले.
\v 38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले.
\s5
\v 39 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
\v 40 अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
\s यहोशाफाटाची कारकीर्द
\r 2 इति. 20:31-21:1
\s5
\p
\v 41 अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र.
\v 42 यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या.
\s5
\v 43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
\v 44 यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला.
\s5
\v 45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
\v 46 त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले.
\v 47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
\s5
\v 48 राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
\v 49 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला.
\v 50 यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला.
\s5
\v 51 अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
\v 52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले.
\v 53 आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.