mr_ulb/10-2SA.usfm

1213 lines
271 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 2SA 2SA-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h 2 शमुवेल
\toc1 2 शमुवेल
\toc2 2 शमुवेल
\toc3 2sa
\mt1 2 शमुवेल
\mt2 The Second Book of
\is लेखक
\ip 2 शमुवेलाचे पुस्तक त्याचे लेखक कोण आहे यास ओळखत नाही. तो मरण पावला म्हणून तो (लेखक) संदेष्टा शमुवेल होऊ शकत नाही. मूलतः, 1 आणि 2 शमुवेल पुस्तके एकच पुस्तक होती. सेप्टुआजिंटचच्या (पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या ग्रीक आवृत्तीमध्ये असे म्हटले आहे की 270 इ. मध्ये 70 भाषांतरकर्त्यांनी हे केले) भाषांतरकर्त्यांनी त्यांना दोन पुस्तकात विभाजित केले. म्हणूनच शौलाच्या मृत्यूनंतरची पहिली पुस्तके संपली आणि दुसऱ्याची सुरुवात दाविदाच्या राज्याशी झाली, दाविदाला यहूदाच्या गोत्रांचा राजा कसे बनवले गेले आणि नंतर त्याला सर्व इस्त्राएलाचा राजा बनवण्यात आले.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 1050-722
\ip अनुवादानंतरच्या इतिहासाचा एक भाग म्हणून हे बाबेलच्या बंदिवासात लिहिले होते.
\is प्राप्तकर्ता
\ip काही स्वरूपात, मूळ प्रेक्षक दावीद आणि शलमोन यांच्या काळात तसेच त्यांच्या पिढ्यांसमवेत राहिलेले इस्त्राएली असतील.
\is हेतू
\ip 2 शमुवेल राजा दाविदाच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. हे पुस्तक त्याच्या ऐतिहासिक संदर्भात दाविदाचा करार ठेवते. दाविदाने यरुशलेमला इस्राएलचे राजकीय व धार्मिक केंद्र बनविले (2 शमुवेल 5:6-12; 6:1-17). परमेश्वराचे वचन (2 शमुवेल 7: 4-16) आणि दाविदाचे शब्द (2 शमुवेल 23: 1-7) देवाने दिलेल्या राज्याच्या महत्तीवर जोर दिला. तसेच मसीहाच्या सत्तारूढ प्रभुत्व भविष्यवाणीला सूचित केले.
\is विषय
\ip एकीकरण
\iot रूपरेषा
\io1 1. दाविदाच्या साम्राज्याचा उदय (अध्याय 1-10)
\io1 2. राज्याचे विभाजन (अध्याय 11-20)
\io1 3. परिशिष्ट (अध्याय 21-24)
\s5
\c 1
\s शौलाच्या मृत्यूची बातमी दाविदाला कळते
\p
\v 1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
\v 2 तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
\s5
\v 3 दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
\v 4 तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
\v 5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”
\s5
\v 6 यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
\v 7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
\s5
\v 8 त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले.
\v 9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.
\v 10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
\s5
\v 11 हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
\v 12 दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
\v 13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”
\s5
\v 14 दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
\v 15 मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
\v 16 दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.”
\s शौल व योनाथानासाठी दावीद शोक करतो
\s5
\p
\v 17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
\v 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात
\f + हे पुस्तक कदाचित प्राचीन युद्धाच्या गाण्यांचे संग्रह आहे, त्याचा संदर्भ याहोशवा 10:13 आला आहे. हिब्रू शब्द याशार ह्याचा अर्थ “प्रामाणिक” किंवा “योग्य” असा होतो
\f* हे गीत लिहिलेले आहे.
\v 19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
\v 20 ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
\s5
\v 21 गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
\v 22 योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
\s5
\v 23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
\v 24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
\s5
\v 25 युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.
\v 26 बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
\v 27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”
\s5
\c 2
\s दावीद यहूदा राष्ट्राचा राजा होतो
\p
\v 1 मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
\v 2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया.
\v 3 दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांसही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.
\s5
\v 4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, “याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले.”
\v 5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
\s5
\v 6 आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे.
\v 7 आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”
\s दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो
\s5
\p
\v 8 नेरचा मुलगा अबनेर हा शौलाचा सेनापती होता. इकडे तो शौलाचा मुलगा इश-बोशेथ
\f + इश-बाले
\f* याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.
\v 9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले.
\s5
\v 10 हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करू लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता.
\v 11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.
\s5
\v 12 नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.
\v 13 सरुवा हिचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.
\s5
\v 14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”
\v 15 तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.
\s5
\v 16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव “हेलकथहसूरीम
\f + धारदार तलवारींचे क्षेत्र
\f* ” असे पडले हे स्थळ गिबोनामध्ये आहे.
\v 17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.
\s5
\v 18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.
\v 19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवीडावीकडे वळून देखील पाहिले नाही.
\s5
\v 20 अबनेरने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”
\v 21 असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
\s5
\v 22 पुन्हा अबनेर त्यास म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.”
\v 23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले.
\s5
\v 24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.
\v 25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.
\s5
\v 26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्यास विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांस सांग.”
\v 27 तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.
\s5
\v 28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलाशी युध्दही केले नाही.
\v 29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केली. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.
\s5
\v 30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांस त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरून दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्यास आढळून आले.
\v 31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.
\v 32 दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोहोचली.
\s5
\c 3
\s हेब्रोन येथे जन्मलेले दाविदाचे पुत्र
\p
\v 1 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले.
\s5
\v 2 हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्नोन.
\v 3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.
\s5
\v 4 अदोनीया चौथा, हग्गीथ ही त्याची आई, शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.
\v 5 दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.
\s दावीदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो
\s5
\p
\v 6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले.
\v 7 शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?”
\s5
\v 8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, मी काय यहूदाच्या असलेल्या कुत्र्याचे डोके आहे? शौलाशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही, पण आता तू मला या स्त्रीच्या संदर्भात दोष देत आहेस.
\s5
\v 9 आता मात्र मी निश्चित सांगतो की, परमेश्वराने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही, तर देव खुशाल माझे वाईट करो.
\v 10 शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल.
\v 11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने अबनेरला काहीही प्रत्युत्तर केले नाही.
\s5
\v 12 अबनेरने दूताकरवी दावीदाला निरोप पाठवला, “या प्रदेशावर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशी करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
\v 13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलाची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलीस तरच मी तुला भेटीन.”
\s5
\v 14 शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदाकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.”
\v 15 तेव्हा ईश-बोशेथने लईशाचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.
\v 16 पालटीयेल हा मीखलचा पती तो तिच्या मागोमाग बहूरीमपर्यंत रडत रडत गेला. पण अबनेरने त्यास परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.
\s5
\v 17 अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते.
\v 18 आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”
\s5
\v 19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला त्यांना आणि इस्राएल लोकांस ते चांगले वाटले.
\v 20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्व लोक यांना मेजवानी दिली.
\s5
\v 21 अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांस मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.” तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
\s यवाब अबनेरास ठार करतो
\s5
\p
\v 22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरून परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता.
\v 23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्यास शांत मनाने जाऊ दिले.”
\s5
\v 24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्यास तसेच जाऊ दिलेत! असे का?
\v 25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यामध्ये कावा आहे. तो येथील बातमी काढायला आला होता.”
\v 26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्यास सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती.
\s5
\v 27 हेब्रोन येथे त्यास आणल्यावर यवाबाने त्यास गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटावर वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेराने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.
\s5
\v 28 दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत, परमेश्वर हे जाणतो.
\v 29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”
\v 30 गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.
\s5
\v 31 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला.” अबनेरच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त करा.
\v 32 त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्वजण यांनी विलाप केला.
\s5
\v 33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले, “एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
\v 34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या, पाय साखळदंडांनी बांधले नव्हते. नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.” मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला.
\s5
\v 35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता.
\v 36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला.
\s5
\v 37 दावीदाने नेर चा पुत्र अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.
\v 38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, आज एक मुख्य आणि महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणत नाही काय?
\v 39 आज जरी मी आभिषिक्त राजा आहे, तरी मी अशक्त आहे. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.
\s5
\c 4
\s ईश-बोशेथाचा वध
\p
\v 1 हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले.
\v 2 शौलाच्या पुत्राजवळ दोन माणसे सेनानायक होती; रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिम्मोनचे पुत्र. रिम्मोन हा बैरोथचा, बैरोथ नगर बन्यामीन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत.
\v 3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.
\s5
\v 4 शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.
\s5
\v 5 बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.
\v 6 गहू घेण्याच्या आमिषाने रेखाब आणि बाना घरात घूसले त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग ते दोघेही निसटून गेले.
\v 7 ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शिर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत.
\s5
\v 8 ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.”
\v 9 पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे.
\v 10 यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्यास वाटले या बातमीबद्दल मी त्यास बक्षीस देईन पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले.
\s5
\v 11 तुम्हासही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”
\v 12 असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.
\s5
\c 5
\s दावीद इस्त्राएल राष्ट्राचा राजा होतो
\r 1इति. 11:1-3
\p
\v 1 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत.
\v 2 शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”
\s5
\v 3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
\v 4 दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
\v 5 हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरुशलेमेमधून राज्य केले.
\s दावीद सीयोन घेतो
\r 1इति. 11:4-9; 14:1-7
\s5
\p
\v 6 राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हास थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.”
\v 7 तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.
\s5
\v 8 दावीद त्यादिवशी आपल्या लोकांस म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात
\f + महलात
\f* येता यायचे नाही अशी म्हण पडली.”
\v 9 दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.
\v 10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.
\s हीराम दाविदाला राजा म्हणून मान्य करतो
\s5
\p
\v 11 सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
\v 12 तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.
\s यरुशलेम येथे जन्मलेली दाविदाची मुले
\s5
\p
\v 13 हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.
\v 14 त्याच्या या यरुशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
\v 15 इभार, अलीशवा, नेफेग, याफीय,
\v 16 अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.
\s दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो
\r 1इति. 14:8-17
\s5
\p
\v 17 दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरुशलेम येथील किल्ल्यात आला.
\v 18 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
\s5
\v 19 दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
\v 20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.
\v 21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या.
\s5
\v 22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
\v 23 दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.
\s5
\v 24 तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
\v 25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.
\s5
\c 6
\s दावीद कोश आणण्यास जातो
\r 1इति. 13:1-14; 15:25-16:3
\p
\v 1 दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले.
\v 2 आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करूबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो देवाचा कोश वर आणायला चालला.
\s5
\v 3 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा देवाचा कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे पुत्र उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
\v 4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला.
\v 5 तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले.
\s5
\v 6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.
\v 7 पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला.
\s5
\v 8 परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
\v 9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?”
\s5
\v 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती
\f + गात शहरातला
\f* याच्या घरी ठेवला.
\v 11 तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
\s कोश यरुशलेमेत आणतात
\s5
\p
\v 12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.
\v 13 परमेश्वराचा कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले.
\s5
\v 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता.
\v 15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
\s5
\v 16 शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले.
\v 17 या कराराच्या कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यामध्ये योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरा पुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
\s5
\v 18 होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले.
\v 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
\s5
\v 20 मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!”
\s5
\v 21 तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार.
\v 22 मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.”
\v 23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.
\s5
\c 7
\s देवाचा दाविदाशी करार
\r 1इति. 17:1-15
\p
\v 1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.
\v 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
\s5
\v 3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.”
\v 4 पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
\v 5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
\s5
\v 6 मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
\v 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.
\s5
\v 8 शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले.
\v 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
\s5
\v 10 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
\v 11 इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
\s5
\v 12 तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.
\v 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
\v 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.
\s5
\v 15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
\v 16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”
\v 17 नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
\s5
\v 18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
\v 19 हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.
\v 20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
\s5
\v 21 तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
\v 22 ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
\v 23 पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.
\s5
\v 24 तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
\v 25 आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.
\v 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.
\s5
\v 27 सर्वशक्तीमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
\v 28 प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
\v 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
\s5
\c 8
\s दावीद आपल्या राज्याचा विस्तार करतो
\r 1 इति. 18:1-13
\p
\v 1 यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.
\s5
\v 2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.
\s5
\v 3 रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला.
\v 4 सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले.
\s5
\v 5 दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले.
\v 6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले.
\s5
\v 7 हद्देजरच्या सैनिकांकडील
\f + अधिकाऱ्यांकडील
\f* सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरुशलेमेला आणल्या.
\v 8 हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
\s5
\v 9 हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.
\v 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिले. (हद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या.
\s5
\v 11 दावीदाने त्या स्विकारून परमेश्वरास अर्पण केल्या. या आधीच्या समर्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती.
\v 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबाचा मुलगा, सोबाचा राजा हद्देजर याचा पराभव केला.
\s5
\v 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला.
\v 14 अदोममध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमी लोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
\s दाविदाचे अंमलदार
\r 1इति. 18:14-17
\s5
\p
\v 15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले.
\v 16 सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस
\f + इतिहासकारक
\f* होता.
\v 17 अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.
\v 18 यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री
\f + याजक
\f* होते.
\s5
\c 9
\s मफीबोशेथावर दावीद कृपा करतो
\p
\v 1 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.
\v 2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्यास दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्यास विचारले, “तूच सीबा काय? सीबा म्हणाला,” “होय, मीच तुमचा दास सीबा.”
\s5
\v 3 तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सीबा राजाला म्हणाला, योनाथानाचा मुलगा आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.
\v 4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, तो लो-दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.
\s5
\v 5 तेव्हा राजा दावीदने मनुष्य पाठवून त्यास लो-दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले.
\v 6 शौलाचा पुत्र योनाथान, याचा पुत्र मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.
\s5
\v 7 त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.
\v 8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?
\s5
\v 9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.
\v 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेथ याचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सीबाला पंधरा पुत्र आणि वीस नोकर होते.
\s5
\v 11 सीबा दावीदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.
\v 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले.
\v 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पक्तींस भोजन करीत असे.
\s5
\c 10
\s दावीद अम्मोनी आणि अरामी ह्यांचा पराभव करतो
\r 1इति. 19:1-19
\p
\v 1 पुढे अम्मोन्याचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.
\v 2 दावीद म्हणाला, हानूनाचा वडील नाहाशचा माझ्यावर लोभ होता याने माझ्यावर दया केली, म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन. मग दावीदाने हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनेसाठी आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.
\v 3 पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हानून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनेसाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय असे तुम्हास वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांस पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरूद्ध उठाव करायचा बेत आहे.
\s5
\v 4 तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.
\v 5 लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरुशलेम येथे या.
\s5
\v 6 आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय त्यांनी, माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबाचे बारा हजार सैनिक घेतले.
\v 7 दावीदाने हे ऐकले, तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.
\v 8 तेव्हा अम्मोनी लोक बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला, सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबाचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.
\s5
\v 9 अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योद्ध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरूद्ध लढायला सज्ज केले.
\v 10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले.
\s5
\v 11 यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले, तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.
\v 12 हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्यास योग्य वाटेल तसे करील.
\s5
\v 13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला.
\v 14 अराम्यांनी पलायन केलेले पाहताच, अम्मोनीही अबीशय समोरून पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमेला परतला.
\s5
\v 15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)
\v 16 हद्देजरने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.
\s5
\v 17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला.
\v 18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरून पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.
\v 19 हद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलाशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अराम्यांनी धास्ती घेतली.
\s5
\c 11
\s दावीद आणि बथशेबा
\p
\v 1 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरुशलेम येथेच राहिला.
\s5
\v 2 संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
\v 3 तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा, उरीया हित्ती याची पत्नी आहे.
\s5
\v 4 तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला, नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.
\v 5 पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे.
\s5
\v 6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की, उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदाकडे पाठवले.
\v 7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.
\v 8 मग दावीद उरीयाला म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली.
\s5
\v 9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला.
\v 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस?
\v 11 उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहुट्यांमध्ये राहत आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशावेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणेपिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.
\s5
\v 12 दावीद उरीयाला म्हणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो. उरीयाने त्या दिवशी यरुशलेमेमध्येच मुक्काम केला.
\v 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्यास भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्यास बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळीसुद्धा तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
\s5
\v 14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
\v 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते, आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल, तेथे उरीयाला पाठवा. त्यास एकट्याला तेथे सोडा, म्हणजे तो युध्दात कामी येईल.
\s5
\v 16 यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले.
\v 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरूद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
\s5
\v 18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त संदेशवाहकाद्वारे दावीदाला पाठवले.
\v 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
\v 20 यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भिंतीवरून शिरसंधान करतील हे त्यास ठाऊक असायला हवे.
\s5
\v 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्यास हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यामध्ये मारला गेला.
\s5
\v 22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगायला सांगितले ते सर्व कथन केले.
\v 23 तो म्हणाला, अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.
\s5
\v 24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यामध्ये काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.
\v 25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको. हिम्मत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा, तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.
\s5
\v 26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
\v 27 काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वरास पसंत पडले नाही.
\s5
\c 12
\s नाथान दाविदाला ताडन करतो
\p
\v 1 परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब.
\v 2 श्रीमंत मनुष्याकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती.
\v 3 पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब मनुष्याच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
\s5
\v 4 एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत मनुष्याकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत मनुष्याची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्यास काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब मनुष्याची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले.
\v 5 दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे
\v 6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही.
\s5
\v 7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.
\v 8 त्याचे घरदार आणि स्त्रिया तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो.
\s5
\v 9 असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.
\v 10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.
\s5
\v 11 परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.
\v 12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल.
\v 13 मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.
\s5
\v 14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल.
\v 15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.
\s5
\v 16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
\v 17 घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला.
\v 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल.
\s5
\v 19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.
\v 20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्यास वाढले आणि तो जेवला.
\s5
\v 21 दावीदाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.
\v 22 दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल.
\v 23 पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.
\s5
\v 24 दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती.
\v 25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले.
\s दावीद राब्बा नगर घेतो
\r 1इति. 20:1-3
\s5
\p
\v 26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले.
\v 27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे.
\v 28 आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.
\s5
\v 29 मग दावीद सर्व लोकांस घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला.
\v 30 त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार
\f + साधारण 34 किलोग्राम
\f* होते. त्यामध्ये मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.
\s5
\v 31 राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरुशलेमेला परतला.
\s5
\c 13
\s अम्नोन आणि तामार
\p
\v 1 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.
\v 2 त्याचे तामारेवर प्रेम होते तामार कुमारिका होती तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला.
\s5
\v 3 अम्नोनाला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
\v 4 तो अम्नोनाला म्हणाला, दिवसें दिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर. तेव्हा अम्नोन योनादाबाला म्हणाला, माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.
\s5
\v 5 योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन.
\v 6 तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्यास तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा तिला इथे माझ्यादेखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.
\s5
\v 7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.
\v 8 तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहत होता.
\v 9 पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनासाठी ताटात वाढल्या. पण अम्नोन ते काही केल्या खाईना मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
\s5
\v 10 यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
\v 11 त्यास ती भरवू लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.
\v 12 तामार त्यास म्हणाली, भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.
\s5
\v 13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करून राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.
\v 14 पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
\s5
\v 15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
\v 16 तामार त्यास म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल. पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
\v 17 नोकरांना बोलावून तो म्हणाला, हिला आताच्या आता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.
\s5
\v 18 तेव्हा अम्नोनाच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.
\v 19 तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली.
\s5
\v 20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करून घेऊ नकोस, यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
\v 21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला.
\v 22 अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
\s अबशालोमाने घेतलेला सूड व त्याचे पलायन
\s5
\p
\v 23 दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
\v 24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा.
\s5
\v 25 तेव्हा राजा दावीद त्यास म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
\v 26 अबशालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दावीद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?
\s5
\v 27 पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
\v 28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.
\v 29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
\s5
\v 30 राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही.
\v 31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
\s5
\v 32 परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
\v 33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला.
\s5
\v 34 अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांस येताना पाहिले.
\v 35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.
\v 36 योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
\s5
\v 37 दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
\v 38 मग अबशालोम गेशूरच्या राजाकडे पळून गेला, तिथे तो तीन वर्षे राहिला.
\v 39 राजा दावीद अम्नोनाच्या दु:खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.
\s5
\c 14
\s अबशालोमाने परत यावे ह्यासाठी यवाबाने केलेली योजना
\p
\v 1 अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले.
\v 2 तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्यास शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस.
\v 3 राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.
\s5
\v 4 मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा.
\v 5 राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे.
\v 6 मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला.
\s5
\v 7 आता सगळे घर माझ्याविरूद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्यास आम्ही मारून टाकतो कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला. तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील. आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.
\s5
\v 8 हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो तू घरी जा.
\v 9 तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत.
\s5
\v 10 राजा दावीद म्हणाला, तुझ्याविरूद्ध कोणी काही बोलले तर त्यास माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.
\v 11 ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की, या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्यास धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.
\s5
\v 12 मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल.
\v 13 त्यावर ती म्हणाली, तुम्ही देवाच्या लोकांच्या विरूद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वत: दोषी ठरता. कारण राजाने आपल्या घराबाहेर घालवलेल्या पुत्राला पुन्हा परत आणलेले नाही.
\v 14 आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही.
\s5
\v 15 स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन कदाचित् तोच मला मदत करील.
\v 16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे.
\v 17 स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची तुम्हास साथ आहे.
\s5
\v 18 राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा.
\v 19 राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.
\v 20 अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच स्वरूप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. स्वामी तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हास या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.
\s5
\v 21 राजा यवाबाला म्हणाला, माझे वचन मी खरे करीन. आता अबशालोमला परत आणा.
\v 22 यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरुन मी हे ताडले.
\s5
\v 23 मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरुशलेमेला घेऊन आला.
\v 24 पण राजा दावीद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे त्यास मला भेटता मात्र येणार नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.
\s5
\v 25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता.
\v 26 प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत, केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे, ते केस राजाच्या वजनाप्रमाणे दोनशे शेकेल
\f + साधारण 2.3 किलोग्राम
\f* भरत असत.
\v 27 त्यास तीन पुत्र आणि एक कन्या होती, त्या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.
\s5
\v 28 यरुशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.
\v 29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्यास पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना.
\s5
\v 30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यामध्ये जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली.
\v 31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला, आणि त्यास म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”
\s5
\v 32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्यास विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे का आलो? तेव्हा मला त्यास भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे.
\v 33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.”
\s5
\c 15
\s अबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो
\p
\v 1 यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत.
\v 2 रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांस भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला.
\s5
\v 3 तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.
\v 4 अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करू शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.
\s5
\v 5 अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी त्याचे चुंबन घेई.
\v 6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली.
\s5
\v 7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या.
\v 8 अराममधील गशूर येथे राहत असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमेला नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो.
\s5
\v 9 तेव्हा राजा दावीदाने त्यास निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला.
\v 10 पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांस कळवले रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा.
\s5
\v 11 अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरुशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती.
\v 12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.
\s5
\v 13 एका निरोप्याने दाविदास वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.
\v 14 तेव्हा यरुशलेमेमध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमेच्या लोकांस तो मारून टाकेल.
\v 15 तेव्हा राजाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.
\s5
\v 16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.
\v 17 राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले.
\v 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करेथी, पलेथी आणि सहाशे गित्ती राजामागोमाग चालत गेले.
\s5
\v 19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे.
\v 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.
\s5
\v 21 पण इत्तय राजाला म्हणाला परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे मरणे तुमच्याबरोबरच.
\v 22 दावीद इत्तयला म्हणाला, मग चल तर, किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ. तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-मनुष्यांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला.
\v 23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्वजण वाळवंटाकडे निघाले.
\s5
\v 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा कराराचा कोश खाली ठेवला. यरुशलेमेमधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून अर्पणे अर्पित होता.
\v 25 राजा दावीद सादोकाला म्हणाला, हा देवाचा कोश यरुशलेमेला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.
\v 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.
\s5
\v 27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा.
\v 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.
\v 29 तेव्हा देवाचा कोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरुशलेमेला परतले आणि तिथेच राहिले.
\s5
\v 30 दावीद शोक करत जैतूनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.
\v 31 एकाने दावीदाला सांगितले अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे. तेव्हा दावीदाने देवाची करूणा भाकली तो म्हणाला, परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.
\s5
\v 32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्या वेळी हूशय अर्की त्यास भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
\v 33 दावीद हूशयला म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यामध्ये आणखी तुझा भार.
\v 34 पण तू यरुशलेमेला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अबशालोमला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, पण आता तुमची सेवा करीन.
\s5
\v 35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.
\v 36 सादोकाचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.
\v 37 तेव्हा दावीदाचा मित्र हूशय यरुशलेमेमध्ये परतला. अबशालोम ही तेथे आला.
\s5
\c 16
\p
\v 1 डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.
\v 2 राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.”
\s5
\v 3 राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरुशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते.
\v 4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.
\s5
\v 5 पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.
\v 6 त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.
\s5
\v 7 शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस!
\v 8 देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांस तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.
\s5
\v 9 सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हास शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या.
\v 10 पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?”
\s5
\v 11 अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.
\v 12 माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.
\s5
\v 13 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
\v 14 राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.
\s5
\v 15 अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरुशलेम येथे आले.
\v 16 दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.
\s5
\v 17 अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?
\v 18 हूशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.
\s5
\v 19 पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार.
\s5
\v 20 अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग.
\v 21 अहिथोफेल त्यास म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.
\s5
\v 22 मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
\v 23 अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांस त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत.
\s5
\c 17
\s अहिथोफेलाने दिलेली मसलत हूशय हाणून पाडतो
\p
\v 1 त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.
\v 2 तो थकला भागलेला असताना भयभीत झालेला असतानाच मी त्यास पकडीन. हे पाहून त्याचे लोक पळ काढतील फक्त राजा दावीदाचा मी वध करीन.
\v 3 बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील.
\v 4 अबशालोम आणि इस्राएलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला.
\s5
\v 5 पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे.
\v 6 मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.
\v 7 हूशय अबशालोमला म्हणाला, अहिथोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही.
\s5
\v 8 तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आता पिल्ले हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वलासारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत.
\v 9 एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.
\v 10 मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे.
\s5
\v 11 तेव्हा मी असे सुचवतो तुम्ही दानपासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएल लोकांस एकत्र आणा म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा.
\v 12 दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या मनुष्यांसहीत आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही.
\s5
\v 13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही.
\v 14 अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.
\s5
\v 15 हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही सविस्तर सांगितले. हूशय म्हणाला,
\v 16 आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत.
\s5
\v 17 योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
\v 18 पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिले हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यामध्ये उतरून ते लपले.
\s5
\v 19 त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही.
\v 20 अबशालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरुशलेमेला परत गेले.
\s5
\v 21 इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्यास म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे सांगितले आहे.
\v 22 तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते.
\s5
\v 23 इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले.
\s महनाईम येथे दावीद
\s5
\p
\v 24 दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली.
\v 25 अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली
\f + इश्माएली
\f* इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरुवे यवाबाची आई.
\v 26 अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.
\s5
\v 27 दावीद महनाईम येथे आला शोबी, माखीर आणि बर्जिल्लय तेथेच होते. नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलाद येथील रोगलीमचा होता.
\v 28 ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दावीद आणि इतर सर्वजणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले.
\v 29 गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.
\s5
\c 18
\s अबशालोमाचा मृत्यू
\p
\v 1 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार मनुष्यांवर अधिकारी, सरदार नेमले.
\v 2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.
\s5
\v 3 पण लोक म्हणाले नाही तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांस त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात रहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच.
\v 4 तेव्हा दावीद राजा लोकांस म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.
\s5
\v 5 यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.
\s5
\v 6 अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमाच्या अरण्यात ते लढले.
\v 7 दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली.
\v 8 देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मरण पावली.
\s5
\v 9 अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला, तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.
\v 10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.
\v 11 यवाब त्या मनुष्यास म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्यास जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुद्रा आणि एक पट्टा इनाम दिला असता.
\s5
\v 12 तो मनुष्य म्हणाला, तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय, आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.
\v 13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.
\s5
\v 14 यवाब म्हणाला, इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले.
\v 15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.
\s5
\v 16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांस अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.
\v 17 यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.
\s5
\v 18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वत:चेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो.
\s5
\v 19 सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्यास सांगतो.
\v 20 यवाब त्यास म्हणाला, आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा पुत्र मरण पावला आहे.
\s5
\v 21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
\v 22 सादोकाचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली. काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला मुला तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.
\v 23 अहीमास म्हणाला; ‘त्याची मला पर्वा नाही, मला जाऊ द्या. तेव्हा यवाबाने त्यास परवानगी दिली. अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
\s5
\v 24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास एक मनुष्य धावत येताना दिसला.
\v 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच,
\s5
\v 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय.
\v 27 पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकाचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार
\s5
\v 28 अहीमासने “सर्व कुशल असो, असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”
\v 29 राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.
\v 30 राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.
\s5
\v 31 मग तो कूशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरूद्ध पक्षाच्या लोकांस परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.
\v 32 राजाने त्यास विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमासारखीच गत होवो.
\v 33 यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला. वेशीच्या भिंतीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्यास रडू कोसळले, आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, ‘अबशालोम, माझ्या पुत्रा, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते माझ्या पुत्रा!
\s5
\c 19
\p
\v 1 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.
\v 2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.
\s5
\v 3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.
\v 4 राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने, माझ्या मुला अबशालोमा, असा मोठ्याने आक्रोश करत होता.
\s5
\v 5 यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्यास म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले.
\v 6 ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मरण पावलो असतो तर तुम्हास फार आनंद झाला असता असे दिसते.
\s5
\v 7 आता ऊठा आणि आपल्या सेवकांशी बोला. त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही मनुष्य उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आघात असेल.
\v 8 तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले. अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते.
\s दावीद यरुशलेमेस परत येतो
\s5
\p
\v 9 इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अबशालोमपासून पळून गेला.”
\v 10 म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करू.
\s5
\v 11 सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.
\v 12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात?
\s5
\v 13 आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो.
\v 14 दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला. त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की, तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.
\v 15 मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.
\s5
\v 16 गेराचा पुत्र शिमी हा बन्यामिनी होता तो बहूरीम येथे राहत असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला.
\v 17 बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हा ही आला. आपले पंधरा पुत्र आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोचले.
\v 18 राजाच्या कुटुंबियांना उतरून घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
\s5
\v 19 तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरुशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.
\v 20 आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.
\s5
\v 21 पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे.
\v 22 दावीद म्हणाला, सरुवेच्या मुलानो मी तुमच्या बरोबर कसे वागावे? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरूद्ध आहे. इस्राएलमध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही कारण आज मी इस्राएलचा राजा आहे.
\v 23 मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस. आपण शिमीचा वध करणार नाही, असे राजाने शिमीला वचन दिले.
\s5
\v 24 शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरुशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
\v 25 मफीबोशेथ यरुशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?
\s5
\v 26 मफीबोशेथने सांगितले, महाराज, माझ्या नोकराने, सीबाने, मला फसवले, त्यास मी म्हणालो, मी पांगळा आहे, तेव्हा गाढवावर खोगीर चढव म्हणजे त्यावर बसून मी राजाबरोबर जाईन.
\v 27 पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.
\v 28 माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?
\s5
\v 29 तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.
\v 30 मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले.
\s5
\v 31 गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
\v 32 बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला.
\v 33 दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरुशलेमेमध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.
\s5
\v 34 पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरुशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का?
\v 35 मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ?
\v 36 आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?
\s5
\v 37 पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा.
\s5
\v 38 तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
\v 39 राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
\s5
\v 40 नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोचवायला आले.
\v 41 सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?”
\s5
\v 42 तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांस सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय?”
\v 43 इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.
\s5
\c 20
\s शबाचे बंड
\p
\v 1 शबा नावाचा एक मनुष्य तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबा अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांस गोळा केले. आणि त्यांना म्हणाला, दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही. इस्राएलींनो, आपापल्या डेऱ्यात परत चला.
\v 2 हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरुशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.
\s5
\v 3 दावीद यरुशलेम येथील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
\s5
\v 4 राजा अमासास म्हणाला, यहूदाच्या लोकांस तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.
\v 5 तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला.
\s5
\v 6 दावीद अबीशयला म्हणाला, अबशालोमापेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्यास गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्यास पकडणे अवघड जाईल.
\v 7 तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरुशलेमेहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.
\s5
\v 8 यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडापाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली.
\s5
\v 9 त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले.
\v 10 यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
\s5
\v 11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
\v 12 अमासा रस्त्याच्या मध्याभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
\v 13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग सुरू केला.
\s5
\v 14 इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जाऊन, शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
\v 15 यवाब आपल्या मनुष्यांसहीत आबेल-बेथ-माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.
\v 16 नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
\s5
\v 17 यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
\v 18 मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.”
\v 19 इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तुची तुम्ही मोडतोड का करता?
\s5
\v 20 यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करू इच्छित नाही.”
\v 21 पण एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील बिक्रीचा पुत्र शबा नावाचा एक मनुष्य तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्यास माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल.
\v 22 मग तिने गावातील लोकांस शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरुशलेम येथे राजाकडे आला.
\s दाविदाचे अंमलदार
\s5
\p
\v 23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
\v 24 अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
\v 25 शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.
\v 26 आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.
\s5
\c 21
\s गिबोनी लोकांनी उगवलेला सूड
\p
\v 1 दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
\s5
\v 2 गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.
\v 3 दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करू? इस्राएलाचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करू शकतो?”
\s5
\v 4 तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हास हक्क नाही.” दावीद म्हणाला, “ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?”
\s5
\v 5 ते राजाला म्हणाले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला व इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा नाश करण्याचे ज्याने योजिले होते
\v 6 त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.” राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.”
\s5
\v 7 पण योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलाचा मुलगा. पण दावीदाने त्यास त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे परमेश्वरास स्मरून वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.
\v 8 अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला अय्याची कन्या रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली.
\v 9 या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता.
\s5
\v 10 अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.
\v 11 शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.
\s5
\v 12 तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादाच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथ-शान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरून नेली.
\v 13 याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले.
\s5
\v 14 शौल आणि योनाथानाच्या अस्थी त्यांनी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.
\s एका राक्षसी पुरुषापासून अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला
\r 1इति. 20:4-8
\s5
\p
\v 15 पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.
\v 16 त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य मनुष्य होता. त्याच्या भाल्याचे वजनच तिनशे शेकेल पितळ होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.
\v 17 पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, “तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”
\s दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरुष
\s5
\p
\v 18 यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.
\v 19 गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ
\f + गल्याथच्या भावाला
\f* याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.
\s5
\v 20 गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर चोवीस बोटे होती. हा ही रेफाई वंशातला होता.
\v 21 त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.
\v 22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.
\s5
\c 22
\s दाविदाने गाइलेले मुक्तिगीत
\r स्तोत्र. 18:1-50
\p
\v 1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले;
\q
\v 2 परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार.
\s5
\q
\v 3 “तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या,
\q देवाच्या आश्रयाला जातो.
\q देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते.
\q परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा,
\q माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले.
\q क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
\q
\v 4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला,
\q आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
\s5
\q
\v 5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता.
\q मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
\q मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
\v 6 अधोलोकाचे
\f + मृत्युलोकाचे
\f* पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
\s5
\v 7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
\s5
\v 8 तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता.
\v 9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
\s5
\v 10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला.
\v 11 करूबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता.
\v 12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.
\s5
\v 13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले.
\v 14 परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला.
\v 15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले.
\s5
\v 16 परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
\s5
\v 17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
\v 18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले.
\s5
\v 19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला.
\v 20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
\v 21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
\s5
\v 22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.
\v 23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
\s5
\v 24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.
\v 25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
\s5
\v 26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
\v 27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटीलांशी तू ही कुटिलतेने वागतोस.
\s5
\v 28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.
\v 29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
\s5
\q
\v 30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो.
\q देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.
\v 31 देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
\s5
\v 32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
\v 33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो.
\s5
\v 34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
\v 35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात.
\s5
\v 36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
\v 37 माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
\s5
\v 38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
\v 39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
\s5
\v 40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
\v 41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.
\s5
\v 42 शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
\v 43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
\s5
\v 44 माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
\v 45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात. जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
\v 46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
\s5
\v 47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
\v 48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले.
\v 49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
\s5
\v 50 हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
\v 51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.”
\s5
\c 23
\s दाविदाचे अखेरचे बोल
\p
\v 1 दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक.
\v 2 परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
\s5
\v 3 इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
\v 4 तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा.
\s5
\v 5 देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.
\s5
\v 6 पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
\v 7 त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा मनुष्य काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.”
\s दाविदाचे शूर वीर
\r 1इति. 11:10-47
\s5
\p
\v 8 दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.
\s5
\v 9 त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजाराने पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते.
\v 10 थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले.
\s5
\v 11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला.
\v 12 पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलाला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.
\s5
\v 13 दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.
\v 14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.
\s5
\v 15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.
\v 16 पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले.
\v 17 दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
\s5
\v 18 सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
\v 19 त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता.
\s5
\v 20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
\v 21 एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला.
\s5
\v 22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
\v 23 तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
\s5
\v 24 यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,
\v 25 शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
\v 26 हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
\v 27 अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,
\v 28 सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
\s5
\v 29 बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,
\v 30 बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
\v 31 अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी,
\v 32 अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान,
\s5
\v 33 शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
\v 34 माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,
\v 35 हेस्री कर्मेली, पारय अर्बी
\v 36 सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी,
\s5
\v 37 सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
\v 38 ईरा इथ्री, गारेब इथ्री,
\v 39 उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.
\s5
\c 24
\s इस्त्राएल आणि यहूदा राष्ट्रांतील लोकांची दावीद शिरगणती करतो
\r 1इति. 21:1-6
\p
\v 1 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”
\v 2 राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैर-शेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.”
\s5
\v 3 पण यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हास असे का करावेसे वाटते?”
\v 4 पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले. आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.
\s5
\v 5 यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)
\v 6 तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.
\v 7 सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.
\s5
\v 8 सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरुशलेम येथे पोहोचले.
\v 9 यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
\s5
\v 10 हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
\s5
\v 11 दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला परमेश्वराची वाणी प्रकट झाली.”
\v 12 परमेश्वर त्यास म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.”
\s5
\v 13 गादने दावीदाकडे येऊन त्यास हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात
\f + तीन
\f* वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा, की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वरास काय सांगावे ते सांग.”
\v 14 दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो लोकांच्या हाती मी पडू नये.”
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दानपासून बैर-शेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
\v 16 यरुशलेमेच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
\s5
\v 17 लोकांस मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वरास म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”
\s5
\v 18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
\v 19 दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला.
\v 20 अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.
\s5
\v 21 अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत? दावीद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”
\v 22 अरवना म्हणाला, “स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे.
\v 23 अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.”
\s5
\v 24 पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
\v 25 मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.