mr_ulb/09-1SA.usfm

1403 lines
320 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id 1SA 1SA-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h 1 शमुवेल
\toc1 1 शमुवेल
\toc2 1 शमुवेल
\toc3 1sa
\mt1 1 शमुवेल
\mt2 The First Book of
\is लेखक
\ip पुस्तक लेखकाचा दावा करत नाही. तथापि, शमुवेलाने कदाचित लिहिले असावे, आणि त्याने 1 शमुवेल 1:1-24: 22 या वचनाची माहिती दिली, जी त्याच्या मृत्यूपर्यंत जीवन आणि कारकीर्द याचे एक चरित्र आहे. हे शक्य आहे की भविष्यवक्ता शमुवेलाने या पुस्तकाचे काही भाग लिहिले. 1 शमुवेलाचे शक्य योगदानकर्ते संदेष्टे/इतिहासकार नाथन आणि गाद (1 करिंथ 29:29) आहेत.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 1050-722
\ip इस्राएल आणि यहूदा यांच्यातील राज्याची विभागणी झाल्यानंतर लेखकाने पुस्तक लिहिले, इस्त्राएल आणि यहूदाच्या अनेक संदर्भांमुळे वेगळे अस्तित्व असल्यामुळे हे स्पष्ट आहे. (1 शमुवेल 11:8; 17:52; 18:16; 2 शमुवेल 5:5; 11:11; 12:8; 19:42-43; 24:1, 9).
\is प्राप्तकर्ता
\ip पुस्तकाचे मूळ वाचक इस्राएल आणि यहूदाच्या विभाजित राजेशाहीचे सदस्य होते ज्यांना दाविदाच्या राजवंशाच्या वैधतेवर व उद्देशाने दैवी दृष्टिकोन असणे आवश्यक होते.
\is हेतू
\ip 1 शमुवेलाने कनानमधील इस्राएलच्या इतिहासाची नोंद केली जेणेकरून ते राजांच्या अधिपत्याखाली एक संयुक्त राष्ट्राचे राज्य बनतील. शमुवेल शेवटच्या शास्त्यांप्रमाणे उदय पावतो आणि त्याने पहिले 2 राजे, शौल आणि दावीद यांना अभिषिक्त केले.
\is विषय
\ip परंपरा
\iot रूपरेषा
\io1 1. शमुवेलाचे जीवन आणि सेवाकार्य (1:1-8:22)
\io1 2. इस्त्राएलाच्या पहिल्या राजासारखे शौलाचे जीवन (9:1-15:35)
\io1 3. राजा म्हणून शौलाचे अपयश (13:1-15:35)
\io1 4. दाविदाचे जीवन (16:1-20:42)
\io1 5. दाविदाचा इस्त्राएलाचा राजा म्हणून अनुभव (21:1-24:22)
\s5
\c 1
\s शमुवेलाचा जन्म
\p
\v 1 एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.
\v 2 त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.
\s5
\v 3 तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
\v 4 यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे.
\s5
\v 5 परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती.
\v 6 परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.
\s5
\v 7 ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.
\v 8 तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
\s5
\v 9 मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.
\v 10 तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.
\s5
\v 11 ती नवस करून म्हणाली, “हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्यास त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वरास देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.”
\s5
\v 12 आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले.
\v 13 हन्ना तर आपल्या मनात बोलत होती. तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.
\v 14 तेव्हा एली तिला म्हणाला, “किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.”
\s5
\v 15 तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, “असे नाही, माझ्या स्वामी, मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षारस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे.”
\v 16 “आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे.”
\s5
\v 17 मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.”
\v 18 ती बोलली, “आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या.” मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने अन्न सेवन केले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.
\s5
\v 19 आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.
\v 20 नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.
\s5
\v 21 पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.
\v 22 परंतु हन्ना वर गेली नाही; ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्यास नेईन, जेणेकरून तो परमेश्वरापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील.”
\v 23 तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले.
\s5
\v 24 आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.
\v 25 मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.
\s5
\v 26 आणि ती म्हणाली, “हे माझ्या प्रभू! आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री परमेश्वराची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे.
\v 27 या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
\v 28 मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली.
\s5
\c 2
\s हन्नाचे गीत
\r लूक 1:46-55
\p
\v 1 मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली,
\q “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे;
\q माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे;
\q माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे,
\q कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
\s5
\q
\v 2 परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही,
\q कारण तुझ्या शिवाय कोणी नाही,
\q आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
\s5
\q
\v 3 अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका;
\q तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो.
\q कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे;
\q त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
\q
\v 4 पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत,
\q परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.
\s5
\q
\v 5 जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत;
\q आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत.
\q वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे,
\q परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.
\s5
\q
\v 6 परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो.
\q तो अधोलोकास नेतो व वर आणतो.
\q
\v 7 परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो.
\q तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.
\s5
\q
\v 8 तो गरीबाला धुळीतून वर उठवतो;
\q तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो;
\q यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे
\q आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे.
\q कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत;
\q त्याने त्यावर जग ठेवले आहे.
\s5
\q
\v 9 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील,
\q परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील,
\q कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
\s5
\q
\v 10 देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील;
\q आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील.
\q परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील;
\q तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.”
\s5
\p
\v 11 मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला.
\s एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य
\s5
\p
\v 12 एलीची मुले नालायक माणसे होती; ते परमेश्वरास ओळखत नव्हते.
\v 13 लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई
\v 14 तो परातीत किंवा पातेल्यांत किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत
\s5
\v 15 त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की, “याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.”
\v 16 जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की, “अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे” तर तो म्हणे असे नाही, “पण तू आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.”
\v 17 हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांस तिरस्कार वाटू लागला.
\s5
\v 18 परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.
\v 19 त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्यास तो देत असे.
\s5
\v 20 एलकानाला व त्याच्या पत्नीला एली आशीर्वाद देऊन म्हणत, “असे या पत्नीपासून परमेश्वर तुला संतान देवो” कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्यास परत दिले मग ते आपल्या घरी जात असत.
\v 21 आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलीना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.
\s5
\v 22 आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले पुत्र सर्व इस्राएलाशी कसे वागले आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रिया सेवा करीत त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले.
\v 23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत.
\v 24 माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही परमेश्वराच्या लोकांस आज्ञाभंग करायला लावता.
\s5
\v 25 जर कोणी एक पुरुष दुसऱ्याविरूद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता.
\v 26 शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.
\s5
\v 27 आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय?
\v 28 आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्यास सर्व इस्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय?
\s5
\v 29 तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?
\v 30 यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.
\s5
\v 31 पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही.
\v 32 जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.
\v 33 आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्यास जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.
\s5
\v 34 आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील.
\v 35 मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या मनात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.
\s5
\v 36 असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.”
\s5
\c 3
\s शमुवेलाला परमेश्वराचे पाचारण
\p
\v 1 शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
\v 2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;
\v 3 आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता.
\v 4 परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.”
\s5
\v 5 मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.
\v 6 पुन्हा परमेश्वराने, “शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” एलीने उत्तर दिले, “माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.”
\s5
\v 7 शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता.
\v 8 मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे.
\s5
\v 9 मग एली शमुवेलाला म्हणाला, “तू जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला.
\s5
\v 10 आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”
\v 11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.
\s5
\v 12 एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरूद्ध पूर्ण करीन.
\v 13 कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
\v 14 यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.”
\s5
\v 15 नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.
\v 16 मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.”
\s5
\v 17 मग त्याने म्हटले, “तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.”
\v 18 तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.”
\s5
\v 19 आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.
\v 20 शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.
\v 21 शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.
\s5
\c 4
\s पलिष्टी कोश हस्तगत करतात
\p
\v 1 आणि, शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलांकडे आला. आता इस्राएल पलिष्ट्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन-एजराजवळ तळ दिला व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.
\v 2 पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले.
\s5
\v 3 मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, “आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे.”
\v 4 मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करूबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
\s5
\v 5 परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली.
\v 6 तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे.
\s5
\v 7 तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, “परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही.
\v 8 आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे.
\v 9 अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.”
\s5
\v 10 पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले.
\v 11 आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले.
\s5
\v 12 त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला.
\v 13 आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कांपत होते; आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले.
\s5
\v 14 आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले.
\v 15 तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते?
\s5
\v 16 आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?”
\v 17 तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, “इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.”
\s5
\v 18 आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
\s5
\v 19 तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या.
\v 20 आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, “भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे.” परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही.
\s5
\v 21 तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.
\v 22 आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”
\s5
\c 5
\s पलिष्ट्यांच्या प्रदेशात कोशाचे वास्तव्य
\p
\v 1 आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला.
\v 2 आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला.
\v 3 जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.
\s5
\v 4 पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते.
\v 5 म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.
\s5
\v 6 मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले.
\v 7 तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे.”
\s5
\v 8 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.
\v 9 परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या.
\s5
\v 10 मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, “देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”
\s5
\v 11 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.
\v 12 जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पीडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.
\s5
\c 6
\s पलिष्टी कोश परत करतात
\p
\v 1 आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
\v 2 आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”
\s5
\v 3 ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”
\v 4 तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
\s5
\v 5 म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.
\v 6 मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
\s5
\v 7 तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
\v 8 मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
\v 9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”
\s5
\v 10 मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
\v 11 मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
\v 12 मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
\s5
\v 13 तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
\s5
\v 14 मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.
\v 15 लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
\s5
\v 16 आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
\s5
\v 17 परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.
\v 18 आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.
\s5
\v 19 मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
\v 20 तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”
\s5
\v 21 मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.”
\s5
\c 7
\p
\v 1 मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.
\s शमुवेल इस्त्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो
\p
\v 2 कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.
\s5
\v 3 शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.”
\v 4 मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.
\s5
\v 5 आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.”
\v 6 मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.
\s5
\v 7 आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
\v 8 नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.”
\s5
\v 9 मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.
\s5
\v 10 आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.
\v 11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली.
\s5
\v 12 मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
\s5
\v 13 असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता.
\v 14 आणि एक्रोनापासून गथपर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.
\s5
\v 15 शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला.
\v 16 तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी.
\v 17 आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पायला वेदी बांधली.
\s5
\c 8
\s इस्त्राएल लोक राजा मागतात
\p
\v 1 जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश नेमले.
\v 2 त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते.
\v 3 परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत.
\s5
\v 4 मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.
\v 5 आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.”
\s5
\v 6 परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.
\v 7 तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.
\s5
\v 8 मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”
\v 9 तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.
\s5
\v 10 मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली.
\v 11 तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.
\v 12 तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.
\s5
\v 13 तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
\v 14 तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.
\v 15 तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल.
\s5
\v 16 तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.
\v 17 तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.
\v 18 त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.”
\s5
\v 19 पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच
\v 20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.”
\s5
\v 21 शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले;
\v 22 मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, “तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव.” तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.”
\s5
\c 9
\s राजपदी शौलाची निवड
\p
\v 1 बन्यामीन वंशातील एक पुरुष होता त्याचे नांव कीश; तो अबीएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी पुरुष मोठा पराक्रमी होता.
\v 2 आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
\s5
\v 3 आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.”
\v 4 मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला, परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले, परंतु येथे ती त्यांना सापडली नाहीत. नंतर ते बन्यामीन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत.
\s5
\v 5 ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला, “चला आपण माघारे जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमचीच काळजी करायला लागेल.”
\v 6 तेव्हा तो चाकर त्यास म्हणाला, “आता पाहा या नगरात देवाचा पुरुष आहे. तो पुरुष खूपच सन्मान्य आहे; जे तो सांगतो ते सर्व पूर्ण होतेच. तर आता आपण तेथे जाऊ; म्हणजे आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे हे कदाचित तो आपल्याला सांगेल.”
\s5
\v 7 मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, “पण पाहा आपण जर जाऊ तर त्या मनुष्यास आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि परमेश्वराच्या मनुष्यास भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?”
\v 8 तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी परमेश्वराच्या मनुष्यास देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हास सांगेल.”
\s5
\v 9 (पूर्वी इस्राएलात कोणी परमेश्वराजवळ विचारायला जात असताना असे म्हणत, “चला आपण द्रष्ट्याकडे जाऊ.” कारण ज्याला आता भविष्यवादी म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा असे म्हणत.)
\v 10 मग शौल चाकराला म्हणाला, “तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ.” तेव्हा ज्या नगरात देवाचा पुरुष होता तेथे ते गेले.
\v 11 ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हा मुली पाणी भरायला बाहेर जाताना त्यांना भेटल्या. ते त्यांना म्हणाले, “द्रष्टा (पाहणारा) येथे आहे काय?”
\s5
\v 12 त्यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तो आहे; पाहा तुमच्या पुढेच तो निघाला आहे. लवकर जा. तो नगरात आला आहे कारण आज लोकांस उंचस्थानी यज्ञ करायचा आहे.
\v 13 तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञाला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.”
\s5
\v 14 मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे.
\s5
\v 15 शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर, परमेश्वराने शमुवेलाला प्रकट केले होते की:
\v 16 “उद्या सुमारे या वेळेस बन्यामिनी प्रांतातून एक पुरुष मी तुझ्याकडे पाठवीन, आणि माझे लोक इस्राएल यांचा राजा होण्यास त्यास तू अभिषेक कर. तो पलिष्ट्यांच्या हातून माझ्या लोकांस सोडवील; कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे.”
\s5
\v 17 शमुवेलाने शौलाला पाहिले, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “पाहा ज्या मनुष्याविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे! हा माझ्या लोकांवर राज्य करील.”
\v 18 मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, “मी तुम्हास विनंती करतो द्रष्याचे (पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.”
\v 19 तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “द्रष्टा (पाहणारा) मीच आहे. माझ्या पुढे उंचस्थानी वर चला, म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल. तुझ्या मनात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊ देईन.
\s5
\v 20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती त्यांची तू काळजी करू नको, कारण ती सांपडली आहेत. आणि इस्राएलाच्या सर्व अभिलाषा कोणाकडे आहेत? तुझ्याकडे व तुझ्या वडिलाच्या सर्व घराण्याकडे की नाही?”
\v 21 तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, “मी बन्यामीनी, इस्राएलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय? आणि बन्यामिनाच्या वंशामध्ये सर्व घराण्यांपेक्षां माझे घराणे लहान आहे की नाही? तर तुम्ही माझ्याशी असे कसे बोलता?”
\s5
\v 22 मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते.
\s5
\v 23 तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.”
\v 24 तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुवेल म्हणाला, “पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे.” कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांस बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.
\s5
\v 25 ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले.
\v 26 ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की, शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले, “मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हा शौल ऊठला, मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.”
\s5
\v 27 ते खाली नगराच्या शेवटास जात असता, शमुवेल शौलाला म्हणाला, “चाकराला आपल्यापुढे चालायला सांग, परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू येथे थोडा थांब. आणि चाकर पुढे गेला.”
\s5
\c 10
\p
\v 1 तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
\v 2 आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?”
\s5
\v 3 मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षारसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.
\v 4 आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील.
\s5
\v 5 त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील.
\v 6 परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील.
\s5
\v 7 आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
\v 8 तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.
\s5
\v 9 आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्यास दुसरे मन दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्यास प्राप्त झाली.
\v 10 जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्यास भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.
\s5
\v 11 तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवक्त्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, “कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवक्त्यांपैकी एक आहे काय?”
\v 12 तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?
\v 13 भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.
\s5
\v 14 नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.”
\v 15 मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.”
\v 16 तेव्हा शौल आपल्या काकाला म्हणाला, “गाढवे सापडली असे त्याने आम्हास उघड सांगितले.” परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्यास सांगितली नाही.
\s5
\v 17 मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले.
\v 18 तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्यांच्या हातातून व तुम्हास पीडणारी जी राज्ये त्या सर्वांच्या हातातून तुम्हास सोडवले.
\v 19 परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.”
\s5
\v 20 शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला.
\v 21 मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.
\s5
\v 22 मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.”
\v 23 मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
\s5
\v 24 तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!”
\s5
\v 25 तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले.
\s5
\v 26 शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या मनाला परमेश्वराने स्पर्श केला, अशी काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली.
\v 27 परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
\s5
\c 11
\s शौल अम्मोन्यांचा पराभव करतो
\p
\v 1 मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”
\v 2 तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.”
\s5
\v 3 तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.”
\s5
\v 4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
\v 5 आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
\s5
\v 6 तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
\v 7 मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
\v 8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
\s5
\v 9 तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले.
\v 10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.”
\s5
\v 11 मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
\s5
\v 12 मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”
\v 13 तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.”
\s5
\v 14 तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.”
\v 15 मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.
\s5
\c 12
\s प्रजेपुढे शमुवेलाचे भाषण
\p
\v 1 शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे.
\v 2 तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे.
\s5
\v 3 मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”
\s5
\v 4 ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.”
\v 5 मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”
\s5
\v 6 शमुवेल लोकांस म्हणाला, “ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.
\v 7 तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हासाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो.
\s5
\v 8 याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.
\v 9 पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापति सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.
\s5
\v 10 तेव्हा ते परमेश्वरास हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वरास सोडून बआल आणि अष्टारोथ या मुर्तींची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
\v 11 मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
\s5
\v 12 परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा होता तरी, तुम्ही मला म्हणालात की, असे नको तर आम्हावर राजा राज्य करो.
\v 13 तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.
\s5
\v 14 जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.
\v 15 परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरूद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरूद्ध होता, तसा तो तुमच्याविरुध्द होईल.
\s5
\v 16 तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
\v 17 आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वरास मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.”
\v 18 तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
\s5
\v 19 तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”
\v 20 मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
\v 21 तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
\s5
\v 22 कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
\v 23 मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्वराच्या विरूद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच राहो. चांगला व सरळ मार्ग मी तुम्हास शिकवीन.
\s5
\v 24 केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण मनाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
\v 25 परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.”
\s5
\c 13
\s पलिष्ट्यांबरोबर युद्ध
\p
\v 1 शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
\v 2 त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
\s5
\v 3 गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”
\v 4 शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
\s5
\v 5 मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
\s5
\v 6 आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
\v 7 कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
\s5
\v 8 शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.
\v 9 तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.
\v 10 त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ति केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्यास भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
\s5
\v 11 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
\v 12 म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत:च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.”
\s5
\v 13 नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
\v 14 परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
\s5
\v 15 मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
\v 16 शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
\s5
\v 17 पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
\v 18 आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
\s5
\v 19 तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.
\v 20 परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
\v 21 नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
\s5
\v 22 आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
\v 23 पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.
\s5
\c 14
\p
\v 1 एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.
\s5
\v 2 शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते;
\v 3 एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते.
\s5
\v 4 योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते.
\v 5 एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते.
\s5
\v 6 योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुनत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.”
\v 7 त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”
\s5
\v 8 तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ.
\v 9 जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा, तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही;
\v 10 परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या, तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.”
\s5
\v 11 मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.”
\v 12 ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”
\s5
\v 13 मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.
\v 14 जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.
\s5
\v 15 छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेहि कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.
\s5
\v 16 तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.
\v 17 मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.
\s5
\v 18 शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता.
\v 19 असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.”
\s5
\v 20 तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.
\v 21 तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले.
\s5
\v 22 जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.
\v 23 असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.
\s5
\v 24 त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांस शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो पुरुष काही खाईल त्यास शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी काही खाल्ले नाही.
\v 25 देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;
\v 26 वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.
\s5
\v 27 परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.
\v 28 तेव्हा लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, “तुझ्या वडिलाने लोकांस शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज काही अन्न् खाईल त्यास शाप लागो.” लोक तर थकले होते.
\s5
\v 29 तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखित करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?
\v 30 जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?”
\s5
\v 31 त्या दिवशी ते मिखमाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते.
\v 32 तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.
\s5
\v 33 तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.”
\v 34 शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.
\s5
\v 35 मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.
\s5
\v 36 मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ.
\v 37 मग शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय?” परंतु त्या दिवशीं देवाने काही उत्तर दिले नाही.
\s5
\v 38 मग शौल म्हणाला, “अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा.
\v 39 कारण परमेश्वर जो इस्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे. म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले, तरी तो खचित मरेल.” पण सर्व लोकांतील कोणीही त्यास उत्तर दिले नाही.
\s5
\v 40 मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.”
\v 41 मग शौल परमेश्वर इस्राएलाचा देव, यास म्हणाला, “खरे ते दाखीव.” तेव्हा योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.
\v 42 मग शौलाने म्हटले, “माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्ठ्या टाका.” तेव्हा योनाथान धरला गेला.
\s5
\v 43 मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.”
\v 44 तेव्हा शौल म्हणाला, “परमेश्वर तसे व त्यापेक्षा अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मरण पावले पाहिजे.”
\s5
\v 45 मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.
\v 46 मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले.
\s5
\v 47 शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.
\v 48 त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातातून सोडवले.
\s5
\v 49 योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.
\v 50 शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापति होता.
\v 51 शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबीएलाचा मुलगा होता.
\s5
\v 52 शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी जबर लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हा तो त्यास आपल्याजवळ ठेवून घेई.
\s5
\c 15
\s शौलाने आज्ञाभंग
\p
\v 1 शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
\v 2 सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
\v 3 आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
\s5
\v 4 मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
\v 5 मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
\s5
\v 6 तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
\v 7 मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
\s5
\v 8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
\v 9 तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
\s5
\v 10 तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
\v 11 “मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
\s5
\v 12 शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुलेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
\v 13 मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
\s5
\v 14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
\v 15 मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
\v 16 तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
\s5
\v 17 मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
\v 18 परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
\v 19 तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
\s5
\v 20 तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
\v 21 परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
\s5
\v 22 शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
\v 23 कारण बंडखोरी जादुगिरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
\s5
\v 24 मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
\v 25 तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
\s5
\v 26 शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
\v 27 शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
\s5
\v 28 तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
\v 29 तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
\s5
\v 30 तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
\v 31 मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
\s5
\v 32 मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
\v 33 तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रीयांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
\s5
\v 34 त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
\v 35 शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
\s5
\c 16
\s राजपदासाठी दाविदाचा तैलाभ्यंग
\p
\v 1 मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.”
\s5
\v 2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.
\v 3 त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर.”
\s5
\v 4 तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?”
\v 5 त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.
\s5
\v 6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.”
\v 7 परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”
\s5
\v 8 मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
\v 9 मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
\v 10 असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.”
\s5
\v 11 तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”
\v 12 मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.”
\s5
\v 13 मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
\s शौलाला रंजवण्यासाठी दावीद वीणा वाजवतो
\s5
\p
\v 14 मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडिले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला.
\v 15 तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे.
\v 16 आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.”
\s5
\v 17 मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.”
\v 18 मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे.
\v 19 मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.”
\s5
\v 20 तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
\v 21 दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.
\s5
\v 22 मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे.
\v 23 मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”
\s5
\c 17
\s दावीद गल्याथाचा वध करतो
\p
\v 1 तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहूदीयातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफस-दम्मीमात आपली छावणी दिली.
\s5
\v 2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली.
\v 3 तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते.
\s5
\v 4 गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती.
\v 5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते.
\s5
\v 6 त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती.
\v 7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता.
\s5
\v 8 तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, “तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक पुरुष निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो.
\v 9 जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.”
\s5
\v 10 आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”
\v 11 जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले.
\s5
\v 12 त्या वेळी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी इशाय नामे मनुष्याचा पुत्र होता; त्या मनुष्यास तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता.
\v 13 इशायाचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलीयाब व दुसऱ्याचे अबीनादाब व तिसऱ्याचे शम्मा.
\s5
\v 14 दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते.
\v 15 दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेंढरे राखावयास जात येत असे.
\v 16 तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.
\s5
\v 17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा.
\v 18 हे लोण्याचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण.
\s5
\v 19 तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.”
\v 20 दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला.
\v 21 इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या.
\s5
\v 22 तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला.
\v 23 तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले.
\v 24 सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले.
\s5
\v 25 मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.”
\s5
\v 26 तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहीलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?”
\v 27 मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल.
\s5
\v 28 त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
\v 29 तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?”
\v 30 मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले.
\s5
\v 31 जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्यास बोलाविले.
\v 32 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.”
\v 33 तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, “त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तिमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा पुरुष आहे.”
\s5
\v 34 मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले.
\v 35 मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले.
\s5
\v 36 तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”
\s5
\v 37 आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”
\v 38 तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले.
\s5
\v 39 दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “याच्याने मला चालवत नाही. कारण त्यास त्याची सवय नव्हती.” मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली.
\v 40 त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
\s5
\v 41 तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला.
\v 42 त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता.
\v 43 तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला.
\s5
\v 44 त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, “माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पाखरांना आणि रानातील वनपशूंना देतो.”
\v 45 दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, “तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे.
\s5
\v 46 परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे.
\v 47 हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल.”
\s5
\v 48 मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला.
\v 49 दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला.
\s5
\v 50 असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती.
\v 51 तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले.
\s5
\v 52 तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले.
\v 53 मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.
\v 54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरुशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली.
\s5
\v 55 शौलाने दावीदाला त्या पलिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, “हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे?” मग अबनेराने म्हटले, “हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.”
\v 56 तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?”
\s5
\v 57 त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते.
\v 58 तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”
\s5
\c 18
\s योनाथान आणि दावीद ह्यांच्यामधील करार
\p
\v 1 तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.
\v 2 त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.
\s5
\v 3 मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
\v 4 योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला.
\s5
\v 5 तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.
\s शौलाच्या अंतःकरणात दाविदाविषयी मत्सर
\s5
\p
\v 6 मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.
\v 7 त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”
\s5
\v 8 तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?”
\v 9 त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला.
\s5
\v 10 मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता.
\v 11 तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
\v 12 मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
\s5
\v 13 शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
\v 14 दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
\s5
\v 15 जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला.
\v 16 परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
\s5
\v 17 मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.
\v 18 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?”
\s5
\v 19 परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.
\s5
\v 20 तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करीत असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले.
\v 21 तेव्हा शौलाने म्हटले, “मी ती त्यास देईन आणि ती त्यास पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला दुसऱ्यांदा म्हटले की, तू माझा जावई होशील.”
\s5
\v 22 शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”
\s5
\v 23 शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.
\v 24 मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्यास सांगितले.
\s5
\v 25 तेव्हा शौलाने म्हटले, “तुम्ही दावीदास असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही.” परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते.
\v 26 मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.
\s5
\v 27 नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्यास पत्नी करून दिली.
\v 28 मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.
\v 29 तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.
\s5
\v 30 नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.
\s5
\c 19
\s शौल दाविदाचा वध करू पाहतो
\p
\v 1 यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती.
\v 2 योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.
\v 3 मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.”
\s5
\v 4 तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत.
\v 5 त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?”
\s5
\v 6 तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहीली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.”
\v 7 मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला.
\s5
\v 8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले.
\v 9 मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता.
\s5
\v 10 तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला.
\v 11 मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.”
\s5
\v 12 तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले.
\v 13 मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.
\s5
\v 14 जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु:खनाईत आहे.”
\v 15 मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.”
\s5
\v 16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.
\v 17 तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, “तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले?” मग मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे?”
\s5
\v 18 याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.
\v 19 मग शौलाला कोणी असे सांगितले की, पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे.
\v 20 तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करीत असता आणि शमुवेल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले.
\s5
\v 21 मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.
\v 22 तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” मग कोणी एकाने म्हटले, “पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.”
\s5
\v 23 तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.
\v 24 मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय?
\s5
\c 20
\s दावीद आणि योनाथान ह्यांची मैत्री
\p
\v 1 दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”
\v 2 तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.”
\s5
\v 3 मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.”
\s5
\v 4 तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला “जे काही तुझा जीव इच्छितो ते मी तुझ्यासाठी करीन.”
\v 5 दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.
\s5
\v 6 जर तुझ्या वडिलाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.
\v 7 जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.
\s5
\v 8 यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?”
\v 9 तेव्हा योनाथान म्हणाला, “तुला असे न होवो माझ्या वडिलाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?”
\s5
\v 10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?”
\v 11 योनाथान दावीदाला म्हणाला, “चल आपण रानात जाऊ.” मग ते दोघे बाहेर रानात गेले.
\s5
\v 12 योनाथान दावीदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय?
\v 13 जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर परमेश्वर देव योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. परमेश्वर जसा माझ्या बापा बरोबर होता तसा तो तुझ्या बरोबर असो.”
\s5
\v 14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही,
\v 15 तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;
\v 16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.”
\s5
\v 17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीति केली.
\v 18 योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील.
\v 19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा.
\s5
\v 20 मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन.
\v 21 मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे.
\s5
\v 22 परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे.
\v 23 आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.”
\s5
\v 24 मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला.
\v 25 राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.
\s5
\v 26 तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.
\v 27 मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.”
\s5
\v 28 तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
\v 29 तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.”
\s5
\v 30 तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?
\v 31 कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्यास माझ्याकडे आण, कारण त्यास खचित मरण पावले पाहिजे.”
\s5
\v 32 मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?”
\v 33 तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.
\v 34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.
\s5
\v 35 मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला.
\v 36 तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला.
\v 37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?”
\s5
\v 38 योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “धाव लवकर पळ थांबू नको.”
\v 39 मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.
\v 40 योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्यास म्हटले, “चल ही उचलून घेऊन नगरात जा.”
\s5
\v 41 पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.
\v 42 योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.
\s5
\c 21
\s दावीद शौलापुढून पळून जातो
\p
\v 1 दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”
\v 2 तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.
\s5
\v 3 तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.”
\v 4 तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.”
\s5
\v 5 दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.”
\v 6 मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.
\s5
\v 7 त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक पुरुष तेथे परमेश्वराच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.
\s5
\v 8 दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ भाला किंवा तलवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.”
\v 9 तेव्हा याजक म्हणाला, “गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तलवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.”
\s5
\v 10 त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
\v 11 तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”
\s5
\v 12 दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
\v 13 मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
\s5
\v 14 तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे?
\v 15 माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”
\s5
\c 22
\p
\v 1 मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.
\v 2 कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.
\s5
\v 3 दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-वडीलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.”
\v 4 मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
\v 5 मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.
\s नोब येथील याजकांचा शौल वध करतो
\s5
\p
\v 6 दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते.
\s5
\v 7 तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय?
\v 8 म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखि:त होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.”
\s5
\v 9 मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले;
\v 10 त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”
\s5
\v 11 तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.
\v 12 तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.”
\v 13 शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?”
\s5
\v 14 तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.
\v 15 आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.”
\s5
\v 16 राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”
\v 17 मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.
\s5
\v 18 मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.
\v 19 त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बाळके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.
\s5
\v 20 तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला.
\v 21 शौलाने परमेश्वराच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले.
\s5
\v 22 तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.
\v 23 माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.”
\s5
\c 23
\s कईलात आणि रानात दावीद लपून राहतो
\p
\v 1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत.
\v 2 म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
\s5
\v 3 तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!”
\v 4 मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”
\s5
\v 5 मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.
\v 6 त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.
\s5
\v 7 दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; “तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.”
\v 8 मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांस लढाईला बोलावले.
\v 9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”
\s5
\v 10 मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;
\v 11 तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”
\s5
\v 12 मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
\s5
\v 13 मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.
\v 14 आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.
\s5
\v 15 आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;
\v 16 शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला.
\s5
\v 17 तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”
\v 18 तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
\s5
\v 19 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
\v 20 तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.”
\s5
\v 21 तेव्हा शौल म्हणाला, “तुम्हास परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे.
\v 22 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.
\v 23 तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हाबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्यास यहूदाच्या सर्व हजारांतून त्यास हुडकून काढीन.”
\s5
\v 24 मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती.
\v 25 शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.
\s5
\v 26 शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.
\v 27 परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे.
\s5
\v 28 तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.
\v 29 मग दावीद तेथून वर जाऊन एन-गेदीच्या गडामध्ये राहिला.
\s5
\c 24
\s एन-गेदी येथे दावीद शौलाला जीवदान देतो
\p
\v 1 असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे.
\v 2 तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
\s5
\v 3 आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
\v 4 तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
\s5
\v 5 त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
\v 6 आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”
\v 7 असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
\s5
\v 8 नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
\v 9 मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
\s5
\v 10 पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
\v 11 आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
\s5
\v 12 माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
\v 13 दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
\s5
\v 14 इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या!
\v 15 यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”
\s5
\v 16 असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला
\s5
\v 17 आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
\v 18 तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.
\s5
\v 19 कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
\v 20 आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
\s5
\v 21 म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.”
\v 22 तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.
\s5
\c 25
\s दावीद आणि अबीगईल
\p
\v 1 शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.
\s5
\v 2 मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
\v 3 त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.
\s5
\v 4 नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.
\v 5 मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला, “कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्यास सलाम करा.
\v 6 त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.
\s5
\v 7 तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.
\v 8 तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतील; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो”
\s5
\v 9 मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.
\v 10 तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.
\v 11 माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”
\s5
\v 12 मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्यास जसेच्या तसे सांगितले.
\v 13 तेव्हा दावीद आपल्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही आपापली तलवार कंबरेस बांधा.” मग प्रत्येकाने आपआपली तलवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तलवार कंबरेस बांधली आणि दावीदामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.
\s5
\v 14 नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
\v 15 ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहीलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.
\s5
\v 16 आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.
\v 17 तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.”
\s5
\v 18 अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षारसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.
\v 19 तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.
\s5
\v 20 मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.
\s5
\v 21 दावीदाने म्हटले होते की, “रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे.
\v 22 जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”
\s5
\v 23 अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले.
\v 24 तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका.
\s5
\v 25 मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही.
\v 26 तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.
\s5
\v 27 आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.
\v 28 मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही.
\s5
\v 29 जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.
\s5
\v 30 असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील.
\v 31 तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.”
\s5
\v 32 तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.
\v 33 तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो.
\s5
\v 34 कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्राएलाचा देव परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.”
\v 35 मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, “तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.”
\s5
\v 36 मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.
\s5
\v 37 मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.
\v 38 नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.
\s5
\v 39 नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.
\v 40 आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.”
\s5
\v 41 तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”
\v 42 मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली.
\s5
\v 43 दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही पत्नी करून घेतले; त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या.
\v 44 शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची पत्नी गल्लीमातील लईशाचा मुलगा पालती याला दिली होती.
\s5
\c 26
\s जीफ रानात दावीद शौलाला जीवदान देतो
\p
\v 1 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?”
\v 2 तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
\s5
\v 3 शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
\v 4 म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले.
\s5
\v 5 मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
\s5
\v 6 तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”
\v 7 मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
\v 8 तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
\s5
\v 9 पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?”
\v 10 दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
\s5
\v 11 मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
\v 12 तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
\s5
\v 13 नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
\v 14 तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
\s5
\v 15 मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
\v 16 ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?”
\s5
\v 17 तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”
\v 18 तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
\s5
\v 19 तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
\v 20 तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
\s5
\v 21 तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.”
\s5
\v 22 मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
\v 23 परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
\s5
\v 24 पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.”
\v 25 तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.
\s5
\c 27
\s दाविदाचे पलिष्ट्यांमध्ये वास्तव्य
\p
\v 1 दावीद आपल्या मनात म्हणाला, “कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.”
\s5
\v 2 मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला.
\v 3 तेव्हा दावीद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कुटुंबासहीत गथात आखीशा जवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी स्त्रिया ईज्रेलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची पत्नी होती ती कर्मेलीण अबीगईल या होत्या.
\v 4 आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही.
\s5
\v 5 दावीद आखीशाला म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे रहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का रहावे?”
\v 6 तेव्हा आखीशाने त्यास सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यंत यहूदाच्या राजांकडे आहे.
\v 7 दावीद पलिष्ट्यांच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते.
\s5
\v 8 दावीद आणि त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून गेशूरी, गिरजी, आणि अमालेकी यांच्यावर स्वाऱ्या केल्या; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश आहे त्यामध्ये हि राष्ट्रे पूर्वीपासून वसली होती.
\v 9 दावीदाने त्या प्रांतातले पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नाही; मग मेंढरे गुरे व गाढवे उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखीशाकडे परत आला.
\s5
\v 10 तेव्हा आखीश म्हणाला, “आज तू कोणावर घाला घातलास?” दावीद म्हणाला, “यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर.”
\s5
\v 11 दावीदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जीवंत ठेवली नाही. त्याने म्हटले, “त्यांना जिवंत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की, दावीदाने असे असे केले आहे.” आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच होती.
\v 12 आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटले, “त्याने आपल्या इस्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्वकाळ माझा दास होऊन राहील.”
\s5
\c 28
\p
\v 1 त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.”
\v 2 दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.”
\s शौल आणि एन-दोर येथील भूतविद्याप्रवीण स्त्री
\r अनु. 18:9-14
\s5
\p
\v 3 शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
\v 4 पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
\s5
\v 5 शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले.
\v 6 शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
\v 7 मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
\s5
\v 8 मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
\v 9 तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”
\v 10 तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.”
\s5
\v 11 मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.”
\v 12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”
\s5
\v 13 राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.”
\v 14 मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
\s5
\v 15 मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.”
\s5
\v 16 तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
\v 17 जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
\s5
\v 18 कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
\v 19 परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
\s5
\v 20 तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ति राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
\v 21 मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
\s5
\v 22 तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही हि आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.”
\v 23 परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.
\s5
\v 24 त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
\v 25 मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.
\s5
\c 29
\s पलिष्टी दाविदावर विश्वास ठेवत नाहीत
\p
\v 1 मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली.
\v 2 पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली.
\s5
\v 3 तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, “हे इब्री येथे काय करतात?” मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.”
\s5
\v 4 मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्य्ट्यांचे सरदार त्यास म्हणाले, “जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही?
\s5
\v 5 शौलाने हजारांना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?”
\s5
\v 6 मग आखीशाने दावीदाला बोलावून त्यास म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस.
\v 7 तर तू पलिष्ट्यांच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.”
\s5
\v 8 तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, “मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?”
\v 9 तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत.
\s5
\v 10 तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.”
\v 11 मग पलिष्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.
\s5
\c 30
\s दावीद अमालेक्यांचा पराभव करतो
\p
\v 1 असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते.
\v 2 त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले.
\s5
\v 3 तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.
\v 4 तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.
\s5
\v 5 दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या.
\v 6 तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले.
\s5
\v 7 मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.
\v 8 दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.”
\s5
\v 9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.
\v 10 तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना.
\s5
\v 11 रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले.
\v 12 मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता.
\s5
\v 13 तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.
\v 14 आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.”
\s5
\v 15 मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.”
\s5
\v 16 त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती.
\v 17 दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही.
\s5
\v 18 जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या.
\v 19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.
\v 20 अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
\s5
\v 21 मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले.
\v 22 तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.”
\s5
\v 23 तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.
\v 24 या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.”
\v 25 त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली.
\s5
\v 26 दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.”
\v 27 जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना;
\v 28 जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना,
\s5
\v 29 जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना,
\v 30 जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना,
\v 31 आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.
\s5
\c 31
\s शौल आणि त्याचे पुत्र ह्यांचा मृत्यू
\r 1इति.10:1-14
\p
\v 1 पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारून पडले.
\v 2 पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे पुत्र योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.
\v 3 शौलावर लढाई भारी पडली व धनुर्धाऱ्यांनी त्यास गाठले. आणि धनुर्धाऱ्यांमुळे तो फार संकटात पडला.
\s5
\v 4 तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तू आपली तलवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तलवार घेऊन तिच्यावर पडला.
\v 5 शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याच्याप्रमाणेच आपल्या तलवारीवर पडून मेला.
\v 6 असे त्या दिवशी शौल, त्याचे तिघे पुत्र, व त्याचा शस्त्रवाहक आणि त्याचे सर्व लोक एकदम मरण पावले.
\s5
\v 7 इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यामध्ये राहिले.
\v 8 दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले सापडले.
\s5
\v 9 तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशात चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांस हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.
\v 10 त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या मंदिरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले.
\s5
\v 11 पलिष्ट्यांनी शौलाला जे केले त्याविषयी जेव्हा याबेश-गिलादाच्या रहिवाश्यांनी ऐकले;
\v 12 तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.
\v 13 मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला.