mr_ulb/06-JOS.usfm

1186 lines
241 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id JOS JOS-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h यहोशवा
\toc1 यहोशवाचे पुस्तक
\toc2 यहोशवा
\toc3 jos
\mt1 यहोशवा
\mt2 The Book of
\is लेखक
\ip यहोशवाचे पुस्तक स्पष्टपणे त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. नूनाचा पुत्र यहोशवा, कदाचित मोशेचा उत्तराधिकारी, इस्त्राएलचा नेता म्हणून असण्याची शक्यता जास्त आहे. यहोशवाच्या मृत्यूनंतर या पुस्तकाच्या नंतरचे भाग किमान एका अन्य व्यक्तीने लिहिले होते. यहोशवाच्या मृत्यूनंतर अनेक विभाग संपादित/संकलित केले गेले असावेत याची देखील शक्यता आहे. या पुस्तकात यहोशवाच्या नेतृत्वाखाली मोशेच्या मृत्यूनंतर प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत विजय प्राप्त होतो.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 1405-1385
\ip या भागाची संभाव्य शक्यता कनानमधून उगम पावते जिथे यहोशवाने भूमीवर विजय मिळवला होता.
\is प्राप्तकर्ता
\ip यहोशवा हे पुस्तक इस्राएलमधील लोकांना आणि पवित्र शास्त्रामधील भावी वाचकांना लिहिले होते.
\is हेतू
\ip यहोशवाचे पुस्तक, देवाने प्रतिज्ञावत दिलेली जमीन जिंकण्यासाठी लागलेल्या सैन्य मोहिमेचा आढावा प्रदान करते. मिसरापासून निर्गमपर्यंत आणि नंतर चाळीस वर्षे अरण्याच्या भटकंतीनंतर, नवनिर्मित राष्ट्र आता प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास, रहिवासींवर विजय मिळविण्यास व प्रांतावर कब्जा करण्यास सज्ज झाले आहे. यहोशवाच्या पुस्तकात हे दाखवून दिले आहे की या कराराच्या आधारावर निवडलेले लोक त्याच्या प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत स्थापन झाले. येथे देशभक्तीबरोबर त्यांच्याशी केलेल्या कराराबद्दल परमेश्वराच्या निष्ठेची नोंद सापडली आहे आणि या देशाला प्रथम सीनायमध्ये दिले गेले होते. भविष्यातील पिढ्यांमधील निष्ठा, एकता आणि उच्च मनोबल यासाठी देवाच्या लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी हे शास्त्रवचन आहे.
\is विषय
\ip विजय
\iot रूपरेषा
\io1 1. प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश (1:1-5:12)
\io1 2. जमीन काबीज करणे (5:13-12:24)
\io1 3. जमीनिची वाटणी करणे (अध्याय 13-21)
\io1 4. अन्यजातीय ऐक्य आणि परमेश्वराप्रती निष्ठा (अध्याय 22-24)
\s5
\c 1
\s कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी
\p
\v 1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,
\v 2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
\v 3 मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
\s5
\p
\v 4 रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल.
\v 5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.
\s5
\p
\v 6 बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
\v 7 मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
\s5
\p
\v 8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
\v 9 मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
\s5
\p
\v 10 मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,
\v 11 “छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”
\s5
\p
\v 12 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,
\v 13 “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
\s5
\p
\v 14 या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र-मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी रहावे, पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.
\v 15 परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”
\s5
\p
\v 16 तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.
\v 17 जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.
\v 18 जो कोणी तुझ्या आज्ञेविरूद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.”
\s5
\c 2
\s यरीहो येथे दोन हेर पाठवले जातात
\r इब्री. 11:31
\p
\v 1 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.
\v 2 मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
\v 3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”
\s5
\p
\v 4 त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, “पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही.
\v 5 अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.”
\s5
\p
\v 6 पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते.
\v 7 त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले.
\s5
\p
\v 8 इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली,
\v 9 ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे,
\s5
\p
\v 10 कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.
\v 11 हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
\s5
\p
\v 12 मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या,
\v 13 तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या,”
\s5
\p
\v 14 तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही, तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”
\s5
\p
\v 15 तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरले, कारण तिचे घर गावकुसास लागून होते.
\v 16 तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा, तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा.”
\v 17 ते पुरुष तिला म्हणाले, “तू आमच्याकडून जी शपथ घेतली आहे तिच्याबाबतीत आम्हांला दोष न लागो,
\s5
\p
\v 18 मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरविले, तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर.
\v 19 कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.
\s5
\p
\v 20 जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू घेतली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.”
\v 21 ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.
\s5
\p
\v 22 ते जाऊन डोंगरास पोहचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.
\s5
\p
\v 23 मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्यास सांगितले.
\v 24 ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”
\s5
\c 3
\s इस्त्राएल लोक यार्देन नदी ओलांडतात
\p
\v 1 यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहिले.
\s5
\p
\v 2 तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्य भागामधून गेले.
\v 3 व त्यांनी लोकांस अशी आज्ञा केली की, “आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश याजक ऊचलून घेऊन जात असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा;
\v 4 पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात
\f + सुमारे 1 किलोमीटर
\f* अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.”
\s5
\p
\v 5 मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.”
\v 6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.
\s5
\v 7 परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.
\v 8 कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”
\s5
\p
\v 9 मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका!
\v 10 अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.
\v 11 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.
\s5
\p
\v 12 तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;
\v 13 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.”
\s5
\p
\v 14 लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.
\v 15 कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.)
\v 16 तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
\s5
\p
\v 17 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
\s5
\c 4
\s यार्देन नदीतून घेतलेले बारा धोंडे
\p
\v 1 सर्व लोक यार्देन पार करून गेले, तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
\v 2 प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड,
\v 3 आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”
\s5
\p
\v 4 मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले.
\v 5 यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,
\s5
\p
\v 6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?
\v 7 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले; कराराचा कोश यार्देन पार करून जात असताना यार्देनेचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी सर्वकाळ स्मारक होतील.”
\s5
\p
\v 8 यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून बारा धोंडे उचलून इस्राएल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले.
\v 9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.
\s5
\p
\v 10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.
\v 11 झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.
\s5
\v 12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे गेले,
\v 13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले.
\v 14 त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
\v 16 “कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.”
\s5
\p
\v 17 त्याप्रमाणे, यहोशवाने याजकांना यार्देनेतून बाहेर येण्याची आज्ञा केली.
\v 18 मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
\s5
\p
\v 19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला.
\v 20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले.
\v 21 तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?
\s5
\p
\v 22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले.
\v 23 आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले.
\v 24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”
\s5
\c 5
\s गिलगाल येथे वल्हांडण सण पाळणे व सुंता
\p
\v 1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.
\s5
\p
\v 2 त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”
\v 3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ
\f + अर्थ-अग्रत्वच्या
\f* हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली.
\s5
\p
\v 4 यहोशवाने त्यांची सुंता केली याचे कारण हे की, युद्धास लायक असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.
\v 5 मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;
\s5
\v 6 कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, त्या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश
\f + सुपीक जमीन
\f* मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता, तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही.
\v 7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते.
\s5
\p
\v 8 सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.
\v 9 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल
\f + अर्थ-लोटून देणे
\f* म्हणतात.
\s5
\p
\v 10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.
\v 11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला.
\s5
\p
\v 12 त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
\s यहोशवा आणि तलवार उपसून उभा राहिलेला पुरुष
\s5
\p
\v 13 यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
\s5
\p
\v 14 तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?”
\v 15 परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.
\s5
\c 6
\s यरीहोचा पाडाव
\p
\v 1 इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.
\v 2 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.
\s5
\v 3 तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.
\v 4 सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,
\s5
\v 5 नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”
\s5
\v 6 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.”
\v 7 तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.”
\s5
\v 8 यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.
\v 9 सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते.
\s5
\v 10 मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.”
\v 11 या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला.
\s5
\v 12 यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला.
\v 13 सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते.
\v 14 ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.
\s5
\v 15 सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या.
\v 16 सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;
\s5
\v 17 हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.
\v 18 तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.
\v 19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”
\s5
\v 20 तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.
\v 21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.
\s5
\v 22 तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.”
\s5
\v 23 तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई-वडीलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
\v 24 मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.
\s5
\v 25 यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
\s5
\v 26 त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
\v 27 याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.
\s5
\c 7
\s आखानाचे पातक
\p
\v 1 परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
\s5
\v 2 बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
\v 3 नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.”
\s5
\v 4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला.
\v 5 आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत
\f + अर्थ-दगडाची खाण
\f* त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.
\s5
\v 6 यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.
\v 7 मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते!
\s5
\v 8 हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू?
\v 9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?”
\s5
\v 10 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
\v 11 इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.
\v 12 त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही.
\s5
\v 13 तर उठ, लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.”
\s5
\v 14 सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर राहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे;
\v 15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.
\s5
\v 16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला.
\v 17 मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले.
\v 18 मग त्या घराण्यातील एकएका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहूदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान हा पकडला गेला.
\s5
\v 19 तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबुली कर; कृपा करून तू काय केले ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नको.”
\v 20 आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे:
\v 21 लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रुपे त्याच्या खाली आहे.”
\s5
\v 22 तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या व त्याच्या खाली रुपे होते.
\v 23 त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.
\s5
\v 24 त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याची मुले व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.
\s5
\v 25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.
\v 26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे
\f + अर्थ-त्रास देणारे
\f* खोरे असे म्हणतात.
\s5
\c 8
\s आय नगराचा पाडाव आणि नाश
\p
\v 1 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नको, धैर्यहीन होऊ नको; ऊठ, सर्व लढाई करणाऱ्या लोकांस बरोबर घे. आय नगरापर्यंत जा. पाहा, आयचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
\v 2 यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर; मात्र त्यातील लूट व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या मागे सैन्याला दबा धरून बसव.”
\s5
\v 3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले.
\v 4 त्याने त्यांना अशी आज्ञा केली, “पाहा, नगराच्या मागे जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
\s5
\v 5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ. आणि ते पूर्वीप्रमाणे आम्हावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापुढून पळायला लागू.
\v 6 असे आम्ही त्यांना पळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल, ‘पहिल्याप्रमाणेच आपल्याला घाबरून हे पळ काढीत आहेत. याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळायला लागू;
\v 7 मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.
\s5
\v 8 तुम्ही ते नगर काबीज करताच त्यास आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे पालन करा; पाहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे.”
\v 9 मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.
\s5
\v 10 यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि त्याने सैन्य तयार केले, यहोशवा आणि इस्राएलाचे वडील आणि त्यांनी आय नगरावर हल्ला केला.
\v 11 त्यांच्याबरोबर सर्व योद्धे लढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर यांच्यामध्ये एक दरी होती.
\v 12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले.
\s5
\v 13 त्याने नगरांच्या उत्तरेच्या ठिकाणी मुख्य सैन्य आणि पश्चिमेकडे सैन्याचे रक्षण करणारे ठेवून यहोशवा त्या रात्री त्या दरीत राहिला.
\v 14 आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहीत नव्हते.
\s5
\v 15 यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर पराजित झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळायला लागले.
\v 16 त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय नगरातल्या सर्व लोकांस एकत्र बोलवण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले.
\v 17 इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर पूर्ण सोडून देऊन आणि उघडे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
\s5
\v 18 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे कर, कारण ते मी तुझ्या हाती देईन” त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे केली.
\v 19 त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्या सैन्याने वेगाने धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.
\s5
\v 20 आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पहिले तो नगरातून निघणारा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे निसटून जाण्याचा मार्गच राहिला नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले.
\v 21 दबा धरणाऱ्यांनी नगर घेतले आहे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलांनी पाहिले तेव्हा ते मागे उलटून आय नगराच्या मनुष्यांवर तुटून पडले.
\s5
\v 22 आणि दुसरे इस्राएल सैन्य जे नगरात होते ते त्यांच्यावर चाल करून बाहेर आले. आय नगराची माणसे इस्राएलाच्या मध्ये सापडली; कित्येक इस्राएल इकडे व कित्येक तिकडे होते; आणि त्यांनी त्यांना असे मारले की त्यांच्यातला कोणी वाचला किंवा निसटून गेला नाही.
\v 23 त्यांनी आय नगराच्या राजाला पकडून जिवंत ठेवले आणि त्यास यहोशवाकडे आणले.
\s5
\v 24 ज्या मोकळ्या रानात त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता तेथे इस्राएलांनी आय नगराच्या रहिवाश्यांचा संहार केला आणि त्यांनी त्या सर्वांचा तलवारीच्या धारेने नाश केला. मग इस्राएल लोक आय नगरात परत आले. त्यावर त्यांनी तलवारीच्या धारेने हल्ला केला.
\v 25 त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली, त्यामध्ये सर्व स्त्रिया आणि पुरुष मिळून ती बारा हजार होती.
\v 26 आय येथील सर्व रहिवाश्यांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.
\s5
\v 27 परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरांतली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.
\v 28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे.
\s5
\v 29 आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिली व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून काढून नगराच्या वेशीजवळ फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली. ती आजपर्यंत तशीच आहे.
\s एबाल डोंगरावर लिहिण्यात आलेले नियम
\r अनु. 27:4,5
\s5
\p
\v 30 मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
\v 31 परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्राएल लोकांस आज्ञा केल्याप्रमाणे, “अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली.” त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वरास होमबली अर्पिले आणि शांत्यर्पणाचे यज्ञ केले.
\v 32 तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने दगडांच्या शिळांवर मोशेने दिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहिली.
\s5
\v 33 परमेश्वराचा कराराचा कोश वाहणाऱ्या लेवी याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अधिकारी आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांस प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरीज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.
\s5
\v 34 त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाशी सर्व वचने त्याने वाचून दाखवली.
\v 35 इस्राएलाच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.
\s5
\c 9
\s गिबोनाच्या रहिवाशांची फसवेगिरी
\p
\v 1 मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.
\v 2 त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली.
\s5
\v 3 यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,
\v 4 तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली,
\f + त्यांनी स्वतःसाठी शिधासामग्री घेतली
\f* आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षारसाचे बुधले घेतले;
\v 5 त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुनेपुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या.
\s5
\v 6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.”
\v 7 इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”
\v 8 ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?”
\s5
\v 9 त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे;
\v 10 आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.
\s5
\v 11 तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.”
\v 12 या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.
\v 13 हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
\s5
\v 14 तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.
\v 15 मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
\v 17 नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.
\s5
\v 18 पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.
\v 19 परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
\s5
\v 20 त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
\v 21 नेत्यांनी लोकांस सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.
\s5
\v 22 यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला का फसवले?
\v 23 म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन रहाल.”
\s5
\v 24 त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
\v 25 आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
\s5
\v 26 त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,
\v 27 यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
\s5
\c 10
\s अमोरी लोकांचा पराभव
\p
\v 1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
\v 2 तेव्हा यरुशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते.
\s5
\v 3 मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
\v 4 “वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.”
\s5
\v 5 तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
\s5
\v 6 हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.
\v 7 तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.”
\s5
\v 8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
\s5
\v 9 यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
\v 10 आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
\s5
\v 11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
\s5
\v 12 परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”
\s5
\v 13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
\v 14 असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
\s5
\v 15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
\v 16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
\v 17 मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
\s5
\v 18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
\v 19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
\s5
\v 20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
\v 21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
\s5
\v 22 मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
\v 23 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
\s5
\v 24 ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
\v 25 यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
\s5
\v 26 नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
\v 27 सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
\s5
\v 28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
\s5
\v 29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;
\v 30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
\s5
\v 31 त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.
\v 32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.
\s5
\v 33 तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
\s5
\v 34 मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
\v 35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
\s5
\v 36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
\v 37 त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
\s5
\v 38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.
\v 39 त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
\s5
\v 40 या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.
\v 41 यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
\s5
\v 42 हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
\v 43 मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.
\s5
\c 11
\s याबीन राजा व त्याच्याशी दोस्ती करणारे राजे ह्यांचा पराभव
\p
\v 1 जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,
\v 2 आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,
\v 3 आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रातांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
\s5
\v 4 तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
\v 5 या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
\s5
\v 6 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
\v 7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
\s5
\v 8 परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
\v 9 परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
\s5
\v 10 त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
\v 11 तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
\s5
\v 12 परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
\v 13 टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
\s5
\v 14 या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
\v 15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
\s यहोशवा सबंध देश पादाक्रांत करतो
\s5
\p
\v 16 अशा प्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलूख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
\v 17 तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
\s5
\v 18 त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
\v 19 गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
\v 20 कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती, अशासाठी की त्यांनी इस्राएलाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला अज्ञापिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याच्या निर्णयापर्यंत, त्याने त्यांच्या दया-याचनेची गय केली नाही.
\s5
\v 21 तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
\v 22 इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.
\s5
\v 23 परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांस वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.
\s5
\c 12
\s मोशेने पराभूत केलेले राजे
\r गण. 21:21-35
\p
\v 1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:
\v 2 अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
\s5
\v 3 किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, आराब समुद्राच्या
\f + क्षार किंवा मृत समुद्र
\f* पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.
\v 4 बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.
\v 5 तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
\s5
\v 6 परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.
\s यहोशवाने पराभूत केलेले राजे
\s5
\p
\v 7 यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
\v 8 डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.
\s5
\v 9 या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,
\v 10 यरुशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
\v 11 यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
\v 12 एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
\s5
\v 13 दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
\v 14 हर्माचा राजा, अरादचा राजा,
\v 15 लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
\v 16 मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
\s5
\v 17 तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
\v 18 अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
\v 19 मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
\v 20 शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
\s5
\v 21 तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
\v 22 केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
\v 23 नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
\v 24 तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते.
\s5
\c 13
\s काबीज करायचा उरलेला प्रदेश
\p
\v 1 आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
\s5
\v 2 हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
\v 3 मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
\s5
\v 4 दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
\v 5 आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
\s5
\v 6 लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.
\v 7 तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
\s मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 8 मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
\v 9 आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;
\s5
\v 10 आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
\v 11 गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
\v 12 म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
\s5
\v 13 तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
\s5
\v 14 लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; “इस्राएलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे,” तेच त्यांचे वतन आहे;
\s5
\v 15 परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
\v 16 आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
\s5
\v 17 हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ-बआल व बेथ-बालमोन;
\v 18 आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
\v 19 आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
\s5
\v 20 बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
\v 21 आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.
\s5
\v 22 आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.
\v 23 तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.
\s5
\v 24 गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
\v 25 आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
\v 26 आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;
\s5
\v 27 आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
\v 28 गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
\s5
\v 29 आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
\v 30 की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;
\v 31 आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
\s5
\v 32 यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.
\v 33 लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.
\s5
\c 14
\s चिठ्ठ्या टाकून कनान देशात वाटणी
\p
\v 1 आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यांनी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.
\s5
\v 2 परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशांविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्ठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले.
\v 3 कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही.
\v 4 वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.
\v 5 जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला.
\s कालेबाला हेब्रोन देण्यात येते
\s5
\p
\v 6 आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, “कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा मनुष्य मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहीतच आहे.
\v 7 परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेश-बर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्यास कळवली.
\s5
\v 8 पण माझे बंधू जे माझ्याबरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो.
\v 9 तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले ती खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन अशी सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास.
\s5
\v 10 तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे.
\v 11 जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे.
\s5
\v 12 तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.”
\s5
\v 13 तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले
\v 14 यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला.
\v 15 पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा मनुष्य होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.
\s5
\c 15
\s यहूदाला देण्यात आलेला प्रदेश
\p
\v 1 यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
\v 2 आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
\s5
\v 3 ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
\v 4 आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
\s5
\v 5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
\v 6 मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
\s5
\v 7 मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
\v 8 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरुशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
\s5
\v 9 मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
\v 10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
\s5
\v 11 मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
\v 12 आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
\s कालेब हा हेब्रोन व दबीर ही नगरे हस्तगत करतो
\r शास्ते 1:11-15
\s5
\p
\v 13 आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
\v 14 मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
\v 15 नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
\s5
\v 16 तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
\v 17 तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
\s5
\v 18 आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
\s5
\v 19 अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
\s यहूदाला मिळालेली नगरे
\s5
\p
\v 20 यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
\s5
\v 21 यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
\v 22 कीना व दीमोना व अदादा;
\v 23 आणि केदेश व हासोर व इथनान;
\v 24 जीफ, टेलेम व बालोथ;
\s5
\v 25 हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
\v 26 अमाम व शमा व मोलादा;
\v 27 आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
\v 28 आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
\s5
\v 29 बाला, ईयीम व असेम;
\v 30 आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
\v 31 आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
\v 32 आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
\s5
\v 33 तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
\v 34 जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
\v 35 यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
\v 36 आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
\s5
\v 37 सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
\v 38 दिलन, मिस्पा व यकथेल;
\v 39 लाखीश व बसकाथ व एग्लोन;
\s5
\v 40 कब्बोन व लहमाम व किथलीश;
\v 41 गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
\s5
\v 42 लिब्ना व एथेर व आशान;
\v 43 इफ्ताह व अष्णा व नजीब;
\v 44 आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
\s5
\v 45 एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
\v 46 एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
\v 47 अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
\s5
\v 48 आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
\v 49 दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
\v 50 अनाब व एष्टमो व अनीम,
\v 51 आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
\s5
\v 52 अरब व दूमा व एशान,
\v 53 यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
\v 54 हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
\s5
\v 55 मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
\v 56 इज्रेल व यकदाम व जानोहा,
\v 57 काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 58 हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
\v 59 माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 60 किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
\v 61 रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
\v 62 आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 63 तथापि यरुशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरुशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.
\s5
\c 16
\s एफ्राईम आणि मनश्शे ह्यांना मिळालेला प्रदेश
\p
\v 1 योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते.
\v 2 मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.
\s5
\v 3 पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
\v 4 याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले.
\s5
\v 5 एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.
\v 6 आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली.
\v 7 नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.
\s5
\v 8 तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.
\v 9 आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती;
\s5
\v 10 तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.
\s5
\c 17
\p
\v 1 मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेले होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलादाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्यास गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता.
\v 2 मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;
\s5
\v 3 मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
\v 4 आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले.
\s5
\v 5 आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.
\v 6 कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
\s5
\v 7 आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.
\v 8 तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.
\s5
\v 9 आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता.
\v 10 दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.
\s5
\v 11 आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
\v 12 पण या नगरातील रहिवाश्यांना मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हते; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला.
\s5
\v 13 तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाले, तेव्हा त्यांनी कनान्यांना नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.
\s5
\v 14 तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, “परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठ्ठी टाकून आम्हांला वतनाचा एकच विभाग का दिला आहेस?”
\v 15 तेव्हा यहोशवाने त्यांना म्हटले, “जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.”
\s5
\v 16 नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”
\v 17 तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनश्शे यांना असे म्हटले की, “तुम्ही संख्येने बहुत आहात, व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा;
\v 18 तेव्हा डोंगराळ प्रदेशही तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरील भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.”
\s5
\c 18
\s शिलो येथील प्रदेशाची वाटणी
\p
\v 1 मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.
\v 2 तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.
\s5
\v 3 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?”
\v 4 तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.
\s5
\v 5 म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.
\v 6 तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
\s5
\v 7 लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना, यार्देनेच्या पलीकडे पूर्वेला, वतन मिळाले आहे परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे.
\s5
\v 8 तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
\v 9 याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.
\s5
\v 10 मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.
\s बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 11 तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.
\v 12 म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते.
\s5
\v 13 मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते
\v 14 तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच.
\s5
\v 15 दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते.
\v 16 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.
\s5
\v 17 मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.
\v 18 मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली.
\s5
\v 19 मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली.
\v 20 आणि पूर्वबाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.
\s5
\v 21 आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस
\v 22 आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल;
\v 23 अव्वीम व पारा व आफ्रा;
\v 24 कफर-अम्मोनी व अफनी व गेबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;
\s5
\v 25 गिबोन व रामा व बैरोथ;
\v 26 मिस्पे व कफीरा व मोजा;
\v 27 रेकेम व इपैल व तरला;
\v 28 सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरुशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.
\s5
\c 19
\s शिमोनाला देण्यात आलेला प्रदेश
\p
\v 1 दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
\s5
\v 2 आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
\v 3 हसर-शुवाल व बाला व असेम;
\v 4 एल्तोलाद व बथूल व हर्मा;
\s5
\v 5 आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;
\v 6 आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे;
\v 7 अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;
\s5
\v 8 बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.
\v 9 शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.
\s जबुलूनाला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 10 तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
\v 11 त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.
\s5
\v 12 ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.
\v 13 तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
\s5
\v 14 ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.
\v 15 कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.
\v 16 जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
\s इस्साखाराला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 17 इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.
\v 18 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
\v 19 आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
\s5
\v 20 रब्बीथ, किशोन व अबेस;
\v 21 रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
\v 22 त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.
\s5
\v 23 इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
\s आशेराला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 24 पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 25 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
\v 26 अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
\s5
\v 27 ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
\v 28 तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
\s5
\v 29 तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
\v 30 उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
\s5
\v 31 आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
\s नफतालीला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 32 सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 33 त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
\v 34 तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
\s5
\v 35 त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
\v 36 अदामा, राम व हासोर;
\v 37 केदेश, एद्रई व एन-हासोर;
\s5
\v 38 इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.
\v 39 नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
\s दानाला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 40 सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 41 त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
\v 42 शालब्बीन व अयालोन व इथला;
\s5
\v 43 एलोन व तिम्ना, एक्रोन;
\v 44 एलतके, गिब्बथोन व बालाथ;
\v 45 यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.
\v 46 मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.
\s5
\v 47 दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.
\v 48 दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.
\s यहोशवाला देण्यात आलेला प्रदेश
\s5
\p
\v 49 इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.
\v 50 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला.
\s5
\v 51 एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.
\s5
\c 20
\s नेमलेली शरणपुरे
\r गण. 35:9-28; अनु. 19:1-13
\p
\v 1 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
\v 2 “तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;
\v 3 म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
\s5
\v 4 आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.
\s5
\v 5 आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.
\v 6 मंडळीसमोर न्याय होईपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसात असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरात त्याने रहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यामध्ये आपल्या घरी माघारी जावे.”
\s5
\v 7 यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
\v 8 पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.
\s5
\v 9 ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो, त्याने त्यामध्ये पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये.
\s5
\c 21
\s लेवी लोकांची नगरे
\r 1इति.6:54-81
\p
\v 1 तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
\v 2 ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की “आम्हांला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गायराने द्यावी.”
\s5
\v 3 यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
\s5
\v 4 तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
\v 5 कहाथीच्या राहिलेल्या वंशजांना एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशांच्या वाट्यातून व मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
\s5
\v 6 आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
\v 7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
\s5
\v 8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
\v 9 त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
\v 10 लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
\s5
\v 11 त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
\v 12 परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
\s5
\v 13 त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
\v 14 आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
\v 15 होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
\v 16 अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
\s5
\v 17 बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
\v 18 अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
\v 19 अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
\s5
\v 20 राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
\v 21 त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
\v 22 किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
\s5
\v 23 दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
\v 24 अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
\s5
\v 25 मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;
\v 26 बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.
\s5
\v 27 लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;
\s5
\v 28 इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;
\v 29 यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
\v 30 आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,
\v 31 हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
\s5
\v 32 नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.
\v 33 गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,
\s5
\v 34 आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;
\v 35 दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
\s5
\v 36 आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;
\v 37 कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
\v 38 आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोथ व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान
\s5
\v 39 हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.
\v 40 लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.
\s5
\v 41 इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.
\v 42 ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते.
\s इस्त्राएल लोक देशाचा ताबा घेतात
\s5
\p
\v 43 याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.
\v 44 याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
\v 45 परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले.
\s5
\c 22
\s यार्देनेजवळ उभारलेली वेदी
\p
\v 1 मग यहोशवाने रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला बोलावले;
\v 2 तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हाला आज्ञा करून जे सांगितले होते ते सर्वकाही तुम्ही केले आणि जे मी तुम्हाला आज्ञापिले त्या सर्वांविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली
\v 3 मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे.
\s5
\v 4 आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा.
\v 5 तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”
\v 6 यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.
\s5
\v 7 मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते; आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांना आशीर्वाद दिला.
\v 8 तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.”
\s5
\v 9 मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले.
\s5
\v 10 तेव्हा यार्देन नदीच्या पश्चिमेच्या कनानातील गलीलोथ येथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली.
\v 11 तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.”
\s5
\v 12 असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला.
\s5
\v 13 त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले.
\v 14 आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता.
\s5
\v 15 तेव्हा गिलाद देशात रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले,
\v 16 परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय?
\s5
\v 17 पौराच्या प्रकरणी
\f + पहा-गणना 25:1-9; स्तोत्र.106:28
\f* जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,
\v 18 सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.
\s5
\v 19 आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका.
\v 20 जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.
\s5
\v 21 तेव्हा रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांनी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकारी होते त्यांनी उत्तर देऊन म्हटले,
\v 22 जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;
\v 23 परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो.
\s5
\v 24 कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे?
\s5
\v 25 हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.
\s5
\v 26 यास्तव आम्ही म्हटले की, “चला आपणासाठी एक वेदी बांधू, जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल.”
\v 27 तर ती, आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावी; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, “परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.”
\s5
\v 28 यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना “पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.”
\v 29 आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो.
\s5
\v 30 तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले.
\v 31 यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.”
\s5
\v 32 मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले.
\v 33 तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही.
\s5
\v 34 तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद
\f + अर्थ-साक्षीची वेदी
\f* ” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल.
\s5
\c 23
\s इस्त्राएल लोकांपुढे यहोशवाचे भाषण
\p
\v 1 परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता.
\v 2 तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, “मी फार वृद्ध झालो आहे.
\v 3 तुमच्यासाठी, या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्वकाही कसे केले, हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव, जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला.
\s5
\v 4 पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे.
\v 5 आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांना तुमच्यापुढून वतनातून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.
\s5
\v 6 तेव्हा चांगले बळकट व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेले आहे त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
\v 7 तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.
\v 8 परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला बिलगून राहा.
\s5
\v 9 कारण, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही.
\v 10 तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.
\v 11 तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या.
\s5
\v 12 पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांच्याशी चिकटून रहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील;
\v 13 तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली, तिच्यावरून तुम्ही नाश पावून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.
\s5
\v 14 तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही.
\v 15 तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे, तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे, तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुम्हाला त्वरीत नष्ट करील.”
\s5
\c 24
\s यहोशवाचा अखेरचा निरोप
\r निर्ग. 24:9-18
\p
\v 1 तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमात एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले.
\v 2 तेव्हा यहोशवाने सर्व लोकांस सांगितले, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली.
\s5
\v 3 परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले,
\v 4 आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला.
\s5
\v 5 मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले.
\v 6 तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले.
\s5
\v 7 तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला.
\s5
\v 8 मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला.
\s5
\v 9 नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले.
\v 10 परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले.
\s5
\v 11 मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;
\v 12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही.
\s5
\v 13 याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही त्यामध्ये राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खात आहात.
\s5
\v 14 तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्वरास भिऊन त्याची सेवा करा, आणि फरात नदीच्या पूर्वेकडे व मिसर देशात तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांना दूर करून परमेश्वर देवाचीच सेवा करा.
\v 15 जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हाला वाईट वाटते, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्यास आज आपल्यासाठी निवडून घ्या; फरात नदीच्या पूर्वेकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू.”
\s5
\v 16 तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, “परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही;
\v 17 कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले,
\v 18 आणि देशात राहणाऱ्या अमोऱ्यांनासह सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.”
\s5
\v 19 परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.
\v 20 जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.”
\s5
\v 21 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.”
\v 22 तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे.” ते म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत.”
\v 23 “असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.”
\s5
\v 24 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.”
\v 25 त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले.
\v 26 तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.
\s5
\v 27 आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.”
\v 28 मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.
\s यहोशवा आणि एलाजार ह्यांचा मृत्यू
\s5
\p
\v 29 मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला.
\v 30 मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्नाथ-सेरह आहे त्यामध्ये, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्यास पुरले.
\s5
\v 31 आणि यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्यांच्या सर्व दिवसात इस्राएलांनी परमेश्वराची सेवा केली.
\s5
\v 32 आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.
\v 33 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, त्यास दिली होती, तिजवर त्यांनी त्यास पुरले.