mr_ulb/05-DEU.usfm

1735 lines
361 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id DEU DEU-Free Bible Marathi
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h अनुवाद
\toc1 अनुवाद
\toc2 अनुवाद
\toc3 deu
\mt1 अनुवाद
\mt2 The Fifth Book of Moses
\mt2 मोशेने लिहिलेले पाचवे पुस्तक
\is लेखक
\ip मोशेने अनुवाद हे पुस्तक लिहिले, जे यार्देन नदी ओलांडण्याआधीच इस्राएलला त्यांच्या उपदेशांचे संग्रह आहे. “मोशेने बोललेले हे शब्द आहेत” (1:1). कदाचित कोणीतरी (कदाचित, यहोशवा) शेवटचा अध्याय लिहिला असेल. पुस्तक स्वतःच त्यातील बहुतेक गोष्टी मोशेबद्दल सांगते (1:1,5; 31:24). अनुवाद या पुस्तकाने मवाबाच्या भागात मोशे व इस्त्राएल यांचे ठिकाण निश्चित केले जिथे यार्देन नदी मृत समुद्रात वाहते (1:5). अनुवाद म्हणजे “दुसरा कायदा.” हा देव आणि इस्त्राएली लोकांमध्ये झालेला करार आहे.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 1446-1405
\ip इस्त्राएलचा प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश होण्यापूर्वी 40 दिवसाच्या कालावधीत हे पुस्तक लिहिण्यात आले.
\is प्राप्तकर्ता
\ip मिसरातील गुलामगिरीतून आणि सर्व पवित्र शास्त्रीय वाचकांपासून त्यांचे आईवडील 40 वर्षांनी गुलामगिरीतून सुटल्यानंतर प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास तयार असलेल्या इस्त्राएली एक नवीन पिढी.
\is हेतू
\ip अनुवाद हे मोशेने राष्ट्राला दिलेले निरोप देण्यासंबंधीचे भाषण आहे. इस्त्राएल प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास सज्ज आहे. मिसरातून बाहेर पडण्याच्या चाळीस वर्षानंतर, कनान देश जिंकण्यासाठी यार्देन नदी पार करणार आहे. जरी मोशेचा मृत्यू होणार होता आणि तो देशाबरोबर प्रदेशात जाणार नव्हता. राष्ट्रासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याकरिता मोशेचे अखेरचे भाषण ही एक आवेशपूर्ण विनंती आहे जेणेकरून त्यांच्या नवीन देशात त्यांच्याबरोबर चांगले होईल (6:1-3, 17-19). भाषण, त्यांचा देव कोण आहे (6:4) आणि त्याने त्यांच्यासाठी काय केले आहे हे लोकांना आठवण करून देते (6:10-12, 20-23). मोशेने लोकांना या आज्ञा पुढील पिढ्यांसाठी पुढे नेण्यास विनंती केली (6:6-9).
\is विषय
\ip आज्ञापालन
\iot रूपरेषा
\io1 1. मिसर देशामधून इस्त्राएल लोकांचा प्रवास (अध्याय 1-3)
\io1 2. परमेश्वराशी इस्त्राएल लोकांचा नातेसंबंध (अनुवाद 4-5)
\io1 3. देवाला निष्ठावान राहण्याचे महत्व (6:1-11:32)
\io1 4. देवावर प्रेम कसे करायचे आणि त्याच्या आज्ञा कशा पाळायच्या (अध्याय 12-26)
\io1 5. आशीर्वाद आणि शाप (अध्याय 27-30)
\io1 6. मोशेचा मृत्यू (अध्याय 31-34)
\s5
\c 1
\s होरेब येथे मोशे इस्त्राएल लोकांस परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो
\p
\v 1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.
\v 2 होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.
\s5
\v 3 हे मिसर सोडल्यानंतर चाळीसाव्या वर्षी घडले, अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला, परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली; ते सर्व त्याने सांगितले.
\v 4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.)
\s5
\v 5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला,
\v 6 आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.
\s5
\v 7 आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
\v 8 पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
\s नायकांची नेमणूक
\r निर्ग. 18:13-27
\s5
\p
\v 9 तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
\v 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
\v 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो.
\s5
\v 12 परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसांतली भांडणे कोठवर सहन करू?
\v 13 म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”
\v 14 त्यावर, “हे चांगलेच झाले असे” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात.
\s5
\v 15 म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
\v 16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.
\s5
\v 17 न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
\v 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती.
\s कादेश-बर्ण्यास पाठवलेले हेर
\r गण. 13:1-33
\s5
\p
\v 19 मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो.
\s5
\v 20 मी तुम्हास म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे.
\v 21 पाहा हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका.”
\s5
\v 22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, “आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.”
\v 23 मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.
\v 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.
\s5
\v 25 येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.”
\s5
\v 26 तथापी तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले.
\v 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे.
\v 28 आता आम्ही कोठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत.
\s5
\v 29 तेव्हा मी तुम्हास म्हणालो, “भिऊ नका, त्या लोकांस घाबरू नका.
\v 30 स्वत: परमेश्वर देव तुमच्यापुढे जात आहे. मिसर देशात तुमच्यासमोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल;
\v 31 तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहीले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे होता. मनुष्य आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हास येथपर्यंत सांभाळून आणले.”
\s5
\v 32 तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.
\v 33 परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हास मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
\s इस्त्राएल लोकांनी परमेश्वराने केलेली शिक्षा
\r गण. 14:20-45
\s5
\p
\v 34 परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला,
\v 35 “तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही,
\v 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.”
\s5
\v 37 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, “तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.
\v 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.
\s5
\v 39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश ते हस्तगत करतील.
\v 40 पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.”
\s हर्मा येथे इस्त्राएल लोकांचा पराभव
\s5
\p
\v 41 मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला.
\v 42 परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.”
\s5
\v 43 त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात.
\v 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले.
\s5
\v 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही.
\v 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहितच आहे.
\s5
\c 2
\s रानात कंठलेली वर्षे
\r गण. 21:21-32
\p
\v 1 मोशे आणखीन पुढे म्हणाला; “परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.
\v 2 परमेश्वर तेव्हा मला म्हणाला,
\v 3 ‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
\s5
\v 4 आणि लोकांस आणखी एक सांग, तुम्हास वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावाच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा.
\v 5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.
\s5
\v 6 तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या.
\v 7 तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.
\s5
\v 8 तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.
\s5
\v 9 परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
\s5
\v 10 पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.
\v 11 या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई
\f + राक्षस
\f* समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
\s5
\v 12 पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.
\s5
\v 13 “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
\v 14 कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.
\v 15 त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता
\s5
\v 16 ह्याप्रकारे सर्व योद्धे मरण पावले, ती पिढी नामशेष झाली,
\v 17 परमेश्वर मला म्हणाला,
\v 18 “तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.
\v 19 तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”
\s5
\v 20 त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.
\v 21 जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांस परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात.
\v 22 एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.
\s5
\v 23 त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.
\s5
\v 24 पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.
\v 25 तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”
\s इस्त्राएल लोक सीहोन राजाला जिंकतात
\s5
\p
\v 26 मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
\v 27 “तुमच्या देशातून आम्हास जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही उजवीडावीकडे वळणार नाही.
\s5
\v 28 तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.
\v 29 यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले तसेच तूही कर.”
\s5
\v 30 पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
\v 31 परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.”
\s5
\v 32 आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.
\v 33 परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो.
\s5
\v 34 त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.
\v 35 तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.
\s5
\v 36 आर्णाेन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते.
\v 37 अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.
\s5
\c 3
\s इस्त्राएल लोक बाशानाच्या आगे राजाला जिंकतात
\r गण. 21:33-35
\p
\v 1 मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.
\v 2 परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.
\s5
\v 3 आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
\v 4 मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच.
\s5
\v 5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.
\v 6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.
\v 7 गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.
\s5
\v 8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.
\v 9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)
\v 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.”
\s5
\v 11 रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.
\s रऊबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यार्देनच्या पूर्वेस वस्ती करतात
\s5
\p
\v 12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून
\f + अरोएर नगराच्या उत्तर भागापासून
\f* गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
\v 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
\s5
\v 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)
\s5
\v 15 आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला.
\v 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.
\s5
\v 17 तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अरबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
\s5
\v 18 त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.
\s5
\v 19 तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.
\v 20 आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.”
\s5
\v 21 मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.
\v 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”
\s कनान देशात प्रवेश करण्यास मोशेला मज्जाव
\s5
\p
\v 23 मग त्या वेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो,
\v 24 “हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासास आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे?
\v 25 तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”
\s5
\v 26 पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.
\v 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.
\s5
\v 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांस पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”
\v 29 “आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”
\s5
\c 4
\s लोकांनी आज्ञाधारक असावे असा मोशेचा उपदेश
\p
\v 1 आता अहो इस्राएल लोकहो, मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत रहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हास देणार आहे त्याचा ताबा घ्याल.
\v 2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.
\s5
\v 3 बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे.
\v 4 परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा.
\s5
\v 5 पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.
\v 6 त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.
\s5
\v 7 आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे?
\v 8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे?
\s5
\v 9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
\v 10 ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.
\s5
\v 11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता.
\v 12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.
\s5
\v 13 परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.
\v 14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हास शिकवण्यास सांगितले.
\s मूर्तिपूजेविरुद्ध ताकीद
\s5
\p
\v 15 होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता.
\v 16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
\v 17 जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,
\v 18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका.
\s5
\v 19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.
\v 20 पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत:चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!
\s5
\v 21 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही.
\v 22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या.
\s5
\v 23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.
\v 24 कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
\s5
\v 25 तुम्हास पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल.
\v 26 तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षि आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.
\s5
\v 27 परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
\v 28 तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.
\s5
\v 29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल.
\s5
\v 30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल.
\v 31 आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
\s5
\v 32 असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का?
\v 33 अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे?
\s5
\v 34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
\s5
\v 35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.
\v 36 तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
\s5
\v 37 त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
\v 38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.
\s5
\v 39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.
\v 40 आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
\s यार्देनेच्या पूर्वेस असलेली शरणपुरे
\s5
\p
\v 41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.
\v 42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये.
\v 43 ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.
\s परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांच्या कथनाची प्रस्तावना
\s5
\p
\v 44 इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, दिले.
\v 45 इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते.
\v 46 म्हणजेच हेशबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
\s5
\v 47 त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत.
\v 48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
\v 49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.
\s5
\c 5
\s दहा आज्ञा
\r निर्ग. 20:1-17
\p
\v 1 मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.
\v 2 होरेब पर्वताजवळ असताना आमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर करार केला होता.
\v 3 हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता.
\s5
\v 4 त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून परमेश्वराने आपल्याशी तोंडोतोंड भाषण केले.
\v 5 पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाही. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. तेव्हा परमेश्वर म्हणाला,
\v 6 मिसर देशामध्ये तुम्ही गुलामीत होता तेथून मी तुम्हास बाहेर काढले, तो मी परमेश्वर, तुमचा देव आहे.
\s5
\v 7 माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत.
\v 8 तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ति करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका.
\s5
\v 9 त्यांच्यापुढे झुकू नका किंवा त्यांची सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. जे माझा द्वेष करतात, त्यांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो त्यांच्या मुलांना एवढेच नव्हे तर त्याच्या चार पिढ्यांना शासन करीन.
\v 10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील.
\s5
\v 11 तुमचा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेवू नका. जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
\s5
\v 12 शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र दिवस म्हणून पाळावा.
\v 13 सहा दिवस तुम्ही श्रम करून आपले सर्व काम करा.
\v 14 पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ शब्बाथाचा दिवस आहे. म्हणून त्यादिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुले, मुली, किंवा दासदासी, परके, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे.
\s5
\v 15 मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हास तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हास मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे.
\s5
\v 16 आपल्या आईवडीलांचा मान ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हास दीर्घायुष्य मिळेल. तुम्हास दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.
\s5
\v 17 कोणाचीही हत्या करु नका.
\v 18 व्यभिचार करु नका.
\v 19 चोरी करु नका.
\v 20 आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नका.
\s5
\v 21 दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दासदासी, गुरे गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.”
\s5
\v 22 पुढे मोशे म्हणाला, ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हास मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वतापाशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिल्या.
\s लोकांस वाटणारी भीती
\r निर्ग. 20:18-21
\s5
\p
\v 23 पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले.
\v 24 आणि म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हास त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्यास प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव मनुष्याशी बोलला तरी मनुष्य जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे.
\s5
\v 25 पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरू. तो भयंकर अग्नी आम्हास बेचिराख करील. आणि आम्हास मरायचे नाही.
\v 26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही.
\v 27 तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हास सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.”
\s5
\v 28 हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, “मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे.
\v 29 ते माझे भय धरून मजशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.
\v 30 त्यांना सांग तुम्ही परत आपापल्या जागी जा.
\s5
\v 31 पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.”
\s5
\v 32 तेव्हा तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.
\v 33 तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हास वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.
\s5
\c 6
\s सर्वात मोठी आज्ञा
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.
\v 2 तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल.
\s5
\v 3 इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
\s5
\v 4 हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
\v 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
\s5
\v 6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.
\v 7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
\s5
\v 8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
\v 9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
\s आज्ञाभंगाविरुद्ध ताकीद
\s5
\p
\v 10 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल.
\v 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
\v 12 पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले.
\s5
\v 13 तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
\v 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
\v 15 कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
\s5
\v 16 मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत
\f + मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत
\f* , तसे इथे करु नका.
\v 17 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.
\s5
\v 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल.
\v 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
\s5
\v 20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.
\v 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले.
\v 22 परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.
\v 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले.
\s5
\v 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व आपले भले करील.
\v 25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.
\s5
\c 7
\s परमेश्वराची पवित्र प्रजा
\r निर्ग. 34:10-16
\p
\v 1 जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.
\s5
\v 2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.
\v 3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.
\s5
\v 4 कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा
\v 5 त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ति जाळून टाका.
\s5
\v 6 कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
\s5
\v 7 परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
\v 8 पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते.
\s5
\v 9 तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो.
\v 10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
\v 11 तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
\s आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
\r लेवी. 26:1-13; अनु. 28:1-4
\s5
\p
\v 12 मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील.
\v 13 तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हास धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हास देईल.
\s5
\v 14 इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील.
\v 15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
\s5
\v 17 ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
\v 18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा.
\v 19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
\s5
\v 20 याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
\v 21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
\v 22 त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील.
\s5
\v 23 पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हास साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.
\v 24 परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
\s5
\v 25 त्यांच्या दैवतांच्या मूर्ति तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका, कारण तो सापळाच आहे, त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. आपला देव परमेश्वर याला त्यांचा वीट आहे.
\v 26 त्या अमंगळ, हानिकारक मूर्ति तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.
\s5
\c 8
\s उत्तम प्रदेशाची प्राप्ती
\p
\v 1 आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल.
\v 2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
\s5
\v 3 परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
\s5
\v 4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
\v 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे.
\v 6 तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा.
\s5
\v 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
\v 8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
\s5
\v 9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
\v 10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
\s परमेश्वरास विसरून जाण्याविरुद्ध ताकीद
\s5
\p
\v 11 सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
\v 12 त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल.
\s5
\v 13 तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
\v 14 या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
\s5
\v 15 विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
\v 16 तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले.
\v 17 हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
\s5
\v 18 तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे.
\v 19 तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो.
\v 20 ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.
\s5
\c 9
\s कनानात असलेल्या राष्टांचा परमेश्वर विध्वंस करील
\r निर्ग. 32:1-35
\p
\v 1 हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदीपलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे.
\v 2 तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हास माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याविषयी आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.
\s5
\v 3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.
\s5
\v 4 तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.
\s5
\v 5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
\s होरेब येथे इस्त्राएल लोकांनी केलेले बंड
\s5
\p
\v 6 म्हणून तुम्ही हे निश्चीत लक्षात ठेवा की, तुमच्या चांगूलपणामुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हास वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात.
\s5
\v 7 रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करीत आलेले आहात.
\v 8 होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता.
\s5
\v 9 त्याचे असे झाले; परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
\v 10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले
\s5
\v 11 चाळीस दिवस, चाळीस रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या.
\v 12 परमेश्वर म्हणाला, “ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून बहकले आहेत. त्यांनी स्वत: साठी एक ओतीव मूर्ती केली आहे.”
\s5
\v 13 परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी या लोकांस पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत.
\v 14 मला आडवू नकोस, त्यांचा नाश करु दे. मी त्यांचे नाव आकाशाखालून खोडून टाकीन. मग मी तुझे, त्यांच्याहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.”
\s5
\v 15 मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.
\v 16 मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरूद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ति केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता!
\s5
\v 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या.
\v 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
\s5
\v 19 परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.
\v 20 परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
\s5
\v 21 मग तुमचे ते अमंगळ कृत्य तुम्ही केलेली वासराची मूर्ति मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
\s5
\v 22 नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वरास संतप्त केलेत.
\v 23 जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हास रवाना करून सांगितले की, “जा, व जो देश मी तुम्हास दिला आहे तो ताब्यात घ्या,” तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.
\v 24 जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो
\f + परमेश्वर तुम्हास ओळखीत असलेल्या दिवसापासून
\f* तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे.
\s5
\v 25 तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता.
\v 26 मी परमेश्वरास विनवणी केली की हे प्रभू तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करून बाहेर आणले आहेस.
\s5
\v 27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर.
\v 28 तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.
\v 29 पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहेत, तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.
\s5
\c 10
\s दगडाच्या नव्या पाट्या
\r निर्ग. 34:1-9
\p
\v 1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले.
\v 2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.”
\s5
\v 3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
\v 4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
\s5
\v 5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.
\s5
\v 6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला.
\v 7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले.
\s5
\v 8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
\v 9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे.
\s5
\v 10 मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
\v 11 तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”
\s देवाची अपेक्षा
\s5
\p
\v 12 आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.
\v 13 परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो?
\s5
\v 14 सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे.
\v 15 परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे.
\s5
\v 16 तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या.
\v 17 कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.
\s5
\v 18 अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो.
\v 19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
\s5
\v 20 तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
\v 21 फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
\s5
\v 22 तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.
\s5
\c 11
\s परमेश्वराची महती
\p
\v 1 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
\s5
\v 2 परमेश्वराने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हासच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी या शिस्तींपैकी काहीच पाहिले किंव्हा अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे,
\v 3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे.
\s5
\v 4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
\v 5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हास त्याने कसे आणले हे तुम्हास माहीत आहेच.
\s5
\v 6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हास माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
\v 7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत.
\s5
\v 8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
\v 9 त्या देशात तुम्ही चिरकाल रहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना दुधामधाचा प्रदेश
\f + सुपीक जमीन
\f* द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
\s5
\v 10 तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता.
\v 11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देशामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
\v 12 तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
\s5
\v 13 परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हास देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
\v 14 तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल.
\v 15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल.
\s5
\v 16 पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
\v 17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हास देत आहे त्यामध्ये तुम्हास लवकरच मरण येईल.
\s5
\v 18 म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा.
\v 19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
\s5
\v 20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
\v 21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल.
\s5
\v 22 मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
\v 23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल.
\s5
\v 24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
\v 25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल.
\s5
\v 26 आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
\v 27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल.
\v 28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वरास तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हास ओळख नाही.
\s5
\v 29 तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
\v 30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
\s5
\v 31 तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा
\v 32 मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.
\s5
\c 12
\s उपासनेसाठी नेमलेले स्थळ
\p
\v 1 परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत रहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.
\v 2 आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.
\s5
\v 3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ति जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
\v 4 ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.
\s5
\v 5 तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
\v 6 तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांत जन्मलेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.
\s5
\v 7 आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
\s5
\v 8 आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.
\v 9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही.
\s5
\v 10 पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हास सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हास स्वस्थता लाभेल.
\v 11 मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्यास तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वरास अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.
\s5
\v 12 येताना आपली मुलेबाळे, दासदासी, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्याबरोबर वाटा नाही) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.
\s5
\v 13 आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.
\v 14 परमेश्वर तुमच्या वंशांच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीं विषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा.
\s5
\v 15 तथापी, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.
\v 16 फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
\s5
\v 17 आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.
\s5
\v 18 या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.
\v 19 या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.
\s5
\v 20 तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल.
\s5
\v 21 तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशु-पक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.
\v 22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तिने ते खावे.
\s5
\v 23 पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा.
\v 24 रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.
\v 25 परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.
\s5
\v 26 देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.
\v 27 आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बलीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा.
\s5
\v 28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
\s मूर्तिपूजेविरुद्ध ताकीद
\s5
\p
\v 29 तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्राचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांस हुसकावून तुम्ही तेथे रहाल.
\v 30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.
\s5
\v 31 तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
\v 32 तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यामध्ये अधिक उणे करु नका.
\s5
\c 13
\p
\v 1 स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.
\v 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.
\v 3 तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपुर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल.
\s5
\v 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा.
\v 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा.
\s5
\v 6 तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल
\v 7 (मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.)
\s5
\v 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका.
\v 9 त्यास ठार करा. त्यास दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरूवात करा. मग इतर जण त्यास दगडांनी मारतील.
\s5
\v 10 मरेपर्यंत त्यास दगडमार करावी; कारण मिसरमधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हास बहकवायचा प्रयत्न करत आहे.
\v 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की त्यांनी ही भीती वाटेल, आणि अशी दुष्कृत्ये करायला ते धजावणार नाहीत.
\s5
\v 12 तुम्हास राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की,
\v 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे
\f + बेलीएल चे पुत्र
\f* आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. आपण अन्य दैवतांची सेवा करु या, असे म्हणून त्यांनी नगरातील लोकांस बहकावले आहेत. (ही दैवते तुम्हास अपरीचीत असतील.)
\v 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले,
\s5
\v 15 तर त्या नगरातील लोकांस त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.
\v 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये.
\s5
\v 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्यास तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल.
\v 18 नगरे उध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.
\s5
\c 14
\s मयतासाठी दुःखप्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई
\p
\v 1 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका.
\v 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.
\s शुद्ध आणि अशुद्ध प्राणी
\r लेवी. 11:1-47
\s5
\p
\v 3 परमेश्वरास ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका.
\v 4 खाण्यास पात्र असे पशु हे, गाय बैल, शेळ्या, मेंढ्या,
\v 5 सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे.
\s5
\v 6 पशूपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे.
\v 7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत.
\s5
\v 8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तेसुध्दा अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मरण पावलेल्या डुकराला स्पर्शही करु नका.
\s5
\v 9 जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा.
\v 10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.
\s5
\v 11 कोणताही शुद्ध पक्षी खा.
\v 12 पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या,
\v 13 ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी,
\s5
\v 14 कोणत्याही जातीचा कावळा,
\v 15 निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा,
\v 16 पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड,
\v 17 पाणकोळी, गिधड, करढोक,
\s5
\v 18 निरनिराळ्या जातीचे बगळे, करकोचे, टिटवी, वटवाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.
\v 19 पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत.
\v 20 पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही.
\s5
\v 21 नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्यास तो खायला हरकत नाही किंवा त्यास तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
\s दशांश देण्याविषयी नियम
\s5
\p
\v 22 दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
\v 23 मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवा, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल सतत भय बाळगण्यास शिकशील.
\s5
\v 24 पण एखाद्यावेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हास शक्य होणार नाही. असे झाले तर, तुझा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दंशमांश तुला तिकडे घेवून जाता आला नाही,
\v 25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा.
\s5
\v 26 त्या पैशाने तुम्ही गाई-गुरे, शेळ्यामेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या.
\v 27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यामध्ये सामील करून घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही.
\s5
\v 28 प्रत्येक तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा.
\v 29 लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास सर्व कार्यात आशीर्वाद देईल.
\s5
\c 15
\s ऋणविमोचनाचे वर्ष
\r निर्ग. 21:1-11; लेवी. 25:1-7
\p
\v 1 प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.
\v 2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
\v 3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.
\s5
\v 4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे
\v 5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.
\v 6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
\s5
\v 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.
\v 8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.
\s5
\v 9 कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल.
\v 10 तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल.
\s5
\v 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
\s दासांशी ठेवायची वर्तणूक
\s5
\p
\v 12 एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.
\v 13 पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका.
\v 14 तर तुझी गुरे, खळे, द्राक्षाकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे.
\s5
\v 15 आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे.
\v 16 असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दुर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही.
\v 17 तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
\s5
\v 18 दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल.
\s प्रथमजन्मलेल्यांचे समर्पण
\s5
\p
\v 19 तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.
\v 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.
\v 21 पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका.
\s5
\v 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.
\v 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.
\s5
\c 16
\s नेमून दिलेले तीन सण
\r निर्ग. 12:1-20; 23:14-9; 34:18-26
\p
\v 1 अबीब
\f + हिब्रू दिनदर्शिकेमध्ये अबिब हा वर्षाचा पहिला महिना होता जो आधुनिक मार्च-एप्रिल होता. नंतर त्याला “निसान” असे म्हटले गेले
\f* महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.
\v 2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वरास अर्पण करा. शेळ्यामेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा.
\s5
\v 3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु:ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हास मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हास तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका.
\v 4 तेव्हा या सात दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपवून टाका.
\s5
\v 5 वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका.
\v 6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.
\s5
\v 7 तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा.
\v 8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा.
\s5
\v 9 पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा उभ्या पिकाला विळा लागल्यापासून सात आठवडे मोजा.
\v 10 मग, आपल्या खुशीने एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.
\s5
\v 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.
\v 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून हे विधी न चुकता पाळा.
\s5
\v 13 खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसानी मंडपाचा सण साजरा करा.
\v 14 हा सणही मुले आणि मुली, दासदासी, लेवी, शहरातील वाटसरु, परके, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा.
\s5
\v 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टी आहे. तेव्हा आनंदात राहा.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे.
\v 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे.
\s न्यायदानपद्धती
\s5
\p
\v 18 तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.
\v 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.
\v 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने रहाल.
\s5
\v 21 जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका.
\v 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.
\s5
\c 17
\p
\v 1 परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा विट आहे.
\s5
\v 2 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,
\v 3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,
\v 4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,
\s5
\v 5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा.
\v 6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
\v 7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
\s5
\v 8 एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हास आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
\v 9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
\s5
\v 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
\v 11 तुला ज्या सुचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.
\s5
\v 12 जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा. त्यास मृत्युदंड द्या. इस्राएलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा.
\v 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
\s राजासंबंधी सूचना
\s5
\p
\v 14 तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे रहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल.
\v 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
\s5
\v 16 त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत.
\f + घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये तुझ्या दासांची देवाणघेवाण करता कामा नयेत.
\f* कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
\v 17 तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
\s5
\v 18 राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
\v 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
\s5
\v 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
\s5
\c 18
\s याजक आणि लेवी ह्यांचे वाटे
\p
\v 1 लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.
\v 2 त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय.
\s5
\v 3 यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.
\v 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
\v 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
\s5
\v 6 प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे.
\v 7 परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.
\v 8 त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
\s परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद
\s5
\p
\v 9 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
\v 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
\v 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये.
\s5
\v 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
\v 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा.
\v 14 इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही.
\s मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन
\s5
\p
\v 15 परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
\v 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.
\s5
\v 17 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे.
\v 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
\v 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन.
\s5
\v 20 पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
\v 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार?
\s5
\v 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
\s5
\c 19
\s शरणपुरे, प्राचीन चतु: सीमा
\r गण. 35:9-28; यहो. 20:1-9
\p
\v 1 तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल,
\v 2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा.
\v 3 म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर.
\s5
\v 4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे.
\v 5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे.
\s5
\v 6 हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
\v 7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव.
\s5
\v 8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल.
\v 9 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
\v 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही.
\s5
\v 11 पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.
\v 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे.
\v 13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.
\s5
\v 14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.
\s साक्षीदारांसंबंधी नियम
\s5
\p
\v 15 एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्यास दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.
\v 16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
\s5
\v 17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.
\v 18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,
\v 19 तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा
\s5
\v 20 हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही.
\v 21 तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.
\s5
\c 20
\s युद्धनीती
\p
\v 1 तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.
\s5
\v 2 तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.
\v 3 ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
\v 4 कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.”
\s5
\v 5 मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
\s5
\v 6 द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.
\v 7 तसेच, पत्नीला मागणी घालून अजून लग्न केलेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.”
\s5
\v 8 त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
\v 9 अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.
\s5
\v 10 तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा.
\v 11 त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.
\s5
\v 12 पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला.
\v 13 आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तलवारीने ठार करा.
\s5
\v 14 पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.
\v 15 तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.
\s5
\v 16 पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.
\v 17 हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा.
\v 18 नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हास शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.
\s5
\v 19 युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
\v 20 पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.
\s5
\c 21
\s अज्ञात रक्तपातासंबंधी नियम
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही
\v 2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
\s5
\v 3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
\v 4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी.
\s5
\v 5 तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.
\s5
\v 6 मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.
\v 7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही.
\s5
\v 8 हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस. आम्हास शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हास दोषी धरु नकोस. त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.”
\v 9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा.
\s युद्धकैदी स्त्रियांशी ठेवायची वर्तणूक
\s5
\p
\v 10 जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल.
\v 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास.
\v 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
\s5
\v 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
\v 14 पुढे त्यास ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
\s प्रथमजन्मलेल्या अपत्याविषयी नियम
\s5
\p
\v 15 एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
\v 16 तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.
\v 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
\s बंडखोर मुलगा
\s5
\p
\v 18 एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल.
\v 19 अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे.
\s5
\v 20 या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
\v 21 यावर त्या गावातील मनुष्यांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
\s निरनिराळे नियम
\s5
\p
\v 22 एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील,
\v 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याच दिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
\s5
\c 22
\p
\v 1 आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.
\v 2 तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.
\s5
\v 3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.
\v 4 कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.
\s5
\v 5 बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.
\s5
\v 6 वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
\v 7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.
\s5
\v 8 नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही.
\s5
\v 9 द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही
\f + अपवित्र मानले जाईल
\f* .
\v 10 बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
\v 11 लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.
\s5
\v 12 वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
\s पतिव्रतेविषयी नियम
\s5
\p
\v 13 एखाद्या मनुष्यास लग्न केल्यावर पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर पत्नी आवडेनाशी झाली आणि
\v 14 मी या स्त्रीशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.
\s5
\v 15 तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.
\s5
\v 16 मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे.
\v 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.
\s5
\v 18 यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.
\v 19 त्यास शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने पत्नी म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
\s5
\v 20 पण पत्नीबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;
\v 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
\s5
\v 22 एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
\s5
\v 23 एखाद्या कुमारिकेची मागणी झालेली असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
\v 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची पत्नी होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकावा.
\s5
\v 25 पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
\v 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
\v 27 त्यास ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
\s5
\v 28 वाग्दत्त झालेली नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
\v 29 त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची पत्नी झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
\s5
\v 30 “आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
\s5
\c 23
\s परमेश्वराच्या मेळ्यास येण्यास मज्जाव असलेले लोक
\p
\v 1 जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे.
\v 2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
\s5
\v 3 अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये.
\v 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.
\s5
\v 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती.
\v 6 तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका.
\s5
\v 7 अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरी लोकांचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
\v 8 त्यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांस इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही.
\s युद्धछावणीत राखायची शुद्धता
\s5
\p
\v 9 युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा.
\v 10 एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये त्याने छावणीच्या आत येवू नये.
\v 11 मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
\s5
\v 12 प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.
\v 13 आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
\v 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हास सोडून जायचा.
\s निरनिराळे नियम
\s5
\p
\v 15 एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्यास मालकाच्या स्वाधीन करु नका.
\v 16 त्यास आपल्या निवडीनुसार त्यास तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्यास जाच करु नका.
\s5
\v 17 इस्राएलाच्या स्त्रीयांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्राएली पुत्रापैकी कोणासही पुमैथुनास वाहू नये.
\v 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वरास अशा व्यक्तीचा विट आहे.
\s5
\v 19 आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका.
\v 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
\s5
\v 21 तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल.
\v 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
\v 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हास काही नवस बोला असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
\s5
\v 24 दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.
\v 25 आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका.
\s5
\c 24
\s घटस्फोटाविषयी नियम
\p
\v 1 एखाद्याला लग्नानंतर आपल्या पत्नीच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली व ती त्यास आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा; मग तिला घराबाहेर काढावे.
\v 2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा.
\s5
\v 3 त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये.
\v 4 कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे या गोष्टीचा तुमचा देव परमेश्वर ह्याला विट आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.
\s5
\v 5 एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्यास सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्यास द्यावी.
\s निरनिराळे नियम
\s5
\p
\v 6 कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये, नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल.
\s5
\v 7 कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या मनुष्यास ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
\s5
\v 8 कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील ते ऐका.
\v 9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.
\s5
\v 10 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका.
\v 11 बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल.
\s5
\v 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले कपडे आणील. तर ते वस्त्र अंगावर घेऊन झोपू नका.
\v 13 त्यास रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्यास पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हास आशीर्वाद देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.
\s5
\v 14 तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.
\v 15 त्यास रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.
\s5
\v 16 मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आई-वडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्यास मिळावी.
\s5
\v 17 गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये.
\v 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हास सांगत आहे.
\s5
\v 19 शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्याच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हास तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
\v 20 जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नको. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे.
\s5
\v 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे.
\v 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हास हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.
\s5
\c 25
\p
\v 1 लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करावा. निर्दोष्याला निर्दोष ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.
\v 2 दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी.
\s5
\v 3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.
\s5
\v 4 धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका.
\s भावाचा वंश चालवण्यासंबंधी नियम
\s5
\p
\v 5 दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
\v 6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये.
\s5
\v 7 त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.”
\v 8 अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांस बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल
\s5
\v 9 तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, “जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.”
\v 10 जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल.
\s इतर काही नियम
\s5
\p
\v 11 दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले,
\v 12 तर दयामाया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा.
\s5
\v 13 बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.
\v 14 आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.
\s5
\v 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल.
\v 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला विट आहे.
\s अमालेक्यांचा समूळ नाश करण्याची आज्ञा
\s5
\p
\v 17 तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.
\v 18 त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले.
\v 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्हास शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हास विश्राम दिल्यावर हे अंमलात आणा. विसरू नका.
\s5
\c 26
\s प्रथम उत्पन्न आणि दशांश सादर करण्याचे विधी
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे वस्ती कराल.
\v 2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.
\s5
\v 3 व त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की “परमेश्वराने आमच्या पूर्वजांनी आम्हांला शपथपुर्वक जो देश देण्याचे वचन दिले होते. त्यामध्ये मी पोहोंचलो आहे,”
\v 4 मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील.
\s5
\v 5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, “आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.
\s5
\v 6 तेथे मिसरी लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली. आम्हास गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला.
\v 7 मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले.
\s5
\v 8 मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
\v 9 आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली.
\s5
\v 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.” मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वरास वंदन करा.
\v 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.
\s5
\v 12 प्रत्येक तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील.
\v 13 यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
\s5
\v 14 मी दु:खी मन:स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी आपला देव परमेश्वर याचे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे.
\v 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांस आशीर्वाद दे. आम्हास दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हास द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.”
\s परमेश्वराची पवित्र प्रजा
\s5
\p
\v 16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हास आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा.
\v 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
\s5
\v 18 परमेश्वराने आज तुम्हास पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हास त्याने सांगितले आहे.
\v 19 इतर सर्व राष्ट्रापेक्षा तो
\f + एल-एलीयोन
\f* तुम्हास महान करणार आहे. तो तुम्हास प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा व्हाल.”
\s5
\c 27
\s एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम
\p
\v 1 मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
\v 2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
\v 3 त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
\s5
\v 4 यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
\v 5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
\s5
\v 6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
\v 7 तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
\v 8 मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
\s5
\v 9 मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
\v 10 तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ.
\s एलाब डोंगरावर उभे राहून उच्चारायची शापवचने
\s5
\p
\v 11 त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
\v 12 ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
\s5
\v 13 तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
\v 14 लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
\s5
\v 15 “मूर्ति घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ति म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा विट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 16 “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 17 परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 18 लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
\v 19 लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 20 लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 21 लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 22 लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 23 लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\v 24 लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\v 25 लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\v 26 लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\c 28
\s आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
\r लेवी. 26:1-13; अनु. 7:12-24
\p
\v 1 आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
\v 2 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील:
\s5
\v 3 तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
\v 4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील.
\s5
\v 5 तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील.
\v 6 तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल.
\s5
\v 7 तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल.
\v 8 परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल.
\s5
\v 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हास आपली पवित्र प्रजा करून घेईल.
\v 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल.
\s5
\v 11 परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हास भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल.
\v 12 आपले आशीर्वादाचे भांडार परमेश्वर तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हास कर्ज काढावे लागणार नाही.
\s5
\v 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
\v 14 या शिकवणीपासून परावृत्त होऊ नका. उजवीडावीकडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.
\s आज्ञाभंगाचे परिणाम
\r लेवी. 26:14-46
\s5
\p
\v 15 पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
\s5
\v 16 नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.
\v 17 तुमच्या टोपल्या आणि पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
\s5
\v 18 परमेश्वराच्या शापाने तुम्हास फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील.
\v 19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हास शाप देईल.
\s5
\v 20 तुम्ही दुष्कृत्ये करून परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात शाप येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलीत होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.
\v 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील.
\s5
\v 22 परमेश्वर तुम्हास रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण
\f + तलवार
\f* पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.
\s5
\v 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.
\v 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
\s5
\v 25 तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
\v 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.
\s5
\v 27 परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांस गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हास करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हास शासन करील.
\v 28 परमेश्वर तुम्हास वेडेपणा, अंधत्व, भांबावलेपण यांनी ग्रस्त करील.
\v 29 तुम्ही भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हास एकसारखे नागवतील, दुखावतील आणि तुम्हास कोणी त्राता राहणार नाही.
\s5
\v 30 तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यामध्ये राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हास मिळणार नाही.
\v 31 लोक तुमच्यासमोर तुमचा बैल कापतील पण त्याचे मांस तुम्हास खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्यामेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हास कोणी सोडवणारा असणार नाही.
\s5
\v 32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
\s5
\v 33 तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील.
\v 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.
\v 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी व बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हास शासन करील.
\s5
\v 36 तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठपाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.
\v 37 आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हास नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल.
\s5
\v 38 तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.
\v 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यामध्ये खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षारस तुम्हास मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील.
\s5
\v 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हास मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.
\v 41 तुम्हास मुले आणि मुली होतील पण ती तुम्हास लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.
\s5
\v 42 तुमच्या भूमीचे, तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे टोळधाडीने नुकसान होईल.
\v 43 तुमच्या गावात राहणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.
\v 44 ते तुम्हास कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून रहाल.
\s5
\v 45 तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.
\v 46 हे शाप तुमच्यावर व तुमच्या सतंतीवर कायमचे चिन्ह व आश्चर्य असे होतील.
\s5
\v 47 सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून
\v 48 परमेश्वराने पाठवलेल्या शत्रूसमोर तुम्हास नतमस्तक व्हावे लागेल. आणि तुम्ही त्यांची सेवा तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे होऊन कराल. परमेश्वर
\f + शत्रू
\f* तुमच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवील. ते तुम्हास बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हास वागवावे लागेल.
\s5
\v 49 दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
\v 50 त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.
\v 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हास उरणार नाही.
\s5
\v 52 ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
\v 53 तुम्हास फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
\s5
\v 54 तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.
\v 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही, अगदी आपल्या घरातल्यांनाही वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
\s5
\v 56 तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक स्त्रीसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
\v 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूति वेळी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
\s5
\v 58 या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि भययोग्य तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर
\v 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल.
\s5
\v 60 अशा रोगराईला आणि उपद्रवांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हास धास्ती वाटत असे. त्या सगळ्यांतून तुम्हास पुन्हा जावे लागेल.
\v 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.
\v 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक रहाल.
\s5
\v 63 तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वरास आनंद वाटत होता तसाच आनंद त्यास तुमचा नाश करायला आणि तुम्हास रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हास हुसकावून लावले जाईल.
\v 64 परमेश्वर तुम्हास पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल.
\s5
\v 65 या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हास शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.
\v 66 तुम्हास नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले रहाल. तुम्हास जिवाची काही खात्री वाटणार नाही.
\s5
\v 67 सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
\v 68 परमेश्वर तुम्हास जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हास पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हास विकत घेणार नाही.
\s5
\c 29
\s मवाब देशात इस्त्राएल लोकांशी परमेश्वराने केलेला करार
\p
\v 1 इस्राएलाशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात देखील पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो पवित्र करार हा होय:
\s5
\v 2 मोशेने सर्व इस्राएलांना बोलावून सांगितले, मिसर देशामध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे.
\v 3 ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत.
\v 4 पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हास समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही.
\s5
\v 5 परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत.
\v 6 तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने असे केले.
\s5
\v 7 तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला.
\v 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला.
\v 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हास सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
\s5
\v 10 आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात.
\v 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत.
\s5
\v 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे.
\v 13 त्याद्वारे तो तुम्हास आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हास आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
\s5
\v 14 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी आज इथे करतो असे नव्हे,
\v 15 तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे.
\v 16 आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे.
\s5
\v 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या,
\v 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत्त होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, स्त्री, एखादे कुटुंब किंवा कुळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विष व कडूदवणा प्रमाणे असतात.
\v 19 एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत:चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्यास त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल.
\s5
\v 20 परमेश्वर अशा मनुष्यास क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर भयानक कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्यास लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील.
\v 21 या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल
\f + उदाहरणदाखल करील
\f* .
\s5
\v 22 या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील.
\v 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयिम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
\v 24 “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील.
\s5
\v 25 त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांस बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.
\v 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.
\s5
\v 27 म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली.
\v 28 क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?”
\s5
\v 29 काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
\s5
\c 30
\s पुन्हा एकत्र केले जाऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी
\p
\v 1 मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास इतर राष्ट्रांमध्ये घालवून देईल. तेव्हा तुम्हास या सर्व गोष्टींची आठवण होईल.
\v 2 तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळाल आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची वाणी ऐकाल.
\v 3 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर दया दाखवील आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांगा केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील तो तुम्हास मुक्त करील.
\s5
\v 4 तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करून टाकली होती तेथून तुझा देव परमेश्वर तुम्हास परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात!
\v 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक कल्याण करील आणि तुम्हास अधीक बहूगुणीत करील.
\s5
\v 6 तुमचा देव परमेश्वर तुमच्या हृदयाची सुंता व तुमच्या पुर्वंजांच्या हृदयाची सुंता करील आणि आपण जीवंत रहावे म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपुर्ण मनाने व संपुर्ण जीवाने प्रेम कराल.
\v 7 मग हे सर्व शाप तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंवर व तिरस्कार करणाऱ्यावर आणील.
\v 8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल.
\s5
\v 9 मी तुम्हास सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हास भरपूर संतती होईल. गाईना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्यास आनंद वाटेल.
\v 10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.
\s5
\v 11 जी आज्ञा मी आता तुम्हास देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही.
\v 12 ती काही स्वर्गात नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागावे.
\s5
\v 13 ती समुद्रापलीकडे नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करून जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागेल.
\v 14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हास ते पाळता येईल.
\s5
\v 15 आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत.
\v 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ रहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
\s5
\v 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;
\v 18 तर मात्र तुमचा नाश ठरलेलाच आहे हे मी तुम्हास बजावून सांगतो. यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.
\s5
\v 19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हास जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्विकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहतील.
\v 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्यास सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
\s5
\c 31
\s मोशेनंतर होणारा नेता यहोशवा
\r गण. 27:12-23
\p
\v 1 मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.
\v 2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे, परमेश्वराने मला सांगितले आहे.
\v 3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हास साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
\s5
\v 4 अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील.
\v 5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे.
\v 6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
\s5
\v 7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यास सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर.
\v 8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.”
\s प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीस नियमशास्त्राचे वाचन व्हावे
\s5
\p
\v 9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांसही मोशेने हे नियमशास्त्र दिले.
\v 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “प्रत्येक सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.
\v 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे.
\s5
\v 12 पुरुष, स्त्रिया, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचे भय धरावे या शिकवणीचे जीवनात आचरण करावे.
\v 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लवकरच तुम्ही यार्देन ओलांडून जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्याज विषयीचे भय धरण्यास तो शिकवील.”
\s परमेश्वराने मोशेला दिलेल्या अखेरच्या सूचना
\s5
\p
\v 14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्यास आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शनमंडपामध्ये गेले.
\v 15 दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला.
\s5
\v 16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”
\s5
\v 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत.
\v 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
\s5
\v 19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांस शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करून घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरूद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील.
\v 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील.
\s5
\v 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. कारण जो देश मी शपथ वाहून देऊ केला. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे याबाबत जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
\s5
\v 22 तेव्हा त्याच दिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांस ते शिकवले.
\v 23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”
\s5
\v 24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर
\v 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,
\v 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुध्द हा साक्ष राहील.
\s5
\v 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरूद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.
\v 28 तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.
\v 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
\s5
\v 30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले.
\s5
\c 32
\s मोशेचे गीत
\p
\v 1 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.” पृथ्वी ऐक शब्द माझ्या मुखातले.
\v 2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.
\s5
\v 3 मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन. तुम्हीही परमेश्वराची महती गा!
\v 4 तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.
\s5
\v 5 तुम्ही त्याची मुले नाहीत. तुमची पापे त्यास मळीन करतील. तुम्ही लबाड आहात.
\v 6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे.
\s5
\v 7 आठवण करा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते लक्षात आणा; आपल्या बापाला विचारा, तो सांगेल आपल्या वडीलजनांना विचारा, ते सांगतील.
\v 8 परात्पर देवाने लोकांची विभागणी राष्ट्रा राष्ट्रांमध्ये केली. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल लोंकाच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या.
\s5
\v 9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे.
\v 10 याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले.
\s5
\v 11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.
\v 12 परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
\s5
\v 13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
\s5
\v 14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यालात.
\s5
\v 15 पण यशुरुन
\f + इस्राएल
\f* पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
\v 16 त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ति त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ति केल्या व त्याचा कोप ओढवला.
\s5
\v 17 खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
\v 18 आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.
\s5
\v 19 परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्यास चिथवले होते!
\v 20 तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत.
\s5
\v 21 मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढवला. मूर्ति म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ति करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.
\s5
\v 22 माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
\s5
\v 23 मी इस्राएलांवर संकटे आणीन. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.
\v 24 भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भंयकर मरीने ग्रस्त होतील. वनपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.
\s5
\v 25 रस्त्यावर सैन्य त्यांना तलवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरूण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.
\v 26 लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.
\s5
\v 27 पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही, अशी ते बढाई मारतील.
\s5
\v 28 इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे, त्यास समज म्हणून नाहीच.
\v 29 ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता.
\s5
\v 30 एक मनुष्य हजारांचा पाठलाग करु शकेल काय? दोघेजण दहा हजारांना सळो की पळे करून सोडू शकतील का? परमेश्वरानेच या जमावला आपल्या शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल.
\v 31 आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात.
\s5
\v 32 सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे त्यांची द्राक्षे विषारी आहेत त्यांचे घोस कडूच आहेत.
\s5
\v 33 त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस अजगराचे विषारी गरळासमान आहे.
\v 34 परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे.
\s5
\v 35 अनवधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहत आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.
\s5
\v 36 परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करून सोडील.
\s5
\v 37 परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग?
\v 38 ते खोटे दैवत तुमच्या यज्ञातील चरबी खाणारे, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षारस प्राशन करणारे दैवत कोठे आहेत? तेव्हा त्या दैवतांनीच उठून यावे व तुम्हास साहाय्य करावे!
\s5
\v 39 तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
\v 40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील.
\s5
\v 41 माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत.
\s5
\v 42 माझे शत्रू ठार होतील. त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील.
\s5
\v 43 समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा. कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो. शत्रूला योग्य अशी शिक्षा देतो. आणि आपली प्रजा आणि प्रदेश ह्यांच्यासाठी प्रायश्चित करतो.
\s5
\v 44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा (म्हणजेच, यहोशवा) मोशेबरोबर होता.
\v 45 ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने इस्राएल लोकांस सांगण्याचे संपविल्यावर
\s5
\v 46 मोशे लोकांस म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा.
\v 47 त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.”
\s दुरून कनान देश पाहण्याची मोशेला संधी मिळते
\s5
\p
\v 48 त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 49 “मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.
\s5
\v 50 या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल.
\v 51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही.
\v 52 तेव्हा मी इस्राएलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस पण तुझे तेथे जाणे होणार नाही.”
\s5
\c 33
\s इस्त्राएल लोकांच्या घराण्यांना मोशे आशीर्वाद देतो
\p
\v 1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
\v 2 “परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
\s5
\v 3 परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
\v 4 मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
\s5
\v 5 इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
\v 6 रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
\s5
\v 7 मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
\s5
\v 8 लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
\s5
\v 9 हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
\s5
\v 10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
\s5
\v 11 परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
\s5
\v 12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”
\s5
\v 13 योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
\s5
\v 14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना
\f + चंद्र
\f* आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.
\v 15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
\s5
\v 16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्यास मिळो.
\s5
\v 17 प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
\s5
\v 18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
\v 19 ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
\s5
\v 20 गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
\s5
\v 21 स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”
\s5
\v 22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
\s5
\v 23 नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
\s5
\v 24 आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
\v 25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
\s5
\v 26 हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
\s5
\v 27 देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
\s5
\v 28 म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
\s5
\v 29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!
\s5
\c 34
\s मोशेचा मृत्यू
\p
\v 1 मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश,
\v 2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला.
\v 3 तसेच नेगेब आणि सोअरापासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हेही दाखवले.
\s5
\v 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.”
\v 5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच.
\v 6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही.
\s5
\v 7 मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती.
\v 8 इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.
\s5
\v 9 मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
\s5
\v 10 इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.
\v 11 मिसर देशामध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसर देशामध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले.
\v 12 मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.