mr_ulb/03-LEV.usfm

1811 lines
306 KiB
Plaintext
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

\id LEV LEV Unlocked Literal Bible
\ide UTF-8
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h लेवीय
\toc1 लेवीय
\toc2 लेवीय
\toc3 lev
\mt1 लेवीय
\mt2 The Third Book of Moses
\mt2 मोशेने लिहिलेले तिसरे पुस्तक
\is लेखक
\ip पुस्तकाच्या शेवटच्या वचनातून लेखकाची समस्या सोडवली आहे, “या आज्ञा त्या आहेत ज्या परमेश्वराने सीनाय पर्वतावर इस्त्राएल लोकांसाठी मोशेला आज्ञा दिली” (27:34; 7:38; 25:1; 26:46). इतिहासाच्या पुस्तकात अनेक ऐतिहासिक खात्यांची नोंद आहे (8:10; 24:10-23). लेवीय हा शब्द लेवींच्या वंशातून आला आहे, जे सदस्य परमेश्वराद्वारे त्याचे याजक व आराधनेचे नेते म्हणून नेमलेले होते. पुस्तक लेव्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिक महत्त्वाच्या विषयांना संबोधित करते, सर्व याजकांना आराधनेत लोकांना मदत करण्यास सांगितले जाते आणि लोकांनी पवित्र जीवन कसे जगावे याविषयी माहिती दिली जाते.
\is तारीख आणि लिखित स्थान
\ip साधारण इ. पू. 1446-1405
\ip लेवीयमध्ये सापडलेल्या नियमशास्त्रात देव सिनाय पर्वताजवळ किंवा जवळच्या ठिकाणी मोशेशी बोलला होता, जेथे इस्त्राएली लोकांनी काही काळ तळ ठोकला होता.
\is प्राप्तकर्ता
\ip हे पुस्तक याजक, लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्याकडून लिहिण्यात आले.
\is हेतू
\ip लेवीय हे पुस्तक परमेश्वराद्वारे सुरु केले जाते जे मोशेला पवित्र निवास मंडपापासून बोलावते. लेवीय पुस्तकाचे वर्णन, या उद्धारित लोकांचे वर्णन करते की, आता आपल्यामध्ये असलेल्या परमपवित्र देवाबरोबर योग्य संगती कशी टिकवून ठेवावी. राष्ट्राने फक्त मिसर त्याची संस्कृती व धर्म सोडून दिलेला आहे, आणि कनानमध्ये प्रवेश करणार आहे, जेथे इतर संस्कृती आणि धर्म राष्ट्रावर प्रभाव पाडतील. लेवीय लोकांना या संस्कृतीपासून वेगळे (पवित्र) राहण्यास आणि परमेश्वराशी विश्वासू राहण्यास मुभा प्रदान करते.
\is विषय
\ip सूचना
\iot रूपरेषा
\io1 1. अर्पणांसाठी सूचना (अध्याय 1-7)
\io1 2. देवाच्या याजकांसाठी सूचना (अध्याय 8-10)
\io1 3. देवाच्या लोकांसाठी सूचना (अध्याय 11-15)
\io1 4. वेदीसाठी सूचना आणि प्रायश्चित्ताचा दिवस (अध्याय 16)
\io1 5. व्यावहारिक पवित्रता (अध्याय 17-22)
\io1 6. शब्बाथ, सण आणि उत्सव (अध्याय 23-25)
\io1 7. देवाच्या आशीर्वादांचा प्राप्त करण्यासाठी अटी (अध्याय 26-27)
\s5
\c 1
\s होमार्पणे
\p
\v 1 परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले,
\v 2 इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा.
\s5
\p
\v 3 जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.
\v 4 त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल.
\s5
\p
\v 5 त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.
\v 6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.
\s5
\p
\v 7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
\v 8 अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी;
\v 9 त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय.
\s5
\p
\v 10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.
\v 11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे.
\s5
\p
\v 12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी,
\v 13 त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय;
\s5
\p
\v 14 जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी.
\v 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
\s5
\p
\v 16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
\v 17 त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
\s5
\c 2
\s अन्नार्पणे
\p
\v 1 जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
\v 2 मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
\v 3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
\s5
\p
\v 4 जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
\v 5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
\s5
\p
\v 6 त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय.
\v 7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.
\s5
\p
\v 8 अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
\v 9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.
\v 10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे.
\s5
\p
\v 11 खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
\v 12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
\v 13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
\s5
\p
\v 14 जर परमेश्वराकरीता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय.
\v 15 त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे अन्नार्पण होय.
\v 16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम जाळावा; हे परमेश्वरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
\s5
\c 3
\s शांत्यर्पणे
\p
\v 1 जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
\v 2 त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
\s5
\p
\v 3 परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
\v 4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
\v 5 व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
\s5
\p
\v 6 परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
\v 7 जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
\v 8 त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
\s5
\p
\v 9 अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
\v 10 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
\v 11 मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे,
\s5
\p
\v 12 “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
\v 13 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
\v 14 त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
\s5
\p
\v 15 दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
\v 16 मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
\v 17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”
\s5
\c 4
\s पापार्पणे
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
\v 3 जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकावंर दोष येईल, असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
\s5
\p
\v 4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
\v 5 मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;
\s5
\p
\v 6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
\v 7 मग याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे;
\s5
\p
\v 8 आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
\v 9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
\v 10 शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
\s5
\p
\v 11 गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
\v 12 अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
\s5
\p
\v 13 इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
\v 14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.
\v 15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.
\s5
\p
\v 16 नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;
\v 17 मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
\s5
\p
\v 18 मग त्याने परमेश्वरासमोर दर्शनमंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
\v 19 त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा;
\s5
\p
\v 20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
\v 21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.
\s5
\p
\v 22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,
\v 23 व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा;
\s5
\p
\v 24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
\v 25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
\s5
\p
\v 26 शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.
\s5
\p
\v 27 सामान्य मनुष्यांमधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला;
\v 28 आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी;
\s5
\p
\v 29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
\v 30 मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे;
\s5
\p
\v 31 आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.
\s5
\p
\v 32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
\v 33 त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे.
\s5
\p
\v 34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
\v 35 त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
\s5
\c 5
\p
\v 1 जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
\v 2 किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
\s5
\p
\v 3 त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल
\f + वचन 12-14 वाचा
\f* .
\v 4 किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
\s5
\p
\v 5 तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
\v 6 आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
\s5
\p
\v 7 त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
\v 8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
\v 9 पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.
\s5
\p
\v 10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल.
\s5
\p
\v 11 “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग
\f + साधारण एक किलोग्राम
\f* सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.
\s5
\p
\v 12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.
\v 13 अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”
\s दोषार्पणे
\s5
\p
\v 14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 15 “परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे; हे दोषार्पण होय.
\p
\v 16 ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
\s5
\p
\v 17 परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
\v 18 त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
\v 19 हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”
\s5
\c 6
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.
\v 3 किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;
\v 4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती,
\s5
\p
\v 5 किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;
\v 6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
\v 7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.
\s होमार्पणाचा विधी
\s5
\p
\v 8 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 9 अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
\s5
\p
\v 10 मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.
\v 11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी;
\s5
\p
\v 12 परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
\v 13 वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
\s अन्नार्पणाचा विधी
\s5
\p
\v 14 हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;
\v 15 याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपिठ, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय,
\s5
\p
\v 16 अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
\v 17 ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.
\v 18 या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
\s5
\p
\v 19 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
\v 20 “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा
\f + साधारण एक किलोग्राम
\f* मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
\s5
\p
\v 21 ते तव्यावर तेलात परतावे त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.
\v 22 त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.
\v 23 याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.”
\s पापार्पणाचा विधी
\s5
\p
\v 24 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 25 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
\v 26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
\s5
\p
\v 27 ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे.
\v 28 मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
\s5
\p
\v 29 याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;
\v 30 आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपामध्ये पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.
\s5
\c 7
\s दोषार्पणाचा विधी
\p
\v 1 दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.
\v 2 ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे.
\v 3 त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी,
\v 4 दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत,
\s5
\p
\v 5 या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
\v 6 याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.
\s5
\p
\v 7 दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.
\v 8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल.
\s5
\p
\v 9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
\v 10 प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.
\s शांत्यर्पणाचा विधी
\s5
\p
\v 11 परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
\v 12 त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
\s5
\p
\v 13 त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
\v 14 या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.
\s5
\p
\v 15 त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.
\v 16 यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.
\s5
\p
\v 17 त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
\v 18 जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
\s5
\p
\v 19 ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
\v 20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
\s5
\p
\v 21 एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल मग ती अशुद्धता मनुष्याची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
\s5
\p
\v 22 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 23 सर्व इस्राएल लोकांस असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
\v 24 मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये.
\s5
\p
\v 25 परमेश्वरास होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे
\v 26 “तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
\v 27 जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”
\s5
\p
\v 28 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 29 “इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
\v 30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
\s5
\p
\v 31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.
\v 32 तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
\s5
\p
\v 33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
\v 34 मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”
\s5
\p
\v 35 परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
\v 36 परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे.
\s5
\p
\v 37 हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे;
\v 38 इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.
\s5
\c 8
\s अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे समर्पण
\r निर्ग. 29:1-37
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
\v 3 दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.
\s5
\p
\v 4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.
\v 5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”
\s5
\p
\v 6 मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
\v 7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.
\s5
\p
\v 8 मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;
\v 9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
\s5
\p
\v 10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.
\v 11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले.
\s5
\p
\v 12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले.
\v 13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\p
\v 14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
\v 15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
\s5
\p
\v 16 गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
\v 17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
\s5
\p
\v 18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
\v 19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
\s5
\p
\v 20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.
\v 21 त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\p
\v 22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
\v 23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
\v 24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
\s5
\p
\v 25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
\v 26 परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
\v 27 हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
\s5
\p
\v 28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते.
\v 29 मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
\s5
\p
\v 30 मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
\s5
\p
\v 31 मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे; तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
\v 32 मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
\v 33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.
\s5
\p
\v 34 परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.
\v 35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”
\v 36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
\s5
\c 9
\s अहरोनाने केलेली अर्पणे
\p
\v 1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले.
\v 2 तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर;
\s5
\p
\v 3 आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत;
\v 4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.”
\v 5 मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
\s5
\p
\v 6 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.”
\v 7 मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
\s5
\p
\v 8 तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.
\v 9 मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
\s5
\p
\v 10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.
\v 11 मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
\s5
\p
\v 12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
\v 13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
\v 14 त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
\s5
\p
\v 15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.
\v 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.
\v 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
\s5
\p
\v 18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
\v 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
\s5
\p
\v 20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.
\v 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
\s5
\p
\v 22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
\v 23 मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले;
\v 24 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
\s5
\c 10
\s नादाब आणि अबीहू ह्यांचे पातक
\p
\v 1 मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;
\v 2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
\s5
\p
\v 3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील;
\p त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे,
\p मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे.
\m तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”
\v 4 अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
\s5
\p
\v 5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
\s याजकांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या
\p
\v 6 मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
\v 7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
\s5
\p
\v 8 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
\v 9 “जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.
\v 10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;
\v 11 याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”
\s5
\p
\v 12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
\v 13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
\s5
\p
\v 14 “त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
\v 15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
\s5
\p
\v 16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
\v 17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते;
\v 18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”
\s5
\p
\v 19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
\v 20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
\s5
\c 11
\s शुद्ध व अशुद्ध प्राणी
\r अनु. 14:3-20
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:
\v 2 इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
\s5
\p
\v 3 ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
\v 4 काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशूद्ध समजावे, जसे उंट, हा रवंथ करतो पंरतू त्याचा खुर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
\s5
\p
\v 5 शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा.
\v 6 ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा.
\v 7 डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे.
\v 8 या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
\s5
\p
\v 9 “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
\v 10 जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टिने ते अयोग्य आहेत.
\s5
\p
\v 11 ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
\v 12 जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
\s5
\p
\v 13 देवाच्या दृष्टिने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
\v 14 घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
\v 15 निरनिराळ्या जातीचे कावळे,
\v 16 शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
\s5
\p
\v 17 पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
\v 18 पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड,
\v 19 करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
\s5
\p
\v 20 जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
\v 21 परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.
\v 22 त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.
\v 23 परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
\s5
\p
\v 24 त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;
\v 25 जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 26 ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत;
\v 27 चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 28 जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
\s5
\p
\v 29 जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
\v 30 चोपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिऱ्या सरडा.
\s5
\p
\v 31 हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
\v 33 त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
\s5
\p
\v 34 अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे.
\v 35 त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
\s5
\p
\v 36 झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल.
\v 37 त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
\v 38 परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
\s5
\p
\v 39 खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 40 कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 41 “जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
\v 42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
\s5
\p
\v 43 कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका!
\v 44 कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
\v 45 मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
\s5
\p
\v 46 प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत.
\v 47 या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी, तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्याच्यातील भेद तुम्हास समजावा.
\s5
\c 12
\s प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.
\v 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
\s5
\p
\v 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.
\v 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध रहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.
\s5
\p
\v 6 तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.
\s5
\p
\v 7 मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.
\v 8 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल;
\s5
\c 13
\s महारोग व कातडीचे रोग यासंबंधीचे नियम
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
\v 2 एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
\s5
\p
\v 3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.
\v 4 त्या मनुष्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास सात दिवस इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे.
\s5
\p
\v 5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याजकाने त्यास आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
\v 6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
\s5
\p
\v 7 परंतु त्या मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
\v 8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
\s5
\p
\v 9 एखाद्या मनुष्यास महारोगाचा चट्टा असेल तर त्यास याजकाकडे न्यावे.
\v 10 याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
\v 11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
\s5
\p
\v 12 एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे,
\v 13 याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
\v 14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
\s5
\p
\v 15 याजकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
\v 16 परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
\v 17 याजकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
\s5
\p
\v 18 कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
\v 19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
\v 20 याजकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.
\s5
\p
\v 21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 22 त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे.
\v 23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे.
\s5
\p
\v 24 एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.
\v 25 तर याजकाने त्यास तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
\s5
\p
\v 26 परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 27 सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;
\v 28 परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
\s5
\p
\v 29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला,
\v 30 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई म्हणजे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
\s5
\p
\v 31 तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे;
\s5
\p
\v 32 सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
\v 33 तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या मनुष्यास आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
\s5
\p
\v 34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.
\s5
\p
\v 35 परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
\v 36 तर याजकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे.
\p
\v 37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.
\s5
\p
\v 38 कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.
\v 39 तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
\s5
\p
\v 40 कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय.
\v 41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे.
\s5
\p
\v 42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
\v 43 मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
\v 44 तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो मनुष्य अशुद्ध होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.
\s5
\p
\v 45 ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.
\v 46 जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
\s5
\p
\v 47 “एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,
\v 48 किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.
\v 49 आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा;
\s5
\p
\v 50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.
\v 51 त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.
\v 52 ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;
\s5
\p
\v 53 परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
\v 54 याजकाने लोकांस ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
\s5
\p
\v 56 परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
\v 57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
\v 58 परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
\s5
\p
\v 59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
\s5
\c 14
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 महारोग बरा झालेल्या लोकांस शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे.
\s5
\p
\v 3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.
\v 4 तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे.
\v 5 मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी.
\s5
\p
\v 6 याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;
\v 7 आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे;
\s5
\p
\v 8 मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर रहावे;
\v 9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
\s5
\p
\v 10 आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा
\f + साधारण तीन किलोग्राम
\f* मैदा, व एक
\fe + त्या काळाची मापे
\fe* लोगभर
\f + साधारण 334 ग्राम
\f* तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;
\v 11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
\s5
\p
\v 12 मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे;
\v 13 मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.
\s5
\p
\v 14 मग याजकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
\p
\v 15 याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
\v 16 मग याजकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.
\s5
\p
\v 17 त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
\v 18 तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
\s5
\p
\v 19 मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;
\v 20 मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
\s5
\p
\v 21 परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा
\f + साधारण तीन किलोग्राम
\f* मैदा आणि एक लोगभर
\f + साधारण 334 ग्राम
\f* तेल आणावे;
\v 22 आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.
\v 23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
\s5
\p
\v 24 मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
\v 25 त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि त्याने त्या कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्यांला लावावे.
\s5
\p
\v 26 याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
\v 27 मग याजकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
\s5
\p
\v 28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे;
\p
\v 29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.
\s5
\p
\v 30 मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
\p
\v 31 त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहीत करावी; ह्याप्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो मनुष्य शुद्ध होईल.
\v 32 अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.
\s5
\p
\v 33 परमेश्वर मोशे व अहरोन ह्याना असेही म्हणाला,
\v 34 कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,
\v 35 तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते.
\s5
\p
\v 36 मग याजकाने लोकांस घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
\v 37 तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.
\v 38 तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.
\s5
\p
\v 39 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
\v 40 चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांस आज्ञा द्यावी.
\s5
\p
\v 41 मग याजकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.
\v 42 त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
\s5
\p
\v 43 जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला.
\v 44 तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय; ते घर अशुद्ध आहे.
\s5
\p
\v 45 मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.
\v 46 आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे;
\v 47 त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.
\s5
\p
\v 48 घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
\s5
\p
\v 49 त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
\v 50 त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
\v 51 मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
\s5
\p
\v 52 त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जीवंत पक्षी, गंधसरूचे लाकुड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.
\v 53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल.
\s5
\p
\v 54 सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई,
\v 55 कपड्यावरील किंवा घराचा महारोग,
\v 56 सूज, खवंद, तकतकीत डाग या सर्वासंबधीचे हे नियम आहेत;
\v 57 हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.
\s5
\c 15
\s शरीरातून वाहणारा अशुद्ध स्त्राव
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
\v 3 त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
\s5
\p
\v 4 स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
\v 5 जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 6 स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 7 स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 8 स्त्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 9 स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
\s5
\p
\v 10 त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 11 स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 12 परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
\s5
\p
\v 13 स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
\v 14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
\v 15 मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
\s5
\p
\v 16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 17 ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
\v 18 स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 19 एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे;
\v 20 ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
\s5
\p
\v 21 जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 22 ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\v 23 तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 24 अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
\s5
\p
\v 25 एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.
\v 26 तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी.
\v 27 जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
\s5
\p
\v 28 त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.
\v 29 मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
\v 30 मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
\s5
\p
\v 31 ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांस अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!
\s5
\p
\v 32 स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;
\v 33 आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.
\s5
\c 16
\s प्रायश्चित्ताचा दिवस
\r लेवी 23:26-32; गण. 29:7-11
\p
\v 1 अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
\v 2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो;
\s5
\p
\v 3 परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
\v 4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
\v 5 मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
\s5
\p
\v 6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
\v 7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
\s5
\p
\v 8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी
\v 9 ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
\v 10 पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
\s5
\p
\v 11 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.
\s5
\p
\v 12 नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
\v 13 त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही;
\s5
\p
\v 14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
\s5
\p
\v 15 मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
\v 16 आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.
\s5
\p
\v 17 अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
\v 18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
\v 19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
\s5
\p
\v 20 जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
\v 21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
\v 22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
\s5
\p
\v 23 मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
\v 24 मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
\s5
\p
\v 25 मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.
\v 26 ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.
\s5
\p
\v 27 पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
\v 28 ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.
\s5
\p
\v 29 तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशीय असो;
\v 30 हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
\v 31 तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.
\s5
\p
\v 32 तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
\v 33 त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.”
\s5
\p
\v 34 इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.
\s5
\c 17
\s अर्पणे करण्याचे एकमेव स्थळ
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही:
\v 3 इस्राएल घराण्यातील एखाद्या मनुष्याने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
\v 4 परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\s5
\p
\v 5 या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
\v 6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
\s5
\p
\v 7 आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हास पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
\s5
\p
\v 8 तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
\v 9 तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्यास बाहेर टाकावे.
\s रक्ताचे सेवन करणे वर्ज्य
\s5
\p
\v 10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
\v 11 कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.
\s5
\p
\v 12 म्हणून मी इस्राएल लोकांस सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
\v 13 इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
\s5
\p
\v 14 कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्राएल लोकांस म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.
\s5
\p
\v 15 “कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; म्हणजे तो शुद्ध होईल.
\v 16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी ठरेल, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”
\s5
\c 18
\s अनैतिक आचरण वर्ज्य
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 3 तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.
\s5
\p
\v 4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
\v 7 तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.
\v 8 तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.
\s5
\p
\v 9 तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको.
\v 10 तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!
\v 11 जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
\s5
\p
\v 12 तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
\v 13 तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
\v 14 तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.
\s5
\p
\v 15 तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची पत्नी आहे तिच्याशी शारीरिक संबध ठेवू नको.
\v 16 तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको.
\s5
\p
\v 17 एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे.
\v 18 तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
\s5
\p
\v 19 स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.
\v 20 तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.
\s5
\p
\v 21 तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
\s5
\p
\v 22 स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
\v 23 कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
\s5
\p
\v 24 अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
\v 25 त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाशांचा त्याग करीत आहे.
\s5
\p
\v 26 ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.
\v 27 कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.
\v 28 जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
\s5
\p
\v 29 जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\v 30 इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; अशी भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\c 19
\s पावित्र्य व न्याय ह्यांसंबंधी नियम
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 सर्व इस्राएलाच्या मंडळीतील लोकांस सांग की, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
\v 3 तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\v 4 तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 5 तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल.
\v 6 त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
\v 7 तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही.
\v 8 कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या मनुष्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
\s5
\p
\v 9 तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक काढू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका.
\v 10 आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 11 तुम्ही चोरी करु नये.
\p कोणाला फसवू नये.
\p एकमेकाशी कपटाने बोलू नये.
\p
\v 12 तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 13 आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
\p
\v 14 बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 15 न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
\p
\v 16 आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 17 आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
\p
\v 18 लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 19 तुम्ही माझे नियम पाळा.
\p आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका;
\p दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका;
\p भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका.
\s5
\p
\v 20 एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये;
\p
\v 21 हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;
\v 22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल.
\s5
\p
\v 23 तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत.
\v 24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.
\v 25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 26 तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका;
\p तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
\p
\v 27 आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका.
\p
\v 28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 29 तू आपल्या मुलीला वेश्या करुन भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
\m
\v 30 तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 31 सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 32 वडीलधाऱ्या मनुष्यांना मान द्या; वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
\s5
\v 33 कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका.
\p
\v 34 तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास स्वदेशीय मनुष्यासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एकेकाळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 35 लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका.
\v 36 तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले!
\v 37 “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!”
\s5
\c 20
\s आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “तू इस्राएल लोकांस आणखी असे सांग की, इस्राएलांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्या परकियांपैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या मनुष्यास जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा!”
\s5
\p
\v 3 मीही त्या मनुष्याच्या विरूद्ध होईन! आणि त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला!
\v 4 मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्यास जिवे मारणार नाहीत.
\v 5 तर मी त्या मनुष्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरूद्ध होईन! आणि त्यास व मजवर अविश्वास दाखवून जो कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्यामागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
\s5
\p
\v 6 जो मनुष्य व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे मी त्याच्या विरूद्ध होईन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
\v 7 म्हणून शुद्ध व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 8 तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर
\f + यहोवा-मकादेश
\f* आहे!
\p
\v 9 जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
\s5
\p
\v 10 जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व ती स्त्री, ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे.
\p
\v 11 जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\p
\v 12 एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\s5
\p
\v 13 एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
\p
\v 14 कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
\s5
\p
\v 15 कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्यास अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
\p
\v 16 कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\s5
\p
\v 17 कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली पत्नी करून घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
\p
\v 18 ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीरसंबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे.
\s5
\p
\v 19 आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
\p
\v 20 कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
\p
\v 21 आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती होणार नाही.
\s5
\p
\v 22 म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
\p
\v 23 ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका.
\s5
\p
\v 24 मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत
\f + सुपीक जमीन
\f* ; इतर राष्ट्रापासून वेगळे करून मी तुम्हास माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\v 25 म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्याच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.
\s5
\p
\v 26 तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हास इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
\s5
\p
\v 27 कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\s5
\c 21
\s याजकांचे पावित्र्य
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.
\v 2 परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
\v 3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
\s5
\p
\v 4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये.
\p
\v 5 याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
\v 6 त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र रहावे आणि आपल्या देवाच्या नावाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र रहावे.
\s5
\p
\v 7 याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये.
\p
\v 8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
\p
\v 9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
\s5
\p
\v 10 आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
\v 11 त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
\v 12 त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 13 मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
\v 14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
\v 15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
\s5
\p
\v 16 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 17 “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
\s5
\p
\v 18 शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
\v 19 मोडक्या पायाचा, थोटा,
\v 20 कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
\v 21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.
\s5
\p
\v 22 तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
\v 23 परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
\v 24 तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे पुत्र व सगळे इस्राएल लोक ह्याना हे सर्व सांगितले.
\s5
\c 22
\s अर्पणांचे पावित्र्य
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर रहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
\v 3 तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्राएल लोकांनी समर्पीत केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये, त्यास मजसमोरुन दूर करावे. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 4 अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य,
\v 5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्यास स्पर्श केल्यामुळे
\v 6 याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
\s5
\p
\v 7 सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
\v 8 आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
\p
\v 9 त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; ती ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
\s5
\p
\v 10 फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
\v 11 परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
\s5
\p
\v 12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
\v 13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.
\s5
\p
\v 14 एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.
\p
\v 15 इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
\v 16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना
\f + लोक किंवा अर्पणे
\f* पवित्र करणारा आहे!
\s5
\p
\v 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 18 अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
\v 19 व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!
\s5
\p
\v 20 परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
\p
\v 21 एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
\s5
\v 22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
\v 23 गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
\s5
\p
\v 24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
\v 25 देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही विदेशी लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!
\s5
\p
\v 26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 27 वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
\s5
\p
\v 28 परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
\v 29 परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
\v 30 अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 31 तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
\p
\v 32 तुम्ही माझ्या पवित्र नांवाचा अनादर करू नये. माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हास माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
\v 33 मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!”
\s5
\c 23
\s नेमून दिलेले सण
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांस असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण असे:
\s शब्बाथ दिवस
\s5
\p
\v 3 सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
\s वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण
\r गण. 28:16-25
\s5
\p
\v 4 परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
\v 5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या
\f + साधारण मार्च 16 ते एप्रिल 15 च्या दरम्यान
\f* दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
\v 6 त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).
\s5
\p
\v 7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
\v 8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.”
\s प्रथम फळाचा सण
\s5
\p
\v 9 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 10 “इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
\v 11 याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बाथाच्या पुढच्या दिवशी ती याजकाने आेवाळावी.
\s5
\p
\v 12 पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे;
\v 13 तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन
\f + साधारण एक किलोग्राम
\f* द्राक्षारस अर्पावा.
\v 14 तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे रहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.
\s आठवड्यांचा सण
\r निर्ग. 34:22; गण. 28:26-31; अनु. 16:9, 10
\s5
\p
\v 15 तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
\v 16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
\s5
\p
\v 17 त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
\v 18 एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल.
\s5
\p
\v 19 आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावित.
\v 20 याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
\v 21 त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय.
\s5
\p
\v 22 तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
\s कर्णे फुंकण्याचा सण
\r गण. 29:1-6
\s5
\p
\v 23 आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 24 “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
\v 25 तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.”
\s प्रायश्चिताचा सण
\r गण. 29:7-11
\s5
\p
\v 26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.
\s5
\p
\v 28 त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
\v 29 त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\s5
\p
\v 30 त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
\v 31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
\v 32 तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
\s निवास मंडपाचा सण
\r गण. 29:12-40; अनु. 16:13-17
\s5
\p
\v 33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
\v 34 “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
\s5
\p
\v 35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये.
\v 36 सात दिवस परमेश्वरास अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
\s5
\p
\v 37 परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे.
\v 38 परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
\s5
\p
\v 39 जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
\s5
\p
\v 40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा.
\v 41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
\s5
\p
\v 42 तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात रहावे,
\v 43 म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
\v 44 तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले.
\s5
\c 24
\s दिव्याची काळजी
\r निर्ग. 27:20, 21
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांस आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
\s5
\p
\v 3 अहरोनाने दर्शनमंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
\v 4 त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.
\s संमक्षतेची भाकर
\s5
\p
\v 5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
\v 6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
\s5
\p
\v 7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल.
\v 8 प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
\v 9 ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय.”
\s दुर्भाषण आणि नुकसानभरपाई
\s5
\p
\v 10 त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला.
\v 11 तो इस्राएली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
\v 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.
\s5
\p
\v 13 मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला,
\v 14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारुन टाकावे.
\s5
\p
\v 15 तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
\v 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जिवे मारावे.
\s5
\p
\v 17 जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे.
\v 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.
\s5
\p
\v 19 जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
\v 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी.
\v 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
\s5
\p
\v 22 परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
\v 23 मोशेने इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
\s5
\c 25
\s शब्बाथवर्ष आणि योबेलवर्ष
\r अनु. 15:1-11
\p
\v 1 सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस असे सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी.
\s5
\p
\v 3 सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;
\v 4 पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.
\s5
\p
\v 5 तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.
\v 6 तरी तुम्हास शब्बाथाच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल;
\v 7 आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.
\s5
\p
\v 8 तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल.
\v 9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे;
\s5
\p
\v 10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
\s5
\p
\v 11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल
\f + पन्नासावा वार्षिकोत्सव
\f* वर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;
\v 12 कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
\s5
\p
\v 13 या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
\p
\v 14 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
\s5
\p
\v 15 तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे.
\v 16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पिकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल.
\v 17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!
\s5
\p
\v 18 माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल;
\v 19 आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित रहाल.
\s5
\p
\v 20 तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही.
\v 21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास तीन वर्षाचे पीक देईल.
\v 22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल.
\s5
\p
\v 23 जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
\v 24 म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी.
\v 25 तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
\s5
\p
\v 26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.
\v 27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
\v 28 पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
\s5
\p
\v 29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
\v 30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
\s5
\p
\v 31 तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
\v 32 परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
\s5
\p
\v 33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
\v 34 लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
\s5
\p
\v 35 तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;
\v 36 त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे.
\v 37 तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.
\v 38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
\s5
\p
\v 39 तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;
\v 40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
\v 41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे;
\s5
\p
\v 42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये.
\v 43 तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
\v 44 तुमच्या दासदासी; तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे;
\s5
\p
\v 45 तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील;
\v 46 तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांस तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये.
\s5
\p
\v 47 तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
\v 48 तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्यास सोडवता येईल;
\s5
\p
\v 49 किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्यास सोडवता येईल किंवा तो स्वत:च धनवान झाला तर त्यास स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करून घेता येईल.
\v 50 त्यास विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्यास फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!
\s5
\p
\v 51 योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील.
\v 52 योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.
\s5
\p
\v 53 त्याने आपल्या मालकापाशी सालादाराप्रमाणे रहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये.
\v 54 जरी त्या मनुष्यास पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलेबाळे मुक्त होतील.
\v 55 कारण इस्राएल लोक माझे दास आहेत; त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\c 26
\s आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
\r अनु. 7:12-24; 28:1-68
\p
\v 1 तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 2 तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.
\s5
\p
\v 3 तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,
\v 4 तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
\s5
\p
\v 5 तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल.
\v 6 मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.
\s5
\p
\v 7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
\v 8 तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
\s5
\p
\v 9 मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
\v 10 तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
\s5
\p
\v 11 मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.
\v 12 मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
\v 13 मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
\s आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा
\s5
\p
\v 14 परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
\v 15 तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,
\s5
\p
\v 16 जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
\v 17 मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
\s5
\p
\v 18 या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन.
\v 19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
\v 20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
\s5
\p
\v 21 तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
\v 22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
\s5
\p
\v 23 एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,
\v 24 तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.
\s5
\p
\v 25 मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
\v 26 मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
\s5
\p
\v 27 एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
\v 28 तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!
\s5
\p
\v 29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
\v 30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
\s5
\p
\v 31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
\v 32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
\v 33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
\s5
\p
\v 34 जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रुंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.
\v 35 देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल.
\v 36 तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
\s5
\p
\v 37 कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
\v 38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
\v 39 तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
\s5
\p
\v 40 परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.
\v 41 या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील.
\v 42 तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
\s5
\p
\v 43 त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.
\s5
\p
\v 44 इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे.
\v 45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!
\s5
\p
\v 46 हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.
\s5
\c 27
\s नवसांसंबंधी नियम
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे:
\s5
\p
\v 3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे,
\v 4 आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे;
\s5
\p
\v 5 मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
\v 6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
\s5
\p
\v 7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
\v 8 परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
\s5
\p
\v 9 काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
\v 10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
\s5
\p
\v 11 काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
\v 12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
\v 13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
\s5
\p
\v 14 एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
\v 15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
\s5
\p
\v 16 एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल
\f + त्यामध्ये किती धान्य प्राप्ती झाली त्यावरुन त्याचे मोल ठरेल
\f* ; एक होमर
\f + साधारण 300 किलोग्राम
\f* , सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
\s5
\p
\v 17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
\v 18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
\s5
\p
\v 19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
\v 20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
\v 21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
\s5
\p
\v 22 स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,
\v 23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
\s5
\p
\v 24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
\v 25 मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
\s5
\p
\v 26 लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
\v 27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
\s5
\p
\v 28 लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
\v 29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
\s5
\p
\v 30 भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
\v 31 म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
\s5
\p
\v 32 गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.
\v 33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
\s5
\p
\v 34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.