\id JOB JOB-Free Bible Marathi \ide UTF-8 \rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License \h ईयोब \toc1 ईयोब \toc2 ईयोब \toc3 job \mt1 ईयोब \mt2 The Book of \is लेखक \ip ईयोबचे पुस्तक कोणी लिहिले हे कोणास ठाऊक नाही. कोणताही लेखक ओळखला जात नाही. कदाचित एकापेक्षा अधिक लेखक असू शकतील. हे शक्य आहे की ईयोब हे पवित्र शास्त्रातील कोणत्याही पुस्तकातील सर्वात जुने पुस्तक आहे. ईयोब चांगला आणि धार्मिक वृत्तीचा मनुष्य होता ज्याला असाह्य त्रास सहन करावा लागला आणि त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही आपत्ती का असावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाच्या प्रमुख व्यक्तिमत्वांमध्ये ईयोब, तेमानीचा एलिफाज, शुहिथी बिल्दद, नामाथीचा सोफर आणि बुझीचा अलीहू यांचा समावेश आहे. \is तारीख आणि लिखित स्थान \ip अज्ञात \ip बहुतेक पुस्तके सूचित करतात की ती हद्दपार झाल्यानंतर किंवा त्यानंतर लवकरच लिहिली गेली आणि अलीहूचे अध्याय अजूनही नंतर असू शकतात. \is प्राप्तकर्ता \ip प्राचीन यहूदी आणि पवित्र शास्त्राचे सर्व भावी वाचक. असेही म्हटले जाते की, ईयोबच्या पुस्तकातील मूळ श्रोते गुलामगिरीत असलेली इस्त्राएली मुले होती, असे समजले जाते की मोशे त्या लोकांना सात्वन देऊ इच्छित होता कारण ते मिसरी लोकांच्या अधीन होते. \is हेतू \ip ईयोबचे पुस्तक आपल्याला खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करते: सैतान आर्थिक आणि भौतिक नाश आणू शकत नाही, सैतान काय करू शकतो आणि काय करू शकत नाही यावर देवाचे सामर्थ्य आहे. हे जगातील सर्व दुःखाच्या पलीकडे “हे का आहे” समजून घेण्याची आपली मानवी क्षमता आहे. दुष्ट लोक त्यांचे दायित्व प्राप्त करतील. आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी आत्म्याला शुद्ध करणे, परीक्षण करणे, शिकवणे किंवा सशक्त करणे यासाठी दुःखदपणाची परवानगी दिली जाऊ शकते. \is विषय \ip दुःखाच्या माध्यमातून आशीर्वाद \iot रूपरेषा \io1 1. परिचय आणि सैतानाचा हल्ला (1:1-2:13) \io1 2. ईयोबची तीन मित्रांबरोबर आपल्या दुःखाबद्दल चर्चा (3:1-31:40) \io1 3. अलीहूकडून देवाच्या चांगुलपणाची घोषणा (32:1-37:24) \io1 4. देवाकडून ईयोबाला सार्वभौमत्वाचा खुलासा (38:1-41:34) \io1 5. देवाकडून ईयोबाची पुनर्रचना (42:1-17) \s5 \c 1 \s ईयोबाच्या नीतिमत्तेची कसोटी \p \v 1 ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासुन दुर राही. \v 2 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. \v 3 ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता. \s5 \p \v 4 प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. \v 5 जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धि करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे. \s5 \p \v 6 एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र \f + देवदूत \f* परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला. \v 7 परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.” \v 8 परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीत त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दुर राहणारा असा कोणीही मनुष्य नाही.” \s5 \v 9 नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय? \v 10 तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भुमीत त्याचे धन वाढत आहे. \v 11 पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करील.” \v 12 परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला. \s5 \v 13 एक दिवस असा आला की, जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षारस पीत होते. \v 14 तेव्हा एक निरोप्या ईयोबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि त्यांच्याबाजुस गाढवी चरत होत्या, \v 15 शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.” \s5 \v 16 पहिला हे सांगत असतांनाच दुसरा आला आणि म्हणाला, “आकाशातुन दैवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले, आणि मीच तेवढा बचावून तुला सांगायला आलो आहे.” \v 17 तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.” \s5 \p \v 18 आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षारस पीत होते. \v 19 तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.” \s5 \v 20 तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. \v 21 तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.” \v 22 या सर्व स्थितीतही, ईयोबाकडून पाप घडले नाही, देवाने चूक केली आहे असे काही तो मुर्खासारखा बोलला नाही. \s5 \c 2 \p \v 1 पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता. \v 2 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे.” \s5 \p \v 3 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तूझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे, तो देवाचे भय धरीतो आणि दुष्ट गोष्टींपासून दुर राहतो. जरी त्याच्याविरुध्द कोणतेही कारण नसतांना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केले, तरीही त्याने आपली सात्विक्ता अंखड धरून ठेवली आहे.” \s5 \p \v 4 सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल. \v 5 परंतु जर तू तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास, तर तो तुझ्या तोंडावर तुझा नकार करील.” \v 6 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जिव राखून ठेव.” \s5 \p \v 7 मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले. \v 8 ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला, \s5 \p \v 9 नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, “तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा,” \v 10 परंतू तो तीला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही. \s5 \v 11 ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते, ईयोबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले, तेव्हा ते आपआपल्या ठिकाणाहून आले. \s5 \p \v 12 जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली. \v 13 मग ते त्याच्याबरोबर सात दिवस आणि सात रात्री जमीनीवर बसून राहिले, आणि त्याच्याशी एक शब्दही कोणी बोलले नाही कारण त्याचा शोक अतिशय तीव्र होता असे त्यांनी पाहीले. \s5 \c 3 \s ईयोब आपल्या जन्मदिवसास शाप देतो \p \v 1 यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. \q \v 2 तो (ईयोब) म्हणाला, \q \v 3 “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, \q मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो. \s5 \q \v 4 तो दिवस अंधकारमय होवो, \q देवाला त्याचे विस्मरण होवो, \q त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते. \q \v 5 मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, \q ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो, \s5 \q \v 6 ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. \q महिन्याच्या तिथीत तीची गणती न होवो. \b \q \v 7 पाहा, ती रात्र फलीत न होवो, \q तीच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो. \s5 \q \v 8 जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत \q ते त्या दिवसास शाप देवो. \q \v 9 त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. \q तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, \q त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो. \q \v 10 कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, \q आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही. \s5 \q \v 11 उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही? \q \v 12 तीच्या मांडयानी माझा स्विकार का केला? \q किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला? \s5 \q \v 13 तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, \q मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो. \q \v 14 पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, \q ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. \s5 \p \v 15 किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते. \q \v 16 कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा \q प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते. \s5 \q \v 17 तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. \q तेथे दमलेल्यांना आराम मिळतो. \q \v 18 तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, \q तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही. \q \v 19 लहान आणि थोर तेथे आहेत, \q तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत. \b \s5 \q \v 20 दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, \q जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, \q \v 21 ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, \q दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? \q \v 22 त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो? \s5 \q \v 23 ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो? \q \v 24 मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! \q माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. \s5 \q \v 25 ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. \q \v 26 मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. \q तरी आणखी पीडा येत आहे.” \s5 \c 4 \s अलीफज ईयोबाला धमकावतो \p \v 1 अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि तो म्हणाला, \q \v 2 “जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु:खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत:ला कोण आवरेल? \b \q \v 3 पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस. \q तू अशक्त हातांना शक्ती दिली आहेस. \s5 \q \v 4 तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस. \q तू अशक्त गुडघे बळकट केले आहेस. \q \v 5 पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस, \q ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस. \q \v 6 तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय? \s5 \q \v 7 मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का? \q किंवा चांगल्या लोकांचा कधी नि:पात झाला का? याच्या विषयी तू विचार कर. \q \v 8 मी असे पाहीले आहे की जे घोर अन्यायाची नांगरणी करीतात, आणि कष्ट पेरतात ते तशीच कापणी करतात. \q \v 9 देवाच्या श्वासाने ते नाश पावतात. \q त्याच्या रागाने ते भस्म होतात. \s5 \q \v 10 सिंहाची गर्जना, सिंहाचा विक्राळ ध्वनी नष्ट होतो, \q तरूण सिंहाचे दात उपटले जातात. \q \v 11 म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात \s5 \q \v 12 आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, \q आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली. \q \v 13 जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो, \s5 \q \v 14 मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला. \q माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली. \q \v 15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि \q माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले. \s5 \q \v 16 तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही, \q माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता, \q तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली. \q \v 17 मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय? \q मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय? \s5 \q \v 18 पाहा, जर देव त्याच्या सेवकावर विश्वास ठेवत नाही. \q जर त्यास त्याच्या दूतांमध्ये काही दोष आढळतो, \q \v 19 तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे, \q ज्यांच्या घरांचा पाया धुळीत आहे, \q ते पंतगासारखे तितक्या लवकर चिरडले जातात? \s5 \q \v 20 आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नाश पावतात, ते कायमचे नष्ट होतात व कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. \q \v 21 त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जात नाही काय? \q ते मरतात, शहाणपणा न मिळवताच मरतात.” \s5 \c 5 \b \q \v 1 “आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे? \q \v 2 मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, \q जळफळाट मुर्खाला ठार मारतो. \q \v 3 मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु \q अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला. \s5 \q \v 4 त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दुर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. \q त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही \q \v 5 भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, \q काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले. \s5 \q \v 6 अडचणी मातीतून येत नाहीत, \q किंवा संकटे रानातून उगवत नाहीत. \q \v 7 परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो. \b \s5 \q \v 8 परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, \q त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते. \q \v 9 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, \q त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही. \q \v 10 तो पृथ्वीवर पाऊस देतो. \q आणि शेतांवर पाणी पाठवतो. \s5 \q \v 11 तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो \q आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो. \q \v 12 तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, \q म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत. \q \v 13 तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, \q तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो. \b \s5 \q \v 14 त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, \q दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात. \q \v 15 त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, \q1 आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो \q \v 16 म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, \q आणि अन्याय आपले तोंड बंद करते. \s5 \q \v 17 पाहा, ज्या मणुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, \q म्हणून सर्वशक्तीमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस. \q \v 18 तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. \q तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो. \q \v 19 सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, \q खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही. \s5 \q \v 20 दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि \q लढाईत तलवारीपासून वाचवेल. \q \v 21 जिभेच्या दुःखदायी वारापासुन तू झाकला जाशील, \q आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस. \q \v 22 तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. \q आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही. \s5 \q \v 23 तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, \q जंगली पशूशीही तू शांतीने राहशील \q \v 24 तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षीत आहे, \q तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही. \q \v 25 तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील. \s5 \q \v 26 जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील. \q \v 27 पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. \q म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत:साठी काही शिक.” \s5 \c 6 \s ईयोब आपल्या मित्रांना दोष देतो \p \v 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, \q1 जर माझ्या शोकाला तराजूत मोजले. \q \v 3 तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. \q यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे. \s5 \q \v 4 त्या सर्वशक्तीमानाचे बाण माझ्यात आहेत. \q माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे \q \v 5 वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय? \q \v 6 ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? \q किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय? \s5 \q \v 7 ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले, \q ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले. \b \q \v 8 अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे! \q ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या. \q \v 9 जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे, \q त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे. \s5 \q \v 10 तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, \q जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, \q कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही. \q \v 11 माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू? \q माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू? \s5 \q \v 12 माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? \q किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय? \q \v 13 माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, \q आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय? \s5 \q \v 14 कमजोर व्यक्तीवर संकट आले, \q त्याने सर्वशक्तीमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा. \q \v 15 बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात. \q \v 16 त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात. \q \v 17 जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात. \s5 \q \v 18 त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात \q ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात. \q \v 19 तेमाच्या गटाने तेथे तपास केला. \q शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला. \q \v 20 त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती, \q ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले. \s5 \q \v 21 आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, \q तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात. \q \v 22 मला काही द्या असे मी म्हणालो का? \q किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या? \q \v 23 किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? \q किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का? \b \s5 \q \v 24 आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन. \q माझी काय चूक झाली ते मला दाखवा. \q \v 25 प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात! \q परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील? \s5 \q \v 26 तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? \q निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का? \q \v 27 खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता, \q आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता. \s5 \q \v 28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. \q खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही. \q \v 29 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही. \q खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे. \q \v 30 माझा जीभेवर काही वाईट आहे काय? \q माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?” \s5 \c 7 \s ईयोब परमेश्वराशी वाद घालतो \b \q \v 1 “प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? \q त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही? \q \v 2 गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते. मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे. \q \v 3 म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे. \s5 \q \v 4 जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत. \q \v 5 माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे. \s5 \q \v 6 माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते. \q \v 7 देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही. \s5 \q \v 8 देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, \q देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार. \q \v 9 ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही. \q \v 10 तो त्याच्या घरात कधीही परत येणार नाही. त्याची जागा त्यास ओळखणार नाही. \s5 \q \v 11 तेव्हा मी गप्प बसणार नाही, \q मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन. \q \v 12 तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे? \s5 \q \v 13 माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल. \q \v 14 तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते. \q \v 15 म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो. \s5 \q \v 16 मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. \q \v 17 मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस. \q \v 18 तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस? \s5 \q \v 19 तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गीळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे कोठवर चालणार? \q \v 20 तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का? \s5 \q \v 21 तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझा आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस? \q मी आता असाच धुळीत पडून राहणार \q तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तीतत्वात नसेल.” \s5 \c 8 \s बिल्दद देवाच्या न्याय्यत्वाचा पुरस्कार करतो \q \v 1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील. \q \v 3 देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तीमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय? \s5 \q \v 4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली. \q \v 5 परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तीमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर. \s5 \q \v 6 तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल. \q \v 7 जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल. \s5 \q \v 8 मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे. \q \v 9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, \q कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत. \q \v 10 ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का? \s5 \q \v 11 लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का? \q \v 12 ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात. \s5 \q \v 13 म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल. \q \v 14 ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे. \q \v 15 तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही. \s5 \q \v 16 तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात. \q \v 17 तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात. \q \v 18 परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’ \s5 \q \v 19 पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील. \q \v 20 पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही. \s5 \q \v 21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील! \q \v 22 जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.” \s5 \c 9 \s देवापुढे ईयोब निरुत्तर होतो \q \v 1 मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला, \q \v 2 “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल? \q \v 3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. \s5 \q \v 4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल? \q \v 5 तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही. \q \v 6 तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो. \s5 \q \v 7 तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो. \q \v 8 त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो. \q \v 9 देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. \s5 \q \v 10 तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकळनधि गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. \q \v 11 पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही. \q \v 12 देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही. \s5 \q \v 13 देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात. \q \v 14 म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही. \q \v 15 मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो. \s5 \q \v 16 मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. \q \v 17 तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल. \q \v 18 तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल. \s5 \q \v 19 कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय? \q \v 20 मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते. \s5 \q \v 21 मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. \q \v 22 मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो. \q \v 23 काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का? \q \v 24 जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो? \s5 \v 25 माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेहि सुख दिसत नाही. \q \v 26 लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. \s5 \q \v 27 मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल. \q \v 28 मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस. \q \v 29 मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? \s5 \q \v 30 मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले. \q \v 31 तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. \s5 \q \v 32 देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. \q \v 33 आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल. \s5 \q \v 34 देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही. \q \v 35 असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.” \s5 \c 10 \s आपल्या परिस्थितीविषयी ईयोबाचे गाऱ्हाणे \b \q \v 1 माझ्या आत्म्याला जीवीताचा कंटाळा आला आहे, मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडूपणेतून बोलेन. \q \v 2 मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मजशी विरोध का करतो ते मला सांग. \q \v 3 मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का? \s5 \q \v 4 तुला मानवी डोळे आहेत का? लोकांस दिसते ते तुला दिसते का? \q \v 5 तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्याइतकेच थोडे आहे, किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे. \q \v 6 तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस. \q \v 7 मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. आणि तुझ्या हातातून मला कोणीही वाचवू शकणार नाही. \s5 \q \v 8 तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत. \q \v 9 मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का? \s5 \q \v 10 तू मला दुधासारखे ओतलेस आणि दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून काढले आहेस ना? \q \v 11 हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढविलेस. \s5 \q \v 12 तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस. \q \v 13 परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे. \q \v 14 जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील \s5 \q \v 15 पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो. \q \v 16 मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा सिंह जशा टपून बसून शिकार करतो तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस. \s5 \q \v 17 माझी चूक सिध्द करण्यासाठी तू माझ्या विरूद्ध नविन साक्षीदार आणतोस. आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल, तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील. \s5 \q \v 18 तू मला जन्माला तरी का घातलेस? आणि मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते. \q \v 19 मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते. \s5 \q \v 20 माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड. \q \v 21 जिथून मी परत येवू शकणार नाही तिथे, अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्यामध्ये मला थोडी विश्रांती मिळेल. \q \v 22 जेथे काळोख, निबीड अंधार आहे, अशा मृत्युछायेच्या प्रदेशात मी सांगण्याविणा जाईल, जेथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे, \s5 \c 11 \s सोफर ईयोबावर दोषारोप लादतो \p \v 1 नंतर नामाथीच्या सोफरने उत्तर दिले आणि तो म्हणाला, \q \v 2 “शब्दांच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे? सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का? \q \v 3 तुझा गर्वाच्या बडबडीने दुसरे चूप होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजीत करणार नाही काय? \s5 \q \v 4 तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे, आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे. \q \v 5 अहो, परंतु, देवाने बोलावे आणि तुझ्या विरूद्ध त्याने ओठ उघडावे. \q \v 6 तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे. \s5 \q \v 7 तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तीमान देवाला समजणे अशक्य आहे. \q \v 8 त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस? \q \v 9 तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे. \s5 \q \v 10 फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले, जर त्याने एखाद्याचा न्याय करावयाचे ठरवले तर त्यास कोण अडवू शकेल? \q \v 11 त्यास चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय? \q \v 12 परंतु मूर्ख मनुष्यास शाहाणपण समजत नाही, त्यांना समजेल रानटी गाढव मनुष्यास जन्म देईल. \s5 \q \v 13 परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस. \q \v 14 तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस. \s5 \q \v 15 तरच तू निश्चीत त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, \q खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील. \q \v 16 तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल. \q \v 17 भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल. \s5 \q \v 18 तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील. \q \v 19 तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील. \s5 \q \v 20 वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.” \s5 \c 12 \s देवाचे सामर्थ्य व ज्ञान ह्यांचा ईयोब पुरस्कार करतो \p \v 1 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल. \q \v 3 माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासहि माहित नाहीत? \s5 \q \v 4 माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात. \q \v 5 जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे. \q \v 6 परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत:चे हातच त्यांचे देव आहेत. \s5 \q \v 7 पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील. \q \v 8 किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि, \s5 \q \v 9 या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे. \q \v 10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो. \s5 \q \v 11 ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का \q \v 12 वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो. \s5 \q \v 13 देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे. \q \v 14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत. \q \v 15 पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल. \s5 \q \v 16 त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत. \q \v 17 तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो. \q \v 18 तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो. \s5 \q \v 19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही. \q \v 20 तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो. \q \v 21 तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो. \s5 \q \v 22 तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो. \q \v 23 तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो. \s5 \q \v 24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो. \q \v 25 प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.” \s5 \c 13 \s ईयोब आपल्या नीतिमत्त्वाचे समर्थन करतो \b \q \v 1 पाहा, “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे व त्या सर्व गोष्टी मला समजतात. \q \v 2 तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे, मी तुमच्याहून काही कमी नाही. \s5 \q \v 3 मला सर्वशक्तीमानाशी बोलायचे आहे, मला देवाबरोबर माझ्या कारणाविषयी बोलायचे आहे. \q \v 4 तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात. \q \v 5 अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल. \s5 \q \v 6 आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका. \q \v 7 तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? त्याच्या करीता तुम्ही कपटाचे भाषण करणार काय? \q \v 8 तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात. \s5 \q \v 9 जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हास वाटते का? \q \v 10 तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का? \s5 \q \v 11 देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय? \q \v 12 तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत, तुमची तटबंदी हि मातीपासून बनलेली आहे. \s5 \q \v 13 आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे. \q \v 14 मी माझे मांस माझाच दातात धरेन मी माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? \q \v 15 पहा, जरी त्याने मला मारुन टाकले, तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. असे असले तरी, मी त्याच्यासमोर माझा मार्गांची मांडणी करीन. \s5 \q \v 16 कारण ढोंगी त्याच्या पुढे येणार नाही हे माझे तारण होईल. \q \v 17 देवा, तू माझे सांगणे काळजी पूर्वक ऐक, माझी घोषणा तुझा कानी येऊदे. \s5 \q \v 18 आता पहा, मी माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी निष्पाप आहे हे मी दाखवून देईन. \q \v 19 न्यायालयात माझ्या विरुध वादविवाद करेल असा कोण आहे? आणि माझी चुक आहे हे तू येऊन सिद्ध केलेस म्हणून मी गप्प बसेन व प्राण त्यागेन. \s5 \q \v 20 देवा, तू माझासाठी फक्त दोन गोष्टी कर, आणि त्यानतर तुझ्या मुखापासून मी स्वत:ला लपवणार नाही. \q \v 21 माझ्या विरुध असलेला तुझा हात कडून घे, आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव. \q \v 22 नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे. \s5 \q \v 23 मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव. \q \v 24 तू आपले मुख माझ्या पासून का लपवत आहेस? आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवीत आहेस? \q \v 25 मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीचा पिच्छा पुरवितोस का? \s5 \q \v 26 तू माझ्याविरुध्द फार कटू गोष्टी लिहिल्या. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस. \q \v 27 तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस. \q \v 28 म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे.” \s5 \c 14 \s आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयी ईयोबाचे विचार \q \v 1 “मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे. \q \v 2 तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते. \q \v 3 अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय? \s5 \q \v 4 अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही. \q \v 5 मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही. \q \v 6 तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल. \s5 \q \v 7 वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात. \q \v 8 त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले. \q \v 9 तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात. \s5 \q \v 10 परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो. \q \v 11 जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते. \q \v 12 मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही. \s5 \q \v 13 तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. \q \v 14 मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन. \s5 \q \v 15 तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन. \q \v 16 पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस. \q \v 17 तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस. \s5 \q \v 18 डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात. \q \v 19 खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते. \s5 \q \v 20 तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु:खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो \q \v 21 त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत. \q \v 22 फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत:साठी रडते.” \s5 \c 15 \s अलीफज ईयोबाला दोष देतो \q \v 1 नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का? \q \v 3 तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय? \s5 \q \v 4 खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस. \q \v 5 तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे. \q \v 6 मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात \s5 \q \v 7 तुच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का? \q \v 8 तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का? \q \v 9 आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? \q आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे? \s5 \q \v 10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत. \q \v 11 देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय? \s5 \q \v 12 तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस, \q \v 13 तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात. \q \v 14 मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार? \s5 \q \v 15 पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही. \q \v 16 असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय? \s5 \q \v 17 माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो. \q \v 18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही. \s5 \q \v 19 ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते. \q \v 20 दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात. \q \v 21 भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल. \s5 \q \v 22 अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे. \q \v 23 ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो. \q \v 24 संकटे आणि दु:ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात. \s5 \q \v 25 कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तीमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे. \q \v 26 हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो, \s5 \q \v 27 त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली, \q \v 28 आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते माती चे ढीग होण्यास तयार आहे. \s5 \q \v 29 तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल. \q \v 30 त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल. \s5 \q \v 31 निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत:चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल. \q \v 32 आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल. \q \v 33 न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील. \s5 \q \v 34 अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात. \q \v 35 ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.” \s5 \c 16 \s देवाच्या कृत्यांविषयी ईयोबाची तक्रार \p \v 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात. \q \v 3 तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता? \s5 \q \v 4 जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात \q तेच मीही म्हणू शकलो असतो. \q मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो \q आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो. \q \v 5 अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. \q आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते. \b \s5 \q \v 6 परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. \q1 पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार? \q \v 7 खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस. \q \v 8 तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते. \s5 \q \v 9 देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात. \q \v 10 लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात. \s5 \q \v 11 देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. \q त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे. \q \v 12 मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. \q हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले \q त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला. \s5 \q \v 13 त्याचे धनुर्धारी मला घेरतात. \q तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. \q तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो. \q \v 14 देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. \q सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो. \s5 \q \v 15 मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. \q मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते. \q \v 16 रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. \q माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे. \q \v 17 तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, \q आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले. \s5 \q \v 18 हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. \q माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस. \q \v 19 स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. \q जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल. \s5 \q \v 20 माझे मित्र माझा उपहास करतात, \q1 पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात. \q \v 21 जशी एखादी व्यक्ति आपल्या मित्रासाठी वादविवाद करते \q तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो. \q \v 22 जेव्हा काही वर्ष जातील, \q तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.” \s5 \c 17 \q \v 1 “माझा आत्मा भंगला \f + श्वास संपुष्टात येत आहे \f* आहे आणि माझे दिवस संपले आहे, \q कबर माझ्यासाठी तयार आहे. \q \v 2 खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, \q माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात. \q \v 3 मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तुच मला जामीन हो, \q दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील? \s5 \q \v 4 तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, \q तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस. \q \v 5 जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, \q त्याच्या मुलांचे डोळे जातील. \s5 \q \v 6 त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. \q ते माझ्या तोंडावर थुंकतात. \q \v 7 दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, \q माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे. \q \v 8 यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. \q देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात. \s5 \q \v 9 पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल. \q \v 10 पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या \q तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही. \s5 \q \v 11 माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या \q आणि माझी आशा नष्ट झाली. \q \v 12 माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. \q अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात. \s5 \q \v 13 थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. \q अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. \q \v 14 जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप \q किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’ \q \v 15 तर आता माझी आशा कोठे आहे? \q माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल? \s5 \q \v 16 माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल \q तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” \s5 \c 18 \s दुष्टाच्या अंताचे बिल्दद वर्णन करतो \p \v 1 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे. \s5 \q \v 3 आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, \q आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत? \q \v 4 रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या, \q तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, \q किंवा खडक त्याची जागा सोडेल का? \s5 \q \v 5 खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. \q त्याचा अग्नी पेटणे बंद होईल. \q \v 6 त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल. \s5 \q \v 7 त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळु हळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील. \q \v 8 त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. \q तो खडकाळ मार्गाने चालला आहे. \s5 \q \v 9 सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल. \q \v 10 जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल. \q \v 11 दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. \q भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे. \s5 \q \v 12 वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. \q विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत. \q \v 13 भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. \q खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील. \s5 \q \v 14 त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. \q त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल. \q \v 15 जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील \q त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील. \s5 \q \v 16 त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील. \q \v 17 पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. \q आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही. \s5 \q \v 18 लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. \q आणि त्याना या जगातून पळवून लावतील. \q \v 19 त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. \q तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही. \q \v 20 पश्चीमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. \q आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील. \s5 \q \v 21 दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.” \s5 \c 19 \s देव आपल्या निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी \p \v 1 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात? \s5 \q \v 3 तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. \q तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही \q \v 4 जर खरच मी काही चुक केली असेल तर, \q ती चुक माझी मला आहे. \s5 \q \v 5 तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, \q माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता. \q \v 6 मग तुम्हास हे माहीती पाहीजे कि, \q देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे. \s5 \q \v 7 ‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. \q मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही. \q \v 8 मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. \q त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे. \q \v 9 देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. \q आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. \s5 \q \v 10 माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. \q एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत. \q \v 11 त्याचा क्रोध मला जाळीत आहे, \q तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो. \q \v 12 त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो \q ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, \q आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात. \b \s5 \q \v 13 त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दुर केले आहे, \q माझ्या सर्वांना दुर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे. \q \v 14 माझे नातलग मला सोडून गेले आहेत, \q माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत. \s5 \q \v 15 माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, \q मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे. \q \v 16 जरी मी माझ्या मुखाने याचना केली, \q माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही, \s5 \q \v 17 माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, \q माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी \f + भाऊ आणि बहिणी \ft मुले-मुली \f* माझा तिरस्कार करतात. \q \v 18 लहान मुलेदेखील मला चिडवतात, \q जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात. \q \v 19 माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. \q माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत. \s5 \q \v 20 मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, \q मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे. \q \v 21 माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! \q कारण देवाचा हात मजवर पडला आहे. \q \v 22 तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. \q माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का? \s5 \q \v 23 अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! \q अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत. \q \v 24 अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर \q किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे. \s5 \q \v 25 माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. \q आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील. \q \v 26 मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल \q तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. \q \v 27 मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, \q माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. \q माझा अतंरात्मा झुरत आहे. \s5 \q \v 28 या सगळ्याचे मुळ माझ्याकडेच आढळून आले आहे, \q म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल. \q \v 29 तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, \q कारण रागामुळे तलवारीने शासन होते, \q यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.” \s5 \c 20 \s दुष्टाच्या प्रतिफळाचे सोफर वर्णन करतो \p \v 1 नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला, \q \v 2 “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. \q कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे. \q \v 3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, \q परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे. \s5 \q \v 4 तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, \q जेव्हा देवाने मणुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून, \q \v 5 दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, \q अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. \s5 \q \v 6 त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, \q आणि त्याचे मस्तक ढगांपर्यंत पोहोचू शकेल. \q \v 7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. \q जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’ \s5 \q \v 8 तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. \q त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल. \q \v 9 ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. \q त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही, \s5 \q \v 10 दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. \q दुष्ट मनुष्याचे स्वत:चे हातच \f + संतान \f* त्याची संपत्ती परत करतील. \q \v 11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. \q परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल. \s5 \q \v 12 दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. \q तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो. \q \v 13 दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. \q तो त्या आपल्या तोंडात ठेवतो. \q \v 14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. \q त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल. \s5 \q \v 15 त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, \q देव त्यास ती पोटातुन ओकायला भाग पाडेल. \q \v 16 तो फुरशाचे विष चोखील, \q सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील. \s5 \q \v 17 नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या \q बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही. \q \v 18 त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले \q ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही. \q \v 19 कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. \q त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली. \s5 \q \v 20 कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते. \q म्हणून त्यास आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही. \q \v 21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. \q त्याचे यश टिकणार नाही. \q \v 22 जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. \q गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील. \s5 \q \v 23 दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. \q देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल. \q \v 24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. \q परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन. \q \v 25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. \q त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील \q आणि तो भयभीत होईल. \s5 \q \v 26 त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. \q मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. \q त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल. \q \v 27 आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, \q पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल. \s5 \q \v 28 पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, \q देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल. \q \v 29 देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.” \s5 \c 21 \s दुष्टांची भरभराट होते असे ईयोब निक्षून सांगतो \p \v 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले. \q \v 2 “मी काय म्हणतो ते निट ऐक \q म्हणजे माझे सांत्वन होईल. \q \v 3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, \q माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस. \s5 \q \v 4 माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? \q मी अधीर का होऊ नये? \q \v 5 माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, \q व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव. \q \v 6 माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते \q आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो. \s5 \q \v 7 दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? \q ते वृध्द आणि यशस्वी का होतात? \q \v 8 आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, \q आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात. \q \v 9 त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, \q देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही. \s5 \q \v 10 त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. \q त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत. \q \v 11 ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. \q त्यांची मुले सभोवती नाचत असतात. \q \v 12 ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात \q आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात. \s5 \q \v 13 ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, \q नंतर ते शांतपणे \f + क्षणात \f* खाली अधोलोकात जातात. \q \v 14 ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड \q आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही. \q \v 15 सर्वशक्तीमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? \q त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ? \s5 \q \v 16 पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? \q दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दुर असो. \b \q \v 17 वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, \q त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? \q आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो. \q \v 18 ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, \q किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात. \s5 \q \v 19 पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. \q तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल. \q \v 20 त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, \q तो सर्वशक्तीमान देवाच्या रागाचे प्राशन करो. \q \v 21 जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, \q तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील? \s5 \q \v 22 देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? \q तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो. \q \v 23 एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, \q पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने. \q \v 24 त्याची भांडी दुधाने \q आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत. \s5 \q \v 25 दुसरा मणुष्य मनाच्या कटूपणात मरतो, \q त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते. \q \v 26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. \q किडे त्यांना झाकून टाकतील. \b \s5 \q \v 27 पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, \q कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे. \q \v 28 तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? \q दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे. \s5 \q \v 29 तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? \q ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय, \q \v 30 दुष्ट मणुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, \q आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील. \s5 \q \v 31 त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? \q त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील? \q \v 32 नंतर त्यास कबरेकडे नेतील, \q त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील. \q \v 33 खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, \q सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील \q जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील \s5 \q \v 34 मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, \q म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.” \s5 \c 22 \s अलिफज ईयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लादतो \p \v 1 मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला, \q \v 2 “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? \q ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय? \q \v 3 तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? \q तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय? \s5 \q \v 4 तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो \q आणि तुला न्यायाकडे नेतो का? \q \v 5 तुझे पाप मोठे नाही काय? \q तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना? \s5 \q \v 6 तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, \q उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. \q \v 7 तू थकलेल्यास पाणी दिले नाही \q आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही. \q \v 8 जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भुमी तुझी असेल, \q जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील. \s5 \q \v 9 तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, \q पोरक्याचे बाहू मोडले असशील. \q \v 10 म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत \q आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस. \q \v 11 म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही \q आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस. \s5 \q \v 12 देव उंच स्वर्गात नाही काय? \q तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत. \q \v 13 आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? \q दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो. \q \v 14 दाट ढग त्यास झाकत आहेत, \q म्हणजे त्याने आपल्याला बघू नये. \s5 \q \v 15 तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, \q ज्यावर दुष्टजण चालले. \q \v 16 त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, \q त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला. \q \v 17 जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघुन जा \q तो सर्वशक्तीमान देव आम्हास काय करु शकतो?’ \s5 \q \v 18 आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. \q परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दुर आहे. \q \v 19 धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. \q निर्दोष त्यांचा उपहास करतात. \q \v 20 आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. \q त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे. \b \s5 \q \v 21 तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. \q तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. \q \v 22 मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सुचनांचा स्विकार कर. \q त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. \s5 \q \v 23 तू सर्वशक्तीमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. \q जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दुर ठेवशील. \q \v 24 तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, \q तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील. \q \v 25 म्हणजे सर्वशक्तीमान देवच तुझे धन असा होईल \q आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल. \s5 \q \v 26 तेव्हा तू सर्वशक्तीमानच्या ठायी आनंद पावशील, \q तू तुझे मुख देवाकडे वर करशील. \q \v 27 तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल \q आणि तू आपले नवस फेडशील. \q \v 28 जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल. \s5 \q \v 29 देव गर्वीष्ठांना नम्र करील, \q आणि तो नम्र लोंकाची सुटका करील. \q \v 30 जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.” \s5 \c 23 \s देवापुढे आपला वाद करण्याची ईयोबाची इच्छा \p \v 1 नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला, \q \v 2 “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? \q कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे. \s5 \q \v 3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर \q मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो \q \v 4 मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. \q माझ्या मुखाने सतत वाद घातला असता. \q \v 5 त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. \q तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते. \s5 \q \v 6 त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? \q नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते. \q \v 7 तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. \q म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो. \s5 \q \v 8 पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, \q मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही. \q \v 9 उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. \q आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही. \s5 \q \v 10 परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, \q जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन. \q \v 11 त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, \q मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही. \q \v 12 मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, \q मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत. \s5 \q \v 13 परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. \q त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो. \q \v 14 कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, \q माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत. \s5 \q \v 15 यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, \q जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते. \q \v 16 त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, \q आणि सर्वशक्तीमानाने मला भयभीत केले आहे. \q \v 17 काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? \q आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.” \s5 \c 24 \s दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार \q \v 1 “त्या सर्वशक्तीमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही? \q त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही? \s5 \q \v 2 आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. \q लोक पशूंचे कळप चोरुन स्वच:च्या रानात चरायला नेतात. \q \v 3 ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. \q ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात. \q \v 4 ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. \q सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते. \s5 \q \v 5 गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. \q त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते. \q \v 6 गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, \q आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात. \q \v 7 त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. \q थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते. \s5 \q \v 8 ते डोंगरावरील पावसाने भिजतात, \q आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात. \q \v 9 दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. \q ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात. \q \v 10 ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, \q ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात. \s5 \q \v 11 ते आवाराच्या आत तेल काढतात, \q ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात. \q \v 12 शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते, \q घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, \q परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही. \b \s5 \q \v 13 काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात. \q देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. \q देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही. \q \v 14 खुनी सकाळी लवकर उठतो \q आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो \q तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो. \s5 \q \v 15 ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. \q तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो. \q \v 16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. \q पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात. \q \v 17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. \q त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते. \s5 \q \v 18 पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, \q त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, \q त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत. \q \v 19 हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. \q त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. \s5 \q \v 20 ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, \q त्याची आठवण राहणार नाही, \q त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल. \q \v 21 दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, \q ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत. \s5 \q \v 22 तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, \q ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो, \q \v 23 देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो \q आणि त्याविषयी ते आनंदी होतात. \s5 \q \v 24 ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. \q खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. \q आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात. \q \v 25 या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? \q माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?” \s5 \c 25 \s देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे \p \v 1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, \q \v 2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, \q तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. \q \v 3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? \q कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? \s5 \q \v 4 मणुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? \q स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. \q \v 5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. \q त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. \q \v 6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” \s5 \c 26 \s ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो \p \v 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, \q \v 2 “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, \q शक्तीनसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले. \q \v 3 बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, \q आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले. \q \v 4 तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? \q तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले. \b \s5 \q \v 5 बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत. \q \v 6 देवापुढे अधोलोक नग्न आहे, \q त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकुण घेवू शकत नाही. \s5 \q \v 7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, \q आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. \q \v 8 तिच्या गडद मेघात तो पाणी बांधुन ठेवतो, \q तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. \s5 \q \v 9 तो चंद्राचा चेहरा झाकतो \q आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. \q \v 10 त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सिमा कोरली \q आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली. \s5 \q \v 11 त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात \q आणि भयचकीत होतात. \q \v 12 तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, \q तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो. \s5 \q \v 13 त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो \q त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. \q \v 14 पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, \q किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! \q परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?” \s5 \c 27 \s दुष्टाला मुळणाऱ्या प्रतिफळाचे ईयोब वर्णन करतो \p \v 1 नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला, \q \v 2 “जसे देव जीवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता, \q त्या सर्वशक्तीमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे, \q \v 3 जोपर्यंत माझ्यात जीव आहे \q आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत, \s5 \q \v 4 माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत \q आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही. \q \v 5 तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. \q मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन. \s5 \q \v 6 मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. \q चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही. \q \v 7 माझे शत्रू दुष्टासारखे होवो, \q अनितीमान मणुष्यासारखे ते माझ्यावर उठो. \b \s5 \q \v 8 कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे, \q त्याचा जीव त्याने काढून घेतला म्हणजे त्यास काय आशा आहे? \q \v 9 देव त्याची आरोळी ऐकेल काय? \q जेव्हा त्याच्यावर संकटे येतील, \q \v 10 तो सर्वशक्तीमानाच्या ठायी आनंद मानेल काय? \q आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय? \s5 \q \v 11 मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल, \q सर्वशक्तीमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही. \q \v 12 पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे, \q मग तुम्ही असे निरर्थक का बोलता? \b \s5 \q \v 13 देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. \q आणि सर्वशक्तीमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते. \q \v 14 त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील, \q दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही. \s5 \q \v 15 राहीलेली सर्व मुले साथीने मरतील, \q आणि त्यांच्या \f + त्याची \f* विधवा विलाप करणार नाहीत. \q \v 16 दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील. \q \v 17 जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील, \q निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील. \s5 \q \v 18 तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो, \q रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते. \q \v 19 तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो, \q परंतू सर्वदा असे राहणार नाही, \q तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल. \s5 \q \v 20 भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल, \q वादळ त्यास रात्री घेवून जाईल. \q \v 21 पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल \q वादळ त्यास त्याच्या घरातून उडवून लावेल. \s5 \q \v 22 तो वारा \f + देव \f* त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही, \q तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील. \q \v 23 तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील, \q त्याच्या ठिकाणातून त्यास पळवून लावतील.” \s5 \c 28 \s मानवाचा ज्ञानासाठी शोध \b \q \v 1 “खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, \q सोने शुद्ध करण्याची जागा असते. \q \v 2 जमिनीतून लोखंड काढतात, \q पाषाणामधून तांबे वितळवले जाते. \s5 \q \v 3 मणुष्य अंधाराचे निवारण करतो, \q अगदी खोलवर जाऊन, \q गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो. \q \v 4 लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दुर खाण खणतो, \q जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, \q तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो. \s5 \q \v 5 जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, \q जसे अग्नीने तीला उलटवले जाते. \q \v 6 जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, \q आणि त्या मातीमध्ये सोने असते. \s5 \q \v 7 पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, \q कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात. \q \v 8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, \q सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो. \s5 \q \v 9 मणुष्य कठीण खडकावर हात टाकतो, \q तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो. \q \v 10 ते खडकातून बोगदा खणतात, \q आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात. \q \v 11 ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, \q ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात. \s5 \q \v 12 पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? \q समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? \q \v 13 शहाणपण किती मोलाचे आहे हे मणुष्याला कळत नाही, \q पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत. \q \v 14 पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ \q सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ \s5 \q \v 15 तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, \q ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. \q \v 16 तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद \q किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही. \q \v 17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, \q सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही. \s5 \q \v 18 शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, \q माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे. \q \v 19 इथिओपियातील (कूश) पीतमणि त्याच्या बरोबरीचा नाही, \q शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही. \s5 \q \v 20 मग शहाणपणा कुठून येते? \q समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? \q \v 21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, \q आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत. \q \v 22 मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, \q आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ \b \s5 \q \v 23 फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, \q फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे. \q \v 24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, \q त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते. \q \v 25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, \q सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले. \s5 \q \v 26 पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले \q आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले. \q \v 27 तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, \q शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली. \q \v 28 आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, \q वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.” \s5 \c 29 \s ईयोब आपले पूर्वीचे सुख आठवतो \p \v 1 ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला \q \v 2 “अहो, काही महिन्यांपूर्वी मी जसा होतो तसा असतो तर, किती बरे झाले असते \q तेव्हा देव माझी काळजी घेत होता, \q \v 3 तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता, \q आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. \s5 \q \v 4 अहो, माझ्या चागल्या फलदायी दिवसाची मी आशा करतो. \q त्या दिवसात माझ्यावर देवाचे मित्रत्वाचे कृपाछत्र होते. \q \v 5 जेव्हा सर्वशक्तीमान देव माझ्याबरोबर होता \q1 आणि माझी मुले माझ्याजवळ होती त्या दिवसाची मी आशा धरतो. \q \v 6 त्या दिवसात माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेल होते. \s5 \q \v 7 त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. \q \v 8 सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत. \s5 \q \v 9 अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. \q \v 10 सरदार मनुष्य सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे. \s5 \q \v 11 लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी. \q \v 12 का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे. \q \v 13 मृत्युपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. \s5 \q \v 14 सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. \q \v 15 मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी घेऊन जात असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून घेऊन जात असे. \q \v 16 गरीब लोकांस मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांसदेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. \s5 \q \v 17 मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला. \q \v 18 मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल. \q \v 19 मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे. \s5 \q \v 20 माझ्याठायी असलेला माझा सन्मान नेहमी टवटवीत आहे, \q आणि माझ्या शक्तीचे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे. \q \v 21 पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत. \q \v 22 मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत. \s5 \q \v 23 पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. \q वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत. \q \v 24 काही लोकांनी आशा सोडून दिली होती. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले. \s5 \q \v 25 मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.” \s5 \c 30 \s आपल्या शोचनीय परिस्थितीबद्दल ईयोब दुःखित होतो \q \v 1 “परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत, \q आणि त्याचे वाडवडील ज्यांना मी माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते. \q \v 2 त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच निकामी आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत. \q \v 3 ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत. \s5 \q \v 4 ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात. \q \v 5 त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात. \q \v 6 त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते. \s5 \q \v 7 ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात. \q \v 8 ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांस त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे. \s5 \q \v 9 अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे. \q \v 10 ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा. \q \v 11 देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात. \s5 \q \v 12 ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात. \q \v 13 मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते. \s5 \q \v 14 ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात. \q \v 15 भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे. \s5 \q \v 16 माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसानी मला वेढून टाकले आहे. \q \v 17 माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत. \s5 \q \v 18 देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत. \q \v 19 देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला. \s5 \q \v 20 देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस. \q \v 21 देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस. \s5 \q \v 22 देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस. \q \v 23 तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच. \s5 \q \v 24 परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु:ख देणार नाही. \q \v 25 देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे. \q \v 26 परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला. \s5 \q \v 27 मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत. \q \v 28 मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो. \q \v 29 कोल्ह्यांना मी भाऊ, \q आणि शहामृगांना सोबती असा झालो आहे. \s5 \q \v 30 माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे. \q \v 31 माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे, \q माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.” \s5 \c 31 \s ईयोब स्वतःच्या प्रमाणिकपणाचे समर्थन करतो \q \v 1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे, \q मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू? \q \v 2 वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, \q कोणता वारसा सर्वशक्तीमान उच्च देवाकडून प्राप्त होणार? \s5 \q \v 3 मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे, \q आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे. \q \v 4 देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? \q1 आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का? \b \s5 \q \v 5 जर मी असत्याने चाललो असेल, \q जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल, \q \v 6 मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या \q म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल. \s5 \q \v 7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, \q जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, \q जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल. \q \v 8 तर मी पेरलेले दुसरा खावो, \q खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो. \b \s5 \q \v 9 जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षीत झाले असेल, \q जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल. \q \v 10 तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो, \q आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो. \s5 \q \v 11 कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; \q खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे. \q \v 12 लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे. \s5 \q \v 13 माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल, \q तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही, \q \v 14 तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? \q देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? \q \v 15 ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का? \q त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का? \s5 \q \v 16 मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल. \q किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल. \q \v 17 आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल, \q आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल, \q \v 18 (त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) \q आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे. \b \s5 \q \v 19 जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले \q किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले. \q \v 20 त्यांनी मला अंत:करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही \q कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही. \q \v 21 माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून \q जर मी पोरक्यावर हात उगारत असेल \s5 \q \v 22 मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो \q आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो. \q \v 23 परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते, \q म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही. \s5 \q \v 24 जर मी सोन्याला माझी आशा केले, \q ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही. \q \v 25 मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही. \s5 \q \v 26 जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून, \q \v 27 माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर \q \v 28 ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. \q कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते. \s5 \q \v 29 माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. \q किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही. \q \v 30 (खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.) \s5 \q \v 31 मी अपरिचितांना अन्न देतो, \q असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही? \q \v 32 परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये \q म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो. \s5 \q \v 33 इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात \q परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. \q \v 34 कारण मला लोकांची भीती आहे, \q मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते. \q म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही. \s5 \q \v 35 अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. \q पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तीमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. \q त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते. \q \v 36 खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. \q मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन. \q \v 37 त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. \q एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन. \s5 \q \v 38 मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. \q माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही. \q \v 39 जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता \q ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल, \q \v 40 तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे \q ईयोबचे शब्द इथे संपले.” \s5 \c 32 \s ईयोबाला प्रत्युत्तर करण्याचा आपला हक्क अलीहू सांगतो \p \v 1 नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता. \v 2 नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला. \s5 \p \v 3 अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते. \v 4 दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहीली. \v 5 तथापी, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला. \s5 \p \v 6 मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, \q मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही. \q \v 7 मी म्हणालो, जास्त दिवस पाहीलेल्यांनी बोलले पाहीजे, \q1 जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे. \s5 \q \v 8 परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, \q सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो. \q \v 9 मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही, \q जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही. \q \v 10 त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, \q मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन. \s5 \q \v 11 पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली, \q जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता, \q मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत. \q \v 12 खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले, \q परंतू, पाहा, तुमच्यापैकी असा कोणीही नाही का जो ईयोबाला समजावेल \q किंवा त्याच्या शब्दांना प्रतीसाद देईल. \s5 \q \v 13 संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको! \q देव ईयोबाला हरवील, मर्त्य मणुष्य हे करू शकत नाही. \q \v 14 ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, \q म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही. \b \s5 \q \v 15 हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत. \q \v 16 ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय? \q ते शांत उभे आहेत आणि काहीच उत्तर देत नाहीत. \s5 \q \v 17 नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, \q मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन. \q \v 18 माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, \q माझा आत्मा मला स्फुर्ती देत आहे. \q \v 19 पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षारसाप्रमाणे झाले आहे, \q नवीन द्राक्षारसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे. \s5 \q \v 20 मी बोललो तर मला बरे वाटेल, \q मी माझे ओठ उघडेल आणि उत्तर देईल. \q \v 21 मी कोणाची बाजू घेणार नाही, \q किंवा कोणत्याही मणुष्याची खुशामत करणार नाही. \q \v 22 खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही, \q जर मी तसे केले असेल तर, माझा निर्माता मला लवकर घेवून जाईल. \s5 \c 33 \s अलीहू ईयोबाला दोष लावतो \q \v 1 “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. \q माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे. \q \v 2 पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, \q माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे. \q \v 3 माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, \q माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. \s5 \q \v 4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, \q मला सर्वशक्तीमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे. \q \v 5 तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, \q माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. \s5 \q \v 6 पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, \q मलाही माती पासून उत्पन्न केले आहे. \q \v 7 पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, \q माझा दाब तुला जड होणार नाही. \b \s5 \q \v 8 तू जे बोललास ते मी निश्चीत ऐकले, \q मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला, \q \v 9 ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही \q मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही. \s5 \q \v 10 पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो \q देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. \q \v 11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले \q देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ \q \v 12 पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, \q देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. \s5 \q \v 13 तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? \q तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. \q \v 14 देव एकदा बोलतो, \q होय दोनदा बोलतो, तरी मणुष्य त्याकडे लक्ष देत नाही. \q \v 15 देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, \q जेव्हा मणुष्य गाढ झोपेत असतो. \s5 \q \v 16 नंतर देव मणुष्याची कानउघडणी करतो, \q आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. \q \v 17 मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, \q आणि गर्व न करण्याचेही सांगतो. \q \v 18 देव गर्तेतून मणुष्याचे जीवन वाचवितो, \q त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. \b \s5 \q \v 19 मणुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल \q वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. \q \v 20 नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही \q चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. \s5 \q \v 21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. \q त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. \q \v 22 खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो \q आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. \b \s5 \q \v 23 परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, \q मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, \q त्यास चांगला मार्ग दाखवणारा. \q \v 24 आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. \q ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव \q त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ \s5 \q \v 25 मग त्याचे शरीर पुन: बाळकासारखे जोमदार बनेल. \q तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. \q \v 26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. \q म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. \q नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. \s5 \q \v 27 नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. \q मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. \q पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. \q \v 28 त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. \q माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. \b \s5 \q \v 29 पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, \q दोनदा, होय तीनदा, \q \v 30 त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो \q म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते. \s5 \q \v 31 ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. \q माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. \q \v 32 पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. \q मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. \q \v 33 परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. \q तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.” \s5 \c 34 \s देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो \p \v 1 नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला, \q \v 2 “शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका \q हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या. \q \v 3 तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते \q आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात. \s5 \q \v 4 तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू \q काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या. \q \v 5 ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे, \q आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही. \q \v 6 मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो \q मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले. \s5 \q \v 7 ईयोबासारखा आणखी कोणी आहे का? \q जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो. \q \v 8 तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो, \q आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते, \q \v 9 तो असे म्हणतो, ते मणुष्याच्या कामाचे नाही, \q जर देवाला खुश करायला लागला तर त्यास त्यापासून काहीही मिळणार नाही. \s5 \q \v 10 तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. \q देव कधीही दुष्टाई करणार नाही. \q तो सर्वशक्तीमान कधीच पाप करणार नाही. \q \v 11 एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो. \q देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो \q \v 12 खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही, \q तो सर्वशक्तीमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही. \s5 \q \v 13 देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. \q सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही. \q \v 14 त्याचे चित्त स्वतःकडेच असते, \q आणि त्याने आपला आत्मा आणि श्वास स्वतःच्या ठायी परत घेतला \q \v 15 नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील \q मणुष्य परत मातीस मिळेल. \s5 \q \v 16 जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल \q माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे \q \v 17 जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. \q ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का? \s5 \q \v 18 एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात. \q आणि ‘तुम्ही दुष्ट आहात.’ असे ज्ञान्यांना म्हणतो. \q \v 19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. \q देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही? \q कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत. \q \v 20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. \q ते आजारी पडतात आणि मरतात. \q अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात. \s5 \q \v 21 लोक जे करतात ते देव बघतो \q देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो. \q \v 22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील. \b \q \v 23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते \q लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही. \s5 \q \v 24 शक्तिशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो, \q त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही. \q \v 25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. \q म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो. \s5 \q \v 26 वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो. \q आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो. \q \v 27 कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले \q आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. \q \v 28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात. \q दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली. \s5 \q \v 29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही. \q देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही \q म्हणजे कोणीही लोकांस पिजंऱ्यात पकडू शकणार नाही. \q \v 30 अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये, \q म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये. \b \s5 \q \v 31 जर तो मनुष्य देवाला म्हणेल की, \p मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही. \q \v 32 जे मी बघू शकत नाही ते मला दाखव, \p मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही. \q \v 33 तुला असे वाटते का देव त्या मणुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही? \q हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. \q तुला काय वाटते ते मला सांग. \s5 \q \v 34 शहाणा मनुष्य मला म्हणेल \q खरोखर, प्रत्येक शहाणा मनुष्य जो माझे ऐकतो तो म्हणेल, \q \v 35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे. \q तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’ \s5 \q \v 36 जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू \q कारण तो एखाद्या दुष्ट मनुष्यासारखे बोलत आहे. \q \v 37 त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे. \q तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो \q देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.” \s5 \c 35 \p \v 1 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला, \q \v 2 “तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? \q मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय? \q \v 3 तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? \q मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’ \s5 \q \v 4 मी तुला उत्तर देतो, \q तू आणि तुझे मित्र यांना देखील. \q \v 5 वरती आकाशाकडे बघ, \q तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ. \s5 \q \v 6 जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? \q तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही? \q \v 7 आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? \q1 तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही? \q \v 8 तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मणुष्य आहेस, \q आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मणुष्याच्या पुत्राला लाभ होईल. \b \s5 \q \v 9 पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील. \q ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात. \q \v 10 परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? \q जो रात्रीला गीत देतो, \q \v 11 ‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ \q पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो, \s5 \q \v 12 त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही \q कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत. \q \v 13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही \q सर्वशक्तीमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. \q \v 14 तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही \q तर तू त्याची वाट पाहत रहा! \s5 \q \v 15 तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, \q आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही. \q \v 16 म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. \q तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.” \s5 \c 36 \s देवाच्या माहात्म्याचे अलीहू वर्णन करतो \p \v 1 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला, \q \v 2 “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे \q कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे. \q \v 3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो \q देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन. \s5 \q \v 4 खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, \q कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे. \q \v 5 देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही \q तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे. \s5 \q \v 6 तो दुष्टांना वाचवीत नाही, \q तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो. \q \v 7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. \q तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो. \s5 \q \v 8 जर, साखळदंडानी ठेवले, \q जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले \q \v 9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. \q देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल. \s5 \q \v 10 तो त्यांचे कान त्याच्या सुचना ऐकण्यास उघडतो, \q तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो. \q \v 11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, \q तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील. \q \v 12 परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, \q त्यांना ज्ञान न होता मरण येईल. \s5 \q \v 13 जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. \q देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात. \q \v 14 ते अगदी तरुणपणी मरतील, \q त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल. \s5 \q \v 15 परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील \q विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो. \q \v 16 खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते \q व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, \q आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते. \s5 \q \v 17 परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, \q दोषारोप व न्याय तुलाच धरतात. \q \v 18 तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. \q लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दुर घेवून जावो. \s5 \q \v 19 आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस \q किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय? \q \v 20 दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, \q लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात. \q \v 21 काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. \q कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दुर रहा. \s5 \q \v 22 पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. \q त्याच्या समान कोण शिक्षक आहे? \q \v 23 त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? \p ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही. \q \v 24 त्याने जे काही केले त्याबद्दल \q लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत. \b \s5 \q \v 25 त्याने कार्य केले ते प्रत्येक मणुष्याला दिसते. \q दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात. \q \v 26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. \q आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे. \s5 \q \v 27 तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके \q आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो. \q \v 28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात \q आणि तो खूप लोकांवर पडतो. \q \v 29 खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो \q आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो? \s5 \q \v 30 बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो \q आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो. \q \v 31 तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो \q आणि त्यांना भरपूर अन्न देतो. \s5 \q \v 32 तो आपल्या हातांनी विजेला पकडतो \q आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो. \q \v 33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.” \s5 \c 37 \q \v 1 “खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते, \q ते त्याच्या जागेवरून सरकले आहे. \q \v 2 ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, \q देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका. \q \v 3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. \q ती सर्व पृथ्वीभर चमकते. \s5 \q \v 4 त्यानंतर आवाजाची गर्जना होते, \q देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. \q वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते. \q \v 5 देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. \q देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो. \q \v 6 तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. \q ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’ \s5 \q \v 7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे \q म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे. \q \v 8 म्हणून पशू लपण्यास जातात, \q आणि त्यांच्या गूहेत राहतात. \q \v 9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते \q उत्तरेकडून थंड वारे येतात. \s5 \q \v 10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ दिल्या जाते \q आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो. \q \v 11 खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो \q तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो. \s5 \q \v 12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो \q देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी. \q \v 13 काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, \q आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते \s5 \q \v 14 ईयोबा, याकडे लक्ष दे, \q थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर. \q \v 15 देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? \q तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का? \s5 \q \v 16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? \q देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय? \q \v 17 तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, \q दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते. \s5 \q \v 18 तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? \q जे आकाश आेतीव आरशाप्रमाणे अढळ आहे? \q \v 19 देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. \q अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही. \q \v 20 मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? \q तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे आहे. \s5 \q \v 21 आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही \q वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो. \q \v 22 उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, \q देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते. \s5 \q \v 23 जो सर्वशक्तीमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, \q तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. \q तो लोकांस त्रास देत नाही. \q \v 24 म्हणूनच लोक त्याचे भय धरतात. \q परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.” \s5 \c 38 \s देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देतो \r उत्प. 1:1-10 \p \v 1 नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, \q \v 2 कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, \q म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? \q \v 3 आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, \q मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. \s5 \q \v 4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? \q तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. \q \v 5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? \q मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? \s5 \q \v 6 तीचा पाया कशावर घातला आहे? \q तिची कोनशिला कोणी ठेवली? \q \v 7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले \q आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. \s5 \q \v 8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला \q तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? \q \v 9 त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले \q आणि काळोखात गुंडाळले. \s5 \q \v 10 मी समुद्राला मर्यादा घातल्या \q आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. \q \v 11 मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. \q तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. \b \s5 \q \v 12 तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला \q आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? \q \v 13 तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून \q दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? \s5 \q \v 14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. \q दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात \q \v 15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे \q आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. \s5 \q \v 16 सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? \q समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? \q \v 17 मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? \q काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? \q \v 18 ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? \q तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग. \s5 \q \v 19 प्रकाश कुठून येतो? \q काळोख कुठून येतो? \q \v 20 तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? \q तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का? \q \v 21 तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील \q तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? \s5 \q \v 22 मी ज्या भांडारात हिम आणि \q गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? \q \v 23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, \q युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो. \q \v 24 सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? \q पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का? \s5 \q \v 25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? \q गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला? \q \v 26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो? \q \v 27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते. \s5 \q \v 28 पावसास वडील आहेत का? \q दवबिंदू कुठून येतात? \q \v 29 हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? \q आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो? \q \v 30 पाणी दगडासारखे गोठते. \q सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो. \s5 \q \v 31 तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? \q तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का? \q \v 32 तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? \q किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का? \b \q \v 33 तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? \q तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का? \s5 \q \v 34 तुला मेघावर ओरडून \q त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का? \q \v 35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? \q ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? \q असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का? \s5 \q \v 36 लोकांस शहाणे कोण बनवतो? \q त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो? \q \v 37 ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? \q त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? \q \v 38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो \q आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात. \s5 \q \v 39 तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? \q त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का? \q \v 40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. \q ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. \s5 \q \v 41 कावळ्याला कोण अन्न देतो? \q जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात \q आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो? \s5 \c 39 \q \v 1 रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? \q हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? \q \v 2 पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? \q त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का? \s5 \q \v 3 ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात \q आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. \q \v 4 ती बछडी शेतात मोठी होतात. \q नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत. \s5 \q \v 5 रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? \q त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले? \q \v 6 ज्याला मी वाळवंटात घर दिले, \q मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली. \s5 \q \v 7 गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही) \q आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही. \q \v 8 ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे. \q ते आपले अन्न तिथेच शोधतात. \s5 \q \v 9 रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? \q तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का? \q \v 10 दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? \q आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का? \s5 \q \v 11 तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय, \q तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का? \q \v 12 तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल \q आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का? \s5 \q \v 13 “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते \q परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय? \q \v 14 ती आपली अंडी जमिनीत घालते \q आणि ती वाळूत उबदार होतात. \q \v 15 आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते. \s5 \q \v 16 ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. \q तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते. \q \v 17 कारण मी देवाने तीला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही. \q \v 18 परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते \q तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते, \s5 \q \v 19 तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? \q तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? \q \v 20 तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? \q तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात. \s5 \q \v 21 तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. \q तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो. \q \v 22 तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही \q तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही. \q \v 23 सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो \q त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात. \s5 \q \v 24 तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो \q तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही. \q \v 25 रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. \q त्यास दुरुनही लढाईचा वास येतो. \q सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात. \b \s5 \q \v 26 तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन \q दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का? \s5 \q \v 27 आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? \q तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का? \q \v 28 तो उंच सुळक्यावर राहतो \q तीच त्याची तटबंदी आहे \s5 \q \v 29 त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. \q गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते. \q \v 30 जेथे लोक मरण पावलेले असतात \q तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.” \s5 \c 40 \p \v 1 परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला, \q \v 2 “तू सर्वशक्तीमान देवाशी वाद घातलास. \q तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. \q आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का? \s5 \q \v 3 मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले, \q \v 4 मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? \q मी तुला उत्तर देऊ शकत नाही. \q मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो. \q \v 5 पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. \q मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही. \s5 \q \v 6 नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला: \q \v 7 तू आता कंबर कसून उभा राहा \q आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो. \s5 \q \v 8 मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस. \q \v 9 तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तिशाली आहेत का? \q देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का? \s5 \q \v 10 तू स्वत:ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, \q तेज व वैभव हे धारण कर. \q \v 11 तुझ्या रागाला भरती येवू दे, \q आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण \q आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस. \s5 \q \v 12 होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर \q वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक. \q \v 13 त्यांना चिखलात पुरुन टाक \q त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक. \q \v 14 मग मी तुझी सत्यता जाणेल, \q मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील. \b \s5 \q \v 15 तू बेहेमोथ \f + मोठा प्राणी \f* कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. \q तो बैलासारखे गवत खातो. \q \v 16 त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. \q त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत. \s5 \q \v 17 त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. \q त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत. \q \v 18 त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. \q त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी. \s5 \q \v 19 बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. \q परंतु मी त्याचा पराभव करु शकतो. \q \v 20 डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात \q तिथले गवत खातो. \q \v 21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. \q दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो. \s5 \q \v 22 कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते \q तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो. \q \v 23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही \q यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो. \q \v 24 त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. \q किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.” \s5 \c 41 \q \v 1 तुला लिव्याथानाला \f + मोठा जलप्राणी \f* गळ टाकून पकडता येईल का? \q तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का? \q \v 2 तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? \q किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का? \q \v 3 लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? \q तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का? \s5 \q \v 4 लिव्याथान तुझ्याशी करार करून \q जन्मभर तुझा दास होऊन राहील का? \q \v 5 तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? \q तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय? \q \v 6 मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? \q ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का? \s5 \q \v 7 तू लिव्याथानाच्या कातडीत \q किंवा डोक्यात बरच्या फेकशील का? \q \v 8 तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. \q ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर. \q \v 9 तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. \q तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल. \s5 \q \v 10 एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. \q “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही. \q \v 11 मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? \q या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे. \q \v 12 मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, \q त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन. \s5 \q \v 13 कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. \q त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल? \q \v 14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. \q त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते. \q \v 15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या \q खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत. \s5 \q \v 16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की \q त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही. \q \v 17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. \q ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही. \q \v 18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. \q त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात. \s5 \q \v 19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. \q आगीच्या ठिणग्या निघतात. \q \v 20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो \q तसा धूर त्याच्या नाकातून येतो. \q \v 21 लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात. \s5 \q \v 22 लिव्याथानाची मान मजबूत आहे. \q लोक त्यास घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात. \q \v 23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही \q ती लोखंडासाखी कठीण आहे. \q \v 24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. \q त्यास भीती वाटत नाही ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे. \s5 \q \v 25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात \q लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात. \q \v 26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात. \q त्या शस्त्रांनी त्यास काहीही इजा होत नाही. \q \v 27 तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो \q कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो. \s5 \q \v 28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही \q वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात. \q \v 29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. \q लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो. \q \v 30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. \q तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो. \s5 \q \v 31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. \q तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो. \q \v 32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. \q तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो. \s5 \q \v 33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. \q तो एक भीतिविरहित प्राणी आहे. \q \v 34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. \q आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.” \s5 \c 42 \s ईयोबाची कबुली व त्याचा अंगीकार \p \v 1 नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला: \q \v 2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, \q तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही. \q \v 3 तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? \q तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, \q त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो. \s5 \q \v 4 परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे. \q \v 5 परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, \q परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे. \q \v 6 आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील. \s5 \p \v 7 परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला. \v 8 म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हास योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मूर्ख होता म्हणून तुम्हास शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला. \v 9 तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले. \s ईयोबाची समृद्धी त्यास पुन्हा प्राप्त होते \s5 \p \v 10 ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. \v 11 ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबासह भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा आणि सोन्याची अंगठी दिली. \s5 \p \v 12 परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत. \v 13 ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. \v 14 ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले. \s5 \p \v 15 त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांप्रमाणे ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा त्यांना मिळाला. \v 16 अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला. \v 17 नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”