added OT books

This commit is contained in:
Larry Versaw 2018-04-26 11:00:56 -06:00
parent b0c1f7b6fd
commit e18820eeaa
42 changed files with 55213 additions and 12 deletions

2474
01-GEN.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,2474 @@
\id GEN
\ide UTF-8
\h उत्पत्ति
\toc1 उत्पत्ति
\toc2 उत्पत्ति
\toc3 gen
\mt1 उत्पत्ति
\s5
\c 1
\p
\v 1 प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
\v 2 पृथ्वी आकारहीन व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता.
\p
\s5
\v 3 देव बोलला, “प्रकाश” होवो आणि प्रकाश झाला.
\v 4 देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला.
\v 5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला रात्र असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.
\p
\s5
\v 6 देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.
\v 7 देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले.
\v 8 देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस.
\p
\s5
\v 9 नंतर देव बोलला, आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो, आणि तसे झाले.
\v 10 देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.
\p
\s5
\v 11 देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
\v 12 पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
\v 13 संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.
\p
\s5
\v 14 मग देव बोलला, दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
\v 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत, आणि तसे झाले.
\p
\s5
\v 16 दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले.
\v 17 पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी,
\v 18 दिवसावर व रात्रीवर सत्ता चालवण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
\v 19 संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस.
\p
\s5
\v 20 देव बोलला, जले जीवजंतूंनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.
\v 21 समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
\p
\s5
\v 22 देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.
\v 23 संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.
\p
\s5
\v 24 देव बोलला, आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.
\v 25 देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
\p
\s5
\v 26 देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.”
\v 27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
\s5
\v 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
\v 29 देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यात बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड, ही मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न असे होतील.
\p
\s5
\v 30 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्याच्यात जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले.
\v 31 देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस.
\s5
\c 2
\p
\v 1 त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी ते भरून गेले
\v 2 देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.
\v 3 देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण त्याने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.
\p
\s5
\v 4 देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.
\v 5 शेतातले कोणतेही झुडप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
\v 6 पण पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्याने भिजवला जात असे.
\p
\s5
\v 7 परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवंत प्राणी झाला.
\v 8 परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.
\p
\s5
\v 9 परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाइटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होतो.
\v 10 बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदी निघाली. तेथून ती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या.
\p
\s5
\v 11 पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने आहे.
\v 12 त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असते. तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात.
\p
\s5
\v 13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश देशामधून वाहते.
\v 14 तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर देशाच्या पूर्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.
\p
\s5
\v 15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
\v 16 परमेश्वर देवाने मनुष्याला आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा.
\v 17 परंतु बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्याचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”
\p
\s5
\v 18 नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.”
\v 19 परमेश्वर देवाने मातीतून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली.
\v 20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू-पक्षी पाहिले परंतु त्यांच्यात त्याला सुसंगत असा मदतनीस सापडला नाही.
\p
\s5
\v 21 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्याला गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली.
\v 22 परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले.
\v 23 तेव्हा मनुष्य म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसाचे मांस आहे; मी तिला स्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
\p
\s5
\v 24 म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
\v 25 तेथे मनुष्य व त्याची पत्नी ही दोघेही नग्न होती, परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
\s5
\c 3
\p
\v 1 परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने तुम्हांला खरोखरच सांगितले आहे काय?” ”
\v 2 स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.
\v 3 परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुंम्ही मराल.”
\p
\s5
\v 4 सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुंम्ही खरोखर मरणार नाही.
\v 5 कारण देवाला हे माहीत आहे की, जर तुंम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुंम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”
\v 6 आणि स्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
\p
\s5
\v 7 तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली.
\v 8 दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.
\p
\s5
\v 9 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्याला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”
\v 10 मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”
\v 11 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
\p
\s5
\v 12 मनुष्य म्हणाला, “तू ही स्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
\v 13 मग परमेश्वर देव त्या स्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
\p
\s5
\v 14 परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.
\v 15 तुझ्यामध्ये व स्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्रीच्या बीजामध्ये मी शत्रुत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.
\p
\s5
\v 16 स्त्रीला तो म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
\p
\s5
\v 17 17 नंतर तो आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;
\v 18 जमीन तुझ्यासाठी काटे व कुसळे उत्पन्न करील आणि शेतातली वनस्पती तुला खाव्या लागतील.
\v 19 तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण तिच्यातून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील
\p
\s5
\v 20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जीवंत माणसांची ती आई होती.
\v 21 परमेश्वराने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.
\p
\s5
\v 22 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्याला बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्याला त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”
\v 23 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले.
\v 24 देवाने मनुष्याला बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करूब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.
\s5
\c 4
\p
\v 1 मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.
\v 2 त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातला कामकरी झाला.
\p
\s5
\v 3 काही काळानंतर काइनाने परमेश्वराला शेतातल्या फळांतले काही अर्पण आणले.
\v 4 हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्वीकारले.
\v 5 परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले.
\p
\s5
\v 6 परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे?
\v 7 तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्वीकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
\p
\s5
\v 8 काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरुद्ध उठला व त्याला त्याने ठार मारले.
\p
\v 9 परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”
\p
\s5
\v 10 देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून ओरड करत आहे.
\v 11 तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे.
\v 12 जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर तू भटकत राहशील व निर्वासित होशील.”
\p
\s5
\v 13 काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलिकडे, इतकी मोठी ती आहे.
\v 14 खरोखर, तू मला ह्या माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारून टाकेल.”
\v 15 परमेश्वर त्याला म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्याला कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.
\p
\s5
\v 16 काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला.
\v 17 काइनाने आपल्या पत्नीस जाणिले, ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले.
\s5
\v 18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला.
\v 19 लामेखाने दोन बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.
\p
\s5
\v 20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला.
\v 21 आणि त्याच्या भावाचे नाव युबाल होते, तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणाऱ्या कलावंताचा मूळपुरुष झाला.
\v 22 सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.
\p
\s5
\v 23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला,
\q आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका;
\q लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान लावा; एका माणसाने मला जखमी केले, मी त्याला ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले.
\q
\v 24 जर काइनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.
\s5
\v 25 आदामाने पुन्हा पत्नीस जाणिले आणि तिला पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले. हव्वा म्हणाली, “देवाने हाबेलाच्या ठिकाणी मला दुसरे संतान दिले आहे, कारण काइनाने त्याला जिवे मारले.”
\v 26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने (प्रार्थना) धावा करू लागले.
\s5
\c 5
\p
\v 1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
\v 2 त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
\p
\s5
\v 3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
\v 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
\v 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 6 शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश झाला
\v 7 अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
\p
\s5
\v 9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान झाला;
\v 10 केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
\v 13 महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
\v 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 17 महललेल एकंदर आठशे पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 18 यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
\v 19 हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 20 यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
\s5
\v 21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
\v 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
\v 23 हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
\v 24 हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्याला नेले.
\p
\s5
\v 25 मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
\v 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेब्यांशी वर्षे जगला. त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
\v 27 मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 28 लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
\v 29 त्याने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
\s5
\v 30 नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
\v 31 लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
\p
\s5
\v 32 नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
\s5
\c 6
\p
\v 1 पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या,
\v 2 तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहे असे देवपुत्रांनी पाहिले. त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या.
\v 3 परमेश्वर म्हणाला, माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”
\p
\s5
\v 4 त्या दिवसांत आणि त्यानंतरही, महाकाय मानव (राक्षस) पृथ्वीवर होते. देवाचे मुलगे मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच.
\p
\s5
\v 5 पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातली प्रत्येक कल्पना केवळ नेहमी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले.
\v 6 म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वराला वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला.
\p
\s5
\v 7 म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”
\v 8 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली.
\p
\s5
\v 9 या नोहासंबंधीच्या घटना आहेत. नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष माणूस होता. नोहा देवाबरोबर चालला
\v 10 नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते.
\p
\s5
\v 11 देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती, आणि हिंसाचाराने भरलेली होती.
\v 12 देवाने पृथ्वी पाहिली; आणि पाहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता.
\p
\s5
\v 13 म्हणून देव नोहाला म्हणाला, मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याचा समय आता आला आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन.
\v 14 तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव.
\v 15 देव म्हणाला, तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे;
\p
\s5
\v 16 तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर.
\v 17 आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहे ते मरतील.
\p
\s5
\v 18 मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे मुलगे, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील.
\v 19 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी दोन-दोन तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने. ते नर व मादी असावेत.
\p
\s5
\v 20 पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील.
\v 21 तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.
\v 22 नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्वकाही केले.
\s5
\c 7
\p
\v 1 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.
\v 2 प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे.
\v 3 आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील.
\p
\s5
\v 4 आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.
\v 5 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.
\p
\s5
\v 6 जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता.
\v 7 नोहा, त्याची मुले, त्याची बायको, आणि त्याच्या मुलांच्या बायका, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.
\p
\s5
\v 8 पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही,
\v 9 देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले.
\v 10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.
\p
\s5
\v 11 नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या.
\v 12 पावसाला सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता.
\p
\s5
\v 13 त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेथ आणि नोहाची बायको व त्यांच्या बरोबर त्याच्या मुलांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवेश केला.
\v 14 त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी, यांनी तारवात प्रवेश केला.
\p
\s5
\v 15 ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला.
\v 16 देवाने त्याला आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.
\p
\s5
\v 17 मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले.
\v 18 मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.
\p
\s5
\v 19 पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले;
\v 20 पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले.
\p
\s5
\v 21 पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आणि सर्व मानवजात मरून गेले.
\v 22 ज्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता असे, कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले.
\p
\s5
\v 23 अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होत तेच फक्त वाचले.
\v 24 एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता.
\s5
\c 8
\p
\v 1 देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहायला लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.
\v 2 पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला.
\v 3 पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.
\p
\s5
\v 4 सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले.
\v 5 दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत होते. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले.
\p
\s5
\v 6 चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली
\v 7 त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.
\p
\s5
\v 8 नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले,
\v 9 परंतु कबुतराला पाय टेकायला जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्याला आपल्याबरोबर तारवात घेतले.
\p
\s5
\v 10 तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले;
\v 11 ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरून पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले.
\v 12 तो आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतर पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.
\p
\s5
\v 13 असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले. नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता.
\v 14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती.
\p
\s5
\v 15 देव नोहाला म्हणाला,
\v 16 “तू, तुझी बायको, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या बायका यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.
\v 17 तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट होऊन आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.”
\p
\s5
\v 18 तेव्हा नोहा, त्याची बायको व त्याची मुले, बायका यांच्यासह तारवातून बाहेर आला;
\v 19 त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले.
\p
\s5
\v 20 नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
\v 21 परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील प्रवृत्ती बालपणापासूनच वाईट आहे. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही.
\v 22 जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”
\s5
\c 9
\p
\v 1 नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका.
\v 2 पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व दहशत राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत.
\s5
\v 3 प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हांला देत आहे.
\v 4 पण ज्यात त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये.
\s5
\v 5 परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक मोबदला घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी तो घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी मोबदल्याची मागणी करीन.
\v 6 जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे.
\v 7 तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.
\s5
\v 8 मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला,
\v 9 माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो,
\v 10 आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो.
\s5
\v 11 याअन्वये मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत. पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.
\v 12 देव म्हणाला, मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे.
\v 13 मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे.
\s5
\v 14 मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हांला ढगात मेघधनुष्य दिसेल,
\v 15 नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही.
\s5
\v 16 मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याचे स्मारक म्हणून मी त्याकडे पाहीन.
\v 17 नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”
\s5
\v 18 नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता
\v 19 हे नोहाचे तीन मुलगे होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला.
\s5
\v 20 नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला.
\v 21 तो थोडा द्राक्षारस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता.
\s5
\v 22 तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले.
\v 23 मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही.
\s5
\v 24 जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले.
\v 25 तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.”
\s5
\v 26 तो म्हणाला,
\q “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो.
\q कनान त्याचा सेवक होवो.
\q
\v 27 देव याफेथाचा अधिक विस्तार करो,
\q आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो.
\q कनान त्यांचा सेवक होवो.”
\p
\s5
\v 28 पुरानंतर नोहा साडेतीनशे वर्षे जगला;
\v 29 नोहा एकूण साडेनऊशे वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
\s5
\c 10
\p
\v 1 नोहाच्या शेम, हाम व याफेथ ह्या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
\s5
\v 2 याफेथाचे मुलगे गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
\v 3 गोमरचे मुलगे आष्कनाज, रीपाथ व तोगर्मा हे होते.
\v 4 यावानाचे मुलगे अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.
\v 5 यांच्यापैकी समुद्रकिनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.
\s5
\v 6 हामाचे मुलगे कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.
\v 7 कुशाचे मुलगे सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.
\s5
\v 8 कुशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता होता.
\v 9 तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी, अशी म्हण पडली आहे.
\v 10 त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.
\s5
\v 11 त्या देशातून तो अश्शुरात गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालाह ही शहरे बांधली
\v 12 आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.
\v 13 मिस्राईम हा लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम,
\v 14 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी निघाले), व कफतोरीम, ह्यांचा बाप बनला.
\s5
\v 15 कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,
\v 16 तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
\v 17 हिव्वी, आर्की व शीनी
\v 18 अर्वादी, झेमारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.
\s5
\v 19 कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
\v 20 कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.
\s5
\v 21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
\v 22 शेम याचे मुलगे एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.
\v 23 अरामाचे मुलगे ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.
\s5
\v 24 अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.
\v 25 एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
\s5
\v 26 यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह
\v 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला
\v 28 ओबाल, अबीमाएल, शबा,
\v 29 ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे मुलगे होते.
\s5
\v 30 त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफरपर्यंत होता.
\v 31 आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे मुलगे.
\s5
\v 32 पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.
\s5
\c 11
\p
\v 1 आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.
\v 2 ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.
\s5
\v 3 ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
\v 4 मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
\s5
\v 5 आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.
\v 6 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एकच असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
\v 7 चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
\s5
\v 8 मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.
\v 9 त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
\s5
\v 10 ही शेमाची वंशावळी : जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा बाप झाला.
\v 11 अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुलगे व मुलींचा बाप झाला.
\s5
\v 12 अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.
\v 13 शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 14 जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;
\v 15 एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 16 एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.
\v 17 पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 18 पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.
\v 19 रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 20 रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरूगाला जन्म दिला.
\v 21 सरूगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 22 सरूग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.
\v 23 नाहोराला जन्म दिल्यावर सरूग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
\s5
\v 24 नाहोर एकूणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.
\v 25 तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
\v 26 तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
\s5
\v 27 तेरहाची वंशावळ ही : तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.
\v 28 हारान, आपला बाप तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
\s5
\v 29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायकोचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा बाप होता.
\v 30 साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
\s5
\v 31 मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानाचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची बायको साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारानपर्यंत येऊन तेथे राहिले.
\v 32 तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
\s5
\c 12
\p
\v 1 आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.
\v 2 मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील,
\v 3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्याला मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.”
\s5
\v 4 परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले, तो गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. त्याने हारान सोडले त्या वेळी अब्राम पंचाहत्तर वर्षांचा होता.
\v 5 अब्रामाने त्याची बायको साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारानमध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता, आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कनान देशात जाण्यासाठी निघाले आणि कनान देशात आले.
\s5
\v 6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
\v 7 परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशाजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.
\s5
\v 8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.
\v 9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेवकडे गेला.
\s5
\v 10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसरमध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता.
\v 11 मिसर देशात प्रवेश करण्यापूर्वी अब्राम आपली बायको साराय हिला म्हणाला, “पाहा मला माहीत आहे की, तू अतिशय सुंदर स्त्री आहेस.
\v 12 मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची बायको आहे, आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील, परंतु तुला जिवंत ठेवतील.
\v 13 म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांना सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.”
\s5
\v 14 अब्रामाने जेव्हा मिसर देशात प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे.
\v 15 मिसरच्या फारो राजाच्या राजकुमारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्याजवळ तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि त्याने तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले.
\v 16 तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. त्याला मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले.
\s5
\v 17 अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकांना भयंकर पीडांनी पीडले.
\v 18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, “तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी बायको आहे हे तू मला का सांगितले नाहीस?
\v 19 ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो, तिला घेऊन जा.”
\v 20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या माणसांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम व त्याची बायको साराय यांनी आपले सर्वकाही बरोबर घेऊन मिसर सोडले.
\s5
\c 13
\p
\v 1 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची बायको साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेवात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.
\v 2 आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.
\s5
\v 3 तो आपला प्रवास करीत नेगेवपासून बेथेलला गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला.
\v 4 जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.
\s5
\v 5 आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व तंबू होते.
\v 6 तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना.
\v 7 तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.
\s5
\v 8 तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.
\v 9 तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
\s5
\v 10 लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.
\v 11 तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.
\s5
\v 12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला.
\v 13 सदोमाचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणारे होते.
\s5
\v 14 लोट त्याच्यापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.
\v 15 तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
\s5
\v 16 मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.
\v 17 ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देईन.”
\v 18 तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी राहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
\s5
\c 14
\p
\v 1 त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसांत असे झाले की,
\v 2 त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले.
\s5
\v 3 नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. ह्या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
\v 4 त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केले.
\v 5 त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम यांना, हाम येथे जूजीम यांना, शावेह किर्याथाईम येथे एमीम यांना मारले.
\v 6 आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले.
\s5
\v 7 नंतर ते मागे फिरून एन्‌-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
\v 8 नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.
\v 9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरुद्ध लढले.
\s5
\v 10 सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यात पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.
\v 11 अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले.
\v 12 ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहात होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले.
\s5
\v 13 तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.
\v 14 जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
\s5
\v 15 त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
\v 16 त्याने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
\s5
\v 17 मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात.
\v 18 देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता.
\s5
\v 19 त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
\v 20 परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्याला सर्वाचा दहावा भाग दिला.
\s5
\v 21 सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.”
\v 22 अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की,
\v 23 “तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही. नाहीतर तू म्हणशील अब्रामाला मी धनवान केले.
\v 24 माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.
\s5
\c 15
\p
\v 1 या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
\v 2 अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्कातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
\v 3 अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.
\s5
\v 4 नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा माणूस तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”
\v 5 मग त्याने त्याला बाहेर आणले, आणि म्हटले, “ह्या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्याला म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”
\s5
\v 6 त्याने देवावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.
\v 7 तो त्याला म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
\v 8 तो त्याला म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”
\s5
\v 9 तो त्याला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
\v 10 त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत;
\v 11 कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
\s5
\v 12 नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्याला झाकले.
\v 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.
\s5
\v 14 परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
\v 15 तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.
\v 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”
\s5
\v 17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली.
\v 18 त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
\v 19 केनी, कनिजी, कदमोनी,
\v 20 हित्ती, परिज्जी, रेफाईमी,
\v 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.”
\s5
\c 16
\p
\v 1 अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
\v 2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.
\v 3 अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची बायको साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.
\v 4 त्याने हगारसोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
\s5
\v 5 नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हांला दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
\p
\v 6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
\s5
\v 7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
\v 8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
\s5
\v 9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
\v 10 परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
\s5
\v 11 परमेश्वराचा दूत तिला असेसुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर एकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
\v 12 “इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरुद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरुद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
\s5
\v 13 नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, ‘तू पाहणारा देव आहेस, असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्याला मी येथेही मागून पाहिले काय?”
\v 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
\s5
\v 15 हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
\v 16 हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शाऐंशी वर्षांचा होता.
\s5
\c 17
\p
\v 1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन दिले व त्याला म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
\v 2 तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.”
\s5
\v 3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले आणि देव त्याला म्हणाला,
\v 4 “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे : तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.
\v 5 येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे.
\v 6 मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील.
\s5
\v 7 मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन.
\v 8 ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.”
\s5
\v 9 नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.
\v 10 माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की : तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी.
\v 11 माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी.
\s5
\v 12 पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसांनी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो.
\v 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील.
\v 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
\s5
\v 15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल.
\v 16 मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.”
\s5
\v 17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्याला मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?”
\v 18 अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!”
\s5
\v 19 देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी बायको सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.
\v 20 तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्याला आशीर्वाद देईन, आणि त्याला फलद्रुप करीन आणि त्याला बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्याला एक मोठे राष्ट्र करीन.
\v 21 परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.”
\s5
\v 22 देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.
\v 23 त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली.
\s5
\v 24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.
\v 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.
\v 26 अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली.
\v 27 त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.
\s5
\c 18
\p
\v 1 परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता.
\v 2 त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. त्याने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले.
\s5
\v 3 तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नको.
\v 4 थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.
\v 5 मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हांला ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणाला तसे कर.”
\s5
\v 6 अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
\v 7 नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्याला ते लवकर तयार करण्यास सांगितले.
\v 8 त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.
\s5
\v 9 ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”
\v 10 तो म्हणाला, “मी वसंतऋतूच्या समयी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले.
\s5
\v 11 आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते.
\v 12 म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”
\s5
\v 13 परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?
\v 14 परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋतूत, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
\v 15 नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
\s5
\v 16 नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे ते जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला.
\v 17 परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय?
\v 18 कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.
\v 19 मी त्याला निवडले आहे यासाठी की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणा व सचोटीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्याला मिळवून द्यावे.”
\s5
\v 20 मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्याकारणाने,
\v 21 मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.”
\s5
\v 22 मग ती माणसे तेथून वळून आणि सदोमाकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला.
\v 23 मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय?
\s5
\v 24 कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय ?
\v 25 असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?”
\v 26 परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.”
\s5
\v 27 अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो!
\v 28 समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
\s5
\v 29 पुन्हा तो परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.”
\v 30 तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
\v 31 तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजावतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
\s5
\v 32 शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
\v 33 मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
\s5
\c 19
\p
\v 1 संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले.
\v 2 तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हांला विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा. मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”
\v 3 परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.
\s5
\v 4 परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील माणसांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.
\v 5 त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
\s5
\v 6 लोट घराच्या दारातून बाहेर त्यांच्याकडे आला व त्याने आपल्यामागे दार बंद करून घेतले.
\v 7 तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, मी तुम्हांला विनंती करतो, तुम्ही असे भयंकर वाईट काम करू नका.
\v 8 पाहा, माझ्या दोन मुली आहेत ज्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही. मी तुम्हांला विनंती करतो, मला त्यांना तुमच्याकडे बाहेर आणू द्या, आणि तुम्हांला जे चांगले दिसेल तसे त्यांना करा. फक्त ह्या माणसांना काही करू नका, कारण ते माझ्या छपराच्या सावलीखाली राहण्यास आले आहेत.”
\s5
\v 9 ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परदेशी म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्याला म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले.
\s5
\v 10 परंतु त्या पुरुषांनी त्यांचा हात बाहेर काढून लोटाला आपणाजवळ घरात घेऊन दार बंद केले.
\v 11 लोटाच्या पाहुण्यांनी घराच्या दाराबाहेर जी सर्व तरुण व म्हातारी माणसे होती, त्यांना आंधळे करून टाकले. ते घराचे दार शोधण्याचा प्रयत्न करून करून थकून गेले.
\s5
\v 12 मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ.
\v 13 यासाठी की, आम्ही या ठिकाणाचा नाश करणार आहोत. कारण या लोकांच्या दुष्टतेचा फार मोठा बोभाटा परमेश्वरासमोर झाला आहे, म्हणून त्याने आम्हांला याचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”
\s5
\v 14 मग लोट बाहेर गेला व ज्या माणसांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावयांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले.
\v 15 मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, ह्या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी बायको व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.”
\s5
\v 16 परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा परमेश्वराच्या त्याच्यावर कृपा होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा हात आणि त्याच्या बायकोचा आणि त्याच्या दोन मुलींचे हात धरून त्यांना बाहेर आणले आणि नगराबाहेर आणून सोडले.
\v 17 त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.”
\s5
\v 18 लोट त्यांना म्हणाला, “हे माझ्या प्रभू, असे नको, कृपा कर!
\v 19 माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासाला प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन.
\v 20 पाहा, पळून जाण्यासाठी हे नगर जवळ आहे, आणि ते लहान आहे, कृपा करून मला तिकडे पळून जाऊ दे (ते लहान नाही काय ?), म्हणजे माझा जीव वाचेल.”
\s5
\v 21 तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी ही विनंतीसुद्धा मान्य करतो. तू उल्लेख केलेल्या नगराचा नाश मी करणार नाही.
\v 22 त्वरा कर! तिकडे पळून जा, कारण तू तेथे पोहचेपर्यंत मला काही करता येणार नाही.” यावरून त्या नगराला सोअर असे नाव पडले.
\s5
\v 23 जेव्हा लोट सोअरात पोहचला तेव्हा सूर्य उगवला होता,
\v 24 नंतर परमेश्वराने सदोम व गमोरा यांवर आकाशातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला.
\v 25 त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला.
\s5
\v 26 परंतु लोटाची बायको त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली.
\v 27 अब्राहाम सकाळी लवकर उठला आणि परमेश्वरासमोर तो ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला.
\v 28 त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे आणि खोऱ्यातील सर्व प्रदेशाकडे पाहिले. त्याने पाहिले तेव्हा पाहा, त्या अवघ्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर त्या प्रदेशातून चढताना त्याला दिसला.
\s5
\v 29 देवाने जेव्हा त्या खोऱ्यातील नगरांचा नाश केला तेव्हा अब्राहामाची आठवण केली. त्याने लोट राहत होता त्या नगरांचा नाश करण्यापूर्वी लोटाला त्या नाशातून काढले.
\s5
\v 30 परंतु लोट त्याच्या दोन मुलींबरोबर सोअरातून निघून डोंगरात राहण्यासाठी चढून गेला, कारण त्याला सोअरात राहण्याची भीती वाटली. तो आपल्या दोन मुलींसह एका गुहेत राहिला.
\s5
\v 31 थोरली मुलगी धाकटीला म्हणाली, “आपला पिता म्हातारा झाला आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याबरोबर संबंध ठेवण्यास येथे कोठेही कोणी पुरुष नाही.
\v 32 चल, आपल्या पित्याला द्राक्षारस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.”
\v 33 म्हणून, त्या रात्री त्यांनी आपल्या पित्याला द्राक्षरस पाजला. नंतर थोरली मुलगी आपल्या पित्याबरोबर झोपली; ती कधी झोपली व कधी उठली हे त्याला समजले नाही.
\s5
\v 34 दुसऱ्या दिवशी वडील धाकटीला म्हणाली, “मी काल रात्री माझ्या बापाबरोबर झोपले, तर आज रात्री पुन्हा आपण बापाला द्राक्षारस पाजू या, मग रात्री तू बापाबरोबर झोप. अशा रीतीने आपण बापाचा वंश चालवू.”
\v 35 तेव्हा त्या रात्रीही त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला, नंतर धाकटी मुलगी आपल्या बापाबरोबर झोपली, आणि ती कधी झोपली व कधी उठली हे त्याला समजले नाही.
\s5
\v 36 अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या.
\v 37 वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष.
\v 38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष.
\s5
\c 20
\p
\v 1 अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.
\v 2 अब्राहाम आपली बायको सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे. गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.
\v 3 परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका माणसाची बायको आहे.”
\s5
\v 4 परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
\v 5 ‘ती माझी बहीण आहे, असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे, असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
\s5
\v 6 मग देव त्याला स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
\v 7 म्हणून आता तू त्याची बायको त्याला परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”
\s5
\v 8 अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.
\v 9 मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्याला म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरुद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”
\s5
\v 10 अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले ?
\v 11 अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या बायकोकरता मला ठार मारतील, असा विचार मी केला.
\v 12 शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी बायको झाली आहे.
\s5
\v 13 देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, ‘तू माझी बायको म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा माझा भाऊ आहे असे सांग.’”
\v 14 अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्याला मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या.
\s5
\v 15 अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”
\v 16 तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि ह्या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.”
\s5
\v 17 अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली.
\v 18 कारण परमेश्वराने अब्राहामाची बायको सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.
\s5
\c 21
\p
\v 1 परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
\v 2 अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्याला जो नेमलेला समय देवाने सांगितला होता त्या समयी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.
\v 3 अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
\v 4 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली.
\s5
\v 5 इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
\v 6 सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माइयाबरोबर हसेल.”
\v 7 आणखी ती असेही म्हणाली, “सारा ह्या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
\s5
\v 8 मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
\v 9 मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.
\s5
\v 10 म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
\v 11 त्याच्या मुलामुळे ह्या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.
\s5
\v 12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती ह्या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
\v 13 मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”
\s5
\v 14 अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैरशेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
\v 15 कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
\v 16 नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको. ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
\s5
\v 17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
\v 18 ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्याला धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
\s5
\v 19 मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
\v 20 देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
\v 21 तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करून दिली.
\s5
\v 22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्याबरोबर असतो;
\v 23 म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील. ”
\v 24 आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”
\s5
\v 25 मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
\v 26 अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”
\v 27 म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन माणसांनी करार केला.
\s5
\v 28 अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.
\v 29 अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे ? ”
\v 30 त्याने उत्तर दिले, “ तू ही कोकरे माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”
\s5
\v 31 तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.
\v 32 त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
\s5
\v 33 अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.
\v 34 अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.
\s5
\c 22
\p
\v 1 या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.”
\v 2 नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोसत्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”
\v 3 तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासाला निघाले.
\s5
\v 4 तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.
\v 5 मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.”
\v 6 अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे संगती निघाले.
\s5
\v 7 इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”
\v 8 अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले.
\s5
\v 9 देवाने सांगिलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.
\v 10 मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला.
\s5
\v 11 परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्याला म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
\v 12 तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.”
\s5
\v 13 आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्याला होमार्पण म्हणून अर्पण केले.
\v 14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.
\s5
\v 15 नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली
\v 16 आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,
\v 17 मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.
\s5
\v 18 पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळलास.”
\v 19 मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.
\s5
\v 20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.”
\v 21 त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामाचा बाप कमुवेल,
\v 22 त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत.
\s5
\v 23 बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
\v 24 त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार मुलगे झाले.
\s5
\c 23
\p
\v 1 सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली. ही सारेच्या आयुष्याची वर्षे होती.
\v 2 सारा कनान देशातील किर्याथ-आरबा, म्हणजे, कनान देशातले हेब्रोन येथे मरण पावली. अब्राहामाने सारेसाठी शोक केला आणि तिच्यासाठी तो रडला.
\s5
\v 3 मग अब्राहाम उठला आणि आपल्या मृत बायकोपासून गेला, व हेथीच्या मुलांकडे जाऊन म्हणाला,
\v 4 “मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”
\s5
\v 5 हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले,
\v 6 “माझ्या स्वामी, आमचे ऐका. तुम्ही आमच्यामध्ये देवाचे सरदार आहात. आमच्याकडे असलेल्या उत्तम थडग्यात तुमच्या मयताला पुरा. आमच्यातील कोणीही आपले थडगे तुम्हांला द्यायला मना करणार नाही.”
\s5
\v 7 अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांना नमन केले.
\v 8 तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा.
\v 9 त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.”
\s5
\v 10 तेथे एफ्रोन हा हेथीच्या मुलांबरोबर बसलेला होता, आणि हेथीची मुले व त्याच्या नगराच्या वेशीत येणारे सर्व ऐकत असता, एफ्रोन हित्ती याने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,
\v 11 “नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हांला देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हांला देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हांला देतो.”
\s5
\v 12 मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वतः वाकून नमन केले.
\v 13 देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.”
\s5
\v 14 एफ्रोनाने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,
\v 15 “माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा चारसे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”
\v 16 तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथाची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले.
\s5
\v 17 एफ्रोनाचे जे शेत मम्रे शेजारी मकपेला येथे होते, ते शेत, व त्यात असलेली गुहा व त्याच्यासभोवती सीमेतील सर्व झाडे,
\v 18 ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली.
\s5
\v 19 त्यानंतर अब्राहामाने आपली बायको सारा हिला कनान देशातील मम्रे म्हणजे हेब्रोन याच्या शेजारी मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
\v 20 ते शेत व त्यातील गुहा ही मृतांना पुरण्याची जागा म्हणून हेथीच्या मुलांकडून अब्राहामाच्या मालकीची झाली.
\s5
\c 24
\p
\v 1 आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते.
\v 2 अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव,
\v 3 आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी बायको पाहणार नाहीस.
\v 4 परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी बायको मिळवून आणशील.”
\s5
\v 5 सेवक त्याला म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?”
\v 6 अब्राहाम त्याला म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे!
\v 7 आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या बापाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून , ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन, असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी बायको आणशील.
\s5
\v 8 परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.”
\v 9 तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली.
\s5
\v 10 मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला. (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती.) त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम नहाराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला.
\v 11 त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला बायका तेथे येत असत.
\s5
\v 12 नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.
\v 13 पाहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे. आणि नगरातील लोकांच्या मुली पाणी काढण्यास बाहेर येत आहेत.
\v 14 तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे, आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते, तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.”
\s5
\v 15 मग असे झाले की, त्या बोलणे संपले नाही तोच, पाहा, रिबका तिची मातीची घागर तिच्या खांद्यावर घेऊन बाहेर आली. रिबका ही अब्राहामाचा भाऊ नाहोर याच्यापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या होती.
\v 16 ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली.
\s5
\v 17 तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.”
\v 18 ती म्हणाली, “प्या माझ्या प्रभू,” आणि तिने लगेच आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन घेतली, आणि त्याला पाणी पाजले.
\s5
\v 19 त्याला पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.”
\v 20 म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले.
\s5
\v 21 तेव्हा, परमेश्वर देवाने आपला प्रवास यशस्वी केला की नाही, हे समजावे म्हणून तो माणूस तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला.
\v 22 उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या माणसाने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या,
\v 23 आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या बापाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.”
\s5
\v 24 ती त्याला म्हणाली, “मी बथुवेलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे.”
\v 25 ती आणखी त्याला म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.”
\s5
\v 26 तेव्हा त्या माणसाने लवून परमेश्वराची उपासना केली.
\v 27 तो म्हणाला, “माझा धनी, अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यासंबंधीचा कराराचा प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता सोडली नाही,. माझ्याकरीताबाबत सांगायचे तर, परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या नातेवाइकाकडेच थेट मार्ग दाखवून आणले.”
\s5
\v 28 नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले.
\v 29 रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पळत गेला.
\v 30 जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या नाकातील नथ व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो मनुष्य मला असे म्हणाला,” असे आपल्या बहिणीचे, म्हणजे रिबकेचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला, आणि पाहतो तो, तो उंटांपाशी विहिरीजवळ उभा होता.
\s5
\v 31 आणि लाबान त्याला म्हणाला, “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही, आत या. तुम्ही बाहेर का उभे आहात? मी तुमच्यासाठी घर तयार केले आहे आणि उंटासाठीही जागा केली आहे.”
\v 32 तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले.
\s5
\v 33 त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.”
\v 34 तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
\v 35 परमेश्वर देवाने माझ्या धन्याला फार आशीर्वादित केले आहे आणि तो महान बनला आहे. त्याने त्याला मेंढरांचे कळप, गुरेढोरे, तसेच सोने, चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.
\s5
\v 36 सारा, ही माझ्या धन्याची बायको वृद्ध झाली तेव्हा तिच्यापासून माझ्या धन्याला मुलगा झाला, आणि त्याला त्याने आपले सर्वकाही दिले आहे.
\v 37 माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी बायको करून घेऊ नकोस.
\v 38 त्याऐवजी माझ्या बापाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू बायको मिळवून आण.
\s5
\v 39 मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?
\v 40 परंतु तो मला म्हणाला, ‘ज्या परमेश्वरासमोर मी चालत आहे, तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुझा मार्ग यशस्वी करील, आणि तू माझ्या नातलगांतून व माझ्या बापाच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी बायको आणशील.
\v 41 परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.
\s5
\v 42 “आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर -
\v 43 मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे - आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, ‘मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,
\v 44 तेव्हा जी मला म्हणेल, ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी काढते’ तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी परमेश्वराने निवडलेली आहे असे मी समजेन.
\s5
\v 45 मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, ‘मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.
\v 46 तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, ‘प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
\s5
\v 47 मग मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस? ती म्हणाली, ‘नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी, तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या.
\v 48 नंतर मी मस्तक लववून माझा धनी याचा देव परमेश्वर याची स्तुती केली, कारण त्याने मला माझ्या धन्याच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला.
\s5
\v 49 आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा. यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.”
\s5
\v 50 मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हांला बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही.
\v 51 पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको व्हावी.”
\s5
\v 52 जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत वाकून परमेश्वर देवाला नमन केले.
\v 53 सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या.
\s5
\v 54 मग त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी त्यांचे खाणे व पिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आता मला माझ्या धन्याकडे पाठवा.”
\v 55 तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.”
\s5
\v 56 परंतु तो त्यांना म्हणाला, “मला थांबवून घेऊ नका, कारण परमेश्वराने माझा मार्ग यशस्वी केला आहे, मला माझ्या मार्गाने पाठवा जेणेकरून मी माझ्या धन्याकडे जाईन.”
\v 57 ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून तिला विचारतो.”
\v 58 मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या माणसाबरोबर तू जातेस काय?” तिने उत्तर दिले, “मी जाते.”
\s5
\v 59 मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली.
\v 60 त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करण्याऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.”
\s5
\v 61 मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या माणसाच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला.
\v 62 इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता.
\s5
\v 63 इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्याला उंट येताना दिसले.
\v 64 रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली.
\v 65 ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?” सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतःला झाकून घेतले.
\s5
\v 66 सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले.
\v 67 मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्वीकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला.
\s5
\c 25
\p
\v 1 अब्राहामाने दुसरी बायको केली; तिचे नाव कटूरा होते.
\v 2 तिच्यापासून त्याला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.
\v 3 यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.
\v 4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.
\s5
\v 5 अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.
\v 6 अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले.
\s5
\v 7 अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.
\v 8 अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांना जाऊन मिळाला.
\s5
\v 9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.
\v 10 हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची बायको सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.
\v 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता.
\s5
\v 12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही :
\s5
\v 13 इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे : इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायाथ, केदार, अदबील, मिबसाम,
\v 14 मिश्मा, दूमा, मस्सा,
\v 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.
\v 16 ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.
\s5
\v 17 ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.
\v 18 त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते.
\p
\p
\s5
\v 19 अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना ह्या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.
\v 20 इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला बायको करून घेतले.
\s5
\v 21 इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची बायको गरोदर राहिली.
\v 22 मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वराला याबद्दल विचारायला गेली.
\s5
\v 23 परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”
\s5
\v 24 जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.
\v 25 आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
\v 26 त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या बायकोने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
\s5
\v 27 ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.
\v 28 एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
\s5
\v 29 याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.
\v 30 एसाव याकोबाला म्हणला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खावयला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.
\s5
\v 31 याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”
\v 32 एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. ह्या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”
\v 33 याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
\v 34 याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
\s5
\c 26
\p
\v 1 अब्राहामाच्या दिवसांत जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरारात गेला.
\s5
\v 2 परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यातच राहा.
\v 3 या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
\s5
\v 4 मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.
\v 5 मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”
\s5
\v 6 म्हणून मग इसहाक गरारातच राहिला.
\v 7 जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या बायकोविषयी त्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी बायको आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.”
\v 8 इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या बायकोला रिबकेला प्रेमाने कुरवाळतआहे.
\s5
\v 9 अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी बायको आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाक त्याला म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.”
\v 10 अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या बायकोबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.”
\v 11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांना ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या माणसाला किंवा याच्या बायकोला हात लावेल त्याला खचित जिवे मारण्यात येईल.”
\s5
\v 12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.
\v 13 तो मनुष्य धनवान झाला आणि अधिकाधिक वाढत गेला आणि खूप थोर होईपर्यंत वाढत गेला.
\v 14 त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे व गुरेढोरे, मोठा कुटुंबकबिला होता. त्यावरून पलिष्टी त्याचा हेवा करू लागले;.
\s5
\v 15 म्हणून त्याच्या बापाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या.
\v 16 तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”
\v 17 म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला.
\s5
\v 18 अब्राहामाने आपल्या दिवसांत ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या बापाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली.
\s5
\v 19 जेव्हा इसहाकाच्या नोकरांनी एक विहीर खोऱ्यात खणली, तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला.
\v 20 गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडणे केली, ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” ते त्याच्याशी भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “एसेक” ठेवले.
\s5
\v 21 मग त्यांनी दुसरी विहीर खणली, आणि तिच्यावरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव “सितना” ठेवले.
\v 22 तो तेथून निघाला आणि त्याने आणखी एक विहीर खणली, परंतु तिच्यासाठी ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ ठेवले. आणि तो म्हणाला, “आता परमेश्वरने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे, आणि देशात आमची भरभराट होईल.”
\s5
\v 23 नंतर तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला.
\v 24 त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा बाप अब्राहाम याचा देव आहे. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि माझा सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझे वंशज बहुतपट करीन.”
\v 25 तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
\s5
\v 26 नंतर गराराहून अबीमलेख, त्याचा मित्र अहुज्जाथ व त्याच्या सैन्याचा सेनापती पीकोल हे त्याच्याकडे गेले.
\v 27 इसहाकाने त्यांना विचारले, “तुम्ही माझा द्वेष करता व मला तुम्ही आपणापासून दूर केलेत. तर आता तुम्ही माझ्याकडे का आलात?”
\s5
\v 28 आणि ते म्हणाले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्टपणे दिसून आले आहे. म्हणून आम्ही ठरवले आहे की, आपणांमध्ये म्हणजे आम्हामध्ये व तुझ्यामध्ये तह असावा. म्हणून तू आम्हाबरोबर करार कर,
\v 29 जसे आम्ही तुझी हानी केली नाही, आणि आम्ही तुझ्याशी चांगले वागलो आणि तुला शांतीने पाठवले, तशी तू आम्हाला हानी करू नको. खरोखर परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे.”
\s5
\v 30 तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली, त्यांनी आनंदाने खाणे पिणे केले.
\v 31 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एकमेकांशी शपथ वाहिली. नंतर इसहाकाने त्यांना रवाना केले आणि ते शांतीने त्याच्याजवळून गेले.
\s5
\v 32 त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहिरीविषयी त्याला सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस पाणी मिळाले आहे.”
\v 33 तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा म्हटले, आणि त्या नगराला अजूनही बैर शेबा नाव आहे.
\s5
\v 34 एसाव चाळीस वर्षांचा झाल्यावर त्याने हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नाव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नाव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी होती.
\v 35 त्यामुळे इसहाक व रिबका दुःखित झाले.
\s5
\c 27
\p
\v 1 जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?”
\v 2 तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही.
\s5
\v 3 म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.
\v 4 मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.”
\s5
\v 5 जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.
\v 6 रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला,
\v 7 माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.
\s5
\v 8 तर आता माझ्या मुला, मी तुला आज्ञा देते त्याप्रमाणे माझा शब्द पाळ.
\v 9 आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,
\v 10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.”
\s5
\v 11 परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ केसाळ मनुष्य आहे. मी गुळगुळीत मनुष्य आहे.
\v 12 कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.”
\s5
\v 13 त्याची आई त्याला म्हणाली, “माझ्या मुला, तुझ्यावरचा शाप माझ्यावर येवो. केवळ माझा शब्द पाळ आणि जा, माझ्याकडे ते घेऊन ये.”
\v 14 मग याकोब गेला आणि ती करडे आईकडे घेऊन आला. त्याच्या आईने त्यांचे त्याच्या बापाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार केले.
\s5
\v 15 रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले.
\v 16 तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले.
\v 17 तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.
\s5
\v 18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?”
\v 19 याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही मला सांगतिले तसे मी केले आहे. तेव्हा आता उठून बसा व तुमच्यासाठी शिकार करून आणलेले मांस खा म्हणजे मग तुम्ही मला आशीर्वाद द्याल.”
\s5
\v 20 इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.”
\v 21 इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.”
\s5
\v 22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्याला स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.”
\v 23 इसहाकाने त्याला ओळखले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला.
\s5
\v 24 तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” आणि तो म्हणाला, “मी आहे.”
\v 25 इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, आणि मी तू आणलेले हरणाचे ते मांस खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले. इसहाकाने ते खाल्ले आणि याकोबाने त्याच्यासाठी द्राक्षारसही दिला आणि तो प्याला.
\s5
\v 26 मग इसहाक त्याचा बाप त्याला म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.”
\v 27 मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. आणि त्याने त्याच्या कपड्यांचा वास घेतला; त्याने त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, पाहा ज्या शेताला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचा वास जसा येतो तसा माझ्या मुलाचा वास आहे.
\s5
\v 28 परमेश्वर तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षारस देईल.
\s5
\v 29 लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.
\s5
\v 30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला - तोच एसाव शिकारीहून आला.
\v 31 त्यानेही आपल्या बापाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या बापाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.”
\s5
\v 32 इसहाक त्याचा बाप त्याला म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”
\v 33 मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्याअगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्याला आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”
\s5
\v 34 जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.”
\v 35 इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.”
\s5
\v 36 एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्याला योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
\v 37 इसहाकाने उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्याला तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्याला मी धान्य व नवा द्राक्षारस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.”
\s5
\v 38 एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला!
\s5
\v 39 मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्याला म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.
\v 40 तुझ्या तरवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
\s5
\v 41 त्यानंतर आपल्या बापाने त्याला जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या बापाकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”
\v 42 रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्याला म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे.
\s5
\v 43 आता म्हणून माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा.
\v 44 तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा.
\v 45 तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्याला काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?”
\s5
\v 46 मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुलीकरून हेथाच्या लोकांतून बायको केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”
\s5
\c 28
\p
\v 1 इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला आज्ञा दिली, तू कनानी मुलगी बायको करून घेऊ नको.
\v 2 ऊठ, तू पदन अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला बायको करून घे.
\s5
\v 3 सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.
\v 4 तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”
\s5
\v 5 अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला.
\s5
\v 6 एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, व पदन अरामातून बायको करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हेदेखील पाहिले की, इसहाकाने त्याला आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली बायको करू नये.”
\v 7 एसावाने हे देखील पाहिले की, याकोबाने आपल्या बापाची आणि आईची आज्ञा मानली, आणि पदन अरामास गेला.
\s5
\v 8 एसावाने पाहिले की, आपला बाप इसहाक याला कनानी मुली पसंत नाहीत.
\v 9 म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आपल्या बायका होत्या त्यांच्याशिवाय अब्राहामाचा मुलगा इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण महलथ ही बायको करून घेतली.
\s5
\v 10 याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला.
\v 11 तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला.
\s5
\v 12 तेव्हा त्याला स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे. तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत.
\v 13 पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.
\s5
\v 14 तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पश्चिमेकडे, पूर्वेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.
\v 15 पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जेथे कोठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन.”
\s5
\v 16 मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते.”
\v 17 त्याला भीती वाटली आणि तो म्हणाला, “हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे.”
\s5
\v 18 याकोब मोठ्या पहाटे लवकर उठला आणि त्याने उशास घेतलेला धोंडा घेतला. त्याने तो स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर तेल ओतले.
\v 19 त्या ठिकाणाचे नाव लूज होते, परंतु त्याने त्याचे नाव बेथेल ठेवले.
\s5
\v 20 मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यात माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,
\v 21 आणि मी सुरक्षित माझ्या बापाच्या घरी परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल.
\v 22 मग मी हा जो धोंडा या ठिकाणी स्तंभ म्हणून उभा केला आहे तो पवित्र धोंडा होईल, तो देवाचे घर होईल. जे सर्व तू मला देशील, त्याचा दहावा भाग मी तुला खचित परत देईन.”
\s5
\c 29
\p
\v 1 नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला.
\v 2 त्याने पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. ह्या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.
\v 3 जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.
\s5
\v 4 याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”
\v 5 मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.”
\v 6 याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
\s5
\v 7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.”
\v 8 परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
\s5
\v 9 याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.
\v 10 जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.
\s5
\v 11 याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला.
\v 12 याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या बापाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.
\s5
\v 13 जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्याला भेटला. त्याला मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या.
\v 14 मग लाबान त्याला म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला.
\s5
\v 15 लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?”
\v 16 लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
\v 17 लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती.
\v 18 याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
\s5
\v 19 लाबान म्हणाला, “परक्या माणसाला देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.”
\v 20 म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसांसारखी वाटली.
\s5
\v 21 सात वर्षांनंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझी बायको द्या, माझा सेवेचा काळ संपला आहे - म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.”
\v 22 तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांना एकत्र केले आणि मेजवानी दिली.
\s5
\v 23 त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला
\v 24 लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.
\v 25 सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?”
\s5
\v 26 लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरिवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही.
\v 27 ह्या मुलीचा लग्न विधी सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”
\s5
\v 28 त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करून दिली;
\v 29 लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.
\v 30 तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.
\s5
\v 31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती.
\v 32 लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
\s5
\v 33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हासुद्धा मुलगा दिला आहे,” आणि ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले.
\v 34 लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले.
\s5
\v 35 त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुले होण्याचे थांबले.
\s5
\c 30
\p
\v 1 याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुले द्या, नाही तर मी मरेन.”
\v 2 याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुले होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”
\s5
\v 3 ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिची शय्यासोबत करा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”
\v 4 अशा रीतीने तिने त्याला आपली दासी बिल्हा बायको म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला.
\s5
\v 5 तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
\v 6 मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.
\s5
\v 7 राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
\v 8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले.
\s5
\v 9 जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला बायको म्हणून दिली.
\v 10 नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
\v 11 लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले.
\s5
\v 12 नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला.
\v 13 लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले.
\s5
\v 14 गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.”
\v 15 लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”
\s5
\v 16 संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्याला भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला.
\v 17 तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला.
\v 18 लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.
\s5
\v 19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला.
\v 20 लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा नवरा माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून ठेवले.
\v 21 त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले.
\s5
\v 22 मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली.
\v 23 ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.”
\v 24 तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”
\s5
\v 25 मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतःच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा.
\v 26 ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या बायका आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हाला माहीत आहे.”
\s5
\v 27 लाबान त्याला म्हणाला, “परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. जर तुझ्या दृष्टीने माझ्यावर तुझी कृपा असेल तर आता थांब.”
\v 28 नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.”
\s5
\v 29 याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हांला माहीत आहे.
\v 30 मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हांला आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू ?”
\s5
\v 31 म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन.
\v 32 परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यांतील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
\s5
\v 33 त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यात तुम्हांला माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.”
\v 34 लाबान म्हणाला, “मी मान्य करतो. तुझ्या शब्दाप्रमाणे कर.”
\s5
\v 35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;
\v 36 तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसांचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला.
\s5
\v 37 मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या.
\v 38 त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत.
\s5
\v 39 तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली.
\v 40 याकोब कळपातील इतर जनावरांतून ठिपकेदार, पांढऱ्या ठिपक्यांची व काळी करडे कोकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करून ठेवत असे.
\s5
\v 41 जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत.
\v 42 परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत.
\s5
\v 43 तो मनुष्य संपन्न झाला. त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.
\s5
\c 31
\p
\v 1 लाबानाचे मुलगे आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले ते म्हणाले, “जे आपल्या बापाचे त्यातून सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि जे आमच्या बापाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे.”
\v 2 याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
\v 3 परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या बापाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
\s5
\v 4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले,
\v 5 आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे.
\v 6 तुम्हांला माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे.
\s5
\v 7 तुमच्या बापाने मला फसवले आणि त्यानी माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्याला दिली नाही.
\v 8 जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,
\v 9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून गुरेढोरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत.
\s5
\v 10 एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.”
\v 11 देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, ‘याकोबा, मी म्हणालो, ‘काय आज्ञा आहे?
\s5
\v 12 तो म्हणाला, ‘आपले डोळे वर करून पाहा, फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे.
\v 13 बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”
\s5
\v 14 राहेल व लेआ यांनी त्याला उत्तर दिले आणि त्याला म्हणाल्या, “आमच्या बापाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही.
\v 15 आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हांला तुम्हाला विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत.
\v 16 देवाने ही सर्व संपत्ती आमच्या बापाकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हांला जे करावयास सांगितले आहे ते करा.”
\s5
\v 17 तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या बायकामुलांना उंटांवर बसवले.
\v 18 तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला.
\s5
\v 19 त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या बापाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
\v 20 याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्याला सांगितले नाही.
\v 21 याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
\s5
\v 22 तीन दिवसांनंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले.
\v 23 तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसांनंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्याला याकोब सापडला.
\s5
\v 24 त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.”
\v 25 लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला.
\s5
\v 26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले ? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?
\v 27 तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते.
\v 28 तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची की त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे.
\s5
\v 29 खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे ,परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.
\v 30 तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?”
\s5
\v 31 याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल.
\v 32 ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.
\s5
\v 33 लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्याला त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला.
\s5
\v 34 राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत.
\v 35 ती आपल्या बापाला म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत.
\s5
\v 36 मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्याला म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात?
\v 37 माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हाला तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हांला तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील.
\s5
\v 38 मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मेलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही.
\v 39 जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता.
\v 40 दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.
\s5
\v 41 वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो. पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. आणि दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला.
\v 42 परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाक ज्याचे मी भय धरतो तो देव, तो माझ्या संगती होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हांला धमकावले.
\s5
\v 43 लाबानाने उत्तर दिले आणि याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या मुली आहेत आणि नातवंडे ही माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी ह्या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो ?
\v 44 म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.”
\s5
\v 45 तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन समारकस्तंभ उभा केला.
\v 46 याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.
\v 47 लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले.
\s5
\v 48 लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले.
\v 49 मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले.
\v 50 जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या बायका करून घेशील. तर पाहा, जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्ष आहे.
\s5
\v 51 लाबान याकोबास म्हणाला, “ह्या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे.
\v 52 ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्व ही रास ओलांडून कधीही येऊ नये.
\v 53 अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या बापांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली.
\s5
\v 54 मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली.
\v 55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.
\s5
\c 32
\p
\v 1 याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्याला देवाचे दूत भेटले.
\v 2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाइम ठेवले.
\s5
\v 3 याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेइर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोप्ये पाठवले.
\v 4 त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो.
\v 5 माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’”
\s5
\v 6 निरोप्ये याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्याला भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”
\v 7 तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.
\v 8 तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.”
\s5
\v 9 याकोब म्हणाला, “माझा बाप अब्राहाम याच्या देवा, आणि माझा बाप इसहाक यांच्या देवा, परमेश्वर देवा, तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस. तसेच तू माझी भरभराट केलीस,
\v 10 तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्याला मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.
\s5
\v 11 कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते.
\v 12 परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येत नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’”
\s5
\v 13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली.
\v 14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
\v 15 तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली.
\v 16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.”
\s5
\v 17 याकोबाने जनावरांच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?
\v 18 तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’”
\s5
\v 19 याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हांला जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.
\v 20 तुम्ही असेही म्हणावे की, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’” त्याने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसावाचा राग शांत होईल. त्यानंतर जेव्हा मी त्याला भेटेन, तेव्हा कदाचित तो माझा स्वीकार करील.”
\v 21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वतः त्या रात्री तळावर मागेच राहिला.
\s5
\v 22 मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला.
\v 23 अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले.
\s5
\v 24 याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली.
\v 25 जेव्हा त्या माणसाने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला.
\v 26 मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.”
\s5
\v 27 तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?” आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
\v 28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व माणसांशी झगडून विजय मिळवला आहेस.”
\s5
\v 29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
\v 30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.”
\s5
\v 31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता.
\v 32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.
\s5
\c 33
\p
\v 1 याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्याला एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.
\v 2 याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वांत शेवटी ठेवले.
\v 3 याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.
\s5
\v 4 एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि त्याला आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
\v 5 एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?” याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.”
\s5
\v 6 मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले.
\v 7 त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्याला खाली वाकून नमन केले.
\v 8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.”
\s5
\v 9 एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.”
\v 10 याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्वीकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्वीकार केला.
\v 11 मी विनंती करतो की, मी आणलेल्या भेटीचा स्वीकार करा. कारण देवाने माझे कल्याण केले आहे, आणि माझ्यापाशी भरपूर आहे.” याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली आणि मग एसावाने त्यांचा स्वीकार केला.
\s5
\v 12 मग एसाव म्हणाला, “आता आपण आपल्या वाटेस लागू. मीही तुझ्या पुढे चालतो.”
\v 13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले लहान आहेत हे आपणाला माहीत आहे, आणि माझी मेंढरे व गुरेढोरे यांच्या पिल्लांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांची एका दिवशी अधिक दौड केली, तर सगळी जनावरे मरून जातील.
\v 14 तर माझे धनी आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”
\s5
\v 15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.”
\v 16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला.
\v 17 याकोब प्रवास करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.
\s5
\v 18 याकोबाने पदन आरामपासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेमला सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला.
\v 19 नंतर त्याने जेथे आपला तंबू ठोकला होता ती जमीन शखेमाचा बाप हमोर याच्या लोकांकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतली.
\v 20 त्याने तेथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव ‘एल एलोहे इस्राएल’ (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले.
\s5
\c 34
\p
\v 1 याकोबापासून लेआस झालेली मुलगी दीना ही त्या देशातील मुलींना भेटण्यास बाहेर गेली.
\v 2 तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.
\v 3 याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला.
\s5
\v 4 शखेमाने आपला बाप हमोरा ह्याला म्हटले, “ही मुलगी मला बायको करून द्या.”
\v 5 आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला.
\s5
\v 6 शखेमाचा बाप हमोर बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.
\v 7 जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते.
\s5
\v 8 हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हांला विनंती करतो की ती त्याला बायको म्हणून द्या.
\v 9 आमच्या बरोबर सोयरीक करा, तुमच्या मुली आम्हांला द्या, आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या.
\v 10 तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि हा देश राहण्यास व व्यापार करण्यास तुमच्यापुढे मोकळा असेल, आणि त्यात मालमत्ता घ्या.”
\s5
\v 11 शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.
\v 12 माझ्याकडे वधूबद्दल मोठी किंमत मागा, जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हांला देईन, परंतु ही मुलगी मला बायको म्हणून द्या.”
\v 13 त्यांची बहीण दीनाला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले.
\s5
\v 14 ते त्याला म्हणाले, “ज्याची अद्याप सुंता झालेली अशा माणसाला आम्ही आमची बहीण देऊ शकत नाही; त्यामुळे आम्हांला कलंक लागेल.
\v 15 पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ : तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच
\v 16 आम्ही आमच्या मुली तुम्हांला देऊ व तुमच्या मुली आम्ही करू आणि आम्ही तुम्हामध्ये राहू आणि आपण सर्व एक लोक होऊ.
\v 17 पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.”
\s5
\v 18 त्यांच्या शब्दाने हमोर व शखेम यांना फार आनंद झाला.
\v 19 त्यांनी जे सांगितले होते ते करण्यास त्या तरुणाने उशीर केला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते, आणि तो त्यांच्या बापाच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता.
\s5
\v 20 हमोर व शखेम त्या नगराच्या वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले, ते म्हणाले,
\v 21 “ही माणसे आपल्याशी शांतीने वागतात, म्हणून त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे आणि त्यामध्ये व्यापार करू द्यावा. खरोखरच, त्यांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या मुली आपण बायका करून घेऊ, आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.
\s5
\v 22 फक्त एकाच अटीवर ते लोक आपल्यासोबत राहायला आणि आपल्यासोबत एक व्हायला तयार आहेत : ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी त्या लोकांप्रमाणे सुंता करून घेण्याचे मान्य केले पाहिजे.
\v 23 जर हे आपण करू तर मग त्यांची सर्व शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपलीच होणार नाहीत काय? म्हणून आपण त्यांच्याशी सहमत होऊ, आणि मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करून राहतील.”
\s5
\v 24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली.
\v 25 तीन दिवसांनंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तरवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले.
\v 26 त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले.
\s5
\v 27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.
\v 28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरांतील व शेतांतील सर्व वस्तू लुटल्या.
\v 29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या बायका व मुलेबाळेदेखील घेतली.
\s5
\v 30 परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील. आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्व लोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”
\v 31 परंतु शिमोन आणि लेवी म्हणाले, “शखेमाने आमच्या बहिणीशी वेश्येशी वागतात तसे वागावे काय?”
\s5
\c 35
\p
\v 1 देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल येथे जाऊन राहा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
\v 2 तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
\v 3 नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्याच्यासाठी मी वेदी बांधीन.”
\s5
\v 4 तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या.
\v 5 ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.
\s5
\v 6 अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.
\v 7 त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.
\v 8 रिबकेची दाई दबोरा ह्या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले.
\s5
\v 9 याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले आणि त्याला आशीर्वाद दिला.
\v 10 देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.
\s5
\v 11 देव त्याला म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.
\v 12 मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
\v 13 मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.
\s5
\v 14 मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले.
\v 15 जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
\s5
\v 16 मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते इफ्राथापसून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.
\v 17 राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”
\v 18 त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले.
\v 19 राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
\v 20 आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.
\s5
\v 21 त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला.
\v 22 इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा मुलगे होते.
\s5
\v 23 त्याला लेआपासून झालेले मुलगे : याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
\v 24 त्याला राहेलपासून झालेले मुलगे : योसेफ व बन्यामीन.
\v 25 त्याला राहेलीची दासी बिल्हापासून झालेले मुलगे : दान व नफताली.
\s5
\v 26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर. हे सर्व याकोबाचे मुलगे जे त्याला पदन अरामात झाले.
\v 27 याकोब मग किर्याथ अरबा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
\s5
\v 28 इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
\v 29 इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला पुरले.
\s5
\c 36
\p
\v 1 एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,
\v 2 एसावाने कनानी मुलींतून बायका करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
\v 3 आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
\s5
\v 4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.
\v 5 आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे त्याला कनान देशात झाले.
\s5
\v 6 एसाव आपल्या बायका, आपले मुलगे, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
\v 7 कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यात त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
\v 8 एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
\s5
\v 9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ :
\v 10 एसावाच्या मुलांची नावे : एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रगुवेल.
\v 11 अलीपाजचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
\v 12 अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची बायको अदा हिची नातवंडे होती.
\s5
\v 13 रगुवेलाचे हे मुलगे होते : नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची बायको बासमथ हिची नातवंडे होती.
\v 14 सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
\s5
\v 15 एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे : तेमान, ओमार, सपो, कनाज,
\v 16 कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
\s5
\v 17 एसावाचा मुलगा रगुवेल याचे मुलगे हे : सरदार नाहथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
\v 18 एसावाची बायको अहलीबामा हिचे मुलगे : यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
\v 19 हे एसावाचे मुलगे होते, आणि हे त्यांचे वंश होते.
\s5
\v 20 त्या देशात सेईर नावाच्या होरी माणसाचे मुलगे हे : लोटन, शोबाल, सिबोन, अना,
\v 21 दीशोन, एसर व दिशान. हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
\v 22 लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
\s5
\v 23 शोबालाचे मुलगे : अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
\v 24 सिबोनाचे दोन मुलगे होते : अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
\s5
\v 25 अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
\v 26 दीशोनाचे हे मुलगे होते : हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.
\v 27 एसराला बिल्हान, जावान व अकान हे मुलगे होते.
\v 28 दीशानाला ऊस व अरान हे मुलगे होते.
\s5
\v 29 होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी : लोटान, शोबाल, सिबोन, अना,
\v 30 दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहाणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
\s5
\v 31 इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच :
\v 32 बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.
\v 33 बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.
\s5
\v 34 योबाब मेल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.
\v 35 हुशाम मेल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
\v 36 हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
\s5
\v 37 साम्ला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
\v 38 शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.
\v 39 बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
\s5
\v 40 एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे : तिम्ना, आल्वा, यतेथ,
\v 41 अहलीबामा, एला, पीनोन,
\v 42 कनाज, तेमान, मिब्सार,
\v 43 माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.
\s5
\c 37
\p
\v 1 याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला.
\v 2 याकोबासंबंधीच्या घटना ह्या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.
\s5
\v 3 इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता.
\v 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.
\s5
\v 5 योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
\v 6 तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका :
\s5
\v 7 पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.”
\v 8 हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
\s5
\v 9 नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले : सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
\v 10 त्याने आपल्या बापालाही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या बापाने त्याला दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे ? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?”
\v 11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या बापाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.
\s5
\v 12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले.
\v 13 याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्याला म्हणाला, “मी तयार आहे.”
\v 14 तो त्याला म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्याला हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला.
\s5
\v 15 योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा माणसाला दिसला. त्या माणसाने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?”
\v 16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे., ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?”
\v 17 तो माणूस म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्याला दोथानात सापडले.
\s5
\v 18 त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्याला ठार मारण्याचे ठरवले.
\v 19 त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे.
\v 20 आता चला, आपण त्याला ठार मारून टाकू आणि त्याला एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्याला कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.”
\s5
\v 21 रऊबेनाने ते ऐकले आणि त्याला त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्याला ठार मारू नये.”
\v 22 रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्याला रानातल्या ह्या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता.
\s5
\v 23 योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला.
\v 24 नंतर त्यांनी त्याला एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यात पाणी नव्हते.
\s5
\v 25 ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहित गिलादाहून येत होता. ते खाली मिसराकडे चालले होते.
\v 26 तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?
\s5
\v 27 चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले.
\v 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.
\s5
\v 29 रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यात त्याला योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली.
\v 30 तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे ? आणि मी, आता मी कोठे जाऊ?”
\s5
\v 31 त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला.
\v 32 नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.”
\v 33 याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यात संशय नाही.”
\s5
\v 34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला.
\v 35 याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला.
\v 36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.
\s5
\c 38
\p
\v 1 त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हीरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला.
\v 2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एक कनानी माणसाची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.
\s5
\v 3 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.
\v 4 त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.
\v 5 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्याला जन्म दिला होता तेव्हा ती कजीब येथे राहात होती.
\s5
\v 6 यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी बायको शोधली. तिचे नाव तामार होते.
\v 7 परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्याला ठार मारले.
\s5
\v 8 मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या बायकोवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.”
\v 9 ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या बायकोशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्याला त्याच्या भावासाठी मूल होऊ नये.
\v 10 त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते, म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले.
\s5
\v 11 मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या बापाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.
\s5
\v 12 बऱ्याच काळानंतर यहूदाची बायको, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला.
\v 13 तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”
\v 14 तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईमच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची बायको करून दिले नाही.
\s5
\v 15 यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.
\v 16 तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”
\s5
\v 17 यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?”
\v 18 यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.
\s5
\v 19 ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.
\v 20 यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या बाईला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्याला ती सापडली नाही.
\s5
\v 21 मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांना विचारले, “येथे ह्या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
\v 22 तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहाणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’”
\v 23 यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.”
\s5
\v 24 या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”
\v 25 जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या माणसाच्या मालकीच्या ह्या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.”
\v 26 यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती बायको म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही.
\s5
\v 27 तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती.
\v 28 प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”
\s5
\v 29 परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.
\v 30 त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले.
\s5
\c 39
\p
\v 1 योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्याला इश्माएली लोकांकडून विकत घेतले.
\v 2 परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे.
\s5
\v 3 परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्याला यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले.
\v 4 योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले.
\s5
\v 5 तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता.
\v 6 पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता.
\s5
\v 7 काही काळानंतर त्याच्या धन्याच्या बायकोला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणली, “माझ्याबरोबर प्रेम कर.”
\v 8 परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या बायकोला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो ह्याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.
\v 9 या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची बायको आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरुद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?”
\s5
\v 10 ती दररोज योसफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला.
\v 11 एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते.
\v 12 तिने त्याचे वस्त्र धरून त्याला म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.
\s5
\v 13 तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले.
\v 14 आणि तिने हाक मारून तिच्या घरातील माणसांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले.
\v 15 मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.”
\s5
\v 16 तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळ ठेवले.
\v 17 नंतर तिने त्याला सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
\v 18 परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
\s5
\v 19 आणि असे झाले की, त्याच्या धन्याने बायकोचे बोलणे ऐकले, ती त्याला म्हणाली की, “तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले,” तो राग खूप संतापला.
\v 20 योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.
\s5
\v 21 परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्याला कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.
\v 22 त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता.
\v 23 तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी, त्यात परमेश्वर देव त्याला यश देई.
\s5
\c 40
\p
\v 1 या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षारस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.
\v 2 फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.
\v 3 आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
\s5
\v 4 तेव्हा पहारेकऱ्याच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
\v 5 मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
\s5
\v 6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्याला दुःखी असलेले दिसले.
\v 7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”
\v 8 ते त्याला म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
\s5
\v 9 तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.
\v 10 द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्याला फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.
\v 11 फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
\s5
\v 12 योसेफ त्याला म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.
\v 13 तीन दिवसांनी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
\s5
\v 14 परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला ह्या तुरुंगातून बाहेर काढ.
\v 15 कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात राहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”
\s5
\v 16 स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
\v 17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
\s5
\v 18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.
\v 19 तीन दिवसांत फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
\s5
\v 20 तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
\v 21 त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
\v 22 परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिले.
\v 23 पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्याला त्याचा विसर पडला.
\s5
\c 41
\p
\v 1 साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
\v 2 तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या.
\v 3 त्यानंतर आणखी सात रोड व अंगाने कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या.
\s5
\v 4 आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला.
\v 5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यात त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.
\v 6 त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.
\s5
\v 7 नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले.
\v 8 दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसरातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.
\s5
\v 9 तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे.
\v 10 फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते.
\v 11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली.
\s5
\v 12 तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.
\v 13 आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.”
\s5
\v 14 मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला.
\v 15 मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
\v 16 योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
\s5
\v 17 मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
\v 18 तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.
\s5
\v 19 त्यानंतर पाहा, सात रोड व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या.
\v 20 त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.
\v 21 तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीइतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
\s5
\v 22 त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,
\v 23 मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळयांमुळे करपलेली सात कणसे आली.
\v 24 बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.
\s5
\v 25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे.
\v 26 त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत.
\s5
\v 27 त्या दुसऱ्या सात रोडक्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत.
\v 28 जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे.
\v 29 पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल.
\s5
\v 30 परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
\v 31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांना विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल.
\v 32 तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
\s5
\v 33 तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्याला सर्व मिसर देशावर नेमावे.
\v 34 फारोने हे करावे : देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा.
\s5
\v 35 अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यांत सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी.
\v 36 येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षांत देशाचा नाश होणार नाही.”
\s5
\v 37 हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला.
\v 38 फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?”
\s5
\v 39 तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही.
\v 40 तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
\v 41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.”
\s5
\v 42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
\v 43 नंतर त्याने त्याला आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्याला सर्व देशावर नेमले.
\s5
\v 44 फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो आहे, आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही.”
\v 45 फारोने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओनचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.
\s5
\v 46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली.
\v 47 सुकाळाच्या सात वर्षांत सर्व देशभर भरपूर पीक आले.
\s5
\v 48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षांत अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले.
\v 49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की, त्याने मोजणे सोडले कारण ते मोजमाप करता येत नव्हते.
\s5
\v 50 दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला, आसनथ जी ओनचा याजक पोटीफरा याची मुलगी तिच्या पोटी दोन मुलगे झाले.
\v 51 योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले.कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या बापाच्या घराचा विसर पडू दिला.”
\v 52 त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, “माझ्या दुःखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतींत सफल केले.”
\s5
\v 53 मिसरमध्ये असलेली भरपुरीची, सुबत्तेची सात वर्षे संपली.
\v 54 सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते.
\s5
\v 55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.”
\v 56 संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांना धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता.
\v 57 सर्व पृथ्वीवरील देशांतून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता.
\s5
\c 42
\p
\v 1 मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?
\v 2 इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”
\v 3 तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले.
\v 4 याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्याला काही अपाय होईल.”
\s5
\v 5 कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते.
\v 6 त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांना धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले.
\s5
\v 7 योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”
\v 8 योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.
\s5
\v 9 आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.”
\v 10 परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत.
\v 11 आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे मुलगे आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.”
\s5
\v 12 नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.”
\v 13 ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा मुलगे आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.”
\s5
\v 14 परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात.
\v 15 यावरून तुमची पारख होईल. फारोच्या जिविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हांला येथून जाता येणार नाही.
\v 16 तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात राहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.”
\v 17 मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.
\s5
\v 18 तीन दिवसांनंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा.
\v 19 तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हांतील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या माणसांकरिता धान्य घेऊन जा.
\v 20 मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरून तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हांला मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले.
\s5
\v 21 ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”
\v 22 मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरुद्ध पाप करू नका, परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.”
\s5
\v 23 योसेफ दुभाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही.
\v 24 म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्याला बांधले.
\v 25 मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास सांगितले, तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला पैसा ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास सांगितले, आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास सेवकांना सांगतिले. त्यांच्यासाठी तसे करण्यात आले.
\s5
\v 26 तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले.
\v 27 ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेले पैसे त्याला त्या गोणीत आढळले.
\v 28 तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.”
\s5
\v 29 ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
\v 30 ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला. आम्ही हेर आहोत असे त्याला वाटले.
\v 31 परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक माणसे आहोत असे त्याला सांगितले.
\v 32 आम्ही त्याला सांगितले की, ‘आम्ही बारा भाऊ एका माणसाचे मुलगे आहोत. आमच्यातला एक जिवंत नाही, आणि तसेच धाकटा भाऊ कनान देशात आज आमच्या बापाजवळच असतो.
\s5
\v 33 तेव्हा त्या देशाचा अधिकारी आम्हांला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे. तो असा की तुम्हांतील एका भावास येथे माझ्यापाशी ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील माणसांसाठी धान्य घेऊन जा.
\v 34 आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. मग तुम्ही खरेच प्रामाणिक माणसे आहात हे मला पटेल. तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि तुम्ही देशात व्यापार कराल.’”
\s5
\v 35 मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले. तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैशाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.
\v 36 याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ नाही. शिमोनही गेला. आणि आता बन्यामिनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे.”
\s5
\v 37 मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “मी जर बन्यामिनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारून टाका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर बन्यामिनाला परत तुमच्याकडे घेऊन येईन.”
\v 38 परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामिनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही. त्याचा भाऊ मरण पावला आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या वाटेने तुम्ही जाता तीमध्ये त्याला काही अपाय झाला तर माझे पिकलेले केस अतिशय दुःखाने कबरेत पाठवाल.”
\s5
\c 43
\p
\v 1 देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता.
\v 2 असे झाले की, त्यांनी मिसरहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”
\s5
\v 3 परंतु यहूदा त्याला म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.
\v 4 तेव्हा तुम्ही भावाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही खाली जाऊन धान्य विकत आणू.
\v 5 पण तुम्ही त्याला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”
\s5
\v 6 इस्राएल म्हणाला, “पण तुम्हांला आणखी एक भाऊ आहे असे त्या माणसाला सांगून तुम्ही माझे असे वाईट का केले?”
\v 7 ते म्हणाले, “त्या माणसाने आमच्याविषयी व आपल्या परिवाराविषयी बारकाईने विचारपूस केली. त्याने आम्हांला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा आणखी दुसरा भाऊ आहे का? आम्ही तर त्याच्या ह्या प्रश्नाप्रमाणे त्याला उत्तरे दिली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे सांगेल, हे आम्हांला कुठे माहीत होते?”
\s5
\v 8 मग यहूदा आपल्या बाप इस्राएल याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणजे आम्ही जाऊ. मग आपण म्हणजे आम्ही, तुम्ही व आपली मुलेबाळे जिवंत राहू, मरणार नाही.
\v 9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्याला परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईल.
\v 10 जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
\s5
\v 11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्याला बक्षीस म्हणून घेऊन जा.”
\v 12 या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल.
\s5
\v 13 तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या माणसाकडे परत जा.
\v 14 “त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे राहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हांला साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”
\v 15 अशा रीतीने त्या माणसांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले.
\s5
\v 16 त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
\v 17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला योसेफाने सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
\s5
\v 18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.”
\v 19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले आणि घराच्या दरवाजाजवळ ते त्याच्याशी बोलू लागले.
\v 20 ते म्हणाले, “धनी, मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.
\s5
\v 21 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक माणसाचा पैसा ज्याच्या पोत्यात पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हांला परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत.
\v 22 आणि आता या वेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत, आमच्या गोणीत पैसे कोणी ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
\v 23 परंतु कारभाऱ्याने उत्तर दिले, “तुम्हांला शांती असो, भिऊ नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात ते पैसे ठेवले असतील. मला तुमचे पैसे मिळाले आहेत.” नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.
\s5
\v 24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.
\v 25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहोत हे त्या भावांनी ऐकले होते. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत तयारी करून त्याला देण्याच्या भेटी तयार केल्या.
\s5
\v 26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्याला भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.
\v 27 मग योसेफाने ते सर्व बरे आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचा बाप, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले होते, तो बरा आहे का? तो अजून जिवंत आहेत का?”
\s5
\v 28 त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले.
\v 29 मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.”
\s5
\v 30 मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्याला वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला.
\v 31 मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.”
\s5
\v 32 योसेफाला त्यांनी वेगळे व त्याच्या भावांना वेगळे वाढले. मिसरी लोक त्याच्यासोबत तेथे वेगळे असे जेवले, कारण इब्री लोकांबरोबर मिसरी लोक जेवण जेवत नसत, कारण मिसऱ्यांना ते तिरस्कारणीय वाटत असे.
\v 33 त्याच्या भावांना त्याच्यासमोर बसवले, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार थोरल्या भावाला प्रथम बसवले, आणि इतरांस त्यांच्या वयांप्रमाणे बसवल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
\v 34 योसेफाने त्याच्या पुढील पक्वान्नामधून वाटे काढून त्यांना दिले, पण त्याने बन्यामिनाला इतरांपेक्षा पाचपट अधिक वाढले. ते सर्व भरपूर जेवले व मनमुराद पिऊन आनंदित झाले.
\s5
\c 44
\p
\v 1 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव.
\v 2 सर्वांत धाकट्याच्या पोत्यात धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.
\s5
\v 3 दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसह त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले.
\v 4 ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला?
\v 5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’”
\s5
\v 6 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे तो त्यांच्याशी बोलला.
\v 7 परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही.
\s5
\v 8 पाहा, मागे आमच्या पोत्यात मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार?
\v 9 या उपर आम्हांपैकी कोणाच्या पोत्यात तुम्हांला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.”
\v 10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.”
\s5
\v 11 नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली.
\v 12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्याला बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला.
\v 13 तेव्हा त्या भावांना भयंकर दुःख झाले अतिदुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
\s5
\v 14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले.
\v 15 योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हांला माहीत नाही का?”
\s5
\v 16 यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.”
\v 17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
\s5
\v 18 मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात.
\v 19 माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे का?
\s5
\v 20 आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे तसेच बापाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे. आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे. आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो.
\v 21 आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्याला माझ्याकडे घेऊन या. मला त्याला पाहावयाचे आहे.
\v 22 आणि आम्ही आपणांस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल.
\s5
\v 23 परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.
\v 24 मग असे झाले की, आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्याला सांगितले.
\v 25 आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.
\v 26 आणि आम्ही म्हणालो, आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्याखेरीज तुम्हांला माझे तोंड पुन्हा पाहता येणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.
\s5
\v 27 मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हांला माहीत आहे की, माझ्या बायकोच्या पोटी मला दोन मुलगे झाले.
\v 28 आणि त्यातला एक माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मी म्हणालो, खरोखर त्याला वन्य पशूने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्याला पाहिले नाही.
\v 29 आणि आता माझ्या ह्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला कारण व्हाल.
\s5
\v 30 म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे,
\v 31 असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील.
\v 32 ह्या मुलाबद्दल मी माझ्या बापास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्याला तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.
\s5
\v 33 म्हणून आता, मी तुम्हांला विनंती करतो, मला, तुमच्या ह्या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या.
\v 34 माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.”
\s5
\c 45
\p
\v 1 आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांना येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
\v 2 तो मोठ्याने रडला. मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
\v 3 मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्याला काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
\s5
\v 4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरच्या लोकांना विकले.
\v 5 आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
\v 6 हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
\s5
\v 7 देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष राहावे आणि तुम्हांला जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
\v 8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”
\s5
\v 9 योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्याला सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हांला संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.
\v 10 तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुझे आहे ते माझ्याजवळ राहील.
\v 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षांत मी तुम्हांला सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हांवर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.
\s5
\v 12 पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.
\v 13 मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
\s5
\v 14 मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.
\v 15 मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
\s5
\v 16 योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.
\v 17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हांला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा.
\v 18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हांला राहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.
\s5
\v 19 तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.
\v 20 तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”
\s5
\v 21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.
\v 22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
\v 23 त्याने आपल्या बापासाठीही या देणग्या पाठवल्या : धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या बापाच्या प्रवासासाठी पाठवल्या.
\s5
\v 24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
\v 25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपल्या बापाकडे गेले.
\v 26 त्यांनी आपल्या बापास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.
\s5
\v 27 परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्याला मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.
\v 28 इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन भेटेन.”
\s5
\c 46
\p
\v 1 इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली.
\v 2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”
\v 3 तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसरास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन.
\v 4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
\s5
\v 5 मग याकोब बैरशेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.
\v 6 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले.
\v 7 त्याने आपल्यासोबत आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.
\s5
\v 8 इस्राएलाचे जे मुलगे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी : याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;
\v 9 रऊबेनाचे मुलगे हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कार्मी;
\v 10 शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल;
\v 11 लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी;
\s5
\v 12 यहूदाचे मुलगे एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल);
\v 13 इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, लोब व शिम्रोन;
\v 14 जबुलूनाचे मुलगे सेरेद, एलोन व याहलेल
\v 15 (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुलगे व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते);
\s5
\v 16 गादाचे मुलगे सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एर, अरोदी, आणि अरेली;
\v 17 आशेराचे मुलगे इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे मुलगे हेबर व मालकीएल
\v 18 (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. ती एकंदर सोळा माणसे होती);
\s5
\v 19 याकोबाची पत्नी राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन हे होते;
\v 20 (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले);
\v 21 बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
\v 22 (याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते);
\s5
\v 23 हुशीम हा दान याचा मुलगा होता;
\v 24 नफतालीचे मुलगे यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
\v 25 (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे मुलगे. हे सर्व मिळून सात जण होते).
\s5
\v 26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती.
\v 27 योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
\s5
\v 28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
\v 29 योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला.
\v 30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
\s5
\v 31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत.
\v 32 माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.
\s5
\v 33 जेव्हा फारो तुम्हांला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?
\v 34 तेंव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते. मग फारो तुम्हांला गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत.”
\s5
\c 47
\p
\v 1 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.”
\v 2 त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली.
\s5
\v 3 फारो त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.”
\v 4 ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही ह्या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
\s5
\v 5 मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत.
\v 6 त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.”
\s5
\v 7 मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.
\v 8 मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”
\v 9 याकोबाने उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”
\v 10 याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.
\s5
\v 11 योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना राहावयास दिली.
\v 12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली.
\s5
\v 13 त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.
\v 14 योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला.
\s5
\v 15 काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हाला अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”
\v 16 परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हांला धान्य देईन.”
\v 17 तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले.
\s5
\v 18 परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही.
\v 19 तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हाला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.”
\s5
\v 20 तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता.
\v 21 मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना त्याने फारोचे गुलाम केले.
\v 22 योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही.
\s5
\v 23 तेव्हा योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हांला तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हांला बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.
\v 24 परंतु हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पाचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे. बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्यासाठी घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.”
\s5
\v 25 लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.”
\v 26 त्या वेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नाचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे. फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही.
\s5
\v 27 इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.
\v 28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.
\s5
\v 29 इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्याला म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको.
\v 30 जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत निजेन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.”
\v 31 मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.
\s5
\c 48
\p
\v 1 या गोष्टीनंतर त्याचा बाप आजारी असल्याचे कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.
\v 2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.
\s5
\v 3 मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
\v 4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.
\s5
\v 5 आणि आता, मी येथे मिसरला येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन मुलगे, माझे आहेत. तुझे हे दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.
\v 6 त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील.
\v 7 परंतु पदम-अराम येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”
\s5
\v 8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?”
\v 9 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “हे माझे मुलगे आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
\v 10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
\s5
\v 11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
\v 12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते मुलगे इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्याला लवून नमन केले.
\v 13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
\s5
\v 14 परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले.
\v 15 इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,
\v 16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच ह्या मुलांना आशीर्वाद देवो. आता ह्या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”
\s5
\v 17 आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्याला ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.
\v 18 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “ असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.”
\s5
\v 19 परंतु त्याचा बापाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
\v 20 त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हांला एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”
\s5
\v 21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हांला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.
\v 22 तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”
\s5
\c 49
\p
\v 1 त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हांला सांगतो.”
\q
\v 2 “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका,
\q तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.
\q
\s5
\v 3 रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस,
\q तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.
\q
\v 4 परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत.
\q कारण तू आपल्या बापाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.”
\q
\s5
\v 5 “शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत.
\q या दोन भावांना तरवारीने लढण्याची आवड आहे.
\q
\v 6 माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतु नको;
\q त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत.
\q त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली.
\q आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
\q
\s5
\v 7 त्यांचा राग शाप आहे, ते अती रागाने वेडे होतात.
\q तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन,
\q ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
\q
\s5
\v 8 यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील.
\q तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील.
\q तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.
\q
\s5
\v 9 यहूदा सिंहाचा छावा आहे.
\q माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे,
\q तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे.
\q त्याला उठवण्याचे धाडस कोण करील ?
\q
\s5
\v 10 शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही,
\q किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही.
\q राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.
\q
\s5
\v 11 तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस,
\q आणि त्याचे शिंगरू खास द्राक्षवेलीस बांधेल.
\q त्याने त्याचे वस्त्र द्राक्षारसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे.
\q
\v 12 त्याचे डोळे द्राक्षारसापेक्षा अधिक लालबुंद होतील.
\q त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील.
\q
\s5
\v 13 जबुलून समुद्रकिनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल.
\q त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.”
\q2
\s5
\v 14 “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे.
\q
\v 15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,
\q आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले
\q आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.
\q
\s5
\v 16 इस्राएलाचा एक वंश ह्या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.
\q
\v 17 तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,
\q वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल.
\q तो घोड्याच्या टाचेला दंश करील.
\q त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.
\q
\v 18 हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहात आहे.
\q
\s5
\v 19 गाद - लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल,
\q परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.
\q
\v 20 आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ तो पुरवील.
\q2
\v 21 नफताली मोकळ्या सुटलेल्या हरिणीप्रमाणे आहे.
\q त्याचे बोलणे गोड असेल.
\q
\s5
\v 22 योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे.
\q तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत.
\q
\v 23 तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला.
\q आणि त्याला तीर मारले व त्याला त्रास दिला.
\q
\s5
\v 24 तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील,
\q आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव,
\q मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते.
\q
\s5
\v 25 कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,
\q आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद,
\q खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो,
\q तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.
\q
\s5
\v 26 तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या प्राचीन पर्वतांपेक्षा मोठे होतील
\q अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील.
\q ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र
\q त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील.
\p
\s5
\v 27 बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”
\s5
\v 28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या बापाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.
\v 29 मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,
\v 30 ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.
\s5
\v 31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची बायको रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
\v 32 ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”
\v 33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर त्याने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.
\s5
\c 50
\p
\v 1 त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली.
\v 2 योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या बापाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले.
\v 3 त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.
\s5
\v 4 सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा,
\v 5 ‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, ‘पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर. तेव्हा कृपा करून माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईल.’”
\v 6 फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्याला पुरून ये.”
\s5
\v 7 तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले.
\v 8 आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.
\v 9 तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली.
\s5
\v 10 ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या बापाकरता सात दिवस शोक केला.
\v 11 कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे.
\s5
\v 12 अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले;
\v 13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले.
\v 14 आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्वसमुदाय मिसरला माघारी गेला.
\s5
\v 15 याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.”
\v 16 तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली,
\v 17 तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो. तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला.
\s5
\v 18 योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.”
\v 19 मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय?
\v 20 तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहात आहात.
\v 21 तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.
\s5
\v 22 योसेफ आपल्या बापाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला.
\v 23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली.
\s5
\v 24 योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हांला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”
\v 25 मग योसेफाने इस्राएल लोकांना शपथ घ्यायला लावली. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हांला येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.”
\v 26 योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसरमध्ये शवपेटीत ठेवले.

1860
02-EXO.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1860 @@
\id EXO
\ide UTF-8
\h निर्गम
\toc1 निर्गम
\toc2 निर्गम
\toc3 exo
\mt1 निर्गम
\s5
\c 1
\p
\v 1 याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नांवे हीः
\v 2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
\v 3 इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
\v 4 दान, नफताली, गाद व आशेर.
\v 5 याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा अाधीच मिसरात होता.
\s5
\v 6 नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले.
\v 7 इस्राएल लोक फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीमान झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला.
\s5
\v 8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. त्याला योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती.
\v 9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत;
\v 10 चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरूद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.”
\s5
\v 11 म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;
\v 12 पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली.
\s5
\v 13 आणि मग मिसऱ्यांनी इस्राएलांवर अधिक कष्टाची कामे लादली.
\v 14 अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
\s5
\v 15 मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यातल्या एकीचे नाव शिप्रा व पुवा असे होते.
\v 16 तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
\v 17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
\s5
\v 18 तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
\v 19 त्या सुइणी फारोस म्हणाल्या, “ह्या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.”
\s5
\v 20 त्याबद्दल देवाने त्या सुइणीचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले.
\v 21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली.
\v 22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत फेकून द्या पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”
\s5
\c 2
\p
\v 1 लेवी वंशातील एका माणसाने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला.
\v 2 ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले.
\s5
\v 3 पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून आणि ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
\v 4 त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
\s5
\v 5 त्यासमयी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले.
\v 6 तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलापैकी आहे.”
\s5
\v 7 मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, “या बाळास दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”
\v 8 फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
\s5
\v 9 फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती बाई बाळास घेऊन त्याला दूध पाजू लागली.
\v 10 ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्याला फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नांव मोशे ठेवले ती म्हणाली “कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”
\s5
\v 11 काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्यांने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले.
\v 12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.
\s5
\v 13 दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामधील एक दोषी होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?”
\v 14 पण त्या माणसाने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यांस जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचित सर्वाना माहीत झाले आहे.”
\s5
\v 15 आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.
\v 16 मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या कळपास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या;
\v 17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपास पाणी पाजले.
\s5
\v 18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आल्या आहात?”
\v 19 त्या म्हणाल्या, “एका मिसरी माणसाने आम्हाला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले.”
\v 20 तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या माणसाला का सोडले? त्याला बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.”
\s5
\v 21 त्या माणसापाशी राहण्यास मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला.
\v 22 तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले. तो म्हणाला “ मी परदेशात वस्ती करून आहे.”
\s5
\v 23 बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला;
\v 24 देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली.
\v 25 देवाने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्याला त्यांची परिस्थिती समजली.
\s5
\c 3
\p
\v 1 तेव्हा मोशे, आपला सासरा इथ्रो, जो मिद्यानी याजक, याचा कळप चारीत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
\v 2 तेव्हा परमेश्वराचा दूताने त्याला एका झुडूपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते परंतु ते जळून भस्म होत नव्हते.
\v 3 मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.”
\s5
\v 4 मोशे झुडपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “ हा मी इथे आहे.”
\v 5 देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.
\v 6 तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहण्यास तो घाबरला.
\s5
\v 7 परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे.
\v 8 त्यास मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
\s5
\v 9 तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे.
\v 10 तर आता, मी तुला फारोकडे माझ्या इस्राएली लोकांना मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी पाठवत आहे.”
\s5
\v 11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांना मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?”
\v 12 देवाने उत्तर दिले, “खचित, मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
\s5
\v 13 मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे? मग मी त्यांना काय सांगू?”
\v 14 देव मोशेला म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांना सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.”
\v 15 देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे. व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल;
\s5
\v 16 तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांस एकत्रीत करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हाकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हासोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.
\v 17 आणि मी तुम्हाला मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईल, असे मी सांगितले आहे म्हणून त्यास कळव.
\v 18 ते तुझे ऐकतील मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांस भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हाला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.
\s5
\v 19 परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहूबल दाखविले तरी तो तुम्हाला जाऊ देणार नाही;
\v 20 तेव्हा मी मिसर देशांत आपले बाहूबल दाखवून, ज्या अद्भुत कृति मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हाला जाऊ देईल;
\v 21 आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही.
\v 22 तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांना सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ती आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशाप्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांना लुटाल.”
\s5
\c 4
\p
\v 1 मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाही; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.”
\v 2 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.”
\v 3 मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला.
\s5
\v 4 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याची शेपटी धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्याला धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला.
\v 5 “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.”
\s5
\v 6 मग परमेश्वर त्याला आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला;
\v 7 मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला.
\s5
\v 8 मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. व ते पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर ते दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील.
\v 9 ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाहीतर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”
\s5
\v 10 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.”
\v 11 मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?
\v 12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखास साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.”
\v 13 परंतु मोशे म्हणाला हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव.
\s5
\v 14 मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्याला चांगले बोलता येते हे मला माहित आहे. तो तुला भेटण्यास येत आहे. तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.
\v 15 तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखांत शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांस साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन.
\v 16 आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील.
\v 17 तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”
\s5
\v 18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा.
\v 19 मिद्यान प्रांतत असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”
\v 20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला.
\s5
\v 21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांना जाऊ देणार नाही.
\v 22 मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.
\v 23 परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्रास ठार मारीन.”
\s5
\v 24 मोशे प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्याठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
\v 25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलांची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “खचित तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.”
\v 26 तेव्हा परमेश्वराने त्याला पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले.
\s5
\v 27 मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानांत जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
\v 28 परमेश्वराने त्याला जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवावयाची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली.
\s5
\v 29 मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजाचे सर्व वडीलजन एकत्र जमवले.
\v 30 नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यास चिन्हे करून दाखवली.
\v 31 तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.
\s5
\c 5
\p
\v 1 या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
\v 2 फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला ओळखत नाही. म्हणून इस्राएलास मी जाऊ देणार नाही.”
\s5
\v 3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर यास यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
\v 4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जावयास का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
\v 5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
\s5
\v 6 त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
\v 7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांना विटा बनविण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणण्यास सांगा.
\v 8 तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. त्यात काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून व म्हणतात, आम्हाला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
\v 9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
\s5
\v 10 म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
\v 11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
\s5
\v 12 म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
\v 13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावीत.
\v 14 मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यास फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही.”
\s5
\v 15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा?
\v 16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आपल्या दासास मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
\v 17 फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, तुम्ही आळशी आहात. म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हाला परमेश्वराला यज्ञ करण्यास जाऊ देण्याची परवानगी दे.
\v 18 आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हाला गवत काही मिळायचे नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
\s5
\v 19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
\v 20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
\v 21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणाले, “परमेश्वर तुम्हाकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हास अपमानकारक केले आहे. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
\s5
\v 22 मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभू तू या लोकांस का त्रास देत आहेस? तू मला पहिल्या जागी का पाठवलेस?
\v 23 मी फारोकडे तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाही.”
\s5
\c 6
\p
\v 1 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहूबल त्याला दाखविले म्हणजे मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. कारण माझ्या बाहूबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
\s5
\v 2 मग देव मोशेशी बोलला व म्हणाला, “मी परमेश्वर आहे
\v 3 मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांस सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो.
\v 4 ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे.
\v 5 ज्या इस्राएलास मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे.
\s5
\v 6 तेव्हा इस्राएलास सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हाला मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हाला त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन.
\v 7 मी तुम्हाला आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हाला मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हाला समजेल.
\s5
\v 8 जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला देण्यास मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यात मी तुम्हाला नेईन; व तो मी तुम्हाला वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”
\v 9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात.
\s5
\v 10 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 11 “तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्राएली लोकांस तुझ्या देशांतून जाऊ दे”
\v 12 तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “इस्राएली लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही.”
\v 13 परमेश्वराने मोशे व अहरोन यांस इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याजकडे पाठवले.
\s5
\v 14 मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ.
\v 15 शिमोनाचे पुत्र यमुवेल यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल.) ही शिमोनाची कुळे.
\s5
\v 16 लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षाचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नांवे हीः गेर्षोन, कहाथ, व मरारी.
\v 17 गेर्षोनाचे पुत्र त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हेः गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी.
\v 18 कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.
\v 19 मरारीचे पुत्र महली व मूशी, लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.
\s5
\v 20 अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले तिच्या पोटी त्याला अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.
\v 21 इसहाराची पुत्र कोरह, नेफेग व जिख्री.
\v 22 उज्जियेलाचे पुत्र: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
\s5
\v 23 अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाले.
\v 24 कोरहाचे पुत्रः अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.
\v 25 अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय.
\s5
\v 26 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे ह्याच कुळातले.
\v 27 इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसराचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे.
\s5
\v 28 मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला.
\v 29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसराचा राजा फारो याला सांग.”
\v 30 परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”
\s5
\c 7
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोचा देवच करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
\v 2 ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्वकाही तू अहरोनाला सांग; मग तो फारोला सांगेल तू इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ दे.
\s5
\v 3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
\v 4 तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांस मिसर देशातून काढून आणीन.
\v 5 आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन तेव्हा मिसऱ्यांस कळेल की मी परमेश्वर आहे.”
\s5
\v 6 मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
\v 7 ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता.
\s5
\v 8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांस म्हणाला,
\v 9 “फारो तुम्हाला एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे तिचा साप होईल.”
\v 10 तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
\s5
\v 11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसराच्या त्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
\v 12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
\v 13 तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही.
\v 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्याला भेटण्यास उभा राहा.
\s5
\v 16 त्याला असे सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस.
\v 17 परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्याला यावरून कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.
\v 18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.
\s5
\v 19 परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनास सांग की, आपली काठी घेऊन मिसरामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
\s5
\v 20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
\v 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकास नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
\v 22 तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
\s5
\v 23 नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने ह्याकडे लक्ष देखील दिले नाही.
\v 24 मिसराच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
\v 25 परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.
\s5
\c 8
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकरता जाऊ दे.
\v 2 जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.
\v 3 नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
\v 4 तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.”
\s5
\v 5 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
\v 6 मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
\v 7 तेव्हा जादुगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
\s5
\v 8 मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वराला विनंति करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांना जाऊ देईन.”
\v 9 मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्यासमयी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
\s5
\v 10 फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशाप्रकारे तुम्हाला समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.
\v 11 बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
\v 12 मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वराला प्रार्थना केली.
\s5
\v 13 मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले.
\v 14 लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
\v 15 बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
\s5
\v 16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
\v 17 त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.
\s5
\v 18 जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.
\v 19 तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की, “यात देवाचे बोट आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
\s5
\v 20 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 21 जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
\s5
\v 22 तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्यादिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.
\v 23 तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल.”
\v 24 अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व ते सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली.
\s5
\v 25 म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
\v 26 परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसराच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसराच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करायचे नाहीत काय?
\v 27 तर आम्हास रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.”
\s5
\v 28 तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. केवळ तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.”
\v 29 मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वापासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही पुन्हा फसवू नये.”
\s5
\v 30 तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
\v 31 याप्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
\v 32 परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकाना जाऊ दिले नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 2 जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील.
\v 3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.
\v 4 परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.”
\s5
\v 5 याकरता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”
\v 6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मेली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मेले नाही.
\v 7 फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरापैकी एकही मेले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी.
\v 9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व पशुंना फोड येऊन गळवे येतील.”
\v 10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व पशुंना फोड व गळवे आले.
\s5
\v 11 गळव्यामुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादुगारांना व सर्व मिसरी लोक यास गळवे आली होती.
\v 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते.
\s5
\v 13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्याला सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 14 कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्या स्वतःवर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही. यावरून तुला हे कळेल.
\s5
\v 15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता.
\v 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.
\v 17 तू अजूनही माझ्या लोकांविरूद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस.
\s5
\v 18 म्हणून उद्या ह्याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
\v 19 तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा माणूस किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
\s5
\v 20 फारोच्या सेवकापैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.
\v 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली.
\s5
\v 22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
\v 23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशाप्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
\v 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते.
\s5
\v 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही, वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतातील सर्व वनस्पतीवर मारा झाला. तसेच वनातील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली.
\v 26 गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.
\s5
\v 27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत.
\v 28 तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हाला जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”
\s5
\v 29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
\v 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”
\s5
\v 31 यावेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसाला बोंडे आली होती. ह्या पिकांचा आता नाश झाला.
\v 32 परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशीरा पिकतात; त्याची उशीरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.
\v 33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली. आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.
\s5
\v 34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले.
\v 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांना मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
\s5
\c 10
\p
\v 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. मी त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. हे यासाठी केले की, माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी.
\v 2 मी हे यासाठी केले की, तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे दिली. याप्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळेल.”
\s5
\v 3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्यास कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
\v 4 जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन.
\s5
\v 5 ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
\v 6 ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, ते व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर फारोसमोरून मोशे निघून गेला.
\s5
\v 7 फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा माणूस आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुला अजून कळत नाही काय?”
\v 8 मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?”
\s5
\v 9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी तसेच आम्ही आमचे मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वास आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हाला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”
\v 10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे.
\v 11 नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हाला पाहिजे आहे.” त्यानंतर त्यास फारोपुढून घालवून दिले.
\s5
\v 12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
\v 13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
\s5
\v 14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
\v 15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
\s5
\v 16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरूद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे.
\v 17 तेव्हा ह्यावेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.”
\v 18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
\s5
\v 19 तेव्हा परमेश्वराने त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळास उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
\v 20 तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
\s5
\v 21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
\v 22 तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला.
\v 23 कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता.
\s5
\v 24 तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
\v 25 मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत.
\v 26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वरा याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हाला काय लागेल ते आम्ही तेथे पोहोचेपर्यत सांगता येणार नाही;”
\s5
\v 27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना.
\v 28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्यादिवशी तू मरशील!”
\v 29 मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”
\s5
\c 11
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हाला येथून जाऊ देईल; तो तुम्हाला जाऊ देईल तेव्हा तो तुम्हाला सर्वस्वी ढकलून काढून लावील,
\v 2 तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.”
\v 3 मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.
\s5
\v 4 मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन
\v 5 आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.
\s5
\v 6 मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.
\v 7 परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुकणार नाही यावरून मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.
\v 8 मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
\s5
\v 9 मग परमेश्वर मोशेला म्हणाला होता की, फारो तुमचे ऐकणार नाही. हे यासाठी की, “मी मिसर देशामध्ये पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्या.”
\v 10 आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांना बाहेर जाऊ दिले नाही.
\s5
\c 12
\p
\v 1 मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.
\s5
\v 3 इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे.
\v 4 आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा अंदाज घ्यावा.
\s5
\v 5 तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा.
\v 6 ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्याला वधावे.
\v 7 त्यांचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे.
\v 8 त्याच रात्री त्याचे मांस विस्तावावर भाजून आणि कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर ते खावे.
\s5
\v 9 तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत.
\v 10 त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.
\v 11 ते तुम्ही याप्रकारे खावेः तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
\s5
\v 12 आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.
\v 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही
\v 14 हा दिवस तुम्हास आठवणी दाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.
\s5
\v 15 सात दिवस बेखमीर भाकर खावी; पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
\v 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.
\s5
\v 17 याप्रकारे बेखमीर भाकरीच्या सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना मिसर देशातून बाहेर काढून आणले. म्हणून हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधि म्हणून पाळावा.
\v 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
\s5
\v 19 ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएलाच्या मंडळीतून बाहेर टाकावे.
\v 20 त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”
\s5
\v 21 मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्या लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
\v 22 मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
\s5
\v 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही.
\s5
\v 24 हा विधी तुम्हाला व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा.
\v 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हा उपासनेचा प्रकार म्हणून पाळावा.
\s5
\v 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ह्या उपासनेचा अर्थ काय आहे?
\v 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांना मारले व आपल्या घरांला वाचवले त्यासमयी तो मिसरांतील इस्राएलांची घरे ओलांडून गेला हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले.
\v 28 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
\s5
\v 29 मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनारूढ असलेल्या फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि तसेच गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले.
\v 30 रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यांत कोणी मेले नाही असे एकही घर राहिले नाही.
\s5
\v 31 तेव्हा रातोरात फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला तुम्ही व तुमचे सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
\v 32 आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे कळप, व गुरेढोरे ही तुमच्याबरोबर घेऊन चालते व्हा. आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या.
\v 33 लोकांनी देशांतून तात्काळ निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लाविला; कारण ते म्हणाले, आम्ही सर्वजण मेलोच आहोत.”
\s5
\v 34 इस्राएल लोकांनी आपल्या मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आणि आपल्या खांद्यावर घेतली.
\v 35 इस्राएली लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसऱ्याजवळ जाऊन कपडे. सोन्यारुप्याचे दागदागिने मागून घेतले.
\v 36 मिसरी लोकांची कृपादृष्टि इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले आणि म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यास दिले. अशाप्रकारे त्यांनी मिसरी इस्राएल लोकांस लुटले.
\s5
\v 37 तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
\v 38 त्यांच्या सोबत लोकांचा मिश्र समुदाय गेला. तशीच पुष्कळ कळप, गुरेढोरे, जनावरे होती.
\v 39 त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही;
\v 40 इस्राएली लोक मिसर देशामध्ये येऊन चारशेतीस वर्षे राहिले होते.
\s5
\v 41 मग चारशेतीस वर्षाच्या अखेरीस बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या.
\v 42 परमेश्वराने त्यास मिसर देशातून बाहेर काढिले ह्याकरता ही परमेश्वरासाठी जागरणाची रात्र म्हणून अवश्य पाळावी. इस्राएल लोकांनी पिढ्यानपिढ्या ही रात्र परमेश्वरासाठी जागरणाची म्हणून अवश्य पाळावी.
\s5
\v 43 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये.
\v 44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्याने त्यातले खावे;
\s5
\v 45 परंतु उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये.
\v 46 प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.
\s5
\v 47 सर्व इस्राएल मंडळीने हा सण पाळलाच पाहिजे.
\v 48 परदेशीय एकजण तुम्हाबरोबर राहत असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंता करून घेतली नाहीतर त्याला त्यातले काही खाता येणार नाही.
\s5
\v 49 हे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”
\v 50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या.
\v 51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएली लोकांना त्यांच्या सैन्या-सैन्याने मिसर देशातून बाहेर काढून आणले.
\s5
\c 13
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 2 “इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशुचा ह्या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.”
\s5
\v 3 मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या हात बलाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
\v 4 आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
\v 5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.
\s5
\v 6 या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा;
\v 7 ह्या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमीराचे दर्शनसुध्दां होऊ नये.
\s5
\v 8 ह्या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे.
\v 9 हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्यामध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले.
\v 10 म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या समयी हा विधी पाळावा.
\s5
\v 11 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल.
\v 12 तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांस परमेश्वरासाठी वेगळे करावे सर्व नर परमेश्वराचे होत.
\v 13 गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
\s5
\v 14 पुढील काळीं तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यास सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांस आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
\v 15 आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशु यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बलि अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो.
\v 16 तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.”
\s5
\v 17 फारोने लोकांना जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”
\v 18 म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्र होऊन बाहेर निघाले होते.
\s5
\v 19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”
\v 20 मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले व रानाजवळील एथामांत त्यांनी तळ दिला.
\v 21 त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यास मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे.
\v 22 दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.
\s5
\c 14
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
\v 3 फारो इस्राएल त्यामुळे लोकांविषयी म्हणेल की ते देशांत गोंधळले आहेत, त्यांचा रानांत कोंडमारा झाला आहे. असे फारोला वाटेल.
\s5
\v 4 मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसराच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
\v 5 इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?”
\s5
\v 6 तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला.
\v 7 त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यावरील सरदारासोबत आपल्याबरोबर घेतले.
\v 8 इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले.
\v 9 मग फारोचे लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग करून लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
\s5
\v 10 फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले.
\v 11 ते मोशेला म्हणाले, “आम्हाला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास का आणले? आम्हांस तू मिसरातून बाहेर का काढले?
\v 12 मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.”
\s5
\v 13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
\v 14 परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
\s5
\v 15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की पुढे चला.
\v 16 तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील.
\v 17 आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते त्यांचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.
\v 18 फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”
\s5
\v 19 इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.
\v 20 अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही.
\s5
\v 21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.
\v 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भरसमुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले.
\s5
\v 23 त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले.
\v 24 तेव्हा त्यादिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
\v 25 रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.”
\s5
\v 26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.”
\v 27 मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यास समुद्रामध्ये उलथून पाडिले.
\v 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व फारोच्या सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.
\s5
\v 29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.
\v 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरांच्या हातातून सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
\v 31 परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.
\s5
\c 15
\p
\v 1 नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गाईले, ते म्हणाले,
\q “मी परमेश्वराला गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे;
\q घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.
\q
\s5
\v 2 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.
\q तो माझे तारण झाला आहे.
\q मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे;
\q तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
\q
\v 3 परमेश्वर महान योद्धा आहे;
\q त्याचे नांव याव्हे आहे.
\q
\s5
\v 4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले;
\q त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.
\q
\v 5 खोल पाण्याने त्यांना बुडविले;
\q ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
\q
\s5
\v 6 हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
\q त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
\q
\v 7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस;
\q अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
\q
\v 8 तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकाराने जलाच्या राशि बनल्या.
\q जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले,
\q जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले.
\q
\s5
\v 9 शत्रु म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन;
\q त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
\q मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.
\q
\v 10 परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायु सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
\q ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले.
\q
\v 11 हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?
\q पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक,
\q अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?
\q
\s5
\v 12 तू तुझा उजवा हात उगारला
\q पृथ्वीने त्यांना गिळून टाकले.
\q
\v 13 तू उध्दारलेल्या लोकांना तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस;
\q तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहे.
\q
\s5
\v 14 इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील;
\q पलेशेथामध्ये राहणारे लोक भीतीने थरथरा कांपतील.
\q
\v 15 मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले.
\q मवाबाचे नायक भीतीने थरथरा कांपत आहेत
\q आणि कनानी लोक गलित झाले आहेत.
\q
\s5
\v 16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
\q आणि परमेश्वराचे लोक म्हणजे
\q तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
\q ते तुझ्या लोकांना काहीही न करता, दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
\q
\s5
\v 17 तू तुझ्या लोकांना तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
\q हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे.
\q हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच.
\q
\v 18 परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”
\p
\s5
\v 19 फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले याप्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
\v 20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
\v 21 मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले.
\q “परमेश्वराला गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
\q त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”
\p
\s5
\v 22 मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.
\v 23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले.
\s5
\v 24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”
\v 25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक वनस्पति दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
\v 26 तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
\p
\s5
\v 27 मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.
\s5
\c 16
\p
\v 1 मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले.
\v 2 त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली;
\v 3 इस्राएल लोक त्यास म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हाला मिसरामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.”
\s5
\v 4 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टि करीन; दर दिवशी ह्या लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा करीन.
\v 5 सहाव्या दिवशी जे काही गोळा करून जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे.”
\s5
\v 6 म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल.
\v 7 उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?”
\v 8 आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरने आमच्याविरुध्द नाहीतर परमेश्वराविरुध्द आहे.”
\s5
\v 9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
\v 10 मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले.
\v 11 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 12 “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.”
\s5
\v 13 त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे येऊन छावणीभर ते पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दंव पडले.
\v 14 सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले.
\v 15 ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “हे काय आहे?” कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरता देत आहे.
\s5
\v 16 परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.”
\v 17 इस्राएल लोकांनी तसे केले, कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले.
\v 18 त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले; तेव्हा ज्याने अधिक गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपआपल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले.
\s5
\v 19 मोशेने लोकांना सांगितले, “कोणीहि यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.”
\v 20 परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.
\v 21 दर दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत परंतु उन्हाच्या उष्णतेमुळे ते अन्न वितळून जाई व नाहीसे होई.
\s5
\v 22 सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे दर माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळवले.
\v 23 तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हाला भाजावयाचे भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”
\s5
\v 24 मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
\v 25 मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानांत ते तुम्हास मिळावयाचे नाही.
\s5
\v 26 तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.”
\v 27 तरी काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
\s5
\v 28 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?
\v 29 पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीहि बाहेर जाऊ नये.”
\v 30 याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
\s5
\v 31 इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नांव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढऱ्या असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.
\v 32 मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”
\s5
\v 33 तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक भांडे घे आणि त्यात एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”
\v 34 मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे ते भांडे ठेवले.
\v 35 इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोंचेपर्यंत खात होते.
\v 36 एक ओमर मान्ना म्हणजे “एका एफाचा दहावा भाग” आहे.
\s5
\c 17
\p
\v 1 सर्व इस्राएल लोकांच्या समुदायाने सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
\v 2 तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी कां भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा कां पाहात आहात?”
\v 3 परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”
\s5
\v 4 तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
\v 5 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
\v 6 पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
\v 7 मोशेने त्या ठिकाणाचे नांव मस्सा (परीक्षा) व मरीबा (कलह) ठेवले; कारण याठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
\s5
\v 8 रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
\v 9 तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांना निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
\v 10 यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
\s5
\v 11 जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई.
\v 12 काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
\v 13 तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकांचा पराभव केला.
\s5
\v 14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या ह्या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांना पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
\v 15 मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला याव्हे-निस्सी “परमेश्वर माझे निशाण” असे नांव दिले.
\v 16 आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासानावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”
\s5
\c 18
\p
\v 1 देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;
\v 2 मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांला घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला;
\v 3 पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
\v 4 दुसऱ्या मुलाचे नांव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”
\s5
\v 5 तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याची दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.
\v 6 त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
\s5
\v 7 तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्याला नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.
\v 8 परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्यास सांगितली.
\s5
\v 9 परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांना स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
\v 10 इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेस मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.
\v 11 परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळाले. इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानीत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
\s5
\v 12 मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला.
\s5
\v 13 दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशासमोर उभे होते.
\v 14 मोशेला लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते कां?”
\s5
\v 15 मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाचा प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
\v 16 लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यास देतो.”
\s5
\v 17 परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
\v 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही.
\v 19 तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने.
\v 20 तू त्यास नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग.
\s5
\v 21 तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
\v 22 ह्या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशाप्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
\v 23 तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.”
\s5
\v 24 तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले.
\v 25 मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर पन्नास पन्नास व दहा दहावर नायक म्हणून नेमले.
\v 26 ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकाकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.
\v 27 मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
\s5
\c 19
\p
\v 1 मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोंचले.
\v 2 ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला.
\s5
\v 3 तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांना हे सांग.
\v 4 मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
\v 5 म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.
\v 6 तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
\s5
\v 7 मोशेने येऊन लोकांच्या वडिलांस एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला जी वचने सांगण्याची आज्ञा होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली.
\v 8 आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वराला लोकांचे म्हणणे सांगितले.
\v 9 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुजजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांना ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.
\s5
\v 10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांना पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.
\v 11 तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.
\s5
\v 12 परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करील तो खास आपल्या जिवास मुकेल.
\v 13 कोणीही त्याला हात लावू नये. हात लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे, तो पशु असो किंवा मनुष्य असो, त्याला जीवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”
\s5
\v 14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.
\v 15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.”
\s5
\v 16 तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कांपू लागले.
\v 17 नंतर मोशाने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले.
\v 18 परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो सर्व धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला. आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
\s5
\v 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला.
\v 20 परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.
\v 21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील.
\v 22 तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करीन.”
\s5
\v 23 मोशेने परमेश्वराला सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हाला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.”
\v 24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”
\v 25 मग मोशाने खाली जाऊन लोकांना हे सांगितले.
\s5
\c 20
\p
\v 1 देवाने ही सर्व वचने सांगितली,
\v 2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.
\v 3 माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
\s5
\v 4 तू आपल्यासाठी कोरीव मूर्ति करु नकोस; वर आकाशांतील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
\v 5 त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
\v 6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
\s5
\v 7 तुझा देव परमेश्वर याचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नांव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
\s5
\v 8 शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
\v 9 सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस;
\v 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्यादिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशु, किंवा व तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
\v 11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
\s5
\v 12 आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
\v 13 खून करू नकोस.
\v 14 व्यभिचार करू नकोस.
\s5
\v 15 चोरी करू नकोस.
\v 16 आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
\v 17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरु नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
\s5
\v 18 लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.
\v 19 ते मोशेला म्हणू लागले आम्हाशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आम्हाशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरुन जाऊ.
\v 20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.”
\v 21 मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे गेला, तोपर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
\s5
\v 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
\v 23 माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
\s5
\v 24 माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांचे होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.
\v 25 तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती घडलेल्या चिऱ्याची नसावी; कारण तुम्ही आपले हत्यार दगडाला लावल्यास तो भ्रष्ट होईल.
\v 26 तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.
\s5
\c 21
\p
\v 1 आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांना लावून द्यावेत ते हेचः
\s5
\v 2 तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सातव्या वर्षी तो काही भरपाई न घेता त्यास मुक्त होऊन जावे.
\v 3 जर तो एकटाच आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची पत्नी घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या पत्नीला घेऊन जावे.
\v 4 जर तो एकटा आला असेल तर त्याच्या मालकाने त्याला पत्नी करून द्यावी; तिला पुत्र किंवा कन्या झाल्या असतील तर ती व तिची मुले मालकाची राहतील; त्याने एकट्यानेच जावे.
\s5
\v 5 पण जर तो आपल्या मालकाबरोबर राहण्याचे स्पष्ट करतो तर मग मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही.
\v 6 तर त्याच्या मालकाने त्याला देवासमोर अथवा त्याला दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील.
\s5
\v 7 कोणी आपली कन्या गुलाम म्हणून विकली तर ती गुलामाप्रमाणे मुक्त होऊन जाता कामा नये.
\v 8 तिचा मालक तिला आपली स्त्री करून घेणार असून पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंड घेऊन तिची मुक्तता करावी. तिजशी त्याने कपट केल्यामुळे परक्या लोकांस तिला कन्येप्रमाणे वागवावे.
\s5
\v 9 तिला आपल्या पुत्रासाठी ठेवून घ्यावयाचे असेल तर त्याने तिला कन्येप्रमाणे वागवावे.
\v 10 त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तरी त्याने पहिल्या पत्नीस अन्नवस्त्र कमी पडू देऊ नये.
\v 11 ह्या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्याला काही खंडणी न देता मुक्त होईल;
\s5
\v 12 कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\v 13 अपघाताने एखाद्याच्या हातून कोणी मेले तर देवाने त्याला त्याच्या हाती दिले तर पळून जाण्यासाठी मी तुला एक स्थान नेमून देईल.
\v 14 परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
\s5
\v 15 कोणी आपल्या पित्यास किंवा आईस मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
\v 16 जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन विकेल किंवा त्याच्याकडे तो सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\v 17 जो कोणी आपल्या पित्याला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 18 दोघेजण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे तो मेला नाही, पण त्याला अंथरूणात पडून रहावे लागले,
\v 19 तर मारणाऱ्याने त्याला त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो माणूस बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा.
\s5
\v 20 काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मेली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी;
\v 21 पण तो एकदोन दिवस जिवंत राहिला तर मालकास शिक्षा होणार नाही कारण तो त्याचेच धन आहे.
\s5
\v 22 दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर बाईला लागला आणि त्या बाईचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाहीतर ज्याचा धक्का तिला लागला तिचा नवरा न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा.
\v 23 पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव.
\v 24 डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
\v 25 चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा.
\s5
\v 26 जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्याने त्याला मुक्त करावे.
\v 27 एखाद्या मालकाने आपल्या पुरुष दासाच्या किंवा स्त्री दासीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर त्याने त्याला दास्यमुक्त करून जाऊ द्यावे
\s5
\v 28 एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलास दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाचा मालकास सोडून द्यावे.
\v 29 परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषांस किंवा स्त्रीस जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकासही जिवे मारावे.
\v 30 त्याच्याकडून खंडणी मागितल्यास त्याने आपला प्राण वाचविण्यासाठी आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी.
\s5
\v 31 बैलाने एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा.
\v 32 एखाद्या बैलाने जर कोणाच्या पुरुष दासाला किंवा स्त्री दासीला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्याच्या मालकाला रुप्याची तीस नाणी द्यावी आणि त्या बैलालाही दगडमार करावा;
\s5
\v 33 एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरिला किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर कोणाचा बैल, गाढव वगैरे त्या खड्डयात पडून मेले तर खड्ड्याचा मालक दोषी आहे;
\v 34 त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकीचे आहे.
\s5
\v 35 जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला हुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी विभागून घ्यावेत आणि मेलेला बैलही विभागून घ्यावा.
\v 36 परंतु तो बैल पूर्वीपासून मारका आहे हे ठाऊक असून मालकाने त्यास बांधून ठेवले नाहीतर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मेलेला बैल त्याचा व्हावा.
\s5
\c 22
\p
\v 1 एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरुन ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
\v 2 चोर घर फोडीत असता सापडला व जिवे जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
\v 3 परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मारण्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
\v 4 चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
\s5
\v 5 कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
\s5
\v 6 जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
\s5
\v 7 कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडला तर त्याच्या दुप्पट चोराने किंमत भरून द्यावी.
\v 8 परंतु जर चोर सापडला नाही तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तूला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
\v 9 जर हरवलेला एखादा बैल, किंवा एखादे गाढव किंवा मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन माणसात वाद उत्पन्न झाला, तर ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्ष्याला देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
\s5
\v 10 एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले परंतु ते जर मेले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले.
\v 11 तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
\v 12 त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
\v 13 जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्याला भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
\s5
\v 14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मेले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
\v 15 जर त्यावेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.
\s5
\v 16 आणि मागणी झाली नाही अशा कुमारीकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
\v 17 तिच्या पित्याने त्याला ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारीकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
\s5
\v 18 कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
\v 19 पशुगमन करणाऱ्यास अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 20 परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बलि करणाऱ्या अवश्य जिवे मारावे.
\v 21 उपऱ्याचा छळ करु नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
\s5
\v 22 विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
\v 23 तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचशील आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
\v 24 व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
\s5
\v 25 तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब माणसाला तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारु नये.
\v 26 तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुन त्याला परत करावे;
\v 27 कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे एकेन, कारण मी करुणामय आहे.
\s5
\v 28 तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
\s5
\v 29 आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
\v 30 तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
\v 31 तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
\s5
\c 23
\p
\v 1 खोटी अफवा पसरवू नको; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको.
\v 2 दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नको, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नको.
\v 3 एखाद्या गरीब माणसाचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नको.
\s5
\v 4 आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्याला वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोडावे.
\v 5 तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्याला सोडून जाऊ नको, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोडीव.
\s5
\v 6 तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नका;
\v 7 कोणावरही खोटे दोषारोप करु नका; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नको. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
\v 8 लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते.
\v 9 परक्यांना कधीही छळू नका; कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला चांगली माहीती आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसर देशात परके होता.
\s5
\v 10 सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव.
\v 11 परंतु सातव्या वर्षी जमीन पडीत राहू दे. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
\s5
\v 12 तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
\v 13 मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
\s5
\v 14 वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ.
\v 15 बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
\s5
\v 16 शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करिशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
\v 17 वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.
\s5
\v 18 तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करु नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
\v 19 आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधांत शिजवू नये.
\s5
\v 20 पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
\v 21 त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळा आणि त्यांच्यामागे चाला; त्याच्याविरुध्द बंड करु नका. कारण तो तुम्हाला क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नांव आहे.
\v 22 जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व तुम्ही केले तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
\s5
\v 23 देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.
\v 24 परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नये; त्यांची सेवा करू नये, त्यांना जमीनदोस्त करावे; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावे.
\v 25 तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; म्हणजे तू त्याच्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
\s5
\v 26 तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुम्हाला दीर्घायुषी करीन.
\v 27 ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.
\v 28 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्याना तुझ्यापुढून पळावयास लावतील.
\v 29 मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुम्हाला त्रास देतील.
\s5
\v 30 तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
\v 31 “मी तुम्हाला तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. मी तुम्हाला तेथे राहणाऱ्या लोकांना तुमच्या हाती देईल व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.
\v 32 तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नको.
\v 33 तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापळ्यासारखे अडकविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरूद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरवात कराल.”
\s5
\c 24
\p
\v 1 मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्याला दुरुनच नमन करा;
\v 2 मग मोशे एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
\s5
\v 3 मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वाप्रमाणे आम्ही करू.”
\v 4 तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि पहाटेस उठून मोशेने पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले.
\s5
\v 5 मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वराला होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करण्यास पाठवले.
\v 6 मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले.
\s5
\v 7 मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
\v 8 मग मोशेने रक्त घेऊन व लोकांवर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी ह्या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्याचे रक्त आहे.”
\s5
\v 9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
\v 10 तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते
\v 11 इस्राएलातील वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
\s5
\v 12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
\v 13 तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.
\s5
\v 14 मोशे इस्राएलांच्या वडीलांस म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
\v 15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
\s5
\v 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली.
\v 17 इस्राएल लोकांना पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते.
\v 18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
\s5
\c 25
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्विकारावी.
\s5
\v 3 त्यांच्याकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशीः सोने, चांदी, पितळ;
\v 4 निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
\v 5 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
\v 6 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
\v 7 एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”
\s5
\v 8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांना माझ्यासाठी एक पवित्र तयार करावे.
\v 9 निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.
\s5
\v 10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
\v 11 तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.
\s5
\v 12 त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.
\v 13 बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत
\v 14 कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
\s5
\v 15 हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”
\v 16 देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोहि त्या कोशात ठेवावा.
\v 17 मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;
\v 18 मग सोन्याचे घडीव काम करून दोन करूब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
\s5
\v 19 एक करूब एकाबाजूला व दुसरा करूब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.
\v 20 त्या करूबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
\v 21 दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
\s5
\v 22 तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करूबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
\s5
\v 23 बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
\v 24 ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.
\s5
\v 25 मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.
\v 26 मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना त्या लावाव्यात.
\v 27 ह्या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घालावे.
\s5
\v 28 मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
\v 29 मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनीव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
\v 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी
\s5
\v 31 शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.
\v 32 त्या दीपवृक्षाला एकाबाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
\s5
\v 33 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या ह्या कळ्याफुलांसह असाव्यात.
\v 34 ह्या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.
\s5
\v 35 ह्या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखापैकी दोन दोन शाखा त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.
\v 36 त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
\s5
\v 37 मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
\v 38 दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
\v 39 हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याची करावा;
\v 40 आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.
\s5
\c 26
\p
\v 1 निवासमंडप दहा पडद्यांचे कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावा. व कुशल कारागिराकडून करूब काढावेत.
\v 2 प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;
\v 3 त्यापैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
\s5
\v 4 जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत. व तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरहि तशीच बिरडी कर
\v 5 एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;
\v 6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या सहाय्याने ते दोन भाग एकत्र जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.
\s5
\v 7 त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावे. हे पडदे अकरा असावे.
\v 8 हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रूंद अशा मापाचे बनवावेत.
\v 9 त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.
\s5
\v 10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तसेच पन्नास बिरडी करावी;
\v 11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबूसाठी अखंड होईल.
\s5
\v 12 ह्या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
\v 13 आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर ह्या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.
\v 14 तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
\s5
\v 15 पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.
\v 16 प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.
\v 17 प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फव्व्या अश्याच कराव्यात.
\v 18 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात.
\s5
\v 19 फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात.
\v 20 पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात;
\v 21 आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कुसा कराव्यात.
\s5
\v 22 पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात;
\v 23 आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
\v 24 कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूस जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
\v 25 पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे सोळा, चांदीच्या बैठका असतील.
\s5
\v 26 त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
\v 27 दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
\v 28 मध्यभागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
\s5
\v 29 फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
\v 30 मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.
\s5
\v 31 तलम सणाच्या कापडाचा व निळया जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढून घ्यावेत.
\v 32 बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यात उभे करावेत;
\v 33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
\s5
\v 34 परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
\v 35 अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूस असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
\s5
\v 36 “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
\v 37 हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”
\s5
\c 27
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
\v 2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.
\s5
\v 3 वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
\v 4 तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
\s5
\v 5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
\v 6 वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
\s5
\v 7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
\v 8 वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंस फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
\s5
\v 9 निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एकाबाजूला शंभर हात असावी.
\v 10 तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
\s5
\v 11 वेदीच्या उत्तर बाजूसही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
\v 12 अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
\v 13 अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.
\s5
\v 14 अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
\v 15 फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
\v 16 अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
\s5
\v 17 अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
\v 18 अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावे; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
\v 19 पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
\s5
\v 20 इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतूनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;
\v 21 अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपात अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.
\s5
\c 28
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवाकरण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
\v 2 आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
\v 3 ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाचा वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवाकरण्यासाठी पवित्र होईल.
\s5
\v 4 तुझा भाऊ अहरोन व त्याची पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल व कमरबंद तयार करावीत.
\v 5 त्यांनी सोन्याची जर आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.
\s5
\v 6 सोन्याची जर व निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;
\v 7 एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात, त्याची दोन टोके जोडावी.
\v 8 एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याची जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने ती असावी.
\v 9 मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नांवे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
\s5
\v 10 त्यांच्या नावांपैकी सहा नांवे एका रत्नावर व बाकीची सहा नांवे दुसऱ्या रत्नावर कोरावी.
\v 11 रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावी.
\v 12 ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत म्हणजे अहरोन त्यांची नांवे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यावर स्मरणार्थ वागवील.
\s5
\v 13 त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावी.
\v 14 पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्या व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.
\s5
\v 15 न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
\v 16 तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.
\s5
\v 17 त्यात रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
\v 18 दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणि व हिरा;
\v 19 तिसऱ्या रांगेत तृणमणि, सूर्यकांत व पद्मराग;
\v 20 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
\s5
\v 21 ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने, असावी. त्यांच्या संख्येइतकी बारा नांवे असावी. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशापैकी एकेकाचे नांव एकेका रत्नावर कोरावे.
\v 22 ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात.
\v 23 ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;
\v 24 ऊरपटाच्या टोकांस लावलेल्या ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.
\s5
\v 25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात.
\v 26 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या.
\s5
\v 27 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.
\v 28 त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळया फितींने बांधाव्या, ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही.
\s5
\v 29 अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
\v 30 ऊरपटात तू उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
\s5
\v 31 एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळया रंगाचा करावा;
\v 32 त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
\s5
\v 33 निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
\v 34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत.
\v 35 सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
\s5
\v 36 शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
\v 37 ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;
\v 38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वराला पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.
\s5
\v 39 चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलहि तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
\s5
\v 40 अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी.
\v 41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
\s5
\v 42 “त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
\v 43 आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपात प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”
\s5
\c 29
\p
\v 1 त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतोः एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
\v 2 बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्या.
\s5
\v 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्याच्यासहीत ती टोपली घेऊन ये.
\v 4 अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;
\s5
\v 5 ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्याला एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;
\v 6 त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदीलावर पवित्र मुकुट ठेव.
\v 7 नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर;
\s5
\v 8 मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत;
\v 9 आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांधव त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशाप्रकारे या विधीने त्यांना याजकपद कायमचे राहील ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावे
\s5
\v 10 नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत
\v 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;
\s5
\v 12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगास लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
\v 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा.
\v 14 पण गोऱ्हाचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापर्पणाचा बली होय.
\s5
\v 15 मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत;
\v 16 आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे.
\v 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत;
\v 18 त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;
\s5
\v 19 नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;
\v 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.
\s5
\v 21 नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रावरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.
\s5
\v 22 तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे;
\v 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
\s5
\v 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.
\v 25 मग त्या सर्व वस्तु त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
\s5
\v 26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे.
\v 27 नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.
\v 28 इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.
\s5
\v 29 अहरोनाची पवित्र वस्रे त्यानंतर ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे ह्या वस्रानिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
\v 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत.
\s5
\v 31 समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
\v 32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
\v 33 त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत.
\v 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे;
\s5
\v 35 मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसापर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.
\v 36 प्रायश्चितासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या दर दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
\v 37 सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
\s5
\v 38 वेदीवर होम करायचा तो असाः प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा.
\v 39 एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा.
\s5
\v 40 कुटून काढलेल्या पाव हीन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे.
\s5
\v 41 आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय.
\v 42 दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत राहावे; ह्या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला भेटेन.
\s5
\v 43 त्याठिकाणी मी इस्राएल लोकांना भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.
\v 44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.
\s5
\v 45 मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.
\v 46 आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”
\s5
\c 30
\p
\v 1 तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
\v 2 ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.
\s5
\v 3 वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
\v 4 त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
\s5
\v 5 हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत.
\v 6 वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
\s5
\v 7 अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
\v 8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा.
\v 9 तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.
\s5
\v 10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.
\s5
\v 11 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 12 “तू इस्राएल लोकांची शिरगणती करिशील तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा;
\v 13 जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.
\v 14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे.
\s5
\v 15 तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
\v 16 इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”
\s5
\v 17 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
\s5
\v 19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत;
\v 20 दर्शनमंडपात व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील.
\v 21 अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
\s5
\v 22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,
\v 24 आणि पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतूनाचे तेल घे,
\v 25 व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
\s5
\v 26 या तेलाने दर्शनमंडप व साक्षीकोश,
\v 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
\v 28 तसेच होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यासर्वाना अभिषेक करावा.
\s5
\v 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
\v 30 आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
\v 31 इस्राएल लोकांना तू सांग की, पिढ्यानपिढ्या तुम्हाला माझ्यासाठीच हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार.
\s5
\v 32 हे तेल कोणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही. व ह्या प्रकारचे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही ह्याला पवित्रच मानावे.
\v 33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परकीयाला लावील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
\s5
\v 34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
\v 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेला, निर्भेळ शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे;
\v 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शनमंडपातील ज्या साक्षकोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.
\s5
\v 37 हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे; त्यासारखे दुसरे धूपद्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करु नये.
\v 38 सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
\s5
\c 31
\p
\v 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला
\v 2 “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
\s5
\v 3 देवाच्या आत्म्याने त्याला परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्याला अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.
\v 4 तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.
\v 5 तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
\s5
\v 6 त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दि ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.
\v 7 म्हणजे दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान;
\v 8 मेज व त्यावरील सर्व समान, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
\v 9 होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
\s5
\v 10 अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेले तलम व पवित्र वस्रे;
\v 11 अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. ह्या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागिर तयार करतील.”
\s5
\v 12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 13 “इस्राएल लोकांना हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
\v 14 म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसाला जर कोणी भ्रष्ट करील तर त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
\v 15 सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
\v 17 शब्बाथ दिवस इस्राएल लोकामध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”
\s5
\v 18 या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्याला दिले.
\s5
\c 32
\p
\v 1 मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्याला म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांस कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”
\v 2 तेव्हा अहरोन लोकांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.”
\s5
\v 3 मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.
\v 4 अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरुन त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”
\s5
\v 5 अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.”
\v 6 लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
\s5
\v 7 त्यासमयी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.
\v 8 ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ति केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला बलि अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”
\s5
\v 9 परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते ताठमानेचे लोक आहेत;
\v 10 तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.”
\v 11 परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?
\s5
\v 12 आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरुन त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याच्या हेतूपासून परावृत हो.
\v 13 तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
\v 14 तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ति आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.
\s5
\v 15 मग मोशे पर्वतावरुन साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते.
\v 16 देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता.
\s5
\v 17 यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”
\v 18 मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.”
\s5
\v 19 मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
\v 20 नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस पिण्यास दिले.
\s5
\v 21 मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”
\v 22 अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; ह्या लोकांची प्रवृति पापाकडे आहे, हे आपणास माहीत आहे.
\v 23 लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.
\v 24 तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या. तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.”
\s5
\v 25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला.
\v 26 तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले.
\v 27 मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक माणसाने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”
\s5
\v 28 लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्यादिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मेले.
\v 29 मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला आशीर्वाद देईल.”
\s5
\v 30 दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांना सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित् मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”
\v 31 तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय ह्या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले;
\v 32 तरी आता तू त्यांच्या ह्या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या जीवनी पुस्तकातून मला काढून टाक.”
\s5
\v 33 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे मजविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नांवे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो.
\v 34 तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”
\v 35 अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनविले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.
\s5
\c 33
\p
\v 1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
\v 2 तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांना तेथून घालवून देईन.
\v 3 दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशास तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.”
\s5
\v 4 ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
\v 5 कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
\v 6 म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यावाचून राहिले.
\s5
\v 7 मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला दर्शनमंडपअसे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
\v 8 ज्यावेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्याला निरखून बघत.
\v 9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
\s5
\v 10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
\v 11 मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
\s5
\v 12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टि आहे.
\v 13 आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
\s5
\v 14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
\v 15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हाला या येथून पुढे नेऊ नकोस.
\v 16 तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकाहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजावयाचें ना?”
\s5
\v 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टि तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तिशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
\v 18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपाकरून मला तुझे तेज दाखव.”
\s5
\v 19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन. ज्यावर कृपा करावीसी वाटेल त्याजवर मी कृपा करीन आणि ज्यावर दया करावीसी वाटते त्यावर दया करीन.
\v 20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जीवंत राहणार नाही.”
\s5
\v 21 परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
\v 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
\v 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
\s5
\c 34
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्याप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
\v 2 पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा.
\s5
\v 3 तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्याना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
\v 4 तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
\s5
\v 5 तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर ह्याच नांवाची घोषणा केली.
\v 6 परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेलाः “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
\v 7 हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही, समाचार घेतो.”
\s5
\v 8 मग मोशेने ताबडतोब भूमिपर्यंत वाकून परमेश्वराला नमन केले.
\v 9 मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टि जर मजवर झाली असेल तर आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठमानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हाला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्विकार कर.”
\s5
\v 10 मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
\v 11 मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांना तुझ्यासमोरुन घालवून देतो.
\s5
\v 12 सावध राहा, तू ज्या देशात जात आहेस त्यात राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
\v 13 परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाका; त्यांचे स्तंभ तोडून टाका; त्यांच्या अशेरा मूर्ति फोडून टाका.
\v 14 तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नांव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
\s5
\v 15 तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नकाे; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
\v 16 त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
\v 17 तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.
\s5
\v 18 बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
\s5
\v 19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नर वत्स माझे आहेत.
\v 20 गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे पण त्याला तसे सोडवले नाहीतर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
\s5
\v 21 सहा दिवस तू आपले कामकाज कर परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.
\v 22 तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.
\s5
\v 23 तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर राहावे.
\v 24 मी तर परराष्ट्रांस तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर राहावयास जाशील त्यावेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
\s5
\v 25 माझ्या यज्ञबलीचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
\v 26 हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पीकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
\s5
\v 27 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
\v 28 मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
\s5
\v 29 मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.
\v 30 अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास घाबरले;
\v 31 परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्याना बोलावले, तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला.
\s5
\v 32 त्यानंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्याला सीनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
\v 33 लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला.
\s5
\v 34 जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा होई ती तो त्यांना सांगत असे.
\v 35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.
\s5
\c 35
\p
\v 1 मोशेने सगळया इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्याः
\v 2 सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्यादिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.
\v 3 शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या रहात असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.
\s5
\v 4 मोशे सर्व इस्राएल लोकाच्या मंडळीस म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हेः
\v 5 परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;
\v 6 निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
\v 7 लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
\v 8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
\v 9 तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.
\s5
\v 10 “तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
\v 11 निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;
\v 12 कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
\s5
\v 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;
\v 14 प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;
\v 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;
\v 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;
\s5
\v 17 अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;
\v 18 निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी देणाऱ्या मेखा व तणावे,
\v 19 पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”
\s5
\v 20 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.
\v 21 नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
\v 22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगडया असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
\s5
\v 23 ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
\v 24 चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.
\s5
\v 25 ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
\v 26 आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ति होऊन त्यांना बुध्दि झाली, त्या सर्वानी बकऱ्याचे केस कातले.
\s5
\v 27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
\v 28 दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.
\v 29 परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वासाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली त्यांनीही अर्पणे आणली.
\s5
\v 30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, पहा, परमेश्वराने यहूदा वंशातील उरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.
\v 31 आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दि, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
\v 32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.
\v 33 तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागीरीची कामे करील.
\s5
\v 34 परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्याच्याठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
\v 35 कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.
\s5
\c 36
\p
\v 1 “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्रस्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुध्दी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यानी हे बांधकाम करावे.”
\s5
\v 2 नंतर बसालेल व अहलियाब ह्याना आणि ज्या ज्ञानी मनुष्याच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ति झाली होती, त्यांना मोशेने बोलावले.
\v 3 आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पणे आणले होते ते त्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला.
\v 4 शेवटी मग सर्व बुध्दीमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले.
\s5
\v 5 आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करावयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!
\v 6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये,” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली.
\v 7 त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.
\s5
\v 8 मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करूब काढले.
\v 9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.
\v 10 त्यांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे केले.
\s5
\v 11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.
\v 12 त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
\v 13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल आकडे बनविले; त्या आंकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवासमंडप तयार झाला.
\s5
\v 14 नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
\v 15 ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद होते.
\v 16 त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
\v 17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
\s5
\v 18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आंकडे केले.
\v 19 मग त्यांनी पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
\s5
\v 20 पवित्र निवासमंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या.
\v 21 प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.
\v 22 त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या.
\v 23 निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फळ्या केल्या;
\s5
\v 24 त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या त्यांनी केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या.
\v 25 त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या.
\v 26 त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन दोन उथळ्या.
\s5
\v 27 निवासमंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फळ्या केल्या,
\v 28 आणि मागच्या बाजूस निवासमंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फळ्या त्यांनी केल्या.
\s5
\v 29 ह्या फळ्या खालपासून दोन दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या.
\v 30 ह्याप्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखालीदोन दोन उथळ्या होत्या.
\s5
\v 31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
\v 32 दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
\v 33 आणि त्यांनी फव्व्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
\v 34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
\s5
\v 35 मग त्यांनी निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब काढली,
\v 36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले; त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या चार उथळ्या ओतल्या.
\s5
\v 37 मग त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला.
\v 38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पांच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पांच उथळ्या बनविल्या.
\s5
\c 37
\p
\v 1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
\v 2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला.
\v 3 त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या.
\s5
\v 4 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढविले.
\v 5 कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
\v 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
\s5
\v 7 बसालेलाने सोने घडवून दोन करूब बनविले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले.
\v 8 त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांस बनविले.
\v 9 त्या करूबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टि दयासनाकडे लागलेली होती.
\s5
\v 10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.
\v 11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला;
\v 12 आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
\v 13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
\s5
\v 14 ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
\v 15 मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले;
\v 16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.
\s5
\v 17 त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली.
\v 18 ह्या दीपवृक्षाला एकाबाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
\v 19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाहि बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
\s5
\v 20 दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.
\v 21 ह्या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखापैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती.
\v 22 शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता.
\s5
\v 23 त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
\v 24 त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची त्याने बनवली.
\s5
\v 25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.
\v 26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
\s5
\v 27 वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगाला लावल्या.
\v 28 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
\v 29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.
\s5
\c 38
\p
\v 1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.
\v 2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली.
\v 3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
\s5
\v 4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.
\v 5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;
\s5
\v 6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले.
\v 7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
\s5
\v 8 दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
\s5
\v 9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.
\v 10 तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
\s5
\v 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
\v 12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याहि होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
\s5
\v 13 पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती;
\v 14 अंगणाच्या फाटकाच्या एकाबाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन उथळ्या होत्या;
\v 15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूस व त्या बाजूस पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याहि तीन तीन होत्या.
\v 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
\s5
\v 17 खांबाच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
\v 18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पांच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पांच हात असावी.
\v 19 तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर अाधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.
\v 20 निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
\s5
\v 21 निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही.
\v 22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे उरीचा पुत्र बसालेल याने बनविल्या;
\v 23 तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, व जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता.
\s5
\v 24 पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते. आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.
\v 25 मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
\v 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येकी एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
\s5
\v 27 त्यांनी ती चांदी पवित्रस्थानातील शंभर उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.
\v 28 बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
\v 29 सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.
\s5
\v 30 त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्या करता;
\v 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.
\s5
\c 39
\p
\v 1 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानांतील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
\s5
\v 2 त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
\v 3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतात व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.
\s5
\v 4 त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
\v 5 एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली.
\v 7 इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 8 त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
\v 9 तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
\s5
\v 10 त्यात रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
\v 11 दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणि व हिरा;
\v 12 तिसऱ्या रांगेत तृणमणि, सूर्यकांत व पद्मराग;
\v 13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
\s5
\v 14 इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक या प्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशाच्या संख्येइतकी एकेका रत्नावर एकेका मुलाचे नांव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
\v 15 दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
\v 16 सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
\s5
\v 17 ऊपपटाऱ्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
\v 18 पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांनी दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
\s5
\v 19 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
\v 20 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
\s5
\v 21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावरून ऊरपट घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
\s5
\v 22 नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयाचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
\v 23 त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
\v 24 मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
\s5
\v 25 नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरु मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
\v 26 सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
\s5
\v 27 अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
\v 28 आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
\v 29 मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निव्व्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 30 मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
\v 31 ती मंदिला भोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 32 अशाप्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
\v 33 मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणिला. तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे आकड्या, फळया, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
\v 34 आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशाची कातडी वे अंतरपट;
\v 35 साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
\s5
\v 36 मेज, त्यावरील सर्व सामान व पवित्र समक्षतेची भाकर;
\v 37 शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
\v 38 सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
\v 39 पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
\s5
\v 40 अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य:
\v 41 पवित्रस्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवाकरण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
\s5
\v 42 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
\v 43 लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
\s5
\c 40
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
\s5
\v 3 साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
\v 4 मग मेज मध्ये आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
\s5
\v 5 साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
\v 6 दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
\v 7 दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यात पाणी भर.
\s5
\v 8 सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
\v 9 अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
\v 10 होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
\v 11 गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
\s5
\v 12 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
\v 13 अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
\s5
\v 14 त्याच्या पुत्रांजवळ बोलावून अंगरखे घाल.
\v 15 त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
\v 16 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
\s5
\v 17 दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
\v 18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
\v 19 त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
\v 20 मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
\s5
\v 21 त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\v 22 मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूस दर्शनमंडपात पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
\v 23 त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\v 24 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
\v 25 नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\s5
\v 26 त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
\v 27 नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
\s5
\v 28 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
\v 29 त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\v 30 त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले.
\s5
\v 31 मोशे, अहरोन व अहरोनाची पुत्र त्यात आपआपले हातपाय धूत असत;
\v 32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
\v 33 त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्याप्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
\s5
\v 34 दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
\v 35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
\s5
\v 36 पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत;
\v 37 परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
\v 38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.

1707
03-LEV.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1707 @@
\id LEV
\ide UTF-8
\h लेवीय
\toc1 लेवीय
\toc2 लेवीय
\toc3 lev
\mt1 लेवीय
\s5
\c 1
\p
\v 1 परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्याला म्हटले,
\v 2 "इस्राएली लोकांना असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा.
\p
\s5
\v 3 जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.
\v 4 त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.
\p
\s5
\v 5 त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे मुलगे, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.
\v 6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.
\p
\s5
\v 7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
\v 8 अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी;
\v 9 त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्ववारे केलेले अर्पण होय.
\p
\s5
\v 10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.
\v 11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे.
\p
\s5
\v 12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी,
\v 13 त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय;
\p
\s5
\v 14 जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिले अर्पावी.
\v 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
\p
\s5
\v 16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
\v 17 त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्ववारे केलेले होमार्पण होय.
\s5
\c 2
\p
\v 1 जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यात तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;
\v 2 मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्ववारे केलेले होमार्पण होय.
\v 3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्ववारे केलेले होमार्पण होय.
\p
\s5
\v 4 जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
\v 5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.
\p
\s5
\v 6 त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओत; हे अन्नार्पण होय.
\v 7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.
\p
\s5
\v 8 अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.
\v 9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्ववारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.
\v 10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले हे अर्पण परमेश्वराला परमपवित्र आहे.
\p
\s5
\v 11 खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वराला अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
\v 12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
\v 13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
\p
\s5
\v 14 जर परमेश्वराकरता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय.
\v 15 त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे अन्नार्पण होय.
\v 16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम जाळावा; हे परमेश्वरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
\v 2 त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
\p
\s5
\v 3 परमेश्वराला शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
\v 4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
\v 5 व ह्या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
\p
\s5
\v 6 परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणसाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
\v 7 जर त्याला कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
\v 8 त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
\p
\s5
\v 9 अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
\v 10 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
\v 11 मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले अर्पण आहे,
\p
\s5
\v 12 “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
\v 13 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
\v 14 त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
\p
\s5
\v 15 दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
\v 16 मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा ह्या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वराला आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
\v 17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”
\s5
\c 4
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
\v 3 जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकावंर दोष येईल, असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
\p
\s5
\v 4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
\v 5 मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
\p
\s5
\v 6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
\v 7 मग याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे;
\p
\s5
\v 8 आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
\v 9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
\v 10 शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
\p
\s5
\v 11 गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
\v 12 अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
\p
\s5
\v 13 इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
\v 14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.
\v 15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.
\p
\s5
\v 16 नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
\v 17 मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
\p
\s5
\v 18 मग त्याने परमेश्वरासमोर दर्शनमंडपात असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
\v 19 त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा;
\p
\s5
\v 20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा करील.
\v 21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.
\p
\s5
\v 22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,
\v 23 व त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा;
\p
\s5
\v 24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
\v 25 मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
\p
\s5
\v 26 शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने ह्या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.
\p
\s5
\v 27 सामान्य माणसांमधून कोणी चुकून पाप केल्यामुळे, परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी ठरला;
\v 28 आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी;
\p
\s5
\v 29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
\v 30 मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे;
\p
\s5
\v 31 आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्याला क्षमा करील.
\p
\s5
\v 32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
\v 33 त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्याला वधावे.
\p
\s5
\v 34 याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
\v 35 त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होइल.
\s5
\c 5
\p
\v 1 जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
\v 2 किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
\p
\s5
\v 3 त्याचप्रमाणे माणसाशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला नकळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
\v 4 किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
\p
\s5
\v 5 तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
\v 6 आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
\p
\s5
\v 7 त्याला कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
\v 8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
\v 9 पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.
\p
\s5
\v 10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल.
\p
\s5
\v 11 “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.
\p
\s5
\v 12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.
\v 13 अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचो उरलेले सपिठ याजकाचे होईल.”
\p
\s5
\v 14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 15 “परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमणे असावे; हे पापार्पण होय.
\p
\v 16 ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पांचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
\p
\s5
\v 17 परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
\v 18 त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
\v 19 हे दोषार्पण होय परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”
\s5
\c 6
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव ह्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.
\v 3 किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;
\v 4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,
\p
\s5
\v 5 किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा;
\v 6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
\v 7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.
\p
\s5
\v 8 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 9 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
\p
\s5
\v 10 मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.
\v 11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी;
\p
\s5
\v 12 परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझवू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
\v 13 वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
\p
\s5
\v 14 हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;
\v 15 याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपिठ, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय,
\p
\s5
\v 16 अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
\v 17 ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे.
\v 18 ह्या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; ह्या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
\p
\s5
\v 19 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
\v 20 "अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वराला अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
\p
\s5
\v 21 ते तव्यावर तेलात परतावे त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.
\v 22 त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून ह्या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.
\v 23 याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये."
\p
\s5
\v 24 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 25 "अहरोन व त्याचे मुलगे ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
\v 26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
\p
\s5
\v 27 ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे.
\v 28 मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
\p
\s5
\v 29 याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;
\v 30 आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपात पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.
\s5
\c 7
\p
\v 1 दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.
\v 2 ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा, आणि याजकाने त्या बळीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे.
\v 3 त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी,
\v 4 दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत,
\p
\s5
\v 5 ह्या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
\v 6 याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बळी खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.
\p
\s5
\v 7 दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.
\v 8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बळीच्या कातड्यावरही हक्क असेल.
\p
\s5
\v 9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
\v 10 प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.
\p
\s5
\v 11 परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
\v 12 त्याला तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
\p
\s5
\v 13 त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
\v 14 ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.
\p
\s5
\v 15 त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.
\v 16 यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.
\p
\s5
\v 17 त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
\v 18 जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
\p
\s5
\v 19 ज्या मांसाला कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
\v 20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वराला अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
\p
\s5
\v 21 एखादा माणूस जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करील मग ती अशुद्धता माणसाची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
\p
\s5
\v 22 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 23 सर्व इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
\v 24 मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये.
\p
\s5
\v 25 परमेश्वराला होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे
\v 26 “तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
\v 27 जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”
\p
\s5
\v 28 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 29 “इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
\v 30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
\p
\s5
\v 31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल.
\v 32 तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
\p
\s5
\v 33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
\v 34 मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”
\p
\s5
\v 35 परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
\v 36 परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे.
\p
\s5
\v 37 हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयीचे आहे;
\v 38 इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत ह्या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.
\s5
\c 8
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
\v 3 दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.
\p
\s5
\v 4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.
\v 5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”
\p
\s5
\v 6 मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
\v 7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.
\p
\s5
\v 8 मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;
\v 9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
\p
\s5
\v 10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.
\v 11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडले व पवित्र केले.
\p
\s5
\v 12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्याला पवित्र केले.
\v 13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\p
\s5
\v 14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
\v 15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. ह्या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
\p
\s5
\v 16 गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
\v 17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
\p
\s5
\v 18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
\v 19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
\p
\s5
\v 20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.
\v 21 त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
\p
\s5
\v 22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
\v 23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
\v 24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
\p
\s5
\v 25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
\v 26 परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
\v 27 हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
\p
\s5
\v 28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्ववारे परमेश्वराला केलेले अर्पण हे होते.
\v 29 मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
\p
\s5
\v 30 मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
\p
\s5
\v 31 मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे; तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
\v 32 मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
\v 33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.
\p
\s5
\v 34 परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.
\v 35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”
\v 36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
\s5
\c 9
\p
\v 1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले.
\v 2 तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर;
\p
\s5
\v 3 आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत;
\v 4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बळी म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे.”
\v 5 मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
\p
\s5
\v 6 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हाला दिसेल.”
\v 7 मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकाकडील बळीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
\p
\s5
\v 8 तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.
\v 9 मग अहरोनाचे मुलगे रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
\p
\s5
\v 10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.
\v 11 मग अहरोनाने मांस कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
\p
\s5
\v 12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
\v 13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
\v 14 त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
\p
\s5
\v 15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.
\v 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.
\v 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
\p
\s5
\v 18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
\v 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
\p
\s5
\v 20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.
\v 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
\p
\s5
\v 22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
\v 23 मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले;
\v 24 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
\s5
\c 10
\p
\v 1 मग अहरोनाचे, मुलगे नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात अग्नी पेटवला व त्यात धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;
\v 2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
\p
\s5
\v 3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील;
\p त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे,
\p मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.
\m तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”
\v 4 अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
\p
\s5
\v 5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
\v 6 मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
\v 7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
\p
\s5
\v 8 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
\v 9 “जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.
\v 10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;
\v 11 याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.”
\p
\s5
\v 12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
\v 13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
\p
\s5
\v 14 “त्याप्रमाणे तू तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
\v 15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
\p
\s5
\v 16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
\v 17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हाला दिले होते;
\v 18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”
\p
\s5
\v 19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
\v 20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
\s5
\c 11
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:
\v 2 इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
\p
\s5
\v 3 ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
\v 4 काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशूद्ध समजावा, जसे उंट, हा रवंथ करतो पंरतू त्याचा खुर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
\p
\s5
\v 5 शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा.
\v 6 ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा.
\v 7 डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे.
\v 8 ह्या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवाला शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
\p
\s5
\v 9 “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
\v 10 जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टिने ते अयोग्य आहेत.
\p
\s5
\v 11 ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
\v 12 जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
\p
\s5
\v 13 देवाच्या दृष्टिने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
\v 14 घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
\v 15 निरनिराळ्या जातीचे कावळे,
\v 16 शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
\p
\s5
\v 17 पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
\v 18 पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड,
\v 19 करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
\p
\s5
\v 20 जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
\v 21 परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.
\v 22 त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.
\v 23 परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
\p
\s5
\v 24 त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवाला शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;
\v 25 जो कोणी मेलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 26 ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत;
\v 27 चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 28 जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
\p
\s5
\v 29 जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
\v 30 चौपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिज्या सरडा.
\p
\s5
\v 31 हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
\v 33 त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
\p
\s5
\v 34 अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे.
\v 35 त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
\p
\s5
\v 36 झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध होईल.
\v 37 त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
\v 38 परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
\p
\s5
\v 39 खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 40 कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 41 “जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
\v 42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
\p
\s5
\v 43 कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका!
\v 44 कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
\v 45 मी परमेश्वर, ज्याने तुम्हाला मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
\p
\s5
\v 46 प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत.
\v 47 ह्या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी, तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्याच्यातील भेद तुम्हास समजावा.
\s5
\c 12
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.
\v 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
\p
\s5
\v 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.
\v 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.
\p
\s5
\v 6 तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.
\p
\s5
\v 7 मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.
\v 8 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल;
\s5
\c 13
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
\v 2 एखाद्या माणसाच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
\p
\s5
\v 3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या माणसाची तपासणी झाल्यावर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
\v 4 त्या माणसाच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या माणसाला सात दिवस इतर माणसापासून वेगळे एकटे ठेवावे.
\p
\s5
\v 5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
\v 6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
\p
\s5
\v 7 परंतु त्या माणसाने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
\v 8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
\p
\s5
\v 9 एखाद्या माणसाला महारोगाचा चट्टा असेल तर त्याला याजकाकडे न्यावे.
\v 10 याजकाने त्याला तपासावे; आणि जर त्याच्या कातडीला पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
\v 11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
\p
\s5
\v 12 एखाद्या माणसाच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्याला अंगभर तपासावे,
\v 13 याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्याला दिसून आले तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
\v 14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
\p
\s5
\v 15 याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
\v 16 परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
\v 17 याजकाने पुन्हा त्याला तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
\p
\s5
\v 18 कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
\v 19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
\v 20 याजकाने त्याला तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.
\p
\s5
\v 21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 22 त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे.
\v 23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या माणसाला शुद्ध ठरवावे.
\p
\s5
\v 24 एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.
\v 25 तर याजकाने त्याला तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
\p
\s5
\v 26 परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 27 सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;
\v 28 परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
\p
\s5
\v 29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला,
\v 30 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ती चाई. आहे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
\p
\s5
\v 31 तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे;
\p
\s5
\v 32 सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
\v 33 तर त्या माणसाने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या माणसाला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
\p
\s5
\v 34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या माणसाने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.
\p
\s5
\v 35 परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
\v 36 तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या माणसाला अशुद्ध ठरवावे.
\p
\v 37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
\p
\s5
\v 38 कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.
\v 39 तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
\p
\s5
\v 40 कोणा माणसाचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो माणूस शुद्ध होय.
\v 41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो माणूस शुद्ध आहे.
\p
\s5
\v 42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
\v 43 मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
\v 44 तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.
\p
\s5
\v 45 ज्या माणसाला महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांना इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.
\v 46 जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
\p
\s5
\v 47 “एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,
\v 48 किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमाड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला पडला.
\v 49 आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा;
\p
\s5
\v 50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.
\v 51 त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.
\v 52 ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे;
\p
\s5
\v 53 परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
\v 54 याजकाने लोकांना ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
\v 55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
\p
\s5
\v 56 परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
\v 57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
\v 58 परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाहीतर मग ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
\p
\s5
\v 59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
\s5
\c 14
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 महारोग बरा झालेल्या लोकांना शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे.
\p
\s5
\v 3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.
\v 4 तो बरा झाला असल्यास याजकाने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे.
\v 5 मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी.
\p
\s5
\v 6 याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;
\v 7 आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या माणसावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्याला सोडून द्यावे;
\p
\s5
\v 8 मग शुद्ध ठरवावयाच्या माणसाने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे;
\v 9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
\p
\s5
\v 10 आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक
\fe +
\fr 14.10
\ft त्या काळाची मापे
\fe* लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;
\v 11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या माणसाला, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
\p
\s5
\v 12 मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे;
\v 13 मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.
\p
\s5
\v 14 मग याजकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
\p
\v 15 याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
\v 16 मग याजकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.
\p
\s5
\v 17 त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
\v 18 तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या माणसासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
\p
\s5
\v 19 मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या माणसाच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;
\v 20 मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या माणसासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
\p
\s5
\v 21 परंतु तो माणूस गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा मैदा आणि एक लोगभर तेल आणावे;
\v 22 आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.
\v 23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
\p
\s5
\v 24 मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
\v 25 त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि त्याने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्यांला लावावे.
\p
\s5
\v 26 याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
\v 27 मग याजकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
\p
\s5
\v 28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे;
\p
\v 29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या माणसासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.
\p
\s5
\v 30 मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
\p
\v 31 त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहीत करावी; ह्याप्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो माणूस शुद्ध होईल.
\v 32 अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या माणसाला आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या माणसाच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.
\p
\s5
\v 33 परमेश्वर मोशे व अहरोन ह्याना असेही म्हणाला,
\v 34 कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,
\v 35 तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते.
\p
\s5
\v 36 मग याजकाने लोकांना घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
\v 37 तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.
\v 38 तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.
\p
\s5
\v 39 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्ठा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
\v 40 चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांना आज्ञा द्यावी.
\p
\s5
\v 41 मग त्याने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.
\v 42 त्या माणसाने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
\p
\s5
\v 43 जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला.
\v 44 तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्ठा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्ठा होय; ते घर अशुद्ध आहे.
\p
\s5
\v 45 मग त्या माणसाने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.
\v 46 आणि घर बंद असताना त्यात कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;
\v 47 त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.
\p
\s5
\v 48 घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्ठा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्ठा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
\p
\s5
\v 49 त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
\v 50 त्याने एक पक्षी वाहात्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
\v 51 मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहात्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
\p
\s5
\v 52 त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जीवंत पक्षी, गंधसरूचे लाकुड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.
\v 53 मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल."
\p
\s5
\v 54 सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई,
\v 55 कपड्यावरील किंवा घराचा महारोग,
\v 56 सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वासंबधीचे हे नियम आहेत;
\v 57 हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.
\s5
\c 15
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
\v 3 त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
\p
\s5
\v 4 स्त्राव होणारा माणूस ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
\v 5 जो कोणी त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 6 स्त्राव होणारा माणूस बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 7 स्त्राव होणाऱ्या माणसाच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 8 स्त्राव होणारा माणूस जर एखाद्या शुद्ध माणसावर थुंकला तर त्या शुद्ध माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 9 स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
\p
\s5
\v 10 त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 11 स्त्राव होणारा माणूस पाण्याने हात न धुता कोणाला शिवला तर त्या दुसऱ्या माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 12 परंतु स्त्राव होणारा माणूस एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
\p
\s5
\v 13 स्त्राव होणारा माणूस आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
\v 14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
\v 15 मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या माणसाच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
\p
\s5
\v 16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 17 ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
\v 18 स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 19 एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;
\v 20 ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
\p
\s5
\v 21 जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 22 ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\v 23 तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 24 अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
\p
\s5
\v 25 एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्त्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.
\v 26 तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी.
\v 27 जर कोणी त्या वस्तूंना शिवेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
\p
\s5
\v 28 त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.
\v 29 मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
\v 30 मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
\p
\s5
\v 31 ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!"
\p
\s5
\v 32 स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;
\v 33 आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.
\s5
\c 16
\p
\v 1 अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
\v 2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्याला सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो;
\p
\s5
\v 3 परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
\v 4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
\v 5 मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
\p
\s5
\v 6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
\v 7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
\p
\s5
\v 8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी
\v 9 ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
\v 10 पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
\p
\s5
\v 11 अहरोनाने अापल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:हासाठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.
\p
\s5
\v 12 नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
\v 13 त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही;
\p
\s5
\v 14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
\p
\s5
\v 15 मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
\v 16 अाणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे ह्या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वसती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.
\p
\s5
\v 17 अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
\v 18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
\v 19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
\p
\s5
\v 20 जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
\v 21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे.
\v 22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
\p
\s5
\v 23 मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपात जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
\v 24 मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
\p
\s5
\v 25 मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.
\v 26 ज्या माणसाने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.
\p
\s5
\v 27 पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
\v 28 ज्या माणसाने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; यानंतर तो छावणीत येऊ शकतो.
\p
\s5
\v 29 तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशीय असो;
\v 30 हे यासाठी की ह्या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
\v 31 तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.
\p
\s5
\v 32 तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
\v 33 त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्याच्यासाठी प्रायश्चित करावे.”
\p
\s5
\v 34 इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.
\s5
\c 17
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 “अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे तीही:
\v 3 इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
\v 4 परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\p
\s5
\v 5 ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
\v 6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
\p
\s5
\v 7 आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
\p
\s5
\v 8 तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
\v 9 तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.
\p
\s5
\v 10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
\v 11 कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हाला दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.
\p
\s5
\v 12 म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
\v 13 इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
\p
\s5
\v 14 कारण प्राणीमात्रांच्या जिवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्राएल लोकांना म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.
\p
\s5
\v 15 “कोणी माणसाणे मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; म्हणजे तो शुद्ध होईल.
\v 16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाहीतर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”
\s5
\c 18
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 3 तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.
\p
\s5
\v 4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
\v 7 तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.
\v 8 तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.
\p
\s5
\v 9 तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको.
\v 10 तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!
\v 11 जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
\p
\s5
\v 12 तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
\v 13 तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
\v 14 तू तुझ्या चुलत्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.
\p
\s5
\v 15 तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे तिच्याशी शारीरिक संबध ठेवू नको.
\v 16 तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको.
\p
\s5
\v 17 एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे.
\v 18 तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
\p
\s5
\v 19 स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.
\v 20 तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.
\p
\s5
\v 21 तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
\p
\s5
\v 22 स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
\v 23 कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
\p
\s5
\v 24 अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुझ्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अश्याच कृत्यांनी अशुद्ध झाले.
\v 25 त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाश्यांचा त्याग करीत आहे.
\p
\s5
\v 26 ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.
\v 27 कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.
\v 28 जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
\p
\s5
\v 29 जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\v 30 इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\c 19
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "सर्व इस्राएलाच्या मंडळीतील लोकांना सांग की, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
\v 3 तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\v 4 तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 5 तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल.
\v 6 त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
\v 7 तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही.
\v 8 कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
\p
\s5
\v 9 तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक काढू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका.
\v 10 आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 11 तुम्ही चोरी करु नये.
\p कोणाला फसवू नये.
\p एकमेकाशी कपटाने बोलू नये.
\p
\v 12 तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 13 आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
\p
\v 14 बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 15 न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
\p
\v 16 आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 17 आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
\p
\v 18 लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 19 तुम्ही माझे नियम पाळा.
\p आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका;
\p दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका;
\p भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका.
\p
\s5
\v 20 एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये;
\p
\v 21 हे पाप केलेल्या माणसाने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;
\v 22 आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
\p
\s5
\v 23 तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत.
\v 24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.
\v 25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 26 तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका;
\p तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
\p
\v 27 आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका.
\p
\v 28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊन नका. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 29 तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
\m
\v 30 तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 31 सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हाला अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 32 वडीलधाऱ्या माणसांना मान द्या; वृद्ध माणूस घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
\s5
\v 33 कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका.
\p
\v 34 तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एकेकाळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 35 लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका.
\v 36 तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले!
\v 37 “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!”
\s5
\c 20
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएलांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्या परकियांपैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा!
\p
\s5
\v 3 मीही त्या माणसाच्या विरूद्ध होईन! आणि त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला!
\v 4 मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्याला जिवे मारणार नाहीत.
\v 5 तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरूद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्यामागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
\p
\s5
\v 6 जो माणूस व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे मी त्याच्या विरूद्ध होईन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
\v 7 म्हणून शुद्ध व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 8 तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे!
\p
\v 9 जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
\p
\s5
\v 10 जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे.
\p
\v 11 जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\p
\v 12 एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\p
\s5
\v 13 एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
\p
\v 14 कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
\p
\s5
\v 15 कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
\p
\v 16 कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\p
\s5
\v 17 कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
\p
\v 18 ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीरसंबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे.
\p
\s5
\v 19 आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
\p
\v 20 कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
\p
\v 21 आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती होणार नाही.
\p
\s5
\v 22 म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
\p
\v 23 ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका.
\p
\s5
\v 24 मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यात दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करून मी तुम्हाला माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\v 25 म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्याच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.
\p
\s5
\v 26 तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
\p
\s5
\v 27 कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
\s5
\c 21
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, "अहरोनाचे मुलगे, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मेलेल्या माणसाला स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.
\v 2 परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
\v 3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
\p
\s5
\v 4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये.
\p
\v 5 याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
\v 6 त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
\p
\s5
\v 7 याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये.
\p
\v 8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे, त्याला तू पवित्र लेखावे; कारण तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
\p
\v 9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
\p
\s5
\v 10 आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
\v 11 त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या बापाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
\v 12 त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 13 मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
\v 14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
\v 15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांत आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्याला पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे."
\p
\s5
\v 16 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 17 "अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
\p
\s5
\v 18 शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
\v 19 मोडक्या पायाचा, थोटा,
\v 20 कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
\v 21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.
\p
\s5
\v 22 तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
\v 23 परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!"
\v 24 तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्राएल लोक ह्याना हे सर्व सांगितले.
\s5
\c 22
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "अहरोन व त्याचे मुलगे ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर राहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
\v 3 तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्राएल लोकांनी समर्पीत केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये, त्याला मजसमोरुन दूर करावे. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 4 अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला माणूस,
\v 5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या माणसास स्पर्श केल्यामुळे
\v 6 याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
\p
\s5
\v 7 सूर्य मावळल्यावरच तो माणूस शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
\v 8 आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
\p
\v 9 त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; ती ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना ह्या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
\p
\s5
\v 10 फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
\v 11 परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
\p
\s5
\v 12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या माणसाबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
\v 13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या बापाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.
\p
\s5
\v 14 एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यात घालून याजकास द्यावी.
\p
\v 15 इस्राएल लोक परमेश्वराला अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
\v 16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!
\p
\s5
\v 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 18 अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
\v 19 व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!
\p
\s5
\v 20 परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
\p
\v 21 एखाद्या माणसाला आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वराला गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
\s5
\v 22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
\v 23 गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
\p
\s5
\v 24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
\v 25 देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही विदेशी लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!
\p
\s5
\v 26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 27 वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
\p
\s5
\v 28 परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
\v 29 परमेश्वराकरिता तुम्हाला उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
\v 30 अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 31 तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
\p
\v 32 तुम्ही माझ्या पवित्र नांवाचा अनादर करू नये. माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
\v 33 मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!"
\s5
\c 23
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण असे:
\p
\s5
\v 3 सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
\p
\s5
\v 4 परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
\v 5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
\v 6 त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).
\p
\s5
\v 7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
\v 8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये."
\p
\s5
\v 9 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 10 "इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
\v 11 याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बाथाच्या पुढच्या दिवशी ती याजकाने आेवाळावी.
\p
\s5
\v 12 पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे;
\v 13 तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन द्राक्षारस अर्पावा.
\v 14 तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.
\p
\s5
\v 15 तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
\v 16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
\p
\s5
\v 17 त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळाण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
\v 18 एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वराला संतोष होईल.
\p
\s5
\v 19 आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पवित.
\v 20 याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
\v 21 त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय.
\p
\s5
\v 22 तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!"
\p
\s5
\v 23 आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 24 "इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
\v 25 तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वराला अर्पण अर्पावे."
\p
\s5
\v 26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 27 "सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे.
\p
\s5
\v 28 त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
\v 29 त्यादिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
\p
\s5
\v 30 त्यादिवशी कोणाही माणसाने जर कसलेही काम केले तर मी देव त्याला त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
\v 31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
\v 32 तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा."
\p
\s5
\v 33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
\v 34 "इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
\p
\s5
\v 35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये.
\v 36 सात दिवस परमेश्वराला अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वराला अर्पण अर्पावे; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
\p
\s5
\v 37 परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यात योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वराला अर्पावे.
\v 38 परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
\p
\s5
\v 39 जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
\p
\s5
\v 40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा.
\v 41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
\p
\s5
\v 42 तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात राहावे,
\v 43 म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!"
\v 44 तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांना कळवले.
\s5
\c 24
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
\p
\s5
\v 3 अहरोनाने दर्शनमंडपात साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
\v 4 त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.
\p
\s5
\v 5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
\v 6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
\p
\s5
\v 7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वराला अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल.
\v 8 दर शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
\v 9 ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय."
\p
\s5
\v 10 त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला.
\v 11 तो इस्राएली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
\v 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.
\p
\s5
\v 13 मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला,
\v 14 "तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करून मारुन टाकावे.
\p
\s5
\v 15 तू इस्राएल लोकांना अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
\v 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\p
\s5
\v 17 जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारील तर त्याला अवश्य जिवे मारावे.
\v 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.
\p
\s5
\v 19 जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
\v 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी.
\v 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
\p
\s5
\v 22 परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!"
\v 23 मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
\s5
\c 25
\p
\v 1 सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 "इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा.
\p
\s5
\v 3 सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;
\v 4 पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.
\p
\s5
\v 5 तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.
\v 6 तरी तुम्हाला शब्बाथाच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल;
\v 7 आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.
\p
\s5
\v 8 तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल.
\v 9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे;
\p
\s5
\v 10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
\p
\s5
\v 11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;
\v 12 कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
\p
\s5
\v 13 ह्या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
\p
\v 14 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
\p
\s5
\v 15 तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हाला जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हाला विकत आहे.
\v 16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हाला खरोखरी फक्त काही पिकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल.
\v 17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!
\p
\s5
\v 18 माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल;
\v 19 आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल.
\p
\s5
\v 20 तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही.
\v 21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षाचे पीक देईल.
\v 22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.
\p
\s5
\v 23 जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
\v 24 म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी.
\v 25 तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
\p
\s5
\v 26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या माणसाला आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.
\v 27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्याला शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
\v 28 पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
\p
\s5
\v 29 एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
\v 30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
\p
\s5
\v 31 तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
\v 32 परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
\p
\s5
\v 33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्याला सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
\v 34 लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
\p
\s5
\v 35 तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;
\v 36 त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे.
\v 37 तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.
\v 38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.
\p
\s5
\v 39 तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्याला गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;
\v 40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
\v 41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे;
\p
\s5
\v 42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये.
\v 43 तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.
\v 44 तुमच्या दासदासी; तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे;
\p
\s5
\v 45 तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील;
\v 46 तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये.
\p
\s5
\v 47 तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
\v 48 तर त्यांची विक्री झाल्यावरही त्याला स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडवता येईल;
\p
\s5
\v 49 किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्याला सोडवता येईल किंवा तो स्वत:च धनवान झाला तर त्याला स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करून घेता येईल.
\v 50 त्याला विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्याला फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!
\p
\s5
\v 51 योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील.
\v 52 योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.
\p
\s5
\v 53 त्याने आपल्या मालकापाशी सालादाराप्रमाणे राहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये.
\v 54 जरी त्या माणसाला पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलबाळे मुक्त होतील.
\v 55 कारण इस्राएल लोक माझे दास आहेत; त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
\s5
\c 26
\p
\v 1 तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
\v 2 तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.
\p
\s5
\v 3 तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,
\v 4 तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
\p
\s5
\v 5 तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल.
\v 6 मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.
\p
\s5
\v 7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
\v 8 तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
\p
\s5
\v 9 मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
\v 10 तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
\p
\s5
\v 11 मी तुम्हामध्ये माझी वसती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.
\v 12 मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
\v 13 मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!
\p
\s5
\v 14 परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
\v 15 तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,
\p
\s5
\v 16 जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही तुम्हाला पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
\v 17 मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
\p
\s5
\v 18 ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन.
\v 19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
\v 20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
\p
\s5
\v 21 तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
\v 22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
\p
\s5
\v 23 एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,
\v 24 तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन.
\p
\s5
\v 25 मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
\v 26 मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
\p
\s5
\v 27 एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
\v 28 तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन!
\p
\s5
\v 29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
\v 30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
\p
\s5
\v 31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
\v 32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
\v 33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
\p
\s5
\v 34 जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रुंच्या देशांत राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.
\v 35 देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
\v 36 तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
\p
\s5
\v 37 कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
\v 38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
\v 39 तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
\p
\s5
\v 40 परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.
\v 41 ह्या कारणामुळे, मीही त्यांच्याविरूद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील.
\v 42 तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी अाठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
\p
\s5
\v 43 त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.
\p
\s5
\v 44 इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशांत असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे.
\v 45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!
\p
\s5
\v 46 हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.
\s5
\c 27
\p
\v 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे:
\p
\s5
\v 3 वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे,
\v 4 आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे;
\p
\s5
\v 5 मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
\v 6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
\p
\s5
\v 7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
\v 8 परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
\p
\s5
\v 9 काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
\v 10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
\p
\s5
\v 11 काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
\v 12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
\v 13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
\p
\s5
\v 14 एखाद्याने आपले घर परमेश्वराला वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
\v 15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
\p
\s5
\v 16 एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
\p
\s5
\v 17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
\v 18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
\p
\s5
\v 19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
\v 20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
\v 21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
\p
\s5
\v 22 स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,
\v 23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
\p
\s5
\v 24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
\v 25 मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
\p
\s5
\v 26 लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
\v 27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
\p
\s5
\v 28 लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
\v 29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
\p
\s5
\v 30 भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
\v 31 म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
\p
\s5
\v 32 गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.
\v 33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे ह्या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्याला बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
\p
\s5
\v 34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच आहेत.

2666
04-NUM.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,2666 @@
\id NUM
\ide UTF-8
\h गणना
\toc1 गणना
\toc2 गणना
\toc3 num
\mt1 गणना
\s5
\c 1
\s सीनाय येथे झालेली इस्त्राएल लोकांची शिरगणती
\p
\v 1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,
\v 2 सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती करा; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी करा.
\v 3 वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
\p
\s5
\v 4 प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हाला मदत करील.
\v 5 तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे हीः
\q रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;
\v 6 शिमोन वंशातला सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल;
\p
\s5
\v 7 यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
\q
\v 8 इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;
\q
\v 9 जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;
\p
\s5
\v 10 योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.
\q
\v 11 बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान;
\p
\s5
\v 12 दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;
\q
\v 13 आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;
\q
\v 14 गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
\q
\v 15 नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा,
\p
\s5
\v 16 हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते;
\p
\s5
\v 17 ज्यांच्या नावाची नोंद होती त्या माणसांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;
\v 18 आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.
\v 19 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
\p
\s5
\v 20 इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली.
\v 21 रऊबेनाच्या वंशातले मोजलेले एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
\p
\s5
\v 22 शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
\v 23 शिमोन्याच्या वंशातले मोजलेले एकूण एकोणसाठ हजार तीनशे भरली.
\p
\s5
\v 24 गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
\v 25 गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.
\p
\s5
\v 26 यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
\v 27 यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.
\p
\s5
\v 28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
\v 29 इस्साखाराच्या वंशातले मोजलेले एकूण चौपन्न हजार चारशे भरली.
\p
\s5
\v 30 जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
\v 31 जबुलून वंशातील मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.
\p
\s5
\v 32 योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
\v 33 एफ्राइमाच्या वंशातले मोजलेले एकूण चाळीस हजार पाचशे भरली.
\p
\s5
\v 34 मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
\v 35 मनश्शेच्या वंशात मोजलेले एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.
\p
\s5
\v 36 बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
\v 37 बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण पस्तीस हजार चारशे भरली.
\p
\s5
\v 38 दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
\v 39 दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली.
\p
\s5
\v 40 आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
\v 41 आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.
\p
\s5
\v 42 नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
\v 43 नफतालीच्या वंशातील मोजलेले एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.
\p
\s5
\v 44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.
\v 45 इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
\v 46 ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
\s निवासमंडपाच्या सेवेसाठी लेव्यांची नेमणूक
\p
\s5
\v 47 इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती.
\v 48 परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,
\v 49 लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको;
\p
\s5
\v 50 लेवी लोकांना सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व सामानावर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व सामान वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.
\s5
\v 51 जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.
\v 52 इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ द्यावेत.
\p
\s5
\v 53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.
\v 54 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
\s5
\c 2
\s निरनिराळ्या वंशांचे डेरे आणि नेते
\p
\v 1 परमेश्वर, मोशे व अहरोन यांच्याशी पुन्हा बोलला, तो म्हणाला,
\v 2 इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे.
\p
\s5
\v 3 यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 4 त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
\p
\s5
\v 5 इस्साखार वंशाच्या लोकांनी यहूदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 6 त्याच्या दलात चौपन्न हजार चारशे लोक होते.
\p
\s5
\v 7 जबुलून वंशाच्या लोकांनीही यहूदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 8 त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.
\p
\s5
\v 9 यहूदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहूदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.
\p
\s5
\v 10 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 11 त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.
\p
\s5
\v 12 शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 13 त्याच्या दलात एकुणसाठ हजार तीनशे लोक होते.
\p
\s5
\v 14 गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 15 त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास लोक होते.
\p
\s5
\v 16 रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशे पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.
\p
\s5
\v 17 त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ रहावे.
\p
\s5
\v 18 एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 19 त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
\p
\s5
\v 20 मनश्शे वंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा.
\v 21 त्याच्या दलात बत्तीस दोनशे लोक होते.
\p
\s5
\v 22 बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा.
\v 23 त्याच्या दलात पस्तीस हजार चारशे लोक होते.
\p
\s5
\v 24 एफ्राइम वंशाच्या छावणीत एकूण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.
\p
\s5
\v 25 दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर हा दानवंशाचा सरदार असावा.
\v 26 त्याच्या दलात बासष्ट हजार सातशे लोक होते.
\p
\s5
\v 27 आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.
\v 28 त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.
\p
\s5
\v 29 नफताली वंशाचे लोक. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.
\v 30 त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशे लोक होते.
\p
\s5
\v 31 दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशे लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे.
\p
\s5
\v 32 अशी इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास होती.
\v 33 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.
\p
\s5
\v 34 तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.
\s5
\c 3
\s लेव्यांची संख्या आणि त्यांची कर्तव्ये
\p
\v 1 जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असाः
\v 2 अहरोनाच्या मुलांची नावे हीः नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार.
\p
\s5
\v 3 अहरोनाचे हे मुलगे जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत
\v 4 परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
\p
\s5
\v 5 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 6 लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्याला मदत करण्यास हजर कर.
\p
\s5
\v 7 अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
\v 8 त्यांनी दर्शनमंडपातील सर्व सामानाची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी.
\p
\s5
\v 9 तू लेवींना अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे.
\v 10 “अहरोन व त्याचे मुलगे यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”
\p
\s5
\v 11 परमेश्वर मोशेशी बोलला तो म्हणाला,
\v 12 पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील.
\v 13 “सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”
\p
\s5
\v 14 परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 15 “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
\v 16 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.
\p
\s5
\v 17 लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.
\v 18 गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी.
\v 19 कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.
\v 20 मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
\p
\s5
\v 21 गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
\v 22 या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
\v 23 गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.
\p
\s5
\v 24 लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
\v 25 दर्शनमंडपातील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले.
\v 26 पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
\p
\s5
\v 27 कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
\v 28 या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
\v 29 कहाथी कुळांनी निवासमंडपाचा दक्षिणेस आपली छावणी उभारली.
\p
\s5
\v 30 उज्जियेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
\v 31 पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
\v 32 अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
\p
\s5
\v 33 मरारीपासून महली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
\v 34 या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष सहा हजार दोनशे होते.
\v 35 अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली.
\p
\s5
\v 36 मरारी वंशातील लोकांना पवित्र निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
\v 37 तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
\p
\s5
\v 38 मोशे, अहरोन व त्याचे मुलगे यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवासमंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
\v 39 लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.
\s लेवी आणि प्रथमजन्मलेल्यांसाठी द्यायची खंडणी
\p
\s5
\v 40 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
\v 41 आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
\s5
\v 42 तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
\v 43 मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
\p
\s5
\v 44 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
\v 45 इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.
\p
\s5
\v 46 लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर मुलगे अधिक शिल्लक राहतात.
\v 47 त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच पाच शेकेल घे. एक शेकेल म्हणजे वीस गेरा.
\v 48 प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे.
\p
\v 49 आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला.
\v 50 इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले.
\v 51 मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.
\s5
\c 4
\s लेव्यांच्या जबाबदाऱ्या
\p
\v 1 परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला, तो म्हणाला,
\v 2 लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
\v 3 तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर.
\v 4 कहाथ वंशजांनी दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी.
\p
\s5
\v 5 जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा.
\v 6 मग त्यांनी कोशावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे.
\p
\s5
\v 7 त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.
\v 8 त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे.
\p
\s5
\v 9 त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.
\v 10 या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे.
\v 11 त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.
\p
\s5
\v 12 मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
\v 13 मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.
\v 14 नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे हे वेदीचे सर्व सामान गोळा करून ते वेदीवर ठेवावे; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
\p
\s5
\v 15 अहरोन व त्याचे मुलगे ह्यानी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहावयाची ती हीच.
\v 16 पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व सामान व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.
\p
\s5
\v 17 परमेश्वर मोशे व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
\v 18 तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका;
\v 19 जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे.
\v 20 पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरहि आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे.
\p
\s5
\v 21 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
\v 22 गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
\v 23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर.
\p
\s5
\v 24 गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशीः
\v 25 त्यांनी निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
\v 26 निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे;
\p
\s5
\v 27 गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा.
\v 28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी.
\p
\s5
\v 29 मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर.
\v 30 म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपातील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर.
\p
\s5
\v 31 दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
\v 32 तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या माणसांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्याला सांगा.
\p
\s5
\v 33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.
\p
\s5
\v 34 मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.
\v 35 त्यांनी, दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली.
\v 36 ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते.
\p
\s5
\v 37 कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपात पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
\s5
\v 38 तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;
\v 39 म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.
\v 40 ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.
\p
\s5
\v 41 गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपात सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली.
\p
\s5
\v 42 त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,
\v 43 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र होते ते सर्व,
\v 44 ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे भरले.
\p
\s5
\v 45 मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.
\p
\s5
\v 46 तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.
\v 47 तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपातील सेवा करण्यास व ओझा वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली;
\v 48 त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.
\p
\s5
\v 49 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची गणती करण्यात आली; प्रत्येक माणसाला त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.
\s5
\c 5
\s अशुद्ध झालेल्या माणसाला छावणीबाहेर काढणे
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांना त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;
\v 3 मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहत आहे.”
\v 4 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांना छावणीबाहेर काढून टाकले.
\s अपराधाबद्दल होणारा दंड
\p
\s5
\v 5 परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 6 इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
\v 7 तेव्हा त्या माणसाने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याला ती सर्व द्यावी.
\p
\s5
\v 8 पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी माणसाने ती भरपाई परमेश्वराला अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
\v 9 “जर कोणी इस्राएल परमेश्वराला समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
\v 10 प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तु त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.”
\s परप्रेमशंकेविषयी नियम
\p
\s5
\v 11 मग परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 12 इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला.
\p
\s5
\v 13 म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
\v 14 आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली,
\p
\s5
\v 15 जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय.
\p
\s5
\v 16 याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
\v 17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी.
\p
\s5
\v 18 याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;
\v 19 मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो.
\p
\s5
\v 20 परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस.
\v 21 मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.
\v 22 याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी व मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे.
\p
\s5
\v 23 मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते कडू पाण्यात धुवावे.
\p
\s5
\v 24 मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.
\v 25 नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.
\v 26 मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे.
\p
\s5
\v 27 जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध अपराध केला असेल तर शापजनक पाणी पाजल्यावर ते तिच्या पोटात जाईल व कडूपणा उत्पन्न करील. तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल तिच्या लोकात तिचे नाव शापित होईल.
\v 28 परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.
\p
\s5
\v 29 तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
\v 30 किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी.
\p
\s5
\v 31 मग नवरा अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.
\s5
\c 6
\s नाजीरांसंबंधी नियम
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा विशेष नवस करील,
\v 3 त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.
\v 4 तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये.
\p
\s5
\v 5 त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत;
\p
\s5
\v 6 त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
\v 7 त्याच्या स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील.
\v 8 आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे.
\p
\s5
\v 9 जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे.
\p
\s5
\v 10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत.
\v 11 मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.
\p
\s5
\v 12 त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.
\p
\s5
\v 13 मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्याला दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.
\v 14 त्याने आपले अर्पण परमेश्वराला भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
\v 15 त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
\p
\s5
\v 16 याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पावेत;
\v 17 त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी.
\p
\s5
\v 18 मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.
\p
\s5
\v 19 नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.
\v 20 मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून आणि त्याला सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.
\p
\s5
\v 21 “जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वराला अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.”
\s याजकांनी द्यायचा आशीर्वाद
\p
\s5
\v 22 पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
\v 23 अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे,
\p
\v 24 परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
\p
\s5
\v 25 परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो;
\p
\v 26 परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
\p
\v 27 याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांना द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन.
\s5
\c 7
\s वेदीच्या समर्पणाच्या प्रसंगी करायची अर्पणे
\p
\v 1 ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून व पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
\v 2 त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
\v 3 त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या.
\p
\s5
\v 4 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
\v 5 “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.”
\p
\s5
\v 6 मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
\v 7 त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
\v 8 त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.
\p
\s5
\v 9 परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
\p
\s5
\v 10 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
\v 11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
\p
\s5
\v 12 पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 13 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 14 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.
\p
\s5
\v 15 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 16 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 17 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती.
\p
\s5
\v 18 दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 19 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\p
\s5
\v 20 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\v 21 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
\v 22 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 23 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.
\p
\s5
\v 24 तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 25 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 26 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 27 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 28 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 29 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
\s5
\v 30 चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 31 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 32 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
\p
\s5
\v 33 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
\v 34 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 35 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 36 पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 37 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 38 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
\p
\s5
\v 39 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 40 त्याने पापार्पणासाठी एक बकर दिला.
\v 41 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते.
\p
\s5
\v 42 सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 43 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
\v 44 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 45 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 46 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 47 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 48 सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 49 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 50 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 51 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 52 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 53 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.
\p
\s5
\v 54 आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 55 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 56 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 57 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 58 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 59 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 60 नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 61 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 62 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 63 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 64 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 65 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 66 दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 67 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 68 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 69 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 70 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 71 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 72 अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 73 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 74 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\p
\s5
\v 75 त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
\v 76 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 77 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 78 बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
\v 79 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
\v 80 त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
\s5
\v 81 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
\v 82 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
\v 83 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.
\p
\s5
\v 84 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
\v 85 प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
\v 86 धूपाने भरलेले सोन्याचे बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.
\p
\s5
\v 87 त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
\v 88 शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला समर्पणे केली.
\p
\s5
\v 89 जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करूबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.
\s5
\c 8
\s अहरोन दिवे उजळतो
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “अहरोनाशी बोल. त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”
\p
\s5
\v 3 अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले.
\v 4 दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होताः परमेश्वराने मोशेला तळापासून तर त्याच्यावर कळ्यापर्यंत, कपासारखा कसा सोन्यापासून घडवायचा दाखविले.
\s लेव्यांचे संमर्पण
\p
\s5
\v 5 पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 6 लेवींना इस्राएल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर.
\p
\s5
\v 7 त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.
\v 8 मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा.
\p
\s5
\v 9 लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव.
\v 10 लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
\v 11 अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी करावी यासाठी त्याने हे करावे.
\p
\s5
\v 12 लेवीनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा.
\v 13 लेवींना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.
\p
\s5
\v 14 याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांतून वेगळे करा. लेवी माझेच होतील.
\v 15 तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपात जाऊन सेवा करावी.
\p
\s5
\v 16 हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे.
\v 17 इस्राएल लोकांतले, माणसापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.
\p
\s5
\v 18 मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी लेवीना घेतले आहे.
\v 19 अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपात सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.
\p
\s5
\v 20 तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले.
\v 21 लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वराला सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
\p
\s5
\v 22 त्यानंतर, लेवी दर्शनमंडपात अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.
\s लेव्यांच्या सेवेची मुदत
\p
\s5
\v 23 पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
\v 24 जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपात सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.
\p
\s5
\v 25 त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे.
\v 26 त्यांनी दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.
\s5
\c 9
\s वल्हांडण सण पाळण्याविषयी नियम
\p
\v 1 मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला,
\v 2 “इस्राएल लोकांना वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
\v 3 या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्यासमयी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”
\p
\s5
\v 4 मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
\v 5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
\p
\s5
\v 6 त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी ते मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.
\v 7 ते माणसे त्याला म्हणाले, “एका मृत माणसामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हाला दूर कां ठेवत आहेस?”
\v 8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”
\p
\s5
\v 9 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 10 तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा;
\p
\s5
\v 11 त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा.
\v 12 त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत.
\p
\s5
\v 13 परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वर्षाच्या केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.
\v 14 जर तुमच्यामध्ये एखाद्या विदेशी माणूस राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.
\s निवासमंडपावरील मेघ
\p
\s5
\v 15 ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यत अग्नीसारखा दिसला.
\v 16 अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे.
\v 17 जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत.
\p
\s5
\v 18 परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत.
\v 19 जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.
\p
\s5
\v 20 काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवास निघत.
\v 21 काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर वरती गेला की, ते एकसारखा प्रवास करीत असत.
\p
\s5
\v 22 जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासाला निघत.
\v 23 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.
\s5
\c 10
\s रुप्याचे कर्णे
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
\p
\s5
\v 3 सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.
\v 4 जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.
\v 5 जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
\p
\s5
\v 6 जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी. त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.
\v 7 जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे, कर्णा फुंका, पण मोठ्याने नाही.
\v 8 अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांना पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.
\p
\s5
\v 9 तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
\p
\s5
\v 10 तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वराला तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.
\s इस्त्राएल लोक सीनाय रान सोडून निघतात
\p
\s5
\v 11 दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.
\v 12 तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.
\v 13 परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.
\p
\s5
\v 14 पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 15 सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 16 हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\p
\s5
\v 17 गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
\v 18 त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 19 सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 20 रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\p
\s5
\v 21 कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहंचेपर्यत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
\v 22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 23 पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 24 गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\p
\s5
\v 25 दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 26 आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 27 एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
\v 28 ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.
\p
\s5
\v 29 मोशे मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या बायकोचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. परमेश्वर म्हणाला, मी तुम्हाला देईन. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”
\v 30 परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”
\p
\s5
\v 31 मग मोशेने त्याला उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हाला सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.
\v 32 तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”
\p
\s5
\v 33 परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.
\v 34 जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
\p
\s5
\v 35 जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”
\v 36 जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”
\s5
\c 11
\s परमेश्वर मांस देण्याचे आश्वासन देतो
\p
\v 1 आणि लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.
\v 2 तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नी विझला.
\v 3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला.
\p
\s5
\v 4 जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल?
\v 5 मिसरमध्ये आम्हाला मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हाला काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हाला येते.
\v 6 आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
\p
\s5
\v 7 हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता.
\v 8 लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.
\p
\s5
\v 9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.
\v 10 सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला. आणि प्रत्येक माणूस आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती.
\p
\s5
\v 11 मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या दासाला इतके वाइट का वागवतोस? तू माझ्यावर प्रसन्न नाहीस का? या सर्व लोकांचा भार तू मला वाहण्यास सांगतोस.
\v 12 मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?
\p
\s5
\v 13 एवढ्या लोकांना पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हाला खावयास मांस दे!
\v 14 मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे.
\v 15 जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास तर आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
\p
\s5
\v 16 परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांना दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.
\v 17 मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
\p
\s5
\v 18 लोकांना सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हाला मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हाला मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हाला मांस देईल आणि तुम्ही ते खाल.
\v 19 तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर,
\v 20 परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्याला तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर का सोडले?
\p
\s5
\v 21 नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!
\v 22 आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावात काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?
\v 23 परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”
\s लोकांचे वडील संदेश सांगू लागतात
\p
\s5
\v 24 मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांना सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले.
\v 25 मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
\p
\s5
\v 26 त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले.
\v 27 तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.
\p
\s5
\v 28 तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.
\v 29 मोशेने त्याला उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतो का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते याप्रकारे परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.
\v 30 मग मोशे व इस्राएलाच्या वडीलजनासह छावणीत परत गेला.
\s परमेश्वर लावे पक्षी पाठवतो
\p
\s5
\v 31 मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. माणूस एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता.
\v 32 लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
\p
\s5
\v 33 ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला.
\v 34 त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले.
\v 35 किब्रोथ-हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथपर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.
\s5
\c 12
\s मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध कुरकुर करतात
\p
\v 1 मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले.
\v 2 ते म्हणाले, “परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले.”
\v 3 आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता.
\p
\s5
\v 4 तेव्हा परमेश्वर एकाएकी मोशे, अहरोन व मिर्याम ह्याच्याशी बोलला. “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा ते तिघे बाहेर आली.
\v 5 परमेश्वर एका ढगाच्या खांबातून खाली आला मंडपाच्या प्रवेशदारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, अहरोन व मिर्याम तेव्हा ते दोघे पुढे आले.
\p
\s5
\v 6 परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका.
\q जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत,
\q मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो,
\q आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
\v 7 माझा सेवक मोशे तसा नाही.”
\q तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.
\v 8 मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही.
\q तो माझे स्वरूप पाहत असतो.
\q तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हाला भीती कशी वाटली नाही?
\p
\s5
\v 9 परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि नंतर तो त्यांना सोडून गेला.
\v 10 ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.
\p
\s5
\v 11 अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको.
\v 12 कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये.
\p
\s5
\v 13 म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर.
\v 14 परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
\v 15 म्हणून त्यांनी मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
\p
\s5
\v 16 त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.
\s5
\c 13
\s बारा हेरांची कनान देशात रवानगी
\p
\v 1 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांना देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव.”
\p
\s5
\v 3 तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे नेते पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते.
\v 4 त्यांची नांवे अशी आहेत:रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
\p
\s5
\v 5 शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
\v 6 यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
\v 7 इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
\v 8 एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
\p
\s5
\v 9 बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी,
\v 10 जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
\v 11 योसेफ वंशातला (मनश्शे) सूसीचा मुलगा गद्दी,
\v 12 दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल,
\p
\s5
\v 13 आशेर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
\v 14 नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
\v 15 आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
\v 16 मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)
\p
\s5
\v 17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांना सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
\v 18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.
\v 19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
\v 20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते.
\p
\s5
\v 21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला.
\v 22 त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते.
\p
\s5
\v 23 नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली.
\v 24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
\p
\s5
\v 25 त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
\v 26 इस्राएल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.
\p
\s5
\v 27 ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला ज्या देशात पाठवले आणि आम्ही तेथे पोहचलो. आणि खचीत दूध व मध वाहणारा तो देश आहे आणि ही त्यातली काही फळे आहेत.
\v 28 पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
\v 29 अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
\s5
\v 30 मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
\v 31 पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.”
\p
\s5
\v 32 आणि त्या माणसांनी इस्राएलाच्या सर्व लोकांना सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाहीत. ते म्हणाले, आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कोणत्याही माणसाचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत.
\v 33 आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.
\s5
\c 14
\s लोक परमेश्वराविरुद्ध बंड करतात
\p
\v 1 त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.
\v 2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
\v 3 तरवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
\p
\s5
\v 4 नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
\v 5 तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
\p
\s5
\v 6 नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले त्यातले काही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली.
\v 7 ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी ते बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.
\v 8 जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.
\p
\s5
\v 9 “परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”
\v 10 पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांना दिसले.
\p
\s5
\v 11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तिशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
\v 12 मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
\p
\s5
\v 13 मोशे परमेश्वराला म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांना बाहेर आणले.
\v 14 ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.
\p
\s5
\v 15 आता जर तू या लोकांना एका माणसाप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
\v 16 परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.
\p
\s5
\v 17 “म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,
\v 18 परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चवथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.
\v 19 मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वासनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”
\s परमेश्वर इस्त्राएल लोकांचे ताडन करतो
\p
\s5
\v 20 परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”
\v 21 पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.
\v 22 ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही.
\p
\s5
\v 23 मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो खचित पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.
\v 24 पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल.
\v 25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.
\p
\s5
\v 26 परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
\v 27 ही दुष्ट मंडळी माझ्याविरूद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्राएली लोक माझ्याविरूद्ध तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत.
\p
\s5
\v 28 तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.
\v 29 तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले,
\v 30 ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.
\p
\s5
\v 31 ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.
\v 32 आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.
\v 33 तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.
\p
\s5
\v 34 तुम्हाला तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या माणसांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.
\v 35 “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”
\s अनिष्ट बातमी देणाऱ्या दहा हेरांचा मृत्यू
\p
\s5
\v 36 मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत.
\v 37 ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले.
\v 38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.
\s हर्मा येथे इस्त्राएल लोकांचा पराभव
\p
\s5
\v 39 मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
\v 40 दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”
\p
\s5
\v 41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.
\v 42 त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
\v 43 अमालेकी आणि कनानी लोक आहेत तुम्ही तरवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
\p
\s5
\v 44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
\v 45 डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
\s5
\c 15
\s अर्पणांविषयी नियम
\p
\v 1 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग. परमेश्वर तुम्हाला एक देश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे पोहचाल,
\v 3 आणि तुम्ही परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे यांचे परमेश्वराकरता अर्पण कराल, मग ते होमार्पणाचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या सणातला तो यज्ञ असो.
\p
\s5
\v 4 जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.
\v 5 प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षारस तयार कर.
\s5
\v 6 अन्नार्पण म्हणून प्रत्येक मेंढ्यामागे एकतृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.
\v 7 परमेश्वराला सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे.
\p
\s5
\v 8 जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा.
\v 9 तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
\v 10 तू पेयार्पणासाठी अर्धा हीन द्राक्षारस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वराला सुवासाचे अर्पण कर.
\p
\s5
\v 11 तुम्ही परमेश्वराला जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे.
\v 12 तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.
\v 13 अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वराला सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.
\p
\s5
\v 14 तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाहि परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेही केले पाहिजे.
\v 15 हेच नियम सर्वाना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
\v 16 हे नियम व विधी तुम्हाला आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.
\p
\s5
\v 17 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
\v 18 इस्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हाला घेऊन जात आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पोहचाल.
\v 19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराला अर्पण करा.
\p
\s5
\v 20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वराला अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पिता त्याप्रमाणे ही अर्पावी.
\v 21 मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा.
\s5
\v 22 जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.
\v 23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हाला मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत.
\v 24 तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वराला सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.
\p
\s5
\v 25 म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.
\v 26 इस्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
\p
\s5
\v 27 पण जर फक्त एकाच माणसाने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
\v 28 त्या माणसाने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
\v 29 जो माणूस चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
\p
\s5
\v 30 पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणार समजावा. त्या माणसाला आपल्या लोकांतून काढून टाकावे.
\v 31 कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.
\s शब्बाथ मोडणाऱ्यास धोंडमार
\p
\s5
\v 32 यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले.
\v 33 ज्या लोकांनी त्याला लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्याला मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
\v 34 त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
\p
\s5
\v 35 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो माणूस मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावा.”
\v 36 म्हणून लोक त्याला छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्याला दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
\s वस्त्राच्या काठांना लावायचे गोंडे
\p
\s5
\v 37 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
\v 38 इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यानी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.
\v 39 या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.
\p
\s5
\v 40 “माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे.
\v 41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”
\s5
\c 16
\s कोरह, दाथान व अबीराम ह्यांचे बंड
\p
\v 1 कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली.
\v 2 या चार माणसांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांना माहीत होते.
\v 3 ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत:ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
\p
\s5
\v 4 जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.
\v 5 मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा माणूस आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या माणसाला त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या माणसाची निवड करील आणि त्याला स्वत: जवळ आणिल.
\s5
\v 6 म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा.
\v 7 उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
\p
\s5
\v 8 मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
\v 9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हाला खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हाला खास कामासाठी, इस्राएल लोकांना परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
\v 10 परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात.
\v 11 तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
\p
\s5
\v 12 नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही.
\v 13 तू आम्हाला रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
\v 14 आणखी तू आम्हाला दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हाला शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
\p
\s5
\v 15 म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वराला म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेहि वाईट केले नाही.
\v 16 नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
\v 17 तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वराला द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
\p
\s5
\v 18 म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
\v 19 कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
\p
\s5
\v 20 परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
\v 21 या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.
\v 22 पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका माणसाने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.
\p
\s5
\v 23 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
\v 24 सर्व लोकांना कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.
\p
\s5
\v 25 मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्यांच्यामागे गेले.
\v 26 मोशेने सर्व लोकांना बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.
\v 27 म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले.
\p
\s5
\v 28 नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हाला दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हाला दाखवीन.
\v 29 हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही.
\v 30 पण जर परमेश्वराने या लोकांना वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हाला कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांना आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”
\p
\s5
\v 31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
\v 32 धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
\p
\s5
\v 33 ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले.
\v 34 इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.
\v 35 नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला.
\p
\s5
\v 36 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला व म्हणाला
\v 37 याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत आणि तो अग्नी पसरावयाला सांग.
\v 38 लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वराला अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांना हा ताकदीचा इशारा असेल.
\p
\s5
\v 39 म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही माणसांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठेवला.
\p
\v 40 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
\p
\s5
\v 41 दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.
\v 42 मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्याला झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
\v 43 हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.
\p
\s5
\v 44 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 45 त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.
\v 46 नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वर कोप भडकला आहे. मरी सुरू झाली आहे.
\p
\s5
\v 47 म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले.
\v 48 म्हणून अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला अहरोनाने लोकांना पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले. आणि मरी तिथेच थांबली.
\p
\s5
\v 49 पण त्या मरीमुळे चवदा हजार सातशे लोक मरण पावले. यामध्ये कोरहामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.
\v 50 भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.
\s5
\c 17
\s अहरोनाची काठी
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्याकडून बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्यांच्या त्यांच्या काठीवर लिही.
\p
\s5
\v 3 “लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.
\v 4 या काठ्या दर्शनमंडपात आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.
\v 5 खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”
\p
\s5
\v 6 म्हणून मोशे इस्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती.
\v 7 मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.
\p
\s5
\v 8 दुसऱ्या दिवशी मोशेने साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्याला दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.
\v 9 म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांना दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.
\p
\s5
\v 10 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत.
\v 11 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
\p
\s5
\v 12 इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे.
\v 13 जो कोणी माणूस नुसता परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वाचा नाश होणार की काय?”
\s5
\c 18
\s याजक आणि वेली ह्यांच्यासाठी तरतूद
\p
\v 1 परमेश्वर अहरोनाला म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्याला वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.
\v 2 तुझ्या वंशातील इतर लेवी लोकांना आण. तुझ्याबरोबर आणि साक्षपटाच्या तंबूत काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.
\p
\s5
\v 3 लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
\v 4 ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये.
\v 5 पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही.
\p
\s5
\v 6 इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपात काम करतील.
\v 7 पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्याला मारुन टाकले जाईल.
\p
\s5
\v 8 नंतर परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय.
\v 9 लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
\s5
\v 10 त्या गोष्टी फक्त पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
\v 11 आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व माणसांनी तो खावा.
\s5
\v 12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
\v 13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
\p
\s5
\v 14 इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.
\v 15 स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
\v 16 ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे.
\p
\s5
\v 17 परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला संतोष देतो.
\v 18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.
\p
\s5
\v 19 “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
\v 20 परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.
\p
\s5
\v 21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.
\v 22 यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील.
\p
\s5
\v 23 लेवीचे जे वंशज दर्शनमंडपात काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.
\v 24 परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही.
\p
\s5
\v 25 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 26 तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
\v 27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल.
\p
\s5
\v 28 याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वराला अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वराला जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.
\v 29 इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.
\p
\s5
\v 30 “मोशे लेवी लोकांना सांग, तुम्ही त्यातून त्यातले जे उत्तम त्याची उचलणी करता तेव्हा ते लेव्यांकडे, खळ्यातले उत्पन्न आणि द्राक्षारसाच्या कुंडातले उत्पन्न यासारखे मोजले जाईल.
\v 31 उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
\v 32 आणि जर तुम्ही सर्वांत चांगला भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हाला पाप लागणार नाही. इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तु भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.”
\s5
\c 19
\s अशुद्धता दूर करणे
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.
\p
\s5
\v 3 ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे.
\v 4 नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
\v 5 नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळली पाहिजे. कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे.
\v 6 नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
\p
\s5
\v 7 याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
\v 8 ज्या माणसाने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
\p
\s5
\v 9 नंतर जो माणूस शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्यच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.
\v 10 ज्या माणसाने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक रहात आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
\p
\s5
\v 11 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
\v 12 त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर सातव्या दिवशी तो शुद्ध होईल, पण जर तो तिसऱ्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाहीतर तो सातव्या दिवशी तो शुद्ध होणार नाही.
\v 13 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर माणूस अशुद्ध असताना परमेश्वर पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या माणसाला इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध माणसावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील.
\p
\s5
\v 14 जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा माणूस त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
\v 15 आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल.
\v 16 खुल्या मैदानात तरवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो माणूस युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या माणसाच्या अस्थींना हात लावला तरी तो माणूस सात दिवस अशुद्ध होईल.
\p
\s5
\v 17 त्या अशुद्ध माणसाला पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
\v 18 शुद्ध माणसाने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या माणसांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या माणसाच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
\v 19 नंतर शुद्ध माणसाने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध माणसाच्या अंगावर शिंपडावे. तो माणूस सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
\p
\s5
\v 20 एखादा माणूस अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्याला इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
\v 21 तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या माणसावर पाणी शिंपडले त्या माणसाने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही माणसाने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
\v 22 जर त्या अशुद्ध माणसाने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो माणूस सुद्धा अशुद्ध होईल. तो माणूस संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
\s5
\c 20
\s खडकातून पाणी
\p
\v 1 इस्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
\p
\s5
\v 2 त्याठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.
\v 3 लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते.
\p
\s5
\v 4 “तू परमेश्वराच्या लोकांना या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी अस तुला वाटते का?
\v 5 तू आम्हाला मिसर देशातून का आणलेस? तू आम्हाला या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
\s5
\v 6 म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
\p
\s5
\v 7 परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
\v 8 तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
\v 9 मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली.
\s5
\v 10 मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय?
\v 11 मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
\s5
\v 12 पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.
\v 13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
\s अदोम इस्त्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देत नाही
\p
\s5
\v 14 मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
\v 15 खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
\v 16 पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.
\p
\s5
\v 17 कृपाकरून आम्हाला तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
\p
\s5
\v 18 परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
\v 19 इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. आम्हाला फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हाला तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
\p
\s5
\v 20 पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हाला आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तिशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी गेला.
\v 21 अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
\s होर डोंगरावप अहरोनाचा मृत्यू
\p
\s5
\v 22 इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.
\v 23 होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
\v 24 अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.
\p
\s5
\v 25 आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
\v 26 अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल.
\p
\s5
\v 27 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले.
\v 28 मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
\v 29 इस्राएलाच्या सर्व लोकांना अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.
\s5
\c 21
\s कनानी लोक इस्त्राएल लोकांवर चाढाई करतात
\p
\v 1 अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांना कैद केले.
\v 2 नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला खास वचन दिले, परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हाला मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.
\v 3 परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
\s आग्ये साप
\p
\s5
\v 4 इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.
\v 5 त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हाला या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.
\p
\s5
\v 6 तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले.
\v 7 लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.
\p
\s5
\v 8 परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो माणूस मरणार नाही.
\v 9 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या माणसाने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
\s मवाबास वळासा घालून इस्त्राएल लोक कूच करतात
\p
\s5
\v 10 इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले.
\v 11 नंतर ओबोथ सोडून त्यांनी ईये-अबारीमाला मवाबाच्या पूर्वेकडे रानात तळ दिला.
\p
\s5
\v 12 तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.
\v 13 ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती.
\p
\s5
\v 14 म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात पुढील शब्द लिहिले आहेत,
\q सुफातला वाहेब
\q व आर्णोनाची खोरी,
\q
\v 15 त्या खोऱ्याची उतरण
\q आर शहराकडे वळते,
\q आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यत खाली जाते.
\p
\s5
\v 16 तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांना एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”
\p
\s5
\v 17 नंतर इस्राएली हे गाणे गाइलेः
\q विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा.
\q
\v 18 आमच्या नेत्यांनी ती विहीर खणली,
\q सरदारांनी ही विहीर खणली.
\q त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली,
\m मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यत प्रवास केला.
\p
\s5
\v 19 लोक मत्तानाहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथाला गेले.
\v 20 लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते.
\s इस्त्राएल लोक सीहोन राजाला जिंकतात
\p
\s5
\v 21 इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
\v 22 “आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”
\v 23 पण सीहोन राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
\p
\s5
\v 24 पण इस्राएलानी त्याच्यावर तरवार चालविली. नंतर त्यांनी आर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.
\v 25 इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजुबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला.
\v 26 हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन रहात होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
\p
\s5
\v 27 त्यावरुन जे म्हणीत बोलतात ते म्हणतात,
\q हेशबोनाला या.
\q पुन्हा सीहोनाचे शहर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या.
\q
\v 28 हेशबोनामधून आग निघाली आहे,
\q ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे.
\q त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचिराख झाले.
\q आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.
\q
\s5
\v 29 हे मवाबा! तू हायहाय करशील,
\q कमोशाचे लोक नष्ट झाले.
\q त्याची मुले पळून गेली.
\q त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले.
\q
\v 30 पण आम्ही सीहोन जिंकले आहे. दीबोनापर्यत हेशबोन सर्व नष्ट झाले आहे.
\q आम्ही नोफा जे मेदबाजवळ पोहचते
\q तेथपर्यत त्यांचा सर्व पराभव केला आहे.
\s इस्त्राएल लोक बाशानाच्या आगे राजाला जिंकतात
\p
\s5
\v 31 याप्रमाणे इस्राएली अमोऱ्यांच्या देशात राहू लागले.
\v 32 मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांना पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी तेथे होते त्यांना घालवून दिले.
\p
\s5
\v 33 नंतर इस्राएल लोक बाशानाच्या रस्त्याला लागले. बाशानाचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.
\v 34 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस. कारण मी तुला त्याच्यावर, त्याच्या सर्व सैन्यावर आणि त्याच्या देशावर विजय दिला आहे. तू हेशबोनमध्ये राहणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”
\v 35 तेव्हा त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व सैन्याला, इतके मारले की, त्याच्या लोकांपैकी कोणी जिवंत उरला नाही. मग त्यांनी त्यांचा सर्व प्रदेश घेतला.
\s5
\c 22
\s बालाक बलामाला बोलावतो
\p
\v 1 नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
\p
\s5
\v 2 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते.
\v 3 मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
\v 4 मवाबाचा राजा मिद्यानीं लोकांच्या वडीलांना म्हणाला, बैल जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबाचा राजा होता.
\p
\s5
\v 5 त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता. एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशातून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ दिला आहे.
\v 6 तर आता ये, मी तुला विनंती करतो, तू या लोकांना माझ्यासाठी शाप दे. कारण ते माझ्यापेक्षा खूप भारी आहेत. कदाचित मी त्यांना मारावयास समर्थ होऊन देशातून घालवून टाकील. कारण मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याला शाप लागतो.
\p
\s5
\v 7 मवाबी वडीलआणि मिद्यानी वडील बलामाशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
\v 8 बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबाचे पुढारी त्या रात्री बलामाबरोबर राहिले.
\p
\s5
\v 9 देव बलामाकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
\v 10 बलाम देवाला म्हणाला, सिप्पोराचा मुलगा बालाकाने, मवाबाच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
\v 11 तो निरोप हा, एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.
\p
\s5
\v 12 पण देव बलामाला म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांना शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत.
\v 13 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही
\v 14 त्यामुळे मवाबाचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, बलामाने आमच्याबरोबर यायला नकार दिला.
\p
\s5
\v 15 म्हणून बालाकाने बलामाकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
\v 16 ते बलामाकडे गेले आणि म्हणाले, बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो, तुझ्या इथे येण्याच्या आड कोठलीही गोष्ट येऊ देवू नको.
\v 17 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशील ते मी करीन परंतु तू ये व माझ्यासाठी या लोकांना शाप दे.
\p
\s5
\v 18 बलामाने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही. बालाकाने माझे घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
\v 19 तरीपण रात्री तुम्ही येथे राहा आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला कळू शकेल.
\v 20 त्या रात्री देव बलामाकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्याबरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
\s देवाचा दूत आणि बलामाची गाढवी
\p
\s5
\v 21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबाच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
\v 22 बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामापुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामाला थांबवणार होता.
\v 23 बलामाच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामाला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
\p
\s5
\v 24 नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
\v 25 गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामाचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
\p
\s5
\v 26 नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
\v 27 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
\p
\s5
\v 28 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामाला म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.
\v 29 बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.
\v 30 पण गाढवी बलामाला म्हणाली, बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि यापूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे. बलाम म्हणाला, नाही.
\p
\s5
\v 31 नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
\v 32 परमेश्वराच्या दूताने बलामाला विचारले, तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
\v 33 तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.
\p
\s5
\v 34 तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.
\v 35 तेव्हा परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल. म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
\s बलाम आणि बालाक
\p
\s5
\v 36 बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामाला भेटायला आर्णोन नदीजवळच्या मवाबाच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
\v 37 जेव्हा बालाकाने बलामाला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, मी तुला आधीच यायला सांगितले होते. तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नव्हतो काय?
\p
\s5
\v 38 बलामाने बालाकाला उत्तर दिले, पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेल तेवढेच मी बोलू शकतो.
\v 39 नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
\v 40 बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मांस बलामाला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
\p
\s5
\v 41 दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामाला घेऊन बामोथ-बआल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.
\s5
\c 23
\p
\v 1 बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.
\v 2 बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.
\v 3 नंतर बलाम बालाकाला म्हणाला, तू या होमबली जवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल. नंतर बलाम उंच जागी गेला.
\s बलाम इस्त्राएल लोकांना आशीर्वाद देतो
\p
\s5
\v 4 देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बळी दिला आहे.
\v 5 नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामाला सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्याला जाऊन सांग.
\v 6 तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमार्पणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्याबरोबर होते.
\p
\s5
\v 7 नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला,
\q पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन
\q मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले.
\q तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे,
\q ये, इस्राएलींना विरोध कर.
\q
\v 8 ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी कसा शाप देऊ?
\q ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी कशी धमकी देऊ?
\q
\s5
\v 9 मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो;
\q मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो.
\q पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे
\q आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.
\q
\s5
\v 10 इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल
\q किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल?
\q मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे,
\q आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे!
\m
\s5
\v 11 बालाक बलामाला म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास.
\v 12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?
\p
\s5
\v 13 नंतर बालाक त्याला म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे.
\v 14 तेव्हा बालाक बलामाला पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बळी दिला.
\v 15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.
\p
\s5
\v 16 परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्याला सांगितले. नंतर परमेश्वराने बलामाला बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले.
\v 17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामाला येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले?
\v 18 बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
\q बालाका, उठ आणि ऐक.
\q तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,
\q
\s5
\v 19 देव माणूस नाही, की त्याने खोटे बोलावे,
\q किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे.
\q जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय?
\q तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
\q
\v 20 पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही.
\q
\s5
\v 21 त्याला याकोबात काही कष्ट
\q किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही.
\q त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे.
\q
\v 22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तिमान आहेत.
\q
\s5
\v 23 याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही
\q आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही,
\q याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की
\q पहा, देवाने केवढे महान कार्य केले!
\q
\s5
\v 24 पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत,
\q सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो.
\q तो त्याची शिकार खाऊन
\q आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही.
\m
\s5
\v 25 नंतर बालाक बलामाला म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको.
\v 26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल.
\v 27 नंतर बालाक बलामाला म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांना शाप द्यायची परवानगी देईल.
\p
\s5
\v 28 म्हणून बालाक बलामाला घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
\v 29 बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बळी देण्यासाठी तयार कर.”
\v 30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बळी दिले.
\s5
\c 24
\p
\v 1 इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.
\s5
\v 2 बलामने रानाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
\v 3 त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला,
\q बौराचा मुलगा बलाम,
\q ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.
\q
\s5
\v 4 जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो,
\q जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो,
\q जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.
\q
\v 5 हे याकोबा तुझे तंबू,
\q हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!
\q
\s5
\v 6 खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले,
\q नदीकाठी लावलेल्या बागेसारखे,
\q परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे,
\q पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.
\q
\s5
\v 7 पाणी त्यांच्या बादलीतून वाहील,
\q आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल.
\q त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल
\q व त्यांच्या राजाचा गौरव होईल.
\q
\s5
\v 8 देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले.
\q त्यांना रानटी बैलासारखी शक्ति आहे.
\q तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील.
\q तो त्यांची हाडे तुकडे तुकडे करील.
\q तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.
\q
\s5
\v 9 तो सिंहासारखा,
\q सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्याला उठवण्याची कोण हिंम्मत करील?
\q जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल;
\q तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.
\s बलामाचा संदेश
\p
\s5
\v 10 बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
\v 11 तर आता मला सोडून आणि घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”
\p
\s5
\v 12 बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
\v 13 बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.
\v 14 तर आता पाहा. मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.
\p
\s5
\v 15 बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
\q बौराचा मुलगा बलाम बोलतो,
\q ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.
\q
\v 16 हा संदेश जो कोणी देवाकडून वचन ऐकतो,
\q ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे,
\q ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे,
\q जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.
\q
\s5
\v 17 मी त्याला पाहीन, पण तो आता इथे नाही.
\q मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही.
\q याकोबातून एक तारा बाहेर येईल,
\q आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल.
\q तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील
\q आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.
\q
\s5
\v 18 नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल,
\q आणि सेईरही आपल्या इस्राएली
\q शत्रूंचे वतन होईल,
\q ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.
\q
\v 19 याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील,
\q आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
\m
\s5
\v 20 नंतर बलामाने अमालेकीकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
\q “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता,
\q पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
\m
\s5
\v 21 नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
\q “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे,
\q आणि तुझे घरटे खडकात आहे.”
\q
\v 22 “तरीसुद्धा केनी नाश होईल,
\q जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.”
\p
\s5
\v 23 नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”
\q
\v 24 कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील;
\q ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील.
\q पण त्यांचासुद्धा नाश होईल.
\m
\v 25 नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.
\s5
\c 25
\s इस्त्राएल लोक व बआल पौराची उपासना करतात
\p
\v 1 इस्राएली शिट्टीमात रहात असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले.
\v 2 मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले.
\v 3 इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.
\p
\s5
\v 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.”
\v 5 मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वाना तुम्ही मारून टाका.”
\p
\s5
\v 6 त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते.
\v 7 जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.
\p
\s5
\v 8 तो त्या इस्राएली माणसाचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली माणसाच्या व त्या बाईच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली.
\v 9 या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.
\s5
\v 10 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 11 एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही.
\p
\s5
\v 12 फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे.
\v 13 हा त्याला आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाल याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.
\p
\s5
\v 14 “मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली माणूस मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
\v 15 आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
\p
\s5
\v 16 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः
\v 17 “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत.
\v 18 कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हाला जाचतात.”
\s5
\c 26
\s मवाब देशात इस्त्राएल लोकांची शिरगणती
\p
\v 1 मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
\v 2 “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
\s5
\v 3 तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
\v 4 मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
\s5
\v 5 रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
\v 6 हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
\v 7 रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
\p
\s5
\v 8 पल्लूचा मुलगा अलीयाब.
\v 9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
\s5
\v 10 त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
\v 11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
\p
\s5
\v 12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः
\q नमुवेलाचे नमुवेली कूळ,
\q यामीनाचे यामीनी कूळ,
\q याकीनाचे याकीनी कूळ,
\q
\v 13 जेरहाचे जेरही कूळ,
\q शौलाचे शौली कूळ.
\v 14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
\p
\s5
\v 15 गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः
\q सफोनाचे सफोनी कूळ,
\q हग्गीचे हग्गी कूळ,
\q शूनीचे शूनी कूळ,
\q
\v 16 आजनीचे आजनी कूळ,
\q एरीचे एरी कूळ,
\v 17 अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
\v 18 गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
\p
\s5
\v 19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
\v 20 यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः
\q शेलाचे शेलानी कूळ,
\q पेरेसाचे पेरेसी कूळ,
\q जेरहाचे जेरही कूळ
\v 21 पेरेसाच्या कुळातील ही कुळेः
\q हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ,
\q हामूलाचे हामूली कूळ.
\v 22 ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
\p
\s5
\v 23 इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
\v 24 याशूबाचे याशूबी कूळ,
\q शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
\v 25 इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
\p
\s5
\v 26 जबुलूनाच्या कुळातील कुळेः
\q सेरेदचे सेरेदी कूळ,
\q एलोनाचे एलोनी कूळ,
\q याहलेलचे याहलेली कूळ.
\v 27 जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
\p
\s5
\v 28 योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
\v 29 मनश्शेच्या कुळातील कुळेः
\q माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता),
\q गिलादाचे गिलादी कूळ.
\p
\s5
\v 30 गिलादाची कूळे होतीः
\q इयेजेराचे इयेजेरी कूळ,
\q हेलेकाचे हेलेकी कूळ.
\q
\v 31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ,
\q शेखेमाचे शेखेमी कूळ.
\q
\v 32 शमीदचे शमीदाई कूळ,
\q हेफेराचे हेफेरी कूळ.
\p
\s5
\v 33 हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
\v 34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
\p
\s5
\v 35 एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
\v 36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
\v 37 ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
\p
\s5
\v 38 बन्यामिनाच्या कुळातील कुळे होतीः
\q बेलाचे बेलाई कूळ,
\q आशबेलाचे आशबेली कूळ,
\q अहीरामाचे अहीरामी कूळ.
\q
\v 39 शफूफामाचे शफूफामी कूळ,
\q हुफामाचे हुफामी कूळ.
\m
\v 40 बेला ह्याचे मुलगे आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
\v 41 ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
\p
\s5
\v 42 दानाच्या कुळातील कुळे होती:शूहामाचे शूहामी कूळ. हे कूळे दानच्या कुळातील होते.
\v 43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
\p
\s5
\v 44 आशेराच्या कुळातील कुळे होतीः
\q इम्नाचे इम्नाई कूळ,
\q इश्वीचे इश्वी कूळ,
\q बरीयाचे बरीयाई कूळ.
\m
\v 45 बरीयाच्या कुळातील कुळे होतीः
\q हेबेराचे हेबेरी कूळ,
\q मलकीएलाचे मलकीएली कूळ.
\m
\v 46 आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
\v 47 ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
\p
\s5
\v 48 नफतालीच्या कुळातील कुळे होतीः
\q यहसेलाचे यहसेली कूळ,
\q गूनीचे गूनी कूळ.
\v 49 येसेराचे येसेरी कूळ,
\q शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
\m
\v 50 ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
\p
\s5
\v 51 ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
\s चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी
\p
\s5
\v 52 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 53 त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
\p
\s5
\v 54 मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.
\v 55 देश चिठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
\v 56 प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.
\s लेव्यांची कुळे
\p
\s5
\v 57 त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ही होतीः
\q गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ,
\q कहाथाचे कहाथी कूळ,
\q मरारीचे मरारी कूळ.
\m
\v 58 लेव्याची ही कूळे होतीः
\q लिब्नी कूळ,
\q हेब्रोनी कूळ,
\q महली कूळ,
\q मूशी कूळ,
\q आणि कोरही कूळ.
\m अम्राम कहाथाच्या कुळातील होता.
\v 59 अम्रामाच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
\p
\s5
\v 60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
\v 61 पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
\v 62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
\s पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात
\p
\s5
\v 63 मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
\v 64 खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
\p
\s5
\v 65 कारण इस्राएल लोकांना तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
\s5
\c 27
\s सलाफहादाच्या मुलींची विनंती
\p
\v 1 मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
\p
\s5
\v 2 या पाच स्त्रिया दर्शनमंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या,
\v 3 आमचे वडील रानात असताना मरण पावले. ज्या मंडळीने कोरहाच्या समूहाला मिळून परमेश्वराला विरोध केला होता त्यामध्ये तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला. त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या पापाच्या कारणाने तो मेला.
\p
\s5
\v 4 त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हाला वतन दे.
\v 5 तेव्हा मोशेने परमेश्वरासमोर त्यांचे प्रकरण ठेवले.
\p
\s5
\v 6 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 7 सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर.
\v 8 इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे.
\p
\s5
\v 9 जर त्याला मुलीही नसल्या तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे.
\v 10 जर त्याला भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे.
\v 11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्याला ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
\s मोशे आपल्या पश्चात यहोशवास नेता नेमतो
\p
\s5
\v 12 परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांना जो देश देणार आहे तो तेथून पाहा.
\v 13 तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील.
\v 14 त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश जवळ येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले.
\p
\s5
\v 15 मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला,
\v 16 परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्याला मंडळीवर नेमून ठेवावे.
\v 17 तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही.
\p
\s5
\v 18 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो.
\v 19 त्याला याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्याला त्यांच्या समक्ष आज्ञा कर.
\p
\s5
\v 20 तू आपला काही अधिकार त्याला दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी.
\v 21 तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.
\p
\s5
\v 22 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले.
\v 23 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्याला नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.
\s5
\c 28
\s दैनिक अर्पणे
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.
\p
\s5
\v 3 आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वराला अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.
\v 4 एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
\v 5 हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
\p
\s5
\v 6 हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वराला सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.
\v 7 त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.
\v 8 दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वराला मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.
\s शब्बाथ आणि मासिक अर्पणे
\p
\s5
\v 9 “प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.
\v 10 नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”
\p
\s5
\v 11 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
\v 12 प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.
\v 13 आणि प्रत्येक कोंकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वराला अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.
\p
\s5
\v 14 लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षारस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.
\v 15 आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वराला पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.
\s नेमून दिलेल्या सणांत करायची अर्पणे
\p
\s5
\v 16 परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
\v 17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
\v 18 या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही.
\p
\s5
\v 19 तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
\v 20 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा,
\v 21 आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.
\v 22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
\p
\s5
\v 23 सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.
\v 24 याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वराला मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.
\v 25 नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये.
\p
\s5
\v 26 सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये.
\v 27 तुम्ही परमेश्वराला सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.
\v 28 आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.
\p
\s5
\v 29 व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
\v 30 आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.
\v 31 आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण ते निर्दोष असावे. त्याबरोबरची पेयार्पणे पण अर्पावी.
\s5
\c 29
\p
\v 1 सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. हा तुमचा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
\s5
\v 2 परमेश्वराला मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी.
\p
\s5
\v 3 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
\v 4 मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण कराल.
\v 5 तुम्हासाठी प्रायश्चित करायला पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
\p
\s5
\v 6 चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणपणे याव्यतिरिक्त परमेश्वराला मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे.
\p
\s5
\v 7 सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
\v 8 तुम्ही परमेश्वराला मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत.
\p
\s5
\v 9 आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
\v 10 सात कोकरांपैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
\v 11 पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत.
\p
\s5
\v 12 सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
\v 13 तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोंकरे, ही दोषरहित असावी.
\p
\s5
\v 14 त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा,
\v 15 आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
\v 16 आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत.
\p
\s5
\v 17 दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
\v 18 त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.
\v 19 आणि पापार्पणासाठी एक बकरा म्हणून द्यावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्यांची पेयार्पण ही असावीत.
\p
\s5
\v 20 तिसऱ्या दिवशी तुम्ही अकरा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
\v 21 त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
\v 22 पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे निरंतरचे होमार्पण व अन्नार्पण व त्यांचे पेयार्पणाव्यतिरिक्त असावी.
\p
\s5
\v 23 चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
\v 24 गोऱ्हे, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणही नियमाप्रमाणे करावी.
\v 25 आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, त्याचे अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
\p
\s5
\v 26 पाचव्या दिवशी तुम्ही नऊ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
\v 27 त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
\v 28 एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी.
\p
\s5
\v 29 सहाव्या दिवशी तुम्ही आठ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
\v 30 आणि त्यांबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण, व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
\v 31 एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
\p
\s5
\v 32 सातव्या दिवशी तुम्ही सात गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
\v 33 त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी.
\v 34 एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी.
\p
\s5
\v 35 आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.
\v 36 तुम्ही परमेश्वराला मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी.
\p
\s5
\v 37 आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.
\v 38 एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण, व त्यांचे पेयार्पण अर्पावा.
\p
\s5
\v 39 तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावी.
\v 40 मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांना सांगितल्या.
\s5
\c 30
\s स्त्रियांनी केलेल्या नवसांसंबंधी नियम
\p
\v 1 मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.
\v 2 जर एखाद्याने परमेश्वराला नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.
\p
\s5
\v 3 एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
\v 4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
\p
\s5
\v 5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील.
\p
\s5
\v 6 आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
\v 7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.
\p
\s5
\v 8 पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
\p
\s5
\v 9 विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
\v 10 आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वराला काही नवस केला असेल,
\v 11 तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.
\p
\s5
\v 12 पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
\p
\s5
\v 13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
\v 14 नवरा यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
\p
\s5
\v 15 पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.
\v 16 परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.
\s5
\c 31
\s मिद्यान्यांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांसाठी मिद्यान्याविरूद्ध सूड घे. हे केल्यानंतर तू मरण पावशील आणि त्यानंतर तू तुझ्या लोकांस जाऊन मिळशील.
\p
\s5
\v 3 मग मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.
\v 4 इस्राएलाच्या प्रत्येक वंशातून एक एक हजार लढाईस पाठवा.
\v 5 इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील.
\s5
\v 6 मोशेने प्रत्येक वंशातून एक हजार असे बारा हजार लोकांना लढाईवर पाठवले. त्यांना आणि त्यांच्याबरोबर याजक एलाजाराचा मुलगा फिनहासाला पवित्र पात्रे व इशारा देण्यासाठी रणशिंगे त्यांच्या हवाली करून पाठवले.
\v 7 मग मोशेने व एलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले.
\v 8 त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामालाही तलवारीने मारले.
\p
\s5
\v 9 इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करून नेले. त्यांनी त्यांची सर्व गुरे व त्यांचे सर्व कळप व सर्व धन लूट म्हणून त्यांनी घेतले.
\v 10 त्यांनी त्यांची सर्व वस्तीची नगरे व त्यांच्या सर्व छावण्याही जाळली.
\p
\s5
\v 11 त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान, दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली.
\v 12 यरीहोपाशी यार्देनतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले.
\p
\s5
\v 13 नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.
\v 14 जे सैनिकांचे सेनापती युद्धावरुन परतले होते एक हजार सैनिकांच्या प्रमुखावर आणि शंभर सैनिकांच्या प्रमुखावर मोशे खूप रागावला.
\v 15 मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?
\p
\s5
\v 16 पाहा ह्यांनीच बलामाच्या मसलतीवरून पौराच्या प्रकरणी इस्राएलाच्या वंशाना परमेश्वराविरूद्ध अपराध करायला लावले. यावरुन परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.
\v 17 आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.
\p
\s5
\v 18 “आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर रहावे.
\v 19 तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.
\v 20 तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”
\p
\s5
\v 21 नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,
\v 22 सोने, चांदी, पितळ, लोखंड, पत्रा किंवा शिसे वगैरे
\v 23 जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा ते शुद्ध होईल: तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे.
\v 24 सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”
\s लुटीची वाटणी
\p
\s5
\v 25 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 26 सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.
\v 27 नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलाच्या इतर लोकात त्यांची वाटणी करा.
\p
\s5
\v 28 युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भागातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा.
\v 29 त्यांच्या हिश्श्यातून घेऊन तो परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून याजक एलाजाराला द्यावा.
\p
\s5
\v 30 “नंतर इस्राएल लोकांना मिळालेल्या हिश्श्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशु ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे.”
\v 31 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजकाने केले.
\p
\s5
\v 32 सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,
\v 33 बहात्तर हजार गाईबैल,
\v 34 एकसष्ट हजार गाढवे
\v 35 आणि बत्तीस हजार स्त्रिया आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे)
\p
\s5
\v 36 युद्धावर गेलेल्या सैनिकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या मिळाल्या.
\v 37 त्यांनी सहाशे पंच्याहत्तर मेंढ्या परमेश्वराला दिल्या.
\v 38 गाईबैल छत्तीस हजार असून त्यातील बहात्तर परमेश्वराचा कर होते.
\p
\s5
\v 39 सैनिकांना तीस हजार पाचशे गाढवे मिळाली. त्यातील एकसष्ट गाढवे त्यांनी परमेश्वराला दिले.
\v 40 सैनिकांना सोळा हजार स्त्रिया मिळाल्या. त्यांपैकी बत्तीस स्त्रिया त्यांनी परमेश्वराला दिल्या.
\v 41 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने याजक एलाजाराला दिल्या.
\p
\s5
\v 42 नंतर युद्धावर गेलेल्या इस्राएली सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता.
\v 43 लोकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या.
\v 44 छत्तीस हजार गाईबैल,
\v 45 गाढवे तीस हजार पाचशे
\v 46 आणि सोळा हजार स्त्रिया मिळाल्या.
\p
\s5
\v 47 आणि इस्राएलाच्या वंशाच्या अर्ध्या भागातून, माणसातून व जनावरांतून प्रत्येक पन्नास वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यामध्ये पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवीना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवासमंडपाची काळजी घेतली.
\p
\s5
\v 48 नंतर सैनिकांचे पुढारी सहस्त्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले.
\v 49 त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.
\p
\s5
\v 50 म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेश्वराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत; बाजूबंद, बांगडया, आंगठ्या, कुड्या आणि हार. ही आम्ही परमेश्वराला अर्पण म्हणून आमच्या जिवासाठी परमेश्वरारासमोर प्रायश्चित करण्याकरता आणली आहेत.
\v 51 मोशे आणि एलाजार याजकाने त्या सर्व सोने व घडीव वस्तू त्यांच्याकडून स्विकारल्या.
\p
\s5
\v 52 सहस्त्रपति आणि शतपति ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सोने सोळा हजार सातशे शेकेल भरले.
\v 53 सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वतःजवळ ठेवल्या.
\v 54 मोशे आणि एलाजार याजक यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्राएल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले.
\s5
\c 32
\s रऊबेन, गाद व अर्धे मनश्शेचे घराणे यार्देनेच्या पूर्वेस वस्ती करतात
\p
\v 1 रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.
\v 2 म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.
\v 3 अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.
\p
\s5
\v 4 ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती गुरांढोरांसाठी खूप चांगली आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.
\v 5 जर तुम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हाला वतन करून देण्यात यावा. आम्हाला यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको.
\p
\s5
\v 6 रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांना मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का?
\v 7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात?
\p
\s5
\v 8 तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.
\v 9 ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांना परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
\p
\s5
\v 10 परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला,
\v 11 मिसर देशातून आलेल्या वीस वर्षांवरील कोणत्याही माणसाला हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.
\v 12 फक्त कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वराला अनुसरले.
\p
\s5
\v 13 परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. आणि परमेशवराच्यादृष्टीने त्यांनी वाईट कृत्ये केलीत्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्यांना चाळीस वर्षे रानात भटकायला लावले.
\v 14 आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?
\v 15 जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांना अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.
\p
\s5
\v 16 पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
\v 17 त्यामुळे आमची मुले याठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलाच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
\p
\s5
\v 18 इस्राएलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही.
\v 19 यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हाला आमचे वतन प्राप्त झाले म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्याबरोबर वतन घेणार नाही.
\p
\s5
\v 20 तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.
\v 21 आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रु सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.
\v 22 आणि तर तो देश त्याच्या ताब्यात आल्यावर तुम्ही परत याल. नंतर परमेश्वराकडे आणि इस्राएलाकडे तुम्ही निरपराधी असाल. तर हा देश परमेश्वरापुढे तुमचे वतन असा होईल.
\p
\s5
\v 23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हाला शासन होईल याची खात्री बाळगा.
\v 24 तुमच्या मुलांसाठी शहरे बसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.
\v 25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
\p
\s5
\v 26 आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील.
\v 27 पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.
\p
\s5
\v 28 याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले.
\v 29 मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्यापुढे चालतील. ते तुम्हाला प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
\v 30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल.
\p
\s5
\v 31 गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.”
\v 32 आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे.
\p
\s5
\v 33 तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली.
\p
\s5
\v 34 गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
\v 35 अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,
\v 36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
\p
\s5
\v 37 रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.
\v 38 नबो व बाल-मौन आणि सिब्मा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
\v 39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांना घालवले.
\p
\s5
\v 40 मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.
\v 41 मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे असे म्हटले.
\v 42 नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.
\s5
\c 33
\s इस्त्राएल लोकांच्या प्रवासातील टप्पे
\p
\v 1 मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसरामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत.
\v 2 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.
\p
\s5
\v 3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
\v 4 मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
\p
\s5
\v 5 इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.
\v 6 ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले.
\v 7 त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.
\p
\s5
\v 8 मग लोकांनी पीहहीरोथ कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला.
\v 9 लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती.
\v 10 लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.
\p
\s5
\v 11 त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला.
\v 12 सीन रान सोडून ते दफकाला येथे तळ दिला.
\v 13 लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
\v 14 लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
\p
\s5
\v 15 लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
\v 16 त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
\v 17 किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
\v 18 हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.
\p
\s5
\v 19 रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
\v 20 रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
\v 21 लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
\v 22 रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
\s5
\v 23 लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
\v 24 शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
\v 25 लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
\v 26 मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
\p
\s5
\v 27 लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
\v 28 तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
\v 29 लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला.
\v 30 हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
\p
\s5
\v 31 त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला.
\v 32 बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
\v 33 होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
\v 34 याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
\p
\s5
\v 35 अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
\v 36 लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.
\v 37 लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
\p
\s5
\v 38 याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
\v 39 अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
\p
\s5
\v 40 कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अर्द येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
\s5
\v 41 लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.
\v 42 त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले.
\v 43 पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.
\p
\s5
\v 44 लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
\v 45 मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
\v 46 लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.
\p
\s5
\v 47 अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला.
\v 48 लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
\v 49 त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यत शेतापर्यंत होते.
\s कनानाच्या चतुःसीमा त्यांची वाटणी
\p
\s5
\v 50 आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 51 इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
\v 52 तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
\p
\s5
\v 53 तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हाला वतन करून दिला आहे.
\v 54 तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हाला वतन मिळेल.
\p
\s5
\v 55 परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हाला डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
\v 56 मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.
\s5
\c 34
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
\v 3 दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
\p
\s5
\v 4 तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
\v 5 असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.
\p
\s5
\v 6 तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.
\p
\s5
\v 7 तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी.
\v 8 होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला.
\v 9 नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
\p
\s5
\v 10 तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
\v 11 शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
\v 12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.
\p
\s5
\v 13 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच.
\v 14 रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे.
\v 15 त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.
\p
\s5
\v 16 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 17 जो पुरुष हा देश तुम्हाला वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
\v 18 प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.
\p
\s5
\v 19 त्या मनुष्यांची नावे ही आहेत
\q यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब.
\q
\v 20 शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
\q
\s5
\v 21 बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.
\q
\v 22 दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की.
\q
\v 23 योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल.
\q
\s5
\v 24 एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल.
\q
\v 25 जबुलून वंशातील सरदार पर्नाकचा मुलगा अलीसाफान.
\q
\v 26 इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल.
\q
\s5
\v 27 आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद.
\q
\v 28 आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.
\m
\v 29 परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.
\s5
\c 35
\s लेव्यांची शहरे
\p
\v 1 परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
\v 2 इस्राएल लोकांना सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांना द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना द्यावी.
\p
\s5
\v 3 लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत.
\v 4 आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.
\p
\s5
\v 5 नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तरे बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.
\p
\s5
\v 6 त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या माणसाने चुकून कुणाला मारले तर तो माणूस संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवीना द्या.
\v 7 म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवीना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवीना द्या.
\p
\s5
\v 8 इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.
\s शरणपुरे
\p
\s5
\v 9 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 10 इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.
\v 11 तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
\p
\s5
\v 12 आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या माणसाचा कोर्टात न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
\v 13 अशी सहा संरक्षक शहरे असतील.
\p
\s5
\v 14 यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.
\v 15 ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
\p
\s5
\v 16 जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे.
\v 17 आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.
\v 18 आणि जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो माणूस सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.
\p
\s5
\v 19 मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्याला ठार मारू शकतो.
\v 20 माणूस एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्याला ठार करु शकतो.
\v 21 जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या माणसाला ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्याला मारु शकतो.
\p
\s5
\v 22 एखादा माणूस अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या माणसाचा त्याने द्वेष केला नाही त्याला त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
\v 23 किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला न दिसलेल्या माणसाला लागला व तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मरण पावलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
\p
\s5
\v 24 जर असे घडले तर काय करायचे ते समाजाने ठरवायचे. मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील एखादा माणूस त्याला मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
\v 25 जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर समाजाने खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
\p
\s5
\v 26 त्या माणसाने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या
\v 27 आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत माणसाच्या कुटुंबाने त्याला पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो माणूस खुनाचा अपराधी ठरणार नाही.
\v 28 एखाद्या माणसाने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो माणूस त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो.
\s साक्षीदार आणि प्राणबद्दल खंडणी ह्यांविषयी नियम
\p
\s5
\v 29 तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
\v 30 मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
\s5
\v 31 जर एखाद्या माणसावर खुनाचा दोष असेल तर त्याला मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला मारलेच पाहिजे.
\v 32 जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
\p
\s5
\v 33 ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
\v 34 मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.
\s5
\c 36
\s वारसा हक्क असणाऱ्या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम
\p
\v 1 नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.
\v 2 ते म्हणाले, परमेश्वराने इस्राएलाला चिठ्या टाकून आमचे वतन घेण्याची आमच्या स्वामींना आज्ञा केली आहे. याप्रकारे परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.
\p
\s5
\v 3 आता जर त्या इस्राएलाच्या वंशातल्या दुसऱ्या कोणत्याही वंशांच्या मुलाशी विवाह केला तर त्यांचे वतन आमच्या वडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल.
\v 4 आणि जेव्हा इस्राएलाच्या वंशाचे योबेल होईल तेव्हा ज्यांच्या त्या होतील त्यांच्या वंशाच्या वतनात त्यांचे वतन मिळवले जाईल, अशाने त्यांचे वतन आमच्या वडिलांच्यावंशाच्या वतनातून काढून टाकले जाईल.
\p
\s5
\v 5 मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून इस्राएल लोकांना ही आज्ञा दिली, तो म्हणाला, योसेफाच्या वंशाचे म्हणणे बरोबर आहे.
\v 6 सलाफहादाच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हाला कोणाशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वंशातील कोणाशी तरी लग्न करा.
\p
\s5
\v 7 यामुळे इस्राएल लोकांमध्ये वतन एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.
\p
\s5
\v 8 आणि इस्राएल वंशातल्या कोणत्याही एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून वतन मिळाले तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.
\v 9 तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल.
\p
\s5
\v 10 सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले.
\v 11 म्हणून सलाफहादच्या महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले.
\v 12 योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील होते. म्हणून त्याची वतन त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.
\p
\s5
\v 13 परमेश्वराने यार्देनपाशी यरीहोजवळ मवाबाच्या मैदानात मोशेच्याद्वारे इस्राएलाच्या वंशाना दिलेल्या या आज्ञा व नियम आहेत.

1553
05-DEU.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1553 @@
\id DEU
\ide UTF-8
\h अनुवाद
\toc1 अनुवाद
\toc2 अनुवाद
\toc3 deu
\mt1 अनुवाद
\s5
\c 1
\p
\v 1 यार्देनेच्या पलीकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला तीही.
\v 2 होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.
\s5
\v 3 हे चाळीसाव्या वर्षी घडले, अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली; ते सर्व त्याने सांगितले.
\v 4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग याच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.)
\s5
\v 5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला,
\v 6 आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.
\s5
\v 7 आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
\v 8 पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
\s5
\v 9 तेव्हा मी तुम्हाला म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
\v 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
\v 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो.
\s5
\v 12 परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसांतली भांडणे कोठवर सहन करू?
\v 13 म्हणून मी तुम्हाला सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”
\v 14 त्यावर, "हे चांगलेच झाले असे" तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात.
\s5
\v 15 म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासावर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
\v 16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की “तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावामधला असो की एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.
\s5
\v 17 न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
\v 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हाला आज्ञा केली होती.
\s5
\v 19 मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हाला ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो.
\s5
\v 20 मी तुम्हाला म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोचलात आपला देव परमेश्वर तुम्हाला हा प्रदेश देत आहे.
\v 21 पाहा हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका.”
\s5
\v 22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, “आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.”
\v 23 मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.
\v 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.
\s5
\v 25 येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.”
\s5
\v 26 तथापी तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले.
\v 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे.
\v 28 आता आम्ही कोठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत.
\s5
\v 29 तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, “भिऊ नका, त्या लोकांना घाबरू नका.
\v 30 स्वत: परमेश्वर देव तुमच्यापुढे जात आहे. मिसर देशात तुमच्यासमोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल;
\v 31 तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहीले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे होता. माणूस आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हाला येथपर्यंत सांभाळून आणले.”
\s5
\v 32 तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.
\v 33 परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
\s5
\v 34 परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला,
\v 35 “तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही,
\v 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.”
\s5
\v 37 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, “तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.
\v 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्याला तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.
\s5
\v 39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन. व ते देश तो हस्तगत करतील.
\v 40 पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.”
\s5
\v 41 मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक माणसाने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढायला तयार झाला.
\v 42 परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.”
\s5
\v 43 त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात.
\v 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले.
\s5
\v 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही.
\v 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला, तुम्हाला हो माहितच आहे.
\s5
\c 2
\p
\v 1 मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.
\v 2 परमेश्वर तेव्हा मला म्हणाला,
\v 3 “या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
\s5
\v 4 आणि लोकांना आणखी एक सांग म्हणावे, तुम्हाला वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावाच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा.
\v 5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.
\s5
\v 6 तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या.
\v 7 तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हाला कशाचीही वाण पडली नाही.”
\s5
\v 8 तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.
\s5
\v 9 परमेश्वर मला म्हणाला, “मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.”
\s5
\v 10 पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.
\v 11 या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
\s5
\v 12 पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.
\s5
\v 13 “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
\v 14 कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.
\v 15 त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता
\s5
\v 16 ह्याप्रकारे सर्व योद्धे मरण पावले, ती पिढी नामशेष झाली,
\v 17 परमेश्वर मला म्हणाला,
\v 18 “तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.
\v 19 तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”
\s5
\v 20 त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.
\v 21 जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांना परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात.
\v 22 एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.
\s5
\v 23 त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.
\s5
\v 24 पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर.
\v 25 तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थराथरा कापतील व भयभीत होतील.”
\s5
\v 26 मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
\v 27 “तुमच्या देशातून आम्हाला जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही उजवीडावीकडे वळणार नाही.
\s5
\v 28 तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हाला फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.
\v 29 यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हाला देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हाला जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हाला जाऊ दिले तसेच तूही कर.”
\s5
\v 30 पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्याला पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
\v 31 परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.”
\s5
\v 32 आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.
\v 33 परमेश्वर देवाने त्याला आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो.
\s5
\v 34 त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.
\v 35 तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.
\s5
\v 36 आर्णाेन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हाला दुर्गम असे एकही नगर नव्हते.
\v 37 अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.
\s5
\c 3
\p
\v 1 मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.
\v 2 परमेश्वर मला म्हणाला, त्याला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.
\s5
\v 3 आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्याला असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
\v 4 मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच.
\s5
\v 5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.
\v 6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, बायका, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.
\v 7 गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.
\s5
\v 8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.
\v 9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)
\v 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.”
\s5
\v 11 रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.)
\s5
\v 12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
\v 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
\s5
\v 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्याला हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)
\s5
\v 15 आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला.
\v 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन आखोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.
\s5
\v 17 तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अरबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
\s5
\v 18 त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.
\s5
\v 19 तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.
\v 20 आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हांला दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.”
\s5
\v 21 मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.
\v 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”
\s5
\v 23 मग त्या समयी मी परमेश्वराला विनंती करून, म्हणालो,
\v 24 “हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासाला आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे?
\v 25 तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”
\s5
\v 26 पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.
\v 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.
\s5
\v 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”
\v 29 “आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”
\s5
\c 4
\p
\v 1 आता अहो इस्राएल लोकहो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल.
\v 2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.
\s5
\v 3 बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे.
\v 4 परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा.
\s5
\v 5 पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.
\v 6 त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.
\s5
\v 7 आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे?
\v 8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हाला दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे?
\s5
\v 9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
\v 10 ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.
\s5
\v 11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता.
\v 12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हाला आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.
\s5
\v 13 परमेश्वराने आपला करार करून तुम्हाला सांगितले. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.
\v 14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हाला शिकवण्यास सांगितले.
\s5
\v 15 होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हाला दिसला नाही. कारण त्याला कोणताही आकार नव्हता.
\v 16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
\v 17 जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,
\v 18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका.
\s5
\v 19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवल्या आहेत.
\v 20 पण तुम्हाला परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हाला स्वत:चे खास लोक केले. जणू तापलेल्या लोखंडी भट्टीतून त्याने तुम्हाला बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!
\s5
\v 21 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे.
\v 22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या व राहा.
\s5
\v 23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.
\v 24 कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
\s5
\v 25 तुम्हांला पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती केली आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्याला क्रोध येईल.
\v 26 तर आज मी तुम्हाला सावध करत आहे. स्वर्ग आणि पृथ्वी याला साक्ष आहेत. तर तुमचा नाश त्वरीत होईल. तुम्ही त्या प्रदेशात वस्ती करायला यार्देन नदी पार करत आहात. पण मूर्ति केल्या तर मात्र तुम्ही तेथे फार काळ राहणार नाही. नव्हे, तुमचा सर्वस्वी नायनाट होईल.
\s5
\v 27 परमेश्वर देव तुम्हाला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
\v 28 तेथे तुम्ही माणसांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.
\s5
\v 29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हाला पावेल.
\s5
\v 30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्याला शरण जाल.
\v 31 आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
\s5
\v 32 असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का?
\v 33 अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे?
\s5
\v 34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
\s5
\v 35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.
\v 36 तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
\s5
\v 37 त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हाला आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
\v 38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हाला राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.
\s5
\v 39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.
\v 40 आज मी तुम्हाला त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
\s5
\v 41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.
\v 42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये.
\v 43 ती नगरे अशी: रऊबेनीसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलाद येथील रामोथ आणि मनश्शेच्या लोकांसाठी बाशान मधील गोलान.
\s5
\v 44 इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, दिले.
\v 45 इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते.
\v 46 म्हणजेच हेशबोनाचा अमोऱ्यांना राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसरातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
\s5
\v 47 त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत.
\v 48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून थेट सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
\v 49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.
\s5
\c 5
\p
\v 1 मोशेने सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.
\v 2 होरेब पर्वताजवळ असताना आमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर करार केला होता.
\v 3 हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता.
\s5
\v 4 त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून परमेश्वराने आपल्याशी तोंडोतोंड भाषण केले.
\v 5 पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाही. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. तेव्हा परमेश्वर म्हणाला,
\v 6 मिसरमध्ये तुम्ही गुलामीत होता तेथून मी तुम्हाला बाहेर काढले, तो मी परमेश्वर, तुमचा देव आहे.
\s5
\v 7 माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत.
\v 8 तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ति करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका.
\s5
\v 9 त्यांच्यापुढे झुकू नका किंवा त्यांची सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. जे माझा द्वेष करतात, त्यांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो त्यांच्या मुलांना एवढेच नव्हे तर त्याच्या चार पिढ्यांना शासन करीन.
\v 10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील.
\s5
\v 11 तुमचा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेवू नका. जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
\s5
\v 12 शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र दिवस म्हणून पाळावा.
\v 13 सहा दिवस तुम्ही श्रम करून आपले सर्व काम करा.
\v 14 पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ शब्बाथाचा दिवस आहे. म्हणून त्यादिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुलं, मुली, किंवा दासदासी, परके, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे.
\s5
\v 15 मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हाला मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे.
\s5
\v 16 आपल्या आईवडीलांचा मान ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.
\s5
\v 17 कोणाचीही हत्या करु नका.
\v 18 व्यभिचार करु नका.
\v 19 चोरी करु नका.
\v 20 आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नका.
\s5
\v 21 दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दासदासी, गुरे गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.”
\s5
\v 22 पुढे मोशे, म्हणाला, ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली.
\s5
\v 23 पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले.
\v 24 आणि म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे.
\s5
\v 25 पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरू. तो भयंकर अग्नी आम्हाला बेचिराख करील. आणि आम्हाला मरायचे नाही.
\v 26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही.
\v 27 तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हाला सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.”
\s5
\v 28 हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, “मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे.
\v 29 ते माझे भय धरून मजशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.
\v 30 त्यांना सांग तुम्ही परत आपापल्या जागी जा.
\s5
\v 31 पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.”
\s5
\v 32 तेव्हा तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.
\v 33 तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.
\s5
\c 6
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या ह्याच. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.
\v 2 तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल.
\s5
\v 3 इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
\s5
\v 4 हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
\v 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
\s5
\v 6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.
\v 7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी, दारी, झोपता उठताना, त्याविषयी बोलत राहा.
\s5
\v 8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
\v 9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
\s5
\v 10 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हाला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हाला मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल.
\v 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
\v 12 पण सावध राहा! परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हाला बाहेर आणले.
\s5
\v 13 तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
\v 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
\v 15 कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
\s5
\v 16 मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका.
\v 17 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.
\s5
\v 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हाला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल.
\v 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
\s5
\v 20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.
\v 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले.
\v 22 परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.
\v 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले.
\s5
\v 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व आपले भले करील.
\v 25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.
\s5
\c 7
\p
\v 1 जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.
\s5
\v 2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.
\v 3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.
\s5
\v 4 कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा
\v 5 त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ति जाळून टाका.
\s5
\v 6 कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
\s5
\v 7 परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
\v 8 पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हाला मिसरदेशा बाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्याला पाळायचे होते.
\s5
\v 9 तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो.
\v 10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
\v 11 तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
\s5
\v 12 मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील.
\f +
\ft
\f*
\v 13 तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल.
\s5
\v 14 इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील.
\v 15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
\s5
\v 17 ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
\v 18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा.
\v 19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हाला माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
\s5
\v 20 याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
\v 21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
\v 22 त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हाला त्रास देतील.
\s5
\v 23 पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.
\v 24 परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
\s5
\v 25 त्यांच्या दैवतांच्या मूर्ति तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका. कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. परमेश्वर आपला देव मूर्तिद्वेष्टा आहे.
\v 26 त्या अमंगळ, हानिकारक मूर्ति तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.
\s5
\c 8
\p
\v 1 आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल.
\v 2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
\s5
\v 3 परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
\s5
\v 4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
\v 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे.
\v 6 तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा.
\s5
\v 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
\v 8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
\s5
\v 9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हाला डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
\v 10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
\s5
\v 11 सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
\v 12 त्यामुळे तुम्हाला अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यात राहाल.
\s5
\v 13 तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
\v 14 या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
\s5
\v 15 विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
\v 16 तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला नम्र केले.
\v 17 हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
\s5
\v 18 तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे.
\v 19 तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच, ही ताकीद मी आताच तुम्हाला देऊन ठेवतो.
\v 20 ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यादेखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदीपलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे.
\v 2 तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याविषयी आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.
\s5
\v 3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.
\s5
\v 4 तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.
\s5
\v 5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
\s5
\v 6 म्हणून तुम्ही हे निश्चीत लक्षात ठेवा की, तुमचा चांगूलपणा मुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात.
\s5
\v 7 रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करीत आलेले आहात.
\v 8 होरेबात तुम्ही परमेश्वराला क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता.
\s5
\v 9 त्याचे असे झाले; परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
\v 10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले
\s5
\v 11 चाळीस दिवस, चाळीस रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या.
\v 12 परमेश्वर म्हणाला, “ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून बहकले आहेत. त्यांनी स्वत: साठी एक ओतीव मूर्ती केली आहे.”
\s5
\v 13 परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी ह्या लोकांना पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत.
\v 14 मला आडवू नकोस, त्यांचा नाश करु दे. मी त्यांचे नाव आकाशाखालून खोडून टाकीन. मग मी तुझे, त्यांच्याहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.”
\s5
\v 15 मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.
\v 16 मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरूद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ति केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता!
\s5
\v 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या.
\v 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
\s5
\v 19 परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.
\v 20 परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
\s5
\v 21 मग तुमचे ते अमंगळ कृत्य तुम्ही केलेली वासराची मूर्ति मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
\s5
\v 22 नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त केलेत.
\v 23 जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हांला रवाना करून सांगितले की, ‘जा, व जो देश मी तुम्हांला दिला आहे तो ताब्यात घ्या, तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.
\v 24 जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे.
\s5
\v 25 तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता.
\v 26 मी परमेश्वराला विनवणी केली की हे प्रभो तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करून बाहेर आणले आहेस.
\s5
\v 27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर.
\v 28 तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.
\v 29 पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहेत, तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.
\s5
\c 10
\p
\v 1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले.
\v 2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.”
\s5
\v 3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
\v 4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हाला दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
\s5
\v 5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.
\s5
\v 6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्याला तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला.
\v 7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले.
\s5
\v 8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
\v 9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे.
\s5
\v 10 मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
\v 11 तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांना पुढच्या प्रवासाला घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”
\s5
\v 12 आता, हे इस्राएल लोकांहो तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुझा देव याची सेवा करावी.
\v 13 परमेश्वर ज्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला आज्ञापिले ते तू पाळावे, .याशिवाय तुझा देव तुझ्याकडून काय मागतो?
\s5
\v 14 सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे.
\v 15 परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातर त्याने इतरांना वगळून तुम्हाला आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे.
\s5
\v 16 तेव्हा हट्टीपणा सोडा. आपली अंत:करणे परमेश्वराला द्या.
\v 17 कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.
\s5
\v 18 अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो.
\v 19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
\s5
\v 20 तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्याला धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
\v 21 फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
\s5
\v 22 तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटअधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.
\s5
\c 11
\p
\v 1 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
\s5
\v 2 त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हालाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. तुमचा देव परमेश्वर त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रमी हात व ऊगारलेला बाहू ह्याच्याद्ववारे
\v 3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे.
\s5
\v 4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
\v 5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच.
\s5
\v 6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हाला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गुरेढोरे यांना सर्व इस्राएलादेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
\v 7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलीत.
\s5
\v 8 तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
\v 9 त्या देशात तुम्ही चिरकाल राहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना दुधामधाचा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
\s5
\v 10 तुम्ही जेथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमीनीला पाणी देत होता.
\v 11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. त्या देश्यामध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
\v 12 तुमचा देव परमेश्वर त्या जमिनीची काळजी घेतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
\s5
\v 13 परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
\v 14 तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल.
\v 15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हाला खाण्याकरता पुष्कळ असेल.
\s5
\v 16 पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
\v 17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यात तुम्हाला लवकरच मरण येईल.
\s5
\v 18 म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा.
\v 19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
\s5
\v 20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
\v 21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल.
\s5
\v 22 मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
\v 23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल.
\s5
\v 24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
\v 25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांना तुमची दहशत वाटेल.
\s5
\v 26 आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
\v 27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
\v 28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
\s5
\v 29 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
\v 30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
\s5
\v 31 तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यात वस्ती कराल तेव्हा
\v 32 मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.
\s5
\c 12
\p
\v 1 परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत राहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.
\v 2 आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.
\s5
\v 3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ति जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
\v 4 ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.
\s5
\v 5 तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
\v 6 तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांत जन्मलेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.
\s5
\v 7 आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
\s5
\v 8 आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.
\v 9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही.
\s5
\v 10 पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हाला सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हाला स्वस्थता लाभेल.
\v 11 मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.
\s5
\v 12 येताना आपली मुलेबाळे, दासदासी, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवीनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्याबरोबर वाटा नाही) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.
\s5
\v 13 आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.
\v 14 परमेश्वर तुमच्या वंशांच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीविषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा.
\s5
\v 15 तथापी, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.
\v 16 फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
\s5
\v 17 आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.
\s5
\v 18 या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.
\v 19 या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.
\s5
\v 20 तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल.
\s5
\v 21 तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशु-पक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.
\v 22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तिने ते खावे.
\s5
\v 23 पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा.
\v 24 रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.
\v 25 परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.
\s5
\v 26 देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.
\v 27 आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बळीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा.
\s5
\v 28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
\s5
\v 29 तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्राचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांना हुसकावून तुम्ही तेथे राहाल.
\v 30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.
\s5
\v 31 तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
\v 32 तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.
\s5
\c 13
\p
\v 1 स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल.
\v 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल.
\v 3 तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपुर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल.
\s5
\v 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा.
\v 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही ह्या दुष्टाईचे निर्मूलन करा.
\s5
\v 6 तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हाला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल
\v 7 (मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे अासपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.)
\s5
\v 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला लपवू नका.
\v 9 त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरूवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील.
\s5
\v 10 मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे.
\v 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की त्यांनी ही भीती वाटेल, आणि अशी दुष्कृत्ये करायला ते धजावणार नाहीत.
\s5
\v 12 तुम्हाला राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की,
\v 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. आपण अन्य दैवतांची सेवा करु या, असे म्हणून त्यांनी नगरातील लोकांना बहकावले आहेत. (ही दैवते तुम्हाला अपरीचीत असतील.)
\v 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले,
\s5
\v 15 तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.
\v 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये.
\s5
\v 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. नगरे उध्वस्त करण्याविषयी
\v 18 नगरे उध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.
\s5
\c 14
\p
\v 1 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, क्षौर करणे असे करु नका.
\v 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.
\s5
\v 3 परमेश्वराला ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका.
\v 4 खाण्यास पात्र असे पशु हे, गाय बैल, शेळ्या, मेंढ्या,
\v 5 सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे.
\s5
\v 6 पशूपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे.
\v 7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत.
\s5
\v 8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तेसुध्दा अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मेलेल्या डुकराला स्पर्शही करु नका.
\s5
\v 9 जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा.
\v 10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.
\s5
\v 11 कोणताही शुद्ध पक्षी खा.
\v 12 पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या,
\v 13 ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी,
\s5
\v 14 कोणत्याही जातीचा कावळा,
\v 15 निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा,
\v 16 पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड,
\v 17 पाणकोळी, गिधड, करढोक,
\s5
\v 18 निरनिराळ्या जातीचे बगळे, करकोचे, टिटवी, वटवाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.
\v 19 पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत.
\v 20 पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही.
\s5
\v 21 नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्याला तो खायला हरकत नाही किंवा त्याला तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
\s5
\v 22 दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
\v 23 मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवा, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल सतत भय बाळगण्यास शिकशील.
\s5
\v 24 पण एखाद्यावेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हाला शक्य होणार नाही. असे झाले तर, तुझा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दंशमांश तुला तिकडे घेवून जाता आला नाही,
\v 25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा.
\s5
\v 26 त्या पैशाने तुम्ही गाई-गुरे, शेळ्यामेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या.
\v 27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यात सामील करून घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही.
\s5
\v 28 दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा.
\v 29 लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात आशीर्वाद देईल.
\s5
\c 15
\p
\v 1 दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.
\v 2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
\v 3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.
\s5
\v 4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे
\v 5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.
\v 6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
\s5
\v 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.
\v 8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.
\s5
\v 9 कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हाला पाप लागेल.
\v 10 तेव्हा तुम्हाला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हाला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल.
\s5
\v 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
\s5
\v 12 एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा.
\v 13 पण त्याला रिक्त हाताने जाऊ देऊ नका.
\v 14 तर तुझी गुरे, खळे, द्राक्षाकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्याला दे.
\s5
\v 15 आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला आज ही आज्ञा देत आहे.
\v 16 असे घडेल की, तो तुम्हाला म्हणेल, मी तुमच्यापासुन दुर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही.
\v 17 तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
\s5
\v 18 दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल.
\s5
\v 19 तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा. पहिल्या गोऱ्हाला कामाला जुंप नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.
\v 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.
\v 21 पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बळी देऊ नका.
\s5
\v 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरीणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.
\v 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.
\s5
\c 16
\p
\v 1 अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.
\v 2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्यामेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा.
\s5
\v 3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु:ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हाला मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका.
\v 4 तेव्हा या सात दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपवून टाका.
\s5
\v 5 वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका.
\v 6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.
\s5
\v 7 तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा.
\v 8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा.
\s5
\v 9 पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा उभ्या पिकाला विळा लागल्यापासून सात आठवडे मोजा.
\v 10 मग, आपल्या खुशीने एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.
\s5
\v 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.
\v 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून हे विधी न चुकता पाळा.
\s5
\v 13 खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसानी मंडपाचा सण साजरा करा.
\v 14 हा सणही मुले आणि मुली, दासदासी, लेवी, शहरातील वाटसरु, परके, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा.
\s5
\v 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टी आहे. तेव्हा आनंदात राहा.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे.
\v 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे.
\s5
\v 18 तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.
\v 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.
\v 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने राहाल.
\s5
\v 21 जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका.
\v 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.
\s5
\c 17
\p
\v 1 परमेश्वराला यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा विट आहे.
\s5
\v 2 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,
\v 3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,
\v 4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,
\s5
\v 5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा.
\v 6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
\v 7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
\s5
\v 8 एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
\v 9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
\s5
\v 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
\v 11 तुला ज्या सुचना दे देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.
\s5
\v 12 जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलातून या नीच माणसाचे उच्चाटन करा.
\v 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
\s5
\v 14 तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल.
\v 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
\s5
\v 16 त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
\v 17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
\s5
\v 18 राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
\v 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
\s5
\v 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
\s5
\c 18
\p
\v 1 लेवी याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.
\v 2 त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय.
\s5
\v 3 यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.
\v 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
\v 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
\s5
\v 6 प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे.
\v 7 परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.
\v 8 त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
\s5
\v 9 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
\v 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
\v 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये.
\s5
\v 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
\v 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा.
\v 14 इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही.
\s5
\v 15 परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
\v 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.
\s5
\v 17 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे.
\v 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
\v 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.
\s5
\v 20 पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
\v 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार?
\s5
\v 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.
\s5
\c 19
\p
\v 1 तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्देशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल,
\v 2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तीन नगरे तुम्ही राखून ठेवा.
\v 3 म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्याला तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा परमेश्वर देव तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर.
\s5
\v 4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे.
\v 5 उदाहरणार्थ, एखादा माणुस लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नेमके दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे.
\s5
\v 6 हे नगर फार दूर असेल तर त्याला तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्याला त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या माणसाच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
\v 7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव.
\s5
\v 8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हाला देईल.
\v 9 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
\v 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या भूमीवर निर्दोष माणसांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हाला लागणार नाही.
\s5
\v 11 पण द्वेषापोटीही एखादा माणूस संधीची वाट पाहात लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.
\v 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्याला तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्याला मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे.
\v 13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.
\s5
\v 14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या ह्या त्याच्या खूणा आहेत.
\s5
\v 15 एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्याला दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.
\v 16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
\s5
\v 17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.
\v 18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,
\v 19 तर मग तुम्ही त्याला तीच शिक्षा करावी जी त्याला आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा
\s5
\v 20 हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही.
\v 21 तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.
\s5
\c 20
\p
\v 1 तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.
\s5
\v 2 तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.
\v 3 ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
\v 4 कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.”
\s5
\v 5 मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
\s5
\v 6 द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.
\v 7 तसेच, बायकोला मागणी घालून अजून लग्न केलेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.”
\s5
\v 8 त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
\v 9 अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.
\s5
\v 10 तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा.
\v 11 त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.
\s5
\v 12 पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला.
\v 13 आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तरवारीने ठार करा.
\s5
\v 14 पण त्या नगरातील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.
\v 15 तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.
\s5
\v 16 पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.
\v 17 हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा.
\v 18 नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हाला शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.
\s5
\v 19 युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
\v 20 पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.
\s5
\c 21
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्याला कोणी मारले हे कळाले नाही
\v 2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
\s5
\v 3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
\v 4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी.
\s5
\v 5 तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.
\s5
\v 6 मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.
\v 7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही.
\s5
\v 8 हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.”
\v 9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध माणसाच्या हत्येचा दोष तू आपल्यामधून काढून टाकावा.
\s5
\v 10 जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल.
\v 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास.
\v 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
\s5
\v 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
\v 14 पुढे त्याला ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
\s5
\v 15 एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
\v 16 तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.
\v 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
\s5
\v 18 एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल.
\v 19 अशावेळी आईवडीलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे.
\s5
\v 20 या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
\v 21 यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
\s5
\v 22 एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील,
\v 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याच दिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
\s5
\c 22
\p
\v 1 आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.
\v 2 तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत कर.
\s5
\v 3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.
\v 4 कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.
\s5
\v 5 बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.
\s5
\v 6 वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
\v 7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.
\s5
\v 8 नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.
\s5
\v 9 द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.
\v 10 बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
\v 11 लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.
\s5
\v 12 वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
\s5
\v 13 एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि
\v 14 मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.
\s5
\v 15 तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.
\s5
\v 16 मुलीच्या बापाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्याला नकोशी झाली आहे.
\v 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.
\s5
\v 18 यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.
\v 19 त्याला शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
\s5
\v 20 पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;
\v 21 तर गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
\s5
\v 22 एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
\s5
\v 23 एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
\v 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.
\s5
\v 25 पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
\v 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
\v 27 त्याला ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
\s5
\v 28 वाग्दत्त झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
\v 29 त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
\s5
\v 30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
\s5
\c 23
\p
\v 1 जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्याला परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे.
\v 2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
\s5
\v 3 अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये.
\v 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्याला तुम्हाला शाप द्यायला लावले.
\s5
\v 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती.
\v 6 तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका.
\s5
\v 7 अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
\v 8 त्यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही.
\p
\s5
\v 9 युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा.
\v 10 एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये त्याने छावणीच्या आत येवू नये.
\v 11 मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
\s5
\v 12 प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.
\v 13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
\v 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हाला सोडून जायचा.
\s5
\v 15 एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका.
\v 16 त्याला आपल्या निवडीनुसार त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका.
\s5
\v 17 इस्राएलाच्या स्त्रीयांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्राएली पुत्रापैकी कोणासही पुमैथुनास वाहू नये.
\v 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वराला अशा व्यक्तीचा विट आहे.
\s5
\v 19 आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका.
\v 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
\s5
\v 21 तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल.
\v 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
\v 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला काही नवस बोला असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
\s5
\v 24 दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.
\v 25 आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका.
\s5
\c 24
\p
\v 1 एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे.
\v 2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा.
\s5
\v 3 त्यातून समजा असे झाले की या पतीचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट लिहून दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या पतीने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा पती मरण पावला तर पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये.
\v 4 कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे ह्या गोष्टीची तुमचा देव परमेश्वर ह्याला गोष्टीचा विट आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.
\s5
\v 5 एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी.
\s5
\v 6 कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल.
\s5
\v 7 कोणी आपल्या इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
\s5
\v 8 कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील ते ऐका.
\v 9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.
\s5
\v 10 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका.
\v 11 बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल.
\s5
\v 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले कपडे आणील. तर ते वस्त्र अंगावर घेऊन झाेपू नका.
\v 13 त्याला रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्याला पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.
\s5
\v 14 तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.
\v 15 त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.
\s5
\v 16 मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी.
\s5
\v 17 गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये.
\v 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे.
\s5
\v 19 शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्याच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
\v 20 जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नकाे. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे.
\s5
\v 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे.
\v 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हाला हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.
\s5
\c 25
\p
\v 1 लोकांमध्ये वाद झाल्यास ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशानी त्यांचा न्याय करावा. निर्दोष्याला निर्दोष ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.
\v 2 दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्याला फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी.
\s5
\v 3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.
\s5
\v 4 धान्याची मळणी करताना बैलाला मुसके बांधू नका.
\s5
\v 5 दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
\v 6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये.
\s5
\v 7 त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की “आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलामध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही.”
\v 8 अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांना बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल
\s5
\v 9 तर सर्व वडिलांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, “जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.”
\v 10 जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल.
\s5
\v 11 दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची बायको आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले
\v 12 तर दयामाया न दाखवता त्या स्त्रीचा हात तोडावा.
\s5
\v 13 बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.
\v 14 आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.
\s5
\v 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
\v 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला विट आहे.
\s5
\v 17 तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.
\v 18 त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले.
\v 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तुम्हाला शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला विश्राम दिल्यावर हे अंमलात आणा. विसरू नका.
\s5
\c 26
\p
\v 1 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे वस्ती कराल.
\v 2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.
\s5
\v 3 व त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की “परमेश्वराने आमच्या पूर्वजांनी आम्हांला शपथपुर्वक जो देश देण्याचे वचन दिले होते. त्यात मी पोहोंचलो आहे,”
\v 4 मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील.
\s5
\v 5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, “आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.
\s5
\v 6 तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला.
\v 7 मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले.
\s5
\v 8 मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
\v 9 आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली.
\s5
\v 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.” मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा.
\v 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.
\s5
\v 12 दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील.
\v 13 यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
\s5
\v 14 मी दु:खीमन:स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी आपला देव परमेश्वर याचे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे.
\v 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.”
\s5
\v 16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा.
\v 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
\s5
\v 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे.
\v 19 इतर सर्व राष्ट्रापेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा व्हाल.”
\s5
\c 27
\p
\v 1 मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांना आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
\v 2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
\v 3 त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.
\s5
\v 4 यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
\v 5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
\s5
\v 6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
\v 7 तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
\v 8 मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
\s5
\v 9 मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
\v 10 तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळ."
\s5
\v 11 त्याच दिवशी मोशेने लोकांना हेही सांगितले,
\v 12 ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन यांनी आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे.
\s5
\v 13 तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
\v 14 लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
\s5
\v 15 “मूर्ति घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ति म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा विट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 16 “नंतर लेवींनी लोकांना सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 17 परत लेवींना म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 18 लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
\v 19 लेवींना म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 20 लेवींनी म्हणावे “वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 21 लेवींना म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\s5
\v 22 लेवींना म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
\v 23 लेवींना म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\v 24 लेवींना म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\v 25 लेवींना म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\v 26 लेवींना म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
\s5
\c 28
\p
\v 1 आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
\v 2 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील:
\s5
\v 3 तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
\v 4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील.
\s5
\v 5 तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील.
\v 6 तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल.
\s5
\v 7 तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल.
\v 8 परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल.
\s5
\v 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करून घेईल.
\v 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांना तुमचा धाक वाटेल.
\s5
\v 11 परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल.
\v 12 आपले आशीर्वादाचे भांडार परमेश्वर तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही.
\s5
\v 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
\v 14 या शिकवणीपासून परावृत्त होऊ नका. उजवीडावीकडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.
\s5
\v 15 पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
\s5
\v 16 नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.
\v 17 तुमच्या टोपल्या आणि पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
\s5
\v 18 परमेश्वराच्या शापाने तुम्हाला फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील.
\v 19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हाला शाप देईल.
\s5
\v 20 तुम्ही दुष्कृत्ये करून परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात शाप येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलीत होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.
\v 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील.
\s5
\v 22 परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज व बुरशी यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.
\s5
\v 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.
\v 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
\s5
\v 25 तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
\v 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.
\s5
\v 27 परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हाला शासन करील.
\v 28 परमेश्वर तुम्हाला वेडेपणा, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल.
\v 29 भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.
\s5
\v 30 तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.
\v 31 लोक तुमच्यासमोर तुमचा बैल कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्यामेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा असणार नाही.
\s5
\v 32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
\s5
\v 33 तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.
\v 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.
\v 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.
\s5
\v 36 तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठपाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.
\v 37 आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हाला नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल.
\s5
\v 38 तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.
\v 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील.
\s5
\v 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.
\v 41 तुम्हाला मुले आणि मुली होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.
\s5
\v 42 तुमच्या भूमीचे, तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे टोळधाडीने नुकसान होईल.
\v 43 तुमच्या गावात राहणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.
\v 44 ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.
\s5
\v 45 तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.
\v 46 हे शाप तुमच्यावर व तुमच्या सतंतीवर कायमचे चिन्ह व आश्चर्य असे होतील.
\s5
\v 47 सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून
\v 48 परमेश्वराने पाठवलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. आणि तुम्ही त्यांची सेवा तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे होऊन कराल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हाला वागवावे लागेल.
\s5
\v 49 दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
\v 50 त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.
\v 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.
\s5
\v 52 ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
\v 53 तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
\s5
\v 54 तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.
\v 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही, अगदी आपल्या घरातल्यांनाही वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
\s5
\v 56 तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
\v 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
\s5
\v 58 या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि भययोग्य तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर
\v 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल.
\s5
\v 60 अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल.
\v 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.
\v 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.
\s5
\v 63 तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा परमेश्वराला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हाला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल.
\v 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल.
\s5
\v 65 या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.
\v 66 तुम्हाला नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची काही खात्री वाटणार नाही.
\s5
\v 67 सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
\v 68 परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.
\s5
\c 29
\p
\v 1 इस्राएलाशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात देखील पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो पवित्र करार हा होय:
\s5
\v 2 मोशेने सर्व इस्राएलांना बोलावून सांगितले, "मिसर देशामध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे.
\v 3 ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत.
\v 4 पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हाला समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही.
\s5
\v 5 परमेश्वराने तुम्हाला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत.
\v 6 तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने असे केले.
\s5
\v 7 तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला.
\v 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला.
\v 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
\s5
\v 10 आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात.
\v 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत.
\s5
\v 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे.
\v 13 त्याद्वारे तो तुम्हाला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हाला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
\s5
\v 14 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी आज इथे करतो असे नव्हे,
\v 15 तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे.
\v 16 आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हाला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हाला माहीतच आहे.
\s5
\v 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या,
\v 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत्त होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कुळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विष व कडूदवणा प्रमाणे असतात.
\v 19 एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत:चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्याला त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल.
\s5
\v 20 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील.
\v 21 या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात करार लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशातून वेगळे करील.
\s5
\v 22 या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील.
\v 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
\v 24 “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील.
\s5
\v 25 त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.
\v 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.
\s5
\v 27 म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली.
\v 28 क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?”
\s5
\v 29 काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे."
\s5
\c 30
\p
\v 1 मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला इतर राष्ट्रांमध्ये घालवून देईल. तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींची आठवण होईल.
\v 2 तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळाल आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची वाणी ऐकाल.
\v 3 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर दया दाखवील आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांगा केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील तो तुम्हाला मुक्त करील.
\s5
\v 4 तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करून टाकली होती तेथून तुझा देव परमेश्वर तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात!
\v 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक कल्याण करील आणि तुला अधीक बहूगुणीत करील.
\s5
\v 6 तुमचा देव परमेश्वर तुमच्या हृदयाची सुंता व तुमच्या पुर्वंजांच्या हृदयाची सुंता करील अाणि अापण जीवंत राहावे म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपुर्ण मनाने व संपुर्ण जीवाने प्रेम कराल.
\v 7 मग हे सर्व शाप तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंवर व तिरस्कार करणाऱ्यावर आणील.
\v 8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल.
\s5
\v 9 मी तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर संतती होईल. गायांना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्याला आनंद वाटेल.
\v 10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.
\s5
\v 11 जी आज्ञा मी आता तुम्हाला देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही.
\v 12 ती काही स्वर्गात नाही, की 'आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील?' असे तुम्हाला म्हणावे लागावे.
\s5
\v 13 ती समुद्रापलीकडे नाही की, 'आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करून जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?' असे तुम्हाला म्हणावे लागावे.
\v 14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हाला ते पाळता येईल.
\s5
\v 15 आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत.
\v 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
\s5
\v 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;
\v 18 तर मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हाला बजावून सांगतो. यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.
\s5
\v 19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्विकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहतील.
\v 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
\s5
\c 31
\p
\v 1 मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.
\v 2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे, परमेश्वराने मला सांगितले आहे.
\v 3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हाला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
\s5
\v 4 अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील.
\v 5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे.
\v 6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
\s5
\v 7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर.
\v 8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.”
\s5
\v 9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले.
\v 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.
\v 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे.
\s5
\v 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचे भय धरावे या शिकवणीचे जीवनात आचरण करावे.
\v 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लवकरच तुम्ही यार्देन ओलांडून जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्याज विषयीचे भय धरण्यास तो शिकवील.”
\s5
\v 14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शनमंडपात गेले.
\v 15 दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला.
\s5
\v 16 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, "तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.
\s5
\v 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत.
\v 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
\s5
\v 19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करून घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरूद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील.
\v 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील.
\s5
\v 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. कारण जो देश मी शपथ वाहून देऊ केला. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे याबाबत जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
\s5
\v 22 तेव्हा त्याच दिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले.
\v 23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”
\s5
\v 24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर
\v 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,
\v 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुध्द हा साक्ष राहील.
\s5
\v 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरूद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.
\v 28 तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना यांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.
\v 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
\s5
\v 30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले.
\s5
\c 32
\p
\v 1 "हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते. “पृथ्वी ऐक शब्द माझ्या मुखातले.
\v 2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझिमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.
\s5
\v 3 घोषणाकरीन मी परमेश्वराच्या नावाची. तुम्हीही परमेश्वराची महती गा!
\v 4 तो आहे दुर्ग आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.
\s5
\v 5 तुम्ही त्याची मुले नाहीत. तुमची पापे त्याला मळीन करतील. तुम्ही लबाड आहात.
\v 6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच.
\s5
\v 7 आठवण करा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते लक्षात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल आपल्या वडीलजनांना विचारा, ते सांगतील.
\v 8 परात्पर देवाने लोकाची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल लोंकाच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या.
\s5
\v 9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे.
\v 10 याकोब (इस्राएल) त्याला तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्याला सांभाळले.
\s5
\v 11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.
\v 12 परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
\s5
\v 13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
\s5
\v 14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यालात.
\s5
\v 15 पण यशुरुन (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
\v 16 त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ति त्याला मान्य नाहीत, तर या लोकांनी मूर्ति केल्या व त्याचा कोप ओढवला.
\s5
\v 17 खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
\v 18 आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.
\s5
\v 19 परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्याला क्रुद्ध केले होते!
\v 20 तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत.
\s5
\v 21 मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढवला. मूर्ति म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ति करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.
\s5
\v 22 माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
\s5
\v 23 मी इस्राएलांवर संकटे आणीन. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.
\v 24 भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भंयकर मरीने ग्रस्त होतील. वनपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.
\s5
\v 25 रस्त्यावर सैन्य त्यांना तरवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरूण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.
\v 26 लोकांच्या स्मृतीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.
\s5
\v 27 पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही, अशी ते बढाई मारतील.
\s5
\v 28 इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे, त्याला समज म्हणून नाहीच.
\v 29 ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता.
\s5
\v 30 एक माणूस हजारांचा पाठलाग करु शकेल काय? दोघेजण दहा हजारांना सळो की पळे करून सोडू शकतील का? परमेश्वरानेच या जमावला आपल्या शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल.
\v 31 आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात.
\s5
\v 32 सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे त्यांची द्राक्षे विषारी आहेत त्यांचे घोस कडूच आहेत.
\s5
\v 33 त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस अजगराचे विषारी गरळासमान आहे.
\v 34 परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे.
\s5
\v 35 अनवधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहात आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.
\s5
\v 36 परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करून सोडील.
\s5
\v 37 परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग?
\v 38 ते खोटे दैवत तुमच्या यज्ञातील चरबी खाणारे, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षारस प्राशन करणारे दैवत कोठे आहेत? तेव्हा त्या दैवतांनीच उठून यावे व तुम्हाला साहाय्य करावे!
\s5
\v 39 तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
\v 40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील.
\s5
\v 41 माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत.
\s5
\v 42 माझे शत्रू ठार होतील. त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील.
\s5
\v 43 समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा. कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो. शत्रूला योग्य अशी सजा देतो. आणि आपली प्रजा आणि प्रदेश ह्यांच्यासाठी प्रायश्चित करतो.”
\s5
\v 44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा (म्हणजेच ,यहोशवा) मोशेबरोबर होता.
\v 45 ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने इस्राएल लोकांना सांगण्याचे संपविल्यावर
\s5
\v 46 मोशे लोकांना म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा.
\v 47 त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.”
\s5
\v 48 त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
\v 49 “मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.
\s5
\v 50 या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल.
\v 51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही.
\v 52 तेव्हा मी इस्राएलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस पण तुझे तेथे जाणे होणार नाही.”
\s5
\c 33
\p
\v 1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
\v 2 “परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिकत्याच्याबरोबर होते.
\s5
\v 3 परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
\v 4 मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
\s5
\v 5 इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
\v 6 रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
\s5
\v 7 मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: "परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्याला शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो."
\s5
\v 8 लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
\s5
\v 9 हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
\s5
\v 10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
\s5
\v 11 परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्याला आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
\s5
\v 12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, "बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील."
\s5
\v 13 योसेफाविषयी तो म्हणाला, "योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
\s5
\v 14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
\v 15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
\s5
\v 16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो.
\s5
\v 17 प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत."
\s5
\v 18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, "जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
\v 19 ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील."
\s5
\v 20 गादविषयी मोशे म्हणाला, "गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
\s5
\v 21 स्वत:साठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वत:ला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो."
\s5
\v 22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
\s5
\v 23 नफताली विषयी मोशेने सांगितले, "नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
\s5
\v 24 आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
\v 25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
\s5
\v 26 हे यशुरूना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
\s5
\v 27 देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
\s5
\v 28 म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
\s5
\v 29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!
\s5
\c 34
\p
\v 1 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश,
\v 2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला.
\v 3 तसेच नेगेब आणि सोअरापासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हेही दाखवले.
\s5
\v 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.”
\v 5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच.
\v 6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही.
\s5
\v 7 मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती.
\v 8 इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.
\s5
\v 9 मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
\s5
\v 10 इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.
\v 11 मिसरमध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले.
\v 12 मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.

1084
06-JOS.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1084 @@
\id JOS
\ide UTF-8
\h यहोशवा
\toc1 यहोशवा
\toc2 यहोशवा
\toc3 jos
\mt1 यहोशवा
\s5
\c 1
\p
\v 1 आणि परमेश्वराचा सेवक मोशे, याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस, याच्याशी परमेश्वर बोलला,
\v 2 माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्हीही यार्देन ओलांडून जा, जो देश मी इस्राएल लोकांस देत आहे त्यात जा.
\v 3 मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
\p
\s5
\v 4 रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यतचा हित्ती याचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यतचा प्रदेश तुमचा होईल.
\v 5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.
\p
\s5
\v 6 शूर आणि निर्भय हो, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
\v 7 मात्र तू शूर व निर्भय हो आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे जेथे जेथे जाशील तेथे तेथे तू सुज्ञपणाने वागशील.
\p
\s5
\v 8 नियमशास्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, यासाठी की त्यात जे काही लिहीले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील.
\v 9 मी तुला आज्ञा केली नाही का? शूर हो, निर्भय हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
\p
\s5
\v 10 मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,
\v 11 छावणीतून फिरून लोकांना अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.
\p
\s5
\v 12 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्याना म्हटले,
\v 13 परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हांला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
\p
\s5
\v 14 या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हांला दिला आहे त्यांतच तुमच्या स्त्रिया, पुत्र-पौत्र आणि गुरेढोरे यांनी राहावे, पण तुम्ही सर्व योद्धयानी सशस्त्र होऊन आपल्या बांधवापुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.
\v 15 परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.
\p
\s5
\v 16 तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, जे काही करण्याची तू आम्हाला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.
\v 17 जसे आम्ही सर्वबाबतीत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.
\v 18 जो कोणी तुझ्या आज्ञेविरूध्द बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्याला देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.
\s5
\c 2
\p
\v 1 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.
\v 2 मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.
\v 3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.
\p
\s5
\v 4 त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही.
\v 5 अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही, तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.
\p
\s5
\v 6 पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यात त्यांना लपवून ठेवले होते.
\v 7 त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापार्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले.
\p
\s5
\v 8 इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली,
\v 9 ती म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्याची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे,
\p
\s5
\v 10 कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.
\v 11 हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
\p
\s5
\v 12 मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या पित्याच्या घराण्यावर दया करू, आणि मला खात्रीदायक खूण द्या,
\v 13 तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वाचे प्राण मरणापासून वाचवू, अशीहि शपथ घ्या,
\p
\s5
\v 14 तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाहीतर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.
\p
\s5
\v 15 तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरले, कारण तिचे घर गांवकुसास लागून होते
\v 16 तिने त्यांना सांगितले होते की, तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा, तोपर्यत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा.
\v 17 ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ घेतली आहे तिच्याबाबतीत आम्हाला दोष न लागो,
\p
\s5
\v 18 मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले, तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरांत तुझे आईवडील, भाऊबंद आणि तुझ्या वडीलांचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर.
\v 19 कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आम्ही दोषमुक्त होऊ त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.
\p
\s5
\v 20 जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू घेतली आहेस तिच्यातून आम्ही दोषमुक्त होऊ.
\v 21 ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.
\p
\s5
\v 22 ते जाऊन डोंगरास पोहोचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांच्या पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहुकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.
\p
\s5
\v 23 मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले.
\v 24 ते यहोशवाला म्हणाले, खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.
\s5
\c 3
\p
\v 1 यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहीले.
\p
\s5
\v 2 तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्यभागामधून गेले
\v 3 व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश लेवीय याजक ऊचलून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा;
\v 4 पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.
\p
\s5
\v 5 मग यहोशवा लोकांना म्हणाला, शुध्द व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.
\v 6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला, त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.
\s5
\v 7 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.
\v 8 कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.
\p
\s5
\v 9 मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर याची वचने ऐका,
\v 10 यहोशवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्यासमोरून खरोखरच वतनातून घालवून देईल हे याप्रमाणे तुम्हाला कळून येईल.
\v 11 संपुर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.
\p
\s5
\v 12 तर आता प्रत्येक वंशातील एक माणूस, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;
\v 13 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.
\p
\s5
\v 14 लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबुतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.
\v 15 कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.
\v 16 तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
\p
\s5
\v 17 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशाप्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
\s5
\c 4
\p
\v 1 राष्ट्रातील सर्व लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
\v 2 प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष लोकांमधून निवड,
\v 3 आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्याठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.
\p
\s5
\v 4 मग यहोशवाने प्रत्येक इस्राएल वंशांतून एक असे जे बारा लोक तयार केले होते त्यांना बोलावले.
\v 5 यहोशवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,
\p
\s5
\v 6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हा दाखल होईल, आणि पुढे तुमची संताने विचारतील की, या धोंड्यांचा अर्थ काय आहे?
\v 7 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंग झाले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशाप्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.
\p
\s5
\v 8 यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागांतून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर आपल्या मुक्कामावर नेऊन ठेवले.
\v 9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.
\p
\s5
\v 10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.
\v 11 झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.
\s5
\v 12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे पलीकडे गेले,
\v 13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहोचले.
\v 14 त्यादिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली, जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.
\s5
\v 15 परमेश्वर यहोशवाला म्हणाला
\v 16 साक्षपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.
\p
\s5
\v 17 त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनेतून निघून वर येण्याची आज्ञा केली.
\v 18 मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
\p
\s5
\v 19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला.
\v 20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले.
\v 21 तो इस्राएल लोकांना म्हणाला की, पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, हे धोंडे कशासाठी आहेत?
\p
\s5
\v 22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, इस्राएल लोक ह्या यार्देनेतून कोरड्या जमिनीवरून चालत पार आले.
\v 23 आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी तुंम्ही तिच्यातून चालत पार आला तोपर्यंत तुमच्यापुढून हटवले.
\v 24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुमचा देव परमेश्वर याचे तुम्ही निरंतर भय धरावे.
\s5
\c 5
\p
\v 1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.
\p
\s5
\v 2 त्यासमयी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.
\v 3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली.
\p
\s5
\v 4 यहोशवाने त्यांची सुंता केली याचे कारण हे की, युद्धास लायक असे मिसर देशांतून निघालेले सगळे पुरुष मिसर देशांतून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.
\v 5 मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानांत वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;
\s5
\v 6 कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही
\v 7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते.
\p
\s5
\v 8 सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.
\v 9 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.
\p
\s5
\v 10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.
\v 11 वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशांत पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला.
\p
\s5
\v 12 त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाह, त्यावर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
\p
\s5
\v 13 यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडला. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
\p
\s5
\v 14 तो म्हणाला, नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीची आपल्या दासासाठी काय आज्ञा आहे?
\v 15 परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसे केले.
\s5
\c 6
\p
\v 1 कारण आता इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.
\v 2 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योध्दे मी तुझ्या हाती दिले आहेत.
\s5
\v 3 तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.
\v 4 सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,
\s5
\v 5 नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घनाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भींती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.
\s5
\v 6 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.
\v 7 तो लोकांना म्हणाला, चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.
\s5
\v 8 यहोशवाने लोकांना सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराचा कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.
\v 9 सशस्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते.
\s5
\v 10 मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.
\v 11 याप्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला.
\s5
\v 12 यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला.
\v 13 सात याजक एडक्याच्या शिंगाची कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते.
\v 14 ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.
\s5
\v 15 सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्यादिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या.
\v 16 सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;
\s5
\v 17 हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.
\v 18 तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.
\v 19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची ही सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.
\s5
\v 20 तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिली, कर्ण्याचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.
\v 21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृध्द, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तरवारीने समूळ नाश केला.
\s5
\v 22 तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, तुंम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.
\s5
\v 23 तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई वडिलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले.
\v 24 मग त्यांनी ते नगर व त्यांतले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली.
\s5
\v 25 यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासुद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
\s5
\v 26 त्यासमयी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.
\v 27 याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची किर्ती सर्व देशभर पसरली.
\s5
\c 7
\p
\v 1 परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
\s5
\v 2 बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले,
\v 3 नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जाऊ नये, फक्त दोन- तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत;
\s5
\v 4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला.
\v 5 आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.
\s5
\v 6 यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.
\v 7 मग यहोशवा म्हणाला, हायहाय! हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांना यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते!
\s5
\v 8 हे प्रभू, इस्राएलांने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू?
\v 9 कारण कनानी लोक आणि देशांतले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांना आमचे नाव विसरावयास लावतील. आणि तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?
\s5
\v 10 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
\v 11 इस्राएलांने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.
\v 12 त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुम्हामध्ये राहणार नाही.
\s5
\v 13 तर उठ, लोकांना पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यांतून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्या सर्व नाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.
\s5
\v 14 सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर रहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे;
\v 15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.
\s5
\v 16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला.
\v 17 मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कुळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळांतले एकएक घराणे समोर आणण्यात आले आणि जब्दीला पकडले गेले.
\v 18 मग त्या घराण्यातील एकएका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान हा पकडला गेला.
\s5
\v 19 तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला. माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबूली कर; कृपाकरून तू काय केले ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नको.
\v 20 आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वराविरुध्द पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे
\v 21 लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रूपे त्याच्याखाली आहे.
\s5
\v 22 तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या व त्याच्याखाली रुपे होते.
\v 23 त्यांने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.
\s5
\v 24 त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे गुरे, बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व आखोर खिंडीत नेले
\s5
\v 25 यहोशवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.
\v 26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरून त्या स्थळाला आजपर्यत आखोर खिंड (त्रास देणारी) असे म्हणतात.
\s5
\c 8
\p
\v 1 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, भिऊ नको, धैर्यहीन होऊ नको; उठ, सर्व लढाई करणाऱ्या लोकांना बरोबर घे. आय नगरापर्यंत जा. पहा, आयचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
\v 2 यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर; मात्र त्यातील लूट व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या मागे सैन्याला दबा धरून बसव.
\s5
\v 3 त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्धयासह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले.
\v 4 त्याने त्यांना अशी आज्ञा केली पाहा, नगराच्या मागे जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
\s5
\v 5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ. आणि ते पूर्वीप्रमाणे आम्हावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापुढून पळायला लागू.
\v 6 असे आम्ही त्यांना पळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल, पहिल्याप्रमाणेच आपल्याला घाबरून हे पळ काढीत आहेत. याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळायला लागू;
\v 7 मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.
\s5
\v 8 तुम्ही ते नगर काबीज करताच त्याला आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे पालन करा; पाहा, मी तुम्हांला आज्ञा केली आहे.
\v 9 मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.
\s5
\v 10 यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि त्याने सैन्य तयार केले, यहोशवा आणि इस्राएलाचे वडील आणि त्यांनी आय नगरावर हल्ला केला.
\v 11 त्यांच्याबरोबर सर्व योद्धे लढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर यांच्यामध्ये एक दरी होती.
\v 12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले.
\s5
\v 13 त्याने नगरांच्या उत्तरेच्या ठिकाणी मुख्य सैन्य आणि पश्चिमेकडे सैन्याची रक्षण करणारे ठरवून यहोशवा त्या रात्री त्या दरीत राहिला.
\v 14 आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याचा नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करावयाला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहित नव्हते.
\s5
\v 15 यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर पराजित झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळायला लागले.
\v 16 त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलवण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले.
\v 17 इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर पूर्ण सोडून देऊन आणि उघडे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
\s5
\v 18 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे कर, कारण ते मी तुझ्या हाती देईन त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे केली.
\v 19 त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्या सैन्याने वेगाने धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.
\s5
\v 20 आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पहिले तो नगरातून निघणारा धूर आकाशांत चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे निसटून जाण्याचा मार्गच राहिला नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले.
\v 21 दबा धरणाऱ्यांनी नगर घेतले आहे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलांनी पाहिले तेव्हा ते मागे उलटून आय नगराच्या माणसांना वर तुटून पडले.
\s5
\v 22 आणि दुसरे इस्राएल सैन्य जे नगरात होते ते त्यांच्यावर चाल करून बाहेर आले. आयचे माणसे इस्राएलाच्या मध्ये सांपडली; कित्येक इस्राएल इकडे व कित्येक तिकडे होते; आणि त्यांनी त्यांना असे मारले की त्यांच्यातला कोणी वाचला किंवा निसटून गेला नाही.
\v 23 त्यांनी आय नगराच्या राजाला पकडून जिवंत ठेवले आणि त्याला यहोशवाकडे आणले.
\s5
\v 24 ज्या मोकळ्या रानांत त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता तेथे इस्राएलांनी आय नगराच्या रहिवाश्याचा संहार केला आणि त्यांनी त्या सर्वांचा तरवारीच्या धारेने नाश केला. मग इस्राएल लोक आय नगरात परत आले. त्यावर त्यांनी तरवारीच्या धारेने हल्ला केला.
\v 25 त्यादिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली, त्यात सर्व स्त्रिया आणि पुरुष मिळून ती बारा हजार होती.
\v 26 आय येथील सर्व रहिवाश्याचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.
\s5
\v 27 परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरांतली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.
\v 28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे.
\s5
\v 29 आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून काढून आणि नगराच्या वेशीजवळ फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली. ती आजपर्यंत तशीच आहे.
\s5
\v 30 मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
\v 31 परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात् मोशेच्या नियमशास्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्श देखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पिले आणि शांत्यर्पणाचे यज्ञ केले.
\v 32 तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने दगडांच्या शिळांवर मोशेने दिलेल्या नियमशास्राची नक्कल लिहिली.
\s5
\v 33 परमेश्वराचा कराराचा कोश वाहणाऱ्या लेवी याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अधिकारी आणि न्यायाधीश तसेच देशांत जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरीज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.
\s5
\v 34 त्यानंतर नियमशास्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाशी सर्व वचने त्याने वाचून दाखवली.
\v 35 इस्राएलाच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी याच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 मग यार्देनेच्या डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे सर्व राजे होते
\v 2 तेव्हा त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरूध्द लढाई पुकारली.
\s5
\v 3 यहोशवाने यरीहो आणि आय या नगराचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यानी ऐकले,
\v 4 तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी स्वतःसाठी शिधासामग्री घेतली आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षारसाचे बुधले घेतले;
\v 5 त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुने पुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या
\s5
\v 6 ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशांहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.
\v 7 इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.
\v 8 ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहो यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला?
\s5
\v 9 त्यांनी त्याला म्हटले, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची किर्ती आम्ही ऐकली आहे;
\v 10 आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.
\s5
\v 11 तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशांतील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.
\v 12 या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्यादिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.
\v 13 हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
\s5
\v 14 तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.
\v 15 मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षीत ठेवण्याचे, अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
\v 17 नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले त्यांच्या नगरांची नांवे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.
\s5
\v 18 पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.
\v 19 परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांना सांगितले, आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लावता येत नाही.
\s5
\v 20 त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.
\v 21 नेत्यांनी लोकांना सांगितले की, त्यांना जिवंत राहू द्या. नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.
\s5
\v 22 यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हाला का फसवले?
\v 23 म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन राहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन राहाल.
\s5
\v 24 त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्याचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होत; तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची फार भीति वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
\v 25 आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.
\s5
\v 26 त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,
\v 27 यहोशवाने त्यादिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
\s5
\c 10
\p
\v 1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
\v 2 तेव्हा यरुशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योध्दे होते.
\s5
\v 3 मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
\v 4 वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.
\s5
\v 5 तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पांच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
\s5
\v 6 हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, आपल्या दासावरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आम्हावर चालून आले आहेत
\v 7 तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.
\s5
\v 8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.
\s5
\v 9 यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
\v 10 आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारीत गेले.
\s5
\v 11 ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मेले.
\s5
\v 12 परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्यादिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला. हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.
\s5
\v 13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
\v 14 असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्यादिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
\s5
\v 15 मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
\v 16 ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
\v 17 मक्केदा येथील गुहेत ते पांच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले
\s5
\v 18 तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा.
\v 19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
\s5
\v 20 यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांतले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
\v 21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
\s5
\v 22 मग यहोशवा म्हणाला, गुहेचे तोड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.
\v 23 त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
\s5
\v 24 ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योध्दयाच्या सेनानायकांना म्हणाला, पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या. तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
\v 25 यहोशवा त्यांना म्हणाला, भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.
\s5
\v 26 नंतर यहोशवा त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
\v 27 सूर्यास्तासमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यांत त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
\s5
\v 28 त्यादिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जीवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्यांने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
\s5
\v 29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांस बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरूध्द त्यांनी लढाई केली;
\v 30 परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या त्यातल्या सर्व जीवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांतला कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
\s5
\v 31 त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरूध्द लढला.
\v 32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जीवंत प्राण्यांचा त्याने तलवारीने नाश केला.
\s5
\v 33 तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा मार दिला की त्यांतला एकही जिवंत राहिला नाही.
\s5
\v 34 मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
\v 35 त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशांतल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जीवंत प्राण्यांचा त्यादिवशी त्याने समूळ नाश केला.
\s5
\v 36 मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
\v 37 त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यांतले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जीवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
\s5
\v 38 नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरूध्द लढला.
\v 39 त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जीवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
\s5
\v 40 याप्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांस काबीज केले; कोणालाही जिवंत राहू देले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जीवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला
\v 41 यहोशवाने तरवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलुख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
\s5
\v 42 हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
\v 43 मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.
\s5
\c 11
\p
\v 1 जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्याना,
\v 2 आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना.
\v 3 आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
\s5
\v 4 तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
\v 5 या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
\s5
\v 6 मग परमेश्वर यहोशवास म्हणाला, त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी यावेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.
\v 7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्धयासह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
\s5
\v 8 परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांच्या एवढा संहार केला की त्यांतला एकही जिवंत राहिला नाही.
\v 9 परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
\s5
\v 10 त्यासमयी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
\v 11 तेथल्या प्रत्येक जीवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
\s5
\v 12 परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
\v 13 टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
\s5
\v 14 या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तरवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
\v 15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
\s5
\v 16 अशाप्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
\v 17 तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यांतील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
\s5
\v 18 त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
\v 19 गिबोनांत राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
\v 20 कारण परमेश्वर देवाचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखविता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करावयाला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची ह्ददये कठीण केली.
\s5
\v 21 तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
\v 22 इस्राएल लोकांच्या देशांत एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.
\s5
\v 23 परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांना वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.
\s5
\c 12
\p
\v 1 यार्देनेच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत.
\v 2 अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोनात रहात होता, तो अरोएर, जे खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर होते, तेथून, आणि अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
\s5
\v 3 किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, आराबाच्या समुद्राच्या (क्षार किंवा मृत समुद्राच्या) पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत सुध्दा सीहोन राज्य करत असे.
\v 4 बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.
\v 5 तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
\s5
\v 6 परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे, याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.
\s5
\v 7 यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
\v 8 डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.
\s5
\v 9 या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेल शेजारी असलेल्या आयचा राजा,
\v 10 यरुशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
\v 11 यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
\v 12 एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
\s5
\v 13 दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
\v 14 हर्माचा राजा, अरादचा राजा,
\v 15 लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
\v 16 मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
\s5
\v 17 तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
\v 18 अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
\v 19 मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
\v 20 शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
\s5
\v 21 तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
\v 22 केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
\v 23 नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
\v 24 तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते.
\s5
\c 13
\p
\v 1 आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतार वयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
\s5
\v 2 हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
\v 3 मिसराच्या पूर्वस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंतहि जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
\s5
\v 4 दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
\v 5 आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
\s5
\v 6 लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्या टाकून वाटून दे.
\v 7 तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
\s5
\v 8 मनश्शाच्या बाकीच्या अर्ध्या वंशास व रऊबेनी व गादी यांस आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यास यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
\v 9 आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारेही;
\s5
\v 10 आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
\v 11 गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
\v 12 म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
\s5
\v 13 तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
\s5
\v 14 लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे, तेच त्यांचे वतन आहे;
\s5
\v 15 परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
\v 16 आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या कांठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
\s5
\v 17 हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ बाल व बेथ-बालमोन;
\v 18 आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
\v 19 आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
\s5
\v 20 बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
\v 21 आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यात होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्याला मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहित मारले
\s5
\v 22 आणि त्यांच्या मारलेल्या मध्ये तो दैवी प्रश्न विचारणारा बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तरवारीने जीवे मारले.
\v 23 तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
\s5
\v 24 गादाच्या वंशालाहि, त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
\v 25 आणि त्यांची सीमा याजेर व गिलादांतली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
\v 26 आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाइमापासुन दबीरच्या सीमेपर्यंत;
\s5
\v 27 आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या कांठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
\v 28 गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
\s5
\v 29 आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
\v 30 की त्यांची सीमा महनाइमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातले याईराचे जे अवघे गांव साठ नगरे त्यांसुद्धा;
\v 31 आणि अर्धा गिलाद, आणि बाशानांत ओगाच्या राज्यांतली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
\s5
\v 32 यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलिकडे पूर्वेस मवाबाच्या अरण्यात मोशेने जी वतने दिली ती हीच.
\v 33 लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.
\s5
\c 14
\p
\v 1 आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यानी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.
\s5
\v 2 परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशाविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले.
\v 3 कारण दोन वंशास व अर्ध्या वंशास मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांस वतन दिले नाही.
\v 4 वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांस देशात त्यांनी वांटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशुसाठी व त्यांच्या मालमतेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.
\v 5 जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला.
\s5
\v 6 आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा माणूस मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहितच आहे.
\v 7 परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेश-बर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षाचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्याला कळवली.
\s5
\v 8 पण माझे बंधु जे माझ्याबरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो.
\v 9 तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले तो खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन असा सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास.
\s5
\v 10 तर आता पाहा इस्राएल रानांत चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जीवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐशी वर्षांचा आहे.
\v 11 जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे.
\s5
\v 12 तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.
\s5
\v 13 तेव्हा यहोशवाने त्याला आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले
\v 14 यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला.
\v 15 पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा माणूस होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.
\s5
\c 15
\p
\v 1 यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
\v 2 आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
\s5
\v 3 ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे.
\v 4 आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
\s5
\v 5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरुन यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या कांठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
\v 6 मग ती सीमा बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
\s5
\v 7 मग ती सीमा आखोर खिंडीपासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
\v 8 मग ती सीमा हित्रोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरुशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाती; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
\s5
\v 9 मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
\v 10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्नाकडे गेली.
\s5
\v 11 मग ती सीमा एक्रोनाच्याबाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोनापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेलास गेली; ह्या सीमेचा शेवट समुद्रात होता.
\v 12 आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
\s5
\v 13 आणि यहोशवाने परमेश्वराने सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन, हे त्याला दिले; हा आर्बा अनाक्या पिता होता.
\v 14 मग तेथून कालेबाने अनाकाच्या तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
\v 15 नंतर तो तेथून दबीरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
\s5
\v 16 तेव्हा कालेब म्हणाला, जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्याला मी आपली कन्या अखसा बायको करून देईन.
\v 17 तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्याला बायको करून दिली.
\s5
\v 18 आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायाला त्याला गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
\s5
\v 19 तेव्हा तिने म्ह्टले, मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या. त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
\s5
\v 20 यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
\s5
\v 21 यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
\v 22 कीना व दीमोना व अदादा;
\v 23 आणि केदेश व हासोर व इथनान;
\v 24 जीफ व टेलेम व बालोथ;
\s5
\v 25 हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुध्दा म्हणत)
\v 26 अमाम व शमा व मोलादा;
\v 27 आणि हसर-गदा व हेशमोन व बेथ-पेलेट;
\v 28 आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
\s5
\v 29 बाला, ईयीम व असेम;
\v 30 आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
\v 31 आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
\v 32 आणि लवावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस व त्यांचे गांव.
\s5
\v 33 तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
\v 34 जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
\v 35 यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
\v 36 आणि शारईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथाईम, अशी चवदा नगरे, आणि त्यांचे गांव;
\s5
\v 37 सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
\v 38 दिलन, मिस्पा व यकथेल;
\v 39 लाखीश व बसकाथ व एग्लोन;
\s5
\v 40 कब्बोन व लहमाम व किथलीश;
\v 41 गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांचे गांव.
\s5
\v 42 लिब्ना व एथेर व आशान;
\v 43 इफ्ताह व अष्णा व नजीब;
\v 44 आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गांवे.
\s5
\v 45 एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गांवे;
\v 46 एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावासह.
\v 47 अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
\s5
\v 48 आणि डोंगरांळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
\v 49 दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
\v 50 अनाब व एष्टमो व अनीम,
\v 51 आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडली खेडी,
\s5
\v 52 अरब व दूमा व एशान,
\v 53 यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
\v 54 हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
\s5
\v 55 मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
\v 56 इज्रेल व यकदाम व जानोहा,
\v 57 काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 58 हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
\v 59 माराथ, बेथ-अनोथ व एलतकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 60 किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
\v 61 रानांतली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
\v 62 आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
\s5
\v 63 तथापि यरुशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरुशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.
\s5
\c 16
\p
\v 1 योसेफ वंशाला नेमून दिलेली जो भाग चिठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशांतून बेथेलास निघते.
\v 2 मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.
\s5
\v 3 मग पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
\v 4 याप्रमाणे योसेफाची वंशज मनश्शे व एफ्राइम यांस वतन मिळाले.
\s5
\v 5 एफ्राइमाच्या वंशजाचे जे त्यांची सीमा कुळाप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार याच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.
\v 6 आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूस गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली.
\v 7 नंतर ती यानोहा पासून अटारोथ व नारा येथपासून उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.
\s5
\v 8 तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.
\v 9 आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गांवे होती;
\s5
\v 10 तथापि जे कनानी गेजेरात राहत होते. त्यास एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.
\s5
\c 17
\p
\v 1 मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेली होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्या टाकून ठरवला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलादाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्याला गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता.
\v 2 मनश्शेच्या राहिलेल्या वंशाजासही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबियेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;
\s5
\v 3 मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुले नव्हते, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत, महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
\v 4 आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांपुढे त्या येऊन म्हणाल्या ,परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हास आमच्या भाऊबदांमध्ये वतन द्यावे. यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यास त्यांच्या बापाच्या भाऊबदांमध्ये वतन दिले.
\s5
\v 5 आणि यार्देनेच्या पलीकडे जे गिलाद व बाशान या प्रांताखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.
\v 6 कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशास गिलाद प्रांत मिळाला.
\s5
\v 7 आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.
\v 8 तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.
\s5
\v 9 आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
\v 10 दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.
\s5
\v 11 आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यात राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यात राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
\v 12 पण या नगरातील रहिवाश्यास मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हती; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला.
\s5
\v 13 तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाली, तेव्हा त्यांनी कनान्यांचा नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.
\s5
\v 14 तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठी टाकून आम्हास वतनाचा एकच विभाग का दिला आहे?
\v 15 तेव्हा यहोशवाने त्यास म्हटले, जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हांस पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.
\s5
\v 16 नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, डोंगराळ प्रदेश आम्हास पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांती राहतात, त्या सर्वांस लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडीं यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यांत आहेत.
\v 17 तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनश्शे यांस असे म्हटले की, तुम्ही संख्येने बहुत आहात, व तुमचे सामर्थ्यहि मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा;
\v 18 तेव्हा डोंगराळ प्रदेश तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरले भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.
\s5
\c 18
\p
\v 1 मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी सभामंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.
\v 2 तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.
\s5
\v 3 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, जो देश तुमच्या पूर्वजाचा देव परमेश्वर याने तुम्हास दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?
\v 4 तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यास पाठवीन, आणि त्यांनी देशांत जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.
\s5
\v 5 म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत राहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत राहावे.
\v 6 तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्याचे वर्णन करा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्या टाकीन.
\s5
\v 7 लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश यांचे, यार्देनेच्या पलिकडे पूर्वेस, जे वतन परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यास दिले, ते त्यास मिळालेच आहे.
\s5
\v 8 तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरले आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन करा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुम्हासाठी चिठ्या टाकीन.
\v 9 याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.
\s5
\v 10 मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्या टाकल्या; असे यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्याच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.
\s5
\v 11 तेव्हा बन्यामीनाच्या वंशजास नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठी टाकून जो वांटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.
\v 12 म्हणजे उत्तर बाजूस त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानांत निघते.
\s5
\v 13 मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते
\v 14 तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्र्चिम सीमा हीच.
\s5
\v 15 दक्षिणेकडील सीमा पश्र्चिमेस सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते.
\v 16 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेस, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.
\s5
\v 17 मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.
\v 18 मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेस जाऊन अराबास उतरली.
\s5
\v 19 मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जावून गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली.
\v 20 आणि पूर्वबाजूस त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामीनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.
\s5
\v 21 आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस
\v 22 आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल;
\v 23 अव्वीम व पारा व आफ्रा;
\v 24 कफर-अम्मोनी व अफनी व गेबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;
\s5
\v 25 गिबोन व रामा व बैरोथ;
\v 26 मिस्पा व कफीरा व मोजा;
\v 27 रेकेम व इपैल व तरला;
\v 28 सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरुशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामीनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.
\s5
\c 19
\p
\v 1 दुसरा चिठी शिमोनाच्या नावाची म्हणजे शिमोनाच्या वंशाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
\s5
\v 2 आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
\v 3 हसर-शुवाल व बाला व असेम;
\v 4 एल्तोलाद व बथूल व हर्मा;
\s5
\v 5 आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;
\v 6 आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गांवे;
\v 7 अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गांव;
\s5
\v 8 बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.
\v 9 शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनभागातच वांटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजास वतन मिळाले.
\s5
\v 10 तिसरा चिठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
\v 11 त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.
\s5
\v 12 ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यत वर जाते.
\v 13 तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
\s5
\v 14 ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफता-एल खोऱ्यांत संपते.
\v 15 कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यात गांवे मोजली नाहीत.
\v 16 जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गांवे हे होत.
\s5
\v 17 इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चवथी चिठी निघाली.
\v 18 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
\v 19 आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
\s5
\v 20 रब्बीथ, किशोन व अबेस;
\v 21 रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
\v 22 त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गांवे.
\s5
\v 23 इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासचे गांवे हे होत.
\s5
\v 24 पांचवी चिठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 25 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
\v 26 अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
\s5
\v 27 ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यत आणि इफता-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक व नियेल येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल येथे निघते.
\v 28 तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोनापर्यत पोहचते.
\s5
\v 29 तेथून ती वळसा घेऊन रामापर्यत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यत जाते. तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशांतून जाऊन समुद्रास मिळते.
\v 30 उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यास मिळाली;
\s5
\v 31 आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासचे गांवे हे होत.
\s5
\v 32 सहावी चिठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 33 त्यांची सीमा हेलेफ आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी नेकेब व यबनेल यावरून लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
\v 34 तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यत आणि पश्र्चिमेस आशेराच्या वतनापर्यत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
\s5
\v 35 त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
\v 36 अदामा, राम व हासोर;
\v 37 केदेश, एद्रई व एन-हासोर;
\s5
\v 38 इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांचे गांव.
\v 39 नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गांवे.
\s5
\v 40 सातवी चिठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
\v 41 त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
\v 42 शालब्बीन व अयालोन व इथला;
\s5
\v 43 एलोन व तिम्ना, एक्रोन;
\v 44 एलतके, गिब्बथोन व बालाथ;
\v 45 यहूदा, बने-बराक व गथ रिम्मोन.
\v 46 मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.
\s5
\v 47 दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरहि गेली, कारण की दान वंशजांनी लेशेमाशी लढून त्याला धरले; आणि तलवारीने त्याला मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यांत वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेमास ठेवले.
\v 48 दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गांवे मिळाले ते हे.
\s5
\v 49 इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ति केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.
\v 50 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यांत राहिला.
\s5
\v 51 एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यानी शिलोमध्ये सभामंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे देश त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.
\s5
\c 20
\p
\v 1 मग परमेश्वर यहोशवास म्हणाला,
\v 2 तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या व्दारे तुम्हास ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;
\v 3 म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्याला जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यांत पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
\s5
\v 4 आणि त्याने त्यांतल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडीलांना सांगावे; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन त्याला ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये राहावे.
\s5
\v 5 आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.
\v 6 मंडळीसमोर न्याय होईपर्यत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसांत असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरांत त्याने राहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यात आपल्या घरी माघारी जावे.
\s5
\v 7 यास्तव त्यांनी गालीलांत नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
\v 8 पूर्वेस यरीहोजवळ यार्देनेच्या पलीकडे रानांतल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.
\s5
\v 9 ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यांत राहणारा जो परदेशी त्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून माणसाला मारतो, त्याने त्यांत पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याला, त्याच्या हाताने मरू नये.
\s5
\c 21
\p
\v 1 मग लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराणाचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
\v 2 ते कनान देशांतील शिलो येथे येईन म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या व्दारे अशी आज्ञा दिली होती की आम्हास राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांचे गायराने द्यावी.
\s5
\v 3 यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांस दिली.
\s5
\v 4 तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठी निघाली लेव्यांतला अहरोन याजकाच्या वंशजास यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
\v 5 कहाथीच्या राहिलेल्या वंशजास एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळातून व दानाच्या वंशांतून व मनश्शेच्या अर्ध्या वंशातून दहा नगरे चिठ्या टाकून मिळाली.
\s5
\v 6 आणि गेर्षोनाच्या वंशजास इस्साखार वंशांतील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानांत मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्या टाकून मिळाली.
\v 7 मरारीच्या वंशजास त्यांच्या कुळांप्रमाणे, रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून, बारा नगरे मिळाली.
\s5
\v 8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्या टाकून ही नगरे आणि यांचे गायराने लेव्यांस दिले
\v 9 त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
\v 10 लेवी वंशातील कहाथीच्या कुळांतल्या अहरोनाच्या वंशजासाठी ही नगरे होती कारण पहिली चिठी त्यांची निघाली.
\s5
\v 11 त्यास त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्या पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, हे आणि त्याचे चहुकडले गायराने त्यांना दिले.
\v 12 परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
\s5
\v 13 त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजास हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायराने दिले, आणि लिब्ना व त्याचे गायराने;
\v 14 आणि यत्तीर व त्याचे गायराने, आणि एष्टमोवा व त्याचे गायराने;
\v 15 होलोन व त्याचे गायराने आणि दबीर व त्याचे गायराने;
\v 16 अईन व त्याचे गायराने, आणि युट्टा व त्याचे गायराने, बेथ-शेमेश व तिचे गायराने; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
\s5
\v 17 बन्यामीन वंशांतले गिबोन व त्याचे गायराने; गेबा व त्याचे गायराने;
\v 18 अनाथोथ व त्याचे गायराने, आणि अलमोन व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली.
\v 19 अहरोन वंशातील याजकास त्यांची तेरा नगरे व त्याचे गायराने मिळाली.
\s5
\v 20 राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांस एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठी टाकून नगरे दिली.
\v 21 त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यास दिले; आणि गेजेर व त्याचे गायराने;
\v 22 किबसाईम व त्याचे गायराने; आणि बेथ-होरोन तिचे गायराने अशी एकंदर चार नगरे दिले;
\s5
\v 23 दानाच्या वंशांतून एलतके व त्याचे गायराने, गिब्बथोन व त्याचे गायराने;
\v 24 अयालोन व त्याचे गायराने, गथ रिम्मोन व त्यांचे गायराने अशी चार नगरे दिली;
\s5
\v 25 मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ रिम्मोन त्यांचे गायराने, अशी दोन नगरे दिली;
\v 26 बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजास एकंदर दहा नगरे व त्यांचे गायराने दिली.
\s5
\v 27 लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळास मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायराने, आणि बैश्तरा व त्यांचे गायराने, अशी दोन नगरे दिली;
\s5
\v 28 इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायराने, दाबरथ व त्याचे गायराने;
\v 29 यर्मूथ व त्याचे गायराने, एन-गन्नीम व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली;
\v 30 आणि आशेराच्या वंशांतली मिशाल व त्यांचे गायराने, अब्दोन व त्यांचे गायराने,
\v 31 हेलकथ व त्यांचे गायराने, आणि रहोब व त्यांचे गायराने, अशी चार नगरे दिली;
\s5
\v 32 नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायराने, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायराने, आणि कार्तान व त्यांचे गायराने, अशी तीन नगरे दिली.
\v 33 गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्याचे गायराने,
\s5
\v 34 आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळास जबुलूनाच्या वंशांतले यकनाम व त्याचे गायराने, कर्ता व त्याचे गायराने;
\v 35 दिम्रा व त्याचे गायराने, नहलाल व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली;
\s5
\v 36 आणि रऊबेन वंशांतले बेजेर व त्यांचे गायराने, आणि याहस व त्यांचे गायराने;
\v 37 कदेमोथ व त्यांचे गायराने, आणि मेफाथ व त्यांचे गायराने, अशी चार नगरे दिली;
\v 38 आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादांतले रामोथ व त्यांचे गायराने, महनाइम व त्यांचे गायराने
\s5
\v 39 हेशबोन व त्याचे गायराने, याजेर व त्यांचे गायराने, सर्व चार नगरे दिली.
\v 40 लेव्यांच्या कुळांतली राहिलेली मरारीची वंशज त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्या टाकून त्यांना दिली.
\s5
\v 41 इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांस एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासहित दिली.
\v 42 ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांस होते.
\s5
\v 43 याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलांस जो देश त्यांच्या पूर्वजांस देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यांत राहिले.
\v 44 याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहुकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
\v 45 परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्यास जी काही चांगले सांगितले होते, त्यातली एकही गोष्ट पूर्ण झाल्यावाचून राहिली नाही; सर्व घडून आले.
\s5
\c 22
\p
\v 1 तेव्हा यहोशवाने रऊबेनी व गादी व मनश्शेचा अर्धा वंश यांस बोलावले;
\v 2 आणि त्यास म्हटले, परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हास आज्ञा करून सांगितले होते ते तुम्ही सर्वकाही केले आणि जे मी तुम्हास आज्ञापिले त्या सर्वाविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली
\v 3 आजपर्यत बहुत दिवस तुम्ही आपल्या भावांस न सोडता आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे पालन केले आहे.
\s5
\v 4 आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या वचनानुसार तुमच्या भावांस विसावा दिला आहे; जो परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे तुम्हास वतनाचा देश दिला, त्यांत तुम्ही आपआपल्या तंबूकडे परत जा.
\v 5 परंतु ज्या आज्ञा आणि जे शास्त्र परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञापिले ते तुम्ही आचरावे, म्हणजे तुंम्ही आपला देव परमेश्वरावर प्रीती करावी, आणि त्याच्या सर्व मार्गात चालावे, आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याला चिकटून राहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार सांभाळा.
\v 6 यहोशवाने त्यास आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.
\s5
\v 7 मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या दिले होते; अाणखी जेव्हा यहोशवाने त्यास त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यास आशीर्वाद दिला.
\v 8 तेव्हा त्याने त्यास असे सांगितले की, बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे व सोने व तांबे व लोखंड व फारच फार वस्रे घेऊन तुंम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा; आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.
\s5
\v 9 मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोपासून इस्राएलाच्या इतर वंशजातून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यांत जाण्यास माघारी चालले.
\s5
\v 10 तेव्हा यार्देनेजवळचे गलीलोथ कनान देशांत आहे, तेथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली.
\v 11 मग इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ, जेथे इस्राएलाची लोक उतरून आली होती तेथे एक वेदी बांधली आहे.
\s5
\v 12 असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने हे ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय. त्यांवर सैन्यरूपें जायला शिलोमध्ये एकत्र मिळाला.
\s5
\v 13 आणि इस्राएल लोकांनी रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांतल्या गिलाद देशी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास याला पाठवले.
\v 14 आणि त्याजबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजाच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि हजार हजार इस्राएलावर ते एकएक आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांत मुख्य होते.
\s5
\v 15 तेव्हा गिलाद देशांत रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश याजवळ ते येऊन त्यांच्याशी बोलले की,
\v 16 परमेश्वराच्या सर्व समुदाने असे म्हटले की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुध्द असे पातक का केले? की आज परमेश्वराला अनुसरणे यांतून फिरून आपल्यासाठी वेदी बांधली, येणेकरून आज तुंम्ही परमेश्वराविरुध्द बंड केले आहे.
\s5
\v 17 पौर देवावरून जो आम्हाकडला अन्याय तो लहान की काय? त्यापासून आम्ही आजपर्यंत शुध्द झालो नाही, आणि परमेश्वराच्या मंडळीवर मरी आली होती.
\v 18 तुंम्ही ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहा काय? आज तुंम्ही परमेश्वराविरुध्द बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.
\s5
\v 19 आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुध्द असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आम्हामध्ये वतन करून घ्या ,पण आमचा देव परमेश्वर याच्याविरुध्द बंड करू नका.
\v 20 जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तूविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.
\s5
\v 21 तेव्हा रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकार होते त्यास उत्तर देऊन म्हटले,
\v 22 जो समर्थ देव परमेश्वर, जो समर्थ देव परमेश्वर, तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुध्द उल्लंघन असल्यास तू आज आम्हास वाचवू नकोस;
\v 23 म्हणजे परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली, तिजवर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी बांधली असली, तर परमेश्वर आमची झडती घेईल.
\s5
\v 24 आम्ही पुढला विचार करून व विशेष हेतूने हे केले आहे; आम्ही म्हणालो, यदाकदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांस म्हणावयाची की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे?
\s5
\v 25 हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हास परमेश्वरावर हक्क नाही. अशी तुमचे वंशज आमच्या वंशजास परमेश्वराचे भय धरण्यापासून दूर करतील.
\s5
\v 26 यास्तव आम्ही म्हटले की, आपण आपल्यासाठी होमार्पणासाठी नव्हे, आणि यज्ञार्पणासाठी नव्हे वेदी बांधू;
\v 27 परंतु आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढयांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावे; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पण व आपल्या यज्ञार्पण व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.
\s5
\v 28 यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हास किंवा आमच्या वंशजास असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यास असे सांगू की तुंम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञासाठी नव्हे, परंतु ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.
\v 29 आमचा देव परमेश्वर यांस होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरूध्द बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो.
\s5
\v 30 तेव्हा रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी व इस्राएलाचे हजार लोकांमध्ये जे जे मुख्य पुरुष यानी ऐकल्या, तेव्हा त्यास बरे वाटले.
\v 31 यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यांने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांस सांगितले, आज आम्हास कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुंम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुंम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.
\s5
\v 32 मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशांतून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशांत इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यास वर्तमान सांगितले.
\v 33 तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशांत रऊबेन वंश व गाद वंश राहिली होती, त्याचा नाश करायास त्यांवर सैन्यरूपे जावे असे आणखी कधी म्हटले नाही.
\s5
\v 34 तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला साक्षीचे असे नाव दिले; का तर त्यांनी म्हटले की, ते आपल्यामध्ये अशी साक्ष देईल की ,परमेश्वरच देव आहे.
\s5
\c 23
\p
\v 1 मग परमेश्वराने इस्राएलांस त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूपासून विसावा दिल्यावर बरच काल गेला व यहोशवा वयाने वृध्द झाला.
\v 2 तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरले कारभारी यांस बोलावून सांगितले, मी वयोवृध्द झालो आहे.
\v 3 आणि तुमचा देव परमेश्वर याने या सर्व राष्ट्रांस तुमच्यापुढून घालवून त्यास जे केले, ते अवघे तुम्ही पाहिले, कारण की तुमचा देव परमेश्वर याने स्वत: तुमच्यासाठी लढाई केली आहे.
\s5
\v 4 पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्र मी मारून टाकली त्याचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठया समुद्रापर्यंतही मी तुम्हास तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे.
\v 5 अाणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यास तुमच्यापुढून घालवील, आणि त्यास तुमच्यापुढून वतनांतून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.
\s5
\v 6 फार मजबूत व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्राच्या ग्रंथात जे लिहिलेले त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
\v 7 तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली, त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवाच्या नांवाची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाहि करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.
\v 8 परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला चिकटून राहा.
\s5
\v 9 कारण की, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही माणूस उभा राहू शकला नाही.
\v 10 तुमच्यातला एक माणूस हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हास सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.
\v 11 तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या.
\s5
\v 12 पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांशी चिकटून राहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील;
\v 13 तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांस तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिली, तिजवरून तुंम्ही नाश पावून जाल तोंपर्यंत ती तुम्हास सांपळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.
\s5
\v 14 तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुंम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वातली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हास प्राप्त झाल्या; त्यांतली एकही गोष्ट कमी पडली नाही.
\v 15 तर अस होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हास प्राप्त झाली तशी देव तुम्हास प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमचा देवाने तुम्हास दिली आहे, तिजवरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यत तो असे करील.
\s5
\v 16 तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हास आज्ञा केली आहे, ती मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हांवर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हास दिला आहे, त्यातून तुम्हास त्वरीत नष्ट करेल.
\s5
\c 24
\p
\v 1 तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमांत एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले.
\v 2 तेव्हा यहोशवाने सर्व लोकांना सांगितले, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलिकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली.
\s5
\v 3 परंतु त्या तुमचा पूर्वज अब्राहाम यांस महानदीच्या पलिकडून आणले, आणि त्याला कनान देशांत नेले आणि तेव्हा मी त्याला इसहाकाव्दारे पुष्कळ वंशज दिले,
\v 4 आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रासहित मिसर देशी गेला.
\s5
\v 5 मग मी मोशे व अहरोन यांस पाठवले आणि मिसऱ्यांस पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हास बाहेर आणले.
\v 6 तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसरांतून बाहेर आणले आणि तुंम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले.
\s5
\v 7 तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्याजवर समुद्र आणून त्यास बुडवले; मी मिसरांत जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानांत बहुत दिवस राहिला.
\s5
\v 8 मग जे अमोरी यार्देनेच्या पलिकडे राहत होते, त्यांच्या देशांत मी तुम्हास आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला.
\s5
\v 9 नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हास शाप देण्यासाठी बोलावले.
\v 10 परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हास आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हास त्याच्या हातातून सोडवले.
\s5
\v 11 मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे धनी, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, यानी तुम्हाशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;
\v 12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यास तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांस घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही.
\s5
\v 13 याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, आणि जी नगरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हास दिली आहेत, आणि तुझ्यी त्यांत राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खाता.
\s5
\v 14 तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्वराला भिऊन त्याची सेवा करा, आणि नदीच्या पलिकडे व मिसरांत तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यास दूर करून परमेश्वर देवाचीच सेवा करा.
\v 15 जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हास वाईट वाटते, तर तुंम्ही ज्याची सेवा कराल, त्याला आज आपल्यासाठी निवडून घ्या; नदीच्या पलिकडे तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशांत तुंम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराची सेवा करू.
\s5
\v 16 तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की ,परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही;
\v 17 कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हास व आमच्या पूर्वजांस मिसर देशांच्या दास्यांतून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यांत त्याने आमचे रक्षण केले,
\v 18 आणि देशांतल्या राहणाऱ्या अमोऱ्यांनासुद्धा सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.
\s5
\v 19 परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.
\v 20 जर तुम्ही परमेश्वराला सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.
\s5
\v 21 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.
\v 22 तेव्हा यहोशवा लोकांना म्हणाला, तुंम्ही आपल्या स्वत:चे साक्षी आहात, तुंम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्याला आपल्यासाठी निवडून घेतले आहे. ते म्हणाले, आम्ही साक्षी आहोत.
\v 23 असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुंम्ही दूर करा, आणि आपले अंत:करण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.
\s5
\v 24 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.
\v 25 त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमांत त्यांठिकाणी नियम व कायदे स्थापले.
\v 26 तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.
\s5
\v 27 आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुम्हाविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुंम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.
\v 28 मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.
\s5
\v 29 मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला.
\v 30 मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्नाथ-सेरह आहे त्यांत, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्याला पुरले.
\s5
\v 31 आणि यहोशवाच्या सर्व दिवसांत, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्याच्या सर्व दिवसांत इस्राएलानी परमेश्वराची सेवा केली.
\s5
\v 32 आणि शखेमांत जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनांचा झाला त्यांत, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसरातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.
\v 33 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, याला दिली होती, तिजवर त्यांनी त्याला पुरले.

1000
07-JDG.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1000 @@
\id JDG
\ide UTF-8
\h शास्ते
\toc1 शास्ते
\toc2 शास्ते
\toc3 jdg
\mt1 शास्ते
\s5
\c 1
\s यहूदा व शिमोन वंशांतील लोकांचे पराक्रम
\p
\v 1 यहोशवाच्या मृत्यूनंतर, इस्राएल लोकांनी परमेश्वराला असे म्हणून विचारले, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आम्ही जावू तेव्हा आमच्या वतीने पहिल्याने कोणी स्वारी करावी?
\v 2 परमेश्वर म्हणाला, “यहूदा तुमचे नेतृत्व करील; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”
\v 3 यहूदाच्या लोकांनी आपले भाऊ, शिमोन याच्या लोकांना म्हटले, आमच्याबरोबर आमच्या प्रदेशात वर या, म्हणजे आपण एकत्र मिळून कनान्यांविरूद्ध लढाई करू, त्याप्रमाणे तुमच्या प्रदेशात आम्हीही तुम्हामध्ये येऊ; तेव्हा शिमोनाचा वंश त्यांच्याबरोबर गेला.
\p
\s5
\v 4 मग यहूदाचे लोक वर चढून गेले याप्रकारे परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार मारले.
\v 5 बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला;
\p
\s5
\v 6 पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्यांचा हाताचे व पायांचे अंगठे कापून टाकले.
\v 7 तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, हाताचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे. त्यांनी त्याला यरुशलेमेस आणले; तेथे तो मेला.
\p
\s5
\v 8 यहूदाच्या लोकांनी यरुशलेम नगराविरूद्ध लढाई करून ते घेतले, आणि तलवारीच्या धारेने त्यावर हल्ला करून व त्या नगराला आग लावली.
\v 9 नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी असलेल्या टेकडीचा प्रदेश राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.
\v 10 मग हेब्रोनांत राहणाऱ्या कनान्यांविरूद्ध यहूदा पुढे चालून गेला. (हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते) आणि त्यांनी शेशय, अहीमन व तलमय यांचा पराभव केला.
\p
\s5
\v 11 तेथून यहूदाचे लोक दबीराच्या रहिवाश्यावर पुढे चालून गेले. (दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते)
\v 12 कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली कन्या अखसा पत्नी म्हणून देईन.
\v 13 तेव्हा अथनिएल कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा पुत्र ह्याने दबीर नगर काबीज केले आणि म्हणून कालेबाने आपली कन्या अखसा त्याला पत्नी करून दिली.
\p
\s5
\v 14 ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
\v 15 ती त्याला म्हणाली, मला आशीर्वाद द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या; आणि कालेबाने तिला वरचे व खालचे झरे दिले.
\p
\s5
\v 16 मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.
\v 17 आणि यहूदाची माणसे त्यांचा भाऊ शिमोन ह्याच्या माणसांबरोबर गेली आणि त्यांनी सफाथ येथे राहणारे कनानी यांच्यावर हल्ला करून पूर्णपणे नाश केला; त्या नगराचे नाव हर्मा असे म्हटले होते.
\s5
\v 18 यहूदाच्या लोकांनी गज्जा व त्याच्या सभोवतालची जमीन, अष्कलोन व त्याच्या सभोवतालची जागा आणि एक्रोन व त्याच्या सभोवतालची जागा ही नगरे घेतली.
\v 19 यहूदाच्या लोकांबरोबर परमेश्वर होता आणि त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यांत घेतला, पण खोऱ्यात राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना घालवून देणे त्याला जमेना.
\s5
\v 20 मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना घालवू दिले.
\v 21 पण बन्यामिनाच्या लोकांनी यरुशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांना बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.
\p
\s5
\v 22 योसेफाच्या घराण्यानेही बेथेलावर हल्ला करण्याची तयारी केली; आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
\v 23 योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.
\v 24 त्या हेरांनी नगरांतून एक मनुष्य बाहेर निघतांना पाहिला; आणि त्यांनी त्याला म्हटले आम्ही तुला विनंती करतो नगरात कसे जायचे आम्हाला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.
\s5
\v 25 तेव्हा त्याने त्यांना नगरांत जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तरवारीच्या धारेने मारले; पण त्या मनुष्याला व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
\v 26 त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर बांधले व त्याचे नाव लूज ठेवले. त्याचे नाव आजपर्यंत तेच आहे.
\p
\s5
\v 27 मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यात राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यात राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.
\v 28 जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना कठोर परीश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही.
\s5
\v 29 एफ्राइमने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही, ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
\s5
\v 30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परीश्रमाच्या कामास नेमले.
\s5
\v 31 आशेराने अक्को यातले राहणारे आणि सीदोन व अहलाब व अकजीब व हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही;
\v 32 म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्याला घालवून दिले नाही.
\s5
\v 33 नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्याना घालवून दिले नाही; नफताली त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी नफताली लोकांची कठीण कष्टाचे कामे करू लागले.
\s5
\v 34 अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात;
\v 35 अमोऱ्यांनी हेरेस डोंगरावर अयालोन व शालबीम येथे राहण्याचा निश्चय केला; पण योसेफाच्या घराणे प्रबळ झाल्यावर त्यांनी त्यांना जिंकले आणि कठीण कष्टाचे काम करण्यास त्यांना भाग पाडले.
\v 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीमाचा चढावापसून आणि सेला येथून डोंगराळ प्रदेशावर गेली होती.
\s5
\c 2
\p
\v 1 परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, मी तुम्हांला मिसरातून काढून आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
\v 2 तुम्ही ह्या देशात राहणाऱ्याशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?
\s5
\v 3 आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.
\v 4 परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले
\v 5 त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले.
\s5
\v 6 जेव्हा यहोशवाने लोकांना निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले.
\v 7 यहोशवाच्या सर्व दिवसांत, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
\v 8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशेदहा वर्षाचा होऊन मरण पावला.
\s5
\v 9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला पुरले.
\v 10 ती सर्व पिढी पूर्वजास मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
\s5
\v 11 इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
\v 12 आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवाच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वराला क्रोधाविष्ट केले.
\v 13 परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल अष्टारोथ यांची उपासना केली;
\s5
\v 14 इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यास त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
\v 15 परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरूद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
\s5
\v 16 मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;
\v 17 तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; त्यांनी स्वतःला व्यभिचारी बुध्दीने अन्य देवाच्यामागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरित सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही.
\s5
\v 18 परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.
\v 19 पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
\s5
\v 20 तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;
\v 21 म्हणून यहोशवाच्या मृत्यूसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही;
\v 22 पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.
\v 23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.
\s5
\c 3
\p
\v 1 इस्राएल लोकांना कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली.
\v 2 इस्राएलाच्या नव्या पिढ्यांना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहित नव्हते त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही;
\v 3 पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.
\s5
\v 4 इस्राएलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
\v 5 अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यामध्ये राहू लागले.
\v 6 त्यांनी त्यांच्या मुली आपणास बायका करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली.
\s5
\v 7 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा यांची उपासना करू लागले;
\v 8 म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना मेसोपटेम्याचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती विकत दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याची सेवा केली.
\s5
\v 9 इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
\v 10 त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,
\v 11 त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
\s5
\v 12 पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन इस्राएलावर सबळ केले कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.
\v 13 तेव्हा एग्लोनाने अम्मोनी व अमालेकी ह्याना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्राएलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले.
\v 14 इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली.
\s5
\v 15 परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामीनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली.
\s5
\v 16 एहूदाने हातभर लांब दुधारी तरवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली
\v 17 त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे भेट सादर केली; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
\v 18 भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकांना त्याने निरोप दिला;
\s5
\v 19 पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन आणि तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.
\v 20 एहूद त्याच्याजवळ आला त्यासमयी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद म्हणाला, मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे तेव्हा तो आसनावरून उठला.
\s5
\v 21 मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तरवार काढून राजाच्या पोटात खुपसली;
\v 22 पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तरवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती.
\v 23 मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले.
\s5
\v 24 तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.
\v 25 त्यांना मोठी काळजी वाटू लागली आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
\s5
\v 26 सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीवमूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईरा येथे जाऊन पोहचला.
\v 27 तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.
\s5
\v 28 तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत. तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.
\v 29 त्यासमयी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही बचावला नाही.
\v 30 अशा प्रकारे मवाब त्यादिवशी इस्राएलाच्या सत्तेत आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे विसावा मिळाला.
\s5
\v 31 एहूदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला; त्याने सहाशे पलिष्ट्याना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची संकटातून सुटका केली.
\s5
\c 4
\p
\v 1 एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.
\v 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापति होता आणि तो विदेश्यांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.
\v 3 त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला.
\s5
\v 4 त्यासमयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत असे.
\v 5 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत.
\s5
\v 6 तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफतालीच्या केदेशातून येथून बोलावणे पाठवून म्हटले, तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.
\v 7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.
\s5
\v 8 बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.
\v 9 ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन पण ज्या मार्गाने तू जाणार आहे त्यात तुझा सन्मान होणार नाही कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
\s5
\v 10 बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
\s5
\v 11 मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.
\s5
\v 12 इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
\v 13 तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि आपल्याजवळचे सर्व सैन्य, विदेश्यांचे हरोशेथापासून कीशोन नदीपर्यंत बोलावून एकवट केले.
\s5
\v 14 दबोरा बाराकाला म्हणाली, ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
\s5
\v 15 परमेश्वराने सीसरा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य ह्याना गोंधळून टाकले; आणि बाराकाच्या माणसांनी त्यावर तलवारींने हल्ला केला आणि तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
\v 16 पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; आणि त्यातला एकही वाचला नाही.
\s5
\v 17 सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची पत्नी याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते.
\v 18 तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका. तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
\s5
\v 19 तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावयाला दे. मला तहान लागली आहे. तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्याला दुध प्यावयाला दिले व तिने त्याला पुन्हा झाकले.
\v 20 तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.
\s5
\v 21 मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.
\v 22 बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हांला दाखवते. तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
\s5
\v 23 अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले.
\v 24 इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्यांच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
\s5
\c 5
\p
\v 1 त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत,
\v 2 इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
\s5
\v 3 राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
\v 4 हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदु गाळले; मेघांनीही जलबिंदु गाळले;
\s5
\v 5 परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.
\v 6 अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्याकाळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गानी प्रवास करीत.
\s5
\v 7 मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;
\v 8 लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलांतील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
\s5
\v 9 माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
\v 10 पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
\s5
\v 11 पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्ते संबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्यासमयी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
\s5
\v 12 जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
\v 13 त्यासमयी उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरीता वीरांविरूद्ध सामना करावयास उतरले.
\s5
\v 14 अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अमलदार उतरून आले.
\s5
\v 15 इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
\s5
\v 16 खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
\s5
\v 17 गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
\v 18 जबुलून व नफताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवटयांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
\s5
\v 19 राजे येऊन लढले, त्यासमयी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही.
\v 20 आकाशांतून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
\s5
\v 21 कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंम्मत धरून पुढे चाल.
\v 22 त्यासमयी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
\s5
\v 23 परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यांतल्या रहिवाश्याना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करावयास वीरांविरूद्ध परमेश्वराला साहाय्य करावयास ते आले नाहीत.
\s5
\v 24 केनी हेबेर यांची स्री याएल ही सगळया स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
\v 25 त्याने पाणी मागितले तो तिने त्याला दुध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.
\s5
\v 26 तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोडयाला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
\v 27 तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
\s5
\v 28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकाना कोणी खीळ घातली?
\s5
\v 29 तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;
\v 30 त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकएक किंवा दोन दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लूटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?
\s5
\v 31 हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत. मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.
\s5
\c 6
\p
\v 1 नंतर इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, त्याने त्यांना मिद्यानाच्या नियंत्रणाखाली सात वर्षे ठेवले.
\v 2 तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे व गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
\s5
\v 3 आणि असे झाले की, जर इस्राएली पिकांची लागवड करीत, तर मिद्यानी व अमालेकी आणि पूर्वेकडले लोक त्यांवर हल्ला करीत.
\v 4 त्यांनी त्याच्याविरूद्ध सैन्याचा तळ देऊन गज्जापर्यंत भूमीच्या पिकांचा नाश केला आणि इस्राएलात काही अन्न आणि मेंढर किंवा गाय बैल किंवा गाढव असे काही एक शिल्लक ठेवले नाही.
\s5
\v 5 जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.
\v 6 तेव्हा मिद्यानामुळे इस्राएलाची कठीण दुर्बल अवस्था झाली आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली.
\s5
\v 7 जेव्हा इस्राएलाच्या संतानानी मिद्यान्यांमुळे परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली तेव्हा असे झाले की,
\v 8 परमेश्वराने कोणी भविष्यवादी इस्राएलाच्या लोकांजवळ पाठवला; तेव्हा तो त्यास बोलला, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास मिसरातून काढून वर आणले, दास्याच्या घरातून बाहेर काढून आणले;
\s5
\v 9 असे मी तुम्हास मिसऱ्यांच्या हातातून व तुमच्या सर्व जाचणाऱ्यांच्या हातातून सोडवले; आणि त्यास तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हास दिला.
\v 10 तेव्हा मी तुम्हास असे सांगितले की, मी तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहत आहा, त्यांच्या देवांना भिऊ नका; तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही.
\s5
\v 11 आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन गहू मिद्यांन्यापासून लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता.
\v 12 आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला बोलला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
\s5
\v 13 तेव्हा गिदोन त्याला बोलला, हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आम्हाबरोबर आहे तर हे सर्व आम्हाबरोबर का घडले? परमेश्वराने आम्हास मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हास मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हास मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.
\s5
\v 14 मग परमेश्वराने त्याकडे बघितले आणि म्हटले, तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांस मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?
\v 15 गिदोन त्याला बोलला, हे माझ्या प्रभू, मी इस्राएलांस कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्वाचा आहे.
\s5
\v 16 परमेश्वर त्याला बोलला, खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका माणसाला मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यांन्यांना ठार करशील.
\v 17 गिदोन त्याला बोलला, तुझी कृपादृष्टी मजवर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव.
\v 18 मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन. तेव्हा तो बोलला, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.
\s5
\v 19 गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घातले, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन सादर केले.
\v 20 तेव्हा देवाच्या दूताने त्याला सांगितले, तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत. मग गिदोनाने तसे केले.
\s5
\v 21 तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसाला व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकांतून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्याला पाहू शकला नाही.
\s5
\v 22 तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!
\v 23 परमेश्वर त्याला म्हणाला, तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.
\v 24 तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
\s5
\v 25 आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्याला सांगितले की, तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षाचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बाल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळचे अशेरा कापून टाक.
\v 26 मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधनी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लांकडाचा उपयोग करून कर.
\s5
\v 27 तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्याला सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायाला तो आपल्या बापाच्या घराण्याला व त्या नगराच्या माणसांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले.
\s5
\v 28 मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बालाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळचे अशेराही तोडलेले होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता.
\v 29 तेव्हा ती एकमेकांना म्हणाले, ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.
\s5
\v 30 नंतर त्या नगराच्या माणसानी योवाशाला सांगितले तू आपला पुत्र बाहेर आण, त्याला तर मारावयाचे आहे, कारण त्याने बालाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ति तोडून टाकली आहे.
\s5
\v 31 तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, बालाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरूद्ध त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.
\v 32 तेव्हा त्याच दिवशी त्याने त्याला यरूब्बाल म्हटले, कारण की तो बोलला, बालानेच स्वतःसाठी बचाव करावा कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली.
\s5
\v 33 तेव्हा सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला.
\s5
\v 34 परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्याला मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबियेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले.
\v 35 मग त्याने सगळ्या मनश्शेत जासुद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र मिळाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासुद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले.
\s5
\v 36 मग गिदोन देवास बोलला, जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांस तारणार असलास;
\v 37 तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.
\s5
\v 38 नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तीथले दहिवर पिळून वाटीभर पाणी काढले.
\s5
\v 39 मग गिदोन देवाला बोलला, तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्याव्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.
\v 40 तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.
\s5
\c 7
\p
\v 1 मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याबरोबरचे जे सर्व लोक त्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी यांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.
\s5
\v 2 तेव्हा देव गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.
\v 3 तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे, त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे. तेव्हा लोकांतून बावीस हजार परत माघारी गेले आणि दहा हजार राहिले.
\s5
\v 4 मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अद्याप लोक फार आहेत; तू त्यास खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी त्तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.
\s5
\v 5 मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्याला तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्याला एकीकडे ठेव.
\v 6 तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
\s5
\v 7 नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्याकडून मी तुम्हास सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीचे सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.
\v 8 तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नपुरवठा व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली तेव्हा मिद्यानी तळ त्यांच्याखाली खिंडीत होता.
\s5
\v 9 आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्याला सांगितले, तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.
\v 10 आणि जर तुला खाली जायला भीति वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ ने.
\v 11 मग ते जे बोलतील, ते तू ऐक; आणि मग तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते, त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.
\s5
\v 12 तेव्हा मिद्यांनी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणाप्रमाणे असंख्य होते.
\s5
\v 13 मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटा झाला अशाप्रकारे तो सपाट झाला.
\v 14 तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, इस्राएली माणूस योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तरवार तिच्याशिवाय हे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.
\s5
\v 15 तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळास माघारा येऊन बोलला, तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यांनी तळ तुमच्या हाती दिला आहे.
\v 16 तेव्हा त्याने त्या तीनशे माणसांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यामध्ये दिवे दिले होते.
\s5
\v 17 तेव्हा त्याने त्यास सांगितले, तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.
\v 18 म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.
\s5
\v 19 तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यांनानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातले मडके फोडले.
\s5
\v 20 असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडके फोडले; मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायाची कर्णे आपल्या उजव्या हाती धरली, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.
\v 21 तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतले सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत आणि दूर पळाले.
\s5
\v 22 ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, याप्रकारे परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तरवार त्याच्या आपल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूद्ध चालवली; आणि सरेरा येथल्या बेथ-शिट्टा तेथपर्यंत, आणि आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास छावणी पळून गेली.
\v 23 मग नफताली व आशेर व मनश्शे यातली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यांन्यांचा पाठलाग केला.
\s5
\v 24 गिदोनाने एफ्राइमाच्या सर्वं डोंगराळ प्रदेशातून दूत पाठवून सांगितले, तुम्ही खाली मिद्यान्यांविरूद्ध जाऊन आणि बेथ-बारापर्यत यार्देन नदी तेथवर नियंत्रण करा आणि त्यांना थांबवा; अशी सर्व एफ्राइमी माणसे बोलावली असता. त्यांनी बेथ-बारा व यार्देन तेथवर येऊन पाण्याच्या वाटा रोखून धरल्या.
\v 25 आणि मिद्यान्याचे दोन अधिकारी ओरेब व जेब यांस त्यांनी धरले; तेव्हा ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले; असे ते मिद्यान्याच्या पाठीस लागले, आणि त्यांनी आरेबाचे व जेबाचे डोके यार्देनेपार गिदोनाजवळ आणले.
\s5
\c 8
\p
\v 1 तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनास म्हणाली, तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेला तेव्हा आम्हाला का बोलावले नाही? असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
\s5
\v 2 तेव्हा तो त्यास म्हणाला, तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
\v 3 मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे? तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
\s5
\v 4 गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
\v 5 तेव्हा तो सुक्कोथांतल्या माणसांस म्हणाला, माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपाकरून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबाह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.
\s5
\v 6 तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबाह व सलमुन्ना यांच्यांवर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हाला माहित नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
\v 7 तेव्हा गिदोन म्हणाला, जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल तेव्हा मी रानांतल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.
\s5
\v 8 नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याचप्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथांतल्या माणसानी उत्तर दिले होते, तसेच पनुएलांतल्या माणसांनी त्याला उत्तर दिले.
\v 9 तेव्हा तो पनुएलांतल्या माणसांस असे म्हणाला, जेव्हा मी शांतीने माघारा येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.
\s5
\v 10 तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरांत होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्याच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तरवारीने पडले होते.
\s5
\v 11 तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
\v 12 जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाचे दोन राजे यांस पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
\s5
\v 13 मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
\v 14 तेव्हा त्याने सुक्कोथांतला एक तरुण माणूस धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण माणसाने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर माणसांचे वर्णन लिहून दिले.
\s5
\v 15 मग तो सुक्कोथातल्या माणसांजवळ जाऊन बोलला, जेबाह व सलमुन्ना हे तुम्ही पाहा; याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहे काय? आम्हाला माहित नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?
\v 16 नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानांतल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या माणसांस शिक्षा केली
\v 17 आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरांतल्या माणसांना मारून टाकले.
\s5
\v 18 मग जेबाह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती? तेव्हा ते बोलले, जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.
\v 19 गिदोन म्हणाला, ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यास जिवंत वाचवले असते, जसा परमेश्वर जिवंत आहे, मी तुम्हाला मारले नसते.
\s5
\v 20 तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, तू उठून त्यास मार. परंतु त्या तरुणाने आपली तरवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता, म्हणून तो घाबरला.
\v 21 तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हास मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांस मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
\s5
\v 22 तेव्हा इस्राएलातल्या माणसांनी गिदोनाला सांगितले, आम्हावर तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने राज्य करावे कारण तू आम्हाला मिद्यानाच्या सत्तेतून सोडवले आहे.
\v 23 तेव्हा गिदोन त्यास बोलला, मी तुम्हांवर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुम्हांवर राज्य करणार नाहीतर परमेश्वर तुम्हांवर राज्य करील.
\s5
\v 24 तरी गिदोन त्यास बोलला, मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे. त्यांत तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
\v 25 तेव्हा ते बोलले, आम्ही देतोच देतो मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यांतल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
\s5
\v 26 आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यांनी राजांची जांभळी वस्रे याखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
\s5
\v 27 तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यात ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
\v 28 मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
\s5
\v 29 योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.
\v 30 आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्याला पुष्कळ पत्न्या होत्या.
\v 31 आणि शखेमांत जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्याला पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
\s5
\v 32 मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्याला अबीयेजऱ्यांच्या अफ्रास आपला पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात.
\v 33 तेव्हा असे झाले की, गिदोन मेल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बाल-बरीथ आपला देव असा करून ठेवला.
\s5
\v 34 असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यास त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
\v 35 आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्यांप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.
\s5
\c 9
\p
\v 1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,
\v 2 तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व माणसास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हांवर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हांवर राज्य करावे? यांतून तुम्हाला कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.
\s5
\v 3 तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व माणसांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, तो आमचा भाऊ आहे.
\v 4 त्यांनी त्याला बाल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.
\s5
\v 5 तो अफ्रास आपल्या बापाच्या घरी गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.
\v 6 मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले.
\s5
\v 7 नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.
\v 8 झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, तू आमचा राजा हो.
\s5
\v 9 तेव्हा जैतूनाने त्यास म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व माणसाचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय?
\v 10 नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले तू चल, आमचा राजा हो.
\v 11 तेव्हा अंजिराने त्यास म्हटले, मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?
\s5
\v 12 नंतर त्या झाडानी द्राक्षवेलाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.
\v 13 तेव्हा द्राक्षवेलाने त्यास म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांस संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायास जावे की काय?
\v 14 नंतर त्या सर्व झाडानी काटेरी झुडुपाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.
\s5
\v 15 तेव्हा काटेरी झुडुपाने त्या झाडांस म्हटले, जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाहीतर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्या गंधसरूस जाळून टाकील.
\v 16 यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून अबीमलेख राजा केले, आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्याला शिक्षा केली आहे काय?
\s5
\v 17 आणि विचार करा की, माझ्या बापाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे.
\v 18 परंतु तुम्ही आज माझ्या बापाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांस तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमांतल्या माणसांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे.
\s5
\v 19 तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुम्हामध्ये संतोष करावा.
\v 20 परंतु जर तसे नाही, तर अबीमलेखांतून विस्तव निघून शखेमांतील व मिल्लोतील माणसांस जाळून टाको, आणि शखेमातल्या व मिल्लोतील माणसांतून विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको.
\v 21 नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबीमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला.
\s5
\v 22 तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले.
\v 23 नंतर देवाने अबीमलेख व शखेमांतली माणसे यांमध्ये दुष्ट आत्मा पाठवला, यास्तव शखेमांतल्या माणसानी अबीमलेखाशी कपटाने वागु लागले;
\v 24 देवाने हे केले यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंकाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्याला मदत केली म्हणून, शखेमांतल्या माणसेही जबाबदार धरली जावीत.
\s5
\v 25 नंतर शखेमातल्या माणसानी त्याच्यासाठी डोंगरांच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्याला लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले.
\s5
\v 26 मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसहीत आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमांतल्या माणसानी त्याच्यावर विश्वास ठेविला.
\v 27 तेव्हा त्यांनी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरात गेले, आणि तेथे खाऊन पिऊन त्यांनी अबीमलेखाला शाप दिला.
\s5
\v 28 तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी?
\v 29 आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.
\s5
\v 30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला.
\v 31 मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, पाहा, एबेदाचा पुत्र गाला आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावणी देत आहेत.
\s5
\v 32 तर आता, तू आपल्या जवळच्या लोकांसहीत रात्री उठून शेतात दबा धर.
\v 33 मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला करा; मग पाहा, तो आपल्या जवळच्या लोकांसुध्दा तुझ्याजवळ बाहेर येईल, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.
\s5
\v 34 यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला.
\v 35 मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.
\s5
\v 36 तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात. मग जबुल त्यास बोलला, तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.
\v 37 तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.
\s5
\v 38 मग जबुल त्याला बोलला, तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.
\v 39 मग गालाने शखेमांतल्या माणसांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली.
\v 40 तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.
\s5
\v 41 मग अबीमलेख आरूम्यात राहिला, आणि गालाने व त्याच्या भावांनी शखेमांत न राहावे म्हणून जबुलाने त्यास घालवले.
\v 42 नंतर पुढल्या दिवशी असे झाले की लोक बाहेरल्या शेतांत गेले, आणि हे अबीमलेखाला कोणीतरी सांगितले;
\v 43 तेव्हा त्याने लोक मिळवून त्यांच्या तीन टोळ्या केल्या; मग शेतात दबा धरला, आणि त्याने न्याहाळले; तर पाहा लोक नगरांतून बाहेर आले होते, तेव्हा त्याने त्यावर चाल करून त्यास मारले.
\s5
\v 44 त्या वेळेस अबीमलेख आणि त्याच्या सोबतची जी टोळी, ती घाला घालून नगराच्या वेशीजवळ उभी राहिली, आणि दुसऱ्या दोन टोळ्यानी शेतात जे सर्व, त्यांवर घाला घालून त्यास मारले.
\v 45 अबीमलेखाने तर त्या सगळ्या दिवसांत नगराशी लढाई केली, आणि त्याने नगर घेतले व त्यांत, जे लोक होते त्यास जिवे मारले, आणि नगर उध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.
\s5
\v 46 तेव्हा शखेमाच्या बुरूजांतल्या सर्व हे माणसानी ऐकले, आणि ते बरीथ देवाच्या घराच्या बुरूजात गेली.
\v 47 मग शखेमाच्या बुरूजातली सर्व माणसे एकवट झाली आहेत, असे अबीमलेखाला कोणी सांगितले.
\s5
\v 48 तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सलमोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्दावर उचलून घेऊन त्याने आपल्या जवळच्या लोकांस सांगितले, जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा.
\v 49 तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्यामागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशी शखेमाच्या बुरुजातली सर्व पुरुष व स्त्रिया सुमारे एक हजार इतकी मेली.
\s5
\v 50 नंतर अबीमलेख तेबेसास गेला, आणि त्याने तेबेजावर तळ देऊन ते घेतले.
\v 51 परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसुध्दा म्हणजे त्या नगरांतली सर्व माणसे त्यांत पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढले.
\s5
\v 52 नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरूद्ध लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळावयास त्याच्या दाराजवळ गेला.
\v 53 तेव्हा एका स्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकतो.
\v 54 तेव्हा त्याने घाई करून आपला हत्यारे वाहणारा जो तरुण त्याला हाक मारून सांगितले, तू आपली तरवार काढून मला जिवे मार, नाहीतर मजविषयी म्हणतील की बाईने त्याला मारले. यास्तव त्याच्या तरूणाने त्याला भोसकल्यावर तो मेला.
\s5
\v 55 मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली.
\v 56 तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांस जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला.
\v 57 आणि शखेमांतल्या माणसांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.
\s5
\c 10
\p
\v 1 अबीमलेखा नंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला माणूस तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीरात राहत होता.
\v 2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीरात पुरला गेला.
\s5
\v 3 नंतर त्याच्यामागे गिलादी याईर उभा झाला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 4 त्याला तीस पुत्र होते; तीस गाढवावर ते बसत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.
\v 5 मग याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे पुरले.
\s5
\v 6 यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबांतले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्टयांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वराला सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही.
\v 7 यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यास पलिष्टयांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.
\s5
\v 8 त्यावर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलिकडे अमो-यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.
\v 9 यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढायास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले.
\s5
\v 10 तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वराला मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बालाची उपासना केली.
\v 11 तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हांस सोडवले नाही काय?
\v 12 आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हांस जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हांस त्यांच्या हातातून सोडवले.
\s5
\v 13 तरी तुम्ही मला सोडून दुस-या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.
\v 14 जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यांला हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हास सोडवावे.
\s5
\v 15 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला म्हटले, आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हास कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हास सोडव.
\v 16 तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दु:दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
\s5
\v 17 अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादांत तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.
\v 18 तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकाला म्हणाले जो माणूस अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादांतल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.
\s5
\c 11
\p
\v 1 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो इफ्ताह वेश्या स्रीचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता.
\v 2 गिलादाच्या बायकोने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, आमच्या बापाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्रीचा पुत्र आहेस.
\v 3 यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशांत जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली.
\s5
\v 4 मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली.
\v 5 जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशांतून परत आणायला गेले.
\v 6 तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.
\s5
\v 7 इफ्ताह गिलादाच्या वडील जनास बोलला, तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरांतून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?
\v 8 तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमच्या अधिकारी असा होशील.
\s5
\v 9 तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलांस म्हणाला, जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, याप्रकारे परमेश्वराने ते माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?
\v 10 तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहास बोलले, जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.
\v 11 मग इफ्ताह गिलादाच्या वडीलांबरोबर गेला, आणि त्या लोकांनी त्याला आपल्यावर अधिकारी व सेनापति असे करून ठेवले; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पांत परमेश्वरासमोर बोलला.
\s5
\v 12 मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशांत आमचा देश घेण्यास येत आहेस?
\v 13 तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांस बोलला, कारण की जेव्हा इस्राएल मिसरांतून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन ह्या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.
\s5
\v 14 तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.
\v 15 आणि त्याला म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.
\v 16 परंतु जेव्हा इस्राएल मिसरांतून निघाले, तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले.
\s5
\v 17 मग इस्राएलानी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, तू कृपाकरून आपल्या देशावरून मला जाऊ दे; परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळही पाठवले, परंतु तोसुद्धा मान्य झाला नाही; यास्तव इस्राएल कादेशात राहिले.
\v 18 आणि त्यांनी रानांत चालून अदोम देश व मवाब देश यांस फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन आर्णोनच्या कांठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे.
\s5
\v 19 तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनांतल्या राजाजवळ वकील पाठवले, आणि इस्राएलानी त्याला म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हास आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.
\v 20 पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाजात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली.
\s5
\v 21 तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशांत राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.
\v 22 असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले.
\s5
\v 23 तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांस घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?
\v 24 तुझा देव कामोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकांस घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा.
\v 25 तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?
\s5
\v 26 जेव्हा इस्राएल हेशबोनांत व त्याच्या गावांत, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत.
\v 27 मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू मजशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो.
\v 28 तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.
\s5
\v 29 आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनश्शे यात तो चहूकडे गेला, आणि गिलादी मिस्पा त्यात चहूकडे गेला, मग तेथून अम्मोनी लोकाकंडे गेला.
\v 30 इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर,
\v 31 असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.
\s5
\v 32 तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरूद्ध लढावयाला त्याकडे गेला, याप्रकारे परमेश्वराने त्याला विजय दिला.
\v 33 आणि अरबेरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.
\s5
\v 34 मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरास आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्याला भेटावयाला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याची एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.
\v 35 तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, हाय! माझ्या मुली! तू मला दु:खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यात तूही आहेस! मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूद्ध वळता येत नाही.
\s5
\v 36 तेव्हा ती त्याला बोलली, हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू मजशी सर्वकाही कर; कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.
\v 37 आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, मजसाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.
\s5
\v 38 तेव्हा त्याने म्हटले, जा. असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली.
\v 39 मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्राएलात अशी रित झाली की,
\v 40 प्रत्येक वर्षी इस्राएलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.
\s5
\c 12
\p
\v 1 तेव्हा एफ्राइमी माणसे एकत्र मिळून आणि उत्तरेस जाऊन इफ्ताहाला म्हणाली, तू आम्हास बोलावल्याशिवाय अम्मोनी विरूद्ध लढावयाला का पलिकडे गेलास? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.
\v 2 तेव्हा इफ्ताह त्यास म्हणाला, अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हास बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.
\s5
\v 3 तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत:च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरूद्ध लढावयाला पलिकडे गेलो, याप्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही लढावयाला मजवर का चढून आला?
\v 4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी माणसानी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.
\s5
\v 5 तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतारे रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळतांना बोलला, तुम्ही मला पार जाऊ द्या, तेव्हा गिलादी माणसे त्यास बोलत असत, तू एफ्राथी आहेस की काय? आणि तो नाही जर बोलला,
\v 6 तर ते त्याला म्हणत, आता तू शिब्बोलेथ असे म्हण; मग तो सिब्बोलेथ असे म्हणत (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता) मग ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळेस एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
\s5
\v 7 इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्याला पुरण्यात आले.
\s5
\v 8 मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.
\v 9 तेव्हा त्याला तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\s5
\v 10 नंतर इब्सान मेला, आणि बेथलेहेमात पुरण्यात आले.
\v 11 आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 12 नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्याला जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.
\s5
\v 13 आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला.
\v 14 आणि त्याला चाळीस पुत्र व तीस नातू होते; ते सत्तर गाढवांवर बसत असत; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
\v 15 मग तो पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्याला एफ्राइम प्रांतांतील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.
\s5
\c 13
\p
\v 1 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
\v 2 तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी माणूस होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
\s5
\v 3 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
\v 4 आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले ते अन्न खाऊ नको.
\v 5 पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याच्या डोक्याचे केस कापण्यासाठी कधीच वस्ताऱ्याचा उपयोग करू नको, कारण की, तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयांच्या जाचातून सोडवायास आरंभ करील.
\s5
\v 6 तेव्हा त्या स्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, देवाचा माणूस माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्याला विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.
\v 7 परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुध्द जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.
\s5
\v 8 तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा माणूस तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे, आणि जो पुत्र जन्मेल, त्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हास शिकवावे.
\v 9 तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या स्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा पती मानोहा तिच्यासोबत नव्हता.
\s5
\v 10 तेव्हा ती स्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली, पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.
\v 11 मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्याला बोलला, जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता, तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, होय मीच आहे.
\s5
\v 12 मग मानोहा म्हणाला, तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?
\v 13 तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, जे मी या बाईला सांगितले, त्याविषयी हिने काळजीपूर्वक राहावे.
\v 14 द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये, आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये, आणि नियमाप्रमाणे जे काही अशुध्द जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी हिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.
\s5
\v 15 तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हाला वेळ दे,
\v 16 परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल, (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)
\s5
\v 17 मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?
\v 18 तेव्हा परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे.
\s5
\v 19 मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्याला खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
\v 20 जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.
\s5
\v 21 मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की, तो परमेश्वराचा दूत होता.
\v 22 मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचीत मरू, कारण आपण देवाला पाहीले आहे.
\s5
\v 23 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, जर परमेश्वर देवाने आम्हास जिवे मारायास इच्छिले असते, तर त्याने आमच्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हास दाखवल्या नसत्या, आणि या वेळेसारखे वर्तमान आम्हास ऐकवले नसते.
\s5
\v 24 नंतर त्या स्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, याप्रकारे परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.
\v 25 तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने दानाच्या छावणीत त्याला परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.
\s5
\c 14
\p
\v 1 नंतर शमशोन खाली तिम्ना येथे गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्री पाहिली.
\v 2 तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला सांगितले, मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला बायको करून द्या.
\s5
\v 3 परंतु त्याचे आई व बाप त्याला म्हणाले, तुझ्या नातेवाईकात किंवा तुझ्या लोकांत कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली बायको करून घ्यायला जात आहेस? तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.
\v 4 परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापांस हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते.
\s5
\v 5 यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्नास जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत पोहंचले, आणि तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला.
\v 6 तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांस सांगितले नाही.
\s5
\v 7 तो गेला आणि जाऊन त्या स्त्रिसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली.
\v 8 काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहण्यास बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला.
\v 9 त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांसही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्यांने सांगितले नाही.
\s5
\v 10 नंतर शमशोनाचा बाप ती स्री जिथे होती तिथे उतरून खाली गेला, आणि शमशोनाने तेथे मेजवानी दिली, कारण तरुण पुरुषांमध्ये तशी रुढी होती.
\v 11 तिच्या नातेवाईकांनी त्याला पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्याला तीस मित्र आणून दिले.
\s5
\v 12 मग शमशोन त्यांना म्हणाला, आता मी तुम्हाला कोडे सांगतो; मेजवानीच्या सात दिवसात जर तुम्हातील कोणी एकाने त्याचे उत्तर शोधून मला सांगितले, तर मी तुम्हाला तागाचे तीस झगे व कपड्यांचे तीस संच जोड देईन.
\v 13 परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाहीतर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे. तेव्हा ते त्याला म्हणाले, तुझे कोडे आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.
\s5
\v 14 तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यामधून खाण्याजोगे काही बाहेर निघते, बळकटातून काहीतरी गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसांत तर त्याच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही.
\s5
\v 15 नंतर चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हाला सांग, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हाला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?
\s5
\v 16 तेव्हा शमशोनाची बायको त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीति करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांना तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही. परंतु शमशोन तिला म्हणाला, पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?
\v 17 मेजवाणीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.
\s5
\v 18 आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या माणसांनी त्याला म्हटले, मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे? तेव्हा शमशोन त्यास म्हणाला, जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.
\s5
\v 19 नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन अष्कलोनास खाली गेला आणि त्याने त्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्याला खूप राग आला होता, आणि तो त्याच्या बापाच्या घरी निघून गेला.
\v 20 इकडे शमशोन ज्या एका सोबत्याशी मित्रभावाने वागला होता त्यास त्याची बायको त्याच्याजवळच्या मित्राला देऊन टाकण्यात आली.
\s5
\c 15
\p
\v 1 काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन; परंतु तिच्या पित्याने त्याला आत जाऊ दिले नाही.
\v 2 तिचा पिता म्हणाला, मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.
\s5
\v 3 तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबधी मी निर्दोष राहीन.
\v 4 शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
\s5
\v 5 मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिक आणि धान्याच्या रचलेल्या सुडयासुध्दा जाळले आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
\v 6 तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, हे कोणी केले? नंतर त्यांनी म्हटले, तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यानी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
\s5
\v 7 शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरूद्ध सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.
\v 8 नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
\s5
\v 9 मग पलिष्ट्यी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
\v 10 तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, तुम्ही आम्हावर का हल्ला केला आहे? तेव्हा ते म्हणाले, शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.
\s5
\v 11 नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, पलिष्टी आम्हावर राज्य करतात, हे तुला माहित नाही काय? तर तू हे काय केले? शमशोन त्यांना म्हणाला, जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.
\s5
\v 12 ते शमशोनाला म्हणाले, आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, अशी माझ्याजवळ शपथ घ्या.
\v 13 मग त्यांनी त्याला सांगितले की, नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही. तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्याला बांधून खडकातून वर नेले.
\s5
\v 14 जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्याला पाहून आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
\s5
\v 15 नंतर त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
\v 16 शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.
\s5
\v 17 शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरून त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
\v 18 तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वराला हाक मारून म्हटले, तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंतीच्या हाती पडत आहे.
\s5
\v 19 आणि देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्याला परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरून त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
\v 20 शमशोनाने पलिष्ट्यांच्या दिवसात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.
\s5
\c 16
\p
\v 1 शमशोन गज्जात गेला आणि तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.
\v 2 गज्जेकरास सांगण्यात आले की, शमशोन तिथे आला आहे. गज्जकरांनी ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळी उजेडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्याला जिवे मारू.
\s5
\v 3 शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीची दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
\s5
\v 4 त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रिवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.
\v 5 पलिष्ट्याचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्याला बांधू, कशा प्रकारे आम्ही त्याला नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकरा अकराशे चांदीची नाणी देऊ.
\s5
\v 6 आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, मी विनंती करते तुझे महान बळ कशांत आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तिहीन होशील, ते मला सांग.
\v 7 तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईल.
\s5
\v 8 नंतर पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांनी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्याला त्यांनी बांधले.
\v 9 तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्याला म्हटले, शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत! परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्यां तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही.
\s5
\v 10 दलीला, शमशोनाला म्हणाली, पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.
\v 11 तेव्हा त्याने तिला सांगितले, जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारखा होईन.
\v 12 तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्याला बांधले, आणि त्याला म्हटले, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत. तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.
\s5
\v 13 दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाडयाच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर माणसासारखा होईन.
\v 14 तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्याला म्हणाली, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत! तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
\s5
\v 15 ती त्याला म्हणाली, तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.
\v 16 तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्याला मरून जावेसे वाटू लागले.
\s5
\v 17 म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर माणसासारखा होईन.
\s5
\v 18 जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे. तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.
\v 19 मग तिने त्याला आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने माणसाला बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्याला ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
\s5
\v 20 ती म्हणाली, हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्याला सोडले होते, हे त्याला कळले नाही.
\v 21 पलिष्ट्यांनी तर त्याला धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर याला खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.
\v 22 तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
\s5
\v 23 मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याजवळ मोठा यज्ञ अर्पण करण्यास करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.
\v 24 तेव्हा लोकांनी त्याला पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यांतल्या पुष्कळांना मारले, त्याला आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.
\s5
\v 25 आणि ते जेव्हा आनंद सासरा करत होते तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरांतून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्याला खांबांच्यामध्ये उभे केले होते.
\v 26 शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, ज्या खांबांचा इमारतीला आधार आहे, ते मी चापसावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्यांवर टेकेन.
\s5
\v 27 ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
\s5
\v 28 तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपाकरून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळयांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.
\v 29 नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्याला आधार होता, त्यांतला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.
\s5
\v 30 तेव्हा शमशोन म्हणाला, पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो! मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते.
\v 31 नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्याला उचलून आणले, आणि त्याला नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
\s5
\c 17
\p
\v 1 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक माणूस होता; त्याचे नाव मीखा.
\v 2 आणि त्याने आपल्या आईला म्हटले, जी अकराशे शेकेल रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती, आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!
\s5
\v 3 मग त्याने ती अकराशे शेकेल रुपे आपल्या आईला परत दिली; तेव्हा त्याच्या आईने म्हटले, मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपे परमेश्वराला अर्पण म्हणून वेगळी करते. तर आता मी ही तुला परत देते.
\v 4 त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिली. मग त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिली, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ति केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.
\s5
\v 5 मीखा ह्या माणसाचे एक मूर्तीचे देवघर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते.
\v 6 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यांत जे योग्य, ते केले.
\s5
\v 7 तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.
\v 8 नंतर तो माणूस यहूदातल्या बेथलेहेम नगरांतून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला.
\v 9 मग मीखा त्याला म्हणाला, तू कोठून आलास? तेव्हा तो माणूस त्याला म्हणाला, मी बेथलेहेमतला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.
\s5
\v 10 तेव्हा मीखा त्याला म्हणाला, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी (तुकडे) व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.
\v 11 तो लेवी त्या माणसाबरोबर राहण्यास तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.
\s5
\v 12 आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले, आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मीखाच्या घरी राहिला.
\v 13 नंतर मीखा बोलला, आता मला कळले की, परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.
\s5
\c 18
\p
\v 1 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसांत दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.
\v 2 दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पांच शूर योध्दे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहाळणी व पाहणी करण्यास पाठवले; तेव्हा त्यांनी त्यास सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.
\s5
\v 3 ते मीखाच्या घराजवळ होते, तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्याला बोलले, तुला इकडे कोणी आणले? आणि तू ह्या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस?
\v 4 तो त्यास म्हणाला, मीखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.
\s5
\v 5 तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, तू कृपाकरून देवाला सल्ला विचार, की आम्ही जो प्रवास करत आहोत तो सफल होईल किंवा नाही.
\v 6 तेव्हा तो याजक त्यास बोलला, तुम्ही शांतीने जा; ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे, त्यात परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील.
\s5
\v 7 मग ती पाच माणसे निघाली आणि लईश येथे आली, आणि त्यांनी पाहिले की, ज्याप्रकारे सीदोनी अबाधित व सुरक्षित राहत होते; तसेच त्यात राहणारे लोक हे तेथे सुरक्षित आहेत. आणि देशांत त्यांना कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणारा एकही जण तेथे नव्हता. ते सीदोन्यांपासून फार दूर रहात होते, आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यवहारीक संबंध नव्हते.
\v 8 नंतर ते सरा व अष्टावोल तेथे आपल्या वंशाजवळ आले; तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यास विचारले, तुमचा अहवाल काय आहे?
\s5
\v 9 ते म्हणाले, चला! आपण त्यांच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका.
\v 10 तुम्ही तेथे जाल, तेव्हा तुम्ही अशा लोकांकडे याल जे असा विचार करतात आम्ही अगदी सुरक्षित आहोत आणि त्यांचा देश विस्तीर्ण आहे. देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.
\s5
\v 11 मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळांतले सहाशें पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.
\v 12 तेव्हा त्यांनी जाऊन यहूदातल्या किर्याथ-यारीम जवळ तळ दिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महाने-दान, दानाची छावणी असे म्हणतात; ते किर्याथ-यारीमाच्या पश्चीमेस आहे.
\s5
\v 13 मग ते तेथून पुढे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाच्या घरापर्यंत आले.
\v 14 तेव्हा जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यांनी आपल्या नातेवाईकास असे सांगितले की, या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता, आणि कोरीव मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति आहेत; हे तुम्हाला माहित आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा.
\s5
\v 15 मग त्यांनी तिकडे वळून मीखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याचे क्षेमकुशल विचारले.
\v 16 नंतर जी दानाच्या वंशातली सहाशे माणसे ती आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशव्दाराशी उभी राहिली.
\s5
\v 17 आणि जी पांच माणसे देश हेरायला गेली होती, त्यांनी आत शिरून, ती कोरीव मूर्त्ति, एफोद, कुलदेवता व ओतीव मूर्ति घेतली; तेव्हा तो याजक लढाईची शस्त्रे घेतलेली जी सहाशे माणसे होती त्याच्याबरोबर दरवाज्यापुढे उभा होता.
\v 18 तर त्यांनी मीखाच्या घरांत जाऊन ती कोरीव मूर्ति व ते एफोद व ते कुलदेवता व ती ओतीव धातूची मूर्ति घेतली असता, तो याजक त्यांना म्हणाला, तुम्ही हे काय करत आहात?
\s5
\v 19 त्यांनी त्याला म्हटले, तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव आमच्याबरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा, आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे?
\v 20 तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला; यास्तव तो, ते एफोद व ते कुलदेवता व ती कोरीव मूर्ति घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
\s5
\v 21 अशा रीतीने ते तेथून वळाले आणि दूर गेले. लहान मुलेबाळे, गुरेढोरे व त्यांची मालमत्ता ते आपल्यापुढे घेऊन चालले.
\v 22 मीखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मीखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले.
\v 23 त्यांनी दानाच्या लोकांस हाक मारली; तेव्हा ते मागे वळून मीखाला म्हणाले, तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास.
\s5
\v 24 तो म्हणाला, मी केलेले देव तुम्ही चोरले आणि याजक तुम्ही घेऊन चालला, आणि आता मला दुसरे काही राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला कसे विचारू शकता?
\v 25 मग दानाच्या लोकांनी त्याला म्हटले, तू आपला आवाज आम्हास ऐकू देऊ नको; नाहीतर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील, आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील.
\v 26 मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, यास्तव तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.
\s5
\v 27 मीखाने ज्या मूर्ति केल्या होत्या त्या आणि त्याचा जो याजक होता, त्याला त्यांनी घेतले; मग लईशावर, शांत राहणा-या लोकांवर जाऊन त्यास तलवारीने मारले, आणि नगराला आग लावून जाळले.
\v 28 तेव्हा त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर होते, आणि त्यांचा कोणाशीही व्यवहार नव्हता; ते नगर बेथ-रहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी तेथे पुन्हा नगर बांधले आणि ते त्यांत राहिले.
\v 29 त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्राएलाचा एक पुत्र होता त्याचे नाव त्या नगराला दिले, परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते.
\s5
\v 30 नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ति केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदीवासात जाऊपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होती.
\v 31 देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मीखाची कोरीव मूर्ति जी त्याने केली होती तिची उपासना केली.
\s5
\c 19
\p
\v 1 त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वात दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम येथील एक बाई, उपपत्नी करून घेतली होती.
\v 2 परंतु त्याची उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला, आणि ती त्याला सोडून आणि यहूदातील बेथलेहेमात आपल्या बापाच्या घरी परत गेली, आणि तेथे चार महिने राहिली.
\s5
\v 3 तेव्हा तिचा नवरा उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्याला आपल्या बापाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले, त्याला भेटून तो आनंदित झाला.
\v 4 त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या बापाने त्याला फार आग्रह केला; म्हणून तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिली.
\s5
\v 5 मग चवथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जाण्यास तयार झाला, परंतु त्या मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.
\v 6 त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले; नंतर त्या मुलीच्या बापाने म्हटले. कृपाकरून तू एक रात्र राहण्यास तयार हो, आणि चांगला समय घालव.
\s5
\v 7 जेव्हा लेवी जाण्यास उठला, तेव्हा तरुण मुलीच्या बापाने त्याला पुन्हा राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली.
\v 8 नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, परंतु त्या मुलीच्या बापाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब. तेव्हा त्या दोघांनी जेवण केले.
\s5
\v 9 जेव्हा लेवी, त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठली, तेव्हा त्याचा सासरा त्याला बोलला, आता पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा; पाहा, दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्ल्हास होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरास जा.
\s5
\v 10 परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती.
\v 11 जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यात रात्र घालवू.
\s5
\v 12 त्याचा धनी त्याला म्हणाला, जे इस्राएलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.
\v 13 लेवीने आपल्या नोकराला सांगितले, चल, आपण गिबा किंवा रामा या जागांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यांत रात्र घालवू.
\s5
\v 14 मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला.
\v 15 तेव्हा गिब्यांत वस्ती करायाला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला, परंतु त्यास रात्री राहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही.
\s5
\v 16 परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा माणूस शेतांतून आपल्या कामावरून येत होता; तोसुद्धा माणूस एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यांत उपरा होता आणि त्या ठिकाणांतली माणसे बन्यामीनी होती.
\v 17 त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू माणूस पाहिला; तेव्हा तो म्हातारा माणूस म्हणाला, तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?
\s5
\v 18 तेव्हा तो त्याला म्हणाला, आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही.
\v 19 आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि मजसाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.
\s5
\v 20 तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने त्यास अभिवादन केले, तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईल. फक्त चौकात रात्र घालवू नको.
\v 21 तेव्हा त्या माणसाने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.
\s5
\v 22 ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरांतल्या दुष्ट लोकांनी, घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो माणूस तुझ्या घरात आला आहे, त्याला तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.
\v 23 मग तो माणूस, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यास बोलला, नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा माणूस माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपण करू नका.
\s5
\v 24 पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी तिला आता बाहेर आणतो; मग तुम्ही तिची आब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.
\v 25 तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या माणसाने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.
\v 26 तेव्हा पहाटेच्या वेळेस ती बाई येऊन जेथे आपला धनी होता, त्या माणसाच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली.
\s5
\v 27 जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबऱ्यावर होते.
\v 28 तेव्हा लेवीने तिला म्हटले, ऊठ, म्हणजे आपण जाऊ. परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.
\s5
\v 29 मग आपल्या घरी पोहोचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले.
\v 30 ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, मिसर देशांतून इस्राएल लोक पुन्हा आले, त्यादिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हाला सल्ला द्या! काय करावे ते आम्हाला सांगा!
\s5
\c 20
\p
\v 1 नंतर दानापासून बैर-शेबापर्यंतचे आणि गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर येऊन आणि एक मनीचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पात एकत्र जमा झाले.
\v 2 इस्राएलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी, यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले, सुमारे चार लाख पायदळ, जे तलवारीने लढण्यास तयार होते.
\s5
\v 3 आता बन्यामीनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, आम्हाला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?
\v 4 तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हणाला, मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.
\s5
\v 5 गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मेली.
\v 6 मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतात पाठवले, कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
\v 7 आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि ह्याकडे लक्ष द्या.
\s5
\v 8 सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
\v 9 परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायच ठरवू.
\s5
\v 10 आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातले दहा माणसे व हजारांतले शंभर, व दहा हजारांतले एक हजार, इतकी माणसे निवडू ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.
\v 11 मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरूद्ध जमले.
\s5
\v 12 तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?
\v 13 तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हाला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यास जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू. परंतु बन्यामीनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.
\v 14 आणि बन्यामीनी लोक इस्राएली लोकांविरूद्ध लढण्यास आपल्या नगरांतून गिब्याजवळ तयार झाले.
\s5
\v 15 त्यादिवशी बन्यामीनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यात गिब्यांत राहणारे त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली.
\v 16 त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
\s5
\v 17 बन्यामीनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.
\v 18 मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, बन्यामीनी लोकांशी लढावयाला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे? परमेश्वर देवाने सांगितले, यहूदाने पहिल्याने जावे.
\s5
\v 19 इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
\v 20 मग इस्राएली सैन्य बन्यामिन्या विरूद्ध लढावयाला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरूद्ध गिबा याठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
\v 21 तेव्हा बन्यामीनी सैन्याने गिब्यांतून निघून आणि त्यादिवशी इस्राएली सैन्यांतील बावीस हजार माणसांस मारले.
\s5
\v 22 तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली.
\v 23 आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वराला विचारले, आमचा बंधु बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय? परमेश्वर म्हणाला त्यांवर हल्ला करा.
\s5
\v 24 म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामीनी सैन्याविरूद्ध चालून गेले.
\v 25 दुसऱ्या दिवशी, बन्यामीनी लोक गिब्यांतून त्यांच्याविरूद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार माणसांस मारले, हे सर्व तरवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.
\s5
\v 26 नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले आणि त्यादिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
\s5
\v 27 आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथे होता.
\v 28 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसांत त्याची सेवा करत होता. आम्ही आपला बंधु बन्यामीन याच्या लोकांविरूद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे? तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.
\s5
\v 29 मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळीं माणसे ठेवले.
\v 30 मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरूद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
\s5
\v 31 तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यात इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
\s5
\v 32 यास्तव बन्यामीनी लोकांनी म्हटले त्यांचा पराजय झाला आहे आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत. परंतु इस्राएली सैन्य म्हणाले आम्ही मागे पळू आणि त्यांना नगरांतल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.
\v 33 सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि बाल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
\s5
\v 34 सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
\v 35 तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्यादिवशी बन्यामिन्यांची पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
\s5
\v 36 बन्यामीनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामीनी माणसांपुढून बाजूला झाली.
\v 37 नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन आणि ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
\v 38 आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरांतून उंच धूराचा लोळ चढवावा.
\s5
\v 39 आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्यास सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारले आणि त्यांनी म्हटले, खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.
\s5
\v 40 परंतु नगरांतून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिनानी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशांत चढत आहे.
\v 41 नंतर इस्राएली सैन्य मागे फिरून त्यांच्याविरूद्ध उलटले. बन्यामीनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे.
\s5
\v 42 यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले.
\s5
\v 43 त्यांनी बन्यामिन्यांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले.
\v 44 बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती.
\s5
\v 45 जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यांतले पांच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांतले दोन हजार पुरुष आणखी मारले.
\v 46 त्यादिवशी बन्यामिनांतले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते.
\s5
\v 47 परंतु सहाशे पुरुष फिरून रानांत रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महीने राहिले.
\v 48 नंतर इस्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामीन लोकांच्याविरूद्ध जाऊन हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून आग लावून जाळून टाकले.
\s5
\c 21
\p
\v 1 आता इस्राएली माणसानी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, आमच्यांतला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.
\v 2 नंतर लोक बेथेलास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु:खाने रडले.
\v 3 ते मोठ्याने म्हणाले, हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.
\s5
\v 4 नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.
\v 5 इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्वाची शपथ केली होती की, ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.
\s5
\v 6 इस्राएलाच्या लोकांनी आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, आज इस्राएलातून एक वंश कापला गेला आहे;
\v 7 जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण पत्नीची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वराजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या कन्यातल्या कोणीही त्यास लग्नासाठी देणार नाही.
\s5
\v 8 त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे? तेव्हा याबेश गिलादांतला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळाले.
\v 9 कारण लोकांची मोजणी घेतली गेली, तेव्हा पाहा, याबेश गिलादाच्या तेथल्या राहणाऱ्यापैकी कोणी तेथे आला नव्हता.
\v 10 मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.
\s5
\v 11 हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि जिचा पुरुषाशी लैंगिक संबंध आला आहे ती प्रत्येक स्री, त्यांचा नाश करावा.
\v 12 तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशे कुमारी त्यास मिळाल्या आणि त्यांनी त्यास कनान देशांत शिलो छावणीत आणले.
\s5
\v 13 तेव्हा सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामीनी लोक रहात होते त्यांच्याकडे निरोप पाठवून त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.
\v 14 तेव्हा बन्यामीनी माघारी आले, आणि त्यांनी याबेश गिलादांतल्या स्त्रिया त्यास पत्न्या करून दिल्या; परंतु त्या सर्वांस त्या पुरल्या नाहीत.
\v 15 लोकांना बन्यामिनाविषयी दु:ख वाटले कारण की, परमेश्वराने इस्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.
\s5
\v 16 यास्तव मंडळीच्या वडीलांनी म्हटले, जे उरलेले त्यास पत्नी मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण त्यांनी बन्यामीनी स्त्रियांना मारून टाकले होते.
\v 17 आणखी त्यांनी म्हटले, इस्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, म्हणून बन्यामिनाच्या उरलेल्यांस वतन मिळावे.
\s5
\v 18 आम्ही आपल्या कन्येतून त्यास स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला बायको करून देतो, तो शापित होईल.
\v 19 नंतर ते म्हणाले, शिलोमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.
\s5
\v 20 त्यांनी बन्यामीनी लोकांस अशी आज्ञा दिली की, तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.
\v 21 मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचावयाला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
\s5
\v 22 जेव्हा त्यांचे वडिल किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यास सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या आम्हावर कृपा करा! कारण लढाईत आम्हाला त्यांतील एकएकासांठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यास तुमच्या मुली दिल्या नाहीत.
\s5
\v 23 यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले, आणि आपल्या संख्येप्रमाणे कन्या पकडून पत्नी करून घेतल्या. नंतर ते माघारी आपल्या वतनावर गेले, आणि तेथली नगरे बांधून त्यांत राहिले.
\v 24 त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.
\s5
\v 25 त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण आपल्या दिसण्यास जे बरे ते करीत होता.

176
08-RUT.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,176 @@
\id RUT
\ide UTF-8
\h रूथ
\toc1 रूथ
\toc2 रूथ
\toc3 rut
\mt1 रूथ
\s5
\c 1
\p
\v 1 मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला. आणि यहूदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला.
\v 2 आणि त्या मनुष्याचे नाव अलीमलेख आणि त्याच्या पत्नीचे नाव नामी होते व त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन असून ती एफ्राथा यहूदातील बेथलेहेम येथील होती. ती मवाब देशी राहण्यास गेली.
\p
\s5
\v 3 आणि नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली.
\v 4 आणि त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ होते, आणि ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.
\v 5 मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली.
\p
\s5
\v 6 परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जाण्यास निघाली.
\v 7 आणि ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जाण्यास निघाली.
\p
\s5
\v 8 आणि नामी आपल्या दोन्ही सुनांस म्हणाली, तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवरवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो. "
\v 9 परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो आणि तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.
\v 10 आणि त्या तिला म्हणाल्या आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या लोकांकडे येणार.
\p
\s5
\v 11 नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही मजबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील?
\v 12 माझ्या मुलींनो माघारी जा. मी आता म्हातारी झाले आहे. पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि मला पुत्रही झाले,
\v 13 तरी ते मोठे होऊपर्यत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय राहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरूध्द फिरला आहे.
\p
\s5
\v 14 आणि तिच्या सुना मोठा आवाज काढून आणि पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले. परंतु रूथ तिला धरून राहिली.
\p
\v 15 मग ती तिला म्हणाली, ऐक तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व देवाकडे परत गेली आहे. तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.
\p
\s5
\v 16 आणि रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा अस मला सांगू नका तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहील तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.
\v 17 तुम्ही मराल तेथे मी मरेल व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.
\v 18 आणि रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.
\p
\s5
\v 19 मग त्या दोघी बेथलेहेमात चालत पोहचल्या. आणि बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्याच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, हीच का ती नामी?
\v 20 आणि ती त्यांना म्हणाली, मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु:खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे.
\v 21 मी भरलेली गेले याप्रकारे परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरूध्द साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खीत केले आहे म्हणून तुम्ही मला नामी का म्हणता?
\p
\s5
\v 22 याप्रमाणे नामी आणि तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूचा हंगामास आरंभ झाला होता.
\s5
\c 2
\p
\v 1 आणि नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेख याच्या कुळांतला असून मोठा धनवान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते.
\v 2 आणि मवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ दे, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन. तेव्हा तिने म्हटले जा, माझ्या मुली.
\s5
\v 3 मग ती निघून शेतात गेली, आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा अलीमलेखाच्या कुळातला बवाज याच्या शेताच्या भागात जाण्याची संधी तिला मिळाली.
\v 4 आणि पहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुम्हाबरोबर असो, आणि त्यांनी उत्तर दिले" परमेश्वर तुला आशीर्वादित करो. "
\s5
\v 5 मग बवाज कापणी करणाऱ्यांस म्हणाला ही तरुण स्री कोण आहे?
\v 6 कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्याने म्हटले नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे
\v 7 ती मला म्हणाली कृपाकरून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू दे. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यत वेचीत आहे, थोडा वेळ मात्र ती घरांत बसली होती.
\p
\s5
\v 8 बवाज रूथेस म्हणाला, मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचावयास जाऊ नको, येथेच माझ्या तरुण नोकराणीबरोबर राहा.
\v 9 हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी ह्या माणसास तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागली तर पाण्याच्या भांड्याकडे जाऊन तरूणांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.
\p
\s5
\v 10 तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रिवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?
\v 11 आणि बवाज तिला म्हणाला, तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू आपल्या आईवडीलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परीचित नाहीत अशा लोकांत तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे.
\v 12 देव तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. आणि ज्याच्या पंखाचा आश्रय करायला तू आलीस तो परमेश्वर इस्राएलाचा देव याच्यापासून तुला, तो तुला पुरे पारितोषिक देवो.
\p
\s5
\v 13 मग ती म्हणाली, माझ्या धन्या आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याहि दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.
\p
\s5
\v 14 आणि भोजनसमयी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. ह्या कढीत आपली भाकर बुडव. त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
\p
\s5
\v 15 ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्यास सांगितले, तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका.
\v 16 आणि चालता चालता पेंढ्यातून मूठमूठ टाकत जा. तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.
\p
\s5
\v 17 तिने याप्रकारे संध्याकाळपर्यत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले.
\v 18 ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.
\p
\s5
\v 19 तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली ,त्याचे कल्याण होवो. मग आपण कोणाच्या शेतात काम आज केले ते तिने सासूस सांगितले. ती म्हणाली ज्या माणसाच्या शेतात काम केले त्याचे नाव बवाज.
\v 20 नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जीवंतावर व मृतांवरहि आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या नातलगापैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.
\p
\s5
\v 21 मग मवाबी रूथेने सांगितले की तो मला म्हणाला की माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यत त्याच्या मागोमाग राहा.
\v 22 नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली, तू त्याच्याच नोकराणीबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.
\p
\s5
\v 23 याप्रकारेे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यत तिने बवाजाच्या नोकराणीबरोबर सरवा वेचला. आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.
\s5
\c 3
\p
\v 1 आणि तिची सासू नामी तिला म्हणाली, माझ्या मुली तुझे चांगले होऊन तुला विसाव्यासाठी एखादे स्थळ मिळावे म्हणून मला शोध करावयास नको काय?
\v 2 तर हे पाहा, ज्याच्या नोकराणीबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.
\p
\s5
\v 3 तर तू शुध्द होऊन, सुगंधीत तेल लावून, वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यत तू त्याच्या नजरेस पडू नको.
\v 4 तो कोठे निजतो ते पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल.
\v 5 ती म्हणाली, तुम्ही सांगता ते सर्व मी करीन.
\p
\s5
\v 6 तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केले.
\v 7 खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरून काढून तेथे झोपली.
\p
\s5
\v 8 मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.
\v 9 तेव्हा तो तिला म्हणाला, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे, या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या. कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.
\p
\s5
\v 10 तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास. कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तुरुणाच्यामागे तू गेली नाहीस.
\v 11 तर मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो. कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना माहित आहे की तू सदगुणी स्री आहेस.
\p
\s5
\v 12 मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे.
\v 13 तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुजसंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे. त्याला ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाहीतर, परमेश्वराच्या जिवीताची शपथ, ते मी करीन. सकाळपर्यत झोपून राहा.
\p
\s5
\v 14 ती त्याच्या पायाशी झोपून राहिली, आणि मग माणूस माणसाला ओळखेल इतके उजाडेल त्याच्या अगोदर उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.
\v 15 तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर. तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात गेला.
\p
\s5
\v 16 सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, माझ्या मुली, कसे काय झाले? तेव्हा त्या माणसाने कायकाय केले ते तिने तिला सगळे सांगितले.
\v 17 तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको.
\v 18 ती म्हणाली, मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही.
\s5
\c 4
\p
\v 1 आता बवाज वेशीत जाऊन बसला. आणि इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला. तेव्हा हा त्याला म्हणाला, येथे येऊन बस. तोसुद्धा तेथे जाऊन बसला.
\v 2 आणि गावातील दहा वडिल पुरुषास बोलावले आणि म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. आणि तोसुद्धा बसला.
\p
\s5
\v 3 मग तो त्या जवळच्या नातलगास म्हणाला, मवाब देशातून नामी आली आहे. ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे.
\v 4 आणि तुला हे कळवावे, आणि येथे या बसलेल्यासमोर आणि माझ्या वडिलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, आणि तुझ्यानंतर मी आहे. तो म्हणाला, मी खंडून घेईल.
\p
\s5
\v 5 मग बवाज म्हणाला ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्यादिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.
\v 6 आणि तो जवळचा नातलग म्हणाला, माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही. सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल. म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.
\p
\s5
\v 7 वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात एक पध्दत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्यास देत असे.
\v 8 तो जवळचा नातलग बवाजास म्हणाला, तूच ते विकत घे. आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
\p
\s5
\v 9 आणि बवाज त्या वडिल जनास व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
\v 10 याखेरीज महलोनाची स्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून तिचा स्विकार करतो. ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये.
\p
\s5
\v 11 तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडिल जन म्हणाले, आम्ही साक्षी आहो, ही जी स्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ प्रमाणे करो. एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमांत कीर्ती होवो.
\v 12 आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान येईल त्याच्याद्वारे होवो.
\p
\s5
\v 13 मग बवाजाने रूथेशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
\v 14 तेव्हा तेथील नामीस म्हणाल्या, परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही. आणि त्याचे नाव इस्राएलात प्रसिध्द होवो.
\v 15 आणि तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृध्दपणी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीति करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.
\p
\s5
\v 16 तेव्हा नामीने ते बालक घेतले, आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.
\v 17 आणि नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणीनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
\p
\s5
\v 18 आता ही पेरेशाची वंशावळ आहे. पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,
\v 19 हेस्रोन रामचा पिता झाला आणि राम अम्मीनादाबाचा पिता झाला,
\v 20 आणि अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला आणि नहशोन सल्मोनाचा पिता झाला,
\v 21 आणि सल्मोन बवाजाचा पिता झाला आणि बवाज ओबेदाचा पिता झाला
\v 22 ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दावीदाचा पिता झाला.

1307
09-1SA.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1307 @@
\id 1SA
\ide UTF-8
\h 1 शमुवेल
\toc1 1 शमुवेल
\toc2 1 शमुवेल
\toc3 1sa
\mt1 1 शमुवेल
\s5
\c 1
\p
\v 1 एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम ह्या नगरामधील एक माणूस होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.
\v 2 त्याला दोन बायका होत्या एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.
\s5
\v 3 तो माणूस आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याचे भजनपूजन करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन मुलगे हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
\v 4 यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे तिच्या सर्व मुली यांना वाटे देत असे.
\s5
\v 5 परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो प्रीती करत असे पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती.
\v 6 परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.
\s5
\v 7 तो प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारा सोबत देवाच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.
\v 8 तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला नेहमी म्हणक असे, हन्ना तू कां रडतेस? का खात नाहीस आणि तुझे ह्रदय का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?
\s5
\v 9 मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.
\v 10 तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती देवाजवळ प्रार्थना करून फार रडली.
\s5
\v 11 नवस करून बोलली हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात देवाला देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.
\s5
\v 12 आणि असे झाले की ती देवाच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले दिले.
\v 13 हन्ना तर आपल्या ह्रदयात बोलत होती तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.
\v 14 तेव्हा एली तिला म्हणाला किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.
\s5
\v 15 तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली असे नाही माझ्या प्रभू मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव देवापुढे ओतत आहे.
\v 16 आपली दासी दुष्ट बाई आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या क्लेश व यातना यांमुळे आतार्यंत बोलले आहे.
\s5
\v 17 मग एली उत्तर देऊन म्हणाला, सुखरूप जा व इस्राएलाचा परमेश्वर याच्याजवळ जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो.
\v 18 ती बोलली आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या. मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.
\s5
\v 19 आणि सकाळी त्यांनी उठून देवाचे भजनपूजन केले; मग ती निघून रामा येथे आपल्या घरी गेली. आणि एलकानाने आपली बायको हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.
\v 20 आणि असे झाले की, नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्याला देवापासून मागून घेतले.
\s5
\v 21 आणि तो माणूस एलकाना आपल्या सर्व कुटुंबासहीत देवाला वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.
\v 22 परंतु हन्ना वर गेली नाही कारण ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्याला नेईल, आणि तो देवापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील.
\v 23 तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो. मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले.
\s5
\v 24 आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्याला शिलो येथे देवाच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल लहान होते.
\v 25 मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.
\s5
\v 26 आणि ती म्हणाली माझ्या प्रभू आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री देवाची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे.
\v 27 या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी देवापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
\v 28 म्हणूनच मी तो देवाला उसना दिला आहे तो जगेल तोपर्यंत तो देवाला उसना दिलेला आहे. तेव्हा तेथे त्याने देवाची आराधना केली.
\s5
\c 2
\p
\v 1 मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, माझे ह्रदय देवाच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग देवाच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदित होत आहे.
\s5
\v 2 देवासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
\s5
\v 3 अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
\v 4 पराक्रम्याची धनुष्ये मोडलेली आहेत आणि जे अडखळले ते बलाने वेष्टीलेले आहेत.
\s5
\v 5 जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सातांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.
\s5
\v 6 यहोवा जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो.
\v 7 परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.
\s5
\v 8 तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे व त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब देवाचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.
\s5
\v 9 तो आपल्या विश्वासणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारांत शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
\s5
\v 10 देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्याच्याविरूद्ध मेघगर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.
\s5
\v 11 मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर देवाची सेवा करू लागला.
\s5
\v 12 एलीची मुले नालायक माणसे होती; ते देवाला ओळखत नव्हते.
\v 13 लोकाच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई
\v 14 तो परातीत किंवा तपेल्यांत किंवा कढईत किंवा पातेल्यांत तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत
\s5
\v 15 त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.
\v 16 जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की, अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तूं घे; तर तो म्हणे असे नाही, पण तूं आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.
\v 17 हे त्या तरुणाचे पाप देवाच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांना तिरस्कार वाटू लागला.
\s5
\v 18 परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.
\v 19 त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्याला तो देत असे.
\s5
\v 20 एलकानाला व त्याच्या बायकोला एली आशीर्वाद देऊन म्हणत असे या बायकोपासून यहोवा तुला संतान देवो कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्याला परत दिले मग ते आपल्या घरी जात असत.
\v 21 आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलीना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाळ यहोवाच्यासमोर वाढत गेला.
\s5
\v 22 आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले मुलगे सर्व इस्राएलांशी कसे वागले आणि सभामंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रीया सेवा करीत त्यांच्यांपाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले.
\v 23 तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत.
\v 24 माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही देवाच्या लोकांना आज्ञाभंग करायला लावता.
\s5
\v 25 जर कोणी एक माणूस दुसऱ्याविरुद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर माणूस देवाच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल? पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता.
\v 26 शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.
\s5
\v 27 आता देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्याला प्रगट झालो नाही काय?
\v 28 आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्याला सर्व इस्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय?
\s5
\v 29 तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?
\v 30 यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.
\s5
\v 31 पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या बापाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही.
\v 32 जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.
\v 33 आणि तुझा जो माणूस मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्याला जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या ह्रदयाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.
\s5
\v 34 आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील.
\v 35 मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या ह्रदयात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापील; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.
\s5
\v 36 असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.
\s5
\c 3
\p
\v 1 शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. आणि देवाचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
\v 2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याचे दृष्टीमंद झाल्यामुळे त्याला डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;
\v 3 आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता.
\v 4 परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, मी येथे आहे.
\s5
\v 5 मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाकमारलीत. आणि एलीने म्हटले, मी बोलावले नाही परत जाऊन झोप. म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.
\v 6 पुन्हा परमेश्वराने, शमुवेला, अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत. एलीने उत्तर दिले, माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.
\s5
\v 7 शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्याला प्रगट झालेला नव्हता.
\v 8 मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाकमारलीत. तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे.
\s5
\v 9 मग एली शमुवेलाला म्हणाला, तूं जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे. मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला.
\s5
\v 10 आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, शमुवेला शमुवेला, अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, बोल तुझा दास ऐकत आहे.
\v 11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.
\s5
\v 12 एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरुद्ध पूर्ण करीन.
\v 13 कारण मी त्याल सांगितले की जो अन्याय त्याला माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
\v 14 यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.
\s5
\v 15 नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.
\v 16 मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, माझ्या मुला शमुवेला. तेव्हा शमुवेल म्हणाला, हा मी येथे आहे.
\s5
\v 17 मग त्याने म्हटले, तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यांतले कांही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.
\v 18 तेव्हा शमुवेलाने सर्व काही त्याला सांगितले; त्याच्यापासून कांही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो परमेश्वरच आहे. त्याला बरे वाटेल ते तो करो.
\s5
\v 19 आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.
\v 20 शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैरशेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.
\v 21 शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.
\s5
\c 4
\p
\v 1 आणि, शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलांकडे आला. आता इस्राएल पलिष्ट्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन-एजराजवळ तळ दिला व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.
\v 2 पलिष्ट्यांनी इस्राएलाविरुद्ध लढाई केली आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले.
\s5
\v 3 मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हांबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे.
\v 4 मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करूबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन मुलगे हफनी व फिनहास हे देवाच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
\s5
\v 5 देवाचा कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली.
\v 6 तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल? मग त्यांना कळले की, देवाचा कोश छावणीत आला आहे.
\s5
\v 7 तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही.
\v 8 आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातांतून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वरहाच आहे.
\v 9 अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.
\s5
\v 10 पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपपल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले.
\v 11 आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मेले.
\s5
\v 12 त्यादिवशी एक बन्यामिनी माणूस आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला.
\v 13 आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पहात होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे ह्रदय कांपत होते; आणि त्या माणसाने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले.
\s5
\v 14 आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले हा गोंगाटाचा शब्द काय आहे? मग त्या माणसाने उतावळीने येऊन एलीला सांगितले.
\v 15 तेव्हा एली अठ्ठ्याणव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्याला दिसत नव्हते?
\s5
\v 16 आणि तो माणूस एलीला म्हणाला, मी सैन्यातून पळून आलो. मग हा म्हणाला, माझ्या मुला काय झाले आहे?
\v 17 तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास हे मेले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.
\s5
\v 18 आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड माणूस असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
\s5
\v 19 तेव्हा त्याची सून फिनहासाची बायको गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला नवरा हे मेले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या.
\v 20 आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे. परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही.
\s5
\v 21 तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे! कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा नवरा हे मेले होते.
\v 22 आणि ती म्हणाली, इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.
\s5
\c 5
\p
\v 1 आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला.
\v 2 आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला.
\v 3 जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, देवाच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.
\s5
\v 4 पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, देवाच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्याला राहिले होते.
\v 5 म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्याऱ्यावर पाय ठेवत नाहीत.
\s5
\v 6 मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांना गाठींच्या पिडेने पिडले.
\v 7 तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरुद्ध भारी झाला आहे.
\s5
\v 8 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे आम्ही काय करावे? ते बोलले, इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा. मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.
\v 9 परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पिडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या.
\s5
\v 10 मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला. परंतु, असे झाले की, देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांना मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.
\s5
\v 11 मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हाला व आमच्या लोकांना मारू नये. कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.
\v 12 जी माणसे मेली नाहीत त्यास त्यांना गाठीने पिडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.
\s5
\c 6
\p
\v 1 आता देवाचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
\v 2 आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व दैवी प्रश्न जाणणाऱ्यांना बोलावून त्याने म्हटले यहोवाच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.
\s5
\v 3 ते म्हणाले, तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हांवरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हांस समजेल.
\v 4 तेव्हा ते म्हणाले, जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे? त्यांनी उत्तर दिले, पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हां सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
\s5
\v 5 म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हांवरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.
\v 6 मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली ह्रदये कठीण केली तशी तुम्ही आपली ह्रदये कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
\s5
\v 7 तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
\v 8 मग देवाचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
\v 9 आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हाला घडले ती आकस्मिक घटना आहे असे आम्ही समजू.
\s5
\v 10 मग त्या माणसांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
\v 11 मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
\v 12 मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
\s5
\v 13 तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
\s5
\v 14 मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशाकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वराला होमार्पण अशा अर्पण केल्या.
\v 15 लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या माणसांनी त्या दिवशी परमेश्वराला होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
\s5
\v 16 आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
\s5
\v 17 परमेश्वराला पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जकरता एक, अश्कलोनाकरता एक, गथाकरता एक, एक्रोनाकरता एक.
\v 18 आणि आबेलाचा मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणाने ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शएमेशकर यांच्या शेतात आहे.
\s5
\v 19 मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आंत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांना फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
\v 20 तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हांपासून वरती कोणाकडे जावे?
\s5
\v 21 मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, पलिष्यांनी यहोवाचा कोश माघारा आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणांकडे वरती न्या.
\s5
\c 7
\p
\v 1 मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी यहोवाचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला यहोवाचा कोश राखायला पवित्र केले.
\v 2 कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.
\s5
\v 3 शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला जर तुम्ही आपल्या सर्व ह्रदयाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि एष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली ह्रदये परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हांस पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.
\v 4 मग इस्राएली लोकांनी बाल व अष्टरोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले.
\s5
\v 5 आणि शमुवेल म्हणाला, सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हांसाठी परमेश्वराला विनंती करीन.
\v 6 मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे. तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.
\s5
\v 7 आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
\v 8 नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, परमेश्वर आमचा देवयाकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.
\s5
\v 9 मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वराला केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्याला उत्तर दिले.
\s5
\v 10 आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यांस घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.
\v 11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली.
\s5
\v 12 मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्याला एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.
\s5
\v 13 असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता.
\v 14 आणि एक्रोनापासून गथापर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.
\s5
\v 15 शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला.
\v 16 तो प्रत्येक वर्षी बेथलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी.
\v 17 आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वराला अर्पणे अर्पायला वेदी बांधली.
\s5
\c 8
\p
\v 1 जेव्हा शमुवेल म्हातारा झाला तेव्हां त्याने आपले मुलगे इस्राएलावर न्यायाधीश नेमले.
\v 2 त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बेरशेबा येथे ते न्यायाधीश होते.
\v 3 परंतु त्याचे मुलगे त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठामागे लागले होते. ते लांच घेऊन विपरीत न्याय करीत असत.
\s5
\v 4 मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.
\v 5 आणि ते त्याला म्हणाले पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे मुलगे तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आतां सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.
\s5
\v 6 परंतु, आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली.
\v 7 तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.
\s5
\v 8 मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.
\v 9 तर आता त्यांचे ऐक; तथापि तूं त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.
\s5
\v 10 मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, यहोवाची सर्व वचने सांगितली.
\v 11 तो त्यांना म्हणाला, जो राजा तुम्हांवर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे मुलगे घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.
\v 12 तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.
\s5
\v 13 तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
\v 14 तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतुनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल.
\v 15 तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल.
\s5
\v 16 तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.
\v 17 तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.
\v 18 त्यानंतर तुम्ही आपणांसाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल; परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हांस उत्तर देणार नाही.
\s5
\v 19 पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच
\v 20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हांपुढे चालून आमच्या लढाया लढेल.
\s5
\v 21 शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून देवाला ऐकवले;
\v 22 मग तेव्हा परमेश्वर शमुवेलाशी बोलला, तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव. तेव्हा शमुवेल इस्राएलाच्या मनुष्यांना म्हणाला, तुम्ही प्रत्येकजण आपापल्या नगरास परत जा.
\s5
\c 9
\p
\v 1 बन्यामिनांतील एक माणूस होता त्याचे नांव कीश; तो अबीयएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी माणूस मोठा पराक्रमी होता.
\v 2 आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
\s5
\v 3 आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, आता तूं ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.
\v 4 मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला, परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले, परंतु येथे ती त्यांना सापडली नाहीत. नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत.
\s5
\v 5 ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला, चला आपण माघारे जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमचीच काळजी करायला लागेल.
\v 6 तेव्हा तो चाकर त्याला म्हणाला, आता पाहा या नगरात देवाचा माणूस आहे. तो माणूस खूपच सन्मान्य आहे; जे तो सांगतो ते सर्व पूर्ण होतेच. तर आता आपण तेथे जाऊ; म्हणजे आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे हे कदाचित तो आपल्याला सांगेल.
\s5
\v 7 मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, पण पाहा आपण जर जाऊ तर त्या माणसाला आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि देवाच्या माणसाला भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?
\v 8 तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी देवाच्या माणसाला देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हाला सांगेल.
\s5
\v 9 (पूर्वी इस्राएलांत कोणी देवाजवळ विचारायला जात असताना असे म्हणत, चला आपण द्रष्ट्याकडे जाऊ. कारण ज्याला आता भविष्यवादी म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा असे म्हणत.)
\v 10 मग शौल चाकराला म्हणाला, तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ. तेव्हा ज्या नगरात देवाचा माणूस होता तेथे ते गेले.
\v 11 ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हां मुली पाणी भरायला बाहेर जाताना त्यांना भेटल्या. ते त्यांना म्हणाले, द्रष्टा(पाहणारा) येथे आहे काय?
\s5
\v 12 त्यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, तो आहे; पाहा तुमच्या पुढेच तो निघाला आहे. लवकर जा. तो नगरात आला आहे कारण आज लोकांना उंचस्थानी यज्ञ करायचा आहे.
\v 13 तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञ ला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.
\s5
\v 14 मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात, तो त्यांनी पाहीले की, शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे येत आहे.
\s5
\v 15 शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर, परमेश्वराने शमुवेलाला प्रकट केले होते की:
\v 16 उद्या सुमारे या वेळेस बन्यामिनी प्रांतातून एक माणूस मी तुझ्याकडे पाठवीन, आणि माझे लोक इस्राएल यांचा राजा होण्यास त्याला तूं अभिषेक कर. तो पलिष्ट्यांच्या हातून माझ्या लोकांना सोडवील. कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे.
\s5
\v 17 शमुवेलाने शौलाला पाहिले, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, पाहा ज्या माणसाविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे! हा माझ्या लोकांवर राज्य करील.
\v 18 मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, मी तुम्हांला विनंती करतो द्रष्याचे(पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.
\v 19 तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले, द्रष्टा(पाहणारा) मीच आहे. माझ्या पुढे उंचस्थानी वर चला, म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल. तुझ्या ह्रदयात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊ देईन.
\s5
\v 20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती त्यांची तूं काळजी करू नको, कारण ती सांपडली आहेत. आणि इस्राएलाच्या सर्व अभिलाषा कोणाकडे आहेत? तुझ्याकडे व तुझ्या बापाच्या सर्व घराण्याकडे की नाही?
\v 21 तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, मी बन्यामिनी, इस्राएलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय? आणि बन्यामिनाच्या वंशामध्ये सर्व घराण्यांपेक्षां माझे घराणे लहान आहे की नाही? तर तुम्ही माझ्याशी असे कसे बोलतोस?
\s5
\v 22 मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते.
\s5
\v 23 तेव्हा शमुवेल स्वयंपाक्याला म्हणाला, जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.
\v 24 तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुलेल म्हणाला, पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांना बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.
\s5
\v 25 ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले.
\v 26 ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की, शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हा शौल ऊठला, मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.
\s5
\v 27 ते खाली नगराच्या शेवटास जात असता, शमुवेल शौलाला म्हणाला, चाकराला आपल्या पुढे चालायला सांग, परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू येथे थोडा थांब. आणि चाकर पुढे गेला.
\s5
\c 10
\p
\v 1 तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
\v 2 आज तूं माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तूं गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?
\s5
\v 3 मग तेथून तूं पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हां तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षारसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.
\v 4 आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातांतून घेशील.
\s5
\v 5 त्यानंतर देवाच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तूं तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार व झांज व बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील.
\v 6 देवाचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा माणूस होशील.
\s5
\v 7 आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
\v 8 तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.
\s5
\v 9 आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्याला दुसरे ह्रदय दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्याला प्राप्त झाली.
\v 10 जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्याला भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.
\s5
\v 11 तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवाद्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवाद्यांपैकी एक आहे काय?
\v 12 तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, त्यांचा बाप कोण आहे? यावरून, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?
\v 13 भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.
\s5
\v 14 नंतर, शौलाचा काका त्याला व त्याच्या चाकराला म्हणाला, तुम्ही कोठे गेला होता? तो बोलला, आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.
\v 15 मग शौलाचा काका म्हणाला, मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हांशी काय बोलला ते मला सांग.
\v 16 तेव्हा शौल आपल्या म्हणाला काकाला म्हणाला, गाढवे सापडली असे त्याने आम्हाला उघड सांगितले. परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्याला सांगितली नाही.
\s5
\v 17 मग शमुवेलाने लोकांना मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले.
\v 18 तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्याच्या हातातून व तुम्हांस पिडणारी जी राज्ये त्या सर्वाच्या हातातून तुम्हांस सोडवले.
\v 19 परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हांस सोडवतो त्याला तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्याला म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.
\s5
\v 20 शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला.
\v 21 मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.
\s5
\v 22 मग त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले की, तो माणूस इकडे फिरून येईल काय? तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, पाहा तो सामानामध्ये लपला आहे.
\v 23 मग त्यांनी धांवत जाऊन त्याला तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.
\s5
\v 24 तेव्हा शमुवेल सर्व लोकांना म्हणाला, ज्याला परमेश्वराने निवडले त्याला तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकांत कोणी नाही! सर्व लोक ओरडून म्हणाले, राजा दिर्घ आयुष्यी होवो!
\s5
\v 25 तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांना सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांना आपापल्या घरी पाठवून दिले.
\s5
\v 26 शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या ह्रदयाला परमेश्वराने स्पर्श केला, अशा काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली.
\v 27 परंतु काही नालायक माणसे होती ती म्हणाली, हा माणूस आम्हाला कसा काय सोडवील? त्यांनी त्याचा अनादर केला व त्याला काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.
\s5
\c 11
\p
\v 1 मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व माणसांनी नाहाशाला म्हटले, आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
\v 2 तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, मी तुम्हांशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हांतील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.
\s5
\v 3 तेव्हां याबेशच्या वडिल जनांनी त्याला म्हटले, आम्हांला सात दिवसांचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हाला सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.
\s5
\v 4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे य़ेऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हां सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
\v 5 आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला लोकांना काय झाले म्हणून ते रडत आहेत? तेव्हां त्यांनी त्याला याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
\s5
\v 6 तेव्हां शौलाने ह्या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
\v 7 मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, जो कोणी शौलाच्यामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल. तेव्हां परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
\v 8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
\s5
\v 9 तेव्हां जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, याबेश-गिलादाच्या माणसांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हां तुमची सुटका होईल. मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हां ते आनंदित झाले.
\v 10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, उद्यां आम्ही बाहेर तुम्हांकडे येऊ तेव्हा तुम्हांला बरे दिसेल तसे आमचे करा.
\s5
\v 11 मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापेपर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यांतले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
\s5
\v 12 मग लोक शमुवेलाला म्हणाले, शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.
\v 13 तेव्हा शौल बोलला, आज कोणाही माणसाला जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.
\s5
\v 14 तेव्हां शमुवेलाने लोकांस म्हटले चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.
\v 15 मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हां तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.
\s5
\c 12
\p
\v 1 शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हांवर एक राजा नेमला आहे.
\v 2 तर आता पाहा, राजा तुम्हांपुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे मुलगे तुम्हांजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हांपुढे चाललो आहे.
\s5
\v 3 मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरुद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.
\s5
\v 4 ते म्हणाले, तुम्ही आम्हाला फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.
\v 5 मग तो त्यांना म्हणाला, माझ्या हाती तुम्हांस काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे. ते म्हणाले, परमेश्वर साक्षी आहे.
\s5
\v 6 शमुवेल लोकांना म्हणाला, ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.
\v 7 तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हांसाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो.
\s5
\v 8 याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.
\v 9 पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापति सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.
\s5
\v 10 तेव्हां ते परमेश्वराला हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वराला सोडून बाल आणि अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
\v 11 मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हांला तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
\s5
\v 12 परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हांवर आला असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा होता तरी, तुम्ही मला म्हणालात की, असे नको तर आम्हावर राजा राज्य करो.
\v 13 तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हांवर राजा नेमला आहे.
\s5
\v 14 जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हांवर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.
\v 15 परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरुद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरुद्ध होता, तसा तो तुमच्याविरुद्ध होईल.
\s5
\v 16 तर आता तुम्ही स्वताःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
\v 17 आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वराला मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.
\v 18 तेव्हां शमुवेलाने परमेश्वराला हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांना परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
\s5
\v 19 तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी ह्या दुष्कर्माची भर टाकली आहे.
\v 20 मग शमुवेल लोकांना म्हणाला, भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण ह्रदयाने परमेश्वराची सेवा करा.
\v 21 तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
\s5
\v 22 कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांना नाकारणार नाही, कारण तुम्हांला आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वराला आनंददायी वाटले.
\v 23 मी तुम्हांसाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्वराच्या विरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच राहो. चांगला व सरळ मार्ग मी तुम्हांस शिकवीन.
\s5
\v 24 केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण ह्रदयाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हांसाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
\v 25 परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.
\s5
\c 13
\p
\v 1 शौल राज्य करू लागला तेव्हा तो (चाळीस?/ तीस?) वर्षाचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
\v 2 त्याने इस्राएलांतून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यांतले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथोनाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांना त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
\s5
\v 3 गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, इब्र्यांना ऐकू द्या.
\v 4 शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
\s5
\v 5 मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
\s5
\v 6 आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हां लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
\v 7 कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
\s5
\v 8 शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक त्याच्यापासून विखरून जाऊ लागले.
\v 9 तेव्हां शौलाने म्हटले, होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा. मग त्याने होमार्पण अर्पिले.
\v 10 त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ति केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्याला भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
\s5
\v 11 तेव्हा शमुवेल म्हणाला, तू हे काय केले आहे? शौलाने म्हटले, कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
\v 12 म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरुद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत:च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.
\s5
\v 13 नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
\v 14 परंतु आतां तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्याला आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तूं पाळले नाही.
\s5
\v 15 मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
\v 16 शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
\s5
\v 17 पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी एफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
\v 18 आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
\s5
\v 19 तेव्हां इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणांसाठी तरवारी किंवा भाले करून घेतील.
\v 20 परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
\v 21 नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एक तृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
\s5
\v 22 आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यांतल्या कोणाच्याही हाती तरवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
\v 23 पलिष्ट्याचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.
\s5
\c 14
\p
\v 1 एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, चल आपण पलिष्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ. परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.
\s5
\v 2 शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते;
\v 3 एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा इखाबोद याचा भाऊ एहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला यहोवाचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांना माहित नव्हते.
\s5
\v 4 योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्याच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यांतल्या एकांचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते.
\v 5 एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते.
\s5
\v 6 योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, चल, आपण त्या बेसुनत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वराला काही अडचण नाही.
\v 7 त्याचा शस्त्रवाहक त्याला म्हणाला, जे तुझ्या ह्रदयांत आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्या तुझ्याबरोबर आहे.
\s5
\v 8 तेव्हां योनाथान म्हणाला पाहा आपण त्या माणसाकडे जाऊन त्यास प्रगट होऊ.
\v 9 जर ते आम्हास म्हणतील आम्ही तुम्हांकडे येऊ तोपर्यंत थांबा, तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहूं वर त्याच्याकडे जाणार नाही.
\v 10 परंतु जर ते म्हणतील की, वर आम्हांकडे या, तर आम्ही वर जाऊं; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.
\s5
\v 11 मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यांतून ते निघून येत आहेत.
\v 12 ठाण्याच्या माणसांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, वर आम्हांकडे या म्हणजे आम्ही तुम्हांला काही गोष्टी दाखवू. तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला माझ्यामागे वर ये, कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.
\s5
\v 13 मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.
\v 14 जो पहिला वध योनाथानाने केला त्यात एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.
\s5
\v 15 छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेहि कांपले व भूमि कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.
\s5
\v 16 तेव्हां बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.
\v 17 मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला, आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा. मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.
\s5
\v 18 शौलाने अहीयाला म्हटले देवाचा कोश इकडे आण. कारण त्या समयी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता.
\v 19 असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्याच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, आपला हात काढून घे.
\s5
\v 20 तेव्हा शौल व त्याच्याजवळते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी माणसाची तरवार आपल्या सोबत्याच्या विरुद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.
\v 21 तेव्हां जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेहि शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले.
\s5
\v 22 जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.
\v 23 असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.
\s5
\v 24 त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांना शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो माणूस कांही खाईल त्याला शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी कांही खाल्ले नाही.
\v 25 देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;
\v 26 वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.
\s5
\v 27 परंतु जेव्हा त्याच्या बापाने लोकांस शपथ घातली तेव्हां योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.
\v 28 तेव्हां लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, तुझ्या बापाने लोकांना शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज कांही अन्न् खाईल त्याला शाप लागो. लोक तर थकले होते.
\s5
\v 29 तेव्हा योनाथान म्हणाला माझ्या बापाने देशास दुखित करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?
\v 30 जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आतां पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?
\s5
\v 31 त्या दिवशी ते मिखामाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते.
\v 32 तेव्हां लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासुध्दां लोक खाऊं लागले.
\s5
\v 33 तेव्हां कोणी शौलास सांगितले की, पाहा लोक रक्तासह खाऊन परमेश्वराच्या विरुद्ध पाप करत आहेत. त्याने म्हटले, तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.
\v 34 शौलाने म्हटले, लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक माणसाने आपला बैल व प्रत्येक माणसाने आपली मेढरें माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तसह खाऊन परमेश्वराच्याविरुद्ध पाप करू नका. तेव्हां सर्व लोकांनी प्रत्येक माणसाने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.
\s5
\v 35 मग शौलाने यहोवाला अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वराला अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.
\s5
\v 36 मग शौल बोलला आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्याच्यांतील एकही माणूस उरू देऊ नये. ते म्हणाले जे तुला बरे वाटेल ते कर. मग याजकाने म्हटले आपण येथे देवाजवळ येऊ.
\v 37 मग शौलाने विचारले की, मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय? परंतु त्या दिवशीं त्याने कांही उत्तर दिले नाही.
\s5
\v 38 मग शौल म्हणाला अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा.
\v 39 कारण परमेश्वर जो इस्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे. म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले, तरी तो खचित मरेल. पण सर्व लोकांतील कोणीही त्याला उत्तर दिले नाही.
\s5
\v 40 मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ. लोक तर शौलाला म्हणाले तुला बरे वाटेल ते कर.
\v 41 मग शौल यहोवा इस्राएलाचा देव त्याला म्हणाला, खरे ते दाखीव. तेव्हां योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.
\v 42 मग शौलाने म्हटले माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्या टाका. तेव्हा योनाथान धरला गेला.
\s5
\v 43 मग शौल योनाथानाला म्हणाला, तूं काय केले आहे ते सांग. योनाथान त्याला म्हणाला, मी आपल्या हातांतल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मेले पाहिजे.
\v 44 तेव्हा शौल म्हणाला परमेश्वर तसे व त्यापेक्षां अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मेले पाहिजे.
\s5
\v 45 मग लोक शौलाला म्हणाले ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने देवाच्यासंगती काम केले आहे. या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.
\v 46 मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले.
\s5
\v 47 शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.
\v 48 त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातांतून सोडवले.
\s5
\v 49 योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे मुलगे होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.
\v 50 शौलाच्या बायकोचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापति होता.
\v 51 शौलाचा बाप कीश व अबनेराचा बाप हे अबियेलाचे मुलगे होते.
\s5
\v 52 शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हां तो त्याला आपल्याजवळ ठेवून घेई.
\s5
\c 15
\p
\v 1 शमुवेल शौलाला म्हणाला परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
\v 2 सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्याला काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुद्ध कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
\v 3 आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रीया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.
\s5
\v 4 मग शौलाने लोकांना बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
\v 5 मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
\s5
\v 6 तेव्हा शौलाने केनी यांना म्हटले, अमालेक्याबरोबर तुम्हांस मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा. तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
\v 7 मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
\s5
\v 8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तरवारीच्या धारेखाली जिवे मारले.
\v 9 तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे काही चांगले ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
\s5
\v 10 तेव्हा देवाचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
\v 11 मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र देवाचा धावा केला.
\s5
\v 12 शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेच उठला. तेव्हा कोणी शमुलेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
\v 13 मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्याला म्हणाला, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.
\s5
\v 14 तेव्हा शमुवेल म्हणाला तर मेढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?
\v 15 मग शौल म्हणाला लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.
\v 16 तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, तू थांब, म्हणजे ह्या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले ते मी तुला ऐकवतो. शौल त्याला म्हणाला, बोला!
\s5
\v 17 मग शमुवेल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले;
\v 18 परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्याच्यांशी लढाई कर.
\v 19 तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
\s5
\v 20 तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यात मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
\v 21 परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.
\s5
\v 22 शमुवेल म्हणाला, परमेश्वराला आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या मांदया पेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
\v 23 कारण बंडखोरी जादुगिरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.
\s5
\v 24 मग शौल शमुवेलाला म्हणाला, मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
\v 25 तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी देवाचे भजनपूजन करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.
\s5
\v 26 शमुवेल शौलाला म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यपासून धिक्कारले आहे.
\v 27 शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
\s5
\v 28 तेव्हा शमुवेलाने तुला म्हटले, परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्याला दिले आहे.
\v 29 तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.
\s5
\v 30 तेव्हा शोल म्हणाला, मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि यहोवा तुझा परमेश्वर याचे भजनपूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.
\v 31 मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने देवाचे भजनपूजन केले.
\s5
\v 32 मग शमुवेल म्हणाला, अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा. तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
\v 33 तेव्हा शमुवेल म्हणाला, जसे तुझ्या तरवारीने स्त्रीयांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल. मग शमुवेलाने गिलगालात यहोवाच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
\s5
\v 34 त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
\v 35 शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
\s5
\c 16
\p
\v 1 मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. ईशाय बेथलेहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.
\s5
\v 2 तेव्हा शमुवेल म्हणाला, मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील. मग परमेश्वर म्हणाला, एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.
\v 3 त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्याला माझ्यासाठी अभिषेक कर.
\s5
\v 4 तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीतभीत त्याला भेटायास आले व त्यांना त्याला विचारले, तुम्ही शांतीनेच आला आहात ना?
\v 5 त्याने म्हटले, शांतीने; मी परमेश्वराला यज्ञ आर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्धा व्हा. त्याने ईशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.
\s5
\v 6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.
\v 7 परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्याला नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरुप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.
\s5
\v 8 मग ईशायाने आबीनादाबाला बोलाविले आणि त्याला शामुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही.
\v 9 मग ईशायने शाम्मास पुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले. ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.
\v 10 असे ईशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेला पुढे चालविले. परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.
\s5
\v 11 तेव्हा शमुवेलाने ईशायला म्हटले, तुझे सर्व पुत्र आले आहेत का? मग तो म्हणाला, आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेढंरे राखीत आहे. तेव्हा शमुवेलाने त्याला म्हटले. त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.
\v 12 मग त्याने त्याला बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.
\s5
\v 13 मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्याला अभिषेक केला. त्या दिवसापासून देवाचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
\s5
\v 14 मग देवाच्या आत्म्याने शौलास सोडिले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्याला त्रास करू लागला.
\v 15 तेव्हा शौलाचे चाकर त्याला म्हणाले, आता पहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास देतो आहे.
\v 16 आपण विणा वाजविणारा निपुण असा एक माणूस शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा दुष्ट आत्मा तुम्हाला त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुमाहाला बरे वाटेल.
\s5
\v 17 मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, जा, चांगला वाजविणारा माणूस शोधून माझ्याकडे आणा.
\v 18 मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ माणूस व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो ईशाय बेथेलहेमी ह्याचा पुत्र आहे.
\v 19 मग शौलाने ईशायजवळ दूत पाठवून म्हटले की, तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्याला मजपाशी पाठवावे.
\s5
\v 20 तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
\v 21 दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.
\s5
\v 22 मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे.
\v 23 मग जेव्हाकेव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्याला सोडून जाई.
\s5
\c 17
\p
\v 1 तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहुदियातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफेस-दम्मीनात आपली छावणी दिली.
\s5
\v 2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली.
\v 3 तेव्हा पलिष्टी एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते.
\s5
\v 4 गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती.
\v 5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खावलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते.
\s5
\v 6 त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती.
\v 7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता.
\s5
\v 8 तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक माणूस निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो.
\v 9 जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्याला जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.
\s5
\v 10 आणखी तो पलिष्टी म्हणाला मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक माणूस द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.
\v 11 जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले.
\s5
\v 12 त्या समयी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी ईशाय नामे माणसाचा पुत्र होता; त्या माणसाला तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता.
\v 13 ईशायचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलियाब व दुसऱ्याचे अबिनादाब व तिसऱ्याचे शम्मा.
\s5
\v 14 दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील मुलगे शौलामागे गेले होते.
\v 15 दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेढंरे राखावयास जात येत असे.
\v 16 तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.
\s5
\v 17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा.
\v 18 हे पनेरीचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण.
\s5
\v 19 तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.
\v 20 दावीद पहाटेस उठला आणि एका राखनाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला.
\v 21 इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या.
\s5
\v 22 तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला.
\v 23 तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले.
\v 24 सर्व इस्राएलांचे पुरूष त्या माणसाला पाहून पळाले आणि फार भ्याले.
\s5
\v 25 मग इस्राएलाची माणसे म्हणाली हा जो मनुष्य पुढे आला आहे त्याला तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्याला राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्याला देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.
\s5
\v 26 तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहीलेल्या लोकांस म्हटले जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्याला काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ मानावे?
\v 27 मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो माणूस त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल.
\s5
\v 28 त्याचा भाऊ अलियाब याने त्याला या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलियाब दावीदावर रागवून म्हणाला, तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
\v 29 तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?
\v 30 मग तो त्याच्याजवळून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्याला पूर्वी प्रमाणे उत्तर दिले.
\s5
\v 31 जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्याला बोलाविले.
\v 32 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, त्या माणसामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.
\v 33 तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तिमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरूणपणापासून लढाईचा माणूस आहे.
\s5
\v 34 मग दावीद शौलाला म्हणाला, तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेढंरू कळपातून नेले.
\v 35 मग मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि मेढंरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला ठार मारले.
\s5
\v 36 तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत देवाच्या सैन्याची निंदा केली आहे.
\s5
\v 37 आणखी दावीदाने म्हटले, ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील. मग शौलाने म्हटले, जा परमेश्वर तुझ्या संगती असो.
\v 38 तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले.
\s5
\v 39 दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, याच्याने मला चालवत नाही. कारण त्याला त्याची सवय नव्हती. मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊेन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली.
\v 40 त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
\s5
\v 41 तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला.
\v 42 त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्याला तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता.
\v 43 तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास? त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या देवाच्या नावाने शाप दिला.
\s5
\v 44 त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पांखरांला आणि रानातील वनपशूंना देतो.
\v 45 दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, तू तरवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्रायएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे.
\s5
\v 46 परमेश्वर ह्या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे.
\v 47 हा सर्व समुदाय जाणेल की, तरवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हांस आमच्या हाती देईल.
\s5
\v 48 मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला.
\v 49 दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला.
\s5
\v 50 असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्याला मारिले. परंतु दावीदाच्या हाती तरवार नव्हती.
\v 51 तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तरवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्याला ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले.
\s5
\v 52 तेव्हा इस्राएल व यहुदीयांच्या माणसांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले.
\v 53 मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.
\v 54 दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन येरुशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली.
\s5
\v 55 शौलाने दावीदाला त्या पालिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे? मग अबनेराने म्हटले, हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.
\v 56 तेव्हा राजाने म्हटले, तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?
\s5
\v 57 त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्याला घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते.
\v 58 तेव्हा शौलाने त्याला म्हटले, हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस? मग दावीदाने म्हटले, तुमचा दास ईशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.
\s5
\c 18
\p
\v 1 तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.
\v 2 त्या दिवशी शौलाने त्याला ठेवून घेतले आणि त्याला त्याच्या बापाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.
\s5
\v 3 मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
\v 4 योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तरवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्याला दिला.
\s5
\v 5 तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्याला लढाईच्या माणसांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.
\s5
\v 6 मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा बायका इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवतीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.
\v 7 त्या बायका नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.
\s5
\v 8 तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्याला वाईट वाटून त्याने म्हटले, त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्याला आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?
\v 9 त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला.
\s5
\v 10 मग दुसऱ्या दिवशी असे झाले देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बरळत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता.
\v 11 तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन. परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
\v 12 मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
\s5
\v 13 शौलाने त्याला आपल्यापासून दूर करून त्याला आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
\v 14 दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
\s5
\v 15 जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्याला त्याचा धाक बसला.
\v 16 परंतु सर्व इस्राएली आणि यहुदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
\s5
\v 17 मग शौलाने दावीदाले म्हटले, पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला बायको करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर. कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.
\v 18 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?
\s5
\v 19 परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीयेल अमोलाथी याला बायको करून देण्यात आली.
\s5
\v 20 तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करित असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्याला बरे वाटले.
\v 21 तेव्हा शौलाने म्हटले, मी ती त्याला देईन आणि ती त्याला पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला दुसऱ्यांदा म्हटले की, तू माझा जावई होशील.
\s5
\v 22 शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.
\s5
\v 23 शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय? मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.
\v 24 मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्याला सांगितले.
\s5
\v 25 तेव्हा शौलाने म्हटले, तुम्ही दावीदाले असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही. परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते.
\v 26 मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.
\s5
\v 27 नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या माणसांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्याला बायको करून दिली.
\v 28 मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या संगती आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.
\v 29 तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.
\s5
\v 30 नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.
\s5
\c 19
\p
\v 1 यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती.
\v 2 योनाथानाने दावीदाला म्हटले की, माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.
\v 3 मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.
\s5
\v 4 तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावादावीषयी बरे बोलला आणि तो त्याला म्हणाला की, राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत.
\v 5 त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारतांना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?
\s5
\v 6 तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहीली, देवाची शपथ मी त्याला मारणार नाही.
\v 7 मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला.
\s5
\v 8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले.
\v 9 मग देवापासून दुष्ट आत्मा शौलालावर आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता.
\s5
\v 10 तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला.
\v 11 मग दावीदावर टपून सकाळी त्याला जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची बायको हे वर्तमान त्याला सांगून असे बोलली की, जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.
\s5
\v 12 तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले.
\v 13 मग मिखलने एक मुर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.
\s5
\v 14 जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, तो दु:खनाईत आहे.
\v 15 मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, मी त्याला जीवे मारावे म्हणून त्याला पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.
\s5
\v 16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मुर्ती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.
\v 17 तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्याला का पाठवून दिले? मग मीखल शौलाला म्हणाली, त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तूला का मारावे?
\s5
\v 18 याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.
\v 19 मग शौलाला कोणी असे सागितले की, पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे.
\v 20 तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करित असता आणि शमुवेल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले.
\s5
\v 21 मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.
\v 22 तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, शमुवेल व दावीद कोठे आहेत? मग कोणी एकाने म्हटले, पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.
\s5
\v 23 तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्याच्यावरही आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.
\v 24 मग त्यानेही आपली अंगवस्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवाद्यां पैकी आहे की काय?
\s5
\c 20
\p
\v 1 दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या बापाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?
\v 2 तेव्हा त्याने त्याला म्हटले असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.
\s5
\v 3 मग दावीद शपथ वाहून म्हणाला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्याला दुःख होईल; परंतु खरोखर यहोवा जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.
\s5
\v 4 तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला जे कांही तुझा जीव इच्छितो ते मी तुझ्यासाठी करीन.
\v 5 दावीद योनाथानाला म्हणाला, पाहा उद्या अमावस्या आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.
\s5
\v 6 जर तुझ्या बापाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.
\v 7 जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासाला शांती प्राप्त होईल. परंतु जर त्याला राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.
\s5
\v 8 यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासाला आपल्याबरोबर देवाच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?
\v 9 तेव्हा योनाथान म्हणाला, तुला असे न होवो माझ्या बापाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?
\s5
\v 10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, जर कदाचित तुझ्या बापाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?
\v 11 योनाथान दावीदाला म्हणाला चल आपण रानात जाऊ. मग ते दोघे बाहेर रानात गेले.
\s5
\v 12 योनाथान दावीदाला म्हणाला, यहोवा इस्राएलाचा देव साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदावीषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय?
\v 13 जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर यहोवा परमेश्वर योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. यहोवा परमेश्वर जसा माझ्या बापा संगती होता तसा तो तुझ्या संगती असो.
\s5
\v 14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू देवाची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही,
\v 15 तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;
\v 16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.
\s5
\v 17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीति केली.
\v 18 योनाथान त्याला म्हणाला, उद्या अमावस्या आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील.
\v 19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा.
\s5
\v 20 मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन.
\v 21 मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे.
\s5
\v 22 परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे.
\v 23 आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा यहोवा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.
\s5
\v 24 मग दावीद रानात लपून राहिला आणि अमावस्या आली तेव्हा राजा जेवायला बसला.
\v 25 राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.
\s5
\v 26 तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्याला असे वाटले, त्याला काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.
\v 27 मग अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.
\s5
\v 28 तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
\v 29 तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.
\s5
\v 30 तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्याला म्हणाला, अरे विपरीत फितूर खोर बायकोच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?
\v 31 कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्याला माझ्याकडे आण, कारण त्याला खचित मेले पाहिजे.
\s5
\v 32 मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, त्याने कशासाठी मारावे? त्याने काय केले आहे?
\v 33 तेव्हा शौलाने त्याला मारायला भाला फेकला यावरून योनाथानाला कळले की, आपल्या बापाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.
\v 34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदावीषयी त्याला वाईट वाटले कारण त्याच्या बापाने त्याचा अपमान केला.
\s5
\v 35 मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला.
\v 36 तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला.
\v 37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?
\s5
\v 38 योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, धाव लवकर पळ थांबू नको.
\v 39 मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.
\v 40 योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्याला म्हटले, चल ही उचलून घेऊन नगरात जा.
\s5
\v 41 पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.
\v 42 योनाथान दावीदाला म्हणाला, शांतीने जा; कारण आपण दोघांनी देवाच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.
\s5
\c 21
\p
\v 1 दावीद नोब येथे अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्याला म्हणाला तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?
\v 2 तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.
\s5
\v 3 तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.
\v 4 तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.
\s5
\v 5 दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रीया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.
\v 6 मग याजकाने त्याला पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर देवाच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.
\s5
\v 7 त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक माणूस तेथे देवाच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.
\s5
\v 8 दावीद अहीमलेखाला म्हणाला, येथे तुझ्याजवळ भाला किंवा तरवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तरवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.
\v 9 तेव्हा याजक म्हणाला, गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तरवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही. दावीद म्हणाला तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.
\s5
\v 10 त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
\v 11 तेव्हा अखीशाचे दास त्याला म्हणाले, हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?
\s5
\v 12 दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
\v 13 मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
\s5
\v 14 तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, पाहा हा वेडा आहे हे तुम्हांला दिसते तर कशासाठी तुम्ही त्याला माझ्याकडे आणले काय?
\v 15 माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?
\s5
\c 22
\p
\v 1 मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.
\v 2 कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.
\s5
\v 3 दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-बापांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.
\v 4 मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
\v 5 मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा. तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.
\s5
\v 6 दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते.
\s5
\v 7 तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हां प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय?
\v 8 म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हांतला कोणी माझ्यासाठी दुखि:त होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.
\s5
\v 9 मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले;
\v 10 त्याने त्याच्यासाठी देवाला विचारले व त्याला अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तरवार त्याला दिली.
\s5
\v 11 तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या बापाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलावायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.
\v 12 तेव्हा शौलाने म्हटले, अहीटूबाच्या मुला आता ऐक. तो म्हणाला माझ्या प्रभू मी येथे आहे.
\v 13 शौल त्याला म्हणाला, तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्याला भाकर व तरवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?
\s5
\v 14 तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.
\v 15 आजच मी त्याच्यासाठी देवाला विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासाला किंवा माझ्या बापाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासाला ठाऊक नाही.
\s5
\v 16 राजा म्हणाला, अहीमालेखा तुला खचित मेले पाहिजे; तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वाना मेले पाहिजे;
\v 17 मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला यहोवाच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही. परंतु राजाचे चाकर देवाच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.
\s5
\v 18 मग राजाने दवेगाला म्हटले तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला. त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.
\v 19 त्याने याजकांचे नोब नगर याचा तरवारीच्या धारेने नाश केला; पुरुष बायका बाळके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तरवारीच्या धारेने जिवे मारली.
\s5
\v 20 तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला.
\v 21 शौलाने देवाच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले.
\s5
\v 22 तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या बापाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.
\v 23 माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.
\s5
\c 23
\p
\v 1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटताहेत.
\v 2 म्हणून दावीदाने देवाला विचारले, तो म्हणाला, मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय? मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
\s5
\v 3 तेव्हा दावीदाच्या माणसांनी म्हटले, पाहा आम्हाला येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते किरीतरी अधिक धोकादायक होईल!
\v 4 मग दावीदाने आणखी देवाला विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.
\s5
\v 5 मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.
\v 6 त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.
\s5
\v 7 दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.
\v 8 मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या माणसांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांना लढाईला बोलावले.
\v 9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला एफोद इकडे आण.
\s5
\v 10 मग दावीद म्हणाला, हे यहोवा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;
\v 11 तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे यहोवा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग. परमेश्वर बोलला तो खाली येईल.
\s5
\v 12 मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या माणसांना शौलाच्या हाती देतील काय? यहोवा बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
\s5
\v 13 मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.
\v 14 आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्याला त्याच्या हाती दिले नाही.
\s5
\v 15 आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;
\v 16 शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात देवाच्याठायी सबळ केला.
\s5
\v 17 तो त्याला म्हणाला, भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.
\v 18 तेव्हा त्या दोघांनी देवाच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
\s5
\v 19 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
\v 20 तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्याला राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.
\s5
\v 21 तेव्हा शौल म्हणाला, तुम्हाला देवापासून आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे.
\v 22 मी तुम्हांला विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्याला कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.
\v 23 तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हांबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्याला यहूदाच्या सर्व हजारांतून त्याला हुडकून काढीन.
\s5
\v 24 मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती.
\v 25 शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.
\s5
\v 26 शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या माणसांना धरायला घेरीत होती.
\v 27 परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे.
\s5
\v 28 तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.
\v 29 मग दावीद तेथून वर जाऊन एन गेदीच्यागडामध्ये राहिला.
\s5
\c 24
\p
\v 1 असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्याला कोणी सांगितले की, दावीद एन गेदीच्या रानात आहे.
\v 2 तेव्हा शौल सर्व इस्राएलांतून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
\s5
\v 3 आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौंचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
\v 4 तेव्हा दावीदाच्या माणसांनी त्याला म्हटले, परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुजा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा. मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
\s5
\v 5 त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्याला टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
\v 6 आणि त्याने आपल्या माणसांस म्हटले, मी आपल्या धन्यावर देवाच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
\v 7 असे बोलून दावीदाने आपल्या माणसांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
\s5
\v 8 नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला हे माझ्या प्रभू, राजा. तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
\v 9 मग दावीदाने शौलाला म्हटले, पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
\s5
\v 10 पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हला जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हाला सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
\v 11 आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्य वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हाला जिवे मारले नाही. यावरून माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुद्ध पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
\s5
\v 12 माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
\v 13 दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
\s5
\v 14 कोणाच्यामागे इस्राएलाचा राजा लागला आहे? तुम्ही कोणाच्या पाठीस लागता? मेलेल्या कुत्र्याच्या मागे काय?
\v 15 यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.
\s5
\v 16 असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय? मग शौल गळा काढून रडला
\s5
\v 17 आणि तो दावीदाला म्हणाला, माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
\v 18 तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण यहोवाने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.
\s5
\v 19 कोणा माणसाला त्याचा वैरी सापडला तर तो त्याला चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
\v 20 आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
\s5
\v 21 म्हणून आता तू माझ्याशी देवाची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या बापाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.
\v 22 तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडात चढून गेली.
\s5
\c 25
\p
\v 1 शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्याला रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.
\s5
\v 2 मावोनात एक माणूस होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो माणूस फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
\v 3 त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या बायकोचे नाव अबीगईल होते; त्याची बायको तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.
\s5
\v 4 नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.
\v 5 मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्याला सलाम करा.
\v 6 त्या सुखी जिवाला असे म्हणा, तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.
\s5
\v 7 तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.
\v 8 तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतिल; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो;
\s5
\v 9 मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.
\v 10 तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.
\v 11 माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?
\s5
\v 12 मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्याला जसेच्या तसे त्याला सांगीतले.
\v 13 तेव्हा दावीद आपल्या माणसांना म्हणाला तुम्ही आपापली तरवार कंबरेस बांधा. मग प्रत्येकाने आपआपली तरवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तरवार कंबरेस बांधली आणि दावीदाच्यामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.
\s5
\v 14 नाबालाची बायको अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.
\v 15 ती माणसे तर आम्हांशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहीलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.
\s5
\v 16 आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.
\v 17 तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.
\s5
\v 18 अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षारसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.
\v 19 तिने आपल्या चाकरांना म्हटले माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते. परंतु तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितले नाही.
\s5
\v 20 मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.
\s5
\v 21 दावीदाने म्हटले होते की, रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे.
\v 22 जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.
\s5
\v 23 अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले.
\v 24 तिने त्याच्या पाया पडून म्हटले, माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हाला विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐकी.
\s5
\v 25 मी तुम्हाला विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट माणसाला नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही.
\v 26 तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हाला आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.
\s5
\v 27 आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.
\v 28 मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू देवाच्या लढाया लढताहेत, म्हणून यहोवा परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही.
\s5
\v 29 जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.
\s5
\v 30 असे होईल की, यहोवाने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हाला इस्राएलाचा अधिपती नेमील.
\v 31 तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हाला खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि यहोवा माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.
\s5
\v 32 तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, यहोवा इस्राएलाचा परमेश्वर ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.
\v 33 तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो.
\s5
\v 34 कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो यहोवा इस्राएलाचा परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.
\v 35 मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.
\s5
\v 36 मग अबगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे ह्रदय त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्याला अधिक उणे काहीच सांगितले नाही.
\s5
\v 37 मग असे झाले की, सकाळी नाबालाचा कैफ उतरल्यावर त्याच्या बायकोने या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हा त्याचे ह्रदय त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.
\v 38 नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.
\s5
\v 39 नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे. मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली बायको करण्याविषयीची गोष्ट काढली.
\v 40 आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, दावीदाने तू त्याची बायको व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.
\s5
\v 41 तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.
\v 42 मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची बायको झाली.
\s5
\v 43 दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही बायको करून घेतले; त्या दोघीही त्याच्या बायका झाल्या.
\v 44 शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची बायको गल्लीमातील लइशाचा मुलगा पालती याला दिली होती.
\s5
\c 26
\p
\v 1 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?
\v 2 तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक माणसांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
\s5
\v 3 शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
\v 4 म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्याला समजले.
\s5
\v 5 मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
\s5
\v 6 तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल? तेव्हा अबीशय म्हणाला मी तुझ्याबरोबर खाली येईन.
\v 7 मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
\v 8 तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्याला भूमीवर ठार करून दे, मी त्याला दुसरा घाव मारणार नाही.
\s5
\v 9 पण दावीद अबीशयाला म्हणाला त्यांचा वध करू नकोस कारण यहोवाच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?
\v 10 दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्याला मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
\s5
\v 11 मी आपला हात यहोवाच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.
\v 12 तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. देवाकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
\s5
\v 13 नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
\v 14 तेव्हा दावीदाने लोकांना व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय? तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?
\s5
\v 15 मग दावीद अबनेराला म्हणाला, तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
\v 16 ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; यहोवा परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू यहोवाचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशापाशी होता तो कोठे आहे?
\s5
\v 17 तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय? दावीद म्हणाला माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.
\v 18 तो म्हणाला, माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
\s5
\v 19 तर आता मी तुम्हाला विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हाला माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती देवाच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला देवाच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
\v 20 तर आता माझे रक्त देवाच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.
\s5
\v 21 तेव्हा शौल म्हणाला, मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.
\s5
\v 22 मग दावीदाने असे उत्तर केले की, हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
\v 23 परमेश्वर प्रत्येक माणसाला त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हाला माझ्या हाती दिले असता मी आपला हात देवाच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
\s5
\v 24 पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव यहोवाच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.
\v 25 तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो; तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.
\s5
\c 27
\p
\v 1 दावीद आपल्या मनात म्हणाला कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.
\s5
\v 2 मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला.
\v 3 तेव्हा दावीद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कूटूंबासहीत गथात आखीशाजवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी बायका ईज्रेलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची बायको होती ती कर्मेलीण अबीगईल ह्या होत्या.
\v 4 आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही.
\s5
\v 5 दावीद आखीशाला म्हणाला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे राहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का राहावे?
\v 6 तेव्हा आखीशाने त्याला सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यंत यहूदाच्या राजांकडे आहे.
\v 7 दावीद पलिष्ट्ंयाच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते.
\s5
\v 8 दावीद आण त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून गेशूरी, गिरजी, आणि अमालेकी यांच्यावर स्वाऱ्या कल्या.
\v 9 दावीदाने त्या प्रांतातले पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नाही; मग मेंढरे गुरे व गाढवे उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखीशाकडे परत आला.
\s5
\v 10 तेव्हा आखीश म्हणाला आज तू कोणावर घाला घातलास? दावीद म्हणाला यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर.
\s5
\v 11 दावीदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जीवंत ठेवली नाही. त्याने म्हटले त्यांना जिंवत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की, दावीदाने असे असे केले आहे. आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच होती.
\v 12 आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटले, त्याने आपल्या इस्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्वकाळ माझा दास होऊन राहील.
\s5
\c 28
\p
\v 1 त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.
\v 2 दावीदाने आखीशाला म्हटले, तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.
\s5
\v 3 शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्याला रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांना व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
\v 4 पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
\s5
\v 5 शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे ह्रदय फार घाबरे झाले.
\v 6 शौलाने देवाला विचारले तेव्हा परमेश्वराने त्याला स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
\v 7 मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन. तेव्हा त्याच्या चाकरांनी त्याला म्हटले, पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एनदोर येथे आहे.
\s5
\v 8 मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या बाईकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले मी तुला सांगेन त्याला माझ्यासाठी वर आण.
\v 9 तेव्हा ती बाई त्याला म्हणाली, पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?
\v 10 तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, यहोवा परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काहीं शिक्षा होणार नाही.
\s5
\v 11 मग त्या बाईने म्हटले, तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू? तेव्हा तो म्हणाला, माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.
\v 12 त्या बाईने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती बाई शौलाला म्हणाली, तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.
\s5
\v 13 राजा तिला म्हणाला, भिऊ नको. तू काय पाहतेस? तेव्हा ती बाई शौलाला म्हणाली, मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.
\v 14 मग तो तिला म्हणाला तो कोणत्या रूपाचा आहे? तिने म्हटले, म्हातारा माणुस झगा घातलेला असा आहे. तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
\s5
\v 15 मग शमुवेल शौलाला म्हणाला, तू मला वर आणून का त्रास दिला आहे? तेव्हा शौलाने उत्तर केले, मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हाला बोलावले आहे.
\s5
\v 16 तेव्हा शमुवेल म्हणाला, परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?
\v 17 जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
\s5
\v 18 कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
\v 19 परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. यहोवा इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
\s5
\v 20 तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ति राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
\v 21 मग त्या बाईने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्याला म्हटले, पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
\s5
\v 22 तर आता मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही हि आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हाला शक्ती असावी.
\v 23 परंतु त्याने नाकारून म्हटले, मी खाणार नाही. मग त्याच्या चाकरांनी व त्या बाईनेही त्याला आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीनरून उठून पलंगावर बसला.
\s5
\v 24 त्या बाईच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या भाकरी भाजल्या.
\v 25 मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.
\s5
\c 29
\p
\v 1 मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली माणसांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली.
\v 2 पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली.
\s5
\v 3 तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, हे इब्री येथे काय करतात? मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.
\s5
\v 4 मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्य्ट्यांचे सरदार त्याला म्हणाले, जे ठिकाण तू या माणसाला नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्याला परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही?
\s5
\v 5 शौलाने हजाराना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?
\s5
\v 6 मग आखीशाने दावीदाला बोलावून त्याला म्हटले, यहोवा परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस.
\v 7 तर तू पलिष्याच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.
\s5
\v 8 तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आज पर्यंत तुम्हाला आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?
\v 9 तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, तू माझ्या दृष्टीने देवाच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत.
\s5
\v 10 तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहित तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.
\v 11 मग पलिष्यांच्या देशांत परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.
\s5
\c 30
\p
\v 1 असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते.
\v 2 त्यांतल्या स्त्रिया व त्यात जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले.
\s5
\v 3 तर दावीद व त्याची माणसे गावाजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या बायका आणि त्यांचे मुलगे व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.
\v 4 तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही.
\s5
\v 5 दावीदाच्या दोघी बायका अहीनवाम इज्रेलीन व पूर्वी नाबाल कर्मेली याची बायको होती ती अबीगईल ह्या धरून नेलेल्या होत्या.
\v 6 तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व माणसांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने यहोवा आपला परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले.
\s5
\v 7 मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले.
\v 8 दावीदाने देवाला विचारले, तो म्हणाला, जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय? त्याने त्याला उत्तर दिले की, पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.
\s5
\v 9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.
\v 10 तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना.
\s5
\v 11 रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्याला दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्याला भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्याला पाणी पाजले.
\v 12 मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्याला दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता.
\s5
\v 13 तेव्हा दावीद त्याला म्हणाला तू कोणाचा? कोठला आहेस? त्याने म्हटले मी मिसरी तरुण एका अमालेकी माणसाचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.
\v 14 आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.
\s5
\v 15 मग दावीद त्याला म्हणाला, तू मला या टोळीकडे खाली नेशील काय? त्याने म्हटले, तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हाला या टोळीकडे खाली नेईन.
\s5
\v 16 त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्याच्या देशातून व यहूद्याच्या देशांतून पुष्कळ लूट घेतली होती.
\v 17 दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही.
\s5
\v 18 जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी बायका सोडवल्या.
\v 19 लहान किंवा मोठा किंवा मुलगे किंवा मुली किंवा लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होतें त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले.
\v 20 अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, ही दावीदाची लूट आहे.
\s5
\v 21 मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या माणसांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले.
\v 22 तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.
\s5
\v 23 तेव्हा दावीद म्हणाला, माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हाला संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली.
\v 24 या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.
\v 25 त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली.
\s5
\v 26 दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, पाहा देवाच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांस ही भेट आहे.
\v 27 जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यतीरात होते त्यांना;
\v 28 जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना,
\s5
\v 29 जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना,
\v 30 जे हर्मात होते त्यांना, व जे कोरशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना,
\v 31 आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.
\s5
\c 31
\p
\v 1 पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल पलिष्ट्यांच्या पुढून पळून गिलबोवा डोंगरात मारून पडले.
\v 2 पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे मुलगे योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले.
\v 3 शौलावर लढाई भारी पडली व धनुर्धाऱ्यांनी त्याला गाठले. आणि धनुर्धाऱ्यांमुळे तो फार संकटात पडला.
\s5
\v 4 तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, तू आपली तरवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील. परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तरवार घेऊन तिच्यावर पडला.
\v 5 शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याच्याप्रमाणेच आपल्या तरवारीवर पडून मेला.
\v 6 असे त्या दिवशी शौल, त्याचे तिघे मुलगे, व त्याचा शस्त्रवाहक आणि त्याचे सर्व लोक एकदम मरण पावले.
\s5
\v 7 इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे मुलगे मेले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यात राहिले.
\v 8 दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे मुलगे गिलबोवा डोंगरात पडलेले सांपडले.
\s5
\v 9 तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशांत चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांना हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.
\v 10 त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथाच्या मंदिरात ठेवली आणि त्यांनी त्यांचे प्रेत बेथ-शानाच्या भिंतीस टांगले.
\s5
\v 11 पलिष्ट्यांनी शौलाला जे केले त्याविषयी जेव्हा यावेश-गिलादाच्या राहीवाशांनी ऐकले;
\v 12 तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.
\v 13 मग त्यांनी त्यांची हाडे घेऊन याबेशात चिचेंच्या झाडाखाली पुरली आणि सात दिवस उपास केला.

1082
10-2SA.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1082 @@
\id 2SA
\ide UTF-8
\h 2 शमुवेल
\toc1 2 शमुवेल
\toc2 2 शमुवेल
\toc3 2sa
\mt1 2 शमुवेल
\s5
\c 1
\p
\v 1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग येथे येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
\v 2 तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
\s5
\v 3 दावीदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
\v 4 तेव्हा दावीद त्याला म्हणाला, मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.
\v 5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “ते दोघे मरण पावले हे तुला कसे कळले?”
\s5
\v 6 यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
\v 7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
\s5
\v 8 त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले.
\v 9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.
\v 10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
\s5
\v 11 हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
\v 12 दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
\v 13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, तू कुठला? यावर तो म्हणाला, मी अमालेकी असून एका परदेशी माणसाचा मुलगा आहे.
\s5
\v 14 दावीदाने त्याला विचारले, देवाने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?
\v 15 मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
\v 16 दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.”
\s5
\v 17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
\v 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
\v 19 हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
\v 20 ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदित होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
\s5
\v 21 गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
\v 22 योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
\s5
\v 23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान् आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
\v 24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
\s5
\v 25 युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानला मरण आले.
\v 26 बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
\v 27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.
\s5
\c 2
\p
\v 1 मग दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
\v 2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका.
\v 3 दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांनाही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या गावांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.
\s5
\v 4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्याला म्हणाले, याबेश गिलादच्या लोकांनी शौलाला पुरले.
\v 5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
\s5
\v 6 देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे.
\v 7 आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”
\s5
\v 8 नेरचा मुलगा अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.
\v 9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामी आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले.
\s5
\v 10 हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करू लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता.
\v 11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदांच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.
\s5
\v 12 नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.
\v 13 सरुवेचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.
\s5
\v 14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”
\v 15 तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.
\s5
\v 16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच धारदार सुऱ्यांचे क्षेत्र असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे.
\v 17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.
\s5
\v 18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरूवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता.
\v 19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने डावीउजवीकडे वळून देखील पाहिले नाही.
\s5
\v 20 अबनेरने मागे वळून विचारले, तू असाएल ना?
\v 21 असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे. पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
\s5
\v 22 पुन्हा अबनेर त्याला म्हणाला, हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.
\v 23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले.
\s5
\v 24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.
\v 25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.
\s5
\v 26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्याला विचारले, आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांना सांग.
\v 27 तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.
\s5
\v 28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलांशी युध्दही केले नाही.
\v 29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करून महनाइमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.
\s5
\v 30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांना त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरून दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्याला आढळून आले.
\v 31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.
\v 32 दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोचली.
\s5
\c 3
\p
\v 1 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले.
\s5
\v 2 हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्मोन.
\v 3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.
\s5
\v 4 अदोनीया चौथा, हग्गीथ ही त्याची आई, शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.
\v 5 दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.
\s5
\v 6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले.
\v 7 शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?”
\s5
\v 8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, शौलाशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही, पण आता तू मला या स्त्रीच्या संदर्भात दूषण देत आहेस.
\s5
\v 9 आता मात्र मी निश्चित सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही, तर देव खुशाल माझे वाईट करो.
\v 10 शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल.
\v 11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.
\s5
\v 12 अबनेरने दूताकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशावर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशी करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
\v 13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलाची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलीस तरच मी तुला भेटीन.”
\s5
\v 14 शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदाकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.”
\v 15 तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.
\v 16 पालटीयेल हा मीखलचा पती तो तिच्यामागोमाग बहूरीमपर्यंत रडतरडत गेला. पण अबनेरने त्याला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.
\s5
\v 17 अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते.
\v 18 आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”
\s5
\v 19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.
\v 20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्व लोक यांना मेजवानी दिली.
\s5
\v 21 अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.” तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
\s5
\v 22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरून परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता.
\v 23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्याला शांत मनाने जाऊ दिले.”
\s5
\v 24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का?
\v 25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यात कावा आहे. तो येथील बातमी काढायला आला होता.”
\v 26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्याला सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती.
\s5
\v 27 हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटावर वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेराने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.
\s5
\v 28 दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत, परमेश्वर हे जाणतो.
\v 29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”
\v 30 गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.
\s5
\v 31 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त करा.
\v 32 त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्वजण यांनी विलाप केला.
\s5
\v 33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले,“ एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
\v 34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या, पाय साखळदंडांनी बांधले नव्हते. नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.” मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला.
\s5
\v 35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता.
\v 36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला.
\s5
\v 37 दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.
\v 38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, आज एक मुख्य आणि महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणत नाही काय?
\v 39 आज जरी मी आभिषिक्त राजा आहे, तरी मी अशक्त आहे. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.
\s5
\c 4
\p
\v 1 हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व लोक भयभीत झाले.
\v 2 तेव्हा दोन माणसे ईश-बोशेथला भेटायला आली. ते दोघे सेनानायक असून रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिम्मोनचे मुलगे. रिम्मोन हा बैरोथचा, बैरोथ नगर बन्यामिन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत.
\v 3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.
\s5
\v 4 शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.
\s5
\v 5 बैरोथच्या रिम्मोनची मुले. रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.
\v 6 गहू घेण्याच्या मिषाने रेखाब आणि बाना घरात घूसले त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग ते दोघेही निसटून गेले.
\v 7 ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्याला ठार मारले. त्याचे शिर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत.
\s5
\v 8 ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.”
\v 9 पण दावीद त्या दोघांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटांतून सोडवले आहे.
\v 10 यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले.
\s5
\v 11 तुम्हालाही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या माणसाला तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”
\v 12 असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.
\s5
\c 5
\p
\v 1 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्याला म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच रक्तमांसाचे आहोत.
\v 2 शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हाला म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”
\s5
\v 3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
\v 4 दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
\v 5 हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरूशलेममधून राज्य केले.
\s5
\v 6 राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.
\v 7 तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.
\s5
\v 8 दावीद त्यादिवशी आपल्या लोकांना म्हणाला, यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.
\v 9 दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.
\v 10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.
\s5
\v 11 सोरेचा राजा हीराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
\v 12 तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्याला उमगले.
\s5
\v 13 हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.
\v 14 त्याच्या या यरूशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
\v 15 इभार, अलीशवा, नेफग, याफीय,
\v 16 अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.
\s5
\v 17 दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्याला शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरूशलेम येथील किल्ल्यात आला.
\v 18 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
\s5
\v 19 दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
\v 20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला. म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.
\v 21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या माणसांनी त्या तेथून हलवल्या.
\s5
\v 22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
\v 23 दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.
\s5
\v 24 तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हाला झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
\v 25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गेबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.
\s5
\c 6
\p
\v 1 दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले.
\v 2 आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करूबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो कोश वर आणायला चालला.
\s5
\v 3 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
\v 4 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.
\v 5 तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले.
\s5
\v 6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.
\v 7 पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला.
\s5
\v 8 या घटनेमुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
\v 9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?
\s5
\v 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला.
\v 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
\s5
\v 12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र कराराचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.
\v 13 कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले.
\s5
\v 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता.
\v 15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
\s5
\v 16 शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले.
\v 17 या कराराच्या कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यात योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरा पुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
\s5
\v 18 हे झाल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वतीने आशीर्वाद दिले.
\v 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, किसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
\s5
\v 20 मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्याला गाठले आणि ती म्हणाली, इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत.
\s5
\v 21 तेव्हा दावीद तिला म्हणाला, तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार.
\v 22 मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.
\v 23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.
\s5
\c 7
\p
\v 1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.
\v 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
\s5
\v 3 नाथान राजाला म्हणाला, आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.
\v 4 पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
\v 5 दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग. परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
\s5
\v 6 मी इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
\v 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.
\s5
\v 8 शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले.
\v 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
\s5
\v 10 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
\v 11 पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले. पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
\s5
\v 12 तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.
\v 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
\v 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्याला मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.
\s5
\v 15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
\v 16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.
\v 17 नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
\s5
\v 18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
\v 19 मी केवळ तुझा सेवक आहे. तुझा माझ्यावर किती लोभ आहे! पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का?
\v 20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
\s5
\v 21 तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
\v 22 ह्यास्तव हे माझ्या प्रभो, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर एकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
\v 23 पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.
\s5
\v 24 तू निरंतर त्यांना स्वतःच्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.
\v 25 आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.
\v 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.
\s5
\v 27 सर्वशक्तीमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
\v 28 प्रभो परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
\v 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.
\s5
\c 8
\p
\v 1 यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.
\s5
\v 2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांना ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांना जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.
\s5
\v 3 रहोबचा मुलगा हदद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हदद्देजरचा पराभव केला.
\v 4 सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हदद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले.
\s5
\v 5 दिमिष्कामधील अरामी लोक हदद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामीलोकांनाही दावीदाने ठार केले.
\v 6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले.
\s5
\v 7 हदद्देजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमला आणल्या.
\v 8 हदद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हदद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
\s5
\v 9 हमाथचा राजा तोई याने हदद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.
\v 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हदद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्याला आशीर्वाद दिले. (हदद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या.
\s5
\v 11 दावीदाने त्या स्वीकारून परमेश्वराला अर्पण केल्या. या आधीच्या समार्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती.
\v 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबचा मुलगा, सोबाचा राजा हदद्देजर याचा पराभव केला.
\s5
\v 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला.
\v 14 अदोममध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमी लोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
\s5
\v 15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले.
\v 16 सरूवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
\v 17 अहीटुबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.
\v 18 यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे मुलगे महत्वाचे नेते होते.
\s5
\c 9
\p
\v 1 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.
\v 2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय? सीबा म्हणाला,” “होय, मीच तुमचा दास सीबा.”
\s5
\v 3 तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे. सीबा राजाला म्हणाला, योनाथानचा मुलगा आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.
\v 4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, तो लो-दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.
\s5
\v 5 तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली.
\v 6 योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.
\s5
\v 7 त्याला दावीद म्हणाला, भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.
\v 8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?
\s5
\v 9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.
\v 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.
\s5
\v 11 सीबा दावीदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.
\v 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले.
\v 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरूशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पक्तींस भोजन करीत असे.
\s5
\c 10
\p
\v 1 पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.
\v 2 दावीदाने विचार केला, नाहाशचा माझ्यावर लोभ होता, म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन. मग दावीदाने हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.
\v 3 पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हानून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनासाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय असे तुम्हाला वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांना पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे.
\s5
\v 4 तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.
\v 5 लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरूशलेम येथे या.
\s5
\v 6 आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय त्यांनी, माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.
\v 7 दावीदाने हे ऐकले, तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.
\v 8 तेव्हा अम्मोनी लोक बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला, सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.
\s5
\v 9 अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले.
\v 10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही माणसांना करून अम्मोन्यांचा सामना करायला सांगितले.
\s5
\v 11 यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले, तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.
\v 12 हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.
\s5
\v 13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला.
\v 14 अराम्यांनी पलायन केलेले पाहताच, अम्मोनीही अबीशय समोरून पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरूशलेमला परतला.
\s5
\v 15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)
\v 16 हदद्देजरने नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हदद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.
\s5
\v 17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला.
\v 18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरून पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.
\v 19 हदद्देजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.
\s5
\c 11
\p
\v 1 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
\s5
\v 2 संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्याला एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
\v 3 तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा, उरीया हित्ती याची पत्नी आहे.
\s5
\v 4 तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.
\v 5 पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे.
\s5
\v 6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की, उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले.
\v 7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.
\v 8 मग म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली.
\s5
\v 9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला.
\v 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस?
\v 11 उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.
\s5
\v 12 दावीद उरीयाला म्हाणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो. उरीयाने त्या दिवशी यरूशलेममध्येच मुक्काम केला.
\v 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळीसुद्धा तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
\s5
\v 14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
\v 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते, आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल, तेथे उरीयाला पाठवा. त्याला एकट्याला तेथे सोडा, म्हणजे तो युध्दात कामी येईल.
\s5
\v 16 यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले.
\v 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
\s5
\v 18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त दावीदाला पाठवले.
\v 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
\v 20 यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरून शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.
\s5
\v 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्याला हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.
\s5
\v 22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले.
\v 23 तो म्हणाला, अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.
\s5
\v 24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यात काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.
\v 25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको. हिम्मत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा, तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.
\s5
\v 26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
\v 27 काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.
\s5
\c 12
\p
\v 1 परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब.
\v 2 श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती.
\v 3 पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
\s5
\v 4 एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत माणसाकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब माणसाची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले.
\v 5 दावीदाला त्या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे
\v 6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही.
\s5
\v 7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.
\v 8 त्याचे घरदार आणि बायका तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो.
\s5
\v 9 असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या बायकोचा स्वतःची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.
\v 10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.
\s5
\v 11 परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या बायका तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.
\v 12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल.
\v 13 मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.
\s5
\v 14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल.
\v 15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.
\s5
\v 16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
\v 17 घरातील वडीलधाऱ्या माणसांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला.
\v 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल.
\s5
\v 19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.
\v 20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्याला वाढले आणि तो जेवला.
\s5
\v 21 दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.
\v 22 दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वराला माझी दया येईल आणि बाळ जगेल.
\v 23 पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.
\s5
\v 24 दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती.
\v 25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. देवाच्या वतीने नाथानने हे केले.
\s5
\v 26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले.
\v 27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे.
\v 28 आता इतर लोकांना एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.
\s5
\v 29 दावीद मग सर्व लोकांना घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला.
\v 30 त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार होते. त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.
\s5
\v 31 राब्बा नगरातील लोकांनाही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीटकामही करून घेतले. सर्व आम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमला परतला.
\s5
\c 13
\p
\v 1 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.
\v 2 त्याचे तामारवर प्रेम होते तामार कुमारिका होती तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला.
\s5
\v 3 अम्नोनला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
\v 4 तो अम्नोनला म्हणाला, दिवसें दिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर. तेव्हा अम्नोन योनादाबला म्हणाला, माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.
\s5
\v 5 योनादाब यावर अम्नोनला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन.
\v 6 तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्याला तो म्हणाला, तामारला माझ्याकडे पाठवा तिला इथे माझ्यादेखत दोन पोळ्या करू द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.
\s5
\v 7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.
\v 8 तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहात होता.
\v 9 पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनसाठी ताटात मांडल्या. पण अम्नोन ते काही केल्या खाईना मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
\s5
\v 10 यानंतर आम्नोन तामारला म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
\v 11 त्याला ती भरवू लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ निज.
\v 12 तामार त्याला म्हणाली, भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.
\s5
\v 13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करून राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.
\v 14 पण अम्नोनने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
\s5
\v 15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करू लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
\v 16 तामार त्याला म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल. पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
\v 17 नोकरांना बोलावून तो म्हणाला, हिला आताच्या आता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.
\s5
\v 18 तेव्हा अम्नोनच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.
\v 19 तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करू लागली.
\s5
\v 20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करून घेऊ नकोस, यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
\v 21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला.
\v 22 अबशालोमला अम्नोनचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनने आपल्या बहिणीशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
\s5
\v 23 दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
\v 24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहित येऊन हे दृश्य पाहा.
\s5
\v 25 तेव्हा राजा दावीद त्याला म्हणाला, मुला आम्ही सर्व जण येणे काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल. अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. परंतु दावीद गेला नाही. पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
\v 26 अबशालोम म्हणाला, तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा. राजा दावीद म्हणाला, तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?
\s5
\v 27 पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
\v 28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनवर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्याला जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हाला संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्याला ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.
\v 29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
\s5
\v 30 राजाचे पुत्र नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली. ती अशी, अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले कोणालाही त्यातून वगळले नाही.
\v 31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
\s5
\v 32 परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
\v 33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला.
\s5
\v 34 अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांना येताना पाहिले.
\v 35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.
\v 36 योनादाबचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
\s5
\v 37 दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
\v 38 गशूर येथे तो तीन वर्षे राहिला.
\v 39 राजा दावीद अम्नोनच्या दु:खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.
\s5
\c 14
\p
\v 1 अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले.
\v 2 तेव्हा तकोवा येथे निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्याला शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस.
\v 3 राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.
\s5
\v 4 मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा.
\v 5 राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा बाई आहे.
\v 6 मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला.
\s5
\v 7 आता सगळे घर माझ्याविरुद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्याला आम्ही मारून टाकतो कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला. तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील. आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.
\s5
\v 8 हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यात लक्ष घालतो तू घरी जा.
\v 9 तेव्हा ती स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत.
\s5
\v 10 राजा दावीद म्हणाला, तुझ्याविरुद्ध कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.
\v 11 ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की, या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्याला धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.
\s5
\v 12 मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल.
\v 13 त्यावर ती म्हणाली, तुम्ही देवाच्या लोकांच्या विरुद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वत: दोषी ठरता. कारण तुम्ही आपल्या घराबाहेर घालवलेल्या पुत्राला पुन्हा परत आणलेले नाही.
\v 14 आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्याला आपल्यापासून पळायला लावत नाही.
\s5
\v 15 स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन कदाचित् तोच मला मदत करील.
\v 16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या माणसापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जे दिले त्यापासून हा माणूस आम्हाला वंचित करू पाहात आहे.
\v 17 स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.
\s5
\v 18 राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा.
\v 19 राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.
\v 20 अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच स्वरुप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हाला या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.
\s5
\v 21 राजा यवाबाला म्हणाला, माझे वचन मी खरे करीन. आता अबशालोमला परत आणा.
\v 22 यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरून मी हे ताडले.
\s5
\v 23 मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरूशलेमला घेऊन आला.
\v 24 पण राजा दावीद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे त्याला मला भेटता मात्र येणार नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.
\s5
\v 25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता.
\v 26 प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत असे तर ते दोनशे शेकेल भरत असे.
\v 27 त्याला तीन पुत्र आणि एक कन्या होती या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.
\s5
\v 28 यरूशलेममध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.
\v 29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्याला पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना.
\s5
\v 30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यात जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली.
\v 31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला, आणि त्याला म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”
\s5
\v 32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्याला विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे का आलो? तेव्हा मला त्याला भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे.
\v 33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.
\s5
\c 15
\p
\v 1 यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत.
\v 2 रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला.
\s5
\v 3 तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.
\v 4 अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करू शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.
\s5
\v 5 अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्याला आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या माणसाला मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्याला स्पर्श करी त्याचे चुंबन घेई.
\v 6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली.
\s5
\v 7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वराला नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या.
\v 8 अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरूशलेमला नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो.
\s5
\v 9 तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला.
\v 10 पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांना कळवले रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा.
\s5
\v 11 अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरूशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती.
\v 12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.
\s5
\v 13 एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.
\v 14 तेव्हा यरूशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरूशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.
\v 15 तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.
\s5
\v 16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.
\v 17 राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले.
\v 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करेथी, पलेथी आणि सहाशे गित्ती राजामागोमाग चालत गेले.
\s5
\v 19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे.
\v 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.
\s5
\v 21 पण इत्तय राजाला म्हणाला परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे मरणे तुमच्याबरोबरच.
\v 22 दावीद इत्तयला म्हणाला, मग चल तर, किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ. तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-माणसांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला.
\v 23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्वजण वाळवंटाकडे निघाले.
\s5
\v 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कराराचा कोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला. यरूशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता.
\v 25 राजा दावीद सादोकला म्हणाला, हा देवाचा पवित्र कोश यरूशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरूशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.
\v 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.
\s5
\v 27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा.
\v 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.
\v 29 तेव्हा देवाचा पवित्र करारकोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरूशलेमला परतले आणि तिथेच राहिले.
\s5
\v 30 दावीद शोक करत जैतूनच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.
\v 31 एकाने दावीदाला सांगितले अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे. तेव्हा दावीदाने देवाची करूणा भाकली तो म्हणाला, परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.
\s5
\v 32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्या वेळी हूशय अर्की त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
\v 33 दावीद हूशयला म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यात आणखी तुझा भार.
\v 34 पण तू यरूशलेमला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अबशालोमला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, पण आता तुमची सेवा करीन.
\s5
\v 35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.
\v 36 सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.
\v 37 तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरूशलेममध्ये आला.
\s5
\c 16
\p
\v 1 डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.
\v 2 राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.”
\s5
\v 3 राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेममध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्याला वाटते.
\v 4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्या नमन करतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.
\s5
\v 5 पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.
\v 6 त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.
\s5
\v 7 शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तु दुष्ट आहेस तू खूनी आहेस!
\v 8 देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांना तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.
\s5
\v 9 सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्यासारख्या माणसाने तुम्हाला शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या.
\v 10 पण राजा त्याला म्हणाला, सरूवेच्या पुत्रांनो मी काय करू? शिमी मला शाप देत आहे. पण परमेश्वरानेच त्याला तसे करायला सांगितले आहे. मग त्याला असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?
\s5
\v 11 अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामीनी हे असे करत आहे तर त्यात नवल काय. त्याला हवे ते म्हणू द्या, कारण देवानेच त्याला सांगितले असेल.
\v 12 माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.
\s5
\v 13 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
\v 14 राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.
\s5
\v 15 अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरूशलेम येथे आले.
\v 16 दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.
\s5
\v 17 अबशालोम त्याला म्हणाला, तू आपल्या मित्राची दावीदाची साथ का सोडलीस? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस?
\v 18 हूशय म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्याला माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.
\s5
\v 19 पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार.
\s5
\v 20 अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग.
\v 21 अहिथोफेल त्याला म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.
\s5
\v 22 मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
\v 23 अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत.
\s5
\c 17
\p
\v 1 त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार माणसांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.
\v 2 तो थकला भागलेला असताना भयभीत झालेला असतानाच मी त्याला पकडीन. हे पाहून त्याचे लोक पळ काढतील फक्त राजा दावीदाचा मी वध करीन.
\v 3 बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील.
\v 4 अबशालोम आणि इस्राएलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला.
\s5
\v 5 पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे.
\v 6 मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्याला म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.
\v 7 हूशय अबशालोमला म्हणाला, अहिथोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही.
\s5
\v 8 तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आता पिल्ल हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वला सारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत.
\v 9 एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.
\v 10 मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांना ठाऊक आहे.
\s5
\v 11 तेव्हा मी असे सुचवतो तुम्ही दानपासून बैरशेबापर्यंत सर्व इस्राएल लोकांना एकत्र आणा म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा.
\v 12 दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्याला धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या माणसांसहित आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही.
\s5
\v 13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही.
\v 14 अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्किचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांना पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.
\s5
\v 15 हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही साविस्तर सांगितले. हूशय म्हणाला,
\v 16 आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत.
\s5
\v 17 योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
\v 18 पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिले हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यात उतरून ते लपले.
\s5
\v 19 त्या माणसाच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही.
\v 20 अबशालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावाठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरूशलेमला परत गेले.
\s5
\v 21 इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्याला म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे सांगितले आहे.
\v 22 तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते.
\s5
\v 23 इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले.
\s5
\v 24 दावीद महनाइम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलींसमवेत यार्देन नदी ओलांडली.
\v 25 अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरूवे यवाबाची आई.
\v 26 अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी यांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.
\s5
\v 27 दावीद महनाइम येथे आला शोबी, माखीर आणि बिर्जिल्ल्य तेथेच होते. नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलादमधील रोगलीमचा होता.
\v 28 ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दावीद आणि इतर सर्वजणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले.
\v 29 गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.
\s5
\c 18
\p
\v 1 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार माणसांवर अधिकारी, सरदार नेमले.
\v 2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.
\s5
\v 3 पण लोक म्हणाले नाही तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांना त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात राहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच.
\v 4 तेव्हा राजा लोकांना म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.
\s5
\v 5 यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.
\s5
\v 6 अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमच्या अरण्यात ते लढले.
\v 7 दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली.
\v 8 देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मेली.
\s5
\v 9 अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला, तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.
\v 10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.
\v 11 यवाब त्या माणसाला म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्याला जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुद्रा आणि एक पट्टा इनाम दिला असता.
\s5
\v 12 तो माणूस म्हणाला, तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय, आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.
\v 13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.
\s5
\v 14 यवाब म्हणाला, इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले.
\v 15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.
\s5
\v 16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.
\v 17 यवाबाच्या माणसांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.
\s5
\v 18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वत:चेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो.
\s5
\v 19 सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.
\v 20 यवाब त्याला म्हणाला, आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा पुत्र मरण पावला आहे.
\s5
\v 21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
\v 22 सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली. काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला मुला तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.
\v 23 अहीमास म्हणाला त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली. अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
\s5
\v 24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला.
\v 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच,
\s5
\v 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय.
\v 27 पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार
\s5
\v 28 अहीमासने “सर्व कुशाल असो, असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”
\v 29 राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.
\v 30 राजाने मग त्याला बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.
\s5
\v 31 मग तो कूशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.
\v 32 राजाने त्याला विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमसारखीच गत होवो.
\v 33 यावरून अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला वेशीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्याला रडू कोसळले आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, अबशालोम, माझ्या पुत्रा, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते माझ्या पुत्रा!
\s5
\c 19
\p
\v 1 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्याला म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.
\v 2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.
\s5
\v 3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.
\v 4 राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने, माझ्या मुला अबशालोमा, असा मोठ्याने आक्रोश करत होता.
\s5
\v 5 यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले.
\v 6 ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर तुम्हाला फार आनंद झाला असता असे दिसते.
\s5
\v 7 आता ऊठा आणि आपल्या सेवकांशी बोला. त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही माणूस उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आघात असेल.
\v 8 तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले. अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते.
\s5
\v 9 इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अबशालोमपासून पळून गेला.”
\v 10 म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करू.
\s5
\v 11 सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.
\v 12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात?
\s5
\v 13 आणि अमासाला सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो.
\v 14 दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला. त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की, तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.
\v 15 मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्याला भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.
\s5
\v 16 गेराचा पुत्र शिमी हा बन्यामीनच्या घराण्यातील होता तो बहूरीम येथे राहात असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला.
\v 17 बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हा ही आला. आपले पंधरा मुलगे आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोचले.
\v 18 राजाच्या कुटुंबियांना उतरून घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
\s5
\v 19 तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरूशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.
\v 20 मी पापी आहे हे तुम्ही जाणता. म्हणूनच योसेफच्या घराण्यातून तुमच्या भेटीला आलेला मी पहिलाच मनुष्य आहे.
\s5
\v 21 पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्याला ठारच करायला हवे.
\v 22 दावीद म्हणाला, सरुवेच्या मुलानो मी तुमच्या बरोबर कसे वागावे? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरूद्ध आहे. इस्राएलमध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही कारण आज मी इस्राएलचा राजा आहे.
\v 23 मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस. आपण शिमीचा वध करणार नाही, असे राजाने शिमीला वचन दिले.
\s5
\v 24 शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
\v 25 मफीबोशेथ यरूशलेमहून आला तेव्हा राजा त्याला म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?
\s5
\v 26 मफीबोशेथने सांगितले, महाराज, माझ्या नोकराने, सीबाने, मला फसवले, त्याला मी म्हणालो, मी पांगळा आहे, तेव्हा गाढवावर खोगीर चढव म्हणजे त्यावर बसून मी राजाबरोबर जाईन.
\v 27 पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरुद्ध तुझे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.
\v 28 माझ्या आजोबाच्या घराण्याचा तुम्ही समूळ नाश करू शकला असता. पण तसे तुम्ही केले नाही. तुम्ही मला आणखी काहीजणांबरोबर आपल्या पंक्तीला बसवलेत, तेव्हा मला काहीही तक्रार करायचा हक्क नाही.
\s5
\v 29 तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.
\v 30 मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यात सगळे आले.
\s5
\v 31 गिलादचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
\v 32 बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला.
\v 33 दावीद त्याला म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरूशलेममध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.
\s5
\v 34 पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हाला माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हाला वाटते का?
\v 35 मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ?
\v 36 आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?
\s5
\v 37 पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्याला वागवा.
\s5
\v 38 तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
\v 39 राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
\s5
\v 40 नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोचवायला आले.
\v 41 सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?”
\s5
\v 42 तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांना सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हाला एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हाला काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हाला काही बक्षीस दिले काय?
\v 43 इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हाला तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.
\s5
\c 20
\p
\v 1 शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबा अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोळा केले. आणि त्यांना म्हणाला, दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही. इस्राएलींनो, आपापल्या डेऱ्यात परत चला.
\v 2 हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरूशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.
\s5
\v 3 दावीद यरूशलेममधील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रीया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
\s5
\v 4 राजा अमासाला म्हणाला, यहूदाच्या लोकांना तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.
\v 5 तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्याला लागला.
\s5
\v 6 दावीद अबीशयला म्हणाला, अबशालोमापेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.
\v 7 तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरूशलेमहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.
\s5
\v 8 यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली.
\s5
\v 9 त्याने अमासाला विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्याला पुढे खेचले.
\v 10 यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
\s5
\v 11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
\v 12 अमासा रस्त्याच्या मध्याभागी सक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
\v 13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरू केला.
\s5
\v 14 इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जाऊन, शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
\v 15 यवाब आपल्या माणसांसहित आबेल बेथ माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.
\v 16 नगरात एक चाणाक्ष स्त्री राहात होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
\s5
\v 17 यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
\v 18 मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.”
\v 19 इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तुची तुम्ही मोडतोड का करता?
\s5
\v 20 यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करू इच्छित नाही.
\v 21 पण एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शबा नावाचा एक माणूस तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्याला माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल.
\v 22 मग तिने गावातील लोकांना शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांना शबाचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरूशलेम येथे राजाकडे आला.
\s5
\v 23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
\v 24 अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
\v 25 शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.
\v 26 आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.
\s5
\c 21
\p
\v 1 दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.
\s5
\v 2 गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.
\v 3 दावीद त्यांना म्हणाला, तुमच्यासाठी मी काय करू? इस्राएलाचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करू शकतो?
\s5
\v 4 तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हाला हक्क नाही. दावीद म्हणाला ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?
\s5
\v 5 ते राजाला म्हणाले, ज्या माणसाने आमचा नाश केला व इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा नाश करण्याचे ज्याने योजिले होते,
\v 6 त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ. राजा दावीद म्हणाला, मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.
\s5
\v 7 पण योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलचा मुलगा. पण दावीदाने त्याला त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.
\v 8 अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली.
\v 9 या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता.
\s5
\v 10 अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसाला सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.
\v 11 शौलाची दासी रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.
\s5
\v 12 तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथशान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरून नेली.
\v 13 याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले.
\s5
\v 14 शौल आणि योनाथानच्या अस्थी त्यांनी बन्यामीनच्या प्रदेशात पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.
\s5
\v 15 पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.
\v 16 त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य माणूस होता. त्याच्या भाल्याचे वजनच तिनशे शेकेल पितळ होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.
\v 17 पण सरूवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.
\s5
\v 18 यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.
\v 19 गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.
\s5
\v 20 गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर बोटे चोवीस होती. हा ही रेफाई वंशातला होता.
\v 21 त्याने इस्राएलला आव्हान दिले पण योनाथानने या माणसाचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.
\v 22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.
\s5
\c 22
\p
\v 1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.
\v 2 परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार.
\s5
\v 3 तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
\v 4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
\s5
\v 5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
\v 6 अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
\s5
\v 7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
\s5
\v 8 तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता.
\v 9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
\s5
\v 10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला.
\v 11 करूबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता.
\v 12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.
\s5
\v 13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले.
\v 14 परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला.
\v 15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले.
\s5
\v 16 परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
\s5
\v 17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
\v 18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले.
\s5
\v 19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण देवाने मला आधार दिला.
\v 20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
\v 21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
\s5
\v 22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.
\v 23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
\s5
\v 24 माझे आचरण शुध्द आणि निर्दोष आहे.
\v 25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
\s5
\v 26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
\v 27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटीलांशी तू ही कुटिलतेने वागतोस.
\s5
\v 28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.
\v 29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
\s5
\v 30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.
\v 31 देवाची सत्ता सर्वंकष आहे. देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
\s5
\v 32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
\v 33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.
\s5
\v 34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
\v 35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात.
\s5
\v 36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
\v 37 माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
\s5
\v 38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
\v 39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
\s5
\v 40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
\v 41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.
\s5
\v 42 शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी देवाचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
\v 43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
\s5
\v 44 माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
\v 45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात. जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
\v 46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
\s5
\v 47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
\v 48 त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.
\v 49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
\s5
\v 50 म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
\v 51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.
\s5
\c 23
\p
\v 1 दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक.
\v 2 परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
\s5
\v 3 इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
\v 4 तो माणूस सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा.
\s5
\v 5 देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.
\s5
\v 6 पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
\v 7 त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा माणूस काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.
\s5
\v 8 दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी अदीनो म्हणूनही त्याला ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.
\s5
\v 9 त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजार पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते.
\v 10 थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले.
\s5
\v 11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला.
\v 12 पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.
\s5
\v 13 दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून थेट गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.
\v 14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.
\s5
\v 15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.
\v 16 पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वराला अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले.
\v 17 दावीद म्हणाला, परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल. म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
\s5
\v 18 सरूवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
\v 19 त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता.
\s5
\v 20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
\v 21 एका धिप्पाड मिसरी माणसालाही त्याने मारले. या मिसरी माणसाच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी माणसाचा जीव घेतला.
\s5
\v 22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
\v 23 तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
\s5
\v 24 यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,
\v 25 शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
\v 26 हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
\v 27 अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी,
\v 28 सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
\s5
\v 29 बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,
\v 30 बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
\v 31 अबी-अलबोन अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,
\v 32 अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान,
\s5
\v 33 शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
\v 34 माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,
\v 35 हेस्री कर्मेली, पारय अर्बी
\v 36 सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी,
\s5
\v 37 सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
\v 38 ईर इथ्री, गारेब इथ्री,
\v 39 उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.
\s5
\c 24
\p
\v 1 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.
\v 2 राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, दानपासून बैरशेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.
\s5
\v 3 पण यवाब राजाला म्हणाला, आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हाला हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हाला असे का करावेसे वाटते?
\v 4 पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले. आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.
\s5
\v 5 यार्देन ओलांडून त्यांनी आरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)
\v 6 तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यात आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.
\v 7 सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.
\s5
\v 8 सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसांनी यरूशलेम येथे पोहोचले.
\v 9 यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
\s5
\v 10 हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
\s5
\v 11 दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला देववाणी ऐकू आली.
\v 12 परमेश्वर त्याला म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.
\s5
\v 13 गादने दावीदाकडे येऊन त्याला हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा, की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वराला काय सांगावे ते सांग.
\v 14 दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो लोकांच्या हाती मी पडू नये.”
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दानपासून बैरशेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
\v 16 यरूशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे. तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
\s5
\v 17 लोकांना मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वराला म्हणाला, माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.
\s5
\v 18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.
\v 19 दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला.
\v 20 अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.
\s5
\v 21 अरवना म्हणाला, माझे स्वामी का बरे आले आहेत? दावीद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.
\v 22 अरवना म्हणाला, स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे.
\v 23 महाराज, हवे ते मी तुम्हाला देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.
\s5
\v 24 पण राजा अरवनाला म्हणाला नाही, तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही. तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
\v 25 मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यार्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.

1258
11-1KI.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1258 @@
\id 1KI
\ide UTF-8
\h 1 राजे
\toc1 1 राजे
\toc2 1 राजे
\toc3 1ki
\mt1 1 राजे
\s5
\c 1
\p
\v 1 आता राजा दाविद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना.
\v 2 म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “आपण आपल्या प्रभुराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभुराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”
\s5
\v 3 आणि सेवकांनी या कामासाठी इस्त्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
\v 4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
\s5
\v 5 तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईल.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.
\v 6 “तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्याला कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.
\s5
\v 7 सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.
\v 8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही.
\s5
\v 9 एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांना, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.
\v 10 पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.
\s5
\v 11 तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, “हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दाविद यांना त्याचा पत्तासुद्वा नाही, असे तूझ्या कानावर आले नाही काय?”
\v 12 तर आता चल मी तूला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.
\s5
\v 13 तर आता तू दाविद राजा कडे जा आणि त्याला म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?
\v 14 “तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तूझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.”
\s5
\v 15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.
\v 16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”
\v 17 ती त्याला म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात.
\s5
\v 18 तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हाला याची माहितीही नाही का?
\v 19 त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
\s5
\v 20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
\v 21 नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांच्या शेजारी झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
\s5
\v 22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच, नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.
\v 23 राजाच्या सेवकांनी त्याला सागीतले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.
\s5
\v 24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय?
\v 25 कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.
\s5
\v 26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.
\v 27 माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाल न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव.”
\s5
\v 28 तेव्हा राजा दाविद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहीली.
\v 29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.
\v 30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.”
\v 31 बथशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, “माझे स्वामीराज दाविद चिरायु होवो.”
\s5
\v 32 मग दाविद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
\v 33 राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.
\v 34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.”
\s5
\v 35 मग त्याला घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.”
\v 36 यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो.
\v 37 महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दाविद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”
\s5
\v 38 सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
\v 39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
\v 40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येतांना ते पावा वाजवत आले. लोकांना उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
\s5
\v 41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
\v 42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “ये तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
\s5
\v 43 पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दाविद याने शलमोनाला राजा केले आहे.”
\v 44 दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.
\v 45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.
\s5
\v 46 शलमोन आता राज्याचा राजासनावर बसला आहे.
\v 47 राजाचा सेवकवर्ग स्वामी दाविद राजाला आशिर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दाविद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.
\v 48 आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”
\s5
\v 49 हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.
\v 50 अदोनीया शलमोनाला घाबरला, व जावून तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला.
\v 51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तरवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”
\s5
\v 52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल.”
\v 53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले, ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.”
\s5
\c 2
\p
\v 1 दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,
\v 2 “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.
\v 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
\v 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुटंणार नाही.
\s5
\v 5 सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.
\v 6 तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको.
\s5
\v 7 गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
\s5
\v 8 गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामीनी आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शाप उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.
\v 9 पण आता त्याला तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्याला काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”
\s5
\v 10 मग दाविद मरण पावला. आपल्या पुर्वजाजवळ दाविद नगरात त्याचे दफन झाले.
\v 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
\v 12 आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
\s5
\v 13 यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस ना”? अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”
\v 14 “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
\v 15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
\s5
\v 16 आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
\v 17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
\v 18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
\s5
\v 19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
\v 20 नंतर बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
\v 21 ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
\s5
\v 22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखिल का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”
\v 23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधीक माझे करो.
\s5
\v 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दाविद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
\v 25 राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
\s5
\v 26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
\v 27 शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
\s5
\v 28 ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभित झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.
\v 29 “कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
\s5
\v 30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.
\v 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
\s5
\v 32 त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडिल दाविद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन माणसांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.
\v 33 त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दाविद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
\s5
\v 34 तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.
\v 35 यवाबाच्या जागी मग राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.
\s5
\v 36 मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेमामध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.
\v 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”
\v 38 तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील” शिमी मग यरुशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.
\s5
\v 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.”
\v 40 तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
\s5
\v 41 शिमी यरुशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.
\v 42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्याला कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.
\s5
\v 43 परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?”
\v 44 मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दाविद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.
\s5
\v 45 पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”
\v 46 मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.
\s5
\c 3
\p
\v 1 मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दाविद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमासभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.
\v 2 परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बळी अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
\v 3 राजा शलमोनही आपले वडिल दाविद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
\s5
\v 4 राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
\v 5 शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
\s5
\v 6 तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दाविद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.
\s5
\v 7 माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही.
\v 8 तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत.
\v 9 म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”
\s5
\v 10 शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वराला फार आनंद झाला
\v 11 म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.
\v 12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही.
\s5
\v 13 आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही.
\v 14 जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दाविद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
\s5
\v 15 शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
\s5
\v 16 नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
\v 17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.
\s5
\v 18 तीन दिवसांनंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो.
\v 19 एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले.
\v 20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.
\s5
\v 21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
\v 22 पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मेलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
\s5
\v 23 तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मेलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जीवंत जो माझा मुलगा.”
\v 24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
\v 25 नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.”
\s5
\v 26 पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “हे माझ्या स्वामी नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.” दुसरी बाई म्हणाली, “बाळाचे दोन तुकडे करा.” म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.
\v 27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”
\v 28 राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
\s5
\c 4
\p
\v 1 राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता.
\v 2 त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता.
\v 3 शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता.
\v 4 बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते
\s5
\v 5 नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
\v 6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
\s5
\v 7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई.
\v 8 त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
\v 9 माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
\v 10 अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता.
\s5
\v 11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी.
\v 12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता.
\v 13 रामोथ गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती.
\v 14 इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाइम प्रांतावर होता.
\s5
\v 15 नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.)
\v 16 हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
\v 17 पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता.
\s5
\v 18 एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
\v 19 उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
\s5
\v 20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती.
\v 21 नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
\v 22 शलमोनाला एका दिवसाला जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ,
\v 23 दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
\s5
\v 24 महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जीतके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. ह्या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती.
\v 25 शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
\s5
\v 26 रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते.
\v 27 शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
\v 28 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
\s5
\v 29 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले.
\v 30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
\v 31 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते.
\s5
\v 32 आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
\v 33 निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
\v 34 देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
\s5
\c 5
\p
\v 1 हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याने आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले कारण त्याने ऐकले होते की, शलमोनाचा अभिषेक होऊन त्याच्या वडिलांच्या जागेवर राजा झाला आहे, त्याचे दाविदाशी सख्य होते.
\v 2 शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
\v 3 “तुम्हाला माहित आहे माझे वडिल दाविद सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंना पायदळी तुडवीपर्यंत ते थांबले होते.
\s5
\v 4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू किंवा अरिष्ट राहीले नाही.
\v 5 परमेश्वराने माझे वडिल दाविदाला वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बाधण्याची माझी योजना आहे.
\s5
\v 6 तर आता माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. तुम्हाला माहित आहे की आमचे लोक तुमच्या सीदोनी लोकांइतके कुशल नाहीत.”
\s5
\v 7 हिरामाला शलमोनाचे शब्द ऐकूण फार आनंद झाला व तो म्हणाला, “दाविदाला एवढा ज्ञानी पुत्र या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.”
\v 8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या ईच्छेप्रमाणे देईल.
\s5
\v 9 माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.”
\s5
\v 10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची लाकडे पुरवली.
\v 11 शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी वीस हजार कोर गहू आणि वीस कोर शुद्ध तेल दिले.
\v 12 परमेश्वराने शलमोनाला कबूल केल्याप्रमाणे, त्याने त्याला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
\s5
\v 13 शलमोनान राजाने सर्व इस्राएल लोंकावर वेठबिगार बसवला यासाठी तीस हजार नेमली.
\v 14 अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
\s5
\v 15 ऐंशी हजार लोकांना शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.
\v 16 शलमोनाच्या कामावरील मुख्य अमलदाराखेरीज आणखी तीन हजार तीनशे अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते.
\s5
\v 17 त्यांना शलमोन राजाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कापायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.
\v 18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबली येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.
\s5
\c 6
\p
\v 1 अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जिव महिना जो दुसरा महिना होता त्यात तो यहोवाचे मंदिर बांधू लगला.
\v 2 शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.
\s5
\v 3 मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती.
\v 4 मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
\s5
\v 5 मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले.
\v 6 सर्वात खालच्या मजल्याची रूंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या बाहेरच्या भिंतीस तोडे ठेवले होते, ते अशासाठी की, मंदीराच्या भिंतीत तुळ्या शिरू नयेत.
\s5
\v 7 भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले खाणीतूनच ते योग्य मापाने कापून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना हातोड्या, कुऱ्हाडी किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
\v 8 तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
\s5
\v 9 शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
\v 10 मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
\s5
\v 11 परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,
\v 12 “माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दाविद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
\v 13 मी इस्त्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
\s5
\v 14 शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
\v 15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
\s5
\v 16 मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
\v 17 मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
\v 18 हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
\s5
\v 19 आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
\v 20 याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.
\s5
\v 21 शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
\v 22 परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले.
\s5
\v 23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
\v 24 करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासुन दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
\v 25 दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते.
\v 26 आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करूबाचीही तेवढीच होती.
\s5
\v 27 हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
\v 28 हे करुब सोन्याने मढवले होते.
\s5
\v 29 दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
\v 30 दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.
\s5
\v 31 शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
\v 32 जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
\s5
\v 33 त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता;
\v 34 त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या.
\v 35 त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती.
\s5
\v 36 मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
\s5
\v 37 वर्षाचा चौथा महिना जिव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला.
\v 38 अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.
\s5
\c 7
\p
\v 1 शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली.
\v 2 त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.
\s5
\v 3 त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
\v 4 तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
\v 5 दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
\s5
\v 6 शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती.
\s5
\v 7 मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
\s5
\v 8 याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
\s5
\v 9 या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
\v 10 पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती.
\s5
\v 11 त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते.
\v 12 महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.
\s5
\v 13 राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या माणसाला निरोप पाठवून यरुशलेम येथे बोलावून घेतले.
\v 14 हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या.
\s5
\v 15 हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे.
\v 16 शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती.
\v 17 या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात.
\s5
\v 18 याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसाला झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या.
\v 19 जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
\s5
\v 20 हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती.
\v 21 हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले.
\v 22 कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.
\s5
\v 23 मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्याला वेढायला तीस हात दोरी लागत असे.
\v 24 या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या.
\s5
\v 25 बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती.
\v 26 हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यात दोन हजार बथ पाणी मावत असे.
\s5
\v 27 मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन उंच हात होते.
\v 28 चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि ह्या पत्र्यास सभोवार कंगोरे होते.
\v 29 पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती.
\s5
\v 30 प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते.
\v 31 कळसाच्या आतल्या बाजूपासुन वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या.
\s5
\v 32 चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.
\v 33 रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते.
\s5
\v 34 प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
\v 35 प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या.
\s5
\v 36 चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यात कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती.
\v 37 हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते.
\s5
\v 38 हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यात चाळीस बथ पाणी मावू शकत असे.
\v 39 त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे आग्नेय दिशेला ठेवल्या.
\s5
\v 40 याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या
\v 41 त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या
\s5
\v 42 या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी ह्या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.
\v 43 दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे,
\s5
\v 44 एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल;
\v 45 याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.
\s5
\v 46 सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले.
\v 47 या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते राजाने शलमोनाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही.
\s5
\v 48 शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी)
\v 49 शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.
\s5
\v 50 पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या.
\s5
\v 51 परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत:च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दाविद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
\s5
\c 8
\p
\v 1 इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दाविद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.
\v 2 तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी शलमोन राजासमोर एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा सनाचा माहिना चालू होता.
\s5
\v 3 इस्राएलची सर्व वडिलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला.
\v 4 त्याबरोबरच सभामंडप, परमेश्वराचा कोश, तेथील सर्व पवित्र पात्रे लेवीनी व याजकांनी वरती वाहून नेली.
\v 5 राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक कराराच्या कोशासमोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते.
\s5
\v 6 मग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
\v 7 करुबांचे पंख पवित्र कराराच्या कोशावर पसरलेले होते. कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते.
\v 8 हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.
\s5
\v 9 कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
\v 10 परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
\v 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले, व मेघामुळे याजकांना उभे राहता येईना.
\p
\s5
\v 12 तेव्हा शलमोन म्हणाला,
\p “परमेश्वर म्हणाला आहे की,
\p मी निबीड अंधारात वस्ती करीन.
\p
\v 13 परंतु तुला युगानुयूग राहण्यासाठी,
\p हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
\p
\s5
\v 14 इस्राएल लोकांकडे वळून राजाने त्यांना आशिर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहील.
\v 15 तो म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो! माझे वडिल दाविद यांना म्हटल्याप्रमाणे त्याने स्वत:च्या हाताने ते पूर्ण केले परमेश्वर माझ्या वडिलांना म्हणाला,
\v 16 माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणून अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे, आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दाविदाची निवड केली आहे.
\s5
\v 17 इस्राएलाच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे, माझे वडिल दाविद यांच्या फार मनात होते.
\v 18 पण परमेश्वर माझे वडिल दाविद यांना म्हणाला, “माझ्या नामासाठी मंदिर उभारण्याची तुझ्या मनातील इच्छा मी जाणून आहे, अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.
\v 19 पण तुझ्या हस्ते हे मंदिराचे काम होणार नाही, तर तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो माझ्या नामासाठी हे मंदिर बांधील.
\s5
\v 20 परमेश्वर जे वचन बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. आता माझे वडिल दाविद याच्या गादीवर मी आलो आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.
\v 21 त्यात पवित्र कराराच्या कोशासाठी एक जागा करवून घेतली आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा केलेला तो करार यात आहे.”
\p
\s5
\v 22 शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्त्राएलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले,
\v 23 तो म्हणाला, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुजसमान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास, कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस, जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
\v 24 माझे वडिल दाविद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस, आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे; अशी आज वस्तुस्थिती आहे.
\s5
\v 25 माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दाविद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील.
\v 26 परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.
\s5
\v 27 पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल! आहे.
\v 28 पण कृपाकरुन माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
\p
\s5
\v 29 माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या ह्या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.
\v 30 परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हाला माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.
\s5
\v 31 जर एखादया व्यक्तिने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्याला शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली.
\v 32 तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर.
\s5
\v 33 जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरुद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील;
\v 34 तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्त्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण.
\s5
\v 35 त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील,
\v 36 तेव्हा स्वर्गातून इस्त्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे.
\s5
\v 37 कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील.
\v 38 असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्त्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणार त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील.
\s5
\v 39 तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.
\v 40 आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन राहावे म्हणून एवढे कर.
\s5
\v 41 इस्त्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला,
\v 42 कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली,
\v 43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.
\s5
\v 44 कधी तू आपल्या लोकांना शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते प्रभूकडे प्रार्थना करतील.
\v 45 तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर.
\s5
\v 46 जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.
\v 47 तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील.
\s5
\v 48 बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
\s5
\v 49 तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक. व त्यास न्याय दे.
\v 50 त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्याविरुध्द पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूसमोर त्यांच्या वर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील,
\s5
\v 51 ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत.
\v 52 “तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरून ऐक, ते तुझा धावा करतील त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.
\v 53 प्रभू परमेश्वरा, पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस. त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.”
\s5
\v 54 शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.
\v 55 मग त्याने इस्राएल लोकांना उभे राहून उंच आवाजात आशिर्वाद दिला, तो म्हणाला.
\v 56 “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत वचने दिली होती. त्यापैकी एकही शब्द वाया गेला नाही.
\s5
\v 57 आपल्या पूर्वजांना त्याने साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हाला कधीही अंतर देऊ नये.
\v 58 आम्ही त्याला अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.
\s5
\v 59 आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
\v 60 परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल त्याच्याशिवाय दुसरा देव नाही.
\v 61 तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”
\s5
\v 62 मग राजासहीत सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले.
\v 63 शलमोनाने बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे बळी अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वराला अर्पण केले.
\s5
\v 64 मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्यादिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.
\s5
\v 65 शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
\v 66 नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराच्या सेवक दाविद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.
\s5
\c 9
\p
\v 1 शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले, व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले.
\v 2 यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला दर्शन दिले.
\s5
\v 3 परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील.
\s5
\v 4 तुझे वडिल दाविद यांच्या प्रमाणेच चागल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास,
\v 5 तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्त्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दाविद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही.
\s5
\v 6 पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात,
\v 7 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना मी हुसकावून लावीन. इतर लोकांत तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन.
\s5
\v 8 हे मंदिर नामशेष होईल ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का बरे केले?
\v 9 यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले”
\s5
\v 10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
\v 11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
\s5
\v 12 शलमोनाने हिराम मग सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्याला ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
\v 13 राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
\v 14 हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार सोने पाठवले होते.
\s5
\v 15 शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमासभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
\v 16 मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
\s5
\v 17 शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले.
\v 18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे बांधली,
\v 19 शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
\s5
\v 20 इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
\v 21 इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
\s5
\v 22 इस्त्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
\s5
\v 23 शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
\s5
\v 24 फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दाविद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
\s5
\v 25 शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांत्यर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळीत असे. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
\s5
\v 26 एसयोन-गेबर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
\v 27 समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले.
\v 28 शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.
\s5
\c 10
\p
\v 1 परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.
\v 2 नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्याला सांगितले.
\s5
\v 3 शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही.
\v 4 शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले.
\v 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली.
\s5
\v 6 ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे.
\v 7 पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे.
\s5
\v 8 तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य.
\v 9 परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”
\s5
\v 10 मग शबाच्या राणीने राजाला एकशे वीस किक्कार सोने, नजर केले. शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्राएलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
\s5
\v 11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली.
\v 12 शलमोन राजाने या लाकडाचा वापर परमेश्वराच्या मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलामध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
\s5
\v 13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला, जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
\s5
\v 14 शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार सोने मिळत राहिले.
\v 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
\s5
\v 16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.
\v 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या.
\s5
\v 18 शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते.
\v 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते.
\v 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते.
\s5
\v 21 राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्व सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
\v 22 समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
\s5
\v 23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते.
\v 24 पृथ्वीवरील सर्व लोक त्याला भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे.
\v 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
\s5
\v 26 शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरुशलेमेमध्येही होते.
\v 27 राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
\s5
\v 28 मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणवत असे. राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत.
\v 29 मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
\s5
\c 11
\p
\v 1 राजा शलमोनाचे अनेक विदेशी स्त्रिंयावर प्रेम जडले होते. फारोच्या मुलीखेरीज, हित्ती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
\v 2 परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
\s5
\v 3 त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
\v 4 तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडिल दाविद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
\s5
\v 5 सीदोनी लोकांच्या अष्टारोथ देवाची शलमोनाने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही शलमोनाने भजले.
\v 6 अशाप्रकारे शलमोनाने परमेश्वराचा दृष्टाने वाईट केले. आपले वडिल दाविद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.
\s5
\v 7 कमोश या मवाबी लोकांच्या अमंगळ दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या अमंगळ दैवतासाठीही एक उंच स्थान बांधले.
\v 8 आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच पूजास्थळे बांधली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
\s5
\v 9 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
\v 10 इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
\s5
\v 11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्याकडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या सेवकाला मी ते देईल.
\v 12 पण तुझे वडिल दाविद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा पुत्र गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
\v 13 तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दाविदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरुशलेमेसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
\s5
\v 14 आणि मग परमेश्वराने अदोमी हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमाच्या राजघराण्यातला होता.
\v 15 त्याचे असे झाले दाविदाने पूर्वी अदोमाचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दाविदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. तेव्हा त्याने अदोमातील सर्वांची कत्तल केली होती.
\v 16 यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोम येथे सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोम येथे कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
\v 17 हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडिलांचे काही अदोमी सेवकही त्याच्याबरोबर गेले.
\s5
\v 18 मिद्यानाहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हे सगळे लोक मिळून मिसरला गेले. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.
\v 19 फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. त्याची राणी तहपनेस हिची ती बहीण होती.
\s5
\v 20 या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा पुत्र झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलांबरोबरच वाढला.
\v 21 दाविदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्याला कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
\v 22 तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्वकाही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?” तेव्हा “हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.”
\s5
\v 23 देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा पुत्र. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
\v 24 दाविदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर, रजोनाने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला.
\v 25 अरामावर रजोनाने राज्य केले. इस्राएलाबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलाला बराच त्रास दिला.
\s5
\v 26 नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
\v 27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दाविद राजाच्या नगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करून घेत होता.
\s5
\v 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
\v 29 एकदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखी कोणी नव्हते.
\v 30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
\s5
\v 31 मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत:जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
\v 32 आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दाविद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे.
\v 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मवाबाचा कमोश, अम्मोन्याचा मिलकोम या परकीय दैवतांचे तो भजन पूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडिल दाविद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
\s5
\v 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर अधिपती राहील. माझा सेवक दाविद याच्याखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दाविदाने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले.
\v 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
\v 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेमामध्ये माझा सेवक दाविद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वत:चे म्हणून निवडले.
\s5
\v 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
\v 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
\v 39 यामुळे मी दाविदाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”
\s5
\v 40 शलमोनाने यराबामाच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामाने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
\s5
\v 41 शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या नाहीत काय?.
\v 42 यरुशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले
\v 43 मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दाविद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.
\s5
\c 12
\p
\v 1 रहबाम शेखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यास सर्व इस्त्राएल लोक तेथे गेले होते.
\v 2 शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता. त्याने हे ऐकले,
\s5
\v 3 लोकांनी त्याला बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्याला म्हणाले,
\v 4 “तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हाला भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
\v 5 रहबाम म्हणाला, “तीन दिवसांनंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
\s5
\v 6 शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांना मी काय सांगू?”
\v 7 यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
\s5
\v 8 पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
\v 9 रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांना कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
\s5
\v 10 तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा. तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे.
\v 11 माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
\s5
\v 12 रहबाम राजाने त्या लोकांना “तीन दिवसांनी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसांनी रहबामाकडे आले.
\v 13 त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
\v 14 मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हाला आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हाला विंचवानी शिक्षा करील.”
\s5
\v 15 या प्रकारे राजाने इस्त्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
\s5
\v 16 नवा राजा आपले म्हणणे मानत नाही, हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा, या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे.” एवढे बोलून ते निघून गेले.
\v 17 तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच.
\s5
\v 18 अदोराम नावाचा एक माणूस सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्याला लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला.
\v 19 इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
\s5
\v 20 यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला सर्व इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
\s5
\v 21 रहबाम यरुशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.
\s5
\v 22 शमाया नामक देवाच्या माणसाशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
\v 23 “शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
\v 24 इस्त्राएलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे.” प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले.
\s5
\v 25 शेखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.
\v 26 यराबाम मनाशीच म्हणाला, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
\v 27 लोक यरुशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”
\s5
\v 28 त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, तुम्हाला यरुशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्त्राएला तुम्हाला मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
\v 29 राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
\v 30 पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
\s5
\v 31 उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
\v 32 याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले.
\s5
\v 33 अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
\s5
\c 13
\p
\v 1 परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या माणसाला) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता.
\v 2 परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
\v 3 हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांना खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.”
\s5
\v 4 राजाने जेव्हा देवाच्या माणसाचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या माणसाकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या माणसाकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्याला तो हलवता येईना
\v 5 तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या माणसाच्या तोंडून देवाचे वचन निघत होते याची ती खूण होती.
\s5
\v 6 तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
\v 7 राजा त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.”
\s5
\v 8 पण हा देवाचा माणूस म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
\v 9 काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.”
\v 10 त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही.
\s5
\v 11 बेथेल नगरात एक वृध्द देवाचा माणूस राहत होता. त्याच्या मुलांनी त्याला या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
\v 12 तेव्हा वृध्द देवाचा माणूस म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला.
\v 13 त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला.
\s5
\v 14 हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्याला विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा माणूस?” संदेष्ट्याने यावर होकार दिला.
\v 15 तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.”
\v 16 पण हा देवाचा माणूस म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही.
\v 17 तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
\s5
\v 18 यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटेच सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
\v 19 तेव्हा तो देवाचा माणूस वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले.
\s5
\v 20 ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.
\v 21 वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या माणसाला म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
\v 22 येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.”
\s5
\v 23 या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा माणूस) निघाला.
\v 24 परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारुन टाकले. देवाच्या माणसाचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.
\v 25 इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली.
\s5
\v 26 वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या माणसाला फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा माणूस. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्याला मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार असे परमेश्वराने सांगितले होते.”
\v 27 मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले.
\v 28 तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.
\s5
\v 29 वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला.
\v 30 त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.”
\s5
\v 31 मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या माणसा शेजारीच विसावू द्या.
\v 32 परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.”
\s5
\v 33 राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या माणसांची तो पुरोहित म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्याला पुरोहित बनता येई.
\v 34 या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
\s5
\c 14
\p
\v 1 याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
\v 2 तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
\v 3 यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
\s5
\v 4 मग यराबामाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते.
\v 5 पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामाची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले. यराबामाची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.”
\s5
\v 6 अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
\v 7 परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
\v 8 यापुर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दाविद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.
\s5
\v 9 पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ति केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
\v 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्त्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.
\s5
\v 11 यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.
\v 12 अहीया संदेष्टा मग यराबामाच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.
\v 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.
\s5
\v 14 परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल.
\v 15 मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्याला संताप आला.
\v 16 आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
\s5
\v 17 यराबामाची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.
\v 18 सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
\s5
\v 19 राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
\v 20 यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.
\s5
\v 21 शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरुशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती.
\v 22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
\s5
\v 23 या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या.
\v 24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापुर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांना दिला होता.
\s5
\v 25 रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमेवर स्वारी केली.
\v 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ने ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरुशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या.
\s5
\v 27 मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
\v 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
\s5
\v 29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
\v 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
\v 31 रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दाविद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.
\s5
\c 15
\p
\v 1 नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामाचा) पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
\v 2 अबीयाने तीन वर्षे यरुशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
\v 3 आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दाविद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
\s5
\v 4 दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरुशलेम सुरक्षित ठेवले.
\v 5 दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
\v 6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
\s5
\v 7 अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
\v 8 अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दाविद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
\s5
\v 9 यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
\v 10 आसाने यरुशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
\v 11 आपला पूर्वज दाविद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
\s5
\v 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ति पूर्णपणे हलवल्या.
\v 13 आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ति या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
\s5
\v 14 त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
\v 15 आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
\s5
\v 16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
\v 17 इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
\s5
\v 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
\v 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून झाईल.”
\s5
\v 20 राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्त्राएलावर पाठवले.
\v 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
\v 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
\s5
\v 23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
\v 24 आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दाविद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
\s5
\v 25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
\v 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.
\s5
\v 27 बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
\v 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
\s5
\v 29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
\v 30 राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
\s5
\v 31 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
\v 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
\s5
\v 33 यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
\v 34 पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.
\s5
\c 16
\p
\v 1 यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
\v 2 “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.
\s5
\v 3 तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराणचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन.
\v 4 बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
\s5
\v 5 इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे.
\v 6 बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला.
\s5
\v 7 तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.
\s5
\v 8 यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्त्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.
\v 9 जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
\v 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला.
\s5
\v 11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले.
\v 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश झाला
\v 13 बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ति केल्यामुळे इस्त्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
\s5
\v 14 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
\s5
\v 15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
\v 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता.
\v 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला.
\s5
\v 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले.
\v 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
\v 20 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.
\s5
\v 21 इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते.
\v 22 तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला.
\s5
\v 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता.
\v 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.
\s5
\v 25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता.
\v 26 नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
\s5
\v 27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे.
\v 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.
\s5
\v 29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.
\v 30 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता.
\s5
\v 31 नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्याला शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवताच्या भजनी लागला.
\v 32 शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली.
\v 33 अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
\s5
\v 34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
\s5
\c 17
\p
\v 1 गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीवीताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
\s5
\v 2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
\v 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
\v 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
\s5
\v 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
\v 6 रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
\v 7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला.
\s5
\v 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
\v 9 “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
\v 10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
\s5
\v 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
\v 12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
\v 13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
\s5
\v 14 इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
\v 15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
\v 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
\s5
\v 17 काही दिवसांनंतर त्या बाईचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला.
\v 18 तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा माणूस आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
\s5
\v 19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले.
\v 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
\v 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
\s5
\v 22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला.
\v 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.”
\v 24 ती बाई एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्ववारे बोलतो हे आता मला कळले.”
\s5
\c 18
\p
\v 1 तेव्हा पुष्कळ दिवसांनी, तिसऱ्या वर्षी, एलीयाकडे परमेश्वराचे वचन आले, ते असे की, “जा, आणि अहाब राजाच्या नजरेत ये आणि मग मी भूमीवर पाऊस पाडणार.”
\v 2 तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.
\s5
\v 3 अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. पण ओबद्या परमेश्वराचा फार मान राखत असे.
\v 4 जेव्हा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्नपाण्याचीहि तरतूद केली.
\s5
\v 5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”
\v 6 तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसांत वाटून घेतला, अहाब स्वत:हा एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला.
\s5
\v 7 आणि ओबद्याला वाटेत असता, एलीया अनपेक्षीतपणे त्याला भेटला. तेव्हा ओबद्याने त्याला ओळखले व जमीनीवर उपडे पडून त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
\v 8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग.”
\s5
\v 9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस?
\v 10 परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझा स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही सापडला नाहीत, असे कळले, तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली.
\v 11 आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.
\s5
\v 12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.
\v 13 ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.
\s5
\v 14 आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे, मग तो मला जीवे मारील.”
\v 15 यावर एलीया त्याला म्हणाला, “सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जीवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन.”
\s5
\v 16 तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले, आणि अहाब एलीयाला भेटण्यासाठी निघाला.
\v 17 अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”
\s5
\v 18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.
\v 19 तर आता सर्व इस्राएलला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”
\s5
\v 20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
\v 21 तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्याला अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्याला अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्याला उत्तर देऊ शकले नाही.
\s5
\v 22 मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत.
\v 23 तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही.
\v 24 तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांना उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.”
\p
\s5
\v 25 मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे देवाची नाव घ्या.”
\v 26 तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्याला हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तीच्या भोवती ते नाचू लागले.
\p
\s5
\v 27 दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरेच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्याला उठवा.”
\v 28 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले.
\v 29 दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
\s5
\v 30 मग एलीया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.
\v 31 एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते.
\v 32 परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.
\s5
\v 33 एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.”
\v 34 मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले.
\v 35 वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
\s5
\v 36 दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
\v 37 हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
\s5
\v 38 तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले.
\v 39 सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
\v 40 एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
\s5
\v 41 एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”
\v 42 तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.
\s5
\v 43 आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा समुद्र दिसेल” अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्याला पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले.
\v 44 सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाहीतर पावसामुळे त्याला थांबावे लागेल.”
\s5
\v 45 पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला.
\v 46 परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरुन घट्ट खोचले आणि थेट इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.
\s5
\c 19
\p
\v 1 अहाब राजाने घडलेली सर्व हकिकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
\v 2 तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यात मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”
\v 3 एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
\s5
\v 4 तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
\v 5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.”
\v 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
\s5
\v 7 आणखी काही वेळाने तो देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”
\v 8 तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
\s5
\v 9 तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
\v 10 एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
\s5
\v 11 यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
\v 12 धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
\s5
\v 13 एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्याला ऐकू आली.
\v 14 एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
\v 16 निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.
\s5
\v 17 हजाएल अनेक पापी माणसांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील. आणि यातूनही कोणी निसटले तर त्याला अलीशा मारील.
\v 18 एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
\s5
\v 19 तेव्हा एलीया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलीशा याच्या शोधात निघाला. अलीशा तेव्हा आपली बैलाची बारा जोते चालवून शेतजमीन नांगरत होता. एलीया आला तेव्हा अलीशा स्वत:हा बाराव्या जोतावर होता. एलीया अलीशाजवळ आला. एलीयाने मग आपला संदेष्ट्याचा खास अंगरखा अलीशावर पांघरला.
\v 20 अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्याला म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
\s5
\v 21 अलीशाने मग आपल्या आईवडीलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली. त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले त्यावर बैलांचे मांस शिजवले. सर्व लोकांना जेवायला बोलावले. मग अलीशा एलीयाच्या पाठोपाठ गेला. एलीयाचा तो मदतनीस झाला.
\s5
\c 20
\p
\v 1 बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
\v 2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे नगरात बेनहदादने दूतांकरवी निरोप पाठवला
\v 3 संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि पुत्रेही माझ्या हवाली करावी.”
\s5
\v 4 यावर इस्राएलाच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
\v 5 अहाबाकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेन-हदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
\v 6 उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. त्यांच्या डोळ्यांना जे आवडेल ते स्वत:च्या हाताने घेतील. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
\s5
\v 7 तेव्हा इस्त्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडिलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मणुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी बायका पुत्रे मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
\v 8 यावर ती वडिलधारी मंडळी आणि इतर लोक अहाबाला म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान झुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
\s5
\v 9 मग राजा अहाबाने बेन-हदादकडे निरोप्याला सांगितले की “माझा स्वामी अहाब राजास सांग” तुझी पहिली मागणी मला मान्य आहे.” पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही. बेन-हदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
\v 10 तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.”
\s5
\v 11 इस्त्राएलच्या राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये.”
\v 12 राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. “त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.”
\s5
\v 13 त्यासमयी इकडे एक संदेष्टा इस्त्राएलाचा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हस्ते या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
\v 14 अहाबाने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील”? तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल” यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?” “तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
\v 15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलाच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
\s5
\v 16 राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबाने हल्ला चढवला.
\v 17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा “शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेन-हदादच्या माणसांनी त्याला सांगितले.”
\s5
\v 18 तेव्हा बेन-हदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
\v 19 राजा अहाबाच्या तरुणांची तुकडी नगरातून बाहेर पडली आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
\s5
\v 20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अरामामधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलाच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेन-हदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
\v 21 इस्त्राएल राजाने सेनेचे नेतृत्व करून अरामाच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामाची मोठी कत्तल उडवली.
\s5
\v 22 यानंतर तो संदेष्टा इस्त्राएल राजा अहाबाकडे गेला आणि म्हणाला, “अरामाचा राजा बेन-हदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आख.”
\v 23 अरामाच्या राजाचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
\s5
\v 24 आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
\v 25 जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
\s5
\v 26 वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
\v 27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
\s5
\v 28 एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”
\s5
\v 29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.
\v 30 जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता.
\s5
\v 31 त्याचे सेवक त्याला म्हणाले, “इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.”
\v 32 त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.”
\s5
\v 33 बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जीवंत आहे” अहाब म्हणाल, “ जा आणि त्याला आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
\v 34 बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले.
\s5
\v 35 त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
\v 36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.
\s5
\v 37 मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
\v 38 त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला.
\s5
\v 39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.
\v 40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
\s5
\v 41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
\v 42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
\v 43 यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चितांग्रस्त झाला होता.
\s5
\c 21
\p
\v 1 नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या माणसाचा होता.
\v 2 एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”
\s5
\v 3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”
\v 4 तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा माणूस जे बोलला ते त्याला आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हाला देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले.
\s5
\v 5 अहाबाची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्याला म्हणाली, “तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही?”
\v 6 अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”
\v 7 ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”
\s5
\v 8 ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
\v 9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांना एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.
\v 10 नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या माणसांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.”
\s5
\v 11 ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) मंडळींनी ही आज्ञा मानली.
\v 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांना सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले.
\v 13 मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम माणसांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.
\v 14 मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.
\s5
\v 15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हाला नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” जो तो पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता नाबोथ आता जीवंत नाही मेला आहे.
\v 16 यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.
\s5
\v 17 यावेळी परमेश्वर एलीया तिश्बीशी बोलला,
\v 18 “ऊठ शोमरोनमधल्या इस्त्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे.
\s5
\v 19 अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.”
\v 20 तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.
\s5
\v 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना तो इस्त्राएलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो त्याला मी ठार करीन.
\v 22 नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहीयाचा पुत्र बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.”
\s5
\v 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, “तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेलमध्ये कुत्री तुटून पडतील.
\v 24 अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल”
\s5
\v 25 अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले.
\v 26 अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.
\s5
\v 27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
\v 28 परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला,
\v 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”
\s5
\c 22
\p
\v 1 पुढील तीन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
\v 2 तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाचा राजा याला भेटायला गेला.
\s5
\v 3 यावेळी इस्त्राएलाच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामाच्या राजाने गिलाद येथील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
\v 4 आणि इस्त्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.”
\s5
\v 5 यहोशाफाटाने इस्त्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
\v 6 तेव्हा इस्त्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”
\s5
\v 7 पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
\v 8 इस्त्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्त्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
\v 9 तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला “इम्लाचा पुत्र मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.”
\s5
\v 10 यावेळी इस्त्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्याठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
\v 11 त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे, की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
\v 12 मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
\s5
\v 13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्याला भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
\v 14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
\v 15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
\s5
\v 16 पण राजा त्याला म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?”
\v 17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
\s5
\v 18 मग इस्त्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
\v 19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.
\v 20 देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल. तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
\s5
\v 21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.
\v 22 परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील? यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल. यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईन.
\v 23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”
\s5
\v 24 मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
\v 25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
\s5
\v 26 तेव्हा इस्त्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
\v 27 आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यत त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”
\v 28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
\s5
\v 29 नंतर इस्त्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
\v 30 अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
\s5
\v 31 अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
\v 32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतीनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
\v 33 हा इस्त्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.
\s5
\v 34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”
\s5
\v 35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहात होता. त्याला एवढा रक्तस्त्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
\v 36 सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.”
\s5
\v 37 राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.
\v 38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नेमके घडले.
\s5
\v 39 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
\v 40 अहाब मरण पावला व त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
\s5
\v 41 अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र.
\v 42 यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या.
\s5
\v 43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
\v 44 यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला.
\s5
\v 45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
\v 46 त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले.
\v 47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहात असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
\s5
\v 48 राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
\v 49 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला.
\v 50 यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दाविद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला.
\s5
\v 51 अहज्या अहाबाच्या पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
\v 52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांना आणखी पापात लोटले.
\v 53 आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

1136
12-2KI.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1136 @@
\id 2KI
\ide UTF-8
\h 2 राजे
\toc1 2 राजे
\toc2 2 राजे
\toc3 2ki
\mt1 2 राजे
\s5
\c 1
\p
\v 1 अहाबाच्या मृत्यूनंतर मवाबाने इस्राएलाविरुद्ध बंड केले.
\v 2 नंतर अहज्या आपल्या शोमरोनमधल्या त्याच्या माडीवरच्या खिडकीच्या जाळीतून खाली पडला व जखमी झाला. तेव्हा अहज्याने आपल्या सेवकांना बोलावले आणि त्यांना सांगितले. “जा, आणि एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारून या, मी या दुखण्यातून बरा होईल का.”
\p
\s5
\v 3 पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “ऊठ, राजा अहज्याने शोमरोनाहून आपले काही दूत रवाना केले आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, ‘इस्राएलात देव नाही काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारायला जात आहा?
\v 4 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” मग एलीया निघून गेला.
\p
\s5
\v 5 जेव्हा दूत परत अहज्याकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?”
\v 6 ते त्याला म्हणाले, “एक मनुष्य आम्हाला भेटला व तो असे बोलला की, ‘तुम्हाला ज्या राजाने पाठवले आहे त्याच्याकडे परत जाऊन त्याला सांगा, परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलात परमेश्वर नाही काय? जो तू एक्रोनचे दैवत बआल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना विचारायला पाठवलेस? ह्यास्तव ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाहीस. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.”
\s5
\v 7 अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”
\v 8 त्यांनी त्याला उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.”
\p
\s5
\v 9 नंतर अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. सरदार एलीयाकडे वर गेला, जिथे एलीया एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या) राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”
\v 10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “जर मी देवाचा माणूस (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करून टाको.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्याच्या पन्नास जणांना भस्म केले.
\p
\s5
\v 11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार देखील एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”
\v 12 एलीयाने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “जर मी देवाचा माणूस (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करो.” पुन्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्या पन्नास माणसांना भस्म केले.
\p
\s5
\v 13 अहज्याने आणखी तिसऱ्या सरदारला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाकडे वर आला, व गुडघे टेकून एलीयाला विनवणी करून म्हणाला, “हे देवाच्या माणसा, माझा आणि माझ्याबरोबरचे हे तुझे पन्नासदास, ह्यांचा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.
\v 14 खरोखरच, आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली, पण आता माझा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.”
\p
\s5
\v 15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, तर त्याच्याबरोबर खाली जा.” तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला खाली गेला.
\v 16 एलीया अहज्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलात विचारायला परमेश्वर नाही काय? म्हणून तू ‘एक्रोनचा देव बआल-जबूबकडे विचारायला माणसे पाठवलीस? म्हणून आता, ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरशील नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.”
\p
\s5
\v 17 परमेश्वराचे जे वचन एलीयाने सांगितले होते त्याप्रमाणे राजा अहज्या मरण पावला. अहज्याला मुलगा नव्हता, याकारणामुळे अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट याचा मुलगा योराम याच्या दुसऱ्या वर्षी हे झाले.
\v 18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्याने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली नाहीत काय?
\s5
\c 2
\p
\v 1 आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
\v 2 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जीवंत आहे, व तू जीवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.
\p
\s5
\v 3 तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे मुलगे अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण ह्या विषयी बोलू नका”
\v 4 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरुन तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जीवंत आहे व तू जीवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले.
\p
\s5
\v 5 तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांची मुले अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण ह्या विषयी बोलू नका.”
\v 6 नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरुन येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जीवंत आहे व तू जीवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले.
\p
\s5
\v 7 नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले.
\v 8 तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले.
\p
\s5
\v 9 आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरुन तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
\v 10 एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
\s5
\v 11 एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
\v 12 अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
\p
\s5
\v 13 त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला.
\v 14 त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला.
\p
\s5
\v 15 तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे मुलगे जे समोर होते ते त्याला पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्याला भेटायला आले. त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.
\v 16 ते त्याला म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”
\p
\s5
\v 17 पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्याला शोधू शकले नाही.
\v 18 आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?”
\p
\s5
\v 19 त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, ह्या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”
\v 20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यात मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले.
\p
\s5
\v 21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
\v 22 अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे.
\p
\s5
\v 23 नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
\v 24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
\v 25 नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
\s5
\c 3
\p
\v 1 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.
\v 2 यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला.
\v 3 असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत.
\p
\s5
\v 4 आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे.
\v 5 पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले.
\v 6 त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र केले.
\p
\s5
\v 7 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरुद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.”
\v 8 नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले.
\p
\s5
\v 9 मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसांच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे ह्याकरता पाणी सापडले नाही.
\v 10 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?”
\p
\s5
\v 11 परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”
\v 12 यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.
\p
\s5
\v 13 अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.”
\v 14 अलीशा म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा राहतो, तो सैन्याचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता, तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते.
\p
\s5
\v 15 तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा.” आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता, परमेश्वराचा हात अलीशावर आला.
\v 16 मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा.
\v 17 कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हाला वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल, आणि तुम्ही प्याल, तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल.
\s5
\v 18 कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हाला मवाबांवरही विजय निळवून देईल.
\v 19 प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त असलेल्या अशा निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करून चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
\s5
\v 20 मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला.
\s5
\v 21 राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा, त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.
\v 22 ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकांना त्यांच्या विरूद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता, ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले.
\v 23 ते म्हणाले, “हे रक्त आहे! या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते, त्यांनी परस्परांना मारले! तर आता मवाब्यांनो त्यांना लुटायला चला.”
\s5
\v 24 मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले असता, इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्राएल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले.
\v 25 इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली, त्यांच्या प्रत्येक शेतांत दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली केली. फक्त कीर हरेसेमधे त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण गोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला.
\s5
\v 26 या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला पण त्याला ते जमले नाही.
\v 27 मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले, जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. तेव्हा इस्राएलवर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.
\s5
\c 4
\p
\v 1 आता संदेष्ट्यांच्या मुलांच्या बायकांतली एक अलीशाकडे रडत आली, आणि म्हणाली, “तुझा सेवक माझा नवरा मरण पावला आहे, आणि तुला माहित आहे की, तुझा सेवक परमेश्वराचे भय राखत होता. पण आता सावकार माझ्या दोन मुलांना त्याचा गुलाम करून घ्यायला नेण्यासाठी आला आहे.”
\v 2 तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.”
\s5
\v 3 तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण.
\v 4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.”
\s5
\v 5 मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली.
\v 6 अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण तो तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
\s5
\v 7 मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल विक आणि कर्जफेड कर, आणि उरलेल्या पैशावर तू आपल्या मुलांचा निर्वाह कर.”
\s5
\v 8 एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या बाईकडे जेवणासाठी थांबत असे.
\v 9 तेव्हा ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र माणूस आहे.
\s5
\v 10 तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यात एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला थांबायला ही खोली होईल.”
\v 11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.
\s5
\v 12 तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.
\v 13 अलीशा त्याला म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”
\s5
\v 14 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”
\v 15 मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली.
\v 16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
\s5
\v 17 पण ती बाई गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या समयी तिने मुलाला जन्म दिला.
\v 18 मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांना सोबत होता तेथे गेला.
\v 19 तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
\v 20 नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.
\s5
\v 21 तेव्हा त्या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराच्या माणसाच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली.
\v 22 तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या माणसाला भेटून येते.”
\s5
\v 23 त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.”
\v 24 मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”
\s5
\v 25 मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या माणसाकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची बाई येतेय.
\v 26 कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा नवरा, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.
\s5
\v 27 आणि तिने डोंगरावर देवाच्या माणसाजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या माणसाने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.”
\s5
\v 28 तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?”
\v 29 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्याला सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्याला उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”
\s5
\v 30 पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला.
\v 31 गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्याला म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.”
\s5
\v 32 जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मेलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते.
\v 33 अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली.
\v 34 अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.
\s5
\v 35 मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
\v 36 अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्याला सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.”
\v 37 मग तिने जमिनीपर्यत पालथे पडून त्याला नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.
\s5
\v 38 अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले होते. तो आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
\v 39 त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्याला एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.
\s5
\v 40 मग ही शाकभाजी सर्वाना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले. “देवाच्या माणसा, या भांड्यात तर मरण आहे.” त्यांना ते खाता येईना.
\v 41 तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर त्याने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्यात काही अपायकारक राहिले नाही.
\s5
\v 42 बआल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या माणसासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.”
\v 43 त्याचा सेवक म्हणाला, “शंभर माणसांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”
\v 44 मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच.
\s5
\c 5
\p
\v 1 नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.
\v 2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या बायकोची दासी झाली.
\s5
\v 3 ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.”
\v 4 कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे.
\s5
\v 5 त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले.
\v 6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यात लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.
\s5
\v 7 इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, “मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे.”
\s5
\v 8 राजाने कपडे फाडले हे अलीशा संदेष्ट्याने ऐकले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू आपले कपडे का फाडलेस? त्याला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलामध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”
\v 9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला.
\v 10 अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.”
\s5
\v 11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.
\v 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
\s5
\v 13 मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? ‘स्नान करून शुध्द हो, एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?”
\v 14 तेव्हा त्याने देवाचा माणसाच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला.
\s5
\v 15 नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या माणसाकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
\v 16 पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
\s5
\v 17 तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही.
\v 18 परमेश्वराने मला एकागोष्टींची क्षमा करावी. अरामाचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी.
\v 19 तेव्हा अलीशा त्याला म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला.
\s5
\v 20 तो थोडी वाट चालून गेल्यावर अलीशा याचा नोकर गेहजी याने विचार केला, “पाहा, माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून भेट न स्विकारता त्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मीच त्यामागे धावत जाऊन त्याजपासून काहीतरी घेतो.”
\v 21 मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला तो रथातून काही उतरला व म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
\v 22 गेहजी म्हणाला, “हो, सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी आणि दोन पोशाख द्या.”
\s5
\v 23 नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या.
\v 24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. गेहजीने मग हा ऐवज आपल्या घरात लपवला.
\v 25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कोठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कोठेच गेलो नव्हतो.”
\s5
\v 26 अलीशा त्याला म्हणाला, “नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय?”
\v 27 नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.
\s5
\c 6
\p
\v 1 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते.
\v 2 यार्देन नदीवर जाऊन आम्ही एकेकजण एकेक तुळई आणू आणि आपल्यासाठी तिथे राहायला आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. अलीशा म्हणाला, जा आणि कामाला लागा.”
\v 3 एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
\s5
\v 4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि लाकडे तोडायला लागले.
\v 5 तुळई तोडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ती उसनी मागून आणली होती.”
\s5
\v 6 नंतर देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” तेव्हा त्याने, ती जागा दाखवली. तेव्हा अलीशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले. त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले.
\v 7 अलीशा म्हणाला, “ते उचलून घे.” मग त्याने पुढे हात करून ते उचलले.
\s5
\v 8 अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”
\v 9 पण तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा.” त्याठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे.
\s5
\v 10 ज्याठिकाणी जाऊ नकोस असा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवला होता, तेथे त्याने आपली माणसे पाठवली. असा आपला बचाव त्याने एकदोनदा नाहीतर अनेकदा केला होता.
\v 11 यावरून अरामाच्या राजाला संताप आला. त्याने पुन्हा आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
\s5
\v 12 तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, कोणीही हेर नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलाचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला सांगतो.”
\v 13 तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
\s5
\v 14 मग अरामाच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
\v 15 अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथ व घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करावे?”
\v 16 अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!”
\s5
\v 17 आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
\v 18 हे अग्नीरथ आणि अग्रीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, “तू या लोकांना आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
\v 19 अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
\s5
\v 20 ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले.
\v 21 इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
\s5
\v 22 अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
\v 23 इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याच्या टोळ्या इस्राएलावर आल्या नाहीत.”
\s5
\v 24 यानंतर, अरामाचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
\v 25 त्यामुळे शोमरोनामध्ये महगाई वाढली. गाढवाचे मुंडके ऐंशी रुपयांना आणि कबुतराची पावशेर विष्ठा पांच रुपयांना विकली जाऊ लागली.
\v 26 इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
\s5
\v 27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून ?”
\v 28 मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.
\v 29 तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ. पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
\s5
\v 30 बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की त्याने आपले कपडे फाडले. तो तेथून पुढे गेला तेव्हा त्याने गोणताट घातलेले लोकांनी पाहिले
\v 31 राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
\s5
\v 32 राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्याला लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!”
\v 33 अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?”
\s5
\c 7
\p
\v 1 अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.
\v 2 तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशा त्याला म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”
\s5
\v 3 वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहात इथे कशाला बसलो अहोत?
\v 4 शोमरोनात अन्नाचा दुष्काळ आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ.
\s5
\v 5 तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही.
\v 6 परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांना आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलाच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते.”
\s5
\v 7 आणि अरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळीच तेथून पळ काढला. आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसेच टाकून ते ते आपला जीव घेऊन तेथून पळाले.
\v 8 शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणेपिणे केले. तिथले कपडेलत्ते आणि सोनेचांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली.
\s5
\v 9 आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडेपर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाहीतर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची वर्दी देऊ.”
\v 10 मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारुन म्हणाले, “आम्ही अराम्यांच्या छावणीवर गेलो होतो, पण तिथे कोणाचीच चाहूल लागली नाही. एकही माणूस तिथे नव्हता. तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती. माणसांचा मात्र पत्ता नव्हता.”
\v 11 तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करून राजाच्या महालातील लोकांना ही खबर दिली.
\s5
\v 12 रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहित आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”
\v 13 यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. इस्त्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्या माणसासारखी त्यांची गती होईल.”
\s5
\v 14 तेव्हा दोन रथ जोडून काही माणसे निघाली. राजाने त्यांना अरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायला सांगितले.
\v 15 हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदीपर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाईघाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तू टाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.
\s5
\v 16 तेव्हा ते लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांना एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.
\v 17 आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा त्या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा देवाच्या माणसाने जे सांगितले त्यानुसार हे घडले.
\s5
\v 18 अलीशाने राजाला सांगितले होते, “लोकांना मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”
\v 19 पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.”
\v 20 त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नेमके तसेच झाले. लोक वेशीपाशी त्याला तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला.
\s5
\c 8
\p
\v 1 अलीशामुळे जो मुलगा जीवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”
\v 2 तेव्हा देवाच्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली.
\s5
\v 3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.
\v 4 अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.”
\s5
\v 5 अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती बाई राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती बाई आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”
\v 6 राजाने त्या बाईची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”
\s5
\v 7 अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्याला सांगितले, “आपल्या इथे एक संदेष्टा आला आहे.”
\v 8 तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वराला विचारायला त्याला सांग.”
\v 9 तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”
\s5
\v 10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील. पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
\v 11 एवढे बोलून मग देवाच्या माणसाने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला.
\v 12 हजाएलने त्याला विचारले, “माझ्या स्वामी, तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहित आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”
\s5
\v 13 हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
\v 14 मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”
\v 15 पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.
\s5
\v 16 यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला.
\v 17 त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरुशलेमेवर त्याने आठ वर्षे राज्य केले.
\s5
\v 18 पण इस्राएलच्या इतर राजाप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची बायको अहाबाची मुलगी होती.
\v 19 पण परमेश्वराने आपला सेवक दाविद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते.
\s5
\v 20 यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितूरी करून यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली.
\v 21 तेव्हा यहोराम आपले सर्व रथ व अधिकाऱ्यास घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्याला वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामाचे लोक पळाले आणि घरी परतले.
\s5
\v 22 अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.
\v 23 “यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे.
\v 24 यहोराम मरण पावला आणि दाविद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.
\s5
\v 25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला.
\v 26 त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी.
\v 27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाच्या जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.
\s5
\v 28 अहाबाच्या मुलगा योराम यासह अहज्या रामोथ गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले.
\v 29 आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्याला भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.
\s5
\c 9
\p
\v 1 अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा.
\v 2 येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
\v 3 त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे, असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
\s5
\v 4 तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे आला
\v 5 येथे पोचल्यावर त्याला सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
\v 6 यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.”
\s5
\v 7 तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
\v 8 म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.
\s5
\v 9 नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन.
\v 10 “ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.”
\s5
\v 11 येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो माणूस कोण आणि त्याचा संदेश तुम्हाला माहित आहेच.”
\v 12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”
\v 13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
\s5
\v 14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
\v 15 राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
\v 16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता.
\s5
\v 17 इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
\v 18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”
\s5
\v 19 तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
\v 20 पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.
\s5
\v 21 योथामाने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली.
\v 22 येहूला पाहून योरामाने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
\s5
\v 23 योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
\v 24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहुंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
\s5
\v 25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना?
\v 26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन. प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
\s5
\v 27 यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
\v 28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरुशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दाविद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
\s5
\v 29 अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
\s5
\v 30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.
\v 31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेस काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”
\v 32 येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
\s5
\v 33 येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरुन चालून गेले.
\v 34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
\s5
\v 35 लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
\v 36 तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलिया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.
\v 37 शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांना तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”
\s5
\c 10
\p
\v 1 शोमरोनात अहाबाला सत्तर मुलगे होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.
\v 2 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे.
\v 3 तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्याला त्याच्या बापाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”
\s5
\v 4 पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुध्द येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्याला अडवणार?”
\v 5 मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
\s5
\v 6 येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.
\v 7 या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर जणांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या.
\s5
\v 8 निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्याला येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.”
\v 9 सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्याला ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.
\s5
\v 10 परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.”
\v 11 आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
\s5
\v 12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.
\v 13 यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”
\v 14 तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वाना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
\s5
\v 15 तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.
\v 16 येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कटता आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला.
\v 17 शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबीय अजून जिवंत होते त्या सर्वाना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
\s5
\v 18 येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे.
\v 19 आता बआलाच्या सर्व संदेष्टयांना आणि याजकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बआलाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यात कोणीही गैरहजर असता कामा नये. बआलसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्याला मी ठार करीन हे नक्की,” येहूची ही सर्व बतावणी होती. त्याला बआलाच्या पूजकांचा संहार करायचा होता.
\v 20 येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा पुरोहितांनी त्याची घोषणा केली.
\s5
\v 21 येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
\v 22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली.
\s5
\v 23 मग येहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बआलाच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बालाच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बालाची पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.”
\v 24 यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
\s5
\v 25 स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बआलाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले
\v 26 स्मृतिस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बआलाची देऊळ जाळले.
\v 27 बआलाच्या स्मृतिस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बालाच्या देवळाचाही विध्वस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.
\v 28 अशा प्रकारे इस्राएलमधली बआलाची पूजा येहूने मोडून काढली.
\s5
\v 29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
\v 30 परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
\v 31 पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन:पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत:ला थोपवू शकला नाही.”
\s5
\v 32 याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
\v 33 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यात आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
\s5
\v 34 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.
\v 35 येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.
\v 36 येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
\s5
\c 11
\p
\v 1 तिने अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली.
\v 2 पण यहोशेबा, ही राजा योरामाची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
\v 3 योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.
\s5
\v 4 सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
\v 5 यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.
\v 6 आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.
\s5
\v 7 आणि शब्बाथ दिवसाला जे सेवा नाही करत, तुमच्यापैकी असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील.
\v 8 राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”
\s5
\v 9 याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. जी श्ब्बाथात आत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.
\v 10 याजक यहोयादाने शेकडो भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दाविद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.
\s5
\v 11 मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत.
\v 12 मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्याला राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला.
\s5
\v 13 हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
\v 14 राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
\s5
\v 15 हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
\v 16 मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
\s5
\v 17 यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यात म्हटले होते.
\v 18 यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
\s5
\v 19 सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.
\v 20 लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.
\s5
\v 21 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
\s5
\c 12
\p
\v 1 येहूच्या सातव्या वर्षी योवाश राज्य करू लागला. त्याने यरुशलेमेवर चाळीस वर्षे राज्य केले. योवाशाच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती.
\v 2 योवाशाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.
\v 3 पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.
\s5
\v 4 योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची पवित्र वस्तूंचा जो काही येईल तो सर्व पैसा, कोणी शिरगणती झाली त्याचा पैसा, आणि परमेश्वराच्या घरात आणायला कोण्याच्या मनात येईल तो सगळा पैसा.
\v 5 याजकाने आपापल्या करदात्यांच्या कडून मिळालेले पैसे घ्यावे आणि परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेत तर या पैशातून तिची दुरुस्ती करावी.”
\s5
\v 6 पण योवाश राजाच्या तेविसाव्या वर्षीही याजकांनी मंदिराची दुरुस्ती केली नाही.
\v 7 तेव्हा मात्र राजा योवाशाने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”
\v 8 याजकांनी लोकाकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले.
\s5
\v 9 तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.
\v 10 मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत.
\s5
\v 11 मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते.
\v 12 दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडविणे आणि परमेश्वराच्या मंदिरासाठी दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.
\s5
\v 13 लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण ते चांदीची उपकरणी, कात्र्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके त्या पैशातून करण्यात आले नव्हते,
\v 14 तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करत.
\s5
\v 15 कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशेब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.
\v 16 परंतु दोषार्पणाचा पैसा व पापार्पणाचा पैसा परमेश्वराच्या घरात त्यांनी आणला नाही, कारण तो याजकांचा होता.
\s5
\v 17 हजाएल अरामाचा राजा होता. तो गथवर स्वारी करून गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमेवर चढाई करायचा विचार करु लागला.
\v 18 योवाशाच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच पवित्र गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशानेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशाने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामाचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमेला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
\s5
\v 19 “यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात योवाशाच्या थोर कृत्यांची नोंद आहे.
\v 20 योवाशाच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशाचा वध केला.
\v 21 शिमाथचा मुलगा योजाखार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशाचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले. दाविद नगरात लोकांनी योवाशाला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशाचा मुलगा अमस्या त्यानंतर राज्य करु लागला.
\s5
\c 13
\p
\v 1 अहज्याचा मुलगा योवाश यहूदाचा राजा, याच्या तेविसाव्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने सतरा वर्षे राज्य केले.
\v 2 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली, त्याने ती सोडली नाही.
\s5
\v 3 तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
\v 4 तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली, तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
\v 5 मग परमेश्वराने इस्राएलाला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
\s5
\v 6 तरीही यराबामाच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांना करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
\v 7 अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.
\s5
\v 8 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
\v 9 पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्याला पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
\s5
\v 10 यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
\v 11 परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
\s5
\v 12 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
\v 13 योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
\s5
\v 14 आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याला भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
\v 15 तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले
\v 16 मग अलीशा इस्त्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
\s5
\v 17 अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
\v 18 अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
\v 19 अलीशा संदेष्टा योवाशावर रागावला. तो त्याला म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्याना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
\s5
\v 20 अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्याला पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
\v 21 काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
\s5
\v 22 यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
\v 23 पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
\v 24 अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.
\v 25 मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशाचे वडिल यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशाने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशाने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.
\s5
\c 14
\p
\v 1 इस्राएलचा राजा, यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या दुसऱ्या वर्षी, योवाशाचा मुलगा अमस्या यहूदावर राज्य करू लागला.
\v 2 अमस्या राज्य करु लागला तेव्हा, पंचवीस वर्षांचा होता; अमस्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती.
\v 3 परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले, तरीही त्याचा बाप दाविद याच्या सारखे नाही. आपले वडिल योवाश यानी जे केले, तेच सर्व त्याने केले.
\s5
\v 4 तरी उंचवट्यावरील पूजास्थळे नष्ट केली नव्हती. लोक त्याठिकाणी अजूनही यज्ञ करीत व धूप जाळीत होते.
\v 5 आणि असे झाले की, त्याचा बाप जो राजा होता त्या राज्यावर त्याची चांगली पकड असातानाच, आपल्या वडिलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला.
\s5
\v 6 परंतु त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही, त्याऐवजी त्याने मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, परमेश्वराने जी आज्ञा केली की: “मुलांच्या गुन्ह्या करता आईवडीलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडीलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. त्याऐवजी अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
\v 7 त्याने मिठाच्या खोऱ्यात दहाहजार अदोम्यांना मारले, ह्या व्यतिरीक्त या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “यकथेल” ठेवले. अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
\s5
\v 8 त्यानंतर येहूचा मुलगा यहोआहाज याचा मुलगा, इस्राएलाचा राजा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. त्यात असे म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
\v 9 तेव्हा इस्त्राएलाचा राजा योवाशाने यहूदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, “लबानोनातल्या काटेरी झुडुपाने लबानोनातल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको करून दे.” पण लबानोनातल्या एका वन्यपशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून टाकले.
\v 10 “तू अदोमचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी राहा, तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल असा तू अरिष्टांशी झगडा का करावा?”
\s5
\v 11 परंतू अमस्याने काही ऐकले नाही. म्हणून इस्राएलचा राजा योवाश याने हल्ला केला, तो व यहूदाचा राजा अमस्या हे यहूदाच्या बेथ-शेमेन येथे एकमेकांसमोर भेटले.
\v 12 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. आणि प्रत्येक माणूस आपापल्या घरी पळाले.
\s5
\v 13 इस्राएलचा राजा योवाश याने अहज्याचा मुलगा यहोआश याचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा, याला बेथ-शेमेश येथे पकडून त्याला यरुशलेमेस नेले. यरुशलेमेत आल्यावर त्याने यरुशलेमच्या तटबंदीला एफ्राईमाच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ-जवळ चारशे फुटांची भींत पाडून टाकली.
\v 14 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशाने लुटली. आणि ओलीस ठेवण्याकरीता माणसे घेऊन मग तो शोमरोनास परतला.
\s5
\v 15 यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशाने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
\v 16 नंतर योहोआश आपल्या पूर्वजांबरोबर झोपी गेला आणि शोमरोनात इस्राएलांच्या राजांबरोबर त्याला पुरण्यात आले. योवाशानंतर त्याचा मुलगा यराबाम त्याच्याजागी गादीवर आला.
\s5
\v 17 यहोआहाज याचा मुलगा योवाश, इस्राएलचा राजा याच्या मृत्यूनंतर, योवाशाचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा पंधरा वर्षे जगला.
\v 18 अमस्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
\v 19 त्यांनी यरुशलेमामध्ये अमस्याविरुध्द कट केला, तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्यामागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्याला जिवे मारले.
\s5
\v 20 त्यांनी त्याला घोड्यावर लादून आणले, आणि यरुशलेमेत दाविदाच्या नगरात त्याला त्याच्या पूर्वजांच्या सोबत पुरले.
\v 21 यहूदाच्या सर्व लोकांनी त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.
\v 22 राजा अमस्याच्या त्याच्या पूर्वजांबरोबर निजल्यानंतर. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
\s5
\v 23 यहूदाचा राजा, योवाशाचा मुलगा अमस्या याच्या पंधराव्या वर्षापासून इस्राएलाचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनांत राज्य करू लागला. त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले.
\v 24 त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. नबाटचा मुलगा यराबाम याची पापे, जी त्याने इस्राएलाला करायला लावली त्यातील कोणत्याही पापापासून तो फिरला नाही.
\v 25 त्याने इस्रएलाच्या लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत भूमी परत घेतली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयाचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणेच हे घडले.
\s5
\v 26 इस्राएलचे दु:ख फार कडू आहे. दास काय व स्वतंत्र काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, आणि इस्राएलाला साहाय्य करणारा कोणीच नाही असे परमेश्वराने पाहिले.
\v 27 आणि इस्राएलचे नाव आकाशाखालून पुसून टाकू असे परमेश्वर म्हणाला नाही. त्याऐवजी परमेश्वराने योवाशाचा मुलगा यराबाम याच्यामार्फत इस्राएलाला तारले.
\s5
\v 28 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यराबामाच्या पराक्रमांची नोंद आहे. त्याचा पराक्रम, तो कसा लढला आणि दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला कशी घेतले. ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती.
\v 29 यराबाम आपल्या पूर्वज इस्राएलचे राजे यांच्याबरोबर निजला, आणि यराबामाचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.
\s5
\c 15
\p
\v 1 इस्राएलचा राजा यराबाम याच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राज्य करू लागला.
\v 2 अजऱ्या राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. आणि त्याने यरुशलेमामध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या असून ती यरुशलेमामधली होती.
\v 3 अजऱ्याचे वर्तन आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडिल अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
\s5
\v 4 उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत, त्याठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
\v 5 परमेश्वराने राजाला दु:ख दिले आणि अजऱ्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
\s5
\v 6 अजऱ्याच्या राहिलेल्या गोष्टी, आणि त्याने जे केले, ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
\v 7 आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्याला दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.
\s5
\v 8 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.
\v 9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.
\s5
\v 10 मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्याला लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.
\v 11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
\v 12 अशा रीतीने परमेश्वराचा जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.
\s5
\v 13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा, यहूदाचा राजा उज्जीया याचे एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात एक महिना राज्य केले.
\v 14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून वर शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा मुलगा शल्लूम याला मारून ठार केले आणि स्वत: त्याच्या जागेवर राजा झाला.
\s5
\v 15 आणि शल्लूमच्या राहिलेल्या गोष्टी, त्याने केलेला कट, हे सर्व इस्राएल राजाच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले आहे.
\v 16 मनहेमने तिरसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्याला नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.
\s5
\v 17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.
\v 18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली, त्यापासून ते फिरला नाही.
\s5
\v 19 अश्शूरचा राजा पूल देशावर आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे, या इराद्याने मनहेमने पूलला हजार किक्कार चांदी दिली.
\v 20 हा पैसा उभा करायला मनहेमने इस्राएलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला पन्नास शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
\s5
\v 21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नाही काय?
\v 22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांसोबत झोपी गेला. त्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
\s5
\v 23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
\v 24 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध:पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
\s5
\v 25 रमल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरूद्ध कट करून त्याला शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.
\v 26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
\s5
\v 27 रमल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले.
\v 28 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध:पात झाला, त्या पापांपासून तो फिरला नाही.
\s5
\v 29 पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करून अश्शूरला नेले.
\v 30 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी, एला याचा मुलगा होशे याने रमल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला.
\v 31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
\s5
\v 32 रमल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया याचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला.
\v 33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकाची मुलगी यरुशा ही त्याची आई.
\s5
\v 34 आपले वडिल उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
\v 35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने एक वरचा दरवाजा बांधला.
\v 36 यहूदाच्या राजाचा इतिहास, या पुस्तकात योथामाने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
\v 37 अरामाचा राजा रसीन आणि रमल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्युक्त केले.
\v 38 योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दाविद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.
\s5
\c 16
\p
\v 1 इस्राएलचा राजा रमल्याचा मुलगा पेकह याच्या सतराव्या वर्षी, योथामाचा मुलगा आहाज यहूदावर राज्य करू लागला.
\v 2 आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये वाईट म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दाविद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करत नसे.
\s5
\v 3 त्याऐवजी तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गात चालला. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांपुढून घालवली होती, त्यांच्या तिरस्करणीय कर्मांस अनुसरून त्याने आपल्या मुलाचे अग्नीतून अर्पण केले
\v 4 तो उंचस्थळी, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळत असे.
\s5
\v 5 अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमल्याचा मुलगा पेकह यरुशलेमेवर स्वारी करून आले. आणि त्यांनी आहाजला घेरले, पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.
\v 6 अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहूद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
\s5
\v 7 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास व तुझा मुलगा आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करून आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला वर ये आणि मला वाचव.”
\v 8 आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
\v 9 तेव्हा अश्शूरच्या राजाने आहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले.
\s5
\v 10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेव्हा तेथील वेदी त्याने पाहिली आणि तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.
\v 11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
\v 12 मग राजा दिमिष्काहून आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर यज्ञ अर्पण केला.
\s5
\v 13 त्या वेदीवर त्याने होमार्पण आणि अन्नार्पण केले. त्याचे पेयार्पण ओतले तसेच शांती अर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले.
\v 14 जी पितळी वेदी परमेश्वराच्या समोर होती, ती त्याने आपली वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामधून, काढली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
\s5
\v 15 मग राजा आहाजाने उरीया याजकाला आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, देशातील सर्व लोकांचे होमार्पण व त्यांचे अन्नार्पण व त्यांची पेयार्पणे, राजाचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्यासाठी असावी.”
\v 16 उरीया याजकाने आहाज राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
\s5
\v 17 मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि गंगाळ काढले आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.
\v 18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशही त्याने अश्शूरच्या राजासाठी परमेश्वराच्या मंदिरापासून फिरवला.
\s5
\v 19 यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.
\v 20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दाविदाच्या नगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.
\s5
\c 17
\p
\v 1 यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले.
\v 2 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
\v 3 अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्याला खंडणी भरून दिली.
\s5
\v 4 पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करून कैदेत टाकले.
\v 5 मग अश्शूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनला तीन वर्षे वेढा घातला.
\v 6 होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांना त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी लोकांच्या नगरात ठेवले.
\s5
\v 7 परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरूद्ध पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले.
\v 8 आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत.
\s5
\v 9 इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली.
\v 10 प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले.
\s5
\v 11 आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि यहोवाला संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला.
\v 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
\s5
\v 13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हाला पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.”
\s5
\v 14 पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला.
\v 15 परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांना आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते.
\s5
\v 16 आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ति केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.
\v 17 त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.
\v 18 म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही.
\s5
\v 19 यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले.
\v 20 त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देउन लुटारुंच्या हाती दिले.
\s5
\v 21 त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले.
\v 22 यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही.
\v 23 अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सागिंतल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.
\s5
\v 24 अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले.
\v 25 आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला.
\v 26 मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांना मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.”
\s5
\v 27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत, त्यातील कोण्याएकाला तिथे घेऊन जा. आणि त्याला तिथे राहू द्यावे व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा.
\v 28 तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
\s5
\v 29 परंतू प्रत्येक राष्ट्राने स्वत:चे देव केले, आणि त्यांना शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पूजास्थळामध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वत:च्या राहण्याच्या नगरात असेच केले.
\v 30 बाबेल लोकांनी सुक्कोथ-बनोथ ही दैवते केली; कूथातील लोकांनी नेरगल केला; हमाथमधील लोकांनी अशीमा केली,
\v 31 अव्वी यांनी निभज आणि तर्ताक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बळी दिला.
\s5
\v 32 ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी, उंचस्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत.
\v 33 ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रा प्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले.
\s5
\v 34 आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराने आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही.
\v 35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका.
\s5
\v 36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा.
\v 37 त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये.
\v 38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
\s5
\v 39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटातून सोडवील.”
\v 40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.
\v 41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुलेबाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
\s5
\c 18
\p
\v 1 आणि एलाचा मुलगा होशे, जो इस्राएलाचा राजा, याच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिज्कीया राज्य करू लागला.
\v 2 हिज्कीया पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करू लागला. आणि त्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी होती.
\v 3 परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते तो करीत असे, आपला पूर्वज दाविद करीत असे त्याप्रमाणे हिज्कीयाही सर्वकाही करत असे.
\s5
\v 4 त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतिस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्रएलाचे लोक त्याला धूप जाळत असत. ते त्याला “नहुश्तान” असे म्हणत.
\v 5 इस्राएलचा देव परमेश्वर ह्यांच्यावर हिज्कीयाने भरवसा ठेवला होता, म्हणून त्याच्यासारखा राजा यहूदाच्या राजांमध्ये त्याच्याआधी किंवा त्याच्यानंतरही झाला नाही.
\s5
\v 6 तो परमेश्वराला धरून राहिला. त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.
\v 7 म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.
\v 8 त्याने गज्जा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांचा पराभव केला. त्याने पहारेकऱ्यांच्या बुरूजा पासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.
\s5
\v 9 आणि हिज्कीया राजाच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्याला वेढा घातला.
\v 10 तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.
\s5
\v 11 मग अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले.
\v 12 त्यानी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.
\s5
\v 13 हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.
\v 14 तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करील.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली.
\v 15 तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्याला दिली.
\s5
\v 16 मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले.
\v 17 पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरुशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरुशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.
\v 18 त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.
\s5
\v 19 तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, “अश्शूराचा महान राजा हिज्कीयास काय म्हणतो हे सांगा; तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस?
\v 20 तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरुद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?
\v 21 पाहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरवसा ठेवतोस, अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जे कोणी मिसराचा राजा फारो ह्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे.
\p
\s5
\v 22 तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरुशलेमेला म्हटले की, फक्त यरुशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?
\v 23 तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.
\s5
\v 24 माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
\v 25 मी यरुशलेमचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर.”
\s5
\v 26 तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नको. कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
\v 27 पण रब-शाके त्यांना म्हणाला, “प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
\s5
\v 28 मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”
\v 29 राजा असे म्हणतो, हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.
\v 30 तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.
\s5
\v 31 पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूराचा राजा म्हणतो माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
\v 32 पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याच्या व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीचा मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यात मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहात आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
\s5
\v 33 इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
\v 34 कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का?
\v 35 इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का?”
\p
\s5
\v 36 पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
\v 37 हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी, व चिटणीस शेबना आणि आसाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले. अश्शूराचा सेनापती रब-शाके काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
\s5
\c 19
\p
\v 1 हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 2 त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले.
\s5
\v 3 ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.
\v 4 परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्याला जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.”
\s5
\v 5 तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले.
\v 6 आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.
\v 7 पाहा, मी आता त्याच्यांत एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्याला तलवारीने मरण येईल असे मी करणार.”
\s5
\v 8 नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्याला अश्शूराचा राजा लिब्नाविरुध्द लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले.
\v 9 मग कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे असे सन्हेरीब याने ऐकले. तेव्हा त्याने राजा हिज्कीयाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले,
\s5
\v 10 यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
\v 11 अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.
\s5
\v 12 त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.
\v 13 हमाथ, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इळा नगराचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुरळा उडाला आहे.”
\s5
\v 14 हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.
\v 15 परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
\s5
\v 16 परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
\v 17 खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.
\v 18 तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. माणसाने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ति होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.
\s5
\v 19 तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.”
\s5
\v 20 आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.”
\v 21 “सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरुशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरुशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.”
\v 22 पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला क:पदार्थ लेखलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
\s5
\v 23 परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
\v 24 मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”
\s5
\v 25 तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
\v 26 तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
\s5
\v 27 तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे.
\v 28 माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”
\s5
\v 29 “मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.”
\v 30 यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.
\v 31 कारण काहीजण बचावतील. ते यरुशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
\s5
\v 32 “अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
\v 33 तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
\v 34 या नगराचे रक्षण करून त्याला मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविद याच्यासाठी मी हे करीन.”
\s5
\v 35 त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
\v 36 तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.
\v 37 एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्याला तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.
\s5
\c 20
\p
\v 1 याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.”
\v 2 तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला.
\v 3 “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला.
\s5
\v 4 यशया मधला चौक ओलांडून बाहेर शहराच्या जाण्यापूर्वी पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
\v 5 “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्याला म्हणावे, “तुझा पूर्वज दाविद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
\s5
\v 6 तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दाविद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.”
\v 7 मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
\s5
\v 8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?”
\v 9 यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”
\s5
\v 10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसे नको, ती दहा पावले मागे यावी.”
\v 11 मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
\s5
\v 12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे त्याने ऐकले होते.
\v 13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या माणसांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तु दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.
\s5
\v 14 तेव्हा यशया संदेष्टा राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?” हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.”
\v 15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?” हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”
\s5
\v 16 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक.
\v 17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे.
\v 18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.”
\s5
\v 19 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”
\v 20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
\v 21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
\s5
\c 21
\p
\v 1 मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
\v 2 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
\v 3 हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
\s5
\v 4 आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरुशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
\v 5 या खेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
\v 6 आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
\s5
\v 7 मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दाविद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
\v 8 इस्राएल लोकांना या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली, तर त्यांची इथेच या भूमीत वसती राहील.”
\v 9 पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
\s5
\v 10 तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
\v 11 “यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यापेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
\v 12 तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरुशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांना धक्का बसेल.
\s5
\v 13 शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.
\v 14 मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.
\v 15 मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
\s5
\v 16 शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”
\v 17 मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.
\v 18 मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
\s5
\v 19 आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
\v 20 आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
\s5
\v 21 तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
\v 22 आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
\v 23 आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.
\s5
\v 24 आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
\v 25 आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
\v 26 उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.
\s5
\c 22
\p
\v 1 योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकाथमधील अदाया याची मुलगी.
\v 2 योशोयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दाविद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.
\s5
\v 3 मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस, याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले.
\v 4 “तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.
\v 5 परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा.
\s5
\v 6 सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.
\v 7 पण त्यांना दिलेल्या पैशाचा हिशेब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.”
\s5
\v 8 महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.
\v 9 शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करून तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.”
\v 10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले.
\s5
\v 11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली.
\v 12 मग राजाने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की,
\v 13 “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.
\s5
\v 14 मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”
\v 15 तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा,
\v 16 “परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.”
\s5
\v 17 यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला, त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल.
\v 18 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस.
\v 19 तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमेवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत.
\s5
\v 20 “ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करून देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमेवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.” मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.
\s5
\c 23
\p
\v 1 राजा योशीया याने यहूदा आणि यरुशलेम येथील सर्व वडिलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले.
\v 2 मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरुशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य माणसापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.
\s5
\v 3 स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. “त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले.” पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
\s5
\v 4 मग बआलदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरुशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली व त्यांची राख बेथेल येथे नेली.
\v 5 यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरुशलेमासभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बआल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.
\s5
\v 6 योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ काढून तो यरुशलेमेबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकले. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली.
\v 7 परमेश्वराच्या मंदिरातील पुरुष वेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने तयार करत असत.
\s5
\v 8 योशीयाने यहूदा नगरातील सर्व याजक आणले व गेबापासून बैर-शेब्यापर्यंत ज्या उंचस्थानात धूप जाळला होता ती भ्रष्ट केली. दरवाजांची उंचस्थाने, जो नगराचा अधिकारी यहोशवा याच्या वेशींच्या प्रवेशाजवळ होती ती त्याने मोडली.
\v 9 तरी याजक परमेश्वराची वेदी जी यरुशलेमेत होती तीच्याकडे चढून जात नव्हते, पण आपल्या भावांमध्ये बेखमीर भाकरी खात होते. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरुशलेमेला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली.
\s5
\v 10 हिन्नोमच्या मुलाचे खोरे याठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले.
\v 11 पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ यहूदाच्या राजाने दिले होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
\s5
\v 12 आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करून किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्नावशेष टाकून दिले.
\v 13 यरुशलेमाजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर इस्त्राएलाचा राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती. सीदोन्यांची अमंगळ दैवत अष्टारोथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगल देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली.
\v 14 त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत माणसांच्या अस्थी पसरुन टाकल्या.
\s5
\v 15 नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामाने इस्राएलाला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करून त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला.
\v 16 योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.
\s5
\v 17 योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्याला सांगितले, “हे यहूदातून आलेल्या संदेष्ट्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करून टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”
\v 18 तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका तेथील अस्थी हलवू नका.”
\s5
\v 19 शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने ह्या दैवतांची गत करून टाकली.
\v 20 शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर माणसांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करून मग तो यरुशलेमेला परतला.
\s5
\v 21 राजा योशीयाने सर्व लोकांना आज्ञा केली, “करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.”
\v 22 इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता.
\v 23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वराला उद्देशून यरुशलेमेत वल्हांडण सण साजरा केला.
\s5
\v 24 यहूदा आणि यरुशलेमामध्ये लोक पुजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले.
\v 25 योशीयासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशीया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला मोशेच्या कराराचे पालन योशीयाइतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते. आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही.
\s5
\v 26 पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्याला राग होता.
\v 27 परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदाना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन. माझे नाव राखणारी जागा असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”
\s5
\v 28 “यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकिकत आहे.”
\v 29 योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करून गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्याला पाहिले आणि ठार केले.
\v 30 योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमेला आणला. त्याला त्याच्या कबरीत पुरले. मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्याला पुढचा राजा केले.
\s5
\v 31 यहोआहाज तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल लिब्नाच्या यिर्मया याची ती मुलगी.
\v 32 यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते.
\v 33 फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजाला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजाला यरुशलेमामध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून साडेसात हजार पौंड चांदी आणि पंचाहत्तर पौंड सोने जबरदस्तीने वसूल केले.
\s5
\v 34 फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला.
\v 35 यहोयाकीमाने फारोला सोनेचांदी दिले तरी फारो नखोयास देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमाने मग फारो नखोयास पैसे दिले.
\s5
\v 36 यहोयाकीम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा. ती रुमा येथील पदाया याची मुलगी.
\v 37 यहोयाकीमचे वर्तन परमेश्वराला न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.
\s5
\c 24
\p
\v 1 यहोयाकीमाच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमाने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.
\v 2 यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे घडेल म्हणून सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडत होते. यहूदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.
\s5
\v 3 यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसा व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.
\v 4 मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
\s5
\v 5 यहोयाकीमाने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे.
\v 6 यहोयाकीमाच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
\s5
\v 7 मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत, पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरदेश सोडून आला नाही.
\s5
\v 8 यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी.
\v 9 यहोयाखीनाने आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.
\s5
\v 10 यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेम नगराला वेढा दिला.
\v 11 नंतर नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा या नगरात आला.
\v 12 यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनाची आई, त्याचे कारभारी, वडिलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनाला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
\s5
\v 13 यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. इस्त्राएलाचा राजा शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.
\v 14 नबुखद्नेस्सरने यरुशलेमामधली सगळी वडिलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
\s5
\v 15 यहोयाखीनाला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही यरुशलेमेत त्याचे कैदी होते.
\v 16 सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना राजाने बाबेलला कैदी म्हणून नेले.
\v 17 बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
\s5
\v 18 सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी.
\v 19 सिद्कीया यहोयाकीमाप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला.
\v 20 तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली. नंतर सिद्कीयाने बाबेलच्या राज्याविरूद्ध बंडखोरी केली.
\s5
\c 25
\p
\v 1 सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमेला वेढा देऊन लोकांची येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.
\v 2 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत ह्या नगराला वेढा चालू राहिला.
\v 3 दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसाची अन्नान्नदशा झाली.
\s5
\v 4 नबुखद्नेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले.
\v 5 बाबेलच्या सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.
\s5
\v 6 बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.
\v 7 त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करून बाबेलला नेले.
\s5
\v 8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुजरदान यरुशलेमेवर चाल करून आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.
\v 9 या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.
\v 10 मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली.
\s5
\v 11 नगरात अजून असलेले लोक बाबेलच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.
\v 12 अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.
\s5
\v 13 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.
\v 14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.
\v 15 अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली.
\s5
\v 16 अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू दोन पितळी स्तंभ. एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या, यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.
\v 17 प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती, दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.
\s5
\v 18 नबुजरदानने लोकांना मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
\v 19 आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.
\s5
\v 20 बाबेलातील रिब्ला येथे नबुजरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले.
\v 21 बाबेलच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.
\s5
\v 22 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने काही लोकांना यहूदातच राहू दिले. त्यात एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.
\v 23 नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्याला भेटायला मिस्पा येथे आले.
\v 24 गदल्याने त्या सर्वांना शपथ दिली आणि तो त्यांना म्हणाला, “बाबेलच्या अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे भले होईल.”
\s5
\v 25 अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले.
\v 26 मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. बाबेलच्या लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.
\s5
\v 27 पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनाला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.
\s5
\v 28 त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले.
\v 29 अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
\v 30 अबील मरोदख राजाने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.

1963
13-1CH.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1963 @@
\id 1CH
\ide UTF-8
\h 1 इतिहास
\toc1 1 इतिहास
\toc2 1 इतिहास
\toc3 1ch
\mt1 1 इतिहास
\s5
\c 1
\p
\v 1 आदाम, शेथ, अनोश,
\v 2 केनान, महललेल, यारेद,
\v 3 हनोख, मथुशलह, लामेख,
\v 4 नोहा, शेम, हाम आणि याफेथ.
\p
\s5
\v 5 याफेथाचे मुलगेः गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
\v 6 गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा
\v 7 यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम.
\p
\s5
\v 8 हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.
\v 9 कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.
\v 10 कूशचा वंशज निम्रोद हा जगातील प्रथम विजेता होता.
\p
\s5
\v 11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
\v 12 पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
\p
\s5
\v 13 आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,
\v 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
\v 15 हिव्वी, आर्की, शीनी
\v 16 अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
\p
\s5
\v 17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.
\v 18 शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.
\v 19 एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.
\p
\s5
\v 20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
\v 21 हदोराम, ऊजाल, दिक्ला,
\v 22 एबाल, अबीमाएल, शबा,
\v 23 ओफीर, हवीला, योबाब यांना यक्तानाने जन्म दिला.
\p
\s5
\v 24 शेम, अर्पक्षद, शेलह,
\v 25 एबर, पेलेग, रऊ
\v 26 सरुग, नाहोर, तेरह,
\v 27 अब्राम म्हणजेच अब्राहाम.
\p
\s5
\v 28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.
\v 29 ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,
\v 30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
\v 31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.
\p
\s5
\v 32 अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.
\v 33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वाना कटूराने जन्म दिला.
\p
\s5
\v 34 इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.
\p
\v 35 एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
\v 36 अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.
\v 37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
\p
\s5
\v 38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.
\v 39 होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.
\v 40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.
\p
\s5
\v 41 दीशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.
\v 42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
\p
\s5
\v 43 इस्राएलामध्ये ह्या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
\v 44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
\v 45 योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.
\p
\s5
\v 46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
\v 47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
\v 48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.
\p
\s5
\v 49 शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.
\v 50 बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मे-जाहाबची कन्या.
\p
\s5
\v 51 पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,
\v 52 अहलीबामा, एला, पीनोन,
\v 53 कनाज, तेमान मिब्सार,
\v 54 माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.
\s5
\c 2
\p
\v 1 ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
\v 2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
\p
\s5
\v 3 एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्याला झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
\v 4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
\p
\s5
\v 5 हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
\v 6 जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
\v 7 जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
\v 8 एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
\p
\s5
\v 9 यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
\v 10 अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
\v 11 नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
\v 12 बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
\p
\s5
\v 13 इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
\v 14 चवथा नथनेल, पाचवा रद्दाय,
\v 15 सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
\p
\s5
\v 16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
\v 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
\p
\s5
\v 18 हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
\v 19 अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
\v 20 हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
\p
\s5
\v 21 नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
\v 22 सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
\p
\s5
\v 23 पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
\v 24 हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
\p
\s5
\v 25 यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची पुत्र होती.
\v 26 यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
\v 27 यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
\v 28 शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
\p
\s5
\v 29 अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
\v 30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
\v 31 अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
\v 32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र बाळे न होताच मेला.
\v 33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
\p
\s5
\v 34 शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
\v 35 शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला.
\p
\s5
\v 36 अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
\v 37 जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
\v 38 ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
\p
\s5
\v 39 अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
\v 40 एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
\v 41 शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
\p
\s5
\v 42 यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
\v 43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
\v 44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय,
\p
\s5
\v 45 शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
\v 46 कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
\v 47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
\p
\s5
\v 48 माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
\v 49 तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
\p
\v 50 ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
\s5
\v 51 बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
\p
\s5
\v 52 किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
\v 53 आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
\p
\s5
\v 54 सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
\v 55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.
\s5
\c 3
\p
\v 1 आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.
\q अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ;
\q अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
\q
\v 2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र,
\q हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चवथा.
\q
\v 3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा.
\q दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
\m
\s5
\v 4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
\v 5 यरुशलेमात जन्मलेली दावीदाची पुत्र बथशूवाला चार पुत्र झाले. बथशूवा अम्मीएलची कन्या. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
\p
\s5
\v 6 इतर नऊ पुत्र
\q इभार, अलीशामा, एलीफलेट,
\v 7 नोगा, नेफेग, याफीय,
\v 8 अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
\v 9 ही दावीदाची पुत्र होती, त्यात त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
\p
\s5
\v 10 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता.
\q रहबामाचा पुत्र अबीया होता.
\q अबीयाचा पुत्र आसा.
\q आसाचा पुत्र यहोशाफाट.
\q
\v 11 यहोशाफाटाचा पुत्र योराम.
\q योरामाचा पुत्र अहज्या होता.
\q अहज्याचा पुत्र योवाश होता.
\q
\v 12 योवाशाचा पुत्र अमस्या होता.
\q अमस्याचा पुत्र अजऱ्या होता.
\q अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
\q
\s5
\v 13 योथामाचा पुत्र आहाज होता.
\q आहाजाचा पुत्र हिज्कीया,
\q हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
\q
\v 14 मनश्शेचा पुत्र आमोन होता,
\q आमोनचा पुत्र योशीया होता.
\p
\s5
\v 15 योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.
\v 16 यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
\p
\s5
\v 17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
\v 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
\p
\s5
\v 19 पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
\v 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
\v 21 पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
\p
\s5
\v 22 शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.
\v 23 नाऱ्याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
\v 24 एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
\s5
\c 4
\p
\v 1 यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
\v 2 शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाची पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
\p
\s5
\v 3 इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.
\v 4 पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता.
\p
\s5
\v 5 अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.
\v 6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले.
\v 7 सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे पुत्र.
\v 8 हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते.
\p
\s5
\v 9 याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरनीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
\v 10 याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.
\p
\s5
\v 11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन.
\v 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
\p
\s5
\v 13 अथनिएल आणि सराया ही कनाजची पुत्र. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलाचा पुत्र.
\v 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
\v 15 यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबची पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज.
\v 16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलाचे पुत्र.
\p
\s5
\v 17 एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी बायकोने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.
\v 18 त्याच्या यहूदी बायकोला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.
\p
\s5
\v 19 होदीयाची बायको ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.
\v 20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.
\p
\s5
\v 21 यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.
\v 22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.
\v 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
\p
\s5
\v 24 नमुवेल, यामीन, यरिब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र.
\v 25 शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिबसाम. मिबसामचा पुत्र मिश्मा.
\v 26 मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी.
\p
\s5
\v 27 शिमीला सोळा पुत्र आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.
\v 28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
\p
\s5
\v 29 बिल्हा, असेम, तोलाद,
\v 30 बथुवेल, हर्मा सिकलाग,
\v 31 बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
\p
\s5
\v 32 त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे.
\v 33 बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
\p
\s5
\v 34 त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा पुत्र योशा,
\v 35 योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असिएलचा पुत्र सराया,
\v 36 एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदीएल, यशीमिएल, बनाया,
\v 37 जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र.
\v 38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली.
\p
\s5
\v 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
\v 40 त्यांना विपुल व चांगली गायरानेे मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
\v 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले.
\p
\s5
\v 42 शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.
\v 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
\s5
\c 5
\p
\v 1 रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुध्द केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.
\v 2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.
\v 3 इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी.
\p
\s5
\v 4 योएलाचे वंशज हे होते:
\q योएलाचा पुत्र शमाया होता.
\q शमायाचा पुत्र गोग होता.
\q गोगचा पुत्र शिमी होता.
\q
\v 5 शिमीचा पुत्र मीखा होता.
\q मीखाचा पुत्र राया होता.
\q रायाचा पुत्र बाल होता.
\q
\v 6 बालाचा पुत्र बैरा होता.
\q अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.
\p
\s5
\v 7 योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,
\v 8 योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन येथपर्यंत ते अरोएर राहत होते.
\v 9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.
\p
\s5
\v 10 शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगरी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.
\p
\s5
\v 11 त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलका येथपर्यंत राहत होते.
\v 12 योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.
\v 13 त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.
\s5
\v 14 हे अबीहाईलचे वंशज.
\q अबीहाईल हूरीचा पुत्र.
\q हूरी यारोहाचा पुत्र आणि
\q यारोहा गिलादाचा.
\q गिलाद मीखाएलचा.
\q मीखाएल यशीशा याचा पुत्र.
\q यशीशाया यहदोचा पुत्र.
\q यहदो बूजाचा पुत्र.
\m
\v 15 अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
\p
\s5
\v 16 ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.
\v 17 यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वाची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.
\p
\s5
\v 18 मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.
\v 19 हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.
\p
\s5
\v 20 आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगरी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.
\v 21 त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
\v 22 पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.
\p
\s5
\v 23 बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
\v 24 मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.
\p
\s5
\v 25 पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.
\v 26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांना कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यत ते तेथे राहत आहेत.
\s5
\c 6
\p
\v 1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
\v 2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
\v 3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
\p
\s5
\v 4 एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
\v 5 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
\v 6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
\p
\s5
\v 7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
\v 8 अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
\v 9 अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
\p
\s5
\v 10 योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरुशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
\v 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
\v 12 अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
\p
\s5
\v 13 शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
\v 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
\v 15 परमेश्वराने नबुखद्रेस्सराच्या हातून यहूदा आणि यरुशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
\p
\s5
\v 16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
\v 17 लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
\v 18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
\p
\s5
\v 19 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
\v 20 गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी.
\q लिब्नीचा पुत्र यहथ.
\q यहथया पुत्र जिम्मा.
\q
\v 21 जिम्माचा पुत्र यवाह.
\q यवाहाचा इद्दो.
\q इद्दोचा पुत्र जेरह.
\q जेरहचा यात्राय.
\p
\s5
\v 22 कहाथाचे वंशज असे,
\q कहाथचा पुत्र अम्मीनादाब.
\q अम्मीनादाबचा कोरह.
\q कोरहचा पुत्र अस्सीर.
\q
\v 23 अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
\q
\v 24 अस्सीरचा पुत्र तहथ,
\q तहथचा पुत्र उरीएल.
\q उरीएलचा उज्जीया.
\q उज्जीयाचा शौल.
\q
\s5
\v 25 अमासय आणि
\q अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
\v 26 एलकानाचा पुत्र सोफय.
\q सोफयचा पुत्र नहथ.
\q
\v 27 नहथचा पुत्र अलीयाब.
\q अलीयाबाचा यरोहाम.
\q यरोहामाचा एलकाना.
\q एलकानाचा पुत्र शमुवेल.
\p
\s5
\v 28 थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.
\q
\v 29 मरारीचे पुत्र,
\q मरारीचा पुत्र महली.
\q महलीचा लिब्नी.
\q लिब्नीचा पुत्र शिमी.
\q शिमीचा उज्जा.
\q
\v 30 उज्जाचा पुत्र शिमा
\q शिमाचा हग्गीया आणि
\q त्याचा असाया.
\p
\s5
\v 31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
\v 32 पवित्र निवासमंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेमामध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनीही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
\p
\s5
\v 33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज,
\q हेमान हा गवई.
\q हा योएलाचा पुत्र.
\q योएल शमुवेलचा पुत्र.
\q
\v 34 शमुवेल एलकानाचा पुत्र.
\q एलकाना यरोहामाचा पुत्र.
\q यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
\v 35 तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र.
\q एलकाना महथचा पुत्र.
\q महथ अमासयाचा पुत्र.
\q
\s5
\v 36 अमासय एलकानाचा पुत्र.
\q एलकाना योएलाचा पुत्र.
\q योएल अजऱ्याचा पुत्र.
\q अजऱ्या सफन्याचा पुत्र.
\q
\v 37 सफन्या तहथचा पुत्र.
\q तहथ अस्सीरचा पुत्र.
\q अस्सीर एब्यासाफचा पुत्र.
\q एब्यासाफ कोरहचा पुत्र.
\q
\v 38 कोरह इसहारचा पुत्र.
\q इसहार कहाथचा पुत्र.
\q कहाथ लेवीचा आणि
\q लेवी इस्राएलाचा पुत्र.
\p
\s5
\v 39 आसाफ हेमानाचा नातलग होता.
\q हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे.
\p आसाफ हा बरेख्या याचा पुत्र.
\q बरेख्या शिमाचा पुत्र.
\q
\v 40 शिमा मीखाएलचा पुत्र.
\q मिखाएल बासेया याचा पुत्र.
\q बासेया मल्कीया याचा पुत्र.
\v 41 मल्कीया एथनीचा पुत्र,
\q एथनी जेरहचा पुत्र
\q जेरह हा अदाया याचा पुत्र.
\q
\v 42 अदाया एतानाचा पुत्र.
\q एथाना हा जिम्मा याचा पुत्र.
\q जिम्मा शिमीचा पुत्र.
\q
\v 43 शिमी यहथ याचा पुत्र.
\q यहथ हा गर्षोम याचा पुत्र.
\q गर्षोम लेवीचा पुत्र.
\s5
\v 44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र.
\q किशी अब्दीचा पुत्र.
\q अब्दी मल्लूखचा पुत्र.
\q
\v 45 मल्लूख हशब्याचा पुत्र.
\q हशब्या अमस्याचा पुत्र.
\q अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
\q
\v 46 हिल्कीया अमसीचा पुत्र.
\q अमसी बानीचा पुत्र.
\q बानी शेमर पुत्र.
\q
\v 47 शेमेर महलीचा पुत्र.
\q महली मूशीचा पुत्र,
\q मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
\q
\s5
\v 48 आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
\p
\s5
\v 49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.
\p
\s5
\v 50 अहरोनाचे वंशज असे मोजले,
\q अहरोनाचा पुत्र एलाजार.
\q एलाजाराचा पुत्र फिनहास.
\q फिनहासचा पुत्र अबीशूवा.
\q
\v 51 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
\q
\v 52 जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
\v 53 अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
\p
\s5
\v 54 अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठी निघाली.
\v 55 यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणेे त्यांना मिळाली.
\v 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
\p
\s5
\v 57 अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
\v 58 हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह,
\p
\s5
\v 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
\v 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
\p
\s5
\v 61 कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
\v 62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
\p
\s5
\v 63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
\v 64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवीना दिली.
\v 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
\p
\s5
\v 66 एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
\v 67 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
\v 68 यकमाम, बेथ-होरोन,
\v 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
\p
\s5
\v 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांना दिली.
\p
\s5
\v 71 गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
\v 72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
\v 73 रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह,
\p
\s5
\v 74 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
\v 75 हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
\v 76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
\p
\s5
\v 77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
\v 78 यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
\v 79 कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
\p
\s5
\v 80 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाइम कुरणासकट;
\v 81 हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.
\s5
\c 7
\p
\v 1 इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.
\v 2 उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
\v 3 इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
\p
\s5
\v 4 त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या बायका आणि पुत्र पुष्कळ होते.
\v 5 इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
\s5
\v 6 बन्यामीनला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
\v 7 बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
\p
\s5
\v 8 जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
\v 9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
\v 10 यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानची पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
\p
\s5
\v 11 यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
\v 12 शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
\p
\s5
\v 13 यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
\p
\s5
\v 14 मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
\v 15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्याला फक्त कन्याच होत्या.
\v 16 माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
\p
\s5
\v 17 ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
\v 18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
\v 19 अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
\p
\s5
\v 20 एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः
\q एफ्राईमाचा पुत्र शुथेलह.
\q शुथेलहचा पुत्र बेरेद.
\q बेरेदाचा पुत्र तहथ.
\q तहथाचा पुत्र एलादा.
\q एलादाचा पुत्र तहथ.
\q
\v 21 तहथचा पुत्र जाबाद.
\q जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
\v 22 एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
\p
\s5
\v 23 मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
\v 24 त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
\q
\s5
\v 25 रेफह हा एफ्राईमाचा पुत्र.
\q रेफहचा पुत्र रेशेफ.
\q रेशेफचा पुत्र तेलह.
\q तेलहचा पुत्र तहन.
\q
\v 26 तहनचा पुत्र लादान.
\q लादानचा पुत्र अम्मीहूद.
\q आम्मीहूदचा अलीशामा.
\v 27 त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
\q
\s5
\v 28 एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
\v 29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
\p
\s5
\v 30 इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
\v 31 हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
\v 32 यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
\p
\s5
\v 33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
\v 34 अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
\v 35 शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
\p
\s5
\v 36 सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
\v 37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
\v 38 यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
\p
\s5
\v 39 आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
\v 40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
\s5
\c 8
\p
\v 1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
\v 2 चौथा नोहा व पाचवा राफा.
\v 3 आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
\v 4 अबीशूवा, नामान, अहोह,
\v 5 गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
\p
\s5
\v 6 एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यांस पाडाव करून मानाहथ येथे नेले.
\v 7 नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यांस उज्जा व अहिहूद हे झाले.
\p
\s5
\v 8 शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
\v 9 त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
\v 10 यऊस. शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
\v 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
\p
\s5
\v 12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
\v 13 बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्याना हुसकावून लावले.
\p
\s5
\v 14 हे बरीयाचे पुत्र:
\q अह्यो, शाशक, यरेमोथ,
\q
\v 15 जबद्या. अराद, एदर,
\q
\v 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
\m
\v 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
\v 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
\s5
\v 19 याकीम, जिख्री, जब्दी,
\v 20 एलीएनय, सिलथय, अलीएल,
\v 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
\s5
\v 22 इश्पान, एबर, अलीएल,
\v 23 अब्दोन, जिख्री, हानान,
\v 24 हनन्या, एलाम, अनथोथीया,
\v 25 इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
\s5
\v 26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
\v 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
\v 28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुशलेम येथे राहत होते.
\s5
\v 29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
\v 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
\v 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
\p
\s5
\v 32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
\v 33 कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.
\v 34 योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
\p
\s5
\v 35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
\v 36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
\q
\v 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
\p
\s5
\v 38 आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
\v 39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
\v 40 ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.
\s5
\c 9
\p
\v 1 इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.
\v 2 त्यापैंकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.
\v 3 यरुशलेमामध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते.
\p
\s5
\v 4 ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.
\v 5 यरुशलेमामध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र.
\v 6 यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.
\p
\s5
\v 7 बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हस्सनुवाचा पुत्र.
\v 8 इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र.
\v 9 त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.
\p
\s5
\v 10 यरुशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन,
\v 11 अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा पुत्र. हिल्कीया मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम सादोकाचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा पुत्र. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता.
\p
\s5
\v 12 यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र.
\v 13 असे एकंदर एक सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते.
\s5
\v 14 यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला.
\v 15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र.
\v 16 ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
\p
\s5
\v 17 यरुशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
\v 18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.
\v 19 शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.
\p
\s5
\v 20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या संगती होता.
\v 21 मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “निवासमंडपाचा” द्वारपाल होता.
\p
\s5
\v 22 निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती
\v 23 परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.
\v 24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
\p
\s5
\v 25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.
\v 26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
\v 27 देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
\p
\s5
\v 28 त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत.
\v 29 आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते.
\p
\s5
\v 30 याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत.
\v 31 लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता.
\v 32 कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.
\s5
\v 33 लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे.
\v 34 हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरुशलेमात राहत होते.
\p
\s5
\v 35 गिबोनाचे पिता ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या पत्नीचे नाव माका होते.
\v 36 ईयेल्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी पुत्र,
\v 37 गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच अपत्ये.
\p
\s5
\v 38 मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरुशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
\q
\v 39 नेर हे कीशाचा पिता होता.
\q कीश शौलाचा पिता होता.
\q शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.
\q
\v 40 मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र.
\q मीखा हा मरीब्बालाचा पुत्र.
\p
\s5
\v 41 पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे पुत्र.
\q
\v 42 आहाज याराचा पिता होता.
\q यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता.
\q जिम्रीन मोसाचा पिता होता.
\q
\v 43 मोसा बिनाचा पिता होता.
\q बिना रफायाचा पिता होता.
\q रफाया एलासाचा पिता होता.
\q एलासा आसेलाचा पिता होता.
\q
\v 44 आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.
\s5
\c 10
\p
\v 1 आणि पलिष्टी इस्राएलाविरूध्द लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल माणसाने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
\v 2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
\v 3 शौलाविरूध्द त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्याला गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
\p
\s5
\v 4 नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत:ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
\p
\s5
\v 5 जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेहि तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
\v 6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
\p
\s5
\v 7 जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल माणसाने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मेले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यात राहू लागले.
\v 8 मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
\p
\s5
\v 9 त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांना कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
\v 10 त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
\p
\s5
\v 11 पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
\v 12 तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनीक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
\p
\s5
\v 13 शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्याला मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
\v 14 त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.
\s5
\c 11
\p
\v 1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्याला म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत.
\v 2 मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्त्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्त्राएल लोकांवर राज्य करशील.”
\v 3 असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्त्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.
\p
\s5
\v 4 दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे रहात होते.
\v 5 यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे.
\v 6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्याला सेनापती करण्यात आले.
\p
\s5
\v 7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले.
\v 8 त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला.
\v 9 दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता.
\p
\s5
\v 10 हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्त्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.
\v 11 दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे माणसांना ठार मारले.
\p
\s5
\v 12 त्यानंतर दोदय अहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरापैकी एक होता.
\v 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यापुढून सैन्य पळून गेले होते.
\v 14 तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला.
\p
\s5
\v 15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.
\v 16 आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते.
\v 17 तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.!”
\p
\s5
\v 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले.
\v 19 तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो ह्या ज्या माणसांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले.
\p
\s5
\v 20 यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. ह्या तिघा सैनिकाबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो.
\v 21 ह्या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्याला त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही.
\p
\s5
\v 22 कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया, याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना त्याने ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
\v 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले.
\p
\s5
\v 24 यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते.
\v 25 तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
\p
\s5
\v 26 सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
\v 27 हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
\v 28 तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर
\v 29 सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,
\p
\s5
\v 30 महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद,
\v 31 बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
\v 32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
\v 33 अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी,
\p
\s5
\v 34 हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान,
\v 35 साखार हरारी याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल,
\v 36 हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
\v 37 हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय,
\p
\s5
\v 38 नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
\v 39 सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
\v 40 ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
\v 41 उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,
\p
\s5
\v 42 शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
\v 43 माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी,
\v 44 उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा ईयेल,
\p
\s5
\v 45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
\v 46 अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
\v 47 अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.
\s5
\c 12
\p
\v 1 कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.
\v 2 धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.
\p
\s5
\v 3 अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.
\v 4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.
\p
\s5
\v 5 एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या
\v 6 एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज,
\v 7 तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.
\p
\s5
\v 8 गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
\p
\s5
\v 9 गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.
\v 10 मिश्मन्ना चवथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.
\v 11 अत्तय सहावा, अलीएल सातवा,
\v 12 योहानन आठवा, एलजाबाद नववा,
\v 13 यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
\p
\s5
\v 14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता.
\v 15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.
\p
\s5
\v 16 बन्यामीन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
\v 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”
\p
\s5
\v 18 अमासय याच्यावर आत्म्या आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
\p
\s5
\v 19 मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”
\v 20 तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.
\p
\s5
\v 21 लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
\v 22 देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.
\p
\s5
\v 23 आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले.
\v 24 यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.
\v 25 शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.
\p
\s5
\v 26 लेवीच्या कुळातून चार हजार सहाशें शूर वीर होते.
\v 27 अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
\v 28 सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या बापाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.
\p
\s5
\v 29 बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
\v 30 एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले होते. वीस हजार आठशे शूर सैनिक होते.
\v 31 मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.
\p
\s5
\v 32 इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती, जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.
\v 33 जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
\p
\s5
\v 34 नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.
\v 35 दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.
\p
\s5
\v 36 आशेर मधले चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
\v 37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
\p
\s5
\v 38 हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
\v 39 त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते.
\v 40 याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षारस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.
\s5
\c 13
\p
\v 1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
\v 2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
\v 3 आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
\v 4 तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
\p
\s5
\v 5 किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रवेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले.
\v 6 करूबांवरती राहणारा परमेश्वर देव याचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
\p
\s5
\v 7 मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
\v 8 दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
\p
\s5
\v 9 किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
\v 10 तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्याला मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
\v 11 परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
\p
\s5
\v 12 दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी परमेश्वराचा कोश कसा आणू?”
\v 13 त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
\v 14 मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.
\s5
\c 14
\p
\v 1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले.
\v 2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.
\p
\s5
\v 3 यरुशलेमातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला.
\v 4 यरुशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
\v 5 इभार, अलीशवा, एल्पलेट,
\v 6 नोगा, नेफेग. याफीय,
\v 7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
\p
\s5
\v 8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.
\v 9 आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.
\p
\s5
\v 10 मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्याला सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईल.”
\v 11 मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.
\v 12 पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ति जाळून टाकण्याची आज्ञा दिली.
\p
\s5
\v 13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
\v 14 दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्याला म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.
\p
\s5
\v 15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”
\v 16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
\v 17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.
\s5
\c 15
\p
\v 1 दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
\v 2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
\v 3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यसाठी सर्व इस्राएल लोकांना यरुशलेमेत एकत्र जमा केले.
\p
\s5
\v 4 दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
\q
\v 5 कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
\q
\v 6 मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
\q
\s5
\v 7 गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
\q
\v 8 अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
\q
\v 9 हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
\q
\v 10 उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
\p
\s5
\v 11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवीनाही बोलावून घेतले.
\v 12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
\p
\s5
\v 13 पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
\v 14 यावरून याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
\v 15 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
\p
\s5
\v 16 दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
\v 17 लेवीनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
\v 18 याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
\s5
\v 19 हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
\v 20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
\v 21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
\p
\s5
\v 22 लेवीचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
\v 23 बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
\v 24 शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
\p
\s5
\v 25 अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
\v 26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
\p
\s5
\v 27 कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
\v 28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
\p
\s5
\v 29 पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्याला तुच्छ लेखले.
\s5
\c 16
\p
\v 1 त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.
\v 2 मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला.
\v 3 मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.
\p
\s5
\v 4 मग दावीदाने काही लेवीची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुति करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
\v 5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.
\v 6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत.
\p
\s5
\v 7 तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.
\q
\v 8 परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा.
\q राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.
\q
\v 9 त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा.
\q त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
\q
\s5
\v 10 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.
\q जे परमेश्वराला शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.
\q
\v 11 परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला शोधा.
\q निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.
\q
\s5
\v 12 त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा.
\q त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
\q
\v 13 त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो,
\q त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,
\q
\v 14 तो परमेश्वर, आमचा देव आहे.
\q त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
\q
\s5
\v 15 त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा.
\q त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.
\q
\v 16 त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.
\q आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.
\q
\v 17 याकोबासाठी त्याने तोच नियम केला.
\q आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला.
\q
\v 18 तो म्हणाला, “मी तुला कनान देश
\q तुमच्या वतनाचा वाटा असा देईल.”
\q
\s5
\v 19 मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,
\q फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.
\q
\v 20 तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता.
\q एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.
\q
\v 21 पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही.
\q त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली.
\q
\v 22 तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका.
\q माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
\q
\s5
\v 23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा.
\q त्याचे तारण दिवसेदिवस सर्वांना सांगा.
\q
\v 24 त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा
\q सर्व राष्ट्राला त्याच्या आश्र्चर्यकारक कृत्ये जाहिर सांगा.
\q
\s5
\v 25 परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे.
\q आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.
\q
\v 26 कारण सर्व राष्ट्रातले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत.
\q पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
\q
\v 27 महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत.
\q सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत.
\q
\s5
\v 28 अहो लोकांच्या कुळांनो
\q परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
\q
\v 29 परमेश्वराला त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या.
\q त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.
\q पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
\q
\s5
\v 30 त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो
\q पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.
\q
\v 31 पृथ्वी उल्हसित होवो आणि आकाश आनंदीत होवो;
\q राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”
\q
\s5
\v 32 समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो
\q शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.
\q
\v 33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील
\q कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
\q
\s5
\v 34 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.
\q कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
\q
\v 35 आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.
\q आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.
\q आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी
\q आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”
\q
\s5
\v 36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यत धन्यवादित असो.
\m सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
\p
\s5
\v 37 मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.
\v 38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यात समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.
\v 39 सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले.
\p
\s5
\v 40 ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी आणि होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वराला होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.
\v 41 आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांहि, परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
\p
\s5
\v 42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.
\v 43 नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.
\s5
\c 17
\p
\v 1 आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी रहात होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच रहात आहे ”
\v 2 तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.”
\p
\s5
\v 3 पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले,
\v 4 “जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही.
\v 5 कारण मी इस्राएलांस वर आणले त्यादिवसापासून आजपर्यत मी मंदिरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच रहात आलो आहे.
\v 6 सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्त्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही “माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?”
\p
\s5
\v 7 “तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे “की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले.
\v 8 आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.
\p
\s5
\v 9 माझ्या इस्राएल लोकांना मी एक जागा नेमून देईल आणि त्यांना त्याठिकाणी स्थीर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.
\v 10 मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.
\p
\s5
\v 11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्याला मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.
\v 12 तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन.
\p
\s5
\v 13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही.
\v 14 मी त्याला माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन.”
\v 15 नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्याला सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.
\p
\s5
\v 16 नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यत आणले आहे?
\v 17 आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसाबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत.
\v 18 तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.
\p
\s5
\v 19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतु पूर्ण व्हावा, म्हणून तू ह्या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.
\v 20 हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.
\v 21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; ह्या तुझ्या लोकांना तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रास घालवून दिले.
\p
\s5
\v 22 तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
\v 23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाल स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर.
\v 24 तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.
\p
\s5
\v 25 कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.
\v 26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे.
\v 27 तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.”
\s5
\c 18
\p
\v 1 यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्याच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
\v 2 मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्याला कर देऊ लागले.
\p
\s5
\v 3 मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
\v 4 दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
\p
\s5
\v 5 जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांनाही दावीदाने जिवे मारले.
\v 6 नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्याला कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे परमेश्वराने त्याला जय देत असे.
\p
\s5
\v 7 हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरुशलेमेला आणल्या.
\v 8 हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
\p
\s5
\v 9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
\v 10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
\v 11 जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रापासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वराला समर्पिली.
\p
\s5
\v 12 सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले.
\v 13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्याला जय मिळवून दिला.
\p
\s5
\v 14 दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
\v 15 सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
\v 16 अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
\v 17 यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.
\s5
\c 19
\p
\v 1 आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला.
\v 2 दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले.
\v 3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले की, “दावीदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांना तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
\p
\s5
\v 4 हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.
\v 5 मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या माणसांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.
\p
\s5
\v 6 जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार रुपे पाठवले.
\v 7 अम्मोन्यांनी बत्तीस हजार रथ व माकाच्या राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले; तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन व लढायला आले.
\p
\s5
\v 8 दावीदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले.
\v 9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.
\p
\s5
\v 10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्यामागे व एक पुढे आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुध्द त्यांची व्यवस्थित मांडणी केली.
\v 11 उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने ह्या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली.
\s5
\v 12 यवाब म्हणाला, “अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन.
\v 13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.”
\p
\s5
\v 14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्त्राएलाच्या सैन्यापुढून पळाले.
\v 15 अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमेला परत आला.
\p
\s5
\v 16 आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता.
\v 17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.
\p
\s5
\v 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
\v 19 आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनीना मदत करण्यास तयार नव्हते.
\s5
\c 20
\p
\v 1 आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरुशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.
\p
\s5
\v 2 दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक मणभर होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.
\v 3 त्या नगरातील लोकांना बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमेला परतले.
\p
\s5
\v 4 यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टि लोक त्यांना शरण आले.
\v 5 पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.
\p
\s5
\v 6 गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोहि रेफाईच्या वंशातला होता.
\v 7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्याला ठार केले.
\v 8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.
\s5
\c 21
\p
\v 1 आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.
\v 2 दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावा म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”
\v 3 यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभु राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का. मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”
\p
\s5
\v 4 पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता. यामुळे यवाब निघून आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरुशलेमाला परत आला.
\v 5 मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
\p
\s5
\v 6 पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
\v 7 देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला.
\v 8 मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”
\p
\s5
\v 9 परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला,
\v 10 “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, “मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”
\p
\s5
\v 11 मग गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.
\v 12 तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तरवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्याला मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”
\p
\s5
\v 13 मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.”
\v 14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यात सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले.
\v 15 यरुशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.
\s5
\v 16 दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरुशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.
\v 17 दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हाला शिक्षा दे, पण तुझ्या लोकांना ह्या मरीने शिक्षा देऊ नको.”
\s5
\v 18 मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी.
\v 19 मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला.
\v 20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.
\s5
\v 21 आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
\v 22 मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधील.”
\p
\s5
\v 23 अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हाला देईन.”
\v 24 तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.”
\p
\s5
\v 25 आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.
\v 26 दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वराला हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
\v 27 मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
\p
\s5
\v 28 त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले.
\v 29 कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती.
\v 30 पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.
\s5
\c 22
\p
\v 1 मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”
\p
\v 2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
\p
\s5
\v 3 दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,
\v 4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.
\v 5 दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.
\p
\s5
\v 6 मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्याला आज्ञा दिली.
\v 7 दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती.
\v 8 पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.
\p
\s5
\v 9 मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.
\v 10 तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यत स्थापित करील.”
\p
\s5
\v 11 “आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध.
\v 12 जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.
\v 13 इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.
\p
\s5
\v 14 पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि एक किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू ह्या सर्वात अधिक भर घाल.
\p
\s5
\v 15 तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत.
\v 16 जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
\p
\s5
\v 17 दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला,
\v 18 “तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हाला शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे.
\v 19 तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यात मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”
\s5
\c 23
\p
\v 1 आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले.
\v 2 त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले.
\v 3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवीची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
\p
\s5
\v 4 त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.
\v 5 चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.
\v 6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवीची तीन गटांमध्ये विभागणी केली.
\p
\s5
\v 7 गेर्षोन घराण्यात
\q लादान आणि शिमी हे दोघे होते.
\q
\v 8 लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
\q
\v 9 शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
\q
\s5
\v 10 शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
\q
\v 11 यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
\p
\s5
\v 12 कहाथाला चार पुत्र होते:
\q अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
\v 13 अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
\v 14 मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
\q
\s5
\v 15 गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
\q
\v 16 शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
\q
\v 17 रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
\q
\v 18 शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
\q
\s5
\v 19 हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
\q
\v 20 उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
\q
\s5
\v 21 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
\q
\v 22 एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्याला पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
\q
\v 23 मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.
\p
\s5
\v 24 हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
\v 25 दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांना शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
\v 26 तेव्हा लेवीना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”
\p
\s5
\v 27 लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या माणसांची मोजणी झाली.
\v 28 अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
\v 29 मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
\p
\s5
\v 30 ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुति करायला उभे राहत.
\v 31 आणि परमेश्वराला शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
\p
\s5
\v 32 ते सभामंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.
\s5
\c 24
\p
\v 1 अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
\v 2 पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
\v 3 दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
\p
\s5
\v 4 इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
\v 5 दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
\p
\s5
\v 6 आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
\p
\s5
\v 7 पहिली चिठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
\v 8 तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
\v 9 पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
\v 10 सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
\p
\s5
\v 11 नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
\v 12 अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
\v 13 तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
\v 14 पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची,
\p
\s5
\v 15 सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
\v 16 एकुणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
\v 17 एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
\v 18 तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
\p
\s5
\v 19 परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
\p
\s5
\v 20 लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:
\q अम्रामच्या वंशातील शूबाएल;
\q शूबाएलचे वंशज: यहदाया.
\q
\v 21 रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
\q
\v 22 इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
\q
\s5
\v 23 हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
\q
\v 24 उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
\q
\v 25 मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
\q
\s5
\v 26 मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
\q
\v 27 मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
\q
\v 28 महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
\q
\s5
\v 29 कीशाचे वंशज: यरहमेल.
\q
\v 30 महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र.
\m हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
\v 31 राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्या टाकल्या.
\s5
\c 25
\p
\v 1 दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
\v 2 आसाफाच्या वंशातले:
\q जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
\m
\v 3 यदूथूनाचे वंशज:
\q गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
\p
\s5
\v 4 हेमानाचे वंशज:
\q बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
\v 5 हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
\p
\s5
\v 6 हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
\v 7 ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
\v 8 त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
\p
\s5
\v 9 तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत:
\q पहिली चिठी योसेफाची निघाली;
\q दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
\q
\v 10 तिसरी चिठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
\q
\v 11 चवथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
\q
\v 12 पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
\q
\s5
\v 13 सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 14 सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 15 यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 16 नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
\q
\s5
\v 17 दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 18 अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
\q
\v 19 बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 20 तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\s5
\v 21 चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\q
\v 22 पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
\q
\v 23 सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 24 सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\s5
\v 25 अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 26 एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
\q
\v 27 विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\q
\v 28 एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\s5
\v 29 बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
\q
\v 30 तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
\q
\v 31 चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
\s5
\c 26
\p
\v 1 द्वारपालांचे गट:
\q हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.
\q
\v 2 मेशेलेम्या याला पुत्र होते. जखऱ्या हा त्यातला मोठा. यदीएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
\v 3 एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
\q
\s5
\v 4 ओबेद-अदोम, याची अपत्ये. शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
\v 5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमावर खरोखच कृपादृष्टी होती.
\v 6 शमाया हा ओबेद-अदोमाचा पुत्र. त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.
\q
\s5
\v 7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.
\v 8 हे सर्व ओबेद-अदोमाचे वंशज त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद-अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते.
\v 9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
\q
\s5
\v 10 मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्याला मुख्य केले होते.
\v 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
\p
\s5
\v 12 यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
\v 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
\v 14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
\p
\s5
\v 15 ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.
\v 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.
\p
\s5
\v 17 पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या.
\v 18 पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.
\v 19 हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.
\p
\s5
\v 20 देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.
\v 21 लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.
\v 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.
\p
\s5
\v 23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
\v 24 मोशेचा पुत्र गेर्षोम, याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता.
\v 25 अलियेजराकडून त्याचे भाऊबंद: अलियेजाराचा पुत्र हा रहब्या होता.
\q रहब्याचा पुत्र यशया.
\q यशयाचा पुत्र योराम.
\q योरामाचा पुत्र जिख्री. आणि
\q जिख्रीचा पुत्र शलोमोथ.
\p
\s5
\v 26 दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.
\v 27 युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली.
\v 28 शमुवेल संदेष्टा, कीशचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुवेचा पुत्र यवाब यांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
\p
\s5
\v 29 इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.
\v 30 हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्राएलावर देखरेख करत होते.
\p
\s5
\v 31 हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.
\v 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.
\s5
\c 27
\p
\v 1 ही इस्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती.
\q
\v 2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.
\v 3 तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.
\q
\s5
\v 4 अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.
\v 5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.
\v 6 हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तिसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.
\s5
\v 7 चवथ्या महिन्याचा चवथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\q
\s5
\v 10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\v 11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.
\v 12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामीनी वंशातला अबीयेजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते.
\q
\s5
\v 13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
\v 14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.
\v 15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
\q
\s5
\v 16 इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.
\q
\v 17 लेवी कमुवेलचा पुत्र हशब्या. अहरोन: सादोक.
\q
\v 18 यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार:
\q मीखाएलचा पुत्र अम्री.
\q
\s5
\v 19 जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली:
\q अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ.
\q
\v 20 एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेथ.
\q पश्चिम मनश्शेः पदायाचा पुत्र योएल.
\q
\v 21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल.
\q
\v 22 दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख,
\p
\s5
\v 23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.
\v 24 सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.
\p
\s5
\v 25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.
\v 26 कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
\v 27 रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता.
\p
\s5
\v 28 गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
\v 29 आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
\s5
\v 30 ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांवर मुख्य होता.
\v 31 याजीज हगरी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.
\p
\s5
\v 32 दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
\v 33 अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.
\v 34 अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.
\s5
\c 28
\p
\v 1 दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरुशलेमेत एकत्र बोलावले.
\p
\s5
\v 2 नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
\v 3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.
\p
\s5
\v 4 इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या बापाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
\v 5 देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
\p
\s5
\v 6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईल.
\v 7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
\p
\s5
\v 8 तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकालचे वतन म्हणून द्यावा.
\p
\s5
\v 9 हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्याला कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्याला सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
\v 10 परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
\p
\s5
\v 11 दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
\v 12 त्याला दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा,
\p
\s5
\v 13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
\v 14 सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
\v 15 सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
\p
\s5
\v 16 आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
\v 17 शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
\p
\s5
\v 18 धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
\v 19 दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
\p
\s5
\v 20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
\v 21 देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”
\s5
\c 29
\p
\v 1 राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अननुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही माणसासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.
\v 2 माइया देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे.
\p
\s5
\v 3 आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे.
\v 4 एकशेदहा टन ओफीरचे शुध्द सोने, दोनशे साठ टन निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत.
\v 5 कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
\p
\s5
\v 6 तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.
\v 7 देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू एकशें नव्वद टन सोने, तीनशे पंच्याहत्तर टन रुपे, सहाशें पंच्याहत्तर टन पितळ, आणि तीन हजार सातशे पन्नास टन लोखंड दिले.
\s5
\v 8 ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली.
\v 9 या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वराला अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही महा आनंदीत झाला.
\p
\s5
\v 10 त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.
\v 11 हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.
\p
\s5
\v 12 संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
\v 13 देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुति करतो.
\p
\s5
\v 14 या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत.
\v 15 आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही.
\p
\s5
\v 16 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.
\v 17 हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.
\p
\s5
\v 18 हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर.
\v 19 माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.
\p
\s5
\v 20 तेथे जमलेल्या सर्व लोकांना दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.
\v 21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.
\p
\s5
\v 22 मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.
\v 23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
\p
\s5
\v 24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले.
\v 25 परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्त्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला एैश्वर्य त्याला मिळाले.
\p
\s5
\v 26 इशायाचा पुत्र दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.
\v 27 दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहत्तीस वर्षांची होती.
\v 28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला.
\p
\s5
\v 29 राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात लिहिलेला आहे.
\v 30 त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकिकत या ग्रंथांमध्ये आहे.

1300
14-2CH.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1300 @@
\id 2CH
\ide UTF-8
\h 2 इतिहास
\toc1 2 इतिहास
\toc2 2 इतिहास
\toc3 2ch
\mt1 2 इतिहास
\s5
\c 1
\p
\v 1 परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्याला फार सामर्थ्यवान केले.
\s5
\v 2 शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील वाडवडीलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला.
\v 3 मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. कारण परमेश्वराचा सभामंडप तेथे होता, कारण परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक रानात असतांना मोशेने तो बनवला होता.
\v 4 दाविदाने परमेश्वराच्या कराराचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरुशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता.
\v 5 हुराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती, म्हणून शलमोन आपल्याबरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला.
\s5
\v 6 परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदीवर शलमोनाने एक हजार होमार्पणे केली.
\v 7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, शलमोना, माग! तुला काय हवय ते?
\s5
\v 8 शलमोन परमेश्वराला म्हणाला, माझे पिता दाविद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस.
\v 9 आता, हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दाविद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे.
\v 10 या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?
\v 11 तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस तसेच तुझा द्वेष करणारा शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस-
\s5
\v 12 आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळाले नाही एवढे ऐश्वर्य, संपत्ती व बहुमान मी तुुला देईन.
\v 13 मग शलमोन गिबोनाच्या उच्चस्थानाहून, सभामंडपासमोरून यरुशलेमेस आला, व इस्त्राएलावर राज्य करू लागला.
\s5
\v 14 शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले.
\v 15 राजाने यरुशलेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की,ते दगडांप्रमाणे विपुल झाले तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले.
\v 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोडयांची खरेदी करत.
\v 17 त्यांनी प्रत्येक रथ सहाशे शेकेल चांदीला व प्रत्येक घोडा दिडशें शेकेल चांदीला या प्रमाणे मिसरामधून ही खरेदी करून मग ते हेच रथ आणि घोडे हित्ती व अरामी राजांना विकले.
\x -
\xo 1.17
\xt
\x*
\s5
\c 2
\p
\v 1 परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत:साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली.
\v 2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.
\v 3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.
\s5
\v 4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथच्या दिवशी दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
\v 5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.
\s5
\v 6 परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.
\v 7 तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्याला ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेमेत काम करील.
\s5
\v 8 लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.
\v 9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.
\v 10 लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षारस आणि वीस हजार बुधले तेल.
\s5
\v 11 मग हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.
\v 12 हिराम पुढे म्हणाला, इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.
\s5
\v 13 हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.
\v 14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दाविद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
\s5
\v 15 माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षारस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
\v 16 लबानोनातून तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमेला न्यावे.”
\v 17 शलमोनाचा पिता दावीद यानेे जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
\v 18 शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
\s5
\c 3
\p
\v 1 यरुशलेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दावीदाने योजनापुर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्णान यबूसीचे खळे होय!
\v 2 आपल्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
\v 3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.
\s5
\v 4 मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस क्युबीट असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस क्युबीट होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती.
\v 5 मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यांवर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या
\s5
\v 6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली यामध्ये उपयोगात आणलेले सोने पर्वाइमचे होते.
\v 7 मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.
\p .
\s5
\v 8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार सोने होते.
\v 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
\s5
\v 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
\v 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी पाच हात होती. त्यांची एकंदर लांबी वीस हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा पाच हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पाच हात लांबीचा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.
\v 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पाच हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता.
\s5
\v 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते.
\v 14 निळ्या, जांभळ्या व किरमीजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
\v 15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ पस्तीस हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी पाच हात उंचीचे होते.
\v 16 शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली.
\v 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज ( सामर्थ्यवान ) अशी नावे दिली.
\s5
\c 4
\p
\v 1 शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
\v 2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
\v 3 प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतांनाच एकसंथ तुकड्यातून ते बनवले होते.
\s5
\v 4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमभिमुख, तीन दक्षीणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
\v 5 या पितळी गंगाळाची जाडी हाताएवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यात तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
\v 6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
\s5
\v 7 शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
\v 8 तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
\s5
\v 9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
\v 10 एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
\s5
\v 11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्याला शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
\v 12 दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
\v 13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळींबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
\s5
\v 14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
\v 15 मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
\v 16 शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी,मांस खाण्यासाठी काटे इत्यादी मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
\s5
\v 17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
\v 18 शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
\s5
\v 19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
\v 20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
\v 21 याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
\v 22 कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.
\s5
\c 5
\p
\v 1 अशारितीने शलमोनाने ठरवलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व कार्य समाप्त झाले. आपले पिता दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने आत आणल्या. सोन्यारुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान मंदिराच्या कोषागारात त्याने आणून ठेवले.
\s5
\v 2 पुढे शलमोनाने, परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदाचे नगर, म्हणजेच सीयोनमधून, आणण्यासाठी इस्राएलातील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले.
\v 3 सातव्या महिन्यातील, मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.
\s5
\v 4 सर्व इस्राएलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवीनी कराराचा कोश उचलून घेतला.
\v 5 याजक आणि लेवी यांनी मिळून कोश यरुशलेमेला आणला. दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली. लेवी वंशातील याजकांनी ती आणली.
\v 6 राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाहीत इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले.
\s5
\v 7 एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या मुद्दाम तयार करवून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराच्या कराराचा कोश करुबांच्या पखांच्या खाली ठेवला.
\v 8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले.
\s5
\v 9 त्यांचे दांडे एवढे लांब होते कि त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातुन बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरुन ते दिसू शकत नव्हते. आजपर्यंत ते तेथे आहेत.
\v 10 दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या कराराच्या कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरातून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो याच होरेब पर्वतावर केला.
\s5
\v 11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते. ते सर्व गटागटांमध्ये विभागले. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले.
\v 12 मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांचे पुत्र आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये हातात घेवून वेदीच्या पुर्व टोकाकडे उभे होते. या लेवी गायकांबरोबर ऐकशे वीस याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.
\v 13 गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहते. तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.
\v 14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.
\s5
\c 6
\p
\v 1 मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे.
\v 2 परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे घर विशाल बांधले आहे तू चिरकाल राहावेस.”
\v 3 मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले.
\s5
\v 4 शलमोन पुढे म्हणाला, इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते
\v 5 मी माझ्या लोकांना मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.
\v 6 पण आता यरुशलेम हे स्थान माझे नाव तेथे राहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.
\s5
\v 7 “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.
\v 8 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.
\v 9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.
\s5
\v 10 आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. मी इस्राएलचा राजा आहे असे होईल हे वचन परमेश्वराने दिले होते. आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.
\v 11 मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.”
\s5
\v 12 शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.
\v 13 बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मडंपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले.
\s5
\v 14 शलमोन म्हणाला हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.
\v 15 दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.
\s5
\v 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.
\v 17 तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
\s5
\v 18 परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो
\v 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे.
\v 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.
\s5
\v 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.
\s5
\v 22 एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना,
\v 23 तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्याला शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.त्याचे प्रतीफळ त्यास दे.
\s5
\v 24 इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर.
\v 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
\s5
\v 26 जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले,
\v 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहे.
\s5
\v 28 कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास,
\v 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.
\v 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.
\v 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील.
\s5
\v 32 जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहात प्रार्थना केली तर,
\v 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.
\s5
\v 34 शत्रूंशी लढण्यासाठी जर तू आपल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील.
\v 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
\s5
\v 36 पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.
\v 37 पण तिथे त्यांचे ह्दयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.
\v 38 असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील.
\v 39 असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर.
\v 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
\v 41 आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.
\v 42 “हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
\s5
\c 7
\p
\v 1 शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले.
\v 2 त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना.
\v 3 थेट स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहते.”
\s5
\v 4 शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले.
\v 5 राजा शलमोनाने बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरा साठी समर्पण केले.
\v 6 याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
\s5
\v 7 मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांतिअर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले.
\s5
\v 8 शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता.
\v 9 आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता.व समर्पणे सात दिवस वेेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला.
\v 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांना घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.
\s5
\v 11 परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
\v 12 नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
\s5
\v 13 कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला
\v 14 आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
\v 15 आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
\s5
\v 16 हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ राहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.
\v 17 शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
\v 18 तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.
\s5
\v 19 पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,
\v 20 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांना मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मीदेशांमध्ये निंदेचा विषय करीन.
\v 21 एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?
\v 22 तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांना या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.
\s5
\c 8
\p
\v 1 मंदिर, आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
\v 2 मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वस्ती करण्यास मुभा दिली.
\s5
\v 3 पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
\v 4 वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
\s5
\v 5 वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
\v 6 बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
\s5
\v 7 इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
\v 8 हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
\s5
\v 9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
\v 10 काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
\s5
\v 11 शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दाविद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या पत्नीने दावीद नगरात राहू नेये.”
\s5
\v 12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
\v 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
\s5
\v 14 आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवीना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
\v 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यात इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
\s5
\v 16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीला गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम तडीला गेले. व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
\v 17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एस्योन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
\v 18 हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार टन सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
\s5
\c 9
\p
\v 1 शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरुशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.
\v 2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला त्यातले काहीच अवघड वाटले नाही.त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही.
\s5
\v 3 शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला.
\v 4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
\s5
\v 5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
\v 6 इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
\s5
\v 7 तुझे लोक,व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
\v 8 तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदरस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
\s5
\v 9 शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ वस्तू शलमोनाला कधीच कुणाकडून मिळाल्या नव्हत्या.
\s5
\v 10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
\v 11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
\v 12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली.
\s5
\v 13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट टन एवढे असे.
\v 14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
\s5
\v 15 सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला.
\v 16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशें ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या.
\s5
\v 17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.
\v 18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्याला लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.
\s5
\v 19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
\v 20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
\v 21 राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तिन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे माकडे व वानरे आणत.
\s5
\v 22 वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला.
\v 23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत.
\v 24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यात सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
\s5
\v 25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरुशलेमामध्ये केली होती.
\v 26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.
\s5
\v 27 राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.
\v 28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
\v 29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावादयाच्या इद्दोची दर्शने यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
\v 30 शलमोनाने यरुशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
\v 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
\s5
\c 10
\p
\v 1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
\v 2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.
\s5
\v 3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्याला ते म्हणाले, “रहबामा,
\v 4 तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”
\v 5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
\s5
\v 6 राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांना काय उत्तर द्यावे? याबाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे.”
\v 7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”
\s5
\v 8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला.
\v 9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांना काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”
\s5
\v 10 तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हाला म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हाला कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हाला वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल.
\v 11 माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.”
\s5
\v 12 “यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसांनी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते.
\v 13 रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.
\v 14 तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांना म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चांबकांनी शासन करीन.”
\s5
\v 15 राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता.
\s5
\v 16 राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.
\v 17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.
\v 18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्याला इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्याला मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुशलेमेला पळून गेला.
\v 19 तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.
\s5
\c 11
\p
\v 1 यरुशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.
\s5
\v 2 पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला,
\v 3 “शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
\v 4 परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.
\s5
\v 5 रहबाम यरुशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली.
\v 6 बेथलेहेम, एटाम, तकोवा,
\v 7 बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,
\v 8 गथ, मारेशा, जीफ,
\v 9 अदोरइम, लाखीश, अजेका,
\v 10 सोरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.
\s5
\v 11 किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला.
\v 12 प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
\s5
\v 13 सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले.
\v 14 लेवीनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवीना हाकलून लावले म्हणून ते आले.
\v 15 यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ति उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
\s5
\v 16 इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवीनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमेला आले.
\v 17 त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
\s5
\v 18 रहबामाने महलथाशी विवाह केला. तिचे पिता यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा पुत्र. अबीहईल अलीयाबची कन्या आणि अलीयाब हा इशायचा पुत्र.
\v 19 महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.
\s5
\v 20 मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले.
\v 21 रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.
\s5
\v 22 अबीयाला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्याला राजा करावे अशी त्याची इच्छा होता.
\v 23 रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.
\s5
\c 12
\p
\v 1 रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.
\s5
\v 2 रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.
\v 3 शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते.
\v 4 यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुशलेमेला आणले.
\s5
\v 5 तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहूदाच्या वडिलधाऱ्या मंडळीकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरुशलेमेला जमली होती. शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”
\v 6 तेव्हा यहूदाची ती वडीलधारी मंडळी आणि रहबाम यांना पश्चात्ताप होऊन ते विनम्र झाले. “परमेश्वर न्यायी आहे.” असे त्यांनी उदगार काढले.
\s5
\v 7 ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. थोड्याफार प्रमाणात मी त्यांना मुक्त करीन. शिशक मार्फत त्यांना मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही.
\v 8 पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”
\s5
\v 9 शिशकने यरुशलेमेवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या.
\v 10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामाने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या.
\s5
\v 11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.
\v 12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
\s5
\v 13 रहबामाने यरुशलेमामध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सतरा वर्षे राज्य केले, इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुशलेमाची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा; नामा अमोनीण नगरातली होती.
\v 14 रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.
\v 15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.
\v 16 रहबामाने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीद नगरात त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र अबीया राजा झाला.
\s5
\c 13
\p
\v 1 इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
\v 2 त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली.
\v 3 अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
\s5
\v 4 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,
\v 5 दाविद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या, देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
\s5
\v 6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरूद्ध बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता.
\v 7 मग कुचकामी आणि वाईट माणसांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरुद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अननुभवी होता. त्याला यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
\s5
\v 8 आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
\v 9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत:वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो.
\s5
\v 10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
\v 11 परमेश्वराला ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वराला सोडले आहे.
\s5
\v 12 पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यात तुम्हाला यश येणार नाही.”
\s5
\v 13 पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.
\v 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले.
\v 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.
\v 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.
\v 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला.
\v 19 अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.
\v 20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला.
\v 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्याला बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या.
\v 22 इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
\s5
\c 14
\p
\v 1 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दाविद नगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांना दहा वर्षे शांतता लाभली.
\v 2 आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला.
\v 3 त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या. उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले.
\v 4 त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.
\s5
\v 5 यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्चस्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती.
\v 6 या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
\s5
\v 7 आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहत आहोत, तो आपलाच आहे. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
\v 8 आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामीन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरुष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्यबाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
\s5
\v 9 पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशें रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.
\v 10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली.
\v 11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळवू नये.”
\s5
\v 12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला.
\v 13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.
\v 14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले.
\v 15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमेला परतले.
\s5
\c 15
\p
\v 1 ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
\v 2 अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हाला भेटेल. पण तुम्ही त्याला सोडलेत तर तो ही तुम्हाला सोडेल.
\s5
\v 3 इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
\v 4 पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा इस्राएलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला.
\v 5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
\s5
\v 6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते.
\v 7 पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हाला मिळेल.”
\s5
\v 8 आसाला या शब्दांनी आणि ओदेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ति हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्तीही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
\v 9 मग त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदात आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर त्याच्या सोबत आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
\s5
\v 10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेमामध्ये एकत्र जमले.
\v 11 त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बळी परमेश्वराला अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती.
\s5
\v 12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
\v 13 जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
\s5
\v 14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला.
\v 15 मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांना मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वराला शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
\s5
\v 16 आसा राजाने आपली आजी माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्याने ती मूर्ती मोडून तोडून किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली.
\v 17 त्याने यहूदातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
\v 18 मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
\v 19 आसाच्या पस्तिस वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.
\s5
\c 16
\p
\v 1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्त्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
\s5
\v 2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला,
\v 3 “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
\s5
\v 4 बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली व केली.
\v 5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
\v 6 राजा आसाने मग सर्व यहूदी यांना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
\s5
\v 7 यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
\v 8 कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
\s5
\v 9 अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
\v 10 द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्याला तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.”
\s5
\v 11 यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात आसाच्या कारभाराचे संपूर्ण वर्णन आहे.
\v 12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
\s5
\v 13 आपल्या कारकीर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
\v 14 दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
\s5
\c 17
\p
\v 1 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.
\v 2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.
\s5
\v 3 यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही.
\v 4 आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
\s5
\v 5 परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच बहुमान मिळाला.
\v 6 परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.
\s5
\v 7 आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन हईक, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.
\v 8 त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
\v 9 हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.
\s5
\v 10 यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.
\v 11 कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्याला दिले.
\s5
\v 12 यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली.
\v 13 यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरुशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली.
\s5
\v 14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तिन लाख सैनिकांचा सेनापती होता.
\v 15 यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.
\v 16 जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
\v 17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
\v 18 यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.
\v 19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.
\s5
\c 18
\p
\v 1 यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्याच्याशी सलोखा केला.
\v 2 त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रित्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बळी दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
\v 3 अहाब त्याला म्हणाला, रामोथ गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का? अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्याला म्हणाला, तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.
\s5
\v 4 यहोशाफाट इस्त्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.
\v 5 तेव्हा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, जरुर जा. कारण राजाला जय देईल.
\s5
\v 6 पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वराला त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”
\v 7 तेव्हा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वराला विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र. पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.”
\v 8 तेव्हा अहाबाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”
\s5
\v 9 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते.
\v 10 कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.
\v 11 इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”
\s5
\v 12 मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्याला म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
\v 13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
\v 14 मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्याला म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”
\s5
\v 15 राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!”
\v 16 यावर मीखाया राजाला म्हणाला, मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांना डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.
\s5
\v 17 इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
\v 18 मीखाया म्हणाला, तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वराला मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती,
\s5
\v 19 “परमेश्वर म्हणाला, इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला ह्या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
\s5
\v 20 “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
\v 21 तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.”
\s5
\v 22 “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
\s5
\v 23 तेवढ्यात कनानाचा सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”
\v 24 मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”
\s5
\v 25 राजा अहाब म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा
\v 26 आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्याला कैदयाना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.”
\v 27 मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”
\s5
\v 28 इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ गिलादावर हल्ला चढवला.
\v 29 राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “ मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.
\v 30 अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”
\s5
\v 31 त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
\v 32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
\s5
\v 33 पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नेमका चिलखताच्या सांध्यातून अहाबाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”
\v 34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.
\s5
\c 19
\p
\v 1 यहूदाचा राजा यहोशाफाट यरुशलेमामध्ये आपल्या घरी सुखरुप परतला.
\v 2 हनानीचा पुत्र येहू हा द्रष्टा होता तो यहोशाफाटाला सामोरा गेला. येहू यहोशाफाटाला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.
\v 3 पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.”
\s5
\v 4 यहोशाफाट यरुशलेमामध्ये राहत असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेब्यापासून एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले.
\v 5 तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले.
\s5
\v 6 यहोशाफाटाने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल.
\v 7 तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
\s5
\v 8 यानंतर यहोशाफाटाने यरुशलेमामध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वयस्कर मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेमामधल्या रहिवाश्याच्या वादांचा निकाल लावायचा होता. ते यरूशलेमेत राहीले
\v 9 यहोशाफाटाने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन निष्कपट रीतीने आणि मन:पूर्वक ही सेवा करा.
\s5
\v 10 खुनाचा वाद, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्वबाबतीत प्रत्येक वेळी लोकांना सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.
\s5
\v 11 अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा पुत्र जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”
\s5
\c 20
\p
\v 1 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.
\v 2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.
\s5
\v 3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
\v 4 तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
\s5
\v 5 यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
\v 6 तो म्हणाला, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.
\v 7 तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्याना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
\s5
\v 8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले.
\v 9 ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.”
\s5
\v 10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
\v 11 पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस.
\s5
\v 12 हे देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.
\v 13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.
\s5
\v 14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत
\v 15 यहजीएल म्हणाला, राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
\s5
\v 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
\v 17 तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
\s5
\v 18 यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली.
\v 19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
\s5
\v 20 यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
\v 21 यहोशाफाटाने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”
\s5
\v 22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
\v 23 अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
\s5
\v 24 यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.
\s5
\v 25 यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहापाशी आले. त्यात त्यांना खूप , धन, आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत:ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले.
\v 26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वराला, धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे.
\s5
\v 27 मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरुशलेम लोकांना यरुशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता.
\v 28 यरुशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
\s5
\v 29 परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला.
\v 30 त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
\s5
\v 31 यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या.
\v 32 आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.
\v 33 पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
\s5
\v 34 हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे.
\s5
\v 35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.
\v 36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एस्योन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
\v 37 पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील. आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.
\s5
\c 21
\p
\v 1 पुढे यहोशाफाट मरण पावला. त्याला त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला.
\v 2 अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्त्राएलाचा राजा होता.
\v 3 यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्यारुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.
\s5
\v 4 यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.
\v 5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरुशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले.
\s5
\v 6 अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या वर्तनूकी प्रमाणेच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या कन्येशी यहोरामाने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या.
\v 7 पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता.
\s5
\v 8 यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला.
\v 9 तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला.
\v 10 तेव्हापासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले.
\s5
\v 11 यहोरामाने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली. असे करण्याने, परमेश्वराला लोकांनी जसे वागावे असे वाटत होते त्यात खंड पडला. यहोरामाने यहूदी लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.
\s5
\v 12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दाविद यांचा परमेश्वर म्हणतो, यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही.
\v 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांना तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत:च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते.
\v 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांना जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे.
\v 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.
\s5
\v 16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले.
\v 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला.
\s5
\v 18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.
\v 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.
\v 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दाविद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.
\s5
\c 22
\p
\v 1 यहोरामाच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबाबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
\v 2 त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.
\v 3 अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.
\s5
\v 4 अहाबाच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वराला मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर अहाबाच्या घराण्याने त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. त्या अयोग्य सल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला.
\v 5 अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामाच्या बरोबर अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा पुत्र. योराम या लढाईत अराम्याकडून जखमी झाला.
\s5
\v 6 तेव्हा तो दुखण्याला उतार पडावा यासाठी इज्रेल येथे परतला. रामोथ येथे अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढताना तो घायाळ झाला होता. योथामाला भेटायला म्हणून अहज्या इज्रेल येथे गेला. यहूदाचा राजा यहोराम याचा अहज्या हा पुत्र. योरामाच्या पित्याचे नाव अहाब. दुखापतीमुळे तो इज्रेला आला होता.
\s5
\v 7 अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
\v 8 अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
\s5
\v 9 यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या माणसांनी त्याला तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्याला ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वराला शरण गेला होता. यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
\s5
\v 10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.
\v 11 पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही.
\v 12 परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.
\s5
\c 23
\p
\v 1 यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.
\v 2 त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवीना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले.
\v 3 तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांना म्हणाला, परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्याला अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.
\s5
\v 4 आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
\v 5 एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात राहावे.
\s5
\v 6 कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.
\v 7 लेवीनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.
\s5
\v 8 लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.
\v 9 दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.
\s5
\v 10 आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या थेट उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.
\v 11 मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुगुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्याला अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.
\s5
\v 12 मंदिराकडे लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती मंदिरात लोकांकडे आली.
\v 13 पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि फितुरी, फितुरी असे ती ओरडली.
\s5
\v 14 याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्याला तलवारीने मारुन टाका. मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.
\v 15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
\s5
\v 16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
\v 17 मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ति आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
\s5
\v 18 यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले
\v 19 कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले
\s5
\v 20 सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.
\v 21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुशलेम नगर शांत झाले.
\s5
\c 24
\p
\v 1 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती.
\v 2 यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती.
\v 3 यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्याला अपत्ये झाली.
\s5
\v 4 पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.
\v 5 तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. या कामाला विलंब लावू नका पण लेवीनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.
\s5
\v 6 तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, लेवीना तू यहूदा आणि यरुशलेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे.
\v 7 पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी देवाच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बआल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती.
\s5
\v 8 राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली.
\v 9 लेवीनी मग यहूदा व यरुशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.
\v 10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले.
\s5
\v 11 पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला.
\v 12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.
\s5
\v 13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले.
\v 14 कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापारायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याव्यतिरिक्त सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जीवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत.
\s5
\v 15 पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युसमयी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते.
\v 16 दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे याठिकाणी दफन केले.
\s5
\v 17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले.
\v 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ति यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला.
\v 19 लोकांना परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांना परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.
\s5
\v 20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.
\v 21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांना जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्याला दगडफेक करून मारले. हे त्यांनी मंदिराच्या दालनातच केले.
\v 22 जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.
\s5
\v 23 वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरुशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले.
\v 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले.
\s5
\v 25 अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्याला मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
\v 26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाब येथील होती.
\s5
\v 27 योवाशाचे पुत्र, त्याला दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.
\s5
\c 25
\p
\v 1 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरुशलेमची होती.
\v 2 त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मन:पूर्वकता नव्हती.
\s5
\v 3 अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
\v 4 पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, मुलांच्या अपराधासाठी मातापितांना आणि मातापित्यांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.
\s5
\v 5 अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामीन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर तीन लाख सैनिक युध्दाला तयार होते.
\v 6 यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर क्किकार चांदी एवढी किंमत मोजली.
\s5
\v 7 पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही.
\v 8 तू भले कितीही तयारी करून लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.
\s5
\v 9 यावर अमस्या त्या देवाच्या माणसाला म्हणाला, पण इस्राएली सैन्याला मी पैसे देऊन बसलो आहे, त्याचे काय? देवाचा माणूस म्हणाला, परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.
\v 10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले, या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहूदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले.
\s5
\v 11 यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांना ठार केले.
\v 12 यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
\s5
\v 13 नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
\s5
\v 14 अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ति बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
\v 15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत:च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
\s5
\v 16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
\s5
\v 17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता.
\s5
\v 18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे. पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
\v 19 मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत:ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
\s5
\v 20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
\v 21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे.
\v 22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
\s5
\v 23 योवाशाने बेथ-शेमेश येथे यहूदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरुशलेमेला नेले. अमस्याच्या पित्याचेनाव योवाश. योवाशाचे पिता यहोआहाज. योवाशाने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमच्या तटबंदीची चारशे हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
\v 24 सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
\s5
\v 25 योवाशाच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश.
\v 26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकीकत आली आहे.
\s5
\v 27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
\v 28 अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्याला पूर्वंजाशेजारी पुरले.
\s5
\c 26
\p
\v 1 अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
\v 2 उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
\v 3 उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरुशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरुशलेमाची होती.
\s5
\v 4 उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
\v 5 जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.
\s5
\v 6 उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
\v 7 पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
\v 8 अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली.
\s5
\v 9 यरुशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.
\v 10 वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखेसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
\s5
\v 11 उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
\v 12 सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
\v 13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
\s5
\v 14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
\v 15 काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
\s5
\v 16 पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
\v 18 त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नकोस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
\s5
\v 19 पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
\v 20 मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
\s5
\v 21 राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. मंदिरात त्याला मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
\s5
\v 22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत.
\v 23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्याला पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
\s5
\c 27
\p
\v 1 योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या.
\v 2 योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.
\s5
\v 3 परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले.
\v 4 यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले.
\s5
\v 5 अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीन वर्षे अम्मोनी योथामाला शभंर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.
\s5
\v 6 परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.
\v 7 त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे.
\s5
\v 8 योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले.
\v 9 पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशेजारी दफन केले गेले. दाविद नगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामाच्या जागी आहाज हा त्याचा पुत्र राज्य करु लागला.
\s5
\c 28
\p
\v 1 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षाचा होता. त्याने यरुशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दाविद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वराला मान्य होणारे नव्हते.
\v 2 इस्राएलाच्या राजांच्या त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ति बनवल्या.
\s5
\v 3 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या पुत्रांना त्याने अग्नीमध्ये आहूती देवून बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तेथून घालवले होते.
\v 4 आहाजने उंचस्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.
\s5
\v 5 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामाच्या राजाच्या हातून आहाजाचा पराभव करविला. अरामाच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजाचा पाडाव करून यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजाचा पराभव करवला.
\v 6 पेकहच्या पित्याचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे एक लाख विस हजार शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला.
\s5
\v 7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजाचा पुत्र मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.
\v 8 इस्राएलाच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या दोन लाख जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते या कैद्यांमध्ये स्त्रिया व बालकेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन येथे आले.
\s5
\v 9 तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांची कत्तल केलीत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे.
\v 10 यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे अपराध केले आहे.
\v 11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या बंधू-भगिनींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”
\s5
\v 12 एफ्राइमच्या काही प्रमुख मंडळीनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानाचा पुत्र अजऱ्या, मशिल्लेमोथचा पुत्र बरेख्या, शल्लूमचा पुत्र यहिज्कीया, आणि हदलाईचा पुत्र अमास ही ती नेते मंडळी होत.
\v 13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलावर परमेश्वराचा कोप होईल.”
\s5
\v 14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले.
\v 15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी त्यांच्या जखमा बांधल्या व चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. (यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात.) मग ते शोमरोनला परतले.
\s5
\v 16 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करून नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली.
\v 17 कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते.
\v 18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, गदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. व तेथे ते राहायला गेले.
\s5
\v 19 परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केलेे होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते.
\v 20 तिल्गथ-पिलेसर हा अश्शूराचा राजा. याने आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला.
\v 21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
\s5
\v 22 या संकटकाळात आहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला.
\v 23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामाचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.
\s5
\v 24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणे गोळा करून त्यांची मोडतोड करून विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करून घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेमामध्ये चौका चौकात बसवल्या.
\v 25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंचस्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.
\s5
\v 26 आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे.
\v 27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजाचा पुत्र हिज्कीया हा पुढे राजा झाला.
\s5
\c 29
\p
\v 1 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या.
\v 2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
\s5
\v 3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले.
\v 4 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली.
\v 5 तो त्यांना म्हणाला, लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका.
\s5
\v 6 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि देव आपला परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली.
\v 7 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले.
\s5
\v 8 म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
\v 9 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले.
\s5
\v 10 म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही.
\v 11 तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हाला त्याने निवडले आहे.
\s5
\v 12 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयाचा पुत्र महथ आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजऱ्या, गर्षोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन,
\v 13 अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.
\v 14 हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी, यदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल.
\s5
\v 15 मग या लेवीनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुद्धतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले.
\v 16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या.
\v 17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवीनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
\s5
\v 18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडे आम्ही शुद्ध केले आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत.
\v 19 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुद्धी करून आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”
\s5
\v 20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला.
\v 21 त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्रस्थान आणि यहूदा यांच्या शुद्धीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
\s5
\v 22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.
\v 23 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले.
\v 24 बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. इस्राएलाबद्दल प्रायश्चित होण्यासाठी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
\s5
\v 25 दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेप्रमाणे राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवीची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती.
\v 26 त्याप्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले
\s5
\v 27 मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञा केली. त्याला सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला.
\v 28 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.
\s5
\v 29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली.
\v 30 हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.
\s5
\v 31 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली.
\s5
\v 32 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे नर कोकरे. त्यांचे परमेश्वराला होमार्पण करण्यात आले.
\v 33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमंढरे हे परमेश्वराला वाहिलेले पशू.
\s5
\v 34 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवीनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.
\s5
\v 35 होमबली पुष्कळ होते. शांती अर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. याप्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली.
\v 36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदित झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
\s5
\c 30
\p
\v 1 हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांना निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांना पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.
\v 2 यरुशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.
\v 3 सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरुशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.
\s5
\v 4 तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली.
\v 5 बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरुशलेमेला यायला सर्व लोकांना आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.
\s5
\v 6 त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.
\s5
\v 7 आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
\v 8 आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वराला शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.
\v 9 तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.
\s5
\v 10 एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोप्ये गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली.
\v 11 आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरुशलेमेला प्रयाण केले.
\v 12 पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
\s5
\v 13 दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरुशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.
\v 14 यरुशलेमेमधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या.
\v 15 दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बळी दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत:ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
\s5
\v 16 देवाचा माणूस मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.
\v 17 येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवीनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.
\s5
\v 18 एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.
\v 19 तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांना मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
\v 20 राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांना क्षमा केली.
\s5
\v 21 इस्राएलाच्या प्रजेने यरुशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन:पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्त्रोत्रे गाईली.
\v 22 परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवीना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांतिअर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबूली दिली.
\s5
\v 23 वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला.
\v 24 यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे व पुढाऱ्यांनी एक हजार बैल व दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले.
\s5
\v 25 यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते.
\v 26 यरुशलेमामध्ये आनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता.
\v 27 याजक व लेवी यांनी उठून लोकांना आशीर्वाद देण्याची परमेश्वराला प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वराला ऐकू गेली.
\s5
\c 31
\p
\v 1 अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरुशलेमेमध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ति फोडून टाकल्या. या परकीय दैवतांची पूजा होत असे. अशेराच्या मुर्तीही त्यांनी उखडून टाकल्या. यहूदा आणि बन्यामीन प्रांतातील सर्व उंचस्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. इतर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. व तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.
\s5
\v 2 लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वाना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांतिअर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.
\v 3 यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या होमार्पणा खातर त्यांचा उपयोग करण्यात आला. शब्बाथ, चंद्रदर्शने व इतर उत्सव कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहीले आहे.
\s5
\v 4 आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्यावा लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवीना शक्य झाले.
\v 5 ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.
\s5
\v 6 यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वर देव यहोवाकरिता आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.
\v 7 लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.
\v 8 राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणि इस्राएलाच्या प्रजेला धन्यवाद दिले.
\s5
\v 9 राजाने मग याजकांना आणि लेवीना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.
\v 10 तेव्हा सादोकाचा घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या लोकांना आशीर्वाद दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.
\v 11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.
\v 12 याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
\v 13 यहीएल, अजज्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या माणसांची निवड केली.
\s5
\v 14 लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वराला वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वराला आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्याच्या पित्याचे नाव इम्नाना लेवी.
\v 15 एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या व शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहत त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वानाच सारखाच भाग देत असत.
\s5
\v 16 लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.
\s5
\v 17 याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवीना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरुप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
\v 18 ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.
\v 19 अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहत असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील माणसांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.
\s5
\v 20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.
\v 21 हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वराला शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले त्याला यश लाभले.
\s5
\c 32
\p
\v 1 हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करून आला. नगराच्या तटबंदी बाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करून ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.
\s5
\v 2 यरुशलेमेवर हल्ला करायला सन्हेरीब आला आहे हे हिज्कीयाला कळले.
\v 3 तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्याला मदत केली.
\v 4 झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्याला मुबलक पाणी का मिळावे?
\s5
\v 5 हिज्कीयाने पुढील उपाययोजनेने यरुशलेमची मजबुती वाढवली. तटबंदीची भिंत ज्याठिकाणी ढासळली होती तिथे बांधून काढली. भिंतीवर बुरुज बांधले. तटबंदी बाहेर दुसरा मजबूत कोट केला. दाविद नगरातील मिल्लो नावाच्या बूरूजाची मजबूती केली. शस्त्रे आणि ढाली आणखी करवून घेतल्या.
\s5
\v 6 हिज्कीयाने प्रजेवर सेना नायकांच्या नेमणुका केल्या, आणि नगराच्या वेशीजवळच्या चौकात त्यांची सभा घेऊन त्यांच्याशी उत्तेजनपर बातचीत केली.
\v 7 हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
\v 8 अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला तर साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे यहूदाचा राजा हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.
\s5
\v 9 अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.
\v 10 सेवक म्हणाले की, “अश्शूरचा राजा सन्हेरीब याचा संदेश असा आहे. यरुशलेमेला वेढा पडला असताना कशाच्या भरवंशावर तुम्ही तिथे राहता?”
\s5
\v 11 हिज्कीयाचा हा तुम्हाला फसवण्याचा डाव आहे. यरुशलेमामध्ये अडकून तुम्ही तहानभुकेने व्याकुळ होऊन मरावे असा त्याचा अंतताः हेतू आहे. तो तुम्हाला म्हणतो, अश्शूरच्या राजापासून आपला देव परमेश्वर आपले रक्षण करील.
\v 12 पण त्यानेच परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या. तुम्हा यहूदी आणि यरुशलेमच्या लोकांना त्याने सांगितले की तुम्ही फक्त एकाच वेदीवर उपासना केली पाहिजे आणि धूप जाळला पाहिजे.
\s5
\v 13 माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हाला माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांना वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत.
\v 14 माझ्या पूर्वजांनी इतर देशांचा नाश केला. त्यांच्या सर्व देवापैकी आपल्या लोकांना विनाशातून सोडवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तरी तुम्हाला माझ्या सामर्थ्यापासुन वाचवू शकेल असे वाटते का?
\v 15 हिज्कीयाच्या बतावणीला बळी पडू नकाव त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्या पासून आपल्या प्रजेचे रक्षण करण्यात कोणत्याच राष्ट्राच्या दैवताला अद्यापि यश आलेले नाही. तेव्हा तुमचा संहार करण्याला तुमचे दैवत माझ्या हातून तुम्हांला वाचवू शकेल असे समजू नका.
\s5
\v 16 अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी परमेश्वर देवाची आणि देवाचा सेवक हिज्कीया याची निंदानालस्ती केली.
\v 17 अश्शूरच्या राजाने पत्रांमध्ये परमेश्वर देवाविषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तसेच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”
\s5
\v 18 मग अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी तटबंदीवर उभ्या असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवण्यासाठी हिब्रू भाषेत मोठ्याने आरडाओरडा केला. असे करून यरुशलेम नगर ताब्यात घ्यायचा त्यांचा विचार होता.
\v 19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरुशलेमेच्या परमेश्वरालाही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.
\s5
\v 20 यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली.
\v 21 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.
\s5
\v 22 अशाप्रकारे परमेश्वराने अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याचे सैन्य यांच्यापासून हिज्कीया आणि यरुशलेमचे लोक यांचे संरक्षण केले. परमेश्वराला हिज्कीयाची आणि यरुशलेमच्या प्रजेची काळजी होती.
\v 23 बऱ्याच जणांनी परमेश्वराला वाहण्यास भेटवस्तू आणल्या. यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठी ही नजराणे आणले. या घटनेपासून सर्व राष्ट्रांना हिज्कीयाबद्दल आदर वाटू लागला.
\s5
\v 24 या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला याप्रकारे परमेश्वराने त्याला एक संकेत दिला.
\v 25 पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला.
\v 26 परंतु यरुशलेमेचे लोक आणि हिज्कीया यांचे ह्दयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही.
\s5
\v 27 हिज्कीयाची भरभराट झाली. त्याला मान सन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली.
\v 28 धान्य, नवीन मद्य, तेल या लोकांकडून आलेल्या गोष्टी ठेवायलाही कोठारे बांधली, गुरेढोरे आणि मेंढ्या आपल्या कळपासाठी कोंडवाडे बांधले.
\v 29 हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देव दयेने हिज्कीयाला समृध्दी आली.
\s5
\v 30 याच हिज्कीयाने गीहोनचा यरुशलेमामधला वरचा प्रवाह अडवून त्याला दाविद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.
\v 31 एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्याला एकटे सोडले.
\s5
\v 32 हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी आमोजचा पुत्र यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे.
\v 33 हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दाविदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे गादीवर आला.
\s5
\c 33
\p
\v 1 मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
\v 2 त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
\v 3 हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बाल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे.
\s5
\v 4 परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या ईतर दैवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेमामध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
\v 5 या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
\v 6 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बळी दिला. जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्यांशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.
\s5
\v 7 मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दाविद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, या मंदिरात आणि यरुशलेमेमध्ये माझे नाव चिरंतन काल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमेला निवडले.
\v 8 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्राएल लोकांना बाहेर पडू देणार नाही. पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत. मोशेद्वारे त्यांना दिलेल्या विधी, नियम व आज्ञा त्यांनी पाळायला हवेत.
\v 9 मनश्शेने मात्र यहूदा लोक आणि यरुशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत केले. इस्राएल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते.
\s5
\v 10 परमेश्वर मनश्शेशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही.
\v 11 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.
\s5
\v 12 मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
\v 13 त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमेला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
\s5
\v 14 या घटनेनंतर मनश्शेने दाविद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.
\v 15 परक्या देवतांच्या मूर्ति त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ति काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेमामध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.
\s5
\v 16 नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांना त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली.
\v 17 लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवा प्रित्यर्थ करीत होते.
\s5
\v 18 मनश्शेची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्यावतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्राएलच्या राजांच्या बखरीत लिहिलेले आहे.
\v 19 मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वराला त्याचे गाऱ्हाणे ऐकून करुणा वाटणे हे द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व दुर्वर्तने, उंचस्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने कोरीव मुर्ती याचेही तपशील याच बखरीत आहेत.
\v 20 पुढे मनश्शे मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राज्य करु लागला.
\s5
\v 21 आमोन बाविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेमेमध्ये दोन वर्षे गादीवर होता.
\v 22 परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. पित्यानी करून घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करून आमोनाने त्यांची पूजा केली.
\v 23 पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वराला नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट अामोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.
\s5
\v 24 आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली.
\v 25 पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा पुत्र योशीया याला लोकांनी राजा केले.
\s5
\c 34
\p
\v 1 योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले.
\v 2 त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते परमेश्वराची त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला आपला पूर्वज दाविद याच्याप्रमाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.
\v 3 आपल्या कारकीर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दाविद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकीर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरुशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ति यांची मोडतोड केली.
\s5
\v 4 लोकांनी त्याच्या समोरच बआलदेवतांच्या मूर्ति फोडून टाकल्या. वरच्या भागात असलेल्या धूप जाळण्याच्या वेद्या योशीयाने उद्ध्वस्त केल्या. अशेराच्या मुर्ती ओतीव आणि कोरीव मूर्तीचाही त्याने पार चुराडा करून टाकला आणि हे चूर्ण, ज्या लोकांनी बआल देवतांसाठी यज्ञ केले त्यांच्या कबरीवर पसरले.
\v 5 बआल देवतांची पूजा करणाऱ्या याजकांच्या अस्थी देखील त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या. अशाप्रकारे त्याने यहूदा आणि यरुशलेमला शुद्ध केले.
\s5
\v 6 मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून आणि त्यांच्या आसपासच्या पडीक जागेत त्याने हेच केले.
\v 7 त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरा खांबांची मोडतोड करून चूर्ण केले धूपाच्या वेद्या उखडणे ही इस्राएलभरची मोहीम उरकल्यावर योशीया यरुशलेमेला परतला.
\s5
\v 8 योशीयाने राज्याची सूत्रे हाती घेतल्याच्या अठराव्या वर्षी शाफान, मासेया, आणि योवाह यांना परमेश्वर देवाचे मंदिर दुरुस्तीसाठी पाठवले. शाफानच्या पित्याचे नाव असल्या, मासेया हा नगराचा कारभारी होता आणि योवाहाचे पिता योवाहाज. योवाह हा बखरकार होता. यहूदा आणि मंदिर यांच्या शुद्धीकरणासाठी मंदिराच्या डागडुजीचे हे काम योशीयाने अंगावर घेतले.
\v 9 ही माणसे हिल्कीया या मुख्य याजकाकडे गेली. मनश्शे, एफ्राइम आणि उर्वरित सर्व इस्राएलातून लोकांनी देवाच्या मंदिरासाठी दिलेला पैसा लेवी द्वारपालांनी जमा केला होता. सर्व यहूदा प्रांत, बन्यामिनचा प्रदेश आणि यरुशलेमेतून देखील त्यांनी पैसे जमा केले होते. ही रक्कम हिल्कीयाकडे त्यांनी सुपूर्त केली.
\s5
\v 10 मग, परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्यांना लेवीनी हे पैसे दिले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कामगारांना दिले.
\v 11 तासलेले चिरे, लाकूड यांच्या खरेदीसाठी गवंडी, सुतार या लोकांना पैसे देण्यात आले. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि कडीपाटासाठी लाकूड लागले. यहूदाचा राजांनी यापूर्वी मंदिराची योग्य देखभाल न केल्यामुळे मंदिराच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या.
\s5
\v 12 कामगारांनी मन लावून काम केले. यहथ व ओबद्या हे मरारी कुळातील लेवी देखरेख करत होते. कहाथी वंशातील जखऱ्या आणि मशुल्लाम हे ही देखरेखीच्या कामावर होते. वाद्ये वाजवण्यात निपुण असलेले लेवीसुध्दा होते.
\v 13 ते कारागिरांवर आणि मजुरांवर देखरेख करत होते. चिटणीस, कारभारी आणि द्वारपाल म्हणून काही लेवी काम करत होते.
\s5
\v 14 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
\v 15 तेव्हा हिल्कीयाने शाफान या चिटणीसाला असा ग्रंथ सापडल्याचे सांगून, शाफानला तो दिला.
\v 16 शाफानने तो योशीयाकडे आणला. राजाला तो म्हणाला, “तुझे सेवक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत.
\s5
\v 17 परमेश्वराच्या मंदिरातील पैसा घेऊन त्यातून ते देखरेख करणाऱ्यांना आणि मजुरांना वेतन देत आहेत”
\v 18 शाफान पुढे राजाला म्हणाला, “याजक हिल्कीयाने मला हे पुस्तक दिले आहे.” शाफानने मग राजाला पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला.
\v 19 तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले.
\s5
\v 20 आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.
\v 21 “माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”
\s5
\v 22 हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुशलेमच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले सांगितली.
\s5
\v 23 हुल्दा त्यांना म्हणाली, इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे: राजा योशीयाला म्हणावे:
\v 24 परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.
\v 25 माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.
\s5
\v 26 पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो:
\v 27 योशीयाने, पश्चात्तापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे
\v 28 तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
\s5
\v 29 तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरुशलेममधील सर्व वयोवृद्धांना भेटीसाठी एकत्र बोलावले.
\v 30 राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरुशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली.
\s5
\v 31 मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले.
\v 32 मग त्याने यरुशलेम आणि बन्यामीन मधील लोकांनाही या करारपालनात सामील करून घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले.
\s5
\v 33 इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधील विविध मूर्ति होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ति योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.
\s5
\c 35
\p
\v 1 राजा, योशीयाने यरुशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
\v 2 परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
\s5
\v 3 इस्त्राएली लोकांना शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दाविद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दाविद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
\v 4 आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा.
\s5
\v 5 आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हाला आपापसात सहकार्य करता येईल.
\v 6 वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”
\s5
\v 7 वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांना दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
\v 8 या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांना, लेवीना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशें बैल एवढे पशू वल्हांडणाचे बळी म्हणून याजकांना दिले.
\v 9 कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवीना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.
\s5
\v 10 वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
\v 11 वल्हांडणाचे कोकरे मारले गेली. लेवीनी त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. याजकांनी हे रक्त वेदीवर शिंपडले.
\v 12 त्यांनी मग हे बैल परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
\s5
\v 13 लेवीनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांना ती नेऊन दिली.
\v 14 हे काम उरकल्यावर लेवीना स्वत:साठी आणि अहरोनचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
\s5
\v 15 आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदुथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
\s5
\v 16 तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
\v 17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
\s5
\v 18 शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरुशलेमाची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
\v 19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
\s5
\v 20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढण्यासाठी सैन्यासह चालून आला. योशीया त्याला लढाईसाठी सामोरा गेला.
\v 21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्याला कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.
\s5
\v 22 पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मागिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
\s5
\v 23 या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.
\v 24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमेला नेले. यरुशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमेच्या लोकांना फार दु:ख झाले.
\s5
\v 25 यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
\v 26 आपल्या कारकिर्दीत योशीयाने ज्या इतर चांगल्या गोष्टी केल्या त्या इस्राएल आणि यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात अथपासून इतीपर्यंत नोंदवलेल्या आहेत.
\v 27 यहूदाची परमेश्वरावरची निष्ठा आणि त्याचे आज्ञापालन याविषयी त्यात लिहिले आहे.
\s5
\c 36
\p
\v 1 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र.
\v 2 तो यहूदाचा राजा झाला तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये तीन महिने राज्य केले.
\s5
\v 3 त्यानंतर मिसरचा नखो याने योआहाजला कैद केले. नखोने यहूदाच्या लोकांवर शभंर किक्कार चांदी आणि एक किक्कार सोने एवढी खंडणी लादली.
\v 4 मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकीम याला यहूदा-यरुशलेमेचा राजा केले. यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले.
\s5
\v 5 यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेमामध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवाविरुध्द पाप केले.
\v 6 बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्याला कैद केले आणि त्याला बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्याला नबुखदनेस्सरने बाबेलला नेले.
\v 7 नबुखद्नेनेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या.
\s5
\v 8 यहोयाकीमाच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध हे सर्व इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. यहोयाकीमाच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राज्य करु लागला.
\s5
\v 9 यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता. यरुशलेमामध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती. परमेश्वराला अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले.
\v 10 राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या नातलगांपैकी सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरुशलेमचा राजा केले.
\s5
\v 11 सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले.
\v 12 परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याने केले. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत. त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.
\s5
\v 13 सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वत:शी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले.
\v 14 त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधाण केली.
\s5
\v 15 त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांना सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वराला वाटत होते.
\v 16 पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
\s5
\v 17 तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमेवर स्वारी करायला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दिली होती.
\s5
\v 18 देवाच्या मंदिरातील सर्व चीजवस्तू त्याने बाबेलला नेल्या. इतकेच नव्हे तर राजाच्या व सरदारांच्या किंमती वस्तूही नेल्या.
\v 19 त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरुशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरुशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली.
\s5
\v 20 अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांना नबुखदनेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.
\v 21 अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथच्या भरपाईसाठी असे होईल.
\s5
\v 22 कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्याला एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की,
\v 23 पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरुशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरुशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.

511
15-EZR.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,511 @@
\id EZR
\ide UTF-8
\h एज्रा
\toc1 एज्रा
\toc2 एज्रा
\toc3 ezr
\mt1 एज्रा
\s5
\c 1
\p
\v 1 पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.
\v 2 “पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरुशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.
\p
\s5
\v 3 जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरुशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरुशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.
\v 4 तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यानी त्या भागातून यरुशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.”
\s5
\v 5 तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरुशलेमेला जाण्यास सिद्ध झाले.
\v 6 जे लोक त्यांच्या सभोवती रहात होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.
\s5
\v 7 यरुशलेमातून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली.
\v 8 ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली.
\s5
\v 9 त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,
\v 10 तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार इतर पात्रे,
\v 11 सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरुशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यासोबत ही सर्व पात्रे आणली.
\s5
\c 2
\p
\v 1 बाबेलचा राजा नबुखद्रेस्सराने बाबेलास नेलेले यरुशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.
\v 2 जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, एलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणेः
\p
\s5
\v 3 परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.
\v 4 शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
\v 5 आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.
\v 6 येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.
\p
\s5
\v 7 एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
\v 8 जत्तूचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
\v 9 जक्काईचे वंशज सातशे साठ.
\v 10 बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.
\p
\s5
\v 11 बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.
\v 12 अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
\v 13 अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.
\v 14 बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.
\p
\s5
\v 15 आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.
\v 16 हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.
\v 17 बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.
\v 18 योराचे वंशज एकशे बारा.
\p
\s5
\v 19 हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.
\v 20 गिबाराचे वंशज पंचाण्णव.
\v 21 बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.
\v 22 नटोफातील लोक छपन्न.
\p
\s5
\v 23 अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.
\v 24 अजमावेथातील लोक बेचाळीस
\v 25 किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.
\v 26 रामा व गेबा मधील लोक सहाशे एकवीस.
\p
\s5
\v 27 मिखमासातील लोक एकशे बावीस.
\v 28 बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.
\v 29 नबोतील लोक बावन्न.
\v 30 मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.
\s5
\v 31 दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.
\v 32 हारीम येथील लोक तीनशे वीस.
\v 33 लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.
\p
\s5
\v 34 यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.
\v 35 सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.
\p
\s5
\v 36 याजक येशूवाच्या घराण्यातील यदायाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.
\v 37 इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
\v 38 पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
\v 39 हारीमाचे वंशज एक हजार दोनशे सतरा.
\p
\s5
\v 40 लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.
\v 41 मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.
\v 42 मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.
\p
\s5
\v 43 मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.
\v 44 केरोस, सीहा, पादोन.
\v 45 लबाना, हगबा, अकूबा,
\v 46 हागाब, शम्लाई, हानान,
\p
\s5
\v 47 गिद्देल, गहर, राया,
\v 48 रसीन, नकोदा, गज्जाम,
\v 49 उज्जा, पासेह, बेसाई,
\v 50 अस्ना, मऊनीम, नफसीम.
\p
\s5
\v 51 बकबुक हकूफ, हरहुर,
\v 52 बस्लूथ, महीद, हर्षा,
\v 53 बकर्स, सीसरा, तामह,
\v 54 नसीहा, हतीफा.
\s5
\v 55 शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,
\v 56 जाला, दकर्न, गिद्देल,
\v 57 शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
\v 58 मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.
\s5
\v 59 तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.
\v 60 दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.
\s5
\v 61 आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी बायको करून घेतली होती आणि त्याला त्याचे नाव पडले होते.)
\v 62 आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.
\v 63 याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.
\p
\s5
\v 64 सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
\v 65 त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.
\p
\s5
\v 66 त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
\v 67 त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
\s5
\v 68 हे सर्वजण यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.
\v 69 या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.
\p
\s5
\v 70 याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.
\s5
\c 3
\p
\v 1 इस्राएली लोक आपापल्या नगरात परतल्यानंतर सातव्या महिना सुरु झाल्यावर, ते सर्वजण एकमनाने यरुशलेमेत एकत्र जमले.
\v 2 योसादाकाचा मुलगा येशूवा आणि त्याचे भाऊ याजक व शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्राएलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी, देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली.
\p
\s5
\v 3 मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वराला सकाळ संध्याकाळ होमार्पणे अर्पण करू लागले.
\v 4 मग त्यांनी मंडपाचा सण लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमार्पणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली.
\v 5 त्यानंतर दररोजचे होमार्पण, चंद्रदर्शन याप्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमार्पण त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले.
\p
\s5
\v 6 अशाप्रकारे, अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतांनाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वराला होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली.
\v 7 त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांना अन्न, पेय व तेलही दिले.
\s5
\v 8 शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा व त्याचे भाऊ, जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदीवासातून परत यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदीराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते.
\v 9 येशूवा आपले मुले आणि त्याचे भाऊ, कदमीएल आणि त्याची मुले, यहूदाचे वंशज हेनादाद आणि त्याचे मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्यासहीत देवाच्या मंदिरात कारारगिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.
\s5
\v 10 जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोषाख घालून हाती कर्णे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले.
\v 11 “तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे.” स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.
\p
\s5
\v 12 पण यावेळी वृद्ध याजक, लेवी आणि वडिलांच्या घराण्यांतील मुख्य मंडळी यांच्यातले पुष्कळजण जेव्हा ह्या मंदिराचा पाया त्याच्या डोळ्यासमोर घातला गेला तेव्हा ते मोठ्याने रडू लागले, कारण पहिले घर त्यांनी पाहिले होते. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू होता.
\v 13 हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.
\s5
\c 4
\p
\v 1 यहूदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की, बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत.
\v 2 तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हालाही तुम्हासोबत बांधकाम करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हाला ह्या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत.”
\p
\s5
\v 3 पण जरुब्बाबेल, येशूवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, “तुम्ही नव्हे तर इस्राएलचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हालाच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”
\p
\s5
\v 4 त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांना भीती घालवू लागले.
\v 5 पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.
\v 6 नंतर अहश्वेरोशाच्या राज्याच्या सुरवातीलाच त्यांनी यहूदा व यरुशलेम यातल्या राहणाऱ्यांविरुद्ध आरोप पत्र लिहून पाठवले.
\p
\s5
\v 7 अर्तहशश्ताच्या दिवसात बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथीदार यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहिले. हे पत्र अरामी लिपीत लिहीले असून व अरामी भाषांतरीत केले होते.
\v 8 यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुशलेम येथील लोकांविरुद्ध अर्तहशश्त राजाला लिहीले.
\p
\s5
\v 9 मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांनी एक पत्र लिहिले-
\v 10 आणि, जे त्यांना जाऊन मिळाले ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवलेले होते.
\p
\s5
\v 11 जे पत्र त्यांनी राजा अर्तहशश्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे: “नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक:
\v 12 राजा अर्तहशश्त यास, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे यरुशलेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहे. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे.
\p
\s5
\v 13 आता राजाला हे समजावे की, जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की, ते लोक तुम्हाला खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल.
\p
\s5
\v 14 खचित आम्ही राजाचे मीठ खातो. कारण राजाचा कोणताही अपमान झालेला पाहणे आम्हाला योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही तुला कळवीत आहोत.
\v 15 तुझ्या पित्याच्या नोंद-पुस्तकात शोधून पाहा आणि त्यावरुन हे नगर बंडखोर आहे राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. ह्या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता.
\v 16 आम्ही राजाला कळवतो की, हे नगर आणि त्यासभोवतालची भिंत बांधून पूर्ण झाली की नदीच्या पलीकडे तुमचे काहीच राहणार नाही.”
\p
\s5
\v 17 यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो.
\v 18 तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले.
\v 19 याकरीता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की, मागील दिवसात राजाच्या विरुद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.
\p
\s5
\v 20 यरुशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदीपलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत.
\v 21 आता तुम्ही त्या लोकांना काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये.
\v 22 तर हे करण्याची हयगय करू नका म्हणून काळजीपूर्वक राहा. राजाचे नुकसान होईपर्यत हानी का वाढू द्यावी?”
\s5
\v 23 मग राजा अर्तहशश्तने पाठवलेले फर्मान रहूम, शिमशय आणि त्यांच्याबरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरुशलेममधील यहूद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले.
\v 24 त्यामुळे यरुशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दायरावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.
\s5
\c 5
\p
\v 1 त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरुशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.
\v 2 तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना उत्तेजन दिले.
\p
\s5
\v 3 त्यावेळी ततनइ हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्हाला हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?”
\v 4 ते असेही म्हणाले, “हे बांधकाम करणाऱ्या माणसांची नावे काय आहेत?”
\v 5 तरीही यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दायरावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
\s5
\v 6 नदीच्या अलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दायरावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे.
\v 7 त्यांनी अहवाल पाठवला, त्यात लिहिले होते, राजा दायरावेश “सर्व कुशल असो
\s5
\v 8 हे राजा, आम्ही यहूदा प्रांतात महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहूदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहूदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.
\v 9 या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हाला हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?
\v 10 आम्ही त्यांची नावेही विचारुन घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हाला कळावीत म्हणून आम्ही त्यांची नावे विचारली.
\p
\s5
\v 11 त्यांनी उत्तर दिले, ‘आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत."
\p
\s5
\v 12 आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना कैद करून बाबेलला नेले.
\v 13 कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला.
\p
\s5
\v 14 तसेच, देवाच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती नबुखद्रेस्सराने यरुशलेमतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या स्वाधीन केली. त्याला कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते.
\v 15 तो त्यांना म्हणाला, “ही पात्रे घे आणि यरुशलेमातील मंदिरात ठेव. देवाचे मंदिर त्याच्या ठिकाणावर पुन्हा बांध.”
\p
\s5
\v 16 तेव्हा शेशबस्सरने यरुशलेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही.
\p
\s5
\v 17 तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरुशलेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा याबाबतीत काय निर्णय आहे ते आम्हाला कळवावे.”
\s5
\c 6
\p
\v 1 तेव्हा राजा दायरावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
\v 2 मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते.
\p
\s5
\v 3 “कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी.
\v 4 मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा.
\v 5 देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्रेस्सराने यरुशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरुशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.
\s5
\v 6 आता नदीपलीकडील ततनइ, शथर-बोजनइ आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा.
\v 7 देवाच्या घराचे काम चालू द्या. यहूदी अधिकारी आणि यहूदी वडीलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे.
\s5
\v 8 आता माझा आदेश असा आहे. देवाच्या मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या माणसांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये.
\v 9 स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांना जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरुशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षारस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या.
\v 10 हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
\p
\s5
\v 11 मी तुम्हाला आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्याला टांगावे. यामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा.
\v 12 यरुशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दायरावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.”
\p
\s5
\v 13 नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दायरावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले.
\v 14 यहूद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यात त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दायरावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले.
\v 15 हे मंदिर राजा दायरावेशाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेला पूर्ण झाले."
\s5
\v 16 इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली.
\v 17 प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलाच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलाच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते.
\v 18 यरुशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
\s5
\v 19 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला.
\v 20 वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यानी एकचित्ताने स्वत:ला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बळी दिला.
\p
\s5
\v 21 बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्त्राएलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले.
\v 22 बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.
\s5
\c 7
\p
\v 1 यानंतर, पारसाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत, एज्रा, जो सरायाचा मुलगा, अजऱ्याचा मुलगा, हिल्कीयाचा मुलगा,
\v 2 जो शल्लूमचा मुलगा, जो सादोकाचा मुलगा, जो अहीटूबचा मुलगा,
\v 3 जो अमऱ्याचा मुलगा, जो अजऱ्याचा मुलगा आणि जो मरोयाथचा मुलगा,
\v 4 जो जरह्याचा मुलगा, जो उज्जीचा मुलगा, आणि जो बुक्कीचा मुलगा
\v 5 जो अबीशूवाचा मुलगा, जो फिनहासचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा, जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा.
\p
\s5
\v 6 हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्राएलचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यात एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्याला दिले.
\v 7 राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, काही इस्राएली लोक आणि याजक, लेवी, गायक, व्दारपाल व ज्यांना मंदिराच्या सेवेसाठी नेमले होते, तेसुद्धा वर यरुशलेमेला गेले.
\p
\s5
\v 8 राज्याच्या कारकीर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात यरुशलेमेत आला.
\v 9 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे, तो पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरुशलेमेला पोहोंचला.
\v 10 एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मन:पूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास, व इस्राएलांस त्यातील नियम व विधी आपले मन लावले.
\p
\s5
\v 11 राजा अर्तहशश्ताने, एज्रा, जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्राएलांस दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता, त्याला दिलेला हा आदेश होय;
\v 12 “स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,
\v 13 मी असा आदेश देत आहे की, माझ्या राज्यातील इस्त्राएल लोक आणि त्यांचे याजक व लेवी, यांच्यापैकी ज्या कोणाला तुझ्याबरोबर यरुशलेमेला जाण्याची इच्छा असेल, त्याने जावे.
\p
\s5
\v 14 तुजजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात सल्लागार तुला पाठवत आहोत.
\v 15 इस्राएलचा देव ज्याचे घर यरुशलेमेमध्ये आहे. ज्याला तू सोनेचांदी स्वखुशीने अर्पण केले आहे. ते तू न्यावेस.
\v 16 जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरुशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे.
\p
\s5
\v 17 या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरुशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर.
\v 18 यातून उरलेल्या त्या सोन्यारुप्याचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा.
\s5
\v 19 तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत, ती तू यरुशलेमेस त्यापुढे सोपवून दे.
\v 20 देवाच्या मंदिरासाठी आणखी कश्याची गरज असेल जे तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर.
\p
\s5
\v 21 आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे,
\v 22 एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यत, गहू शंभर कोरपर्यत, द्राक्षारस शंभर बथपर्यत, तेल शंभर बथपर्यत, अमर्याद मीठ द्यावे.
\v 23 स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे, हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा?
\p
\s5
\v 24 आम्ही तुम्हाला कळवतो की, मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये.
\p
\s5
\v 25 एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील.
\v 26 जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्याला शासन झाले पाहिजे. त्याला मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.”
\s5
\v 27 परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरुशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली.
\v 28 आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्राएलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.
\s5
\c 8
\p
\v 1 आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख त्यांची नावे ही आहेत.
\v 2 फिनहासाच्या वंशातला गर्षोम, इथामारच्या वंशातला दानीएल, दावीदाच्या वंशातला हट्टूश,
\v 3 शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखऱ्या, आणि त्याच्याबरोबर पुरुषातले एकशे पन्नास,
\p
\s5
\v 4 पहथ-मवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे दोनशे पुरुष,
\v 5 शखन्याच्या वंशतला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर तीनशे पुरुष,
\v 6 आदीनच्या वंशतला योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे पन्नास पुरुष,
\v 7 एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे सत्तर पुरुष,
\p
\s5
\v 8 शफाट्याच्या वंशातला मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे ऐंशी पुरुष,
\v 9 यवाबाच्या वंशातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष,
\v 10 बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्याबरोबरचे एकशे साठ पुरुष,
\v 11 बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे अठ्ठावीस पुरुष,
\p
\s5
\v 12 अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे एकशेदहा पुरुष,
\v 13 अदोनीकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे साठ पुरुष,
\v 14 आणि बिग्वईच्या वंशातले उथई, जब्बूद त्यांच्याबरोबरचे सत्तर पुरुष,
\p
\s5
\v 15 मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्याठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याजकांची तपासणी केली पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत.
\v 16 तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.
\p
\s5
\v 17 कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवाचाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवाचाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावीत.
\p
\s5
\v 18 देवाचा आमच्यावर चांगला हाथ असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्राएलाचा मुलगा लेवी याचा मुलगा महली याच्या वंशातला एक शहाणा माणूस आणला, आणि शेरेब्याचे मुलगे आणि त्याचे भाऊ असे एकंदर अठराजण आले.
\v 19 मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर वीस जण आणले.
\v 20 शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी दोनशे वीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
\p
\s5
\v 21 तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलेबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा.
\v 22 प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. कारण आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”
\v 23 म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला.
\s5
\v 24 तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.
\v 25 मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि इस्राएल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले.
\p
\s5
\v 26 मी त्यांच्याकडे सहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची तबके, शंभर किक्कार सोने.
\v 27 शिवाय हजार दारिकांचे सोन्याच्या वीस वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्याएवढी मोलवान दोन पात्रे ही तोलून दिली.
\p
\s5
\v 28 मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे.
\v 29 या गोष्टी यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलाच्या वडिलांच्या घराण्यांच्या हाती सोपवा. त्यांचे वजन करून त्या गोष्टी यरुशलेमेमधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
\v 30 यावर, एज्राने वजन करून दिलेल्या खास भेटवस्तू आणि सोने व चांदी याजकांनी व लेवीनी ताब्यात घेतल्या. यरुशलेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
\s5
\v 31 पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा कालव्यापासून यरुशलेमेला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले.
\v 32 आम्ही यरुशलेमेला पोहचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली.
\p
\s5
\v 33 चौथ्या दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
\v 34 आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
\p
\s5
\v 35 त्यानंतर बंदिवासातून परत आलेल्या यहूद्यांनी इस्राएलाच्या देवाला होमार्पणे वाहिली. सर्व इस्राएलाकरीता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी परमेश्वराला होमार्पण केले.
\v 36 मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडे भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि देवाच्या घराला सहाय्य केले.
\s5
\c 9
\p
\v 1 या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.
\v 2 कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही बायका करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यात अप्रामाणिक आहेत.”
\p
\s5
\v 3 जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
\v 4 तेव्हा ह्या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्राएली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते ते माझ्याभोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो.
\p
\s5
\v 5 संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो.
\v 6 मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
\p
\s5
\v 7 आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना ह्या जगिक राजाच्या हाती तरवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.
\s5
\v 8 आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशीत केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हाला दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काहीजणांना वाचवून अवशेष ठेवले आहे. आणि त्याच्या पवित्रस्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे.
\v 9 आम्ही गुलामच आहोत. तरी आमचा देव आम्हाला विसरला नाही. पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केलेस. यहूदा आणि यरुशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
\s5
\v 10 परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे? कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत.
\v 11 त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हाला दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.
\v 12 त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा.
\p
\s5
\v 13 आमच्या वाइट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.
\v 14 आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीहि निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय?
\p
\s5
\v 15 हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधीमुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”
\s5
\c 10
\p
\v 1 एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते
\v 2 त्यावेळी एलाम वंशातल्या यहीएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाविरुद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांसोबत राहत आहो. तरी आता याविषयी इस्राएलाला अजून आशा आहे.
\p
\s5
\v 3 तर आता, प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे सर्व त्या बायका आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे.
\v 4 आता ऊठ ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर.”
\p
\s5
\v 5 तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले.
\v 6 मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.
\p
\s5
\v 7 त्याने मग यहूदा आणि यरुशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांना त्याने यरुशलेमेमध्ये जमायला सांगितले.
\v 8 आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडीलांच्या मसलतीप्रमाणे तीन दिवसाच्या आत यरुशलेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकांना हद्दपार करावे.
\p
\s5
\v 9 त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसांच्या आत यरुशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकात प्रचंड पाऊस आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.
\v 10 एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.
\p
\s5
\v 11 तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्याला इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या बायका यांच्यापासून वेगळे व्हा.”
\p
\s5
\v 12 यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू.
\v 13 पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हाला बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.
\p
\s5
\v 14 या समुदायाच्यावतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरुशलेमेला नेमलेल्या वेळी यावे त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल.”
\v 15 असाएलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरुद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला.
\p
\s5
\v 16 बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले
\v 17 आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली.
\p
\s5
\v 18 याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.
\v 19 यासर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला.
\p
\s5
\v 20 इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या,
\v 21 हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,
\v 22 पशूहरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा,
\p
\s5
\v 23 लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलीटा, पथह्या, यहूदा आणि अलियेजर,
\p
\v 24 गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी,
\p
\v 25 इस्राएलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया,
\p
\s5
\v 26 एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,
\v 27 जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्या, यरेमोथ, जाबाद, अजीजा,
\v 28 बेबाईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बइ, अथलइ
\v 29 बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, अदाया, याशूब, शाल आणि रामोथ,
\p
\s5
\v 30 पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे,
\v 31 आणि हारीमच्या वंशातील अलियेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया, शिमोन,
\v 32 बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या,
\p
\s5
\v 33 हाशूमच्या वंशातील मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी,
\v 34 बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल
\v 35 बनाया, बेदया, कलूही,
\v 36 वन्या, मरेमोथ, एल्याशीब,
\p
\s5
\v 37 मत्तन्या, मत्तनई, व यासू
\v 38 बानी व बिन्नइ, शिमी,
\v 39 शेलेम्या, नाथान, अदाया,
\v 40 मखनदबइ, शाशइ, शारइ,
\p
\s5
\v 41 अजरएल, शेलेम्या, शमऱ्या
\v 42 शल्लूम, अमऱ्या, योसेफ,
\v 43 नबोच्या वंशातील ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया.
\v 44 वरील सर्वांनी परकीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.

772
16-NEH.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,772 @@
\id NEH
\ide UTF-8
\h नहेम्या
\toc1 नहेम्या
\toc2 नहेम्या
\toc3 neh
\mt1 नहेम्या
\s5
\c 1
\p
\v 1 हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.
\v 2 माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरुशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.
\p
\s5
\v 3 त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरुशलेमाची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
\p
\s5
\v 4 आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. आणि मी कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.
\v 5 मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीति करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस.
\p
\s5
\v 6 तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.
\v 7 आम्ही तुझ्या विरुद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.
\p
\s5
\v 8 कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्याला तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हाला दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन,
\v 9 पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”
\p
\s5
\v 10 आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस.
\v 11 तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि ह्या माणसावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
\s5
\c 2
\p
\v 1 अर्तहशश्त राजाच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात त्याने द्राक्षारस निवडला होता आणि मी द्राक्षारस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो.
\v 2 म्हणून राजाने मला विचारले, “तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस. तू तर मनातून दु:खी दिसतोस.” मग मी फार घाबरलो.
\p
\s5
\v 3 मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?”
\p
\s5
\v 4 यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?” मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.
\v 5 मग मी राजाला उत्तर दिले, “महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहूदातील यरुशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा.”
\v 6 (राणीसुद्धा त्याच्याजवळच बसलेली होती) राजाने मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील ? ” राजा मला आनंदाने पाठविण्यास तयार झाला जेव्हा मी त्याला वेळ ठरवून दिली.
\p
\s5
\v 7 मग मी राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहूदा देशी पोहचेपर्यत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावीत.
\v 8 प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
\p
\s5
\v 9 मग मी नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते.
\v 10 होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता, इस्राएलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एक जण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले.
\p
\s5
\v 11 याकरता मी यरुशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो.
\v 12 मग मी रात्री उठलो, मी काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमासाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशू नव्हता.
\p
\s5
\v 13 मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे, उकिरडा वेशीकडे जाऊन यरुशलेमाची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पाहाणी केली.
\v 14 मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती.
\p
\s5
\v 15 तेव्हा मी रात्री भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो आणि परत फिरलो.
\v 16 मी कोठे गेलो आणि मी काय केले हे अधिकाऱ्यांना माहित नव्हते आणि यहूदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो.
\p
\s5
\v 17 मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरुशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरुशलेमाची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
\v 18 देवाची माझ्यावर कृपा असल्याचेही व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली.
\p
\s5
\v 19 पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”
\v 20 पण मी त्यांना असे म्हणालो “स्वर्गातील देवच आम्हाला यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. पण यरुशलेमात तुमचा काहीएक अधिकार, वाटा व ऐतिहासीक हक्क नाही.”
\s5
\c 3
\p
\v 1 मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमया बुरुजापर्यत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
\v 2 त्यानंतर यरीहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
\p
\s5
\v 3 हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
\v 4 हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
\v 5 तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.
\p
\s5
\v 6 यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले.
\v 7 गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता.
\p
\s5
\v 8 हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली.
\v 9 हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.
\v 10 हरूमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत:च्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तूश याने डागडुजी केली.
\p
\s5
\v 11 हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
\v 12 हल्लोहेशचा पुत्र शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्याला मदत केली. शल्लूम यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
\p
\s5
\v 13 हानून नावाचा एकजण आणि जानोहे येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली.
\p
\s5
\v 14 रेखाबाचा पुत्र मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली, मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजागऱ्यांसह लावले, या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
\p
\v 15 मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यत त्याने डागडुजी केली.
\p
\s5
\v 16 अजबूकचा पुत्र नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथ-सूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.
\v 17 लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाचाखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.
\s5
\v 18 त्याच्या भावांनी हेनादादचा पुत्र बवई, कईलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधानी डागडुजी केली.
\v 19 नंतर येशूवाचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले.
\p
\s5
\v 20 जब्बईचा पुत्र बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता.
\v 21 हक्कोसचा पुत्र उरीया. उरीयाचा पुत्र मरेमोथ याने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून थेट घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
\p
\s5
\v 22 भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरुशलेमाभोवती राहणाऱ्या याजकांनी केली.
\v 23 बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा पुत्र मासेया. मासेयाचा पुत्र अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले.
\v 24 हेनादादचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
\p
\s5
\v 25 उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली.
\v 26 ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी (नथीमीम) यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.
\v 27 पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते थेट ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
\p
\s5
\v 28 घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली.
\v 29 इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता.
\v 30 शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.
\p
\s5
\v 31 मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली.
\v 32 कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.
\s5
\c 4
\p
\v 1 आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
\v 2 सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”
\v 3 तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
\p
\s5
\v 4 आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यात त्यांची लूट होवो.
\v 5 त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयादेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.
\v 6 यरुशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यत तयार झाला कारण लोकांनी मनापासून काम केले.
\p
\s5
\v 7 पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
\v 8 तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरुशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला.
\v 9 पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
\p
\s5
\v 10 मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.”
\m
\v 11 आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”
\p
\s5
\v 12 त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ रहात होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूध्द त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले.
\v 13 तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती.
\v 14 सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीति बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुलगे, मुली, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
\p
\s5
\v 15 आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला.
\v 16 त्यादिवसापासून माझे निम्मी सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते.
\p
\s5
\v 17 बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
\v 18 तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा माणूस माझ्या शेजारीच होता.
\p
\s5
\v 19 मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
\v 20 तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.”
\p
\s5
\v 21 अशाप्रकारे आम्ही यरुशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते थेट रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
\v 22 त्यावेळी मी लोकांना असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
\v 23 मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि जर तो पाण्यालासुद्धा जात आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धरत असे.
\s5
\c 5
\p
\v 1 तेव्हा माणसांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.
\v 2 त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
\v 3 काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
\p
\s5
\v 4 काही असेसुद्धा म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरीला राजाचा कर भरण्यासाठी आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
\v 5 आमच्या बांधवाचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
\p
\s5
\v 6 जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला.
\v 7 मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही आपल्या बंधूकडून व्याज घेत आहात” मग मी सर्व लोकांना सभेमध्ये एकत्र बोलावले
\v 8 आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
\p
\s5
\v 9 मी असेही म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही?
\v 10 तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
\v 11 त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा.”
\p
\s5
\v 12 मग ते म्हणाले “त्यांच्याकडून घेतलेले सर्वकाही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.” मग मी याजकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली.
\v 13 मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
\p
\s5
\v 14 शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
\v 15 पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
\p
\s5
\v 16 मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो.
\v 17 माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत.
\p
\s5
\v 18 आता प्रत्येक दिवशी एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि पक्षीहि तयार करीत असत, व प्रत्येक दहा दिवसांनी सर्व प्रकारचे द्राक्षारस मुबलक प्रमाणात आणत आणि तरीही, मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता.
\p
\v 19 हे माझ्या देवा, जे मी या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.
\s5
\c 6
\p
\v 1 आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते,
\v 2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
\p
\s5
\v 3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हाला भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
\v 4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.
\s5
\v 5 मग, पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसाकरवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते.
\v 6 त्यात असे लिहीले होते,
\p राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरुशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.
\p
\s5
\v 7 “यहूदात राजा आहे, असे स्वत:बद्दल घोषित करायला तू यरुशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
\p
\s5
\v 8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
\v 9 आमचे शत्रू आम्हाला भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होत, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
\p
\s5
\v 10 मी एकदा दलायाचा पुत्र शमया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.”
\v 11 पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव बचावण्यासाठी माझ्यासारख्या माणसाने मंदिरात का जावे? मी जाणार नाही.”
\p
\s5
\v 12 शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्याला त्याबद्दल पैसे चारले होते.
\v 13 मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते.
\v 14 देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे.
\p
\s5
\v 15 मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरुशलेमच्या भिंतीचे काम समाप्त बावन्न दिवसांनी समाप्त झाले.
\v 16 हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीति व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
\p
\s5
\v 17 त्या दिवसात यहूदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबीया त्यांना उत्तरे देत होता.
\v 18 यहूदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्याला वचन दिले होते. कारण, आरहाचा पुत्र शखन्या याचा तोबीया हा जावई होता. तोबीयाचा पुत्र योहानान याचे मशुल्लामच्या कन्येशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र.
\v 19 तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत.
\p मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.
\s5
\c 7
\p
\v 1 तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली.
\v 2 यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
\p
\s5
\v 3 आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरुशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
\v 4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
\p
\s5
\v 5 माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यात जे लिहिले होते ते हे.
\p
\s5
\v 6 बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
\v 7 जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वाई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
\s5
\v 8 परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर,
\v 9 शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर,
\v 10 आरहचे वंशज सहाशें बावन्न,
\p
\s5
\v 11 येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा,
\v 12 एलामाचे वंशज एक हजार दोनशेंं चौपन्न,
\v 13 जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस,
\v 14 जक्काईचे वंशज सातशे साठ,
\p
\s5
\v 15 बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस,
\v 16 बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस
\v 17 अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस,
\v 18 अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट,
\p
\s5
\v 19 बिग्वाईचे वंशज दोन हजार सदुसष्ट,
\v 20 आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न,
\v 21 हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव,
\v 22 हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस,
\p
\s5
\v 23 बेसाईचे वंशज तीनशे चोवीस,
\v 24 हारिफाचे वंशज एकशे बारा,
\v 25 गिबोनाचे वंशज पंचाण्णव,
\v 26 बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐशी,
\p
\s5
\v 27 अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस,
\v 28 बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस,
\v 29 किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस,
\v 30 रामा आणि गेबातली माणसे सहाशे एकवीस,
\p
\s5
\v 31 मिखमाशाची माणसे एकशे बावीस,
\v 32 बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस,
\v 33 दुसऱ्या नबोची माणसे बावन्न,
\v 34 दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चोपन्न,
\p
\s5
\v 35 हारीमाचे वंशज तीनशे वीस,
\v 36 यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस,
\v 37 लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस,
\v 38 सनावाचे वंशज तीन हजार नऊशें तीस.
\p
\s5
\v 39 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर
\v 40 इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,
\v 41 पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,
\v 42 हारीमाचे वंशज एक हजार सतरा,
\p
\s5
\v 43 लेवी:होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर
\v 44 गाणारे:आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस,
\v 45 द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस,
\p
\s5
\v 46 हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज,
\v 47 केरोस, सीया, पादोन
\v 48 लबोना, हगाबा, सल्माई
\v 49 हानान, गिद्देल, गहार.
\p
\s5
\v 50 राया, रसीन, नकोदा
\v 51 गज्जाम, उज्जा. पासेहा
\v 52 बेसई, मऊनीम, नफूशेसीम.
\p
\s5
\v 53 बकबूक, हकूफ, हर्हूराचे
\v 54 बसलीथ, महीद, हर्शा
\v 55 बकर्स, सीसरा, तामह
\v 56 नसीहा आणि हतीफा
\s5
\v 57 शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा
\v 58 याला, दकर्न, गिद्देल
\v 59 शफाट्या, हत्तील, पोखरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
\v 60 मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
\p
\s5
\v 61 तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः
\v 62 दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.
\v 63 आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई)
\p
\s5
\v 64 काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुध्द ठरून त्यांस याजकांच्या यादीतून काढून टाकले.
\v 65 अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते.
\p
\s5
\v 66 सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते.
\v 67 यात त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या.
\p
\s5
\v 68 त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे,
\v 69 चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती.
\p
\s5
\v 70 घराण्यांच्या काही प्रमुखानी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.
\v 71 काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले.
\v 72 इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली.
\p
\s5
\v 73 अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.
\s5
\c 8
\nb
\v 1 सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.
\v 2 तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षीच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.
\v 3 एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.
\p
\s5
\v 4 एज्रा शास्त्री एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
\v 5 आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले.
\p
\s5
\v 6 एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वराला वंदन केले.
\v 7 बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,
\v 8 या लेवीनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांना समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांना समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
\p
\s5
\v 9 यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांना स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांना बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दु:खी राहू नका किंवा शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते.
\v 10 नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.”
\p
\s5
\v 11 लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांना शांत केले. आणि म्हणाले, “शांत व्हा, आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.”
\v 12 मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली.
\p
\s5
\v 13 यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्रा शास्त्रीला तसेच याजकांना व लेवीना भेटायला गेले. नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ते जमले.
\v 14 परमेश्वराने मोशेद्वारे लोकांना हे नियमशास्त्र दिले. त्यात यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी या सणा दरम्यान तात्पुरत्या तंबूत राहावे.
\v 15 लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरुशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी की, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांचे तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
\p
\s5
\v 16 तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी फांद्या आणल्या आणि त्यापासून स्वत:साठी आपल्या धाब्यावर आणि स्वतःच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले.
\v 17 बंदिवासातून परत आलेल्या सर्वानी मांडव उभारले व त्यात ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
\p
\s5
\v 18 प्रतिदिवशीहि, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचीत होता. त्यांनी सात दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक आठव्या दिवशी सभा भरून पाळला.
\s5
\c 9
\p
\v 1 आता त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी गोणपाट घालून व डोक्यांत धूळ घालून एकत्र जमले.
\v 2 इस्राएली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाइट कृत्यांची कबुली दिली.
\p
\s5
\v 3 ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी सहा तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले.
\v 4 मग लेवी असलेले येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी जिन्यावर उभे राहिले आणि त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला.
\p
\s5
\v 5 मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
\v 6 तू परमेश्वर आहे. तूच एक आहेस. तू आकाश, अत्युच्च आकाश, त्याबरोबर सर्व देवदूत लढाईसाठी त्यांची रचना करून निर्माण केलेस आणि ही पृथ्वी आणि तिच्यातील सर्वकाही आणि समुद्र आणि त्यातले सर्व काही तू केले. तू त्या सर्वांना जीवन देतोस आणि स्वर्गातील देवदूतांची सेना तुझी उपासना करते.
\p
\s5
\v 7 हे परमेश्वरा, तूच देव आहेस. ज्याने अब्रामाची निवड केली आणि बाबेलमधील (खास्द्यांच्या) ऊर नगरातून तू बाहेर काढून त्याला अब्राहाम असे नाव दिले.
\v 8 तो तुझ्याशी निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास की, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याच्या वंशजांना द्यायचे वचन दिलेस. आणि तू ते पाळलेस. कारण, तू न्यायी आहेस.
\p
\s5
\v 9 मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास. आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ केलेला धावा तू ऐकलास.
\v 10 फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. कारण तुला माहित होते की, मिसर देशातील लोक त्यांच्याशी गर्वाने वागत होते. पण तू आपल्या नावासाठी केले ते आजवर आहे.
\p
\s5
\v 11 त्यांच्या डोळयादेखत तू तांबडा समुद्र दुभागून दाखवलास. आणि ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरुन चालत गेले आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलेस जसा एखादा दगड खोल पाण्यात बुडावा.
\p
\s5
\v 12 दिवसा तू त्यांना मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री अग्नीस्तंभाने त्यांच्या वाटेवर प्रकाश दिला अशासाठी की त्याप्रकाशात ते चालू शकतील.
\v 13 मग तू सीनाय पर्वतावर उतरलास आणि त्यांच्याशी आकाशातून बोललास आणि तू त्यांना योग्य दिलेस, खरी शिकवण, चांगले नियम आणि आज्ञा दिल्यास.
\p
\s5
\v 14 तुझ्या पवित्र शब्बाथाचा त्यांना परिचय करून दिलास आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.
\v 15 ते भुकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस. ते तहानलेले होते, म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास की, मी शपथपूर्वक तुम्हाला दिलेल्या वचनदत्त जमिनीचा ताबा घ्या.
\p
\s5
\v 16 पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले.
\v 17 त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
\p
\s5
\v 18 त्यांनी ओतीव धातुपासून वासरांच्या मूर्ति केली आणि आम्हाला मिसर देशातून सोडवणारा हाच देव असे ते म्हणाले आणि त्यांनी खूप नींदा केली तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
\v 19 तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्नीस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवीत राहिलास.
\p
\s5
\v 20 त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस, त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस.
\v 21 चाळीस वर्षे तू त्यांचे वाळवंटात पालनपोषण केलेस आणि त्यांना कशाचीही उणीव भासली नाही. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत त्यांच्या पावलांना सूज आली नाही.
\p
\s5
\v 22 त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनच्या राजाचा सिहोन प्रांत व बाशानचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले.
\p
\s5
\v 23 त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस आणि त्यांना त्या प्रदेशात आणले. तू सांगितल्यावर त्यांच्या पूर्वजांनी तो प्रदेश ताब्यात घेतला.
\v 24 या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला आणि तूच हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांना त्यांच्या हातात देऊन मन मानेल तसे वागू दिलेस.
\p
\s5
\v 25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला आणि सुपीक प्रदेश मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांनी ताब्यात घेतली, खोदलेल्या विहिरी त्यांना मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे यांचा त्यांनी ताबा घेतला, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तुझ्या महान चांगुलपणामुळे ते आनंदीत झाले.
\p
\s5
\v 26 आणि मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुध्द बंड केले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, ज्या संदेष्ट्यांनी तुझ्याकडे परत वळण्यासाठी सांगितले त्यांचा त्यांनी वध केला आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.
\v 27 म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुझा धावा केला आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांची शत्रूपासून सुटका केलीस.
\p
\s5
\v 28 मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रू कडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि तुझ्या दयेस्तव अनेकदा त्यांना सोडवलेस.
\v 29 त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जीवंत रहातो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.
\p
\s5
\v 30 अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.
\v 31 पण तू दयाळू आहेस म्हणून तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस, त्यांचा तू त्याग केला नाहीस कारण देवा, तू कृपाळू आणि दयाळू आहेस.
\p
\s5
\v 32 हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
\v 33 पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे.
\v 34 आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.
\p
\s5
\v 35 स्वत:च्या राज्यात राहत असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत:च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही.
\p
\s5
\v 36 आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत.
\v 37 या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
\p
\s5
\v 38 या सगळया गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्ताऐवजावर आहेत.”
\s5
\c 10
\p
\v 1 त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,
\v 2 सराया, अजऱ्या, यिर्मया,
\v 3 पशहूर, अमऱ्या, मल्खीया,
\p
\s5
\v 4 हत्तूश, शबन्या, मल्लूख,
\v 5 हारीम, मरेमोथ, ओबद्या,
\v 6 दानीएल, गिन्नथोन, बारुख,
\v 7 मशुल्लाम, अबीया, मियामीन,
\v 8 माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
\p
\s5
\v 9 आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नइ, कदमीएल,
\v 10 आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान,
\v 11 मीखा, रहोब, हशब्या,
\v 12 जक्कूर, शेरेब्या, शबन्या,
\v 13 होदीया, बानी, बनीनू.
\v 14 लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी,
\p
\s5
\v 15 बुन्नी, अजगाद, बेबाई,
\v 16 अदोनीया, बिग्वाई, आदीन,
\v 17 आटेर, हिज्कीया, अज्जूर,
\v 18 होदीया, हाशूम, बेसाई,
\v 19 हारिफ, अनाथोथ, नोबाई,
\v 20 मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
\v 21 मशेजबेल, सादोक, यद्दूवा,
\p
\s5
\v 22 पलट्या, हानान, अनया,
\v 23 होशेया, हनन्या, हश्शूब.
\v 24 हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
\v 25 रहूम, हश्बना, मासेया,
\v 26 अहीया, हानान, अनान,
\v 27 मल्लूख, हारीम आणि बाना.
\p
\s5
\v 28 उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले.
\v 29 त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला.
\p
\s5
\v 30 आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
\v 31 शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. दर सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
\p
\s5
\v 32 मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.
\v 33 मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.
\s5
\v 34 मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे.
\v 35 आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो.
\v 36 आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
\p
\s5
\v 37 तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवीना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात.
\v 38 लेवी या धान्याचा स्विकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवीनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या, मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा.
\p
\s5
\v 39 इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.
\p आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.
\s5
\c 11
\p
\v 1 इस्राएली लोकांचे नेते जे यरुशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी दहातल्या एकाने पवित्र यरुशलेम नगर येथे राहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरवण्यासाठी चिठ्या टाकल्या.
\v 2 आणि जे लोक स्वखुषीने यरुशलेमेमध्ये राहायला तयार झाले. त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले.
\p
\s5
\v 3 जे प्रांताचे अधिकारी यरुशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते.
\v 4 यरुशलेमेमध्ये काही यहूदी आणि बन्यामीनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरुशलेमामध्ये आलेले यहूदाचे वंशज पुढीलप्रमाणेः उज्जीयाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र, अमऱ्याचा पुत्र आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज.
\p
\s5
\v 5 बारूखचा पुत्र मासेया (बारुख हा कोल-होजचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र.)
\v 6 पेरेसचे सर्व पुत्र जे यरुशलेमामध्ये रहात होते त्यांची संख्या चारशे अडुसष्ट होती. हे सर्व शूर पुरुष होते.
\p
\s5
\v 7 यरुशलेमामध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असेः मशुल्लामचा पुत्र सल्लू (मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा)
\v 8 यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर नवशे अठ्ठावीस जण होते.
\v 9 जिखरीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुवाचा पुत्र यहूदा, हा यरुशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता.
\p
\s5
\v 10 याजकांपैकीः योयारीबचा पुत्र यदया, याखीन,
\v 11 हिल्कीयाचा पुत्र सराया (हिल्कीया मशुल्लामचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोथचा, मरायोथ अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधिक्षक होता.)
\v 12 आणि त्यांचे आठशे बावीस भाऊबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामाचा पुत्र अदाया (यरोहाम पलल्याचा पुत्र. पलल्या अम्सीचा, जखऱ्याचा पुत्र, जखऱ्या पशहूरचा आणि पशहूर मल्कीयाचा)
\p
\s5
\v 13 मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा
\v 14 आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.
\p
\s5
\v 15 लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा
\v 16 शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्याची प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.
\p
\s5
\v 17 मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदुथूनाचा
\v 18 या पवित्र नगरात दोनशे चौऱ्यायशी लेवी राहायला गेले.
\p
\s5
\v 19 यरुशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असेः अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
\v 20 बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले.
\v 21 मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते.
\p
\s5
\v 22 बानीचा पुत्र उज्जी हा यरुशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
\v 23 ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे.
\v 24 राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांना सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.
\p
\s5
\v 25 यहूदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशीः किर्याथ-आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी,
\v 26 आणि येशूवा, मोलादा, बेथ-पलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी,
\v 27 हसर-शूवाल, बैर-शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी,
\p
\s5
\v 28 सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे,
\v 29 एन-रिम्मोन, सारया, यर्मूथ
\v 30 जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहूदाचे लोक बैर-शेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते.
\p
\v 31 गेबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी
\v 32 अनाथोथ, नोब, अनन्या,
\v 33 हासोर, रामा, गित्तइम,
\v 34 हादीद, सबोइम, नबल्लट,
\v 35 लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते.
\v 36 लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामिनांच्या प्रदेशात गेले.
\s5
\c 12
\p
\v 1 शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा,
\v 2 अमऱ्या, मल्लूख हत्तूश,
\v 3 शखन्या, रहूम मरेमोथ.
\p
\s5
\v 4 इद्दो, गिन्नथोई, अबीया,
\v 5 मियामीन, माद्या, बिलगा,
\v 6 शमया, योयारीब, यदया.
\v 7 सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
\p
\s5
\v 8 लेवी असेः येशूवा, बिन्नुइ, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुति स्तोत्रांचे प्रमुख होते.
\v 9 बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतिस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत.
\p
\s5
\v 10 येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा.
\v 11 योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला.
\p
\s5
\v 12 योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या
\v 13 एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
\v 14 मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ.
\p
\s5
\v 15 हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
\v 16 इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
\v 17 अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
\v 18 बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमयाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
\v 19 योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
\v 20 सल्लयाच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर
\v 21 हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
\p
\s5
\v 22 एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.
\v 23 लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
\p
\s5
\v 24 लेव्यांचे प्रमुख असे होतेः हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा पुत्र येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समुहाने दाद देत कारण देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.
\v 25 दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,
\v 26 हे द्वारपाल योचाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा पुत्र आणि येशूवा योसादाकाचा. नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात द्वारपाल होते.
\p
\s5
\v 27 यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमेला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
\v 28 शिवाय सर्व गायक देखील यरुशलेम भोवतालच्या नटोफाथी प्रांतातून यरुशलेमेला आले.
\p
\s5
\v 29 नटोफा, बेथ-गिलगाल, गेबा आणि अजमावेथ ही ती गावे होत. यरुशलेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती.
\v 30 नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत:चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरुशलेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला.
\p
\s5
\v 31 यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला.
\p
\s5
\v 32 होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले,
\v 33 आणि अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम,
\v 34 यहूदा, बन्यामीन, शमया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले.
\v 35 काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमया, शमयाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या.
\p
\s5
\v 36 आसाफचे भाऊ म्हणजे शमया, अजरेल, मिललई, गिललइ, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा माणूस दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता.
\v 37 झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
\p
\s5
\v 38 स्तुति गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.
\v 39 मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले.
\p
\s5
\v 40 मग स्तुति गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यासमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या.
\v 41 मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.
\v 42 मग मासेया, शमया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्र ह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
\p
\s5
\v 43 या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेमामधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
\p
\s5
\v 44 त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.
\v 45 याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली.
\p
\s5
\v 46 फार पूर्वी, दावीदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्याच्याजवळ देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते होती.
\v 47 अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला. आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.
\s5
\c 13
\p
\v 1 त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांना ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.
\v 2 या लोकांनी इस्राएली लोकांना अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्याला पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
\v 3 हा नियम ऐकताच विदेशी लोकांना इस्त्राएलमधून वेगळे करण्यात आले.
\p
\s5
\v 4 यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात.
\v 5 जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षारस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथे ठेवली जात.
\p
\s5
\v 6 परंतु हे घडताना मी यरुशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली,
\v 7 आणि मी यरुशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.
\p
\s5
\v 8 मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.
\v 9 त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
\p
\s5
\v 10 लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.
\v 11 म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.
\p
\s5
\v 12 त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
\v 13 कोठारांवर या माणसांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.
\v 14 देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
\p
\s5
\v 15 यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांना द्राक्षारसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरुशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
\p
\s5
\v 16 सोरे नगरातील काही लोक यरुशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरुशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांना आणून विकत.
\v 17 यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात.
\v 18 तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”
\p
\s5
\v 19 दर शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरुशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरुशलेमेमध्ये येणार नाही.
\v 20 एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरुशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
\p
\s5
\v 21 मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हाला पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.
\v 22 मग मी लेवीना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे.
\p
\s5
\v 23 त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.
\v 24 आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.
\p
\s5
\v 25 आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका.
\v 26 अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्याला राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.
\v 27 तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरुद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?”
\p
\s5
\v 28 योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्याला मी न लावले. माझ्यासमोरून हाकून लावले.
\p
\v 29 हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.
\p
\s5
\v 30 याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या.
\v 31 लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली.
\p हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.

342
17-EST.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,342 @@
\id EST
\ide UTF-8
\h एस्तेर
\toc1 एस्तेर
\toc2 एस्तेर
\toc3 est
\mt1 एस्तेर
\s5
\c 1
\p
\v 1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश हिंदुस्तानापासून कूशापर्यंतच्या एकशे सत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता),
\v 2 असे झाले की, त्या दिवसात शूशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोश बसला होता.
\p
\s5
\v 3 आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी, त्याने आपले सर्व प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि सरदार त्याच्यासमोर उपस्थित होते.
\v 4 त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले.
\p
\s5
\v 5 जेव्हा ते दिवस संपले, तेव्हा राजाने सात दिवसपर्यत मेजवानी दिली. शूशन राजवाडयातील सर्व लोकांना, लहानापासून थोरांपर्यत होती, ती राजाच्या राजवाड्यातील बागेच्या अंगणात होती.
\v 6 बागेच्या अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते. तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते.
\p
\s5
\v 7 सोन्याच्या पेल्यांतून पेयपदार्थ वाढले जात होते. प्रत्येक पेला अव्दितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षारस पुष्कळच होता.
\v 8 हे पिणे नियमानुसार होते. कोणी कोणाला आग्रह करीत नसे. प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती.
\p
\s5
\v 9 वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.
\v 10 मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उल्हासीत मनःस्थितीत होता. तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस, या सात खोजांना आज्ञा केली की,
\v 11 वश्ती राणीला राजमुकुट घालून आपल्याकडे आणावे. आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिची सुंदरता दाखवावी अशी त्याची इच्छा होती. कारण तिचा चेहरा अति आकर्षक होता.
\p
\s5
\v 12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला; त्याचा क्रोधाग्नी भडकला.
\p
\s5
\v 13 तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्यासंबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती.
\v 14 आता त्याला जवळची होती त्यांची नावे कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते.
\v 15 राजाने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी? कारण तिने अहश्वेरोश राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे.”
\p
\s5
\v 16 ममुखानाने राजा व अधिकाऱ्यांसमक्ष म्हटले, वश्ती राणीने केवळ अहश्वेरोश राजाविरूद्ध चुकीचे केले नाही, पण राज्यातील सर्व सरदार व अहश्वेरोश राजाच्या प्रांतातील सर्व प्रजेविरूद्ध केले आहे.
\v 17 राणी वश्ती अशी वागली हे सर्व स्त्रियांना समजेल. तेव्हा त्यांना आपल्या पतींला तुच्छ मानण्यास ते कारण होईल. त्या म्हणतील, अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणण्याची आज्ञा केली पण तिने नकार दिला.
\v 18 राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप होईल.
\p
\s5
\v 19 जर राजाची मर्जी असल्यास, राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की, वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे.
\v 20 जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की, सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतींचा मान ठेवतील.
\p
\s5
\v 21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदीत झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.
\v 22 राजाच्या सर्व प्रांतात, प्रत्येक प्रांताकडे त्याच्या त्याच्या लिपीप्रमाणे व प्रत्येक राष्ट्राकडे त्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे त्याने पत्रे पाठवली की, प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालावी असे. हा आदेश राज्यातील प्रत्येक लोकांच्या भाषेत देण्यात आला होता.
\s5
\c 2
\p
\v 1 या गोष्टी झाल्यानंतर, राजा अहश्वेरोशचा राग शमला, त्याने वश्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्याविरूद्ध दिलेल्या आदेशाचाहि त्याने विचार केला.
\v 2 तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्याला म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.
\p
\s5
\v 3 आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी नेमावा, त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख, सुकुमार कुमारीकांना शूशन राजवाड्यात अंत:पुरात ठेवावे. तेथे राजाचा अधिकारी हेगे, याच्या निगराणीखाली स्त्रीयांना त्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याने त्यांना त्यांची सौंदर्य प्रसाधने द्यावीत.
\v 4 त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.
\p
\s5
\v 5 बन्यामिनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता.
\v 6 बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरुशलेमेहून पकडून नेले होते.
\p
\s5
\v 7 तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा, म्हणजे एस्तेर, हिची काळजी घेत असे. कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रुपवती होती.
\p
\s5
\v 8 जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता.
\v 9 त्याला ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.
\p
\s5
\v 10 मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते.
\v 11 आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.
\p
\s5
\v 12 स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत.
\v 13 आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.
\p
\s5
\v 14 संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.
\s5
\v 15 आता एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. (मर्दखयाचा चुलता अबीहाईल याची कन्या जिला मर्दखयाने कन्या मानले होते) आता ज्या कोणी एस्तेरला पाहीले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.
\p
\v 16 तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.
\p
\s5
\v 17 इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीति केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले.
\v 18 आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांना कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांना बक्षीसे दिली.
\p
\s5
\v 19 आता सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.
\v 20 एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते. कारण मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.
\v 21 मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे अधिकारी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.
\p
\s5
\v 22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले.
\v 23 मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.
\s5
\c 3
\p
\v 1 या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्याला दिले.
\v 2 राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखयाने त्याला नमन किंवा मुजरा करीत नसे.
\p
\s5
\v 3 तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”
\v 4 राजाचे सेवक त्याला दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते.
\p
\s5
\v 5 जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
\v 6 पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्याला अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांना कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.
\p
\s5
\v 7 अहश्वेरोश राजाच्या, बाराव्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये (निसान महीना), हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यांमध्ये टाकत होते त्यानुसार अदार हा बारावा महिना त्यांनी निवडला. (त्या काळात अशा चिठ्ठ्यांना “पूर” म्हणत.)
\p
\s5
\v 8 मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.
\v 9 “जर राजाची मर्जी असल्यास, या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे, म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.”
\p
\s5
\v 10 तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली.
\v 11 राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.”
\p
\s5
\v 12 त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली.
\v 13 जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या, बाराव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले.
\p
\s5
\v 14 हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांना तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे.
\v 15 राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.
\s5
\c 4
\p
\v 1 जेव्हा जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठयाने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला.
\v 2 पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून आत जाण्यास मनाई होती.
\v 3 राजाचा हुकूम ज्या ज्या प्रांतात पोचला तेथे तेथे यहूद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि गोणताटाची वस्त्रे घालून बहुतेक यहूदी राखेत पडून राहिले.
\p
\s5
\v 4 जेव्हा एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले, तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. गोणताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्रे पाठवली, पण त्याने ती स्विकारली नाहीत.
\v 5 एस्तेरने मग हथाकाला बोलावले, हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्याला आज्ञा दिली.
\p
\s5
\v 6 तेव्हा राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला.
\v 7 मर्दखयाने मग त्याला जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले.
\v 8 यहूद्यांच्या वधाची आज्ञा शूशन नगरात दिली होती त्या राजाज्ञेची प्रतही तिला दाखवण्यासाठी दिली. एस्तेरने राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची याचना व विनंती करावी ही जबाबदारी त्याने तिच्यावर सोपवली.
\p
\s5
\v 9 म्हणून हथाकाने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले.
\v 10 मग मर्दखयासाठी एस्तेरने हथाकाजवळ निरोप दिलाः
\v 11 ती म्हणाली, “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री, राजाचा एकच कायदा आहेः तो म्हणजे मृत्युदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या माणसाला जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”
\v 12 मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला.
\p
\s5
\v 13 मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस.
\v 14 तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”
\p
\s5
\v 15 तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले:
\v 16 “जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले.”
\v 17 तेव्हा मर्दखय निघून गेला आणि एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.
\s5
\c 5
\p
\v 1 तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
\v 2 त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
\p
\s5
\v 3 मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
\v 4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
\p
\s5
\v 5 तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हाला एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
\v 6 ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.”
\p
\s5
\v 7 एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
\v 8 जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”
\p
\s5
\v 9 हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला त्याचा अतिशय संताप आला.
\v 10 तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
\v 11 आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
\p
\s5
\v 12 हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
\v 13 पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”
\p
\s5
\v 14 मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्याला म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला.
\s5
\c 6
\p
\v 1 त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.
\v 2 राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती.
\v 3 त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”
\p
\s5
\v 4 राजा म्हणाला “चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता.
\v 5 राजाचे सेवक त्याला म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.”
\v 6 हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, “माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?”
\p
\s5
\v 7 तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे,
\v 8 राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा.
\v 9 मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”
\p
\s5
\v 10 मग राजा हामानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे “लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.”
\v 11 मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”
\p
\s5
\v 12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.
\v 13 आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्याला सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्याला म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध:पात खचीतच होणार.”
\v 14 हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली.
\s5
\c 7
\p
\v 1 तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले.
\v 2 मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षारस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, “तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती मान्य करण्यांत येईल.”
\p
\s5
\v 3 तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांनाही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.
\v 4 कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.”
\v 5 तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा माणूस कोण व तो कोठे आहे?”
\p
\s5
\v 6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.
\v 7 राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला, पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले.
\p
\s5
\v 8 मग जेथे द्राक्षारस दिला गेला होता त्या दालनामध्ये, राजा बागेतून येऊन उभा राहिला मेजवानीच्या, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.
\p
\s5
\v 9 नंतर हरबोना नावाचा राजाच्या सेवकातील एक अधिकारी, म्हणाला “ज्या मर्दखयाने राजाचे रक्षण करण्यासाठी खबर दिली होती त्याच्यासाठी हामानाच्या घराजवळ पन्नास हात उंचीचा खांब उभारला आहे.” राजा म्हणाला “त्याच खांबावर त्याला फाशी द्या.”
\v 10 तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.
\s5
\c 8
\p
\v 1 त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू असलेल्या हामानाच्या मालकीची सर्व मालमत्ता राणी एस्तेरला दिली. आणि मर्दखय राजाकडे आला कारण त्याचे एस्तेरशी काय नाते आहे ते तिने राजाला सांगितले.
\v 2 राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.
\p
\s5
\v 3 एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हामानाने यहूद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्याला विनंती करु लागली.
\v 4 मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला; एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली.
\p
\s5
\v 5 ती म्हणाली, “जर राजाच्या मर्जीस आल्यास, आणि मजवर तुमची कृपादृष्टी झाली असल्यास, जर राजाला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्यांच्या दृष्टीने मी त्याला आवडले तर हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान याने सर्व प्रांतातील यहूद्यांचा नायनाट करण्याचे पाठवलेले पत्रे रद्द करणारा आदेश लिहावा.
\v 6 कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश पाहून मी कसा सहन करू शकेल?”
\p
\s5
\v 7 राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेर आणि मर्दखय यहूदी यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हे, पहा, हामान यहूद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली आणि माझ्या शिपायांनी त्याला फाशी दिले आहे. कारण तो यहूद्यांवर हल्ला करणार होता.
\v 8 आता राजाच्या नावाने यहूद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहर उमटवा. कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही.”
\p
\s5
\v 9 राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले, तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या तेविसाव्या दिवशी हे झाले. सर्व यहूदी आणि हिंदुस्तानपासून कूशपर्यंतच्या एकशेंसत्तावीस प्रांतांमधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयाने दिलेले यहुद्याविषयी असलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहूद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले.
\p
\s5
\v 10 मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठवले.
\v 11 राजाने त्या पत्रात सर्व नगरातील यहूद्यांनी एकत्र जमावे आणि स्वसंरक्षणासाठी उभे रहावे; त्यांना जे लोक व प्रांत उपद्रव करतील, त्यांच्या सर्व सैन्याचा, स्त्रियांचा, मुलांचाही नाश करावा व त्यांना ठार मारावे व त्यांना नाहीसे करावे, त्यांची लूट करून घ्यावी.
\v 12 अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत एकाच दिवशी, बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या, तेराव्या दिवशी यहूद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते.
\p
\s5
\v 13 जो लेख हुकूम म्हणून प्रत्येक प्रांतात द्यायचा होता त्याची प्रत सर्व लोकांस जाहीर झाली, की यहूद्यांनी त्या दिवशी शत्रूचा सूड उगवण्यासाठी तयार रहावे.
\v 14 राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. ते वेळ न गमावता जायला निघाले. राजाचा हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला.
\p
\s5
\v 15 मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याची वस्त्रे निळया आणि पांढऱ्या रंगाची होती. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशन नगरामध्ये आनंदाने जयघोष करण्यात आला.
\v 16 यहूद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्यादिवशी जल्लोषाचे वातावरण होते.
\v 17 ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहूद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहूदी झाले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.
\s5
\c 9
\p
\v 1 आता बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांना राजाच्या आज्ञेचे व हुकूमाचे पालन करायचे होते, यहूद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती पण त्याच्या उलट झाले, जे यहूद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहूदी आता वरचढ झाले होते.
\v 2 आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहूदी आपआपल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती म्हणून यहूद्यांना ते लोक घाबरले.
\p
\s5
\v 3 शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते.
\v 4 मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची किर्ती राज्यातील सर्वापर्यंत पोहचली होती, मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.
\v 5 यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तरवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.
\p
\s5
\v 6 शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला.
\v 7 शिवाय त्यांनी पुढील लोकांना ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा,
\v 8 पोराथा, अदल्या, अरीदाथा,
\v 9 पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा,
\v 10 हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वाना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.
\p
\s5
\v 11 तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले.
\v 12 तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानाच्या दहा पुत्रासहीत यहूद्यांनी शूशनमध्ये पाचशे लोकांना मारले. आता राजाच्या इतर प्रांतांत काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तुझी काय विनंती आहे? ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे? ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल.”
\p
\s5
\v 13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.”
\v 14 तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानाच्या दहा मुलांना टांगले गेले.
\p
\s5
\v 15 अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहूदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या तीनशे जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
\v 16 त्यासमयी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांना त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही.
\p
\s5
\v 17 अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला.
\v 18 परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला.
\v 19 म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहूदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्यादिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
\p
\s5
\v 20 मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली,
\v 21 दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा,
\v 22 त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
\p
\s5
\v 23 मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला.
\v 24 हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठी टाकून दिवस ठरवला होता.
\v 25 परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहुद्यांविरुद्ध लोकांविरूध्द रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्याला व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावे.
\s5
\v 26 यास्तव पूर या शब्दावरून “पुरीम” असे म्हणत, म्हणून या दिवसाला “पुरीम” नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली.
\v 27 यहूद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्विकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजासाठी व जो प्रत्येकजन त्यांना जोडलेले आहे तो. आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येकवर्षी त्याच समयी साजरे करावे.
\v 28 प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसांची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.
\s5
\v 29 मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले.
\s5
\v 30 राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यात शांतीची सत्य वचने होती.
\v 31 पुरीम साजरा करायला लोकांना सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसांचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा.
\v 32 पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.
\s5
\c 10
\p
\v 1 मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला.
\v 2 त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये, त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत.
\p
\s5
\v 3 राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.

3390
18-JOB.usfm Normal file

File diff suppressed because it is too large Load Diff

9179
19-PSA.usfm Normal file

File diff suppressed because it is too large Load Diff

3302
20-PRO.usfm Normal file

File diff suppressed because it is too large Load Diff

791
21-ECC.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,791 @@
\id ECC
\ide UTF-8
\h उपदेशक
\toc1 उपदेशक
\toc2 उपदेशक
\toc3 ecc
\mt1 उपदेशक
\s5
\c 1
\s सर्वकाही व्यर्थ
\p
\v 1 ही शिक्षकाकडून आलेली वचने आहेत, जो यरुशलेमेतील राजा आणि दावीदाचा वंशज होता.
\v 2 शिक्षक हे म्हणतो,
\q धुक्याच्या वाफेसारखी,
\q वाऱ्यातील झुळूकेसारखी
\q प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.
\q
\v 3 भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्याला काय लाभ?
\q
\s5
\v 4 एक पिढी जाते,
\q आणि दुसरी पिढी येते,
\q परंतु पृथ्वीच काय ती सर्वकाळ राहते.
\q
\v 5 सूर्य उगवतो
\q आणि तो मावळतो.
\q आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो.
\q
\v 6 वारा दक्षिणेकडे वाहतो
\q आणि उत्तरेकडे वळतो,
\q नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून
\q आणि पुन्हा माघारी येतो.
\q
\s5
\v 7 सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात
\q पण सागर कधीही भरून जात नाही.
\q ज्या स्थानाकडेन नद्या वाहत येतात,
\q तेथेच त्या पुन्हा जातात.
\q
\v 8 सर्व गोष्टी कष्टमय आहेत.
\q आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
\q डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,
\q किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही.
\s5
\v 9 जे काही आहे तेच होणार,
\q आणि जे केले आहे तेच केले जाईल.
\q भूतलावर काहीच नवे नाही.
\q
\v 10 कोणतेही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,
\q पाहा, हे नवीन आहे?
\q जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते,
\q आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे.
\q
\v 11 प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.
\q आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार
\q आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील
\q त्यादेखील आठवणीत राहणार नाही.
\s उपदेशकाचा अनुभव
\p
\s5
\v 12 मी शिक्षक आहे, आणि यरुशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो.
\v 13 आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत.
\v 14 भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासाठी ते आहे.
\q
\v 15 जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही!
\q जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही!
\p
\s5
\v 16 मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरुशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.”
\v 17 याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो.
\v 18 कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो.
\s5
\c 2
\p
\v 1 मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हेसुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.”
\v 2 मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?
\p
\s5
\v 3 जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षारसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.
\p
\s5
\v 4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.
\v 5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली.
\v 6 झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले.
\p
\s5
\v 7 मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरुशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांचे कळपाचे मोठे धन मजजवळ होते.
\v 8 मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया व उपपत्नी ठेवल्या.
\p
\s5
\v 9 जे माझ्यापूर्वी यरुशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.
\q
\v 10 जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले,
\q ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही.
\q मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही,
\q कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे
\q आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.
\q
\s5
\v 11 नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती,
\q आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले,
\q परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते
\q भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
\q
\v 12 मग मी ज्ञान,
\q आणि वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो.
\q कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील?
\q जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार.
\q
\s5
\v 13 नंतर मला समजायला लागले
\q जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे
\q तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.
\q
\v 14 ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात,
\q पण मूर्ख अंधारात चालतो,
\q असे असून सर्वांची एक सारखीच गती असते. असेही मी समजलो.
\q
\s5
\v 15 मग मी आपल्या मनात म्हणालो,
\q मूर्खाविषयी जे काय घडते,
\q ते माझ्याही बाबतीत घडेल,
\q मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल?
\q मी आपल्या मनात अनुमान काढले,
\q हे सुद्धा व्यर्थच आहे.
\q
\v 16 मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकालपर्यत राहणार नाही.
\q कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील
\q म्हणून शहाणा माणूस मूर्खासारखाच मरतो.
\p
\s5
\v 17 यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत.
\v 18 माझे अपार कष्ट, जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. कारण जो मनुष्य माझ्यामागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार.
\p
\s5
\v 19 आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख असेल कोणाला माहित? परंतु माझे सर्व श्रम, जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखवले आहे, त्यावर तो अधिकार चालवील. हेही व्यर्थ आहे.
\v 20 म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले.
\p
\s5
\v 21 कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा माणूस कोण आहे? तरी ते ज्याने त्यामध्ये काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास सोडून जाईल हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे.
\v 22 कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्याला काय फायदा होतो?
\v 23 कारण त्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.
\p
\s5
\v 24 मनुष्याने खावे, प्यावे आणि आपल्या श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले.
\v 25 कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?
\p
\s5
\v 26 जर जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्याला तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्याला ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
\s5
\c 3
\s प्रत्येक गोष्टीस उचित काळ
\p
\v 1 प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
\q
\v 2 जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते.
\q रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
\q
\v 3 ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते.
\q मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते.
\q
\s5
\v 4 रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते.
\q शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
\q
\v 5 धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते.
\q दुसऱ्या लोकांना आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते.
\q
\s5
\v 6 गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते.
\q गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
\q
\v 7 वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते.
\q शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.
\q
\s5
\v 8 प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.
\q युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते.
\v 9 काम करणारा जे श्रम करतो त्याला त्यामध्ये काय लाभ मिळतो?
\v 10 देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.
\p
\s5
\v 11 देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही.
\p
\s5
\v 12 त्यांनी जिवंत असेपर्यत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले.
\v 13 आणि प्रत्येक माणसाने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे.
\p
\s5
\v 14 देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कामीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे.
\q
\v 15 जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते.
\q आणि जे काही अस्तित्वात यावयाचे आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते.
\q देव मानवजातीला दडलेल्या गोष्टी शोधण्यास लावतो.
\s जीवनातील अन्याय
\p
\s5
\v 16 आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते.
\v 17 मी आपल्या मनात म्हटले, देव प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक कामाचा योग्यसमयी सदाचरणी आणि दुष्ट लोकांचा न्याय करील.
\p
\s5
\v 18 मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे.
\p
\s5
\v 19 जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशु मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय?
\v 20 सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात.
\p
\s5
\v 21 मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे?
\v 22 मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्याला कोण परत आणील?
\s5
\c 4
\p
\v 1 मी पुन्हा एकदा जे सर्व जाचजुलूम भूतलावर करण्यात येतात ते पाहिले.
\q पीडलेल्यांच्या अश्रुकडे पाहा.
\q तेथे त्यांचे समाधान करणारा कोणी नाही.
\q त्याजवर जाचजुलूम करणाऱ्यांच्या हातात बळ आहे.
\q पण पीडलेल्यांचे समाधान करणारा कोणी नाही.
\q
\s5
\v 2 म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जीवंत आहेत,
\q व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे,
\q
\v 3 जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही,
\q तो त्या दोघांपेक्षा बरा आहे असे मी समजतो.
\p
\s5
\v 4 नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
\q
\s5
\v 5 मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही,
\q त्याचा देह त्याचे अन्न आहे.
\q
\v 6 परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा
\q स्वस्थपणे कार्य करून मूठभर लाभ मिळविणे हे चांगले आहे.
\p
\s5
\v 7 मग मी पुन्हा निरर्थकतेबद्दल विचार केला, भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या.
\q
\v 8 तेथे अशाप्रकारचा कोणी माणूस आहे, तो एकटाच असून
\q त्याला दुसरा कोणी नाही. त्याला मुलगा किंवा भाऊ नाही.
\q परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही.
\q मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही.
\q तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे?
\q आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे?
\q हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे.
\q
\s5
\v 9 एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत.
\q कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात.
\q
\v 10 जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्याला उचलतो.
\q पण जो एकटाच असून पडतो त्याला उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते.
\q
\v 11 आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते.
\q परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल?
\q
\s5
\v 12 जो माणूस एकटा आहे त्याला कोणी भारी झाला
\q तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल.
\q तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
\p
\s5
\v 13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.
\v 14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल.
\p
\s5
\v 15 तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्याला शरण गेले.
\v 16 त्या सर्व लोकांचा म्हणजे ज्या सर्वावर तो अधिकारी झाला त्यांचा, काही अंत नव्हता. तरी जे लोक पुढे होणार आहेत ते त्याच्याविषयी आनंद करणार नाहीत. खचित ही परीस्थिती व्यर्थ आहे आणि हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
\s5
\c 5
\s अविचाराने बोलणे धोक्याचे
\p
\v 1 जेव्हा तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा आपल्या वागणूकीकडे लक्ष दे. तेथे ऐकण्यास जा. ऐकणे हे मूर्खाच्या यज्ञापेक्षा चांगले आहे. जीवनात ते वाईट करतात हे ते जाणत नाही.
\q
\s5
\v 2 तुझ्या मुखाने बोलण्याची घाई करू नको,
\q आणि देवासमोर कोणतीही गोष्ट उच्चारायला तुझे मन उतावळे करू नको.
\q देव स्वर्गात आहे पण तू तर पृथ्वीवर आहेस.
\q म्हणून तुझे शब्द मोजकेच असावे.
\q
\v 3 जर तुम्हाला पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही त्याबद्दल काळजी करता, तुम्हाला बहुतकरून वाईट स्वप्रे पडतात.
\q आणि तुम्ही पुष्कळ शब्द बोलता, संभाव्यता अधिक मूर्ख गोष्टी बोलत जाता.
\p
\s5
\v 4 जर तू देवाला नवस केला असेल तर तो फेडायला वेळ लावू नको. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.
\v 5 काहीतरी नवस करून त्याची पूर्तता न करण्यापेक्षा कसलाच नवस न करणे हे चांगले आहे.
\p
\s5
\v 6 आपल्या मुखामुळे आपल्या शरीराला शासन होऊ देऊ नको. याजकांच्या दूताला असे म्हणू नकोस, तो नवस माझी चूक होती. तुझ्या चुकीच्या नवसामुळे देवाने तुझ्यावर का कोपित व्हावे, देवाला कोपवून तुझ्या हातचे काम का नष्ट करावे?
\v 7 कारण पुष्कळ स्वप्नात, पुष्कळ शब्दात, अर्थहीन वाफ असते. तर तू देवाचे भय धर.
\s जीवनाची व्यर्थता
\p
\s5
\v 8 जेव्हा काही प्रांतात गरीब लोकांवर जुलूम होत आहे आणि न्याय व योग्य वागवणूक त्यांना मिळत नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण वरीष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते.
\v 9 आणखी, पृथ्वीचे फळ प्रत्येकजणासाठी आहे आणि राजा स्वतः शेतातील उत्पन्न घेतो.
\q
\s5
\v 10 जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही.
\q आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्याला नेहमीच अधिक हाव असते.
\q हे सुद्धा व्यर्थ आहे.
\q
\v 11 जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात.
\q आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय
\q तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे?
\q
\s5
\v 12 काम करणाऱ्या माणसाची झोप गोड असते,
\q तो थोडे खावो किंवा अधिक खावो,
\q पण श्रीमंत माणसाची संपत्ती त्याला चांगली झोप येऊ देत नाही.
\q
\s5
\v 13 जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे,
\q ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय.
\q
\v 14 जेव्हा श्रीमंत माणूस आपले धन अनिष्ट प्रसंगामुळे गमावतो,
\q त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मुलाला, ज्याला त्याने वाढवले आहे, त्याला द्यायला त्याच्या हातात काहीही राहत नाही.
\q
\s5
\v 15 जसा माणूस आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला,
\q जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल.
\q आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही.
\v 16 दुसरे एक मोठे अरिष्टच आहे
\q तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल,
\q म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्याला काय लाभ मिळतो?
\q
\v 17 तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो
\q आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.
\p
\s5
\v 18 मी पाहिले आहे, ते पाहा, की, माणसाने खावे. प्यावे आणि देवाने त्याचे जे आयुष्य त्याला दिले आहे त्यातील सर्व दिवस तो ज्या उद्योगात भूतलावर श्रम करतो त्यामध्ये सुख भोगावे हे चांगले आणि मनोरम आहे, हे माणसाला नेमून दिलेले काम आहे.
\s5
\v 19 जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्विकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.
\v 20 माणसाला जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्याला त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.
\s5
\c 6
\p
\v 1 जे मी भूतलावर एक अरिष्ट पाहिले. आणि ते मनुष्यासाठी भारीच असते.
\v 2 देव कोणा माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानसन्मान एवढा देतो की तो जे इच्छितो ते सर्व त्याला मिळते, कसलीही उणीव पडत नाही. परंतु नंतर देव त्याला त्याचा आनंद घेण्याची शक्ती देत नाही. त्याऐवजी कोणीतरी अनोळखी त्या गोष्टींचा उपयोग करतो. हे व्यर्थ आहे, अतिशय वाईट पीडा आहे.
\p
\s5
\v 3 जर कोणा मनुष्याने शंभर मुलांस जन्म दिला आणि पुष्कळ वर्षे जगला आणि त्याच्या आयुष्याचे वर्षे पुष्कळ असली, परंतु त्याचा जीव चांगल्या सुखाने समाधान पावला नाही आणि त्याला सन्मानाने दफन केले नाही. तर त्याच्यापेक्षा मृत जन्मलेले बाळ खूप बरे आहे. असे मी म्हणतो.
\v 4 जसे ते जन्मलेले बाळ निरर्थक आहे आणि अंधकारात नाहीसे होते व त्याचे नाव लपलेलेच राहते.
\p
\s5
\v 5 त्या बाळाने कधीही सूर्य पाहिला नाही किंवा त्याला काहीच माहीत नाही, त्याला त्या माणसापेक्षा अधिक विसावा आहे.
\v 6 तो माणूस कदाचित दोन हजार वर्षे जरी जगला. पण तो चांगल्या गोष्टींचा उपभोग घेण्यास शिकला नाही तर प्रत्येकजण ज्या जागी जातात त्याचजागी तो पण जाईल.
\q
\s5
\v 7 मनुष्याचे सर्व श्रम पोटासाठी आहेत.
\q तरी त्यांची भूक भागत नाही.
\q
\v 8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो?
\q त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्याला तरी काय फायदा?
\q
\s5
\v 9 जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे
\q मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे.
\q हे सुध्दा वाफच आहे. व वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
\q
\v 10 जे काही झाले त्याचे नाव पूर्वीच ठेवलेले आहे आणि मनुष्य काय आहे हेही कळलेले आहे. त्याजहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही.
\q
\v 11 अधिक शब्द बोलण्याने अधिक निर्थकता वाढते.
\q त्यामध्ये मनुष्याला काय लाभ?
\v 12 मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो. त्यामध्ये त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? कारण त्याच्या मरणानंतर पृथ्वीवर काय होईल हे मनुष्याला कोण सांगेल?
\s5
\c 7
\s ज्ञानाची श्रेष्ठता
\q
\v 1 किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे,
\q आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.
\q
\v 2 मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा,
\q शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे,
\q जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे.
\q म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील.
\q
\s5
\v 3 हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे.
\q कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो
\q
\v 4 शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते,
\q पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते.
\q
\s5
\v 5 मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा
\q शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे.
\q
\v 6 भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे
\q मूर्खाचे हसणे आहे.
\q हे सुद्धा व्यर्थच आहे.
\q
\s5
\v 7 पिळवणूक खात्रीने शहाण्या माणसाला मूर्ख करते
\q आणि लाच मन भ्रष्ट करते.
\q
\s5
\v 8 एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे.
\q आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे.
\q
\v 9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको.
\q कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
\q
\s5
\v 10 या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको.
\q कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्र विचारत नाही.
\q
\s5
\v 11 आमच्या पूर्वजापासून आम्हाला वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे.
\q ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो.
\q
\v 12 कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते.
\q परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
\s5
\v 13 देवाच्या कृत्यांचा विचार कराः
\q जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
\q
\s5
\v 14 जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा.
\q परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः
\q देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे.
\q या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.
\p
\s5
\v 15 मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत.
\q तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतिने वागत असताना देखील नष्ट होतात,
\q आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
\q
\v 16 स्वनीतिमान होऊ नका,
\q स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका.
\q तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो?
\q
\s5
\v 17 दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका,
\q तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
\q
\v 18 तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे,
\q आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस.
\q जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.
\q
\s5
\v 19 एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या माणसाला अधिक बलवान करते,
\q
\v 20 जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही.
\q असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.
\q
\s5
\v 21 बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका.
\q कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हाला शाप देताना ऐकाल.
\q
\v 22 त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे
\q तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.
\s ज्ञानाचा शोध
\p
\s5
\v 23 मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो,
\q मी ज्ञानी होईल,
\q परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.
\q
\v 24 ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?
\q
\v 25 मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले.
\q आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले,
\q आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे.
\q आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.
\q
\s5
\v 26 मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली
\q तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे,
\q आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत.
\q जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो.
\q पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.
\p
\s5
\v 27 मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
\v 28 मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान माणूस मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.
\p
\s5
\v 29 मला यातून सापडले की, देवाने माणसाला सरळ असे निर्माण केले पण ते अनेक योजनांच्या मागे गेले आहेत.
\s5
\c 8
\q
\v 1 ज्ञानी मनुष्य कोण आहे?
\q जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते?
\q मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते
\q आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो.
\s राजाच्या आज्ञा पाळ
\p
\s5
\v 2 मी तुम्हाला सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याच्या संरक्षणाची तू देवाची शपथ घेतली आहे.
\v 3 त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्याला पाठींबा देऊ नको. कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो.
\v 4 राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्याला कोण म्हणेल, तू काय करतो?
\q
\s5
\v 5 जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो.
\q शहाण्या माणसाचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते.
\s देवाचे मार्ग मानवी ज्ञानाला अगम्य
\p
\q
\v 6 प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे.
\q कारण माणसाच्या अडचणी मोठ्या आहेत.
\q
\v 7 पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही.
\q काय होणार आहे हे त्याला कोण सांगू शकेल?
\q
\s5
\v 8 जीवनाच्या श्वासाला थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही
\q आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही.
\q युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही,
\q आणि दुष्टाई त्याच्या दासाला सोडवणार नाही.
\v 9 मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि कोणतेही काम जे भूतलावर करण्यात येत आहे त्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. एक समय आहे त्यामध्ये दुसरा मनुष्य आपल्या वाईटासाठी दुसऱ्यावर अधिकार करतो.
\p
\s5
\v 10 मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे.
\v 11 जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊनही ती लवकर अंमलात आणली जात नाही. त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते.
\p
\s5
\v 12 पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्याला मान देतात हे अधिक चांगले आहे.
\v 13 पण दुष्टाचे हित होणार नाही. त्याला दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही.
\p
\s5
\v 14 पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते, असे काही नीतिमान असतात की, दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते आणि असे काही दुष्ट असतात की, नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो हेही व्यर्थ आहे.
\v 15 मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे व आनंद करावा यापेक्षा सूर्याच्या खालती त्याला काही उत्तम नाही. कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्याला पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील.
\p
\s5
\v 16 जेव्हा ज्ञान समजायला आणि जे कार्य पृथ्वीवर चालले आहे ते पाहायला जेव्हा मी आपले मन लावले. कारण अहोरात्र ज्याच्या डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.
\v 17 तेव्हा देवाचे सर्व काम पाहून मला समजले की, जे काम भूतलावर करण्यात येत आहे ते मनुष्याला पुरते शोधून काढता येत नाही, कारण ते शोधून काढायला जरी मनुष्याने कितीही श्रम केले तरी ते त्याला सापडणार नाही आणि याव्यतिरिक्त, कोणी ज्ञानी मनुष्याने, मी ते जाणीन, असे जरी म्हटले, तरी त्याला ते सापडणार नाही.
\s5
\c 9
\s जीवनातील विसंगती
\p
\v 1 मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. नीतिमान आणि ज्ञानी माणसे व त्यांचे कार्ये समजण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या हातात असते. कोणीतरी आपला तिरस्कार किंवा प्रेम करील याबद्दल काहीही माहीत नसते.
\p
\s5
\v 2 जे काही घडते ते सर्वास सारखेच घडते.
\q नीतिमान आणि दुष्ट,
\q चांगला आणि वाईट,
\q शुद्ध आणि अशुद्ध,
\q यज्ञ करणारा आणि यज्ञ न करणारा, या सर्वांची सारखीच गती होते.
\q चांगला माणूस पापी माणसासारखाच मरेल.
\q शपथ वाहणाऱ्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा सारखीच होते.
\p
\s5
\v 3 जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे त्यामध्ये एक अनिष्ट आहे. सर्वांचा शेवट सारखाच होतो. मानवजातीच्या मनात सर्व दुष्टता भरलेली असते. ते जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्या मनात वेडेपण असते. मग त्यानंतर ते मेलेल्यास जाऊन मिळतात.
\p
\s5
\v 4 जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.
\q
\v 5 जिवंताना ते मरणार आहेत हे माहीत असते.
\q पण मरण पावलेल्यांना काहीच माहीत नसते.
\q मरण पावलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही.
\q कारण त्यांचे स्मरण विसरले आहे.
\q
\s5
\v 6 त्यांची प्रीती, द्वेष व मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत
\q आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे
\q त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही.
\v 7 तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षारस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे.
\v 8 सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा.
\p
\s5
\v 9 तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्याने तुला सूर्याच्या खालती दिले आहेत त्यामध्ये, तुझ्या व्यर्थतेच्या सर्वच दिवसात, तुझी बायको जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव, कारण आयुष्यात, आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खालती श्रम करतोस तेथेही तुझा वाटा हाच आहे.
\v 10 जे काही काम तुझ्या हाती पडेल ते सर्व तू आपल्या सामर्थ्याने कर. कारण ज्या कबरेत आपण सर्व जाणार आहोत त्यामध्ये काम, विचार, ज्ञान आणि शहाणपणही नसते.
\p
\s5
\v 11 मी सूर्याच्या खालती काही कुतुहलाच्या गोष्टी पाहिल्या.
\q वेगाने धावणारा शर्यत जिंकत नाही,
\q सर्वशक्तीमान लढाई जिंकतो असे नाही.
\q शहाण्याला अन्न खाता येते असे नाही.
\q समंजसाला संपत्ती मिळते असे नाही
\q आणि ज्ञान्यावरच अनुग्रह होतो असे नाही.
\q त्याऐवजी समय व संधी त्या सर्वावर परीणाम होतात.
\q
\v 12 कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही,
\q जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो,
\q किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,
\q त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर
\q अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.
\s सामर्थ्यापेक्षा ज्ञान थोर
\p
\s5
\v 13 हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते.
\v 14 थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले.
\v 15 पण त्या शहरात एक विद्धान होता. तो विद्धान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरून गेले.
\p
\s5
\v 16 मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही.
\q
\s5
\v 17 विद्धान माणसाने शांतपणे उच्चारलेले काही शब्द
\q हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.
\q
\v 18 शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते.
\q पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करू करतो.
\s5
\c 10
\s मूर्खपणाचे परिणाम
\q
\v 1 जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात.
\q त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.
\q
\v 2 शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे.
\q पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते.
\q
\v 3 जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात.
\q तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.
\q
\s5
\v 4 तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका.
\q शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो.
\q
\s5
\v 5 एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे,
\q ते अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे.
\q
\v 6 मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते
\q आणि यशस्वी माणसांना खालची जागा दिली जाते.
\q
\v 7 मी दासाला घोड्यावरून जाताना मी पाहिले
\q आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले.
\q
\s5
\v 8 जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो
\q त्याला साप चावण्याची शक्यता असते.
\q
\v 9 जो कोणी दगड फोडतो
\q त्याला त्यामुळे इजा होऊ शकते.
\q आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो.
\s5
\v 10 लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे.
\q
\v 11 जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही.
\q
\s5
\v 12 शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात. परंतु मूर्खाचे ओठ त्यालाच गिळून टाकतील.
\q
\s5
\v 13 त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो.
\q आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते.
\q
\v 14 मूर्ख वचने वाढवून सांगतो,
\q पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही.
\q त्याच्यामागे काय होईल ते त्याला कोण सांगेल?
\q
\s5
\v 15 मूर्ख श्रम करून थकतो
\q कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही.
\q
\s5
\v 16 हे देशा, तुझा राजा जर दासासारखा असला,
\q आणि तुझे अधिपती सकाळी मेजवाणीला सुरवात करतात तर तुझी केवढी दुर्दशा.
\q
\v 17 पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे,
\q आणि तुझे अधिपती नशेसाठी
\q नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे.
\q
\s5
\v 18 जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल
\q आणि त्याचे छत कोसळून पडेल.
\q
\v 19 लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात,
\q द्राक्षारस जीवन आनंदीत करतो.
\q आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो.
\q
\s5
\v 20 तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको.
\q आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको.
\q कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल,
\q आणि जे काही पंख आहेत ते गोष्ट पसरविल.
\s5
\c 11
\s शहण्याचे आचरण
\q
\v 1 आपली भाकर जलावर सोड.
\q कारण पुष्कळ दिवसानी तुला ते पुन्हा मिळेल.
\q
\v 2 तू सात आठ लोकांस वाटा दे.
\q कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हाला कल्पना नाही.
\q
\v 3 जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील
\q तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात
\q आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
\q
\s5
\v 4 जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही.
\q जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही.
\q
\v 5 जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही
\q आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही
\q तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.
\q
\s5
\v 6 सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस.
\q कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते
\q अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
\q
\v 7 प्रकाश खरोखर गोड आहे,
\q आणि सूर्य पाहणे डोळ्यांस आनंददायक गोष्ट आहे.
\q
\v 8 जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो,
\q पण तो येण्याऱ्या अंधकाराचे दिवसाचा विचार करो,
\q कारण ते पुष्कळ होतील.
\q जे सर्व येते ते व्यर्थच आहे.
\s तरुण पिढीस बोध
\p
\q
\s5
\v 9 हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर.
\q तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो
\q आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.
\q पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.
\q
\v 10 यास्तव आपल्या मनातून राग दूर कर
\q आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको.
\q कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.
\s5
\c 12
\q
\v 1 तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.
\q अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी,
\q आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील,
\q त्यामध्ये मला काही सुख नाही.
\q
\v 2 सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल
\q आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.
\q
\s5
\v 3 त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील
\q आणि बळकट मनुष्य वाकतील
\q आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत,
\q आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.
\q
\s5
\v 4 त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल,
\q तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल,
\q आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल.
\q
\s5
\v 5 तेव्हा मनुष्याला उंचावरच्या ठिकाणांची
\q आणि रस्त्यावरील पुढील धोक्यांची भीती वाटेल,
\q आणि तेव्हा बदामाचे झाड फुलेल,
\q आणि तेव्हा टोळ स्वतःपुढे भारी असा वाटेल,
\q आणि तेव्हा स्वाभाविक इच्छा दुर्बल होईल.
\q नंतर मनुष्य आपल्या सनातन घरास जातो,
\q आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात.
\q
\s5
\v 6 तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,
\q रुप्याची तार तुटण्यापूर्वी
\q किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी,
\q अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी,
\q अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल,
\q
\v 7 ज्याठिकाणापासून ती आली, माती परत मातीला मिळण्यापूर्वी,
\q आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.
\q
\s5
\v 8 उपदेशक म्हणतो, धुक्याची वाफ, प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी वाफ आहे.
\s मानवाचे कर्तव्य
\p
\v 9 उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांना ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला.
\p
\s5
\v 10 उपदेशकाने स्पष्ट व सत्याची सरळमार्गी वचने शोधून लिहिण्याचा प्रयत्न केला.
\v 11 ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत.
\p
\s5
\v 12 माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल.
\q
\s5
\v 13 याविषयाचा शेवट हाच आहे,
\q सर्व काही ऐकल्यानंतर,
\q तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ.
\q कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.
\q
\v 14 देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील,
\q त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा,
\q मग ती वाईट असो किंवा चांगली.

557
22-SNG.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,557 @@
\id SNG
\ide UTF-8
\h गीतरत्न
\toc1 गीतरत्न
\toc2 गीतरत्न
\toc3 sng
\mt1 गीतरत्न
\s5
\c 1
\p
\v 1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
\q
\v 2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे,
\q कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
\q
\v 3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
\q तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
\q
\v 4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.
\q (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे.
\q (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
\q
\s5
\v 5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरुशलेमेच्या कन्यांनो, मी काळी पण सुंदर आहे.
\q मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि
\q शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
\q
\v 6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.
\q कारण सूर्याने मी होरपळले आहे.
\q माझ्या आईची मुले माझ्यावर रागावले होते.
\q त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले.
\q परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
\q
\s5
\v 7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:
\q तो तू तुझा कळप कोठे चारतोस?
\q तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस?
\q तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
\q
\s5
\v 8 (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी स्त्री,
\q जर तुला काय करायचे ते माहीत नाहीतर
\q माझ्या कळपाच्या मागे जा.
\q तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
\q
\s5
\v 9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
\q
\v 10 तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
\q तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
\q
\v 11 मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले
\q सोन्याचे दागिने करेल.
\q
\s5
\v 12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता
\q माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
\q
\v 13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,
\q माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे
\q
\v 14 माझा प्रियकर एन-गेदीमधील
\q द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
\p
\s5
\v 15 (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
\q तू फारच सुंदर आहेस.
\q तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
\q
\s5
\v 16 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.
\q आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
\q
\v 17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत.
\q आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.
\s5
\c 2
\q
\v 1 (ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे.
\q दरीतले कमलपुष्प आहे.
\q
\v 2 (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प
\q तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
\q
\s5
\v 3 (स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये
\q तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे.
\q त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला.
\q आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.
\q
\v 4 त्याने मला मेजवानीच्या घरात आणले
\q आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
\s5
\v 5 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा.
\q सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा.
\q कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
\v 6 (ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे
\q आणि त्याचा उजवा हात मला आलिंगीत आहे.
\q
\s5
\v 7 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो,
\q तुम्हाला वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की,
\q आमचे प्रेमकरणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
\s5
\v 8 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे,
\q डोंगरावरुन उड्या मारत,
\q टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
\q
\v 9 माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे.
\q आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे,
\q खिडकीतून डोकावणाऱ्या,
\q झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
\q
\s5
\v 10 माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला,
\q माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या!
\q
\v 11 बघ आता हिवाळा संपला आहे.
\q पाऊस आला आणि गेला.
\q
\s5
\v 12 भूमीवर फुले दिसत आहेत,
\q पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे.
\q आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
\q
\v 13 अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे.
\q आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत.
\q ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
\q
\s5
\v 14 माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या,
\q पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा,
\q मला तुझे मुख पाहू दे.
\q मला तुझा आवाज ऐकू दे.
\q तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
\s5
\v 15 (ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा.
\q लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे.
\q कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
\s5
\v 16 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे.
\q तो आपला कळप कमळांच्यामध्ये चारीत आहे.
\v 17 (ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा.
\q माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरीणीच्या पाडसासारखा परत फीर.
\s5
\c 3
\q
\v 1 (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता
\q ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो
\q त्याची उत्कंठा मला लागली. मी त्याला उत्कटतेने शोधले
\q पण तो मला सापडला नाही.
\q
\v 2 मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती,
\q रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन.
\q मी त्याला शोधले पण मला तो सापडला नाही.
\s5
\v 3 शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.
\q मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
\q
\v 4 मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.
\q इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला.
\q मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही.
\q मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले.
\q जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्याला सोडले नाही.
\q
\s5
\v 5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो,
\q रानतल्या हरीणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते.
\q आमचे प्रेम करणे संपत नाही
\q तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
\q
\s5
\v 6 (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील
\q सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने
\q अशी धुराच्या खांबासारखी
\q रानातून येणारी ती ही कोण आहे?
\q
\v 7 पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे.
\q त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत,
\q ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
\q
\s5
\v 8 ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत.
\q रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला
\q करायला ते तयार आहेत.
\q
\v 9 राजा शलमोनाने स्वत:साठी
\q लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
\q
\s5
\v 10 त्याने खांब चांदीचे केले.
\q पाठ सोन्याची केली.
\q बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली.
\q त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
\q
\v 11 (ती स्त्री यरुशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा.
\q ज्या दिवशी त्याचे लग्र झाले,
\q त्यादिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
\q ज्या दिवशी तो खूप आनंदी होता.
\s5
\c 4
\q
\v 1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस.
\q तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत.
\q तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या
\q शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
\q
\s5
\v 2 लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे.
\q त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही.
\q त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
\q
\s5
\v 3 तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत.
\q तुझे मुख सुंदर आहे.
\q तुझ्या बुरख्याच्या आत
\q तुझी कानशिले दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
\q
\s5
\v 4 तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे.
\q ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
\q
\v 5 हरीणीची जी जुळी,
\q जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात
\q त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
\q
\s5
\v 6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत.
\q तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर
\q ऊदाच्या टेकडीवर जाईन.
\q
\v 7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस.
\q तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
\q
\s5
\v 8 लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये.
\q लबानोनातून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
\q
\s5
\v 9 अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू,
\q तू माझे हृदय हरण केले आहेस.
\q तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
\q तू माझे हृदय चोरले आहेस.
\q
\s5
\v 10 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे.
\q तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
\q तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
\q
\v 11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
\q तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे.
\q तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
\q
\s5
\v 12 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस.
\q तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
\q
\v 13 तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत.
\q त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
\q
\v 14 मेंदी, जटामांसी, केशर,
\q वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
\q तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
\q
\s5
\v 15 तू बागेतल्या कारंज्यासाखी,
\q ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी,
\q लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
\q
\v 16 (तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये,
\q माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव.
\q माझा सखा त्याच्या बागेत येवो
\q आणि त्याच्या आवडीची फळे खावो.
\s5
\c 5
\p
\v 1 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो.
\q मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत.
\q मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे.
\q मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो आहे.
\q मित्रांनो, खा.
\q माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
\q
\s5
\v 2 (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे.
\q माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो,
\q माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या निर्दोषे! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे.
\q माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
\q
\s5
\v 3 (तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू?
\q मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
\q
\v 4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला
\q आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
\q
\s5
\v 5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
\q तेव्हा माझ्या हातास
\q दाराच्या कडीवरील गंधरस लागला.
\q माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
\q
\s5
\v 6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
\q पण माझा प्रियकर तोंड फिरवून व निघून गेला होता.
\q तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला.
\q मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
\q मी त्याला हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
\q
\s5
\v 7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
\q त्यांनी मला मारले, जखमी केले.
\q कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
\q
\s5
\v 8 (ती स्त्री त्या शहरातील स्त्रीयांशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हाला शपथ घालून सांगते,
\q जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला,
\q तर कृपाकरून त्याला सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
\q
\s5
\v 9 (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
\q तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय?
\q तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इत्तरापेक्षा अधिक ते काय आहे?
\q
\s5
\v 10 माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे.
\q तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
\q
\v 11 त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे.
\q त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
\q
\s5
\v 12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
\q दुधात धुतलेले कबुतरासारखे आहेत कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
\q
\s5
\v 13 त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे,
\q सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत,
\q अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
\q त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
\q
\s5
\v 14 त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
\q त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
\q
\s5
\v 15 त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
\q त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
\q
\s5
\v 16 होय, यरुशलेमच्या कन्यांनो,
\q माझा प्रियकर हाच माझा सखा आहे.
\q त्याची वाणी सर्वांत गोड आहे.
\q तो सर्वस्वी सुंदर आहे.
\s5
\c 6
\q
\v 1 (यरुशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
\q तुझा प्रियकर कोठे गेला आहे?
\q तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे,
\q तुझ्याबरोबर आम्ही त्याला शोधावयाला येऊ?
\q
\s5
\v 2 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे,
\q बागेत आपला कळप चारायला
\q आणि कमळे वेचण्यास गेला आहे.
\q
\v 3 मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे.
\q तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.
\q
\s5
\v 4 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस.
\q यरुशलेमेसारखी सुरूप आहेस.
\q ध्वजा फडकिवणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस.
\q
\s5
\v 5 तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव
\q त्यांनी मला घाबरे केले आहे.
\q जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे
\q त्यासारखे तुझे केस आहेत.
\q
\s5
\v 6 ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत,
\q ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे,
\q आणि ज्यांतली कोणी पिल्ला वेगळी झाली नाही,
\q त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
\q
\v 7 तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले
\q डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत.
\q
\s5
\v 8 (स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी,
\q आणि अगणित कुमारी असतील.
\q
\v 9 पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे,
\q ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे,
\q आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले,
\q राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली.
\q
\s5
\v 10 ती पहाटेप्रमाणे चमकते आहे,
\q ती चंद्रासारखी सुंदर आहे.
\q सूर्यासारखी तेजस्वी आहे
\q आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे?
\q
\s5
\v 11 खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला,
\q द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय,
\q डाळिंबांना फुले आले आहेत की काय,
\q ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेलो.
\q
\v 12 मी खूप आनंदीत होते
\q जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते.
\q
\s5
\v 13 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री,
\q मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू,
\q (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता?
\q जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?
\s5
\c 7
\q
\v 1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात.
\q कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा
\q तुझ्या माड्यांचा बांक आहे.
\q
\s5
\v 2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,
\q त्यामध्ये मिश्र द्राक्षारसातील उणीव कधीही नसावी.
\q तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
\q
\s5
\v 3 तुझी वक्षस्थळे तरुण हरीणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
\q
\v 4 तुझा मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे.
\q तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत.
\q तुझे नाक दिमिष्कासाकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.
\q
\s5
\v 5 तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे
\q आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत.
\q तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
\q
\v 6 अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस
\q व किती गोड आहेस.
\q
\s5
\v 7 तुझा उंची खजुरीच्या झाडासारखी
\q आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
\q
\v 8 मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेल
\q त्याच्या फांद्यांना धरील.
\q तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी
\q आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
\q
\s5
\v 9 तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे व्हावे.
\q तो माझ्या प्रियेसाठी घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो,
\q त्यासारखे तुझे तोंड असो.
\q
\s5
\v 10 (ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
\q
\v 11 माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ.
\q आपण खेेड्यात रात्र घालवू.
\q
\s5
\v 12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ.
\q द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू.
\q आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा,
\q तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
\q
\s5
\v 13 पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे
\q आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत.
\q माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.
\s5
\c 8
\q
\v 1 (तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या
\q माझ्या बंधुसारखा तू असतास तर किती बरे होते.
\q तू जर मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते
\q आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.
\q
\s5
\v 2 मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते.
\q तू मला शिकवले असते.
\q मी तुला मसाला घातलेला द्राक्षारस
\q आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.
\q
\v 3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि
\q त्याचा उजवा हात मला आलिंगीत असता.
\q
\s5
\v 4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरुशलेमच्या कन्यांनो,
\q मी तुम्हाला शपथ घालते.
\q माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत
\q राहू द्या.
\s5
\v 5 (यरुशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे?
\q (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले,
\q तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले,
\q तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.
\q
\s5
\v 6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे,
\q आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव.
\q कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे.
\q त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी,
\q किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
\q
\s5
\v 7 असले प्रेम महाजलांच्यानेहि विझवणार नाही.
\q महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही.
\q जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी
\q ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
\q
\s5
\v 8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हाला एक लहान बहीण आहे
\q आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही.
\q आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?
\q
\s5
\v 9 ती जर भिंत असती तर
\q आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता.
\q ती जर दार असती तर
\q तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.
\q
\s5
\v 10 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते.
\q म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे.
\q
\s5
\v 11 (ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता.
\q त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला,
\q त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार रुपये द्यावे लागत.
\q
\v 12 माझाहि एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे.
\q हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.
\q
\s5
\v 13 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस.
\q त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत.
\q मलाही तो ऐकू दे!
\s5
\v 14 (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर.
\q सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा,
\q तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.

4528
23-ISA.usfm Normal file

File diff suppressed because it is too large Load Diff

3464
24-JER.usfm Normal file

File diff suppressed because it is too large Load Diff

531
25-LAM.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,531 @@
\id LAM
\ide UTF-8
\h विलापगीत
\toc1 विलापगीत
\toc2 विलापगीत
\toc3 lam
\mt1 विलापगीत
\s5
\c 1
\q
\p
\v 1 जी नगरी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे.
\q जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे.
\q राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.
\q
\v 2 ती रात्री फार रडते व तिचे अश्रु तिच्या गालांवर असतात.
\q तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता.
\q तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत.
\q
\s5
\v 3 दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे.
\q ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही.
\q तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे.
\q
\s5
\v 4 सियोनचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही.
\q तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत.
\q तिच्या कुमारी दु:खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहे.
\q
\v 5 तिचे शत्रू तिचे धनी झाले आहे. तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे.
\q परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे.
\q तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.
\q
\s5
\v 6 सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे.
\q तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले,
\q आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत.
\q
\s5
\v 7 यरुशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात,
\q पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते.
\q तिच्या लोकांना वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते.
\q तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.
\q
\s5
\v 8 यरुशलेमने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे.
\q सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पहिली आहे;
\q ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे.
\q
\v 9 तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही.
\q ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही.
\q “हे परमेश्वरा, माझे दु:ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”
\q
\s5
\v 10 तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे.
\q परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभा स्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही,
\q तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.
\q
\s5
\v 11 यरुशलेममधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत.
\q त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत.
\q “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.”
\q
\v 12 “जे तुम्ही जवळून जाता, तुम्हाला काहीच वाटत नाही काय?
\q पण जरा माझ्याकडे निरखून पाहा.
\q परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले,
\q या माझ्या दु:खा सारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.
\q
\s5
\v 13 त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो.
\q त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे.
\q त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे.
\q
\v 14 माझ्या पुष्कळ अपराधाचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे.
\q ते एकत्र गुंफले आहेत, आणि माझ्या मानेवर आली आहेत. त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे.
\q ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे.
\q
\s5
\v 15 माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात, परमेश्वराने दूर फेकले आहे.
\q त्याने माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलावली आहे.
\q जसे द्राक्षकुंडात द्राक्षे तुडविली जातात तसे प्रभूने यहूदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे.
\q
\s5
\v 16 या सगळयाबद्दल मी आक्रोश करते. माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत.
\q कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे.
\q माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”
\q
\v 17 सियोनने तीचे हात पसरवले, पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही.
\q परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे. परमेश्वराने याकोबासंबधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्याला घेरले.
\q यरुशलेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिकपाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे
\q
\s5
\v 18 “परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले.
\q सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु:ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.
\q
\v 19 मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला.
\q माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून,
\q स्वत:साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले.
\q
\s5
\v 20 परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु:खी झाले आहे. माझ्या अातड्यास पीळ पडला आहे.
\q माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते.
\q बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे.
\q
\s5
\v 21 मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही.
\q माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे.
\q जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील.
\q
\v 22 त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो,
\q माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग.
\q कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.”
\s5
\c 2
\q
\v 1 परमेश्वराने सियोनकन्येला आपल्या क्रोधमय काळोख्या मेघाने कसे अच्छादीले आहे.
\q इस्राएलाचे सौंदर्य त्याने स्वर्गातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे.
\q त्याने आपल्या क्रोधासमयी न्यायासनाचे स्मरण केले नाही
\q
\v 2 परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत.
\q त्यांच्यावर कसलीही दया केली नाही.
\q त्याने आपल्या क्रोधाने यहूदाकन्येच्या दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहे.
\q त्याने तिचे राज्य व सरदारास अप्रतिष्ठीत व कलंकित ठरविले आहे
\q
\s5
\v 3 आपल्या संतप्त क्रोधाने त्याने इस्राएलाचे सर्व बळ नष्ट केले आहे.
\q त्याने आपला उजवा हात शत्रूंपासून मागे घेतला आहे.
\q सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे.
\q
\v 4 त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे.
\q त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे.
\q त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली.
\q सियोनकन्येच्या तंबूत त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे.
\q
\s5
\v 5 परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्राएलांस गिळले.
\q त्याने तिच्या बलस्थानाचा नाश केला आहे.
\q त्याने यहूदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे.
\q
\v 6 एखाद्या बागेप्रमाणे त्याने निवासमंडपावर हल्ला केला आहे.
\q त्याने पवित्र सभास्थान उध्वस्त केले.
\q सियोनेत पवित्रसण व शब्बाथाचा विसर परमेश्वराने घडवून आणला आहे कारण त्याने आपला क्रोध राजे
\q आणि याजकावर वर प्रकट करून त्यांना तुच्छ लेखिले आहे
\q
\s5
\v 7 परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे.
\q त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.
\q परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला.
\q सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
\q
\s5
\v 8 सियोनकन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरवले आहे.
\q त्याने त्यावर दोरी ताणली आहे, आणि आपला हात संहार करण्यापासून आवरला नाही.
\q म्हणून त्याने तट व कोट ह्यास शोक करायला लावला आहे.
\q ते सर्वच व्याकूळ झाले आहेत.
\q
\v 9 तिच्या वेशी जमिनित खचल्या आहेत. त्याने वेशींचे अडसर तोडून नष्ट केले.
\q तिचे राजे आणि सरदार हे मोशेचा नियमशास्त्र नसलेल्या परराष्ट्राप्रमाणे आहेत.
\q तिच्या संदेष्टयांना परमेश्वराकडून दृष्टांत ही प्राप्त होत नाहीत
\q
\s5
\v 10 सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमुटपणे आक्रंदन करीत आहे.
\q त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत.
\q यरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहे.
\q
\s5
\v 11 माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत.
\q माझ्या अातड्यांना पीळ पडत आहे.
\q माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे.
\q मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत.
\q
\v 12 ती मुले त्यांच्या मातांना म्हणतात, “धान्य आणि द्राक्षारस कोठे आहे?”
\q घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला.
\q
\s5
\v 13 यरुशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू,
\q सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?
\v 14 तुझ्या संदेष्ट्यांनी पाहिलेले दृष्टांत तुझ्यासाठी कपटी व मुर्खपणाचे होते.
\q त्यांनी तुझे अपराध तुझे भवितव्य उज्वल करण्यासाठी प्रकट केले नाही,
\q तर तूझ्यासाठी फसवे दैवी संकेत आणि पाशाचे दृष्टांत निर्माण केले.
\q
\s5
\v 15 रस्त्याच्या बाजूने जाणारे सुध्दा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात.
\q यरुशलेमच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात,
\q “हिच ती नागरी आहे का जीला ‘सौंदर्यपूर्ण’ किंवा ‘आखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी’ असे म्हणत?”
\q
\v 16 तुझे सर्व शत्रु तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात.
\q ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे.
\q खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहात होतो.
\q आम्ही तो शोधला! आणि तो पहिला आहे!”
\q
\s5
\v 17 परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे.
\q त्याने चिरडून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखविली नाही.
\q त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे.
\q
\s5
\v 18 “त्यांचे हृदय परमेश्वराचा धावा करत आहे.
\q हे सियोनकन्येच्या तटा, तुझे अश्रू नदीच्या प्रवाहाप्रमाणे रात्रंदिवस वाहत राहो.
\q त्यास अटकाव करू नको. तुझ्या डोळ्यातील बाहुलीस विसावा देऊ नको.
\q
\v 19 रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर.
\q परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता.
\q जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.
\q
\s5
\v 20 परमेश्वरा, पाहा, जीच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव.
\q स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय?
\q परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?
\q
\s5
\v 21 तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत.
\q माझे तरुण व तरुणी तलवारीने पडले आहेत.
\q तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलीही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस.
\q
\v 22 पवित्र सभेच्या दिवसातील दहशतीप्रमाणे चोहोबाजूने तू माझ्याविषयी भय निर्माण केले आहेस.
\q परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी कोणीही सुटला नाही, व वाचला नाही.
\q मी ज्यांचे लालनपालन केले व वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ट केले.”
\s5
\c 3
\q
\v 1 तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.
\q
\v 2 त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले.
\q
\v 3 खचितच तो माझ्याविरूद्ध झाला आहे; पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे.
\q
\v 4 त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत
\q
\s5
\v 5 त्याने माझ्याविरूद्ध विष व दुःखाचे बांधकाम करून यांनी मला वेढले आहे.
\q
\v 6 फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे.
\q
\v 7 त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही.
\q त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत.
\q
\v 8 मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.
\q
\s5
\v 9 त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे.
\q त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
\q
\v 10 तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.
\q
\v 11 त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.
\q
\s5
\v 12 त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे.
\q
\v 13 त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहे.
\q
\v 14 माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे.
\q
\v 15 त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडूदवणा प्यायला भाग पाडले आहे.
\q
\s5
\v 16 त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.
\q
\v 17 माझ्या जिवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही.
\q
\v 18 मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.”
\q
\s5
\v 19 माझे दुःख, कष्ट, कडूदवणा आणि विष ह्याचे स्मरण कर.
\q
\v 20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे.
\q
\v 21 पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.
\q
\s5
\v 22 ही परमेश्वराची प्रेमदया आहे जे आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
\q
\v 23 ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.
\q
\v 24 माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”
\q
\s5
\v 25 जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्याला शोधतो त्याला, परमेश्वर चांगला आहे.
\q
\v 26 परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.
\q
\v 27 पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्याला फार चांगले आहे.
\q
\v 28 ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे.
\q
\v 29 त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल.
\q
\s5
\v 30 एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;
\q
\v 31 कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही.
\q
\v 32 जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.
\q
\v 33 कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही.
\q
\s5
\v 34 पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे,
\q
\v 35 परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे,
\q
\v 36 एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?
\q
\s5
\v 37 परमेश्वरने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?
\q
\v 38 इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठाच्या मुखातून येत नाहीत काय?
\q
\v 39 कोणत्याही जीवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी?
\q
\s5
\v 40 चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.
\q
\v 41 आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावू या.
\q
\v 42 आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हाला क्षमा केली नाहीस.
\q
\v 43 तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.
\q
\s5
\v 44 कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.
\q
\v 45 लोकांमध्ये तू आम्हाला कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
\q
\v 46 आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे.
\q
\v 47 भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे.
\q
\s5
\v 48 माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
\q
\v 49 माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही;
\q
\v 50 परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही.
\q
\s5
\v 51 माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात.
\q
\v 52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.
\q
\v 53 गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे.
\q
\v 54 माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”
\q
\s5
\v 55 परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला.
\q
\v 56 तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.
\q
\v 57 मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”
\q
\s5
\v 58 परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास
\q
\v 59 परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे.
\q
\v 60 माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास.
\q
\v 61 त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.
\q
\s5
\v 62 माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे.
\q
\v 63 परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.
\q
\s5
\v 64 परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर.
\q
\v 65 तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.
\q
\v 66 क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.
\s5
\c 4
\q
\v 1 सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे!
\q पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत.
\q
\v 2 सियोनाचे मोलवान मुलगे शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते,
\q पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मानलेले आहेत.
\q
\s5
\v 3 कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात.
\q पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे.
\q
\s5
\v 4 तान्ह्या मुलांची जीभ तहानेने टाळूला चिकटली आहे.
\q बालके भाकर मागतात, पण त्यांना कोणीही भाकर देत नाही.
\q
\v 5 जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत.
\q जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे.
\q
\s5
\v 6 सदोमावर कोणी हात टाकला नाही तरी त्याचा अकस्मात नाश झाला, त्याच्या पापांपेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे.
\q सदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही माणसाचा हात नव्हता.
\q
\s5
\v 7 तिचे सरदार बर्फा सारखे चकाकत असत व दुधापेक्षा पांढरे होते.
\q ते पोवळयांसारखे कांतीने लाल होते. त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते.
\q
\v 8 पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत. त्यांना रस्त्यात कोणी ओळखतसुध्दा नाही.
\q त्यांची कातडी सुरकुतली आणि हाडाला चिकटली आहे. ती लाकडाप्रमाणे शुष्क झाली आहे.
\q
\s5
\v 9 जे उपासमारीने मरण पावले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे.
\q कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले.
\q
\v 10 दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली,
\q ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.
\q
\s5
\v 11 परमेश्वराने आपला क्रोध प्रकट केला. त्यांने आपला संतप्त राग ओतला आहे.
\q त्याने सियोनेत आग लावली आहे व त्या आगित तिचे आधारस्तंभे जाळून टाकले आहेत.
\q
\s5
\v 12 पृथ्वीवरील राजांचा व पृथ्वीवरील राहणाऱ्यांचा ह्यावर विश्वास बसला नाही की,
\q यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू किंवा वैरी वेशींत शिरतील.
\q
\v 13 असे घडले कारण, तिच्या संदेष्ट्यांनी पाप केले, तिच्या धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली,
\q त्यांनी नितीमान लोकांचे रक्त यरुशलेमामध्ये सांडले होते.
\q
\s5
\v 14 ते आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते.
\q कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत, कारण ती रक्ताने माखली होती.
\q
\v 15 दूर व्हा, “दूर व्हा! अमंगळ लोकहो.” आम्हाला स्पर्श नका करू, असे लोक त्यांना म्हणाले,
\q ते पळून जाऊन भटकत राहीले, तेव्हा राष्ट्रांमधील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये.”
\q
\s5
\v 16 परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे,
\q तो पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही, याजकांची मर्यादा त्यांनी राखली नाही.
\q त्यांनी वडिलांचा मान राखला नाही.
\q
\s5
\v 17 मदतीची निरर्थक वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत.
\q आम्ही आतूरतेने वाट पाहत असता जे राष्ट्र आमचा बचाव करू शकले नाही त्याची वाट आम्ही पाहिली आहे.
\q
\v 18 आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही.
\q आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला आहे!
\q
\s5
\v 19 आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला.
\q आम्हाला पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.
\q
\v 20 आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास.
\q त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू.
\q तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”
\q
\s5
\v 21 ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर.
\q पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील.
\q
\v 22 सियोन कन्ये, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही.
\q अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.
\s5
\c 5
\q
\v 1 हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव.
\q आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
\q
\v 2 आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे.
\q आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
\q
\v 3 आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत.
\q आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
\q
\v 4 आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात;
\q आमचेच लाकूड आम्हास विकले जाते.
\q
\s5
\v 5 आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत.
\q आम्ही दमलो आहेत. आम्हाला विश्रांती नाही.
\q
\v 6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पूढे केले.
\q
\v 7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत.
\q पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
\q
\s5
\v 8 गुलाम आमच्यावर राज्य करतात.
\q त्यांच्या हातातून आम्हाला कोणीही वाचवायला नाही.
\q
\v 9 राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.
\q
\v 10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत.
\q भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
\q
\s5
\v 11 सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;
\q
\v 12 त्यांनी आमच्या राजपुत्रांना त्यांनी फासावर दिले;
\q आमच्या वडीलधाऱ्याचा त्यांनी सन्मान केला नाही.
\q
\s5
\v 13 आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले.
\q ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
\q
\v 14 वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत.
\q तरुण गायनवादन करीत नाहीत.
\q
\s5
\v 15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे.
\q आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
\q
\v 16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे.
\q म्हणून आम्हाला हायहाय.
\q
\s5
\v 17 या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे.
\q आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
\q
\v 18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत.
\q सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
\q
\s5
\v 19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे.
\q तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
\v 20 परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते.
\q तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
\q
\v 21 परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव.
\q आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो.
\q पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.
\q
\v 22 तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.

2117
26-EZK.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,2117 @@
\id EZK
\ide UTF-8
\sts EZK - Free Bible Marathi
\rem Copyright Information: Creative Commons Attribution-Share Alike 4.0 License
\h यहेज्केल
\toc1 यहेज्केल
\toc2 यहेज्केल
\toc3 ezk
\mt1 यहेज्केल
\s5
\c 1
\s संदेष्ट्याला दिव्य दृष्टान्त
\p
\v 1 तिसाव्या वर्षीच्या चौथ्या महिन्यात, पाचव्या दिवशी, मी खबार नदिच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.
\v 2 तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते.
\v 3 खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.
\s5
\v 4 तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होते.
\v 5 मध्यभागी चार जीवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणासासारखे दिसत होते,
\v 6 पण त्यांना चार तोंडे होते, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.
\p
\s5
\v 7 त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.
\v 8 त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना माणसाचे हात होते.कारण त्या चौंघाना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः
\v 9 त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे.
\p
\s5
\v 10 त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख माणसाच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.
\v 11 त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.
\v 12 प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.
\p
\s5
\v 13 ते जीवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.
\v 14 हे जीवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करु शकत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!
\p
\s5
\v 15 मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जीवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते.
\v 16 त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्यमण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.
\p
\s5
\v 17 जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.
\v 18 त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते!
\p
\s5
\v 19 जेव्हा ते जिवीत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.
\v 20 जेथे आत्मा त्यांना नेऊ इच्छीत होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
\v 21 जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता.
\p
\s5
\v 22 त्या जीवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते.
\v 23 घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत.
\p
\s5
\v 24 तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्याच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते.
\v 25 जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.
\p
\s5
\v 26 त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर माणसाच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती.
\p
\s5
\v 27 त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहीला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभी चमकत होती.
\v 28 पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.
\s5
\c 2
\s यहेज्केलाला पाचारण
\p
\v 1 “मानवाच्या मुला” ती वाणी मला म्हणाली आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.
\v 2 जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्याला माझ्याशी बोलताना ऐकले.
\v 3 इस्राएलाच्या लोकांजवळ “मानवाच्या मुला” मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे.
\s5
\v 4 त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग.
\v 5 ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही. ते फितुर झालेले राहत आहे. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल.
\s5
\v 6 त्यांच्या भोवती काटे विंचवांनी व त्यांच्या शब्दांनी “मानवाच्या मुला” भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.
\s5
\v 7 पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत.
\v 8 परंतू मी जे तुला “मानवाच्या मुला” बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा!
\s5
\v 9 माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती.
\v 10 तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.
\s5
\c 3
\p
\v 1 “मानवाच्या मुला, तो मला म्हणाला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.”
\v 2 म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.
\v 3 “मानवाच्या मुला, तो मला म्हणाला मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.
\s5
\v 4 तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग.
\v 5 अपरीचीत वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो;
\v 6 मोठी राष्ट्रे अपरीचीत, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवेल तर ते तुझे ऐकतील!
\v 7 परंतु इस्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझे ही ऐकण्याची इच्छा दाखवत नाही. म्हणून इस्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहे.
\s5
\v 8 पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे.
\v 9 तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.”
\s5
\v 10 “मानवाच्या मुला, तेव्हा तो मला म्हणाला; जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!
\v 11 मग गुलामांकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल; ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो”
\s5
\v 12 आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे!
\v 13 ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जीवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!
\s5
\v 14 आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि आत्म्यात माझ्या कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!
\v 15 तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहात होते, आणि मी तेथे सात दिवस राहीलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो.
\s इस्त्राएल घराण्यावर पाहारेकरी
\p
\s5
\v 16 मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले,
\v 17 “मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर!
\v 18 ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो, असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल.
\v 19 परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही.
\s5
\v 20 जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्याला सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेल्या धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेल.”
\v 21 परंतू जर तू देवभीरु माणसाला पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चीत वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही.
\s संदेष्टा मुका होतो
\p
\s5
\v 22 मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!”
\v 23 मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो.
\s5
\v 24 आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वताःला आपल्या घरात बंद करून ठेव,
\v 25 आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही.
\s5
\v 26 तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेल आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे.
\v 27 पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.
\s5
\c 4
\s यरुशलेमेच्या वेढ्याचे चित्र
\p
\v 1 परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरुशलेम शहराचे चित्र रेखाट.
\v 2 तीला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
\v 3 तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यांध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील.इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
\s5
\v 4 मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वताःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
\v 5 मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
\s5
\v 6 जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिले आहेत.
\v 7 आपले तोंड यरुशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटन केले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत करशील.
\v 8 पहा, तुला दोरीने करकचून बांधतील तुला एका बाजुहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
\s5
\v 9 स्वताःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि जर्मन गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजुस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
\v 10 हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
\v 11 पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
\s5
\v 12 जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वा देखत माणसाच्या विष्टेवर भाजून खा!
\v 13 यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेल.”
\s5
\v 14 परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
\v 15 म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वताःसाठी भाकर भाज.”
\s5
\v 16 तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरुशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेल, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केला जाईल.
\v 17 कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.”
\s5
\c 5
\p
\v 1 “मग मानवाच्या मुला, स्वताःसाठी न्हाव्याच्या वस्त्र्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर
\v 2 वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तरवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल.
\s5
\v 3 थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक.
\v 4 काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्याला जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.
\s5
\v 5 परमेश्वर देव म्हणतो, ही यरुशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे.
\v 6 पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझा न्यांयीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.
\s5
\v 7 म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.
\v 8 म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेल! तुम्हाला केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.
\s5
\v 9 तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल.
\v 10 तथापी बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल.
\s5
\v 11 म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चीतच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
\v 12 घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेल, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.
\s5
\v 13 तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात त्वेषाने म्हणाला.
\v 14 तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेल, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील.
\s5
\v 15 यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो.
\v 16 तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेल, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेल;
\v 17 दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवील, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”
\s5
\c 6
\s इस्त्राएलाच्या पर्वतांविषयी भविष्य
\p
\v 1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि तो मला म्हणाला,
\v 2 मानवाच्या मुला, आपले मुख इस्राएलाच्या पर्वताच्या विरुध्द राहून त्यांच्या विरुध्द भाकीत कर
\v 3 परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत दऱ्या खोऱ्याना झऱ्यांना सांगत आहे. ऐका! मी तुमच्या विरुध्द तरवार चालवील, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील.
\s5
\v 4 तुमच्या वेद्याचे खांब, तुमच्या सुर्यमुर्ती मी पाडून टाकीन, तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मुर्त्यांपुढे पडतील असे परमेश्वर करीन.
\v 5 इस्राएल लोकांचे प्रेत त्यांच्या मुर्त्यांपुढे मी टाकून देईल आणि त्यांच्या वेद्यांपुढे हाडांची पांगापांग करेल.
\s5
\v 6 जेथे तुम्ही रहातात, त्या शहराचे उच्च स्थानांचा विध्वंस करेल. म्हणून तुमच्या वेद्या, मुर्त्या, उध्वस्त केल्या जाईल. त्यामुळे ते मोडकळीस येतील आणि त्यांची सर्व कामे पुसून टाकली जातील.
\v 7 त्यांच्या मध्ये ते म्रतप्राय होतील आणि मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 8 तरी उरलेल्यांचा मी बचाव करेल, देशातून काहींचा बचाव तरवारीपासून होईल, जेव्हा देशातून तुमची पांगापांग होईल.
\v 9 ज्यांचा बचाव झाला ते माझ्या बद्दल विचार करतील जेथे ते गुलामगिरीत होते. त्यांचे मन रसमिसळ झालेला, माझ्या पासून दुर आहेत, मग ते तिव्री तिटकारा त्यांच्या चेहऱ्यावर व डोळे मूर्तीकडे लागलेले, दुष्टपणा, घृणा त्यांची निंदा झाली होती.
\v 10 तेव्हा त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे, त्यांच्यावर संकट आणले त्यासाठी विशेष त्यांचे कारण आहे.
\s5
\v 11 परमेश्वर देव हे म्हणतो; “टाळ्या वाजवा आपले पाय आपटा, अहा! कारण इस्राएलाच्या घराण्यात सर्व प्रकारचे वाईट घृणा आहे. त्यांच्यावर तलवार, दुष्काळ, साथीचा रोग येईल.
\v 12 जे लांब असतील ते साथीच्या रोगाने मरतील जे जवळ असतील ते तलवारीने मरतील जे उरलेले लोक दुष्काळाने मरतील; मी त्यांच्या विरुध्द असलेला त्वेष पूर्ण करेल.
\s5
\v 13 मग तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा त्यांचे मस्तक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते!
\v 14 मी आपले सामर्थ्य त्यांना दाखवील, आणि त्यांच्या भुमीचा पूर्ण विध्वंस करेल, त्यांचे राहण्याचे ठिकाणे दिबलायाकडे व ज्या जागी ते राहात होते जवळपास सर्व ठिकाणे वाया घालवील, मग त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”
\s5
\c 7
\s अंत आला आहे
\p
\v 1 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला व तो म्हणाला.
\v 2 “मानवाच्या मुला, परमेश्वर देव इस्राएलाच्या भुमीला म्हणतो, या देशाच्या चारही बाजुचा शेवट झाला आहे.
\s5
\v 3 आता तुझा शेवट जवळ आला आहे, यास्तव मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेल, त्यांच्या अपवित्र कामा वरुन मी त्यांचा न्याय करेल. त्यानंतर त्यांच्यावर घृणा आणेल.
\v 4 माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घृणा मला येते, मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 5 परमेश्वर देव हे सांगतो, अनर्थ! अनर्था मागे अनर्थ! पहा तो येत आहे.
\v 6 शेवट हा निश्चीत जवळ आला आहे, शेवट तुमच्यासाठी जागा झाला आहे, पहा तो येत आहे.
\v 7 रहीवाशी असलेल्या लोकांच्या भुमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे, आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकू येणार नाही.
\s5
\v 8 आता जास्त काळ मी तुम्हाविरुध्द आपल्या त्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेल, जेव्हा मी तुमच्या कृत्याप्रमाणे न्यायाचा निकाल करेल आणि तेव्हा तुमचाच सर्व प्रकारचा घृणितपणा तुमच्यावर येईल.
\v 9 मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.
\s5
\v 10 पहा! असे दिवस येत आहेत, जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल.
\v 11 क्रुरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल त्यांच्या सर्वावर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा रहाणार नाही.
\s5
\v 12 वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे.
\v 13 विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयी आहे, त्यातले काही ही चूकणार नाही, कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जिवीतास बळकटी आणणार नाही.
\s5
\v 14 ते तुताऱ्याचा नाद करतील आणि तयारी करतील तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही. तथापी माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे.
\v 15 इमारतीच्या आत तलवार आणि दुष्काळ, साथीचा रोग बाहेर आहे. जे शेतात आहेत ते तलवारीने मरतील, जो नगरात असेल त्याला दुष्काळ आणि साथीचा रोग त्यांचा नायनाट करेल.
\v 16 त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबूतराप्रमाणे जातील, त्याच्या पातकामुळे ते कण्हत राहतील.
\s5
\v 17 प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होईल.
\v 18 आणि ते अंगावर पोते गुंडळतील, त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेल; त्यांच्या चेहऱ्यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल.
\v 19 ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकून देतील त्याचा त्याग करतील, त्यांचे सोनेचांदीही त्यांना परमेश्वराच्या क्रोधाच्या वाचवू शकणार नाही, त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.
\s5
\v 20 ते त्यांच्या दागीण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरकार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केल्या आहे.
\v 21 आणि मी तिऱ्हाईतास हे सर्व लुट म्हणून वाटून देईन आणि पृथ्वी वरील वाईट लोकांना लुटून घेऊन देईन. ते ते भ्रष्ट करतील.
\v 22 मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासून फिरवेल कारण यांनी माझे स्थान भ्रष्ट केले. लुटारू येऊन आत लुटालुट करतील.
\s5
\v 23 साखळी तयार करा, कारण भुमी रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरुन गेली आहे, शहर हिंसक बनले आहे.
\v 24 देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईल आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील, आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेल कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत.
\v 25 भयभीत होतील, शांततेच्या शोधात ते भटकतील पण त्यांना ती सापडणार नाही.
\s5
\v 26 अनर्थावर अनर्थ येईल अफवावर अफवा पसरतील, मग ते संदेष्ट्याला संदेश पहाण्यासाठी सांगतील, दृष्टांत विद्या, सल्ला, वडीलांची बुध्दी संपून जाईल.
\v 27 राजा शोक करील, व राजकुमार निराशा परीधान करतील, तेव्हा भुमीच्या लोकांचे हात भितीने थरथरतील त्यांच्या कृत्याप्रमाणे हे त्यांच्याशी मी करेल, आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या न्याय करेल जोपर्यंत त्यांना समजणार नाही मी परमेश्वर देव आहे.”
\s5
\c 8
\s संदेष्ट्याला यरुशलेमेतील अमंगळ कृत्यांचा दृष्टान्त
\p
\v 1 मग सहाव्या महिन्याच्या सहाव्या वर्षी, महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला.
\v 2 मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातुसारखे मला दिसले.
\s5
\v 3 मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसाला धरुन आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरुशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.
\v 4 आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते.
\s5
\v 5 मग तो मला म्हणाला मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते, प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती.
\v 6 तेव्हा तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, ते काय करत आहे. हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पहा ते मोठे घृणास्पद आहे.
\s5
\v 7 मग त्याने मला मैदानाच्या प्रवेश व्दारात नेले, मग मी पाहिले तेथे भिंतीला मोठे छिद्र पडलेले मला दिसले.
\v 8 तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर. म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पाहा, तेथे दरवाजा होता.
\v 9 तेव्हा तो मला म्हणाला, “जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होतांना आपल्या डोळ्यांनी पाहा.”
\s5
\v 10 मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरुशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.
\v 11 तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या बिन शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक माणसाजवळ धुप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता.
\s5
\v 12 मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हाला बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे.
\v 13 आणि तो मला म्हणाला, ‘पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे.”
\s5
\v 14 पुन्हा त्याने मला परमेश्वर देवाच्या मंदिराच्या दरवाज्याच्या उत्तर भागात नेले, आणि पहा! स्त्रिया बसून तम्मुजासाठी दुःख करीत होत्या.
\v 15 तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे बघीतलेस का? पुन्हा वळून पहा! यापेक्षा अधिक घृणा येणारे काम तू डोळ्यांनी पहाशील.”
\s5
\v 16 परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील प्रांगणात त्याने मला आणले, आणि पहा! परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेश व्दारात ढेलज आणि वेदीवर पंचवीस माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सुर्याची उपासना करीत होते.
\s5
\v 17 तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भुमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.
\v 18 म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेल त्यांच्यावर मी मेहरनजर करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी कंठरव करतील, मी त्यांचे ऐकणार नाही.”
\s5
\c 9
\s गुन्हेगारांची कत्तल
\p
\v 1 तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणाले, “शहर रक्षकाला येऊ द्या, प्रत्येकाच्या हाती हल्ला व हानी करणारे हत्यार असेल.”
\v 2 मग पहा! उत्तरे दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्रे परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते. मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.
\s5
\v 3 मग इस्राएली देवाचे गौरवी तेज करुबा वरुन निघून घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजूला शास्रांचे उपकरण होते त्यांना बोलावले.
\v 4 परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरुशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेला सगळ्या अपवित्र गोष्टीसाठी उसासे टाका.”
\s5
\v 5 ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.
\v 6 म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.
\s5
\v 7 तो त्यांना म्हणाला, “आक्रमण कर, मंदिर भ्रष्ट करा, घरे उध्वस्त करा, आणि वेशी मृतांना व्यापून टाका” मग ते नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.
\v 8 ते हल्ला करीत असतांना, मला स्वताःला एकटे वाटले. आणि मी उपडा पडून रडलो, हे प्रभू परमेश्वर देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरुशलेमातील इस्राएलाचा विध्वंस करशील काय?
\s5
\v 9 तो मला म्हणाला, “इस्राएल आणि यहूदाचे अपराध फार वाढत आहे, शहर व भुमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात, परमेश्वर देव आम्हाला विसरला तो आम्हाला बघत नाही.
\v 10 म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”
\v 11 पहा! तागाचे वस्त्र घातलेला शास्त्र्याचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्याने बातमी दिली, “तू मला सांगीतलेले सर्व काही पार पाडले आहे.”
\s5
\c 10
\s देवाचे तेज मंदिरातून निघून जाते
\p
\v 1 मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले.
\v 2 मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करूबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला.
\s5
\v 3 करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला जेव्हा तो पुरुष आत गेली, तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या.
\v 4 परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागले. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.
\v 5 मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता.
\p
\s5
\v 6 मग असे झाले की, तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, “करुबांच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहीला.
\v 7 एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला.
\v 8 मी करुबाला पाहिले तो पहा, माणसाच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते.
\p
\s5
\v 9 मग मी पाहिले तेव्हा पहा! करुबाच्या बाजूला चार चाके होती - एकेक चाक एकेका करुबीमाच्या शेजारी होते, आणि ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.
\v 10 ती चारही चाके एकसारखीच दिसत होते, एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती.
\v 11 जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंड ज्या दिशेला होती त्याच दिशेने ते सरळ चालत होते.
\p
\s5
\v 12 त्यांची सर्व शरीरे - त्यांचे हात, पाठ, आणि त्यांचे पंखदेखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती.
\v 13 जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले.
\v 14 त्यांना प्रत्येकाला चार तोंड होती; पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चोथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते.
\p
\s5
\v 15 मग करुब प्राणी - हे मी खबार नदी शेजारी पाहिले - ते जीव उभे राहीले.
\v 16 जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजूला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच उडत होती चाके पंखांसोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती.
\v 17 जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहात होती आणि जेव्हा ते उभे राहात चाके उभे राहात होती, त्या जीवत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता.
\p
\s5
\v 18 मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले,
\v 19 तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले.
\p
\s5
\v 20 मी खबार नदीच्या तीरी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जीवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळाले
\v 21 त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखांच्या खाली माणसाच्या हातासारखे हात होते
\v 22 खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.
\s5
\c 11
\s दुष्ट लोकनायकांची कानउघाडणी
\p
\v 1 नंतर परमेश् वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली मी पाहिली. त्यांच्यामधे अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते.
\p
\s5
\v 2 परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात.
\v 3 ते म्हणतात, ‘घरे बांधण्याचा समय अजून जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे, आणि आपण मांस आहोत.
\v 4 म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भविष्यवाणी कर.”
\p
\s5
\v 5 त्यानंतर परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला परमेश्वर देव असे सांगतो असे म्हण, तू असे इस्राएलाच्या घराण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो.
\v 6 शहरात, रस्त्यावर मारलेल्या लोकांना, दुप्पट करा आणि रस्त्ये त्यांनी भरुन टाका.
\v 7 म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांना तुम्ही मारले त्यांची प्रेते यरुशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहे, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातून घेऊन यायचे आहे.
\s5
\v 8 तुम्ही तलवारीला घाबरला, तर मी तलवार तुम्हावर आणिन, हे परमेश्वर देवाचा जाहीर नामा आहे
\v 9 मी तुम्हाला शहराच्या मध्य भागातून घेऊन येईल आणि परदेशांच्या मस्तकावर तुम्हाला ठेवील, कारण त्यांच्या विरुध्द न्याय करेल.
\v 10 त्यांचा पाडाव मी तलवारीने करेल. इस्राएलाच्या वेशीत त्याचा न्याय करेल मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 11 हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही. त्यांच्यामध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्राएलाच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे.
\v 12 मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.
\s5
\v 13 मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्या बिन बनायाचा मुलगा मेला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, “आहा! हे प्रभू परमेश्वर देवा तू उरलेल्या इस्राएलाच्या लोकांना पूर्ण शेवट केलास काय?”
\s पुनरुजीवन व नवीकरण करण्याचे अभिवचन
\p
\s5
\v 14 परमेश्वर देवाचा शब्द मला कळला, व मला म्हणाला,
\v 15 “मानवाच्या मुला, जे यरुशलेमनिवासी, तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, इस्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज. जे सांगतात इस्राएल देश आम्हाला मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत, ही भूमी आम्हाला वतन म्हणून दिलेली आहे.
\s5
\v 16 म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, मी त्यांना देशातून फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भुमीत करीन, तरी मी काहीकाळ त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे.
\v 17 म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हाला एकत्र करीन आणि मी तुम्हाला इस्राएल देश तुम्हाला देईल.
\v 18 मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या व ओंगळ व घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल.
\s5
\v 19 आणि मी तुम्हाला एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतील, त्यांच्यातील दगडाचे मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन.
\v 20 मग मी ठरवेल तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. मग ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईल.
\v 21 पण जे कोणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घृणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणुक त्याच्या माथी आणिल. मी परमेश्वर देव आहे असे जाहिर करतो.”
\s5
\v 22 तेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलून घेतले आणि चाके त्यांच्या बाजूला होती आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव हे सर्वोच्च होते.
\v 23 शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले.
\s5
\v 24 आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.
\v 25 मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे परमेश्वर देवाने मला सांगितले होते.
\s5
\c 12
\s यहेज्केल बंदिवासाचे चित्र दर्शवतो
\p
\v 1 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
\v 2 “मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाही, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत.
\s5
\v 3 तथापी मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्या देखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करील. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.
\s5
\v 4 आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तु दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्या देखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.
\v 5 त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ.
\v 6 त्यांच्या डोळ्यादेखत आपले सामान वस्तु आपल्या खांद्यावर घे, आणि त्यांना अंधारात घेऊन जा, आणि तोंड झाकून घे म्हणजे तुला जमीन दिसणार नाही, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी हे चिन्ह ठेवले आहे.”
\s5
\v 7 म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व सामान बाहेर हद्दपार आणले, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझे सर्व सामान अंधारात बाहेर काढले आणि त्यांच्या डोळ्यादेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो.
\s5
\v 8 मग परमेश्वर देवाचे शब्द मला प्रभात समयी आले आहे,
\v 9 “मानवाच्या मुला, हे इस्राएलाच्या घराण्या तू काय करतोस, बंडखोर पणा तू केला नाहीस काय?”
\v 10 त्यांना म्हणाला, परमेश्वर प्रभू देव हे सांगतोय ही भविष्यात्मक कृती यरुशलेमच्या राजपुत्रांना, आणि सर्व येथे जमलेल्या इस्राएलाच्या घराण्यासाठी आहे.
\s5
\v 11 असे सांगा मी तुम्हासाठी खुण देतो की, जे मी केले ते सर्वांसाठी होईल; ते सर्वजण सरहद्दपार गुलामगिरीत जातील.
\v 12 त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघून जाईल. तो वेशीला भगदड पाडून आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही.
\v 13 मी आपली जाळी त्यांच्यावर टाकील आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईल; मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईल, पण ती भूमी ते बघणार नाही त्यामध्ये त्यांचा अंत होईल.
\s5
\v 14 मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्याना आणि त्यांच्या सेनेची पांगापांग करेल, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेल.
\v 15 मग त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा मी त्यांना देशातून संपूर्ण भुमीतून पांगवेल.
\v 16 पण त्यांच्यातील काही लोकांना तलवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेल, ज्या भुमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांना त्यांच्या घृणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 17 परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 18 मानवाच्या मुला आपली भाकर थरथरत खाऊन टाक, आणि आपले पाणी थरकापत आणि चिंतातुर होऊन पिवून घे.
\s5
\v 19 मग त्या भूमीतील लोकांना सांग, प्रभू परमेश्वर हे यरुशलेम रहीवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.
\v 20 म्हणून त्यांच्या राहत्या नगराला उध्वस्त केले जाईल, आणि भूमी ओसाड नापीक होईल; मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 21 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 22 मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसीध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील.
\v 23 यास्तव त्यांना सांग परमेश्वर प्रभू देव असे म्हणतो, मी या म्हणीला संपुष्टात आणिल यासाठी की इस्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहे सर्व बोलके होतील”
\s5
\v 24 आता येथून पुढे कोणतेही पाखंडी दृष्टांत नसणार किंवा अनूकुल भविष्य कथन इस्राएलात होणार नाही.
\v 25 मी परमेश्वर देव आहे आणि मी बोलत आहे. मी बोललेले शब्द पूर्ण करेल. आता येथे उशिर होणार नाही. हे परमेश्वर देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो.
\s5
\v 26 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 27 मानवाच्या मुला पहा! इस्राएलाचे घराणे म्हणेल जो दृष्टांत अनेक दिवसा पासून पाहिला आणि पुढच्या काळासाठी भाकीत पूर्ण येत आहे.
\v 28 यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
\s5
\c 13
\s खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
\p
\v 1 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि तो म्हणाला,
\v 2 मानवाच्या मुला इस्राएलाच्या भाकीत करणाऱ्या विरूद्ध भाकीत आणि जे आपल्या बुध्दीने भाकीत करतात त्यांना सांग, परमेश्वर देवाचा शब्द ऐका.
\v 3 प्रभू देव परमेश्वर असे म्हणतो; मूर्ख संदेष्ट्यांबद्दल दिलगीरी आहे जे आपल्या स्वताःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.
\v 4 हे इस्राएला तुझे भाकीत उजाड नापीक भूमीत कोल्ह्या सारखे आहेत.
\s5
\v 5 तुम्ही इस्राएलाच्या घराण्यात वेशी पाडण्यास गेला नाहीत तर वेशी बांधून काढल्या नाही, परमेश्वर देवाच्या दिवशी युध्दात तुम्ही प्रतिकार केला नाही.
\v 6 लोकांना खोटा दृष्टांत आणि आणि खोटे भाकीत कळले आहे, जे कोणी म्हणते परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांना आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.
\v 7 तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला नाही का? आणि खोटे भाकीत केले नाही का? “तुम्ही म्हणता की अमुक तमुक परमेश्वर देव जाहीर करीत आहे” जेव्हा मी तसले काही बोललो नाही.
\s5
\v 8 यास्तव परमेश्वर देव असे सांगत आहेः कारण तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला आणि खोटी वार्ता केली यास्तव ही परमेश्वर देवाचा हा खोटा जाहीरनामा तुझ्या विरुध्द आहेः
\v 9 माझा हात जे खोटे भाकीत करणाऱ्यां विरुध्द आहे, आणि खोटे दर्शन बघणाऱ्यां विरुध्द आहे, ते लोक माझ्या लोकांच्या सभेत येणार नाहीत, त्यांच्या नावाची नोंदणी इस्राएलाच्या घराण्यात होणार नाही, ते इस्राएलाच्या भूमीत निश्चीत जाणार नाहीत. मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 10 यास्तव माझ्या लोकांना भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहे.
\v 11 आणि म्हणतात की जो कोणी पांढरा रंग देईल त्यांना म्हणा वेशी पडतील; त्यांच्यावर मुसळ धार पाऊस पडून गारा पडून ते कोसळून जाईल व वादळाने उध्वस्त होईल.
\v 12 पहा वेशी पडतील, इतर तुम्हाला हे सांगणार नाही, “तुम्ही लावलेला पांढरा रंग कोठे आहे?”
\s5
\v 13 यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे. माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईल, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल; गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल.
\v 14 तुम्ही पांढऱ्या रंगाने आच्छादलेली वेशी मी पाडून टाकेल त्यांना समुळ उध्वस्त त्यांच्या मध्य भागी मी करेल, मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 15 मी आपल्या रागाची परीसीमा पांढऱ्या रंगाच्या वेशीवर करेल, मी तुम्हास सांगेल वेशी तेथे उभ्या नसणार व लोक त्यांना पांढरा रंगही लावणार नाही.
\v 16 इस्राएलाचे भाकित करणारे ज्यांनी यरुशलेमची भविष्यवाणी केली ज्यांनी तिच्या शांतीचा दृष्टांत पाहिला, पण तेथे शांती नाही. हे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.
\s5
\v 17 म्हणून मानवाच्या मुला आपले तोड लोकांच्या मुलींपासून फिरव जे आपल्या मनाचे भाकीत करतात, त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
\v 18 सांग, परमेश्वर देव हे म्हणतो; लोकांच्या जीवाची पारध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाश मांडून ठेवले आहे, निरनिराळ्या माणसांच्या उंचीच्या जाळ्या बनवतील तेव्हा तुम्ही हळहळ व्यक्त करून माझ्या लोकांच्या जीवाची शिकार करता, पण स्वताःला वाचवता.
\s5
\v 19 खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा उपमर्द केला आहे.
\s5
\v 20 यास्तव परमेश्वर देव म्हणतो, पहा ज्या पक्षाच्या पारधासाठी पाश मांडला आहे त्याला तोडून मी मार्ग करीन,
\v 21 ज्या आत्म्यांची तुम्ही पक्षासारखे पारध केली त्यांना स्वतंत्र केले. तेव्हा तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 22 किंबहून ज्या देवभीरुला मी खेदीत केले नाही. त्याचे हृदय असत्य बोलून दुःख देता व वाईट मार्गापासून परावृत होऊ नये, आणि आपल्या जीवाचा बचाव करु नये असे त्यांच्या बाहूंना ताकद देता.
\v 23 यानंतर विनाकारण दर्शन बघणे व ज्योतिषी हे संपुष्टात येईल; मी आपले लोक तुमच्या हातून सोडवेल, तेव्हा तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\c 14
\s संदेष्ट्याचा सल्ला घेण्याऱ्या मूर्तिपूजकांचा न्याय
\p
\v 1 इस्राएलाच्या वडीलापैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले
\v 2 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला म्हणाला की,
\v 3 मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी पापाला अडखळण आपल्या दृष्टी समोर ठेवले आहेत, अशा पापीष्ट लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारु देईल?
\s5
\v 4 याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्याला माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.
\v 5 मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिल, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\v 6 तथापी इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा.
\s5
\v 7 इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन.
\v 8 माझे मुख त्याच्या पासून लपवील त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 9 जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईन, समजावे की मीच परमेश्वर देव त्याला भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातून त्यांना हुसकून देईन
\v 10 ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील.
\v 11 यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वताःला अशुद्ध करणार नाही, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल, असे परमेश्वर देव म्हणतो.
\s देवाने यरुशलेमेस केलेली शिक्षा न्याय्य
\p
\s5
\v 12 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आले आणि म्हणाला,
\v 13 मनुष्याच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिल त्यांच्यातून मानव व पशु ह्यांना हुसकून देईन.
\v 14 जरी देशात नोहा दानीएल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे परमेश्वर प्रभू म्हणतो.
\s5
\v 15 जर मी देशात क्रुर हिंस्र पशु पाठवीले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल.
\v 16 जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वताःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\v 17 जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशु नष्ट करीन.
\v 18 जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल.
\s5
\v 19 जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशु हे नष्ट करीन.
\v 20 जरी मी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असेल प्रभू परमेश्वर देव म्हणतो, ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वताःचा बचाव करतील.
\s5
\v 21 कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चीत शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरुशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\v 22 त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले रहातील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पाहाल; तेव्हा यरुशलेमेवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन.
\v 23 तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हाला दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हाला कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\c 15
\s यरुशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता
\p
\v 1 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
\v 2 मानवाच्या मुला वनवृक्षाची इतर झाडे त्याच्या फांद्या ह्यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय महतता आहे?
\v 3 तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय?
\v 4 बघा जर ती आगेत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही. तर अग्नीने जाळून भस्म झाल्यावर उपयोगी वस्तु बनवीण्यास कोणत्यास उपयोगात राहात नाही.
\s5
\v 5 पहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही. जळाल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही.
\v 6 प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो की, वनवृक्षातील न आवडती द्राक्षाचे झाड मी आगीने जाळून टाकीन त्याच प्रमाणे यरुशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेल.
\s5
\v 7 मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेल, जरी ते आगेतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे.
\v 8 मी देश ओसाड नापीक करेल कारण त्यांची पापकर्मे करीत असे प्रभू परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\c 16
\s बेइमान यरुशलेम
\p
\v 1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
\v 2 मानवाच्या मुला, त्यांच्या किळस वाण्या कृत्याबद्दल यरुशलेमेस बजावून सांग.
\v 3 असे जाहीर कर परमेश्वर देव यरुशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.
\s5
\v 4 तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.
\v 5 कुणाच्या डोळ्यात तुझ्या बद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले.
\s5
\v 6 पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो.
\v 7 मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झाला. आणि मोठा झाला, व तू आभुषणांचा दागीना झाला, तुझी छाती चोडी आणि केस दाट झाले, तू उघडा नागडा होता.
\s5
\v 8 मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहे.
\s5
\v 9 मी पाण्याने तुला धुतले, आणि तेलाने तुला मळले.
\v 10 तुला नक्षीकाम केलेले कापड घातले तुझ्या पायात कातड्याचे जोडे घातले तुझ्या डोक्याला चांगले रेशमाचे मुलायम कापड लावले.
\v 11 त्यानंतर मी तुला दागीन्यांनी सजवले तुझ्या हातात कडे घातले आणि साखळी गळ्यात घातली.
\v 12 मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला.
\s5
\v 13 तुला सोन्यारुप्याने सजवीले तुला रेशमाच्या कापडाचा पेहराव व नक्षीकाम केलेला कापड घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत तू अति सुंदर होतास कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होता असे परमेश्वर देव म्हणतो.
\v 14 तुझ्या देखणे पणाची चर्चा सर्व राष्ट्रात पसरली ती तुला परिपूर्ण मोहून टाकणारी आहे. जी मी तुला दिली असे परमेश्वर देव म्हणतो.
\s5
\v 15 पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले.
\v 16 मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली कधी झाली नाही, व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस.
\s5
\v 17 मी दिलेल्या शोभेच्या सोन्याचांदीच्या दागीन्यांची तू पुरुष प्रतिमा बनवीली आणि त्यांच्या बरोबर तू वेश्या कर्म केले.
\v 18 तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला.
\v 19 भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो.
\s5
\v 20 मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.
\v 21 तू मूर्तीच्यापुढे माझ्या लेकरांना अग्नीने जाळून खाक केले व त्यांचे अग्नीअर्पण केला.
\v 22 तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.
\s5
\v 23 तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर,
\v 24 तू आपल्यासाठी संस्कार गृह बांधले, व सार्वजनिक असे पवित्र ठिकाण उभे केले
\s5
\v 25 तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सोंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.
\v 26 तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय.
\s5
\v 27 बघ मी माझा हात तुझ्यावर उचलीन व तुझी उपासमार करीन तुझ्या शत्रुंचा हात तुझ्यावर पडेल व पलिष्ट्यांच्या कन्या तुझ्या वासनाधुंदपणाची तुझी लाज काढतील.
\v 28 तू अश्शुरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाही. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस.
\v 29 तू व्यापाऱ्यांच्या म्हणजे खास्द्यांच्या देशात बरेच वेश्या काम केले किंबहूना यानेही तुझे समाधान झाले नाही.
\s5
\v 30 तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वताःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले.
\v 31 रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केले, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेशेची रिवाज मोडला.
\s5
\v 32 तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले.
\v 33 लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस.
\v 34 म्हणून तुझ्यात व इतर स्त्रियात फरक आहे, कुणी तुझ्या बरोबर झोपण्यास तयार होत नाही जोपर्यंत तू त्याला मोबदला देत नाही, तो तुला काही धन देत नाही.
\s5
\v 35 परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक.
\v 36 असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;
\v 37 यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील.
\s5
\v 38 तुझ्या जारकर्माचे व तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन व माझ्या रागाने व त्वेषाने तुझे रक्त सांडेल.
\v 39 तुला मी त्यांच्या हाती सोपवेल व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील.
\s5
\v 40 मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील.
\v 41 ते तुझ्या घराला जाळून टाकतील अनेक स्त्रियांच्या डोळ्यादेखत तुझ्यावर शासन केले जाईल, मी तुझे वेश्या कर्म बंद करेल, आणि आता तू कुणालाही मोबदला देणार नाहीस.
\v 42 मग माझा राग तुझ्या वरचा थंड होईल; मग माझा राग निघून जाईल, मी शांत होऊन पुन्हा कोपणार नाही.
\s5
\v 43 कारण तू आपल्या जवानपणात माझी आठवण केली नाहीस आणि मला क्रोधावीष्ट केलेस बघ तुझ्या वाईट कृत्याचे परीणाम मी तुझ्या शिरी घेऊन येईन “असे परमेश्वर देव जाहीर करतो” म्हणून आता यापुढे तू वाईट वेश्या काम तू यापुढे करणार नाहीस.
\s5
\v 44 बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे
\v 45 तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीच्या बहीणीने पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.
\s5
\v 46 तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे.
\s5
\v 47 आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत.
\v 48 परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहीणी प्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस.
\s5
\v 49 पाहा! सदोम या तुझ्या बहीणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दत, निष्काळजी, करुणाहिन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.
\v 50 ती उध्दट आणि किळसवाणी कार्य तिने माझ्या पुढे केले आहे, तुझ्या देखत मी तुला हुसकावून दिले आहे.
\s5
\v 51 शोमरोनाने तुझ्या सारखे निम्मे पाप केले नाही, त्यांनी केलेल्या पापापेक्षा तू अनेक किळस वाणे पापे केलीस, तू दाखवलेस की तुझी बहीण तुझ्याहून सरळ आहे कारण सर्व ओंगाळ कर्म तू केलेले आहेस.
\v 52 विशेषत; तू आपली स्वतःची लाज तू दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शीवीले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने तुझी बहीण उत्तम आहे.
\s5
\v 53 यास्तव मी तुझे भविष्य सामान्य स्थीतित आणेल सदोमाचे भविष्य आणि तुझ्या बहीणीचे आणि शोमरोनाचे व तिच्या बहीणीचे भविष्य पण भविष्य त्यांच्यापैकी असेल.
\v 54 या सर्वांचा लेखा जोख्या तुला आपली लज्जा उघडी केली जाईल; आणि या मार्गाने तुझे सांत्वन केले जाईल.
\v 55 म्हणून सदोम व तुझ्या बहीणीची पूर्वीच्या स्थीतीहून सामान्य स्थिती आणेल. मग शोमरोन व तिच्या मुलीची स्थिती मी सामान्य करेल.
\s5
\v 56 जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण करणे नव्हते.
\v 57 तुझा दुष्टपण जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कार्णीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले व सर्व लोक तिरस्कार करतील.
\v 58 तू तुझी लज्जा दाखवली आणि तुझे तिरस्करणीय कृती केली असे परमेश्वर देव जाहीर करतोय.
\s5
\v 59 प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला.
\s5
\v 60 तुझ्या जवानपणात केलेला मी करारा सर्वदा त्याचे स्मरण मी करेल आणि मी सर्व काही कराराच्या व्दारे स्थापीत करेल.
\v 61 मग तुला तुझ्या मार्गाची आठवण होईल आणि आपल्या थोरल्या बहिणीची व धाकट्या बहिणीबद्दल लज्जीत होशील, तू तुझी मुलगी त्यांना देईल पण तुझ्या करारामुळे नव्हे.
\s5
\v 62 तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\v 63 या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करतोय.”
\s5
\c 17
\s गरुडांचा ल द्राक्षवेलीचा दुष्टान्त
\p
\v 1 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
\v 2 मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग.
\v 3 सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने देवराराची फांदी मोडून टाकली.
\v 4 त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्याला कनानात घेऊन गेला त्याला व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.
\s5
\v 5 त्याने त्यातले काही बिज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले.
\v 6 मग त्याची वाढ होऊन द्राक्षाचे झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते.
\s5
\v 7 पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्याला रोपन केल्या पासून त्याला विपुल पाणी घातले होते.
\v 8 त्याला सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपन केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली.
\s5
\v 9 हे घडेल का? लोकांना असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहुबल कोणताही जनसमुदाय त्याला उपटून टाकणार नाही.
\v 10 मग पाहा! त्याला रोपन केल्यावर त्याची वाढ होईल, ते सुकून जाणार नाही? जेव्हा पूर्वेकडील वारा त्याला स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल.
\s5
\v 11 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
\v 12 बडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरुशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल.
\s5
\v 13 मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल.
\v 14 मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भूमीवर वावरता येईल.
\s5
\v 15 पण मिसऱ्यांनी त्याला घोडे बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का?
\v 16 माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चीत राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्याला राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्याला तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल.
\s5
\v 17 फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांना जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलाच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील.
\v 18 करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही.
\s5
\v 19 यास्तव परमेश्वर देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो, त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी मी शासन आणिन;
\v 20 मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेल, मग त्याला बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला.
\v 21 आणि त्याच्या बाहुबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे, मी जे बोलले ते घडेल.
\s5
\v 22 परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वताःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वताःला उच्चस्थानी स्थापील.
\v 23 मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली रहातील, ते त्यांच्या फांद्यां मध्ये घरटे करतील.
\s5
\v 24 मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेल; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहिर केले आहे ते घडेल.
\s5
\c 18
\s पाप करणारा जीवात्मा मरेल
\p
\v 1 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आहे आणि म्हणाला.
\v 2 याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू जे म्हणी वापरतो आणि म्हणतो.
\s5
\v 3 मी शपथ घेतो “हे परमेश्वर देव जाहिर करतोय” निश्चीतच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
\v 4 पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहे, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
\s5
\v 5 जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
\v 6 जर त्याला पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि तो आपल्या डोळ्या वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात तू स्त्रीकडे गेला नाहीस.
\s5
\v 7 जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्नांना कपडे घातले.
\v 8 त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासुपण निर्माण केला.
\v 9 जर तो माझ्या दर्ज्याने चालेले आणि माझे फर्मान विशासूपणे वागण्यास पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहिर करतोय.
\s5
\v 10 पण तो जर रक्तपात रागीट मुलगा आहे हे सर्व काम त्याने केले
\v 11 त्याच्या बापाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
\s5
\v 12 त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले वापस केले नाही जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
\v 13 जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झाडा त्याच्याच माथी येईल.
\s5
\v 14 पण पाहा! त्याला पुत्र झाला व त्याने बापाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही
\v 15 जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रिला भ्रष्ट केले नाही.
\s5
\v 16 जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तु ठेवून घेतल्या पण त्याबदल्यात त्याने भुकेल्याला अन्न दिले आणि नागड्याला वस्त्र दिले.
\v 17 गरीबाला नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतला नाही व आन्यायाने नफा घेतला नाही त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्ज्यानुसार चालला तर तो आपल्या बापाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चीत जगेल.
\s5
\v 18 त्याच्या पित्याविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
\s5
\v 19 पण तू म्हणतोस “बापाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझ्या सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केले, तो निश्चित जगेल.
\v 20 जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा बापाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
\s देवाचा मार्ग न्याय्य आहे
\p
\s5
\v 21 पण पापी आपला केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
\v 22 सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतिच्या सरावाने जगेल.
\s5
\v 23 “मी दुष्टतेच्या मृत्युवर मी मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहिर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
\s5
\v 24 जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही जेव्हा त्याने मला देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
\s5
\v 25 पण तू म्हणतो, “प्रभूचे मार्ग योग्य नाही,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
\v 26 जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, जर त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
\s5
\v 27 पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
\v 28 कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
\s5
\v 29 पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत:चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
\v 30 तथापी “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेल.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
\s5
\v 31 तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दुर सार तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
\v 32 कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”
\s5
\c 19
\s इस्त्राएलाच्या सरदारांसाठी विलाप
\p
\v 1 मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द दिगंत हो.
\v 2 आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहाते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.
\v 3 आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्याला तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो माणसाला खाऊन टाकते.
\v 4 मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्याला आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.
\s5
\v 5 मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.
\v 6 हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने माणसांना खाऊन टाकले.
\v 7 मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता.
\s5
\v 8 सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्याला पाशात पकडले.
\v 9 त्याला पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्याला तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.
\s5
\v 10 तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाचे झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.
\v 11 तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.
\s5
\v 12 पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.
\v 13 मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहाण आहे.
\s5
\v 14 तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकले, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.
\s5
\c 20
\s इस्त्राएलाशी देवाचा व्यवहार
\p
\v 1 हे सातव्या वर्षी घडले, दहावा दिवस पाचवा महिना, इस्राएलाचे वडील परमेश्वर देवाला विचारणा करण्यास आले, आणि मज पुढे येऊन बसले.
\s5
\v 2 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि म्हणाला
\v 3 मनुष्याच्या मुला इस्राएलाच्या वडीलांना जाहिर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे परमेश्वर देव जाहीर करतोय.
\s5
\v 4 तू त्यांचा न्याय करु नये काय? मानवाच्या मुला तू त्यांचा न्याय करु नये काय? त्यांच्या वाडवडीलांनी केलेली घृणास्पद कृत्ये त्यांना सांग
\v 5 प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो.
\v 6 त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्याशी शपथ वाहीली की, मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे.
\s5
\v 7 तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्करणीय वस्तु आपल्या दृष्टी समोरुन फेकून द्या, तुम्ही त्यामुळे विटाळू नये, असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 8 तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तु फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर मी ओतीन तरच मी समाधान पावेन हा माझा केलेला ठराव आहे.
\v 9 माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहात आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, मी त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.
\s5
\v 10 मी त्यास मिसर देशातून बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणिले.
\v 11 मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल.
\v 12 माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून त्यास शब्बाथ दिले, ह्यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 13 रानामध्ये इस्राएल घराण्याने माझा तिव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला त्यांनी माझ्या पवित्र शब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले.
\v 14 तथापी माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिसरा बाहेर आणून कृती केली.
\s5
\v 15 म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहे जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना देऊन जाणार नाही.
\v 16 मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले.
\v 17 तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही.
\s5
\v 18 रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडीलांच्या नियमांनी चालु नका, तुम्ही त्यांचा करार पाळू नका किंवा मूर्तीपुजा करून स्वताःस अशुद्ध करु नका.
\v 19 मी तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या नियमांनी चाला माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत रहा.
\v 20 माझे शब्बाथ पवित्र पणे पाळ ह्यासाठी की, त्या तुमच्या व माझ्यामध्ये चिन्ह दाखल होतील. ह्यासाठी की मी तुमचा परमेश्वर देव आहे हे तुम्हास कळून येईल.
\s5
\v 21 परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तिव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा.
\v 22 परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे.
\s5
\v 23 रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन.
\v 24 हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा करार पाळल्या नाही, माझ्या शब्बाथ व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडीलांच्या मूर्तीकडे लागली होती.
\s5
\v 25 जे चांगले नाहित असे नियम मी त्यांना दिलेत, ज्यांनी ते जगावयास असे निर्णय मी त्यास दिलेत.
\v 26 त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुद्ध केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 27 यास्तव हे मनुष्याच्या पुत्रा इस्राएल घराण्याला जाहिरपणे सांग की, प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, तुम्ही तुमच्या वाडवडीलांनी माझा विश्वासघात केला असून देवनिंदक शब्द बोललेत ते अशा प्रकारे
\v 28 मी आपले उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.
\v 29 तेव्हा मी त्यास म्हणालो, तुम्ही ज्या उंचवटयांवर जाऊन जेथे तुम्ही अर्पण अर्पिता? त्या ठिकाणास आजवर उंचवटा म्हटले आहे.
\s5
\v 30 ह्यासाठी इस्राएलाच्या घराण्यास सांग, परमेश्वर देव असे म्हणतो काय? तुम्ही आपल्या वाडवडीलांना मार्गास लागून स्वत:ला विटाळवीता काय? आणि वेश्ये प्रमाणे कृती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता?
\v 31 आपली अर्पणे वाहून आपल्या पुत्रांना अग्नीत होम करून आजपर्यंत मूर्तीपुजेमुळे तुम्ही स्वताःला अशुद्ध केलेत, हे इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुम्हाला प्रश्न विचारु देणार नाही, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ ही माझी घोषणा आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारु देणार नाही.
\v 32 तुमच्या मनात येणारे विचार तरंग बाहेर येतील, तुम्ही म्हणता, चला इतर राष्ट्राप्रमाणे तेथील जमाती काष्ट पाषाणाची पुजा करतात तशी आपण करु.
\s5
\v 33 ही प्रभू परमेश्वर देव घोषणा करतो, मी खात्रीने आपले बाहु उभारुन पराक्रमाने तुमच्यावर राज्य करीन.
\v 34 मी राष्ट्रातून तुम्हाला बाहेर आणिल, आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हाला एकत्र करीन मी हे आपल्या प्रबळ बाहूने उगारलेल्या हाताने कोपवृष्टी करीन.
\v 35 नंतर मी लोकांना रानात आणले आणि तोंडो तोंड त्यांचा न्याय करेल.
\s5
\v 36 ज्या प्रमाणे मिसराच्या रानात तुमच्या वाडवडीलांचा न्याय केला, तसा मी तुमच्या बरोबर करेल. हा परमेश्वर देव घोषणा करून सांगतोय.
\v 37 तुम्हाला माझ्या काठीखाली घालवून बेड्या टाकून करारबध्द करीन.
\v 38 तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार पुनःरुपी ते पुन्हा इस्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 39 मग त इस्राएलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तु बद्दल मूर्तीला भेट देऊन अनादर आता पुढे करणार नाही.
\s5
\v 40 माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या पर्वत शिखरावर हे परमेश्वर देव जाहिर करतोय, सर्व इस्राएलाचे घराणे त्यांच्या भूमित माझी आराधना करतील. तुझ्या अर्पणांनी मी तेथे आनंदी होईल आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंड्णीचा प्रथम फळ ते अर्पितील.
\v 41 मी त्यांचे सुवासीक अर्पण स्विकारीन जेव्हा सर्व लोक देशातून एकत्र जमतील जेथून ते विखुरले गेले होते. मी स्वताःला त्यांना पवित्र असे प्रकट करेल, सर्व राष्ट्रे ते बघतील.
\s5
\v 42 जेव्हा मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत घेऊन येईल, ज्या भूमिला हात उंचावून तुमच्या वाडवडीलांना दिली होती, मग तुम्हाला कळेल कि मी परमेश्वर देव आहे.
\v 43 मग तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांचे स्मरण होईल, आणि तुमच्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वत:ची घृणा कराल.
\v 44 मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे जेव्हा मी हे माझ्या नामास्तव हे केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्राएलाच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतोय.
\s दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी
\p
\s5
\v 45 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला
\v 46 मानवाच्या मुला आपले तोंड दक्षीणेच्या भूमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकीत करा.
\v 47 नेगेबच्या रानाला बोल ऐक परमेश्वर देव काय जाहिर करतोय; परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवील. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना जाळेल व झाडे सुकवून टाकेल. जळीत आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षीण भाग जळून भस्म होईल.
\s5
\v 48 जेव्हा मी अग्नी पेटवेल तेव्हा सर्व जीव मला परमेश्वराला बघतील, आणि मी आग विझवणार नाही.
\v 49 मग मी त्यांना म्हणालो, आहा हा परमेश्वर देवा ते मला म्हणाले, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?
\s5
\c 21
\s परमेश्वराची तीक्ष्ण तलवार
\p
\v 1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 2 मानवाच्या मुला आपले तोंड यरुशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्राएलाच्या भूमी विरुध्द भविष्यवाणी कर.
\v 3 इस्राएलाच्या भूमिला सांगा परमेश्वर देव म्हणतो पाहा! मी तुझ्या विरुध्द आहे मी शेथापासून आपली तलवार म्यानातून उपसून घेऊन तुझ्यापासून धार्मीकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन.
\s5
\v 4 माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करेल, माझी तलवार म्यानातून निघून शेथापासून सर्व जीवा विरूद्ध उत्तर दक्षीण भागात बाहेर पडेल
\v 5 मग सर्व जीवांना कळेल मी परमेश्वर देव आहे मी शेथा जवळ तलवार ठेवली आहे. ती वापस म्यान होणार नाही.
\s5
\v 6 आणि तू, मानव पुत्रा, कंबर मोडल्याप्रमाणे उसासा टाक, त्यांच्या नजरे देखत कष्टाने कण्हत राहा.
\v 7 मग तू तुला विचारतील काय झाले का तू विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल पाहा! असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल “असे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.”
\s5
\v 8 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 9 मानवाच्या मुला, भाकीत कर आणि म्हण असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्याला चकाकीत करा.
\s5
\v 10 मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.
\v 11 मग तलवारीला चकीकीत होण्यासाठी सोपवून दिली, आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली. तलवारीला धार लावली आणि चकाकीत केली ठार मारणाऱ्या पुरुषाच्या हाती दिली.
\s5
\v 12 मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तरवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतीतीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.
\v 13 तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही? हे परमेश्वर देव सांगत आहे.
\s5
\v 14 आता तू मानवाच्या मुला, भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तलवार तिसऱ्यांदा चालून येईन. ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे.
\s5
\v 15 त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तलवारी सिध्द केल्या आहे. आहाहा! तिला विजेसासारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.
\v 16 हे तलवारी, जशी तू आपले मुख फिरवशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जी प्रमाणे वळवली जा.
\v 17 मी सुध्दा टाळी वाजवून आपल्या त्वेषाला शांत करेल असे परमेश्वर देव जाहिर करतो.
\s5
\v 18 परमेश्वर देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला.
\v 19 आता तू मानवाच्या मुला बाबेलाच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल.
\v 20 एका मार्गाला बाबेलाच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोनीच्या मुलाकडे राब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरुशलेमेच्या शहरा जवळ यहूदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्देश करा.
\s5
\v 21 वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळीजा वरुन तो तपासणी करेल.
\v 22 यरुशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजा फोडण्याचा हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.
\v 23 पुढे घडून येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरुशलेमपैकी एक, ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे. पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.
\s5
\v 24 यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्यापुढे स्मरण केले जाईल तुझे अपराध प्रकट केले जातील; तू पाप सर्व कृतीत दर्शीवीले जातील यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून तू आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील.
\s5
\v 25 तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.
\v 26 प्रभू परमेश्वर देव हे सांगत आहे. आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजुला सारा, सर्व काही एक समान राहाणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील आणि नम्र उंच केले जातील.
\v 27 मी सगळ्यांची नासाडी, नासाडी, नासाडी करेल, जमाव उरणार नाही, ज्याला हक्क आहे त्याला तो मिळेल.
\s अमेमोन्यांचा न्याय
\p
\s5
\v 28 तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल परमेश्वर देव हे सांगत आहे, अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे.
\v 29 ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
\s5
\v 30 तलवार म्यानात जाईल, तू ज्या ठिकाणी जन्मला तुझी जेथे सुरुवात झाली त्या भूमिवर मी तुझा न्याय करेल.
\v 31 मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेल आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.
\s5
\v 32 तू अग्नीसाठी इंधन होशील; तुझे रक्त भूमिच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी परमेश्वर देव हे जाहीर करतो.”
\s5
\c 22
\s यरुशलेमेची पापे
\p
\v 1 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे येऊन म्हणाला,
\v 2 मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतो काय? तू त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे.
\v 3 मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.
\p
\s5
\v 4 तू सांडलेल्या रक्त्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केल्या आहेस, तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तव मी तुझी खरड पट्टी राष्ट्रात काढेल व भूमीवर तुझा उपहास प्रत्येक डोळ्या समोर करेल.
\v 5 जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपहास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकीक तुला प्राप्त झाला आहे.
\p
\s5
\v 6 पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.
\v 7 त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे.
\v 8 तू माझ्या पवित्र वस्तुंना तुच्छ लेखल्या आहेस व माझ्या शब्बाथाचा अनादर केला आहे.
\v 9 बदनामी कारक पुरुषांनी क्रमाने येऊन रक्त ओतले व उंच स्थानी जाऊन भोजन केले, व त्यांनी माझ्या पुढे दुष्टपणा केला आहे.
\p
\s5
\v 10 तुझ्याकडे तुझ्या बापाची नग्नता उघड झाली आहे त्यांनी ऋतुमती अशुद्धतेत स्त्रिला भ्रष्ट केले आहे.
\v 11 ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी घृणास्पद वर्तन केले आहे. ज्या पुरुषाने आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले; असा पुरुष ज्याने आपल्या बापाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले ते सर्व कृत्ये तुझ्यामध्ये झालेले आहे.
\v 12 असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.
\p
\s5
\v 13 यास्तव तू केलेल्या अनादराच्या कामावर मी आपला हात उगारीन आणि तुझ्यामध्ये जो रक्तपात झाला आहे.
\v 14 जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर असे परमेश्वर देव जाहीर करतो व ते मी करेलच.
\v 15 मी तुमची देशातून दाणादाण करेल व भूमीतून नाहीसे करेल, मी तुम्हाला तुमच्या अशुद्धतेतून शुध्द करेल.
\v 16 मग तुम्ही राष्ट्राच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\p
\s5
\v 17 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
\v 18 मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे मला धातुच्या गाळाप्रमाणे झाले आहे. त्यामध्ये उरलेले पितळ, कथील, आणि लोखंड, शिसे आहे, ते भट्टीतल्या चांदीचा गाळ आहे.
\v 19 यास्तव परमेश्वर देव हे म्हणतो, कारण तुम्ही उरलेला गाळ झाला आहात. यास्तव पाहा! मी तुम्हाला यरुशलेमेत एकत्र करीन.
\p
\s5
\v 20 चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे गोळा करून जसे तुम्हा मध्ये त्यांच्यात भट्टीत टाकले जाते तसे मी तुम्हाला वितळवीन यासाठी मी तुला माझ्या क्रोधाच्या अग्नीने एकत्र करीन मी त्यांना भट्टीत वितळून टाकीन, तुम्हाला त्यामध्ये ओतणी करेल.
\v 21 म्हणजे मी तुमच्यात माझ्या क्रोधाच्या अग्नीने त्यांच्यावर ओतणी करेल.
\v 22 जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुध्द त्वेषाची ओतणी केली आहे.
\p
\s5
\v 23 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
\v 24 मानवाच्या तिला सांग तू अशी भूमी आहे जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.
\v 25 तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.
\p
\s5
\v 26 तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तु आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे.
\v 27 त्यांच्या राज कुमारी या लांडग्या प्रमाणे बळी घेणारे रक्तपात करणारे आहेत. आपल्या हिंसाचारासाठी ते जीवाचा घात करतात.
\v 28 आणि त्यांचे दृष्टे चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताहि प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात.
\s5
\v 29 भूमितील लोक पिळवणुकीने दबून गेले आहेत आणि डाका टाकून लुटून टाकतील व ते गरीब, गरजूंना वाईट वागणुक देतात तसेच विदेशांना अन्यायाने दाबून टाकतात.
\p
\s5
\v 30 मग मी मानवाचा शोध घेतला जो बुरुज बांधून घेईल आणि जो माझ्या पुढे उभा राहील ती भूमिला भित असेल ज्याचा विध्वंस मी करणार नाही.
\v 31 मग मी माझ्या संतापाची ओतणी त्यांच्यावर करीन, मी माझ्या संतापाच्या अग्नीने त्यांना संपवून टाकीन आणि त्यांचा मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे सिध्द करेल. असे परमेश्वर देव जाहीर करतो.
\s5
\c 23
\s दोन बहिणी
\p
\v 1 परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 2 दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या.
\v 3 त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले.
\v 4 त्यांची नावे अहला थोरली व अहलीबा धाकटीचे नाव आहे, ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला कन्येला जन्म दिला. त्यांच्या नावाचा अर्थ येणे प्रमाणे आहे. अहला म्हणजे, शोमरोन आणि ओहलीबा म्हणजे यरुशलेम.
\p
\s5
\v 5 परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते.
\v 6 राजधिकाऱ्याने जांभळी वस्त्रे परिधान केली होती. जे सर्व पुरुषात बलवान व देखणे होते, त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत.
\v 7 तिने स्वत:ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत:ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत:ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला.
\p
\s5
\v 8 तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या संभोग केला.
\v 9 यास्तव मी तिला तिच्या प्रियकरांच्या हाती दिले अश्शूर ज्यांनी तिच्याशी व्यभिचार केला.
\v 10 त्यांनी तिला नग्न केले. त्यांनी तिच्या मुला मुलींना नेऊन तलवारीने मारुन टाकले, ती स्त्रियांमध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला.
\p
\s5
\v 11 तिच्या बहिणीने अहलीबाने हे पाहिले, पण तिच्याहून अधिक आपल्या बहिणी हून व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले.
\v 12 अश्शुरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला.
\v 13 मी पाहिले तिने स्वत:ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले.
\p
\s5
\v 14 मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेल्या चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटलेली.
\v 15 आपल्या कमेरेस बंद घालून रंगीबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खास्दी देशातील बाबेलाच्या अधिकाऱ्यासारखी दिसत असून आपल्या जन्मभूमित होती.
\p
\s5
\v 16 जशी तिची नजर जाच्यावर गेली त्याच्याशी तिने व्यभिचार केला म्हणून तिने खास्द्यांच्या देशात निरोप्या पाठवला.
\v 17 मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत:ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले.
\s5
\v 18 तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दुर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले.
\p
\v 19 मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला.
\s5
\v 20 तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्यभिचार केला, ज्यांचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते, व माज घोड्या सारखे होते.
\v 21 पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले जेव्हा मिसऱ्यांनी तिचे स्तन गोंजारले.
\s5
\v 22 यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांना करी.
\v 23 बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करील.
\p
\s5
\v 24 ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील.
\v 25 मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील.
\p
\s5
\v 26 ते तुझे कपडे काढून टाकतील व दागीनेही घेऊन जातील.
\v 27 मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेल. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.
\p
\s5
\v 28 यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू व्देष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दुर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन.
\v 29 क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही घेतील, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल.
\s5
\v 30 या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस.
\v 31 तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन.
\p
\s5
\v 32 प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल.
\p
\s5
\v 33 तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे.
\p
\v 34 तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहिर करतो, मी परमेश्वर देव जाहिर करतोय.
\p
\s5
\v 35 यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत:ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.”
\p
\s5
\v 36 परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर,
\v 37 जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केलाय व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले.
\p
\s5
\v 38 आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली.
\v 39 जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.
\p
\s5
\v 40 लांबून आलेल्या लोकांना तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले.
\v 41 वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याज पुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्य व तेल मांडले.
\p
\s5
\v 42 मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांना जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होती.
\s5
\v 43 मग मी त्यांना एक झिजून गेलेली व्यभिचाराच्या कृत्यांबद्दल सांगितले, ‘आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म केरील.
\v 44 ते जसे वेश्येकडे जातात तसे ते तिच्याकडे अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे ते गेले.
\p
\v 45 पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील.
\p
\s5
\v 46 प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक, लुटमार करतील.
\v 47 मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारुन टाकतील व त्यांच्या घरांना जाळू टाकतील.
\p
\s5
\v 48 मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन यापुढे ते वेश्याकर्म करणार नाहीत.
\v 49 मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुध्द करीन तू मुर्तीसोबत केलेल्या पापाचे फळ भोगशील मग यामार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे.”
\s5
\c 24
\s कढईचा दाखला
\p
\v 1 नवव्या वर्षी पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणाला,
\v 2 “मानवाच्या मुला, तुझ्यासाठी आजचा दिवस आणि तारीख लिहून ठेव, याच दिवशी बाबेलचा राजा येऊन यरुशलेमेला वेढा देईल.
\p
\s5
\v 3 आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत.
\p
\v 4 मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्याला हाडे टाकून भरणा कर.
\p
\v 5 कळपातले चांगले कोकरु घे, हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांचा जाळ कर, त्यांना चांगले शिजू दे त्यातील हाडांनाही शिजू दे.
\p
\s5
\v 6 यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असे, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे त्याचा गंज निघत नाही त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही.
\p
\s5
\v 7 तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळ गुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्याला झाकू दिले नाही.
\v 8 म्हणून संतापाच्या त्वेषाने मी तिचे रक्त खडकावर सांडले जमीनीच्या धुळीने त्याला झाकू दिले नाही.
\p
\s5
\v 9 यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असे, मी जळणासाठी लाकडाचा साठा मोठा करीन.
\v 10 लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतुत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत.
\p
\s5
\v 11 मग अग्नीवर भांडे रिकामेच असू दे अशासाठी की त्यातील गाळ तप्त अग्नीने जळून जाईल.
\v 12 ती कष्टाने खुप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती.
\p
\s5
\v 13 तुझा लज्जास्पद स्वभाव हा तुझ्या अशुद्धतेत आहे, कारण मी तुला शुद्ध करु पाहिले तरी पण तू शुद्ध झालीच नाही व अशुद्धच राहील्याने माझा त्वेष तुझ्यावर आला आहे.
\p
\s5
\v 14 मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईल तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहिर करतोय.
\s यहेज्केलाच्या पत्नीचा मृत्यू
\p
\s5
\v 15 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
\v 16 मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईल तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत.
\v 17 तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”
\p
\s5
\v 18 मग पहाटे मी माझ्या लोकांशी बोललो आणि माझी बायको सायंकाळी वारली. तेव्हा मला जी आज्ञा झाली तसे मी सकाळी पालन केले.
\p
\s5
\v 19 लोकांनी मला विचारले, “तू आम्हाला याचा अर्थ काय हे सांगणार नाहीस जे काही तू करत आहेस ते?”
\v 20 मग मी त्यांना म्हणालो, परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
\v 21 इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जे तुझे मुलेमुली मागे उरलेले होते ते तलवारीने खाली पडले आहेत.
\p
\s5
\v 22 मग मी जे केले तेच तुम्ही कराल; तू आपले तोंड खाली घालणार नाही, दुःखाने समयी लोक देतात ती खावयाची भाकर खाणार नाही.
\v 23 त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद व आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल.
\v 24 मग यहेज्केल तुम्हाला चिन्ह होईल जे काही त्याने केले तेच तुम्ही कराल हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.
\s5
\v 25 “पण तू मानवाच्या मुला, ज्या दिवशी त्यांच्यापासून त्यांचा आश्रय ताब्यात घेतले, जो त्यांचा आनंद, गर्व जो त्यांनी पाहिला व ज्याची इच्छा त्यांनी केली जेव्हा मी त्यांच्या मुलामुलींना त्यांच्या पासून घेऊन गेलो.
\v 26 त्या दिवशी शरणार्थी येतील व तुला बातमी देतील.
\v 27 त्या दिवशी शरणार्थी व निभावलेले येतील आणि ते तुला सांगतील तू आता फार काळ गप्प रहाणार नाही, असा तू चिन्ह होशील म्हणजे, त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”
\s5
\c 25
\s अन्मोन्यांविषयी भविष्य
\p
\v 1 नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि संदेश म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, तू आपले मुख अम्मोन्यांच्या लोकांविरूद्ध लाव आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग.
\s5
\v 3 अम्मोनाच्या लोकांना सांग, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, माझे पवित्रस्थान बाटविण्यात आले तेव्हा त्याविरूद्ध होता आणि इस्राएल देश उद्ध्वस्त करण्यात आला, तेव्हा तिच्याविरूद्ध होता आणि यहूदाचे घराणे जेव्हा बंदिवासात गेले तेव्हा त्यांच्याविरुद्ध तू, अहा! म्हणालास,
\v 4 म्हणून पाहा! मी तुला पूर्वेकडच्या लोकांस त्यांची मालमत्ता असे देईन. ते तुमच्याविरुध्द छावणी देतील आणि आपले तंबू तुमच्यात देतील. ते तुझे फळ खातील व ते तुझे दूध पितील.
\v 5 आणि मी राब्बाचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन लोकांच्या कळपासाठी शेत करीन. मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे.
\s5
\v 6 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, की तू इस्राएल देशाविरूद्ध टाळ्या वाजविल्या व तुझे पाय आपटले व आपल्या मनापासून तुच्छतेने आनंद केलास.
\v 7 म्हणून पाहा! मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला राष्ट्रांस लूट असे देईल. मी तुला दुसऱ्या लोकांपासून कापून दूर करील आणि तुझा नाश करीन. मी तुला देशामधून नाहीसे करीन आणि तेव्हा तुला समजेल मी परमेश्वर आहे, हे समजून येईल.
\s मवाबाविषयी भविष्य
\p
\s5
\v 8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण मवाब व सेईर म्हणतात ‘पाहा! यहूदाचे घराणे सर्व इतर राष्ट्रांसारखेच आहे.
\v 9 यास्तव पाहा! मी मवाबाचा उतार उघडा करीन, त्याच्या सीमेवरील बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही वैभवी नगरे सुरवात होतात,
\v 10 पूर्वेकडचे लोक जे कोणी अम्मोनी लोकांविरूद्ध आहेत. मी त्यांना त्यांचा ताबा देईन याकरिता की, अम्मोनी लोकांची आठवण राष्ट्रांमध्ये कोणी काढणार नाही.
\v 11 म्हणून मी मवाबाविरूद्ध न्याय तडीस नेईन आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे.
\s अदोमाविषयी भविष्य
\p
\s5
\v 12 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याविरूद्ध सूड घेतला आहे आणि असे करून त्यांने अपराध केला आहेत.
\v 13 म्हणून प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी अदोमाला आपल्या हाताने तडाखा देईन आणि प्रत्येक पुरुषचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत मी त्यांचा विध्वंस करीन, ते ठिकाण सोडून देईन. ते तलवारीने पडतील.
\s5
\v 14 याप्रकारे मी आपले लोक इस्राएल यांच्या हातून अदोमावर सूड घेईन आणि माझ्या क्रोधाप्रमाणे आणि माझ्या त्वेषाप्रमाणे ते अदोमाचे करतील. मग त्यांना माझा सूड कळेल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s पलिष्ट्यांविषयी भविष्य
\p
\s5
\v 15 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण आपल्या मनात फार जुने शत्रुत्व आणि तिरस्कार बाळगून पलिष्ट्यांनी यहूदावर सूड घेतला आहे आणि तिचा नाश केला आहे.
\v 16 म्हणून, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी पलिष्ट्यांविरूद्ध आपला हात उगारीन आणि करेथी लोकांना कापून टाकीन आणि जे कोणी समुद्रकिनाऱ्यावरील अवशिष्ट राहिल्यांचा नाश करीन.
\v 17 कारण त्वेषयुक्त कृतीने मी त्यांच्याविरुद्ध भयंकर सूड घेऊन त्यांना मी शिक्षा करीन. मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
\s5
\c 26
\s सोरेविषयी भविष्य
\p
\v 1 आणि असे झाले की, अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, कारण सोर यरुशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली मी ओतप्रोत भरेल.”
\s5
\v 3 म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.”
\v 4 ते सोरेच्या तटाचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची धूळ झाडून दूर करील आणि तिला उघडा खडक करीन.
\s5
\v 5 ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल.
\v 6 तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वधल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
\s5
\v 7 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.
\v 8 तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरूद्ध उतरती वेढ्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरूद्ध ढाल उभारील.
\s5
\v 9 तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील.
\v 10 घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील.
\v 11 तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवितील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमीनीवर पडतील.
\s5
\v 12 याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझे श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील.
\v 13 कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्यांचा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही.
\v 14 कारण मी तुला उघडा खडक करीन. तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील. तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी, परमेश्वराने असे म्हटले आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 15 प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधःपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कण्हण्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?
\v 16 कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.
\s5
\v 17 ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून आणि तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस?
\v 18 आता, तुझ्या पडण्याच्या दिवशी, समुद्रकिनारीचा देशांचा भीतीने थरकाप उडेल. तू समुद्रकिनारील देश भयभीत झाले आहेत, कारण तू पाण्यात गेली आहेस.”
\s5
\v 19 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जी नगरे वसली नाहीत त्यासारखे जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि तेव्हा प्रचंड जले तुला झाकतील.
\v 20 मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस.
\v 21 मी तुझ्यावर विपत्ती आणिल आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
\s5
\c 27
\s सोर नगरीसाठी शोक
\p
\v 1 परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 आता तू, मनुष्याच्या मुला, सोरेविषयी विलाप कर.
\v 3 आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे.
\s5
\v 4 तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत; बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
\v 5 त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे.
\s5
\v 6 त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या.
\v 7 तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.
\s5
\v 8 जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते
\v 9 तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत.
\s5
\v 10 पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत.
\v 11 अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली.
\s5
\v 12 तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत.
\v 13 यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.
\s5
\v 14 तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.
\v 15 ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते.
\s5
\v 16 तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते.
\v 17 यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
\v 18 तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षारस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता.
\s5
\v 19 दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला.
\v 20 ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता.
\v 21 अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.
\s5
\v 22 शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.
\v 23 हारान, कन्ने व एदेन, शबा, अश्शूर व किल्मद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते.
\s5
\v 24 ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाऱ्याच्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत होते.
\v 25 तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.
\s5
\v 26 तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.
\v 27 तुझे संपत्ती, तुझ्या व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू; तुझे नाविक, खलाशी आणि जहाज बांधणारे; तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेला सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील.
\s5
\v 28 तुझ्या खलाशांच्या आरोळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील.
\v 29 जे कोणी वल्ही हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रावरील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील.
\v 30 ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील.
\s5
\v 31 ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील.
\v 32 ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?
\v 33 तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
\s5
\v 34 पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले.
\v 35 समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत.
\v 36 लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”
\s5
\c 28
\s सोरेच्या राजाविषयी भविष्य
\p
\v 1 नंतर परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, सोरेच्या राज्यकर्त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुझे हृदय गर्विष्ठ आहे. तू म्हणाला मी देव आहे. मी समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे. जरी तू मानव आहेस व देव नाही, तरी तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे करतो.
\v 3 तू स्वत:ला दानीएलापेक्षा बुद्धिमान समजतोस आणि कोणतेही रहस्ये तुला आश्चर्यचकित करीत.
\s5
\v 4 तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:ला संपन्न केले आहेस आणि तुझ्या खजिन्यात तू चांदी सोने संपादन केले आहेस.
\v 5 तुझ्या मोठ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढवली, म्हणून तुझे हृदय संपत्तीमुळे गर्विष्ठ झाले आहे.
\s5
\v 6 म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, कारण तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे केले आहे,
\v 7 मी परक्यांना तुझ्याविरूद्ध आणीन, जे दुसऱ्या राष्ट्रांतून भयंकर माणसे आणीन. आणि ते तुझ्या शहाणपण्याच्या सुंदरतेवर आपल्या तलवारी उपसतील आणि ते तुझे वैभव भ्रष्ट करतील.
\s5
\v 8 ते तुला खाचेत पाठवतील आणि तू समुद्राच्या हृदयामध्ये मरण पावलेल्या वधलेल्यांंच्या मरणाने मरशील.
\v 9 तू आपल्या वधणाऱ्यासमोर, मी देव आहे. असे खचित म्हणशील काय? ज्या कोणी तुला भोसकले त्यांच्या हाती तू आहेस तो तू देव नव्हे व मानव आहेस.
\v 10 परक्यांच्या हातून बेसुंतीच्या मरणाने मरशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
\s सोरेच्या राजासाठी विलाप
\p
\s5
\v 11 परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले व म्हणाले,
\v 12 “मनुष्याच्या मुला, सोरेच्या राजाविषयी ओरडून विलाप कर आणि त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू परीपूर्णतेची प्रतीकृतीच आहेस, तू ज्ञानपूर्ण आणि सुंदरतेत परिपूर्ण आहेस.
\v 13 देवाचा बाग एदेनमध्ये तू होतास. प्रत्येक मौल्यवान खड्यांनी तू आच्छादलेला होतास. अलाक, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, सोने अशी सर्व प्रकारची जवाहीर तुझ्या अंगभर होती, तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला घालण्यासाठी ते तयार केले होते.
\s5
\v 14 मी तुला देवाच्या पर्वतावर एक अभिषिक्त करुब म्हणून मानवजातीच्या रक्षणासाठी ठेवले. तू अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या पाषाणांतून इकडेतिकडे चालत होतास.
\v 15 मी तुला निर्मिले, त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास.
\s5
\v 16 तुझा व्यापार खूप मोठा असल्यामुळे तू बलात्काराने भरला आहे, तू पाप केले आहे म्हणून मी तुला भ्रष्ट समजून देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले आणि हे पाखर घालणाऱ्या करुबा, मी तुला अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या असलेल्या पाषाणातून, काढून मी तुझा नष्ट केले आहे.
\v 17 तुझ्या सौंदर्यांने तुझे हृदय गर्विष्ठ बनले. तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाचा नाश करून घेतला आहे. मी तुला खाली जमिनीवर फेकले आहे. राजांनी तुझे जाहीर प्रदर्शन पाहावे यासाठी मी तुला त्यांच्यापुढे ठेवले.
\s5
\v 18 तुझ्या खूप पापांमुळे आणि व्यापारातील अप्रामाणिकपणामुळे, तू आपले पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यामधून अग्नी काढला आहे, त्याने तुला खाऊन टाकले आहे. जे कोणी पाहतात त्या सर्वाच्यादेखत मी पृथ्वीवर तुझी राख केली आहे.
\v 19 लोकांमध्ये जे तुला ओळखतात ते सर्व तुझ्याविषयी विस्मित होतील, तू भय असा होशील व पुन्हा कधी असणार नाहीस.”
\s सीदोनेविषयी भविष्य
\p
\s5
\v 20 मग मजकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
\v 21 “मनुष्याच्या मुला, सीदोनेविरूद्ध आपले तोंड कर व तिच्याविरूद्ध भविष्य सांग.
\v 22 सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! हे सीदोने, मी तुझ्याविरूद्ध आहे. कारण मी तुझ्यामध्ये गौरविला जाईल म्हणून मी तिला न्यायाने शिक्षा करीन व तिच्यात मला पवित्र मानले म्हणजे, त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
\s5
\v 23 मी तिच्यात मरी पाठवीन आणि तिच्या रस्त्यात रक्त पाठवीन आणि तलवार तुमच्याविरुध्द सर्व बाजूंनी येईल तेव्हा घायाळ झालेले तुम्हामध्ये पडतील मग त्यांना समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.
\v 24 नंतर इस्राएलाच्या घराण्याच्या सभोवतालचे जे सर्व तिला तुच्छ मानत असत त्यांच्यातून कोणीही त्यांना बोचणारी काटेरी झुडुपे किंवा वेदनादायक काटे असे उरणार नाहीत, म्हणून त्यांना समजून येईल की, मीच प्रभू परमेश्वर आहे.
\s5
\v 25 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत विखुरविले आहे त्यांतून मी त्यास एकत्र आणीन आणि मग मी त्या विधर्मी राष्ट्रांच्या देखत त्याच्याठायी पवित्र ठरेन; मग मी जो देश आपला सेवक याकोब याला दिला त्यामध्ये ते राहतील.
\v 26 मग ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील आणि ते घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग ते निर्भयपणे राहतील. म्हणून त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”
\s5
\c 29
\s मिसर देशाविषयी भविष्य
\p
\v 1 दहाव्या वर्षात, दहाव्या महिन्यात, महिन्याच्या बाराव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, तू आपले मुख मिसराचा राजा फारो याच्याविरूद्ध कर; त्यांच्याविरुद्ध व सर्व मिसराविरूद्ध भविष्यवाणी सांग.
\v 3 सांग व म्हण ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मिसराचा राज फारो, मी तुझ्याविरूद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी आहेस, तू मला म्हणतोस, “ही नदी माझी आहे. ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे.”
\s5
\v 4 कारण मी तुझ्या जबड्यात गळ घालीन आणि तुझ्या नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला तुझ्या खवल्यास चिकटलेल्या नद्यांच्या माशांसह नदीतून ओढून बाहेर काढीन.
\v 5 मी तुला आणि तुझ्या नद्यांतली सर्व मासे यांनाही रानात खाली टाकून देईन; तू शेतातल्या उघड्या भूमीवर पडशील; तुला कोणी एकवट करणार नाही किंवा उचलून घेणार नाही. मी तुम्हाला भूमीवरच्या पशूंस व आकाशातल्या पक्षांना भक्ष्य असे देईन.
\s5
\v 6 मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना कळून येईल की मीच परमेश्वर आहे. कारण ते इस्राएलाच्या घराण्याला बोरूची काठी असे झाले आहेत.
\v 7 जेव्हा त्यांनी तुला आपल्या हातांनी धरले तेव्हा तुझे टोकदार तुकडे झाले आणि त्यांच्या खांद्यात घुसला. जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तू त्यांचे पाय मोडले आणि त्यांच्या कंबरा खचविण्यास लावल्या.
\s5
\v 8 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुझ्याविरूद्ध तलवार आणिन. मी तुझी सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन.
\v 9 मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.” कारण तू म्हणालास नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले.
\v 10 म्हणून पाहा, मी तुझ्याविरूद्ध व तुझ्या नदीच्याविरूद्ध आहे. मग मी मिसर देश उजाड व ओसाड करीन आणि तू मिग्दोलापासून सवेनेपर्यंत व कूशाच्या सीमेपर्यंत टाकाऊ भूमी होशील.
\s5
\v 11 मनुष्याचे पाऊल त्यातून जाणार नाही. पशूचा पाय त्यामधून जाणार नाही आणि चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही.
\v 12 कारण जे देश ओसाड झाले त्यामध्ये मी मिसर देश ओसाड करून ठेवीन आणि जी नगरे उजाड झाली आहेत त्यांच्यामध्ये त्यातली नगरे चाळीस वर्षे ओसाड राहतील; नंतर मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये उधळवीन आणि मी त्यांना देशात पांगवीन.
\s5
\v 13 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, चाळीस वर्षाच्या शेवटी ज्या लोकांमध्ये मिसरी विखरले होते त्यातून मी त्यांना एकत्र करीन.
\v 14 मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन, मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. मग तेथे त्यांचे हलके राज्य होईल.
\s5
\v 15 “ते राज्यामध्ये ते हलके राज्य होईल आणि ते कधीच इतर राष्ट्रांपेक्षा वरचढ होणार नाही. मी त्यांना कमी करीन की ते दुसऱ्या राष्ट्रांवर सत्ता गाजविणार नाही.
\v 16 ते यापुढे इस्राएलाच्या घराण्याला विश्वासाचा विषय असे होणार नाहीत. जेव्हा त्यांचे मुख मिसराकडे वळेल तेव्हा त्यांना अन्यायाची आठवण येईल. मग त्यांना समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
\s5
\v 17 मग सत्ताविसाव्या वर्षात, पहिल्या महिन्यात, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 18 “मनुष्याच्या मुला, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोरविरूद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची सालटी निघाली होती पण त्याने जे कठीण परिश्रम सोरेविरूद्ध केले त्यामुळे त्याला व त्याच्या सैन्याला सोरेतून कधीही काही वेतन मिळाले नाही.”
\s5
\v 19 म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! मिसर देश मी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल, त्यांची मालमत्ता लुटेल व तेथे त्याला जे सापडेल ते घेऊन जाईल. ते त्याच्या सैन्याचे वेतन असे होईल.
\v 20 त्याने माझ्या जी मेहनत केली त्याचे वेतन म्हणून मी त्याला मिसर देश दिला आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे.” असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे.
\s5
\v 21 “त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या घराण्याचे शिंग उगवेल असे करीन आणि त्यांच्यामध्ये तुझे मुख उघडेल असे मी तुला दान देईन. यासाठी की, त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
\s5
\c 30
\s मिसराचा नाश
\p
\v 1 परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
\v 3 तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
\s5
\v 4 मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
\v 5 कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
\s5
\v 6 परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तरवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 7 ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
\s5
\v 8 जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
\v 9 त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांना दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
\s5
\v 10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
\v 11 तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तरवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
\s5
\v 12 मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट माणसांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
\s5
\v 13 प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
\v 14 मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
\s5
\v 15 कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
\v 16 मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
\s5
\v 17 आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तरवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
\v 18 जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्वाचा नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
\v 19 अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणील, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
\s5
\v 20 मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 21 “मनुष्याच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्याला बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्याला कोणीही बांधले नाही.
\s5
\v 22 यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोहि मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
\v 23 मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
\v 24 मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या माणसाप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
\s5
\v 25 कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तरवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
\v 26 म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकेल आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”
\s5
\c 31
\s फारोचे व त्याच्या लोकांचे भवितव्य
\p
\v 1 अकराव्या वर्षी, तिसऱ्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस?
\s5
\v 3 पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता.
\v 4 पुष्कळ जलांनी त्याला उंच वाढवले. खोल जलांनी त्याला खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्याचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते.
\s5
\v 5 म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडांपेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या.
\v 6 आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी करीत. त्याच्या खांद्याच्या खाली सर्व वनपशू पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावली खाली सर्व मोठी राष्ट्रे राहत.
\v 7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
\s5
\v 8 देवाच्या बागेतील, देवदारूने त्याला झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते.
\v 9 मी त्याला खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्यांचा द्वेष करीत.
\s5
\v 10 यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतोः कारण त्याने आपणाला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे.
\v 11 म्हणून मी त्याला पकडून एका बलिष्ट राष्ट्राच्या राज्यकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राज्यकर्ता त्याच्याविरुध्द कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्याला दूर काढून टाकीन.
\s5
\v 12 सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून व नंतर त्याला सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्याला सोडले आहे.
\s5
\v 13 त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशू त्याच्या फांद्यामधून बसतात.
\v 14 आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासहि जावयास लाविले आहे.
\s5
\v 15 प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली.
\s5
\v 16 गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडी, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला.
\s5
\v 17 जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तरवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले.
\v 18 तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तरवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
\s5
\c 32
\s फारोसाठी विलाप
\p
\v 1 मग बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 2 मनुष्याच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्याला म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
\s5
\v 3 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.
\v 4 मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
\s5
\v 5 कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.
\v 6 मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
\s5
\v 7 मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधार करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.
\v 8 मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 9 जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रांमध्ये, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील.
\v 10 मी खूप लोकांना तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तरवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक माणसाला आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
\s5
\v 11 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तरवार तुमच्याविरुध्द येईल.
\v 12 योद्ध्याच्या तरवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.
\s5
\v 13 महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.
\v 14 मग मी त्यांचे पाणी शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
\s5
\v 15 जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
\v 16 तेथे विलाप होईल. कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिसरासाठी विलाप करतील. ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 17 मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 18 मनुष्याच्या मुला, मिसरातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना, मिसर कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्रांच्या कन्येस गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.
\s5
\v 19 त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस? खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड.
\v 20 जे कोणी तरवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तरवारीला सोपून दिली आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
\v 21 योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्याला सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तरवारीने वधले ते तेथे पडले आहेत.
\s5
\v 22 अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तरवारीने वधलेले आहेत.
\v 23 ज्या कोणाच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तेथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली ते सर्व वधलेले, तरवारीने पडले आहेत.
\s5
\v 24 तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाया बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वधलेले, तरवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जिवंताच्या भूमीत दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत.
\v 25 त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तरवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.
\s5
\v 26 तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तरवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.
\v 27 बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तरवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे.
\s5
\v 28 म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तरवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.
\v 29 तेथे अदोम तिचा राजा आणि तिच्या सर्व अधिपतीबरोबर आहे. ते सर्व शक्तिशाली होते, पण आता ते तरवारीने वधलेल्याबरोबर पडले आहे, बेसुंतीबरोबर, जे कोणी खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत.
\s5
\v 30 उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तिशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तरवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.
\s5
\v 31 फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यांस तरवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
\v 32 मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तरवारीने वधलेल्याबरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 33
\s पहारेकऱ्याचे कर्तव्य
\p
\v 1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तरवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका माणसाला घेतात आणि त्याला आपल्यासाठी पहारेकरी करतात.
\v 3 तो देशावर तरवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांना सावध करतो.
\v 4 जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तरवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल.
\s5
\v 5 जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपल्या स्वतःचा जीव वाचवील.
\v 6 पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तरवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांना सावध केले नाही, आणि जर तरवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन.
\s5
\v 7 आता, मनुष्याच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.
\v 8 जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्याला बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेल.
\v 9 पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो माणूस त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
\s देवाचा मार्ग न्याय्य आहे
\p
\s5
\v 10 म्हणून हे मनुष्याच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे?
\v 11 त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहिल! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?
\s5
\v 12 आणि मनुष्याच्या मुला, तू तुझ्या लोकांना सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्याला वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही.
\v 13 जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल.
\s5
\v 14 आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले,
\v 15 जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही.
\v 16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल.
\s5
\v 17 पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत!
\v 18 जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल.
\v 19 आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल.
\v 20 पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.”
\s यरुशलेमेच्या पाडावाचे वृत्त
\p
\s5
\v 21 आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरुशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.”
\v 22 तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता, आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने त्याने माझे मुख उघडले होते. म्हणून माझे मुख उघडे होते; मी मुका राहिलो नाही.
\s5
\v 23 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 24 “मनुष्याच्या मुला, जे इस्राएल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलतात व म्हणतात, अब्राहाम फक्त एकच पुरुष होता आणि त्याला या देशाचे वतन मिळाले परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत! देश आम्हाला वतनासाठी दिला आहे.
\s5
\v 25 म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
\v 26 तुम्ही तुमच्या स्वत:च्या तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंगळ गोष्टी करता. प्रत्येक माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला अशुद्ध करतो, तुम्ही खरोखर देश वतन करून घ्या का?
\s5
\v 27 तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तरवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्याला मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत त्यांना मी मरीने मरतील.
\v 28 मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.
\v 29 म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करील. तेव्हा त्यांना समजेल की, मीच परमेश्वर आहे.
\s5
\v 30 आणि, मनुष्याच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या घराच्या दारांत उभे राहून, व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला, व परमेश्वराकडून संदेष्ट्याकडे आलेले वचन जाऊन ऐकू या.
\v 31 म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते.
\s5
\v 32 कारण पाहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा, तंतुवाद्यांवर मधुर आवाजात वाजवणारा, असा तू त्यांना आहे. म्हणून ते तुझे वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत.
\v 33 म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पाहा! हे होईल! मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदेष्टा होता.”
\s5
\c 34
\s इस्त्राएलाच्या मेंढपाळांविषयी भविष्य
\p
\v 1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, इस्राएलाच्या मेंढपाळाविरूद्ध भविष्य सांग! भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्राएलाचे मेंढपाळ स्वत:च चरत आहेत त्यास धिक्कार असो! मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का?
\v 3 तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही.
\s5
\v 4 जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही किंवा तुम्ही आजाऱ्यांना बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही. आणि जे घालवून दिलेले त्याला परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व जुलमाने राज्य करता.
\v 5 मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली आणि त्यांची पांगापाग झाल्यानंतर ते रानातील सर्व जिवंत पशूंचे भक्ष्य बनले.
\v 6 माझा कळप सर्व डोंगरांतून व प्रत्येक उंच टेकड्यांवरुन भटकून गेली, पृथ्वीच्या सर्व पाठीवर पांगविली गेली. तरी त्यांना शोधण्यास कोणीही नव्हते.
\s5
\v 7 म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
\v 8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही.
\s5
\v 9 तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
\v 10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मेंढपाळांच्याविरूद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करीन; मग मेंढपाळ आपणास पुढे पोसणार नाहीत आणि मी आपली मेंढरे त्यांच्यामुखातून सोडवीन, अशासाठी की, माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत.
\s5
\v 11 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,
\v 12 जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन.
\v 13 मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन.
\s5
\v 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
\v 15 मी स्वतः माझा कळप चारीन. आणि मी स्वतः त्यांना पहुडण्याचे असे करीन. असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
\v 16 हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्याला मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन.
\s5
\v 17 आणि प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पाहा, मी मेंढरामेंढरामध्ये, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
\v 18 तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायांनी तुडवता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते का?
\v 19 पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
\s5
\v 20 म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.
\v 21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यत त्यांना तुम्ही भोसकता,
\s5
\v 22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
\v 23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारीन आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यास चारीन; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
\v 24 कारण मी परमेश्वर त्यांचा देव होईन. व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल मी परमेश्वर बोललो आहे.
\s5
\v 25 मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील.
\v 26 मग मी त्यास व डोंगराभोवतालच्या स्थानांस आशीर्वाद असे करीन. कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांचे वर्षाव होतील.
\v 27 नंतर शेतांतली झाडे त्यांचे फळ उत्पन्न करतील. आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढर त्यांच्या देशात सुरक्षित राहतील; मी त्यांच्या जोखडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवले म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे.
\s5
\v 28 यापुढे ते राष्ट्रांसाठी लूट असे होणार नाहीत आणि पृथ्वीवरील वनपशू त्यांना खाऊन टाकणार नाहीत. कारण ते सुखरुप राहतील. व कोणीही त्यांना भयभीत करणार नाही.
\v 29 कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, मग त्यांची पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
\s5
\v 30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 31 कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
\s5
\c 35
\s सेईर पर्वताविषयी भविष्य
\p
\v 1 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, सेईर पर्वताकडे आपले तोंड कर आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
\v 3 त्याला सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड व दहशत करीन.
\s5
\v 4 मी तुझी नगरे उजाड करीन आणि तू स्वतः ओसाड होशील. मग तुला समजेल की मी परमेश्वर आहे.
\v 5 कारण तू इस्राएल लोकांशी नेहमीच शत्रुत्व केले आणि त्यांच्या संकटकाळी, त्यांच्या अन्यायाच्या शिक्षेच्या वेळी तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.”
\v 6 म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, “मी तुला तुझे रक्त पाडण्यासाठी तयार करीन आणि रक्तपात तुझ्या पाठीस लागेल; तू रक्तपाताचा द्वेष केला नाही म्हणून खचित रक्तपात तुझ्या पाठीस लागेल.
\s5
\v 7 मी सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. जेव्हा त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही कापून काढीन.
\v 8 आणि त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी भरीन. तुझ्या उंच टेकड्या व दऱ्या आणि तुझे सर्व प्रवाह जे तरवारीने मारले ते त्यामध्ये पडतील.
\v 9 मी तुला कायमचा ओसाड असे करीन. तुझ्या नगरांतून कोणीही राहाणार नाहीत मग तुला समजेल की, मी परमेश्वर आहे.”
\s5
\v 10 तू म्हणालास, ती दोन राष्ट्रे आणि ही दोन देश माझे होतील आणि आम्ही त्यांचा ताबा घेऊ. तेव्हा तेथे परमेश्वर त्यांच्याबरोबर उपस्थित होता.
\v 11 म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, “तुझ्या क्रोधाप्रमाणे आणि जो तुझा हेवा तू आपल्या द्वेषाने इस्राएलाविरूद्ध प्रगट केला त्याप्रमाणे मी आपले कार्य करीन. आणि मी तुझा न्याय केला म्हणजे मी त्यांना प्रगट होईन.
\s5
\v 12 तू इस्राएलाच्या पर्वताविरूद्ध म्हणालास की ते उध्वस्त झाले आहेत ते आम्हाला खायला दिले आहेत हे सर्व तुझे दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.
\v 13 तुम्ही आपल्या तोंडाने मजविरूद्ध जेव्हा फुशारकी मारली; तुम्ही माझ्याविरूद्ध पुष्कळ गोष्टी बोललात. मी ते ऐकले आहे.”
\s5
\v 14 प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, “सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुझा नाश करीन.
\v 15 इस्राएल लोकांचे वतन ओसाड झाले म्हणीन जसा तुला आनंद झाला होता तसेच मी तुलाही करीन. हे सेईर पर्वता तू ओसाड होशील व संपूर्ण अदोम तो सारा नाश होईल. मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
\s5
\c 36
\s इस्त्राएलाची भावी उर्जिकावस्था
\p
\v 1 आता मनुष्याच्या मुला, तू इस्राएलाच्या पर्वताला भविष्य सांग आणि म्हण, इस्राएलामधील पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
\v 2 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण शत्रू तुमच्याविषयी म्हणतात की, अहा! आणि प्राचीन उंच ठिकाणे आमची मालमत्ता झाली आहे.
\v 3 “म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”
\s5
\v 4 म्हणून, इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वत, व उंच टेकड्या, झरे, व दऱ्या उजाड आणि सोडून दिलेली नगरे यांना असे सांगतो की,
\v 5 “यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.”
\v 6 “म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हाला राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.”
\s5
\v 7 म्हणून, प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी आपला हात उंचावून वचन देतो की, तुमच्या भोवतालची राष्ट्रे खचित अप्रतीष्ठा पावतील.”
\s5
\v 8 “पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल.
\v 9 कारण पाहा, मी तुम्हास अनुकूल आहे, आणि मी तुम्हाकडे वळेल, मग तुम्ही मशागत केलेले, व बी पेरलेले व्हाल.
\s5
\v 10 म्हणून मी तुम्हावर मनुष्याची, इस्राएलाच्या सर्व घराणे, ते सर्वच बहुतपट करीन, आणि नगरे वसतील आणि ओसाड झालेली ठिकाणे पुन्हा उभारली जातील.
\v 11 मनुष्य व पशु यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळ देणारे होतील; पूर्वीच्याप्रमाणे लोक राहू लागतील. आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे.
\v 12 मी मनुष्ये, म्हणजे माझे इस्राएल लोक आणील, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील, आणि तू त्यांच्या मुलांच्या मरणाचे कारण होणार नाहीस.”
\s5
\v 13 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण लोक तुम्हाला म्हणतात, “तू लोकांना खाणारा देश आहेस, आणि तुझ्या देशाची मुले मरत आहेत.
\v 14 यास्तव यापुढे तू लोकांना खाणार नाहीस, आणि पुन्हा तू आपल्या राष्ट्राला त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यास लावणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 15 “किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही आणि किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
\s5
\v 16 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 17 “मनुष्याच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत.
\v 18 म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला.
\s5
\v 19 मी त्यांना राष्ट्रांमध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरुन टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला.
\v 20 मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे.
\v 21 पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो.
\s5
\v 22 म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे.
\v 23 कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.
\s5
\v 24 मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हाला प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हाला तुमच्या देशात आणीन.
\v 25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हाला तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन.
\s5
\v 26 मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन.
\v 27 मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन.
\v 28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल.
\s5
\v 29 कारण मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून व त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही.
\v 30 मी झाडाचे फळ आणि शेतांचे उत्पादन वाढवीन याकरिता की, राष्ट्रांमध्ये तुम्हाला दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही.
\v 31 मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत:चाच द्वेष कराल.
\s5
\v 32 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरीता हे करत नाही, हे तुम्हाला माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा.
\v 33 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हाला तुमच्या सर्व अन्यायापासून शुद्ध करीन त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील.
\v 34 कारण जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना, ओसाड दिसत होती, ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
\s5
\v 35 ते म्हणतील, ‘ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत.
\v 36 मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना समजेल की, मी परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे बांधून काढोत व ओसाड जमिनीत मी लागवड केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो व ते मी करीनच.
\s5
\v 37 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांनी वाढ करीन.
\v 38 पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरुशलेमेतील सणाचा कळप असतात त्याप्रमाणे ओसाड नगरे लोकांच्या कळपांनी भरून जातील; मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
\s5
\c 37
\s शुष्क अस्थींचे खोरे
\p
\v 1 परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती.
\v 2 मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती.
\v 3 तो मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.”
\s5
\v 4 मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांना परमेश्वराचे वचन ऐका.
\v 5 प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालीन व तुम्ही जिवंत व्हाल.
\v 6 मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हाला त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”
\s5
\v 7 म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली.
\v 8 मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.
\s5
\v 9 मग परमेश्वर मला म्हणाला, “वाऱ्याला भविष्य सांग मनुष्याच्या मुला, वाऱ्याला भविष्य सांग आणि वाऱ्याला म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.”
\v 10 मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले.
\s5
\v 11 आणि देव मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हाला आशा राहिलेली नाही. आम्हाला नाशासाठी कापून टाकले आहे.
\v 12 म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हाला इस्राएलाच्या भूमीत परत आणीन.
\s5
\v 13 माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हाला बाहेर काढीन तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे.
\v 14 मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
\s यहूदा व इस्त्राएल ह्यांच्या समेटाविषयी भविष्य
\p
\s5
\v 15 मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 16 तर “मनुष्याच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहचरी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहचरी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.
\v 17 मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील.
\s5
\v 18 जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हाला सांगणार नाहीस काय?
\v 19 मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहचरी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील.
\v 20 नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर.
\s5
\v 21 मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांना ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.
\v 22 मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही.
\v 23 मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
\p
\s5
\v 24 दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील.
\v 25 जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहात होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईल.
\s5
\v 26 मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन आणि बहुगुणीत करीन व मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन.
\v 27 माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
\v 28 जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
\s5
\c 38
\s गोगबाबत भविष्य
\p
\v 1 परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
\v 2 “मनुष्याच्या मुला, मागोग देशातील, गोग, जो रोश, मेशेख व तुबाल यांचा अधिपती याजकडे तोंड कर. आणि त्याच्याविरुध्द भविष्य सांग.
\v 3 म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘अरे गोगा, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती, पाहा! मी तुझ्याविरूद्ध आहे.
\s5
\v 4 म्हणून मी तुला पाठमोरा करीन आणि तुझ्या जाभाडात आकडा घालीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व घोडेस्वार यास बाहेर काढीन; ते सर्वजण पूर्ण चिलखत घालून, मोठ्या व लहान ढाली धारण केलेला, त्यासर्वांनी तरवारी धरलेला असा मोठा समुदाय मी पाठवीन.
\v 5 पारस, कूश व पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरस्राणे धारण करून त्यांच्याबरोबर आहेत.
\v 6 त्याचप्रमाणे गोमर आणि त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेचा देश तोगार्माचे घराणे व त्याचा सेनासमूह, तसेच अनेक लोक तुजसह बाहेर काढीन.
\s5
\v 7 “सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हाला येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.
\v 8 पुष्कळ दिवसानंतर तुम्हाला बोलविण्यात येईल. जो देश तरवारीपासून घेतलेला आहे व पुष्कळ राष्ट्रांतील लोकांपासून मिळवलेला आहे, त्यामध्ये इस्राएलाचे पर्वत सर्वदा ओसाड होत असत त्यावर तू शेवटल्या वर्षामध्ये येशील; तथापि तो देश लोकांतून काढून घेतलेला आहे आणि ते सर्व निर्भय राहतील
\v 9 म्हणून तू चढून येशील, तू वादळासारखा येशील. देशाला झाकणाऱ्या ढगासारखा तू होशील, तू आणि तुझ्याबरोबरचे सैन्य व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही त्यासारखे व्हाल.”
\s5
\v 10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, त्यादिवसात असे होईल की, तुझ्या मनात योजना येतील, तू वाईट युक्तिचा नवीन मार्ग आखशील.
\v 11 मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यत जाईल; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.
\v 12 अशासाठी की, तू लूट करावी व शिकार धरावी, आणि जी उजाड स्थाने वसली आहेत त्यावर, व जे लोक राष्ट्रांमधून एकवटलेले आहेत, ज्यांनी गुरे व धन ही प्राप्त करून घेतली आहेत, जे पृथ्वीच्या मध्यभागी वसतात त्यांच्यावरही तू आपला हात चालवावा.
\s5
\v 13 “शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हाला तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”
\s5
\v 14 म्हणून हे मनुष्याच्या मुला, गोगाला भविष्य सांग, “प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ‘त्या दिवसात जेव्हा माझे इस्राएल लोक सुरक्षीत राहतील, तेव्हा तुला हे कळणार नाही का?
\v 15 तू आपल्या स्थानातून अगदी उत्तरेकडच्या दूरच्या प्रदेशातून मोठ्या सैन्याने, त्यातील सर्व घोड्यांवर स्वार होऊन मोठा समुदाय व विशाल सैन्य असे येतील.
\v 16 “तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढण्यासाठी मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे. मी तुला काय करील ते ते पाहातील.”
\s5
\v 17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्यावेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांना आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलाच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आणिन असे इस्राएलाच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
\v 18 म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करील त्या दिवसात असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
\s5
\v 19 कारण मी आपल्या रागाच्या भरात आवेशाने व आपल्या क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे. इस्राएल देशामध्ये त्या दिवशी खचित मोठा भूकंप होईल.
\v 20 त्यावेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
\s5
\v 21 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपल्या सर्व पर्वतावर त्याच्याविरुध्द तरवार बोलावीन. प्रत्येक माणसाची तरवार आपल्या भावाविरूद्ध चालेल.
\v 22 आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
\v 23 मग मी आपला महिमा व पवित्रता दाखवून देईल आणि माझी ओळख पुष्कळ राष्ट्रांना करून देईल; तेव्हा त्यास समजेल की परमेश्वर आहे.
\s5
\c 39
\p
\v 1 आता “मनुष्याच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे.
\v 2 मी तुला वळविन आणि मी तुला पुढे नेईन; अति उत्तरेकडून मी तुला परत आणीन आणि इस्राएलाच्या पर्वंतांशी आणीन.
\v 3 मग मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य उडवून देईन; व तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
\s5
\v 4 तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हाला पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन.
\v 5 तू शेतातील पृष्टभागावर मरून पडशील कारण मी हे बोललो आहे. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 6 मग मी, मागोगामध्ये व किनाऱ्यावर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी अग्नी पाठवीन. मग त्यांना समजेल ‘मी परमेश्वर आहे.
\s5
\v 7 कारण मी माझ्या इस्राएल लोकांमध्ये माझे पवित्र नाव माहीत करून देईन. आणि मी यापुढे आपले पवित्र नाव पुन्हा भ्रष्ट होऊ देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
\v 8 पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे.
\s5
\v 9 “तेव्हा इस्राएलात राहणारे बाहेर निघून आणि ते शस्त्रास्त्रे, लहान ढाली, मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, गदा व भाले यांना आग लावून जाळतील. ते सरपण म्हणून सात वर्षे जाळत राहतील.
\v 10 त्यामुळे त्यांना रानातून लाकडे गोळा करावी लागणार नाही किंवा जंगलातून लाकडे तोडावी लागणार नाही. तर ही शस्त्रांस्त्रे ते जाळतील. त्यास ज्यांनी लुटले त्यास ते लुटतील. ज्या कोणी त्यांच्याकडून घेतले ते त्याजकडून घेतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 11 मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान देईल. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्याला ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील.
\s5
\v 12 देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल.
\v 13 कारण देशातील सर्व लोक त्यांना पुरतील. मी जेव्हा गौरविला जाईन तो दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय होईल.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 14 “हे काम नेहमी करणाऱ्या मनुष्यांना वेगळे करून नेमतील, आणि ते देश शुद्ध व्हावा म्हणून देशातून येथून तेथून जातील; जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांस पुरतील; सात महिने झाल्यावर ते शोधाला लागतील.
\v 15 शोध करणारे देशातून फिरत कोणाला मनुष्याचे अस्थि दिसताच, तो तेथे खूण करून ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या अस्थिला हमोन गोगाच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
\v 16 तेथल्या नगराचे नाव हमोना असे होईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
\s5
\v 17 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मनुष्याच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहाकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.
\v 18 तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत.
\s5
\v 19 कापलेल्या पशूंचा हा माझा यज्ञ मी तुम्हासाठी केला आहे. मग तुमची तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल. त्याचे रक्त तुम्ही मस्त होईपर्यंत प्याल.
\v 20 माझ्या मेजावर बसून तुम्हाला तेथे घोडे, रथ, योद्धे आणि प्रत्येक लढणारा माणूस यांस खाऊन तुमची तृप्ती होईल.” प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 21 “मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोहि ते सर्व राष्ट्रे पाहतील.
\v 22 मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
\s5
\v 23 आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तरवारीने पडले.
\v 24 मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे मी त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.”
\s5
\v 25 म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांना बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहिन.
\v 26 मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील.
\v 27 मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल.
\s5
\v 28 नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्याना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोजून देणार नाही.
\v 29 मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही. जेव्हा मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 40
\s संदेष्ट्याला मंदिराचा दृष्टान्त
\p
\v 1 आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षात, वर्षाच्या आरंभी, महिन्याच्या दहाव्या दिवशी नगर काबीज झाल्यानंतर चौदाव्या वर्षी, त्याच दिवशी परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले.
\v 2 दृष्टांतात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्यावर दक्षिणेकडे नगराची इमारतीसारखे काही होते.
\s5
\v 3 मग त्याने मला तेथे आणले. पाहा तेथे पितळेच्या रूपासारखे होते, असा एक माणूस होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती. व तो वेशीजवळ उभा होता.
\v 4 तो माणूस मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.”
\s5
\v 5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात लांब होती. हे माप एक हात व चार अंगुले होते. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक काठी भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक काठी भरली.
\v 6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक काठी रुंद होता. दुसरा उंबरठाही तेवढाच रुंद होता.
\v 7 चौकीदाराची खोली एक काठी लांब व रुंदी एक काठी होती. आणि दोन खोल्यांच्या मधील अंतर पाच हात होते. मंदिरासमोरच्या द्वाराच्या द्वारमंडपाजवळील दाराचा उंबरठा एक काठी होता.
\s5
\v 8 मग त्याने मंदिरासमोरच्या द्वाराचा द्वारमंडप एक काठी मोजला.
\v 9 मग त्याने द्वाराचा द्वारमंडप आठ हात लांब भरला. आणि दोन खांब दोन हात मापले, आणि द्वाराचा द्वारमंडप मंदिरासमोर होता.
\v 10 पूर्वेकडील द्वाराच्या या बाजूला व त्या बाजूला तीन तीन चौक्या होत्या. त्या तिन्हीचे माप सारखेच असून दोन्ही बाजूचे खांबही एकाच मापाचे होते.
\s5
\v 11 त्या माणसाने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात आणि द्वाराची लांबी तेरा हात होती.
\v 12 त्या चौकांच्या पुढची जागा एका बाजूला एक हात व दुसऱ्या बाजूला एक हात होती. त्या चौक्या दोन्ही बाजूंना सहा सहा हात होत्या.
\v 13 त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंतचे दाराचे मोजमाप केले ते दाराला दार धरून पंचवीस हात रुंदी भरली.
\s5
\v 14 त्याने साठ हात खांब केले. अंगण खांबापर्यत द्वाराभोवती होते
\v 15 प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या द्वारमंडपाच्या मुखापर्यत पन्नास हात होते.
\v 16 त्या चौक्यांना बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान अरुंद खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
\s5
\v 17 मग त्या माणसाने मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आणले. पाहा, तेथे अंगणाच्या सर्व बाजूंना खोल्या असून पदपथ केला होता. पदपथावर तीस खोल्या होत्या.
\v 18 द्वारांच्या दोन्ही बाजूस द्वाराच्या लांबी इतकाच पदपथ रुंद होता. ती खालचा पदपथ होता.
\v 19 मग त्या माणसाने खालच्या द्वाराच्या मुखापासून अंगणाच्या मुखापासून बाहेरून पूर्वेला शंभर हात आणि उत्तरेला शंभर हात असे मोजले.
\s5
\v 20 मग त्याने बाहेरच्या अंगणाचे जे द्वार उत्तरेकडे होते त्याची लांबी व रुंदीही मोजली.
\v 21 त्याच्या चौक्या या बाजूला तीन व त्या बाजूला तीन होत्या; त्यांचे खांब आणि कमानी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होती; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
\s5
\v 22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्या, व त्याच्या कमानी व त्यांची खजुरीची झाडे द्वारमंडप मापाच्या होत्या. द्वाराला सात पायऱ्या होत्या त्याने लोक त्यामध्ये चढून जात असत व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या.
\v 23 आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारासमोर उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मोजले.
\s5
\v 24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तो तेथे दक्षिणेकडे एक द्वार होते. त्याने त्यांचे खांब व त्यांच्या कमानी यांच मापल्या त्या पूर्वीच्या इतक्याच भरल्या.
\v 25 आणि त्याला व त्याच्या कमानीस सभोवार याच खिडक्यांसारख्या खिडक्या होत्या; लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात होते.
\s5
\v 26 आणि त्यावर चढून जाण्यासाठी सात पायऱ्या होत्या व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या आणि त्याला त्याच्या खांबावर खजुरीची झाडे, एक या बाजूला व एक त्या बाजूला अशी होती.
\v 27 आणि आतल्या अंगणाच्या दक्षिणेला एक दार होते आणि त्याने एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यत दक्षिणेकडे शंभर हात मापले.
\s5
\v 28 मग त्याने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले, दक्षिणेकडचे दार या मापाप्रमाणे मापले.
\v 29 त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यावरल्या कमानी ही मापली, ती तेवढीच भरली; त्याला व सभोवतालच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात भरली.
\v 30 त्याला सभोवार कमानी होत्या. त्या एकंदर पंचवीस हात लांब, व पाच हात रूंद होत्या.
\v 31 त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरली होती. त्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या.
\s5
\v 32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणून त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापासारखेच होते.
\v 33 त्याच्या चौक्या, खांब, व कमानी या मापाप्रमाणे त्याने मापल्या; आणि त्याला व कमानीसभोवार खिडक्या होत्या; ते पन्नास हात लांब व पंचवीस हात रुंद होते.
\v 34 त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाकडे होत्या; आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती आणि त्याच्या चढणीस आठ पायऱ्या होत्या.
\s5
\v 35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
\v 36 त्याच्या चौकीच्या खोल्या, त्याचे खांब व त्याच्या कमानी त्याने मापल्या; त्याला सभोवार खिडक्या होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
\v 37 आणि त्याचे खांब बाहेरच्या अंगणाकडे होते आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती; त्याच्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या.
\s5
\v 38 द्वारापाशी खांबाला लागून एकएक खोली असून तिला दार होते. तेथे होमाबलि धूत असत.
\v 39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन मेजे होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यासाठी आणलेले पशू कापीत असत.
\s5
\v 40 बाहेरच्या बाजूस, उत्तरेकडच्या दाराच्या प्रवेशाकडे चढण्याच्या वाटेवर, दोन मेजे होती आणि जे दुसऱ्या बाजूस द्वाराच्या द्वारमंडपाकडे होते त्या तेथेही दोन मेजे होती.
\v 41 द्वाराच्या बाजूस या बाजूला बाजूस चार मेजे व त्या बाजूस चार मेजे अशी आठ मेजे होती; त्या आठ मेजावर प्राण्यांना कापीत असत.
\s5
\v 42 आणि होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार मेजे होती. ती दीड हात लांब आणि दीड हात रुंद व एक हात उंच होती. ज्या हत्यारांनी होमबलि व यज्ञपशु कापीत ती या मेजावर ठेवीत असत.
\v 43 सर्व मंदिरात एक वीत लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस मेजावर ठेवीत असत.
\s5
\v 44 आतल्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे आतले अंगण उत्तरेकडच्या द्वाराच्या बाजूस होते त्यामध्ये गायकांच्या खोल्या होत्या; त्यांची तोंड दक्षिणेकडे होते; एक पूर्वेकडील द्वाराच्या बाजूस होती, तिचे तोंड उत्तरेकडे होते.
\v 45 मग तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात कामावर असलेल्या याजकाकरिता आहे.
\s5
\v 46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सादोकाचे वंशज आहेत, ते लेवीच्या वंशजातून परमेश्वराजवळ त्याची सेवा करायला येतात.”
\v 47 त्याने अंगण शंभर हात लांब व शंभर हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती.
\s5
\v 48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत पाच हात जाड आणि तीन हात रुंद होती. प्रवेशद्वाराची रुंदी चवदा हात होती.
\v 49 द्वारमंडपाची लांबी वीस हात व अकरा हात रुंदी होती. ज्या पायऱ्यांनी लोक त्यावर चढत असत त्यावरून मला नेले, द्वाराच्या खांबापाशी खांब, या बाजूला एक व त्या बाजूला एक असे होते.
\s5
\c 41
\p
\v 1 नंतर त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.
\v 2 दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पांच हात व दुसरी पांच हात होती; मग माणसाने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
\s5
\v 3 मग तो माणूस परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.
\v 4 मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”
\s5
\v 5 मग माणसाने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्याप्रत्येकाची रुंदी चार हात होती.
\v 6 तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.
\v 7 आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
\s5
\v 8 मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.
\v 9 बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी पांच हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती.
\s5
\v 10 या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याजकासाठी बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूंनी वीस हात अंतर होते.
\v 11 बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होते. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.
\s5
\v 12 मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.
\v 13 मग त्या माणसाने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.
\v 14 मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.
\s5
\v 15 नंतर त्या माणसाने मंदिराच्यामागे असलेल्या त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे, पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व शंभर हात मोजली.
\v 16 तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.
\v 17 मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.
\s5
\v 18 आणि ते करुब आणि खजुरीच्या झाडांनी सजवलेली होते. प्रत्येक दोन करुबामध्ये एक खजूराचे झाड होते. आणि प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
\v 19 करूबाला एका खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चोहोंकडे अशाप्रकारचे काम होते.
\v 20 जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.
\s5
\v 21 मंदिराच्या द्वारांचे खांब चौरस होते. परमपवित्रस्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते.
\v 22 पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या माणसाने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
\v 23 पवित्र स्थानाला आणि परमपवित्रस्थानाला दोन दोन दारे होती.
\v 24 प्रत्येक दरवाजाला दोन व दुसऱ्यास दोन अशा प्रत्येक तावदानाला दोन दोन बिजागऱ्या होत्या.
\s5
\v 25 जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.
\v 26 द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्याला पुढे आलेले छतही होते.
\s5
\c 42
\p
\v 1 नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.
\v 2 शंभर हात लांबीच्यासमोर तिच्या उत्तरेकडचा प्रवेश होता आणि इमारतीची रुंदी पन्नास हात होती.
\v 3 आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.
\s5
\v 4 खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.
\v 5 पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.
\v 6 कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.
\s5
\v 7 आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या अंगणापर्यंत गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.
\v 8 कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.
\v 9 या खोल्यांच्या खालून पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.
\s5
\v 10 अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.
\v 11 उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्यासमोरहि रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.
\v 12 उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.
\s5
\v 13 मग तो माणूस मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.
\v 14 जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”
\s5
\v 15 आतील मंदिराच मोजमाप करून झाल्यावर त्या माणसाने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.
\s5
\v 16 त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापला.
\v 17 त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती मापण्याच्या काठीने पाचशे हात भरली.
\v 18 त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
\v 19 मग तो वळलाही आणि पश्चिमेची बाजू मोजली, मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
\s5
\v 20 त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्याला सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.
\s5
\c 43
\s परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरते
\p
\v 1 नंतर त्या माणसाने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले.
\v 2 तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
\s5
\v 3 आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो.
\v 4 जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले.
\v 5 मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
\s5
\v 6 मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो माणूस माझ्या शेजारीच उभा होता.
\v 7 तो मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
\v 8 त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारीले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लाविला आहे. म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे.
\s5
\v 9 आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी. म्हणजे मी सर्वकाळ त्यांच्यात राहीन.
\s वेदीसंबंधी नियम
\p
\s5
\v 10 मनुष्याच्या मुला, तू इस्राएलाच्या घराण्याला हे घर दाखीव, अशासाठी की, त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे; त्यांनी त्यांच्या वर्णनाविषयी विचार करावा.
\v 11 कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे.
\s5
\v 12 हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे.
\s5
\v 13 हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय.
\v 14 तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत चार हात व दोन हात रुंद होती.
\s5
\v 15 वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात होती. वेदीच्या अग्नीकुंडाला लागून वर गेलेली चार शिंगे होती.
\v 16 वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.
\v 17 तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात होता उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
\s5
\v 18 पुढे तो मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, प्रभू परमेश्वर, म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत.
\v 19 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पार्पणासाठी एक गोऱ्हा दे.
\s5
\v 20 तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून तू शुद्ध कर.
\v 21 मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे.
\s5
\v 22 नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याजकांनी ती शुद्ध करावी.
\v 23 जेव्हा तू तिचे शुध्दिकरण समाप्त करशील कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील.
\v 24 तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील.
\s5
\v 25 तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेहि अर्पण करावे.
\v 26 सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.
\v 27 आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
\s5
\c 44
\s मंदिरातील सेवा
\p
\v 1 नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
\v 2 परमेश्वर मला म्हणाला, “हे दार बंद केलेले राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही माणूस जाणार नाही. कारण परमेश्वर इस्राएलाचा देव यातून आत गेला आहे; म्हणून ते बंद केलेले राहिल.
\v 3 इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”
\s5
\v 4 मग त्याने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. म्हणून मी पाहिले व पाहा! परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते. आणि मी उपडा पडलो.
\v 5 मग परमेश्वर मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधि व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
\s5
\v 6 मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही केलेली सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हाला पुरेशी होवो;
\v 7 कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पिताना जे मनाने व शरीरानेहि बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.
\s5
\v 8 तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण जबाबदारीने केली नाही, तर तुम्ही आपणासाठी माझ्या पवित्रस्थानाची काळजी घेण्याचे काम दुसऱ्याला दिले.”
\v 9 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.
\s5
\v 10 जेव्हा इस्राएल भरकटून दूर गेले, तेव्हा लेवीं माझ्यापासून दूर गेले, जे माझ्यापासून भरकटून दूर आपल्या मूर्तीच्या मागे गेले, आता ते आपल्या पापासाठी किंमत देतील.
\v 11 ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.
\v 12 पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 13 म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, जे परमपवित्र वस्तु आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.
\v 14 पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.
\s5
\v 15 आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाच्या वंशजानी माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 16 ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.
\s5
\v 17 ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
\v 18 त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.
\s5
\v 19 जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.
\s5
\v 20 त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.
\v 21 आतल्या अंगणात जाताना कोणत्याहि याजकाने द्राक्षारस पिऊ नये.
\v 22 कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारिकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची बायको होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.
\s5
\v 23 कारण ते माझ्या लोकांना “शिक्षण द्यावे. पवित्र व सामान्य, आणि शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक त्यास दाखवून देतील.
\v 24 वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.
\s5
\v 25 मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.
\v 26 याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.
\v 27 मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्रस्थानातील सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, त्यादिवशी त्याने आपले पापार्पण करावे.” असे प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 28 आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.
\v 29 त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तु त्यांची व्हावी.
\s5
\v 30 सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तु याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.
\v 31 पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.
\s5
\c 45
\s जमिनीची विभागणी व खरी वजने व मापे
\p
\v 1 जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वराला अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात व रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल.
\v 2 यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.
\s5
\v 3 त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ.
\v 4 जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल.
\v 5 म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वसतीसाठी हे त्यांचे वतन होय.
\s5
\v 6 अर्पिलेला पवित्र प्रदेशसुद्धा तुम्ही पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल; तो इस्राएलाच्या सर्व घराण्याला होईल.
\v 7 “अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल.
\s5
\v 8 ही जमीन इस्राएलात अधिपतीचे वतन व्हावी म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर त्याऐवजी इस्राएल घराण्याला त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी.
\s5
\v 9 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\v 10 तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा.
\v 11 एफा व बाथ सारख्याच मापाचे असावे. याकरिता बथ होमराचा दहावा भाग; तशीच एफाहि होमराचा दहावा भाग; या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या.
\v 12 शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा.
\s अर्पणे व सण
\p
\s5
\v 13 तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.
\v 14 तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत;
\v 15 आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 16 देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत.
\v 17 उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी.
\s5
\v 18 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी, तू निर्दोष तरुण गोऱ्हा घेऊन पवित्रस्थानाची शुद्धी कर.
\v 19 तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.”
\v 20 पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे.
\s5
\v 21 पहिल्या महिन्यात, महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्हाला सात दिवसाचा वल्हांडण सण होईल, त्यामध्ये बेखमीर भाकर खावी.
\v 22 त्यादिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी एक गोऱ्हा सिद्ध करील.
\s5
\v 23 परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोऱ्हे व सात मेंढे सिद्ध करावे आणि पापर्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा.
\v 24 मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील. पापार्पण म्हणून बैल देईल.
\s5
\v 25 सातव्या महिन्यात, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, सणात, सात दिवसपर्यत तो पापबलि, होमबलि, अन्नबलि आणि तेल ही याप्रमाणेच सिद्ध करील.
\s5
\c 46
\p
\v 1 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल.
\v 2 अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वराला दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यत बंद केले जाणार नाही.
\s5
\v 3 देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.
\v 4 शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वराला जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे.
\v 5 त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीन तेल अर्पावे.
\s5
\v 6 नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावी.
\v 7 त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
\v 8 जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे.
\s5
\v 9 पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.
\v 10 आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर यावे.
\s5
\v 11 सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे.
\v 12 जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमाबली वा शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.
\s5
\v 13 “परमेश्वराला रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.
\v 14 आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वराला करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.
\v 15 याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.”
\s5
\v 16 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे.
\v 17 पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.
\v 18 आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक माणूस आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.”
\s5
\v 19 मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.
\v 20 तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांना पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात बाहेर जाऊ नये.”
\s5
\v 21 मग मला त्याने बाहेरच्या अंगणात बाहेर आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.
\v 22 अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
\v 23 त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
\v 24 तो माणूस मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”
\s5
\c 47
\s मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायक पाणी
\p
\v 1 मग त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.
\v 2 म्हणून त्याने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. तो पाहा, पाणी दाराच्या दक्षिणेकडून वाहत होते.
\s5
\v 3 जसा तो माणूस हातात मापनसूत्र घेऊन पूर्वेला जात होता. त्याने एक हजार अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला सांगितले. तो पाणी घोट्यापर्यंत होते.
\v 4 मग त्याने आणखी एक हजार हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. आणि आणखी हजार हात अंतर मोजून मला पाण्यातून चालावयास लावले तो तेथे पाणी कमरेपर्यत होते.
\v 5 त्यानंतर त्याने आणखी हजार हात अंतर मोजले तो त्या नदीतून मला चालता येईना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून पार जाता आले नसते. इतकी खोल ती होती.
\s5
\v 6 तो माणूस मला म्हणाला, “मनुष्याच्या मुला, तू हे पाहिले ना?” आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
\v 7 जसा मी परत आलो तेव्हा पाहा, नदीच्या तीरांवर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसहि पुष्कळ झाडी असलेली पाहिली.
\v 8 तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेप्रदेशाकडे वाहत जाते. आणि तेथून अराबात उतरून क्षारसमुद्राला मिळते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते.
\s5
\v 9 मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते.
\v 10 तिच्या तीरी कोळी उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्या क्षारसमुद्रात अनेक प्रकारांप्रमाणे विपुल मासे होतील.
\s5
\v 11 पण दलदल आणि पाणथळीच्या जागा निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासाठी होतील.
\v 12 नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारची झाडे वाढतीत. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाहीत. त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाने औषधी होतील.”
\s जमिनीची वाटणी व सरहद्दी
\p
\s5
\v 13 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्राएलाच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल, तेव्हा योसेफाला दोन भाग मिळतील.
\v 14 आणि तुम्ही, प्रत्येक माणूस आणि तुमच्यातील बंधु यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पूर्वजांना द्यावा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्या वतनाचे सारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल.
\s5
\v 15 जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला मोठ्या समुद्रापासून, हेथलोनच्या वाटेने हमाथकडे सदादाच्या सीमेपर्यत,
\v 16 हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क व हमाथाच्या सीमेवरील सिब्राईम, व हौरानच्या सीमेवरील मध्यहासेर.
\v 17 समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गांव हसर-एनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमाथ ही सीमा. ही बाजू उत्तर झाली.
\s5
\v 18 पूर्वेला सीमारेषा हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश याच्यामधून गेलेली यार्देन नदी.
\v 19 मग दक्षिण बाजू, तामारपासून पार मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यत व तेथून मिसरच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्यासमुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली.
\v 20 पश्चिमबाजू दक्षिण सीमेपासून हमाथाच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल; ही पश्चिम बाजू आहे.
\s5
\v 21 “याप्रकारे तुम्ही हा देश आपसांत इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटून द्या.
\v 22 तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलाच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही या लोकांना द्यावा.
\v 23 हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
\s5
\c 48
\p
\v 1 ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.
\v 2 दानाच्या दक्षिण सीमेपाशी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यत एक विभाग तो आशेराचा.
\v 3 आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नफतालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यत पसरलेला.
\s5
\v 4 नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यतचा विस्तारीत प्रदेश.
\v 5 मनश्शेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यत तो एफ्राईमाचा.
\v 6 एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यत एक विभाग रऊबेनाचा.
\v 7 रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा.
\s5
\v 8 यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.
\v 9 तुम्ही जो प्रदेश परमेश्वराला अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.
\s5
\v 10 पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
\v 11 सादोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली, त्यांच्यासाठी तो होईल. जेव्हा इस्राएली लोक बहकून गेली तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत. इस्राएलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत.
\v 12 त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.
\s5
\v 13 याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.
\v 14 त्यांनी या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु नये. इस्राएल देशातील कोणतेही प्रथमफळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये. कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.
\s5
\v 15 उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोग होईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.
\v 16 नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.
\s5
\v 17 नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.
\v 18 आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.
\s5
\v 19 सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.
\v 20 सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे.
\s5
\v 21 “तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हा त्याच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.
\v 22 ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
\s5
\v 23 आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.
\v 24 बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यत तो शिमोनाचा विभाग.
\v 25 शिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यत तो इस्साखाराचा विभाग.
\v 26 इस्साखाराच्या सीमेपाशी पूर्वबाजूस पश्चिमबाजूपर्यत तो जबुलूनाचा विभाग.
\s5
\v 27 जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यत, गादाला एक विभाग.
\v 28 गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.
\v 29 ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
\s नगराच्या वेशी व त्यांची नावे
\p
\s5
\v 30 ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.
\v 31 नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
\v 32 पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
\s5
\v 33 दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
\v 34 पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
\v 35 ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव याव्हे शाम्मा म्हणजे तेथे परमेश्वर आहे असे पडेल.

796
27-DAN.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,796 @@
\id DAN
\ide UTF-8
\h दानीएल
\toc1 दानीएल
\toc2 दानीएल
\toc3 dan
\mt1 दानीएल
\s5
\c 1
\p
\v 1 यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरुशलेमेला वेढा दिला.
\v 2 परमेश्वराने नबुखद्रेनेस्सर राजास यहूदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्याला परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या त्याने त्या शिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तु त्याने त्याच्या देवाच्या भांडारात ठेवल्या.
\p
\s5
\v 3 राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्राएलाचे काही लोक, जे राज कुळातले आणि उच्चकुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेवून ये.
\v 4 ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप, सुरुप, कौशल्यपुर्णतेने चतुर, ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तीवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खास्द्यांची शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्याला सांगितले.
\v 5 राज्याच्या मिष्ठान्नातून व तो पीत असे त्या द्राक्षरसातून तो त्यांचा रोज वाटा नेमून दिला. असे त्या तरुणांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांनी राजाची सेवा करावी.
\p
\s5
\v 6 त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते.
\v 7 प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.
\p
\s5
\v 8 पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षारसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये.
\v 9 आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले.
\v 10 प्रमुख अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझा स्वामी, राजांचे भय आहे त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याची आज्ञा केली आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे? तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकले.”
\p
\s5
\v 11 मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला.
\v 12 तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे.
\v 13 नंतर आमचे बाहयरुप व त्या तरुणांचे बाहयरुप व जे राजाचे मिष्ठान्न खात आहेत त्या तरुणांचे बाह्यरुप, त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर.”
\p
\s5
\v 14 मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला दहा दिवसानी त्याने त्यांची पाहणी केली.
\v 15 दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले.
\v 16 मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षारस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले.
\p
\s5
\v 17 मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत.
\v 18 राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखदनेस्सर राजासमोर घेऊन आला.
\p
\s5
\v 19 राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले.
\v 20 ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते, सर्व जादूगार, भुतविद्या करणारे हयांच्यापेक्षा ते दहापट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले.
\v 21 कोरेश राजाच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानीएल तेथे राहीला.
\s5
\c 2
\p
\v 1 नबुखदनेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्याला स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही.
\v 2 तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले.
\p
\s5
\v 3 राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकुळ झाले आहे.”
\v 4 तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराजा चिरायु असतो! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हाला प्रगट करू!”
\p
\s5
\v 5 राजाने खास्दी लोकांना उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील.
\v 6 पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हाला माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.”
\p
\s5
\v 7 ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
\v 8 राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हाला ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे.
\v 9 पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”
\p
\s5
\v 10 खास्दी लोकांनी राजास उत्तर केले, “या जगात असा कोणताच मनुष्य नाही जो राजाची ही मागणी पूर्ण करेल असा कोणताच महान आणि प्रतापी राजा नाही ज्याने असे मागणे ज्योतिषी, भुतविद्या जाणणारे आणि ज्ञानी लोकांना केली असेल.
\v 11 महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.”
\p
\s5
\v 12 हे ऐकून राजा रागाने संतापला आणि त्याने आज्ञा केली की, बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा.
\v 13 हे फर्मान निघाले म्हणून जे त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जात होते त्यास मरणास सामोरे जावे लागणार होते, आणि लोक दानीएल आणि त्यांचा मित्रांना शोधू लागले यासाठी की, त्यांचा घात करावा.
\p
\s5
\v 14 तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांचा घात करायला निघाला होता, त्याला दुरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला.
\v 15 दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले.
\v 16 मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्याला महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”
\p
\s5
\v 17 तेव्हा दानीएललाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांना ती गोष्ट कळवली,
\v 18 त्याने त्यांना विनंती केली की, या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे म्हणजे बाबेलाच्या इतर ज्ञान्यांसोबत त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा घात होऊ नये.
\p
\s5
\v 19 त्या रात्री दानीएलास दृष्टांताद्वारे, या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्याने स्वर्गीय देवाचे स्तवन केले.
\v 20 आणि तो म्हणाला,
\q “देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो,
\q कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.”
\q
\s5
\v 21 तो समय आणि ऋतु बदलतो,
\q तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो
\q तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.
\q
\v 22 तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो
\q कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो,
\q आणि प्रकाश त्यामध्ये वसतो.
\q
\s5
\v 23 माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तव करतो
\q कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले
\q आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानते व तुझी स्तुती करतो,
\q कारण तू राजाची गोष्ट आम्हाला कळविली आहे.
\p
\s5
\v 24 हे सगळे झाल्यानंतर दानीएल ज्याची नेमणूक राजाने बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा वध करण्यास ज्याची नेमणूक केली होती त्या अर्योकाकडे जाऊन म्हणाला, “बाबेलाच्या ज्ञानी लोकांना ठार करु नको, तर मला राजासमोर घेऊन जा म्हणजे मी त्याला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगेन.”
\p
\s5
\v 25 नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.”
\v 26 राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?”
\p
\s5
\v 27 दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही.
\v 28 तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा;
\p
\s5
\v 29 आपण जसे बिछान्यात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास पुढे होणारी घटना कळविली.
\v 30 आता माझी गोष्ट, ती अशी की, हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर माणसांपेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा जो आपल्याला गहन विचारात आहे.
\p
\s5
\v 31 राजा आपण, आपल्या डोळ्यापुढे एक मोठा पुतळा पाहिला हा पुतळा शक्तीशाली आणि तेजोमय असा तुमच्यासमोर उभा राहिला, त्याचे तेज भयावह होते.
\v 32 त्या पुतळ्याचे डोके उत्तम सोन्याचे होते, त्याची छाती व हात चांदीचे होते, त्यांचा मधला भाग आणि मांडया पितळेच्या.
\v 33 आणि त्याचे पाय लोखंडाचे होते त्याची पावले काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होती.
\p
\s5
\v 34 तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा माणसाचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले.
\v 35 त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हायाळ्यातील खेळ्यातल्या भुश्याप्रमाणे झाले. वारा त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळयावर आदळला होता त्यांचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
\p
\s5
\v 36 हे आपले स्वप्न आहे राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो.
\v 37 राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे.
\v 38 त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे माणसे राहतात. त्याने तुमच्या आधीन वनपशू आणि आकाशातील पक्षी केले आहेत आणि तुम्हाला त्याचा शासक बनविले आहे, तुम्ही त्या पुतळ्याचे सुवर्ण मस्तक आहात.
\p
\s5
\v 39 आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल, आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील.
\p
\s5
\v 40 तेथे चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत लोखंड तुकडे करतो हे त्यांचे तुकडे करून त्यांचा भुगा करील.
\p
\s5
\v 41 जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिले.
\v 42 जशी पायांची बोटे अंशत: लोखंडाची आणि अंशत: मातीची बनली होती तसे ते राज्य असेल अंशत: बळकट आणि अंशत: ठिसूळ असे होईल.
\v 43 जसे आपण पाहिले लोखंड मऊ माती सोबत मिसळले होते, तसे लोक मिसळलेले राहतील, जसे लोखंड व माती एक होत नाही तसे हे लोकही एकत्र राहणार नाही.
\p
\s5
\v 44 त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.
\v 45 आपण जसे पाहिले कोणी मनुष्याचा हात न लागता एक दगड पर्वतांवरून तुटून पडला त्याने लोखंड, पितळे, माती, चांदी आणि सोने यांचे तुकडे केले, त्या महान परमेश्वराने राजा पुढे होणाऱ्या घटना कळविल्या आहेत. हे स्वप्न सत्य असून त्याचा हा विश्वसनीय उलगडा आहे.”
\p
\s5
\v 46 राजा नबुखद्रेस्सराने पालथे पडून दानीएलास साष्टांग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्याला अर्पण करून धूप दाखवा.
\v 47 राजा दानीएलास म्हणाला, “खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्या प्रगट करता आले आहे.”
\p
\s5
\v 48 नंतर राजाने दानीएलास मोठ्या सन्मान आणि अद्भुत भेटवस्तु दिल्या. त्याला अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.
\v 49 दानीएलाने राजास केलेल्या विनंतीवरुन, राजाने शद्रुख, मेशख आणि अबेदनगो ह्यास बाबेलाच्या प्रांताचे प्रशासक नेमले पण दानीएल राजदरबारीच राहिला.
\s5
\c 3
\p
\v 1 नबुखद्नस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला त्याची उंची साठ हात आणि रुंदी सात हात होती त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली.
\v 2 नंतर नबुखद्रेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी हयांस निरोप पाठवला.
\p
\s5
\v 3 नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की, नबुखद्नेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे.
\v 4 तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो,
\v 5 ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, विणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल त्यावेळी त्या सुवर्ण पुतळयास दंडवत करा ज्याची स्थापना नबुखद्नेस्सर राजाने केली आहे.
\p
\s5
\v 6 जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्याला लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.”
\v 7 मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळयास पालथे पडून दंडवत केले जो नबुखद्नेस्सर राजाने स्थापला होता.
\p
\s5
\v 8 आता यावेळी काही खास्द्यांनी जवळ येऊन यहूद्यांवर दोषारोप केला.
\v 9 ते नबुखद्नेस्सर राजास म्हणाले, “महाराज चिरायु असा.
\v 10 महाराज तुम्ही असे फर्मान काढले आहे ना, की, जो कोणी शिंग, बासरी, सतार, विणा, पुंगी आणि इतर वाद्याचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण् पुतळयास दंडवत करावे.
\p
\s5
\v 11 जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्याला लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल.
\v 12 आता येथे काही यहूदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलाच्या प्रांतात केली, त्यांची नावे शद्रख, मेशख अबदनगो ही आहेत. हे लोक, राजा, आपली पर्वा करत नाहीत, ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाही, किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत, ज्याची तुम्ही स्थापना केली आहे.”
\p
\s5
\v 13 तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.
\v 14 नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख, अबदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही?
\p
\s5
\v 15 आता जर तुम्ही तयार आहात तर, जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे; पण जर तुम्ही नमन करणार नाही, तर तुम्हाला त्वरीत तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हाला माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?”
\p
\s5
\v 16 शद्रख, मेशख, अबदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन नाही.
\v 17 जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त आग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हाला आपल्या हातून सोडवीन.
\v 18 पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडुन त्यास दंडवत करणार नाही.”
\p
\s5
\v 19 नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.
\v 20 नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की, शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका.
\p
\s5
\v 21 ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले.
\v 22 राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रख, मेशख, अबदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले.
\v 23 तिथे ते पुरुष शद्रख, मेशख, अबदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले.
\p
\s5
\v 24 नंतर नबुखद्नेस्सर चकीत होऊन त्वरीत उभा राहिला त्याने आपल्या सल्लागारास विचारले, “आपण त्या तिघांना बांधून भट्टीत टाकले ना?” त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे.
\v 25 तो म्हणाला, मला असे दिसते की, चार माणसे अग्नीत मोकळे फिरत आहेत, त्यांना काही एक दुखापत झालेली नाही, चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे.
\p
\s5
\v 26 तेव्हा नबुखद्नेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या.” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.
\v 27 तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार ह्यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही.
\p
\s5
\v 28 नबुखद्नेस्सर म्हणाला या आपण शद्रख, मेशख, अबदनगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्याने आपला दिव्यदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला, आणि राजाची आज्ञा पालटवलिली, आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली त्यांना त्याने सोडवले आहे.
\p
\s5
\v 29 त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतीला तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.
\v 30 नंतर राजाने शद्रख, मेशख, अबदनगो यांना बाबेलच्या परगण्यात बढती दिली.
\s5
\c 4
\p
\v 1 नबुखद्नेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकात फर्मान पाठवले की, तुमचे कल्याण होवो.
\v 2 सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे
\q
\v 3 त्याचे चिन्हे किती थोर,
\q त्याचे चमत्कार किती अद्भूत
\q त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे.
\q त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते.
\p
\s5
\v 4 मी, नबुखद्रेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो.
\v 5 मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले.
\v 6 म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांना मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील.
\p
\s5
\v 7 तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना.
\v 8 शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले.
\v 9 बेल्टशस्सरा, सर्व ज्ञान्यांच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गुढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग.
\p
\s5
\v 10 मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती.
\v 11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचे शेंडा आकाशात पोहचला आणि त्याच्या देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला.
\v 12 त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे.
\p
\s5
\v 13 मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला.
\v 14 तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्यांच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जावो आणि फांद्यांतील पाखरे उडून जावोत.
\p
\s5
\v 15 पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्याला आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्याला भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या.
\v 16 त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील.
\p
\s5
\v 17 हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्याला तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्याला तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.
\v 18 हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सरा ह्याचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कोणीही ह्याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो.
\p
\s5
\v 19 मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो.
\p
\s5
\v 20 जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते.
\v 21 ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते.
\v 22 हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात.
\p
\s5
\v 23 हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, पण त्यांचा बुंधा जमिनीत राहू दया, ह्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्षे वनपशुसोबत राहो.
\p
\s5
\v 24 हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे.
\v 25 तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल, तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील, सात वर्षे जाईपर्यंत तू हे जानशील की, मानवावर देवाची सत्ता आहे.
\p
\s5
\v 26 जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे, जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल.
\v 27 म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”
\p
\s5
\v 28-29 हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता.
\v 30 “काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ गौरवासाठी बांधली.”
\s5
\v 31 जेव्हा राजा हे बोलत होता. पहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.
\v 32 तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्याना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.”
\p
\s5
\v 33 हे फर्मान त्याच घरकेस नबुखद्रेस्सराचा विरोधात अमलात आले. त्याला मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या देवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
\p
\s5
\v 34 या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे जाळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाले,
\q मी सर्वोच्च देवाचे आभार मानले,
\q जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली,
\q कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारी आहे.
\q
\s5
\v 35 भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत.
\q तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो,
\q कोणीही त्यास थांबवू शकत नाही
\q वा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”
\p
\s5
\v 36 त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली.
\v 37 आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.
\s5
\c 5
\p
\v 1 बेलशस्सर राजाने आपल्या एक हजारां सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्या हजारा समोर तो द्राक्षारस प्याला.
\v 2 बेलशस्सराने द्राक्षारस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरुशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षारस पिता येईल.
\p
\s5
\v 3 तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरुशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली.
\v 4 ते द्राक्षारस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले.
\p
\s5
\v 5 त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राज्यास वाचता येईल.
\v 6 तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.
\p
\s5
\v 7 राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की, जे भूतविद्या करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल.
\p
\s5
\v 8 राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.”
\v 9 तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले.
\p
\s5
\v 10 राजा आणि सरदार यांचे बोलणे एकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका.
\p
\s5
\v 11 आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या बापाच्या राज्यात, प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले आपला बाप राजा नबुखद्नेस्सराने त्यास सर्व जादूगार भूतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्याला नेमले.
\v 12 उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्याला बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”
\p
\s5
\v 13 नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या बापाने पकडले होते.
\v 14 मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे.
\p
\s5
\v 15 मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना.
\v 16 मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू ह्याचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.”
\p
\s5
\v 17 नंतर दानीएलाने राजास उत्तर दिले, “तुझ्या भेटी तुलाच राहू दे आणि तुझी बक्षीसे दुसऱ्यांना दे तरीही मी लिखान वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो.
\v 18 हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सराला राज्य महत्त्व, प्रतिष्ठा आणि वैभव दिले.
\v 19 त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भित होते. त्याला वाटले त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे.
\p
\s5
\v 20 पण जेव्हा त्याचे हृदय ताठ झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वागला तेव्हा त्याला राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरावण्यात आले.
\v 21 त्याला मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला.
\p
\s5
\v 22 हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.
\v 23 तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून, तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षारस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस.
\v 24 म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले.
\p
\s5
\v 25 हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.
\v 26 ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे.
\v 27 तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस.
\v 28 परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारशी हयांना दिले आहे.”
\p
\s5
\v 29 तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून तयाच्या गळयात सोन्याचा गोफ घाला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.
\v 30 त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याला ठार मारण्यात आले.
\v 31 आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला.
\s5
\c 6
\p
\v 1 दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले.
\v 2 त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
\v 3 दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता.
\p
\s5
\v 4 असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांतिधिकारी हे दानीएलात चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही.
\v 5 नंतर ते ही लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाच्या विरुद्ध काही कारण काढता येत नाही पण त्याच्या देवाच्या नियमा संबंधानेच निमित्त काढता येईल.
\p
\s5
\v 6 नंतरही प्रशासक व प्रांताधिकारी योजना घेवून आले ते म्हणाले, राजा दारयावेश चिरायू असा.
\v 7 राज्यातले सर्व मुख्य प्रशासक, प्रांताधिकारी सल्लागार आणि प्रशासक ह्यांनी असा विचार केला की राजा आपण असे फर्मान काढा की, जो कोणी पुढील तीस दिवस आपल्याशिवाय कोणाही दुसऱ्या देवाची अथवा मानवाची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे.
\p
\s5
\v 8 तर महाराज हा फर्मान मंजूर करून हयावर सही करा म्हणजे मेदी आणि पारशी यांच्या कायद्याप्रमाणे हा ठराव पालटणार नाही.”
\v 9 तेव्हा दारयावेश राजाने त्या आदेशावर सही केली यासाठी नाही की त्याचा कायदा व्हावा.
\p
\s5
\v 10 या फर्मानावर सही झाली हे दानीएलास जेव्हा माहित झाले, तेव्हा तो आपल्या घरी गेला, त्याच्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेने उघडत होत्या, तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून तिनवेळा करत असे.
\v 11 नंतर ही मानसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानीएलास प्रार्थना करीत असताना पाहिले.
\p
\s5
\v 12 नंतर ते राजाकडे जावून त्याच फर्मानाविषयी त्यास म्हणाले, “महाराज आपण हे फर्मान काढले ना, ज्यात लिहीले आहे पुढील तीस दिवस जो कोणी तुमच्याशिवाय दुसऱ्या देवाची किंवा मनुष्याची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे” राजा म्हणाला “मेदी व पारसी ह्यांच्या न बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरले आहे.”
\p
\s5
\v 13 तेव्हा ते राजास म्हणाले, “तो मनुष्य दानीएल जो यहूद्यांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फर्मानास न जुमानता दिवसातून तीन वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो.”
\v 14 हे शब्द ऐकून राजा अती खिन्न झाला आणि दानीएलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला त्यासाठी सुर्यास्तापर्यंत तो खटपट करत राहीला.
\p
\s5
\v 15 तेव्हा हा कट करणारे लोक राजासमोर जमले व त्याला म्हणाले, राजा हे लक्षात घे, मेदी व पारसी याच्या कायद्याप्रमाणे राजाचे फर्मान किंवा कायदा बदलता येत नाही.
\p
\s5
\v 16 नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची सेवा तू सेवा करतोस तो तुला सोडवो.”
\p
\s5
\v 17 त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला राजाने मग आपली आणि सरदाराची मुद्रा घेवून त्यावर शिक्का मारला तो यासाठी की दानीएलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही.
\v 18 नंतर राजा त्यांच्या महलात गेला ती रात्र तो न जेवता असाच राहिला त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली.
\p
\s5
\v 19 मग मोठ्या पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला.
\v 20 गुहेजवळ येताच तो दु:खीस्वराने दानीएलास हाक मारू लागला तो म्हणाला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय?
\p
\s5
\v 21 दानीएल राजास म्हणाला, “महाराज चिरायू असा
\v 22 माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”
\p
\s5
\v 23 नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.
\p
\s5
\v 24 तेव्हा राज्याच्या आज्ञेवरून, ज्यांनी दानीएलावर आरोप केले त्या लोकांना पकडण्यात आले तेव्हा सर्वांना त्यांची मुले पत्नीसह सिंहाच्या गुहेत टाकले ते गुहेत तळ गाठण्याच्या आधीच सिंहानी त्याच्या हाडांचा चुराडा केला.
\v 25 मग दारयावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व् लोकांस सर्व राष्ट्रांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहीले:
\q “तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जावो.”
\p
\s5
\v 26 मी असे जाहिर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे
\q कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे.
\q त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे.
\q
\v 27 तो आम्हास सुरक्षीत करतो
\q आणि आम्हास सोडवतो.
\q तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह;
\q आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले.
\p
\s5
\v 28 मग हा दानीएल दारयावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच्या कार्यकाळात समृध्द झाला.
\s5
\c 7
\p
\v 1 बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्याला स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या.
\v 2 दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते.
\v 3 चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली.
\p
\s5
\v 4 पहिले सिंहासारखे असून तयास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता तयाचे पंख उपटून त्याला जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते.
\v 5 नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.
\p
\s5
\v 6 त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्याला राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता.
\v 7 त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्याला मोठे लोखंडी दात होते, ते चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती.
\p
\s5
\v 8 मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होत आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.
\p
\s5
\v 9 मी पाहत होतो तेव्हा,
\q आसने मांडण्यात आली
\q आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला.
\q त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती
\q आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते.
\q आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.
\p
\s5
\v 10 त्याच्या समोर अग्नीची नदी वहात होती,
\q हजारो लोक त्याची सेवा करीत होते,
\q लाखो लोक समोर उभे होते,
\q न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती.
\p
\s5
\v 11 मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याच्या शरीराचे तूकडे करून ते जाळण्यास देण्यात आले.
\v 12 इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले.
\p
\s5
\v 13 त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले,
\q आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराण पुरूषाकडे आला
\q व त्यास त्याने जवळ केले.
\q
\v 14 आणि त्याला प्रभुत्व व वैभव व राज्य दिले, ते असे की, सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी;
\q त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही,
\q आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे.
\p
\s5
\v 15 मग मज दानीएलचा जिव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलीत झाले.
\v 16 जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला.
\p
\s5
\v 17 ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत.
\v 18 पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य, प्राप्त होईल ते युगानयुग त्याचा ताब्यात राहील.
\p
\s5
\v 19 नंतर मला त्या चौथ्या श्वापदा विषयी बोलण्याची इच्छा झाली, जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दात लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळेची होती, ते चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे पायाखाली तूकडे करी.
\v 20 मला त्याची दहा शिंगे आणि त्याचे गुढ जाणायचे होते जी त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यामध्ये आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्यांचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शविली.
\p
\s5
\v 21 मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला.
\v 22 आणि दिवसाचा पुरातन येईपर्यंत ते त्यांच्यावर प्रबळ होत गेले. मग परात्पराच्या पवित्र जनांस न्य दिला, आणि पवित्र जनांची राज्य आपल्या मालकीचे करून घेतले, असा समय आला.
\p
\s5
\v 23 त्याने सांगितले चौथे श्वापद
\q हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल
\q हे इतर राज्यांपेक्षा वेगळे राहील ते सर्व
\q पृथ्वीला ग्रासून टाकील
\q आणि तिचे पायाखाली तूकडे करीन.
\q
\v 24 आता दहा शिंगाविषयी
\q या राज्यातून दहा राज्यांचा उदय होईल;
\q आणि त्यातून आणखी एक राजा निघेल.
\q तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील.
\p
\s5
\v 25 तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल
\q आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण
\q आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील.
\q या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे
\q आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.
\q
\v 26 पण तिथे न्यायसभा होईल
\q आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येतील.
\q त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल.
\p
\s5
\v 27 राज्य, प्रभूत्व
\q आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल.
\q त्याचे राज्य अनंतकालचे आहे.
\q आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील.”
\p
\v 28 या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.
\s5
\c 8
\p
\v 1 त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.
\v 2 मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.
\p
\s5
\v 3 मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती, आणि ते हळू वाढत आहे.
\v 4 मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही त्यांच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्याला जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.
\p
\s5
\v 5 जसा मी त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला. तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक मोठे शिंग होते.
\v 6 मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.
\p
\s5
\v 7 मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर रागे भरुन होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.
\v 8 मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबळ झाला, तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नविन शिंगे फुटली ती चारही बाजूस ठळक होती.
\p
\s5
\v 9 त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.
\v 10 त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.
\p
\s5
\v 11 आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीपावेतो मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.
\v 12 आणि लोकांच्या पातकामुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले; तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले; आणि ते कार्य करीत व समृद्ध होत गेले.
\p
\s5
\v 13 नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”
\v 14 तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तिनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”
\p
\s5
\v 15 मग मी दानीएलाने हा दुष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पाहा एक मानवासारखा कोणी तरी माझ्यासमोर उभा होता.
\v 16 मी एक मानवी वाणी ऐकली; ती उलई नदीच्या काठामधून आली ती म्हणाली, “गब्रीएला या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.”
\v 17 मग तो, जेथे मी उभा होतो, तेथे आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”
\p
\s5
\v 18 जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.
\v 19 तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.
\p
\s5
\v 20 जो मेंढा तू पाहिला त्याला दोन शिंगे होती, ती मेदया व पारस यांचे राजे आहेत.
\v 21 तो बकरा म्हणजे ग्रिसचा राजा त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.
\p
\s5
\v 22 जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार.
\v 23 त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.
\p
\s5
\v 24 त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.
\v 25 तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतींच्या अधिपतीविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याचा बलाने नाही.
\p
\s5
\v 26 हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”
\p
\s5
\v 27 तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्याला समजणारा कोणीच नव्हता.
\s5
\c 9
\p
\v 1 दारयावेश राजा जो अहश्वेरोशाचा पुत्र मेदय वंशातून आलेला तो अहश्वेरोश ज्यास खास्द्यांचा राजा करण्यात आले होते.
\v 2 दरयावेशाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानीएल, परमेश्वराचे वचन असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करत होतो, ते वचन जे यिर्मया संदेष्टयाच्याद्वारे प्राप्त झाले. माझ्या लक्षात असे आले की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा वेळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील.
\p
\s5
\v 3 मी हे जाणून माझे मुख देव परमेश्वराकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्याला मागणे करावे.
\v 4 मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो.
\p
\s5
\v 5 आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो.
\v 6 तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.
\p
\s5
\v 7 आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापी आज आमची तोंडे लज्जीत झाली आहेत. यहूदाचे यरुशलेमेत राहणारे सर्व इस्राएलाचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत, त्यांनी तुझ्या विरूद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले.
\v 8 हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.
\p
\s5
\v 9 आमचा देव परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली.
\v 10 आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती.
\v 11 सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले.
\p
\s5
\v 12 परमेश्वराने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. यरुशलेमेवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही.
\v 13 मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची आणभाक केली नाही.
\v 14 म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही.
\p
\s5
\v 15 प्रभू आमच्या देवा, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले, आणि आज आहे त्याप्रमाणे आपणाला किर्ती प्राप्त करून घेतली आहे; आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वोगलो आहे.
\v 16 हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे यरूशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.
\p
\s5
\v 17 हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनविण्याकडे कान दे; प्रभू, तुझ्या ओसाड झालेल्या स्थानावर आपला प्रकाश पाड.
\v 18 देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर तुझ्या नावासाठी उशीर करू नको, माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकांस तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायीपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या अपार दयेमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो.
\v 19 हे प्रभू, ऐक, हे प्रभू, क्षमा कर, हे प्रभू, कान दे, आणि कार्य कर, उशीर करू नको; हे माझ्या देवा, तू आपणाकरता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकांना तुझे नाव आहे.
\p
\s5
\v 20 आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्राएल यांचे पाप कबूल करीत असता, आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरिता परमेश्वर माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो.
\v 21 मी प्रार्थना करत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रीएल तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.
\p
\s5
\v 22 आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे.
\v 23 तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.
\p
\s5
\v 24 सात सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात काळ आला होता ज्यात पापाचा अंत व्हावा अधार्मिकतेसाठी प्रायश्चित करावे सनातन धार्मिकता उदयास यावी. दृष्टांत आणि स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.
\v 25 हे जाण आणि समजून घे की, यरुशलेमेची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून तर अभिषिक्त (जो पुढारी असेल) येईपर्यंतचा अवकाश सात सप्तके आणि बासष्ट आठवडे आहे. त्यानंतर यरूशमेलेची पुनर्बांधणी होईल; आणि संकटाच्या काळातही खंदक आणि कोट यांसह ती बांधण्यात येईल.
\p
\s5
\v 26 बासष्ट आठवड्यानंतर अभिषिक्तीचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही जो येणारा अधिपती त्याचे सैन्य शहर आणि वेदी यांचा नाश करतील, त्याचा नाश पुराने होईल युध्द शेवटपर्यंत होईल सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे.
\p
\s5
\v 27 एक सप्तकाचा करार तो पुष्कळासोबत पक्का करेल, सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”
\s5
\c 10
\p
\v 1 पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला.
\p
\s5
\v 2 त्या दिवसात मी दानीएल, तीन आठवडे शोक करत होतो.
\v 3 ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्न्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षारस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही.
\p
\s5
\v 4 पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदीच्या (टायग्रीस) काठावर होतो.
\v 5 मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत ऊफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला.
\v 6 त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता.
\p
\s5
\v 7 मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले.
\v 8 मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.
\v 9 मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.
\p
\s5
\v 10 एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले.
\v 11 तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.
\p
\s5
\v 12 तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानीएला, भिऊ नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले, आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे.
\v 13 परंतु पारसाच्या राज्याच्या अधिपतीन एकवीस दिवस मला आवरिले; आणि पाहा, मीखाएल, मुख्य अधिपतींपैकी एक, माझे साहाय्य करायला आला; मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो.
\p
\s5
\v 14 आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.
\v 15 जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला; मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही.
\p
\s5
\v 16 तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.
\v 17 मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.”
\p
\s5
\v 18 तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.
\v 19 तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.”
\p
\s5
\v 20 तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार मी गेलो म्हणजे ग्रिसचा अधिपती येईल.
\v 21 परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही.
\s5
\c 11
\p
\v 1 दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे.
\v 2 आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.
\p
\s5
\v 3 एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल.
\v 4 आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.
\p
\s5
\v 5 दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील.
\v 6 काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राज्याची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून येण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.
\p
\s5
\v 7 तरी तिच्या कुळातून एक अंकूर उगवेल तो तिची जागा घेईल तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युध्द करील आणि त्यामध्ये तो विजयी होईल.
\v 8 तो त्यांची दैवते ओतीव मुर्त्या आणि मौल्यवान सोने व चांदीची पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राजावर हल्ला करणार नाही.
\v 9 उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्याला स्वदेशी परत जावे लागेल.
\p
\s5
\v 10 त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.
\p
\s5
\v 11 दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करील उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारील पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल.
\v 12 जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.
\p
\s5
\v 13 उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उकृष्ट सैन्य व धन घेऊन येईल सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल.
\p 14 त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राज्याच्या विरोधास उठतील तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.
\p
\s5
\v 14 त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राज्याच्या विरोधास उठतील तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.
\p
\s5
\v 15 अशाप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील.
\v 16 पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्याला कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.
\p
\s5
\v 17 उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल. आणि तो उत्तरेच्या राज्याशी करार करील तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भष्ट करण्यास देईल म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल पण त्याची योजना यशस्वी होणार नाही.
\v 18 ह्यानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्विपाकडे लावून त्यापैकी बरेच काबीज करील; पण एक सरदार त्याने केलेली अप्रतिष्ठा नाहीशी करील; आणखी तो आपली अप्रतिष्टा त्याच्यावर फिरवील.
\v 19 मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा लावील पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही.
\p
\s5
\v 20 नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील पण काही दिवसात त्याचा नाश होईल पण तो रागात किंवा युध्दात होणार नाही.
\v 21 मग त्याच्या जागी नकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील.
\v 22 आणि उचंबळणारी बळे त्याच्या समोरून ओसरून जातील, व मोडून खातील, आणि कराराचा अधिपतिही मोडून जाईल.
\p
\s5
\v 23 त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल.
\v 24 सुचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करीले जे त्याच्या वडिलाने किंवा त्यांच्या वडीलांच्या वडीलाने केले नाही ते तो करील; आपल्या सहकाऱ्यास लूट आणि धन वाटून देईल काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील.
\p
\s5
\v 25 दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही.
\v 26 जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील.
\v 27 हे दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.
\p
\s5
\v 28 उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल.
\s5
\v 29 नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही.
\v 30 कारण कित्तीमाची जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील.
\p
\s5
\v 31 त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील रोजची बलिहवन ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील.
\v 32 जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.
\p
\s5
\v 33 लोकांमधील चतूर इतरांना समज देतील पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास, व लूटालूट यांनी संकटात पडतील.
\v 34 ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील.
\v 35 सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.
\p
\s5
\v 36 राजा मनात येईल तसे तो करील; तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवा विरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल, कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळविल जे ठरले आहे ते घडेलच.
\v 37 तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचे किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागले आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.
\p
\s5
\v 38 आणि तो आपल्या ठिकाणी गडांच्या देवाला मान देईल, आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्याला तो सोन्याने व रुप्याने व मोलवान पाषाणांनी व मनोरम पदार्थांनी मान देईल.
\v 39 तो परक्या देवाच्या मदतीने बलाढ्य दुर्गावर हल्ला करील. जे ह्याला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील.
\p
\s5
\v 40 शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.
\v 41 तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.
\p
\s5
\v 42 तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही.
\v 43 त्याला मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्याला अधिकार मिळाले. लुबी आणि कुशी त्याची चाकरी करतील.
\p
\s5
\v 44 पण पुर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्याला चिंताग्रस्त करील तेव्हा तो मोठया रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल.
\v 45 तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्याला मदत करणार नाही.
\s5
\c 12
\p
\v 1 आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.
\v 2 अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.
\p
\s5
\v 3 जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्काळास न्यायीपणाकडे वळवणारे सदासर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील.
\v 4 पण तू दानीएला, ही वचने आणि पुस्तकाचे रहस्य गुप्त ठेव, अगदी अंतसमयापर्यंत अनेक लोक इकडे तिकडे धावतील आणि ज्ञान वाढत जाईल.
\p
\s5
\v 5 मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या या काठवर उभा होता आणि दुसरा पलिकडील काठावर उभा होता.
\v 6 त्यापैकी एकाने तागाची वस्त्रे घातलेल्यास विचारले जो नदीच्या पाण्यावर होता या अद्भुत गोष्टीचा अंत होण्यास किती वेळ लागेल?
\p
\s5
\v 7 मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्र जनाचा बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले.
\p
\s5
\v 8 मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?”
\v 9 तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने सिलबंद करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.
\p
\s5
\v 10 पुष्कळ शुध्द, स्वच्छ आणि पवित्र केले जातील पण दुष्ट दुष्टपणा करतील, दुष्टांपैकी कोणास समजणार नाही पण जे ज्ञानी ते समतील.
\v 11 रोजचे बलिहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.
\p
\s5
\v 12 जो धीराने 1,335 दिवस वाट पाहील तो धन्य.
\v 13 तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा, तू तुझे वतन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील.

1003
28-HOS.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,1003 @@
\id HOS
\ide UTF-8
\h होशेय
\toc1 होशेय
\toc2 होशेय
\toc3 hos
\mt1 होशेय
\s5
\c 1
\p
\v 1 होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएल मध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.
\v 2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,
\q “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील
\q ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील
\q कारण परमेश्वराचा त्याग करणे
\q हे जारकर्म हा देश करीत आहे.”
\p
\s5
\v 3 म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
\v 4 परमेश्वर होशेयला म्हणाला,
\q त्याचे नाव इज्रेल ठेव,
\q कारण काही वेळानंतर
\q मी येहूच्या घराण्याला
\q त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा
\q करणार आहे व इस्राएल
\q घराण्याच्या राज्याचा शेवट करीन.
\q
\v 5 त्या दिवशी
\q मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.
\p
\s5
\v 6 गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली
\q तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला
\q हिचे नांव लो-रुहामा ठेव
\q कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया
\q करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
\q
\v 7 तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन
\q मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई,
\q घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही
\q तर त्यांना स्वबळाने सोडवेल.
\p
\s5
\v 8 मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तीला मुलगा झाला.
\v 9 मग परमेश्वर म्हणाला,
\q त्याचे नांव लो-अम्मी ठेव,
\q कारण तुम्ही माझे लोक नाही
\q आणि मी तुमचा देव नाही.
\q
\s5
\v 10 जरी इस्राएलच्या लोकांची संख्या
\q समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल
\q जी मोजता येत नाही
\q हे असे घडेल की,
\q जिथे तुम्ही माझे लोक नव्हते
\q तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
\q
\v 11 यहूदाचे लोक व इस्राएलचे
\q2 लोक एकत्र येऊन आपणावर
\q एक पुढारी नेमतील
\q व त्या देशातून निघून येतील
\q तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.
\s5
\c 2
\q
\v 1 “आपल्या भावांना म्हणा, अम्मी ‘माझे लोक!
\q आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”
\q
\s5
\v 2 तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला,
\q2 कारण ती माझी पत्नी नाही,
\q2 आणि मी तीचा पती नाही.
\q ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो
\q आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.
\q
\v 3 जर नाही, तर मी
\q तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती
\q तशी नग्न करीन,
\q मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन
\q आणि मी तिला तहानेने मारीन.
\q
\s5
\v 4 तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने
\q मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.
\q
\v 5 त्यांची आई वेश्या राहलेली आहे
\q व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे,
\q ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईल,
\q कारण ते मला माझी भाकर आणि पाणी,
\q माझी लोकर आणि ताग,
\q माझे तेल आणि मद्य देतात.
\q
\s5
\v 6 म्हणून मी तीच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन,
\q मी तीच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे
\q तिला वाट सापडणार नाही.
\q
\v 7 ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल
\q पण ती त्यांना गाठु शकणार नाही,
\q ती त्यांचा शोध करेल पण ते तीला सापडणार नाही.
\q मग ती म्हणेल,
\q मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल,
\q कारण माझी दशा आतापेक्षा
\q तेव्हा चांगली होती.
\q
\s5
\v 8 कारण तिला हे ठाऊक नाही की,
\q तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षारस,
\q तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली,
\q नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.
\q
\v 9 म्हणून मी हंगामाच्या वेळी
\q तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षारस परत घेईन.
\q तिची लाज झाकण्यासाठी दिलेली
\q माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.
\q
\s5
\v 10 नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन
\q व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.
\q
\v 11 मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन,
\q शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन.
\q
\s5
\v 12 मी तिच्या द्राक्षवेली
\q आणि अंजिराची झाडे नष्ट करीन,
\q ज्या विषयी ती म्हणाली होती,
\q माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत.
\q मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.
\q
\v 13 तिने बआलास धूप दिला
\q आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली.
\q मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली
\q म्हणून मी तीला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 14 यास्तव, मी तीला परत मिळविन मी तीला जंगलात घेऊन जाईल
\q आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.
\q
\v 15 मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,
\q आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन.
\q तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणे दिले होते,
\q जेव्हा ती मिसर देशातून आली होती.
\q
\s5
\v 16 हे परमेश्वर घोषित करतो की,
\q त्या दिवसात असे होईल की तू मला इशी, म्हणजे, माझा नवरा म्हणशील,
\q आणि पुन्हा मला बाली, म्हणजे, धनी म्हणणार नाहीस.
\q
\v 17 कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन,
\q व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.
\q
\s5
\v 18 त्या दिवशी मी इस्राएलासाठी
\q वनपशु, आकाशातील पाखरे,
\q भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन.
\q मी देशातून धनुष्य तलवार
\q आणि लढाई नाहीशी करीन
\q व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.
\q
\s5
\v 19 मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईल.
\q मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईल.
\q
\v 20 मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन
\q व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
\q
\s5
\v 21 आणि त्या दिवशी,
\q मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो,
\q मी आकाशाला उत्तर देईल
\q आणि आकाश भूमीला उत्तर देईल.
\q
\v 22 आणि भूमी धान्य, नवा द्राक्षारस
\q आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.
\q
\s5
\v 23 मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन
\q आणि लो रुहामावर दया करीन
\q जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन
\q आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.
\s5
\c 3
\p
\v 1 परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली.
\v 2 म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले.
\v 3 मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा; यापुढे तू वेश्या नाही वा परपुरुषाची नाही, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन.
\p
\s5
\v 4 कारण इस्राएलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलीदान, दगडी खांब, एफोद आणि गृहदेवता ह्यांवाचून राहतील.
\v 5 नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.
\s5
\c 4
\q
\v 1 इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका
\q या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे
\q कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
\q
\v 2 तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जिव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे.
\q या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.
\q
\s5
\v 3 म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे,
\q जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे,
\q रानपशू, आकाशातील पाखरे,
\q समुद्रातील मासेही नाही तसे होत आहेत.
\q
\s5
\v 4 पण कुणालाही वाद घालू देऊ नका,
\q कोणीही कोणावर आरोप न लावो,
\q कारण माझे लोक याजकांशी वाद करतात त्यांच्यासारखे आहेत.
\q
\v 5 आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझ्यासुद्धा
\q भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल;
\q आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.
\q
\s5
\v 6 माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत.
\q कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून
\q मी सुध्दा तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारीन.
\q माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र
\q तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
\q
\v 7 जसे हे याजक वाढत गेले
\q तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले.
\q मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.
\q
\s5
\v 8 ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात.
\q त्यांच्या दुष्टतेकडे त्याने मन लागलेले आहे.
\v 9 आणि जसे लोक तसा याजक असे होईल,
\q आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन,
\q आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.
\q
\s5
\v 10 ते खातील पण ते त्यास पुरणार नाही
\q ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही
\q कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
\q
\s5
\v 11 वेश्यागमन, द्राक्षारस, आणि नवा द्राक्षारस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.
\q
\v 12 माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात,
\q त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात.
\q गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे,
\q आणि त्यांनी माझा त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.
\q
\s5
\v 13 ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात
\q आणि टेकडयांवर धूप जाळतात,
\q ओक, हिवर, आणि धूप जाळतात,
\q कारण त्यांची सावली चांगली (छान) असते;
\q म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात
\q व सुना व्यभिचार करतात.
\q
\v 14 तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात
\q तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात,
\q आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात;
\q हे विवेक हिन लोक आहेत, ते पावतील.
\q
\s5
\v 15 हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस,
\q तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो,
\q गिल्गालास जाऊ नका,
\q वर बेथ अवेनास जाऊ नका,
\q परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
\q
\v 16 कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे.
\q मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?
\q
\s5
\v 17 एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे
\q त्याला एकटे सोडा.
\q
\v 18 त्यांचा द्राक्षारस आंबट झाला आहे;
\q ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात.
\q तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
\q
\v 19 वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन,
\q आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.
\s5
\c 5
\q
\v 1 याजकांनो!
\q हे एका इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे,
\q हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे
\q तुम्ही मिस्पावर पाश
\q आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
\q
\v 2 बंडखोर खोल कत्तलीत राहतात
\q पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
\q
\s5
\v 3 एफ्राईम मला माहित आहे
\q आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही
\q एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस,
\q इस्राएल अशुद्ध झाला आहे.
\q
\v 4 त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही,
\q कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो
\q आणि ते आपला देव परमेश्वरास ओळखत नाही.
\q
\s5
\v 5 इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो,
\q इस्राएल व एफ्राहम आपल्या अपराधात ठेचाळणार
\q आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.
\q
\v 6 ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील
\q परंतू तो त्यांना सापडणार नाही,
\q कारण त्याने त्याचा त्याग केला आहे.
\q
\v 7 ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले
\q कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले
\q आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.
\q
\s5
\v 8 गिबात शिंग
\q आणि रामात तुतारी फुंका;
\q तुझ्यामागे, हे बन्यामिना!
\q असा रणशब्द बेथ अविन येथे करा.
\q
\v 9 शासनाच्या दिवशी एफ्राहम नाश पावेल
\q इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.
\q
\s5
\v 10 यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत,
\q मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.
\q
\v 11 एफ्राहमाचा चुराडा झाला आहे,
\q न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे,
\q कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे.
\q
\s5
\v 12 ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर
\q आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन.
\q
\v 13 जेव्हा एफ्राईमाने आपला रोग
\q आणि यहूदाने आपली जखम पाहिली
\q तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला,
\q आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला
\q पण तो त्यास आरोग्य देऊन
\q त्यांची जखम बरी करू शकला नाही.
\q
\s5
\v 14 हयास्तव मी एफ्राईमास सिंह
\q आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन;
\q मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन
\q व घेऊन जाईन,
\q आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.
\q
\v 15 मी आपल्या स्थानी परत जाईन,
\q जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत
\q जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
\s5
\c 6
\q
\v 1 “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ,
\q कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हाला बरे करील,
\q त्याने जखम केली, तोच आम्हाला पट्टी बांधेल.
\q
\v 2 दोन दिवसानंतर तो आम्हाला पुन्हा जिवंत करेल,
\q तिसऱ्या दिवशी उचलून उभे करीन,
\q आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
\q
\v 3 चला आपण परमेश्वराला ओळखू या,
\q प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया,
\q तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे,
\q भूमीवर पाऊस पडतो
\q त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
\q
\s5
\v 4 एफ्राईमा मी तुला काय करु?
\q यहूदा मी तुला काय करु?
\q तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे,
\q आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
\q
\v 5 म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्याचे तुकडे केले आहे,
\q माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे.
\q तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
\q
\s5
\v 6 कारण मी बलीदान नाही तर विश्वासूपण इच्छितो,
\q मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
\q
\v 7 आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला,
\q ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
\q
\s5
\v 8 गिलाद हे दुष्टांचे शहर आहे,
\q त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
\q
\v 9 जशी लुटारुंची टोळी टपून बसते,
\q तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात,
\q त्यांनी महापातके केली आहेत.
\q
\s5
\v 10 इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे,
\q एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
\q
\v 11 तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल,
\q तेव्हा मी माझ्या लोकांना बंदिवासापासून मुक्त करीन.
\s5
\c 7
\q
\v 1 जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो,
\q तेव्हा एफ्राहमाचे पाप
\q आणि शोमरोनाची अधमता उघड होते
\q ते कट रचतात,
\q चोर आत शिरतो
\q आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.
\q
\v 2 मी त्यांचे दुराचार आठवतो
\q याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही,
\q त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे,
\q ते माझ्या मुखासमोर आहे.
\q
\s5
\v 3 ते आपल्या वाईटाने राजाला,
\q आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.
\q
\v 4 ते सर्व व्यभिचारी आहेत
\q जसा भटारी भट्टी पेटवून
\q कनिक भिजवतो
\q व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत.
\q
\v 5 राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले
\q मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला.
\q
\s5
\v 6 भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी
\q आणि फसव्या योजना करतात.
\q त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो,
\q आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो.
\q
\v 7 ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत,
\q ते आपल्या राज्यकर्त्यांस गिळून टाकतात,
\q त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे,
\q त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही.
\q
\s5
\v 8 एफ्राहम त्या लोकांसोबत मिसळतो,
\q एफ्राहम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
\q
\v 9 परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे
\q पण त्याला हे ठाऊक नाही
\q त्याचे काही केस पांढरे झाले आहेत,
\q पण ते त्यास माहित नाही.
\q
\s5
\v 10 इस्राएलाचा गर्व त्याच्या विरोधात साक्ष देतो,
\q इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत,
\q हे करण्यापेक्षा ते त्याला शोधत नाही.
\q
\v 11 एफ्राहम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे,
\q तो मिसराला हाक मारतो,
\q नंतर अश्शूरास उडून जातो.
\q
\s5
\v 12 जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन,
\q आकाशतल्या पक्षांप्रमाणे
\q मी त्यांना खाली आणिन,
\q लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.
\q
\v 13 हायहाय, त्यांना!
\q कारण ते मजपासून बहकले आहेत.
\q त्यांच्यावर नाश येत आहे!
\q त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे
\q मी त्यांची सुटका केली असती
\q पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.
\q
\s5
\v 14 त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही,
\q परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात,
\q ते माझ्यापासून बहकले आहेत.
\q
\v 15 जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहुबल दिले,
\q आता ते माझ्या विरोधात कट रचतात.
\q
\s5
\v 16 ते परत फिरतात,
\q पण ते मी जो सर्वोच्च आहे,
\q त्याकडे फिरत नाही,
\q ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत,
\q त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मतपणामुळे तलवारीने पाडले जातील,
\q मिसरात त्यांची थट्टा करण्यात येईल.
\s5
\c 8
\q
\v 1 “मुखाला तुतारी लाव,
\q परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे,
\q हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून
\q माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.
\q
\v 2 ते माझा धावा करतात,
\q माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो”
\q
\v 3 पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे,
\q आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.
\q
\s5
\v 4 त्यांनी राजे नेमले,
\q पण माझ्या द्वारे नाही;
\q त्यांनी राजपुत्र स्थापले आहे,
\q पण माझे ज्ञान न घेता त्यांनी,
\q आपले सोने व चांदी घेऊन,
\q स्वत:साठी मुर्त्या बनविल्या आहेत.
\q त्यानेच ते नाश पावतील.
\q
\v 5 संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे,
\q परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल,
\q किती वेळ ते अशुद्ध राहणार?
\q
\s5
\v 6 कारण ही मूर्ती इस्राएलातून आली,
\q कारागिराने बनवली,
\q ती देव नाही शोमरोनाच्या
\q वासराचे तुकडे होतील.
\q
\v 7 कारण लोक वारा पेरतात
\q आणि वावटळीची कापणी करता,
\q उभ्या पिकाला कणीस नाही,
\q ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही,
\q आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली
\q तरी परके त्याला गिळून टाकतील.
\q
\s5
\v 8 इस्राएलास गिळले आहे,
\q आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.
\q
\v 9 कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले,
\q एफ्राहमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.
\q
\v 10 जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले,
\q तरी मी त्यांना आता एकत्र करीन.
\q राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.
\q
\s5
\v 11 कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत,
\q पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.
\q
\v 12 मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले,
\q पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.
\q
\s5
\v 13 मला अर्पणे करावी म्हणून
\q ते मांस देतात व खातात,
\q पण मी परमेश्वर,
\q ते स्वीकारत नाही.
\q आता मी त्यांचे पाप स्मरण करून
\q त्यांना शासन करणार ते मिसर देशात परत जातील.
\q
\v 14 इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्यांचा विसर पडला आहे
\q आणि त्याने महाल बांधले आहेत,
\q यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत,
\q पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन,
\q तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.
\s5
\c 9
\q
\v 1 हे इस्राएला,
\q इतर लोकांसारखा आनंद करु नको,
\q कारण तू आपल्या देवाला सोडून
\q अविश्वासू झाला आहेस,
\q तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते.
\q
\v 2 पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही,
\q नवा द्राक्षारस त्यांना निराश करेल.
\q
\s5
\v 3 ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत,
\q त्याशिवाय एफ्राहम मिसरात परत जाईल,
\q आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ खातील.
\q
\v 4 ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही,
\q व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत,
\q त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल
\q जे ते खातील ते अशुद्ध होतील,
\q कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल,
\q ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार ना.
\q
\s5
\v 5 परमेश्वराच्या सणाच्या दिवशी
\q नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?
\q
\v 6 कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर,
\q मिसर त्यांना एकत्र करील
\q आणि मोफ त्यांना मुठमाती देईल,
\q वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील
\q आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.
\q
\s5
\v 7 शासन करण्याचे दिवस येत आहेत,
\q प्रतिफळाचे दिवस येत आहेत,
\q इस्राएल हे जाणणार,
\q तुझ्या महापातकामुळे, तुझ्या
\q आता वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.
\q
\s5
\v 8 संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे,
\q तो एफ्राहमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे
\q आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे.
\q
\v 9 गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले
\q त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे.
\q देव त्यांच्या अधर्माची आठवण करून
\q त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे.
\q
\s5
\v 10 परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला
\q तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता,
\q अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले
\q पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले
\q ते त्यांच्या मूर्तिसारखे घृणास्पद झाले.
\q
\s5
\v 11 एफ्राहमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल
\q तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.
\q
\v 12 जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन
\q ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार
\q यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!
\q
\s5
\v 13 मी एफ्राहमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला
\q पण तरी तो आपल्या मुलास बळी देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.
\q
\v 14 त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे
\q गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.
\q
\s5
\v 15 कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे,
\q तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला.
\q त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून
\q त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार
\q नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.
\q
\s5
\v 16 एफ्राईम रोगी आहे
\q त्यांचे मूळ सुकून गेले आहे,
\q त्यास फळ येणार नाही,
\q त्यांना जरी मुले झाली
\q तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.
\q
\v 17 माझा देव त्यांना नाकारेल
\q कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही,
\q ते देशोदेशी भटकणारे होतील.
\s5
\c 10
\q
\v 1 इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे.
\q त्याला विपुल फळे येतात.
\q जसजसे त्यांची फळ वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या.
\q त्यांची भूमी सुपीक झाली,
\q तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
\q
\v 2 त्यांचे हृदय कपटी आहे,
\q त्यांना त्यांची शिक्षा होईल
\q परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल
\q त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
\q
\s5
\v 3 आता ते म्हणतील,
\q “आम्हाला राजा नाही,
\q कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही
\q आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
\q
\v 4 ते पोकळ शब्द बोलतात
\q खोट्या शपथा वाहून करार करतात,
\q म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात
\q तसा त्यांच्यावर न्याय येईल.
\q
\s5
\v 5 शोमरोनाचे रहिवासी
\q बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील
\q त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील,
\q सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी
\q जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते
\q आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
\q
\v 6 ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील.
\q एफ्राहम लज्जीत होईल,
\q आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे
\q इस्राएल लज्जीत होईल.
\q
\s5
\v 7 शोमरोनाचा राजा पाण्यावर
\q तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
\q
\v 8 दुष्टतेची श्रध्दास्थानाने
\q आणि इस्राएलाची पापे नाश पावतील
\q त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील.
\q लोक पर्वतास म्हणतील, “आम्हाला झाका”
\q आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
\q
\s5
\v 9 इस्राएला,
\q गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस;
\q तू तिथेच राहिला आहेस
\q गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
\q
\s5
\v 10 मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन,
\q त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील
\q व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
\q
\v 11 एफ्राहम ही प्रशिक्षित कालवड आहे
\q तीला मळणी करायला आवडते म्हणून
\q मी तीच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन.
\q मी एफ्राहमावर जू ठेवीन,
\q यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
\q
\s5
\v 12 तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा
\q आणि कराराच्या विश्वासूपणाची
\q फळ कापाल तुमची पडीत भूमी नांगरुन काढा,
\q कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही,
\q तोपर्यंत परमेश्वराला शोधण्याचीच ही वेळ आहे.
\q
\v 13 तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली,
\q तुम्ही अन्यायाची कापणी केली,
\q तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले
\q कारण तू तुझ्या योजनांवर
\q आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
\q
\s5
\v 14 म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल
\q आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील.
\q हे असे घडेल जसे शल्मानाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला
\q तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
\q
\v 15 तुझ्या अती
\q दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील.
\q प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.
\s5
\c 11
\q
\v 1 जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले,
\q आणि माझ्या मुलांला मिसरातून बोलावले.
\q
\v 2 त्यांना जितके बोलविले तेवढे
\q ते माझ्यापासून दूर जात
\q ते बआलास बळी
\q आणि मुर्तीस धूप जाळत.
\q
\s5
\v 3 तरी तो मीच ज्याने एफ्राहमास चालणे शिकविले
\q तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले
\q पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
\q
\v 4 मी त्यांना मानेवता
\q आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो
\q मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो
\q आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
\q
\s5
\v 5 काय ते मिसरात परत येणार?
\q काय अश्शूर त्यावर राज्य करणार?
\q कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
\q
\v 6 त्यांच्या नगरावर तलवार चालेल
\q आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील,
\q त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल.
\q
\v 7 माझ्या लोकांना मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे
\q तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे
\q त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
\q
\s5
\v 8 हे एफ्राहमे,
\q मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला,
\q मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ?
\q मी तुला अदमासारखे कसे करु?
\q मी तुला सबोयिमासारखे कसे करु?
\q माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
\q
\v 9 मी माझा भयानक राग अमलात
\q आणणार नाही मी एफ्राहमाचा पुन्हा नाश करणार
\q नाही कारण मी देव आहे
\q आणि मनुष्य नाही
\q तुमच्यामध्ये असणारा
\q मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
\q
\s5
\v 10 ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर
\q सिंहासारखी गर्जना करेन
\q मी खरोखर गर्जेन
\q आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
\q
\v 11 ते मिसरातून पक्षासारखे
\q आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील
\q मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 12 एफ्राईम मला लबाडीने
\q आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले,
\q पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर,
\q जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.
\s5
\c 12
\q
\v 1 एफ्राईम वारा जोपासतो,
\q आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो,
\q तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो,
\q तो अश्शुरांशी करार करतो,
\q आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
\q
\v 2 परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे.
\q आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील.
\q त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
\q
\s5
\v 3 गर्भात असता यहूदाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली,
\q आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
\q
\v 4 त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला,
\q त्याने रडून देवाची करुणा भाकली,
\q तो बेथेलास देवाला भेटला,
\q देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.
\q
\s5
\v 5 “यहोवा” सेनाधीश परमेश्वर,
\q ज्यांचे स्मरण परमेश्वर नावाने होते.
\q
\v 6 म्हणून तू आपल्या देवाकडे वळ,
\q विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ,
\q आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.
\q
\s5
\v 7 व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत,
\q फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
\q
\v 8 एफ्राहम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे,
\q माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे.
\q माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही,
\q ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
\q
\s5
\v 9 मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे,
\q नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे
\q मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
\q
\v 10 मी संदेष्टयांनी बोललो आहे.
\q आणि त्यांना मी पुष्कळ दुष्टांत दिले आहेत
\q मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
\q
\s5
\v 11 जर गिलादामध्ये दुष्टता असली
\q तर निश्चितच लोक नालायक आहेत.
\q गिलादात ते बैल अर्पितात,
\q त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
\q
\v 12 याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला.
\q इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली
\q आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.
\q
\s5
\v 13 परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले,
\q आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
\q
\v 14 एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे.
\q म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल
\q आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.
\s5
\c 13
\q
\v 1 एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई;
\q तो इस्राएलाचा सरदार झाला;
\q पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.
\q
\v 2 आता ते अधिकाधिक पाप करु लागले
\q ते चांदीच्या ओतीव मूर्त्या आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो
\q तसे बनवू लागले.
\q लोक म्हणू लागले,
\q “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
\q
\s5
\v 3 म्हणून पहाटेच्या ढगासारखे
\q लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून
\q वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे
\q आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
\q
\s5
\v 4 पण मी तुमचा देव परमेश्वर आहे,
\q ज्याने तुम्हाला मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हाला अन्य देव नाही,
\q माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
\q
\v 5 मी तुम्हाला रानात,
\q रुक्ष प्रदेशात जाणून होतो.
\q
\v 6 जेव्हा तुम्हाला गायरान मिळाले तेव्हा तुम्ही तृप्त झालात
\q आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले
\q त्या कारणास्तव तुम्ही मला विसरले.
\q
\s5
\v 7 म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन,
\q चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन.
\q
\v 8 जिची पिल्ले चोरी झालीत
\q अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन,
\q आणि मादी सिंहाप्रमाणे तुम्हाला खाऊन टाकेन,
\q जसा वनपशू तुम्हाला फाडून टाकतो.
\q
\s5
\v 9 इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे,
\q कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.
\q
\v 10 तुझा राजा कोठे आहे?
\q जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो
\q तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले,
\q “मला राजा आणि अधिपती दे?”
\q
\v 11 मी क्रोधाने तुला राजा दिला
\q आणि रागाने त्याला काढूनही घेतले.
\q
\s5
\v 12 एफ्राहमाचा अन्याय गोळा केला आहे,
\q त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.
\q
\v 13 प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील,
\q पण तो अक्कलशून्य मुलगा आहे,
\q कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.
\q
\s5
\v 14 मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवले काय?
\q मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय?
\q मरणा तुझ्या महामाऱ्या कोठे?
\q आण ते इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे.
\q
\s5
\v 15 एफ्राहम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला,
\q तरी पूर्वेचा वारा येईल,
\q परमेश्वराचा वारा रानातून येईल
\q एफ्राहमाचा झरा सुकून जाईल,
\q त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही.
\q त्यांचा शत्रु त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
\q
\s5
\v 16 शोमरोनात दोष येईल,
\q कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे
\q ते तलवारीने पडतील.
\q त्यांची लहान मुले आपटली जातील
\q आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.
\s5
\c 14
\q
\v 1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये,
\q तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
\q
\v 2 कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा,
\q आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर
\q म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु,
\q आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
\q
\s5
\v 3 अश्शूर आम्हास तारणार नाही,
\q आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही,
\q यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही,
\q कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
\q
\s5
\v 4 ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन,
\q त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन,
\q कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
\q
\v 5 मी इस्राएलास दवा सारखा होईल,
\q तो भुकमळासारखा फुलेल
\q आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.
\q
\v 6 त्याच्या फांद्या पसरतील,
\q त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल,
\q आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.
\q
\s5
\v 7 त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील
\q ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील
\q आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील,
\q त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.
\q
\v 8 एफ्राहम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु?
\q मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईल
\q मी सारखा सदाहरित आहे,
\q माझ्यातून तुला फळ मिळते.
\q
\s5
\v 9 कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील?
\q कोण समंजस आहे ज्याला ते समजेल?
\q परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत
\q आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.

384
29-JOL.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,384 @@
\id JOL
\ide UTF-8
\h योएल
\toc1 योएल
\toc2 योएल
\toc3 jol
\mt1 योएल
\s5
\c 1
\p
\v 1 पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.
\q
\v 2 तुम्ही वडिलांनो, हे ऐका,
\q आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या.
\q तुमच्या पूर्वजांच्या दिवसात
\q किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?
\q
\v 3 ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा,
\q आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे,
\q व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.
\q
\s5
\v 4 कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले;
\q झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले;
\q आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
\q
\s5
\v 5 दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा!
\q तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा,
\q कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
\q
\v 6 कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे,
\q ते बळकट व अगणित आहेत.
\q त्यांचे दात सिंहाचे आहेत,
\q आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत.
\q
\v 7 त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे
\q आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे.
\q त्यांने साल सोलून व दूर फेकली आहे.
\q फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.
\q
\s5
\v 8 जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
\q
\v 9 परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत.
\q परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
\q
\v 10 शेतांचा नाश झाला आहे.
\q आणि भूमी रडते.
\q कारण धान्याचा नाश झाला आहे,
\q नवा द्राक्षारस सुकून गेला आहे
\q आणि तेल नासले आहे.
\q
\s5
\v 11 तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा,
\q आणि द्राक्षमळेवाल्यांनो, आक्रोश करा,
\q गहू व जवसासाठी
\q कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.
\q
\v 12 द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे,
\q डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड
\q अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत.
\q मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
\q
\s5
\v 13 याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा!
\q वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा.
\q माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा.
\q कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.
\q
\v 14 पवित्र उपास नेमा,
\q आणि पवित्र सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा.
\q तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांना एकत्र गोळा करा.
\q आणि परमेश्वराला आरोळी मारा.
\q
\s5
\v 15 त्या दिवसाकरता हायहाय!
\q कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
\q सर्वसमर्थापासून जसा नाश तसा तो येईल.
\q
\v 16 आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले,
\q आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
\q
\v 17 बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे,
\q धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत,
\q कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत,
\q कारण धान्य सुकून गेले आहे.
\q
\s5
\v 18 प्राणी कसे कण्हत आहेत!
\q गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत.
\q मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.
\q
\v 19 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो.
\q कारण आगीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
\q आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
\q
\v 20 रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे,
\q कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत
\q आणि आगीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
\s5
\c 2
\q
\v 1 सियोनात कर्णा फुंका,
\q आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा!
\q ह्या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या,
\q कारण परमेश्वराचा दिवस येत आहे;
\q खरोखर, तो जवळ आहे.
\q
\v 2 तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा,
\q तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे.
\q तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा,
\q त्याचे प्रचंड व शक्तिशाली सैन्य जवळ येत आहे.
\q त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही,
\q आणि त्यानंतरही अनेक पिढ्या,
\q पुन्हा कधीच होणार नाही.
\q
\s5
\v 3 त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे,
\q आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे,
\q त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे,
\q पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे.
\q खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
\q
\s5
\v 4 सैन्याचे स्वरुप घोड्यांप्रमाणे आहे
\q आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात.
\q
\v 5 त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा,
\q धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा,
\q युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे.
\q
\s5
\v 6 त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात
\q आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.
\q
\v 7 ते वीरासारखे धावतात,
\q ते सैनिकासारखे तटांवर चढतात,
\q ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात,
\q आणि आपली रांग तोडीत नाहीत.
\q
\s5
\v 8 ते एकमेकांना रेटीत नाहीत.
\q प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात.
\q ते संरक्षणातून जातात
\q आणि ते रेषेबाहेर जात नाही.
\q
\v 9 ते नगरातून धावत फिरतात.
\q ते तटावर धावतात.
\q ते चढून घरात शिरतात.
\q चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात.
\q
\s5
\v 10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते,
\q आकाश थरथरते,
\q सूर्य आणि चंद्र काळे पडतात
\q आणि तारे तळपण्याचे थांबतात.
\q
\v 11 परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो,
\q त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत,
\q कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे.
\q कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे.
\q त्यात कोण टिकू शकेल?
\q
\s5
\v 12 “तरी आताही” परमेश्वर म्हणतो,
\q “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या.
\q रडा, शोक करा आणि उपवास करा.”
\q
\v 13 आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा
\q आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा,
\q कारण तो कृपाळू व दयाळू आहे,
\q तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे,
\q आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.
\q
\s5
\v 14 परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल,
\q आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे?
\q त्याला अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील?
\q
\s5
\v 15 सियोनात कर्णा फुंका.
\q एक पवित्र उपास नेमा,
\q आणि पवित्र मंडळीला बोलवा.
\q
\v 16 लोकांना एकत्र जमवा,
\q मंडळीला पवित्र करा.
\q वडिलांना एकत्र करा,
\q मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा.
\q वर आपल्या खोलीतून
\q आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो.
\q
\s5
\v 17 याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना,
\q द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या.
\q त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर.
\q आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.
\q म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा.
\q राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?
\q
\s5
\v 18 मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली,
\q आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली.
\q
\v 19 परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले,
\q “पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षारस आणि तेल पाठवीन.
\q तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल,
\q आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही.
\q
\s5
\v 20 मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करील,
\q आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन.
\q त्यांची आघाडी पूर्व समुद्रात
\q आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल.
\q त्यांचा दुर्गध चढेल.
\q आणि तेथे वाईट दुर्गधी पसरेल.
\q मी महान गोष्टी करीन.”
\q
\s5
\v 21 हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो,
\q कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत.
\q
\v 22 रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका.
\q कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल,
\q झाडे त्यांचे फळे देतील,
\q आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील.
\q
\v 23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा.
\q आणि परमेश्वर तुमचा देवामध्ये उल्हासित व्हा.
\q कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो,
\q तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो,
\q आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
\s5
\v 24 खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील.
\q
\v 25 मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले.
\q तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.
\q मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.
\q
\s5
\v 26 मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल.
\q आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल.
\q त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.
\q माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
\q
\v 27 मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल.
\q आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे,
\q आणि दुसरा कोणीच नाही.
\q माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
\q
\s5
\v 28 ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन,
\q आणि तुमची मुले आणि मुली भविष्य सांगतील.
\q तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील.
\q तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.
\q
\v 29 आणि त्यादिवसात मी माझा आत्मा
\q दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन.
\q
\s5
\v 30 मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे
\q आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन.
\q
\v 31 परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी
\q सूर्य बदलून अंधकारमय
\q आणि चंद्र रक्तमय असा होईल.
\q
\s5
\v 32 जसे परमेश्वराने म्हटले,
\q जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल.
\q जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील,
\q आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो,
\q ते बाकी वाचलेल्यात राहतील.
\s5
\c 3
\q
\v 1 पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी,
\q जेव्हा मी यहूदाचे व यरुशलेमेचे बंदीवान परत आणीन,
\q
\v 2 मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून,
\q आणि खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन.
\q कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल
\q ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले.
\q आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला.
\q तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.
\v 3 त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्या टाकल्या.
\q त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली
\q आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली.
\q
\s5
\v 4 सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता?
\q तुम्ही माझी परत फेड कराल का?
\q जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी,
\q मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन.
\q
\v 5 तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे,
\q आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे.
\q
\v 6 तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांना
\q त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांना विकले.
\q
\s5
\v 7 पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन,
\q आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन.
\q
\v 8 मी तुमच्या मुलांना आणि मुलींना
\q यहूदी लोकांच्या हाती विकीन.
\q मग ते त्यांना शबाच्या लोकांना
\q दूरच्या राष्ट्रांस विकतील.
\q कारण परमेश्वर हे बोलला आहे.
\q
\s5
\v 9 राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः
\q युध्दाला सज्ज व्हा,
\q बलवान माणसांना उठवा,
\q त्यांना जवळ येऊ द्या,
\q सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत.
\q
\v 10 तुमचे फाळ मोडून त्यांच्या तरवारी करा.
\q आणि कोयत्यांपासून भाले करा.
\q दुर्बल म्हणो की,
\q मी बलवान आहे.
\q
\s5
\v 11 तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो,
\q त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या.
\q हे परमेश्वरा,
\q तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर.
\q
\s5
\v 12 राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत,
\q आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत.
\q तेथे मी सभोवतालच्या
\q सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
\q
\v 13 विळा आणा,
\q कारण पीक तयार झाले आहे.
\q म्हणून तुम्ही विळा घाला,
\q या, द्राक्षे तुडवा,
\q कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे.
\q पिंप भरून वाहत आहेत.
\q कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे.
\q
\s5
\v 14 तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे.
\q कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
\q
\v 15 चंद्र आणि सूर्य काळवंडतील,
\q तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील.
\q
\s5
\v 16 परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील,
\q आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील.
\q आकाश व पृथ्वी कापतील
\q पण परमेश्वर आपल्या लोकांना सुरक्षित स्थान,
\q आणि इस्राएलाच्या लोकांना तो दुर्ग होईल.
\q
\v 17 मग तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे.
\q माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो.
\q तेव्हा यरूशलेम पवित्र होईल.
\q आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
\q
\s5
\v 18 त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षारस पाझरेल,
\q टेकड्यांवरून दूध वाहील,
\q यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील,
\q आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील
\q आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
\q
\v 19 मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल,
\q कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला
\q आणि अदोम ओसाड रान होईल,
\q कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले.
\q
\s5
\v 20 परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल,
\q आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या राहील.
\q
\v 21 मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन.
\q कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.

692
30-AMO.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,692 @@
\id AMO
\ide UTF-8
\h आमोस
\toc1 आमोस
\toc2 आमोस
\toc3 amo
\mt1 आमोस
\s5
\c 1
\p
\v 1 तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्याला मिळाली ती ही आहेत.
\v 2 तो म्हणाला:
\q सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल,
\q तो यरूशलेमेतून आपला शब्द उच्चारील.
\q मेंढपाळांची कुरणे शोक करतील,
\q आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.
\q
\s5
\v 3 परमेश्वर असे म्हणतो,
\q “कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल,
\q अगदी चाऱ्हींमुळे,
\q मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही.
\q कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे.
\q
\v 4 मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन
\q आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन.
\q
\s5
\v 5 मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन,
\q आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यातून राहणारा यांचा पराभव करील.
\q आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 6 आणि परमेश्वर असे म्हणतो,
\q “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल,
\q अगदी चाऱ्हींमुळे,
\q त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही.
\q कारण त्यांनी संपूर्ण लोकांना गुलाम म्हणून नेले,
\q ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.
\q
\v 7 म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन.
\q आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.
\q
\s5
\v 8 मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्याला
\q आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्याला नष्ट करीन.
\q एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन.
\q आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.”
\q असे परमेश्वर देव म्हणतो.
\q
\s5
\v 9 परमेश्वर असे म्हणतो,
\q “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे,
\q मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही.
\q कारण त्यांनी संपूर्ण लोकांना अदोम्यांच्या हाती दिले
\q आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
\q
\v 10 म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन
\q आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करील.”
\q
\s5
\v 11 परमेश्वर असे म्हणतो,
\q “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे,
\q मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही.
\q कारण अदोमाने तरवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला.
\q आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला.
\q त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.
\q
\v 12 म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन,
\q ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”
\q
\s5
\v 13 परमेश्वर असे म्हणतो,
\q “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे,
\q मी शिक्षा करण्यारासून फिरणार नाही.
\q कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले,
\q ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.
\q
\s5
\v 14 म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन,
\q त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरड होत असतांना,
\q आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील.
\q
\v 15 आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 2
\q
\v 1 परमेश्वर असे म्हणतो,
\q “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चाऱ्हींमुळे,
\q मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
\q कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून
\q त्याचा चुना केला.
\q
\s5
\v 2 म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन,
\q आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील.
\q आणि मवाब गोंधळात,
\q आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.
\q
\v 3 मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन,
\q आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 4 परमेश्वर म्हणतो,
\q “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
\q मी त्याला शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
\q कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे,
\q आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
\q त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली
\q अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
\q
\v 5 म्हणून मी यहूदात आग लावीन.
\q त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
\s5
\v 6 परमेश्वर असे म्हणतो:
\q “इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे,
\q तर अगदी चारहींमुळे,
\q मी त्याला शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
\q कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध
\q अाणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
\q
\s5
\v 7 जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात
\q आणि मुलांनी व त्यांच्या वडीलांनी एकाच स्त्रीशी संबंध ठेवले,
\q अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे.
\q
\v 8 आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात,
\q आणि आपल्या देवाच्या घरांत ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षारस पितात.
\q
\s5
\v 9 मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला,
\q ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती;
\q ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते.
\q परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
\q
\v 10 तुम्हाला मिसरमधून आणणारा मीच
\q आणि चाळीस वर्षे मीच तुम्हाला वाळवंटातून पार नेले
\q ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
\q
\s5
\v 11 मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी
\q आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यास वाढवले,
\q इस्राएल लोकांनो, हे असे नाही काय?”
\q असे परमेश्वरा म्हणतो.
\q
\v 12 “पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले,
\q आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.
\q
\s5
\v 13 पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल,
\q त्याच प्रकाराने मी तुम्हाला दाबून टाकीन.
\q
\v 14 चपळ व्यक्ती सुटणार नाही;
\q बलवान आहे त्याला आपली शक्ती लावता यायची नाही,
\q आणि वीराला स्वत:चा जीव वाचवता येणार नाही.
\q
\s5
\v 15 धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही;
\p आणि जोरात धावणारे सुटणार नाही;
\q घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.
\q
\v 16 वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 3
\q
\v 1 इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका,
\q
\v 2 “पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून,
\q मी फक्त तुम्हाला निवडले आहे.
\q म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी
\q तुम्हाला शिक्षा करीन.”
\s5
\v 3 दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय
\q ते एकमेकांबरोबर चालू शकतील काय?
\q
\v 4 शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय?
\q तरुण सिंहाने काही धरले नसेल
\q तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय?
\q
\s5
\v 5 जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय?
\q पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?
\q
\v 6 रणशिंगे फुंकली गेली,
\q तर लोक भिणार नाहीत काय?
\q नगरावर संकट आले
\q आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?
\q
\s5
\v 7 खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना
\q म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून,
\q प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
\q
\v 8 सिंहाने डरकाळी फोडल्यास,
\q कोण भिणार नाही?
\q परमेश्वर बोलला आहे;
\q तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?
\q
\s5
\v 9 अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा:
\q “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा,
\q आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.
\q
\v 10 परमेश्वर असे म्हणतो,
\q ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात,
\q ते योग्य आचरण जाणत नाहीत.”
\q
\s5
\v 11 यास्तव परमेश्वर म्हणतो:
\q “त्या देशाला शत्रू घेरतील,
\q तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल,
\q आणि तुझे महाल लुटले जातील.”
\q
\v 12 परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून
\q फक्त दोन पाय,
\q किंवा कानाचा तुकडा,
\q त्याचप्रकारे इस्राएली लोक जे शोमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा
\q खाटेच्या रेशमी गाद्यांवर बसतात ती वाचवली जातील.”
\s5
\v 13 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः
\q “ऐका, आणि याकोबाच्या घराण्या विरूद्ध साक्ष द्या.
\v 14 कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन
\q तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन,
\q वेदीची शिंगे तोडली जातील
\q आणि ती भूमीवर पडतील.
\q
\s5
\v 15 हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन.
\q हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.”
\q परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
\s5
\c 4
\q
\v 1 शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो,
\q जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता,
\q जे तुम्ही गरजवंतांना ठेचता,
\q जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता,
\q “आण आणि आम्ही पीऊ.”
\q ते तुम्ही हे वचन ऐका.
\q
\v 2 परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की,
\q पाहा, ते तुम्हाला आकड्यांनी,
\q आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील,
\q असे दिवस तुम्हावर येतील.
\q
\s5
\v 3 तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल,
\q तुम्ही आपणास हर्मोनांत टाकाल,
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 4 “बेथेलला जा आणि पाप करा,
\q गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा,
\q तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ
\q आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
\q
\v 5 खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा;
\q खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा;
\q कारण हे इस्राएलाच्या लोकांनो,
\q हे करायला तुम्हाला आवडते.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 6 “मी तुम्हाला तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली
\q आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला,
\q तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 7 “कापणीला तीन महिने राहीले असता,
\q त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला.
\q आणि मी एका शहरावर पाऊस पाडला
\q आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही.
\q एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर
\q पाऊस पडला नाही तो सुकून गेला.
\q
\s5
\v 8 म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले.
\q परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 9 “मी तुम्हाला तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे.
\q टोळांनी तुमच्या
\q बागांचा,
\q व द्राक्षमळ्यांचा,
\q व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाउन टाकले.
\q तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 10 “मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे.
\q तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत,
\q आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत,
\q तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे.
\q तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\v 11 “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला.
\q तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला;
\q आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती.
\q तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 12 “म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन,
\q आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा,
\q इस्राएलाच्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो.
\q
\v 13 कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो,
\q आणि मनुष्याला त्याची कल्पना काय ती प्रगट करतो,
\q जो पाहाटे अंधार करतो,
\q आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो.
\q त्याचे नाव परमेश्वर,
\q सेनाधीश देव आहे.”
\s5
\c 5
\q
\v 1 इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.
\q
\v 2 इस्राएलची कुमारिका पडली आहे;
\q ती पुन्हा कधीही उठणार नाही;
\q तिला एकटीलाच सोडून दिले आहे,
\q तिला उठवणारा कोणीही नाही.
\q
\s5
\v 3 परमेश्वर असे म्हणतो,
\q “ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील
\q आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”
\q
\s5
\v 4 परमेश्वर इस्राएलाच्या घराण्याला असे म्हणतो,
\q “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल.”
\q
\v 5 पण बेथेलास शरण जाऊ नका;
\q गिल्गालला जाऊ नका;
\q सीमा ओलांडून खाली बैर-शेबालाही जाऊ नका.
\q गिलगालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल,
\q आणि बेथेल नाहीसे होईल.
\q
\s5
\v 6 परमेश्वराला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल,
\q नाहीतर तो अग्नीसारखा योसेफाच्या घरावर पडेल
\q आणि ते भस्मसात होऊन जाईल
\q आणि त्याला विझवायला बेथेलमधे कोणी नसणार.
\q
\v 7 जे तुम्ही न्यायाला कडूपणामध्ये बदलता
\q आणि न्यायीपण धुळीस मिळवता,
\q
\s5
\v 8 ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली,
\q तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो;
\q आणि दिवसाला रात्रीने अंधकारमय करतो;
\q समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
\q त्याचे नाव “परमेश्वर” आहे.
\q
\v 9 तो बलवानावर एकाएकी नाश आणतो
\q म्हणून किल्ल्यांवर नाश येतो.
\q
\s5
\v 10 जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात,
\q आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.
\q
\v 11 तुम्ही गरिबांना तुडवीता,
\q आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता.
\q जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली,
\q पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही.
\q तुम्हा द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत,
\q पण त्यापासून निघणारा द्राक्षारस तुम्ही पिणार नाही.
\q
\s5
\v 12 कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे,
\q आणि तुम्ही खरोखरच खुप वाईट कृत्ये केली आहेत.
\q तुम्ही लाच घेता,
\q न्यायीला त्रास देता,
\q आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता.
\v 13 त्यावेळी, सुज्ञ गप्प बसतील, कारण ती वाईट वेळ असेल.
\q
\s5
\v 14 तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा,
\q वाईटाला शोधू नका.
\q म्हणजे जसे तुम्ही म्हणता,
\q त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.
\q
\v 15 वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा,
\q नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा.
\q मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव,
\q योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
\q
\s5
\v 16 यास्तव सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू असे म्हणतो,
\q “सर्व चव्हाट्यावर रडणे असेल,
\q अाणि गल्लोगल्ली लोक हाय हाय म्हणतील,
\q आणि ते शेतकऱ्याला शोक करायला
\q आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलवून घेतील.
\q
\v 17 द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील,
\q कारण मी तुमच्यामध्ये फिरत जाईन.”
\q असे परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 18 जे परमेश्वराच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय!
\q तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे?
\q तो अंधार आहे, उजेड नाही.
\v 19 जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला
\q आणि अस्वलाने त्याला गाठले,
\q अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला
\q आणि त्याला साप चावाला.
\q
\v 20 परमेश्वराचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय?
\q प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्यामध्ये काही तेज नाही असा असेल.
\q
\s5
\v 21 “मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो,
\q मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत.
\q
\v 22 तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत,
\q तरी मी ती स्वीकारणार नाही,
\q शांत्यर्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
\q
\s5
\v 23 तुमच्या गाण्यांच्या कोलाहल येथून दूर न्या,
\q तुझ्या वीणांचा आवज मी ऐकणार नाही.
\q
\v 24 तर जलांप्रमाणे न्याय व न्यायीपण अविरतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो.
\q
\s5
\v 25 इस्राएल, वाळवंटात, चाळीस वर्षे तू मला यज्ञ व दाने अर्पणे करत होता काय?
\q
\v 26 तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देव्हारा,
\q आपणासाठी केलेला तुमच्या देवाचा तारा, ही वाहून न्याल.
\q
\s5
\v 27 म्हणून मी तुम्हाला कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.” असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे.
\s5
\c 6
\q
\v 1 जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना,
\q आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय,
\q जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत,
\q ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.
\q
\v 2 “कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा,
\q तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा.
\q ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय?
\q त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय?
\q
\s5
\v 3 तुम्ही जे वाईट दिवसाला दूर करता,
\q आणि हिंसाचाराचे आसन जवळ आणता, त्यांना हाय हाय.
\q
\v 4 तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता
\q आणि आपल्या गाद्यांवर पसरता.
\q तुम्ही कळपातील कोकरे,
\q आणि गोठ्यातील वासरे खाता.
\s5
\v 5 ते वीणेच्या संगीतावर मुर्खासरखे गातात,
\q आणि दाविदाप्रमाणे ते वाद्यांवर सराव करता.
\q
\v 6 ते प्यालांतून मद्य पितात
\q आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करता.
\q पण ते योसेफाचा नाश होत आहे त्यावर शोक करीत नाही.”
\q
\s5
\v 7 तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील,
\q आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल.
\q
\v 8 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की,
\q “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो,
\q त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो.
\q म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”
\q
\s5
\v 9 त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील.
\q
\v 10 प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो माणूस म्हणेल, नाही, मग तो त्याला म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”
\q
\s5
\v 11 कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.
\q
\s5
\v 12 घोडे खडकावरून धावतात का?
\q तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का?
\q पण तुम्ही तर न्यायाचे विष केले,
\q आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.
\q
\v 13 तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता,
\q “आम्ही आमच्या बळावर कर्नाईम घेतले.”
\s5
\v 14 “पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन,
\q ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या
\q सगळ्या प्रदेशाला दु:ख देईल.”
\q सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.
\s5
\c 7
\p
\v 1 परमेश्वराने मला असे दाखविले की: पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.
\v 2 टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यावर, त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.”
\v 3 मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
\s5
\v 4 प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने माहासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.
\v 5 पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.”
\v 6 मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हे ही घडणार नाही.”
\s5
\v 7 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
\v 8 परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
\q
\s5
\v 9 इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल,
\q इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील,
\q आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
\p
\s5
\v 10 बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही.
\v 11 कारण आमोस असे म्हणतो,
\q यराबाम तलवारीने मरेल,
\q आणि इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
\q
\s5
\v 12 अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.
\v 13 पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजांचे पवित्रस्थान आहेत व राज घराणे आहे.”
\s5
\v 14 मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
\v 15 मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांना, इस्राएलाला, भविष्य सांग.
\s5
\v 16 म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
\v 17 पण परमेश्वर असे म्हणतो,
\q ‘तुझी बायको गावची वेश्या होईल;
\q तुझी मुलेमुली तलवारीने मरतील,
\q तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल,
\q तू अपवित्र जागी मरशील,
\q इस्राएलाच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”
\s5
\c 8
\p
\v 1 परमेश्वराने मला हे दाखवले, पाहा, उन्हाळ्यातल्या फळांची टोपली दिसली.
\v 2 तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला,
\q “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे;
\q मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही.
\q
\v 3 परमेश्वर, असे म्हणातो,
\q त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील.
\q सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”
\q
\s5
\v 4 जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.
\v 5 तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
\q
\v 6 आपण चांदी देऊन गरीबांना
\q आणि एका जोड्याच्या किंमतीत गरजूंना विकत घेऊ
\q आणि गव्हाचे भूसही विकून टाकू.”
\p
\s5
\v 7 परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहीली आहे की, “खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही.
\q
\v 8 त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय?
\q आणि या देशात राहणारा प्रत्येकजण शोक करणार नाही काय?
\q त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल,
\q आणि मिसरातल्या नदी सारखी खवळेल व पुन्हा खाली ओसरेल.”
\q
\s5
\v 9 परमेश्वर असे म्हणतो,
\q “त्या दिवसात,” “मी सूर्याला दुपारीच मावळवीन
\q आणि पृथ्वीला निरभ्र दिवशी अंधकारमय करीन.
\q
\v 10 मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन,
\q आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन.
\q मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन.
\q मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए
\q कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो,
\q तसा मी करीन.
\q तो फारच कडू शेवट असेल.”
\q
\s5
\v 11 परमेश्वर म्हणतो,
\q “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन,
\q ते दिवस येतच आहेत,
\q तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल,
\q पाण्याचा दुष्काळ नसेल,
\q परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”
\q
\v 12 “लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत
\q आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील.
\q परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील.
\q पण त्यांना ते सापडणार नाहीत.
\q
\s5
\v 13 त्यावेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील.
\q
\v 14 जे शोमरोनाच्या पापाची शपथ वाहतात,
\q आणि ‘हे दाना’, तुझा परमेश्वर जिवंत आहे,
\q असे म्हणतात,
\q आणि बैर-शेब्याचा देव जिवंत आहे,
\q असे म्हणतात, ते पडतील,
\q आणि ते परत कधीही उठणार नाहीत.”
\s5
\c 9
\p
\v 1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला,
\q “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल.
\q आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर.
\q कोणी जिवंत राहिल्यास,
\q मी त्याला तरवारीने ठार मारीन.
\q त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही,
\q आणि त्यांच्यातला एकालाही सुटता येणार नाही.
\q
\v 2 ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन.
\q ते आकाशात उंच चढून गेले,
\q तरी मी त्यांना तेथून खाली आणीन.
\q
\s5
\v 3 ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले,
\q तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन.
\q त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला,
\q तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.
\q
\v 4 ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले,
\q तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील.
\q मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे,
\q तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”
\q
\s5
\v 5 आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते,
\q आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात,
\q तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे,
\q आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार
\q व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.
\q
\v 6 ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या,
\q आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापीला आहे,
\q जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
\q त्याचे नाव परमेश्वर आहे.
\q
\s5
\v 7 परमेश्वर असे म्हणतो:
\q “इस्राएलाचे लोकहो,
\q तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय?
\q मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”
\q
\v 8 पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे,
\q आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन,
\q पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
\q
\s5
\v 9 “पाहा, मी आज्ञा करीन,
\q धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन,
\q व त्यातील लहान अशी कणी देखील भुमीवर पडणार नाही.”
\q
\v 10 माझ्या लोकांतील पापी जे असे म्हणतात,
\q “आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हाला आडवेही येणार नाही.
\q ते सर्व तरवारीने मारतील.”
\q
\s5
\v 11 त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे,
\q मी तो पुन्हा उभारीन.
\q मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे,
\q ते मी पुन्हा बांधीन.
\q मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.
\q
\v 12 “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना,
\q आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे,
\q त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.”
\q परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.
\q
\s5
\v 13 परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,”
\q नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला,
\q द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील.
\q आणि पर्वत गोड द्राक्षारस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील.
\q
\s5
\v 14 मी माझ्या लोकांना, इस्राएलाला,
\q कैदेतून सोडवून परत आणीन,
\q ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील,
\q आणि त्यामध्ये वस्ती करतील.
\q ते द्राक्षांचे मळे लावतील.
\q आणि त्यापासून मिळणारा द्राक्षारस पितील.
\q ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.
\q
\v 15 मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन
\q आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत.
\q परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.

50
31-OBA.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,50 @@
\id OBA
\ide UTF-8
\h ओबद्या
\toc1 ओबद्या
\toc2 ओबद्या
\toc3 oba
\mt1 ओबद्या
\s5
\c 1
\p
\v 1 ओबद्याचा दृष्टांत. अदोमाबद्दल प्रभू परमेश्वराने म्हटलेः आम्ही परमेश्वराकडून बातमी ऐकली आणि एक राजदूत राष्ट्रांमध्ये पाठवला आहे. तो म्हणतो, “उठा! आपण त्याच्याविरुध्द लढण्यास उठू.”
\v 2 पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये लहान करीन, तू खूप तिरस्करणीय आहेस.
\p
\s5
\v 3 जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.
\v 4 परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
\p
\s5
\v 5 तू कसा छेदला गेला आहेस! जर तुझ्याकडे चोर आले, तुझ्याकडे रात्री लुटारू आले, तर ते त्यांना पाहिजे तितकेच चोरून घेणार नाहीत का? द्राक्षे गोळा करणारे तुजकडे आले तर ते सरवा नाही का ठेवणार?
\v 6 एसावाची मालमत्ता कशी शोधून काढण्यात आली आहे आणि त्याचा गुप्त खजिना शोधून काढण्यात आला.
\p
\s5
\v 7 तुझ्या कराराच्या सर्व मनुष्यांनी तुला तुझ्या सीमेपर्यंत घालवले आहे, तुझ्या सल्लाच्या मनुष्यांनी तुला फसवले आहे, आणि ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझी भाकर खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे. त्याच्यात काही समजूतदारपणा नाही.
\v 8 परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय?
\v 9 आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील.
\p
\s5
\v 10 तू आपला भाऊ याकोब याच्यावर जो जुलूम केला त्यामुळे लाज तुला झाकील आणि तुझा कायमचा नाश होईल.
\v 11 ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेवर चिठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.
\p
\s5
\v 12 परंतु तू आपल्या भावाचा दिवस, त्याच्या विपत्तीचा दिवस पाहू नकोस, आणि तू यहूदाच्या वंशजास नाशाच्या दिवशी आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी तू गर्वाने बोलू नको.
\v 13 तू माझ्या लोकांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांच्या वेशीत शिरू नको, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहू नको, आणि त्यांच्या विपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको.
\v 14 आणि त्यांच्या पळून जाण्याऱ्यास मारून टाकण्यासाठी चौकात उभा राहू नको संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यास शत्रूच्या हाती देऊ नको.
\p
\s5
\v 15 कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल.
\v 16 कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.
\p
\s5
\v 17 पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
\v 18 याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.
\s5
\v 19 नेगेबचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील. बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
\p
\s5
\v 20 इस्राएल लोकांच्या या सैन्यातील जे बंदिवान कनानांच्यामध्ये आहेत ते सारफथापर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतील, आणि यरुशलेमाचे जे बंदिवान सफारदात आहेत ते नेगेबची गावे घेतील.
\v 21 आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.

129
32-JON.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,129 @@
\id JON
\ide UTF-8
\h योना
\toc1 योना
\toc2 योना
\toc3 jon
\mt1 योना
\s5
\c 1
\p
\v 1 आता अमित्तयाचा पुत्र योना याच्याजवळ परमेश्वराचे वचन आले की,
\v 2 ''ऊठ व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरूध्द आरोळी करून सांग; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे''.
\v 3 परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शिसास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे उतरला तेव्हा तार्शिसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला.
\p
\s5
\v 4 परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले.
\v 5 तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजन आपल्या देवाला हाक मारू लागले, आणि जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.
\p
\s5
\v 6 मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या देवाला हाक मार कदाचित तुझा देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.
\v 7 आणि ते सर्व एकमेकाला म्हणाले, चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठी निघाली.
\p
\s5
\v 8 तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हाला सांग, तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?
\v 9 मग योनाने त्यास सांगितले की मी इब्री आहे; आणि ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.
\v 10 मग त्या माणसास अत्यंत भीती वाटली, आणि ते योनाला म्हणाले, तू हे काय केले ? कारण त्या मनुष्यांनी जाणले तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे. कारण त्याने त्यास तसे सांगितले होते.
\p
\s5
\v 11 मग ते योनाला म्हणाले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे? कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.
\v 12 योना त्यास म्हणाला तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे. हे मला माहीत आहे.
\p
\v 13 तरीसुध्दा त्या माणसांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते. कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.
\p
\s5
\v 14 तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या माणसाच्या जिवामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहे.
\v 15 नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला.
\v 16 मग त्या माणसांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवसही केले.
\p
\s5
\v 17 मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्र त्या माशाच्या पोटात होता.
\s5
\c 2
\nb
\v 1 नंतर माश्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
\v 2 तो म्हणाला,
\q मी आपल्या आपत्तीमुळे परमेश्वराला हाक मारली,
\q आणि त्याने मला उत्तर दिले;
\q मी मृतलोकाच्या पोटातून मदतीकरिता हाक मारली
\q तू माझा आवाज ऐकला.
\q
\s5
\v 3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले,
\q आणि प्रवाहाने मला वेढले,
\q तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ
\q माझ्यावरून गेला.
\q
\v 4 आणि मी म्हणालो, मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे;
\q तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?
\q
\s5
\v 5 पाण्याने माझा प्राण जाईपर्यंत झाकले;
\q आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले,
\q समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.
\q
\v 6 मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो;
\q पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले;
\q तथापि परमेश्वर माझ्या देवा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.
\q
\s5
\v 7 जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले.
\q आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.
\q
\v 8 जे निरर्थक देवाकडे आपले चित्त लावतात,
\q ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात.
\q
\s5
\v 9 परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन;
\q जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन,
\q तारण परमेश्वराकडूनच आहे.
\m
\v 10 मग परमेश्वराने त्या माश्याशी बोलला; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.
\s5
\c 3
\p
\v 1 आणि परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाकडे आले, ते म्हणाले,
\v 2 ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, अणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.
\v 3 मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने फार मोठे शहर होते. ते सर्व फिरण्यास तीन दिवस लागत होते.
\p
\s5
\v 4 तेव्हा योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून सांगितले, की अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.
\p
\v 5 तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, आणि उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानपर्यंत त्यांनी गोणताट नेसले.
\p
\s5
\v 6 कारण निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोणताट नेसून राखेत बसला.
\v 7 आणि राजाने, राज्याच्या आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिध्द केला. त्याने सांगितले, की मनुष्यांनी अथवा पशूंनी, गुराढोरांनी, अथवा शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये व पाणी पिऊ नये.
\p
\s5
\v 8 परंतु मनुष्य आणि पशू गोणताट नेसावेत; आणि देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हाताच्या कुर्मागापासून मागे फिरावे.
\v 9 न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अनुताप पावेल, आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल.
\p
\s5
\v 10 तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता, की मी त्याच्यावर ते आणीन, त्याविषयी त्याने आपले मन बदलले, आणि त्याने तसे केले नाही.
\s5
\c 4
\p
\v 1 परंतु ह्यामुळे योनाला फार वाइट वाटले व त्याला राग आला.
\v 2 तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला की, हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो. तेव्हा माझे सांगणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिसास पळून जाण्याची घाई केली. कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. आणि संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.
\v 3 माझी विनंती ऐक, हे परमेश्वरा, माझा जीव घे कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.
\p
\s5
\v 4 मग परमेश्वर म्हणाला तुला राग येणे चांगले आहे का?
\v 5 मग योना बाहेर निघून शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत व शहराचे काय होईल हे पाहत बसला.
\s5
\v 6 मग तुंबीचा एक वेल परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी उगवला म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे. त्या तुंबीच्या वेली मुळे योनाला खूप आनंद झाला.
\v 7 मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा त्या तुंबीच्या वेलीवर सोडला व ती वेल सुकून गेली.
\p
\s5
\v 8 मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्च्छित झाला व त्याला मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.
\v 9 मग देव योनाला म्हणाला तुंबीमुळे तुला राग येणे हे बरोबर आहे का? तो म्हणाला, रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.
\p
\s5
\v 10 परमेश्वर त्याला म्हणाला या तुंबीसाठी तू काहीच कष्ट केले नाही व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली त्या वनस्पतीवर तू करुणा केली आहे;
\v 11 ज्याला उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही अशी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक ह्या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. तिच्यावर मी करुणा करू नये काय?

552
33-MIC.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,552 @@
\id MIC
\ide UTF-8
\h मीखा
\toc1 मीखा
\toc2 मीखा
\toc3 mic
\mt1 मीखा
\s5
\c 1
\p
\v 1 परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.
\q
\s5
\v 2 सर्व लोकांनो ऐका,
\q पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका!
\q प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.
\q
\v 3 पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे.
\q तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
\v 4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते,
\q तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील,
\q दऱ्या दुभंगतील,
\q आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.
\q
\s5
\v 5 ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप,
\q तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत.
\q याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय?
\q त्याला कारणीभूत आहे शोमरोनच आहे की नाही?
\q यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत?
\q ती यरुशलेमच आहेत की नाही?
\p
\s5
\v 6 “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन,
\q ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.”
\q मी तिचे दगड दरीत ढकलून देईल,
\q आणि तीचे पाये उघडे करीन.
\q
\v 7 तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील.
\q तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जाईल.
\q तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन,
\q कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत,
\q म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
\q
\s5
\v 8 ह्या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन.
\q मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन.
\q मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन
\q आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
\q
\v 9 कारण तिची जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत.
\q कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत,
\q आणि तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमपर्यंत पोचला आहे.
\q
\v 10 गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका.
\q बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.
\q
\s5
\v 11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो,
\q तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा.
\q सनानिवासी बाहेर निघून येत नाही,
\q बेथ-एसलासचा शोक करेल,
\q कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
\q
\v 12 मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत,
\q कारण परमेश्वराकडून संकट खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे.
\q
\s5
\v 13 लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप,
\q लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती.
\q कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.
\q
\v 14 म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील;
\q अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.
\q
\s5
\v 15 मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो,
\q मी तुझा वारीस तुझाकडे आणीन,
\q जे तुमचा ताबा घेतील.
\q इस्राएलचे वैभव अदुल्लामला येईल.
\v 16 म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर.
\q कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल.
\q गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करा.
\q कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
\s5
\c 2
\q
\v 1 जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात,
\q त्यांना हायहाय.
\q आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात,
\q कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.
\q
\v 2 आणि ते शेतांची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात;
\q आणि घरांची इच्छा धरतात व ती मिळवतात.
\q ते पुरुषावर व त्याच्या घराण्यावर,
\q मनुष्यावर व त्याच्या वतनावर जुलूम करतात.
\q
\s5
\v 3 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो,
\q “पाहा! ह्या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजीत आहे,
\q ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही,
\q आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही.
\q कारण ही वाईट वेळ आहे.
\q
\v 4 त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील,
\q आणि भारी विलाप करून म्हणतील:
\q ‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे;
\q परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे.
\q त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला?
\q त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
\q
\v 5 अहो श्रिमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल,
\q असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.”
\q
\s5
\v 6 “तुम्ही भविष्य सांगू नका,
\q असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये;
\q अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
\q
\v 7 पण याकोबाचे घराणे हो,
\q परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय?
\q त्याची ही कृत्ये आहेत की नाही?
\q जो सरळ चालतो त्याला माझी वचने बरे करीत नाहीत काय?
\q
\v 8 तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत.
\q ज्यांना युद्ध आवडत नाही,
\q असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता.
\q
\s5
\v 9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता;
\q त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता.
\q
\v 10 ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते,
\q ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.
\q
\v 11 जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की,
\q “मी द्राक्षारस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,"
\q तर तो देखील या लेकांचा भविष्यावादी होईल.
\q
\s5
\v 12 हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन.
\q खरोखर मी इस्राएलाच्या उरलेल्यांना एकत्र करीन.
\q कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे, तसे त्यांना मी एकत्र ठेवीन.
\q मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा गोंगाट करतील.
\q
\v 13 फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल.
\q ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत;
\q आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे.
\q परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो,
\q आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,
\q
\v 2 जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता
\q आणि वाईटावर प्रेम करता.
\q जे तुम्ही लोकांची चामडी सोलता
\q आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
\q
\v 3 जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता
\q आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता.
\q भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात,
\q आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता,
\q तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता,
\q त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?
\q
\s5
\v 4 आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल.
\q पण तो तुम्हाला उत्तर देणार नाही.
\q त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल.
\q कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
\q
\s5
\v 5 जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवितात,
\q ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी,
\q ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल.
\q पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही,
\q तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात,
\q त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.
\q
\v 6 “म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल,
\q पण तुम्हाला दृष्टांत होणार नाही.
\q तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही.
\q संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल,
\q आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.
\q
\v 7 द्रष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील.
\q ते सर्व आपले ओठ झाकतील,
\q कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही.
\q
\s5
\v 8 पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने,
\q चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे,
\q ह्यासाठी की याकोबला त्याचा अपराध व इस्राएलाला,
\q त्याचे पाप दाखवावा.”
\q
\s5
\v 9 याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो
\q आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो,
\q जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता,
\q आता हे ऐका,
\q
\v 10 तुम्ही सियोन रक्ताने
\q आणि यरुशलेम अन्यायाने बांधले आहे.
\q
\v 11 तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात,
\q आणि तीचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात.
\q आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात.
\q तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणता,
\q “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय?
\q आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”
\q
\s5
\v 12 ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल,
\q यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल,
\q आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.
\s5
\c 4
\q
\v 1 परंतु शेवटल्या दिवसात असे होईल की,
\q परमेश्वराच्या घराचा पर्वत,
\q इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल.
\q आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.
\q
\s5
\v 2 पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील,
\q “या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर,
\q याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या.
\q मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील,
\q आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.”
\q कारण सियोनमधून नियमशास्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
\q
\v 3 तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील,
\q आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील.
\q ते आपल्या तरवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील,
\q आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील.
\q राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तरवार उचलणार नाही,
\q आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
\q
\s5
\v 4 त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली
\q आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल.
\q त्यांना कोणीही घाबरवणार नाही.
\q कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
\q
\v 5 कारण सर्व लोक,
\q प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात.
\q पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.
\q
\s5
\v 6 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन,
\q आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले,
\q त्यांना मी एकवट करीन.
\q
\v 7 मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन,
\q आणि दूर घालवल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.”
\q आणि आता व सदासर्वकाळ,
\q मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करील.
\q
\v 8 आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा,
\q सियोन कन्येच्या टेकाडा,
\q तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल.
\q यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.
\q
\s5
\v 9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस?
\q काय तुझ्यात राजा नाही?
\q काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे?
\q कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.
\q
\v 10 सियोनच्या कन्ये, प्रसवतीप्रमाणे वेदना पावून प्रसुत हो,
\q कारण आता तू शहरातून बाहेर जाशील,
\q शेतात राहशील,
\q आणि बाबेलला जाशील. तेथे तुझी सुटका होईल,
\q आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडवील.
\q
\s5
\v 11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत.
\q ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो;
\q आणि आमचे डोळे सियोनवर तृप्त होवोत.”
\q
\v 12 संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत,
\q आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत.
\q कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.
\q
\s5
\v 13 परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर,
\q मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन.
\q तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील.
\q मी त्यांची संपत्ती परमेश्वराला आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”
\s5
\c 5
\q
\v 1 यरूशलेमेतील लोकहो,
\q आता युध्दामध्ये एकत्र या.
\q तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे,
\q पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.
\q
\s5
\v 2 पण हे, बेथलहेम एफ्राथा,
\q जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस.
\q तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल.
\q त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून अाहे.
\q
\v 3 यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल,
\q आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.
\q
\s5
\v 4 तो उभा राहून परमेश्वराच्या सार्थ्याने,
\q परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने,
\q आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील;
\q कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
\q
\v 5 आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल.
\q अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील,
\q तेव्हा आम्ही सात मेंढपाळ
\q आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.
\q
\s5
\v 6 तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर
\q आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल.
\q जेव्हा ते आमच्या देशात येतील
\q आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील.
\q तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आंम्हाला सोडवीन.
\q
\v 7 जसे परमेश्वराकडून दहिवर येते,
\q जशा गवतावर सरी येतात
\q आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही,
\q तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.
\q
\s5
\v 8 जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो,
\q जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो,
\q आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर
\q त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते,
\q त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक,
\q पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.
\q
\v 9 तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो
\q आणि तो त्यांचा नाश करो.
\q
\s5
\v 10 परमेश्वर असे म्हणतो,
\q “त्या दिवसात असे होईल की, मी
\q तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन
\q आणि तुमचे रथ मोडून टाकीन.
\q
\v 11 तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन
\q आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.
\q
\s5
\v 12 तुझ्या हातून मी जादूटोणा नष्ट करीन,
\q आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील.
\q
\v 13 मी तुझ्या कोरीव मूर्तींचा
\q आणि दगडी स्तंभांचा नाश करीन.
\q तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
\q
\v 14 तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढील,
\q आणि तुझ्या शहरांचा नाश करीन.
\q
\v 15 आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही
\q त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.
\q पण मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करीन.”
\s5
\c 6
\p
\v 1 आता परमेश्वर जे म्हणतो, ते आता ऐक.
\q मीखा त्याला म्हणाला,
\q ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड
\q आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
\q
\v 2 पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो,
\q परमेश्वराचा वाद ऐका,
\q कारण परमेश्वराला आपल्या लोकांशी वाद करायचा आहे,
\q आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
\q
\s5
\v 3 “माझ्या लोकांनो, मी काय केले?
\q मी तुम्हाला कशाने कंटाळविले ते सांगा?
\q माझ्या विरुद्ध साक्ष दे.
\q
\v 4 कराण मी मिसर देशातून तुम्हाला बाहेर काढले
\q आणि दास्यात्वाच्या घरातून तुला सोडवीले,
\q मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
\q
\v 5 माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजीले होते ते आठवा
\q आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा,
\q त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्याला कसे उत्तर दिले,
\q त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
\q
\s5
\v 6 मी परमेश्वराला काय देऊ?
\q आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू?
\q काय मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
\q
\v 7 हजार मेंढ्यांनी किंवा दाहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का?
\q माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का?
\q माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
\q
\v 8 हे मनुष्या,
\q चांगले ते त्याने तुला सांगितले आहे.
\q आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे
\q आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने.
\q यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
\q
\s5
\v 9 परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते.
\q जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो,
\q म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
\q
\v 10 अजूनपण वाईटाचा पैसा
\q आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
\q
\s5
\v 11 मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
\q
\v 12 त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत,
\q त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत.
\q त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
\q
\s5
\v 13 म्हणून मी तुम्हाला गंभीर अशा जखमांनी मारले आहे,
\q तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
\q
\v 14 तू खाशील पण तृप्त होणार नाही,
\q तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील,
\q तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही,
\q आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तरवारीला देईन.
\q
\v 15 तू पेरशील, पण कापणी करणार नाही;
\q तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील,
\q पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही;
\q तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
\q
\s5
\v 16 कारण अम्रीचे नियम पाळले जातात
\q आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात.
\q तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता,
\q म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व
\q त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल
\q आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल.
\s5
\c 7
\p
\v 1 मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे,
\q कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे,
\q काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे,
\q खायला एकही घोंस नाही,
\q पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
\q
\v 2 धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे,
\q आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही;
\q ते सर्व रक्त पाडायला टपतात;
\q ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.
\q
\s5
\v 3 त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत.
\q अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत.
\q सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो.
\q असे ते एकत्र येऊन योजना करतात.
\q
\v 4 त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे.
\q त्यातला अति सरळ तो कोटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे.
\q हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो,
\q आता त्यांचा गोंधळ उडेल.
\q
\s5
\v 5 कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको.
\q मित्रावरही विश्वासून राहू नको.
\q तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको,
\q तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.
\q
\v 6 स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील.
\q मुलगा वडिलांना मान देणार नाही.
\q मुलगी आईविरुध्द जाईल.
\q सून सासूच्या विरोधात जाईल.
\q
\s5
\v 7 परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन,
\q मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन,
\q माझा परमेश्वर माझे ऐकेल.
\q
\v 8 माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन.
\q जेव्हा मी अंधारात बसेन
\q तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
\q
\s5
\v 9 परमेश्वर माझा वाद करेल
\q आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन,
\q कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे.
\q तो मला प्रकाशाकडे आणील,
\q आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.
\q
\s5
\v 10 मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?”
\q असे ज्याने मला म्हटले त्याला लाज झाकून टाकेल.
\q माझे डोळे तिच्याकडे पाहतील,
\q रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.
\q
\s5
\v 11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल.
\q त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.
\q
\v 12 त्या दिवसात ते अश्शूर देशातून
\q आणि मिसर देशापासून,
\q फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून,
\q दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.
\q
\v 13 देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.
\q
\s5
\v 14 म्हणून तू आपल्या लोकांस,
\q तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला,
\q आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचिन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
\q
\v 15 जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास,
\q त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
\q
\s5
\v 16 राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील.
\q ती आपला हात आपल्या मुखाला लावतील,
\q त्यांचे कान बहिरे होतील.
\q
\v 17 ते सापाप्रमाणे धुळ चाटतील,
\q भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील.
\q परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील,
\q आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
\q
\s5
\v 18 तुझ्यासारखा देव कोण आहे?
\q जो तू पापांची क्षमा करतोस
\q आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो.
\q तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही,
\q कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
\q
\s5
\v 19 तो आम्हावर पुन्हा दया करील;
\q तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील
\q आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
\q
\v 20 पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की,
\q तू याकोबला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासुपणा देशील.

110
34-NAM.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,110 @@
\id NAM
\ide UTF-8
\h नहूम
\toc1 नहूम
\toc2 नहूम
\toc3 nam
\mt1 नहूम
\s5
\c 1
\p
\v 1 निनवेविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.
\p
\s5
\v 2 परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.
\v 3 परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरपराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
\p
\s5
\v 4 तो समुद्राला दटावतो आणि त्याला कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.
\v 5 त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यात राहणारा प्रत्येक माणूस थरथरतो.
\p
\s5
\v 6 त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
\p
\s5
\v 7 परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
\v 8 पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.
\p
\s5
\v 9 तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.
\v 10 ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत:च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.
\v 11 जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.
\p
\s5
\v 12 परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.
\v 13 तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.
\p
\s5
\v 14 आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.
\p
\s5
\v 15 पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.
\s5
\c 2
\p
\v 1 तो तुला आदळून तुकडे करण्यासाठी तुझ्याविरूद्ध आला आहे. शहरातील कोटांचे रक्षण कर, रस्त्यावर नजर ठेव, स्वतःला बळकट कर, तुझ्या सैन्याला एकत्र कर.
\v 2 कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.
\p
\s5
\v 3 त्यांच्या वीरांच्या ढाली लाल आहेत आणि शूर माणसे किरमिजी रंगाचे पोषाख नेसले आहेत, त्यांच्या तयारी करण्याच्या दिवशी रथ पोलादाने चमकत आहेत आणि सुरूच्या काठ्यांचे भाले हवेत हालवत आहेत.
\v 4 रथ रस्त्यातून वेगाने धावत आहेत. रूंद रस्त्यामधून ते इकडे तिकडे झपाट्याने पळत आहेत. ते मशाली सारखे आणि विजांसारखे धावत आहेत.
\p
\s5
\v 5 जो कोणी तुझे तुकडे करण्यास धडक देत आहे तो त्याच्या अधिकाऱ्यांना बोलावत आहे; ते उतावळीने त्यांच्या चालण्यात अडखळत आहेत. ते तटबंदीवर हल्ला करण्याची घाई करत आहेत. हल्ला करणाऱ्यापासून संरक्षणासाठी रक्षणाची तयारी करत आहेत.
\p
\s5
\v 6 पण नदीकाठची दारे उघडी केली आहेत, आणि राजवाडा नाश होऊन कोसळला आहे.
\v 7 असा निर्णय होऊन चुकला आहे, राणी उघडी झाली आहे आणि तिला धरून नेले आहे आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे कण्हत आहेत, त्या आपली छाती पिटून घेत आहेत.
\p
\s5
\v 8 निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे, पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत. दुसरे किंचाळतात, थांबा! थांबा, परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही.
\v 9 चांदी लुटून घ्या, सोने लुटून घ्या, सर्व उज्वल शोभिवंत वस्तूंचा अमर्याद साठा आहे, त्याला अंत नाही.
\v 10 निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.
\p
\s5
\v 11 आता सिंहाची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाच्या छाव्याची भक्ष्य खाण्याची जागा कोठे आहे? सिंह आणि सिंहीण त्यांच्या छाव्याबरोबर तेथे फिरत असत, ते तेथे कशालाही भीत नसत ती जागा कोठे आहे?
\v 12 सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडून तुकडे करीत असे आणि तो आपल्या सिंहिणीसाठी भक्ष्याचा गळा दाबीत असे आणि तो आपल्या गुहा भक्ष्याने आणि त्याची गुहा शिकारीने भरीत असे.
\p
\s5
\v 13 पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन; आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष्य तुझ्या देशातून नाहीसे करीन, आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही.
\s5
\c 3
\p
\v 1 पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो! ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे; तिच्यात नेहमी बळी आहेत.
\v 2 परंतु आता तेथे चाबकांच्या फटकाऱ्यांचे आवाज, चाकांच्या खडखडाटाचे ध्वनी, घोड्यांच्या टापांचे आणि रथाच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐकता.
\p
\s5
\v 3 लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत.
\v 4 हे सर्व सुंदर वेश्येच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीण कृतीने लोकांना विकते.
\s5
\v 5 पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडापर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन.
\v 6 मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजिरवाणे करीन. प्रत्येकजण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन.
\v 7 असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू?
\p
\s5
\v 8 निनवे तू नो-आमोन थेबेस, जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय?
\v 9 कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.
\p
\s5
\v 10 तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत माणसांवर चिठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान माणसांना साखळ्यांनी बांधून नेले.
\v 11 तू सुध्दा दारूड्या होशील. तू लपण्याचा प्रयत्न करशील. तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील.
\p
\s5
\v 12 तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
\v 13 पाहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियांप्रमाणे आहेत. तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आगीने खाऊन टाकले आहेत.
\p
\s5
\v 14 वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर.
\v 15 तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.
\p
\s5
\v 16 आकाशातल्या ताऱ्यापेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत. परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत; ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील.
\v 17 तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापति टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही.
\p
\s5
\v 18 अश्शूराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत. तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत. तुझे लोक पर्वतांवर पांगले आहेत. आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही.
\v 19 तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?

195
35-HAB.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,195 @@
\id HAB
\ide UTF-8
\h हबक्कूक
\toc1 हबक्कूक
\toc2 हबक्कूक
\toc3 hab
\mt1 हबक्कूक
\s5
\c 1
\p
\v 1 संदेष्टा हबक्कूकला याला मिळालेले देववचन.
\q
\v 2 “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू,
\q आणि तू ऐकणार नाहीस?
\q जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली,
\q पण तू मला वाचवत नाही!
\q
\s5
\v 3 तू मला अन्याय
\q व अनर्थ का पाहायला लावतोस?
\q नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत;
\q आणि भांडण आहे व वाद उठतो!
\q
\v 4 ह्यास्तव नियमशास्र कमकुवत झाले आहे,
\q आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही,
\q कारण दुष्ट न्यायीला घेरतो,
\q त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”
\q
\s5
\v 5 “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा!
\q कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हाला सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.
\q
\v 6 कारण पाहा! मी खास्द्यांची उठावनी करतो, ते भयानक व उतावीळ राष्ट्र आहे.
\q जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहे.
\q
\v 7 ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात.
\q
\s5
\v 8 त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद अाहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात,
\q आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.
\q
\v 9 ते सर्व हिंसा करण्यास येतात,
\q त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात!
\q
\s5
\v 10 म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत!
\q ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात!
\q
\v 11 मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”
\q
\s5
\v 12 “हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही.
\q परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.
\q
\s5
\v 13 तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही.
\q मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस?
\q जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस?
\q
\v 14 तू लोकांना समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत.
\q
\s5
\v 15 ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात
\q आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.
\q
\v 16 म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात.
\q कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते.
\q
\v 17 तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांचा कत्तल करीतच राहणार काय?”
\s5
\c 2
\q
\v 1 मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिल आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल
\q व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन.
\q
\s5
\v 2 परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!
\q
\v 3 कारण हा दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही,
\q जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही!
\q
\s5
\v 4 पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत:च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.
\q
\v 5 कारण द्राक्षारस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही.
\q परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही.
\q तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांना एकत्र करतो.
\q
\s5
\v 6 सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्याला म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील.
\q जो आपले नाही ते वाढवतो, त्याला हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?
\q2
\v 7 तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठतील नाही काय? तू त्यांच्यासाठी बळी असा होशील.
\q
\v 8 कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील,
\q ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील.
\q
\s5
\v 9 ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो
\q व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्याला हाय हाय!
\q
\v 10 तू अनेक लोकांना मारलेस, त्यामुळे तू स्वत:च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहे आणि आपल्या स्वत:च्या जिवा विरुद्ध पाप केले आहे.
\q
\v 11 भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील.
\q
\s5
\v 12 ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्याला हाय हाय!
\q
\v 13 त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल,
\q आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय?
\q
\v 14 तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.
\q
\s5
\v 15 ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्याला हाय हाय! तू आपले विष त्यात घालून त्याला मस्त करतो,
\q ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे.
\q
\v 16 तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर!
\q2 परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल.
\q
\s5
\v 17 लबानोनावर वर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल.
\q
\s5
\v 18 मूर्तिकाराने कोरून केलेल्या मुर्तिंत त्याला काय लाभ? कारण जो कोणी त्याला कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे,
\q कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो.
\q
\v 19 जो लाकडास म्हणतो जागा हो! किंवा दगडाला म्हणतो ऊठ! त्याला हाय हाय! ह्या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले अाहेत, पण त्यात मुळीच श्वास नाही.
\q
\v 20 परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”
\s5
\c 3
\p
\v 1 संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः
\v 2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो.
\q हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.
\q
\s5
\v 3 तेमानहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे,
\qs सेला.
\qs*
\q परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.
\q
\s5
\v 4 त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि तेथे त्याने त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
\q
\v 5 रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघून चाले.
\q
\s5
\v 6 तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला.
\q सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या,
\q त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.
\q
\s5
\v 7 कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.
\q
\v 8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? कारण तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास.
\q
\s5
\v 9 तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला).
\q तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.
\q
\v 10 पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले!
\q जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे. त्याने आपला हात उंचावला आहे.
\q
\s5
\v 11 चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दुर गेले आहेत!
\q
\v 12 तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.
\q
\s5
\v 13 तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे,
\q व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला अाहे, सेला!
\q
\s5
\v 14 ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हाला पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनीकांच्या डोक्यात भोसकले,
\q गरीब माणसाला एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती.
\q
\v 15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
\q
\s5
\v 16 मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझे हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे.
\q म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.
\q
\s5
\v 17 जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराश झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,
\s5
\v 18 तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
\v 19 प्रभू परमेश्वर माझे बळ आहे,
\q तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील.
\q3 (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)

182
36-ZEP.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,182 @@
\id ZEP
\ide UTF-8
\h सफन्या
\toc1 सफन्या
\toc2 सफन्या
\toc3 zep
\mt1 सफन्या
\s5
\c 1
\p
\v 1 यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे,
\q
\v 2 परमेश्वर असे म्हणतो की, “मी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करीन.
\q
\v 3 मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन.
\q मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन. परमेश्वर असे म्हणतो.
\q
\s5
\v 4 मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले
\q आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन.
\q
\v 5 जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणिपरमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,
\v 6 आणि जे परमेश्वराला अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”
\s5
\v 7 प्रभू परमेश्वराच्या उपस्थीतीत शांत राहा, कारण परमेश्वराचा दिवस जवळ येत आहे;
\q2 कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.
\q
\v 8 “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन.
\q
\v 9 तेव्हा उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि जे आपल्या धन्याचे घर फसवणूक
\q व हिंसाचाराने भरतात त्यांना मी त्या दिवशी शिक्षा देईन.”
\q
\s5
\v 10 परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत
\q आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवज होईल.
\q
\v 11 मक्तेशातल्या रहीवाश्यांनो गळा काढून रडा,
\q कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत.
\q
\s5
\v 12 “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.
\q
\v 13 त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल.
\q ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षारस प्यायला मिळणार नाही.
\q
\s5
\v 14 परमेश्वराचा महान दिवस जवळ येत आहे. तो जवळ आहे आणि वेगाने येऊ पाहत आहे! परमेश्वराच्या दिवसाचा आवाज होतो, तेथे वीर दु:खाने ओरडत आहे.
\v 15 तो दिवस क्रोधाचा, दु:खाचा व क्लेशाचा दिवस अाहे, वादळ व नासधूस ह्यांचा दिवस आहे, उजाडीचा व ओसाडीचा दिवस,
\q अभ्रांचा व अंधाराचा दिवस आहे.
\q
\v 16 तो दिवस तटबंदीच्या शहरांविरूद्ध
\q आणि उंच बूरूजांविरूद्ध तुतारीच्या शब्दाचा व गजराचा असा आहे.
\q2
\s5
\v 17 मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील,
\q कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे.
\q2 त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल.
\q
\v 18 परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही.
\q तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल,
\q कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!”
\s5
\c 2
\q
\v 1 हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.
\v 2 फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी,
\q परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.
\v 3 पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्याला शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका.
\q कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित राहाल.
\q
\s5
\v 4 गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल.
\q ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.
\q
\v 5 समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांना, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे.
\q2 कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही.
\q
\s5
\v 6 तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.
\q
\v 7 किनाऱ्याचा प्रदेश यहूदाच्या घराणातल्या राहिलेल्यांचा होईल.
\q ते त्यावर आपले कळप चारतील.
\q संध्याकाळी, ते अष्कलोनमधील घरात विश्रांती घेतील,
\q कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांची काळजी घेईल, आणि त्यांचे भविष्य पुनर्संचयित करीन.
\q
\s5
\v 8 मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत.
\q त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.
\q
\v 9 ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील.
\q ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील.
\q पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”
\q
\s5
\v 10 मवाब व अमोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांना टोमणे मारले व त्यांची थट्टा केली.
\v 11 ते लोक परमेश्वराला घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रांची द्विपे त्याची आराधना करतील.
\q
\s5
\v 12 अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तरवारीने मराल.
\q
\v 13 नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल.
\q
\v 14 तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील,
\q त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील,
\q त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.
\q
\s5
\v 15 जी नगरी आधी हर्षात व भीती शिवाय जगत होती, आणि आपल्या मनात म्हणत होती की, मीच आहे आणि माझ्याबरोबरीची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे.
\q ती आता कशी ओसाड व वनपशू बसण्याचे स्थान अशी झाली आहे!
\q आणि तिच्याजवळून जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणार व आपला हात हलवणार!
\s5
\c 3
\q
\v 1 त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.
\q
\v 2 तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही.
\q तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही.
\q
\s5
\v 3 तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
\q तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत!
\q
\v 4 तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत.
\q तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे!
\q2
\s5
\v 5 परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही!
\q2 तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही.
\q
\s5
\v 6 मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे.
\q मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कोणीही जात नाही.
\q त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही.
\q
\v 7 मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत.
\q
\s5
\v 8 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला उठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी,
\q आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा,
\q असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.
\q
\s5
\v 9 त्यानंतर लोकांना मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी.
\q
\v 10 कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.
\q
\v 11 त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही,
\q कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन,
\q आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस.
\q
\s5
\v 12 तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांनाच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.”
\q
\v 13 “इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाही व खोटे बोलणार नाहीत.
\q त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
\q
\s5
\v 14 सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!
\q यरुशलेमच्या कन्ये, आनंद व उल्लास कर!
\q
\v 15 कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे!
\q इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही!
\q
\v 16 त्या दिवशी ते यरुशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको.
\q
\s5
\v 17 परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
\q तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
\q तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
\q
\v 18 जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी नींदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेल. त्यांची निंदा तिच्यावरचा भार झाला आहे.)?
\q
\s5
\v 19 त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन,
\q जी लंगडी आहे तीला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन. आणि ज्या प्रत्येक देशांत त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यात मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन.
\q
\v 20 त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन,
\q मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो!

117
37-HAG.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,117 @@
\id HAG
\ide UTF-8
\h हाग्गय
\toc1 हाग्गय
\toc2 हाग्गय
\toc3 hag
\mt1 हाग्गय
\s5
\c 1
\p
\v 1 दारयावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या, सहाव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल यहूदाचा राज्यपाल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा, मुख्य याजक याच्याकडे हाग्गय संदेष्ट्याद्वारे परमेश्वराचे वचन आले, ते असे म्हणाले,
\v 2 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो “हे लोक म्हणतात, की आमची येण्याची अजून वेळ आली नाही, किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.”
\p
\s5
\v 3 आणि परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या हातून आले आणि म्हणाले,
\q
\v 4 “इकडे हे मंदिर ओसाड पडले असता,
\q तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात राहावे असा समय आहे का?
\q
\v 5 आता सेनाधीश परमेश्वर म्हणतोः
\q तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या!
\q
\v 6 तुम्ही खूप बीज पेरता, पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते;
\q तुम्ही खाता पण ते तुम्हाला पुरेसे नसते,
\q तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही,
\q तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी ऊब येत नाही,
\q आणि जो मजुरी मिळवतो तो ती भोके पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी कमवतो.”
\q
\s5
\v 7 सेनाधीश परमेश्वर हे म्हणतोः
\q “आपल्या मार्गाकडे लक्ष द्या!
\q
\v 8 पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा;
\q मग मी त्यात आनंद करीन आणि मी गौरविला जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.
\q
\v 9 “तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली, परंतु पाहा! तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली!
\q का? हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो,!
\q कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक माणूस आपआपल्या स्वत:च्या घरात आनंद घेत आहे.
\q
\s5
\v 10 यास्तव तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे.”
\q
\v 11 “मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर नव्या द्राक्षारसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशूवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे.”
\p
\s5
\v 12 मग शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा व उरलेल्या सर्व लोकांसह यांनी, आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली, कारण आपला देव परमेश्वर ह्याने त्यास पाठवले होते आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले.
\v 13 मग परमेश्वराचा निरोप्या, हाग्गय याने, परमेश्वराचा निरोप लोकांस सांगितला आणि म्हणाला; परमेश्वर असे म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे!”
\p
\s5
\v 14 यहूदाचा राज्यपाल शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा आणि सर्व उरलेल्या लोकांच्या आत्म्याला परमेश्वराने उत्तेजित केले. तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले.
\v 15 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हे झाले.
\s5
\c 2
\p
\v 1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या हातून परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 2 यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा आणि उरलेल्या लोकांशी तू बोल. म्हण,
\q
\s5
\v 3 ज्याने हे मंदिर त्याच्या पहिल्या वैभवात पाहिले,
\q असा कोण तुम्हामध्ये उरला आहे?
\q आणि आता तुम्हाला हे कसे दिसते?
\q हे तुमच्या नजरेत काहीच नसल्यासारखे नाही काय?
\q
\v 4 परमेश्वर असे म्हणतो, आता, हे जरुब्बाबेला बलवान हो!
\q आणि हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या मुला, यहोशवा, बलवान हो;
\q आणि या देशाच्या सर्व लोकांनो, बलवान व्हा. असे परमेश्वर म्हणतो.
\q आणि काम करा, कारण मी तुम्हाबरोबर आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\v 5 तुम्ही जेव्हा मिसरातून बाहेर आला तेव्हा जे वचन बोलून मी तुमच्याबरोबर करार स्थापित केला,
\q त्याप्रमाणे मी तुम्हासोबत आहे आणि माझा आत्मा तुमच्यात राहत आहे, घाबरू नका!
\q
\s5
\v 6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो,
\q अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हालवून सोडीन.
\q
\v 7 आणि मी प्रत्येक राष्ट्रांना हालवून सोडीन, आणि प्रत्येक राष्ट्र त्यांच्या मोलवान वस्तू माझ्याकडे घेऊन येतील,
\q आणि मी हे मंदिर वैभवाने भरून टाकीन! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\s5
\v 8 रुपे माझे आहे, सोने माझे आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\v 9 या मंदिराचे शेवटचे वैभव ह्याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठे होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q आणि मी या स्थळास शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\p
\s5
\v 10 दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
\v 11 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आता तू याजकांना नियमशास्त्राविषयी विचार आणि म्हण,
\v 12 जर कोणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो. त्याच्या पदराने भाकरीला, किंवा कालवणाला, मद्य किंवा तेल, किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला, तर ह्या सर्व वस्तू पवित्र होतील का? याजकांनी उत्तर दिले, “नाही.”
\p
\s5
\v 13 मग हाग्गय म्हणाला, “जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे, कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल का?” याजक म्हणाले, “हो! तेसुध्दा अशुद्ध होईल.”
\v 14 मग हाग्गयाने उत्तर दिले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तसे हे लोक व तसे हे राष्ट्र माझ्यासमोर आहे, तसे त्यांचे हाताचे प्रत्येक काम आहे, तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे.
\p
\s5
\v 15 तर आता आमच्या पूर्वी परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड ठेवण्याच्या पूर्वीची पद्धत कशी होती याचा विचार करा.
\v 16 त्या दिवसात जर कोणी वीस मापे धान्याच्या राशीजवळ आला तर त्याच्या हाती दहा मापेच लागत. द्राक्षकुंडातून पन्नास पात्रे भरून काढावयास गेला तर त्याला फक्त वीसच मिळत होते.
\v 17 मी तुम्हाला आणि तुमच्या हातच्या सर्व कामावर पाठवलेले रोग आणि बुरशी यांनी पीडले पण तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
\p
\s5
\v 18 “आजच्या पूर्वीची स्थिती कशी होती याचा विचार करा. नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवसापासून ज्या दिवशी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या दिवसापासून स्थिती कशी होईल याचा विचार करा.
\v 19 कोठारात अजून बीज आहे का? द्राक्षवेल, अंजीराचे झाड, डाळिंब, आणि जैतून झाड ह्यांनी काही उत्पन्न दिले नाही! पण ह्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन!”
\p
\s5
\v 20 मग महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, हाग्गयाकडे परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा आले आणि म्हणाले,
\v 21 यहूदाचा राज्यपाल जरुब्बाबेलाशी बोल व सांग,
\q मी आकाश आणि पृथ्वी हालवीन.
\q
\v 22 मी राज्यांचे सिंहासन उलथवून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन!
\q मी त्यांच्या रथाना व सारथ्यांना उलथून टाकीन. त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येकजण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.
\q
\s5
\v 23 सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, त्यादिवशी शल्तीएलाच्या मुला, जरुब्बाबेला, माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन, असे परमेश्वर म्हणतो.
\q मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन, कारण मी तुला निवडले आहे!
\q असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

518
38-ZEC.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,518 @@
\id ZEC
\ide UTF-8
\h जखऱ्या
\toc1 जखऱ्या
\toc2 जखऱ्या
\toc3 zec
\mt1 जखऱ्या
\s5
\c 1
\p
\v 1 पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे:
\v 2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता.
\v 3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो:
\q “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे;
\q “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\p
\s5
\v 4 संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरीतींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.
\q
\v 5 “तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?
\q
\v 6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले,
\q ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?”
\m तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत.”
\p
\s5
\v 7 दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा:
\v 8 “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”
\v 9 मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”
\p
\s5
\v 10 मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या माणसाने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.”
\v 11 नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.”
\s5
\v 12 मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरुशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”
\v 13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.
\p
\s5
\v 14 मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो:
\q “मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा आलो आहे!
\q
\v 15 आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे;
\q कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”
\q
\s5
\v 16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरुशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.”
\q सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरुशलेमेवर लावण्यात येईल.”
\q
\v 17 पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील,
\q परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरुशलेमची निवड करील.”
\p
\s5
\v 18 मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!
\v 19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”
\p
\s5
\v 20 मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.
\v 21 मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”
\s5
\c 2
\p
\v 1 मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मला मापनसूत्र घेतलेला एक माणूस मला दिसला.
\v 2 तेव्हा मी त्याला विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरुशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.”
\s5
\v 3 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.
\v 4 दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्याला सांग,
\q ‘यरुशलेमेत माणसांचे व गुराढोरांचे वास्तव्य
\q जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.
\q
\v 5 परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईल.”
\q
\s5
\v 6 परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेतील प्रदेशातून पळून जा.
\q होय! मी तुम्हाला आकाशाच्या चार वाऱ्याप्रमाणे चहूकडे पांगवले आहे.”
\q
\v 7 “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”
\q
\s5
\v 8 कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हाला लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे;
\q जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,
\q
\v 9 “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील
\q तेव्हा तुम्हाला कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”
\q
\s5
\v 10 परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा!
\q कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”
\q
\v 11 त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्याला मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल;
\q कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.
\q
\s5
\v 12 स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरुशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
\q
\v 13 लोक हो शांत राहा! कारण, परमेश्वर आपल्या पवित्र निवासातून येत आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्याला दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.
\v 2 मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”
\v 3 यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता,
\p
\s5
\v 4 म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”
\v 5 तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्याला स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.
\p
\s5
\v 6 पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला,
\v 7 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो,
\q “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील,
\q तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील.
\q माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
\q
\s5
\v 8 तेव्हा हे यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका!
\q ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्याला फांदी असे म्हणतील.
\q
\v 9 आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत,
\q आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’
\q आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\p
\s5
\v 10 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”
\s5
\c 4
\p
\v 1 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्याला झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले.
\v 2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
\v 3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”
\p
\s5
\v 4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “प्रभू, या गोष्टींचा अर्थ काय?”
\v 5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” “नाही प्रभू” मी म्हणालो.
\p
\s5
\v 6 मग त्याने मला सांगितले हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे तो असा: “बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल.” सेनाधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
\v 7 “हे उंच पर्वता तू कोण आहेस? तू जरुब्बाबेलासमोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर ‘अनुग्रह! अनुग्रह! असा गजर करीत शिखर पुढे आणील.”
\p
\s5
\v 8 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे:
\v 9 “जरुब्बाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.
\v 10 लहानशा आरंभाच्या दिवसाला कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील”
\v 11 मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?”
\p
\s5
\v 12 मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या.
\q त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
\v 13 तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला या गोष्टींबद्दल माहीती नाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!”
\s5
\v 14 तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी संपुर्ण पृथ्वीतून निवडलेल्या दोन अभिषिक्तांची ती प्रतिके आहेत.”
\s5
\c 5
\p
\v 1 नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला.
\v 2 त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दीले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात व रूंदी दहा हात आहे.”
\p
\s5
\v 3 तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.
\q
\v 4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन.
\q तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”
\p
\s5
\v 5 मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला आणि मला म्हणाला, “तुझे डोळे वर करून बघ! काय येत आहे?”
\v 6 मी विचारले, “ते काय आहे?” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपली आहे. हे त्यांच्या संपूर्ण देशाच्या पापाचे रूपक आहे.”
\v 7 मापन-टोपलीवरचे झाकण वर उचलेले होते आणि त्या मापन-टोपलीत एक स्त्री बसली होती.
\p
\s5
\v 8 देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले.
\v 9 नंतर मी माझे डोळे वर केले व पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी ती टोपली उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधून नेली.
\p
\s5
\v 10 मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “त्या ती टोपली कोठे घेऊन जात आहेत?”
\v 11 देवदूत मला म्हणाला, “शिनार देशामध्ये त्या मापन-टोपलीसाठी एक मंदिर बांधण्यासाठी त्या जात आहेत. जेव्हा ते घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती टोपली तेथे ठेवतील.”
\s5
\c 6
\p
\v 1 मग मी वळून आणि आपले डोळे वर करून बघितले तेव्हा दोन पर्वतांमधून चार रथ जातांना दिसले. ते पर्वत पितळेचे होते.
\v 2 पहिल्या रथला तांबडे रंगाचे घोडे होते. दुसऱ्या रथाला काळ्या रंगाचे घोडे होते.
\v 3 तिसऱ्या रथाला पांढऱ्या रंगाचे घोडे होते आणि चौथ्या रथाला ठिपके असलेले राखाडी घोडे होते.
\v 4 मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, हे काय आहे?”
\p
\s5
\v 5 देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे स्वर्गातले वारे आहेत. ते अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर उभे होते व आता बाहेर येत आहेत.
\v 6 काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिमेला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिणेला जात आहेत.”
\p
\s5
\v 7 तांबडे घोडेही बाहेर पडले, त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा कल होता. म्हणून देवदूताने त्यांना पृथ्वीवर फिरण्यास सांगितले मग ते पृथ्वीवर फिरले.
\v 8 मग त्याने मला हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी आपले काम पूर्ण केले आहे. उत्तर देशात त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे.”
\p
\s5
\v 9 मग मला परमेश्वराचे वचन मिळाले. तो म्हणाला,
\v 10 बंदिवासात असलेल्या हेल्दय, तोबीया व यदया ह्यास सोबत घे. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, योशीयाच्या घरी आजच जा, ते बाबेलाहून आले आहेत.
\v 11 त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.
\q
\s5
\v 12 मग त्याला पुढील गोष्टी सांग: “सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो:
\q ‘फांदी’ नावाचा एक माणूस आहे. तो आपल्या स्थानावर उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
\q
\v 13 तो परमेश्वराचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली होईल. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील.
\q तो सिंहासनावर याजकही होईल. या दोन्हीमध्ये शांतीची सहमती असेल.”
\p
\s5
\v 14 “तो मुकुट परमेश्वराच्या मंदिरात ठेवतील. हेलेम, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या दानशूरपणाची आठवण म्हणून ठेवण्यात येईल.
\p
\v 15 दूरवर राहणारे लोक येतील आणि परमेश्वराचे मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की सेनाधिश परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठवले. जर तुम्ही लक्षपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकाल तर असे होईल.”
\s5
\c 7
\p
\v 1 पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले.
\v 2 बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले.
\v 3 ते संदेष्ट्यांना आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरातील याजकाला म्हणाले: “प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही उपवास करून शोक प्रकट करत आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?”
\q
\s5
\v 4 मला सेनाधीश परमेश्वराकडून वचन मिळाले की:
\q
\v 5 “याजकांना आणि या देशातील इतर लोकांना सांग की तुम्ही सत्तर वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या
\q आणि सातव्या महिन्यात उपवास केला व शोक प्रकट केला. पण हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का?
\q
\v 6 जे तुम्ही खाल्ले-प्यायले ते आपल्यासाठीच होते की नाही?
\q
\v 7 याच गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वराने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे घोषीत केले होते.
\q जेव्हा यरुशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, यरुशलेमच्या भोवतालच्या गावात, नेगेबला व पश्चिमेकडील डोंगरपायथ्याशी वस्ती होती. तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली होती.”
\q
\s5
\v 8 परमेश्वराचे वचन जखऱ्याला मिळाले:
\q
\v 9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे सत्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.
\q
\v 10 विधवा, अनाथ, परके व गरीब यांना छळू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.”
\p
\s5
\v 11 पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.
\v 12 जे नियम सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करून जे धर्मशास्त्र व संदेष्ट्यांमार्फत धर्मशास्त्र व वचन पाठवले ते लोक ऐकेनात. त्यांची मन त्यांनी पाषाणासारखे कठीण केली, तेव्हा सेनाधीश परमेश्वर कोपला.
\p
\s5
\v 13 तेव्हा असे झाले की, त्याने आवाहन केले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याच प्रकारे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यांनी माझा धावा केल्यास, मी उत्तर देणार नाही.
\v 14 एखाद्या झंझावत्या वाऱ्याप्रमाणे मी त्यांना अनोळखी राष्ट्रांमध्ये पांगवीन. त्यांचा देश त्यांच्या मागे ओसाड पडेल व तेथे कोणी ये-जा करणार नाही, कारण, त्यांनी उत्तम देश वैराण केला आहे.”
\s5
\c 8
\p
\v 1 सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.
\v 2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “मी सियोनेसाठी खूप ईर्ष्यावान झालो आहे. तिच्या करीता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यावान झालो आहे.”
\q
\v 3 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “मी सियोेनेत परत आलो आहे आणि यरुशलेमेत राहील. यरुशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
\q
\s5
\v 4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “वृध्द स्त्री आणि वृध्द पुरुष यरुशलेमच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील.
\q लोक इतके दीर्घायुषी होतील की चालतांना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.
\q
\v 5 रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल.
\q
\s5
\v 6 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का?” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\v 7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन.
\q
\v 8 मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरुशलेमेमध्ये राहतील.
\q ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल.”
\q
\s5
\v 9 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाया घालताना,
\q संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.
\q
\v 10 त्या दिवसापूर्वी, लोकांस काम मिळत नसे वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे.
\q जाणे येणे शत्रूंमुळे सूरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुध्द भडकविले होते.
\q
\s5
\v 11 पण आता तसे पूर्वीच्या दिवसासारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार.”
\q असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\q
\v 12 “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील.
\q जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल.
\q मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांना वतन देईल.
\q
\s5
\v 13 शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती.
\q पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!”
\p
\v 14 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.
\v 15 “पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरुशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!
\p
\s5
\v 16 पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.
\v 17 आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका. कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
\p
\s5
\v 18 सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.
\v 19 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
\s5
\v 20 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरुशलेमेला येतील.
\v 21 निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्याला शोधू. मीही येतो.”
\v 22 पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरुशलेमेत येतील.
\p
\s5
\v 23 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्याला विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”
\s5
\c 9
\p
\v 1 हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशी परमेश्वराची दृष्टी मानवजातीवर आहे;”
\v 2 तसेच सोर व सीदोन आणि हद्राखच्या सीमेवरील हमाथ याविषयीची भविष्यवाणी; कारण तेथील लोक अतिबुध्दिवान आहेत.
\p
\s5
\v 3 सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत.
\v 4 पाहा! परमेश्वर, तिला तिच्या भूमीवरून हाकलून लावेल आणि तो तिच्या सागरी शक्तीचा नाश करील; अशाप्रकारे तिला आगीत भस्मसात करील.
\p
\s5
\v 5 “अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील. आणि एक्रोन, तिची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.
\v 6 अश्दोदात अनोळखी येवून आपली घरे वसवतील. पलिष्ट्यांचा गर्व नाहीसा करीन.
\v 7 त्यांच्या मुखातले रक्त आणि दातांतले निषिध्द अन्न मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तेही आमच्या देवासाठी शेष असे एक घराणे म्हणून राहतील आणि एक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.
\p
\s5
\v 8 माझ्या देशातून कोणत्याही सैन्याने येवू-जाऊ नये म्हणून मी माझ्या भूमीभोवती तळ देईल, कोणीही जुलूम करणारा त्यांच्यातून येणारजाणार नाही. कारण आता मी स्वत: त्यांच्यावर आपली नजर ठेवीन.”
\q
\s5
\v 9 हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरुशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा!
\q पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे
\q आणि तो तारण घेवून येत आहे.
\q तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
\q
\v 10 त्यानंतर मी एफ्राईममधील रथांचा आणि यरुशलेमेतील घोडदळाचा नाश करीन आणि युध्दातील धनुष्यबाण मोडतील; कारण तो शांतीची वार्ता राष्ट्रांशी बोलेल, त्याचे राज्य सर्व समुद्रांवर आणि महानदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत असेल.
\p
\s5
\v 11 आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुझ्याशी मी केलेल्या माझ्या कराराच्या रक्तामुळे, निर्जल खड्ड्यांतून तुझ्या बंधकांना मुक्त केले आहे.
\v 12 आशावान कैद्यांनो, मजबूत दुर्गांकडे परत या! मी आजही जाहीर करतो की मी तुम्हाला दुप्पटीने प्रतिफळ देईन
\v 13 कारण मी यहूदाला धनुष्य म्हणून वाकवले आहे. एफ्राईमरूपी बाणांनी मी आपला भाता भरला आहे. हे सियोने, ग्रीसच्या पुत्रांशी लढायला मी तुझ्या पुत्रांना उत्तेजीत केले आहे. त्यांना योद्ध्याच्या तरवारीप्रमाणे मी ग्रीसाच्याविरूद्ध वापरीन.
\p
\s5
\v 14 परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल.
\v 15 सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केलेल्यांप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.
\p
\s5
\v 16 आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्याला मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील.
\v 17 हे सर्व किती मनोरम व किती सुंदर होईल! तरुण पुरुष धान्याने आणि कुमारी गोड द्राक्षरसाने पुष्ट होतील.
\s5
\c 10
\q
\v 1 वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा
\q आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील,
\q मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
\q
\v 2 कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे;
\q ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात;
\q म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत.
\m
\s5
\v 3 परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”
\p
\s5
\v 4 “त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.
\v 5 ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”
\p
\s5
\v 6 “मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
\v 7 एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”
\p
\s5
\v 8 “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.
\v 9 होय! मी माझ्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
\v 10 मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनोच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.”
\p
\s5
\v 11 ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.
\v 12 मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.
\s5
\c 11
\q
\v 1 लबानोना, अग्नीने आत शिरुन तुझे गंधसरू जाळून टाकावेत
\q म्हणून तू आपली दारे उघड.
\q
\v 2 गंधसरू उन्मळून पडला आहे म्हणून हे देवदार वृक्षांनो आक्रोश करा. जे श्रेष्ठ होते ते नाश झाले आहे!
\q बाशानाच्या ओक वृक्षांनो, विलाप करा कारण घनदाट अरण्य भूसपाट झाले आहे.
\q
\v 3 रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका. त्यांचे गौरव नाहीसे झाले आहे;
\q तरुण सिंहाच्या गर्जना ऐका कारण यार्देन नदीकाठची दाट झुडुपे लयास गेली आहेत.
\m
\s5
\v 4 तर परमेश्वर माझा देव, म्हणतो, “ठार मारण्यासाठी नेमलेल्या मेढरांची काळजी घे.
\v 5 त्यांचे मालक त्यांना ठार मारतात आणि स्वत:ला दोषी मानत नाही. ते त्यांना विकतात आणि म्हणतात, ‘परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो आहे! त्यांच्या स्वतःच्या मेंढपाळांना त्यांची दया आली नाही.
\v 6 मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल यापुढे दु:ख होणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो. “पाहा! मी त्यांना एकमेकांच्या व राजाचा तावडीत देईन; आणि याप्रकारे ते देशाचा नाश करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडविणार नाही.”
\p
\s5
\v 7 म्हणून मी त्या ठार मारण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मेंढपाळ झालो. त्यांच्यातील अगदी मरणास टेकलेल्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी रमणीयता व दुसरीला ऐक्य असे नाव दिले. मग मी त्या कळपाची निगा राखण्यास सुरवात केली.
\v 8 एका महिन्यात मी तीन मेंढपाळांचा नाश केला. कारण मला त्या मेंढपाळांचा कंटाळा आला व त्यांचा जीव माझा तिरस्कार करू लागला.
\v 9 मग मी म्हणालो, “आता मी तुमचा सांभाळ करणार नाही. जी मरायला टेकली आहेत ती मरोत; कोणी नष्ट झाले तर होऊ द्या; आणि जी वाचतील ती एकमेकांचे मांस खातील.”
\p
\s5
\v 10 मग मी “रमणीयता” नावाची काठी उचलली आणि मोडली. सर्व वंशांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले.
\v 11 म्हणून त्या दिवसापासून करार संपुष्टात आला आणि त्या कळपातील माझ्याकडे निरखून पाहणारे अतिशय अशक्तांची खात्री पटली की हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
\v 12 मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझी मजूरी द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.
\s5
\v 13 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्या लेखी तुझी जी किंमत आहे, ती रक्कम तू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.
\v 14 मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले जेणेकरून यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील बंधुत्त्व मोडावे.
\p
\s5
\v 15 मग परमेश्वर मला म्हणाला, “आता, पुन्हा एका मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे.
\v 16 पाहा, मी या देशासाठी नवीन मेंढपाळ निवडीन. पण तो नाश पावणाऱ्या मेढरांची काळजी घेणार नाही. भटकलेल्या मेढरांना तो शोधणार नाही, मोडलेल्यांना बरे करणार नाही. ज्या मेंढ्या पोसलेल्या आहेत त्यांना तो चारापाणी देणार नाही. तर तो सशक्त मेंढ्यांचे मांस खाईल आणि फक्त त्यांचे खूर शिल्लक ठेवील.”
\q
\s5
\v 17 मेंढरांना टाकून जाणाऱ्या निरुपयोगी मेढपाळाचा धिक्कार असो!
\q त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवार येवो. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होवो आणि तो उजव्या डोळ्याने अंध होईल.
\s5
\c 12
\p
\v 1 इस्राएलाबद्दल परमेश्वराचे वचन: ज्याने आकाश विस्तारले आणि पृथ्वीचे पाये घातले, जो मनुष्याच्या आत त्यांच्या आत्माची निर्मिती करतो, तो परमेश्वर म्हणतो:
\v 2 “पाहा! मी यरुशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरुशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल.
\v 3 त्या दिवसात मी यरुशलेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन, तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल आणि जगातील सर्व राष्ट्रे यरुशलेमच्या विरुध्द लढण्यासाठी एकत्र येतील.”
\p
\s5
\v 4 “पण, त्या दिवसामध्ये, मी घोड्याला भीतीने बिथरवीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्यांला अंधळे करीन. परमेश्वर असे म्हणतो.
\v 5 मग यहूदाचे पुढारी आपापल्या मनात विचार करतील, ‘यरुशलेमेतील राहणारे रहिवासी त्यांचा देव सैन्यांचा परमेश्वर, याच्या ठायी माझे सामर्थ्य असे आहेत.
\p
\s5
\v 6 त्या दिवसामध्ये मी यहूदाच्या पुढाऱ्यांना लाकडांमधील आगीप्रमाणे बनवीन. वणव्यात उभे पीक जसे भस्मसात होते, तसे ते त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. यरुशलेमवासी पुन्हा आपल्या स्वतःच्या पूर्वीच्या जागी वसतील.”
\p
\s5
\v 7 परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या तंबूंना वाचवील म्हणजे यरुशलेमेमधील राहणाऱ्यांचे आणि दावीदाच्या घराण्यातील लोकांचे गौरव यहूदापेक्षा मोठे होणार नाही.
\v 8 त्या दिवशी, परमेश्वर यरुशलेमेतील रहिवाश्यांना वाचवील; त्यातील जो अतिदुर्बल माणूससुध्दा दावीदासारखा वीर बनेल आणि दावीदाचे घराणे देवासमान होईल म्हणजे ते परमेश्वराच्या दूताप्रमाणे पुढे चालणारे होतील.
\v 9 परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी, यरुशलेमशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी निर्धार करीन.
\s5
\v 10 “मी दावीदाच्या घराण्यात आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.
\v 11 त्यावेळी यरुशलेमेची शोककळा मगिद्दोनच्या सपाट भूमीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमयी झालेल्या आक्रोशासारखी असेल.
\p
\s5
\v 12 देश विलाप करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे होतील, आक्रोश करतील. दावीदाच्या कुळातील पुरुष एकीकडे, तर त्यांच्या स्त्रिया दुसरीकडे आक्रंदन करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्या बायकादेखिल वेगवेगळा विलाप करतील.
\v 13 लेवी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील.
\v 14 आणि इतर सर्व कुळांतले लोक व त्यांच्या स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”
\s5
\c 13
\p
\v 1 त्या दिवसात दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल.
\v 2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुद्ध आत्म्यांचा नायनाट करीन.
\p
\s5
\v 3 एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही. भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आईवडील त्याला भोसकतील.
\p
\s5
\v 4 त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांना फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत.
\v 5 तेव्हा तो म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय. असे ते सांगतील.
\v 6 पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या? तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे व्रण होत!”
\q
\s5
\v 7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
\q “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर;
\q मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील
\q आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.
\q
\s5
\v 8 परमेश्वर असे म्हणतो,
\q ते देशाचे दोन भाग नष्ट करतील आणि त्याचा तिसरा भाग मागे शेष राहील.
\q
\v 9 त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकील,
\q आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन;
\q सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन.
\q ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन.
\q मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहात.
\q आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”
\s5
\c 14
\p
\v 1 पाहा! परमेश्वराचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल.
\v 2 यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांना लुटतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही.
\p
\s5
\v 3 मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल; युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी युध्द करेल.
\v 4 त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहताच तो पर्वत दुभंगेल; त्या पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल. जैतूनाच्या झाडांचा डोंगर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दुभागून एक खोल दरी निर्माण होईल.
\p
\s5
\v 5 तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोऱ्याकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोंचेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल; पण माझा परमेश्वर, देव तेथे येईल आणि तुमच्याबरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
\p
\s5
\v 6 आणि तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश नसेल, आणि गारठा वा कडाक्याची थंडी नसेल.
\v 7 तो दिवस विशेष होईल तो परमेश्वरालाच ठाऊक; कारण तो दिवसही नसणार वा रात्रही नसणार. तर संध्याकाळचा प्रकाशासारखा प्रकाश असेल.
\v 8 तेव्हा यरुशलेमेतून सतत वाहाण्याऱ्या पाण्याचा झरा वाहील, त्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाऊन पुर्वेकडील समुद्राला मिळेल तर दुसरा पाट पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल, हिवाळा असो वा उन्हाळा तो वाहत राहील.
\p
\s5
\v 9 त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. त्यादिवशी केवळ परमेश्वर व केवळ त्याचे नाव असणार.
\v 10 तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल.
\v 11 लोक तेथे वस्ती करतील, ह्यापुढे त्यांचा नाश होणार नाही; यरुशलेम अगदी सुरक्षित असेल.
\p
\s5
\v 12 पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील; तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील: ते आपल्या पायांवर उभे असतांनाच त्यांची कातडी कुजू लागेल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचांत आणि त्यांच्या जीभा त्यांच्या तोंडांत सडतील.
\v 13 तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल; प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील.
\p
\s5
\v 14 यहूदाही यरुशलेममध्ये लढेल. भोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून संपत्ती मिळेल; त्यांना भरपूर सोने, चांदी आणि वस्रे यांचा पूर येईल.
\v 15 ही मरी शत्रू सैन्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर आणि गाढवांवर व प्रत्येक जनावरावर ही मरी येईल.
\p
\s5
\v 16 यरुशलेमशी लढण्यास आलेल्या राष्ट्रांपैकी जे वाचतील ते सर्व, सेनाधीश परमेश्वराची उपासना करण्यासाठी, मंडपाचा सण साजरा करायला, दरवर्षी यरुशलेमेला येतील.
\v 17 पृथ्वीवरील जी सर्व कुटुंबे यरुशलेमेला प्रभूराजाची, सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला जाणार नाहीत त्यांच्या देशात परमेश्वर पाऊस पाडणार नाही.
\v 18 जर मिसराचे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासाठी आले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; मंडपाच्या सणात जी राष्ट्रे वर चढून जाणार नाहीत त्यांच्यावर, शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जी मरी पसरवली होती, ती तो त्यांच्यावर आणिल.
\p
\s5
\v 19 ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिसराला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल.
\p
\s5
\v 20 त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
\v 21 यरुशलेमेतील व यहूदातील प्रत्येक पात्र सेनाधीश परमेश्वरास पवित्र होईल; परमेश्वरासाठी यज्ञ करणारा प्रत्येकजण ही भांडी घेईल व त्यामध्ये अन्न शिजविल; त्यादिवसापासून सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात कनानी आणखी असणार नाहीत.

110
39-MAL.usfm Normal file
View File

@ -0,0 +1,110 @@
\id MAL
\ide UTF-8
\h मलाखी
\toc1 मलाखी
\toc2 मलाखी
\toc3 mal
\mt1 मलाखी
\s5
\c 1
\p
\v 1 परमेश्वराकडून मलाखीच्याहस्ते इस्राएलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा:
\p
\v 2 परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.” पण तुम्ही म्हणालात, “कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस?” परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.
\v 3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.”
\s5
\v 4 अदोम असे म्हणाला, “आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उध्वस्त झाले आहे ते बांधू.” पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील पण मी पाडून टाकीन.” आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागावला आहे.
\v 5 तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, “परमेश्वर इस्राएलाच्या सीमेपलिकडे थोर मानला जावो.”
\p
\s5
\v 6 सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, “मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धन्याला मान देतो. मग मी, जो तुमचा पिता आहे, त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे, तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही. पण तुम्ही म्हणता ‘तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही?
\v 7 तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पिता. आणि म्हणता, ‘कशामुळे आम्ही तुला विटाळवीले? परमेश्वराचा मेज तुच्छ आहे, असे बोलून तुम्ही ते विटाळवता.
\p
\s5
\v 8 ‘जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी अंधळा पशू अर्पिता, तेव्हा हे वाईट नाही काय? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगीष्ट पशू अर्पिता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकारकरील का? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का?’” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 9 आणि आता तुम्ही देवा कडून अनुग्रह मागता, ह्यासाठी की तो आमच्यासाठी दयावान असेल. अशा अर्पणांसह तो तुमच्यातल्या एकाला तरी ग्रहण करेल काय? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 10 “अहा! तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटवू नये म्हणून दारे बंद करील असा तुम्हामध्ये कोणी असता तर किती चांगले झाले असते! मी तुमच्या हातातले अर्पण स्विकारणार नाही, कारण तुम्हा विषयी मी आनंदी नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 11 “कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 12 “परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे, आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कारयुक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे.
\s5
\v 13 तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी ह्या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकारकरावे काय?
\v 14 तर जो कोणी अापल्या कळपात नर असतांना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशु परमेश्वराला यज्ञ म्हणून अर्पण करतो तो फसवणारा शापित असो. कारण मी थोर राजा आहे आणि राष्ट्रे माझ्या नावाची भीती धरतात. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s5
\c 2
\p
\v 1 “आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे.
\v 2 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिली आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.
\p
\s5
\v 3 पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुझ्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हालाही फेकून देण्यात येईल.
\v 4 आणि तेव्हा तुम्हाला कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी ह्या आज्ञा तुम्हाकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\p
\s5
\v 5 “लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्याला तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्याला वाटले.
\v 6 खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले.
\v 7 कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.”
\p
\s5
\v 8 “परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांना नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 9 “ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्र पाळण्यात पक्षपात केला आहे.”
\s5
\v 10 आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?
\v 11 यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.
\v 12 जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वराला अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील.
\s5
\v 13 आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण आणखी मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही.
\s5
\v 14 तुम्ही म्हणता 'असे का नाही?' कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.
\v 15 आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केला नाही काय? आणि त्याने तुम्हाला एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
\p
\v 16 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपले वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागलो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”
\s5
\v 17 तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वराला कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्याला आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्याला त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्याला कंटाळविले आहे.
\s5
\c 3
\p
\v 1 “पाहा! मी माझा दूत पाठवत आहे, आणि तो माझ्यापुढे मार्ग तयार करील. आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्याच्यात तुम्ही आनंदी होता, तो कराराचा दूत, अचानक आपल्या मंदिरात येत आहे. पाहा तो येत आहे, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.”
\p
\v 2 त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार? आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहिल? कारण तो शुद्धकरणाऱ्या अग्नीसारखा आणि परिटाच्या खारासारखा आहे.
\v 3 आणि तो चांदीचा गाळणारा व ते स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वराला अर्पण करतील.
\p
\s5
\v 4 तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे यरुशलेम व यहूदाची अर्पणे परमेश्वराला सुखकारक असतील.
\v 5 “मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. आणि जादूटोणा, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे, आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी व आणि विधवेला व अनाथाला पीडतात, आणि परदेशियांचा न्याय विपरीत करतात, आणि माझे भय धरीत नाही यांच्याविरूद्ध मी त्वरीत साक्षी होईन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 6 “कारण मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही, म्हणून याकोबाच्या मुलांनो, तुमचा नाश झाला नाही.
\v 7 तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन येईन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कसे परत फिरावे?
\s5
\v 8 मनुष्य देवाला लुटणार काय? तरीही तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, ‘आम्ही तुझे काय लुटले आहे? तुम्ही दशमांश व अर्पणे यांविषयी मला लुटता.
\v 9 तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापीत झाला आहात."
\p
\s5
\v 10 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, "माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठरांत आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पाहा.
\v 11 आणि खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावेल, मग तो तुमच्या भुमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेलींचे फळ अकाली गळणार नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 12 “सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील, कारण तुमची भुमी आनंदाची होईल,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
\s5
\v 13 परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?”
\v 14 तुम्ही म्हणालात “परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. आम्ही त्याच्या आज्ञापालन केले, आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो याचा काय लाभ झाला?
\v 15 तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो, होय, जे दुष्टाई करतात तो वाढवले जातात, आणि ते देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात.”
\p
\s5
\v 16 तेव्हा जे परमेश्वराचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होतो, आणि परमेश्वराने ते ध्यान देऊन ते ऐकले. मग जे परमेश्वराचे भय धरत असत आणि त्याच्या नांवाचा सन्मान करत असत त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले.
\s5
\v 17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, "मी हे करीन त्या दिवशी ते माझे, म्हणजे माझे खासगीचे धन होतील, आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.
\v 18 तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट माणूस आणि चांगला माणूस यातील फरक तुम्हाला कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हाला समजेल."
\s5
\c 4
\p
\v 1 “कराण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी वा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\v 2 “परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.
\v 3 तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करील त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
\s5
\v 4 “मोशे जो माझा सेवक होता त्याला होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.”
\v 5 “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.
\v 6 आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”

26
LICENSE.md Normal file
View File

@ -0,0 +1,26 @@
# License
## Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0)
This is a human-readable summary of (and not a substitute for) the [license](http://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/).
### You are free to:
* **Share** — copy and redistribute the material in any medium or format
* **Adapt** — remix, transform, and build upon the material
for any purpose, even commercially.
The licensor cannot revoke these freedoms as long as you follow the license terms.
### Under the following conditions:
* **Attribution** — You must attribute the work as follows: "Original work available at https://door43.org/." Attribution statements in derivative works should not in any way suggest that we endorse you or your use of this work.
* **ShareAlike** — If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same license as the original.
**No additional restrictions** — You may not apply legal terms or technological measures that legally restrict others from doing anything the license permits.
### Notices:
You do not have to comply with the license for elements of the material in the public domain or where your use is permitted by an applicable exception or limitation.
No warranties are given. The license may not give you all of the permissions necessary for your intended use. For example, other rights such as publicity, privacy, or moral rights may limit how you use the material.

5
README.md Normal file
View File

@ -0,0 +1,5 @@
# mr_ulb
Marathi ULB text
STR https://git.door43.org/unfoldingWord/SourceTextRequestForm/issues/177 (OT)

View File

@ -14,27 +14,309 @@ dublin_core:
source:
-
identifier: ulb
language: 'Holy Bible in Marathi: 1855'
language: 'Holy Bible in Marathi: 1955'
version: '1'
rights: 'CC BY-SA 4.0'
creator: 'Distant Shores Media'
contributor:
- 'ANNIE NIRMAL'
- 'VIDYA SAGAR GAIKWAD'
- 'SUNIL YESHWANT KASBE'
- 'SURENDRAKANTA SUSHIL BHAKRE'
- SUMEET
- 'VENU SHANKARAO GOPNARAYAN'
relation: []
- 'Annie Nirmal'
- 'Antoney Raj'
- 'Cdr. Thomas Mathew'
- 'Dr. Bobby Chellappan'
- 'Hinal Prakash'
- 'Shojo John'
- 'Sumeet'
- 'Sunil Yeshwant Kasbe'
- 'Surendrakanta Sushil Bhakre'
- 'Venu Shankarao Gopnarayan'
- 'Vidya Sagar Gaikwad'
relation:
- 'mr/tn'
- 'mr/tq'
- 'mr/obs'
publisher: unfoldingWord
issued: '2016-12-09'
modified: '2018-04-25'
version: '1.1'
issued: '2018-04-26'
modified: '2018-04-26'
version: '1.2'
checking:
checking_entity:
- 'AMIT SHANKAR ARYAN'
- 'Amit Shankar Aryan'
- 'Cdr. Thomas Mathew'
checking_level: '3'
projects:
-
title: '1 इतिहास '
versification: ufw
identifier: 1ch
sort: 13
path: ./13-1CH.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: '1 राजे '
versification: ufw
identifier: 1ki
sort: 11
path: ./11-1KI.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: '1 शमुवेल '
versification: ufw
identifier: 1sa
sort: 09
path: ./09-1SA.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: '2 इतिहास '
versification: ufw
identifier: 2ch
sort: 14
path: ./14-2CH.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: '2 राजे '
versification: ufw
identifier: 2ki
sort: 12
path: ./12-2KI.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: '2 शमुवेल '
versification: ufw
identifier: 2sa
sort: 10
path: ./10-2SA.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'आमोस '
versification: ufw
identifier: amo
sort: 30
path: ./30-AMO.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'दानीएल '
versification: ufw
identifier: dan
sort: 27
path: ./27-DAN.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'अनुवाद '
versification: ufw
identifier: deu
sort: 05
path: ./05-DEU.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'उपदेशक '
versification: ufw
identifier: ecc
sort: 21
path: ./21-ECC.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'एस्तेर '
versification: ufw
identifier: est
sort: 17
path: ./17-EST.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'निर्गम '
versification: ufw
identifier: exo
sort: 02
path: ./02-EXO.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'यहेज्केल '
versification: ufw
identifier: ezk
sort: 26
path: ./26-EZK.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'एज्रा '
versification: ufw
identifier: ezr
sort: 15
path: ./15-EZR.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'उत्पत्ति '
versification: ufw
identifier: gen
sort: 01
path: ./01-GEN.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'हबक्कूक '
versification: ufw
identifier: hab
sort: 35
path: ./35-HAB.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'हाग्गय '
versification: ufw
identifier: hag
sort: 37
path: ./37-HAG.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'होशेय '
versification: ufw
identifier: hos
sort: 28
path: ./28-HOS.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'यशया '
versification: ufw
identifier: isa
sort: 23
path: ./23-ISA.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'यिर्मया '
versification: ufw
identifier: jer
sort: 24
path: ./24-JER.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'ईयोब '
versification: ufw
identifier: job
sort: 18
path: ./18-JOB.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'योएल '
versification: ufw
identifier: jol
sort: 29
path: ./29-JOL.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'योना '
versification: ufw
identifier: jon
sort: 32
path: ./32-JON.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'यहोशवा '
versification: ufw
identifier: jos
sort: 06
path: ./06-JOS.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'शास्ते '
versification: ufw
identifier: jdg
sort: 07
path: ./07-JDG.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'विलापगीत '
versification: ufw
identifier: lam
sort: 25
path: ./25-LAM.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'लेवीय '
versification: ufw
identifier: lev
sort: 03
path: ./03-LEV.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'मलाखी '
versification: ufw
identifier: mal
sort: 39
path: ./39-MAL.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'मीखा '
versification: ufw
identifier: mic
sort: 33
path: ./33-MIC.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'नहूम '
versification: ufw
identifier: nam
sort: 34
path: ./34-NAM.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'नहेम्या '
versification: ufw
identifier: neh
sort: 16
path: ./16-NEH.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'गणना '
versification: ufw
identifier: num
sort: 04
path: ./04-NUM.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'ओबद्या '
versification: ufw
identifier: oba
sort: 31
path: ./31-OBA.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'नीतिसूत्रे '
versification: ufw
identifier: pro
sort: 20
path: ./20-PRO.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'स्तोत्रसंहिता '
versification: ufw
identifier: psa
sort: 19
path: ./19-PSA.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'रूथ '
versification: ufw
identifier: rut
sort: 08
path: ./08-RUT.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'गीतरत्न '
versification: ufw
identifier: sng
sort: 22
path: ./22-SNG.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'जखऱ्या '
versification: ufw
identifier: zec
sort: 38
path: ./38-ZEC.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
title: 'सफन्या '
versification: ufw
identifier: zep
sort: 36
path: ./36-ZEP.usfm
categories: [ 'bible-ot' ]
-
categories:
- bible-nt