\v 3 बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
\v 4 ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.
\v 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
\v 10 आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
\v 11 याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
\v 12 ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हास त्याच्याठायी, गौरव मिळावे.
\v 2 तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका;
\v 3 कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;
\v 4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
\v 8 मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;
\v 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल
\v 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
\v 13 प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
\v 14 त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
\v 1 शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
\v 2 आणि हेकेखोर व दुष्ट मनुष्यांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
\p
\v 3 परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील.
\v 6 बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
\v 7 आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;