# नरक, अग्नीचे सरोवर ## व्याख्या: नरक ही शाश्वत वेदनांचे आणि छळाचे शेवटचे ठिकाण आहे, जिथे देव त्याच्याविरुद्ध बंड करणाऱ्या आणि येशूच्या बलिदानाद्वारे त्यांना वाचवण्याच्या योजनेला नाकारणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा करील. याला "अग्नीचे सरोवर" असेही संदर्भित केले आहे. * नरक हे अग्नी व गंभीर दुःखाचे ठिकाण म्हणून वर्णन केले आहे. * सैतान आणि त्याला अनुसरण करणारे दुष्ट आत्मे ह्यांना अनंतकाळच्या शिक्षेसाठी नरकात फेकले जाईल. * जे लोक त्यांच्या पापासाठी येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना नरकात कायमची शिक्षा होईल. ## भाषांतर सूचना * या संज्ञा वेगवेगळ्या प्रकारे भाषांतरित केल्या पाहिजेत, कारण त्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये आढळतात. * काही भाषा "अग्नीचे सरोवर" या वाक्यांशामध्ये "सरोवर" या शब्दाचा उपयोग करत नाहीत, कारण ते पाण्याला संदर्भित करते. * "नरक" या शब्दाचे भाषांतर "दुःखाचे ठिकाण" किंवा "अंधकार आणि वेदनांचे शेवटचे ठिकाण" असे केले जाऊ शकते. * "अग्नीचे सरोवर" या शब्दाचे भाषांतर "अग्नीचा समुद्र" किंवा "(दुःखाची) मोठा अग्नी" किंवा "अग्नीचे क्षेत्र" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [स्वर्ग](../kt/heaven.md), [मृत्यू](../other/death.md), [अधोलोक](../kt/hades.md), [अथांग](../other/abyss.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [याकोबाचे पत्र 03:5-6](rc://mr/tn/help/jas/03/05) * [लुक 12:4-5](rc://mr/tn/help/luk/12/04) * [मार्क 09:42-44](rc://mr/tn/help/mrk/09/42) * [मत्तय 05:21-22](rc://mr/tn/help/mat/05/21) * [मत्तय 05:29-30](rc://mr/tn/help/mat/05/29) * [मत्तय 10:28-31](rc://mr/tn/help/mat/10/28) * [मत्तय 23:32-33](rc://mr/tn/help/mat/23/32) * [मत्तय 25:41-43](rc://mr/tn/help/mat/25/41) * [प्रगटीकरण 20:13-15](rc://mr/tn/help/rev/20/13) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[50:14](rc://mr/tn/help/obs/50/14)__ तो त्यांना __नरकात__ टाकील, ज्या ठिकाणी सर्वकाळ रडणे व दुःखाने दात खाणे सर्वकाळ चालेल. त्यांना न विझणाऱ्या अग्निमध्ये जाळून टाकण्यात येईल व किडे त्यांना सर्वकाळ खात राहतील. * __[50:15](rc://mr/tn/help/obs/50/15)__ तो सैतानाला __नरकात__ टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील. # Strong's * Strong's: H7585, G86, G439, G440, G1067, G3041, G4442, G4443, G4447, G4448, G5020, G5394, G5457