# अधोलोक, मृतलोक ## व्याख्या: "अधोलोक" आणि "मृत्युलोक" या शब्दांचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये मृत्युच्या आणि असे ठिकाण जिथे लोक मेल्यावर त्यांचे आत्मे जातात ह्यांच्या संदर्भात केला जातो. त्यांचे अर्थ समान आहेत. * "मृत्युलोक" हा इब्री शब्द, सहसा जुन्या करारामध्ये समान्यपणे मृत्युची जागा संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. * नवीन करारामध्ये, "अधोलोक" हा ग्रीक शब्द, देवाविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांच्या आत्म्याच्या जागेला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. या आत्म्यांना "खाली" अधोलोकात जाण्याचा संदर्भ दिला आहे. हे कधीकधी स्वर्गात "वर" जाण्याच्या विरुद्ध आहे, जिथे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचे आत्मे राहतात. * अधोलोक हा शब्द प्रकटीकरणच्या पुस्तकात "मृत्यू" या शब्दाशी जोडला गेला आहे. शेवटच्या काळात, मृत्यू आणि अधोलोक या दोघांनाही आगीच्या सरोवरात, म्हणजेच नरकात टाकले जाईल. ## भाषांतर सूचना * जुन्या करारातील शब्द "मृत्युलोक" ह्याचे भाषांतर "मेलेल्यांची जागा" किंवा "मेलेल्या आत्म्यांची जागा" असे केले जाऊ शकते. संदर्भाच्या आधारावर, काही भाषांतरे ह्याचे भाषांतर "खड्डा" किंवा "मृत्यू" असे करू शकतात. * नव्या करारातील शब्द "अधोलोक" ह्याचे भाषांतर "अविश्वासणाऱ्यांच्या मृत आत्म्याची जागा" किंवा "मृतांच्या छळाची जागा" किंवा "अविश्वासू मृत लोकांच्या आत्म्याची जागा" असे केले जाऊ शकते. * काही भाषांतरे "मृत्युलोक (Sheol)" आणि "अधोलोक (Hades)" हे शब्द असेच ठेवून, भाषांतर करण्याच्या भाषेमध्ये ते व्यवस्थित बसतील ह्याप्रमाणे त्यांच्या शब्दाच्या वर्णामध्ये बदल करतात. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) * हे स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक शब्दाबरोबर एका वाक्यांशास जोडले जाऊ शकते, जसे की, "मृत्युलोक, मेलेल्या लोकांची जागा" आणि "अधोलोक, मृत्यूची जागा." (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) (हे सुद्धा पहा: [मृत्यू](../other/death.md), [स्वर्ग](../kt/heaven.md), [नरक](../kt/hell.md), [कबर](../other/tomb.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 02:29-31](rc://mr/tn/help/act/02/29) * [उत्पत्ति 44:27-29](rc://mr/tn/help/gen/44/27) * [योना 02:1-2](rc://mr/tn/help/jon/02/01) * [लुक 10:13-15](rc://mr/tn/help/luk/10/13) * [लुक 16:22-23](rc://mr/tn/help/luk/16/22) * [मत्तय 11:23-24](rc://mr/tn/help/mat/11/23) * [मत्तय 16:17-18](rc://mr/tn/help/mat/16/17) * [प्रकटीकरण 01:17-18](rc://mr/tn/help/rev/01/17) # Strong's * Strong's: H7585, G86