# कृपा, कृपायुक्त ## व्याख्या: "कृपा" या शब्दाचा संदर्भ मदत किंवा अशीर्वादाशी आहे, जो एखाद्याने कमाई न करता त्याला असाच दिला जातो. "कृपायुक्त" या शब्दाचा अर्थ, जो इतरांना कृपा दर्शवितो असा होतो. * पापी मनुष्याबद्दल देवाची कृपादृष्टी, मुफ्तपणे दिली जाणारी एक देणगी आहे. * कृपेच्या संकल्पना म्हणजे, ज्याने चुकीच्या किंवा दुखावलेल्या गोष्टी केल्या आहेत, त्याच्याशी दयाळूपणे आणि क्षमाशील असणे होय. * "कृपा मिळणे" या अभिव्यक्तीचा अर्थ देवाकडून मदत आणि दया मिळणे असा होतो. बऱ्याचदा ह्याच्या अर्थामध्ये देव एखाद्याशी संतुष्ट आहे आणि त्याला मदत करतो ह्याचा समावेश होतो. ## भाषांतर सूचना * कृपा" हा शब्द भाषांतरित करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "ईश्वरी दया" किंवा "देवाची मेहेरनजर" किंवा "पाप्यांसाठी देवाची दया आणि क्षमाशीलता" किंवा "क्षमाशील दयाळूपणा" ह्यांचा समावेश होतो. * "कृपायुक्त" या शब्दाचे भाषांतर "कृपेने भरलेला" किंवा "दयाळू" किंवा "क्षमाशील" किंवा "क्षमाशीलपणे दयाळू" असे केले जाऊ शकते. * "त्याला देवाच्या नजरेमध्ये कृपा प्राप्त झाली" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याला देवाकडून क्षमा प्राप्त झाली" किंवा "देवाने क्षमाशीलपणे त्याला मदत केली" किंवा "देवाने त्याच्यावर मेहेरनजर केली" किंवा "देव त्याच्यावर संतुष्ट होता आणि त्याने त्याला मदत केली. # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 04:32-33](rc://mr/tn/help/act/04/32) * [प्रेषितांची कृत्ये 06:8-9](rc://mr/tn/help/act/06/08) * [प्रेषितांची कृत्ये 14:3-4](rc://mr/tn/help/act/14/03) * [कलस्से. 04:5-6](rc://mr/tn/help/col/04/05) कलस्सैकरांस 04:18 * [उत्पत्ति 43:28-29](rc://mr/tn/help/col/04/18) * [याकोबाचे पत्र 04:6-7](rc://mr/tn/help/gen/43/28) * [योहान 01:16-18](rc://mr/tn/help/jas/04/06) * [फिलीप्पेकरास पत्र 04:21-23](rc://mr/tn/help/jhn/01/16) * [प्रकटीकरण 22:20-21](rc://mr/tn/help/php/04/21) # Strong's * Strong's: H2580, H2587, H2589, H2603, H8467, G2143, G5485, G5543