# भीती, घाबरणे ## व्याख्या: "भीती" आणि "घाबरणे" या शब्दांचा संदर्भ, एखाद्या मनुष्याच्या अप्रिय भावनेशी आहे, जेंव्हा जिथे त्या व्यक्तीला स्वतःला किंवा इतरांना हानी पोहोचण्याचा धोका असतो. * "भीती" या शब्दाचा संदर्भ अधिकारामध्ये असलेल्या व्यक्तीबद्दल अतिशय आदर किंवा विस्मायाशी सुद्धा येतो. * "यहोवाचे भय" हा वाक्यांश आणि त्याचबरोबर, त्याच्या संबंधित शब्द "देवाचे भय" किंवा "परमेश्वराचे भय" ह्यांचा संदर्भ देवाच्या गंभीर आदराशी आहे आणि तो आदर त्याची आज्ञा पाळून दाखवला जातो. ही भीती, देव पवित्र आहे आणि तो पापाची घृणा करतो या प्रेरणेतून येते. * पवित्र शास्त्र शिकवते की, जो मनुष्य यहोवाचे भय धरतो तो सुज्ञ बनतो. ## भाषांतर सूचना संदर्भावर आधारित, "भीती" या शब्दाचे भाषांतर "घाबरणे" किंवा "प्रचंड आदर" किंवा "पूज्य मानणे" किंवा "विस्मित होणे" असे केले जाऊ शकते. * "घाबरलेला" या शब्दाचे भाषांतर "भीतीदायक" किंवा "भ्यालेला" किंवा "भयावह" असे केले जाऊ शकते. * "देवाचे भय त्या सर्वांवर पडले" या वाक्याचे भाषांतर "अचानक ते सर्व देवाबद्दल विस्मित झाले आणि त्यांना देवाचा प्रचंड आदर वाटला" किंवा "ताबडतोब, ते सर्व खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी देवाला पूज्य मानले" किंवा "त्यानंतर लगेचच, त्या सर्वांना देवाची भीती वाटू लागली (त्याच्या महान शक्तीमुळे) असे केले जाऊ शकते. * "घाबरू नको" या वाक्यांशाचे भाषांतर "भयभीत होऊ नका" किंवा "घाबरणे सोडून द्या" असे देखील होऊ शकते. * "यहोवाचे भय" या वाक्यांश नव्या करारात आढळत नाही ह्याची नोंद घ्या. त्याऐवजी, "देवाचे भय" किंवा "प्रभु परमेश्वराचे भय" या वाक्यांशाचा उपयोग केलेला आहे. (हे सुद्धा पहा: [आश्चर्यकारक गोष्टी](../other/amazed.md), [विस्मित](../other/awe.md), [प्रभु](../kt/lord.md), [सामर्थ्य](../kt/power.md), [यहोवा](../kt/yahweh.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 योहान 04:17-18](rc://mr/tn/help/1jn/04/17) * [प्रेषितांची कृत्ये 02:43-45](rc://mr/tn/help/act/02/43) * [प्रेषितांची कृत्ये 19:15-17](rc://mr/tn/help/act/19/15) * [उत्पत्ति 50:18-21](rc://mr/tn/help/gen/50/18) * [यशया 11:3-5](rc://mr/tn/help/isa/11/03) * [ईयोब 06:14-17](rc://mr/tn/help/job/06/14) * [रोमकरास पत्र 01:8-10](rc://mr/tn/help/jon/01/08) * [लुक 12:4-5](rc://mr/tn/help/luk/12/04) * [मत्तय 10:28-31](rc://mr/tn/help/mat/10/28) * [नीतिसूत्रे 10:24-25](rc://mr/tn/help/pro/10/24) # Strong's * Strong's: H367, H926, H1204, H1481, H1672, H1674, H1763, H2119, H2296, H2727, H2729, H2730, H2731, H2844, H2849, H2865, H3016, H3025, H3068, H3372, H3373, H3374, H4032, H4034, H4035, H4116, H4172, H6206, H6342, H6343, H6345, H6427, H7264, H7267, H7297, H7374, H7461, H7493, H8175, G870, G1167, G1168, G1169, G1630, G1719, G2124, G2125, G2962, G5398, G5399, G5400, G5401