# विश्वसनियतेचा करार, एकनिष्ठेचा करार, दया, न ढळणारे प्रेम ## व्याख्या: या शब्दांचा उपयोग देवाने त्याच्या लोकांशी केलेल्या वचनांना पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचे वर्णन करण्याकरिता केला जातो. * देवाने इस्राएली लोकांच्याबरोबर औपचारिक करार केले त्याला "करार" असे म्हंटले जाते. * यहोवाचा "विश्वसनियतेचा करार" किंवा "एकनिष्ठेचा करार" ह्याचा संदर्भ, त्याने त्याच्या लोकांशी केलेली वचने तो पूर्ण करील, या तथ्याशी येतो. * देवाचा त्याचा करार पाळण्याची विश्वसनियता, ही त्याच्या लोकांच्याप्रती त्याची दया व्यक्त करण्याची एक अभिव्यक्ती आहे. * "एकनिष्ठ" हा शब्द अजून एक शब्द आहे, ज्याचा संदर्भ, ज्याचे वचन दिले आहे तसे करण्याशी आणि वागण्याशी, आणि त्याचा इतर कोणाल लाभ होईल, ह्याच्याशी वचनबद्ध आणि अवलंबून असण्याशी येतो. ## भाषांतर सूचना: * या शब्दाचे भाषांतर ज्या पद्धतीने केले जाते, हे "करार" आणि "विश्वसनियता" ह्याचे भाषांतर कसे केले जाते ह्यावर आधारित आहे. * या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "विश्वसनीय प्रेम" किंवा "एकनिष्ठ आणि बंधनकारक प्रेम" किंवा "अवलंबणारे प्रेम" यांचा समावेश होतो. (हे सुद्धा पहा: [करार](../kt/covenant.md), [विश्वसनीय](../kt/faithful.md), [दया](../kt/grace.md), [इस्राएल](../kt/israel.md), [देवाचे लोक](../kt/peopleofgod.md), [वचन](../kt/promise.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [एज्रा 03:10-11](rc://mr/tn/help/ezr/03/10) * [गणना 14:17-19](rc://mr/tn/help/num/14/17) # Strong's * Strong's: H2617