# विवेकबुद्धी, सदसदविवेकबुद्धी ## व्याख्या: विवेकबुद्धी हा मनुष्याच्या विचारांचा एक भाग आहे, ज्याच्या द्वारे देव त्याला जाणीव करून देतो की, एखादी गोष्ट पापमय आहे. * चांगले काय आणि वाईट काय ह्यामधील फरक समजायला मदत होण्यासाठी देव लोकांना विवेकबुद्धी देतो. * एखादा मनुष्य जो देवाची आज्ञा पाळतो त्याच्याकडे "शुद्ध" किंवा "स्पष्ट" किंवा "स्वच्छ" विवेकबुद्धी आहे असे म्हंटले जाते. * जर एखाद्या व्यक्तीकडे "स्पष्ट विवेकबुद्धी" आहे, तर त्याचा अर्थ तो कोणतेही पाप लपवत नाही असा होतो. * जर एखादा त्याच्या विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष करत असेल आणि जेंव्हा तो पाप करतो तेंव्हा त्याला दोषी वाटत नसेल तर, ह्याचा अर्थ काय चुकीचे आहे हे समजण्यासाठी त्याची विवेकबुद्धी संवेदनशील राहिलेली नाही. पवित्र शास्त्र ह्याला "भावनाशून्य" विवेकबुद्धी असे म्हणते, जसे की, एक ज्याला गरम लोखंडाने "डाग" लावलेला आहे. अशा विवेकबुद्धीला "भावनाशून्य" आणि "दुषित" असे म्हंटले जाते. * या शब्दाचे भाषांतर करण्याचा संभाव्य मार्ग म्हणजे "आंतरिक नैतिक मार्गदर्शक" किंवा "नैतिक विचार." ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 तिमोथी 01:18-20](rc://mr/tn/help/1ti/01/18) * [1 तिमोथी 03:8-10](rc://mr/tn/help/1ti/03/08) * [2 करिंथकरांस पत्र 05:11-12](rc://mr/tn/help/2co/05/11) * [2 तिमोथी 01:3-5](rc://mr/tn/help/2ti/01/03) * [रोमकरास पत्र 09:1-2](rc://mr/tn/help/rom/09/01) * [तीताला पत्र 01:15-16](rc://mr/tn/help/tit/01/15) # Strong's * Strong's: G4893