# कबूल करणे, कबूल केले, कबूल करतो ## व्याख्या: कबूल करणे ह्याचा अर्थ एखादी गोष्ट सत्य आहे हे मान्य करणे किंवा निश्चय होणे. * "कबूल करतो" हे एखादी गोष्ट सत्य आहे ह्याचे एक विधान आहे किंवा मान्यता आहे. * "कबूल करणे" ह्याचा संदर्भ देवाच्या सत्याबद्दल धाडसाने संगण्याशी येतो. ह्याचा संदर्भ आपण पाप केले आहे हे मान्य करण्याशी देखील येतो. * पवित्र शास्त्र असे सांगते की, जर लोकांनी त्यांची पापे देवाजवळ कबूल केली तर, तो त्यांना क्षमा करेल. * प्रेषित याकोब, त्याच्या पत्रामध्ये असे लिहितो की, जेंव्हा विश्वासणारे त्यांचे पाप एकमेकांजवळ कबूल करतात, तेंव्हा ते आत्म्यामध्ये आरोग्य घेऊन येत. * प्रेषित पौल फिलीप्पीकरांस लिहितो की, एके दिवशी प्रत्येकजण कबूल किंवा घोषित करेल की, येशू प्रभु आहे. * पौलाने असे देखील म्हंटले की, जर लोक आपल्या मुखाने येशु प्रभू आहे असे कबूल करतील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरतील, तर त्यांना तारणप्राप्ती होईल. ## भाषांतर सूचना: * संदर्भाच्या आधारावर, "कबूल करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "मान्य करणे" किंवा "घोषणा करणे" किंवा "सत्य स्वीकारणे" किंवा "जाहीर करणे" ह्यांचा समावेश होतो. * "कबूल करतो" या भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "घोषणा करणे" किंवा "साक्ष देणे" किंवा "आम्ही काय विश्वास करतो ह्याचे विधान करणे" किंवा "पाप मान्य करणे" ह्यांचा समावेश होतो. (हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/faith.md), [साक्ष](../kt/testimony.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 योहान 01:8-10](rc://mr/tn/help/1jn/01/08) * [2 योहान 01:7-8](rc://mr/tn/help/2jn/01/07) * [याकोबाचे पत्र 05:16-18](rc://mr/tn/help/jas/05/16) * [लेवीय 05:5-6](rc://mr/tn/help/lev/05/05) * [मत्तय 03:4-6](rc://mr/tn/help/mat/03/04) * [नहेम्या 01:6-7](rc://mr/tn/help/neh/01/06) * [फिलीप्पेकरास पत्र 02:9-11](rc://mr/tn/help/php/02/09) * [स्तोत्र 038:17-18](rc://mr/tn/help/psa/038/017) # Strong's * Strong's: H3034, H8426, G1843, G3670, G3671