# कनवाळू (दया), दयाळू ## व्याख्या: "कनवाळू" या शब्दाचा संदर्भ लोकांबद्दल असणाऱ्या चिंतेच्या भावनेशी आहे, विशेषकरून असे लोक जे त्रास सहन करत आहेत. एक "दयाळू" व्यक्ती लोकांच्याबद्दल काळजी करतो आणि त्यांना मदत करतो. * "कनवाळू" या शब्दामध्ये, सामान्यतः गरजेमध्ये असलेल्या लोकांची काळजी घेणे त्याच बरोबर त्यांना मदत करण्यासाठी योग्य ती कृती करणे, ह्यांचा समावेश होतो. * पवित्र शास्त्र सांडते की, देव दयाळू आहे, म्हणजेच, तो प्रेमाने आणि दयेने भरलेला आहे. * पौलाच्या कलस्सैकरांस पत्रामध्ये, तो त्यांना "स्वतःवर कनवाळूपानाची वस्त्रे चढवा" असे सांगतो. तो त्यांना लोकांच्याबद्दल काळजी घेण्यास आणि सक्रीयपणे इतरांना जे गरजू आहेत त्यांना मदत करण्याच्या सूचना देतो. ## भाषांतर सूचना * "कनवाळू" या शब्दाचा शब्दशः अर्थ "दयेचा कटोरा (दयाळूपणा)" असा होतो. ही एक अभिव्यक्ती आहे जिचा अर्थ "दया" आणि "करुणा" असा होतो. इतर भाषेमध्ये कदाचित ह्याच्या अर्थाची त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असू शकते. * "कनवाळू" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एखाद्याबद्दल खोल काळजी करणे" किंवा "मदतयुक्त दया" ह्यांचा समावेश होतो. * "दयाळू" या शब्दाचे भाषांतर "मदत करणारा" किंवा "गंभीरपणे प्रेमळ आणि क्षमाशील" असेही केले जाऊ शकते. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [दानीएल 01:8-10](rc://mr/tn/help/dan/01/08) * [होशे 13:14](rc://mr/tn/help/hos/13/14) * [याकोबाचे पत्र 05:9-11](rc://mr/tn/help/jas/05/09) * [योना 04:1-3](rc://mr/tn/help/jon/04/01) * [मार्क 01:40-42](rc://mr/tn/help/mrk/01/40) * [रोमकरास पत्र 09:14-16](rc://mr/tn/help/rom/09/14) # Strong's * Strong's: H2550, H7349, H7355, H7356, G1653, G3356, G3627, G4697, G4834, G4835