# शुद्ध, पवित्र करणे, शुद्ध केले, धुणे, धुण्यासाठी, धुतले, अशुद्ध ## व्याख्या: "शुद्ध" या शब्दाचा शब्दशः अर्थ कोणतीही घाण किंवा डाग नसणे असा होतो. पवित्र शास्रामध्ये, सहसा ह्याचा उपयोग लाक्षणिकरित्या "शुद्ध," "पवित्र," किंवा "पापापासून मुक्त" या अर्थाने केला आहे. * "पवित्र करणे" म्हणजे काहीतरी "शुद्ध" करण्याची प्रक्रिया आहे. ह्याचे भाषांतर "धुणे" किंवा "शुद्ध करणे" असे देखील केले जाऊ शकते. * जुन्या करारामध्ये, देवाने इस्राएली लोकांना कोणता प्राणी धार्मिक रीतीने "शुद्ध" आहे आणि कोणता "अशुद्ध" आहे हे सांगितले. फक्त शुद्ध प्रण्यानांच खाण्यासाठी किंवा बलिदानासाठी वापरण्याची परवानगी होती. या संदर्भामध्ये, "शुद्ध" या शब्दाचा अर्थ, असा प्राणी जो देवाला बलिदान करण्यासाठी ग्राह्य मानला जातो असा होतो. एखाद्या मनुष्याला जर काही विशिष्ठ त्वचेचा रोग असेल, तर त्याला त्याची त्वचा इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही, इथपर्यंत बरी होईपर्यंत अशुद्ध समजण्यात यावा. त्या व्यक्तीला पुन्हा "शुद्ध" घोषित करण्यासाठी, शुद्ध होण्याच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे होते. * काहीवेळा "शुद्ध" या शब्दाला, लाक्षणिकरित्या नैतिक शुद्धतेला संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. पवित्र शास्त्रामध्ये, "अशुद्ध" हा शब्द, लाक्षणिकरित्या अशा गोष्टींसाठी वापरला जातो, ज्यांना देवाने त्याच्या लोकांनी स्पर्श करणे, खाणे, किंवा बलिदान करणे यासाठी अयोग्य घोषित केल्या आहेत. * देवाने इस्राएल लोकांना कोणता प्राणी "शुद्ध" आहे आणि कोणता "अशुद्ध" आहे ह्याबद्दल सूचना दिल्या होत्या. अशुद्ध प्राण्यांना खाण्यासाठी किंवा बलिदानासाठी वापरण्याची परवानगी नव्हती. * विशिष्ठ त्वचेचा आजार असलेल्या लोकांना, ते बरे होईपर्यंत "अशुद्ध" म्हंटले जात असे. * जर इस्राएली लोकांनी काहीतरी "अशुद्ध" वस्तूला स्पर्श केला, तर काही काळासाठी ते स्वतःला अशुद्ध समजत असत. * अशुद्ध गोष्टींना स्पर्श करू किंवा खाऊ नका या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याने, इस्राएली लोकांना देवाच्या सेवेसाठी वेगळे ठेवण्यात आले. * ही भौतिक आणि धार्मिक विधी देखील नैतिक अशुद्धपणाचे प्रतीक आहे. * दुसऱ्या लाक्षणिक अर्थाने, "अशुद्ध आत्मा" ह्याचा संदर्भ दुष्ट आत्म्याशी आहे. ## भाषांतर सूचना या शब्दाचे भाषांतर "शुद्ध" किंवा "पवित्र" ह्याच्यासाठीच्या सामान्य शब्दाने केले जाऊ शकते (गलिच्छ नसल्याच्या अर्थाने). * ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "धार्मिकरित्या शुद्ध" किंवा "देवाला ग्रहणीय" असे केले जाऊ शकते. * "पवित्र करणे" ह्याचे भाषांतर "धुणे" किंवा "शुद्ध करणे" असे देखील केले जाऊ शकते. * "शुद्ध" आणि "पवित्र" साठी वापरलेले शब्द, लाक्षणिक अर्थाने देखील समजले जाऊ शकतात याची खात्री करा. * "अशुद्ध" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध नसलेला" किंवा "देवाच्या नजरेमध्ये अयोग्य" किंवा "शारीरिकदृष्ट्या अशुद्ध" किंवा "अपवित्र" असे देखील केले जाऊ शकते. * जेंव्हा अशुद्ध आत्मा, ह्यामध्ये सैतानाला संदर्भित केले जाते, तेंव्हा "अशुद्ध" ह्याचे भाषांतर "दुष्ट" किंवा "अपवित्र" असे केले जाऊ शकते. * या शब्दाच्या भाषांतरात आत्मिक अशुधातेला परवानगी असावी. ते, देवाने स्पर्श करणे, खाणे किंवा बलीदान करण्यास निरुपयोगी म्हणून घोषित केलेले, काहीही संदर्भित करण्यास सक्षम असावे. (हे सुद्धा पहा: [अपवित्र](../other/defile.md), [सैतान](../kt/demon.md), [पवित्र](../kt/holy.md), [बलिदान](../other/sacrifice.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ति 07:1-3](rc://mr/tn/help/gen/07/01) * [उत्पत्ति 07:8-10](rc://mr/tn/help/gen/07/08) * [अनुवाद 12:15-16](rc://mr/tn/help/deu/12/15) * [स्तोत्र 051:7-9](rc://mr/tn/help/psa/051/007) * [नीतिसूत्रे 20:29-30](rc://mr/tn/help/pro/20/29) * [यहेज्केल 24:13](rc://mr/tn/help/ezk/24/13) * [मत्तय 23:27-28](rc://mr/tn/help/mat/23/27) * [लुक 05:12-13](rc://mr/tn/help/luk/05/12) * [प्रेषितांची कृत्ये 08:6-8](rc://mr/tn/help/act/08/06) * [प्रेषितांची कृत्ये 10:27-29](rc://mr/tn/help/act/10/27) * [कलस्सैकरांस पत्र 03:5-8](rc://mr/tn/help/col/03/05) * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 04:7-8](rc://mr/tn/help/1th/04/07) * [याकोबाचे पत्र 04:8-10](rc://mr/tn/help/jas/04/08) # Strong's * Strong's: H1249, H1252, H1305, H2134, H2135, H2141, H2398, H2548, H2834, H2889, H2890, H2891, H2893, H2930, H2931, H2932, H3001, H3722, H5079, H5352, H5355, H5356, H6172, H6565, H6663, H6945, H7137, H8552, H8562, G167, G169, G2511, G2512, G2513, G2839, G2840, G3394, G3689