# सुंता, सुंता केलेले, सुंता झालेले, अशुद्ध (सुंता न केलेले), सुंता न झालेले ## व्याख्या: "सुंता" या शब्दाचा अर्थ मनुष्याची किंवा नर मुलाची अग्रत्वचा कापणे. सुंता करण्याचा विधी याच्या संदर्भातच केला जात असे. * देवाने त्यांच्याशी केलेल्या कराराच्या चिन्हादाखल, देवाने अब्राहमला त्याच्या कुटुंबातील आणि सेवकांतील प्रत्येक पुरुषाची सुंता करण्यास सांगितले. * देवाने अब्राहामाच्या वंशजांना त्यांच्या कुटूंबातील प्रत्येक लहान नर मुलाच्या जन्मानंतर असे करण्याची आज्ञा दिली. * "हृदयाची सुंता झालेले" या वाक्यांशाचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने एकाद्या मनुष्यापासून पाप "बाजूला करणे" किंवा काढून टाकणे असा होतो. * आत्मिक अर्थाने, "सुंता केलेले" या शब्दाचा संदर्भ अशा लोकांशी आहे, ज्यांना देवाने येशूच्या रक्ताच्याद्वारे पापापासून शुद्ध केले आहे आणि जे त्याचे लोक आहेत. * "अशुद्ध (सुंता न केलेले)" हा शब्द ज्यांची शारीरिक सुंता झालेली नाही अशा लोकांच्या सद्नार्भात आहे. लाक्षणिक अर्थाने त्याचा संदर्भ आत्मिक सुंता न झालेल्यांना सुद्धा देता येतो,असे लोक ज्यांचा संबंध देवाबरोबर नाही. "सुंता न केलेले" किंवा "सुंता न झालेले" या शब्दांचा संदर्भ अशा पुरुषाशी आहे ज्याची शारीरिक सुंता केलेली नाही. या संज्ञादेखील लाक्षणिक अर्थाने वापरल्या जाऊ शकतात. * मिसर हा एक देश होता ज्यात सुद्धा सुंता होणे गरजेचे होते. म्हणून , जेंव्हा देव "बेसुंती (सुंता न झालेल्या)" लोकांच्याकडून मिसरच्या पराभवाबद्दल बोलतो, तेंव्हा तो अशा लोकांना संदर्भित करतो ज्यांना मिसाऱ्यांनी सुंता न केल्याबद्दल तुच्छ मानले होते. * पवित्र शास्त्रामध्ये "सुंता न झालेल्या हृदयाचा मनुष्य" किंवा "हृदयामध्ये सुंता न झालेल्या" लोकांचा संदर्भ आहे. हे लोक देवाचे लोक नाहीत आणि दुराग्रहाने त्यांनी देवाची आज्ञा मानली नाही अशा लोकांसाठी हे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते. * सुंता करण्यासाठीचा एखादा शब्द एखाद्या भाषेत वापरला जातो किंवा ज्ञात असतो, तेंव्हा "अशुद्ध" हा शब्द "सुंता न केलेला" असा भासंतरीत केला जातो. * "सुंता न झालेले" या शब्दाचे भाषांतर संदर्भाच्या आधारावर "सुंता न झालेले लोक" किंवा "देवाचे नसलेले लोक" असे केले जाऊ शकते. * या संज्ञाच्या लाक्षणिक भावनांचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गामध्ये, "देवाचे लोक नव्हेत" किंवा जे देवाचे लोक नाहीत अशा लोकांसारखे बंडखोर" किंवा "असे लोक ज्यांच्याकडे ते देवाचे लोक असल्याचे कोणतेही चिन्ह नाही" या वाक्यांशाचा समवेश होतो. * "हृदयामध्ये सुंता न झालेले" या अभिव्यक्तीला "दुराग्रही बंडखोर" किंवा "विश्वास ठेवण्यास नकार देणारे" असे भाषांतरित केले जाऊ शकते. तथापि, जर शक्य असेल तर ही अभिव्यक्ती तशीच ठेवणे किंवा त्यासारखीच समान वापरणे हे सर्वोत्तम ठरेल, ज्याअर्थी आत्मिक सुंता झालेले ही एक महत्वाची संकल्पना आहे. ## भाषांतर सूचना * जर लक्ष्यित भाषेची संस्कृती पुरुषांची सुंता करण्याची असेल तर या शब्दासाठी त्या भाषेतील तोच शब्द वापरला पाहिजे. * या शब्दाला भाषांतरित करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "बाजूने कापणे" किंवा "वर्तुळाकार कापणे" किंवा अग्रत्वचा कापणे" या शब्दांचा समवेश होतो. * ज्या संस्कृतीमध्ये सुंता करणे माहित नाही, त्यासाठी ते एक तळटीप किंवा शब्दकोशात स्पष्ट करणे गरजेचे आहे. * या संज्ञेच्या भाषांतराचा स्त्रीशी काहीही संबंध नाही हे सुनिश्चित करा. "नर" चा अर्थ अंतर्भूत असलेल्या शब्दासह किंवा वाक्यांशासह याचे भाषांतर करणे गरजेचे आहे. (हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) (हे सुद्धा पहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [करार](../kt/covenant.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ति 17:9-11](rc://mr/tn/help/gen/17/09) * [उत्पत्ति 17:12-14](rc://mr/tn/help/gen/17/12) * [निर्गमन 12:47-48](rc://mr/tn/help/exo/12/47) * [लेवीय 26:40-42](rc://mr/tn/help/lev/26/40) * [यहोशवा 05:2-3](rc://mr/tn/help/jos/05/02) * [शास्ते 15:17-18](rc://mr/tn/help/jdg/15/17) * [2 शमुवेल 01:17-20](rc://mr/tn/help/2sa/01/17) * [यिर्मया 09:25-26](rc://mr/tn/help/jer/09/25) * [यहेज्केल 32:24-25](rc://mr/tn/help/ezk/32/24) * [प्रेषितांची कृत्ये 10:44-45](rc://mr/tn/help/act/10/44) * [प्रेषितांची कृत्ये 11:1-3](rc://mr/tn/help/act/11/01) * [प्रेषितांची कृत्ये 15:1-2](rc://mr/tn/help/act/15/01) * [प्रेषितांची कृत्ये 11:1-3](rc://mr/tn/help/act/11/01) * [रोमकरास पत्र 02:25-27](rc://mr/tn/help/rom/02/25) * [गलतीकरांस पत्र 05:3-4](rc://mr/tn/help/gal/05/03) * [इफिसकरांस पत्र 02:11-12 * [फिलीप्पेकरास पत्र 03:1-3](rc://mr/tn/help/eph/02/11) * [कलस्सैकरांस पत्र 02:10-12](rc://mr/tn/help/php/03/01) * [कलस्सैकरांस पत्र 02:13-15](rc://mr/tn/help/col/02/10) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[05:03](rc://mr/tn/help/col/02/13)__ तु आपल्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाची __सुंता__ कर. * __[05:05](rc://mr/tn/help/obs/05/03)__ त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घराण्यातील सर्व पुरुषांची __सुंता__ केली. # Strong's * Strong's: H4135, H4139, H5243, H6188, H6189, H6190, G203, G564, G1986, G4059, G4061