# मंडळी, मंडळ्या, ## व्याख्या: नवीन करारामध्ये, "मंडळी" या शब्दाचा उल्लेख, येशुंवर विश्वास ठेवणाऱ्या स्थानिक लोकांचा समुह, जो नित्यनेमाने प्रार्थना करण्यास आणि देवाच्या वचनांचा उपदेश ऐकण्यास एकत्रित होत असे अशा लोकांसाठी केलेला आहे. "मंडळी" हा शब्द सहसा सर्व ख्रिस्ती लोकांना संदर्भित करण्यासाटी वापरला जातो. * या शब्दाचा शब्दशः अर्थ एक "घोषित" विधानसभा किंवा एका विशिष्ट उद्देशाने एकत्र येणा-या लोकांची मंडळी असा होतो. * जेंव्हा या शब्दाचा संदर्भ सर्व ठिकाणच्या ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीरातील विश्वासनाऱ्यांना होतो, तेंव्हा काही पवित्र शास्त्राच्या भाषांतरात स्थानिक मंडळी पासून ही मंडळी वेगळी आहे हे दर्शवण्यासाठी मंडळी ("Church") याचे पहिले अक्षर मोठे लिहिले जाते. * बऱ्याचदा विशिष्ठ शहरातील विश्वासू लोक एखाद्याच्या घरात एकत्र जमतात. या स्थानिक मंडळ्यांना त्यांच्या शहराच्या नावाने ओळखले जात असे, जसे की, "इफिसची मंडळी." * पवित्र शास्त्रामध्ये, "मंडळीचा" संदर्भ इमारतीशी येत नाही. ## भाषांतर सूचना * "मंडळी" या शब्दाचे भाषांतर "एकत्रित येणे" किंवा "विधानसभा" किंवा "परिषद" किंवा "असे लोक जे एकत्र भेटतात" असे केले जाऊ शकते. * शब्द किंवा वाक्यांश ज्याचा वापर या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी केला जातो, तोच शब्द सर्व विश्वासनाऱ्यांना, एखाद्या छोट्या गटासाठी नाही संदर्भित करण्यासाठी सक्षम असला पाहिजे. * "मंडळी"या शब्दाचे भाषांतर करताना त्याचा संदर्भ इमारतीशी येणार नाही याची खात्री करा. * जुन्या करारामध्ये "विधानसभा" याचे भाषांतर करण्यासाठी वापरला जाणारा शब्द देखील या संज्ञाचा अनुवाद करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. * स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) (हे सुद्धा पहा: [विधानसभा](../other/assembly.md), [विश्वास](../kt/believe.md), [ख्रिस्ती](../kt/christian.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 करिंथकरांस पत्र 05:11-13](rc://mr/tn/help/1co/05/11) * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:14-16](rc://mr/tn/help/1th/02/14) * [1 तीमथ्य 03:4-5](rc://mr/tn/help/1ti/03/04) * [प्रेषितांची कृत्ये 09:31-32](rc://mr/tn/help/act/09/31) * [प्रेषितांची कृत्ये 14:23-26](rc://mr/tn/help/act/14/23) * [प्रेषितांची कृत्ये 15:39-41](rc://mr/tn/help/act/15/39) * [कलस्से. 04:15-17](rc://mr/tn/help/col/04/15) * [इफिसकरांस पत्र 05:22-24](rc://mr/tn/help/eph/05/22) * [मत्तय 16:17-18](rc://mr/tn/help/mat/16/17) * [फिलीप्पेकरास पत्र 04:14-17](rc://mr/tn/help/php/04/14) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[43:12](rc://mr/tn/help/obs/43/12)__ तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या __मंडळीमध्ये__ सामिल झाले. * __[46:09](rc://mr/tn/help/obs/46/09)__ अंत्युखिया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण प्रथमच, त्यांच्यापैकी पुष्कळ लोक सुद्धा विश्वासणारे झाले. * बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व __मंडळीला__ उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले. * __[46:10](rc://mr/tn/help/obs/46/10)__ तेव्हा अंत्युखिया येथील __मंडळीने__ शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले. * आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठविले. * __[47:13](rc://mr/tn/help/obs/47/13)__ येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली व __मंडळीची__ वाढ होत गेली. * __[50:01](rc://mr/tn/help/obs/50/01)__ सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत. __मंडळीची__ वाढ होत आहे. # Strong's * Strong's: G1577