# विश्वास, विश्वासणारा, अविश्वासणारा, अविश्वासणारे, अविश्वास ## व्याख्या: "विश्वास" आणि "च्या वर विश्वास असणे" या शब्दांमध्ये जवळचे संबंध आहेत, पण त्यांच्या अर्थामध्ये थोडा फरक आहे. ## 1. विश्वास * एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे ती गोष्ट सत्य आहे हे स्वीकारणे किंवा ती खरी आहे यावर विश्वास ठेवणे. * एखाद्या व्यक्तीने जे सांगितले आहे ते सत्य आहे हे कबूल करणे म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे. ## 2. च्या वर विश्वास असणे * "एखाद्यावर विश्वास असणे" म्हणजे त्या व्यक्तीवर "दृढ श्रद्धा" असणे. याचा अर्थ असा होतो जे तो व्यक्ती बोलतो की तो आहे त्यावर विश्वास ठेवणे, तो नेहमीच सत्य बोलतो आणि त्याने जे वचन दिले आहे ते तो करेल ह्यावर सुद्धा विश्वास ठेवणे. * जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा तो अशा प्रकारे कार्य करेल की तो विश्वास दिसुन येईल. * "विश्वास धरणे" या शब्दाचा सहसा अर्थ "च्या वर विश्वास असणे" असाच होतो. * "येशूवर विश्वास ठेवणे" म्हणजे तो देवाचा पुत्र आहे असा विश्वास बाळगणे म्हणजे तो स्वतःच देव आहे आणि जो मनुष्य सुद्धा झाला आणि जो आपल्या पापांची भरपाई करण्यासाठी बलिदान म्हणून मरण पावला. याचा अर्थ उद्धारकर्ता म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याला सन्मानित अशा मार्गाने जगणे. पवित्र शास्त्रामध्ये "विश्वासणारा" या शब्दाचा अर्थ, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि तारणारा म्हणून त्याच्यावर अवलंबून राहणे असा होतो. * "विश्वासणारा" या शब्दाचा शब्दशः अर्थ "विश्वास ठेवणारा व्यक्ती" असा आहे. * संज्ञा "ख्रिस्ती" अखेरीस विश्वासणाऱ्यांसाठी मुख्य शीर्षक ठरले कारण ते दर्शविते की ते ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या शिकवणींचे पालन करतात. "अविश्वास" या शब्दाचा संदर्भ एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास न ठेवणाऱ्याशी आहे. * पवित्र शास्त्रामध्ये, "अविश्वास" या शब्दाचा संदर्भ येशूवर विश्वास न ठेवणारा किंवा त्याला स्वतःचा तारणहार म्हणून त्याचा स्वीकार न करणारा याच्याशी आहे. * येशूवर विश्वास नसलेल्या व्यक्तीला "अविश्वासू" असे म्हटले जाते. ## भाषांतर सूचना * "विश्वास" या शब्दाचे भाषांतर "सत्य असल्याचे ठाऊक आहे" किंवा "योग्य असल्याचे ठाऊक आहे" असे केले जाऊ शकते. * "च्या वर विश्वास असणे" या शब्दाचे भाषांतर "संपूर्णपणे विश्वास असणे" किंवा "विश्वास ठेवणे आणि आज्ञा पाळणे" किंवा "पूर्णपणे विसंबून राहणे व अनुसरणे" असे केले जाऊ शकते. * काही भाषांतरे "येशूवर विश्वास ठेवणारा" किंवा "ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा" या वाक्यांशाला प्राधान्य देतात. * या पदांचे भाषांतर "येशूवर विश्वास ठेवणारी व्यक्ती" किंवा "एखादा व्यक्ती जो येशूला ओळखतो आणि त्याच्यासाठी जगतो" अशा शब्दांनी किंवा वाक्यांशानी सुद्धा केला जाऊ शकतो. * "विश्वासणारा" या शब्दाचे भाषांतर "येशूचे अनुयायी" किंवा "एखादा व्यक्ती जो येशूला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो" अशा मार्गांनी सुद्धा केले जाऊ शकते. * "विश्वासणारा" हा ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्वसामान्य शब्द आहे, तर "शिष्य" आणि "प्रेषित" या शब्दाचा उपयोग विशेषकरून अशा लोकांसाठी वापरण्यात आला जे येशू जिवंत असताना त्याला ओळखत होते. या शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे भाषांतर करणे त्यांना वेगळे ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. * "अविश्वास" या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग "विश्वासाची कमतरता" किंवा "विश्वास न ठेवणारा" असे होऊ शकतात. * "अविश्वासणारा" या शब्दाचे भाषांतर " असा व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवत नाही" किंवा "जो कोणी तारणहार म्हणून येशूवर विश्वास ठेवत नाही" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/believe.md), [प्रेषित](../kt/apostle.md), [ख्रिस्ती](../kt/christian.md), [शिष्य](../kt/disciple.md) [विश्वास](../kt/faith.md), [विश्वास](../kt/trust.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ति 15:6-8](rc://mr/tn/help/gen/15/06) * [उत्पत्ति 45:24-26](rc://mr/tn/help/gen/45/24) * [ईयोब 09:16-18](rc://mr/tn/help/job/09/16) * [हबक्कूक 1:5-7](rc://mr/tn/help/hab/01/05) * [मार्क 06:4-6](rc://mr/tn/help/mrk/06/04) * [मार्क 01:14-15](rc://mr/tn/help/mrk/01/14) * [लुक 09:41-42](rc://mr/tn/help/luk/09/41) * [योहान 01:12-13](rc://mr/tn/help/jhn/01/12) * [प्रेषितांची कृत्ये 06:5-6](rc://mr/tn/help/act/06/05) * [प्रेषितांची कृत्ये 09:40-43](rc://mr/tn/help/act/09/40) * [प्रेषितांची कृत्ये 28:23-24](rc://mr/tn/help/act/28/23) * [रोमकरास पत्र 03:3-4](rc://mr/tn/help/rom/03/03) * [1 करिंथकरांस पत्र 06:1-3](rc://mr/tn/help/1co/06/01) * [1 करिंथकरांस पत्र 09:3-6](rc://mr/tn/help/1co/09/03) * [2 करिंथकरांस पत्र 06:14-16](rc://mr/tn/help/2co/06/14) * [इब्री लोकांस पत्र 03:12-13](rc://mr/tn/help/heb/03/12) * [1 योहान 03:23-24](rc://mr/tn/help/1jn/03/23) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[03:04](rc://mr/tn/help/obs/03/04)__ नोहाने लोकांना प्रलयाविषयी सांगितले व देवाकडे वळण्यास सांगितले पण कोणीही त्याच्याकडे __लक्ष__ दिले नाही. * __[04:08](rc://mr/tn/help/obs/04/08)__ अब्रामाने देवाच्या वचनावर __विश्वास__ ठेवला. देवावर ठेवलेल्या __विश्वासामुळे__ देवाने अब्रामाला नितिमान ठरवले. * __[11:02](rc://mr/tn/help/obs/11/02)__ जो कोणी देवावर __विश्वास__ ठेवील त्याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास वाचविण्यासाठी देवाने मार्ग काढला. * __[11:06](rc://mr/tn/help/obs/11/06)__ परंतु मिस-यांनी देवावर __विश्वास__ ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. * __[37:05](rc://mr/tn/help/obs/37/05)__ येशू म्हणाला, ‘‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ‌माझ्यावर __विश्वास__ ठेवणारा मेला असला तरी जगेल. आणि जो मजवर __विश्वास__ ठेवितो तो कधीही मरणार नाही. याजवर तू __विश्वास__ ठेवतेस काय?’’ * __[43:01](rc://mr/tn/help/obs/43/01)__ येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे शिष्य यरूशलेमेतच राहिले. तेथील __विश्वासणारे__ प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र येऊ लागले. * __[43:03](rc://mr/tn/help/obs/43/03)__ जेंव्हा सर्व __विश्वासणारे__ एकत्र जमले होते एकाएकी ते बसले होते ती खोली सोसाट्याच्या वा-यासारख्या ध्वनीने भरून गेली. तेव्हा अग्निच्या ज्वालेसारख्या जिभा त्यांना सर्व __विश्वासणा-यांच्या__ डोक्यावर दिसल्या. * __[43:13](rc://mr/tn/help/obs/43/13)__ प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन __विश्वासणा-यांची__ भर पडत होती. * __[46:06](rc://mr/tn/help/obs/46/06)__ त्या दिवसांमध्ये, यरूशलेमेतील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांचा छळ करत होते, म्हणून __शिष्य__ दुस-या ठिकाणी पळून गेले. पण, असे असतांनाही, जेथे कोठे ते गेले, त्यांनी येशूविषयी प्रचार केला. * __[46:01](rc://mr/tn/help/obs/46/01)__ शौल हा तरुण मनुष्य स्तेफनाला दगडमार करणा-यांची वस्त्रे सांभाळत होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो __विश्वासी__ लोकांचा छळ करत असे. * __[46:09](rc://mr/tn/help/obs/46/09)__ यरूशलेमेतील छळामुळे काही __विश्वासणारे__ दूर अंत्युखिया शहरामध्ये गेले व तेथे त्यांनी येशूविषयी प्रचार केला. अंत्युखिया येथील येशूवर __विश्वास__ ठेवणा-यांना प्रथमच "ख्रिस्ती" म्हटले गेले. * __[47:14](rc://mr/tn/help/obs/47/14)__ त्यांनी पुष्कळ पत्रे सुद्धा लिहीली व मंडळ्यातील __विश्वासणा-यांना__ प्रोत्साहन व शिक्षण दिले. # Strong's * Strong's: H539, H540, G543, G544, G569, G570, G571, G3982, G4100, G4102, G4103, G4135